Home Blog Page 2559

‘आशा’ गटप्रवर्तक,अर्धवेळ स्त्री परिचरांना मिळणार प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

0

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. ४ – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या ‘आशा’ गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रत्येकी १ हजार रुपये इतकी प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील गावांमध्ये सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोना विषाणुविरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यामध्ये आशा गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर बाकी होते. आता या कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे १३ हजार ५०० आशा गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना याचा लाभ होणार आहे. चालू महिन्यामध्येच या कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

आतापर्यंत २ लाख ७४ हजार ग्रामीण कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात आतापर्यंत कोरोना रोखण्यासाठी काम करणाऱ्या  एकुण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. आता राज्यातील आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य उपकेंद्रांमधील अर्धवेळ स्त्री परिचरांनाही ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन

कोरोनाविरुद्ध काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला असून त्यांच्या वेतनासाठी असलेली ग्रामपंचायत करवसुलीची अट रद्द करण्यात आली आहे. यापुर्वी या कर्मचाऱ्यांचे वेतन हे ग्रामपंचायत करवसुलीशी निगडीत होते. पण आता करवसुलीची अट रद्द केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सन २०२० – २१ या वर्षात त्यांचे संपूर्ण वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहितीही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

करोनाचे उपचार मोफतच करा-१०६ तहसीलदारांमार्फत पीएम ला रुग्ण हक्क परिषदेचे साकडे

पुणे : कोरोनाचे उपचार खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयात मोफत झालेच पाहीजेत, आतापर्यंत रुग्णांनी भरलेल्या लाखो रुपयांच्या बिलाचा रिफंड मिळालाच पाहिजे, कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना घरटी दहा हजार रुपये मिळालेच पाहिजे म्हणून रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी रूग्ण हक्क परिषदेच्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहून मागण्यांचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र भरातील कार्यकर्त्याना आवाहन केले होते. त्यांच्या अवाहनास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यातील १९ जिल्ह्यातील तब्बल १०६ तालुक्यातून ५ पदाधिकाऱ्यांची किमान सात शिष्टमंडळे तयार करून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात रूग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळातही सर्वसामान्य नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविला आहे!!

         मंगळवारी २ जून २०२० रोजी एकाच दिवशी १०६ तालुक्यातील तहसीलदार यांना भेटून रूग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागरिक आणि करोना रुग्णांच्या व्यथा शासनदरबारी मांडल्या यामध्ये महाराष्ट्र राज्यातील १९ जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद दिला. प्रामुख्याने पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, रायगड, पालघर, अहमदनगर, बीड जिल्ह्यातील सरासरी आठ तालुक्यातील म्हणजेच तब्बल १०६ तालुक्यातून सुमारे ३०० हुन अधिक शिष्टमंडळानी तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित मागण्या मान्य होइपर्यंत लढा देणार असल्याचे सूतोवाच केले.
      पुणे शहर तहसीलदार यांना संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन सादर केले. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात केंद्रीय सचिव दीपक पवार, सामाजिक कार्यकर्ते विकास साठे, संतोष सरोदे, आनंद बहिरट, दिव्या कोंतम, रफिक शेख, भरत चव्हाण, उमर शेख, नरेश भोसले, प्रशांत गायकवाड सहभागी झाले. त्याचसोबत प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे लातूर मधून, प्रदेश संघटक शैलेश खुंटे पिंपरी चिंचवड मधून, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील कोल्हापूर मधून, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. के. एम. ढोबळे उस्मानाबाद मधून, प्रदेश संघटक सचिन खरात दौंड मधून, प्रदेश सचिव डॉ. संध्याराणी निकाळजे सातारा फलटण मधून, प्रदेश उपाध्यक्ष कय्युम पटेल नाशिक मधून, प. महा. अध्यक्ष डॉ. सलीम आळतेकर इचलकरंजी मधून सहभागी झाले. सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. एकादशी लोंढे, ठाणे जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक काकडे, परभणी जिल्हाध्यक्ष अहमद अन्सारी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष किरण मोरे, रायगड अलिबाग मधून धनंजय म्हात्रे यांनी विशेष प्रयत्न करून सर्वस्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तालुका तहसीलदारामार्फत मागण्यांचे पत्र दिले. परिषदेच्या संस्थापक नेत्या ऍड. वैशाली चांदणे यांनी इमेल द्वारे पंतप्रधान कार्यालयात निवेदन दिले.
      संबधित विषय मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढू असे रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.

अचलपूरमध्ये बीओटी तत्वावर 1 हजार घरकुले साकारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

0

अमरावती, दि. 3 : गोरगरीब, गरजू व्यक्तींना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध आवास योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतून परतवाडा-अचलपूर हे जुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीओटी तत्वावर एक हजार घरकुले साकारण्याचा निर्णय जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. या दृष्टीने आवश्यक निधी व इतर प्रक्रिया तत्काळ पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री.कडू यांनी यावेळी दिले.

