Home Blog Page 2562

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 220

पुणे विभागातील 5 हजार 63 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 9 हजार 749 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 31 :- पुणे विभागातील 5 हजार 63 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 हजार 749 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 220 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 216 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 7 हजार 670 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4 हजार 350 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 988 आहे. कोरोनाबाधित एकूण 332 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 229, सातारा जिल्ह्यात 34, सोलापूर जिल्ह्यात 52, सांगली जिल्ह्यात 9 कोल्हापूर जिल्ह्यात 58 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 516 कोरोना बाधीत रुग्ण असून 158 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 891 कोरोना बाधीत रुग्ण असून 380 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 427 आहे. कोरोना बाधित एकूण 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 110 रुग्ण असून 57 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 562 कोरोना बाधीत रुग्ण असून 118 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 439 आहे. कोरोना बाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 87 हजार 951 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 82 हजार 544 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 407 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 72 हजार 680 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 9 हजार 749 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.31 मे 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

भाजपनेते श्रीनाथ भिमाले आणि मटातर्फे पेपर विक्रेते यांना अन्नधान्य किट वाटप

पुणे-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका वृत्तपत्र व्यवसायाला बसला असून , त्यामुळे घरोघरी वृत्तपत्र टाकून उदरनिर्वाह करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत . त्याची दखल घेऊन नगरसेवक श्रीनाथ भिमाले आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्या तर्फे स्वारगेट विभाग विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले . कोरोना विषाणूच्या महामारीमुळे वृत्तपत्रविक्रेत्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे . समाजातील हा महत्त्वाचा घटक दुर्लक्षित राहिल्याचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या लक्षात आल्याने , त्यांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट वृत्तपत्र विभाग परिसरातील वृत्तपत्रविक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले . या वेळी नगरसेवक श्रीनाथ भिमाले , क्षेत्रीय अधिकारी गणेश सोनुणे,पत्रकार जितेंद्र आष्टीकर ,प्रशांत आहेर यांच्या उपस्थिती मध्ये वाटप करण्यात आले सतीश काळे , चेतन चावीर , प्रशांत लोंढे , रमेश बिबवे, संजय शिंदे , प्रमोद शिळीमकर , अक्षय खिलारे, ओमप्रकाश जैन यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले .

यावेळी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे , वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे , सचिव अरुण निवंगुणे , विनायक वाळके, अजय गायकवाड ,वसंत कोल्हटकर , अभिजीत श्रोत्री , भागवत वाघ,योगेश भुजबळ, सुनील बरके , अमित कोंडे उपस्थित होते.

३२३ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव चुकीचा :न्यायालयात दाद मागणार माजी उपमहापौर आबा बागुल यांचा इशारा

