Home Blog Page 2554

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप

0

मुंबई दि. ७, :- रायगड जिल्ह्यात ३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे या भागात वीजपुरवठा नाही, परिणामी तेथील बाधित कुटुंबांना दिवे लावण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून मोफत केरोसिनचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील इतर नुकसानग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची मागणी असल्यास त्यांनाही केरोसिन पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे इत्यादी प्रयोजनांकरिता विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे.त्यानुंषगाने रायगड जिल्ह्यामध्ये ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटूंब मोफत केरोसिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ३३५ इतक्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिशिधापत्रिका ५ लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाने बाधित कुटुंबांना वितरित होणा-या केरोसिनचा एक्स डेपो दरासह सर्व खर्च (घाऊक विक्रेत्याचे कमिशन, वाहतूक खर्च, लागू असेल तेथे अर्ध-घाऊक विक्रेत्यांचे कमिशन, किरकोळ विक्रेत्यांचे कमिशन इ.) सुरुवातीला संबंधित केरोसिन विक्रेत्यांना राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून करावा लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटूंब म्हणून निश्चित केलेल्या कुटुंबांनाच केरोसिनचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. मंजूर करण्यात आलेले विनाअनुदानित दराचे केरोसिन जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळ बाधित म्हणून निश्चित केलेल्या कुटूबांना व आवश्यक तेथे पात्र शिधापत्रिकाधारकांनाच होईल याची दक्षता घेण्याच्याही सूचना मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.७: राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी ८५ हजार ९७५ नमुने पॉझिटिव्ह (१५.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७७ हजार ६५४ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ५०४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७१ (मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा-भाईंदर ४, पालघर १), नाशिक- १ (नाशिक १), पुणे- १४ (पुणे ६, सोलापूर ८), कोल्हापूर- २ (कोल्हापूर २), औरंगाबाद-१ (जालना १), अकोला-१ (अकोला मनपा १). इतर राज्य- १ (पश्चिम बंगाम मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ९१ रुग्णांपैकी ६७ जणांमध्ये (७३.६ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३०६० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३१ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १३ एप्रिल ते ४ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६० मृत्यूंपैकी मुंबई ४४, उल्हासनगर – ५, मीरा भाईंदर – ४, सोलापूर ४ , नाशिक -१ ,पालघर -१, इतर राज्ये -१,असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (४८,७७४), बरे झालेले रुग्ण- (२१,१९०), मृत्यू- (१६३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव रुग्ण- (२५,९४०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१३,०१४), बरे झालेले रुग्ण- (४८३६), मृत्यू- (३३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (७८४६)

पालघर: बाधित रुग्ण- (१४८५), बरे झालेले रुग्ण- (६०७), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८३८)

रायगड: बाधित रुग्ण- (१४४१), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (६४९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५२१), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४०५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०३), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९४)

धुळे: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४८९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९७०५), बरे झालेले रुग्ण- (५५१६), मृत्यू- (४०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३७८३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१३४३), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६१९)

सातारा:  बाधित रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६४७), बरे झालेले रुग्ण- (३३५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०४)

सांगली: बाधित रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (८८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३५४), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१८५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१९६५), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८४)

जालना: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१६३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५०)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३७), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६२)

बीड: बाधित रुग्ण- (५५), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (१५)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५४)

अकोला: बाधित रुग्ण- (७७८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (३०२)

अमरावती: बाधित रुग्ण- (२९३), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (४३४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०२)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (३९), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१५)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५३)

एकूण: बाधित रुग्ण-(८५,९७५), बरे झालेले रुग्ण- (३९,३१४), मृत्यू- (३०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०),ॲक्टिव रुग्ण-(४३,५९१)

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १३८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३६५४ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ५१५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.६० लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 262

