Home Blog Page 2552

भामा आसखेड जलवाहिनीचे कामकाज व प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेणार-जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध.भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी.शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्यासाठी प्रशासन तत्पर.खेड तहसीलदार कार्यालयाला भेट व कामकाजाचा आढावा

पुणेभामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. जलवाहिनीचे कामकाज, प्रकल्प ग्रस्तांना जमीन वाटप, जमीनीचा मोबदला वाटप आदी प्रश्नांबाबत स्थानिक परिस्थिती पाहून व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तसेच पुढील आठवड्यात पुन्हा प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. प्रकल्प ग्रस्तांना रोख रक्कम वाटप करताना गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आज भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तत्पूर्वी खेड तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक गजानन टोणपे, तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना जमीन व मोबदला मिळवून देण्यात गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. खेड तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांच्या जमीन वाटपा बाबतचे व रोख रक्कम वाटपाचे कामकाज खेड उपविभागीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल, असेही श्री. राम यांनी सांगितले.

यावेळी भामा आसखेड प्रकरणाचा आढावा घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे हित पाहून काम करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या मान्यतेनुसार जमीन वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना रक्कम वाटप करताना गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच भूमीहीन शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी 68 धरणग्रस्तांना जमिनीचे एकाच दिवसात वाटप केले, याबाबत जिल्हाधिकारी श्री राम यांना यावेळी प्रकल्प ग्रस्तांनी धन्यवाद दिले. यापुढेही प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर-

0

मुंबई- कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील चार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

सर ज. जी. कला महाविद्यालय-मुंबई, सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय-मुंबई, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-नागपूर आणि शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय-औरंगाबाद  अशी चार शासकीय कला महाविद्यालये कार्यरत आहेत.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.इ.) अधिनियम-1987 नुसार दृश्य कलेशी संबंधित अभ्यासक्रम तंत्र शिक्षण म्हणून घोषित करण्यात आले आहेत. कला महाविद्यालयांकरिता ए.आय.सी.टी.इ.कडून निकष व मानके विहित करण्यात आली आहेत. या निकष व मानकांनुसार शासकीय कला महाविद्यालयांकरिता शिक्षकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे आवश्यक होते. त्यामुळे या चार शासकीय महाविद्यालयांकरिता ए.आय.सी.टी.इ.कडून विहित करण्यात आलेले निकष, मानके तसेच, वेतनश्रेणीमध्ये, प्राचार्य, प्राध्यापक, सहायोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि अधिव्याख्याता या संवर्गातील 159 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कला महाविद्यालयांमध्ये जुन्या आकृतीबंधानुसार अध्यापकांची 135 पदे मंजूर आहेत. या पदांवर कार्यरत असलेले अध्यापक जसजसे निवृत्त होतील तसतशी ही पदे सुधारित आकृतीबंधानुसार भरण्यात येतील.

—–०—–

पर्यावरण विभाग आता पर्यावरण व वातावरणीय विभाग

पर्यावरण विभागाच्या नावात बदल करून ते आता पर्यावरण व वातावरणीय विभाग असे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

पर्यावरण विभागामध्ये वातावरणातील बदलांशी निगडीत कामे पार पाडण्यासाठी स्टेट नॉलेज मॅनेजमेंट सेंटर ऑन क्लायमेट चेंज हा कक्ष मदत करत असून हा विषय पर्यावरण विभागाचा अविभाज्य घटक आहे.  यातील कामाचा आवाका यापुढे वाढत जाणार असून जनमाणसांमध्येही जागरुकता वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आता. महाराष्ट्र शासनाने देखील 2011 मध्ये वातावरणातल्या बदलांवर कृती आराखडा अहवाल तयार केला असून केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाने 2014 मध्ये यास मान्यता दिली आहे.

