Home Blog Page 2564

राज्यात कोरोनाच्या ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२९ : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २६८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६२ हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३५ हजार ४६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार ९६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११ दिवस होता तो आता १५.७ दिवस झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.३८ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

राज्यात ११६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ५८ (मुंबई ३८, ठाणे १, भिवंडी ३, नवी मुंबई ९, रायगड २, मीरा-भायंदर ३, पनवेल १, कल्याण डोंबिवली १), नाशिक- ३२ (जळगाव १७, नाशिक ३, मालेगाव ५, धुळे ७), पुणे- १६ (पुणे मनपा १३,सोलापूर ३), कोल्हापूर-३, औरंगाबाद- ५, अकोला- २ (अमरावती २) आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७७ पुरुष तर ३९ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ११६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ५५  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. या ११६ रुग्णांपैकी ७५ जणांमध्ये ( ६५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २०९८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १६ मे ते २६ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७० मृत्यूंपैकी मुंबई १६, जळगाव- १४, नवी मुंबई -९, धुळे -६, मालेगाव -५ , औरंगाबाद ३, भिवंडी-३, नाशिक -३ , अमरावती -२ , कोल्हापूर -२, मीरा भाईंदर -२ , रायगड -२ , सोलापूर -२ आणि १ मृत्यू ठाणे येथील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३६,९३२), बरे झालेले रुग्ण- (१६,००८), मृत्यू- (११७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव रुग्ण- (१९,७४५)

ठाणे: बाधित रुग्ण- (८६३८), बरे झालेले रुग्ण- (२७२९), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७३७)

पालघर: बाधित रुग्ण- (९१३), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१०)

रायगड: बाधित रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण- (५१८), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (४५०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१०७०), बरे झालेले रुग्ण- (८१८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८)

धुळे: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४९)

जळगाव: बाधित रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२२३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

पुणे: बाधित रुग्ण- (७२२३), बरे झालेले रुग्ण- (३४२५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३४८४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७६९), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३९३)

सातारा:  बाधित रुग्ण- (४५९), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (८७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२८८)

सांगली: बाधित रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१४)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४१०), बरे झालेले रुग्ण- (९५९), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३८६)

जालना: बाधित रुग्ण- (११७), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६)

परभणी: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०)

लातूर: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५१)

बीड: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (४१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२०)

अकोला: बाधित रुग्ण- (५३७), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (२३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (११७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१२८), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२४)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५११), बरे झालेले रुग्ण- (३४२), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६०)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

भंडारा: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३१), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३)

एकूण: बाधित रुग्ण-(६२,२२८), बरे झालेले रुग्ण- (२६.९९७), मृत्यू- (२०९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव रुग्ण-(३३,१२४)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

मान्सून उंबरठ्यावर उभा आहे, हे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोना शिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने पूर्वतयारी सुरु आहे. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे तर पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षण सुरु आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहे.

• राज्यात कोरोनाच्या रुग्णांसाठी त्रिस्तरीय उपचार पद्धती असून २५७६ उपचार केंद्र कार्यान्वित आहेत.

• डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH) २७५ आहेत. त्यात एकूण खाटा ३३ हजार ५३८ असून अतिदक्षता विभागातील ५००३ खाटा आहेत. २०२८ व्हेंटीलेटर असून २ लाख ५६ हजार ४८५ पीपीई कीटस् आहेत. तर ४ लाख ३१ हजार २१४ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

• डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (DCHC) ४४९ आहेत. त्यात एकूण खाटा २८ हजार ९२७ असून अतिदक्षता विभागातील २१३७ खाटा आहेत. ६१५ व्हेंटीलेटर असून ६४ हजार ३०८ पीपीई कीटस् आहेत तर २ लाख ११ हजार ८४७ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

• कोविड केअर सेंटर (CCC) १६४३ आहेत. त्यात एकूण खाटा २ लाख ६ हजार ४२८ असून १ लाख ५४ हजार ८६० पीपीई कीटस् आहेत. तर ३ लाख २५ हजार ९६१ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

• वर्गवारी न केलेले २०५ उपचार केंद्र आहेत.

