Home Blog Page 2558

काय म्हणाले होते राजीव बजाज , लॉक डाउन बाबत

0

देशातील कोरोनाच्या स्थितीबाबत राजीव बजाज यांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखत घेतली.

यावेळी काय म्हणाले होते राजीव बजाज

राजीव बजाज यांनी सांगितले की, पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करीत केंद्र सरकारने अत्यंत क्रूर पद्धतीने लॉकडाऊन लागू केले.

त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमध्ये आर्थिकदृष्ट्या सबळ वर्गातील काही प्रमाणात तग धरू शकतात. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे असे मजूर, गरीब वर्गातील लोक, शेतकरी यांच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. या वर्गातील लोकांना सध्या अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती डोळ्याला दिसत असूनही केंद्र सरकार त्यापासून काही धडा शिकायला तयार नाही.

उद्योगपती राजीव बजाज व राहुल गांधी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारवर इतक्या परखडपणे देशातील कोणत्याही उद्योगपतीने जाहीर टीका केली नव्हती. लॉकडाऊन व केंद्र सरकारच्या धोरणांबाबत राजीव बजाज यांनी हातचे काहीही राखून न ठेवता आपली मते या मुलाखतीत मांडली.
राजीव बजाज म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक त्रुटी आहेत. या निर्णयामुळे देशाचे दुहेरी नुकसान झाले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही व अर्थव्यवस्थेचेही कंबरडे मोडले आहे. भारतामध्ये झाले त्या पद्धतीने जपान, सिंगापूर, युरोप, अमेरिकेमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलेले नाही, असे त्या देशांत राहाणाऱ्या माझ्या नातेवाईक, मित्रमंडळींनी कळविले आहे. जागतिक महायुद्धांच्या काळातही अशा वाईट पद्धतीने लॉकडाऊन अमलात आले नव्हते.

सरकारविरोधात बोलल्यास कोसळते संकट
राजीव बजाज म्हणाले की, एखाद्या घटनेचा नामवंत लोकांना तडाखा बसतो तेव्हा तो चर्चेचा विषय होतो; परंतु आफ्रिकेमध्ये ८ हजार मुले भुकेने तडफडून मरतात, तिथे कोणाचेही लक्ष जात नाही. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर हजारो स्थलांतरित मजूर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले. हे मजूर बेकार झाले होते. त्यांच्याकडे ना पुरेसे पैसे होते, ना पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न. या स्थलांतरितांच्या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठीच राजीव बजाज यांनी आफ्रिकेतील मुलांच्या उदाहरणाचा सूचकतेने वापर केला. ते म्हणाले की, देशातील उद्योगजगतच नाही, तर सर्वसामान्य माणसेही केंद्र सरकारला वचकून राहातात. या सरकारविरोधात काही बोललो, तर आपल्यावर संकट कोसळेल, अशी भीती त्यांच्या मनात आहे. अशी स्थिती असूनही मी माझ्या मनातील विचार अत्यंत मोकळेपणाने मांडण्याचा निर्णय घेतला.

लोकांच्या मनातील भीती घालवा
प्रख्यात उद्योगपती राजीव बजाज यांनी सांगितले की, सर्वात प्रथम लोकांच्या मनातून भीती घालविली पाहिजे. या गोष्टीवर सर्वांनीच मोकळ्या मनाने विचार केला पाहिजे. मला वाटते देशातील जनता पंतप्रधानांचे ऐकते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात असून, या आजाराला घाबरू नका, असे आता सरकारने लोकांना सांगण्याची गरज आहे. जगातील अनेक देशांनी जे आर्थिक पॅकेज जाहीर केले, त्यातील दोनतृतीयांश रक्कम जनतेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र, भारतात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील फक्त १० टक्के रक्कमच लोकांच्या हाती पडणार आहे.)

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

0

मुंबई, दि. ६ : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजुरी दिली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज (४ जून) राज्यपालांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे यावेळी राज्यपालांनी कौतूक केले. 

राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोना परिस्थितीमुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.

उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.

आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परिक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी, माजी कुलगुरु, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले.

यासंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिचर्या परिषद, वैद्यकीय परिषद तसेच इतर केंद्रीय संस्थाशी देखील सल्लामसलत केल्याचे त्‍यांनी  सांगितले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीबाबत विद्यापीठाच्या कुलगुरुंना देखील स्वतंत्रपणे कळविण्यात आले आहे.

‘मिशन बिगिन अगेन’ काही निर्बंध आणखी शिथील व नवीन उपक्रमांना संमती

0

मुंबई, दि. ४ –  राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश आज जारी करण्यात आला. तसेच याबरोबर काही उपक्रमांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत.

एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी ३ जूनपासून मोकळ्या जागांमध्ये सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग आदी शारीरिक व्यायामांना काही अटींच्या अधीन राहून संमती देण्यात आली होती. पण आता हे करताना बगिच्यांमधील व्यायामाचे साहित्य, ओपन एअर जीममधील साहित्य, खेळाच्या मैदानावरील स्विंग्ज, बार्स यासारखे साहित्य यांचा वापर करता येणार नाही, असा निर्णय आता घेण्यात आला आहे.

५ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘मिशन बिगिन अगेन’ टप्पा २ मध्ये या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणचे रोड, गल्ली, भाग यांच्या एका बाजुची दुकाने एका दिवशी त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुची दुकाने नियमित वेळेत सुरु राहतील, असा निर्णय आता घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त याचे संनियंत्रण करतील. या व्यवस्थेत वाहतूक नियंत्रण तसेच व्यक्ती व्यक्तींमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘मिशन बिगिन अगेन’ टप्पा ३ मध्ये या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी खाजगी कार्यालयांना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या क्षमतेसह कामकाज करण्यास संमती देण्यात आली आहे. इतर कर्मचारी घरुन कामकाज करु शकतील. तथापि, कार्यालयात येणारे कर्मचारी घरी परतल्यानंतर त्यांनी स्वच्छतेची संपूर्ण काळजी घेण्याबाबत कार्यालय प्रमुखांनी त्यांना अवगत करायचे आहे.  

७ जूनपासून या महापालिका क्षेत्रांमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी वृत्तपत्रांची छपाई तसेच ग्राहकांना माहिती देऊन वितरण (होम डिलिवरीसह) करण्यास अनुमती देण्यात आली आहे. तथापि, पेपर वाटणाऱ्यांनी मास्क, सॅनिटायजर यांचा वापर करणे तसेच शारीरिक अंतर पाळण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

उपरोक्त महापालिका क्षेत्र सोडून राज्याच्या इतर भागात विविध उपक्रमांना काही अटींच्या अधिन राहून संमती देण्यात आली होती. यामध्ये आता विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा या शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी यांना काही अशैक्षणिक कामांसाठी संमती देण्यात आली आहे. यामध्ये ई – मजकूर तयार करणे, उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन तसेच निकाल जाहीर करणे यांचा समावेश आहे.       सध्या नागरिकांचा आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा प्रवास नियंत्रित स्वरुपातच राहील. तथापि, आता एमएमआर क्षेत्रामधील महापालिकांमध्ये नागरिकांच्या आंतरजिल्हा प्रवासास कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी देण्यात येत आहे. अडकलेले श्रमिक, स्थलांतरीत श्रमिक, यात्रेकरु, पर्यटक यांचा प्रवास मात्र निर्धारित केलेल्या कार्यप्रणालीनुसार (एसओपी) नियंत्रित केला जाईल.

शहरात झाडपडीच्या १६० घटना

पुणे-निसर्ग वादळाचा थेट फटका पुणे शहराला बसला नसला तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात बुधवारी सायंकाळपर्यंत ६० घटनांची नोंद झाली, त्यानंतर आज दुपारपर्यंत त्यामध्ये किमान १०० झाडपडीच्या घटना वाढून एकूण घटनांची संख्या १६० पर्यंत गेली आहे. आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान विविध ठिकाणी अजूनही कामगिरी बजावत आहेत.

पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

0

मुंबई, दि. ४ :-  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलीस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. पुणे शहरात तसेच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. विजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन नुकसानीबद्दलची माहिती जाणून घेतली. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल येताच मदतीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या

0


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी
नुकसानग्रस्त अलिबागला दिली तातडीने भेट,नुकसानीचा घेतला आढावा
अलिबाग दि. ४ जून- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपारिक नियम डावलून कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सकाळी जिल्हधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासमवेत शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्‍यानंतर दरेकर नुकसानग्रस्‍त भागाला भेट देवून पाहणी केली.
जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जागा, शेती, घरे, बागा आदींचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासकीय स्तरावर लवकारात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा व तातडीने शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहचविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी चक्रीवादळाच्या तडाख्यात उमटे गावामधील मृत्युमुखी पडलेल्या दशरथ वाघमारे यांच्‍या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्‍वन केले व त्यांची विचारपूस केली. कालच्या चक्रीवादळाच्या तडाख्यात झाडांची पडझड झाली असून इमारती तसेच घरांचे छप्पर उडाले आहेत. दरेकर यांनी त्या नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. तेथे मदतकार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या टीमची भेट घेतली, त्यांच्याकडून सुरु असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या चेऊल या गावालाही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी भेट दिली. चक्रीवादळामुळे शेती तसेच सुपारी व नाराळाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून त्याठिकाणी जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या सोबत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, भाजपचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

राज्यात ४१ हजार ३९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.४: राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सध्या राज्यात ४६ शासकिय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ ( धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव -१६, ठाणे ८, सोलापूर -६,  नवी मुंबई -५, रायगड -३, परभणी २, नाशिक २, वाशिम -२ , औरंगाबाद -२,पनवेल १, पालघर -१ , वसई विरार -१ उस्मानाबाद -१, धुळे -१,नांदेड १ आणि यवतमाळ – १ असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह  रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४४,९३१), बरे झालेले रुग्ण- (१८,०९६), मृत्यू- (१४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२५,३६४)

ठाणे: बाधित रुग्ण- (११,४२०), बरे झालेले रुग्ण- (४१७९), मृत्यू- (२५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (६९८७)

पालघर: बाधित रुग्ण- (१२३४), बरे झालेले रुग्ण- (४५८), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७४०)

रायगड: बाधित रुग्ण- (१२९३), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५३२)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२९७), बरे झालेले रुग्ण- (९४२), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२८४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९०)

धुळे: बाधित रुग्ण- (१८७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (६७)

जळगाव: बाधित रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३९५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७)

पुणे: बाधित रुग्ण- (८८२५), बरे झालेले रुग्ण- (४७७४), मृत्यू- (३७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३६७५)

सोलापूर: बाधित रुग्ण- (११२५), बरे झालेले रुग्ण- (४५७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५७६)

सातारा:  बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३५०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६१२), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३४६)

सांगली: बाधित रुग्ण- (१२७), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (७०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (१२३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२०१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७१४), बरे झालेले रुग्ण- (१११९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५०६)

जालना: बाधित रुग्ण- (१५९), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (८४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१९४), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४८)

परभणी: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (२६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४६)

लातूर: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४८)

बीड: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह  रुग्ण- (२१)

नांदेड: बाधित रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४८)

अकोला: बाधित रुग्ण- (६७९), बरे झालेले रुग्ण- (३८५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२६०)

अमरावती: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (९८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (५४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३१)

वाशिम: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१)

नागपूर: बाधित रुग्ण- (६६२), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२४१)

वर्धा: बाधित रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४)

भंडारा: बाधित रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (१८)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (२१)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह  रुग्ण- (४६)

