Home Blog Page 2529

सेलेब्रिटींना वाढीव वीज बिलाचे झटके

0

सामान्य जनताच नव्हे तर छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक कलाकारांना अव्वाच्या सवा दराने वीज बिल येत आहे. तापसी पन्नू, रेणुका शहाणे, सौम्या टंडन, नेहा धुपिया, दिनो मोरिया आणि पुलकित सम्राट या सेलेब्रिटींनी वाढीव वीज बिलाची झळ बसली आहे. त्यांनी आपला संताप सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

  • रेणुका शहाणे यांच्या घराचे वीज बिल 18 हजार रुपये

रेणुका शहाणे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अचानक बिलामध्ये इतकी वाढ कशी झाली असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यांनी लिहिले की, . ‘मे महिन्यात माझे लाईट बिल 5510 रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच 29,700 रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल 18080 रुपये दाखवले आहे. पण माझे बिल 5510 रुपयांवरुन 18080 रुपये कसे झाले?’ असे त्यांनी प्रश्न विचारला आहे.

डिनो मोरिया म्हणाला, बिल पाहून धक्का बसला.

  • तापसीच्या घरी आले एकुण 36 हजारांचे वीज बिल 

अभिनेत्री तापसी पन्नूला तब्बल 36 हजारांचे वीज बिल आहे. रविवारी आपल्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, ”लॉकडाऊनचे तीन महिने आणि कोणती नवी उपकरणं मी वापरली आहेत किंवा नव्याने विकत आणली आहेत ज्यामुळे मला इतकं वीजबिल आलं आहे. नेमकं कोणत्या वीजेचं शुल्क आकारत आहात?” 

तापसीने आपल्या ट्विटमध्ये आधीच्या महिन्यांच्या वीज बिलाचे फोटोही जोडले आहेत. एप्रिल महिन्यात तापसीला 4390 तर मे महिन्यात 3850 रुपये बिल आले होते. इतकंच नाही तर तापसीने आपण राहत नसलेल्या घरासाठीही भरमसाट वीज बिल आले असल्याचे सांगितले आहे.

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

0

मुंबई दि.२९- सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या  वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व ते कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते  त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज  डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक  वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा .

केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू  नका  असेही आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल

0

तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश

मुंबई दि. २९ : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे.

महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्राचे नियमन करण्यासाठी विद्युत अधिनियम, 2003 अंतर्गत स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, राज्यातील वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांवर आकारावयाचे वीज दर नियम कांलातराने निश्चित करते. वीजेच्या वाढलेल्या देयकाविषयी ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचे दिसून आल्यानंतर आयोगाने वीज कंपन्यांच्या विशेषत: जून, 2020 महिन्याच्या देयक आकारणी पद्धतीचा आढावा घेतला.

1 एप्रिल 2020 पासून सुधारित वीज दर कमी करण्यात आले आहेत. हे दर मागील वर्षाच्या तुलनेत लाक्षणिकरित्या कमी आहेत. या सुधारणेनंतर महाराष्ट्रातील सर्व निवासी ग्राहकांसह सर्व वर्गवारींसाठीच्या वीज दरात घट झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सुधारित वीज दर निर्गमित झाल्यानंतर, एप्रिल महिन्यानंतरच्या वीज वापरासाठी महिन्यामध्ये आकारण्यात आलेल्या देयकांसाठी इंधन समायोजन आकार (एफएसी) लावण्यात आलेले नाहीत. तसेच यापुढेही इंधन समायोजन आकार लागू नये याची उपाययोजना करण्यात आली आहे.

वीज दराचा आदेश कोविड 19 च्या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान निर्गमित झाल्यामुळे, वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे शक्य होण्यासाठी आणि ग्राहकांना काहीसा दिलासा देण्यासाठी आयोगाने काही बाबतीत वीज कंपन्यांना परवानगी दिली. उदा. मीटरमधील नोंदी घेण्यासाठी ग्राहकांच्या इमारती/घरी न जाता मार्च ते मे या लॉकडाउनच्या कालावधी दरम्यान (ॲटोमॅटिक मीटर रिडिंगची सुविधा जेथे उपलब्ध आहे त्यांना वगळून) सरासरी वीज वापराच्या आधारावर वीज देयके आकारावीत.

