Home Blog Page 2565

कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे, 29: आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करुया, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन परंपरा कायम ठेवायची आहे. या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर प्रास्ताविक करतांना म्हणाले, आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत आपण 15 मे रोजी बैठक घेतली. मात्र पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत शासनानाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
राज्यशासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला. तसेच यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांनीही व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आषाढी वारीच्या आयोजनासंदर्भात आपली मते मांडली.
या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

‘कोरोना’शी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२९ : कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर – कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली.

सातारा जिल्ह्यातील कराड – तासगांव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे. सातारा – कोरेगांव – मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. लोकांची सारखी मागणी असते, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्या. खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे.

सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे,असे त्यांनी  यावेळी सांगितले.

टेंभुर्णी – पंढरपूर – मंगळवेढा – उमदी – विजापूर आणि अक्कलकोट – नळदुर्ग – तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. माढा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या,असे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील आढावा घेताना संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे. भूसंपादनातील त्रुटी दूर करा, मिळालेला निधी खर्च करा,असे सांगितले. नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते. तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्भवते. तेव्हा तेथील रुंदीकरणाचे काम करावे, असे श्री.पवार यांनी सांगितले. पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

गरीबांसाठी तिजोरी उघडा -स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा तीव्र वेदना

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसने गुरुवारी आपली ऑनलाइन मोहीम सुरू केली. ज्याला ‘स्पीकअप’ प्रोग्राम असे नाव दिले आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोहिमेची सुरूवात केली. ‘स्पीक अप’ मोहिमेअंतर्गत पक्षाच्या देशभरातील नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला. दरम्यान त्यांनी मोदी सरकारला प्रवासी मजुरांसाठी तिजोरी उघडण्याचे सुचविले.

सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आम्ही अशा प्रकारच्या वेदना पहिल्या . कामगारांना घरी जाण्यासाठी हजारो किलोमीटर पायी जाण्यास भाग पाडले गेले. सरकार वगळता सर्वांनी कामगारांच्या विवंचना ऐकल्या. सरकारने तिजोरी उघडावी आणि प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा 7500 रुपये द्या.

या व्यतिरिक्त स्थलांतरित मजुरांना सुरक्षित घरी पाठवा.

गरीब, मजूर आणि छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कामगारांना घरी नेण्यासाठी सुरक्षित व मोफत प्रवासाची व्यवस्था करावी, त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करावी, रेशनदेखील द्यावे, मनरेगामध्ये २०० दिवस काम निश्चित करा, छोट्या-छोट्या उद्योगांना कर्ज देण्याऐवजी आर्थिक मदत द्या, म्हणजे कोट्यावधी रोजगार वाचतील आणि देशाची प्रगतीही होईल. अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षांनी केली.

अशोक चव्हाण थेट रुग्णालयातून

0

मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र अशा परिस्थितीतही चव्हाण यांचं राजकीय घडामोडींवर बारीक लक्ष आहे. चव्हाण यांच्या सक्रियतेचा प्रत्यय त्यांनी थेट रुग्णालयातून एक व्हिडीओ शेअऱ केल्याने आला असून या व्हिडीओमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या ‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेबद्दल सांगितलंय. या व्हिडिओमध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे सर्वसामान्यांच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती देखील केली आहे.

या व्हिडीमध्ये अशोक चव्हाण सांगतायेत की, ‘सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे कोट्यवधी देशवासियांचे जे मनोगत आहे, त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीने मीदेखील मुंबईतील रुग्णालयातून करोनाशी लढा देत असताना ‘स्पीक अप इंडिया’ या मोहिमेत सहभागी होत आहे. केंद्र सरकारला जाणीव आणि विनंती करायची आहे की, करोनाचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य, शेतमजूर, शेतकरी आणि गरिबांना बसला आहे. लघू-मध्यम उद्योगांनाही फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये मी सहभाग नोंदवत आहे’.

