Home Blog Page 2543

कोरोनावर माहिती न देता ,संसर्गाचे कारण देत पालिकेची मुख्यसभा तहकूब (व्हिडीओ)

0

पुणे -शहरातील कोरोनाचे थैमान, नागरिकांच्या समस्या सोडविताना नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी ,प्रशासनाला हवे असलेले सहकार्य ,आणि प्रशासनाच्या मर्यादा यावर कोणत्याही प्रकरची माहिती न देता ,चर्चा न करता ,आज कोरोनाच्या संसर्गाचेच कारण देऊन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दोन महिने सभा होऊ शकलेली नसताना तिसऱ्या महिन्यातील सभा आज बहुमताच्या आधारावर तहकूब केली .

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/257413229009015/

महापौर मुरलीधर मोहोळ यांसह, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी सभागृहात येण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ केले तसेच स्क्रीनिंग करून मनपात दाखल झाले. सभागृहात प्रत्येक नगरसेवक करिता सोशल डिस्टंन्सिंग ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी शहराच्या सद्यस्थितीवर प्रशासन कशाप्रकरे काम करत आहे, यावर चर्चा झाली पाहिजे. अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आली. मात्र महापौरांनी आपण मोठ्यासंख्येने एकत्र जमलो आहोत, कोरोना संसर्गाच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सांगत चर्चा करण्यास नकार दिला.सोशल डिस्टंसिंग पालन करून झालेल्या सभेत महाविकास आघाडीने गेल्या तीन महिन्यात कोरोनावर झालेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, खूप वेळ नगरसेवकांनी एकत्र बसायला नको, या सबबीखाली सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. त्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला. विरोधी पक्षांनी कोरोनाच तारतम्य ठेवायला हवं, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना लगावला.

सुरु झालेला पावसाळा,त्या अनुषंगाने घरपडी,पूर अशा निर्माण होऊ शकणार्या आपत्ती , पुणे महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाने म्हणजे भाजपने 6 मीटर रुंदीचे सर्वच रस्ते ९ मीटर रुंद करून त्यावर टीडीआर देण्याचा बहुमताने संमत केलेला प्रस्ताव आणि त्याला राज्य सरकारने दिलेली स्थगिती ,महापालिकेतील कंत्राटी कामगारांची आर्थिक बिघडलेली अवस्था या सर्वांवर मुख्य सभेत भाजप सह सर्वच नगरसेवकांना विविध प्रश्न सतावित असताना अशा कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही . सभागृह नेते धीरज घाटे यांनी मान्यवरांच्या निधनानिमित त्यांना श्रद्धांजली वाहून हि सभा तहकूब करावी असा प्रस्ताव दिला पण त्यास विशाल तांबे , अरविंद शिंदे, अविनाश बागवे आदींनी अगोदर गरजेच्या अत्यावश्यक प्रश्नांवर चर्चा होऊ द्यात अशी मागणी करत तहकुबीला विरोध केला यावेळी नगरसचिव सुनील पारखी यांनी मतदान घेऊन  भाजपच्या सदस्य संख्येच्या  बहुमताने सभा तहकूब केली 

“जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील”-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन

मुंबई, : राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. माँसाहेबांच्या ज्या विचारांनी शिवाजी महाराजांना घडवलं, हजारो मावळ्यांना प्रेरणा दिली, त्याच विचारांवर महाराष्ट्र आजपर्यंत घडला, यापुढेही घडत राहील. जिजाऊ माँसाहेबांचं विचार, संस्कार आपल्याला नेहमीच बळ, प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. 