लॉकडाउनच्या निर्बंधातील शिथिलतेनंतर, ज्या कालावधीसाठी निर्धारित तत्त्वावर देयक आकारले होते त्याचे समायोजन करुन, प्रत्यक्ष मीटरमधील नोंदीच्या आधारावर देयक देण्यास वीज कंपन्यानी सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्ष वीज वापराबरोबर सरासरी देयकाच्या समायोजनामुळे जून महिन्याचे वाढलेले देयक पाहून ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात  आयोगाने दि. 27 जून, 2020 रोजी सर्व चार वितरण परवानाधारकांच्या प्रमुखांची बैठक घेतली.  त्यात स्पष्ट झाले की, लॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान, देयके मार्च 2020 च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्यावेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळ्यातील असून यावेळी वीज वापर सामान्यतः जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक आले, जे जूनमध्ये देण्यात आले आहे.

वीजेच्या देयक आकारणीत पारदर्शकता आणखी वाढवावी तसेच तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा उभारावी असे निर्देश आयोगाने दिले. गाऱ्हाणी प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद द्यावा;  मीटरमधील नोंदी, लागू असलेला वीज दर, वीज दराच्या टप्प्यातील लाभ आणि मागील वर्षीच्या संबंधित महिन्याशी तुलना यानुसार ग्राहकांना त्यांच्या देयकातील वापरलेल्या युनिट्सच्या अचूकतेची स्वयं-तपासणी करण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर देण्यात यावे; जेथे वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या दुप्पट आहे, अशा ग्राहकांना 3 हप्त्यात देयकाचा भरणा करण्याचा पर्याय देण्यात यावा. देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये करण्याचा पर्याय देण्यासह, देयकासंबंधातील ग्राहकाच्या गाऱ्हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असे आयोगाने निर्देश दिले. जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

आयोग वीज देयकांच्या प्रश्नाबाबत लक्ष ठेवत असून कोणत्याही ग्राहकाची वितरण कंपनीकडून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे आश्वस्त केले आहे.

राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू

0

राज्यभरात कोरोनाच्या सुमारे साडेनऊ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री

मुंबई, दि.२९: राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ नमुने पॉझिटिव्ह (१८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार  ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ७८ मृत्यू हे मुंबई मनपा-२१, ठाणे-२, ठाणे मनपा-२, नवी मुंबई मनपा -१, भिवंडी निजामपूर मनपा-१, मीरा भाईंदर मनपा -४, मालेगाव मनपा-१, जळगाव-१,जळगाव मनपा-२, पुणे-१, पुणे मनपा-२०, पिंपरी चिंचवड मनपा -२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-६, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-६, उस्मानाबाद-१, अमरावती मनपा-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (७६,७६५), बरे झालेले रुग्ण- (४३,५४५), मृत्यू- (४४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,७४९)

ठाणे: बाधित रुग्ण- (३६,००२), बरे झालेले रुग्ण- (१४,६५६), मृत्यू- (८७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,४७४)

पालघर: बाधित रुग्ण- (५५७८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८५६)

रायगड: बाधित रुग्ण- (३९८०), बरे झालेले रुग्ण- (२००३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८०)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५७०), बरे झालेले रुग्ण- (४२४), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१८), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

पुणे: बाधित रुग्ण- (२१,३०३), बरे झालेले रुग्ण- (१०,९४३), मृत्यू- (७४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६२०)

सातारा:  बाधित रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

सांगली: बाधित रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४१), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६३४), बरे झालेले रुग्ण- (१४४४), मृत्यू- (२५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३३)

नाशिक: बाधित रुग्ण- (४१११), बरे झालेले रुग्ण- (२१६६), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४२३), बरे झालेले रुग्ण- (२५८), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१)

जळगाव: बाधित रुग्ण- (३३०१), बरे झालेले रुग्ण- (१८४५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (७०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

धुळे: बाधित रुग्ण- (१०३२), बरे झालेले रुग्ण- (४९६), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५१०७), बरे झालेले रुग्ण- (२२९६), मृत्यू- (२३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७२)

जालना: बाधित रुग्ण- (५३५), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८८)

बीड: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

लातूर: बाधित रुग्ण- (३२०), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

परभणी: बाधित रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२६६), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

नांदेड: बाधित रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)

अकोला: बाधित रुग्ण- (१५०९), बरे झालेले रुग्ण- (९२५), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१०)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२२८), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१४४८), बरे झालेले रुग्ण- (११०१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३२)

वर्धा: बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५)

भंडारा: बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (८६), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६४), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

एकूण: बाधित रुग्ण-(१,६९,८८३), बरे झालेले रुग्ण- (८८,९६०), मृत्यू- (७६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टिव्ह रुग्ण-(७३,२९८)