अचलपूर येथील विश्रामभवन येथे राज्यमंत्री श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली शहर प्रशासनाची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहराच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्के, मुख्याधिकारी आश्विनी वाघमळे, बांधकाम सभापती संजय तट्टे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील पाणी पुरवठा, प्रधानमंत्री आवास योजना, नगरपालिका भवन, आठवडी बाजार आदींसंदर्भात आढावा राज्यमंत्री श्री.कडू यांनी घेतला. नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी सर्व नागरी पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह इतर सर्व आवास योजनांची प्रभाविपणे अंमलबजावणी करावी. जुळ्या शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने एक हजार घरकुलांची उपाययोजना तत्काळ पूर्णत्वास जाईल, या दृष्टीने प्रयत्न  करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचा प्रलंबित दुसरा व तिसरा हप्ता देण्यासाठी नगरपालिकेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल. ही कामे गतीने करावी. निधीची कमतरता पडू देणार नाही. योजनेत पीआर कार्ड वडिलांच्या नावाने असलेल्या व लाभार्थी अर्जदार मुलगा असलेल्या एकूण 220 घरकुलांच्या प्रकरणांना तत्काळ मंजूरी प्रदान करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. 

परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात पाणीपुरवठ्यासाठी पूरक जलसंचय स्त्रोत  उपलब्ध असताना मागील दोन महिन्यांपासून पाणी टंचाई असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुनियोजित उपायांची तत्काळ अंमलबजावणी करावी. येत्या एक महिन्याचा पाणीटंचाईचा प्रश्न दूर होऊन पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे, असे निर्देश राज्यमंत्री श्री.कडू यांनी दिले.   

शहरातील साप्ताहिक बाजार, नगरपालिका भवन आदींबाबतही चर्चा यावेळी झाली.

पुण्याला वादळासह पावसाने झोडपले, अंबिलओढा खळखळला

पुणे : जोराच्या वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे पुुणे पिम्परी शहरात वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर हडपसर, कोंढवा, टिंगरेनगर, लोहगाव, येरवडा भागातील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.तर कात्रज हुुन उगम पावलेला अंबिलोढा ही चांगलाच खळखळला. आणि गत वर्षा च्या आठवणीने पुुन्हा धस्स करून गेल्या.

शहरात रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केली असून दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे. .पुणे सातारा रोड शंकर महाराज मठा समोर विश्वेश्वर बँकेच्या इमारतीवरील होर्डिंग बिल्डिंग वरून डायरेक्ट खाली कोसळले. नशिबाने जीवितहानी नाही झाली पण दुचाकी यांचे प्रचंड नुकसान झाले.

शहरात बुधवारी (ता.३) सकाळपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. तर थांबून-थांबून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहे. प्रतिबंधित भाग वगळता शहर तसेच उपनगरातील दुकाने उघडण्यात आली. मात्र, सकाळपासून पावसाचा जोर असल्याने शहरात फारशी गर्दी नाही. त्यामुळे या घटनांत मालमत्तेचे जास्त नुकसान झाले नाही.

खडकी बाजार सुरती मोहोल्ला येथील नाझरत वाडा येथील रहिवासी रत्नप्रभा कमलेल्लू यांच्या घराजवळ असलेले एक झाड वाऱ्यामुळे कोसळून घरावर पडले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी येऊन हे झाड कापून बाजूला केले.सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
मान्सूनपूर्व पावसाने औंध, बोपोडी, औंध रस्ता,विद्यापिठ परिसर, सकाळनगर, पंचवटी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर रस्ता, सूस, महाळुंगे या भागात आज सकाळपासूनच वा-यासह सुरुवात केली होती.काही ठिकाणी वा-यामुळे झाडे उन्मळून पडली तर काही परिसरात झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने समस्या निर्माण झाल्या. बोपोडी, पंचवटी पाषाण परिसरात झाड पडण्याच्या घटना घडल्या. संततधार पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा सकाळपासूनच खंडीत झाला होता.तर काही भागात विजेचा लपंडाव सुरुच होता.
वादळी वा-यामुळे हांडेवाडी रस्त्यावरील दुगड चाळीमधील ४ घरांवर शिवरीचे मोठे झाड पडले. त्यामुळे चारही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आग्नीशामक दलाच्या केंद्राकडून हे झाड बाजूला काढण्यात आले. घराचे पत्रे तुटले तसेच घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. विठ्ठल कोकीळ, रिजवान मन्यार, कृष्णा पोळ, संजय टोनपे या नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. चारही कुंटूबाची राहण्याची पर्यायी व्यवस्था करणार असल्याची माहिती नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिली. परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक सुखावले असले तरी महापालिका प्रशासनाचा फोलपणा या पहिल्या पावसात उघड झाला आहे. अनेक भागांत पाणी साचले आहे, तर पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचेही तीनतेरा वाजले. महापालिकेने शहरात शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता, मात्र या पावसाने त्यांचा हा दावा खोटा असल्याचे दाखवून दिले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज वितरण व्यवस्थाही कोलमडली असून काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पहिल्याच पावसामुळे सोलापूर रस्ता, ससाणेनगर रस्ता, रविदर्शन सोसायटी चौक, डि मार्ट रस्ता, माळवाडी, वानवडी येथील फातीमानगर चौक, कै. विठठलराव शिवरकर रस्ता आदी रस्त्यांवर प्रचंड पाणी साचल्याने नागरिक आणि वाहनचालकांना अक्षरशः रस्ते शोधावे लागले.