—–०—–

कौटुंबिक न्यायालयांना पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी मंजुरी

राज्यातील वैवाहिक व कौटुंबिक वादाची प्रकरणे निकाली काढण्याकरिता कौटुंबिक न्यायालयांची असलेली आवश्यकता विचारात घेता लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद व परभणी येथे स्थापन करण्यात आलेल्या कौटुंबिक न्यायालयांना ज्या दिनांकास ती सुरू झाली आहेत तेथून पुढे 5 वर्षाच्या कालावाधीसाठी  मंजूरी  देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या कौटुंबिक न्यायालयांकरिता पुढील 5 वर्षांकरीता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चाकरिता 33 कोटी 60 लाख 66 हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच 14 व्या वित्त आयोगांतर्गत “तांत्रिक मनुष्यबळ सहाय्य या घटकाखालील बाह्य यंत्रणेच्या  पदांना नियुक्तीच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी मंजूरी देण्यात आली.

तांत्रिक मनुष्यबळ सहाय्यासाठी पुढील 5 वर्षाकरिता येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती  खर्चाकरिता एकूण 58 कोटी 86 लाख 7 हजार या खर्चास मंजूरी देण्यात आली.

लातूर, उस्मानाबाद, जालना येथील कौटुंबिक न्यायालये कार्यान्वित झालेली आहेत.

—–०—–

ऊर्जा विभागाच्या शासकीय कंपन्यांना कर्ज उभारणीसाठी शासन हमी

महानिर्मिती, महापारेषण, महावितरण व एमएसईबी सूत्रधारी कंपन्याद्धारे निधी उपलब्ध करण्याची गरज असून त्यासाठी एनटीपीसी, पीएफसी किंवा राष्ट्रीयकृत बँका आणि वित्तीय संस्था यांच्याशी करण्यात येणाऱ्या विविध करारास शासन हमी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्य शासनातर्फे कमाल 20 हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योग आणि वाणिज्यिक उपक्रम बंद आहेत.  सर्वसामान्य जनता देखील घरी असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांकडून विजेचा जास्त वापर होऊन औद्योगिक ग्राहकांची विजेची मागणी कमी झाली आहे.  महाराष्ट्रातील विजेची सरासरी रोजची मागणी 23 हजार मेगावॅटवरुन 16 हजार मेगावॅट इतकी कमी झाली आहे. सबसीडाईज्ड क्षेत्रातील कृषी व घरगुती ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे महावितरण कंपनीसमोर रोकड सुलभतेचा प्रश्न उभा राहिला आहे. लॉकडाऊननंतर औद्योगिक प्रक्रिया सुरु होऊन सुस्थितीत येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागेल अशी अपेक्षा आहे.  राष्ट्रीयकृत बँका व इतर वित्तीय संस्थांकडून मध्यम मुदतीचे कर्ज घेतल्यास शासन हमीची गरज भासणार आहे.

सदर हमी करिता शासनाकडून आकारण्यात येणारे हमी शुल्क माफ करण्याचाही निर्णय  घेण्यात आला.

—–०—–

मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्रासाठी ताज ग्रुपला भाडेपट्टयाने जमीन

वेंगुर्ला तालुक्यातील मौ. शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे.इंडियन हॉटेल्स कंपनीला 54.40 हेक्टर जमीन 90 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भूसंपादित केलेली जमीन दीर्घ भाडेपट्टयाने इंडियन हॉटेल्स कंपनीला देण्यात येईल.

पर्यटन हा एक प्रमुख सेवा उद्योग असून राज्याच्या आर्थिक विकासाच्या वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.   

पुणे म.न.पा च्या अनागोंदी कारभाराला लगाम घाला.

राष्ट्रवादीचे नितीन कदम यांचे गृहमंत्र्यांना साकडे

पुणे -जीवघेण्या कोरोनाचे निमित्त साधून अव्वाच्या सव्वा दराने होणारी वैद्यकीय साहित्य खरेदी असो किंवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची साफसफाई, मोजक्या बिल्डर्ससाठी कागदोपत्री आणि नियमबाह्य रस्ते रुंदीच्या नावाखाली टीडीआरचा प्रस्ताव यासह अनेक प्रकरणात पुणेकरांच्या हिताऐवजी स्वहित जोपासण्याचा कारभार करणाऱ्या पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला आता राज्यसरकारने चौकशी करून लगाम घालावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष नितीन कदम, प्रदीप देशमुख, भोलासिंग अरोरा, विजयबापू डाकले व मृणाल ववले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे भेटीवर आलेल्या गृहमंत्री देशमुख यांची भेट घेऊन नितीन कदम यांनी भाजपच्या अनागोंदी कारभाराचा लेखाजोखाच मांडला. जलपर्णी, बीआरटी , नाल्यांची साफसफाई यासह अनेक प्रकरणात सत्ताधारी भाजपने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे .

आता तर कोरोनाच्या नावाखाली वैद्यकीय साहित्य खरेदीतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही नितीन कदम यांनी केला आहे.प्रतिबंधित क्षेत्रात अन्नधान्य किटही नागरिकांना मिळाल्या नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असून ज्यांना किट मिळाले, त्यातील अन्नधान्याच्या वस्तू गायब असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. स्थायी समितीमध्ये दर आठवड्याला बेकायदेशी ठराव बहुमताच्या जोरावर मान्य केले जात आहेत.सत्तेवर आल्यापासून भाजपचा कारभार हा पुणेकरांच्या हिताचा नाही.
मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करणाऱ्या पुण्यातील सत्ताधारी भाजपला आता राज्यसरकारने लगाम घालण्याची गरज आहे ,त्याचबरोबर कोणताही प्रस्ताव जो पुणेकरांच्या हिताचा नाही तो तत्परतेने आणणाऱ्या पालिका प्रशासनालाही खडेबोल सुनावण्याची वेळ आली आहे, याकडेही नितीन कदम यांनी लक्ष वेधले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करा – विभागीय महसूल आयुक्त-राजाराम माने

0

धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आणखी सतर्क होत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी मोहीम राबवावी. नागरिकांना मास्क वापरणे सक्तीचे करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, श्री भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (भूसंपादन) आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री. माने म्हणाले, धुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने आणखी दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. कंटेन्मेन्ट झोनमधील जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तातडीने उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. विविध विभागांकडून मागविण्यात येणारी माहिती तत्काळ अपलोड करीत अद्ययावत करावी. तसेच केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार कोरोना विषाणूबाधित रुग्णांबाबत कार्यवाही करावी. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, असेही त्यांनी निर्देश दिले.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असतानाही काही नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात आणि सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रांत जाऊन तपासणी करुन घ्यावी, असेही आवाहन आयुक्त श्री. माने यांनी केले.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे २७५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला असून १२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात फिवर क्लिनीक सुरू करण्यात आली आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासाचे २० हजार ३०१ ई- पास अर्ज मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या माध्यमातून ११ हजार ४०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यात प्रामुख्याने परराज्यात जाणाऱ्या श्रमिकांचा समावेश होता. जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून रोज सरासरी १५५० थाळींचा लाभ देण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी कोरोना बाधित रुग्णांवर करावयाचा औषधोपचार याविषयी, तर वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांनी कोरोना बाधितांच्या मृत्यूची कारणे याविषयी माहिती दिली.

कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना

0

मुंबई-राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना  प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक  रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.

सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:

१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे

१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.  
४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी औषधी

१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे      
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी औषधी

१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक औषधी

१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.  

२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ  आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी  डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )

कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी

१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.  
४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

होमिओपॅथिक औषधी

१.कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील.

रस्ते रुंदीकरणाचा विषय चंद्रकांतदादा पाटील यांच्या जाहीरनाम्यातला – खर्डेकरांचे स्पष्टीकरण

पुणे -शहरातील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंदीचे करणे हा विषय कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या जाहीरनाम्यतला असून तो त्यांनी महापालिकेतील स्थायी समिती द्वारे मान्य करून घेतला आहे असे स्पष्ट करत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी चंद्राकांतदादा पाटील व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचे अभिनंदन केले आहे.