पुणे- एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना, पालिका प्रशासनाने मात्र राज्यशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत नियमबाह्य रस्ता रुंदीसाठी प्रस्ताव दाखल करण्याची तत्परता दाखवली आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावामुळे आगामी काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न पुणेकरांसाठी जीवघेणा ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या नियमबाह्य कारभाराविरोधात  न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिला आहे. याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, २०१६ मध्ये राज्यसरकारने नव्याने टीडीआर लागू केले. त्यानुसार कमीतकमी नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्याच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचे बंधन महापालिकेवर घातलेले असताना, आता पालिका प्रशासनाने कुरघोडी करत शहरातील सहा मीटरच्या रस्त्यांचे नऊ मीटर रुंदीकरण करून टीडीआर देण्याचा तयार केलेला प्रस्ताव चुकीचा असून नियमबाह्य आहे. शहरातील सहा मीटर व साडेसात मीटर रुंदी असलेले १०३ किलोमीटर लांबीचे ३२३ रस्ते २१० कलमानुसार रुंद करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव हा केवळ विकसकांच्या हितासाठीच आहे, असे स्पष्ट करून आबा बागुल म्हणाले कि,  जागेवर नऊ मीटर रस्ता रुंद झाल्यानंतर टीडीआर देणार कि कागदोपत्री रस्ते रुंद करणार ? हा मुद्दा महत्वाचा आहे. तसेच एखाद्या इमारतीच्या कोपऱ्यात रस्ता ताब्यात घेऊन रुंदीकरण करणे अयोग्य  आहे.पुणे शहरात २३ गावे ज्यावेळी समाविष्ट झाले त्यावेळी कायद्याने १५ टक्के क्षेत्र रस्त्यांसाठी ठेवणे आवश्यक होते ;पण ते आज केवळ ९ टक्केच आहे. राज्यसरकार ने महापालिकेला १५ टक्के क्षेत्र रस्त्यांसाठी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मी स्वतः २३ गावांमधील सर्व रस्ते दीडपट रुंद करण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र त्यावेळी प्रशासनाने स्थायी समितीत  रस्ते कलम  ३७ [१] खाली करता येतील , कलम २१० नुसार करता येणार नाही. ३७ [१] नुसार हरकती सूचना घेऊन फेरबदल करता येईल अशी भूमिका प्रशासनाने मांडली होती. मग आता प्रशासन १२३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे फेरबदल करणार आहे,ते नियमाला धरून आहेत का ? कि कलम ३७ [ १ ] नुसार पाहिजे असा प्रश्नही आबा बागुल यांनी उपस्थित केला. काही विकसकांच्या फायद्यासाठी कलम २१० नुसार प्रशासन रस्ते आखत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे जे रस्ते आखायचे आहेत , ते कलम ३७ [ १ ] नुसारच होणे गरजेचे आहे. तसेच ३७ [ १ ] नुसार रस्ते पूर्णत्वास गेल्यानंतरच टीडीआर दिला पाहिजे. रस्ते पूर्ण झाल्याशिवाय जर टीडीआर दिला तर रस्त्यांवर कोंडी निर्माण होईल. सहा मीटरच रस्ता राहील. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यावर नऊ मीटरचा रस्ता दिसेल आणि संबंधितांना टीडीआर दिलेला दिसेल. असे न करता राज्यसरकारकडून आलेल्या नियमानुसारच रस्ते रुंद झाले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी आपण विकास आराखडा तयार केलेला असून नऊ मीटर रस्ते दर्शवण्यात आले आहे मात्र त्याकाळात नऊ मीटरच्या खाली रस्ते आखले नसते तर हा पेचप्रसंग निर्माण झाला नसता, असेही आबा बागुल यांनी नमूद केले. काही विकसकांसाठी राज्यसरकारवर कुरघोडी करून हा एक पर्याय काढून प्रशासन कलम २१० चे रस्ते आखत असल्याचे या प्रस्तावामुळे स्पष्ट होत आहे. कायद्यानुसार २१० चे असे रस्ते आखणी करता येत नाही हे प्रशासनाने राज्यशासनाला यापूर्वीच कळवलेले आहे.  २३ गावांचे डॉकेट आपल्याकडे उपलब्ध असून स्थायी समितीच्या खास सभेकडे प्रलंबित आहे. त्यामुळे २३ गावांमधील रस्ते खऱ्या अर्थाने रुंद करा. टीडीआर, एफएसआय काय द्यायचा तो द्या. मात्र बांधकाम क्षेत्रात मंदी आहे, महसुलाच्या नावाखाली  नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. कोरोनापेक्षा आगामी काळात जीवघेण्या वाहतूक कोंडीत पुणेकरांचे बळी जातील, असा  अनागोंदी  कारभार होऊ देऊ नका असे आवाहनही आबा बागुल यांनी पालिका प्रशासनाला केले आहे. 

पुन्हा आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा  देण्याची नगरसेवकावर वेळ 

पुणे- प्रत्येक वेळी आंदोलन करणे ,निवेदने देणे ,अधिकाऱ्यांना फैलावर घेणे ,प्रसंगी महापालिका आयुक्तालयाला टाळे ठोकणे असे पराक्रम केल्याशिवाय ‘या ‘ प्रभागातल्या नागरिकाना पाणीच मिळत नाही . हा खेळ सुमारे साडेतीन वर्षे सुरु आहे . आणि आता पुन्हा या नगरसेवकाला , आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्याची वेळ येवून ठेपली आहे. . विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाला एवढे झगडावे लागते आहे. नाना भानगिरे नाव त्यांचे . उद्या ते याच पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांना भेटणार आहेत,अधिकारी जाणून बुजून ,काही हेतूने पाण्याच्या मापात पाप करत असल्याचे सांगत आयुक्तांना निवेदन देणार आहेत. सौरभ राव असताना त्यांनी महापालिकेत डुकरे सोडली होती, महापालिका आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकले होते, हंडा मोर्चे आणले होते .आता शेखर गायकवाड यांच्या कार्कीर्दीत हि प्रारंभ होताना दिसत आहे.