• २५७२ उपचार केंद्रांमध्ये २ लाख ७८ हजार ४५९ आयसोलेशन बेडस् आहेत. त्यातील अतिदक्षता विभागातील एकूण बेडस् ८५०१ आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २९४१ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ६०० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६७.६८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

पाकमध्ये क्रॅश झालेल्या विमानाच्या ढिगारातून सापडले 3 कोटी रुपयांच्या बॅगा

0

कराची. पाकिस्तानात 22 मे रोजी झालेल्या विमान अपघातातून एक अजब माहिती समोर आली आहे. विमानाचा ढिगारा उचलताना त्यातून कॅशने भरलेल्या दोन बॅगा सापडलेल्या आहेत. यामध्ये जवळपास 3 कोटी रुपयांच्या चलनी नोटा असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, एवढी मोठी रक्कम विमानात घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विमानतळावरील स्कॅनिंग आणि तपासातून सोडलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा ढिगारा उचलल्यांनंतर प्रवाशांच्या बॅगांचा शोध घेण्यात आला. त्याचवेळी ही रक्कम सापडली. आता या घटनेचा तपास केला जात आहे.

विमान अपघातात 9 चिमुकल्यांसह 97 जणांचा मृत्यू

22 मे रोजी लाहोर येथून कराचीला जाणारे विमान लँडिंग करण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी कोसळले. विमानातील क्रू मेंबर्ससह यात 99 जण प्रवास करत होते. यातील केवळ 2 जण वाचले आहेत. मृतांमध्ये 9 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. हा अपघात कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झाला होता.

वैमानिकाने एटीसीच्या इशाऱ्यावर दुर्लक्ष केले

एकीकडे पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातासाठी वैमानिकाला कारणीभूत ठरवले जात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने पायलटला तीन वेळा वॉर्निंग दिल्या होत्या. तरीही वैमानिकाने त्यावर दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या वैमानिक संघटनेने या विमान अपघाताच्या चौकशीसाठी बनवलेल्या तपास समितीवरच शंका उपस्थित केली. ज्या विमानाचा अपघात झाला ते एक कमर्शिअल प्लेन होते तरीही तपास समितीमध्ये एकही कमर्शिअल पायलटला ठेवण्यात आले नाही असा आरोप या संघटनेने केला.

प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे निधन

0

अहमदाबाद. प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर बेजान दारूवालायांचे 89 व्या वर्षी अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी बेजान दारुवाला यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे

कोव्हिड-19 बाबत केली होती भविष्यवाणी

बेजान दारूवाला जगभर आपल्या भविष्यवाणीसाठा लोकप्रिय होते. जेव्हा भारतासह संपूर्ण जगात कोरोना पसरला होता, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, येणारा काळ कठीण असेल. दारुवाला भगवान गणेशाचे मोठे फक्त होते. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

संजय गांधींच्या मृत्यूबाबत केली होती भविष्यवाणी

त्यांनी 2014 आणि 2019 नरेंद्र मोदींच्या विजयाची भविष्‍यवाणी केली होती. दोन्ही वेळेस भाजपला संपूर्ण बहुमताने विजय मिळाला होता. त्यांनी यापूर्वी संजय गांधी यांचे अपघाती निधन होईल, अशी भविष्यवाणी केली होती. 23 जून 1980 मध्ये संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले होते.

६ लाख ४७ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन

0

पुणे-लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४,३४,५४९ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६,४७,८६७ व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २८ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,१८,६४७ गुन्हे नोंद झाले असून २३,५०८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ७९लाख ८५ हजार ३७१ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २५४ घटना घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर-९६ हजार फोन

पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर ९६,६९७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे अशा ७०६ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ६,४७,८६७ व्यक्ती क्वॉरंटाईन (Quarantine) आहेत, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२३ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७६,०७६ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १४ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १५, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३,ए.टी.एस.१,ठाणे ग्रामीण १, जळगाव ग्रामीण १ अशा २५ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १६५ पोलीस अधिकारी व १०६१ पोलीस कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रिलिफ कॅम्प

राज्यात एकूण ८४४ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ४४,६१९ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

नागपूर व गडचिरोली येथील जिल्हा पुरवठा अधिकारी निलंबित

0

मुंबई, दि. २९: कोविड-19 साथरोग काळात  सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने नागपूर व गडचिरोलीच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. तसेच ज्या राईस मिलमधून निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झालेला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परमिशन रद्द करण्यात यावी. तसेच अनेक जिल्ह्यातून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि एफसीआय प्रतिनिधी यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त तपासणी पथके तयार करून सीएमआर (CMR) साठवलेल्या सर्व गोदामांची सखोल तपासणी करण्यात यावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांना दिले आहेत.

मंत्री श्री.  भुजबळ हे सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे वितरित होणाऱ्या धान्याची नियमितपणे पाहणी करीत असतात. आता प्राप्त झालेल्या तांदूळ व डाळीचे त्यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून नमुने पाहणीसाठी मागवले असता, त्यांना तांदळाचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आले. याबाबत छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक यांच्याकडून माहिती घेतली असता नाशिक जिल्ह्यात नागपूर येथील गोदामातून तांदूळ प्राप्त झालेला असून नागपूर गोदामात आलेला तांदूळ हा गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिल मधून प्रक्रिया होऊन प्राप्त झाल्याची त्यांना माहिती मिळाली.

राज्यात कोविड-19 साथरोग काळात पात्र लाभार्थ्यांना निकृष्ट प्रतीचा तांदूळ पुरविल्याने गरजू लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहे, ही अतिशय गंभीर बाब त्यांनी सचिवांना निर्दशनास आणून देत निकृष्ट प्रतीचा तांदूळ ताब्यात घेऊन गोदामात साठवणुकीसाठी जबाबदार असणारे तपासणीस (Q.C) तसेच या कामी सनियंत्रण करण्यासाठी जबाबदार असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी, नागपूर व जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांना  निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. तसेच ज्या राईस मिलमधून प्रक्रिया केलेला निकृष्ट प्रतीचा तांदूळ प्राप्त झालेला आहे, त्या राईस मिलवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व त्यांची मिलिंग परमिशन रद्द करण्यात यावी, असे आदेश त्यांनी सचिवांना दिले. त्याचबरोबर राज्यातील अनेक जिल्ह्यातून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने राज्यस्तरीय उपनियंत्रक अंमलबजावणी आणि एफसीआय प्रतिनिधी यांच्या नियंत्रणाखाली संयुक्त तपासणी पथके तयार करून CMR साठवलेल्या सर्व गोदामांच्या सखोल तपासणीबाबत कार्यवाही करून तातडीने अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेश छगन भुजबळ यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

0

जिल्ह्यात गेल्या वर्षी महापुराने थैमान घातल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापूरातूनही कोल्हापुरकर सावरल ! पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले असून पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सजग केली आहे. 

गेल्या वर्षीच्या महापुराचा कटू अनुभव डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज आणि सतर्क केली आहे. महापुराचा सामना करताना कोणतीही कमी राहू नये यावर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला असून पूर बाधित गावात पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. गेल्यावर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे मान्सूनपूर्व आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बोटींची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच एनडीआरएफची 2 पथके बोटींसह मागणी केली असून भारतीय तटरक्षक दलही बचाव व मदत कार्यासाठी सक्रिय झाले आहे.

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली असून, यामध्ये इन्फ्लेटेबल रबर बोट- ओबीएम सह – 8, रबर बोट(जुन्या-नव्या)- 17, एअर पंप फॉर बोट- 6, टॉर्च सर्च लाईट- 40, लाईफ बाईज-30, सेफ्टी हेलमेट-50, मेगा फोन-21, फलोटींग पंप-7, स्कुबा डायव्हिंग सेट -2, लाईफ जॅकेट -200, लाईफ बॉयरिंग- 306, सर्च लाईट -20, हेड लाई विथ झुम – 10, फलोटींग रोप मिटर-100 , इन्फ्लेटेबल लाईफ जॅकेट -50, अंडर वॉटर सर्च लाईत-10 तसेच आस्का लाईट-18 यांचा समावेश आहे. संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी उपलब्ध करुन दिलेली साधनसामुग्री योग्य सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील स्वयंसेवी-सेवाभावी संस्था, आपदा मित्र अशा 808 स्वयंसेवकांचा रेस्क्यू फोर्स तैनात केला आहे. गावागावात तरुणांनी फौजच उभी करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी पाऊस आणि अतिवष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे जिल्ह्यातील 386 गावे बाधित झाली, यामध्ये कोल्हापूर शहर, शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले -23, करवीर-57, कागल-41, राधानगरी -22, गगनबावडा-19, पन्हाळा-47, शाहुवाडी-25,गडहिंग्लज -27, चंदगड-30,आजरा-30 आणि भुदरगड तालुक्यातील -23 गावांचा समावेश आहे. या पूरबाधित गांवामध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने शोध व बचाव पथके गठीत केली असून गाव ते जिल्हा पातळीवर प्रशासकीय यंत्रणा गतिमान केल्या आहेत. पूरबाधित गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचेही नियोजन करण्यास प्राधान्य दिले आहे.

जिल्ह्यातून प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा या नद्या वाहतात, कृष्णा नदी जिल्ह्याच्या ईशान्यपूर्व सिमेवरुन तर वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि हिरण्यकेशी या नद्या वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. वारणा नदी सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सिमेवरुन 120 कि.मी. वाहते, जिल्ह्यातील कासारी, कुंभी, तुळशी आणि भोगावती या उपनद्या पंचगंगा नदीस मिळाल्या आहेत. पंचगंगा नदी नृसिंहवाडीजवळ, तर दुधगंगा नदी जिल्हा सिमेबाहेर थोड्याच अंतरावर कृष्णा नदीस मिळते. तिलारी ही एकच नदी पश्चिमवाहिनी आहे. जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दुधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, पाटगांव, चिकोत्रा, चित्री,जंगमहट्टी, घटप्रभा जांबरे ही धरणे आहेत, जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने पाटबंधारे विभागही सज्ज आणि सजग झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच धरणप्रकल्पातील पाणीसाठा, विसर्ग आणि त्यानुसार नद्यीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या सर्व गोष्टी नियोजनबध्द, शास्त्रसुध्द पध्दतीने करण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी केले आहे. महापुरास कारणीभूत मानल्या जाणाऱ्या अलमट्टी प्रकल्पाच्या पाणीसाठा आणि विसर्गाबाबतही  बेळगाव, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील प्रशासकीय पातळीवर सुयोग्य नियोजन ठेवण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून संभाव्य पूरनियंत्रणासाठी आवश्यक पूर्वतयारी करुन पूराचा धोका असणाऱ्या गावांबरोबरच तालुका आणि जिल्हा पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन गट कार्यान्वित करुन आपत्ती निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनाचे प्रशिक्षणही दिले आहे. गाव पातळीवरही शोध व बचावपथके कार्यान्वित केली असून यामध्ये महसूल विभागाबरोबरच पोलीस, जिल्हा परिषद, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, कृषी, आरोग्य, गृहरक्षक, अग्निशमन दलाबरोबरच जिल्हयातील विविध रेस्क्यू फोर्स आणि गावातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. पूराचा धोका असणाऱ्या गावांमध्ये नियंत्रण कक्ष अहोरात्र सुरु केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जूनपासून 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येत असून संभाव्य पूरपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे. यासाठी नियंत्रण कक्षाचा 1077 हा टोल फ्री क्रमांक असून अन्य क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. 0231-2659232 तसेच पोलीस नियंत्रण कक्षही सज्ज असून यासाठी 100 तसेच 0231-2662333 असे दुरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाने सर्व धरण प्रकल्पावर तसेच जिल्हास्तरावरही आपत्ती नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही यंदाच्या पावसाळयात करण्यात येणाऱ्या उपाययोजनामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाही करणे क्रमप्राप्त झाले आहे. महापुराच्या काळात पूरबाधित गावात बचाव व मदत कार्य गतिमान करण्याबरोबरच पूरग्रस्थांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरणाची ठिकाणे निश्चित करणे, निवारागृहांची निवड करताना वीज,पाणी, स्वच्छतागृहे, भोजन, औषधोपचार आदि पायाभूत सुविधाची उपलब्धी महत्वाची आहे. पूरप्रतिबंधक उपायोजना राबविताना कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीने पूरपरिस्थितीमध्येही कोरोना प्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे असून यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर, स्थलांतरीत लोकासाठींच्या निवारागृहामध्ये निर्जंतुकीकरणाची साधने, मास्क, सॅनिटायझर यांचीही उपलब्धता करण्यावर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी भर दिला आहे.

एस.आर.माने,कोल्हापूर.

महिला व बालकल्याण विभागाचे सखी अभियान

0

मुली वयात येत असताना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर स्त्री धर्मानुसार मुर्लीना मासिक पाळी येते. या शारीरिक बदलामुळे मुली अबोल व अस्वस्थ होतात. मासिक पाळीच्या कालावधीमध्ये मुलींचा दृष्टिकोन संकुचित होतो. शिक्षणाचा अभाव, आरोग्‍यविषयक अपुरी माहिती व स्वच्छतेचा अभाव, स्वच्छतेच्‍या अपुऱ्या सुविधा यामुळे हा दृष्टि‍कोन निर्माण झालेला आहे. परिणामी लक्षावधी महिला व मुली मासिक पाळीच्या कालावधीमध्ये पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही.

            या पार्श्वभूमीवर जागतिक स्‍तरावर ‘मासिक पाळी स्वच्छता दिवस’ ही संकल्पना उदयास आली. ‘मासिक पाळी’ या विषयावर जनजागृती निर्माण करणे व या विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टि‍कोन बदलणे, समाजातील विविध घटकांना ‘मासिक पाळी’ या विषयावर बोलते करणे हा या मासिक पाळी स्वच्छता दिवसाचा उद्देश आहे. मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था, समाजमाध्यमे यांना एकत्र आणून महिला व मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छता व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.

            मासिक पाळी स्वच्छता दिवसाची सुरुवात प्रथम जर्मनीमध्ये ‘वॉश युनायटेड’ या संस्थेने दिनांक २८ मे २०१४ मध्ये केली. तेव्हापासून २८ मे हा जागतिक स्तरावर मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. या मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेने एक नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील इयत्ता ८ वी ते १० वी मधील मुली तसेच १४ ते १६ वयोगटातील शालाबाह्य मुलींना सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा केला जाणार आहे.

            किशोरवयीन मुलींना मासिक पाळीमध्ये घेतल्या जाणाऱ्या स्वच्छतेचे महत्त्व आणि सॅनिटरी पॅडच्या वापराबाबत सवय निर्माण करणे व त्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

            पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बालकल्याण विभागाच्‍यावतीने सन २०२०-२१ मध्ये ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी पुढीलप्रमाणे योजना राबविण्‍यात येत आहेत.

            1) इयत्‍ता ७ वी ते १२ वी पास मुलींना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगणक प्रशिक्षणासाठी रक्‍कम रु. ३५००/- पर्यंत अनुदान 2) इयत्ता १२ वी मध्ये 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त गुण मिळविलेल्या (विशेष प्रावीण्य मिळवलेल्या) मुर्लीना पुढील शिक्षणासाठी पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर आर्थिक मदत रक्कम रु. ५०००/ पर्यंत अनुदान ३) आदिवासी व दुर्गम भागातील मुलींना इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शिकण्यासाठी अर्थसहाय्य करणे 4) ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी च्या मुलींना सायकलसाठी रक्कम रुपये ४५००/- पर्यंत अनुदान देणे  5) ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायाभिमुख व जीवनाश्यक वस्तू खरेदी करिता अनुदान देणे (पीठ गिरणी रक्कम रु. १२०००/- पर्यंत, शिलाई मशीन इ. रक्कम रु.७५००/- पर्यंत), 6) ग्रामीण भागातील महिलांना घरकुल दुरुस्तीसाठी रक्कम रु. ५०,०००/- पर्यंत अनुदान देणे.  या सर्व योजनांसाठी पुणे जिल्‍ह्यातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे संपर्क साधावा.

            एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत शून्‍य ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता यांना 1) अनौपचारिक शाळा पूर्व शिक्षण  2) पूरक पोषण आहार 3) लसीकरण 4) आरोग्य तपासणी 5) संदर्भसेवा 6) आहार व आरोग्य शिक्षण या सेवा गावातील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये दिल्या जातात.

            राज्‍यातील महिला व बाल विकासाच्‍या योजनांची योग्‍य अंमलबजावणी व्‍हावी यासाठी महिला व बाल विकास विभागाच्‍या मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्‍या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या योजनांची अंमलबजावणी अध्‍यक्षा निर्मला पानसरे, महिला व बालकल्‍याण विभागाच्‍या सभापती पूजा पारगे यांच्‍या मार्गदर्शनाखाली यशस्‍वीपणे सुरु आहे.

            पुणे जिल्‍ह्यात महिला सुरक्षा दक्षता समिती कार्यरत आहे. त्‍यांच्या मदतीसाठी शासन यंत्रणेचे संपर्क क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. पुणे जिल्ह्यातील तालुका संरक्षण अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- आंबेगाव- अच्युत शेवाळे (9623693787), बारामती- मनिषा जाधव (9404221070), भोर- मयूर भुमकर (8796512326), दौंड- राजश्री खंदारे (7774056692), हवेली – भाग्यश्री घाडगे (8149873494), इंदापूर- शेखर बंडगर (9762108429), जुन्नर-अक्षय साळुंके (9175988969), खेड- प्रवीण नेहरकर (8855088782), मावळ- नूतन देवकर (9822959605), मुळशी- पद्माकर सुरसे (8149468579), पुरंदर-कविता चौरे (9503767478), शिरुर- युवराज गाढवे (9689799696) आणि वेल्हा- नितीन मोरे (9096210652)

            पुणे जिल्ह्यातील उपविभागीय सरंक्षण अधिकाऱ्यांची (उप विभागीय पोलीस अधिकारी) नावे पुढील प्रमाणे- बारामती विभाग- नारायण शिवरगावकर (9527513100, 02112-223630), दौंड विभाग- ऐश्वर्या शर्मा (9691981081, 02117-262333), भोर विभाग -अण्णासाहेब जाधव- (9922712100, 02115-223180), हवेली विभाग- सई भोरे पाटील (9421972522, 020-25658035), खेड विभाग- गजानन टोम्पे-(9545555505, 02135-222013), जुन्नर विभाग- दिपाली खन्ना (7219314433, 02132-223333), लोणावळा विभाग- नवनीत कुमार कावत (9560409479, 02114-273060)

            भरोसा सेल- कौटुंबिक हिंसाचाराशी निगडीत मदतीसाठी भरोसा सेल असून पुणे शहर- (020-26208341) आणि  पिंपरी चिंचवड साठी (020-27352500) हे दूरध्‍वनी क्रमांक आहेत.

       महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरते निवासस्थान आवश्यक असल्यास एक थांब केंद्र- सखी (वन स्‍टॉप सेंटर) स्‍थापन करण्‍यात आले आहे. एक थांब केंद्र -सखी, येरवडा- (9579635511) आणि एक थांब केंद्र- सखी,  मुंढवा- (8275732421) यावर संपर्क साधून मदत घेता येऊ शकते. पुणे जिल्‍हा परिषदेचा टोल फ्री क्रमांक 18002334130 असा असून त्‍यावरही संपर्क साधून मदत मिळवता येवू शकते.

(राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे)

ग्राहकांना फसविणाऱ्या रेशन दुकानदारांविरुद्ध ७९ खटले दाखल

0

वैध मापन शास्त्र यंत्रणेची राज्यभर तपासणी मोहीम

मुंबई, दि. 29 : कोरोना (कोवीड-19) च्या काळात ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैध मापन शास्त्र विभागाने राज्यातील सर्व रेशन/ स्वस्त धान्य दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत एकूण 886 स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये ग्राहकांना वस्तू वजनात कमी दिल्यासंबंधीचे 2 खटले व इतर नियमांचे उल्लंघनाबाबत 77 असे मिळून एकूण 79 खटले नोंदविण्यात आले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे वितरण राज्य शासनाकडून राज्यातील रेशन दुकान व स्वस्त धान्य दुकानामार्फत करण्यात येते. कोरोना (कोवीड-19) प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अशा दुकानदारांकडून फसविले जाऊ नये, यासाठी राज्यातील सर्व रेशन दुकाने व स्वस्त धान्य दुकाने यांची तपासणी करण्याबाबतचे निर्देश अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिले होते. त्यानंतर वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक तथा गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) श्री. अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली तपासणी मोहिम सुरू केली. या मोहिमेत आतापर्यंत विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रेशन दुकानदारांविरुद्ध 79 खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.

वैध मापन शास्त्र यंत्रणा ही ग्राहकांच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना सजग राहण्याचे निर्देश श्री. गुप्ता यांनी दिले आहेत.

ग्राहकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, रेशन दुकान व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून वजनात अथवा मापात वस्तू कमी मिळत असतील, तसेच आवेष्टीत वस्तू छापील किंमतीपेक्षा जादा दराने दिल्या जात असतील, तर ग्राहकांनी क्षेत्रीय वैध मापन शास्त्र कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा dcimms_complaints@yahoo.com या ई-मेलवर तक्रार नोंदवावी.

बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात 15हजारांची वाढ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि.२९ : बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. 

वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार 

आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार 

इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार 

इतर भागातील  विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन  देण्यात येईल

आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे भाजपाकडून स्वागत

पुणे-कोरोनाचे संकट ध्यानात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करते, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. वारकऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे तसेच कोरोनाचे संकट ध्यानात घेऊन पंढरपूर येथे न जाता आपापल्या घरीच विठ्ठलाची पूजा करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वारकरी संप्रदायातील प्रमुखांसोबत पंढरपूरची आषाढीची वारी चालू ठेवण्याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ व नामदेव अशा सात संतांच्या पालख्या पंढरपूरला आषाढीसाठी जातात. ही शेकडो वर्षांची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होऊ नये. परंतु त्याच वेळी या साथीच्या रोगाला कोणी बळी पडू नये, असा विचार झाला. त्यातून तीन पर्याय सुचविण्यात आले. निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत नेहेमीप्रमाणे पालख्या नेण्यात याव्यात किंवा वाहनाने पालख्या नेण्यात याव्यात किंवा हेलिकॉप्टरने पादुका नेण्यात याव्यात असे तीन पर्याय मांडण्यात आले. प्रशासनाने आज वाहन किंवा हेलिकॉप्टर हे दोन पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वारीची परंपरा खंडीत होणे टाळले जाईल व त्याचबरोबर कोरोनापासूनही बचाव केला जाईल. भाजपा प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करते.

ते म्हणाले की, शेकडो वर्षांच्या वारीच्या परंपरेबद्दल समाजात मोठी आस्था आहे. वारीची ओढ वाटणे स्वाभाविक आहे. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन आपण सर्व वारकऱ्यांना करतो. आषाढीसाठी पंढरपूरला दरवर्षी लाखो लोकांनी जाण्याची परंपरा यंदा बाजूला ठेऊन आपण सर्वांनी घरीच विठ्ठलाची पूजा करून आषाढी एकादशी साजरी करणे गरजेचे आहे.

त्यांनी सांगितले की, पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्र आणि भारत कोरोनाच्या संकटातून बाहेर पडेल आणि आगामी काळात परंपरेप्रमाणे दिमाखात पंढरपूरची वारी होईल अशी आपल्याला खात्री आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
१) मेसेज:
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत नवीन मेसेज तयार करून डायरेक्टर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आयटीएस यांच्याद्वारे सर्व मोबाईल कंपन्यांना दिनांक १७/३/२०२० रोजी कळविण्यात आले आहेत. त्या अनुषगाने आतापर्यंत बीएसएनएल यांनी ३५ लाख: आयडिया ३२ लाख, वोडाफोन ३८ लाख लोकांना मेसेजस पाठवले असून एअरटेल बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.
२) व्हाट्सएप्प ग्रुप:
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत व्हॉट्स अप ग्रुप मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत नवीन मेसेजेस तयार करून पाठवण्यात येत आहेत. तसेच वर्तमानपत्रातील कात्रणे, व्हिडीओ क्लिप पाठवण्यात येत आहेत. एकुण २४८ ग्रूपमध्ये पाठवण्यात आले असून या ग्रुपमधील सभासदांची संख्या अंदाजे सव्वा लाखाच्या दरम्यान आहे. याशिवाय शासकीय पत्रके/परिपत्रके वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहेत.
३) जिंगल:
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत एकूण दहा जिंगल तयार करून ४ रेडिओ चॅनलवर ९४.३ रेड एफ एम यांच्याकडे प्रतिदिन १२ ते १५ वेळा वाजवण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच या जिंगल्स व्हाट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या जिंगल टोलनाका,  रेल्वे स्टेशन, बस स्टेशन याठिकाणी वाजवण्यासाठी देण्यात आले आहेत.
४) पोस्टर बॅनर :
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावरून पोस्टर डिझाईन तयार करून दिले आहेत व हे पोस्टर्स वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये किमान पाच ठिकाणी असे एकूण १४ हजार ४३६ पोस्टर लावण्यात आले आहेत. सदरचे GEO tagged केलेले पोस्टर्स फेसबुक पेजवर अपलोड करून घेण्यात येत आहेत. तसेच हे पोस्टर्स बसच्या पाठीमागे, रेल्वे स्टेशन व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
५) वेबसाईट:
जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत शासन परिपत्रके, व्हिडिओ क्लिप्स , फोटो अपलोड करण्यात आले आहेत. तसेच या वेबसाईटवर वेळोवेळी माहिती अपडेट करण्यात येत आहे.
६) फेसबुक:
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरिता जिल्हा परिषदेने नवीन फेसबुक पेज तयार केले असून त्याचे नाव Pune Fight Coronavirus coviD 2019 असे आहे. त्यावर कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत दिलेल्या मेसेजेस नेटवर्कमध्ये BOOST करण्यात आलेले आहेत. यामध्ये वेळोवेळी अपडेट करण्यात येत आहेत. आतापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून एकुण ३ लाख ५० हजार लोकांपर्यंत पोहोचलो आहोत.
७) ट्विटर :
जिल्हा परिषदेचे स्वतंत्र ट्विटर अकाउंट CEO ZP PUNE या नावाने असून जिल्हा परिषदेतील महत्वाच्या बातम्या राज्यशासनाच्या महत्वाच्या बातम्या यावर ट्विट करत आहोत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, DivisionalInformation Office, pune, Directorate General of Information and Public Relations (DGIPR), Maharashtra, Pune Municipal Corporation, Commissioner of Police, Pune City:, Chief Minister of Maharashtra; Prime Minister of India, Ministry of Health & Family welfare, Government of India; President of India,  ट्विटर अकाउंट मधील बातम्या वेळोवेळी रीट्वीट करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत २ लक्ष ९८ हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत.- राजेंद्र सरग, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 4 हजार 147

पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 8 हजार 981 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 29 :- पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 8 हजार 981 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 147 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 200 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 3 हजार 848 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 460 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 321, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 100, कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 452 कोरोना बाधीत रुग्ण असून 134 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 301 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 795 कोरोना बाधीत रुग्ण असून 314 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोना बाधित एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 98 रुग्ण असून 54 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 आहे. कोरोना बाधित एकूण 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 436 कोरोना बाधीत रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 359 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 83 हजार 73 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 77 हजार 945 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 128 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 68 हजार 849 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 8 हजार 981 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.29 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध- रावेत या उडडाणपुलाचे लोकार्पण

पुणे दि.29: औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उडडाणपुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उडडाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
                   या उडडाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोरोनामुळे आषाढीचा पायी पालखी सोहळा रद्द- दशमीला पादुका पंढरपूरात पोहचविण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे, 29: आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगतानाच आषाढीवारीसाठी परवानगी देण्यात येणाऱ्या पादुका दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे-पाटील, राजाभाऊ चोपदार, विशाल मोरे, माणिक मोरे, सोपानदेव देवस्थान सासवडचे गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीला अनेक वर्षाची परंपरा आहे, वारीची ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. वारीची ही परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी राज्यातील प्रमुख व सबंधित जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी परवानगी दिलेल्या संस्थांनच्या पादुकांना राज्यशासनाच्यावतीने विमान, हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीला पंढरपूर येथे पोहचविण्यात येईल. विमान तसेच हेलिकॉप्टर बाबत हवामानाचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय राज्य सरकार राखून ठेवत आहे. याबाबतचा निर्णय घेतांना संबंधित संस्थानला विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही या संतांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करुया, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आषाढी वारीसाठी आपण सर्वांनी शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडली व शासनाच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत केले ही कौतुकास्पद बाब आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामूळे गेल्या अडीच महिन्यापासून सर्व धर्मीयांनी आपले धार्मिक कार्यक्रम घरात राहुनच साजरे केले आहेत. हाच आदर्श समोर ठेवून या वर्षीचा आषाढी वारीचा कार्यक्रम गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन परंपरा कायम ठेवायची आहे. या सोहळ्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. याबाबतची सर्व ती खबरदारी राज्यशासन घेणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगी शिवाय कोणतीही पालखी किंवा दिंडी निघणार नसल्याचे सांगतानाच राज्यातील वारकरी संप्रदायाच्या सकारात्मक भुमिकेबद्दल त्यांनी आभार मानले. दुरदर्शन तसेच अन्य वृत्तवाहिन्यांवरुन आषाढी वारीचा आनंद घरबसल्या अनुभवता येणार आहे. वारकरी संप्रदाय व सर्वांनी पांडुरंगाचे दर्शन घरातूनच घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर प्रास्ताविक करतांना म्हणाले, आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत आपण 15 मे रोजी बैठक घेतली. मात्र पंधरा दिवसात पालखी मार्गक्रमण करीत असलेल्या पुणे, सातारा, सोलापूर, या तीनही जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढली आहे. पुढील कालावधीत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पंढरपूर येथेही रुग्ण आढळले आहेत. एकुणच पुणे विभागात सांगली जिल्ह्याचा अपवाद वगळता चारही जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत शासनानाच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
राज्यशासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे वारकरी निश्चितपणे स्वागत करतील, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला. तसेच यावेळी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त यांनीही व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे आषाढी वारीच्या आयोजनासंदर्भात आपली मते मांडली.
या बैठकीमध्ये पालखी सोहळ्याचे स्वरूप, सहभागी वारकरी, प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, पंढरपूर येथील नियोजन तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

‘कोरोना’शी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२९ : कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर – कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली.

सातारा जिल्ह्यातील कराड – तासगांव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे. सातारा – कोरेगांव – मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. लोकांची सारखी मागणी असते, असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्या. खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे.

सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे,असे त्यांनी  यावेळी सांगितले.

टेंभुर्णी – पंढरपूर – मंगळवेढा – उमदी – विजापूर आणि अक्कलकोट – नळदुर्ग – तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. माढा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या,असे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील आढावा घेताना संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे. भूसंपादनातील त्रुटी दूर करा, मिळालेला निधी खर्च करा,असे सांगितले. नाशिक रोडवरील चाकण, राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते. तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्भवते. तेव्हा तेथील रुंदीकरणाचे काम करावे, असे श्री.पवार यांनी सांगितले. पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.