पुणे विभागातील 7 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 12 हजार 214 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 7 :- पुणे विभागातील 7 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 हजार 214 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 262 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 253 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 523 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 936 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 409 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.33 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 491 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 408, सातारा जिल्ह्यात 3, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 621 कोरोना बाधीत रुग्ण असून 303 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 292 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1263 कोरोना बाधीत रुग्ण असून 647 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 501 आहे. कोरोना बाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 142 कोरोना बाधीत रुग्ण असून 85 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 53 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 665 कोरोना बाधीत रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 238 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 732 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 96 हजार 771 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 961 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 84 हजार 392 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 12 हजार 214 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि. 7 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. ७ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हज यात्रेची अनिश्चितता पाहता ज्या यात्रेकरुंना आपली यात्रा रद्द करावयाची आहे, त्यांनी केंद्रीय हज समितीला ईमेलद्वारे कळवावे. या यात्रेकरुंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना कोणत्याही कपातीशिवाय परत दिली जाईल, असे केंद्रीय हज समितीने कळविले आहे.

जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ मार्च २०२० रोजी सौदी प्रशासनाकडून हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविण्याबाबत कळविण्यात आले होते. पण त्यानंतर आता हज २०२० च्या तयारीसाठी फार कमी कालावधी राहिलेला असताना सौदी प्रशासनाकडून अद्याप पुढील सूचना प्राप्त झालेली नाही. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये ही यात्रा आहे. दरवर्षी याची तयारी फार आधीपासून सुरु केली जाते. पण यंदा आता तयारीसाठी अत्यल्प वेळ राहिलेला असताना अद्यापही सौदी प्रशासनाकडून पुढील सूचना मिळालेली नाही. तथापी, यंदाच्या यात्रेसाठी निवड झालेले उमेदवार हज समितीकडे याबाबत सातत्याने विचारणा करीत आहेत. त्यामुळे निवड झालेले जे उमेदवार आपली हज यात्रा रद्द करु इच्छितात त्यांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर दिलेला यात्रा रद्दीकरणाचा फॉर्म भरुन तो ceo.hajcommittee@nic.in या ई-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबूक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्यांनी भरलेली १०० टक्के रक्कम कोणत्याही कपातीशिवाय परत करण्यात येईल, असेही केंद्रीय हज समितीने कळविले आहे. केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मकसूद अहमद खान यांनी देशातील सर्व राज्यस्तरीय हज समित्यांना पत्राद्वारे ही बाब कळविली आहे.

रत्नागिरीला ७५ कोटी, सिंधुदुर्गला २५ कोटींची तातडीची मदत देणार

0

मुंबई, दि ७ : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासियांच्या पाठीशी उभे राहील. तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी रुपये व सिंधुदुर्गला २५ कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य निर्देश दिले.

ठाणे व पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र, तेथील आढावा घेऊन मग निर्णय जाहीर केला जाईल. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देण्यात आलेला निधी ही तातडीची मदत असून हे पॅकेज नसल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

मुख्यमंत्री म्हणाले, अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकर माहिती सादर करावी. त्याआधारे योग्य निर्णय घेता येईल.

भूमिगत विद्युत तारांबाबत विचार

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, संकट किती गंभीर आहे यावर मी बोलणार नाही, कारण कोकणवासियांनी ते अनुभवले आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. लवकरात लवकर मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागालाही भेट देईन. या संकटातून आपण काय शिकलो आहोत ते पाहिले पाहिजे. कोकण भागात भूमिगत विद्युत तारांची व्यवस्था करू शकतो का याचा विचार करावा लागेल. त्याचप्रमाणे सिमेंटच्या पत्र्याला काही पर्याय आहे का किंवा कोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का याचा विचार करणे गरजेचे आहे. आता जे नुकसान झाले आहे तसे भविष्यात घडू नये, यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

मदत कार्य करताना प्राधान्य ठरवा, लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका. प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत, त्यामुळे मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा. पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरु करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करा. आता पावसाळा सुरू होईल, त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तिकार, मच्छीमार यांना तातडीने मदत करा, अशा सूचनाही श्री. ठाकरे यांनी दिल्या.