सिंहगड रस्ता परिसरातील विविध भागात तसेच सोसायट्यांमध्ये झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले आहे.आनंदनगर सन सिटी रस्ता परिसरात सन एम्पायर भागात एक, फ्लोरिया सोसायटीजवळ एक, प्रथमेश सोसायटी एक अशी झाडे पडली आहेत यासोबतच माणिकबागेतील पुष्पक मंगल कार्यालय एक झाड, वाडेश्वर नर्सिंग होम जवळ दोन झाडे, बेनकर वस्ती दोन, लायगुडे रुग्णालय रस्ता परिसरात एक, पानमळा येथे एक यासह विविध भागात झाडे पडली आहेत.ज्या ठिकाणी रस्त्यात झाडे पडली आहेत, तेथे पडलेली झाडे उचलून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. झाडांच्या पडझडीने काही ठिकाणी चार चाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.सिंहगड रस्ता परिसरात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारच्या सुमारास मुसळधार पावसासह वादळी वारा देखील होता.कोथरूड अग्निशमन केंद्रासमोर, भांडारकर रस्ता, विश्रांतवाडीतील कस्तुरबा हॉस्पिटल, स्वारगेट पोलिस वसाहत, विमाननगर, रामटेकडी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौक, पौड रस्त्यावरील उजवी भुसारी कॉलनी, मुंढवा-केशवनगर, येरवड्यातील वाडिया बंगला, मंगळवार पेठेतील मालधक्का चौक, कोरेगाव पार्क येथील गल्ली क्रमांक पाच, महात्मा फुले पेठेतील महापालिका वसाहत, येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालयाजवळ झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

वडगाव शेरी येथील उज्वल गाडर्न या सोसायटीची सीमा भिंत पावसामुळे काल रात्री कोसळली.
* या पावसामुळे शहरात ९ ठिकाणी पाणी साचले आहे़ त्यात गंगाराम कर्णे हॉस्पिटल, येरवडा, साडेसतरा नळी हडपसर, ससाणेनगर, डि मार्ट, हडपसर, टिंगरेनगर लेन नं ११/८, लक्ष्मीनगर, येरवडा, डि़ वाय पाटील पार्क, लोहगाव, ससाणेनगर, शांती रक्षक सोसायटी, येरवडा, अग्रवाल हॉस्पिटल चंदननगर या ठिकाणी पाणी साचल्याने लोकांची मोठी पंचाईत झाली आहे.
* वडगाव शेरी परिसरातील सोमनाथनगर, सुप्रभात सोसायटी, शुभम, गार्डेनिया, उज्वल गार्डन, आनंद हाईट या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले.
* शहराच्या अनेक भागात झाडे पडली असून त्यात प्रामुख्याने कोथरुड अग्निशामन केंद्रासमोर, कस्तुरबा हॉस्पिटल, विश्रांतवाडी, स्वारगेट पोलीस लाईन, हयात हॉटेलसमोर, विमाननगर, रामटेकडी, हडपसर, एरंडवणा, नळस्टॉप, पंचवटी, पाषाण, पिंपळेवस्ती, मुंढवा, सॅलसबरी पार्क, केशवनगर, मुंढवा,
कोरेगाव पार्क लेन नंबर ५, मनपा ७ नंबर कॉलनी, गंज पेठ, मेंटल कॉर्नर, येरवडा़
* अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन साठलेल्या पाण्याचा उपसा पंपाद्वारे केला. ज्या भागात झाडे तसेच फांद्याा कोसळण्याच्या घटना घडल्या. जवानांकडून झाडयांच्या फांद्या हटविण्यात आल्या आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला.
* महापालिकेचा नियंत्रण कक्ष कार्यान्वित – महापालिकेच्या मुख्य इमारतीतील नियंत्रण कक्ष तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात २५ अधिकारी, कर्मचाºयांचे पथक पावसामुळे उद्भवणाºया कोणत्याही संकटाला तयार ठेवण्यात आले आहे.
नागरिकांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़
*आपत्कालीन व्यवस्थापन विभाग : २५५०१२६२, अग्निशामक दल १०१

पुण्यात आता हे आहेत कंटेन्मेट झोन

पुणे : लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात बाधित आणि सूक्ष्मबाधित क्षेत्रात बदल करण्यात आला असून, जुन्या क्षेत्रांतून 27 ठिकाणे वगळली आहेत. तर कोरोनाचे नवे रुग्ण सापडलेल्या 28 परिसरांचा नव्या बाधित क्षेत्रांत समावेश केला आहे.

नव्याने तयार करण्यात आलेले कंटेन्मेट झोन :
कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय :
1) पर्वती स. नं. 93, महात्मा फुले वसाहत, लक्ष्मीनगर
2) टी.पी. स्किम 3, साने गुरूजी वसाहत, प्लॉट क्र. 28. 2 सी, 29 , 29 ए 2 परिसर

ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय :
1) संगमवाडी टी. पी. स्किम, कवडेवाडी, प्लॉट क्र. 368, 369, 377 ते 379, 381, 381 ते 383, 105, 109, 110,
2) कोरेगाव पार्क, संत गाडगेबाबा वसाहत, साऊथ मेन रोडच्या दक्षिणेकडील भाग
3) सोमवार पेठ पोलिस वसाहती समोर चर्चगेट रोड गारपीर वस्ती

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय :
1) आंबेगाव खुर्द, शनिपार मंदिरासमोरील परिसर

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय :
1) बिबवेवाडी, संदेशनगर, भिमाले कॉम्प्लेक्‍स परिसर
2) बिबवेवाडी, शिल्पा पार्क सोसायटी, सर्वे. नं. 566 , गणात्रा कॉम्ल्पेक्‍स परिसर

वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय :
1) कोंढवा खुर्द शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, कोठी आश्रम, साईबाबा नगर,
2) हडपसर, इंदिरानगर आणि सार्थक सोसायटी, समर्थनगर,

शिवाजीनगर – घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय :
1) शिवाजीनगर, जनवाडी, जनता वसाहत परिसर
2) फा. प्लॉट क्रमांक 833, वडारवाडी वडार हौ. सोसायटी, प्लॉट क्र. 882, 833, 385 ते 388, 391, 341
3) शिवाजीनगर, पांडवनगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी
4) शिवाजीनगर, वेलवर्थ रिजन्सी, दळवी रुग्णालया जवळ, अरूण हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. 413

नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय :
1) निता पार्क सोसायटी परिसर
2) वडगाव शेरी, समता सोसायटी, स. नं. 42, समता सोसायटी लेन 1 परिसर

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय :
1) पर्वती, पानमळा वसाहत

हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय :
1) कालिका डेअरी परिसर
2) बनकर कॉलनी, शांतिनगर परिसर
3) हडपसर स. नं. 10 , उन्नतीनगर परिसर
4) हडपसर साडे सतरा नळी, गणेशनगर
5) मुंढवा, सर्वोदय कॉलनी परिसर

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय :
1) बिबवेवाडी स. न. 569 ,

कोथरूड बावधान क्षेत्रीय कार्यालय :
1) शास्त्रीनगर, पी.एम.सी कॉलनी, स. न. 164, 165, 84 ,
2) राहुल कॉम्प्लेक्‍स पौड रस्ता
3) जय भवानी नगर, पौड रस्ता परिसर
4) एरंडवणे स. नं. 44, केळेवाडी गणपती मंदिर परिसर, केळेवाडी विठ्ठल मंदिर परिसर

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय :
1) बोपोडी, औंध रस्ता, चिखलवाडी, कैलास कृपा सोसायटी

राज्यात आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.३: राज्यात आज ९९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३२ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५६० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३९ हजार ९३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३६ खाजगी अशा एकूण ८२ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ९७ हजार २७६ नमुन्यांपैकी ७४ हजार ८६० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७१ हजार ९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१ हजार ९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३ हजार ६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दि. १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून दि.१ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा (४.७४ टक्के) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले. त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोरोना प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

राज्यात १२२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ६० (मुंबई ४९, उल्हासनगर ३, ठाणे २, नवी मुंबई ३, वसई विरार १, भिवंडी १, मीरा भाईंदर- १), नाशिक- ८ ( धुळे ४, जळगाव २, अहमदनगर १, नंदूरबार १), पुणे- २९ (पुणे १९, सोलापूर १०), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-१७ (औरंगाबाद मनपा १६, जालना १), लातूर- १ (उस्मानाबाद १), अकोला-२ (अकोला २), इतर राज्ये-३ (उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ५१ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६९ रुग्ण आहेत तर ४६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या १२२ रुग्णांपैकी ८८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५८७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते ३१ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई ३०,सोलापूर -१०,  औरंगाबाद -६, नवी मुंबई -३, धुळे -३, जळगाव -२, कोल्हापूर -२, ठाणे २, अहमदनगर -१, अकोला १, नंदूरबार -१,पुणे १ , उल्हासनगर १, वसई विरार -१ आणि उत्तर प्रदेशमधील १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४३,४९२), बरे झालेले रुग्ण- (१७,४७२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव रुग्ण- (२४,५९७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१०,८६५), बरे झालेले रुग्ण- (३९९२), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (६६३३)

पालघर: बाधित रुग्ण- (११९९), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (७१८)

रायगड: बाधित रुग्ण- (१२३८), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव रुग्ण- (५४०)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२३५), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२२५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (९५)

धुळे: बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (६३)

जळगाव: बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३७७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (५)

पुणे: बाधित रुग्ण- (८४६३), बरे झालेले रुग्ण- (४५८५), मृत्यू- (३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३५११)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४९९)

सातारा:  बाधित रुग्ण- (५६४), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३३६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२१३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३८८)

सांगली: बाधित रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (५९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (७०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३१४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (१९१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६५३), बरे झालेले रुग्ण- (१०९५), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४७४)

जालना: बाधित रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (९३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (८७)

परभणी: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४८)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४९)

बीड: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव रुग्ण- (२१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (३०)

अकोला: बाधित रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव रुग्ण- (२५५)

अमरावती: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (९७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७४), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (६३५), बरे झालेले रुग्ण- (३९२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२३२)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२७), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव रुग्ण- (४५)

एकूण: बाधित रुग्ण-(७४,८६०), बरे झालेले रुग्ण- (३२,३२९), मृत्यू- (२५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव रुग्ण-(३९,९३५)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३६२ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६६१ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ९५० सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ७१.४८  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 305

पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 10 हजार 704 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 3 :- पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 हजार 704 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 305 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 233 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 8 हजार 303 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 194 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 287 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 169, सातारा जिल्ह्यात 13, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 10 कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 569 कोरोना बाधीत रुग्ण असून 223 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1080 कोरोना बाधीत रुग्ण असून 463 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 524 आहे. कोरोना बाधित एकूण 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 122 रुग्ण असून 68 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 630 कोरोना बाधीत रुग्ण असून 225 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 399 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 92 हजार 840 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 88 हजार 80 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 760 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 77 हजार 234 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 10 हजार 704 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि.3 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आरोग्य तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा

पुणे : महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच आरोग्य तपासणीबाबत तातडीने सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी केल्या आहेत.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुणे शहरासोबतच पुणे विभागातील कोरोना प्रतिबंधाबाबतचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव करीर म्हणाले, पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. या आजारांची आणि कोविड १९ ची लक्षणे सारखी असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. महागनरपालिका आणि शासनाची रुग्णालये ही कोविड १९ साठी रुग्णालये म्हणून राखून ठेवण्यात आलेली असल्याने पावसाळ्यातील आजारासंदर्भात खाजगी रुग्णालयांची भूमिका जास्त महत्त्वाची असून पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन कोरोनासाठी निर्माण करण्यात आलेल्या तीन स्तरावरील रुग्णालयीन व्यवस्थेत आवश्यकतेनुसार खाटांची क्षमता निर्माण करण्यावर भर देण्याचे निर्देशही करीर यांनी दिले. यासोबतच स्त्राव तपासणी क्षमता, दिवसनिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या, वॉर्डनिहाय रुग्णसंख्या, सुलभ नियोजनासाठी मायक्रो कंन्टेनमेंट झोन, संस्थात्मक क्वारंटाईन क्षमता, जेष्ठ नागरिकांची तपासणी, शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी तसेच सुरू झाल्यानंतरची काळजी, उपचार सुविधा आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सर्व मिळून कोरोनाचे हे संकट निश्चितपणे दूर करू, असा विश्वासही श्री.करीर यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी पुणे शहरासह पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय तयार होणाऱ्या नवीन हॉटस्पॉटवर देखील लक्ष देण्यात येत आहे. परराज्य व परजिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व श्वसनाशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह असणारे नागरिक, गरोदर महिला, लहान बालके यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यात कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत असल्याचे सांगून पुणे शहरासह विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी सर्व आघाड्यांवर प्रशासन प्रयत्नशील आहे. पावसाळ्याच्या कालावधीत कोरोना संसर्गाबरोबरच अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ नये, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. झोपडपट्टी व प्रतिबंधित क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीवर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कोरोनाबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

‘निसर्ग’ वादळाच्या थैमानाने वीजयंत्रणेचे मोठे नुकसान पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. 03 जून 2020 : पुणे जिल्ह्यात बुधवारी (दि. 3) सकाळपासून सुरु असलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या थैमानात वीजयंत्रणेवर मोठा आघात झाला आहे. वीजयंत्रणेवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने प्राथमिक माहितीनुसार सुमारे 540 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामध्ये प्रामुख्याने मावळ, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांमधील 340 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहराच्या विविध भागात तसेच पिंपरी चिंचवड व भोसरीमधील बहुतांश भागात वीजपुरवठा विस्कळीत झाला.

दरम्यान, वादळामुळे महावितरणच्या वीजयंत्रणेचे शहरी व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले असून त्याबाबतची स्थिती गुरुवारी (दि. 4) सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल. तसेच महावितरणचे सर्व अभियंते व कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे करीत आहेत. आज रात्री उशिरापर्यंत खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

      मावळ, खेड तालुक्यांमधील राजगुरुनगर, चाकण, वडगाव, तळेगाव, लोणावळा या परिसरातील 82 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला आहे. यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यांमधील भीमाशंकर, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, पिंपळवंडी, नारायणगाव, नाणेघाट, मंचर, डिंभे, आपटाळे, ओतूर, आळेफाटा या परिसरातील सर्व 215 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद ठेवण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वादळासह पावसाचे थैमान सुरु असल्याने वीजवाहिन्या पूर्ववत करण्याच्या कामात अडथळे येत होते.

पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसल्याने बहुतांश भागातील वीजपुरवठा बंद पडला. पिंपरी, चिंचवड, भोसरी, रावेत, आकुर्डी, मोशी, चऱ्होली, सांगवी, वाकड, बिजलीनगर, खराळवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांतील सुमारे 112 वीजवाहिन्यांवर झाडे किंवा फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

पुणे शहरात वादळी पावसामुळे सुमारे ६० ठिकाणी झाडपडी झाली .85 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामध्ये रास्तापेठ, एनआयबीएम रोड, खडी मशीन चौक, कोंढवा, उंद्री, येवलेवाडी, वानवडी, गुरुवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, धायरी, रामटेकडी, मुंढवा, हडपसर, मगरपट्टा, पिसोळी, केशवनगर, महंमदवाडी, कोरेगाव पार्क, कोथरूड, शिवणे, वारजे परिसर, गांधीभवन परिसर, बिबवेवाडी, धनकवडी, तळजाई पठार, अंबिकानगर, भिलारेवाडी, गंगाधाम रोड, कात्रज आदी भागांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाच्या ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२: राज्यात आज १२२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३१ हजार ३३३  रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २२८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ८३ हजार ८७५ नमुन्यांपैकी ७२ हजार ३०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ७० हजार ४५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ५३८ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ०९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे:  ठाणे- ७४ (मुंबई ४९, ठाणे १, नवी मुंबई ४, पनवेल ४, रायगड ६, मीरा भाईंदर- १०), नाशिक- २ (नाशिक १, अहमदनगर १), पुणे- २१ (पुणे १०, सोलापूर ५, सातारा ६), कोल्हापूर- ३ (सांगली ३) अकोला-३ (अकोला ३).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६८ पुरुष तर ३५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९  रुग्ण आहेत तर ३९  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ५ जण ४० वर्षांखालील आहे. या १०३ रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये ( ६७ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २४६५ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित  मृत्यू हे १ मे ते ३० मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६५ मृत्यूंपैकी मुंबई २९, मीरा भाईंदर -९, सातारा -६, सोलापूर -४, नवी मुंबई -३, रायगड -३, सांगली ३, पनवेल -२, अकोला -३, ठाणे -१, नाशिक -१ आणि  अहमदनगर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४२,२१६), बरे झालेले रुग्ण- (१७,२१३), मृत्यू- (१३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,६२९)

