Home Blog Page 2501

सुशांत आत्महत्येच्या चौकशीची थट्टा-आदित्य ठाकरेंना कंगनाने वादात ओढ़ले

0

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये लॉबी वाद चांगलाचे पेटताना दिसला. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रणावत हिने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने थेट केला आहे.

‘मुंबई पोलीस स्पष्टपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पण करण जोहरला नाही. त्याच्या ऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का?’ साहेबांना त्रास होवू नये का? असा प्रश्न यावेळी तिने उपस्थित केला आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करत तिने थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नाही.’ सुशांतच्या हत्येची थट्टा करणं थांबवा असं देखील ती ट्विटमध्ये म्हणाली आहे.

दरम्यान सुशांतची आत्महत्या नसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी त्याची गर्लफ्रेंड रिया हिने अमित शाह यांच्याकडे केली होती.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसर पदाची भरती

0

महाराष्ट्रात पदांची संख्या  – ५१७ (मुंबई वगळून)

पदाचे नाव : सर्कल बेस ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव

वयोमर्यादा : ०१/०८/२०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १६ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3f4Sn5Y

अर्ज करण्यासाठी : https://bit.ly/32XUyWw

राज्यभर कामगार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर द्या – कामगार राज्यमंत्री बच्चू कडू

0

अकोला – राज्य भर विविध उद्योग व खाजगी आस्थापनांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

राज्यातील विविध उद्योग व खाजगी आस्थापनांवरील कामगारांच्या किमान वेतन कायदा, आरोग्य विमा यासारख्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. त्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. जिल्ह्यात विटभट्टयांवरही अनेक कामगार हंगामी स्वरुपात काम करीता असतात. त्यांची नोंद करण्यात यावी. त्यांना रेशनकार्ड व शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवावी. विटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वस्तीशाळा सुरु करणे, इत्यादी उपाययोजनांचा अवलंब करावा. तसेच जिल्ह्यातील कामगारांना शासनाच्या वेगवेगळ्या घरकुल योजनांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव तयार करा, असे निर्देशही श्री.कडू यांनी दिले.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या प्रकरणाच्या चौकशी सीबीआय कडून करा-पार्थ पवार

0

पुणे : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी किंवा या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिले आहे.पार्थ यांनी सोमवारी (ता.२७) मंत्रालयामध्ये जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.त्यांना आपल्या मागणीचे पत्र दिले. तसेच त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पार्थ यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांच्या नि:पक्षपातीपणे केल्या जाणाऱ्या तपासावर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच बरोबर या प्रकरणासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती करावी किंवा हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयडे सोपविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.”सुशांतच्या दुर्दैवी मृत्युने देशातील कोट्यावधी तरुणांना मोठे दु:ख झाले. तरुण वर्ग निराश झाला आहे. सुशांतला त्वरित न्याय मिळावा, या मागणीसाठी देशातील तरुणाईला माझा पाठिंबा आहे. त्यासाठीच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. हा मुद्दा आता राज्याच्या सीमारेषा ओलांडून संपूर्ण देशाच्या दृष्टिने महत्वाचा आहे.संबंधीत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ३७ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणात ‘व्यावसायिक शत्रुत्व’ तर नाही ना, याचा तपास मुंबई पोलिस करत आहे. तसेच याप्रकरणी कंगना राणावत, करण जोहर यांचीही चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यातही गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे, असे असतानाही पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने ‘पार्थ यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगरसेवक वसंत मोरेंचे कोरोना रुग्णाच्या बेड हक्कासाठी महापालिका भवनात आंदोलन -नव्या कमिशनरांना पहिला झटका

0

पुणे – कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी बेड मिळत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकानी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून निषेध आंदोलन केले. या आंदोलनाने नव्या आयुक्तांना पहिला झटका मिळाल्या चे मानले जातेय.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाकडून हव्या तशा सुविधा निर्माण रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून आंदोलन केले.

पुणे महापालिकेने आतापर्यंत कोरोनासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मग 200 कोटी रुपये खर्च झाले असताना अजूनही सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर काम करत आहेत त्यांना रुग्णालयात बेड का उपलब्ध होत नाहीत

पुणे महापालिकेने ज्या रूग्णालया सोबत करार केला आहे ती रुग्णालय अक्षरशः लॉजिंग अँड बोर्डिंग झाली असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागं व्हावं आणि महापालिकेसोबत करार असलेल्या खाजगी रुग्णालयात खऱ्या रुग्णाला कसे बेड मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे.

राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत द्यावी :महापौर मुरलीधर मोहोळ

0
  • निधीसाठी महापौर आक्रमक
  • साडेचार महिन्यांत महापालिकेचे २५० कोटी खर्च

पुणे (प्रतिनिधी)

कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालविली, कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही. परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी’, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कोरोना निर्मूलन आढाव्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण ३०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यात राज्य शासन ५०% पुणे महानगरपालिका २५% पिंपरी चिंचवड महानगरपालिका १२.५% आणि पीएमआरडीए १२.५% असा हिस्सा उचलणार आहेत.’

‘जम्बो आयसोलेशन सेंटर ला राज्यशासन ५०% निधी देणार आहेत, यासाठी राज्यशासनाचे धन्यवाद! गेली साडेचार महिने पुणे महानगरपालिकेने आत्तापर्यंत अडीचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च केले आहेत. जम्बो आयसोलेशन सेंटरला अशा गरजेच्या वेळी पुणे महापालिका निधी देण्यास नकार देणार नाही. परंतु पुढील काळात राज्यशासनाने पुणे महापालिकेला आर्थिक रसद पुरवली आणि महापालिकेला बळ द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे, असेही मोहोळ म्हणाले

‘शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील बेडस आणि अवाजवी शुल्क आकारणी याबाबत आजही नागरिकांच्या तक्रारी आहेत. यासाठी राज्य शासनाने ताबडतोब योग्य ती कारवाई करावी. तसेच नागरिकांना काही खाजगी हॉस्पिटलमधून चांगल्या सुविधा मिळत नाहीत, तरी यात राज्य शासनाने लक्ष घालून योग्य मार्ग काढावेत, अशा सूचना महापौर मोहोळ यांनी केलेल्या.

‘पुणे शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑगस्ट महिन्यातील मांडलेल्या अंदाजानुसार बेडची कमतरता दिसून येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत जम्बो आयसोलेशन सेंटर सुरू होतील, परंतु तोपर्यंत बेडस च्याबाबतीत नव्याने यंत्रणा लागली पाहिजे तसेच रुग्णांना ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेडची कुठेही कमतरता पडू नये, यांची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, अशी सूचना महापौर मोहोळ यांनी केली.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 33 हजार 546; एकुण 2 हजार 406 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 52 हजार 200 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;   विभागात कोरोना बाधित 88 हजार 152 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