  कोरोनाच्या महामारीत देखील अधिकारी वर्गाची सवय मोडत नाही ज्याला काही लोक मुजोरी हि म्हणतात . पूर्वी लोक नाना भानगिरे यांना तर संपर्क करीतच आता ‘मायमराठी ‘ कडे हि सातत्याने तक्रारी करू लागलेत .हांडेवाडी रोड ,चिंतामणी नगर ,बडदे वाडी ,हांडेवाडी रोड च्या सर्व सोसायटी परिसर ,महम्म्द्वाडी परिसर अशा सुमारे १ लाख लोकवस्तीला कधी कितीही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आणि काही काही ठिकाणी तर १५ /१५ दिवस पाणी येत नाही अशा तक्रारी आहेत . एकीकडे सातत्याने हात धुवा सांगणाऱ्या महापालिकेने हात धुवायला च ,काय प्यायच्या पाण्याचीही मारामार करून ठेवली आहे आणि वर सातत्याने ..हाथ धुवा, हाथ धुवा.. असे उपदेशांचे डोस पाजून स्वच्छतेच्या  पुजारी असल्याचा अविर्भावात राहणाऱ्या  अधिकाऱ्यांनी आपल्याला कोण काय करतंय अशा भ्रमात राहणं खर तर तर यापुढे तरी शहाणपणाचं ठरणार नाही .भामा आसखेड होऊ द्यात असे सांगत  जनतेच्या सहनशीलतेचा  अंत पाहणे रिस्क घेणे होणार आहे हे लक्षात घ्यायला हवंय.

शाळा फि वाढविली,तक्रार करा

0

पुणे : “राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क आकारू नये. पालकांनी शुल्कवाढी संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा,” असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

पुण्यासाठी संनियंत्रण अधिकारी आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
विभाग : संनियंत्रण अधिकारी (पद) : संपर्क क्रमांक
पुणे विभाग : मीना शेंडकर (शिक्षण उपनिरीक्षक) : 9890643222
पुणे विभाग : धनाजी बुटे (शिक्षण उपनिरीक्षक) : 9922458799
पुणे : ज्योती परिहार (उपशिक्षणाधिकारी- प्राथमिक) : 8888225364
पुणे मनपा : धनजंय परदेशी (उपप्रशासकीय अधिकारी) : 9404609170

हे आहेत महाराष्ट्रातील अन्य अधिकारी …

शाळा सुरु होणार जुलै-ऑगस्ट मध्ये बहुधा..

पुणे : महाराष्ट्र सरकारने एकीकडे जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले होते, मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत संस्था, पालक यांच्याशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस सुरू करण्यावर जुलै महिन्यात निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही नगरसेविका अश्विनी कदम यांच्याशी बोलताना जुलैचे च संकेत दिले आहेत.त्यामुळे सर्व नियोजन करून शाळांची घंटा वाजण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शाळा कधी होणार याकडे पालक, विद्यार्थी म्हणून शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे.शिक्षण विभागाने १५ जूनपासून ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरु केले होते, पण त्यात विरोध होत असल्याने ऑनलाईन, दूरदर्शन, प्रसारभारतीच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे यासह विरोध होत आहे. असे असताना केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लाॅकडाऊन ५.० असणार आहे, अशी घोषणा शनिवारी (ता.३०) केली. यामध्ये शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, खासगी क्लासेस जून महिन्यात बंदच असणार आहेत.

जुलै महिन्यात राज्य सरकार यासंदर्भात शाळा, पालक, शिक्षक संघटना यांच्याशी चर्चा करून शाळा, महाविद्यालये कसे भरवायचे याचा निर्णय करेल असे नमूद केले आहे. तसेच शाळा, महाविद्यालये सुरू करताना सोशल डिस्टन्स, स्वच्छता, विद्यार्थी सुरक्षा याचा विचार करून कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाशी सल्लामसलत केल्यानंतरच याचा निर्णय घेता येईल.

खाजगी डॉक्टर,आणि आरोग्य सेवकांना पीपीई किट देणार-उद्धव ठाकरे

0

खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफ ला पीपीई किट देणार, मग त्यांच्याकडून कर्तव्या ची अपेक्षा ठेवणार- जिथे क्लिनिक होवू शकत नसतील, शिवसेनेच्या शाखा तिथे क्लिनिक बनतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2627468317495799/

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवासाला केन्द्राची मुभा,राज्यांना अधिकार

0

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी अनलॉक 1.0 संदर्भात मार्गदर्शकतत्वे जारी केली. त्यावेळी देशांतर्गत रस्ते मार्गाने होणाऱ्या प्रवासासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या एक जूनपासून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूक तसेच नागरी प्रवासावर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.