ठाणे: बाधित रुग्ण- (१०,४०४), बरे झालेले रुग्ण- (३७३२), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४४२)

पालघर: बाधित रुग्ण- (११२२), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४६)

रायगड: बाधित रुग्ण- (१२०९), बरे झालेले रुग्ण- (६२१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण- (९१९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१४१), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४)

धुळे: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४)

जळगाव: बाधित रुग्ण- (७६०), बरे झालेले रुग्ण- (३२४), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

पुणे: बाधित रुग्ण- (८१९६), बरे झालेले रुग्ण- (४३१७), मृत्यू- (३४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)

सातारा:  बाधित रुग्ण- (५६२), बरे झालेले रुग्ण- (१७८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५४३), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३४)

सांगली: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०६०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६४)

जालना: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५)

परभणी: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

नांदेड: बाधित रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

अकोला: बाधित रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४)

अमरावती: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१३८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (४२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (३८१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

एकूण: बाधित रुग्ण-(७२,३००), बरे झालेले रुग्ण- (३१,३३३), मृत्यू- (२४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३८,४९३)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३४४ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३७३० झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार ०१९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ७१.६१  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

मुंबईवर धडकणार चक्रीवादळ,दोन मीटर उंच लाटांची शक्यता, ताशी 100 किमी वेगाने वाहणार वारे

0
मुंबई. कोरोनाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रावर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट येऊन ठेपले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागांवर 3 जून रोजी चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सर्वच किनारपट्टीलगत भागांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रात बनत असलेल्या कमी दाबाच्या पट्टयावरून भारतीय हवामान विभागाने हा इशारा दिला. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, येत्या 12 तासांत वेगवान वारे वाहतील. त्याचेच चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे, मुंबई आणि सभोवतालच्या भागात अलर्ट जारी करण्यात आला. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे दोन पथक पालघर, तीन मुंबईत, एक ठाणे, दोन रायगड आणि एक रत्नागिरी येथे तैनात करण्यात आले आहेत.
 ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी  आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या  विभागासोबत  संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या.
रेल्वेची वाहतूक ही उद्या असणाऱ्या वाऱ्याचा वेग तसेच त्या अनुषंगाने इतर सूचनांवर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या  रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळाने होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसेच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे  नऊ गट  तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्री.अभंग,निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मच्छिमारांना समुद्रातून परतण्याचे निर्देश
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. हा दबाव ताशी 11 किमीच्या वेगाने पूर्व आणि मध्य अरबी समुद्रातून उत्तरेकडे सरकत आहे. मंगळवारी सकाळी साडे पाच वाजल्यापासून त्यात वेग आला आहे. सध्या पणजीपासून 280 किमी दूर पश्चिम-दक्षिण, मुंबईपासून 490 किमी दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि सुरत येथून 710 किमीवर दक्षिण-दक्षिणी पश्चिम येथे केंद्र आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, या चक्रीवादळामुळे समुद्रात 2 मीटर उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मुंबई, ठाणे आणि रायगडच्या खालच्या भागांवर दिसून येईल. त्यामुळेच मच्छिमारांना सागरातून परत येण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोबतच, किनारपट्टीलगत राहणाऱ्या लोकांना दूर पाठवले जात आहे.
अमित शहांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा
मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ काँफ्रंसिंगच्या माध्यमातून बातचीत केली. यामध्ये राज्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एनडीआरएफचे महासंचालक एसएन प्रधान यांनी सांगितले, चक्रीवादळ निसर्गमुळे ताशी 90-100 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे, महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर असलेल्या लोकांना दूर नेण्याचे काम सुरू आहे.

वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी साधला जनसंवाद

0

मुंबई- निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुकद्वारे संबोधित केलं. तसंच या काळात कोणती काळची घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2654981064822200/

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून  ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधूस होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी नेव्ही, आर्मीसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे,  सर्व टीम्स अत्यावश्यक आयुधांसह सज्ज आहेत. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून सर्वांना सुखरूप समुद्रातून बाहेर काढून घरी आणण्यात आले आहे. नागरिकांनीदेखील घरातच राहणे हिताचे असून  वेळप्रसंगी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची गरज पडली तर प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या आपत्तीच्याप्रसंगी केंद्र सरकार राज्य शासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. हे चक्रीवादळ उद्या दुपारपर्यंत अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. या वादळात ताशी १०० ते १२५ कि.मी. वेगाने वारे वाहतील. या वादळाने नुकसान होऊ नये म्हणून एनडीआरएफच्या १५ व एसडीआरएफच्या ४ अशा १९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत, ५ टीम राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