एकूण: बाधित रुग्ण-(७७,७९३), बरे झालेले रुग्ण- (३३,६८१), मृत्यू- (२७१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह  रुग्ण-(४१३९३)

(टीप-आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ९३ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३८०४ झोन क्रियाशील असून आज एकूण १९ हजार १३२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ७२.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

राजीव बजाज यांच्या वक्तव्याला राजकीय वास!(व्हिडीओ)

माजी खासदार संजय काकडे यांच्याकडून बजाज यांचा समाचार

पुणे, दि. 4 जून : भारतात लॉकडाऊन फेल गेल्याच्या उद्योगपती राजीव बजाज यांच्या वक्तव्याचा माजी खासदार संजय काकडे यांनी चांगलाच समाचार घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळी लॉकडाऊन केल्यानेच आपला देश आतापर्यंत कोरोनापासून वाचला आहे. आणि हे अमेरिका, इंग्लंड, स्पेन, इटली यासारख्या अनेक प्रमुख देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

लॉकडाऊन चा भारतातील परिणाम चांगला की वाईट हे जगातल्या या राष्ट्रांमधील कोरोना रुग्णांची संख्या पाहिली तरी लक्षात येईल. अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी असून तिथे 18 लाखांवर कोरोना रुग्ण गेले आहेत. इटलीमध्ये 7 कोटी लोकसंख्येपैकी 2 लाख 34 हजार कोरोना रुग्ण आहेत. इंग्लंड मध्ये 6 कोटी लोकसंख्या असून 2 लाख 80 हजार रुग्ण आहेत. फ्रान्समध्ये 6 कोटी लोकांपैकी 1 लाख 51 हजार लोकांना कोरोना झाला आहे. स्पेनमध्ये 5 कोटी लोकसंख्येपैकी 2 लाख 87 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या देशांची लोकसंख्या, कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांची आरोग्य सुविधा पाहता भारतात 132 कोटी लोकसंख्येपैकी फक्त सुमारे 2 लाखाच्यावर असलेले कोरोनाबाधित रुग्ण आणि आपली आरोग्य व्यवस्था यांची तुलना केली तर, भारतातील स्थिती अतिशय चांगली असल्याचे दिसते. मुंबई व पुणे वगळता देशात अन्यत्र कुठेही कोरोना रुग्णांची संख्या वाढली नाही. हे लॉकडाऊनचेच यश आहे. मुंबई व पुण्यात रुग्ण वाढण्याचे कारण म्हणजे इथली भरमसाठ लोकसंख्या आहे. त्यामुळे एकट्या जपानचं उदाहरण देऊन राजीव बजाज यांनी देशातील नागरिकांची दिशाभूल करू नये, असेही माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग सध्या आर्थिक मंदीत आहे आणि पुढचे सहा महिने तरी कोरोना जाण्याची लक्षणे नाही. त्यामुळे संपूर्ण जगात आर्थिक मंदी उग्र रूप धारण करेल. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे आपल्या देशाला आणि देशातील उद्योजकतेला नवी दिशा मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याचे सकारात्मक परिणामही लवकरच जाणवतील. आर्थिक मंदीतूनही आपण लवकर बाहेर येऊ. त्यामुळे राजीव बजाज यांनी आर्थिक मंदी आणि मोदी सरकारने केलेल्या उपाययोजनांबाबत नोंदविलेली मतं अर्धवट माहितीच्या आधारावर केलेली आहेत, असेही माजी खासदार संजय काकडे म्हणाले.राजीव बजाज आणि त्यांचे वडील चांगले उद्योजक आहेत. त्यांना सरकारला काही सूचना करायच्या असतील तर, जरूर कराव्यात. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील ते याबद्दल सांगू शकतात. परंतु, अशा पद्धतीने राजकीय नेत्याचा आसरा घेत चुकीच्या माहितीवर आधारित विधानं करू नयेत. हवं तर, राजीव बजाज यांनी यासंबंधीची माहिती घेण्यासाठी चांगले सल्लागार देखील नेमावेत, असा विनंतीवजा सल्लाही माजी खासदार संजय काकडे यांनी राजीव बजाज यांना दिला आहे.

भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे पावसाळ्यापूर्वी नाल्यातील कामे न होण्यामागे- अश्विनी कदमांचा आरोप

पुणे- भ्रष्टाचार हेच मुख्य कारण आहे पावसाळ्यापूर्वी नाल्यातील कामे न होण्यामागे असा स्पष्ट आरोप महापालिकेतील स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी च्या महिला नेत्या अश्विनी नितीन कदम यांनी केला आहे. आयुक्त नवीन असल्याने त्यांना यातील काहीच कल्पना नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या ,’कालच्या एका दिवसाच्या पावसाने नागरिकांमध्ये परत या भयान आठवणी 25 सप्टेंबर आलेल्या पुराच्या ताज्या झाल्या. नाल्यावरील असलेल्या पुलांना पाणी स्पर्श करत होते हे बघुन नाल्या लगत राहणाऱ्या नागरिकांची अक्षरश झोप उडाली होती. नागरिकांनी स्वतःच्या घरातील किमती इलेक्ट्रॉनिक, मौल्यवान वस्तू या उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या. टू-व्हीलर, फोर-व्हीलर सुरक्षित जागी नेऊन पार्क करून आले होते. काहींनी तर चार महिन्यासाठी स्वतःचं हे घर बंद ठेवून दुसरीकडे घर भाड्याने घेतले आहे तिथे जाऊन राहू लागलेत. अशी सगळी परिस्थिती कालच्या एका दिवसाच्या पावसाने आज आंबील ओढ्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांवर आली आहे. पुढचे चार महिने अजून काढायचे आणि या सगळ्याला जबाबदार आहे ते पुणे महानगरपालिके भ्रष्ट कारभार. सातत्याने मी सभागृह असेल, लेखी मागण्या असतील किंवा सोशल मीडिया व वृत्तपत्रांच्या माध्यमातून आंबील ओढ्यातील सीमा भिंत बांधा, प्राईम मूव्ह प्रमाणे 22 मीटर नाला रुंद करा, आवश्यक पूल, पुतळे, स्ट्रक्चर काढा परंतु पुणे ह्या मागण्या करत होते. परंतु पुणे महानगरपालिकेने सगळी कामे अपूर्ण ठेवली आणि म्हणूनच आज ही सगळी आंबील ओढ्याच्या कडेला राहत असलेल्या नागरिकांवर ही वेळ आलेली आहे. आणि याला जबाबदार आहे तो सर्व निविदा प्रक्रियांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार. मग तो कलव्हर्ट बांधायचा असुदे ,राडारोडा, गाळ काढण्याचा किंवा सीमा भिंत बांधण्याचा किंवा असू देत या सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये भ्रष्टाचार होत राहिला आणि निविदा प्रक्रिया लांबत गेलाआणि पर्यायाने नाल्यातील कामे सुद्धा लांबत गेली. आणि आज सात आठ महिन्याने पावसाळ्याच्या तोंडावर कोणतेही नाल्यातील काम पूर्ण झालं नसल्यामुळे पुणेकर नागरिक आंबील ओढ्याच्या कडेने राहतात त्यांना अक्षरशः भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.आयुक्तांना नवीन असल्यामुळे याच्यातील काहीच कल्पना नाही परंतु आयुक्तांनी सुद्धा हि सर्व कामे का अपूर्ण राहिली याची चौकशी करून पूर्ण करावी आणि जे कोण याला जबाबदार असतील त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी तरच पुणेकरांना यातून सुटका मिळेलअसेही त्या म्हणाल्या .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

0

मुंबई, दि. ४ : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर केल्यास शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरु करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून अधिक मनुष्यबळ, साधनसामुग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब हे देखील सहभागी झाले होते. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी देखील सूचना केल्या.