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक वंदन करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, गेली साडेतीनशे वर्षे हा महाराष्ट्र जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांवरच घडत आला आहे. माँसाहेबांनी महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवला. राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा दिली. कुठल्याही संकटावर मात करण्याचं बळ दिलं. शेती, शिक्षण, सहकार, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात आपला महाराष्ट्र आज आघाडीवर दिसतो, याचं मूळ जिजाऊ माँसाहेबांनी रुजवलेल्या स्वाभिमानाच्या विचारात, राष्ट्रासाठी त्याग करण्याच्या दिलेल्या संस्कारात आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी मोठ्या शौर्यानं, ध्येयानं, संयमानं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांचे तेच गुण प्रत्येक आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला बळ देतील, मार्ग दाखवतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

0

मुंबई,: भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सीमांचे रक्षण आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांच्या सर्वोच्च त्यागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्रीअजित पवार म्हणाले की, देशाची एकता आणि अखंडतेसाठी सर्व भारतीय एकजूट असून आपल्या वीर सैनिकांच्या शौर्याबद्दल, क्षमतेबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र आणि संपूर्ण देश सीमेवर लढत असलेल्या सैनिकांचा पाठीशी सर्वशक्तीनिशी भक्कमपणे उभा आहे.

‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप- पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण

0

 आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!

 आरोग्य सुविधा,गुंतवणूक,शिक्षण याविषयीमुख्यमंत्र्यांनीदिली माहिती

मुंबई, : आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे. महाराष्ट्राने ‘मिशन बिगिन अगेन’ मधून कशी  झेप घेतली आहे ते सांगायचे आहे असे ठामपणे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पावधीतच  राज्याने उचललेल्या पावलांविषयी प्रभावी सादरीकरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसेच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे अशा काही मागण्याही केल्या. 

            गेल्या दोन-अडीच महिन्यात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. एकीकडे हा लढा सुरु असतांना आम्ही मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

            व्हिडीओ कॉन्फरन्सच्या प्रारंभी पंतप्रधानांनी लडाख येथील घटनेची  माहिती दिली. व त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे स्तब्धता पळून श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सीमेबाहेरील संकटाचाही  पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली समर्थपणे मुकाबला करू असा विश्वास व्यक्त केला.  

उद्योगांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात

वैश्विक महामारी कोरोनाचे संकट सुरु असतांना देखील आम्ही नुकतेच १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार १२ मोठ्या कंपन्यांसमवेत केले. यामुळे १४ हजार लोकांना रोजगारही मिळणार आहे. या उद्योगांत चीन, अमेरीका, दक्षिण कोरिया, सिंगापूर, अशा देशांचा समावेश आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.  

‘चेस दि व्हायरस’ला प्राधान्य

  यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत राज्यभर सुमारे ३ लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत. यावेळी त्यांनी आज लोकार्पण झालेल्या बीकेसी मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालयाची तसेच नेसको येथील कोविड रुग्णालयाची छायाचित्रेही पंतप्रधानांना दाखवली. 

 ‘चेस दि व्हायरस’ ला संपूर्ण प्राधान्य दिले असून चाचण्या करणे आणि व्यक्तींचे संपर्क शोधणे वाढविले आहे अशी माहिती दिली. यामुळे धारावीसारख्या भागातही आम्ही संक्रमण रोखल्याचे ते म्हणाले.

व्हेंटिलेटर्सची गरज

राज्याकडे पीपीई किट्स, एन ९५ मास्कची उपलब्धता आहे मात्र विशेषत: ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्सची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले.

उपचार पद्धतीना मान्यता मिळावी

कोरोनाशी मुकाबला करतांना निश्चित उपचार नाहीत मात्र विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी . उपचारांबाबत इतर देशांच्या आपण मागे नसून बरोबर आहोत असे दिसते असेही मुख्यमंत्री म्हणाले. उपचारांमुळे ९० वर्षांची अनेक रोग असलेली वृद्ध महिलाही एकीकडे बरी होते आहे तर दुसरीकडे लहान मुलेही बरे होत आहेत.

परीक्षांच्या बाबतीत निर्णय व्हावा

 लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नाही आहोत.  अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी  राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुणनिश्चिती करण्याचा फॉर्म्युला तयार करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा रीतीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी देखील असेल अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राने व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा जेणे करून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल. 

 अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व नोकरदारांसाठी आम्ही मुंबईतून लोकल सुरु करण्याची मागणी करीत होतो. ती मागणी आपण पूर्ण केली त्यासाठी धन्यवाद मानून मुख्यमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने कालावधी वाढवून मिळावा यामुळे रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल.  