घरातच सुरक्षित राहा

कोरोनाच्या संकटाला ज्याप्रमाणे आपण संयम, जिद्द आणि धैर्याने सामोरे  गेलो त्याप्रमाणे याही संकटाला आपण धैर्याने सामोरे जाऊ आणि सहीसलामत बाहेर येऊ असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण राज्यात ३ तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणार होतो. परंतू आता उद्या आणि परवाचा दिवस चक्रीवादळाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा, सावध राहण्याचा असल्याने नागरिकांनी दोन्ही दिवस घरीच सुरक्षित रहावे, दुकाने, उद्योग, आस्थापना पूर्णत: बंद ठेवाव्यात. कुणीही घराबाहेर जाऊ नये, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क

या चक्रीवादळाने नुकसान होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी सर्व प्रकारची सज्जता ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व मच्छिमार बांधवांशी संपर्क झाला असून त्यांना घरी सुखरुप परत आणण्यात आले आहे. पालघरच्या मच्छिमार बांधवांशीही संपर्क झाला आहे. ते ही परत येत आहेत. पुढील दोन दिवस किंवा पुढची सुचना येईपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असेही ते म्हणाले. सिंधुदूर्गपासून पालघरपर्यंतच्या जिल्ह्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चक्रीवादळात ही घ्या काळजी!

मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ग्रामीण शहरी भागात ज्या वस्तू आपल्या आजूबाजूला अशाच मोकळ्या किंवा सैल स्वरूपात ठेवण्यात आल्या असतील त्या घरात आणा किंवा बांधून ठेवा. जेणेकरून वादळातील वाऱ्याने त्या उडून जाऊन कुणालाही इजा होणार नाही. 

पूरसदृश्यस्थिती होणार नये याची काळजी घेण्यात आली आहेच परंतू दुर्देवाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवलीच तर काही ठिकाणी वीजप्रवाह बंद होईल किंवा खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करावा लागेल. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे, पिण्याचे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

वादळाच्या काळात वीजेची उपकरणे वापरू नका, ज्या अनावश्यक गोष्टी असतील त्या बांधून ठेवा, अत्यावश्यक गोष्टींची सुसूत्रता ठेऊन त्या जवळपास ठेवा. मोबाईल चार्ज करून ठेवा, फोन, संवादाची उपकरणे सज्ज ठेवा. औषधे जवळपास ठेवा. 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्वाचे दस्तऐवज एकत्र ठेवण्याचे, बॅटरी, पॉवरबँक, मोबाईल चार्ज करून ठेवण्याचे आवाहन केले.  कोणत्याही अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका असे सांगून त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचना ऐका, पाळा असेही नागरिकांना सांगितले.

सुरक्षितस्थळी जा, प्रशासनाला सहकार्य करा

राज्यातील सर्व स्थानिक प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली . ते म्हणाले की धोक्याच्या क्षेत्रातील नागरिकांना प्रशासन सुरक्षितस्थळी नेत आहे.  त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, ते सांगत असलेल्या सुरक्षितस्थळी वेळेत जावे, ग्रामीण आणि शहरी भागात जर घर कच्चे असेल तर सुरक्षित जागा शोधून ठेवावी, तात्पुरत्या बांधलेल्या शेडमध्ये आधाराला अजिबात जाऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या

कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना इजा होऊ द्यायची नाही याची काळजी शासनही घेत आहे म्हणूनच बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात आलेल्या फिल्ड रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तशाचप्रकारे सर्वांनी काळजी घ्यायची आहे. शेड, मोडकळीला आलेल्या इमारती याचा अजिबात आश्रय घ्यायचा नाही. कुठे वायुगळती झाली असेल  किंवा केमिकल जर कुठे पडले असेल  तर तिकडे काय होतेय हे पहायला अजिबात जायचे नाही. असे काही होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू  दुर्देवाने असे काही घडल्यास प्रशासन काळजी घेईल, नागरिकांनी तिकडे जाऊ नये. स्वत: सुरक्षित राहून जिथे मदत करता येणे शक्य आहे तिथे मदत करावी. यातून आपण होणारे नुकसान थोपवता येणे शक्य होईल. आपण कोरोनाशी लढत आहोतच निसर्गही आता आपली परीक्षा पाहात आहे. पण आपण सर्वजण मिळून त्याला पूर्ण ताकदीने सामोरे जाऊ आणि या संकटातून सहीसलामत बाहेर येऊ,  असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वनराई संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची निवड

पुणे-पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या आणि देशभर कार्यविस्तार असलेल्या ‘वनराई’ संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे. अमित वाडेकर यांनी समाजशास्त्र आणि पत्रकारिता या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले असून मानव अधिकार,लिंगभाव अध्ययन, सहकार व्यवस्थापन इत्यादी विषयांचेही त्यांनी अध्ययन केलेले आहेत.

संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या टाटा समाजविज्ञान संस्था (TISS), मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), पुणे अशा शैक्षणिक संस्थांनी सामाजिक समस्यांवर हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये संशोधनात्मक काम करून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. यानंतर त्यांनी बंगलोर येथील सेंटर फॉर बजेट अँड पॉलिसी स्टडीज या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकांच्या क्षमता बांधणीच्या प्रकल्पावर समन्वयक म्हणून काम पाहिले.

