Home Blog Page 2503

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख

0

पुणे, दि. 25- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख यांनी कोरोना आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली.
पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपीतांकरीता केलेल्या “ExTra” (Tracking of Externees) अॅपची माहिती दिली.
पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या इसमास त्याने पुन्हा पुणे शहरात येवुन गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता “ExTra” (Tracking of Externees) अॅप
विकसित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे. या अॅपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हद्दपार गुन्हेगारावर निगराणी / देखरेख करणे सोयीस्कर होईल. कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य होईल. हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होवून पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील नमुद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवू शकतील, असे बच्चन सिंग यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी “स्मार्ट पोलिसिंग” बाबत माहिती दिली. बैठकीस इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आज राज्यात कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान ,१ लाख ४३ हजार ७१४ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.२४: राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख  ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३  हजार ७१४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ८७  हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७  हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६८ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २७८  मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील      

मुंबई: बाधित रुग्ण- (१,०६,९८०) बरे झालेले रुग्ण- (७८,२५९), मृत्यू- (५९८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,४४३)

ठाणे: बाधित रुग्ण- (८३,१८९), बरे झालेले रुग्ण- (४३,७७७), मृत्यू- (२२४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७,१६२)

पालघर: बाधित रुग्ण- (१३,५४३), बरे झालेले रुग्ण- (७७५२), मृत्यू- (२८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५०२)

रायगड: बाधित रुग्ण- (१३,६०५), बरे झालेले रुग्ण-(८०६०), मृत्यू- (२५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८६)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१४२८), बरे झालेले रुग्ण- (८००), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३०६), बरे झालेले रुग्ण- (२४७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

पुणे: बाधित रुग्ण- (६९,९१९), बरे झालेले रुग्ण- (२४,४१५), मृत्यू- (१६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३,८३८)

सातारा:  बाधित रुग्ण- (२८६२), बरे झालेले रुग्ण- (१५८०), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८५)

सांगली: बाधित रुग्ण- (१२३०), बरे झालेले रुग्ण- (५९०), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३२१३), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (७२५१), बरे झालेले रुग्ण- (३३४०), मृत्यू- (४२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४८१)

नाशिक: बाधित रुग्ण- (११,७४०), बरे झालेले रुग्ण- (६४७८), मृत्यू- (४०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२५७४), बरे झालेले रुग्ण- (११३८), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८८)

जळगाव: बाधित रुग्ण- (८७४६), बरे झालेले रुग्ण- (५७८२), मृत्यू- (४५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४९१), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३८)

धुळे: बाधित रुग्ण- (२२८७), बरे झालेले रुग्ण- (१४३८), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (११,२४६), बरे झालेले रुग्ण- (६०३९), मृत्यू- (४३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७७६)

जालना: बाधित रुग्ण- (१६१०), बरे झालेले रुग्ण- (७६१), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८५)

बीड: बाधित रुग्ण- (४७८), बरे झालेले रुग्ण- (१८९), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२७५)

लातूर: बाधित रुग्ण- (१३५८), बरे झालेले रुग्ण- (६४९), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९)

परभणी: बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (४९९), बरे झालेले रुग्ण- (३२८), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२)

नांदेड: बाधित रुग्ण- (११४२), बरे झालेले रुग्ण (५३३), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६१९), बरे झालेले रुग्ण- (३८७), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९९)

अमरावती: बाधित रुग्ण- (१५५३), बरे झालेले रुग्ण- (१०४८), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)

अकोला: बाधित रुग्ण- (२२८९), बरे झालेले रुग्ण- (१७२६), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५९)

वाशिम: बाधित रुग्ण- (४४९), बरे झालेले रुग्ण- (२६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (९०५), बरे झालेले रुग्ण- (२४७), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६९१), बरे झालेले रुग्ण- (४३१), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७)

नागपूर: बाधित रुग्ण- (३१२८), बरे झालेले रुग्ण- (१५३८), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५४९)

वर्धा: बाधित रुग्ण- (१०४), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६)