 (टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १८१ मृत्यूंपैकी ७८ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १०३ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ७१, ठाणे आणि जिल्हांतर्गत मनपामधील १६, जळगाव -५, पुणे -३, सोलापूर -३, औरंगाबाद -३ आणि अमरावती -२ यांचा समावेश आहे. हे १०३ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 9 हजार 296

0

पुणे विभागातील 15 हजार 606 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 25 हजार 949 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 29 :- पुणे विभागातील 15 हजार 606 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 25 हजार 949 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 296 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 524 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 4.3 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 21 हजार 237 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 12 हजार 410 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 106 आहे. कोरोनाबाधित एकूण 721 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 423 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.44 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.40 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 822 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 660, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 96, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 11 रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 255 आहे. कोरोनाबाधित एकूण 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 530 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 555 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 714 आहे. कोरोना बाधित एकूण 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 340 रुग्ण असून 215 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 113 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 831 कोरोना बाधीत रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 108 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 69 हजार 532 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 67 हजार 492 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 30 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 41 हजार 226 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 25 हजार 949 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 29 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी समन्वयाने काम करा- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

पुणे,दि.29 : कोरोनाविरुध्दची लढाई आपल्याला बरीच काळ लढाई लढावी लागणार आहे. या संकटकाळात प्रशासन चांगले काम करीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम केल्यास या विषाणूवर नक्की मात करु, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना साथरोग नियंत्रण विभागीय आढावा बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पिंपरी-चिंचवडचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुणे शहर पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, ससूनचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, यांच्या सह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री थोरात म्हणाले, शासनाने लॉकडॉऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरही कोरोनाचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला कोरोनासोबत जगण्याबरोबरच मोठी लढाई लढावी लागणार आहे. मान्सूनच्या काळात वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता योग्य ते नियोजन करुन रुग्ण संख्या कमी करण्याबरोबरच मृत्यूदराचा आलेख शून्यावर आण्यासाठी सर्वांना मिळून समन्वयाने काम करावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे आणि शारिरीक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो.
मालेगाव शहरात कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घ्या. याचा उपयोग पुणे शहराबरोबरच विभागात इतरत्र परिस्थिती निहाय उपयोगी पडेल का ? याबाबत माहिती घ्या. तसेच सामूहिक संसर्ग होणार नाही याकडे विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागात कोरोना विषाणूची भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कोवीड आणि नॉन कोविड रुग्णासाठी पुणे शहराबरोबरच विभागात करण्यात येणाऱ्या खर्चाची माहिती, प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशाचे पालन होत आहे किंवा कसे ? विभागातील चाचण्याची सद्यस्थिती व नियोजन, उपलब्ध असलेले बेड्स, रुग्णवाहिका, कोराना प्रतिबंधात्मक करण्यात येणाऱ्या उपायोजना याबाबत महसूल मंत्री थोरात यांनी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा बाबतची माहिती दिली. पुणे, पिंपरी चिंचवड व सोलापूर महानगरपालिकेने प्रत्येकी एक लाख अँटीजन टेस्ट कीटची मागणी केली असून लवकरच कीट्स प्राप्त होणार आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येते.

चिनी लष्कराशी संबंध असलेल्या कंपनीकडून पीएमकेअर फंडाला ७ कोटी; थोरातांचा प्रश्न (व्हिडीओ)

0

पुणे: चिनी लष्कराशी संबंधित असलेल्या हुवाई या चिनी कंपनीकडून पीएम केअर फंडाला सात कोटी रुपयांचा निधी आला आहे, असा आरोप करतानाच हा निधी कसा आला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चीनशी काय साटंलोटं आहे? याचा खुलासा भाजपने करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.  
बाळासाहेब थोरात यांनी ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला सात सवालही केले आहेत. हुवाई या चिनी कंपनीचे चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीशी संबंध आहे. ही कंपनी वादग्रस्त आहे. या कंपनीने पीएम केअर फंडाला सात कोटी रुपये दिले आहेत. टिकटॉक या चिनी कंपनीने ३० कोटी, पेटीएमने १०० कोटी, शाओमीने १५ कोटी, ओप्पोने १ कोटी रुपयांचा निधी पीएम केअर फंड किंवा पंतप्रधान निधीला दिला आहे. या कंपन्यांनी पीएम फंडाला निधी दिला का? तो कसा दिला? आदी प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व निधीचा हिशोब भाजपने लोकांसमोर मांडला पाहिजेत आणि चिनी कंपन्यांकडून निधी का स्वीकारला गेला याचा खुलासाही झाला पाहिजे, असं थोरात म्हणाले.

चीनच्या लष्कराशी संबंध असलेल्या हुवाई या चिनी कंपनीकडून निधी स्वीकारलाच कसा जातो? असा सवाल करतानाच चीनशी मोदींचं नेमकं साटंलोटं काय आहे? असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान नॅशनल रिलिफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडाला वळवल्या का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. जोपर्यंत चीनबाबत पंतप्रधान बोलत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना प्रश्न विचारत राहू, असंही ते म्हणाले. दरम्यान, राजीव गांधी फाऊंडेशनच्या निधीवरून भाजपने काँग्रेसला दहा प्रश्न केले होते. त्यानंतरच लगेचच काँग्रेसने चिनी कंपन्यांच्या निधीवरून भाजपला सात प्रश्न विचारल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे भाजप थोरात यांच्या प्रश्नाला काय उत्तर देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे ७ सवाल

– हुवाई या चिनी कंपनीकडून पीएम केअर फंडाला ७ कोटी रुपये आले का?

– हुवाई कंपनीचे पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहेत का?
– शाओमी या चिनी कंपनीने याच फंडात १५ कोटी दिले का?

– पेटीएमने पीएम केअर फंडात १०० कोटी दिले का?

– टिकटॉक कंपनीने पीएम केअर फंडात ३० कोटी दिले का?

– ओप्पो कंपनीने पीएम केअरमध्ये १ कोटी दिलेत का?

– मोदींनी पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडातील देणग्या पीएम केअर फंडात वळवल्या का?

– २०१३मध्ये चीनने सीमेवर कुरापती केल्यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या कंपन्यांकडून निधी का घेतला?

जगातल्या सर्वांत मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायलचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

0
मुंबई, दि. २९: कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि इर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख तसेच संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो  तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात  पण इथे प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत. रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. १० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावार विचार व्हावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय पथक येऊन गेले तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच हे पथक परत येऊन गेले आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, प्लाझ्मा थेरपीचा अभिनव प्रयोग आपल्या राज्यात  होतोय ही अभिनंदनीय बाब आहे. गेले साडेतीन महिने सर्वच जण अहोरात्र मेहनत करून काम करतोय. मात्र अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. कोरोनाच्या रुग्णांना उपचारात मदत ठरणाऱ्या प्लाझ्मा दानाबाबत लोकांना आवाहन करावे, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरविणार-  आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात २३ वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा होणार आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जातात. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे, जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जात आहेत.

ज्या १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे. हा संकलित केलेला प्लाझ्मा वैद्यकीय महाविद्यालयात पुरविला जाईल. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्विता दर हा ९० टक्के आहे. त्यामुळे आता जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांनी अन्य रुग्णांसाठी प्लाझ्मा देण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. पालकमंत्री तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्लाझ्मा डोनेशनबाबत प्रयत्न करावेत असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

जगातली सर्वांत मोठी ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनामुक्त झालेले रुग्ण आता संकटमोचक म्हणून प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जगातली सर्वांत मोठी ट्रायल थेरपी केंद्र राज्याच्या उपराजधानीत सुरू केले आहे. प्लाझ्मा थेरपी यशस्वी करण्यासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करावी. कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. जगातील सर्वात विक्रमी प्रणाली महाराष्ट्रात सुरू करून राज्याने जगासमोर आदर्श निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे प्लाझ्मा थेरपी यशस्वी – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावत असून कोल्हापूर येथे रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कोरोनामुक्त झालेल्या आणि प्लाझ्मा दान केलेल्या डॉ. विकास मैंदाळ यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी  सूत्रसंचालन केले.

 प्लाझ्मा थेरपीविषयी…

महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे.

महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था

सीसीसीमधील रुग्ण जे बरे होऊन चालले आहेत तिथे १० दिवसानंतर २८ दिवसाच्या आत प्लाझ्मा दान केले पाहिजे.

डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररित्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते.

कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर्सनी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठीक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील  रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.

जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरियाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.

हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषधोपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा  रुग्ण निवडला जातो.

एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण  http://www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.

अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि. 29: अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2020 या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2020 ची माहिती असलेल्या पत्रकाचे प्रकाशन करुन व चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक प्रताप सिंग चव्हाण, व्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तंत्र अधिकारी प्रमादे सावंत, कृषि सहायक राजपुत सी.एस. आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2020 मृग बहराकरीता फळपिकांना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 5 जून 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या योजनेचा उद्देश नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणे हे आहे. तसेच ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महवेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही, ही योजनेची प्रमुख वैशिष्टये आहेत. विमा हप्त्याचा दर शेतकऱ्यांना फळ पिकनिहाय प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के आहे.

विमा कंपनीचे नाव बजाज एलाएन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी, पुणे असे असून टोल फ्री क्र. 18002005858, दुरध्वनी क्र.0206602666 , ई-मेल आय डी prmod.patil01@bajajallaianz.co.in हा आहे. पिक विम्याच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषिअधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमास कृषि व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित हो

कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि. 29: जिल्हयात कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांच्या अध्यक्षतेखाली खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांच्या डॉक्टरांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. साखर आयुक्त सौरभ राव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खासगी आणि शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करुन त्यांना मानसिक आधार देवून वैद्यकीय सेवेविषयी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. तसेच ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोविडची तपासणी करण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी कोवीडच्या रुग्णांना भरती करण्यासाठी आदेश द्यावेत. शासकीय व खासगी प्रयोगशाळांमध्ये मोठया प्रमाणात कोविड-19 नमुने तपासणीसाठी येत असतात त्या नमुना तपासणीचा अहवाल वेळेत प्राप्त करुन द्यावेत. सर्वांनी प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. तसेच प्रयोगशाळांसाठी पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक असणाऱ्या मशिनरी, साहित्य कमी पडत असल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. आपणास आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्याकरीता प्रशासन सहकार्य करेल, असेही श्री. राम यांनी सांगितले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या नमुना तपासणीबाबतची माहिती जाणून घेतली.
साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत आणि काही अडीअडचणीबाबत तात्काळ जिल्हा प्रशासनास माहिती सादर करावी.
यावेळी खासगी आणि शासकीय रुग्णालय व प्रयोगशाळांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
००००

सोलापुरात ९३ वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

0

वेळेत तपासणी आणि त्वरित उपचाराचा झाला फायदा

सोलापुरातील मुळेगाव (साईनगर) येथील ९३ वर्षांच्या आजी जबरदस्त इच्छाशक्ती, वेळेत तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने कोरोनामुक्त झाल्या आहेत.

घरात कमावतं कोणी नाही, एक मुलगा त्याचेही वय 63 च्या वर. दुसरी मुलगी कर्णबधीर. अशा परिस्थितीत ९३ वर्षांच्या आजींचा भाऊ सारीच्या आजाराने मयत झाला. आजीचा संपर्क भावाशी आला होता, यातूनच आजीला कोरोनाची बाधा झाली होती.

भाऊ मृत झाल्याचे तालुका प्रशासनाला समजल्यानंतर पारधी वस्तीवर वेळेत उपाययोजना केल्या. आजींचा स्वॅब १३ जूनला घेण्यात आला, त्या काळात आजीला टाकळी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात त्यांना सकस आहार देण्यात आला. संघर्ष करण्याची सवय, रोगप्रतिकारशक्ती आणि जगण्याची इच्छाशक्ती यामुळे आजी घाबरल्या नाहीत. त्यांनी दाखविलेले धैर्य सर्वांना अनुकरणीय आहे.

आजीबाईंच्या इच्छाशक्तीमुळे आजाराने गंभीर स्वरूप धारण केले नाही. सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आजींना ठेवण्यात आले होते. या ठिकाणी वेळेवर दोनवेळा चहा, भरपेट जेवण दिले जात होते. रोज डॉक्टर तपासणी आणि रूग्णांची विचारपूस करून जात होते. डॉक्टरांनी दिलेला आधार यामुळेच रूग्णांचा निम्मा आजार हद्दपार होत आहे. आजीबाई कोरोनाला धीराने तोंड देत होत्या. १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर शनिवारी (२७ जूनला) आजीबाई कोरोनामुक्त होऊन घरी आल्या आहेत. मला पहिल्यापेक्षा आता अधिक चांगले वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.

दुपारी आयुर्वेदिक काढा आणि काही औषधे दिली जात होती, यामुळे मला आजारी असल्याचे जाणवलेच नाही. दोन वेळा जेवण करून निवांत झोप घेत होते. घरातल्यापेक्षा चांगली सोय झाली होती, फक्त एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे कोंडून असल्याने ओळखीची लोकं बोलायला नसायची.

– धोंडिराम अर्जुन, माहिती सहायक

जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर

तीन महिन्यांनंतर सई ताम्हणकर परतली सेटवर

0

मराठी सिनेसृष्टीतली ‘वर्कहोलिक’ म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने  सोमवारपासून चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. सोमवारी सई तिच्या रिएलिटी शोच्या चित्रीकरणस्थळी पोहोचली. तब्बल तीन महिन्यांनी पुन:श्च हरिओम करताना सई ताम्हणकर खूप उत्साहित होती.

सई म्हणाली, “पुन्हा एकदा चित्रीकरणाला परतताना खूप संमिश्र भावना आहेत.  एकिकडे थोडीशी भीती आणि चिंता दाटून आली असतानाच मन खूप उत्साहित झालेले आहे. सेटवर डॉक्टर आहेत. रूग्णवाहिकाही बोलवण्यात आलीय. सेटवर आल्याआल्या टेंपरेचर चेक करणे, सतत हात धूणे, सॅनिटायझर बाळगणे. अशा  सेटवर सगळ्या सावधगिरीच्या उपाययोजना बाळगल्या जातायत. लोकांना टीव्हीवरचे तेचतेच एपिसोड पाहून कंटाळा आल्याने नव्या एपिसोडचे चित्रीकरण सुरू केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांचा आशिर्वाद असू द्या.”   

दिलेली कमिटमेंट पूर्ण करणा-यांमधली सई ताम्हणकर आहे, हे तिने ह्याअगोदरही दाखवून दिले आहे. बॉलीवूड चित्रपट ‘मीमी’च्या सेटवर अपघात होऊन पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही, लॉकडाऊन होणार हे कळल्यावर दुख-या पायासह सई मार्च महिन्यात रिएलिटी शोच्या चित्रीकरणासाठी पोहोचली होती. आताही लॉकडाउन उघडल्यावर निर्माते आणि प्रेक्षकांसाठी असलेली आपली बांधिलकी जपत, सई ताम्हणकर चित्रीकरणासाठी सेटवर पोहोचली. 

आर्थिक पॅकेज देण्याची भाजपची मागणी

0

पुणे-कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पुणे शहरात लॉकडाउन असून पुढील काळात तो वाढण्याची शक्यता आहे. पारं रिक पद्धतीने व्यवसाय करणारे बारा बलुतेदार, रिक्षाचालक, पथारीवाले अशा हातावर पोट असणार्यांची काम नसल्याने आर्थिक परिस्थीती बिकट झाली आहे. अर्थार्जन नसल्याने त्यांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदीन गरजा भागविता येत नाही, तसेच उदरनिर्वाह करता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने तातडीने आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, युवा मोर्चा प्रदेश पदाधिकारी स्वरदा बापट यांचा शिष्टमंडळात समावेश होता. नाभिक समाजाचे विनायक गायकवाड, सुनील पांडे, चर्मकार समाजाचे सूर्यकांत भोसले, शिंपी समाजाचे प्रशांत झणकर, तांबट समाजाचे सतीश निजामपूरकर, धोबी समाजाचे प्रकाश अभ्यंकर, भोई समाजाचे श्रीकांत पाटील यावेळी उपस्थित होते.

खासदार बापट म्हणाले, ‘पुणे शहरात कुंभार, कोळी, चर्मकार, तेली, नाभिक, परीट, माळी, शिंपी, सोनार, चर्मकार, लोहार, कासार अशाप्रकारचे बारा बलुतेदार पारंपरिक पद्धतीने आपले परंपरांगत व्यवसाय करीत आहेत. शहरात अशाप्रकारचे छोटे व्यवसाय करणार्या व्यावसायिकांची संख्या एक लाखांहून अधिक आहे. या व्यावसायिकांकडे काम करणार्या कारागिरांची संख्याही सुमारे तीन लाख इतकी आहे. म्हणजेच बलुतेदार व्यावसायिक आणि कारागिरांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. त्याबरोबर रिक्षाचालक आणि पथारीवाल्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांचे हातावर पोट आहे. रोज काम केले तरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. मात्र गेले तीन महिने लॉकडाउन असल्याने हातात काम नाही. त्यामुळे या सर्व कुटुंबांना रोजच्या गरजा भागविणे अशक्य झाले आहे. म्हणून राज्य शासनाने या सर्वांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे.’

मुळीक म्हणाले, ‘हातावर पोट असलेल्या कुटुंबांच्या अन्न, वस्त्र, निवारा अशा दैनंदीन गरजा भागविता याव्यात, आरोग्य विषयक व मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे पॅकेज असावे. तसेच नव्याने व्यवसायाची उभारणी करता यावी यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, सध्याच्या कर्जात सवलत आणि कर्जाची पुनर्रचना आदी आर्थिक पर्याय उपलब्ध करून द्यावेत. तसेच आगामी काळात व्यावसायिक स्पर्धेत टिकता यावे यासाठी स्वयंरोजगार, व्यवसायातील नवीन संधी, तंत्रज्ञान आणि कौशल्ये याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा आणि तो मंजूर करून घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करण्यात आली. अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येणार आहे.’

हा तर खुद्द केंद्र सरकारनेच घरोघरी टाकलेला दरोडा – बाळासाहेब थोरात    (व्हिडीओ)

पुणे- आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल डिझेलचे दरात प्रचंड घसरण होत असताना दुसरीकडे कोरोनाने आधीच हैराण,आणि कमजोर झालेल्या जनतेची लुट पेट्रोल डिझेलची सातत्याने दरवाढ करून करणे म्हणजे हा तर केंद्र सरकारने घरोघरी टाकलेला दरोडा च आहे अशा शब्दात आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला .पेट्रोल व डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. या विरोधात काँग्रेसने आज राज्यभर आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरूवात केली आहे.  पुण्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते.  शहर अध्यक्ष, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर,दीप्ती चवधरी ,कमल व्यवहारे ,गोपाळ  तिवारी ,बाळासाहेब अमराळे ,मुक्तार शेख ,सचिन आडेकर ,नीता परदेशी ,मोहन जोशी ,अभय छाजेड ,उल्हास पवार ,चंद्रशेखर कपोते ,तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची याप्रसंगी मोठ्यासंख्येने  उपस्थिती होती. बाळासाहेब थोरात यावेळी  पुढे म्हणाले की, आपल्या सर्वांवर करोना विषाणुचे एवढे मोठे संकट असताना. प्रत्येक राज्य त्याला सामोरे जात आहे. मात्र त्याच दरम्यान केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असून, सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

राज्य सरकारने सिंधुदुर्गसाठी जाहीर केलेले २५ कोटी पोहोचणार कधी- प्रवीण दरेकर

0


कुडाळ दि. २८:- निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सिंधुदुर्गसाठी २५ कोटी जाहीर केले. मात्र यातील केवळ ३७ लाख रुपये याठिकाणी खर्च झाल्याचे निदर्शनात आले आहे.अशाप्रकारे राज्य सरकारने सिंधुदुर्गसाठी जाहीर केलेले २५ कोटी पोहोचलेच नाही असा गौप्यस्फोट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला. शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतं शेतकऱ्यां बांधवर उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात आलं परंतु यांच्या वितरणात संपूर्ण गोंधळ आहे. तरी हा गोंधळ दूर करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत किती खतं, बी- बियाणे पोहोच केली याची माहिती जाहीर करावी अशी मागणी दरेकर यांनी केली.

कोवीडमुळे कोकणातील अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोवीडचे रुग्ण वाढत असताना येथे काय व्यवस्था आहे याची माहिती आजच्या सिंधुदुर्ग दौऱ्या दारम्यान घेण्यात आली.येथे अपुरे मनुष्यबळ आहे असे लक्षात आले. ४० ते ४५ आरोग्य सेवक सेविका पाहिजे असताना केवळ दहा ते बारा उपलब्ध आहेत.प्रत्येक विभागात शंभर ते दीडशे लोकांची तफावत आहे.डॉक्टर आणि इन्टेन्सिविस्ट देखील उपलब्ध नाहीत. तरी आवश्यक मनुष्यबळ मिळणेबाबत सरकारला प्रस्ताव पाठवावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री आणि शासनातील संबंधित यंत्रणेशी बोलून सिंधुदुर्गला मनुष्यबळ उपलब्ध करून देऊ असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनावरील नियंत्रण त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.या दौऱ्यादरम्यान दरेकर यांनी कणकवली भाजप कार्यालयालास भेट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबाबत व निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा तसेच कोविड संदर्भात कार्यन्वित असलेल्या उपायोजना आणि आरोग्य यंत्रणा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.त्यानंतर श्री.दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकारांशी संवाद साधताना श्री.दरेकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर खत बियाणे पोचणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.परंतु कुठल्याही गावात शासकीय यंत्रणा किंवा ग्रामीण यंत्रणा अद्याप पोहचली नाही.शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणं दिले गेले नाही.अशाप्रकारे ही देखील सरकारची फसवी घोषणा ठरली असल्याची जोरदार टीका दरेकर यांनी केली.यंत्रणाच वाटप करणार नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन बियाणे वाटप करू अशी घोषणा करायला नको हवी होती असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकणातील शेतकरी फार कर्ज घेत नाहीत. बीडमध्ये दोन-तीन हजार कोटी कर्ज घेतले जात असेल तर कोकणात केवळ पाच ते दहा कोटींच्या वर कर्ज माफी नसते.म्हणून नियमित कर्ज भरणाऱ्यांना शासन ५० हजार रुपये देणार असे जाहीर करण्यात आले. परंतु यातला पण एक रुपयाही अद्याप मिळाला नसल्याची टीका दरेकर यांनी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता पैसे आले नसल्याचे सांगितले. अशाप्रकारे आणखी एक खोटी घोषणा महाविकासआघाडी सरकारने केली अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