 पुणे दि. 27 :- पुणे विभागातील 52 हजार 200 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 88 हजार 152  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 33  हजार 546  आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 406 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 935 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.22 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.  पुणे जिल्हयातील 71 हजार 500 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 44 हजार 243 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 552 आहे.            पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 192, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 301  व पुणे कॅन्टोंन्मेंट    31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 99, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 49 रुग्णांचा समावेश आहे. तसेच  665 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  61.88 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.38 टक्के इतके आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 697 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 814, सातारा जिल्ह्यात 105, सोलापूर जिल्ह्यात 316, सांगली जिल्ह्या 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 382 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.  सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 203 रुग्ण असून 1 हजार 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 351 आहे. कोरोनाबाधित एकूण  109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   सोलापूर जिल्हयातील 7 हजार 383 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 118 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 831 आहे. कोरोना बाधित एकूण 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 573 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 63 आहे. कोरोना बाधित एकूण 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोल्हापूर जिल्हयातील 4 हजार 493 कोरोना बाधीत रुग्ण असून 1  हजार 634 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 749 आहे. कोरोना बाधित एकूण 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 37 हजार 33 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 33 हजार 114 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 919 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 44 हजार  130 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. 
( टिप :- दि. 27 जुलै 2020 रोजी दुपारी  3.00  वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )0000

‘आई माझी काळुबाई’ मालिकेत ‘प्राजक्ता गायकवाड’ साकारणार आर्याचं पात्र

0

आई माझी काळुबाई’ ही मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर सुरू होत आहे. नुकताच त्याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रोमो मधून ही गोष्ट आर्या नावाच्या मुलीची, तिच्या भक्तीची आणि काळूबाईच्या शक्तीची आहे हे कळतंय. आर्या म्हणजेच ‘प्राजक्ता गायकवाड’ हा  नवा चेहरा सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या आधी प्राजक्ता गायकवाड हिला ऐतिहासिक भूमिकेमधून प्रेक्षकांनी पाहिलं आहे पण एका कॉलेज मधल्या तरुणीची भूमिका पहिल्यांदाच ती करत आहे. या भूमिकेसाठी तिने थोडे वजन कमी केलं आहे इतकंच नाही तर स्वतःची स्टाईल आणि लूक सुद्धा प्राजक्ताने या भूमिकेसाठी बदलेल आहे.

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. प्राजक्ताला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचा चाहतावर्ग देखील उत्सुक आहे. प्राजक्ता पहिल्यांदाच आपल्या वयाची भूमिका साकारत आहे.  आर्याचं एक पाऊल कशाप्रकारे तिचं आयुष्य बदलेल, तिच्या मदतीला काळुबाई कशी येईल हे सर्व पाहणं खूप मनोरंजक असणार आहे. ‘गोष्ट आर्याच्या भक्तीची, काळुबाईच्या शक्तीची’ पाहा ‘आई माझी काळुबाई’ लवकरच आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनचा कोरोना, चक्रीवादळ संकटकाळात संपूर्ण भारतभर मदतीचा हात

0

पुणे : कोरोना महामारी, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यामुळे देशाच्या विविध भागाचे, तसेच तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या संकटकाळात फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनने (एमएमएफ) संपूर्ण भारतभर मदतीचा हात दिला आहे. विविध स्तरांतील वंचित घटकांना, तसेच कोरोनायोद्ध्यांना पाठबळ देण्याचे काम फाउंडेशनने केले. ‘एमएमएफ’चा २६ वा वर्धापनदिवस (दि. २६ जुलै) नुकताच झाला. या निमित्ताने व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल माहिती दिली. फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या सहकाऱ्यांकडून, कॉर्पोरेट दात्यांकडून, स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे या संकटांचा सामना करणे शक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.

रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “रोजंदारीवरील, स्थलांतरित मजूर, प्लम्बर आदी घटकांना ग्रोसरी किट, जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. अनामित्र आणि विकास खन्नाज फीड इंडिया यांच्या सहकार्याने एक लाखापेक्षा जास्त लोकांना अन्नधान्ये दिले. तसेच पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या १३ हजार स्थलांतरित मजुरांना चप्पल, खाद्य दिले. राजस्थानातील संगीत कलाकार, पुण्यातील तृतीयपंथी समाजाला रेशन देण्यात आले. कापडी मास्कच्या माध्यमातून एचआयव्हीग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून दिला. देशभरातील विविध समुदायांना त्याची मदत झाली आहे.”

“या काळात रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन देशातील अनेक रुग्णालयात वैद्यकीय उपकरणे, सॅनिटायझर, मास्क, पीपीई किट दिले आहे. डॉक्टर्स, नर्स यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य फाउंडेशनने दिले आहे. वेंकीजच्या साहाय्याने एक लाख अंड्यांचे वाटप करण्यात आले. निसर्ग, अम्फान चक्रीवादळासह आसाममध्ये नुकत्याच आलेल्या २० हजार पूरग्रस्तांना मदत पुरविण्यात आली आहे. पूर्व भारतात रंगीन खिडकी संस्थेने सहकार्य केले. कोरोना व्हायरस आणखी किती दिवस राहणार याबाबत माहिती नसल्याने भविष्यातही या घटकांना सहकार्य करण्यासाठी जागतिक स्तरावरही निधी संकलन केले जात आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

छाब्रिया पुढे म्हणाल्या, “या संकटकाळात लढताना फाउंडेशनने चालू प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित केले आहे. आजवर ९६० सेरेब्रल पाल्सीग्रस्तांना थेरपी दिली आहे. ग्रामीण भागात लोकल चॅनेलच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि योगाची सत्रे घेण्यात आली. रत्नागिरीतील घोळप गावातील मुकुल माधव विद्यालयातील  ६८० विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले. बेरोजगारीमुळे मुंबईतून पालघरला परतलेल्या १५० कुटुंबाना बियाणे देऊन शेती करण्यास प्रोत्साहित केले आहे. लडाखमधील गल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकीत शहीद २० जवानांच्या कुटुंबाना अर्थसहाय पुरविण्यात आले. लडाखच्या महाबोडी इंटरनॅशनल सेंटरलाही साहाय्य देण्यात आले आहे. “

हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
महासंवाद

हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Team DGIPR by Team DGIPRजुलै 27, 2020 2 min read

पोलिसांसाठी गृहनिर्माण योजनेसह ‘सिडको’च्या उपक्रमांचे उद्घाटन

मुंबई दि २७: हक्काचे स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातसुद्धा आमच्या शासनाची ही वचनबद्धता असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महासंवाद

हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Team DGIPR by Team DGIPRजुलै 27, 2020 2 min read

पोलिसांसाठी गृहनिर्माण योजनेसह ‘सिडको’च्या उपक्रमांचे उद्घाटन

मुंबई दि २७: हक्काचे स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातसुद्धा आमच्या शासनाची ही वचनबद्धता असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

Maha Info Corona Website

उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी यावेळी उपस्थित होते

यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रू. १ कोटीची मदत करण्यात आली . सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या माध्यमातून योगदान करण्यात आले आहे.

आज माझ्या वाढदिवसाचे निमित्त ठरवून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न वास्तवात आणणारा कार्यक्रम करीत आहेत ही माझ्यासाठी अनोखी भेट आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   पूर्वी  इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्या जवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरील खारघर हेवन हिल्स हे देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल स्टेशन राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील सिडकोच्या या उपक्रमांचे कौतुक केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलसांसाठी अशा प्रकारे पहिल्यांदाच सिडकोच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे सांगितले तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आणखीही घरे पुढील टप्प्यात सिडकोने उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यशस्वी अर्जदारांना वाटप पत्र

सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना यावेळी इलेकट्रॉनिक  पद्धतीने घरांचे वाटपपत्र थेट त्यांच्या मेलमध्ये देण्यात आले.