आरोग्य सुविधांमध्ये वाढ

पूर्वी:-सुरुवातीला फक्त ३ आयसोलेशन रुग्णालय, १ चाचणी प्रयोगशाळा , ३५० बेड्सची सुविधा होती. 

आज :-

· आज ९७ प्रयोगशाळा आहेत. 

· २८२ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स 

· ४३४ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर्स

· १६३१  डेडिकेटेड कोविड सेन्टर्स

एकूण सर्व ३६ जिल्ह्यांत मिळून २३४७ कोविडसाठी सुविधा उभारल्या आहेत

बेड्सची उपलब्धता :

· आयसोलेशन बेड्स : २ लाख ८१ हजार २९० 

· ऑक्सिजन बेड्स : ३७ हजार ८४५ 

· आयसीयू बेड्स : ७ हजार ९८२ 

याशिवाय १५४३ क्वारांटाईन सुविधांमध्ये ८० हजार बेड्‍स

इतर उपकरणे :

· व्हेंटिलेटर : ३०२८ 

· पीपीई : ५ लाख ६३ हजार ४६८    

· मास्क : १० लाख ७७ हजार ३१३  

जम्बो विलगीकरण सुविधा

· नेहरू सायन्स सेंटर,  रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर येथे विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था.

· पुणे येथे विप्रो ५००  बेड्सचे कोविड रुग्णालय कार्यान्वित 

· मुंबई येथील सेंट जोर्जेस रुग्णालय २०० खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय म्हणून घोषित 

· एमएमआरडीए येथे फेज दोन मध्ये १००० बेड्सचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल सुरु 

·ठाणे येथे कोविड रुग्णालय सुरु 

परप्रांतीय मजूर निवारा व्यवस्था

गेल्या ७५  दिवसांपासून महाराष्ट्राने परराज्यातील ५.५ लाख मजुरांची, कामगारांची व्यवस्था केली. राज्यात आजघडीला निवारा केंद्रांमध्ये आश्रयाला कुणीही नाही. 

सुमारे १७ लाख परप्रांतीय कामगारांना रेल्वे,एसटीने पाठविले

· ३१ मे २०२० पर्यंत ४४ हजार १०६ बस फेऱ्या. ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरितांना राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वेस्टेशन्सपर्यंत नेले. 

·परराज्यातील १२ लाख ३ हजार १३९ मजूर, कामगारांना ८३४  रेल्वेद्वारे सोडण्यात आले आहे. या मजुरांच्या तिकिटांसाठी 97.69 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले. आता रेल्वे सोडण्याची कुठलीही मागणी सध्या नाही. 

‘वंदे भारत’अभियान : परदेशातील भारतीयांना परत आणणे

आजपर्यंत परदेशातून आलेल्या एकूण फ्लाईट ७८ . एकूण आलेले प्रवासी : १२ हजार ९७४ 

१ जुलैपर्यंत एकूण फ्लाईट येणार ८०

आतापर्यंत या देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत:

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगानिस्तान, ओमान, दक्षिणअफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशिस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विड, इथोपिया, रोम जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो 

अन्नधान्य पुरवठा

· जून २०२० मध्ये आत्तापर्यंत नियमित योजनेत अन्नधान्य  वितरण – १४ लाख ८० हजार ८४२ क्विंटल

· प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून जून २०२० मध्ये आत्तापर्यंत अन्नधान्य –  ४ लाख ६ हजार ७६२ क्विंटल तांदूळ व २९ हजार ९५६ क्विंटल डाळ

·  एपीएल केशरीकार्डधारकांना जून २०२० मध्ये वितरण – १ लाख ४६ हजार २७० क्विंटल

· प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जून महिन्यामध्ये आत्तापर्यंत ९९ लाख ८० हजार लोकांना ५ किलो प्रमाणे तांदूळ वाटप

· पोर्टेबिलिटीची सुविधा प्राप्त करून जून महिन्यामध्ये अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकांची संख्या १ लाख ७४ हजार ०६१

· आत्मनिर्भर भारत योजनेत कार्ड धारक नसलेल्या मजुरांना प्रति लाभार्थी ५ किलो अन्नधान्य आत्तापर्यंत जवळपास २ लाख ७७ हजार लोकांनी फायदा

· शिवभोजनथाळी – ८४४ केंद्रे. जून महिन्यात आजपर्यंत सुमारे १ लाखथाळ्या

· १ ते १५ जून  या काळात १४ लाख २५ हजार ३८७ शिवभोजन थाळ्यांचे वाटप. 