प्रशासनाचे कौतुक

कोरोनाच्या संकटाचे आव्हान असताना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गचे कमी नुकसान झाले असले तरी बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेत बिघाड झाला आहे आणि तो दुरुस्त करून पुरवठा सुरळीत व्हावा. गावांचे संपर्क रस्ते दुरुस्त करणे गरजेचे आहे. जिल्ह्याला कमीतकमी २५ ते ३० कोटी रुपये देण्याची गरज आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री ॲड. परब यांनी तिथूनच या कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊन नुकसानीची माहिती दिली. विशेषत: मंडणगड, दापोली, रत्नागिरीला जास्त फटका बसला आहे. बरीच घरे उद्ध्वस्त झाली आहेत, विजेचे खांब तुटले आहेत. शिधावाटप यंत्रणेतील भिजलेले धान्य बदलून नवे धान्य देण्यात येत आहे. घरांचे पत्रे उडाले आहेत. सध्या ते उपलब्ध नाहीत. आता पावसाळा येत असून लवकरात लवकर पत्रे उपलब्ध करणे गरजेचे आहे.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे हे देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यातून सहभागी झाले. ते म्हणाले, फयान वादळापेक्षा जास्त नुकसान झाले असल्याने प्रति कुटुंब रोख मदतीची नागरिकांची मागणी आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत, त्यामुळे जनरेटर संच द्यावे लागतील. ट्रान्सफॉर्मर्स, खांब पडले आहेत. वीज वितरणाचे इतर जिल्ह्यांतून कर्मचारी मागवावे लागतील. तसेच अडथळे दूर करण्यासाठी पडलेली झाडे तातडीने काढावी लागतील.

पालघरचे पालकमंत्री श्री. भुसे यांनी पालघर जिल्ह्यातील नुकसानीची माहिती दिली. या जिल्ह्यांतून खासदार, आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी देखील आपल्या सूचना  मांडल्या.

बागा नष्ट झाल्याने विवंचना

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे प्राथमिक स्वरूपात झालेल्या नुकसानीची विस्तृत माहिती देण्यात आली. विजेचे खांब व झाडे पडणे, घरांवरील पत्रे, कौले उडून जाणे, भिंती कोसळणे, तसेच अंतर्गत रस्ते खराब होणे, दळणवळण यंत्रणा ठप्प होणे असे नुकसान झाले आहे. सुपारी बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी नारळी, पोफळी, आंब्याच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच १५-१५ वर्षे काळजीपूर्वक वाढवलेली ही झाडे नष्ट झाल्याने आता भविष्यात काय करायचे हा प्रश्न उभा ठाकला असल्याचे काही लोकप्रतिनिधी म्हणाले.   

नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देणार

चक्रीवादळाचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध पथके तयार करून हे पंचनामे व्यवस्थित करण्यास सांगितले आहे. नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन पंचनामे होताच ती वितरित केली जाईल, त्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. सध्याच्या घडीला केवळ दुरुस्ती नव्हे तर वीज यंत्रणेतील पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरु करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत, असे मुख्य सचिव श्री. मेहता यांनी सांगितले.

संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी ‘बियॉन्ड द बॉक्स’ विचाराची गरज