यात सिडको महागृहनिर्माण योजना १ व २, स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना, वास्तुविहार व सेलिब्रेशन गृहनिर्माण योजना आणि एनआरआय कॉम्प्लेक्स या योजनांतील वाटपपत्रांचा समावेश होता.

निवारा केंद्र

ऑनलाईन सोडतीत विजयी झालेल्या अर्जदारांच्या कागदपत्र पडताळणीकरिताची प्रक्रिया सोपी, जलद व अचूक पद्धतीने व्हावी याकरिता सिडकोद्वारे  Neutral, Independent Verification Assessment for Allotment अर्थात ‘निवारा केंद्र’ याची उभारणी करण्यात आली आहे.

कोविड -१९ अर्थात करोनाच्या अनुषंगाने संगणक प्रणालीमध्ये बदल करून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याद्वारे अर्जदार घरबसल्या कागदपत्रे सिडको निवारा केंद्राच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन जमा करू शकतील.

जे अर्जदार कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरतील त्यांचेकरिता अपिलाची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीने विकसित केली असून, कागदपत्रे जमा करण्यासाठी अर्जदाराने आपल्या खात्यात लॉगिन करून अपील करावे. त्यानंतर अपिलाची माहिती व कागदपत्रे अपलोड करून ती जमा (सबमिट) करणे शक्य आहे.

सिडकोचे अधिकारी संगणक प्रणालीत उपलब्ध असलेल्या व्हिडियो कॉल सुविधेचा वापर करून अर्जदाराशी संवाद साधू शकतात.

त्याकरिता अर्जदारांना व्हिडिओ कॉल करिताचा दिनांक व वेळ निवडता येतो. त्या माध्यमातून अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यानंतर अर्जदारांच्या अपिलाबाबतचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय घेतला जातो.

वेगवान आणि ऑनलाईन जगात, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रक्रिया हीसुद्धा वेगवान, ऑनलाईन आणि अचूक असायलाच हवी यासाठी या व्हर्च्युअल निवारा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

पोलिस कर्मचारी गृहनिर्माण योजना

पोलिस कर्मचारी यांच्याकरिता सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनाची ऑनलाईन अर्जनोंदणी करण्यासही सुरुवात झाली तब्बल ४,४६६ पोलीस कुटुंबांना हक्काचा निवारा मिळणार असून  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सदर योजना उपलब्ध आहे. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी या ५ नोड्समध्ये आकारास येणारी गृहनिर्माण योजना केवळ मुंबई महानगर कार्यक्षेत्रात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी, शुल्क भरणा, आणि सोडतीची पारदर्शक व सुलभ प्रक्रिया वापरून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या सदनिका असतील.

खारघर हेवन हिल्स

खारघर टेकड्यांच्या शांत, सुंदर आणि निसर्गसंपदेने नटलेल्या या नयनरम्य परिसरात सिडकोतर्फे खारघर हेवन हिल्स प्रकल्प साकारण्यात येत आहे. निसर्गाने समृद्ध असलेल्या या खारघर टेकड्यांवर साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात निवासी व्हिला, रिसॉर्ट, नेचरोपॅथी सेंटर यांचा मुख्यत्वे समावेश आहे.

सिडकोतर्फे खारघर हिलच्या माथ्यावरील २५० एकरवर ‘खारघर हेवन हिल्स’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मिनी हिलस्टेशन परिसरात एक उच्चभ्रू वसाहत विकसित करण्यात येणार आहे. याचबरोबर येथील विस्तीर्ण परिसरावर नेचरोपॅथी सेंटर उभारले जाणार आहे. याखेरीज शहरातील गजबजाटापासून शांततेचे व मनोरंजनाचे दोन क्षण आपल्या कुटुंबियांसमवेत व्यतीत करता यावेत यासाठी या निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टदेखील विकसित केले जाणार आहे.

याचबरोबर सुमारे 250 एकर्सपैकी 39% एवढी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. यातून पर्यावरणाचा पूर्ण समतोल राखण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

खारघर हेवन हिल प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमनातळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. यामुळे देशी व परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांसाठी हा हेवन हिल प्रकल्प आकर्षणाचा बिंदू ठरणार आहे.

याचबरोबर हा प्रकल्प खारघर रेल्वे स्थानकापासून 3.08 कि.मी. अंतरावर आहे. मुख्य शहरांना जोडणारे रस्त्यांचे जाळेदेखील विकसित करण्यात आले आहे. सर्वच प्रकारे उत्तम कनेक्टिविटी असलेला हा प्रकल्प म्हणजे निसर्ग आणि शहरीकरण यांचा सुवर्ण संगम आहे.

त्याचबरोबर 350 एकरच्या विस्तीर्ण परिसरात सिडकोतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट पार्क विकसित करण्यात येत आहे. या कॉर्पोरेट पार्कमध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम व फुटबॉलसाठी विशेष प्राविण्य केंद्र उभारण्याचा सिडकोचा मानस आहे.

आज बरे झालेले रुग्ण ८ हजार ७०६; नवीन रुग्ण ७ हजार ९२४ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२७: राज्यात प्रथमच आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली असून आज ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे.  सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ७९२४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले २२७ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२१ (३९), ठाणे- २८० (४), ठाणे मनपा-२४२ (९), नवी मुंबई मनपा-३३२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३४३ (११),उल्हासनगर मनपा-९६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (५), मीरा भाईंदर मनपा-१०२ (१), पालघर-६४, वसई-विरार मनपा-१९१ (३), रायगड-२३० (२८), पनवेल मनपा-१७२ (१९), नाशिक-७० (३), नाशिक मनपा-१७९ (२), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-८२ (२), अहमदनगर मनपा-८७, धुळे-११ (१), धुळे मनपा-१४, जळगाव-३२६ (४), जळगाव मनपा-९३ (२), नंदूरबार-१२ (३), पुणे- १६७ (११), पुणे मनपा-११०४ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-६५६ (१५), सोलापूर-१८१ (२), सोलापूर मनपा-१२२ (१), सातारा-११५ (४), कोल्हापूर-२९७ (७), कोल्हापूर मनपा-११६ (१), सांगली-३७, सांगली मिरज कुपवाड मनपा-७० (२), सिंधुदूर्ग-१३, रत्नागिरी-१ (२), औरंगाबाद-४३ (१), औरंगाबाद मनपा-२६७ (४), जालना-२९, हिंगोली-१३ (१), परभणी-१, परभणी मनपा-२, लातूर-६६ (१), लातूर मनपा-४८ (१), उस्मानाबाद-२२ (१), बीड-३४ (२), नांदेड-६० (१), नांदेड मनपा-२० (१), अकोला-१२, अकोला मनपा-४, अमरावती-१७, अमरावती मनपा-३५ (१), यवतमाळ-६५, बुलढाणा-६२, वाशिम-१७, नागपूर-७४, नागपूर मनपा-११७ (२), वर्धा-९, भंडारा-१, गोंदिया-८, चंद्रपूर-४, चंद्रपूर मनपा-२, गडचिरोली-३, इतर राज्य ११ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३  हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                  

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१०,१८२) बरे झालेले रुग्ण- (८१,९४४), मृत्यू- (६१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,८१२)

ठाणे: बाधित रुग्ण- (८७,७९०), बरे झालेले रुग्ण- (५०,९३२), मृत्यू- (२३८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,४७७)