ते म्हणाले शहरातील विकासाला चालना देण्यासाठी ६ मीटर रुंदीचे सर्वच रस्ते ९ मीटर रुंद होणार आहेत. या प्रस्तावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली. या निर्णयामुळे कोथरूडसह शहरातील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार आहे.६ मीटर रस्त्यावर टी.डी.आर मिळत नव्हता त्यामुळे अनेक जुन्या जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासात अडथळे येत होते.त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता.६ मीटर चे रस्ते ९ मीटर होणार असल्याने अनेक अडचणी दूर होतील व जुन्या इमारतीतील रहिवाश्यांना अधिक मोठे व लिफ्ट,पार्किंग आदी सुविधा असलेल्या नव्या इमारतीत राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते याची पूर्तता केल्याबद्दल खर्डेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पुणे विभागात 206 शिवभोजन केंद्रामध्ये 21 हजार 616 गरजूंना लाभ -डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- पुणे विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्रे असून सर्व सुरु असून 21 हजार 766 गरजूंनी लाभ घेतला आहे.
पुणे विभागामध्ये स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून 4 हजार 438 दुकाने सुरू आहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे माहे जून 2020 साठी मोफत तांदळाचे मंजूर नियतन 62 हजार 26.36 मे टन असून आज अखेर त्यापैकी 1 हजार 309 मे टन (2.11%) धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आलेले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना माहे जून महिन्याचे नियमित मंजूर 66 हजार 574.22 मे टन असून आज अखेर 58 हजार 42 .43 मे टन (87.18%) धान्याची उचल झालेली आहे. त्यापैकी नियमित धान्य वितरण 9.65 % आहे. या अंतर्गत एकूण 11.96 लाख कुटुंबातील लाभार्थ्यांना 6 हजार 426 मे टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आलेले आहे.

       जिवनावश्यक वस्तुंचा तसेच औषधांचा तुटवडा नाही. जिवनावश्यक वस्तु व औषधे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.   

6 मीटरचे सर्वच रस्ते ९ मीटर रुंद करण्याचा विषय बहुमताने मंजूर,काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचा विरोध(व्हिडीओ)

पुणे-भाजपने अतिशय प्रतिष्ठेचा केलेला 323 रस्ते रुंद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.9) स्थायी समितिच्या बैठकीत, ३२३ ऐवजी सर्वच 6 मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंद करण्याच्या उपसूचने सहबहुमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेने घुमजाव करत अचानक विरोध केला. 10 विरुद्ध 6 असे मतदान झाले.करायचे तर सर्वच रस्ते ९ मीटर करा अशी मागणी करत ३२३ रस्तेच का? असा सवाल करत हा प्रस्ताव काही बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठी आणण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता.त्यांच्या मागणीनुसार स्थायी समितीत हा प्रस्ताव ८ दिवस पुढे ढकलून आज आयत्यावेळी त्यांच्या मागणी नुसार उपसूचना हि देण्यात आली .मात्र यावरही आक्षेप घेत महाविकास आघाडीने यास विरोध केला शहरात एकूण 2000 रस्ते 6 ते साडेसात मीटर रुंदीचे आहे हे शहरातील सर्व 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबत हरकती – सूचना मागविण्याच्या उपसूचनेसह हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.हा प्रस्ताव मंजूर झाल्याने शहरातील विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला. तर, ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतर्फे करण्यात आला होतासर्वच सहा मीटर रस्ते 9 मीटर रुंद करावेत 6 मीटर रस्त्याच्या कडेला असलेल्या मिळकतींना टीडीआर आणि प्रीमियम एफएसआय वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही विरोधी पक्षांनी महापालिका आयुक्त आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होतीशहरातील 6 मीटर रस्त्यांची रुंदी वाढवा. ठराविकच रस्त्यांची रुंदी वाढविल्यास राज्य शासन हस्तक्षेप करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला होता. अध्यक्ष हेमंत रासने यांनी बैठकीत उपसुचनेसह प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे आता शहरातील विकास झपाट्याने होणार असल्याचा विश्वास भाजपला आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 3 हजार 184-डॉ म्हैसेकर

पुणे विभागातील 7 हजार 896 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 12 हजार 662 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे:-पुणे विभागातील 7 हजार 896 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 हजार 662 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 171 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 595 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 248 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.36 टक्के आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 9 हजार 851 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 6 हजार 235 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 184 आहे. कोरोनाबाधित एकूण 432 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 238 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.29 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण  244 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 200, सातारा जिल्ह्यात 18, सोलापूर जिल्ह्यात 8, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर  जिल्ह्यात 7 अशी रुग्ण  संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 649 कोरोना बाधीत रुग्ण असून 368  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण संख्या  253 आहे. कोरोनाबाधित एकूण 28  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 1303 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 457  आहे. कोरोना बाधित एकूण  121 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील 172 कोरोना बाधीत  रुग्ण असून 96 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 70  आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 687 कोरोना बाधीत रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.    ॲक्टीव रुग्ण संख्या 207 आहे. कोरोना बाधित एकूण  8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 3 हजार 442 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी  99 हजार 848 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 594 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 86 हजार 985 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 12 हजार 662 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     