अनंत काळवीट यांचे मत; धनश्री जोग यांच्या पुस्तकांचे ऑनलाईन प्रकाशन
पुणे : “कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर चौकटी बाहेरचा विचार करणे गरजेचे असते. आजच्या कोरोनाच्या संकट काळातून बाहेर पडण्यासाठी अशाच ‘बियॉन्ड द बॉक्स’ विचाराची आज गरज आहे. कोरोना, लॉकडाऊन यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्यासाठी चौकटीबाहेरचा विचार करून नव्या संधी हेरायला हव्यात,” असे मत झेडएफ गिअरिंग सर्व्हिसेसचे अध्यक्ष अनंत काळवीट यांनी व्यक्त केले.
उद्योजिका, तंत्र सल्लागार व लेखिका धनश्री जोग यांच्या ‘होरायझन’ या कथासंग्रहाचे आणि ‘बियॉन्ड द बॉक्स’ या तंत्रविषयक पुस्तकाचे प्रकाशन अनंत काळवीट व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. साहित्य क्षेत्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच लेखक, प्रमुख पाहुणे, प्रकाशक यांनी वेगवेळ्या ठिकाणी बसून पुस्तक प्रकाशित केले. या कार्यक्रमाचे प्रसारण फेसबुक लाईव्हवरून झाले.
विविध संस्था आणि व्यक्तींचे अनुभव, आयुष्यातील सत्य घटना यावर आधारित केलेले मानवतेचे वर्णन ही ‘होरायझन’ या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. तर व्यवसायाची मूल्ये (बिझनेस प्रिनिसिपल्स) आणि प्रात्यक्षिकावर आधारित तंत्रकौशल्ये सांगणारे ‘बियॉन्ड द बॉक्स’ हे पुस्तक आहे. उद्योगांच्या गुणवत्तावाढीसाठी अनेक मौलिक गोष्टी यात आहेत.
अनंत काळवीट म्हणाले, “तांत्रिक पुस्तक असले तरी अतिशय ओघवत्या शैलीत धनश्री जोग यांनी मांडले आहे. त्यामुळे सामान्य माणसालाही कळेल. उद्योगांच्या यशात, विस्तारात आवश्यक तंत्र-कौशल्ये यामध्ये मांडली आहेत. एखाद्या प्रश्नाचे किंवा अडचणीचे उपाय शोधण्यासाठी चौकटीतला विचार करण्यापेक्षा त्याबाहेर जाऊन उपाययोजना कशा कराव्यात, यासाठी हे पुस्तक मार्गदर्शनपर आहे.”
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “गोष्टीच्या रूपातून भावनिक आंदोलने मांडण्याचा प्रयत्न ‘होरायझन’मधून केलेला आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना उत्कंठा वाढत जाते. समाजातल्या विविध घटकांच्या बाबतीत आलेले अनुभव अतिशय आशयपूर्ण मांडले आहे. जीवनात आलेले अनुभव प्रामाणिक व वस्तुनिष्ठपणे उतरवली आहे. पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यातील घटनांच्या आठवणींना उजाळा मिळतो. या विविधांगी लेखनातून माणुसकीचे भाव प्रतीत होतात; तर अनेकदा बोधही मिळतो.” 
प्रास्ताविकात धनश्री जोग यांनी पुस्तकांच्या लेखनाविषयी सांगितले. अनेक वर्षे उद्योजिका, सल्लागार म्हणून काम करताना आलेल्या विविध अनुभवांवर आधारित ही पुस्तके लिहिता आली आणि या दोन्ही पुस्तकांचे तज्ज्ञांकडूनही चांगले स्वागत होत आहे, याचा आनंद वाटतो. मंजुषा वैद्य, अमेय जोग यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री जोग यांनी आभार मानले.

विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा गृहमंत्री अनिल देशमुख

  • ‘लोकभावनांचे सर्वेक्षण’ पुस्तिकेचे प्रकाशन

*पोलिसांच्या कामावर आधारीत कॉफी टेबल बुक साठी माहिती व छायाचित्रांचे संकलन करावे

पुणे दि. 7 : लॉक डाऊन कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला 5 हजार 500 विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा उपक्रम उत्कृष्ट असून यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.

कोरोना नियंत्रणासाठी लॉक डाऊन कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी ते बोलत होते.

कोरोना नियंत्रणासाठी लॉक डाऊन ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी – सुविधांबद्दल पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे श्री. देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “लोक भावनांचे सर्वेक्षण” या पुस्तिकेचे प्रकाशन श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक(ग्रामीण) संदीप पाटील, पोलीस सह आयुक्त (शहर) डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) सुनील फुलारी तसेच सर्व पोलीस उपायुक्त व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांच्या पाल्यांना शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक सहाय्य कारणाऱ्या बिझनेस बायजू एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीचे सहायक व्हाइस प्रेसिडेंट अरुणेश कुमार यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी डिजीटल पास आवश्यक होता. हा पास उपलब्ध करुन देण्यासाठी डिजीटल कार्यप्रणाली विकसित करणाऱ्या सायबेज सॉफ्टवेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या संजीवनी व्हॅन, तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल, मेडिकल मधून औषधे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेवून याद्वारे कोविड संक्रमित रुग्ण शोधणे व कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे श्री. देशमुख यांनी कौतुक केले. ते म्हणाले, पोलिसांनी माणुसकी जपून काम करणे गरजेचे आहे. राज्यात बऱ्याच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे, याचा अभिमान वाटतो, असे सांगून राज्यभरात चांगले काम करणाऱ्या पोलिसांची उदाहरणे दिली. तसेच ताडीवाला रोड व अन्य प्रतिबंधित क्षेत्राला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला असता पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संकलित करावी, जेणेकरुन महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने कॉफी टेबल बुक तयार करता येईल, असे ते म्हणाले. लॉक डाऊन कालावधीत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे सांगून यापुढेही अफवा पसरवून समाजात भय, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लॉकडाऊन कालावधीत शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थी, कामगार व मजूरांच्या स्थलांतरणासाठी केलेल्या कामाची व जनजागृती साठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणातून दिली.

यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन च्या अंमलबजावणीसाठी तसेच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या आवश्यक त्या सोयी सुविधा, स्थलांतरीत गरजूंना भोजनाचे व अन्नधान्याचे किट देणे, प्रवासाच्या परवानगीचे पासेस देणे, वाहनांची सुविधा देणे आदी विविध कामांची माहिती गृहमंत्री श्री.देशमुख यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी व उपायुक्त यांनी दिली.

३२३ रस्ते :भाजपचे निष्ठावंत ,नेते उज्वल केसकर कॉंग्रेस ,सेना ,राष्ट्रवादी च्या भूमिकेशी सहमत-उपमुख्यमंत्र्यांना दिले पत्र

२०१५ च्या अधिसूचनेने मध्यमवर्गीय पुणेकरांवर अन्याय

-पूर्वीप्रमाणे ६ मीटर रस्त्यांवर टीडीआर द्या

पुणे- कॉंग्रेस ,राष्ट्रवादी , शिवसेना आता हि मागणी करीत आहे ती बरोबर असली तरी यापूर्वीच आम्ही हि मागणी केलेली आहे . २०१५ साली कोणाचेही सरकार असू द्यात त्यांनी अधिसूचना काढल्याने पुण्यातील मध्यमवर्गीय असंघटित प्रामाणिक करदात्यांवर 2015 साली अन्याय सुरू झाला.असा सणसणीत टोला भाजपचे निष्ठावंत आणि अभ्यासू नेते ,महापालिकेतील माजी विरोधीपक्षनेते उज्वल केसकर यांनी लगावला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्कांकडे याबाबतचे पत्र दिले आहे . एकीकडे महापालिकेतील भाजपचे महापौर, उपमहापौर ,स्थायी समिती अध्यक्ष , सभागृहनेते अशा पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगलेले असताना स्थायी समितीत ३२३ रस्ते रुंदीकरणासाठी खिचातानणी सुरु असताना केस्कारांचे पत्र म्हणजे भाजपच्या विद्यमान नेत्यांना घरचा आहेर मानले जाणारे आहे.

या पत्रात खालील मुद्दे उज्वल केसकर यांनी उपस्थित केले आहेत .

 1) 2015  साली अचानक MR&TP Act  कलम 154 च्या द्वारे अधिसूचना काढून 6 मीटर रस्त्यावर TDR वापरण्यास बंदी घातली.

2) या कायद्याच्या कलमानुसार सरकारला निर्देश देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.परंतु नंतर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात याव्या असे नमूद आहे,तत्कालीन सरकारने ते केले नाही.

3) आम्ही सरकारला अनेक वेळा विनंती केली परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

4) मध्यंतरी अनेक बांधकाम व्यावसायिक आणि मनपा अधिकारी यांच्यात बैठक होऊन पुण्यातील रस्ते 9 मीटरचे करण्याबाबत एकमत झाले, आम्हाला ज्यावेळी हे कळले तेव्हा त्याला आम्ही विरोध केला. विरोधामुळे प्रस्ताव मागे पडला.

5) नवीन आयुक्त आल्यावर पुन्हा सगळे सक्रिय झाले,आणि हा प्रस्ताव MMC कलम 210 अनव्ये रस्ता रुंदीकरण करण्याचा मांडला गेला.

6) MMC Act कलम 210 यात प्रस्तावित रस्ते हे कुठल्या सर्व्हेअंती निवडले  का ? नागरिक किंवा लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक यांच्या मागणी वरून आखले आहेत. नागरिक व इतरानी रस्ते रुंद करायचे असेल तर मनपा कडे अर्ज करावा अशा प्रकारचे काही प्रगटन दिले होते का ?

जे प्लॉट non buildable किंवा ज्यांचा प्लॉट FSI पूर्ण क्षमतेने वापरले जाणार नाहीत त्यांची नुकसान भरपाईची काही कार्यपद्धती निश्चित केली नाही.

7) आज आपण सगळे रस्ते 9 मीटरचे करा असे म्हटले आहे,तशी बातमी वाचली. यामुळे संपूर्ण शहर non buildable होईल अशी भीती वाटते.

आमची विनंती आपण MR&TP Act कलम 154 चे निर्देश देऊन 6 मीटर रस्त्यावर 2015 प्रमाणे TDR वापरण्यास परवानगी द्यावी आणि पुनर्विकास योजनेत 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीच्या रहिवासी नागरिकांना 15 चौरस मीटर म्हणजे 180 चौरस फूट जादा क्षेत्र, FSI तुन वगळून द्यावे तरच पुनर्विकास करणे शक्य होईल.

मुंबईमध्ये 8 जूनपासून बेस्ट बसेस पुन्हा धावणार

0

मुंबई- बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलंय की, “8 जून 2020पासून बेस्टच्या बसगाड्यांमधून सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमानं घेतला आहे.

“या निर्णयानुसार, बसगाड्यांमधील डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांकरता असणाऱ्या प्रत्येक आसनावर केवळ एकच प्रवासी बसून प्रवास करू शकेल. तसंच केवळ 5 प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतील.”मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर जाहीर करण्यात आला तेव्हापासून बेस्ट सेवा बंद करण्यात आली होती.

सध्या बेस्ट बसेस या फक्त अत्यावश्यक सेवांसाठी सुरू आहेत. पण, सोमवारपासून आणखी काही क्षेत्रातील लोक प्रवास करू शकतील. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

बसमध्ये प्रवेश केल्यानंतर ऑफिसचं आयडीकार्ड कंडक्टरला दाखवावं लागेल. कंटेनमेंट झोन्स असलेल्या भागात बससेवा उपलब्ध नसेल.

प्रवास करणाऱ्यांना मास्क परिधान करणं बंधनकारक आहे. ड्रायव्हर-कंडक्टरकडे सॅनिटायझर असेल असं नमूद करण्यात आलं आहे.

तिरुपती मंदिर ८ जूनपासून पुन्हा सुरु होणार

0

आंध्र  प्रदेशात असणारे तिरुमला तिरुपती देवस्थान ८ जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे.तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाचे मुख्य तसेच या मंडळाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारपासून मंदिर भक्तांसाठी सुरु करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी शर्थींचे पालन करावे लागणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

तिरुमला तिरुपती मंदिरात दर्शनासाठी या आहेत अटी

२० मार्चपासून तिरुमला तिरुपती देवस्थान हे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता ८ जूनपासून प्रायोगित तत्त्वावर हे मंदिर सुरु करण्यात येत आहे.

रोज सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेतच भक्तांना दर्शन घेता येणार आहे. यावेळी ५०० भक्तांना सोडण्यात येईल

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रायोगित तत्त्वावरच दर्शनासाठी मंदिरात जाता येईल. ज्यांनी ८ आणि ९ जूनसाठी इंटरनेटवरुन दर्शनाची वेळ निश्चित केली आहे अशानांच फक्त या मंदिरात प्रवेश दिला जाईल

ज्या भाविकांना ८ आणि ९ जूनला दर्शन घ्यायचे आहे त्यांनी त्यांच्या दर्शन या ६ आणि ७ जून या दिवशी इंटरनेटवर नोंदवणे आवश्यक आहे

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुले यांनी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

१० जून पासून टाइम स्लॉट टोकन्स तिरुमला येथील भाविकांना वाटली जातील. एका तासात ५०० भाविक ही अट कायम असेल