पालघर: बाधित रुग्ण- (१४,४२२), बरे झालेले रुग्ण- (८४२०), मृत्यू- (३०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६९५)

रायगड: बाधित रुग्ण- (१४,९८२), बरे झालेले रुग्ण-(९७२४), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२७)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१५४९), बरे झालेले रुग्ण- (८६६), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३४१), बरे झालेले रुग्ण- (२५५), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)

पुणे: बाधित रुग्ण- (७८,१३०), बरे झालेले रुग्ण- (२७,६२०), मृत्यू- (१८३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,६७२)

सातारा:  बाधित रुग्ण- (३२२२), बरे झालेले रुग्ण- (१७७३), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३५)

सांगली: बाधित रुग्ण- (१५७२), बरे झालेले रुग्ण- (६९७), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३८९१), बरे झालेले रुग्ण- (११६९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८०७४), बरे झालेले रुग्ण- (३७५०), मृत्यू- (४४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८७७)

नाशिक: बाधित रुग्ण- (१२,८८२), बरे झालेले रुग्ण- (७२९९), मृत्यू- (४३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३४२८), बरे झालेले रुग्ण- (१५५२), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२६)

जळगाव: बाधित रुग्ण- (९५०३), बरे झालेले रुग्ण- (६३८४), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६३७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३२६), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)

धुळे: बाधित रुग्ण- (२४२२), बरे झालेले रुग्ण- (१७०४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१२,१२२), बरे झालेले रुग्ण- (६७६७), मृत्यू- (४४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९०६)

जालना: बाधित रुग्ण- (१७९१), बरे झालेले रुग्ण- (११५०), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७३)

बीड: बाधित रुग्ण- (५८१), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३४४)

लातूर: बाधित रुग्ण- (१६४२), बरे झालेले रुग्ण- (८१०), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५७)

परभणी: बाधित रुग्ण- (४६०), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५२२), बरे झालेले रुग्ण- (३६२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३६२), बरे झालेले रुग्ण (६१९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६९३), बरे झालेले रुग्ण- (४४८), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१०)

अमरावती: बाधित रुग्ण- (१६७२), बरे झालेले रुग्ण- (११८६), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

अकोला: बाधित रुग्ण- (२३९०), बरे झालेले रुग्ण- (१८६५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३०), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१०४१), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (७८६), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

नागपूर: बाधित रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (१७५४), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९०४)

वर्धा: बाधित रुग्ण- (१३५), बरे झालेले रुग्ण- (६२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

भंडारा: बाधित रुग्ण- (२१०), बरे झालेले रुग्ण- (१७४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२५०), बरे झालेले रुग्ण- (२२२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३४३), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३४५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)

एकूण: बाधित रुग्ण-(३,८३,७२३) बरे झालेले रुग्ण-(२,२१,९४४),मृत्यू- (१३,८८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,५९२)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

तातडीने पावले उचलल्याने कोरोना मृत्यूंचे प्रमाण कमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील कोरोना उच्च क्षमता प्रयोगशाळेचे उद्घाटन

मुंबईत रोगप्रतिकारकशक्तीविषयक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि २७: कोरोनाच्या या भयंकर साथीतून आपल्याला खूप शिकायला मिळाले.महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  केली. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचविणे हा आपला संकल्प असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच तातडीची पाऊले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखल्याचे आणि १० लाख लोक बरे झाल्याचे सांगितले

भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी उच्च क्षमतेची अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन झाले याप्रसंगी  मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

कोरोना लढ्यात ही  आवश्यक सुविधा उपलब्ध केल्याबद्धल पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले, आज केवळ चाचणी, रुग्णांचे संपर्क शोधणे, आयसोलेशन अशा काही माध्यमांतूनच आपण लढतो आहोत. कोरोनावर उपचारासाठी निश्चित औषध आज तरी नाही, त्यामुळे सगळे विश्वच एक प्रयोगशाळा बनले आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये कोरोना विषयक जम्बो सुविधा उभारण्यास सुरुवात केली असून मुंबईत तर २० दिवसांमध्ये आम्ही या सुविधा उभ्या केल्या आहेत. ‘चेस दि व्हायरस’ परिणामकारकरित्या राबविल्याने चांगले परिणाम दिसत आहेत.कोरोनावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे राज्याने देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग सुरु केला. या  थेरपीचा उपचारांमध्ये परिणामकारक उपयोग दिसू लागला आहे.

मुंबईच्या परिसरात कायमस्वरूपी असे संसर्गजन्य  रोगांवरील उपचार करणारे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मानस व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, त्यामुळे येणाऱ्या अनेक जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचा ठामपणे मुकाबला करता येईल.

पीपीई किट्समास्क अधिक काळासाठी मिळाव्यात 

केंद्र सरकारने सप्टेंबरच्या पुढेदेखील राज्यांना पीपीई किट्स आणि एन ९५ मास्कचा पुरवठा करावा अशी विनंती करून मुख्यमंत्र्यांनी राज्यात जिल्ह्यांमध्ये डॉक्टर्सचे टास्क फोर्स आणि गावोगावी ग्राम दक्षता समित्या स्थापन करून कोरोना विषयक जनजागृती करीत आहोत असे सांगितले. मार्चमध्ये राज्यात २ प्रयोगशाळा होत्या. त्या आता १३० पर्यंत गेल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतर उपाययोजनांची देखील माहिती यावेळी दिली.  

चाचणी केंद्राविषयी माहिती

भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी ही अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत

या उच्च क्षमता केंद्रांमध्ये High Throughput COVID-19 सुविधा  असून या यंत्राचे वैशिष्ट्य हे आहे की, कोविड विषाणूच्या १२०० चाचण्या प्रत्येक दिवशी ३ पाळ्यांमध्ये आणि ते सुद्धा परिणामकारकरित्या केल्या जातात. यात स्वयंचलित नमुना तपासणीची प्रक्रिया  मोठ्या प्रमाणावर केली जाते, ग्रुप टेस्टिंग शक्य होते.

ही संपूर्ण प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने होत असल्याने चाचणीचा वेग तर वाढतोच शिवाय प्रत्यक्ष हाताळणी न झाल्याने या केंद्रातील व्यक्ती सुरक्षित राहतात. एकदा नमुने या यंत्रात टाकले की कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय प्रक्रिया सुरु होते आणि अव्याहतपणे सुरु राहते. रिमोट एक्सेस पद्धतीने चाचणीचे अहवाल आणि विश्लेषण प्राप्त होते. यात प्रक्रियेवर रिअल टाईम देखरेख ठेवता येते

सध्या राज्यातील प्रयोगशाळामध्ये कोविड चाचणीसाठी बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. मॅन्युअल पद्धतीने RNA काढावा लागतो. त्यानंतर या नमुन्याची आरटीपीसीआर चाचणी दुसऱ्या यंत्रावर घेतली जाते. या नव्या प्रणालीत  इतर रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्याबाबतीत देखील नमुन्यांची चाचणी करता येते, जसे की, एचआयव्ही, एचसीव्ही, सीएमव्ही सद्य परिस्थितीत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधानमध्ये आरटीपीसीआरवर आधारित प्रयोगशाळेत २०० चाचण्या दिवसाला होऊ शकतात.

