Home Blog Page 2520

आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.८: राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार  ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८७,८५६), बरे झालेले रुग्ण- (५९,२३८), मृत्यू- (५०६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,५४३)

ठाणे: बाधित रुग्ण- (५२,७३३), बरे झालेले रुग्ण- (२१,२५२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,०६३)

पालघर: बाधित रुग्ण- (८३०४), बरे झालेले रुग्ण- (३७९४), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५७)

रायगड: बाधित रुग्ण- (६६६८५), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९९)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (७९९), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

पुणे: बाधित रुग्ण- (३१,७०४), बरे झालेले रुग्ण- (१४,८१०), मृत्यू- (९६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,९३२)

सातारा:  बाधित रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (८५७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१)

सांगली: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०२४), बरे झालेले रुग्ण- (७५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३४९२), बरे झालेले रुग्ण- (१८४७), मृत्यू- (३२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२३)

नाशिक: बाधित रुग्ण- (६०१७), बरे झालेले रुग्ण- (३३४३), मृत्यू- (२६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (६५२), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७)

जळगाव: बाधित रुग्ण- (४८४६), बरे झालेले रुग्ण- (२७७४), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

धुळे: बाधित रुग्ण- (१३६७), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७१९७), बरे झालेले रुग्ण- (३२८५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९८)

जालना: बाधित रुग्ण- (८४५), बरे झालेले रुग्ण- (४५६), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५५)

बीड: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

लातूर: बाधित रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (२६५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०)

परभणी: बाधित रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

नांदेड: बाधित रुग्ण- (४५५), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

अमरावती: बाधित रुग्ण- (७३६), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७)

अकोला: बाधित रुग्ण- (१७५३), बरे झालेले रुग्ण- (१२७२), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (२५३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

नागपूर: बाधित रुग्ण- (१८२४), बरे झालेले रुग्ण- (१३३३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)

वर्धा: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)

एकूण: बाधित रुग्ण-(२,२३,७२४), बरे झालेले रुग्ण-(१,२३,१९२), मृत्यू- (९४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१९),ॲक्टिव्ह रुग्ण-(९१,०६५)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

शहरी स्थलांतरित/गरीब लोकांसाठी वाजवी दरात भाडेतत्वावर गृहसंकुले विकसित करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

0

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी स्थलांतरित आणि गरीब लोकांसाठी वाजवी दरात भाडेतत्वावर घर उपलब्ध होण्यासाठीच्या गृहसंकुल विकास योजनेला (ARHCs) मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना-नागरी ची उपयोजना म्हणून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल.सध्या रिक्त असलेल्या सरकारी निधीपुरवठा होणारया गृहसंकुलांचे रुपांतर ARHCs अंतर्गत स्वस्त घरांमध्ये केले जाईल. त्यासाठी 25 वर्षांच्या कालावधीसाठी एक सवलत करार केला जाईल. या करारान्वये, या जुन्या गृहसंकुलांमध्ये दुरुस्ती/डागडुजी करून तसेच, पाणी, सांडपाणी व्यवस्था, रस्ते इत्यादीची सोय करून दिली जाईल.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश पारदर्शक लिलावाच्या माध्यमातून  सवलतदाराची निवड करतील. 25 वर्षानंतर ही संकुले स्थानिक स्वराज्य संस्थांकडे परत केली जातील, त्यानंतर पुढचा भाडेकरार करणे किंवा स्वतःच ही योजना चालवण्याचा निर्णय या संस्था घेतील.

ज्या खाजगी/सार्वजनिक विकासकांना आपल्याच जमीनींवर 25 वर्षांच्या करारावर ARHC अंतर्गत गृहसंकुले बांधायची इच्छा असेल, त्यांना, विशेष सवलती, जसे की वापर करण्याची परवानगी, 50% टक्के अतिरिक्त चटई क्षेत्र, सवलतीच्या दरात कर्ज, परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, जसे करातून सवलत वगैरे या योजनेसाठीही दिल्या जातील.

ARHC योजनेचा लाभ, उत्पादन क्षेत्र, आतिथ्यशीलता व्यवसायात सेवा देणारे, आरोग्य, घरगुती/व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम किंवा इतर क्षेत्रे, मजूर, विद्यार्थी अशा सर्व घटकांना मिळेल. लहान गावातून शहरात संधीच्या शोधात आलेल्या सर्वांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

या योजनेसाठी तंत्रज्ञान संशोधन निधी च्या स्वरूपात अंदाजे  600 कोटी खर्च अपेक्षित असून, ज्या प्रकल्पात बांधकामासाठी काही नव्या कल्पना, तंत्रज्ञान वापरले जाईल, त्यासाठी हा निधी सरकार देईल. सुरुवातीच्या टप्प्यात, तीन लाख लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निवासाची व्यवस्था मिळू शकेल.

ARHC योजनेमुळे, शहरी भागात, गरिबांसाठी त्यांच्या कामाच्या जागेजवळ परवडणाऱ्या भाड्यात घर उपलब्ध होण्याची नवी व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल. या योजनेअंतर्गत, नव्या रोजगार संधी देखील उपलब्ध होतील. तसेच, या योजनेमुळे शहरातील अनावश्यक प्रवास, गर्दी आणि प्रदूषण कमी होईल.

केंद्रसरकार पुरस्कृत  रिक्त घरांचे रूपांतर या योजनेअंतर्गत केले जाईल जेणेकरुन, या बंद संकुलांचा आर्थिकदृष्ट्या चांगला वापर करता येईल.  या योजनेमुळे बांधकाम व्यावसायिकाना, भाडेतत्ववरील गृहनिर्माण क्षेत्रात स्वयंउद्योजकता आणि गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध होतील.  AHRC योजना स्वतःच्या किंवा इतर जमीनीवर तयार करण्यासाठीचे पोषक वातावरण तयार होऊ शकेल.   

पार्श्वभूमी :

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी, शहरी स्थलांतारित  वाजवी आणि गरिबांसाठी दरातभाडे तत्वावर घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-शहरी ची उपयोजना म्हणून ही योजना सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 मे 2020 रोजी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेमुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे .

कोविड-19 आजार आणि लॉकडाऊनमुळे देशातील  छोट्या गावातून शहरात रोजगारासाठी आलेले अनेक मजूर/कामगार आपापल्या मूळगावी परत गेले. सामान्यतः हे कामगार, मजूर छोट्या झोपडपट्ट्या, अनौपचारिक/असंघटीत अशा वस्त्यांमध्ये भाड्याने राहतात. त्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी आपला पैसा आणि वेळ वाया घालवावा लागतो.  अनेकदा पैसे वाचवण्यासाठी ते पायी किंवा सायकलने कामावर जातात, जे त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरु शकते.

ॲप डेटाच्या चोरीतून देशाच्या सुरक्षिततेला अनपेक्षित धोका निर्माण होण्याची शक्यता

0

केंद्र सरकारने 29 जून 2020 रोजी एक महत्वाची घोषणा केली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने 59 मोबाईल ॲप्सवर बंदी घातली. हे ॲप्स भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मतेला, देशाच्या संरक्षणाला, देशाची सुरक्षितता आणि सुव्यवस्थेला धोकादायक ठरु शकतात, अशी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जे ॲप्स आता भारतीय लोकांना वापरासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, त्यांच्या यादीत, समाजमाध्यामांमधील लोकप्रिय ॲप टिक-टॉक, फ़ाइल हस्तांतरणाची सुविधा असलेले शेअरइट (ShareIt),सोशल नेट्वर्किंग साईट हेलो आणि कागदपत्रं स्कॅन करणारे ॲप कॅमस्कॅनर यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ नुसार तसेच, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधित तरतुदी असलेल्या(माहिती सार्वजनिक होण्यापासून रोखण्यासाठीची कार्यपद्धती आणि सुरक्षितता) अधिनियम 2009 अंतर्गत ही कारवाई केली आहे.   

काही घटकांकडून डेटाची चोरी किंवा मायनिंग राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी धोकादायक

या ॲप्सवर बंदी घालण्यामागच्या कारणांपैकी एका महत्वाचे कारण म्हणजे या ॲप्सद्वारे वापरकर्त्याच्या मोबाईलमधील डेटा चोरीला जात असून तो डेटा गुप्तपणे भारताबाहेर असलेल्या सर्व्हरकडे पाठवला जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे ही बंदी घालण्यात आली. कदाचित कोणाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, असा निरुपयोगी भासणारी माहिती (डेटा), एखाद्या सोशल नेटवर्किंग ॲपवर असलेली माहिती राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या संरक्षणाला धोका पोहोचवणारी कशी काय असू शकेल?

कदाचित सर्वसामान्य माणसांना हा विषय निरुपद्रवी, साधारण वाटू शकेल. मात्र, या विषयाचे गांभीर्य अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी, आपण इंग्लंडच्या बेलफास्टमधील क्वीन्स विद्यापीठात कॉम्पुटर सायन्स विभागात सहायकप्राध्यापक असलेले डॉ दीपक पी, यांनी दिलेली माहिती समजून घेऊ. दीपक पी हे कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा एथिक्स या विषयातील तज्ज्ञ आहेत. डॉ दीपक आपल्याला, भारताबाहेर असलेल्या कंपन्या, ज्यांच्यावर त्या परदेशातील कायदे आणि नियमनांचे पालन करण्याचे बंधन आहे, अशा कंपन्यांनी विकसित केलेले ॲप्स वापरतांना त्याच्याशी सबंधित संवेदनशील मुद्यांची माहिती देतात. या कंपन्या जो डेटा/माहिती गोळा करतात, तो भारताबाहेर असलेल्या सर्व्हरमध्ये स्टोअर म्हणजेच संकलित केला जातो. साधारणपणे हा डेटा कंपनीच्याच ताब्यात असला, तरी, जर त्यांच्या देशातील सरकारने हा डेटा देण्याची विनंती केली तर त्यांना त्या सरकारची विनंती मान्य करावी लागते. त्याहीपुढे जात, काही कंपन्या अशी विनंती मान्य करत असल्याचे लक्षात आले आहे, ज्यामुळे, भारतीय ॲप्स वापरकर्त्यांच्या मोबाईलमधील सर्व माहिती त्या त्या देशांच्या सत्ताधाऱ्यांकडे दिली जाते. दुसऱ्या देशातील सरकारे, अशा माहितीचा मुत्सद्देगिरीने आपल्या राष्ट्रीय हिताविरुध्द वापर करू शकतात.  

डेटा अत्यंत शक्तीशाली असतो. आज डेटा मायनिंग तंत्रज्ञान अत्यंत अत्याधुनिक झाले असून, ज्याआधारे अनेक प्रकारे धोका निर्माण केला जाऊ शकतो. डॉ दीपक यांनी, ऑनलाईन फिटनेस ट्रॅक ॲप ‘स्ट्रावा’ या सॅन्फ्रान्सिस्को येथील कंपनीचे उदाहरण दिले आहे. हे ॲप वापरकर्त्याच्या व्यायाम आणि इतर शारीरिक हालचालींची माहिती घेण्यासाठी मोबाईल फोनच्या जीपीएस प्रणालीचा वापर करते.

यामुळे वापरकर्त्यांना त्यांचा व्यायामाची तुलना एकमेकांशी आणि स्वतःच्याच आधीच्या शारीरिक हालचालींशी करुन आपल्या प्रगतीचे मूल्यांकन करता येते. नोव्हेंबर 2017 मध्ये, या ॲपने एक हिटमॅप प्रसिध्द केला- यानुसार, 2015 ते  सप्टेंबर 2017 या कालावधीत, वापरकर्त्यांच्या मोबाईलवरुन जमा करण्यात माहितीच्या आधारावर-27 अब्ज किलोमीटर्स धावण्याच्या व्यायामाचे डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजेच, माहितीचे आभासी रूप जाहीर केले, यात सुमारे 3 ट्रीलियन डेटा पॉईंट होते. हा एवढा प्रचंड डेटा पाहिल्यावर, ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातला आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाचा युवा विद्यार्थी, नाथन रुसेरच्या लक्षात आले की हा डेटा धोकादायक ठरु शकतो. का? कारण त्याच्या असे लक्षात आले, की हे ॲप वापरणारे अनेक लष्करी अधिकारी आणि कर्मचारी होते, जे नियमितपणे धावायला किंवा फिरायला जात असतात. त्याच्या लक्षात आले की या ॲपवरच्या माहितीवरुन लष्करी तळ, तिकडे जाण्यासाठी सैनिकांनी वापरलेले काही अज्ञात मार्ग किंवा व्यायामासाठी दररोज वापरले जाणारे मार्ग, गस्त घालण्यासाठीचे रस्ते अशी सर्व संवेदनशील माहिती या ॲपवरुन मिळू शकते. ही माहिती देशाच्या सुरक्षेला थेट धोका पोहोचवणारी ठरु शकते.

आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा डॉ दीपक सांगतात, तो म्हणजे, जेंव्हा आपण देता आणि माहितीच्या सुरक्षेविषयी विचार करतो, तेंव्हा आपल्याला याची कल्पनाही येऊ शकत नाही की जेव्हा या डेटा तयार केला जातो किंवा तो पाठवला जातो, तेव्हा अथवा त्यानंतर  त्याचा किती वेगवगेळ्या मार्गांनी हा डेटा वापरला जाऊ शकतो. रनिंग ॲपच्या वरच्या उदाहरणावरुन हे लक्षात येऊ शकेल. त्यांनी आणखी एक उदाहरण दिले आहे. जे फोरेन्सिक जिनिओलॉजी म्हणजेच जनुकीय न्यायवैद्यक शास्त्र, जिथे ग्राहक कंपन्यांकडून मिळालेल्या जनुकीय माहितीचा वापर गुन्हेगारी प्रकरणातील संशयित गुन्हेगार किंवा पीडित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी केला जातो. अमरिकेत पोलिसांनी अनेक प्रकरणांचा शोध लावतांना, या शास्त्राचा वापर केल्याची आठवण डॉ दीपक सांगतात. गुन्हा घडलेल्या स्थळावरील सर्व माहिती, डीएनए प्रोफाईल -ज्यात गुन्ह्याशी सबंधित व्यक्तींची जनुकीय माहिती देखील असते- ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध होऊ शकेल अशा डोमेनवर अपलोड केली जाते. या माहितीच्या, विशेषतः डीएनए प्रोफाईल्स च्या आधारे त्या व्यक्तींच्या नातेवाईकांची माहिती कळू शकते, या माहितीच्या आधारे पोलीस किंवा इतर सुरक्षा संस्थांना या प्रकरणातील संशयित गुन्हेगार किंवा पीडित व्यक्तीची माहिती मिळून ओळख पटवता येऊ शकते.   

मोबाईल ॲपवरुन डेटा संकलित करणे आणि देशाच्या सुरक्षिततेला आणि संरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या घटकांकडून त्याचे मायनिंग तसेच प्रोफायालिंग होणे हा अत्यंत खोलवर काळजीचा तसेच त्वरित सतर्क होऊन उपाययोजना करण्याचा विषय आहे, असे भारत सरकारने म्हंटले आहे. 

अधिक जनजागृती करण्याची गरज :

डेटा सुरक्षिततेसाठी या माहितीची गोपनीयता आणि सुरक्षा याबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज आहे, असे दीपक यांनी म्हटले आहे. आज आपल्याकडे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात अभूतपूर्व वाढ झाली आहे. अर्थात, या डिजिटल साधनांमुळे आपले आयुष्य अनेक बाबतीत सुरळीत झाले आहे, यात वाद नाही. मात्र, त्याच वेळी त्यांच्या वापरापासून असलेला धोका लक्षात घेऊन, त्यांचा वापर करतांना अधिक सजग आणि दक्ष राहण्याची गरज आहे, मोबाईल आणि इंटरनेट तंत्रज्ञानाचा अधिक शहाणपणाने वापर करणारे ग्राहक होण्याची गरज आहे. 59 मोबाईल ॲप्सवर घालण्यात आलेल्या बंदीविषयी बोलतांना डॉ दीपक यांनी सांगितले की जर सरकारने नागरिकांना नीट समजावून सांगितले की या ॲप्सपासून नेमका कोणता धोका आहे, आणि सरकारकडे आलेल्या तक्रारी आणि अहवाल, ज्यांच्या आधारे, सरकारने हे निर्बंध घातले, त्यांची प्रक्रियाही जनतेला समजावून सांगितली तर त्याची मदत होऊ शकेल. यातून, निर्बंध घालण्याआधी सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडल्या गेल्या आणि योग्य वेळी आवश्यक ती करवाई केली गेली याची माहिती लोकांना मिळेल आणि त्यांचा सरकारप्रती विश्वास वाढेल, असे त्यांनी म्हटले. यामुळे,  अशा मुद्यांवर जनतेची समज वाढेल आणि पुढे त्यांचा सहभागही वाढेल. भारतासारख्या संवादात्मक लोकशाहीमध्ये जनतेचा सहभाग महत्वाचा ठरतो. 

हे निर्बंध जागतिक व्यापार संघटनेच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन आहे का? 

केंद्र सरकारने कोट्यवधी भारतीय मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि भारतीय सायबर अवकाशाचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या ॲप्सवर बंदी घातली आहे. मात्र, भारतातील चीनी दूतावासाने या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करत, इतर अनेक गोष्टींचा उल्लेख करत, या निर्णयामुळे “जागतिक व्यापार संघटनेच्या नियम आणि अधिकारक्षेत्राचे उल्लंघन’ होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. याबद्दल, परराष्ट्र व्यापारविषयक भारतीय संस्था, ‘ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लॉ’ चे प्राध्यापक आणि विभागप्रमुख, डॉ जेम्स जे नेडूमपारा यांनी म्हटले आहे, की या ॲप्सच्या बाबतीतल्या कटीबद्धतेविषयी, भारताची सेवा कटिबद्धता काय आहे, याबाबत राष्ट्रीय व्यवहारांचे बंधन (म्हणजेच, परदेशी आणि स्थानिकांशी समान व्यवहार करण्याचे बंधन) हे निश्चित करणे अत्यंत कठीण होऊ शकेल. जागतिक व्यापार संघटनेच्या सेवा क्षेत्रातील सर्वसामान्य करार (GATS) अंतर्गत मिळालेल्या सवलतींमध्ये  या ॲप्सचा समावेश होत नाही. त्यांच्या मते, भारताने, “सर्वाधिक पसंतीचा देश (Most Favoured Nation) या दर्जा अंतर्गत असलेल्या बंधनांचे उल्लंघन केले आहे, हा चीनचा युक्तिवादही असमर्थनीय आहे. कोणत्याही बाबतीत, कोणत्याही व्यापारी कराराचे बंधन देशाच्या सुरक्षिततेच्या विषयापेक्षा मोठे ठरू शकत नाही. GATS च्याच कलम 14 नुसार, या सर्व नियम/बंधनांना राष्ट्रीय सुरक्षेचा अपवाद करण्यात आला आहे. डॉ  नेडूमपारा यांच्या मते, सध्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आप्तकालीन स्थिती असल्याची परिस्थिती स्वच्छपणे दिसत असतांना, हा निर्णय घेतला गेला आहे. त्यापुढे, भारताने हा निर्णय घेताना सुरक्षेला धोका असल्याचेच कारण स्पष्टपणे सांगितले आहे. दोन्ही देशांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, जरी, सीमेवरील तणाव आणि ॲप्सवर बंदी घालण्याचा निर्णय याचा परस्परांशी काही सबंध असल्याचा उल्लेख नसला, तरी या काळात, घडलेल्या घटनांच्या आधारावर ॲप्सवर बंदी घालण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारा युक्तिवाद तयार केला जाऊ शकतो, असे डॉ नेडूमपारा यांनी म्हटले आहे. नेडूमपारा यांनी हे ही स्पष्ट केले आहे, की GATS कराराअंतर्गत करण्यात आलेल्या सुरक्षाविषयक अपवादांचाच आधार घेऊन, त्यासाठी घेतलेल्या कोणत्याही निर्णयामागची भूमिका सिध्द करून देण्याच्या  स्थितीत सध्या भारत नक्कीच आहे. मात्र सोबतच, त्यांनी हे ही सांगितले की, व्यापारविषयक  नियमांचा भंग झाला नसेल, तर या नियमांसाठीच्या  अपवादाचा आधार घेणे योग्य ठरणार नाही.  

दीप जॉय माँपिल्ली

 (लेखक भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या मुंबईत कार्यरत आहेत; त्यांचा इमेल आयडी –dheep@nic.in)

फरार नीरव मोदीची 300 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती ईडीकडून जप्त, यात लंडन आणि यूएईमधील फ्लॅट्सचा समावेश

0

नवी दिल्ली- सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने सांगितले की, आर्थिक गुन्ह्यातील आरोपी नीरव मोदीची 300 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

न्यूज एजेंसी एएनआयने सांगितल्यानुसार, ईडीने नीरवची 329.66 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीत मुंबईतील आइकॉनिक बिल्डिंग समुद्र महलचे चार फ्लॅट, एक सी-साइड फार्महाउस, अलीबागमधील जमीन, जेसलमेरमधील पवन चक्की, लंडनमधील फ्लॅट आणि संयुक्त अरब अमीरातमधील रेजिडेंशियल फ्लॅट, शेअर आणि बँकेतील रकमेचा समावेश आहे.

यापूर्वी झाला लिलाव

मार्च 2020 मध्ये ईडीने नीरव मोदींची बरीच संपत्ती जप्त करुन, लिलाव केला होता. यात महाग पेंटिंग्स, घड्याळ, पर्स, महागड्या कार्स, हँडबैगसारख्या वस्तुंचा समावेश होता. ईडीने सांगितल्यानुसार, त्या लिलावातून 51 कोटींची रिकव्हरी झाली होती.

लंडनच्या वांड्सवर्थ तुरुंगात आहे नीरव मोदी

13 हजार 700 कोटींचा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव लंडनमधील वांड्सवर्थ जेलमध्ये बंद आहे. भारताच्या अपीलनंतर प्रत्यार्पण वॉरंट जारी झाल्यानंतर लंडन पोलिसांनी मागच्या वर्षी 19 मार्चला नीरवला अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज आतापर्यंत पाचवेळा रद्द झाला आहे. भारत मागील अनेक दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे. मागच्या महिन्यात वेस्टमिंस्टर न्यायालयाने नीरव मोदीला 9 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ

0

मुंबई, दि. ८ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१  साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता १ हजार ३०६ कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे.आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना  १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

दि.१ एप्रिल, २०१५ ते दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ ही कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला होता.

या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मास्क नेमका कसा वापरावा -विभागीय आयुक्तांनी केले स्पष्ट (व्हिडीओ)

पुणे-कोरोनाच्या या संकट काळामध्ये मास्क हा आता सगळ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागच झालेला आहे. त्यामुळे मास्कच्या उपयुक्त वापराविषयी आपल्याला नक्कीच काही प्रश्न असतील..
‘मास्क’ आपले कोरोना पासून संरक्षण करू शकतो; पण हाच मास्क जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळला, तर तो आपल्याला नुकसान सुद्धा पोहोचवू शकतो. त्यामुळे मास्क योग्य पद्धतीने कसा हाताळावा, हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे.
या व्हिडियो मध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ‘मास्क कसा हाताळावा’, याविषयी मार्गदर्शन केलेले आहे..

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/283921946054548/

कोरोना चाचणीचा अहवाल खासगी प्रयोगशाळेने 24 तासाच्या आत देणे बंधनकारक -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 8 :- कोरोना संशयित व्यक्तींचे चाचणीसाठी घेतलेल्या नमुनांचा अहवाल 24 तासांच्या आत करण्याचे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल रुग्ण ज्या भागातील रहिवासी आहे म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसैकर यांच्या अध्यक्षतेखाली कोवीड -19 संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने खासगी प्रयोगशाळा चालकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या.
सर्व प्रयोगशाळा चालकांनी दररोज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या नमुन्यातील अहवाल न चुकता श्री. कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक कार्यालय यांच्याकडे सादर करावे. चाचणी बाबत आरटी-पीसीआरवर डेटा दररोज अपलोड करण्यात यावा व दैनंदिन अहवाल सनियंत्रण अधिकारी यांना देण्यासाठी प्रत्येक प्रयोगशाळेने एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांक कळविण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसैकर दिल्या.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 14 हजार 2 ,एकुण 1 हजार 321 रुग्णांचा मृत्यू

पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 8 :- पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 38 हजार 411 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 14 हजार 2 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 615 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.44 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयात 31 हजार 994 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 19 हजार 319 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 751 आहे. कोरोनाबाधित एकूण 924 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 450 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.38 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.89 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 740 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 569, सातारा जिल्ह्यात 46, सोलापूर जिल्ह्यात 68, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 45 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयात कोरोना बाधीत 1 हजार 418 रुग्ण असून 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 499 आहे. कोरोनाबाधित एकूण 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयात 3 हजार 439 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 871 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 259 आहे. कोरोना बाधित एकूण 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयात कोरोना बाधीत 532 रुग्ण असून 277 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 242 आहे. कोरोना बाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयात 1 हजार 28 कोरोना बाधीत रुग्ण असून 762 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 251 आहे. कोरोना बाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 16 हजार 348 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 15 हजार 67 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 442 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 73 हजार 126 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 38 हजार 411 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 8 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

प्लाझ्मा बँक स्थापन करण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्तींना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि. 8 :- कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु असे लक्षात आले आहे की कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी गंभीर कोरोना रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोव्हिड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, प्लाइमा फेरेसिस ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा फेरेसिस साठी वापरले जाणारे एक अत्याधुनिक मशीन आहे. या मशीनचे वैशिष्ट्य असे की यामध्ये फक्त प्लाझ्मा घेतला जातो व बाकीचे रक्त प्लाइमा दान करणाऱ्या व्यक्तीला परत दिले जाते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच केली जाते. प्लाइमा दान करणारी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील असावी. प्लाइमा देणाऱ्या कोरोनामुक्त व्यक्तीची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या केल्या जातात आणि जर ती वैद्यकीयदृष्ट्या पात्र असेल तरच त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेतला जातो. या सर्व प्रक्रियेसाठी साधारण दीड ते दोन तास लागतात. प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीस अजिबात अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही. म्हणून सर्व करोनामुक्त व्यक्तींनी प्लाइमा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

जग जिंकलं ‘त्या’ माऊलीच्या मायेने!

0

सहा महिन्यानंतर माय लेकराची पुनर्भेट घडविण्यात बालकल्याण समितीला यश

अकोला-

मै रोया परदेस मे, भिगा मां का प्यार,

दुख ने दुखसे बात की बिन चिठ्ठी बिन तार

-निदा फाजली

आईची तिच्या लेकराबद्दल असणारी माया ही जगात सर्वोच्च मानली जाते. आपल्या तान्हुल्यासाठी रायगड किल्ल्याचा धोकादायक कडा रात्री उतरुन जाणारी हिरकणी असो वा अन्य कुणीही. आपल्या हरवलेल्या लेकराला भेटण्यासाठी गेले सहा महिने अशाच कासावीस झालेल्या एका माऊलीची माया मंगळवारी (दि.७) फळाला आली. तिचं हरवलेलं लेकरु सापडलं. तब्बल सहा महिन्यांनी. शासनाच्या  बाल कल्याण समितीने हे लेकरु तिच्या स्वाधीन करत या आईच्या ममतेला कुर्निसात केला. आपल्या तान्हुल्याला जवळ घेत या आईने फोडलेला हंबरडा…. उपस्थितांचे डोळे पाणावून गेला. आपल्या लेकराला कडेवर घेऊन जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून आला.

आईची माया ही गरीब, श्रीमंती तसेच कोणतीही भाषा, धर्म, प्रांत अशा कोणत्याही सीमा जाणत नाही. आई ही आई असते आणि तिचं लेकरु तिला सर्वात प्रिय असतं. अशीच ही आई…. दर्यापूर जि. अमरावती इथली. रेखा पवार तिचं नाव.  संसाराची कर्तीसवरती. नवरा विजय पवार आणि सोन्यासारखी तीन लेकरं. त्यातलाच एक दीड वर्षाचा सुमित. संसार गरिबीचा. आज इथं तर उद्या तिथं मोलमजुरी करुन गुजराण.

दि.१९ फेब्रुवारीची रात्र… हे थकलं भागलं कुटुंब कामासाठी दूरच्या गावी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपी गेलं. आईच्या कुशीत गाढ झोपलेल्या ‘सुमित’ ला कुणीतरी दुष्ट व्यक्तीने अलगद उचलून नेलं. आईची झोप ती. लेकरु जवळ नाही ही संवेदना तिला लगेच जाणवली. भांबावल्यासारखी उठली. सैरभैर आपल्या तान्हुल्याला शोधू लागली. आख्खं कुटुंब आकांत करु लागलं. नवरा, कच्ची बच्ची सगळी धाय मोकलून रडू लागली. प्रकरण पोलिसांत गेलं. शोध सुरु झाला.  आई आणि लेकराची ताटातूट त्यात खाण्यापिण्याचे वांदे, एका लेकराचा शोध घ्यावा तर दुसऱ्या कच्च्याबच्च्यांना काय खाऊ घालणार? हा यक्षप्रश्न.  मोलमजुरी केली नाही तर खाणार काय? पोटच्या गोळ्यांना उपाशी कसं ठेवणार? आणि जो आता डोळ्याला दिसत नाही, तो सुमित.. त्याचं काय? कुठं असंल, कसा असेल…. ‘मन चिंती ते वैरीही न चिंती’… नको नको ते विचार. पण आईची ममता ही जगातली सर्वाधिक सकारात्मक आणि सृजनशील असते. त्याच आईचं मन तिला समजावत होतं.. तुझं लेकरु तुला भेटंल…! ह्या आशेवर दिवसामागून दिवस काढत होती ती.  गावात जाऊन मोलमजुरी करायची. जमेल तसं अकोल्याला येऊन पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवणं सुरु होतं. या आईची ही तडफड सुरु होती ती तब्बल दि.१६ मे पर्यंत.

सुमित नागपूरला सापडला. तिथले बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण ह्या  भल्या अधिकाऱ्यानं सुमितला मातृसेवा संघाच्या शिशुगृहात नेलं. तिथं त्याला ताब्यात घेऊन तिथल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिलं. मग पुन्हा तपासाचा उलटा प्रवास. दि.२० मे ला अकोला रेल्वे पोलिसांत निरोप आला. लगेचच रेल्वे पोलिस निरीक्षक शेंडगे यांनी आई वडीलांचा संपर्क करुन तिला तिचं लेकरु सापडल्याची आणि ते सुखरुप असल्याची बातमी दिली.

जीव भांड्यात पडला खरा, पण लेकरु ताब्यात मिळत नाही  आणि त्याला प्रत्यक्ष बघत नाही तोवर ही आई कशी बरी स्वस्थ राहिल?  सुमितचा त्याच्या आई वडीलांचा फोटो व आवश्यक कागदपत्र रेल्वे पोलिसांनी नागपूर बाल कल्याण समितीला सादर केले. ओळख पटवणे, आणि न्यायालयाच्या  सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, कायदेशीर सोपस्कार करुन नागपूर आणि अकोला इथल्या बालकल्याण समितीच्या ऑनलाईन बैठका झाल्या.

तोवर ह्या माऊलीचे पोलीस स्टेशन, बाल कल्याण समितीचे उंबरठे झिजवणे सुरुच होते. विशेष म्हणजे या काळात कोरोनाच्या साथीमुळं  लॉकडाऊन होतं. मिळेल त्या वाहनाने ही माऊली दर्यापूर हून अकोल्याला येत होती. अखेर सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर एका विशेष गाडीने सुमित  मंगळवारी (दि.७ जुलै) नागपूरहून अकोल्याला आला. त्याच्या आई वडीलांना अकोल्याच्या बालकल्याण समितीने दर्यापूरहून बोलावलं होतं.

गाडीतून तिचं लेकरु अधिकाऱ्यांनी बाहेर आणलं… आणि गेले सहा महिने आपल्या लेकराच्या दर्शनाला आसुसलेली ही माऊली अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागली. बाप डोळे टिपत होता. तिला सावरु की पोराला बघू असं झालं होतं त्याला. सुमितची भावंडं त्यांना तर बिचाऱ्यांना काही कळतच नव्हतं… हा आनंद कसा व्यक्त करायचा? अखेर मायलेकराची भेट झाली. कित्ती कित्ती पापे घेतले तिनं त्याचे.  सहा महिन्यांपासून दुरावलेलं लेकरु  आपल्या आईला जे घट्ट बिलगलं, ते कुणाकडे जाईच ना… त्याची भावंडे त्याला ओंजारु गोंजारु लागली, बाप कुरवाळू लागला. हे सगळं बाल कल्याण समितीच्या विधी सेवा केंद्राच्या आवारात घडत होतं. हे दृष्य बघणाऱ्या उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते…. एका माऊलीची ममता जिंकली होती. आणखी एक हिरकणी जिंकली होती… तिचं लेकरू तिच्या कडेवर घेऊन जग जिंकल्याच्या आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.ही माय लेकरांची भेट घडविण्यात अनेक सहृद शासकीय अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहयोग लाभला. त्यात  बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक खान पठाण, महिला  व बालविकास अधिकारी जवादे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष सौ. पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समितीच्या सदस्या सौ. प्रीती पळसपगार, संरक्षण अधिकारी सुनील सरकटे तसेच सचिन घाटे आणि  नागपूर बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी  ह्या सगळ्यांना त्या आईनं लाख लाख धन्यवाद दिले.

‘महक’तर्फे रविवारी ‘मेरा साया साथ होगा’ची लाईव्ह मैफल

पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कलाकारांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार भिंतीत आपण सगळे बंद असल्याने एकमेकांना भेटणे शक्य नाही. काम करणे शक्य नाही. भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होत जाणार आहे. नाट्यगृहे, सभागृहे कधी खुली होणार? कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ कधी मिळणार? त्यांची गुजराण कशी होणार? असे अनेक प्रश्न कलाकारांना सतावत आहेत.
दुसरीकडे कोरोनामुळे संपूर्ण जग व्हर्च्युअल होत आहे. अशा स्थितीत धीराने उभा राहत कलाकारांना आपल्यासमोर सादर होण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. त्यातूनच कलाकारांनी आता गायन-संगीत मैफलीही ऑनलाईन करण्यास सुरवात होत आहेत. त्यातील पहिला प्रयोग ‘मेरा साया साथ होगा’च्या लाईव्ह मैफलीतून रविवारी (दि. १२ जुलै) रंगणार आहे. ‘मेरा साया साथ होगा’, ‘लग जा गले’, ‘रस्म ए उल्फत’ अशा बहारदार गाण्यांना संगीतबद्ध करणाऱ्या मदन मोहन यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त गायिका मनीषा निश्चल यांच्या ‘महक’ संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम होत आहे. 
मदन मोहनजी यांच्या स्मरणार्थ त्यांनी संगीतबद्ध केलेल्या व भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या काही निवडक गाण्यांची मैफल मनिषा निश्चल्स ‘महक’ प्रस्तुत व संदीप पंचवटकर निर्मित ‘मेरा साया साथ होगा’ हा पहिलावाहिला ऑनलाईन कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता होणार आहे. सईद खान, असिफ खान, हर्षद गनबोटे, असिफखान इनामदार यांच्या वाद्यवृंदाने, तर संदीप पंचवटकर यांच्या मधुर निवेदनाने ही मैफल रंगणार आहे. आ कार्यक्रम सशुल्क असून, www.showline.in या संकेतस्थळावर प्रवेशिका उपलब्ध आहे. 
कोरोनाच्या संकटामुळे कलाकारांवर बिकट परिस्थिती उद्भवली आहे. नाटक आणि संगीत कार्यक्रमाशी संबंधित कलाकारांना घेऊन खूप हिमतीने आणि अपेक्षेने ही सर्व कलाकार मंडळी हा ऑनलाईन कार्यक्रम सादर करणार आहे. मोबाईल, टॅब, लॅपटॉप, टीव्ही, प्रोजेक्टरच्या साहाय्याने ही मैफिल श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. प्रवेशिका घेणाऱ्या श्रोत्यांना लिंक दिली जाणार आहे. हा कार्यक्रम कलाकारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे, असे आयोजिका मनीषा निश्चल यांनी सांगितले.

कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी आपण स्वतःसाठी, भेट करण्यासाठी किंवा जेष्ठ नागरिकांच्या मनोरंजासाठी या कार्यक्रमाचे तिकीट घेऊन सहकार्य करू शकता. तसेच कलाकारांना स्वावलंबी, आत्मनिर्भर होण्यासाठी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करावे.”- मनीषा निश्चल, गायिका व आयोजिका

महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठी पेरा सीईटी 2020 परीक्षा 31 जुलैपासून ऑनलाईन

पुणे, ता. 08 :- कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने एमएच-सीईटीसंदर्भात (सामान्य प्रवेश परीक्षा) निर्णय पुढे ढकलली आहे. तसेच जेईई सीईटी परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र खासगी विद्य़ापीठांच्या प्रवेश प्रक्रियाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या राज्यातील विविध 19 खासगी विद्यापीठांची संघटना ‘पेरा’ (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) यांनी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पेरा सीईटी – 2020 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही सीईटी 31 जुलै रोजी सुरू होणार असून 2 ऑगस्ट 2020 रोजी संपणार होणार आहे. या परीक्षांचा निकाल 5 ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती पेरा इंडियाचे अध्यक्ष आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड आणि पेरा इंडियाचे उपाध्यक्ष श्री. भारत अग्रवाल यांनी दिली.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 19 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली आहेत आणि ती आज राज्यभर कार्यरत आहेत. खाजगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार सरकारी एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सीईटी व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येऊ शकतो. यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी कधी होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पेरा या खासगी विद्यापीठाच्या संघटनांनी 31 जुलै, 1 आणि 2 ऑगस्ट २०२० रोजी सीईटी – 20 ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थी खाजगी राज्य विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून प्रवेश निश्चित करू शकतात.
पेरा सीईटी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. पेरा सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 28 जुलै आहे. विद्यार्थ्यांना या सीईटी संदर्भात ऑनलाइन परीक्षा पद्धती समजून घेण्यासाठी 26 व 27 जुलै रोजी मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना उमेदवार घरातूनच ही सीईटी परीक्षेस देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.

गुजर-निंबाळकरवाडी येथे कोरोनामुळे एका वृध्द महिलेचा मृत्यू -जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन केल्या सूचना

पुणे, दि. 8 :- ग्रामीण भागात होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मिशन मोडवर काम करण्याचा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत गुजर-निंबाळकरवाडी येथे कोरोनामुळे एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकारी राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली. यावेळी घडलेल्या घटनेबाबत येत्या 7 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या तसेच याबाबत फेरआढावा घेणार आहे.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने वाटप करण्यात आलेल्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या इशाराही जिल्हाधिकारी राम यांनी दिला.
बैठकीस प्रांताधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सरपंच व्यंकोजी खोपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैदकीय अधिकारी डॉ. ज्ञानदीप राजगे, आरोग्य सहायक शैलेश चव्हाण, ग्रामसेवक विशाल निकम, तलाठी विकास फुके, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने गावपातळीवर कोरोना विषयक जनजागृती वर द्या, कोरोनाबाधित रुग्णांबाबत दररोज अहवाल सादर करा, गृह विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींसाठी गृह विलगीकरण संच उपलब्ध करुन द्यावे, पल्स ऑक्सिमिटर सरपंच आणि ग्रामसेवक यांना देऊन वापर करण्याबाबत त्यांना माहिती द्या आदि सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
गावामध्ये मोबाईल रुग्णवाहिका सकाळी आणि संध्याकाळी फिरवून गंभीर रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहचवा, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोठेही खाटांची कमतरता नाही त्यामुळे खाटा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होणार नाही याबाबत विशेष काळजी घ्या अन्यथा संबंधितांवर कडक करण्यात येईल. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराबाबत तक्रारी येता कामा नये, अशा कडक सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
*

राजगृह तोडफोड करणे हे अत्यंत निषेधार्थ ;आरोपींना तात्काळ अटक करा, देवेंद्र फडणवीसांची मागणी

0

मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञातांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला आहे. हे अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटले की, ‘भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे’. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे’ अशी माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या हल्ल्यात घराच्या काचांवर देखील दगडफेक करण्यात आली असून कुंड्यांचेही मोठे झाले आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी दिले आहेत. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागमी सर्व स्तरातून होत आहे. पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांनी घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी दिले आहेत. आरोपींची तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. 

‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, शासनाकडून गंभीर दखल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि.8 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केले आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.