(टिप : – दि. 9 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा.पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना ‘लालपरी’ ने दिली सुविधा

0
१५२ लाख कि.मी. ची धाव,  १०४ कोटी रुपयांचा खर्च अन् ५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास

मुंबई -कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यात आपल्या घरी परत जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एस.टी.च्या लालपरीची मोठी सुविधा उपलब्ध झाली. परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना घेऊन रेल्वेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यादेखील  राज्याच्या चोहोबाजूला असलेल्या विविध राज्यांच्या सीमेपर्यंत धावल्या. ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरित नागरिकांना रेल्वे स्थानक आणि त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यासाठी  ३१ मे पर्यंत या एस.टी बसगाड्यांनी तब्बल १५२.४२ लाख कि.मी चा प्रवास केला.महाराष्ट्रातून परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना सुखरूप परतता यावे यासाठी महाराष्ट्र  राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या.एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवले, त्यासाठी राज्य शासनाने  १०.८९ कोटी रुपयांचा खर्च केला.औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा एस.टी. महामंडळाच्या सहा प्रदेशातून  नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली.२ लाखाहून अधिक लोकांना रेल्वेस्टेशनवर पोहोचवलेउत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचलप्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्याचे काम एस.टी महामंडळाच्या बसेसने केले.  २ लाख २८ हजार १०० नागरिकांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला.

३ लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडले
गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंत धावून एस.टीने त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या जवळ नेऊन पोहोचवले, या सुविधेचा तब्बल  ३ लाख  ०९ हजार ४९३ नागरिकांनी  लाभ घेतला.
‘या’ जिल्ह्यांमधून उपलब्ध झाल्या बसेस
औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून एस.टी. बसगाड्या  उपलब्ध करून देण्यात आल्या.

रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावणार – राजेंद्र निंबाळकर

पुणे शहरातील रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.

‘एसआरए’चे रखडलेले प्रकल्प व इतर प्रश्नांबाबत निंबाळकर यांना निवेदन दिल्यावर त्यांनी लगेचच चर्चेसाठी बोलाविले. प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद देत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व स्लम फ्री स्मार्ट सिटी बाबतच्या आशा पल्लवित केल्या, असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.

जे प्रकल्प रखडले आहेत अश्यांचा गेले 2/3 दिवस आढावा घेतला जात असून प्रकल्प कोणत्या कारणाने रखडले व त्यातील अडचणी काय आहेत याबाबत संबंधित विकसकाशी चर्चा करत आहोत. ‘एसआरए’ची स्थापना झाल्यापासून 15 वर्षात एकूण 284 प्रस्ताव दाखल झाले.

यातील झोपडीधारकांची संख्या 93 हजार आहे. यातील 219 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्याद्वारे तब्बल 70 हजार झोपडीधारकांचे पुनर्वसन शक्य होऊ शकेल. मात्र, विविध कारणाने 45 योजनांची छाननी सुरू असून हे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत, असेही निंबाळकर यावेळी म्हणाले.

पुणे महापालिकेच्या मालकीच्या जागेवर 23 झोपडपट्टया असून सुमारे 50 एकर क्षेत्रात त्या वसलेल्या आहेत. यात सुमारे 50 हजार नागरिक वास्तव्य करतात.

पुणे मनपाने या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव दाखल केल्यास किमान 70 % झोपडीधारकांची पुनर्वसन प्रकल्पास संमती असावी, अशी अट शिथिल करून योजनेला मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुधारित नियमावलीला सुद्धा लवकरच मान्यता मिळेल आणि सर्व पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना 9 महिने मुदतवाढ देण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अनेक विकसकांनी मनपाच्या ट्रांझिट कॅंप मधील रहिवाश्यांचे भाडे भरले नसून ही थकबाकी वसूल करावी, अशी आग्रही मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली.