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानविषयी…

मुंबईतील या संस्थेने नुकतेच ५० वर्षे पूर्ण केली असून देशातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्माला घालण्याचा मान या संस्थेकडे जातो. प्रजननाच्या बाबतीत मूलभूत संशोधन याठिकाणी पार पाडले जाते.  

कोविडमुळे निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती पाहता या संस्थेने पुढाकार घेऊन कोविडची अद्ययावत प्रयोगशाळा सुरु केली आहे.  

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे मॉडेल रुरल हेल्थ युनिट स्थापन केले असून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यात येते. पालघर जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने या संस्थेने डहाणू येथे देखील एक चाचणी सुविधा सुरु केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढविल्या

राज्यात २६६५ कोविड समर्पित आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय.

एकूण ३ लाख ६ हजार १८० आयसोलेशन बेड्स. ऑक्सिजन बेड्स ४२ हजार ८१३

आयसीयू बेड्स ११ हजार ८८२

 ३७४४ व्हेंटीलेटर्स, ७ लाख ६ हजार ९११ पीपीई किट्स

१२ लाख ५९ हजार ३८२ एन ९५ मास्क

खाकी वर्दीतील ‘माणुसकी’

0

पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांच्‍या नेतृत्‍वाखाली पुणे पोलिसांनी टाळेबंदीच्‍या काळात कौतुकास्‍पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्‍हानात्‍मक होते. कारण त्‍यासाठी कोणतेही मॅन्‍युअल नव्‍हते, लेखी आदेश नव्‍हते, ड्यूटी चार्ट नव्‍हता.. आपल्‍या विवेकशक्‍तीचा वापर करुन प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये योग्‍य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्‍या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता.

‘जे का रंजले गांजले, त्‍यासि म्‍हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचिं जाणावा’ असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्‍हटले आहे. या उक्‍तीचा तंतोतंत प्रत्‍यय पुणे पोलीस आयुक्‍तालयातील दलाने दाखवून दिला. पुणे शहरात 9 मार्चला कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती आढळल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा गतीने कामाला लागली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी शासनस्‍तरावरुन वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्‍यात आली. पहिला टप्‍पा 25 मार्च ते 14 एप्रिल 2020, दुसरा टप्‍पा 15 एप्रिल ते 3 मे 2020, तिसरा टप्‍पा 4 मे ते 17 मे 2020 आणि चौथा टप्‍पा 18 मे ते 31 मे 2020 असा होता.

सर्वसाधारण परिस्थितीत पोलीस दल कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित कशी राहील, यासाठी प्रयत्‍न करत असते. कोरोनामुळे आलेल्‍या टाळेबंदीमध्‍ये मात्र पोलीस दलाला लोकांना कमीत कमी त्रास कसा होईल, यावर भर द्यावा लागला. पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांच्‍या नेतृत्‍वाखाली पुणे पोलिसांनी या काळात खूपच कौतुकास्‍पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्‍हानात्‍मक होते. कारण त्‍यासाठी कोणतेही मॅन्‍युअल नव्‍हते, लेखी आदेश नव्‍हते, ड्यूटी चार्ट नव्‍हता.. आपल्‍या विवेकशक्‍तीचा वापर करुन प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये योग्‍य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्‍या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता.

पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त डॉ. मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त डॉ. पंकज देशमुख, सुहास बावचे, वीरेंद्र मिश्र, स्वप्ना गोरे, पौर्णिमा गायकवाड, शिरीष सरदेशपांडे, संभाजी कदम आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेवून त्‍यांना दिलासा दिला. टाळेबंदीच्‍या काळात पुणे शहर पोलीस दलातील ‘माणुसकी’चा अनुभव अनेकांना आला. त्‍यातील काही प्रसंग, घटनांना माध्‍यमांनी व्‍यापक प्रसिध्‍दी दिली. यापैकीच काही घटना येथे सादर करीत आहे.

मांडवावर वेल- पोलिसांच्या साक्षीने

‘कन्यादानासारखे पुण्‍य नाही, असे म्‍हणतात. टाळेबंदीच्‍या काळात पोलीस अधिकारी श्री. घाडगे यांना कन्‍यादानाचा आनंद मिळाला. एक मूक मुलगी, तिच्या वडिलांचा फोन बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांना आला. त्या फोनवर झालेल्या संभाषणातून त्यांना कळालं, की ज्या मूक मुलाशी त्यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे तो औरंगाबादला आहे. पण लॉकडाऊनमुळे त्याला पुण्यात येणं शक्य नव्हतं. वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांनी फक्त ई-पास देऊन त्या मुलाला पुण्यात आणण्याची व्यवस्था केली नाही तर या लग्नात बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्यावतीने ५ जण नवऱ्या मुलाचे पाहुणे म्हणून आणि ५ जण नवरी मुलीकडचे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी छोटासा मांडव घातला, लहान स्टेज बांधले, भटजी सुद्धा बोलावले आणि हा लग्न सोहळा आनंदात पार पाडला.

श्री. घाडगे म्हणाले, मला तर माझ्याच मुलीचे ‘कन्यादान’ करतो आहे असे वाटत होते. ह्या लग्न सोहळ्यानंतर नवविवाहित दांपत्याला औरंगाबादला विना अडथळा पोहोचण्याची सुध्दा व्यवस्था केली. असे हे पोलीसांच्या साक्षीने झालेले लग्न

खाकीतील ‘देवदूत’

२३ वर्षाच्या एका विवाहितेने विषारी औषध प्राशन केलं. तिला शिवणेतल्या मिनर्व्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिथल्या डॉक्टरांनी उत्तमनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर यांनी तिची माहिती घेतली व हॉस्पिटलला बिल भरत असल्याचे कळवले. परंतु पंधरकरांनी दिलेल्या माहितीनुसार हॉस्पिटलने तिच्यावर मोफत उपचार करून त्याच दिवशी घरीही सोडले. या महिलेच्या पतीशी बोलल्यावर कळले की तो कोथरुडमधील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करतो. परंतु लॉकडाऊनमुळे नोकरी सुटल्याने त्याच्याकडे पेट्रोल काय, रेशन आणायलासुद्धा पैसे नव्हते. त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये जाऊ शकला नाही. पंधरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दाम्पत्याला काही हजार रुपयांची मदत केली आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने महिन्याभराच्या रेशनची व्यवस्था केली. तसेच त्यांनी मेडिकलच्या मालकाशी बोलून त्याची नोकरी परत मिळवून दिली. त्याची पत्नी पिंपरी-चिंचवडमध्ये कामास होती. परंतु नोकरी गेल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. श्री. पंधरकर यांनी दोघांचे समुपदेशन केले. दोघे पती-पत्‍नी आता ठीक आहेत आणि पोलीसांचे आभार मानायला पोलिस स्टेशनला येऊनही गेले. खरंच पोलिसांच्या रूपात त्यांना ‘देवदूत’च भेटले.

निराधारांना आधार

सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सचिन निवंगुणे व अश्विनी गोरे या एसपीओच्या मदतीने नऱ्हे इथल्या नवले म्युनिसिपल स्कूलमध्ये २ महिन्यांपासून आश्रय घेतलेल्या ७५ जणांची उत्तम काळजी घेतली.

