Home Blog Page 2511

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 16 हजार 619

0

पुणे विभागातील 28 हजार 989 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 47 हजार 137 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे:- पुणे विभागातील 28 हजार 989 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 47 हजार 137 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 16 हजार 619 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 632 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.50टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.24 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 39 हजार 395 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 24 हजार 508 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 806 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 640 व पुणे कॅन्टोंन्मेंट 87, खडकी विभागातील 47, ग्रामीण क्षेत्रातील 853, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 80 रुग्णांचा समावेश आहे.  पुणे जिल्हयात  कोरोनाबाधित एकूण 1 हजार 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 853, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 119 व पुणे कॅन्टोंन्मेंट 25, खडकी विभागातील 17, ग्रामीण क्षेत्रातील 45, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 22 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 442 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 240 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 922, सातारा जिल्ह्यात 56, सोलापूर जिल्ह्यात 169, सांगली जिल्ह्यात 15 तर कोल्हापूर जिल्ह्यात 78 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 752 रुग्ण असून 1 हजार 37 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 650आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 4 हजार 99 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 276 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 484 आहे. कोरोना बाधित एकूण 339रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 639 रुग्ण असून 318 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 302 आहे. कोरोना बाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 252 कोरोना बाधीत रुग्ण असून 850 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 377 आहे. कोरोना बाधित एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 44 हजार 652 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 40 हजार 282 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 92 हजार 678 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 47 हजार 137 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.     

बिबवेवाडी येथील कामगार विभागाच्या रुग्णालयाची जिल्हाधिकारी नवल किशोर रामव महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी

0

पुणे: जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज बिबवेवाडी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामगार विमा विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या सोई सुविधांची पाहणी करुन काही त्रूटींची पूर्तता करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच कोविड रुग्णालय गतीने उभे करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
बिबवेवाडी येथे केंद्रीय कामगार कल्याण विभागाच्या वतीने नव्याने उभारणी करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाची जिल्हाधिकारी राम व मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी आ. माधुरी मिसाळ, तहसिलदार तृप्ती कोलते पाटील, डॉ. सुनिल जगताप उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी रुग्णालयातील नव्याने उभारणी सुरू असलेल्या अतिदक्षता विभाग, विलगीकरण कक्ष व अन्य विविध कक्षांची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड 19 च्या उपचारासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी रुग्णालयाला आवश्यक ती सर्व साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, रुग्णालयाचे काम जलद गतीने पूर्ण करा, ऑक्सीजन व्यवस्था तसेच इतरही अत्यावश्यक व्यवस्थांची उभारणीही तत्परतेने करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. तसेच कोविड रुग्णालय उभारणीत सोईसुविधांबाबत ज्या काही आवश्यक सुधारणा करावयाच्या आहेत. त्याबाबत संबंधीत यंत्रणेला सूचना देवून त्याची पूर्तता करुन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आ. माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी येथे कोविड रुग्णालय लवकरात लववकर सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगून या रुग्णालयाची 100
खाटांची क्षमता तसेच अतीदक्षता विभाग, व्हेंटीलेटर्स सुविधाही उभारली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी कामगार विमा विभागाचे प्रमुख अधिकारी, डॉक्टर उपस्थित होते.

उदया 14 जुलै पासून काय सुरु, काय बंद …

0

पुणे ः कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात 13 जुलै मध्यरात्री म्हणजे 14जुलाई ते 23 जुलै दरम्यान लॉकडाऊन जिल्हा प्रशासनाने घोषित केला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात त्याची अंमलबजावणी नेमकी कशी होईल, याचा आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी रविवारी रात्री प्रसिद्ध केला. त्यात उद्योग- आयटी सुरू राहणार असल्याचे म्हटले असून पेट्रोल पंप आणि गॅस पंपही पासधारकांसाठी सुरू राहणार आहेत. तसेच दूध आणि वृत्तपत्रांचे वितरण घरोघरी करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

हे राहणार बंद
– किरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै)
– ऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी
– मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रिडांगणे आदी
– हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल
– सलून, ब्यूटी पार्लर
– शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था
– दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)
– बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)
– मंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी

-सर्व खासगी कार्यालये

हे राहणार सुरू
– पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)
– दूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण
– सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा
– मेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी
– गॅस वितरण
– बॅंका, एटीएम
– माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह

यांना बाहेर फिरता येईल
– डॉक्‍टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार (पोलिस पाससह), जीवनावश्‍यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे (पोलिस पाससह).

राज्यात आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान

0

राज्यात एक लाखावर रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१२ : राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख  १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार ४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातआज१७३ कोरोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंदझाली असूनसध्याराज्यातीलमृत्यूदर४.४ टक्के एवढाआहे.

राज्यात नोंद झालेले १७३ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, ठाणे-६, ठाणे मनपा-२२, नवी मुंबई मनपा-१०, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी-निजापूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-२, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-७, धुळे-२, जळगाव-२, पुणे-५, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-५, जालना-३, लातूर-१, बीड-१, नांदेड-३, अकोला मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (९२,९८८), बरे झालेले रुग्ण- (६४,८७२), मृत्यू- (५२८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,५०४)

ठाणे: बाधित रुग्ण- (६१,८६९), बरे झालेले रुग्ण- (२६,४८९), मृत्यू- (१६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३,७३३)

पालघर: बाधित रुग्ण- (९७४४), बरे झालेले रुग्ण- (४८१७), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७३९)

रायगड: बाधित रुग्ण- (८४५९), बरे झालेले रुग्ण- (३७३१), मृत्यू- (१५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५६७)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८७०), बरे झालेले रुग्ण- (६०१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७)

पुणे: बाधित रुग्ण- (३९,१२५), बरे झालेले रुग्ण- (१६,४२७), मृत्यू- (१०९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६०१)

सातारा:  बाधित रुग्ण- (१७०९), बरे झालेले रुग्ण- (९८१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५९)

सांगली: बाधित रुग्ण- (५९७), बरे झालेले रुग्ण- (३३०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (११२३), बरे झालेले रुग्ण- (८०७), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३९७८), बरे झालेले रुग्ण- (२०७६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५७)

नाशिक: बाधित रुग्ण- (७०८०), बरे झालेले रुग्ण- (३८४७), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९४३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८४८), बरे झालेले रुग्ण- (५२४), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०४)

जळगाव: बाधित रुग्ण- (५८१०), बरे झालेले रुग्ण- (३३३६), मृत्यू- (३४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१२९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

धुळे: बाधित रुग्ण- (१५१७), बरे झालेले रुग्ण- (८३५), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८२१७), बरे झालेले रुग्ण- (४०४२), मृत्यू- (३३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८३७)

जालना: बाधित रुग्ण- (९८३), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३०)

बीड: बाधित रुग्ण- (२२०), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११०)

लातूर: बाधित रुग्ण- (६६४), बरे झालेले रुग्ण- (३२५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०६)

परभणी: बाधित रुग्ण- (२००), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४१), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

नांदेड: बाधित रुग्ण- (५७२), बरे झालेले रुग्ण (२५१), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३८१), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (८२३), बरे झालेले रुग्ण- (६१३), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

अकोला: बाधित रुग्ण- (१८७५), बरे झालेले रुग्ण- (१४६८), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१४)

वाशिम: बाधित रुग्ण- (१७३), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३९९), बरे झालेले रुग्ण- (२०६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४२४), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०२२), बरे झालेले रुग्ण- (१३६६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३५)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१६२), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

एकूण:बाधित रुग्ण-(२,५४,४२७),बरे झालेले रुग्ण-(१,४०,३२५),मृत्यू- (१०,२८९),इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७),ॲक्टिव्ह रुग्ण-(,०३,५१६)

(टीप- ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

लॉकडाऊनच्या घोषणेनेच वाढला डोंगराएवढा धोका ..

0

पुणे- २४ तास पाणी पुरवठा केला तर लोक पाण्याचा साठा करणार नाहीत ,नळावर झुंबड उडणार नाही , कधीही जा ,पाणी मिळेल अशा व्यवस्थेत चिंता कोणाला उरणार नाही म्हणून २४ तास पाणीपुरवठा योजना पुण्यात राबवू पाहणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने हातात हात घालून परवा केलेल्या लॉकडाऊन च्या घोषणेने अखेर नळावर किंवा पाण्याच्या टँकरवर जसा गोंधळ माजतो त्याहून अधिक गोंधळ माजविला आणि कोरोनाला हात पाय पसरविण्यास डोंगराएवढे बळ दिल्याचे आज पुण्यात सर्वत्र दिसलेल्या गर्दीने स्पष्ट दिसून आले आहे .लॉक डाऊन हा कोरोनावर उपाय होऊ शकत नाही ,तुम्हाला खायलाच मिळाले नाही ,बांधून ठेवले तर तुम्ही शत्रूशी लढणार कसे ? यावर हा शत्रू म्हणे वेगळा आहे . घरात बसून राहा आणि त्याला पराजित करा अशी हाकोटी पिटत लोकांचे काम धंदे बंद करत , नौकरी व्यवसाय बुडवून टाकीत लॉक डाऊन चे शस्त्र उपसण्यात आले ..पण ‘कोरोना ने गळे घोटले आणि लॉक डाऊन ने उपाशी मारले ‘ अशी परिस्थिती निर्माण झाली . त्यात गरिबांची परिस्थिती पाहून त्यांना समजावून घेत ,त्यांना कमजोर न करता कोरोनाशी दोन हात करू पाहणाऱ्या प्रशासनातील मराठी अधिकारी आता शहरात उरले नाहीत . अशा अवस्थेत आता उद्या रात्री पासून सुरु होणारा लॉक डाऊन कसा असेल ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे . कोरोना हा इतिहास अधोरेखित करणार तर आहेच पण याच इतिहासातील पुण्यातील लढाई ची हि पाने सुवर्णाक्षरांनी लिहिली जातील असा दावा हि केला जातो आहे.

… नव्या आयुक्तांनी घेतला पदभार

0

पुणे : पुण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारला. पुण्यात उद्या (सोमवार 13 जुलै) मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होणार असल्याने रविवारच्या दिवशीच विक्रम कुमार यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतला.

विक्रम आला, आता वेताळा (कोरोना ) तुझी खैर नाही….?

शेखर गायकवाड यांची कालच पुणे पालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासात आयुक्त भवनात विक्रम कुमार यांनी गायकवाड यांच्या हस्ते पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोना शी लढा हे आव्हान त्यांच्या समोर आ वासून उभे आहे , रविवारीच विक्रम कुमार यांनी पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात केली.

कोरोनाशी लढताना आजवर केलेल्या उपाययोजनांची आणि त्याने झालेल्या परिणामांची कल्पना -यांची माहिती त्यांनी घेतली तेव्हा लॉक डाऊन गरिबांसाठी कोरोनाचा बाप बनला असल्याची, आणि नफेखोरांसाठी वरदान बनला असल्याची कल्पना काहींनी त्यांना दिल्याचे समजते .रोग परवडला पण उपचार नको अशी स्थिती होऊ नये यासाठी घेतलेली काळजी म्हणजे अनलॉक १ होते . रोगाशी लढताना , गनिमी काव्याने जीवन सावरत ,रोगाला हरवत राहावे पण रोगापेक्षा उपचार जालीम ..होऊ नये … अशी भावना त्यांच्याकडे काहींनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठीत

0

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१२ : भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रणजीत माणकेश्वर, प्रा.डॉ.अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत. यासंदर्भात काल आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

समितीचे कार्य असे राहील –

•       आयसीएमआरने रॅपीड ॲण्टी बॉडी चाचण्यांसाठी शिफारस केलेल्या विविध चाचणी प्रणाली, किट यांचा अभ्यास करून त्यापैकी सर्वच अथवा निवडक चाचणी प्रणालीचा आणि किटचा राज्यात वापर करण्याची शिफारस करणे.