दोन राज्यांमध्ये तसेच राज्यांतर्गत प्रवासासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची तसेच ई-परमिट बाळगण्याची आवश्यकता नाही. पण राज्य सरकार अटी घालू शकते.

“राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि परिस्थितीच्या आधारावर वाहतुकीवर काही निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना त्या संदर्भात आगाऊ माहिती जाहीर करावी लागेल तसेच सर्व प्रक्रियांचे पालन करावे लागेल” असे आदेशात म्हटले आहे.

लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. हा लॉकडाऊन मुख्यत्वे तीन फेजमध्ये असणार आहे. प्रत्येक फेजमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे.

नव्या नियमानुसार रात्री कर्फ्यूमध्ये कपात करण्यात आली आहे. रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे, मात्र, अत्यावश्यक बाबींसाठी कर्फ्यूची बाधा राहणार नाही. याआधी संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यूची मर्यादा होती.

पहिला टप्पा

– 8 जूनपासून धार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट उघडणार आहे. मात्र, यासाठीची नियमावली आरोग्य मंत्रालय जारी करणार आहे. त्यानंतरचं या गोष्टींना परवानगी मिळेल.

संपूर्ण देशात 30 जूनपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असणार.

दुसरा टप्पा

शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, यांचा जुलै महिन्यात राज्य आणि केंद्राच्या परवानगीनंतर उघडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, यासाठीची नियमावलीही जारी करण्यात येणार आहे. या कालावधीत सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असणार आहे.

तिसरा टप्पा

– कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो, चित्रपटगृह, स्विमींग पूल, सार्वजनिक कार्यक्रमाचे हॉल, व्यायाम शाळा, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, बार तसेच सार्वजनिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजनपर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाच्या ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.३०: राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग  १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. राज्यात ९९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:

ठाणे- ८१ (मुंबई ५४, ठाणे ६, वसई-विरार ७, नवी मुंबई २, रायगड ३, पनवेल ७, कल्याण डोंबिवली २), नाशिक- ३ (जळगाव ३), पुणे- १२ (पुणे ६, सोलापूर ६), नागपूर-१, इतर राज्ये-२ राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये तर बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८  रुग्ण आहेत तर ४९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २१९७ झाली आहे.आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे ६ मे ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंपैकी मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू इतर राज्यातील आहे

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (३८,४४२), बरे झालेले रुग्ण- (१६,३६४), मृत्यू- (१२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८४५)

ठाणे: बाधित रुग्ण- (९१२३), बरे झालेले रुग्ण- (२९७३), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९६८)

पालघर: बाधित रुग्ण- (९६८), बरे झालेले रुग्ण- (३२९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०९)

रायगड: बाधित रुग्ण- (१०४२), बरे झालेले रुग्ण- (५४९), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)

नाशिक: बाधित रुग्ण- (११११), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

धुळे: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

जळगाव: बाधित रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२७२), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

पुणे: बाधित रुग्ण- (७५३७), बरे झालेले रुग्ण- (३५५९), मृत्यू- (३२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८७२), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५१)

सातारा:  बाधित रुग्ण- (४९०), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)

सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४६२), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४११)

जालना: बाधित रुग्ण- (११९), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

परभणी: बाधित रुग्ण- (५७), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

लातूर: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

बीड: बाधित रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

अकोला: बाधित रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (२८९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)

अमरावती: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५५६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९३)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

भंडारा: बाधित रुग्ण- (२९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६१), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

एकूण: बाधित रुग्ण-(६५,१६८), बरे झालेले रुग्ण- (२८,०८१), मृत्यू- (२१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३४,८८१)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३११ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३१६९ झोन क्रियाशील असून आज एकूण १७ हजार ९१७ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६८.५१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

‘लोकसेवा ग्रुप’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. डी. के. घोसाल

पुणे : लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. डी. के. घोसाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. घोसाल हे गेल्या 28 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. भुवनेश्वर येथील सैनिक शाळा, आसाम येथील गोलपारा आणि सातारा येथील सैनिक शाळेत त्यांनी विविध पदावर काम केले आहे. लोकसेवामध्ये रुजु होण्यापूर्वी कोल्हापूर येथील संजीवन नॉलेज सिटीमध्ये ते संचालक म्हणून काम पाहात होते.