श्री. शेळके म्हणाले, लॅाकडाऊन जाहीर झाल्‍यावर आम्ही जेव्हा त्यांना इथे आणले, तेव्‍हा त्यांचा अवतार खूपच गबाळा होता. केस वाढलेले, दाढी-आंघोळीचा पत्ता नाही. पण या टीमने एसपीओंच्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या सर्वांची तात्काळ व्यवस्था केली, त्यांना नवीन कपडे दिले. या सर्व टीमने अगदी समरसून हे काम हाती घेतलं. त्यांना खाऊ-पिऊ घातलं, दाढी-आंघोळ-कपडे इतकंच नाही तर त्यांना मनोरंजनासाठी टीव्ही सुद्धा पुरवला. यातील काही दारुच्‍या तर काही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले होते. त्यांचं पुनर्वसनही करण्यात आलं. जेव्हा या निवाऱ्यातून निघायची वेळ आली, तेव्हा कित्येकांचा पाय निघत नव्हता. हीच पावती होती शेळके साहेब आणि त्‍यांच्‍या पथकाच्‍या कामाची !

काळ आला होता पण !

चतु:शृंगी पोलीस स्टेशनचा फोन वाजला. कंट्रोल रूममधून आलेला तो फोन पी. आय. अनिल शेवाळे यांनी घेतला आणि त्यांना कळलं की, कुणीतरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांनी लगेच बिट मार्शल्स दत्ता गेंजगे, प्रवीण शिंदे, मोबाईल स्टाफचे वन्दू गिरे आणि किशोर शिखरे यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यावर त्यांना दिसले की, बेरोजगार झालेला आणि सलूनमध्ये केशकर्तनाचे काम करणारा जयराम गायकवाड याने खचून जावून कात्रीने स्वत:वर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिथे असणाऱ्या लोकांनी अॅम्बुलन्ससाठी बरेच फोन केले, पण यश आले नाही म्हणून त्यांनी श्री. शेवाळे यांना फोन केला. त्यांनी त्या जखमीला पोलीसांच्या गाडीतून औंधच्या रुग्णालयात नेण्याची सूचना केली. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या टिमने वेळीच हालचाल केली म्हणूनच आज जयराम जिवंत आहे

दोन जीवांची सुटका !

दि. 31 मार्च 2020 ची घटना. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक विद्या राऊत या हवालदार विठ्ठल शिंदे आणि ऑपरेटर जगदीश खेडकर यांच्‍यासह वन मोबाईल व्हॅनवर कार्यरत होत्या. पुणे-सातारा नवीन हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना पहाटे पावणे पाचच्या सुमारास बोगद्याच्या थोडं पुढे एक अँब्युलन्स कडेला उभी असलेली त्यांना दिसली. चौकशीअंती कळले की, त्यात 7 महिन्यांची एक गरोदर महिला होती व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्‍या लोखंडी बार मध्ये अडकली होती. ही महिला हादऱ्यामुळे खूप घाबरली होती. मोबाईल व्‍हॅनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला व तिच्या पतीला धीर देऊन खाली उतरवले. अडकलेली अँब्युलन्स बाहेर काढणे अवघड झाले होते, कारण लॉकडाऊनमुळे रस्त्यावर मदतीसाठी कुणीच नव्हते. एकंदर परिस्थिती पाहता श्रीमती राऊत व कर्मचाऱ्यांनी या महिलेस पतीसह पोलीस व्हॅनमध्ये बसवून भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डॉक्टरांशी बोलल्यावर कळाले की, अँब्युलन्सला बसलेल्या हादऱ्यामुळे ही महिला घाबरली होती व तिचा रक्तदाब कमी झाला होता. तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे पुढचा धोका टळला होता व तिची तब्येत स्थिर झाली होती. पोलीस निरीक्षक विद्या राऊत, शिंदे, खेडकर यांनी कर्तव्‍यावर असताना दाखवलेल्या माणुसकीमुळे एक नव्हे तर दोन जीव कठीण परिस्थितीतून बाहेर आले.

पोलीस नव्हे, मोठा भाऊ

हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणारा सचिन चव्हाण हा १९ वर्षांचा सटाण्यातील पिंपळदरा (नाशिक) येथील मुलगा. लॉकडाऊनमुळे एकटा पडला होता. त्यात त्याला किडनी स्टोनचा त्रास. त्यामुळे तो तणावाखाली होता. अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. डापसे (८३९५) यांना तो पोलीस स्टेशनजवळ फिरताना आढळला. त्याची विचारपूस करून त्यांनी त्याला धीर दिला. इतकंच नाही तर एका महिन्यापर्यंत त्याच्या जेवणाची व्यवस्था केली आणि दोन महिन्याचे घरभाडेसुद्धा स्वतःच्या पगारातून भरले. त्याचबरोबर त्याची रितसर वैद्यकीय तपासणी करून नाशिकला परत जाण्याची सोय केली.

एका मोठ्या तणावातून सचिन मोकळा झाला. श्री. डापसे यांनी मोठ्या भावासारखी काळजी घेतल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले, तसेच समस्त पोलीस दलाचेही.

आत्ता हरवले, आत्ता सापडले !

पुणे स्टेशनहून बिहारला जाणाऱ्या कामगारांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी पोलीस नाईक बर्डे आणि ढापसे यांच्यावर होती. नवरा-बायको दोन लहान मुलं व त्यांच्याकडे असणारी एक बॅग असे एक कुटुंब त्यांना स्टेशनकडे येताना दिसलं. ते सर्वांत शेवटी उतरले आणि ते उतरताच बस सुटली. बर्डे सांगत होते, त्यातील महिला रडू लागली. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचे काही सामान बसमध्येच राहिलं. त्यात मुलाची दुधाची बाटली पण होती. तिला शांत केले आणि आम्ही दोघांनी बस आणि ड्रायव्हरची माहिती काढली. त्यांना असं कळलं की, बस हडपसर डेपोत पोहचली सुध्दा. पण हार न मानता ढापसे आपल्या दुचाकीवरुन वेगाने डेपोत गेले आणि त्या महिलेचे सामान परत मिळवले. तोपर्यंत बर्डे त्या कुटुंबाला धीर देत होते. त्यांनी आपले सामान परत आणलेले पाहताच सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले.

त्या चौघी, पुन्हा आनंदी!

बिबवेवाडीत राहणाऱ्या श्रीमती के. आजोलिऊ लॉकडाऊनच्या एक दिवस आधी सांगवीत

राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीला भेटायला गेल्या आणि तिथेच अडकल्या. यिनमिंगला रायखन, थँग्निमोई

ल्यूडीया वायफेई या इतर मैत्रिणीही त्यांच्यासोबत अडकल्या. परंतु, एका मर्यादेनंतर या सर्वांना तिथून निघणे आवश्यक झाले. इकडे-तिकडे प्रयत्न करून आजोलिऊ यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्‍त बच्चन सिंग यांच्‍याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. त्‍यांनी तात्काळ युनिट १ चे वरिष्ठ पी.आय. अरुण वायकर यांना कळवले. वायकर साहेब सांगतात की, ती खूप घाबरलेली होती व मला ते जाणवत होते. त्यांनी लगेच पोलीस निरीक्षकांसोबत अधिकृत गाडी पाठवली आणि त्यांना घरी पोहोचवले.

काळजी ज्येष्ठ नागरिकांची !