भंडारा: बाधित रुग्ण- (२००), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२३३), बरे झालेले रुग्ण- (२१०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२९१), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३१७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७३)

एकूण: बाधित रुग्ण-(३,५७,११७) बरे झालेले रुग्ण-(१,९९,९६७), मृत्यू- (१३,१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४३,७१४)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

खोदकामात तब्बल 131 ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या

0

महावितरणचे आर्थिक; नुकसान वीजग्राहकांची गैरसोय

पिंपरी : गेल्या सहा महिन्यांमध्ये महावितरणच्या पिंपरी व भोसरी विभागामध्ये महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच इतर कंपन्यांच्या विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्रांद्वारे झालेल्या खोदकामात तब्बल 131 ठिकाणी उच्च व लघुदाबाच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. यात महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह वीजग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने एप्रिल व मे महिन्यात खोदकामांना वेग येतो. यंदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासनाने या महिन्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र विविध कामांसाठी खोदकामास परवानगी दिलेली होती. त्यामुळे या कालावधी देखील प्रामुख्याने वाकड, पिंपळे गुरव, निगडी, थेरगाव आदी भागांमध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार घडले. त्यातच मनुष्यबळ कोरोनामुळे अत्यंत मर्यादित असल्याने या वीजवाहिन्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. भूमिगत वाहिन्या तोडल्यानंतर खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध होऊ न शकल्यास महावितरणला वीजविक्रीमध्ये नुकसान तसेच वाहिनी दुरुस्तीचा खर्च सहन करावा लागत आहे. तसेच ग्राहकांनाही खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा भूमिगत वाहिनी तोडली जात असल्याचेही प्रकार दिसून आले आहेत.

खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधीत विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता थेट खोदकामास सुरवात करीत असल्याची स्थिती अद्यापही कायम आहे. खोदकामाची रितसर परवानगी घेतल्यानंतर महावितरणच्या संबंधीत कार्यालयास कळविल्यास वीजवाहिन्यांचा खोदकामातून धोका होणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात येऊ शकते. खोदकामाच्या ठिकाणी कर्मचारी भूमिगत वीजवाहिन्यांची माहिती देऊ शकतो. पण महावितरणला याबाबत कोणतीही पूर्वमाहिती किंवा सूचना मिळत नसल्याची स्थिती आहे. 

पिंपरी व भोसरी विभागात गेल्या सहा महिन्यांमध्ये स्मार्ट सिटी, पाणीपुरवठा, ड्रेनेज लाईन व इतर विविध कामांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इतर कंपन्यांच्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वाहिन्या तोडल्याच्या किंवा वाहिनीची हानी करण्याचे प्रकार समोर आले आहे. भूमिगत वीजवाहिनी तोडल्यानंतर सर्वप्रथम महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो व वीजवाहिनीची दुरुस्ती केली जाते. काही वेळेस खोदकामामध्ये लोखंडी टोकदार अवजारांमुळे वीजवाहिनीला केवळ चिरा पडून हानी होते. त्यावेळी वीज खंडित होत नाही. मात्र पावसाळ्यात जमिनीत पाणी झिरपल्यानंतर वाहिनीच्या चिरेत पाणी गेल्यामुळे आर्द्रता निर्माण व वीजपुरवठा खंडित होतो. वीज खंडित होण्याची कारणे शोधताना भूमिगत वाहिन्यांमधील बिघाड लवकर दिसून येत नाही. त्यासाठी विशेष केबल टेस्टींग व्हॅनद्वारे तपासणी करावी लागते. त्यानंतर दुरुस्तीसाठी वीजवाहिनीला एक-दोन किंवा त्यापेक्षा अधिक जॉईंट देण्याचे काम करावे लागत आहे.

पिंपरी विभागामध्ये पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन चौक, रामकृष्ण मंगल कार्यालय, बसस्टॅंड, चंद्ररंग सोसायटी, लक्ष्मीनगर, देवकर पार्क, तुळजाभवानी मंदिर चौक, जगताप पेट्रोल पंप, डायनासोर गार्डन चौक, सूर्यनगरी, साई हेरिटेज, गुलमोहर कॉलनी आदी परिसरात गेल्या पाच महिन्यांमध्ये 53 वेळा भूमिगत वीजवाहिन्या खोदकामामध्ये तुटल्या आहेत. यासोबतच वाकड परिसरातील काळाखडक चौक, रत्नदीप कॉलनी, कस्पटेवस्ती, वाकड गावठाण, प्लॅटीनम सोसायटी, म्हातोबा चौक, अक्षय टॉवर, वाकड सेंटर आदी भागात 21 वेळा वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच थेरगाव परिसरातील कुणाल रेसिडेंसी, रोजवूड हॉटेल, रॉयल कोर्ट सोसायटी, बाणेर कॉर्नर आदी ठिकाणी 17 वेळा वीजवाहिन्या तोडण्यात आल्या आहेत.

भोसरी विभाग अंतर्गत निगडी परिसरामध्ये तब्बल 19 वेळा हा प्रकार घडला. यामध्ये भक्ती शक्ती चौक, अंकुश चौक, स्वप्नपूर्ती सोसायटी, निगडी पवळे चौक, निसर्ग दर्शन, एसपीएम शाळा यमुनानगर, सेक्टर 26 ते 28 या भागात विविध प्रकारच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याचे दिसून आले होते. याशिवाय देहूरोडमधील वाल्हेकरवाडी परिसर, तळवडे चौक, आकुर्डीमधील संभाजीनगर तसेच भोसरी गावामध्ये सुद्धा महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

बेस्टची वाढीव बिले सरकारने तात्काळ माफ करावीत -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0

भाजप प्रदेश कार्यालयासमोर वीज बिलाची प्रतिकात्मक होळी
मुंबई दि. २४ जुलै- १०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याचे सरकारचे उर्जामंत्री नितिन राऊत यांनी घोषणा केली होती त्याचे काय झाले. त्यामुळे वीज बिल तात्काळ माफ करण्याची भाजपची मागणी आहे. एमईआरसीने कोरोनाच्या काळात वीज बिलामध्ये जे छुपे दर लावले आहेत ते रद्द करण्यात यावेत व कोरोनाच्या काळात कोणाचीही वीज तोडू नये अश्या मागण्या भाजपच्या वतीने काल बेस्ट महाव्यवस्थापकाकडे मांडण्यात आल्या. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली बेस्टमध्ये काल आंदोलन करण्यात आले. पण हे सरकार या विषयावर गंभीर नाही, म्हणून आज आम्ही वीज बिलाची होळी करित सरकाराला इशारा दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वीज बिलाचे वाढीव छुपे कर सरकारने तात्काळ माफ करावेत, १०० युनिट पर्यंत वीज ग्राहकांना मोफत द्यावी अशी आमची मागणी असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
कोरोना टाळेबंदी काळात लोकांचे उत्पन्न कमी झालेले असताना वीज दरात सवलत देण्याऐवजी जनतेला वाढीव वीज देयके पाठविण्यात आली आहेत. तसेच वाढीव देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची बेस्ट कडून देण्यात आलेली धमकीच्या निषेधार्थ आज नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोर बेस्ट वीज बिलांची होळी करण्यात आली व बेस्टचा कृतीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार राहुल नार्वेकर, मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह भाजपचे

विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने भाजप पदाधिकाऱ्याला दिलं होतं सोशल मीडियाचे कंत्राट

0

पुणे-भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक 2019 च्या वेळी सोशल मीडियाचे कंत्राट हे एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याला दिले असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तो पदाधिकारी भाजयुमो आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक असल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. या प्रकरणी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या बाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ट्विटवर शेअर केले आहे. 

पृथ्वीराज चव्हाणांनी आरोप केले की, निवडणूक आयोगानं जाहिरात करताना जो पत्ता द्यावा लागतो, तो खासगी कंपनीचा दिला आहे. मात्र जो पत्ता दिला तो Signpost India कंपनीचा पत्ता आहे. याच कंपनीची सोशल सेंट्रल नावाची देखील एक कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या देवांग दवेच्या असल्याचं ते म्हणाले आहे. देवांग दवे हा आयटी बोर्ड महाराष्ट्र सदस्य असल्याचं ते म्हणाले. असं बोर्ड अधिकृत राज्य सरकारचं नाही. दवे हा भाजप युवा मोर्चा पदाधिकारी आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या कंपनीला हे कंत्राट कसे काय देण्यात आले असा सवाल चव्हाणांनी आता केला आहे. 

पुढे चव्हाण म्हणाले की, देवांग दवेच्या वेबसाइटवर त्याच्या कंपनीच्या ग्राहकांची यादी देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्याची कंपनी ‘द फियरलेस इंडियन’, ‘सपोर्ट नरेंद्र मोदीं’ इत्यादी पेजेसची फाउंडर असल्याची माहितीही समोर आलेली आहे. या पेजेसवरुन भाजपाचा प्रचार करण्यात येतो. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या लोकांबद्दल या पेजेसवरून द्वेष पसरवण्याचे काम केले जात असते. त्याशिवाय इतरही काही सरकारी विभागांचे काम त्याच्या एजन्सीकडून करण्यात आलं असल्याचं त्याच्या वेबसाईटवरून समोर येतं असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून चव्हाणांनी केली आहे.

आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात -भाजपसाठी धोक्याची घंटा

0

पुणे-राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असले तरीही राजकीय समिकरणांवरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचं असं बोललं जात असतानाच  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. भविष्यातील निवडणुका या भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढविण्याची शक्यता आहे. आता यावर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी पक्षाला धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीनुसार राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे. तसेच याबाबत जागावाटपही निश्चित झाल्याचं त्यांनी सांगितलं. ठराविक वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे. 

मुलाखतीत बोलताना माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, ‘महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती भाजपासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित केलं असल्याचंही काकडे म्हणाले आहे. यामध्ये राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. 

पुढे बोलताना संजय काकडे म्हणाले की, ‘सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर खेळ असतो. आमचे सरकार हे जसे आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरत होती. आता त्याचं काय झालं?. असा सवालही काकडेंनी शिवसेनेला विचारला आहे. यासोबतच तसेच आम्हाला सावध राहण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. 

नवीन सौरऊर्जा धोरणासाठी उच्चस्तरीय समितीचे गठन

0

मुंबई, दि.२४ : राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची प्रामुख्याने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात कालच राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी निर्देश दिले होते.

ही समिती अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस प्राधान्य देऊन राज्याचे सर्वसमावेशक ऊर्जा धोरण तयार करून शासनास शिफारस करणार आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी उपलब्ध करून देण्यासाठी लँड बँक तयार करण्यात येणार आहे. तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थान या शेजारील राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांचा अभ्यास करून शासनास शिफारशी सादर करणार आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लँड बँक तयार करण्यासाठी लवकरच एका कंपनीची स्थापना करण्यात येणार असून याची संरचना व कार्यप्रणाली या बाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे. प्रकल्प उभे करण्यासाठी व त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सौर ऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी ऊर्जा विभागाला उच्चस्तरीय समितीचे गठन करण्याचे निर्देश काल विभागाच्या बैठकीत दिले होते.

महावितरण, महापारेषण व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तसेच महाऊर्जाचे  महासंचालक हे या समितीचे सदस्य राहणार असून ऊर्जा विभागाचे उपसचिव किंवा सहसचिव हे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत.

कोरोना -बदलावीच लागेल आपली जीवनशैली (व्हिडीओ)

0

पुणे- विभागीय आयुक्त डॉ. श्री. दिपक म्हैसेकर यांनी आपणाला सार्वजनिक ठिकाणी वावरताना, प्रवास करताना, कार्यालयामध्ये काम करीत असताना आपण काय काळजी घ्यावी, याविषयी नेमके मार्गदर्शन केलेले आहे. हे मोलाचे मार्गदर्शन आपण सर्वांनी जरूर पाहावे आणि आपल्या सर्व आप्तांना सुद्धा पाठवावे. अशा जनजागृती मधूनच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो.

मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि २४  : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.  

मुख्यमंत्री म्हणाले, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले  असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

डॉ तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले.  टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी यावेळी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तात्काळ आम्हाला संपर्क करा.

डॉ राहुल पंडित म्हणाले,  ही विशेष औषधे महत्त्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे  खूप महत्त्वाचे  आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे.

डॉ शशांक जोशी , डॉ मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंकानिरसन केले, उपचाराविषयी सूचना केल्या. 

या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती. 

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 30 हजार 803 ,एकुण 2 हजार 198 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 77 हजार 826 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 24:- पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 77 हजार 826 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 30 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 198 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 849 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.60 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 63 हजार 808 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 38 हजार 519 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 720 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 775 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 841, व पुणे कॅन्टोंन्मेंट 210, खडकी विभागातील 40, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 769, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 123, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 270, जिल्हा शल्य चिकीत्सक यांचेकडील 40 व पुणे कॅन्टोंन्मेंट 30, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 76, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 38 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 586 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.46 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 538 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 864, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 272, सांगली जिल्ह्यात 62 तर कोल्हापूर जिल्ह्यात 245 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 848 रुग्ण असून 1 हजार 538 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 213 आहे. कोरोनाबाधित एकूण 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 6 हजार 599 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 200 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 989 आहे. कोरोना बाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 244 रुग्ण असून 459 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 743 आहे. कोरोना बाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 3 हजार 327 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 109 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 138 आहे. कोरोना बाधित एकूण 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 3 लाख 84 हजार 989 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 3 लाख 79 हजार 900 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 89 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 1 हजार 295 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. तर 77 हजार 826 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 24 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

‘कार्निवल मोशन पिक्चर्स’चा ‘मेरे देश की धरती’ लवकरच

0

कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत असताना सिनेक्षेत्रही रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. भारतातील अग्रगण्य सिनेनिर्मिती संस्थांपैकी एक असलेल्या ‘कार्निवल मोशन पिक्चर्स’ या संस्थेनेही आपला आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असून, कार्निवल ग्रुपची निर्मिती असलेला मेरे देश की धरती हा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कार्निवल मोशन पिक्चर्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी मेरे देश की धरतीचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. दिव्यांदू शर्मा, अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या मेरे देश की धरती या चित्रपटाचं दिग्दर्शन फराज हैदर यांनी केलं आहे. याशिवाय ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर यांच्यासह इतर प्रतिभावान कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे.

मेरे देश की धरती या चित्रपटाच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तव परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणाऱ्या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. जनमानसापर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवणारा हा चित्रपट एक ‘पेट्रियोटिक ड्रामा’ आहे. पोस्ट प्रोडक्शनसह चित्रपटाच्या इतर तांत्रिक बाबींचे काम पूर्ण झाले असून, लवकरच चित्रपट रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. भोपाळमधील सेहोर जिल्ह्यासह मुंबई आणि आसपासच्या भागात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

मेरे देश की धरती हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असल्याचे सांगत कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ आणि संचालिका वैशाली सरवणकर म्हणाल्या की, ‘एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसह संपूर्ण जग सध्या एक अनोखे युद्ध लढत आहे, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यास आम्हीही उत्सुक असून, आमची संपूर्ण टीम त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने उत्तम कलाकारांसोबत काम केल्याचे समाधान लाभले असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या प्रतिभावंत कलाकारांना घेऊन चित्रपट बनवण्याचा आमचा मानस आहे’. लाखो भारतीयांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या या चित्रपटात एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय हलक्या-फुलक्या पध्दतीने मांडण्यात आला आहे.

कार्निवल मोशन पिक्चर्सविषयी :

कार्निवल मोशन पिक्चर्सने आजवर बऱ्याच सुपरहिट हिंदी चित्रपटांसह प्रादेशिक चित्रपटांचीही यशस्वी निर्मिती केली आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना देवस्थानी असलेल्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनप्रवासावर आधारित असलेल्या ‘सचिन : अ बिलिअन ड्रीम्स’ या हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटासह हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘ठाकरे’ हा हिंदी, मराठी चित्रपट आणि  ‘वॉर छोड ना यार’ या हिंदी चित्रपटाचाही यात समावेश आहे. या प्रोडक्शन हाऊसने ‘द सेकंड शो’ या ब्लॉकबस्टरच्या माध्यमातून दुलकीर सलमानला लाँच केले आहे. याखेरीज ‘व्हायोलिन’, ‘मॅटिनी’, ‘हँगओव्हर’, ‘आदी कप्यारे कूटामनी’, ‘मुधूगॉव’ आणि ‘इदककड बटालियन ०६’  या प्रादेशिक चित्रपटांची निर्मितीसुद्धा कार्निवल मोशन पिक्चर्सने केली आहे.

सेबीमध्ये विविध पदांच्या १३४ जागा

0

पदाचे नाव : जनरल – ८० जागा

शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी, अभियांत्रिकी पदवी, सीए/सीएस/ सीएफए आणि कुठल्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : लिगल – २८ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी

पदाचे नाव : इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – १७ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा कम्पयुटर ॲप्लीकेशनमध्ये पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : अभियंता (civil) – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (civil)

पदाचे नाव : अभियंता (Electrical) – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (Electrical)

पदाचे नाव : रिसर्च – ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी

पदाचे नाव : ऑफिशियल लॅग्वेज – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी मध्ये इंग्रजी विषयासह हिंदी मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी मध्ये हिंदी विषयासह संस्कृत, इंग्रजी, इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2WT88Xs आणि https://bit.ly/3hwyfv3

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3fXmkWF

थंड पाण्याचे जार निर्मितीतील बेकायदेशीर उद्योगांची माहिती संकलित करण्याचे शासनाचे आदेश

0

पुणे :
  शासनाच्या आवश्यक परवानग्या नसताना थंड पाण्याच्या जारची निर्मिती-विक्री करणाऱ्या थंड पाण्याचे जार निर्मिती क्षेत्रातील,महाराष्ट्रातील बेकायदेशीर उद्योगांची (चिल्ड वॉटर जार युनिट्स )माहिती संकलित करण्याचे आदेश  राज्य शासनाने राज्यातील नगरपरिषद,नगरपंचायती आणि महानगरपालिकांना दिले आहेत. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक भालचंद्र बेहेरे यांनी हा शासकीय आदेश २२ जुलै रोजी काढला आहे. 
 विजयसिंह डुबल यांनी यासंदर्भात राष्ट्रीय हरित प्राधिकरणात बेकायदेशीररित्या पाणी निर्मिती करणारे असे उद्योग बंद करावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. दिनांक १९ जुन २०२० रोजी याबाबतचा आदेश प्राधिकरणाने दिला आहे.त्याला अनुसरून  राज्य शासनाने बेकायदेशीर पाणी निर्मिती उद्योगांची माहिती संकलित करण्याचा शासकीय आदेश काढला आहे. 
विजयसिंह डुबल यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली. डुबल यांच्या वतीने एड.असीम सरोदे यांनी राष्ट्रीय हरित प्राधिकरणात काम पाहिले. 

जय श्रीराम’ लिहिलेली २५ हजार पत्रे शरद पवार यांना पुण्यातून पाठवण्यास प्रारंभ – दीपक पोटे (व्हिडीओ)

पुणे-आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणचां शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.या विषयात राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी ‘ राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे वादग्रस्त विधान करत समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
असा आरोप करत भाजप युवा मोर्चा पुणे शहराचे अध्यक्ष नगरसेवक दिपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली जिपिओ येथे निदर्शने करत ;पवार यांना प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी “जय श्रीराम” अशा मजकूराचे २५ ,००० पत्र पाठवण्यास प्रारंभ करण्यात आला . या प्रसंगी प्रदेश सचिव -प्रदीप गावडे ,सरचिटणीस, नगरसेवक राजेश येनपुरे , संजय मामा देशमुख , युवा मोर्चा सरचिटणीस निहाल घोडके , चंद्रकांत पोटे , अजय भोकरे , संपर्क प्रमुख – प्रतीक देसरडा ,बाप्पू मानकर , सुनील मिश्रा , अभिजित राऊत ,दीपक पवार , दिलीप राखपसरे , दीपक पवार , राजू परदेशी , दृष्यांत मोहोळ ,अपूर्व खडे, अमित कंक , अपर्णा लोणारे ,तुषार रायकर ,बाबू खैर ,अक्षय वायाळ, शशांक सुर्वे , तेजस मारणे , प्रतीक गुजराथी , अंकित तिवारी ,सचिन फोलाने ,विराज कोकाटे ,अथर्व कुलकर्णी , अक्षय शिंदे ,अर्जुन खानापुरे , प्रतीक कुंजीर , चेतन मुंडे ,शुभम आढाव संतोष फडतळे , रोहित भिसे , अर्चित मेहेंदळे , चैतन्य कोठेकर , मयूर टीलावला , त्याच प्रमाणे सर्व भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

रात्री ९ ते पहाटे ५ संचारबंदी ..हॉटेल ,बीटेल बंदच,अत्यावश्यक सेवा सुरु

0

पुणे – शहरातील १० दिवसांच्या लॉक डाऊनची मुदत आज मध्यरात्री पूर्ण होत असून पुण्यात उद्यापासून (२४ जुलैपासून) लॉक डाऊन नसणार आहे. लॉक डाऊनची मुदत संपत असली तरीही काही निर्बंंध मात्र कायम ठेवण्यात आले आहेत. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केलेल्या आदेशांनुसार केंद्र शासनाच्या कोविड १९ च्या नियंत्रणाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्देश लागू असतील असं स्पष्ट करण्यात आलंय.

हे निर्बंध कायम महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक सेवा किंवा कारण वगळता रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर जाता येणार नाही. ६५ वर्षे वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या, आजारी व्यक्ती, गरोदर महिला, १० वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं यांना अत्यावश्यक सेवा आणि आरोग्य विषयक अडचणींशिवाय बाहेर जाता येणार नाही. २४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत.

आदेशात आणखी काय?
प्रतिबंधित क्षेत्रात विशिष्ट गल्ली, चाळ, वसाहत, इमारती, गृह निर्माण संस्था या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विशिष्ट क्षेत्र, चाळ, वसाह, इमारत किवा गृहनिर्माण सोसायटी येथे पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आढळल्यास त्या कार्यक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त, सनियंत्रण अधिकारी हे ते विशिष्ट क्षेत्र, विभाग, चाळ, इमारत किंवा गृहनिर्माण सोसायटी लगेच सील करतील.

कटेंन्मेंट झोनसाठी अटी
महापालिकेच्या हद्दीत वैद्यकीय, आपात्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्यासठी या सेवा वगळता आणि पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास मनाई

प्रतिबंधित क्षेत्रात दूध आणि भाजीपाला तसंच इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा जसे की स्वयंपाकाला गॅस, औषध विक्रीची दुकानं, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कार्यालय, व्यक्ती आणि त्यांच्या वाहनांना यातून वगळ्यात येतं आहे.

मनपाची अत्यावश्यक सेवा देणारी वाहनं म्हणजेच पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा गाडी व त्यावरचे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, अधिकारी यांना प्रतिबंधित क्षेत्रात कधीही प्रवेश करता येईल.

पुणेकरांना कशाची मुभा असेल

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल. मात्र जीम बंद राहतील.
व्यायामासाठी

सकाळी ५ ते ७ व्यायाम करता येणार .. लगान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही , व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम)

दुकाने पी१ पी२ प्रमाणे सुरू राहतील

खासगी कार्यालये १० टक्के किंवा १५ जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करू शकतील

हाॅटेल्स रेसिटाॅरंट माॅल्स जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार

हाॅकर्सना व्यवसाय सुरू करता येणार

पार्सल, कुरियर सुरू

घरमालकाची परवानगी असल्यास घरेलू कामगार , जेष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)

सगळीकडे मास्क वापरणं बंधनकाराक

जेष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही