Home Blog Page 2566

शिवदर्शन मध्ये महापालिकेच्या अन्नधान्याचे किट वाटप

पुणे-ज्येष्ठ नगरसेवक आणि कॉंग्रेसचे नेते आबा बागुल यांना हि महापालिकेच्या वतीने वाटण्यात येणाऱ्या अन्न धान्याच्या कीट साठी अधिकाऱ्यांना फैलावर घ्यावे लागले होते . आज अखेरीस महानगरपालिकेशी पाठपुरवठा करून, प्रतिबंधित भागात पुणे महानगरपालिकेचे धान्यांचे किट उपलब्ध करून घेण्यात आले . आज शिवदर्शन भागात रेशन किट वाटप करण्यात आले आहे.स्वतः बागुल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यात लक्ष घालून गरजूंना ते मिळते कि नाही हे पाहून वाटप करवून घेतले. 3 ते 4 दिवसांनी पुणे महानगर पालिकेकडून शाहू वसाहत येथे 600 धान्यांच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे नागरीकांनी सहकार्य करावे.

राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६५ हजार ७०० क्विंटल अन्नधान्य तर २९ लाख ४६ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

0

मुंबई, दि. २८ : स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ते २७ मे पर्यंत राज्यातील १ कोटी ४७ लाख ५३ हजार ७२८ शिधापत्रिका धारकांना ६९ लाख ६५ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २९ लाख ४६  हजार ९११ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे २० लाख १० हजार ८८३ क्विंटल गहू, १५ लाख ४५ हजार १४६ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ४५३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख १५ हजार २७६ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ४ मे पासून एकूण १ कोटी १५ लाख ३४ हजार २९२ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी १८ लाख ३१ हजार ६७६  लोकसंख्येला २५ लाख ९१ हजार ५८० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.  

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६  एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आतापर्यंत ८ लाख १८ हजार ९० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५९ हजार ०१२  क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

राज्यात १ मे ते २७ मे पर्यंत ८३३ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २९ लाख ४६ हजार ९११ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आता सर्वांसाठी

0

कोविड-19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने युध्द पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील सर्व जनतेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देणारे देशातील महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये काही ठिकाणी शासकीय रुग्णालये कोविड-19 रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-19 रुग्णांना अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये, कोविड-19 महामारीच्या संकटामध्ये सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा यासाठी मर्यादित कालावधीसाठी योजनेची व्याप्ती सर्व नागरिकांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून प्राप्त झाला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचाराचा लाभ लाभार्थी रुग्णांबरोबर इतर रुग्णानांदेखील मिळावा आणि शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या उपचार पध्दती उपलब्ध व्हाव्यात व योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयातील डॉक्टर, इतर कर्मचारी व अनुषंगिक कर्मचारी यांना कोविड-19 साथरोग प्रतिबंध संदर्भात आवश्यक साधन सामग्री उपलब्ध व्हावी. यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला.

कोविड-19 उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थितीचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपाचार करण्याकरिता लाभार्थी रुग्णांबरोबर राज्यातील सदर योजनेचे लाभार्थी नसलेल्या इतर रुग्णांनादेखील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड-19 साठी उपचार अनुज्ञेय असणार आहेत. राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करावी. (लाभार्थ्यांला रहिवासी पुरावा म्हणून वैध पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसिलदार यांचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक पुरावाजन्य कागदपत्र सादर करावे लागेल. त्याबरोबरच शासनमान्य फोटो ओळखपत्र देणे आवश्यक राहील. कोरोनाच्या साथीचे गांभीर्य, उपचाराची तातडी पाहता उपचारासाठी आवश्यक कागदपत्राबाबत शिथिलता देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांना देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 1 हजार 209 उपचार पुरविले जात असून याचा लाभ राज्यातील 2.23 कोटी कुटूंबांना मिळत आहे. या अंतर्गत राज्यातील सुमारे 85 टक्के लोकसंख्येचा समावशे होतो. तथापि राज्यातील कोविड-19 उद्रेकाची सद्यस्थिती पाहता सद्यस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्‍ट नसलेल्या राज्यातील रहिवासी असलेल्या उर्वरित नागरिकांना सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अनुज्ञेय 996 उपचार पध्दतीचा लाभ मान्यता प्राप्त दराने अंगीकृत रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शासकीय रुग्णालयाकरिता राखीव असलेल्या 134 उपचारापैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व श्रवणयंत्राचा उपचार वगळता 120 उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांना 31 जुलै 2020 पर्यंत मान्यता प्राप्त दराने देण्यात यावेत. योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खर्चाची प्रतीपूर्ती विमा कंपनीकडून व योजनेंतर्गत लाभार्थी नसलेल्या कुटूंबाच्या उपचाराची खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत हमी तत्वावर करण्यात येईल.

किरकोळ व काही मोठे उपचार व तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट नाही. त्या उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना (योजनेंतर्गत लाभार्थी असलेले व लाभार्थी नसलेले) CGHS च्या दरानुसार (NABH/NABL) उपलब्ध करून देण्यात येतील. सदर खर्चाची प्रतीपूर्ती संबंधित रुग्णालयास राज्य शासनाद्वारे राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्यामार्फत हमी तत्वावर करण्यात येईल.

कोविड-19 साठी शासनाने जाहीर केलेल्या खाजगी अंगीकृत रुग्णालयांकडून कोरोना संशयीत रुग्णांवर उपचार करण्याकरिता पीपीई किटस् व एन-95 मास्कचा आवश्यक वापर करण्यात येईल. त्या प्रमाणात प्रत्यक्ष शासनाने ठरविलेल्या दरानुसार निधी देण्यात येईल. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत सनियंत्रण केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील. तसेच प्रतीपूर्ती करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, याची खबरदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांची राहील. योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी सोसायटीने योजनेची मार्गदर्शक तत्वे, अटी व शर्तीनुसार करावी. सदर योजना 31 जुलै 2020 पर्यंत अंमलात राहील. तद्नंतर याबाबत आढावा घेऊन मुदतवाढीचा निर्णय शासनस्तरावरून घेण्यात येणार आहे.

कोकण विभागातील सर्व जनतेला याद्वारे आवाहन करण्यात येते की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमार्फत कोविड-19 साठी सर्व जनतेला उपचाराची सोय करण्यात आली आहे. जनतेने या योजनेचा योग्य तो लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

विभागीय माहिती कार्यालय,

कोकण भवन, नवी मुंबई

शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

0

मुंबई, दि.28 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पद्धतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर  ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

श्री.पाटील म्हणाले, ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी प्रथमत: राबविण्यात येत आहे व यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध  ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सदर वखार पावती वखार अधिनियम, 1960 नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते.

वखार पावतीवर  शेतकऱ्यास प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतू या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पद्धतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करु शकतात.

तसेच शेतकऱ्यास यासंबंधिचे मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन त्याच्या स्मार्टफोनच्या आधारे मराठी मध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्मार्टफोनद्वारे शेतकऱ्यास आवश्यक  कागदपत्रे स्कॅन करुन पाठविता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल.

शेतकरी ठेवीदारांनी ऑनलाईन तारण कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेकडून ह्या अर्जाची छाननी केली जाईल व पात्र शेतकऱ्यास वखार पावतीवरील शेतमालाच्या किंमतीच्या 70 टक्के कर्ज बँकेकडून शेतकऱ्यांच्या बँक खाते आरटीजीएस अथवा एनएफटी द्वारे जमा केले जाईल.  शेतकऱ्यास ऑनलाईन कर्जाची सुविधा एक ते दोन दिवसात उपलब्ध करुन दिली जाईल.

तारण कर्जासाठी व्याजदर 9 टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा रुपये 5 लाख प्रति शेतकरी एवढी असून  वखार महामंडळाकडून शेतकऱ्यास साठवणूक भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यास प्रत्यक्ष बँकेत न जाता वेळोवळी कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज याची माहिती त्याच्या मोबाईलवर नोटीफिकेशनद्वारे दिली जाईल आणि शेतमाल विक्री करावयाचा असल्यास बँकेचे मुद्दल व त्यावरील व्याज ऑनलाइन भरणा केल्यावर शेतकऱ्याच्या वखार पावतीवरील बोजा कमी करण्यात येईल.

यामध्ये ब्लॉकतंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्याचा बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा या सर्व गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन होणार असल्याने शेतकऱ्याचा मोठा फायदा होणार आहे आणि ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांची वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे, असेही श्री.पाटील यांनी संगितले

प्रभाग क्र 26 येथे रक्तदान शिबिर संपन्न

पुणे-
नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे तसेच भारती हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने प्रभाग क्र.26 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच राज्यात रक्ताचा तुटवडा असून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे जाहीर आव्हान केले होते.त्या नुसार आज सोशल डिस्टनसिंग  चे नियम पळून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक रक्तदात्यास छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व प्रमाण पत्र देऊन सन्मान करण्यात आला .या शिबिरात महिला व युवतींचा यात लक्षणीय सहभाग होता तसेच असंख्य नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवला नगरसेक प्रमोद नाना भानगिरे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, अभिमन्यू भानगिरे,नाना तरवडे, संतोष भानगिरे,योगेश सातव,विक्रम फुकते, प्रवीण हिलगे,रोहित पवार, सुनील पाटील,यांनी या शबीराचे संयोजन केले.

305 समुहाकडून 71 लाख 35 हजारच्या मास्कची विक्री

0

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील 305 स्वयं-सहायता समुहाने या लॉकडाऊनच्या काळात 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती केली. केवळ निर्मिती करून न थांबता 71 लाख 35 हजार 16 रूपये किंमतीला या मास्कची विक्री करून कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न झाला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.रवी शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य या स्वयं-सहायता समुहांना मास्क निर्मितीसाठी लाभले आहे.

22 मार्च रोजी जनता कर्फ्यू सर्वप्रथम झाला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात लॉकडाऊनला सुरूवात झाली. या लॉकडाऊनच्या काळात घराघरात नवनवे उपक्रम, विशेषत: खाद्यपदार्थांच्या निर्मितीवर भर राहिला आहे. पण तो कुटूंबातील सदस्यांसाठी मर्यादित असेल. बदलत्या काळाची पावले ओळखत त्याच पद्धतीने स्वत:मध्ये बदल घडवण्याचे काम जिल्ह्यातील स्वयं-सहायता समुहातील महिलांनी केले आहे. बाजारातील मागणी आणि पुरवठा याचे गणित समजावून घेत जिल्ह्यातील या महिला सदस्यांनी लॉकडाऊनचा उत्तम फायदा करून घेतला आणि जिल्ह्यालाही दिला आहे. गेल्या 64 दिवसात मिळालेल्या संधीचं सोनं करत जिल्ह्यातील 305 स्वयं-सहाय्‌यता समुहातील 1301 महिला सदस्यांनी 5 लाख 55 हजार 742 मास्कची निर्मिती आजअखेर केली आहे. आजअखेर 71 लाख 35 हजार 16 रूपयांना याची विक्री झाली आहे.

आजरामधील 12, भुदरगडमधील 150, चंदगडमधील 15, गडहिंग्लजधील 17, बावडामधील 11, हातकणंगलेमधील 12, कागलमधील 17, करवीरमधील 16, पन्हाळ्यातील 14, राधानगरीतील 16, शाहूवाडीतील 13 आणि शिरोळमधील 12 अशा एकूण 305 समुहांचा समावेश आहे. यामध्ये कागलमधील समुहाने सर्वाधिक म्हणजे 2 लाख 42 हजार 10 मास्कची निर्मिती करून विक्री केली आहे.

या निर्मिती झालेल्या मास्कची खरेदी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली आहे. बाजारापेक्षा अत्यंत कमी किंमतीत पण दर्जेदार असणाऱ्या या मास्कला आता मागणी वाढती आहे. बाजारात उपलब्ध झालेली गरज, असणारी मागणी आणि आलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या युद्धात महिलांनीही लावलेला हातभार यशस्वी ठरतोय. ‘आम्ही महिलाही मागे नाही, योद्धे ठरतोय’ असाच काहीसा संदेश जिल्ह्यातील या महिलांनी स्वकर्तृत्वाने दिला आहे.

– प्रशांत सातपुते,

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

भारती विद्यापीठ ‘आय.एम. ई. डी’ मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म लॉक डाऊन काळात ६० वेबिनार यशस्वी

पुणे :
भारती अभिमत विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ( आयएमईडी)   मध्ये व्यवस्थापनशास्त्र,कॉम्प्युटर सायन्स  विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मोफत डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात आला असून ६० वेबिनार यशस्वी करण्यात आले असून आणि आंतरराष्ट्रीय कोर्सेस ‘ई डी एक्स’  संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले. ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन काळात व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी दैनंदिन ऑनलाईन अध्यापनाच्या जोडीला हे वेबिनार,आंतरराष्ट्रीय कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत. वेबिनारच्या विषयामध्ये मनुष्य बळ व्यवस्थापन,सायबर सिक्युरिटी,ऑनलाईन मार्केटिंग,कृत्रिम बुद्धिमत्ता,ताण तणाव व्यवस्थापन,कल्पकता आणि नावीन्य,कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कौशल्ये अशा अनेक विषयांचा समावेश होता.  जगातील  नामवंत शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांचे हे कोर्सेस(अभ्यासक्रम) ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. यात हार्वर्ड,एमआयटी,बर्कले,आय.आय.टी. मुंबई,आय.आय.एम.बंगळूरू,आय.बी.एम यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे .  
आय.एम.इ.डी.तर्फे व्यवस्थापनशास्त्राच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्लेसमेंट प्रक्रिया राबवली जात आहे. लॉक डाऊन उठल्यावर लगेचच हे विद्यार्थी निवडल्या गेलेल्या कंपनी मध्ये रुजू होऊ शकतील,अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.           
आयएमईडीच्या या यशाबद्दल भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांनी अभिनंदन केले.   

इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र योग्य ठिकाण – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. २८ : इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचे विशेष धोरण आहे. याशिवाय या उद्योगासाठी विविध प्रोत्साहने दिली जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाने तयार केलेल्या इन्व्हेस्ट इंडिया फोरमद्वारे इलेक्ट्रॉनिक सिस्टम डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग (इएसडीएम) या क्षेत्रातील गुंतवणुकीवर आज विविध राज्याच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली.

श्री.देसाई म्हणाले की, महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात कायम अग्रेसर राज्य आहे. येथे मिळणाऱ्या सर्व सुविधांमुळे देश विदेशातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होते.

सध्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटला मोठी मागणी असल्याने या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने या क्षेत्रासाठी विशेष धोरण तयार केले आहे. याशिवाय इंटरनेट, डेटा सेंटर्स, विकास व संशोधन केंद्र मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणुकदारांनी महाराष्ट्राला पसंती द्यावी, असे आवाहन श्री.देसाई यांनी केले.

राज्यात ५१ हजार उद्योग सुरू

दरम्यान, इंडिया मर्चंट चेंबर्सच्या वेबिनारमध्ये श्री.देसाई यांनी उद्योगाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात सध्या ५१ हजार उद्योग सुरू झाले आहेत. १३ लाख कामगार या ठिकाणी रुजू झाले आहेत. छोट्या व मध्यम उद्योगांसाठी राज्य शासन विविध योजना जाहीर करणार आहे. मजुरांसाठी कामगार ब्यूरोची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सीए अभय शास्त्री यांची ‘लायन्स’च्या प्रांतपालपदी निवड

पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ संस्थेच्या प्रांतपालपदी सीए अभय शास्त्री यांची निवड झाली आहे. प्रथम उपप्रांतपाल म्हणून हेमंत नाईक, तर द्वितीय उपप्रांतपाल म्हणून राजेश कोठावदे यांची निवड झाली आहे. जुलै २०२० ते जुन २०२१ या कालावधीसाठी ही निवड असणार असून, लायन्स क्लबच्या नुकत्याच ऑनलाईन झालेल्या परिषदेत निर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

विद्यमान प्रांतपाल उद्योजक ओमप्रकाश पेठे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच ब्रह्मकुमारी सुनीता दीदी यांनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी माजी आंतरराष्ट्रिय संचालक नरेंद्र भंडारी, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे (सीआयआरटी) संचालक राजेंद्र सानेर पाटील हे उपस्थित होते.

पूरपरिस्थिती अभ्यासासाठी नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर

0

मुंबई दि.२७:- गतवर्षी भीमा व कृष्णा खोऱ्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचे विश्लेषण करणारा वडनेरे समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. पूरप्रवण भागात पूर नियंत्रणासाठी व भविष्यकालीन उपाययोजनांसाठी नक्कीच या अहवालाचा उपयोग होईल. असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी समितीचे अध्यक्ष जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्री वडनेरे,अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी,  सचिव राजेंद्र पवार, सहसचिव अतुल कपुले  उपस्थित होते.

भीमा व कृष्णा खोऱ्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण करुन कारणे शोधणे, भविष्यात पुराची दाहकता कमी करणेस्तव तांत्रिक उपाययोजना,धोरणे सुचविणे, कर्नाटकातील अलमट्टी व इतर जलाशयांमुळे महाराष्ट्रात पूरपरिस्थिती (Back Water) निर्माण होते किंवा कसे, हे जलशास्त्रीय अभ्यासाद्वारे स्पष्ट करणे.या विषयक अभ्यासासाठी  शासनाने नेमलेल्या तज्ञांच्या  समितीने तब्बल २६ बैठका घेत पूरप्रवण भागांना भेटी देऊन तांत्रिक बाबींवर चर्चा करत विविध अंतर्गत अभ्यासगट नेमून सखोल अभ्यास करत हा विस्तृत अहवाल तयार केला आहे.

23 ऑगस्ट 2019 मध्ये शासनाने निवृत्त प्रधान सचिव (जलसंपदा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय हवामान खाते (IMD), भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था (IITM), केंद्रिय जल  आयोग (CWC), महाराष्ट्र सुंदूर संवेदना उपयोगिता केंद्र (MRSAC), आय.आय.टी. (IIT), मुंबई मजनिप्रा (MWRRA) मधील तज्ञ, जलतज्ञ व जलसंपदा विभागातील सचिव यांची अभ्यास समिती गठित केली होती. 

अहवालातील ठळक बाबी

• पुराची कारणमीमांसा

1. कृष्णा खोऱ्यातील विस्तृत पाणलोट क्षेत्रात अत्यल्प काळात झालेली सातत्यपूर्ण अतितीव्र पर्जन्यवृष्टी

2. पूरप्रवण भागाची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती व नदीची रचना.

3. पूर प्रवण क्षेत्रात (Flood Zone ) नागरीकरण, बांधकामे, अतिक्रमणे इ. मुळे पूर प्रवाहास अडथळे व नदीपात्राचे झालेले संकुचीकरण.

4. शहरी व ग्रामीण भागातील पूरपाणी निचरा व्यवस्थेची खालावलेली परिस्थिती.

5. नद्यांमधील नैसर्गिक पूरवहन क्षमतेत झालेली अभूतपूर्व घट.

6. नद्यांमधील गाळसाठ्यामुळे उंचावलेले व अरूंद झालेले नदीपात्र.

7. धरणांतर्गत पूर सामावून घेण्याची खास वेगळी साठवण क्षमता नसल्यामुळे पूरनियमनात असलेल्या मर्यादा व इतर सूक्ष्मस्तरावरील कारणे.

• बॅक वाटर अभ्यास :

▪ जलशास्त्रावर आधारित गणितीय मॉडेल वापरून (Hydrodynamic Study Model) सद्यस्थितीतील काही क्षेत्रीय मर्यादा लक्षात घेऊन केलेल्या अभ्यासाअंती कर्नाटकातील अलमट्टी व हिप्परगा जलाशय व त्यावरील पूरप्रचालनामुळे महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीवर थेट व विपरित परिणाम होत नाही, असे संकेत दिसून येतात.

( सद्यस्थितीतील कर्नाटकातील व महाराष्ट्रातील क्षेत्रिय अप्राप्त माहिती नव्याने प्राप्त करुन पुनर्अभ्यास करावा, असे समितीने सुचविले आहे.)

• महत्त्वाच्या उपाययोजना / शिफारशी

1. पूर निवारणार्थ नदी नाले संरक्षण व पुनर्स्थापन, पूरप्रवण क्षेत्रांचे संरक्षणासह पुनर्स्थापन, पूर मुकाबला सज्जता, पूरप्रवण क्षेत्रातील अवैध वापरावर चाप, एकूणच अतिक्रमणाविरुद्ध ठोस धोरणांचे (Policy) अवलंबन करणे, अत्यावश्यक करणे तसेच पूरनिवारणार्थ व हवामान बदलाविषयकच्या महाराष्ट्र राज्य हवामान बदल रुपांतर धोरण (Maharashtra State Climate Change Adaptation Policy 2017 i.e. MSAPCC) परिणामकारकरित्या राबविणे.

2. निषिध्द / प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिक्रमणे प्राधान्याने हटविणेबाबत फ्लड प्लेन व झोनिंग नियम कोल्हापूर / सांगली जिल्हयासाठी लागू करणे.

3. परिणामकारक पूरनिवारणार्थ सशक्त / ठोस पूरपूर्वानुमान पध्दतीचा वापर, पूरसंवेदक पायाभूत सुविधा, परिचालन सुधारणा व आपत्ती व्यवस्थापन धोरणात्मक सुधारणा / कायदेशीर तरतुदींचे त्वरित अवलंबनाची गरज.

4. एककालिक पूर पूर्वानुमान पध्दतीचा महाराष्ट्रासह संपूर्ण कृष्णा खोऱ्यात अवलंब करणे.

5. पूरनिवारणास्तव अद्ययावत तंत्रज्ञान, संस्थागत व्यवस्था व धोरणे आखुन अल्पकालीन पूर्वानुमान (Now Cast), एककालिक पूरपूर्वान पध्दती (RTDSS) असुरक्षितता नकाशांसह, अद्ययावत आपत्ती नियोजन राबविणे.

6. एकात्मिक जलाशय प्रचालन राबविणे.

7. नदीपात्र पुर्नस्थापित करणे. ( वहन क्षमता )

8. निम्नपातळीवरील नदीतीर उंचावणे. ( पूर प्रवण क्षेत्र नियंत्रण )

9. नदीपात्रातील काही अतितीव्र वळणे (Meandering) सरळ करणे. ( Bye-Pass)

10. पूरनिवारणासाठी सुयोग्य जागेची तपासणी करुन साठवण तलाव निर्माण करणे.( Sponge Cities )

11. पूरप्रवाहांचे आंतरखोरे विचलन (Diversion) प्रकल्प राबविणे. ( तिव्रता कमी करणे )

12. आधुनिक पूर चेतावणी यंत्रणेचा वापर करणे / वाढविणे, असुरक्षित ( Vulnerable ) क्षेत्राचे नकाशे तयार ठेवणे.

13. पुररेषा सुधारित करणे. ( प्रतिबंधित व निषिध्द क्षेत्राची पुनर्आखणी )

14. ठोस पर्जन्य पूर्वानुमान पध्दती राबविणे.

15. पूर निवारणासाठी सर्व संबंधित संस्थामधील समन्वय वाढविणे व एकत्रितरित्या

परिणामकारक प्रचालन करणे.

16. जलाशास्त्रीय प्रतिकृती अभ्यास, नदीपात्रातील बांधकामांचे जलशास्त्रीय

लेखापरीक्षण, जलाशय प्रचालन अहवाल प्रस्तुतीकरण व लेखापरिक्षण करणे.

17. कृष्णा खोऱ्यात अल्प मुदतीच्या हवामान पुर्वानुमानासाठी ( 2 ते 6 तास) x ब्रॅड रडार डॉपलर बसविणे.

कोरोना संक्रमित भागात पशुसंवर्धन संचालक सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली पाहणी…

पुणे -आज शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वडारवाडी , हेल्थ कॅम्प, रामोशीवाडी,गोखलेनगर, जनवाडी जनता वसाहत,कुसाळकर पुतळा चौक येथे कोव्हिड-19 या सांसर्गिक रोगामुळे बाधित परिसरातील भागाची पहाणी पशुसंवर्धन संचालक श्री सचिंद्र प्रताप सिंग यांनी केली.

महापालिका उपायुक्त नितीन उदास, संदीप काळे (सभासद पुणे मनपा वृक्ष प्रा),आरोग्य अधिकारी डॉ संतोष मुळे,डॉक्टर मृणालिनी कोलते अधिकारी प्रमुख आरोग्य निरीक्षक आय एस इनामदार सर्व आरोग्य निरीक्षक व मोकादम उपस्थित होते  यावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह,ब्लड प्रेश, हृदय विकार असलेल्या नागरिकांची मोठया प्रमाणात आरोग्याची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. संक्रमित झालेल्या भागातील स्वच्छतागृहाची पहाणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले.   कुसाळकर पुतळा चौकात आरोग्य तपासणी करिता फिरता दवाखान्यात  नागरिकांची तपासणी करण्यात येत असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्या भागातील स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे यांनी सांगितले .

राज्यात कोरोनाच्या ३७ हजार १२५रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.२७: राज्यात आज कोरोनाच्या २१९० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३७ हजार १२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ९६४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १७ हजार ९१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५६ हजार ९४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ०३ हजार ९७६ नमुन्यांपैकी ५६ हजार ९४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३७ हजार ७६१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १८९७ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३२, ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ ,नवी मुंबई मध्ये ७, रायगडमध्ये ७,  अकोल्यात ६, औरंगाबाद मध्ये ४, नाशिक ३,  सोलापूरात ३, सातारा -२, अहमदनगर १, नागपूर १, नंदूरबार १, पनवेल १तर वसई विरारमध्ये १ मृत्यू झाला आहे. या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे २१ एप्रिल ते २४ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६६ मृत्यूंपैकी मुंबईचे २१, ठाण्याचे १५, जळगावचे १०, नवी मुंबईचे ७, रायगडचे ७, अकोल्याचे २, साता-याचे २,अहमदनगरचा १, नंदूरबारचा १ मृत्यू आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५०  रुग्ण आहेत तर ४५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १० जण ४० वर्षांखालील आहे. या १०५ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३४,०१८), बरे झालेले रुग्ण- (८४०८), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,५०७)

ठाणे: बाधित रुग्ण- (७७८१), बरे झालेले रुग्ण- (२२२४), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४०८)

पालघर: बाधित रुग्ण- (७७१), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८१)

रायगड: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०१२), बरे झालेले रुग्ण- (७५०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)

धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)

जळगाव: बाधित रुग्ण- (५०५), बरे झालेले रुग्ण- (२१८), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

पुणे: बाधित रुग्ण- (६६१४), बरे झालेले रुग्ण- (३०८६), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२३७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (२८७), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४०)

सातारा:  बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३४६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७)

सांगली: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१९२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३३५), बरे झालेले रुग्ण- (७९३), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८५)

जालना: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (२३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१३३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)

परभणी: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (४५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)

बीड: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३७)

नांदेड: बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)

अकोला: बाधीत रुग्ण- (४८७), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३)

अमरावती: बाधीत रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२)

वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३)

नागपूर: बाधीत रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४१)

वर्धा: बाधीत रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)

भंडारा: बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)

एकूण: बाधीत रुग्ण-(५६,९९८), बरे झालेले रुग्ण- (१७,९१८), मृत्यू- (१८९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण-(३७,१२५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ११९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

●       राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.५ दिवस होता तो आज १४.७ दिवस झाला आहे.

●       देशाच्या एकूण प्रयोगशाळा तपासणीच्या ( ३२,४२,१६०) सुमारे १२. ४ टक्के तपासणी महाराष्ट्रात झाली असून दर दहा लक्ष लोकसंख्येमागे राज्यात ३१४२ जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. हे प्रमाण देशपातळीवर २३६३ एवढे आहे. 

●       राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ३१.५ % एवढे आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २६८४ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ११९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६८.०६  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

लॉकडाऊन शिथिल करताना विषाणूचा पाठलाग अधिक गांभीर्याने करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २६ : अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य तपास झाला नसून या प्रकरणाचा फेरतपास व्हावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदन देवून अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी केली होती. याता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सी.आय.डी) कडे देवून फेरतपास करण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६, ३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. दरम्यान करण्यात आलेल्या तपासापासून आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (सी.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी / न्यायिक अधिकारी यांच्या विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.या संदर्भात शासनाने मंगळवार दि. २६ मे ला निर्णय घेवून अलिबाग पोलीस स्टेशन येथे दाखल गु.र.नं. ५९/२०१८ व गु.र.नं. ११४/२०१८ चा फेरतपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याबाबत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांना आदेश देण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा फेरतपास होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रातून ६९६ विशेष श्रमिक ट्रेनद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय कामगार स्वतःच्या राज्यात

0

मुंबई दि.२७- महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई मध्ये परराज्यातून आलेल्या कामगारांना त्यांच्या स्वगृही परत जाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दि.२७ मे पर्यंत जवळपास ९ लाख ८२  हजार परप्रांतीय कामगारांना स्वगृही परत पाठविण्यात आले.  यासाठी ६९६ विशेष श्रमिक ट्रेन  महाराष्ट्रातील विविध भागातून सोडण्यात आल्याची माहिती  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

विविध राज्यात गेलेल्या विशेष श्रमिक ट्रेन

आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३७४ बिहारमध्ये १६९, मध्य प्रदेशमध्ये ३३, झारखंडमध्ये ३०, कर्नाटक मध्ये ६, ओरिसामध्ये १३, राजस्थान १५, पश्चिम बंगाल ३३, छत्तीसगडमध्ये ६ यासह इतर राज्यांमध्ये एकूण ६९६ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वच रेल्वे स्टेशन मधून या ट्रेन सोडण्यात येत असून यात प्रमुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मधून १११, लोकमान्य टिळक टर्मिनस ११२, पनवेल ४२, भिवंडी १०, बोरीवली ५२, कल्याण ८, ठाणे २८, बांद्रा टर्मिनल ५८, पुणे ६९, कोल्हापूर २३, सातारा १३, औरंगाबाद १२, नागपूर १४  यासह राज्यातील इतर रेल्वे स्टेशन वरून  विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई. दि. २७ – देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत पंडितजींचं अमूल्य योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी  त्यांच्या कुटुंबानं केलेला त्याग, स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेलं योगदान देशवासियांच्या चिरंतन स्मरणात राहणार आहे. पंडितजींनी उभारलेल्या शैक्षणिक, संशोधन संस्था, पायाभूत प्रकल्पांचा रचलेला पाया, युवकांच्या नेतृत्वविकासाला दिलेली दिशा, लोकशाही रुजवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी केलेले प्रयत्न हे सारं अलौकिक आहे.

पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा हा पंडितजींनी त्याकाळात रचलेल्या भक्कम पायावर खंबीरपणे उभा आहे, याचं स्मरण करुन मी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो.