Home Blog Page 2510

बारामती तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी ‘बारामती पॅटर्न’ चा पुन्हा अवलंब करा -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0
  • जिल्हाधिकारी राम यांनी घेतला बारामती तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा


बारामती, : बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी बारामती तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा बारामती पॅटर्नचा अवलंब करावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
बारामती येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे विश्रामगृह येथे बारामती तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्‌व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने अधिक दक्ष राहून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करणे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, प्रसंगी काही लोकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविणे अशी कारवाई आपल्या स्तरावरून करावी. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला तालुका कोरोना विषाणूपासून लवकरच मुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला. तसेच बारामती तालुक्यात कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढविण्यासोबतच कोरोनाबधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर व तपासण्या करण्यावर अधिक भर द्या, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
बारामती शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण, कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात सहकार्य मिळावे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी राम यांनी बारामती शहरातील दोन प्रतिबंधित क्षेत्रास भेटी दिल्या. या भेटी दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व इतर वैद्यकीय सुविधा रोजच्या रोज पुरविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याच बरोबर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या इतर काही अडचणी असल्यास त्या प्रशासनाने तत्काळ दूर कराव्यात. एका कोरोना बाधित रूग्णाच्या मागे कमीत कमी वीस व्यक्तींच्या तपासण्या करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

0

पुणे,: पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच काही ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. आतापर्यत सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत, यापुढेही लॉकडाऊन कडक पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असेही आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे

हॉस्पिटल मधील उपलब्ध बेड, रुणवाहिका व आरोग्यविषयक कोणतीही अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन क्रमांक – 1) तपासणीसाठी डॉ. एन. बी.गोखले- 9422534721/8999951242.

2) कोविड माहिती – 1075 ( केंद्र),104 ( राज्य) किंवा राज्य आरोग्य विभाग (020-26127394) 3) नॉन कोविड आरोग्य ( कोमार्बिड) तातडीचे ( 24×7) डी एम सी सेल – पुणे म.न.पा. (020-25506800, 25506801, 25506802,25506803)
4) कोविड लक्षणे / गृह विलगीकरण/ रुग्णालय प्रवेशाकरीता (24×7)-डी.एम.सी सेल – पुणे म.न.पा. (020- 25506800, 25506801, 25506802, 25506803 किंवा 020- 25506300 (नायडू रुग्णालय).
5) रुग्णवाहिका प्रसुती रुग्णांकरीता – कमला नेहरु रुग्णालय- (020-25508500, 25508609, सोनवणे रुग्णालय – (020-25506100, 25506108) 6) नॉन कोविड रुग्णांकरीता रुग्णवाहीका – 108 ( शासकीय) किंवा 101 पुणे म.न.पा.
7) कोविड रुग्णवाहिका – 108 ( शासकीय) 8) नॉन कोविड शववाहिका – 101 पुणे म.न.पा 9) कोविड शववाहिका – व्हेईकल डेपो – 020-24503211,24503212

बेड उपलब्धतेकरीता – https://www.divcommpunecovid.com/ccsbedddashboard/hsr
इतर तातडीच्या कामाकरीता पुणे म.न.पा.च्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020-25506800 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. तसेच गुगल ॲप वरुन कोविड केअर ॲप डाऊनलोड केल्यास बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती जाणून घेवु शकता.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिक दक्ष राहून काम करणे आवश्यक – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

जिल्हाधिकारी राम यांनी घेतला पुरंदर तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा
• पुरंदर तालुक्यात कोविड केअर सेंटरची संख्या वाढवा
• संस्थात्मक विलगीकरण काटेकोरपणे करा
• कोरोनाबधित रुग्णांचा अधिकाधिक संपर्क शोधण्यावर भर द्या
• कोरोना विषयक जनजागृतीसाठी गावनिहाय नियोजन करा
• अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी कडक कारवाई करा

पुणे, : पुरंदर तालुक्यासह आजूबाजूच्या सर्व भागात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी अधिक दक्ष राहून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करणे, उपद्रव करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, प्रसंगी काही लोकांना संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात पाठविणे अशी कारवाई आपल्या स्तरावरून करावी. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला तालुका कोरोना विषाणूपासून लवकरच मुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला. तसेच पुरंदर तालुक्यात कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढविण्यासोबतच कोरोनाबधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर भर द्या अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
सासवड तहसील कार्यालयात पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, पंचायत समितीच्या सभापती नलीनी लोळे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, जेजुरीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळत, जेजुरीचे मुख्याधिकारी पूनम शिंदे, निवासी नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे, नायब तहसीलदार उत्तम बडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सासवड , जेजूरी शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच संस्थात्मक विलगीकरण, कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात सहकार्य मिळत आहे. गावपातळीवर बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तसेच कोरोना बाधित व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. तसेच होम आयसोलेशनबाबत काय काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटंबाला माहिती देण्यासोबतच कोरोनाबाबत दक्षता घ्या, घाबरू नका, असा सल्ला देण्याचेही त्यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची वाढ करण्यावर भर देणार असल्याचे सांगतानाच कोरोना संसर्गाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी गावनिहाय नियोजन करून जनजागृतीसाठी ध्वनीफित असणारे फिरते वाहन गावात पाठवा तसेच मास्क न वापरणे, लग्नसमारंभात नियमापेक्षा अधीक संख्या तसेच अनावश्यक गर्दी करणा-यांवर कडक कारवाई करा, या कारवाईसाठी भरारी पथक तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता तालुक्यामध्ये कोविड केअर सेंटर, कोविड आरोग्य तपासणी केंद्र वाढवावेत तसेच कन्टेंन्मेंट झोनमधील नागरिकांची प्राधान्याने आरोग्य तपासणी करावी. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तिंचा अत्यंत काटेकोरपणे शोध घेणे आवश्यक आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अत्यावश्यक सेवा व इतर महत्वाच्या कामाशिवाय अनावश्यक गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक वॉर्डनिहाय कोरोना संसर्ग रोखण्याच्या मदतीसाठी पाच स्वंयसेवकांची नेमणूक करणार असून सर्व नियमांचे पालन केले तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश येईल, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी पुरंदर तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण झाली 17 हजार 593

0

पुणे विभागातील 30 हजार 27 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 49 हजार 187 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे:- पुणे विभागातील 30 हजार 27 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 49 हजार 187 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 17 हजार  593आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  624 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  3.19 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 यापैकी पुणे जिल्हयातील 41 हजार 122 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 25 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 553  आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 431, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 1 व पुणे कॅन्टोंन्मेंट 79 , खडकी विभागातील 46 , ग्रामीण क्षेत्रातील 919 , जिल्हा शल्य चिकीत्सक 77 यांच्याकडील  रुग्णांचा समावेश आहे.  पुणे जिल्हयात  कोरोनाबाधित एकूण 1 हजार  रुग्णांचा 112मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 869, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 128 व पुणे कॅन्टोंन्मेंट 27 , खडकी विभागातील 18 , ग्रामीण क्षेत्रातील 47, जिल्हा शल्य चिकीत्सक 23 यांच्याकडील  रुग्णांचा समावेश आहे. तसेच 456 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.91 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.70 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 50 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 727, सातारा जिल्ह्यात 91, सोलापूर जिल्ह्यात 137, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 63 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत  1 हजार 843  रुग्ण असून 1 हजार  66 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 711 आहे. कोरोनाबाधित एकूण 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयातील 4 हजार 236 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 307 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 587 आहे. कोरोना बाधित एकूण रुग्णांचा 342 मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 671 रुग्ण असून 338 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.                      ॲक्टीव रुग्ण संख्या  314 आहे. कोरोना बाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार  315 कोरोना बाधीत रुग्ण असून 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या  428आहे. कोरोना बाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 50 हजार 20 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 45 हजार 397 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 623 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 95 हजार 709 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 49  हजार 187 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.    

( टिप :- दि. 14 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस ग्राह्य मानले जातील

0

पुणे, दि. 13- उद्योग, आस्थापनांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पासेस पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रात येण्या-जाण्यास पात्र राहतील, असे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कळविले आहे.
पुणे जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर झाली असून या कालावधीत उद्योग, आस्थापना, कंपन्यांनी त्यांच्या कामगार, कर्मचाऱ्यांना दिलेले पास पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड
आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात प्रवासासाठी लागू रहातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि कृषी कंपन्या कडक टाळेबंदीच्या
(लॉकडाऊन) काळातदेखील सुरू राहणार आहेत. या कंपन्यांमधील अधिकारी, कामगार यांना रोजच्या प्रवासासाठी पोलीस पासची गरज नसेल, असे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कळविले आहे.
कंपन्यांच्या एचआर (मनुष्यबळ) विभागप्रमुखाने कंपनीच्या लेटरहेडवर वाहन परवाना द्यावा. या परवान्यांची माहिती एचआरने संबंधित पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन प्रभारी यांना द्यावी. कामगार-अधिकाऱ्यांनी कंपनीने दिलेला वाहन परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे. मेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व्यावसायिक, आणि रुग्णवाहिकांना शहरांतर्गत वाहतुकीसाठी वेगळ्या पासची अथवा परवानगीची गरज नाही. तसेच पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते ६ वेळेत शासकीय, अत्यावश्यक सेवेतील तसेच कंपन्यांनी परवानगी दिलेल्या वाहनांसाठी सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा सुरु झालेल्या एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार आहेत. परंतु जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कटेन्मेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, जेजुरी, कुरकुंभ सह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्र सुरु राहतील, ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या सर्व ग्रामपंचायती,
तालुक्याच्या ठिकाणची शेती संबंधित खते, औषधे व अवजारांच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारची निर्बंध घालण्यात आलेले नाहीत.
ग्रामीण भागात नागरिकांनी कामाशिवाय बाहेर फिरु नये, असेही जिल्हाधिकारी राम यांनी आवाहन केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र-चाचण्या वाढविण्यासंबंधी, आरोग्य व्यवस्थेसंदर्भात उपयुक्त सूचना, चर्चेचीही तयारी

0

मुंबई, १३ जुलै
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केल्यानंतर आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवींण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठविले आहे.
यातील मुद्यांवर आपल्याला चर्चा करावी वाटल्यास आपल्याला प्रत्यक्ष भेटून या मुद्यांचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना इत्यादींबाबत प्रत्यक्ष माहिती देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता. या दौर्‍यानंतर तपशीलवारपणे त्यांनी पत्र लिहिले आहे. रूग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेने जाहीर केलेले नाहीत. त्यासंबंधीच्या आकडेवारीची तत्काळ पडताळणी करून ती संख्या जाहीर करण्यात यावी तसेच दि. 10 जुलै 2020 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात मुंबईतील 275 मृत्यू हे अन्य कारणांमुळे झाले, असे दर्शविण्यात आले आहेत. आयसीएमआरने कोणते मृत्यू कोरोनामृत्यू समजावे आणि कोणते नाही, यासंदर्भात अतिशय स्पष्ट दिशानिर्देश दिले आहेत. असे असताना ते अन्य कारणांमुळे झाले असे दाखविणे योग्य नाही. ते कोरोनाबळींच्या संख्येत दाखविण्यात यावेत, या प्रमुख मागण्या त्यांनी केल्या आहेत.
अन्य सूचना पुढीलप्रमाणे :

  • संपूर्ण राज्यात रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याचा नीट अंदाज लावून येणार्‍या काळासाठी आजच पुरेशा प्रमाणात बेड्स आणि ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची सुविधा असणारे बेडस् उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. महापालिका, नगरपालिकांच्या वर्गानुसार, तेथे पुरेशा प्रमाणात व्हेंटीलेटर राज्य शासनामार्फत तातडीने उपलब्ध करुन द्यावेत.
  • राज्यामध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणून रुग्णसंख्या अधिक आहे, हे गृहीतकच मुळात चुकीचे आहे. कारण सर्वाधिक चाचण्यांचा दावा चुकीचा आहे. प्रति दहालाख (टेस्ट पर मिलियन) लोकसंख्येमागे चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे. दि. 10 जुलै 2020 पर्यंत महाराष्ट्रात 12,53,978 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 2,31,468 रूग्ण पॉझिटिव्ह आहेत. प्रारंभीपासूनचा संसर्गाचा दर पाहिला तर तो आता 19 टक्क्यांवर गेला आहे आणि अलिकडे दररोजच्या चाचण्या आणि रूग्णसंख्या पाहिली तर तो जवळजवळ 25 टक्के झाला आहे. देशातील एकूण रूग्णसंख्येत महाराष्ट्राचा वाटा 30 टक्के तर मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा वाटा 44.62 टक्के इतके भीषण आहे. कोरोना मोठ्या प्रमाणात शिरकाव करतोय आणि अशावेळी चाचण्या हाच एकमात्र उपाय आहे, हे आतातरी मनाची पक्के ठरविण्याची वेळ आली आहे. अजूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रीत केले नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे चाचण्यांची पूर्ण क्षमता वापरावी.
  • रूग्णांना वेळेत वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक आहे. केवळ विविध रूग्णालयात चकरा मारणे आणि कुणीही त्याला दाखल करून घेण्यास तयार नसणे, यातून रूग्ण दगाविण्याचे प्रमाण राज्यात अधिक आहे. टेंभासारख्या ठिकाणी 14 तास, मुंबईत 30 तास रूग्णांना प्रवेश न मिळणे अवघड आहे. रूग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे, हेही एक मोठे आव्हान आरोग्यव्यवस्थेपुढे उभे झाले आहे.
  • मनुष्यबळ कुठेही परिपूर्ण नाही. परिणामी गेल्या 128 दिवसांपासून अहोरात्र काम करणार्‍या यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. केवळ 30 ते 40 टक्के क्षमतेत आरोग्यव्यवस्था जीवाचे रान करते आहे. अशावेळी खाजगी रूग्णालयांशी जो समन्वय हवा, तोही दिसून येत नाही. त्यामुळे सरकारी रूग्णालयातील अनागोंदी अवस्था पाहून तेथे रूग्ण जाण्यास तयार नाही. खाजगीत प्रचंड मोठी लूट असल्याने तेथेही सामान्य माणूस जाण्यास धजावत नाही, त्यामुळे रूग्णाच्या कुटुंबीयांपुढे मोठा पेच निर्माण होतो. सध्या अनेक ठिकाणी राज्य सरकारतर्फे सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. पण, तंबू आणि खाटा असे स्वरूप केवळ असून चालणार नाही. तर तेथे सुविधा निर्माणाचे काम सुद्धा करावे लागणार आहे. (उदा. अग्रवाल हॉस्पीटलमधील काही डॉक्टर्सना महापालिकेच्या शेजारी सेनरुप इमारतीजवळ एका अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे डॉक्टर्सना ना वेतन वेळेत दिले जाते, ना दोनवेळचे भोजन. अशा मानसिकतेतही ते रूग्णसेवा देत आहेत.)
  • कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असणार्‍या शहरातील व जिल्ह्यात सध्या उपलब्ध रुग्णवाहिका या वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशा नाहीत. त्याही आवश्यकतेनुसार तत्काळ उपलब्ध करुन द्याव्यात तसेच सामाजिक संघटनांची सुद्धा मदत घेऊन रुग्णवाहिकांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी.
  • अ‍ॅक्टमेरा, रेमडेसिवीर ही औषधे बाजारात उपलब्ध होत नाहीत. त्याचा सर्रास काळाबाजार केला जातोय. ही औषधे तत्काळ आणि सहज उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी.
  • राज्यभरात उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये (क्वारंटाईन सेंटर) बर्‍याच ठिकाणी वेळेत पाणी, जेवण मिळत नाही. परिणामी तेथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने आता कोणतेही नागरिक विलगीकरण कक्षात जाण्यास तयार होत नाहीत. परिणामी रोगाचा प्रादुर्भाव जो सहज टाळता येऊ शकतो, तो टाळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे अशा केंद्रांना वारंवार भेटी देऊन, तेथील व्यवस्थांचा आढावा घेत, कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. दोनवेळचे जेवण आणि चहा वेळेत मिळेल, हे सुनिश्चित करण्यात यावे.
  • कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 30 ते 45 वयोगटातील व्यक्तीचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ही बाब चिंताजनक आहे. याबाबत तज्ञांकडून योग्य त्या सूचना घेण्यात याव्यात.
  • कोविडला प्राधान्य देताना नॉन-कोविड रुग्णांकडे मोठे दुर्लक्ष होतय्. अर्थात कोरोनाकडे लक्ष देण्याला प्राधान्य असलेच पाहिजे. पण, त्यामुळे इतर रूग्णांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याही मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नॉन-कोविड रुग्णालये सुद्धा योग्यप्रमाणात उपलब्ध असतील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. उदा. नवी मुंबई येथे नॉन-कोविड रुग्णांची मोठया प्रमाणात हेळसांड होते आहे.
  • मृतदेहांची अदलाबदल होण्यामुळे एकाच कुटुंबाला दोन वेळा अंत्यसंस्कार करावा लागण्याचा ठाण्यातील प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटेल किंवा त्यासंदर्भातील नोंदी नीट ठेवल्या जातील, अशी व्यवस्था करणे अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारांना संबंधित कुटुंंबाला होणारा मानसिक त्रास हा फार भीषण आहे. (ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये गायकवाड यांचा मृतदेह सोनावणे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांनी अंत्यसंस्कार केले. नंतर सोनावणे हे जिवंत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुन्हा त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगून मृतदेह त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. अशाप्रकारचा हेळसांडपणा योग्य नाही.)
  • आपल्या रुग्णाचे काय होतेय्, हे जाणून घेणे त्यांच्या कुटुंबीयांचा हक्क आहे. शिवाय, कोविडच्या स्थितीत त्याची ख्यालीखुशाली कळण्याचे एकमेव माध्यम हे सीसीटीव्ही आहे. त्यामुळे टॅगिंगची व्यवस्था करुन बाहेरच्या स्क्रीनवर त्याला पाहता येईल, अशी व्यवस्था तातडीने करायला हवी. अनेक दिवस आपल्या रूग्णाचे नेमके काय होतेय् हे नातेवाईकांना समजत नाही. त्यामुळे रुग्णाची व रुग्णांच्या नातेवाईकांची अस्वस्थता कमी करता येईल.
  • खाजगी हॉस्पीटल अवाजवी शुल्क आकारतात, गरीबांच्या तर ते आवाक्याबाहेरचे आहे. खाजगी रूग्णालयातील शुल्काचे ऑडिट करण्याची व्यवस्था राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उभारण्यात यावी. काही महापालिकांनी तर रूग्णाला सुटी मिळण्याच्या आधीच ऑडिट करण्याची पद्धत स्वीकारली आहे. या पद्धतीचा अन्य महापालिकांमध्ये सुद्धा अवलंब करता येईल. रूग्णालयांचे तात्पुरत्या तत्वावर महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत नोंदणी शक्य आहे. ती केल्यास अनेक गरिबांना या योजनेचा लाभ देता येईल. खाजगी रूग्णालयांच्या शुल्क आकारणीसंदर्भात जो शासन आदेश जारी करण्यात आला, त्यात ज्यांचे नियमन करायचे ती यादी छोटी आहे आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या बाबींची यादी मोठी आहे, त्यामुळे लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. हा आदेश तातडीने बदलण्याची गरज आहे.
  • एमएमआर क्षेत्रातील जे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईत येतात, त्यांची निवास/भोजन व्यवस्था मुंबईत करण्यात यावी. त्यामुळे त्यांच्या आवागमनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळेल. त्यांना चांगली सुविधा व या कठीण काळात सेवा देत असल्याबद्दल प्रोत्साहनपर भत्ता द्यावा.
  • डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस आदी कोविड योद्ध्यांना कोरोना झाल्यास त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यांच्यावर उपचारासाठी वणवण भटकण्याची पाळी येऊ नये. त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत.
  • लोकप्रतिनिधी/सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी हे प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करीत असल्याने त्यांना जनतेच्या समस्या अधिक प्रमाणात कानावर येत असतात. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्यांना विश्वासात घेऊन, समन्वयातून काम केले, तर या समस्येवर मात करणे अधिक सोपे होणार आहे. मात्र सध्या त्याचा पूर्णत: अभाव दिसतो. त्यामुळे प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवाचे प्रशासनाला नीट आकलन होत नाही आणि त्याचा दुष्परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतो.
  • एमएमआर कार्यक्षेत्रात आयएएस अधिकार्‍यांच्या सातत्याने बदल्या होत आहेत. अशास्थितीत प्रशासकीय यंत्रणा सातत्याने बदलली जाणे, प्रशासनाच्या दृष्टीने योग्य नाही. नव्या ठिकाणी पुन्हा नव्याने त्या अधिकार्‍याला सुरुवात करावी लागते, त्याचा प्रशासनावर, कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
  • काही ठिकाणी मास्कचा सक्तीने वापर होत नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कंटेनमेंट झोनचे योग्य नियोजन नाही. याकडे कटाक्षाने लक्ष देऊन नियोजन करण्यात यावे.
  • खरेदीचे अधिकार स्थानिक पातळीवर देऊनही काही ठिकाणी वेळेत खरेदी होत नाही, तर काही ठिकाणी चुकीची व अवाजवी दराने खरेदी केली जाते, उदा. मास्क खरेदी. एन 95 मास्कचा शासनमान्य दर 18 रुपये असताना अनेक ठिकाणी ते 50 ते 180 रुपयांनी खरेदी करण्यात आले. याची चौकशी व्हावी आणि शासकीय निधीचा सुयोग्य विनियोग होईल, हे सुनिश्चित करावे. ग्रामीण भागात तालुकास्तरावर ऑक्सिजन/व्हेंटीलेटर सुविधांसह रुग्णालय असावे. तसेच रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात. (काही मोठया शहरात रूग्णवाहिका नाहीत. जळगावसारख्या शहरात केवळ 1 रूग्णवाहिका आहे.)
  • सामाजिक सलोखा राखून सद्भाव निर्माण व्हावा याकरिता सामाजिक समुपदेशाची आवश्यकता आहे. यातून वातावरण सुदृढ होईल. (उदा. मालेगाव पोलिस अधीक्षकांनी राबविलेला उपक्रम अतिशय चांगला आहे.)
  • मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये समन्वय असणे अतिशय गरजेचे आहे. त्यानुषंगाने सर्व संबंधितांना सूचना देणे आवश्यक आहे.

आता तरी मातंग समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व द्या :  (व्हिडीओ) 

महाविकास आघाडीला राज्यभरातून  ‘मातंग स्पीक्स’ चे आवाहन  
पुणे- विधानपरिषदेत सर्वपक्षांनी सर्व जाती धर्माच्या सदस्यांना संधी मिळावी अशी घटनेत तरतूद असतानाही आजवर मातंग समजाला विधानपरिषदेवर संधी मिळालेली नाही , याकडे लक्ष वेधत आता तरी राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी आज अलका चौकात सर्वपक्षीय मातंग समाजाच्या युवा नेत्यांनी केली आहे . कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे,आरपीआय चे हनुमंत साठे , शिवसेनेचे बाळासाहेब भांडे तसेच अन्य कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध रीतीने निदर्शने करत महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला . ‘मातंग स्पीक्स’ च्या माध्यमातून राज्यभरातील ८ लाख मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी विविध शहरातून महाविकास आघाडी कडे गाऱ्हाणे मांडून लक्ष वेधून घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील   कॉग्रेस ,भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ,आरपीआय अशा सर्व पक्षीय मातंग नेत्यांनी पत्रकार परिषेदत या पूर्वीच विधान परिषदेत मातंग समाजाला प्रतिनिधित्व का नाही? असा सवाल उपस्थित करीत कोणत्याही पक्षाचा घ्या पण १ मातंग समाजाचा प्रतिनिधी विधानपरिषदेवर घ्या अशी मागणी केली होती .
 १ मे १९६० पासून विधानपरिष देवर नियुक्त्या करताना मातंग समाजाकडे दुर्लक्ष झालेले आहे . आता तरी सरकारने या समाजाला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी आज पुन्हा करण्यात आली आहे. 

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0

मुंबई, : राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव आणि अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात आढावा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी निर्णय जाहीर केला. श्री. सामंत म्हणाले, परीक्षा घेऊच नये अशी शासनाची भूमिका नाही. तर राज्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता अशा परिस्थितीत आत्ता परीक्षा घेणे योग्य होणार नाही ही शासनाची भूमिका आहे.

सर्व १३ अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी या परिस्थितीत परीक्षा घेणे उचित होणार नाही हे शासनाला लेखी कळवले आहे. त्याचबरोबर पालक आणि शिक्षक यांचा देखील लगेच परीक्षा घेण्यास विरोध आहे. त्यामुळे अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा आत्ता लगेच घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. युजीसी जर मार्गदर्शक तत्वे आम्हाला देते तर जबाबदारीही घेणार काय? असा प्रश्नही श्री. सामंत यांनी यावेळी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांना योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा आणि पुढे कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परिस्थिती सुधारल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला गुण कमी मिळाले आहेत असे वाटते त्यांना परीक्षेची संधी देण्यात येईल.

मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील/वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल घोषित करावा. आणि मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील/वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील, याची कोविड – १९ चा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन, तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा आपत्ती निवारण प्राधिकरण यांचेशी विचारविनिमय करुन विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे. अशा सूचना सुद्धा विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

परीक्षा घ्यायच्या म्हणाल्या तर अनेक शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आज विलगीकरण केंद्रे म्हणून उपयोगात येत आहेत. गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत वसतिगृहात परत येणे वाहतुकीच्या व्यवस्थेअभावी अवघड आहे. शिवाय त्यांची सर्व पुस्तके, संगणक साहित्य त्यांच्या वसतिगृहात अडकले आहेत. नुकतेच बंगळूरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ज्या राज्यांनी परीक्षा रद्द केल्या आहेत त्या ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

प्लाझ्मा थेरपीसंदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान! गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई, – कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’कोविड -१९ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी (डोनेशन) मोहीम सुरू केली आहे.

प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरपी महाग आहे. काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत.

प्लाझ्मा दान करण्यासाठी कोविड मधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये गरजू रुग्णांकडून घेतले जाऊ शकतात.

सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्रीसंदर्भात फसवणूक होऊ शकते. त्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईलच. तथापि सर्व संबंधित लोकांनी या प्लाझ्मा थेरपी उपचाराबाबत जागरूक रहावे, सावध असावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी. नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतींवरच अवलंबून असले पाहिजे.

जर या संदर्भात काही फसवणूक होत असेल तर कृपया आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवा. तसेच http://www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

मुंबई, : राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १९३ मृत्यू हे मुंबई मनपा-४७, ठाणे-५, ठाणे मनपा-२३, नवी मुंबई मनपा-७, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी-निजामपूर मनपा-४, वसई-विरार मनपा-६, पनवेल मनपा-५, नाशिक-१, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-५, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-५, सोलापूर-१,सोलापूर मनपा-६, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-२,औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-२, लातूर-२, उस्मानाबाद-३, अकोला-२,अमरावती-१, वाशिम-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील           

मुंबई: बाधित रुग्ण- (९४,१४६), बरे झालेले रुग्ण- (६५,६२२), मृत्यू- (५३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८९), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९००)

ठाणे: बाधित रुग्ण- (६३,७७८), बरे झालेले रुग्ण- (२७,६४२), मृत्यू- (१६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,४३०)

पालघर: बाधित रुग्ण- (१०,०७८), बरे झालेले रुग्ण- (४९६७), मृत्यू- (१९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९१७)

रायगड: बाधित रुग्ण- (८८६५), बरे झालेले रुग्ण- (४१७४), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (८८४), बरे झालेले रुग्ण- (६१०), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

पुणे: बाधित रुग्ण- (४०,१८०), बरे झालेले रुग्ण- (१६,८५७), मृत्यू- (११२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,१९६)

सातारा:  बाधित रुग्ण- (१७८०), बरे झालेले रुग्ण- (१०२८), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८३)

सांगली: बाधित रुग्ण- (६२२), बरे झालेले रुग्ण- (३५०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२२०), बरे झालेले रुग्ण- (८२२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (४३१३), बरे झालेले रुग्ण- (२१६१), मृत्यू- (३५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८००)

नाशिक: बाधित रुग्ण- (७३१६), बरे झालेले रुग्ण- (४२०९), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८०७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (८९४), बरे झालेले रुग्ण- (५५६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६)

जळगाव: बाधित रुग्ण- (६०३०), बरे झालेले रुग्ण- (३५०८), मृत्यू- (३५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१६९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

धुळे: बाधित रुग्ण- (१५२३), बरे झालेले रुग्ण- (८६०), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (८४३२), बरे झालेले रुग्ण- (४३०४), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८७)

जालना: बाधित रुग्ण- (१०८३), बरे झालेले रुग्ण- (५७१), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६५)

बीड: बाधित रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (११८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)

लातूर: बाधित रुग्ण- (७१९), बरे झालेले रुग्ण- (३३६), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८)

परभणी: बाधित रुग्ण- (२१४), बरे झालेले रुग्ण- (१०३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण- (२७९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)

नांदेड: बाधित रुग्ण- (६०६), बरे झालेले रुग्ण (२५२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३९५), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२)

अमरावती: बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (६४०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१)

अकोला: बाधित रुग्ण- (१८७६), बरे झालेले रुग्ण- (१४९८), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (४११), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (२९१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४३)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०३४), बरे झालेले रुग्ण- (१३८७), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२५)

वर्धा: बाधित रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१६२), बरे झालेले रुग्ण- (८९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२१६), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१७७), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (११५), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (२०२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७१)

एकूण: बाधित रुग्ण-(२,६०,९२४), बरे झालेले रुग्ण-(१,४४,५०७), मृत्यू- (१०,४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९८),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,०५,६३७)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)

बिबवेवाडीत तातडीनेकोविड सेंटर सुरू कराआमदार माधुरी मिसाळयांची मागणी

0

पुणे,- बिबवेवाडीतील वाढती कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (र्इएसआयसी) रुग्णालयात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ११० बेडचे कोविड सेंटर तातडीने सुरू करावे अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.

आमदार मिसाळ यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत आज रुग्णालयातील सोयीसुविधांची आणि तयारीची पाहाणी केली. तहसिलदार तृप्ती कोलते पाटील, डॉ. सुनील जगताप यावेळी उपस्थित होते.

मिसाळ म्हणाल्या, ‘या रुग्णालयात ११० बेड तयार आहेत. अतिदक्षता विभागात १० बेडची व्यवस्था आहे. शस्त्रक्रियेसाठी २ आणि शस्त्र क्रियेनंतरच्या उपचारांसाठी ४ बेड उपलब्ध आहेत. अतिदक्षता विभाग, नवजात शिशुंसाठी अतिदक्षता विभाग, इंटेनसिव्ह केअर विभागासाठी एकूण ३१ बेड आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलायटरसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. कोविड चाचण्या, विलगीकरण कक्ष आदी सुविधा देता येतील. यासाठी मी गेले पंधरा दिवस सातत्याने पाठपुरावा करीत आहे. हे सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.’

कोविड 19 च्या उपचारासाठी आवश्यक असणा-या सर्व वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, रुग्णालयाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात येर्इल असे आश्वासन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली. 

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याकरता सामुहिक आचारसंहिता ठरविणार-राजेंद्र निंबाळकर

0

पुणे- कोरोन विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्या करिता सकारात्मक सह्भागासठी सामुहिक आचासंहिता ठरवणार असल्याची माहिती विशेष नेमणुकी वरील समन्वय अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी दिली

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांचे अध्यक्षतेखाली दि.13/07/2020 रोजी बैठक विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली.सदर बैठकीस या विषयाकरीता विशेष नेमणूक केलेले समन्वय अधिकारी श्री. राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे हे निमंत्रक म्हणून उपस्थित होते

सदर बैठकीमध्ये पुणे शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्याकरिता गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, विशेष पोलीस अधिकारी, एनजीओ यांचे लोकसहभागातून जनजागृती व जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रित करणे. नागरिकांकडून सॅनिटायझर व मास्कस चा वापर होणे, सोशल डिशटंसिंग राखणे, विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणे, जास्तीत जास्त नागरिकांची अँटीजेन टेस्ट करणे, कान्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये सहाय्य्य घेणे या प्रमुख बाबींचा समावेश असेल.
त्याचबरोबर घरी विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे व त्यांना सहाय्य करणे.
प्रत्येक वॉर्ड ऑफिस ला उपलब्ध करून दिलेल्या रुग्ण ऍम्ब्युलन्स चा वापर रुग्णांना टेस्टिंग करीता ने आन करणे व रुग्णांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्याकरिता प्रभावीपणे वापर करणे., झोपडपट्टी क्षेत्रातील सार्वजनिक स्वछतागृहे यांची स्वछता यावर लक्ष देणे,
लॉकडाऊन च्या कालावधीत गरजू नागरिकांना विषेत: बेघर, विध्यार्थी यांची भोजनाची व्यवस्था करणे. या स्वरूपाचे कामे लोकसहभागातून प्रभावीपणे करणे आवश्यक असल्याचे श्री राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी श्री महेश सूर्यवंशी यांनी या कोरोना आपत्कालीन काळात शहरातील सर्व गणेश मंडळ प्रशासनाला सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले.

तसेच श्री धीरज घाटे यांनी प्रशासनाने गणेशोत्सव कार्यकर्ते प्रशासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्य करतील असे सांगितले.

श्री हेमंत रासणे यांनी शहरात रुग्णांना विविध रुग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती नागरिकांना होणेकरिता डॅशबोर्ड सर्व नागरिकांना पाहता यावी अशा सूचना दिल्या.

यावेळी श्री. दीपक म्हैसेकर विभागीय आयुक्त हे प्रशासन कोरोना नियंत्रणाकरिता कठोर परिश्रम करत असून प्रशासनाला गणेशोत्सव कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत लोकसहभागातून जनजागृती केल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे नमूद केले.

या बैठकीस श्री. माधव जगताप, उपआयुक्त पुणे मनपा, तसेच श्री हेमंत रासने अध्यक्ष स्थायी समिती पुणे मनपा, श्री धीरज घाटे, सभागृह नेते , भाजपा, श्री महेश सूर्यवंशी, दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्ट, श्री विवेक खटावकर, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ, श्री.प्रवीण परदेशी, गुरुजी तालीम मंडळ, श्री पुनीत बालन, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ, श्री श्रीकांत शेटे, अध्यक्ष कसबा गणपती, श्री प्रशांत टिकार, तांबडी जोगेश्वरी मंडळ,श्री जगताप उदय आदर्श मित्र मंडळ, श्री शिरीष मोहिते, सेवा मित्र मंडळ आणि डॉ पियुष लाठी स्वामीनारायण मंदिर हे उपस्थित होते.

समन्वयाने काम करुन हवेली तालुक्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी करुया जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0
  • हवेली तालुक्यातील सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साधला संवाद
  • प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी करा
  • गृह अलगीकरण, संस्थात्मक अलगिकरणावर प्रभावीपणे कार्यवाही करा

पुणे,: कोरोना प्रतिबंधासाठी महसूल, पोलीस व जिल्हा परिषद विभागाने समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना देऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून हवेली तालुक्यातील कोरोनाचा रुग्णदर कमी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील काही गावे प्रतिबंधित करण्यात येत आहेत, याअनुषंगाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, हवेली तालुक्यातील सरपंच, संबंधित तहसीलदार, समन्वय अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व संबंधितांसोबत बैठक घेवून चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर तसेच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हवेली तालुक्यातील गावांमध्ये आतापर्यंत आढळलेले कोरोनाचे रुग्ण, झालेले मृत्यू, ऍक्टिव रुग्ण, बरे झालेले रुग्ण यांची ग्रामपंचायत निहाय सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. राम यांनी घेतली. ते म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची चोखपणे अंमलबजावणी करावी. प्रतिबंधित क्षेत्रात जनजागृती करण्याबरोबरच नियम कडक राबवावे. यात लोकसहभाग देखील आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

अधिक रुग्ण असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, ग्रामीण आरोग्य सेवा-सुविधा सक्षम करण्यासाठी, तसेच साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. नऱ्हे, देहू अशा मोठ्या गावांमध्ये स्वॅब तपासणी केंद्र लवकरात लवकर सुरु करावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे करावे. गृह अलगिकरण, संस्थात्मक अलगिकरणावर लक्ष द्यावे. रुग्ण वाढत असणाऱ्या ठिकाणी कोविड केअर सेंटर वाढवण्यासाठी नियोजन करुन कार्यवाही करा. अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्या, जेणेकरुन दोषींवर कारवाई करता येईल, असे सांगून गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना वेळोवेळी भेटी देऊन समन्वय साधून काम करावे, सगळे मिळून काम करुया आणि कोरोनावर नियंत्रण मिळवूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपाययोजना, उपलब्ध मनुष्यबळ, नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विषयक सेवा सुविधा यांचाही त्यांनी आढावा घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी. टीम वर्क म्हणून सगळे मिळून काम करुन कोरोनाचा फैलाव रोखुया, असे ते म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रात सर्व्हेक्षण करण्यावर भर द्यावा. गावात ठराविक कुटुंबनिहाय एक असे समन्वय अधिकारी नियुक्त करुन बाधित व्यक्ती, संपर्कात आलेले व्यक्ती व सद्यपरिस्थितीची माहिती अद्ययावत ठेवा, असे सांगून मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून दंड आकारणी करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत उपस्थित सरपंच, व अधिकाऱ्यांनी उपाययोजना राबविताना येणारे अनुभव व आवश्यक सहकार्य याबाबत माहिती दिली.

कोरोना संसर्ग प्रतिबंधाकरीता लोकसहभाग महत्त्वाचा -विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

0

पुणे: – कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरात प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजना राबविताना लोकसहभाग महत्तवाचा असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासंबंधी आज पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख तसेच विशेष पोलीस अधिकारी यांची विधानभवनाच्या झुंबर हॉलमध्ये विभागीय आयुक्त् डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कोरोना संसर्ग उपाययोजना संनियंत्रण अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तहसिदार विकास भालेराव, पुणे म.न.पा. परिमंडळ क्र.5 चे उप आयुक्त अविनाश सकपाळ, माधव जगताप, सहा.आयुक्त् आशिष महाडदकर,सोमनाथ बनकर, दयानंद सोनकांबळे तसेच प्रमुख गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मंडळांमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोणत्याही संकटसमयी कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन मदत करण्याचा असतो. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरीकांना वेगवेगळया प्रकारची मदत या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली आहे. स्थानिक नागरिकांचा मंडळाच्या कार्यकर्त्यावर विश्वास असतो. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आव्हानांबाबत तात्काळ आणि प्रभावीपणे जनजागृती करता येणे शक्य होते. त्यामुळेच त्यांचा सहभाग महत्तवाचा ठरतो.येणारा काळ हा प्रत्येकाची परीक्षा पहाणारा असणार आहे. त्यामुळे जनतेच्या समन्वयातूनच आपण परिस्थि्ती हाताळू शकतो. याकरीता जास्त जास्त गणेशमंडळाचा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, प्रशासनाकडून देण्यात येणारी माहिती व सूचना हया या कार्यकर्त्यामार्फत् नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी व्हॉटसअप ग्रुप तथा इतर माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या.

यावेळी या पदाधिका-यांमार्फत काही महत्वाच्या सूचना करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय साधनसामग्रीचा पुरवठा, विलगीकरणाकरीता जागा, बेड व वैद्यकीय अधिका-यांची सेवा पुरविण्याकरीता प्रशासनाला मदत करण्याचीही तयारी दर्शविण्यात आली. कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य गणेशोस्तव मंडळांच्या कार्यकर्त्यांना असल्याचे आणि पहिल्या दिवसापासून याबाबत पोलीस, महानगरपालिका, प्रशासनाला मदत करण्यात आल्याचे सांगितले. यापुढील कालावधीमध्ये करावयाच्या मदतीविषयी प्रशासनाने सूचना केल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. यापूर्वीच्या बैठकांमध्ये केलेल्या सूचनांबाबत विभागीय आयुक्तांकडून दखल घेण्यात आली  व काही सूचनांवर तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल त्यांनी विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांचे आभार मानले. तसेच कोरोनाच्या संकटाच्या कोणत्याही आवाहनावेळी प्रशासनाबरोबर राहू,अशी ग्वाही दिली.
विभागीय आयुक्त् डॉ.म्हैसेकर यांनी या कार्यकर्त्याच्या सकारात्मक भूमिकेबाबत त्यांचे कौतुक केले तसेच यापुढील काळात समन्वयाने हे संकट निभावून नेऊ, असा विश्वास व्यक्त् केला.

पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार

0

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घटटे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.
विशेष कार्य अधिकारी सौरभ राव म्हणाले, व्यापारी, दुकानदार हे अर्थ्व्यवस्थेचे मुलभूत स्त्रोत आहेत, परंतू दुकानात होणा-या गर्दीमुळे तसेच सुरक्षित अंतर पाळले जात नाही, मास्कचा वापरही दिसत नाही, यामुळे कोरानाबाधितांची संख्या वाढते आहे. कोणत्याही व्देषभावनेतून व्यापारी बांधवांवर कारवाई करण्यात येत नसून पुणे शहर व जिल्हयाला कोरोना संकटातून वाचविण्यासाठी व कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. पुणे व्यापारी महासंघाची कायम सहकार्याची भूमिका राहीली आहे, यापुढेही आपण कोरोनाच्या उच्चाटनासाठी मिळून काम करू व नक्कीच कोरोनाचे समूळ उच्चाटनासाठी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने कायम शासनाला सहकार्य केले आहे. लॉकडाऊनबाबतही सहकार्य अपेक्षित आहे. व्यापारी महासंघाच्या अडचणीबाबत प्रशासनाचीही कायम सहकार्याची भूमिका राहीली आहे, यापुढेही कायम सहकार्याची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो आहे. दुकानासमोर वस्तू खरेदी करण्यासाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. त्यामुळे पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त् श्रावण हर्डीकर म्हणाले, लॉकडाऊनची आपण सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी पुणे शहरात व्यापारी वर्गावर 10 लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे, लॉकडाऊनमुळे व्यापा-यांना आर्थिक अडचणी येत आहेत. व्यापारी वर्गाच्या अडचणी समजावून घेत त्यावर उपाययोजना करा, आम्ही शासनास सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना संसर्गचा वाढता धोका विचारात घेत पहिल्या पाच दिवसानंतर पुढील पाच दिवसासाठी लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता आणता येईल याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.