•       या चाचण्या पोलिस, आरोग्य सेवेशी निगडीत संवर्ग, स्वच्छता कामगार, तसेच सामान्य जनता यांच्यावर करायच्या की निवडक संवर्गावर करायच्या याबाबत शिफारस करावी.

•       शिफारस केलेल्या चाचण्या व किटच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वारस्य (EOI) मसुदा तयार करून आरोग्य विभागाला सादर करायचा आहे.

अनुपम खेर यांची आई कोरोना पॉझिटिव्ह, भाऊ-वहिनी आणि पुतणीत सौम्य लक्षणे दिसल्यानंतर स्वतःला केले क्वारंटाइन

0

कोरोना विषाणूने आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरातही शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर अभिनेता अनुपम खेर यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनुपम खेर यांची आई दुलारी देवी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. अनुपम खेर यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. सोबतच्या त्यांचा भाऊ, वहिणी आणि पुतणी यांच्यातही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. यानंतर अनुपम यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. 

अनुपम यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “मी तुम्हाला सांगतो की, माझी आई दुलारी देवी कोरोना पॉझिटिव्ह (सौम्य लक्षणे) आढळली आहे. आम्ही त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आहे. माझा भाऊ, वहिणी आणि पुतणी यांच्यातही सावधगिरी बाळगल्यानंतरही सौम्य लक्षणे आढळली. मी स्वतःची चाचणी केली होती आणि माझी चाचणी निगेटीव्ह आली. मी याबाबत बीएमसीला सुचना दिली आहे.”

नवीन टेस्टमध्ये ऐश्वर्या आणि आराध्याही पॉझिटिव्ह, फक्त जया यांचा रिपोर्ट निगेटिव्ह, तीनही बंगले सॅनिटाइज

0

अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर करण्यात आलेल्या एका नवीन टेस्टमध्ये ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते की, रॅपिड टेस्टमध्ये तीनही रिपोर्ट निगेटिव्ह आले होते परंतु नंतर करण्यात आलेल्या टेस्टमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून सामान्य लक्षण सांगण्यात आले आहेत.

कुठून आला नवीन रिपोर्ट
 
मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी संपूर्ण कुटुंबाची तीन वेळेस टेस्ट करण्यात आली. तिसरा टेस्ट रिपोर्ट एका प्रायव्हेट लॅबचा असून त्यानंतर बीएमसीचे असिस्टंट कमिश्नर विश्वास मोटे यांनी या मोठ्या अपडेटची पुष्टी केली आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही नानावटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाऊ शकते. जया बच्चन घरातच क्वारंटाइन राहतील. याव्यतिरिक्त अमिताभ यांची मुलगी श्वेता नंदा, मुलगा अगस्त्य नंदा आणि मुलगी नव्या नवेली नंदा यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला आहे.

तत्पूर्वी सकाळी महापालिकेच्या टीमने अमिताभ यांच्या जलसा बंगल्याव्यतिरिक्त जनक आणि प्रतीक्षा बंगला देखील सॅनिटाइज केला आहे. जलसा बंगल्याशेजारी बंगल्यांमधील रहिवाशांची देखील स्क्रीनिंग करण्यात आली आहे. 

जलसा बंगला प्रतिबंधित क्षेत्र घोषित 

तपासणीनंतर बंगला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. याबाबच एक पोस्टर देखील गेटवर लावले आहे. यानंतर कोणत्याही व्यक्तीला पुढील आदेशापर्यंत बंगल्यात प्रवेश मिळणार नाही. 

अमिताभ आणि अभिषेकचा आरटी-पीईसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

अमिताभ आणि अभिषेक यांचा आरटी-पीईसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या स्टाफ आणि परिवारातील इतर लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान यांच्या नावांचा खुलासा झाला नाही. 

काय आहे आरटी-पीईसीआर टेस्ट?

भारतात कोविड-19च्या चाचणीसीठी आरटी-पीईसीआर आणि रॅपिड अँटीबॉडीज अशा दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. आरटी-पीईसीआर टेस्ट म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन टेस्ट. हे एक लॅब टेक्निक आहे ज्यामध्ये आरएनएच्या डीएनएमध्ये रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन जोडून व्हायरसबद्दल समजते. दुसरे – अँटीबॉडीज टेस्टमध्ये रक्ताचा वापर होते. ज्याद्वारे व्हायरस प्रति शरीराच्या प्रतियेबद्दल माहिती होते. 

15 आमदार सचिन पायलट यांच्या तर पायलट भाजपच्या संपर्कात

0

राज्यसभा निवडणुकीनंतर राजस्थानचे काँग्रेस सरकार अचानक संकटात सापडल्याचे चित्र समोर येत आहे. येथील मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचे आरोप केले आहेत. आमदारांच्या घोडेबाजारात काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटी रुपये देत असताना 2 जणांना अटक करण्यात आली आहे. परंतु, या घडामोडी सुरू असतानाच अचानक उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी आणि त्यांच्या समर्थकांनी सोनिया गांधींची भेट घेतल्याचे वृत्त आहे. एकूणच परिस्थिती पाहता मध्य प्रदेशमध्ये नुकतेच झालेले कथानक राजस्थानातही घडणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दोन्ही युवा नेत्यांना केवळ निवडणुकीत बनवले होते पक्षाचा चेहरा
उल्लेखनीय बाब म्हणजे, मध्य प्रदेश आणि राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने युवा नेत्यांनाच मतदारांसमोर प्रस्तुत केले होते. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, तर राजस्थानात सचिन पायलट प्रचारात काँग्रेसचा चेहरा होते. पण, मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ ज्योतिरादित्य शिंदे नव्हे, तर कमलनाथ यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासूनच मध्य प्रदेशात काँग्रेसला उतरती कळा लागली. हीच गत सचिन पायलट यांची होती. त्यांना देखील राजस्थानात विजयानंतर दुय्यम पद देऊन अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पायलट आणि गहलोत यांच्या वादाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

दोन्ही युवा नेत्यांमध्ये घनिष्ठ मैत्री
ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. याच वर्षी मार्चमध्ये ज्योतिरादित्य भाजपात गेले तेव्हा सचिन पायलट सोशल मीडियावर ट्रेंड करत होते. राजकीय तज्ज्ञांच्या मते, राजस्थानमध्ये गहलोत सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू होत असतील तर त्यामध्ये ज्योतिरादित्य यांची भूमिका असू शकते. कारण, कमलनाथ यांच्या सरकारमध्ये जी परिस्थिती ज्योतिरादित्य यांची होती तीच गत राजस्थानात पायलट यांची आहे. दोन्ही राज्यांमध्ये या युवा नेत्यांचा मुख्यमंत्र्यांसोबत वाद झालेला आहे.

राजस्थानातील पक्षीय बलाबल
राजस्थानात राजकीय परिस्थिती पाहिल्यास काँग्रेसकडे 107 आमदार आहेत. यासोबतच, सरकारला 13 अपक्ष आणि एका राष्ट्रीय लोक दलाच्या आमदाराचे समर्थन आहे. अर्थात गहलोत यांच्याकडे 121 आमदारांचे समर्थन आहे. राज्यसभा निवडणुकीत हे प्रकर्षाने दिसून आले होते. 200 आमदार असलेल्या राजस्थानाच्या विधानसभेत काँग्रेस अतिशय मजबूत असून भाजपकडे केवळ 72 आमदार आहेत. सद्यस्थितीत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आणि 29 आमदार लागतील.

गहलोत यांचे समर्थक असलेले 13 अपक्ष आमदार भाजपकडे गेल्यास तो आकडा केवळ 85 होईल. काही आमदार फोडले तरीही भाजपकडे 100 आमदार होतील. अपक्ष आमदार फुटल्यानंतरही राजस्थान सरकारवर काही परिणाम होणार नाही. राजस्थानात काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी दोन तृतियांश आमदारांना बंडखोरी करावी लागेल. अर्थात पक्षांतर बंदी कायद्यानुसार नियम लागू केल्यास काँग्रेसचे सरकार एवढ्यात कोसळेल असे दिसत नाही. काँग्रेसचे आमदार नाराज असले तरीही त्यांची संख्या किती आहे हे पाहावे लागेल.

ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा धनादेशाऐवजी ऑनलाईन करावा : महावितरण

0

मुंबई, दि.१२ जुलै २०२०: सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बँकेतील कामकाजावर परिणाम झालेला असून वीजबिलांचे धनादेश उशिरा वटत असल्याने वीजग्राहकांनी वीजबिलांचा भरणा करण्यासाठी धनादेशाऐवजी ऑनलाईन पर्यायांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

जून महिन्यात प्रतिबंध क्षेत्र वगळता उर्वरित भागात लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर महावितरणने वीजमिटरचे रीडिंग व वीजबिलांचे वाटप तसेच वीजबिल भरणा केंद्र सुरू केले आहे. जूनमध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांच्या अचूक वीजवापराचे मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात आले आहे. त्याबाबतचा संभ्रम दूर होऊन आता वीजबिल भरण्यास वेग आला आहे. 

ग्राहकांनी धनादेशाद्वारे वीजबिलांचा भरणा केला असेल तर नियमानुसार ज्यादिवशी धनादेश वटविला जाईल त्याच दिनांकाला सदर रक्कम ग्राहकाच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र  लॉकडाऊनमुळे अनेक बँकांमध्ये मनुष्यबळांची संख्या मर्यादित असून  प्रतिबंध क्षेत्रातील बँक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकाने वीजबिलाकरिता धनादेश दिला असेल तर बँकांकडून धनादेश वटविण्यास उशिर होत आहे. वीजबिलांच्या देय मुदतीनंतर धनादेश वटल्यास पुढील महिन्याचे बिल थकबाकीसह येण्याची शक्यता आहे. तसेच काही कारणास्तव धनादेश बाऊंस झाल्यास मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्यासाठी 750 रुपये दंड देखील पुढील वीजबिलात लागू शकतो. यामुळे ग्राहकांना  नाहक त्र꠰स सहन करावा लागू शकतो. 

तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावामध्ये धनादेश जमा करण्यासाठी बँका किंवा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाण्याचा धोका पत्करण्याऐवजी घरबसल्या ऑनलाईन पर्यायांद्वारे वीजबिलांचा भरणा करणे सद्यस्थितीत सोयीस्कर आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईनला प्राधान्य द्यावे. ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी महावितरण मोबाईल अँप तसेच www.mahadiscom.in या वेब साईटचा वापर करावा. याशिवाय वीजबिलांवर  महावितरणच्या बँकेचे छापील तपशील असणाऱ्या ग्राहकांनी आरटीजीएस व एनईएफटीचा वापर करावा असेही आवाहन महावितरणने केले आहे. 

नागरी आरोग्य तपासणीसाठी कदम परिवार कात्रजकरांच्या दारोदारी

0

पुणे-प्रगती फाऊंडेशन आणि प्रतीक कदम यांच्या सयुंक्त विद्यमाने कोरोना चा प्रदूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण कात्रज परिसरातील प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाचे कोरोना पूर्व चाचणी करण्याचे काम सुरु केले आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले कि , टेम्प्रेचर , पल्स स्क्रिनिंग व HPO2 ची तपासणी नागरिकांच्या घरी जाऊन करत आहोत.तसेच प्रत्येक कुटुंबाला स्यानिटांयझर बॉटल , मास्क व अरसिक आल्बम 30 या आयुर्वेदिक गोळ्या ही मोफत वाटप करत आहोत. गेली 10 दिवस आमच्या नर्स व कार्यकर्ते स्वता जीव धोक्यात घालून ही सेवा करत आहेत. या कार्यात पुणे मनपा चे एक ही सेवक किंवा अधिकारी न घेता प्रतिक कदम स्वता उपस्थितीत राहून हे काम युद्धपातळीवर करत आहे.आतापर्यंत 28000 नागरिकांची तपासणी केली आहे. . अंदाजे 12000 घरात मोफत स्यानिटायझर पोचले आहे.
ही अखंड अविरत सेवा कदम परिवार चालू ठेवणार आहे. लवकरच राहिलेला परिसर ही या कार्यात सहभागी केला जाईल. तुमच्या दारी आम्ही तपासणी साठी येत आहोत. काळजी घ्या सुरक्षित रहा.असा संदेश उर्वरित रहिवाशी विभागांना देण्यात आला आहे .

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 16 हजार 483 -एकुण 1 हजार 483 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 27 हजार 931 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 45 हजार 897 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 12 :- पुणे विभागातील 27 हजार 931 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 45 हजार 897 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 16 हजार 483 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 483 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 731 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.86 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.23 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 38 हजार 473 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 23 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 832 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 30, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 820 व पुणे कॅन्टोंन्मेंट 83, खडकी विभागातील 50, ग्रामीण क्षेत्रातील 777, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 72 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 832, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 113 व पुणे कॅन्टोंन्मेंट 24, खडकी विभागातील 15, ग्रामीण क्षेत्रातील 45, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 21 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 558 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.32 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 822 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 509, सातारा जिल्ह्यात 153, सोलापूर जिल्ह्यात 109, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 35 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 696 रुग्ण असून 1 हजार 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 621 आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 3 हजार 930 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 193 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 409 आहे. कोरोना बाधित एकूण 328 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 624 रुग्ण असून 302 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 306 आहे. कोरोना बाधित एकूण 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 174 कोरोना बाधीत रुग्ण असून 835 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 315 आहे. कोरोना बाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 39 हजार 852 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 34 हजार 207 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 645 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 87 हजार 860 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 45 हजार 897 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 12 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

प्रशासनाच्या आणि पुण्याच्या महापौरांच्या सूचना लक्षात घेऊनच लॉकडाउन घोषित -अजित पवार

0

पुणे-प्रशासनाकडून, आणि पुण्याच्या महापौरांकडून आलेल्या सूचनांचा विचार करुनच पुणे, पिंपरी-चिंचवडच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापक लोकहित लक्षात घेवून हा निर्णय घेतला असून तो एकतर्फी नाही अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खासदार गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याची टीका केली होती. एकाही आमदार खासदाराला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचे बापट म्हणाले होते, त्याचा पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना खुलासा केला.पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे लॉकडाऊनची गरज प्रशासनाकडून व्यक्त होत होती. पुण्यातील स्थिती आटोक्यात येण्यासाठी व्यापक विचार करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचे पवार म्हणाले. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिका-यांनाही याची कल्पना होती. काही लोकप्रतिनिधी बरोबर फोनवरुन बोलणे केले होते. पुण्याच्या महापौर यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय एकतर्फी नसल्याचे पवार म्हणाले.

अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चनलाही कोरोनाचा संसर्ग

0

काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती त्यांच्याच ट्विटर हँडलवरुन देण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती समोर येत आहे. फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.