कोकणात एकही कोरोना टेस्टिंग सेंटर उपलब्ध नसल्याने तसेच वाढते कोरोना रुग्ण प्रमाणामुळे कोकणवासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते.कोकणात कोरोना तपासणी वेळेत व्हावी यासाठी आवश्यक लॅब निर्माण करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ममागील कोकण दौऱ्या दरम्यान केली होती.आमच्या प्रयत्नांमुळे आणि राजकीय भूमिकेतून येथे एक सकब सेंटर उभारणायत आले आहे.
परंतु सिंधुदुर्ग येथे भाजपच्या माध्यमातून १ कोटींचा निधी पाच आमदार प्रशासनास देतील अशी ग्वाही मागील कोकण दौऱ्यादारम्यान कोकणचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती.त्याची पूर्तता करण्यात आली आहे,याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ कॉलेज व लाईफ टाईम हॉस्पिटल येथे आणखी एक कोविड-१९ तपासणी लॅब उभारण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२०- २१ अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे.हा निधी शासनस्तरावर मान्य करण्यात आला आहे.यांतर्गत मी स्वतः,आमदार प्रसाद लाड,आमदार निरंजन डावखरे,आमदार भाई गिरकर,आमदार रमेश पाटील हे प्रत्येकी २० लाख अशाप्रकारे एकूण १ कोटी इतका निधी उपलब्ध करून देणार आहेत.या निधीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यात येणार आहे. तरी याबाबत जिल्हाधिकारी आणि संबंधितांना प्रस्ताव सादर करून संबंधित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले.आठवड्याभरात स्वब सेंटरचे काम पूर्ण झाले तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करुन सिंधुदुर्ग वासियांसाठी नारायण राणे यांच्या महाविद्यालयात आणखी एक स्वब सेंटर उपलब्ध करणार अशी माहिती दरेकर यांनी दिली.

खासगी कर्जाच्या बाबतीत प्रतिक्रिया देताना श्री. दरेकर म्हणाले, खाजगी कर्जाच्या बाबतीत पहिली कर्ज फेडले गेली नाही तर दुसरी कर्ज मिळणार नाही. त्यामुळे यासाठी १३ कोटी रुपये उपलब्ध आहेत ते वितरित व्हावे.हे पैसे वितरित झाले नाही तर नवीन कर्ज दिले जाणार नाही त्यामुळे हे कर्ज तात्काळ वितरित करण्यात यावी अशी भूमिका मांडली. इथले किराणामाल, टपरी, हॉटेल व्यवसायिक, उद्योजग यांचे कोविडमुळे धंद्याचं काय नुकसान झाले त्यांना उभा करण्यासाठी काय करावे लागेल असे किती उद्योजक आहेत याची माहिती काढायला सांगितली होती. परंतु याबाबत माहिती अप्राप्त आहे. तरी या बाबत योग्य माहिती मिळवून द्यावी असे निर्देश देण्यात आले. शासन कर्ज सवलत देत असताना जर डाटा उपलब्ध नसेल तर केवळ निर्णय होईल पण त्या घटकांसाठी ज्या सवलती पोचल्या पाहिजे त्या पोहचणार नाही.या विषयात प्रशासन अद्याप गंभीर नाही. तरी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी किती व्यवसाय आहेत, या व्यवसायात किती लोक अवलंबून आहेत, यासाठी काय करावे लागेल यासाठी जिल्हा म्हणून सरकारला काय मागणी करता येईल,कशाप्रकारे मागणी करता येईल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.