https://www.facebook.com/ashokchavanofficial/videos/676074026289081/

काय आहेत काँग्रेस पक्षाच्या सूचना आणि मागण्या –
– सर्व गरिबातील गरीब कुटुंबांच्या बॅंक खात्यात एकरकमी १० हजार रूपये जमा करावेत. तसंच कॉंग्रेस पक्षाने सुचवलेल्या ‘न्याय’ योजनेनुसार पुढील सहा महिने त्यांच्या खात्यात दरमहा ७ हजार ५०० रूपये जमा करावेत, अशी प्रत्येक गरीब कुटुंबाची मागणी आहे
– थेट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली तर देशातील कोट्यवधी नागरिकांच्या हाती पैसा येऊन त्यांना दिलासा तर मिळेलच; शिवाय लोकांच्या हाती पैसा उपलब्ध झाल्याने बाजारातील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होण्यास मदत होईल.
-दुसरी महत्वाची बाब म्हणजे आज विविध राज्यांमधून कष्टकरी, मजूर आपआपल्या मूळ राज्यात जात आहेत. त्यांच्या प्रवासाचा आणि खाण्यापिण्याचा सर्व खर्च सरकारच्या स्तरावर झाला पाहिजे. ते गावात गेल्यानंतर त्यांना वर्षातून २०० दिवस रोजगार मिळावा, यादृष्टीने नियोजन केले पाहिजे
– केंद्र सरकारने आपल्या आर्थिक पॅकेजमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज देण्याच्या घोषणा केल्या आहेत. पण ही वेळ केवळ कर्जाची उपलब्धता करून देण्याची नाही, तर या उद्योगांना थेट आर्थिक मदत देण्याची आहे. त्याशिवाय त्यांना खऱ्या अर्थाने तातडीने उभारी मिळणार नाही.
– शेतकरी, कर्मचारी, कामगार, व्यापारी, उद्योजक आदी सर्व घटकांच्या कर्जाचे हप्ते रिझर्व्ह बॅंकेने पुढे ढकलले आहेत. पण ते पुरेसे नाही. त्यांना भरीव मदत म्हणून सरकारने बॅंकांशी चर्चा करून कर्जखात्यांचे विशिष्ट कालावधीचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
– केंद्र सरकारने अशी भरीव पावले उचलली तरच या सर्वसामान्य नागरिकांना खऱ्या अर्थाने मदत होणार असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त करून देण्यास हातभार लागेल.

पुण्यातील मार्केटयार्ड होणार सुरु

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला व कांदा-बटाटा विभाग येत्या ३१ मेपासून सुरू करण्याचा निर्णय गुरूवारी सर्व बाजार घटक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला मार्केट यार्डातील व्यापार पुन्हा सुरू होणार आहे. मात्र,त्यासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांना अटी व नियमावलीचे पालन करावे लागणार आहेबाजार समितीने तयार केलेल्या नियोजनानुसार व बाजार समितीने दिलेल्या पर्यायानुसार संपूर्ण बाजारातील असलेल्या पाकळ्यांमध्ये एक बाजू एकादिवशी व दुसरी बाजू दुसऱ्यादिवशी अशा पद्धतीने फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील सर्व आडत्यांना कामकाज करावे लागणार आहे. येत्या रविवारपासून (दि.३१ मे) बुधवारपर्यंत (दि.३ जून) याचपद्धतीने कामकाज करावे लागेल. तसेच बुधवारी दुपारी बाजारसमिती व आडते असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेऊन या पद्धतीने व्यापार करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील कामकाजाची दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला जाईल,असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भूजबळ यांनी सांगितले.
खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे मार्केटमध्ये सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यांनी बाजार समितीकडून परवाना घेतला नाही. त्यांनी त्वरित बाजार समितीकडे दोन दिवसाच्या आत त्यासाठी अर्ज करावा. आडत्यांसाठी केळी बाजार समोरील वाहनतळ व कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्या शेजारील वाहन तळामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने उभी करता येणार आहेत. सर्व आडत्यांनी आपल्या विभागातील गट प्रमुखांकडून स्वत:साठी त्याचप्रमाणे गाळ्यावरील मदतनीस व कामगार यांच्यासाठी ओळखपत्रे त्वरित करून घ्यावीत, असेही असे विलास भुजबळ यांनी सांगितले.

बालेवाडी कोविड-19 केंद्राची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी केली पाहणी

पुणे दि. 28: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 च्या केंद्राला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज भेट देवून पाहणी केली. पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास या केंद्राचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो या कामाची माहिती जाणून घेत त्यांनी कोविड केंद्रावर लागणाऱ्या खाटा, सी.सी.टी.व्ही. व आवश्यक त्या वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत सूचनाही केल्या. तसेच तेथील विविध ठिकाणांचीही माहिती घेतली.
यावेळी कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, सहायक आयुक्त संदीप कदम, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय बेंद्रे, आरोग्य विभागाचे डॉ.शिवाजी विधाटे व महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोरोना- खंडाळा व तळेगाव टोल नाका: पल्स ऑक्सी मिटरव्दारे करण्यात येणाऱ्या तपासणीची विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी केली पाहणी

पुणे दि. 28: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई -पुणे महामार्गावरील तळेगाव टोल नाका व खंडाळा येथील वन विश्रामगृहा समोरील तपासणी केंद्र येथे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देवून तेथील पल्स ऑक्सी मिटर, थर्मल स्कॅनर मशीनव्दारे ये-जा करणाऱ्या वाहनांतील नागरिकांच्या तपासणी नोंदणी रजिस्टरची पाहणी करुन तेथील कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली . तसेच तपासणी करतांना कोणकोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबाबत आवश्यक त्या सूचनाही डॉ.म्हैसेकर यांनी केल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नवनीत कुमार कॉवत, कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, सहायक आयुक्त संदीप कदम, सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अजय बेंद्रे, मावळचे तहसिलदार श्री. बर्गे, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राज्यात कोरोनाच्या ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.२८ : राज्यात आज कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज  ६९८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत  ५९ हजार ५४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख १९ हजार ४१७ नमुन्यांपैकी ५९ हजार ५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ६ लाख १२ हजार ७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ८५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ४९ (मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे ४, नवी मुंबई २, रायगड १), नाशिक-१ (जळगाव १), पुणे- २६ (पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७), औरंगाबाद- ३, लातूर-१ (नांदेड मनपा), अकोला- ५ (अकोला मनपा ५).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५  रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये (५३ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला -४, औरंगाबाद -३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि  रायगड येथील १ मृत्यू आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३५,४८५), बरे झालेले रुग्ण- (८६५०), मृत्यू- (११३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५६९४)

ठाणे: बाधित रुग्ण- (८२२०), बरे झालेले रुग्ण- (२३००), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६५)

पालघर: बाधित रुग्ण- (८२५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९)

रायगड: बाधित रुग्ण- (९४४), बरे झालेले रुग्ण- (४८८), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७५५), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

धुळे: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

जळगाव: बाधित रुग्ण- (५२६), बरे झालेले रुग्ण- (२३९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)

पुणे: बाधित रुग्ण- (६८९६), बरे झालेले रुग्ण- (३२४२), मृत्यू- (३०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३५३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७११), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९)

सातारा:  बाधित रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१२८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३५१), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१४)

सांगली: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१३७०), बरे झालेले रुग्ण- (८७९), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३१)

जालना: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

लातूर: बाधित रुग्ण- (१०७), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

बीड: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

अकोला: बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

अमरावती: बाधित रुग्ण- (१९७), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

नागपूर: बाधित रुग्ण- (४९५), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

भंडारा: बाधित रुग्ण- (२०), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

एकूण: बाधित रुग्ण-(५९,५४६), बरे झालेले रुग्ण- (१८,६१६), मृत्यू- (१९८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३८,९३९)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ११९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे रुग्ण डिस्चार्ज माहिती आज दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार २११ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६५.६१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.   

आंबा उत्पादकांनी तोडली दलालांची साखळी

0

कोरोना संकटाची अशीही इष्टापत्ती

सिंधुदुर्गनगरी, दि. २८  : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार यांना याचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकरी ही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायत दारांसाठी इष्टापत्ती ठरले आहे. या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे आंबा उत्पादकही अडचणीत आला होता. पण, कृषि विभागाने दिलेली साथ, पणन मंडळाने घेतलेली जबाबदारी व आंबा उत्पादक यांनी मिळून या संकटातून फक्त मार्गच काढला नाही तर चांगला फायदा मिळणवून देणारा एक नवा पायंडा पाडला आहे.

कोकणातील सर्वात महत्त्वाचे फळपिक म्हणजे आंबा. मार्चपासून आंब्याचा हंगाम सुरू होतो. तो सुमारे जूनच्या मध्यापर्यंत चालतो. पण, नेमके याच काळात कोरोनामुळे देशात लॉकाडाऊन सुरू झाले आणि आंबा उत्पादक शेतकरी हवालदील झाला. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या सिमा बंद झाल्या. त्यामुळे आता आंबा विक्री कशी करायची या एक मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला.

यावर जिल्हा प्रशासन, जिल्हा कृषि विभाग व पणन महामंडळाने एक तोडगा काढला. शेतकऱ्यांनी त्यांचा आंबा स्वतः बाजारात नेऊन विकावा. त्यासाठी शेतकऱ्यांना व आंब्याची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना पासचे वाटप करण्यात आले. त्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासारख्या शहरांमध्ये आंबा विक्रीसाठी परवानगी दिली. तसेच पणन मंडळाने आंब्याची ऑनलाईन विक्रीही सुरू केली. त्यासाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली. या सर्व प्रयत्नांना यश येऊन आंब्याच्या विक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीस शेतकरी जेवढे मिळेत तेवढे ठिक अशा भावनेने आंबा विक्री करत होते.

या सर्व प्रयत्नांचा एक चांगला फायदा शेतकरी व ग्राहक या दोन्ही घटकांना झाल्याचे दिसून आले व आंब्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली. यंदाच्या वर्षी आंब्याच्या पेटीला सुमरे 1 हजार आठशे ते 2 हजार रुपये भाव मिळत आहे. हा भाव शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होणाऱ्या आंब्यास मिळत आहे. तर ग्राहकांनाही अवघ्या 2 हजार ते 2 हजार  200 रुपयांमध्ये पेटी मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार करता यावर्षीच्या नवीन पद्धतीने होणाऱ्या विक्रीमध्ये शेतकऱ्यांना सुमारे 800 ते एक हजार रुपये जादाचा भाव मिळत आहे. दरवर्षी दलालांमार्फत खरेदी होताना पेटीला सुमारे 800 रुपये ते 1000 रुपये दर शेतकऱ्यांमा मिळत होता.

देवगड तालुक्यातील 400 कलमांचे मालक असणारे विष्णू राजाराम डगरे सांगतात दरवर्षी दलालांकडे आंबा विक्रीसाठी पाठवत होतो. त्यावेळी आठशे रुपयांना एक पेटी असा दर असे. तसेच वाहतुकीमध्ये खराब होणाऱ्या आंब्याची नुकसानीही शेतकरीच सोसत होता. त्यामुळे नफा कमी मिळत होता. पण यंदा कृषि विभाग व पणन मंडळाने केलेल्या प्रयत्नांमुळे आंबा थेट ग्राहकांना विक्री करत आहे. सध्या आंब्याला चांगला दर मिळत आहे. ग्राहक जागेवर 2 हजार रुपये पेटी प्रमाणे दर देत आहे. हा सर्व व्यवहार रोखीने होत असल्यामुळे तसेच जागेवर आंबा उचल होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे. दलाल रोखीचा व्यवहार करत नसत. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मिळण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागत. संपूर्ण पैसा मिळेलच याची शाश्वती नसे. पण आता चांगला नफा मिळत आहे. यंदाच्या वर्षीची ही आंबा विक्रीची पद्धत कायम रहावी असे मतही त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील अनेक बागायतदारांचे मत अशाच पद्धतीचे आहे. एका कलमामागे सुमारे 10 पेटी आंबा तयार होतो. तर सुमारे 100 कलमांपाठीमागे शेतकऱ्याचा वर्षाला 1 ते सव्वा लाख रुपये खर्च होतो. हा सर्व खर्च जाऊन शेतकऱ्याला दलालांमार्फत होणाऱ्या व्यवहारामध्ये सुमारे 8 लाख रुपये वार्षिक मिळत होते. पण, यंदा आंब्याच्या व्यवसायात आतापर्यंत 10 लाख रुपये 100 कलमांमागे कमाई झाली आहे. तर एकूण सुमारे 16 ते 18 लाख रुपये वार्षिक कमाई होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे. यातून वाहतूक खर्च वगळला तरी एक चांगला नफा शेतकऱ्यांच्या पदरात पडणार हे नक्की.

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १६ हजार गुन्हे दाखल

0
५ कोटी ७५ लाख रुपये दंड आकारणी; ७५ हजार वाहने जप्त – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. २८ : राज्यात लॉडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १६ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. ५ कोटी ७५ लाख रुपये दंड आकारणी व ७५ हजार वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार  १,१६,६७० गुन्हे नोंद झाले असून २३,३१४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ७५ लाख ३० हजार २६७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.कडक कारवाईकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.१०० नंबरवर ९६ हजार फोनपोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर ९६,६९७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ७०६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७५,८१३ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.पोलीस कोरोना कक्षकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने  राज्यातील २१ पोलीस व १ अधिकारी अशा २२ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.अफवांवर विश्वास ठेवू नकाकोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संकटातही बळीराजाची दिलदारी

0

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील रानसई फार्म. आंबा बागायतदाराचे नाव असीब शहाबाजकर.  आंब्याचे चांगले उत्पादन होऊनही काेरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने भलतचं संकट उभे राहिले.  यावर मात करण्यासाठी कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी एक शक्कल लढवली.  त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला, या ग्रुपचे नामकरण झाले “डायरेक्ट फ्रूट सप्लाय”.  

या ग्रुप मध्ये त्यांनी स्थानिक शेतकरी आणि ग्राहक यांचा समावेश करून घेतला आणि मग सुरू झाला आंब्याचा ऑनलाइन व्हॉट्सअप ग्रुप द्वारे व्यवसाय.  या ग्रुपवरच मागणी नोंदविली जाते.  मागणीप्रमाणे वाशी, नवी मुंबई ,खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये असलेल्या ग्राहकांपर्यंत आंब्याच्या पेट्या पोहोचविल्या जातात. आंबे पोहोचविताना सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायजर चा वापर हे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. 

हे आंबे जसे आंबा बागायतदार असीब शहाबाजकर यांनी विक्रीस दिले, तसेच पाली येथील शेतकरी श्री. परांजपे यांनी 100 डझन आणि उरण येथील शेतकरी घनश्याम धर्मा पाटील यांनी 110 डझन आंबे या व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून विक्रीसाठी दिले. आतापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 5 हजार डझनापेक्षा जास्त आंबे विकण्यात आले आहेत. 

सुरुवातीला काही डझन आंबे विकल्यानंतर या ग्रूपमधील डॉ.सतिश मोरे आणि अमोल मार्कंडे या सदस्यांनी सूचना केली की, आपण केलेल्या विक्रीतून एका डझनामागे फक्त दहा रुपये असे जमा करुन करोनाच्या या संकटात शासनाला मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देवू या. या कल्पनेचा अधिक विस्तार झाला आणि या ग्रुपने आतापर्यंत झालेल्या आंबे विक्री झाल्यानंतर पहिले दहा हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी, नऊ हजार दोनशे रुपये जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीकरिता जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे जिल्हा कृषी अधिकारी श्री. पांडुरंग शेळके, श्री. विजयकुमार साळवे यांच्या हस्ते सुपूर्द केले. याचबरोबर बेलापूर महानगरपालिकेला औषधे-गोळ्या घेण्यासाठी दहा हजार रुपये, गरिबांना अन्न वाटप करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला दहा हजार रुपये तर उरणमधील आदिवासींना बियाणे खरेदी करून देण्यासाठी मदत म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत. 

याच प्रकारे दुसरा आणखी एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला. त्याचे नामकरण झाले “व्हेजिटेबल सप्लाय” ग्रुप. उरणमधील कंठवली आणि विंधने या गावातील बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू आणि शेतकऱ्यांचा भाजीपाला यांच्या विक्रीसाठी एकत्रित काम सुरू झाले.  साधारण दहा-बारा एप्रिल दरम्यान हा ग्रुप स्थापन करण्यात आला.  या भाजीपाला ग्रुपबरोबरच कृषी विभागाच्या आत्मा’अंतर्गत तयार करण्यात आलेल्या महिला बचतगटांनाही समाविष्ट करून घेण्यात आले.  या महिला बचतगटांनी तयार केलेल्या कुरड‌्या, पापड्या, मसाले यांचीही विक्री या “व्हेजिटेबल सप्लाय” व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून सुरू करण्यात आली.  वाशी, नवी मुंबई, खारघर, बेलापूर, पनवेल या भागातील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये कुरडया, पापड्या, अंडी, मसाले, तुळशीचा पाला यासह वांगी, माठ, पालक, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, मेथी अशा प्रकारच्या भाज्या विक्री होऊ लागल्या. सध्या रोज जवळपास 200 किलो 300 किलो भाजीपाला विक्री होत आहे.

हा भाजीपाला, आंबे पोहोचविण्यासाठी याच भागातील स्थानिक आदिवासींना उत्पन्न मिळावे यासाठी त्यांचाच टेम्पो भाड्याने घेण्यात आला आहे.   

काेरोनाच्या संकटात सर्व जग सापडले आहे. मात्र आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी उपाशी मरू नये यासाठी मनापासून काम करणाऱ्या कृषी अधिकारी क्रांती चौधरी-मोरे यांनी दाखविलेली कल्पकता, उत्तम असे मनुष्यबळ व्यवस्थापन, सोशल मीडियाचा अचूक वापर, उत्तम जनसंपर्क निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यासह त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, मार्गदर्शन देणाऱ्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी अर्चना नारनवर, विजयकुमार साळवे, क्रांती चौधरी-मोरे यांचे पती डॉ.सतिश मोरे आणि हा भाजीपाला, आंबे छोट्या टेम्पोने पोहोचविण्याचे काम करणारे तरुण शेतकरी सचिन खाणे, पुनित राठोड, राज मेहेकर आणि विविध हाऊसिंग सोसायट्यांमधील श्रीमती क्रांती चौधरी-मोरे यांच्या ग्राहक मैत्रिणी या सर्वांचे मिळालेले सहकार्य समाजाला प्रेरणादायक असेच आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतरही हा उपक्रम असाच पुढे सुरु राहील, असा संकल्प या दोन्ही ग्रुपच्या सदस्यांनी केला आहे.

 (मनोज शिवाजी सानप)

 जिल्हा माहिती अधिकारी 

रायगड-अलिबाग

शासनाकडून अधिकृत प्रसारित माहितीची नोंद घ्यावी – विशेष पोलीस महानिरीक्षक

मुंबई, दि. २८ : सध्या लॉकडाऊनच्या काळात २७ मे २०२० पासून सर्व सोशल मीडियावर एक मेसेज फिरत आहे की, “मुंबई व पुणे शहरांमध्ये कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व लॉकडाऊनच्या नियमांचे कडक शिस्तीने पालन करण्याच्या हेतूने या दोन शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे. तसेच या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मर्यादित काळापुरती चालू राहतील”. कृपया या आशयाचा मजकूर असणाऱ्या कोणत्याही मेसजवर विश्वास ठेवू नये व हा मेसेज फॉरवर्ड देखील करू नये. त्यातील मजकूर हा खोटा असून या शहरांमध्ये लष्कराला पाचारण करण्यात येणार नाही.

महाराष्ट्र सायबरतर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की, सर्व नागरिकांनी शासनाकडून अधिकृतपणे प्रसारित केलेल्या माहितीची नोंद घ्यावी. तसेच कोणत्याही माहितीची खातरजमा न करता व त्याची सत्यता न पडताळता मेसेज फॉरवर्ड करणे किंवा चुकीची माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे.  असे खोटे मेसेज पाठविणाऱ्यांविरुद्ध पोलीस कडक कायदेशीर कारवाई करतील. अशी कृती करणे हा एक सामाजिक गुन्हा देखील आहे. अशा प्रकारचे मेसेज पाठविणाऱ्या व्यक्ती आपली समाजातील विश्वासाहर्ता गमावून बसतील व त्यांनी एखादी खरी माहिती पाठविली तरी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला जाणार नाही.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, विशेष करून जे व्हाट्सॲप ग्रुप्सचे ऍडमिन्स किंवा ग्रुप निर्माता आहेत त्यांनी, आपल्या ग्रुपवर अशा आशयाचे मेसेज येणार नाहीत याची काळजी घ्या.

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागातर्फे करण्यात येत आहे.

पुणे विभागात अॅॅक्टीव रुग्ण संख्या 3949

पुणे, दिनांक 28– पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6879 झाली असली तरी 3661 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती विभागीय आयुक्तो डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.अॅक्टीव्ह रुग्ण संख्या 2912 असून पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तसेच 180 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली असल्यायचेही त्यां0नी सांगितले. विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 8521 झाली आहे.विभागातील 4179 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अॅक्टीव रुग्ण संख्या 3949 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 399 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 275, सातारा जिल्हयात 28, सोलापूर जिल्ह्यात 42, सांगली जिल्हयात 10 तर कोल्हापूर जिल्हयात44अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.आजपर्यंत विभागामध्ये एकूण 80303 नमूने तपासणीसाठी पाठविण्याात आले होते, त्यापैकी 74562 चा अहवाल प्राप्त आहे. 5741 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 65925 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8521 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
वंदेभारत मिशन अंतर्गत परदेशातून आलेले नागरिक:
विभागामध्येश फेज 1 मध्ये परदेशातून 457 व्यक्तीचे आगमन झालेले असून फेज 2 मध्ये परदेशातून एकूण 185व्यक्तींचे असे एकूण 642 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले असल्याीची माहितीही विभागीय आयुक्तक डॉ. म्हैमसेकर यांनी दिली.

परप्रांतीय व्यक्तींसाठी रेल्वेची सुविधा :
पुणे विभागातून दि. 28 मे 2020 पर्यंत मध्यप्रदेशासाठी -15, उत्तरप्रदेशासाठी -61, उत्तराखंडासाठी -2, तमिळनाडूसाठी -2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी -36, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी -8, छत्तीसगडसाठी-5,जम्मू-कश्मीरसाठी 1, मणीपूरसाठी 1, आसामसाठी 1, ओरीसासाठी 2 व पश्चिम बंगालसाठी 8 अशा एकूण 148रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 1 लक्ष 98 हजार 136 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत.

अन्न धान्य वितरण :-
पुणे विभागातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या 9095 असून आज रोजी 9091 सुरु आहेत. (ऑनलाईननुसार)
स्वस्त धान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरु झाले असून 89.18 टक्के धान्यवाटप झालेले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितली.
दि. 27 मे 2020 रोजी विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सरु आहेत. यामध्ये 21101 गरजूंनी लाभ घेतला आहे.
एपीएल केशरी कार्डधारकांसाठी मे 2020 साठी 40401 मे. टन नियतन मंजूर झालेले आहे. त्यापैकी 40401 मे. टन (100 टक्के) धान्याची उचल झालेली आहे व 29818.99 मे. टन (73.81 टक्के) धान्य वाटप आजतागायत झालेले आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवदर्शन मध्ये महापालिकेच्या अन्नधान्याचे किट वाटप

पुणे-ज्येष्ठ नगरसेवक आणि कॉंग्रेसचे नेते आबा बागुल यांना हि महापालिकेच्या वतीने वाटण्यात येणाऱ्या अन्न धान्याच्या कीट साठी अधिकाऱ्यांना फैलावर घ्यावे लागले होते . आज अखेरीस महानगरपालिकेशी पाठपुरवठा करून, प्रतिबंधित भागात पुणे महानगरपालिकेचे धान्यांचे किट उपलब्ध करून घेण्यात आले . आज शिवदर्शन भागात रेशन किट वाटप करण्यात आले आहे.स्वतः बागुल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यात लक्ष घालून गरजूंना ते मिळते कि नाही हे पाहून वाटप करवून घेतले. 3 ते 4 दिवसांनी पुणे महानगर पालिकेकडून शाहू वसाहत येथे 600 धान्यांच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे नागरीकांनी सहकार्य करावे.

राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६५ हजार ७०० क्विंटल अन्नधान्य तर २९ लाख ४६ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

0

मुंबई, दि. २८ : स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ते २७ मे पर्यंत राज्यातील १ कोटी ४७ लाख ५३ हजार ७२८ शिधापत्रिका धारकांना ६९ लाख ६५ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच २९ लाख ४६  हजार ९११ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे २० लाख १० हजार ८८३ क्विंटल गहू, १५ लाख ४५ हजार १४६ क्विंटल तांदूळ, तर २१ हजार ४५३ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे ४ लाख १५ हजार २७६ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ४ मे पासून एकूण १ कोटी १५ लाख ३४ हजार २९२ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी १८ लाख ३१ हजार ६७६  लोकसंख्येला २५ लाख ९१ हजार ५८० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.  

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६  एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.२४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आतापर्यंत ८ लाख १८ हजार ९० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ५९ हजार ०१२  क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

राज्यात १ मे ते २७ मे पर्यंत ८३३ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २९ लाख ४६ हजार ९११ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.