·       केवळ एप्रिल आणि मे महिन्यात मिळून सुमारे ६० लाख शिवभोजन थाळ्या वाटप 

अर्थव्यवस्था पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात उद्योग- व्यवसाय सुरु

उद्योग सुरु :

· ६०  हजार लहान मोठे उद्योग सुरु झाले असून १५ लाख लोक कामांवर येत आहेत 

रोहयो :

· रोजगार हमी योजनेची  ४८ हजार २५० कामे सुरू. त्यावर ५ लाख १४ हजार ५२६ मजूर 

४ लाख ७० हजार ८६४ इतकी कामे शेल्फवर.

चक्रीवादळग्रस्तांना आणखी वाढीव मदत देणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

कोकणासह राज्यातील आपदग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या व्हिडिओ कॉन्फरन्सला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खा. सुनील तटकरे, खा.विनायक राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कोकण विभागीय आयुक्त लोकेशचंद्र व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते सर्व केले जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. या कालावधीत प्रशासनानेही चांगले काम केले आहे. खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ व योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम चालू ठेवावे. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीचा शासन निर्णय आजच निर्गमित करुन वाटप तात्काळ सुरु करण्यात येईल.

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाने दिलेली मदत ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकट कितीही गंभीर असले तरी सरकार जनतेसोबतच आहे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचविण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

आजपर्यंत कोकणवासियांना कमी मदत मिळत गेलेली आहे. परंतु आता निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नुकसानग्रस्तांना आणखी वाढीव निधी आजच वितरित करण्यात येईल. हा निधी योग्य त्या नुकसानग्रस्तांना मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.

एमआयडीसीचा राज्यातील उद्योगांना दिलासा; विविध शुल्क आकारणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महांडळाद्वारे आकारण्यात येत असलेल्या विविध शुल्क आकारणीस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोरोना संकटात सापडलेल्या उद्योगांना दिलासा मिळणार आहे.

एमआयडीसी सेवा देत असलेल्या उद्योगांक़डून प्रिमियम रक्कम, हस्तांतर शुल्क, अतिरिक्त प्रिमियम, पोटभाडे शुल्क आकारले जाते. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि उद्योगांना हे शुल्क भरणे शक्य झाले नाही. अशा उद्योगांना ही रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्यांना रक्कम भरणे शक्य झाले नाही, त्यांच्याकडून विलंब शुल्क वसूल केले जाणार नाही.

याशिवाय ज्या भूखंडाचा विकास कालावधी, वाढीव विकास कालावधी लॉकडाऊनच्या कालावधीत संपलेला आहे, अशांनादेखील सवलत मिळणार आहे. यासंबधीचा कालावधी वाढविण्याचा अधिकार संबधित प्रादेशिक अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटातून उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी या निर्णय़ाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

राज्यात जून महिन्यात आतापर्यंत १६ लाख ३३ हजार ६६४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप – मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

0

२७ लाख ६८ हजार ७०० क्विंटल अन्नधान्याचेही वाटप

मुंबई, : राज्यातील 52 हजार 438 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 16 जूनपर्यंत राज्यातील 81 लाख 27 हजार 869 शिधापत्रिका धारकांना 27 लाख 68 हजार 700 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 16 लाख 33 हजार 664 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

राज्यात ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने’अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 438 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 11 लाख 2 हजार 725 क्विंटल गहू, 8 लाख 49 हजार 809 क्विंटल तांदूळ, तर 11 हजार 639 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 2 लाख 13 हजार 54 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि.1 जूनपासून एकूण 25 लाख 18 हजार 653 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 1 कोटी 8 लाख 55 हजार 394 लोकसंख्येला 5 लाख 59 हजार 480 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.   

राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील  उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून २०२० मध्ये आतापर्यंत २ लाख २८ हजार ५० क्विंटल वाटप केले आहे.

‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’त प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत तूर किंवा चणा डाळ देण्याची योजना  आहे. या योजनेतून सुमारे १ लाख ३९ हजार ६०९ क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.  

‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेच्या अन्नधान्य लाभ मे व जून २०२० या २ महिन्यासाठी असून त्या अंतर्गत ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने’मध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ दिला जात आहे आतापर्यंत २८ हजार ६४० क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

राज्यात १ जून ते  १६ जूनपर्यंत ८४६ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे १६ लाख ३३ हजार ६६४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत ७४ लाख १७ हजार ४४१ शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत. राज्यात काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा!

0

मुंबई,:राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी  इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे,  अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी दिली आहे.

नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पद्धतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्यांची सर्व माहिती मिळवणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता अद्ययावत करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.

उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने नोंदणीस आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे, असे श्रीमती कुबल यांनी स्पष्ट केले आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

0
पंढरपूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरदेखील बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदीर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन
• संकेतस्थळ- http://www.vitthalrukminimandir.org
• गुगल प्ले स्टोअरवरील ॲप- shreevitthalrukmnilive Darshan
• जिओ टीव्ही- जिओ दर्शन
• टाटा स्काय- ॲक्टिव्ह चॅनेल
वरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार भाविकांना पाहता येणार आहे.
१ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.

सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलल्या- सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

0

मुंबई,- राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सध्याच्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दि. 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी दि. 30 जून, 2020 पर्यत वाढवला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका घेणे उचित होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी मा. उच्च अथवा मा.सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेशित केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात येत असल्याचेही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी संगितले.

मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

0

मुंबई : मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करण्याच्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून उचित कार्यवाही करण्यात यावी तसेच मराठा अक्करमाशी, साळू मराठा, वायंदेशी मराठा यांची कुणबी असल्याबाबतची न्याय्‍य बाजू राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडली जावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी केली. 

या विषयासंदर्भात आज विधानभवन मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  बैठकीस इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव, जे.पी.गुप्ता, विधी व न्याय विभागाचे सचिव आणि विधानमंडळ सचिवालयाचे प्रभारी सचिव, राजेंद्र भागवत, सहसचिव नि.वी.जीवणे, यो.ही.अमेटा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील कुणबी समाजाचे योग्य प्रकारे सर्वेक्षण व्हावे, राज्याच्या सर्व विभागातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग समाजात समावेश व्हावा.  राज्याच्या एका विभागात कुणबी समाजातील काही घटक खुल्या प्रवर्गात आहेत  तर दुसऱ्या विभागात आरक्षित विभागात येतात, ही तफावत समतोल दृष्टीकोन स्वीकारुन तातडीने दूर होणे आवश्यक आहे, अशी सूचना अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी यावेळी केली.

पुण्याच्या कॉंग्रेस भवनात चीनी जीनपिंगच्या प्रतिमेचे दहन (व्हिडीओ)

0

पुणे- भारतीय २० जवान शहीद झाल्यानंतर आज पुण्याच्या कॉंग्रेस भवनात चीनच्या प्रमुख जीन पिंग च्या प्रतिमेचे दहन करून चीन च्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .शहर कॉंग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गट नेते अरविंद शिंदे माजी आमदार मोहन जोशी ,नगरसेवक अविनाश बागवे,रवींद्र  धंगेकर माजी नगरसेवक अभय छाजेड , संजय बालगुडे ,कमल व्यवहारे ,लता राजगुरू ,मेहबूब नदाफ , सचिन आडेकर,विठ्ठल गायकवाड ,रोहित अवचिते आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शने केली . 

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 4 हजार 259

0

पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 16 हजार 469 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे दि. 17 :- पुणे विभागातील 10 हजार 455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 हजार 469  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 5 हजार 269आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.48 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.52 टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 12  हजार 919  बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 8  हजार 125  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 535 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 264 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.89 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.14 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत  पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 576 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 530, सातारा जिल्ह्यात 21, सोलापूर जिल्ह्यात 24, कोल्हापूर  जिल्ह्यात 1 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील 766 कोरोना बाधीत रुग्ण असून 560 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.        ॲक्टीव रुग्ण 171 संख्या  आहे. कोरोनाबाधित एकूण  35  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 1 हजार 811 कोरोना बाधीत रुग्ण असून 996 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 655 आहे. कोरोना बाधित एकूण  160 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 247 रुग्ण असून 130 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण 110 संख्या  आहे. कोरोना बाधित एकूण 7  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत 726 रुग्ण असून 644 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.   ॲक्टीव रुग्ण संख्या 74 आहे. कोरोना बाधित एकूण 8  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 24 हजार 612 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1  लाख 20 हजार 314  नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4  हजार 297 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1  लाख 3 हजार 585 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 16 हजार 469  नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     

( टिप :- दि. 17 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना

0

पुणे, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या आढावा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
कोरोना विषाणू प्रार्दुभाव निर्मूलन आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, आदिवासी संसोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा नाईक आदि उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोविड-19 च्या अनुषंगाने रुग्णांवर उपचार करीत असलेल्या रुग्णालयांचे लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच काही खाजगी रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर वाढीव दर आकारणी करीत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबी गंभीर असून कायद्याचे उल्लघंन करण्याऱ्या आहेत. रुग्णांवर उपचाराअंती देण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकांची तपासणी करण्यासाठी पाच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबरोबरच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत कोवीड-19 च्या अनुषंगाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. 21 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षित करणे. त्याचबरोबर रुग्णालयातील उपलब्ध असलेले बेडस्, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, खाजगी रुग्णालयात आरक्षित असलेले विलगीकरण कक्ष तसेच रुग्णालयात रुग्णांवर उपचार केल्यानंतर देण्यात येणाऱ्या खर्चाबाबतचा आढावाही घेण्यात आला.

कोरोना : स्वत:हून तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारण्याचा निर्णय –आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई,: खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी २२०० रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी २५०० रुपये आकारायचे असा निर्णय झाला. मात्र काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून २८०० रुपये आकारले जातात. वास्तविक रुग्ण स्वत:हून आल्यावर प्रयोगशाळेला पीपीई कीटचा तसेच वाहतुकीचा खर्च येत नाही अशा वेळी त्यांच्याकडून २८०० रुपयांऐवजी २५०० रुपये आकारावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी २२०० आणि २८०० यामधला टप्पा म्हणून २५०० रुपये राज्य शासनाने ठरवून दिले आहे.

मुंबईकरांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णवाहिकांची उपलब्धतात असेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या ५०० रुग्णवाहिका उपलब्ध असून ५० रुग्णवाहिका महिंद्रा समुहाकडून मिळाल्या आहेत तर आठवडाभरात १५० रुग्णवाहिका उपलब्ध होतील त्यामुळे मुंबईत ६५० रुग्णवाहिकांची सेवा मिळणार आहे. नागरिकांनी वॉर्डमधील वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवावी, ही सेवा नागरिकांना विनामुल्य मिळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत आयसीयुचे ५०० बेडस् उपलब्ध होणार आहेत. त्यात आठवडाभरत अजून १०० ते १५० बेडस् ची भर पडणार आहे. सेंट जॉर्जेस, बीकेसी, सेव्हन हिल, वरळी डोम, येथे बेडस् वाढविण्यात येत आहेत. कांदीवलीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात २५० बेडस् वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांच्या ऐवजी जे गंभीर आजारी आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात प्राधान्याने दाखल करून घेण्याविषयी सांगण्यात येत आहे. यासाठी ८० टक्के खाटा घेतलेल्या रुग्णालयांमध्ये एक अधिकारी नेमला जाईल तिथे मदतीसाठी कक्ष उभारला जाईल. लक्षणे नसलेल्या रुग्णांना थेट दाखल न करता गरजूंना दाखल करण्याविषयी हे अधिकारी समन्वय करतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.