डॉ. डी. के. घोसाल यांची कारकीर्द अनेक शैक्षणिक उपक्रम राबविल्याने गाजली आहे. यामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे. ‘बेस्ट बायोलॉजी टीचर’ म्हणून त्यांना 2012 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आऊटस्टँडिंग प्रिन्सिपल म्हणून 2016 मध्ये त्यांना कन्याकुमारी येथे गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथील ग्लोबल लीडर फाउंडेशन एज्युकेशन कौन्सिल ऑफ इंडियातर्फे ‘बेस्ट प्रिन्सिपल’ म्हणून 2016 मध्ये गौरविण्यात आले. तसेच, नवी दिल्लीच्याच एकेसतर्फेही त्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल’ पुरस्कार मिळाला आहे.

डॉ. डी. के. घोसाल यांच्या आतापर्यंतच्या सेवेदरम्यान 179 विद्यार्थी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये निवडले गेले. याबरोबरच शिक्षक प्रशिक्षणासाठीच्या विविध उपक्रमांसाठी त्यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन मार्गदर्शन केले आहे.

लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी डॉ. डी. के. घोसाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

भविष्यात शिक्षण हे विद्यार्थी केंद्री बनेल:डॉ.अभय जेरे

फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ विषयावरील  राष्ट्रीय वेबिनारला  चांगला प्रतिसाद  
पुणे:
‘कोरोना साथीच्या काळानंतर शिक्षण पद्धती मध्ये ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीचे मिश्रण येईल आणि ती अधिक विद्यार्थी केंद्री होईल.देशाला प्रश्न सोडविणारे,रोजगार निर्माण करणारे,तंत्र कुशल विदयार्थी हवे असून त्याकडे लक्ष द्यावे लागेल’,असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ.अभय जेरे यांनी केले.    

महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी’ तर्फे ‘फ्युचर ऑफ एज्युकेशन सिस्टीम’ विषयावरील राष्ट्रीय वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर डॉ.अभय जेरे यांनी वेबिनार मध्ये मार्गदर्शन केले.सरकारचे शैक्षणिक नियोजन,शैक्षणिक प्रणाली ४.०,कोविड १९ नंतरची शैक्षणिक व्यवस्था या विषयावर वेबिनार मध्ये चर्चा झाली. 

ते म्हणाले,’देशात तांत्रिक प्रशिक्षण घेणारे ८० लाख विद्यार्थी आहेत.सर्वच विद्या शाखांत मिळून ७० टक्के विद्यार्थी रोजगारापासून वंचित आहेत.तरीही भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्ट अप उद्योग असलेला देश आहे.इथून पुढे तंत्र कुशल आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा लागेल.समस्या सोडविणारी,कल्पक,नव्या उद्योग संकल्पना मांडणारी पिढी हवी आहे.त्यांना व्यावसायिक पाठबळ देणारे इन्क्युबेटर लागतील’.  
‘केंद्र सरकार नवे शैक्षणिक धोरण आणत आहे.पुढील पाच वर्षात शिक्षण पद्धती अधिक विद्यार्थीकेंद्रित होईल.प्रत्येकाच्या वैयक्तिक प्रगतीकडे ही शिक्षण पद्धती लक्ष देईल’,असेही डॉ.जेरे यांनी सांगितले.   
  इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.व्ही.एन.जगताप,समन्वयक सबा शेख यांनी संयोजन केले.महाविद्यालयांचे प्राचार्य,प्लेसमेंट ट्रेनिंग ऑफिसर,विभागप्रमुख ,प्राध्यापक,एच आर विभाग प्रमुख या वेबिनार मध्ये सहभागी झाले. 

कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन,धार्मिक स्थळे, हॉटेल, मॉल आठ जूनपासून उघडणार

0

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केलीय. यानुसार कंटेन्मेंट झोनमध्येही टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. १ जूनपासून हे दिशानिर्देश ३० जूनपर्यंत लागू राहतील. रात्रीची संचारबंदीही सुरूच राहील. रात्री ९ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. आतापर्यंत रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ही संचारबंदी कमी करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज आणि शिक्षणसंस्था सुरू करण्याबाबत सरकार नंतर दिशानिर्देश जारी करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.

८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल.

– ३० जून २०२० पर्यंत कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे.
– कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन अधिक कठोर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल.

पहिल्या टप्प्यात काय उघडणार
– आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
– हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
– शॉपिंग मॉल उघडणार.

दुसऱ्या टप्प्यात काय उघडणार
– शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर चर्चा करुन उघडण्यात येतील.

तिसऱ्या टप्प्यात काय उघडणार
सर्व परिस्थितीचे आकलन करुन या गोष्टी कधी सुरु करायच्या त्या संदर्भात निर्णय घेण्यात येतील.
– आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
– सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
– क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

कोरोना रुग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

0

  • मुंबई, दि.३०: कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरोहाव आणि महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड सेंटर कार्यान्वित होणार आहे.
    शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या निर्णयामुळे ५३ मोठ्या रुग्णालयातील सुमारे १२ हजार खाटा उपलब्ध झाल्या आहेत त्यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचाही समावेश आहे.
    गोरेगाव येथे २६०० खाटांची उभारणी पूर्ण झाली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर ३०० खाटांची उभारणी करम्यात आली. येत्या दोन दिवसात हे सेंटर कार्यान्वित होील. त्यापाठोपाठ मुलुंड येथे २००० खाटा, दहीसर येथे २००० आणि भायखळा येथेही २००० खाटांची उभारणी अंतीम टप्प्यात असून आठवडाभरात ते कार्यान्वित होईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.३०: पावसाळा तोंडावर आल्याचे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. हिवतापासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये कीटकनाशक फवारणी आणि पाणी गुणवत्तेसाठी राज्यात स्वच्छता सर्वेक्षणाला गती देण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

या काळात रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी  निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता वाढविण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात किटकनाशक फवारणीचे काम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आहेत त्यासाठी स्वच्छता सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे.

प्रत्येक ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार हिरवे, पिवळे आणि लाल रंगाचे कार्ड दिले जाते. त्या अनुषंगाने लाल आणि पिवळ्या रंगाचे कार्ड असलेल्या ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत असलेल्या विहीरींमध्ये ब्लिचींग पावडरचा वापर करून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

३२३ रस्ते ९ मीटर करून नव्या वाढीव बांधकामांना परवानग्या देणार

पुणे- शहरातील सहा मीटर व साडेसात मीटर रुंदीचे असलेले सुमारे 103 किलोमीटर लांबीचे 323 रस्ते 210 कलमाखाली नऊ मीटर रुंदीचे करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर मांडला आहे येथील असलेल्या वाड्यांचा ,बांधकामांचे रखडलेले प्रकल्प सुरु व्हावेत ,तिथे टीडीआर द्वारे अधिक चे बांधकामे व्हावीत आणि त्यातून पालिकेला महसूल मिळावा  या हेतूनेच हा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. 

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी नाही. त्यामुळे अनेक जुन्या इमारती, जुने वाडे, सोसायट्यांचा विकास रखडला आहे. अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. अशा इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागावा, तसेच महापालिकेचे उत्पन्न देखील वाढावे, या हेतूने प्रशासनाकडून 210 कलमाखाली या रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाने सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका.

2016 मध्ये राज्य सरकारने नव्याने टीडीआर लागू केले. त्यामध्ये कमीत कमी नऊ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्याच रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याचे बंधन महापालिकेवर घातले. त्यातून हा प्रश्‍न निर्माण झाला होता. पुणे शहरात नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांची संख्या ही जवळपास साठ ते सत्तर टक्के आहे. या सर्व ठिकाणच्या इमारती, वाडे, जुन्या सोसायट्यांच्या वाढीव बांधकाम  पुनर्विकासाला त्यामुळे खो बसला होता.जुन्या हद्दीचा नव्याने विकास आराखडा तयार करून चूक दुरुस्तीचा प्रयत्न महापालिकेकडून झाला. परंतु तत्कालीन राज्य सरकारने ते हाणून पाडला होता. शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून ते नऊ मीटरपर्यंत करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यास मान्यता मिळाल्यानंतर शहरातील काही हजार बांधकामांना याचा फायदा मिळणार आहे. शहराच्या आणि उपनगरांच्या गजबजलेल्या अरुंद रस्त्यावरील बांधकामांची पुनर्बांधणी होऊन त्यांची उंची वाढनार आहे.

कोविड-19 मुळे बांधकाम क्षेत्राला मरगळ आली आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या तिजोरीवर देखील झाला आहे. या क्षेत्राला पुन्हा संजीवनी देण्यासाठी आणि महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या रस्त्यांवर टीडीआर आणि प्रिमिअम एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळणार आहे.