रायगड जिल्ह्यामध्ये घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्नधान्य पोहचविणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीजपुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीजपुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसानभरपाई देताना नागरिकांना विश्वासात घ्या. संकट मोठे आहे, आपण सर्व कोरोनामध्ये दिवस रात्र काम करीत आहात त्याचे निश्चितच कौतुक आहे असे सांगून मुंबई परिसरातील छावण्यांमध्ये हलविलेल्या नागरिकांना सोडताना त्यांची कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या. 

मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या नशिबामुळे या चक्रीवादळाचा जोर ओसरला. आपल्याला आता सदैव दक्षता घ्यावी लागेल. महत्त्वाचा मुद्दा असा की, पूर्व किनाऱ्यावर अशी वादळे नवीन नाहीत पण आता पश्चिम किनाऱ्यावर मुंबईला पहिल्यांदाच खूप वर्षांनी असे वादळ आले. त्यामुळे आपल्याला भविष्यातील तयारीही ठेवावी लागेल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, खऱ्या अर्थाने सतर्कता काय असते ती पहायला मिळाली. विद्युत तारा, खांब पडणे यामुळे पुनर्वसन अवघड होते. हे प्राधान्याने लवकरात लवकर उभे करणे गरजेचे आहे. मदत जितकी लवकर पोहचेल तितके लोकांना दिलासा मिळेल. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याला सुदैवाने धोका पोहचला नाही. पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले की, ठाण्याला विशेष फटका बसला नाही. १६२ कच्च्या घरांची पडझड झाली, झाडांच्या फांद्या पडल्याच्या ३६० घटना घडल्या. जिल्ह्यातील सर्व मार्ग व महामार्ग सुरु झाले आहेत. उल्हासनगर येथे काही वेळासाठी दूरध्वनी सेवा खंडीत झाली होती अशी माहितीही त्यांनी दिली. 

रायगड निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी यावेळी माहिती दिली की, रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. १ लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. श्रीवर्धन आणि मुरुडच्या मध्ये चक्रीवादळ धडकले, त्याचा फटका श्रीवर्धनला जास्त बसला असून सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. विजेचे खांब हजारोंच्या संख्येने पडले आहेत.  जिल्ह्यांत ५ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून पंचनाम्यासाठी पथके बाहेर पडली आहेत. मात्र अंतर्गत रस्ते खूप खराब झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णवाहिकाही पाठवणे शक्य झालेले नाही. लोकांत दूरध्वनी व मोबाईल सेवा खंडीत झाल्याने ते घाबरले आहेत, त्यांना इतरांशी संपर्क शक्य होत नाही. टेलिकॉम यंत्रणा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वीज नसल्याने ५०० मोबाईल टॉवर पडले आहेत असे सांगण्यात आले. १० बोटी अंशत: नुकसान झाले असून १२ हेक्टर मत्स्यशेती खराब झाली आहे, अशी माहितीही देण्यात आली.

दापोली व मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. ३ हजार झाडे पडली आहेत. १४ सबस्टेशन, १९६२ ट्रान्सफॉर्मर विजेचे खांब पडले आहेत, पाणीपुरवठ्याची व्यवस्था काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे, अशी माहिती रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई शहरात २५ ठिकाणी झाडे पडली. तर मुंबई उपनगरमध्ये ५५ ठिकाणी झाडे पडली तसेच २ घरांची पडझड झाली. विभागीय आयुक्त कोकण यांनी देखील वीजपुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहितीही देण्यात आली.

प्रारंभी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी चक्रीवादळाविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, या वादळामुळे राज्यात ७२.५ मिमी पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस १५२ मिमी जालना येथे झाला. राज्यात ७८ हजार १९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तर २१ एनडीआरएफ व ६ एसडीआरएफ पथके तैनात करण्यात आली होती. ६ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ६ जनावरे दगावली तर १६ नागरिक जखमी झाले. रायगड जिल्ह्यात प्राथमिक माहितीनुसार ५०३३ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले. मयत व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपये याप्रमाणे सानुग्रह अनुदान लगेच द्यावे असेही त्यांनी सांगितले.

पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक अहमदनगर, कोकण विभागीय आयुक्त या बैठकीस उपस्थित होते. पालघर, अहमदनगर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा यावेळी झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 334

पुणे विभागातील 6 हजार 241 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 11 हजार 86रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 4 :- पुणे विभागातील 6 हजार 241 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 86 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 334 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 8 हजार 604 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 203 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 18 आहे. कोरोनाबाधित एकूण 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 215 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 382 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 9, सोलापूर जिल्ह्यात 55, सांगली जिल्ह्यात 2, कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 578 कोरोना बाधीत रुग्ण असून 223 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 331 आहे. कोरोनाबाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1135 कोरोना बाधीत रुग्ण असून 476 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 565 आहे. कोरोना बाधित एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 124 रुग्ण असून 70 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 50 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 645 कोरोना बाधीत रुग्ण असून 269 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 370 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 94 हजार 919 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 90 हजार 669 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 350 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 79 हजार 340 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11 हजार 86 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि. 4 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

पोलिसांबरोबर ,पत्रकार ,लोकप्रतिनिधी यांनाही ५० लाखाचे विमाकवच

0

मुंबई-कोरोनाविरुद्धलढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या १९१ पोलीस अधिकारी, १३१९ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरूअसून ,मुंबई १८, पुणे २,सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, एटीएस १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३० पोलीसवीरांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे वृत्त शासकीय सूत्रांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर काल एका कार्यक्रमात बोलताना आताशासकीय कर्मचारीवर्ग यांच्यासमवेत पत्रकार ,सरपंच ,लोकप्रतिनिधी यांनाही कोरोना विरोधात लढा देताना ५० लाखाचे विमाकवच देण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

पुणे, पिंपरीसह ग्रामीणमध्ये बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि. 04 जून 2020 : ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे परिमंडलातील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसला असून प्राथमिक अंदाजानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच प्रामुख्याने मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार तालुक्यांमध्ये उच्च व लघुदाबाचे 1440 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडून वीजतारा तुटल्या आहेत.

दरम्यान महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविश्रांत दुरुस्ती कामे करून गेल्या 24 तासांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागातील बहुतांश वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. संततधार पाऊस, चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही सुरु असलेला सोसाट्याचा वारा आणि शहरी भागात अनेक भूमिगत वाहिन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा सुरु करण्यात अनेक अडथळे आले. मात्र आज पहाटेपर्यंत बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

पुणे शहरात वादळी वारे व मुसळधार पावसामुळे सुमारे 45 उच्च व लघुदाबाचे वीजखांब कोसळले. वीजतारांवर झाडे व फांद्या पडल्याने शेकडो ठिकाणी वीजतारा तुटल्या होत्या. काल सायंकाळी उशिरा पावसाचा वेग ओसरला तरी वारे वेगान वाहत होते. मात्र महावितरणचे सर्व अभियंते, कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे कर्मचाऱ्यांनी लगेचच दुरुस्ती कामाला सुरवात केली. पहाटेपर्यंत दुरुस्ती तसेच पर्यायी व्यवस्थेद्वारे टप्प्याटप्प्याने बहुतांश भागात वीजपुरवठा सुरु केला.

भूमिगत वाहिन्या व फिडर पिलरमध्ये पाणी शिरणे, मोठी झाडे व फांद्या हटविण्यास विलंब होणे आदी कारणांमुळे गुरुवारी दुपारपर्यंत आंबेगाव, सहकारनगर व मार्केटयार्डमधील काही भाग, जनता वसाहत, बाणेरमधील काही भाग, येवलेवाडीमधील फॉर्च्यून सृष्टी, फॉर्च्यून शुभम, पद्मकुंज, हडपसरमधील गंगा व्हीलेज, विमाननगर व विश्रांतवाडीमधील काही सोसायट्या आदी भागांमध्ये वीजपुरवठा खंडित होता. सायंकाळी उशिरा किंवा रात्रीपर्यंत या सर्व भागात वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे. शहरात काल 85 पैकी 84 वीजवाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र सुमारे 47 रोहित्रांवरील वीजपुरवठा बंद आहे. रोहित्रांच्या दुरुस्तीसोबतच अनेक भागातील वीजपुरवठा खंडित असल्याच्या वीजग्राहकांच्या वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम वेगाने सुरु आहे. 

      पिंपरी चिंचवड व भोसरीमध्ये वादळी पावसामुळे वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसल्याने 45 ठिकाणी वीजखांब कोसळले. चार ठिकाणी रोहित्र जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्या. त्यामुळे 112 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये आज पहाटेपर्यंत अविश्रांत दुरुस्ती काम करुन बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. दुपारपर्यंत हिंजवडी, वाकडचा काही भाग, खराळवाडीमधील काही सोसायट्या, पिंपळे सौदागरचा काही भाग तसेच भोसरीमधील काही भागात वीजपुरवठा सुरु करण्यासाठी दुरुस्ती कामे सुरु होती. सायंकाळी किंवा रात्री उशिरापर्य़ंत या सर्व भागात वीजपुरवठा सुरुर करण्यात येत आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमधील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार झाडे, फांद्या पडल्याने उच्चदाबाचे 390 व लघुदाबाचे 960 असे सुमारे 1350 वीजखांब जमीनदोस्त झाले आहेत. शेकडो ठिकाणी वीजतारा तुटल्या आहेत. यात महावितरणचे सुमारे 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यांमधील 385 वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडल्यामुळे 794 गावांमधील सुमारे 5 लाख 57 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या चक्रीवादळामुळे महापारेषणच्या पाच अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्या तुटल्या होत्या.

पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी वीजयंत्रणेची पाहणी व दुरुस्ती कामाला वेग देण्यासाठी ग्रामीण भागात आज विविध ठिकाणी भेटी दिल्या. महापारेषणकडून काल रात्रीच तुटलेल्या पाचही अतिउच्चदाब वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारास दुरुस्ती कामाला वेग दिला. दुपारपर्यंत लोणावळा, तळेगाव शहर व ग्रामीण परिसर, तसेच आंबेगाव, जुन्नरमधील काही गावे आणि कोकणजवळील माले गावाचा परिसर (ता. मुळशी), वेल्हा परिसर आदी ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु होते. या भागातील 7 उपकेंद्र बंद आहेत. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा बंद असलेल्या लोणावळा, तळेगावसह इतर बहुतांश भागात वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 

मुदत संपलेल्या १५६६ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

0

मुंबई, दि. ४ – राज्यातील मुदत संपलेल्या १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भात ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून राज्यपालांकडे तशी शिफारस करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये १ हजार ५६६ इतक्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तथापि, आता या ग्रामपंचायतींची मुदत संपली असून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही कमी झालेला नाही. त्यामुळे लगतच्या काळात निवडणुका घेणे शक्य नाहीत. तसेच ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतींवर शासनामार्फत प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. राज्यपालांच्या मान्यतेनंतर यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) मध्ये कलम १५१ (३) नंतर पुढीलप्रमाणे बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. जर कोणत्याही कारणांमुळे (नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी इत्यादी मुळे) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणूक घेता आली नाही तर त्यावेळेस शासनास या ग्रामपंचायतीवर उचित व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार राहील.

राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित

0

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. ४ – राज्यातील कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव पाहता तो रोखण्याच्या अनुषंगाने राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान प्रस्तावित असलेल्या १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणूक आयोगास नुकतीच करण्यात आली होती. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यात जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबींकरिता मोठा वेळ लागतो. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच प्रस्तावित निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील ६ महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगास करण्यात आली होती, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे की, निवडणूक आयोगाच्या १७ मार्च २०२० रोजीच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्या ग्रामपंचायतींची ५ वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याबाबत व निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाने कळविले आहे.