गेली दहा वर्षे ते वनराई संस्थेच्या माध्यम व प्रकाशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, वनराई मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात वनराई मासिकाला वीसहून अधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. वनराई संस्थेमार्फत पुण्याजवळ पिरंगुटगावासाठी राबवण्यात येणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ४ आदिवासीबहुल गावांमध्ये राबवण्यात येणारा शाश्वत ग्राम विकास प्रकल्प, अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येणारा जलस्त्रोत विकास आणि शैक्षणिक सुविधा विकास प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) या केंद्र शासनाच्या योजनेकरिता त्यांनी प्रशिक्षण व वाचन साहित्याचे लेखन केलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP), केंद्रीय पंचायतराज मंत्रालय आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावर नेमलेल्या तज्ञ समितीमध्ये, तसेच पर्यावरण संतुलित समृद्ध गाव (Eco Village) योजनेच्या मार्गदर्शीकेसाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या संपादक मंडळामध्येही त्यांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांचे अनेक लेख विविध नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दलसन २०१५ मध्ये तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते त्यांना‘पद्मासंघर्ष पुरस्कार’प्राप्त झालेला आहे. तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन २०१६ मध्ये ‘पर्यावरण संवर्धन समिती’नेही त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

‘वनराई’ ही पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक अग्रेसर संस्था म्हणून देशभर ओळखली जाते. वनराई संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये आजवर सुमारे २५० पेक्षा जास्त गावांमध्ये समाजोपयोगी प्रकल्प राबवले असून सध्या सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, जालना, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. याशिवाय दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि गुजरात राज्यामध्येही विविध प्रकल्प राबवले आहेत. गोवा राज्यामध्ये नुकताच प्रकल्प हाती घेण्यात आलेला असून,आगामीकाळात राजस्थान, बिहार व कर्नाटक या राज्यांमध्येही विविध प्रकल्प राबवण्याचे नियोजन सुरु आहे. अशा प्रकारे व्यापक कार्यविस्तार असलेल्या ‘वनराई’ संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये संस्थेच्या सचिवपदावर अमित वाडेकर यांची निवड करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दि. १ जून२०२० पासून त्यांनी सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशी माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.

पुण्यात जोरदार पावसाला प्रारंभ

पुणे (प्रतिनिधी)- पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळ पासून वादळी पावसाला सुरूवात झाली.पुणे शहरात गेले दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत होते अधूनमधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत होत्या पण मुसळधार पावसाला सुरवात झाली नव्हती. संध्याकाळ 7 नंतर मात्र पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते तर रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. शहरात अनेक भागात सध्या पावसाळी कामे सुरू आहेत त्यातच आता पावसाला सुरूवात झाल्याने अनेक भागात चिखल जमा झाला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.पावसाचा जोर रात्री जास्त वाढण्याची शक्यता आहे .मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर आज त्याने आणखी प्रगती करत केरळ मधील इतर काही भाग व्यापला. चक्री-वादळाच्या प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढला असून हा वेग असाच राहीला तर महाराष्ट्रात सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होऊ शकतो असे ही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

मुंढवा, केशवनगर, खराडी परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कात्रज परिसरात पाऊस सुरू असून पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. लाईट गेलेली असल्याने सर्वत्र अंधार झालेला आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच कल्याणीनगर विमाननगर वडगावशेरी चंदननगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहेखडकीत संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. फक्त दहा मिनिटातच सगळीकडे रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. खडकी बाजार येथील इंदिरा नगर, दर्गा वसाहत, महादेववाडी झोपडपट्ट्यांमध्ये काही ठिकाणी घरात पाणी शिरले.औंध, बाणेर रस्ता, बोपोडी, पाषाण, महाळुंगे, सूस परिसरात सायंकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाची तिव्रता अधिक असल्याने रस्त्यावर तुरळक वाहनांची संख्या दिसत होती.

स्कुटर मोटारसायकल रिपेअर्स असोसिएशन कडून ३५० जणांना आपत्कालीन सेवा

कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन  काळात असोसिएशन कडून पुढाकार  

पुणे :
कोरोना विषाणू साथीच्या लॉक डाऊन  काळात पुणे शहरातील स्कुटर मोटारसायकल रिपेअर्स असोसिएशन कडून ३५० जणांना आपत्कालीन सेवा  देण्यात आली. असोसिएशन चे अध्यक्ष हरीश अनगोळकर , उपाध्यक्ष प्रभाकर नायर,सचिव  संजय काबरा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 
पुणे शहरात सुमारे ३५ वर्षांपासून ही असोसिएशन कार्यरत आहे. कोरोना विषाणू साथीच्या काळात असोसिएशन ने आपत्कालीन सेवेत असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनांच्या दुरुस्तीची घरपोच सेवा दिली. दुकाने बंद असतानाही काही वाहनांना पर्यायी जागेत दुरुस्त करून दिली. सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून असोसिएशन ने सोशल मीडिया मध्ये हेल्पलाईन दूरध्वनी जाहीर केला आणि आलेल्या विनंतीनुसार सेवा उपलब्ध करून दिली. पोलीस ,डॉक्टर ,परिचारिका , सफाई कामगार,बँक कर्मचारी आणि पत्रकारांना या दुरुस्ती सेवा कोणताही अधिकचा मोबदला न घेता नाममात्र मोबदल्यात करून दिल्या. हे काम करताना सोशल डिस्टंसिंग ,कर्फ्यू चे नियम पाळून पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्यात आले. 
प्रभाकर नायर ,सचिन पवार ,धनंजय  काबरा ,राजेंद्र सुपेकर ,मंदार पानसे ,रमेश इंगळे या सर्वांनी या साठी पुढाकार घेतला. २५ जणांची आपतकालीन टीम तयार करून कोरोना लॉक डाऊन काळात ३५० वाहनांना सेवा देण्यात आल्या.                                                                               —————-