ज्या ट्रांझिट कॅंपमधे सोसायटी रजिस्टर झाली आहे तेथे देखभाल खर्च दिला जात नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे याकडेही खर्डेकर यांनी लक्ष वेधले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लागणे हे स्मार्ट सिटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून आपण सातत्याने याचा पाठपुरावा करणार असल्याचे खर्डेकर यांनी सांगितले.

नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

0

अमरावती : भारतीय कपास निगमकडून (सीसीआय) दर्यापूर तालुक्यात येवदा येथील श्री साई ॲग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस हमीभाव केंद्रावर कापूस खरेदीचा शुभारंभ पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. नियोजनानुसार कापूस खरेदी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्रीमती ठाकूर यांनी दिले.

दर्यापूर तालुक्यात सीसीआयचे केंद्र सुरु करण्याची मागणी आमदार बळवंतराव वानखडे यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी निगमचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार अग्रवाल यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार तत्काळ केंद्र सुरु करण्याबाबत अकोला शाखा कार्यालयाला आदेशही प्राप्त झाले व ही सगळी प्रक्रिया एका आठवड्याच्या आत पूर्ण होऊन दर्यापूर तालुक्यात कापूस खरेदीलाही सुरुवात झाली.

आमदार बळवंतराव वानखडे, दर्यापूर कृउबासचे सभापती बाबाराव पाटील बरबट, उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह निगमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी बांधवांची संख्या मोठी आहे. कोरोना संकटकाळात कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. त्यामुळे कापूस खरेदीला गती येण्यासाठी, तसेच कुणीही पात्र शेतकरी बांधव हमीभाव मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नवे केंद्र उघडण्यासह पुनर्नोंदणीचाही निर्णय घेतला. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकरी बांधवांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या नऊवर पोहोचली असून, खरेदीला गती मिळणार आहे.

याच अनुषंगाने खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या १८ वरून २५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रशासनाने १० कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहीत केल्या. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. शेतकरी बांधवांच्या हितासाठी केवळ जिल्हा प्रशासनच नव्हे, तर मंडळे, महामंडळे, बाजार समित्या, पणन महासंघ, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अडचणी दूर करून त्यांच्या कामाला वेग आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

शासनाकडून सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी कोरोनाविरुद्धची आपली लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, कामाचा वेगही कमी होता कामा नये. दिवसभरात केंद्रावर येणाऱ्या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी व नियोजनानुसार खरेदी पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

खरेदी केंद्रावरील सुरक्षिततेकडेही कटाक्षाने लक्ष द्यावे. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कुठल्याही अडचणी आल्या तर  तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कुठल्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

केंद्रावर कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांचा यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापूर्वी जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे होती. त्यातील एक धामणगाव रेल्वे येथे सीसीएचे होते. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. आता येवदा येथे सीसीआयचे केंद्र सुरु झाल्याने  खरेदी प्रक्रियेला अधिक गती येणार आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देणार – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

0

अलिबाग, जिल्ह्यातील ३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे  अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, वीजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर वीजेचे खांब पडल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला असून या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व कोरोना संदर्भातील उपाययोजनासंबंधी  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र,) सर्जेराव मस्के पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर.एस.मोरे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग माकीलाल तपासे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ.बी.के.आर्ले, मत्स्य व्यवसाय अधिकारी अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.

यावेळी  मदत व पुनर्वसन राज्यमंत्री श्री. तनपुरे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त नुकसान वीजेच्या खांबांचे  झाले आहे.  त्यामुळे ज्या ठिकाणी वीजेचे खांब पडले आहेत तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करुन वीजपुरवठा पूर्ववत करावा.  तसेच दोन ते तीन दिवसात पूर्ण एसटी लाईनचे काम पूर्ण करावे.  या कामासाठी बाहेरुन जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक मजूर लावायचे असतील तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल, त्यासाठी  निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत. जेणेकरुन काम करताना कुठली कमतरता पडू नये. परंतु एकदंरित परिस्थिती पाहता सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ आहे.

कोरोनामुळे बाहेरचे मजूर यायला घाबरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, नागरिकांनी एकजूटीने या सर्व परिस्थितीचा सामना केला पाहिजे, असे  सांगून श्री. तनपुरे पुढे म्हणाले, ज्या व्यक्तींच्या घरांची पडझड झाली आहे, झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.

राज्यात आज कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.८: राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के एवढा असून आज १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १०९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ६ जण ४० वर्षांखालील आहे. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये ( ७२.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३१६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३२ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू  ३ मे ते ५ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५१, औरंगाबाद -८, रत्नागिरी -३, धुळे – ४, अहमदनगर -१, भिवंडी -१, जळगाव – १, जालना -१, कल्याण डोंबिवली -१, नाशिक – १, पुणे -१, सोलापूर १, ठाणे -१, उल्हासनगर -१आणि वसई विरार १ असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (५०,०८५), बरे झालेले रुग्ण- (२२,०३२), मृत्यू- (१७०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,३४५)

ठाणे: बाधित रुग्ण- (१३,५२८), बरे झालेले रुग्ण- (५०८१), मृत्यू- (३३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८११०)

पालघर: बाधित रुग्ण- (१५६७), बरे झालेले रुग्ण- (६०८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१८)

रायगड: बाधित रुग्ण- (१४६१), बरे झालेले रुग्ण- (८०५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९९)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५९२), बरे झालेले रुग्ण- (१०२७), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१०८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

धुळे: बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८)

जळगाव: बाधित रुग्ण- (१०८१), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८)

पुणे: बाधित रुग्ण- (९८७७), बरे झालेले रुग्ण- (५७४३), मृत्यू- (४१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७२१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४१९), बरे झालेले रुग्ण- (६२०), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

सातारा:  बाधित रुग्ण- (६४०), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६४८), बरे झालेले रुग्ण- (३९४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४६)

सांगली: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११३), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (३७१), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०३६), बरे झालेले रुग्ण- (१२३१), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०५)

जालना: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०)

परभणी: बाधित रुग्ण- (७८), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१३८), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

बीड: बाधित रुग्ण- (५६), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (११०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२)

अकोला: बाधित रुग्ण- (८३४), बरे झालेले रुग्ण- (४४३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५४)

अमरावती: बाधित रुग्ण- (२९९), बरे झालेले रुग्ण- (१७३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१६३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (७६१), बरे झालेले रुग्ण- (४६६), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८४)

वर्धा: बाधित रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४२), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४४), बरे झालेले रुग्ण- (३१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

एकूण: बाधित रुग्ण-(८८,५२८), बरे झालेले रुग्ण- (४०,९७५), मृत्यू- (३१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(४४,३७४)

(टीप- आयसीएमआर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १५० रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.  ही माहिती केंद्र सरकारच्या आयसीएमआर पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३५१० झोन क्रियाशील असून आज एकूण १७,८९५ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६६.८४  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी भारावला!

0

मुंबई दि.८- कुठलाही सण असो, समारंभ असो पोलीस मात्र नेहमीच रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा वाढदिवस जर पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुखाच्या उपस्थितीत साजरा झाला तर? किवळे फाटा येथे कर्तव्य बजावणारे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांना हे भाग्य लाभलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाल्याने श्री. जाधव भारावले.

गृहमंत्री अनिल देशमुख  काल पुणे येथे दौऱ्यावर होते. आज सकाळी पुण्यावरुन मुंबईला येताना एक्सप्रेस हायवेवर थोडा वेळ थांबून त्यांनी किवळे फाटा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. पोलिसांना मिळणाऱ्या सोयीसुविधा, अडीअडचणींबाबत चर्चा केली. या चर्चे दरम्यान त्यांना समजले की बंदोबस्तासाठी असलेले पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस असूनही  कुटुंबापासून दूर आपले कर्तव्य  बजावणाऱ्या श्रीकांत जाधव यांचे गृहमंत्र्यांना कौतुक वाटले.  केवळ कौतुकच नव्हे तर  राज्याचा गृहमंत्री पण पोलीस विभागाचा कुटुंब प्रमुख या नात्याने गृहमंत्री श्री. देशमुख पोलीस उपनिरीक्षकाच्या आनंदात सामील झाले.त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.  त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले.

दस्तुरखुद गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला वाढदिवस साजरा होत आहे. हे पाहून श्री. जाधव व तेथील उपस्थित सर्व पोलीसअधिकारी,कर्मचारी आनंदले. अशा प्रकारे साजरा केलेला हा वाढदिवस श्री. जाधव यांच्या कायम स्मरणात राहील.