११ जूनपासून ३०० रुपये मूल्य असलेली ३ हजार तिकिटं तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहेत. ऑनलाइन तिकिट बुकिंगचा कोटा ८ जूनपासून सुरु होईल

जे गावांमधून किंवा ग्रामीण भागांमधून तिरुपतीच्या दर्शनासाठी येत आहेत त्यांनाही तिकिटं ऑनलाइन बुक करता येणार आहेत. त्यांना स्वयंसेवक तिकिट कसं बुक करायचं याचं मार्गदर्शन करतील

३ हजार सर्व दर्शन तिकिटं तिरुपती येथील काऊंटरवरही उपलब्ध होणार आहेत

११ जूनपासून VIP दर्शनही सुरु करण्यात येणार आहे. त्याचेही बुकिंग आधी करणे आवश्यक

मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत

तिरुपती येथे कोविड १९ च्या रोज २०० चाचण्याही केल्या जाणार आहेत

सध्याच्या घडीला तीन दिवसांची विधी असलेला ज्येष्ठ अभिषेकम हा तिरुपती बालाजी मंदिरात सुरु करण्यात आला आहे असंही मंदिर समितीने स्पष्ट केलं

भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना दारूड्यांची धक्काबुक्की

पुणे-कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यास बसलेल्या युवकांना जाब विचारला म्हणून चौघाजणांनी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला. बाहेर काहीतरी झाल्याचे समजताच तेथेच राहावयास असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि काय झाले म्हणून विचारणा केली. तेव्हा या गुंडांनी त्यांना ही धक्काबुक्की केली. यामध्ये त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.माजी आमदार कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना दारूड्यांचा मोठा त्रास होत आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. आजच्या घटने संदर्भात पोलिसांना कळवल्यानंतरही ते लवकर आले नाहीत. दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पोलिस व्यस्त होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.६ : राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

 ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ९० (मुंबई ५८, ठाणे १०, उल्हासनगर ६, वसई विरार १, भिवंडी ३, मीरा-भाईंदर ५, पालघर १), नाशिक- ७ (नाशिक ५, मालेगाव २), पुणे- १७ (पुणे १०, सातारा ५, सोलापूर २), औरंगाबाद-२ (औरंगाबाद मनपा २), अकोला-४ (अकोला मनपा २, अमरावती २)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहेत. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये (५७.५ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३, ठाणे -९, उल्हासनगर -६, नवी मुंबई -६, सातारा- २,  वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१ , सोलापूर १असे मृत्यू आहेत.

323 रस्ते-तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अजीत पवारांची तंबी…

पुणे : ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून पालिकेच्या हद्दीतील ३२३ रस्ते सहा मीटर ऐवजी ९ मीटर करण्याचा निर्णय घेऊ नका. शहराच्या विकासाच्यादृष्टीने सर्व पक्षांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालिका आयुक्तांना दिले.बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशी तंबीही पवार यांनी यावेळी दिली.शहरातील ३२३ रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे टीडीआर वापरता येणार आऊन यातून पालिकेचे उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी विरोध केला असून हा याबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रमुख तीनही पक्षांनी हा प्रकार काही ठराविक बिल्डरांच्या हितासाठी घेतला जात असल्याचा आरोप केला होता. आबा बागुल, अरविंद शिंदे,अविनाश बागवे,या काँग्रेस नगरसेवकां सह शिवसेना, राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी या प्रस्तावाविरुद्ध आवाज उठविला होता.त्यापार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, यांनी पालकमंत्री पवार यांची शनिवारी सकाळी काऊन्सिल हॉल येथे भेट घेतली. पालिका आयुक्त शेखर गायकवाड हेही उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱयांनी ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून ठराविक भागातील रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव आणल्याचे सांगत विरोध दर्शविला. हा प्रस्ताव बांधकाम विभागाने आणला असून पथ विभागाने का नाही आणला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मध्यवस्तीतील वाडे, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. रस्ता रुंदीकरण झाल्याशिवाय टीडीआर वापरता येणार नाही अशी अट टाकण्याची मागणी सर्वांनी केली. यासोबतच सहा मीटर रस्त्यावर सरसकट टीडीआर वापरण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शहरातील अन्य रस्त्यांचेही टप्याटप्याने रुंदीकरणाचे प्रस्ताव आणणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यावेळी पालकमंत्री पवार यांनी पालिकेचे सत्ताधारी भाजपाचे बहुमत आहे. बहुमताच्या जोरावर कोणताही निर्णय घेऊ नका. करायचे तर सर्वच रस्ते सरसकट रुंद करा. मध्यवस्तीमधील रस्त्यांचा समावेश करून रुंदीकरणाबाबात धोरण तयार करण्याच्या सूचना केल्या.

दाउद इब्राहीमचा कोरोनामुळे मृत्यू ?

0

दाउदचा भाऊ आधीच म्हणाला, दाउद तर सोडा डी कंपनीच्या कुठल्याही सदस्याला कोरोना नाही

भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. अनेक भारतीय माध्यमांनी त्याचा मृत्यू झाला असे वृत्त देखील शनिवारी प्रसारित केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी काही माध्यमांनी दाउदला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त दिले. एवढेच नव्हे, तर त्याला कराची येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा केला. केवळ दाउद नव्हे, तर त्याच्या पत्नीला सुद्धा कोरोना झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आता मात्र चक्क दाउदचा मृत्यू झाला अशी चर्चा सुरू आहे. परंतु, दाउदला कोरोनाची लागण झाली किंवा त्याचा मृत्यू झाला यापैकी कुठल्याही वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही.

दाउदला कोरोना झाल्याचे वृत्त प्रसारित झाले त्याच दिवशी दाउदचा छोटा भाऊ अनीस इब्राहीमने त्याला कोरोनाची लागण झालीच नाही असे स्पष्ट केले. अनीसने हे देखील सांगितले होते की दाऊदची माणसं आता दुबई आणि पाकिस्तानात बिझनेस करत आहेत. दाउदचा भाऊ अनीसने वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली तरीही त्याचा ठाव-ठिकाणा अद्याप स्पष्ट झाला नाही. दाउद तर सोडाच डी कंपनीतील कुठल्याही सदस्याला अद्याप कोरोनाचे संक्रमण झालेले नाही असा दावा अनीसने केला होता. दाउद संदर्भात बातम्या प्रसारित करताना भारतातील स्थानिक आणि राष्ट्रीय माध्यम गुप्तचर यंत्रणांचा दाखला देत होते.मीडिया रिपोर्टनुसार, दाउद कराचीतच राहत असून पाकिस्तानी लष्कराचे गुप्तचर विभाग आणि आयएसआय त्याच्यावर नजर ठेवून आहेत.

1993 च्या बॉम्बस्फोटानंतर दाउद इब्राहीम मुंबई आणि देश सोडून पसार झाला. तेव्हापासूनच तो पाकिस्तानात राहत असून त्याला आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचे संरक्षण आहे. तो मुंबई बॉम्बस्फोटांसह भारतातील अनेक स्फोट आणि हिंसाचाराचा आरोपी आहे. परंतु, दाउद किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कुणीही पाकिस्तानात नाही असे वेळोवेळी पाकिस्तानच्या वतीने सांगितले जाते. दाउदच्या मुलीचा विवाह पाकिस्तानचा माजी क्रिकेटर जावेद मियादादचा मुलगा जुनैदशी झाला आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्णसंख्या झाली 4 हजार 203

पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 11 हजार 723 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 6 :-पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 203 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 231 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 115 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 637 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 77 आहे. कोरोनाबाधित एकूण 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 220 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 283 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 199, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 50, सांगली जिल्ह्यात 9, कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 618 कोरोना बाधीत रुग्ण असून 260 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 332 आहे. कोरोनाबाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 194 कोरोना बाधीत रुग्ण असून 586 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 507 आहे. कोरोना बाधित एकूण 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 137 रुग्ण असून 79 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 54 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 659 कोरोना बाधीत रुग्ण असून 419 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 233 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 98 हजार 394 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 94 हजार 343 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 51 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 82 हजार 461 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 11 हजार 723 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप : – दि. 6 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
0000