निवृत्त जनरल शेरलेकर (वय वर्षे ८७) हे बी. टी. कवडे मार्गावर सोपान बागेतील त्यांच्या घरात एकटेच राहत होते. त्यांचा मुलगा हा वडगाव शेरी येथे राहतो. पण लॉकडाऊनमुळे पिता-पुत्र यांची भेट होऊ शकत नव्हती. खूप प्रयत्न केल्यावर त्यांनी उपायुक्‍त बच्चन सिंग यांच्या व्हॉट्सॲपवर याबाबत संपर्क साधला. त्‍यांनी हडपसरच्या क्राईम ब्रँच युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांना कळवले. श्री. चव्हाण यांनी पीएसआय सोमनाथ शेंडगे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याची कल्पना दिली आणि त्यांची टीम श्री. शेरलेकर यांच्या घरी पोहोचवली. त्यांनी फक्त भाजीपाला किंवा इतर सामान असे नाही दिले तर त्यांच्या औषधांची सुद्धा व्यवस्था केली. दोन दिवस त्यांच्या मदतीला त्यांच्यापैकी सतत कोणीतरी होतं. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या मुलांशी संपर्क साधला आणि त्यांची विना-अडथळा नियमित भेट व्हावी यासाठी प्रवास परवानगीची सोय केली. एवढेच नाही तर मुलाच्या गाडीसाठी पेट्रोल सुद्धा मिळवून दिले. श्री. चव्हाण म्हणतात, आम्ही केलेल्या या मदतीमुळे शेरलेकर साहेबांना खूप आनंद झाला. आम्ही अजूनही त्यांची रोजच विचारपूस करतो. एका जेष्ठ नागरिकासाठी डी.सी.पी. बच्चन सिंग, पी.आय. दत्ता चव्हाण, पी.एस.आय. सोमनाथ शेंडगे आणि त्यांच्या टीमने केलेल्या या मदतीचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे.

देव माणूस !

हिंदी चित्रपटात पोलिस नेहमीच अगदी शेवटी येतात. पण टाळेबंदीच्‍या कालावधीत हडपसर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. प्रसाद लोणारे हे खऱ्या अर्थाने हिरोच्या भूमिकेत चमकले. त्यांनी अशी मदत केली जी एक हिरोच करू शकेल. विकी कवडे हा दिव्यांग त्याच्या तीन चाकी अॅक्टिवावर किरकोळ वस्तू विकून उपजीविका करायचा. पण कोरोनाच्या संकटामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. संपूर्ण लॉकडाऊन झाल्यावर विकी आणि त्याच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली. विकी डोळ्यात अश्रू घेऊन लोणारे साहेबांसमोर उभा राहिला. त्‍यांनी त्याला धीर दिला. त्याला आवश्यक वस्तूंची त्यांनी सोय केली. हसतमुखाने विकी घराकडे निघाला. पण तो जाण्यापूर्वी श्री. लोणारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला नुसतंच आश्वासन दिले नाही तर जबाबदारी सुद्धा घेतली की, त्याचा व्यवसाय जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत विकी आणि त्याच्या कुटुंबाला ते नियमित अन्नधान्य पुरवतील.

श्री. लोणारे म्हणाले, ‘हे आम्ही काही फार मोठं काम केलं आहे, असं नाही. तर आपण या समाजाचं काही देणे लागतो, ही भावना मनात ठेवली आणि कृती केली’. ही गोष्‍ट प्रत्‍येकासाठी नक्‍कीच प्रेरणादायी आहे.

पुनर्भेट

बंडगार्डन पोलीस स्टेशनअंकित ताडीवाला रोड पोलिस चौकीचे ए.पी.आय. अमोल काळे यांना हॉटेल मेरूच्या गेटसमोर ८० वर्षांची एक वृध्द महिला आढळून आली. त्या महिलेची अवस्था पाहून त्‍यांनी माहिती घेतली. जेव्हा त्यांना कळालं की, ती बोलू शकते आहे, तेव्हा त्यांनी तिची विचारपूस केली. तिच्यासाठी खाण्या-पिण्याची व्यवस्था केली. त्यांनी तिचा फोटो काढून त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील तब्बल ६०० लोकांपर्यंत पोहचवला. काही वेळातच त्यांना कळाले की, ती वृध्द महिला बालमित्र मंडळ भागात राहते. त्यांनी तिला तिच्या घरी पोहोचविण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिच्या नातेवाईकांना चौकीवर बोलावून घेतले आणि अशा दिवसात वृध्द नातेवाईकांची कशी आणि किती काळजी घेतली पाहिजे, याबद्दल समजावून सांगितले. त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा आणि त्यांना घराबाहेर पडू देवू नका, अशी तंबी सुध्दा दिली.

मेरे पास मेरी माँ है !

कोथरूडमध्ये एक अंध दाम्पत्य राहते. ते दोघेही एका बँकेत नोकरी करतात. ती महिला गरोदर होती. नववा महिना चालू झाला होता. अशा वेळी तिच्याजवळ तिची आई असणं खूप आवश्यक होतं. अर्थात असं कुठल्याही गर्भवती महिलेला वाटणं साहजिकच आहे. पण लॉकडाऊनमुळे लातूर येथे राहणारी तिची आई पुण्यात येणार कशी ? हा मोठा प्रश्न होता. त्यांनी क्राईम ब्रँचचे डी.सी.पी. बच्चन सिंग यांना संदेश पाठवला. डी.सी.पी. साहेबांनी तात्‍काळ क्राईम ब्रँच वरिष्ठ पी.आय. महेंद्र जगताप यांना याबाबत कल्पना दिली.

आता त्या महिलेच्या आईला पुण्यात आणायचं कसं ? खूप प्रयत्नानंतर त्यांना कळालं की, त्यांचेच एक सहकारी पोलीस नाईक दाऊद सय्यद हे सुट्टीसाठी लातूरला गेले आहेत. त्यांनी लगेच श्री. दाऊद यांच्याशी संपर्क साधला. श्री. दाऊद यांनी त्यांना सोबत घेतलं आणि कोथरूडमध्ये त्या अंध दाम्‍पत्यापर्यंत पोहचवलं ! टाळेबंदीच्‍या काळात ‘मला माझी आई हवी’ ही त्या महिलेची इच्छा खाकी वर्दीने पूर्ण केली.

बाजीगर

टाळेबंदीचे (लॉकडाऊन) व्यवस्थित पालन होते आहे ना, हे पाहण्यासाठी बिट मार्शल ग्रुपची नेमणूक करण्यात आली होती. बिट मार्शल ग्रुपमधील शेखर बाबासाहेब कौटकर (बिल्ला नं. ३६३६) हे बालगंधर्व भागात डयुटीवर होते. त्‍यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एक माणूस झोपलेला आढळला. पण त्याला गाढ झोप लागली आहे, असे वाटून ते पुढील फेरीसाठी गेले. ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना तोच माणूस त्याच अवस्थेत तिथे निपचित पडलेला दिसला. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. त्याची ती अवस्था पाहून हा माणूस मृत तर झाला नसेल ना अशी त्यांना शंका आली. कोरोना संसर्गाचे वातावरण बघता त्यांना त्याच्याजवळ जाण्याचे धाडस होईना. तरी सुध्दा जराही वेळ न घालवता त्यांनी त्वरीत जवळच्या पोलीस चौकीशी संपर्क साधला. त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे एक डॉक्टर आले. त्यांनी त्या माणसाला तपासले आणि भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याची अशी अवस्था झाली असल्‍याचा निष्‍कर्ष काढला. श्री. कौटकर यांनी लगेच त्या माणसासाठी खाण्याच्या पदार्थांची व्यवस्था केली. पुरेसं खाणं झाल्यावर त्या माणसाला जरा तरतरी आली. त्याला काही प्रश्न विचारल्यावर त्याने कसेबसे सांगितले की, तो एक सिक्युरिटी गार्ड आहे. पण लॉकडाऊन असल्याने त्याची खाण्यापिण्याची सोय होऊ शकली नाही. अंगातील त्राण गेल्याने त्याची अशी अवस्था झाली होती. त्यानंतर १०८ क्रमांकावरुन ॲम्बुलन्सला बोलावून त्याला अधिक तपासणी आणि उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले.

तो माणूस मूळचा सातारा भागातील होता. पण असाध्य व्याधीमुळे घरचे लोक त्याला सांभाळण्यास तयार नव्हते. ४-५ दिवसांनी कळाले की, त्याचा ससून रुग्‍णालयात मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह शवागारात हलविण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनाने नातेवाईकांना ही बातमी कळविण्याचा प्रयत्न केला. पण शव ताब्यात घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही म्हणून पोलीसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

निधड्या छातीचे योध्दे !

चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनअंकीत पाषाण पोलीस चौकीमध्ये पी.एस.आय राकेश सरडे त्यांच्या कामात व्यस्त होते. त्यांना पाषाण येथील सोसायटीमधून एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पी.एस.आय सरडे आणि त्यांचे सहकारी महेश बामगुडे, अनिकेत भोसले आणि दिपक फासले यांच्या सोबत पोलीस मित्र गब्बर शेख हे त्या महिलेच्या घरी पोहचले.

तिकडे जात असतानाच त्यांनी पुणे महानगरपालिकेचे संपर्क अधिकारी आणि अँब्युलन्स सेवेला सुध्दा फोन करुन या घटनेची कल्पना दिली. पण, तिथे पोहचल्यावर महानगर पालिकेने मृतदेह स्‍वीकारुन पुढील कार्यवाहीस नकार दिला. याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी त्या गृहस्थाचा कोविड-19 अहवाल पॉझिटिव्ह आला होता. राकेश सरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि 9 मजले चढून ते त्या घरात पोहचले. त्यांच्यातील दोघांनी पीपीई कीट परिधान केले होते. त्यांनी अधिकृत प्लॅस्टिकच्या बॅगेत तो मृतदेह व्यवस्थित गुंडाळला आणि ससूनमध्ये नेला. तिथे शवचिकित्सा झाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार सुध्दा केले.खाकी वर्दीतील निधड्या छातीच्या योद्ध्‍याने ते धाडस दाखवले, ते जीवावर उदार होवून लढले. श्री. सरडे म्हणाले की, ‘हे एक टिमवर्क होते आणि पार पाडायचेच असाच सगळ्यांनी विचार केला.’

प्राण रक्षक !

सोलापूरला राहाणाऱ्या अभय चावरे यांना त्यांच्या लहान मुलासाठी पुण्यातील सिंहगडरोड येथील डॉक्टरांनी काही औषधे कुरियरने पाठवली होती. पण टाळेबंदीमुळे शहरांतर्गत कुरियर सेवा बंद झाली होती आणि औषधांचे पार्सल अडकून पडले. श्री. चावरे यांनी सिंहगडरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्याशी संपर्क साधला. ज्यांनी पुढे ए.पी.आय. सतीश उमारे यांना काही सूचना दिल्या. श्री. उमारे यांनी ती कुरियर कंपनी शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना त्यांचे दुकान उघडायला लावून किलोभर वजनाचे औषधाचे पार्सल ताब्यात घेतले. नंतर पोलीस नाईक श्री. पोळ यांच्याकरवी ते पार्सल हडपसर येथील त्यांचे सहकारी ए.पी.आय. श्री. पाटील यांच्याकडे पोहचवले. श्री. पाटील यांनी ते सोलापूरला पाठवण्याची व्यवस्था केली आणि ती औषधे त्या गरजू मुलापर्यंत वेळेत पोहचली. श्री. उमारे म्हणाले की, हे एक टीमवर्क होतं. शेळके साहेब, पोलीस नाईक पोळ, माझे सहकारी पाटील यांच्या प्रयत्नातून ते पार्सल सोलापूरला वेळेत पोहोचवले गेले, ही समाधानाची व आनंदाची बाब होती

का रे दुरावा ?

पोटचा गोळा म्हणजे आई वडिलांचा जीव की प्राणच! पण लष्कर पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक दिपक लांडगे यांना त्यांच्या नवजात मुलीला तब्बल दोन महिने स्पर्शसुध्दा करता आला नव्हता. श्री. लांडगे यांना एक मुलगा आहे. आता मुलीच्या जन्माने त्यांना खूप आनंद झाला होता.

१४ मार्च रोजी जन्मलेल्या मुलीला माझ्या हातात घेण्यासाठी २४ मे पर्यंत वाट पहावी लागली. माझ्यासाठी हे खूपच कठीण होतं. पण, मी संयम राखला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसले आणि लष्कर पोलीस स्टेशनमधील माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप धीर दिला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे! अशा शब्दात दिपक लांडगे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या कालावधीत ते त्यांच्या मुलीला व्हिडिओ कॉल किंवा व्हॉट्सअॅपवर आलेल्या फोटोतच पाहू शकले. कारण, पुण्यातील कोविड बाधीत क्षेत्र कॅम्प भागात ते आणि त्यांचे सहकारी गरजूंना मदत करत होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांची भूक त्यांनी भागवली. तब्बल दोन महिन्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं, तो क्षण म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.

आजीबाईंचा वाढदिवस

जोरात टाळया वाजल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर छान हसू फुललं आणि आनंद पसरला. विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांचे डोळे पाणावले. कारण त्यांनी 83 वर्षांच्या एका आजींचा वाढदिवस धडाक्यात साजरा केला. मागील साठ दिवसांपासून या आजींनी घराबाहेर पाऊल टाकलं नव्हतं. पण, आम्ही सर्वांनी ठरवून त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याचा आनंदी चेहरा, त्यांचं ते हसू पाहून आम्ही सुध्दा आनंदलो. अशा ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, म्हणूनच आम्हाला बळ मिळतं, असे रवींद्र कदम म्हणाले.

‘आजी, हॅपी बर्थ डे’ असं जोरात ओरडून आजींनी शंभरी नक्की पार करावी, अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केल्या.

एक कहाणी पोतराजाची

पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर आणि गल्लोगल्ली फिरून स्वत:च्या उघड्या पाठीवर चाबकाचे फटके मारून गुजराण करणाऱ्या पोतराजाला सगळेच ओळखतात. हडपसर भागात असाच एक पोतराज या गल्लीतून त्या गल्लीत पोटासाठी काही मिळतं का ते शोधत फिरत होता. पण लॉकडाऊनमुळे त्याच्यावर बिकट प्रसंग आला. कुणीतरी त्याला हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जावून नोडल ऑफिसर ए.पी.आय. प्रसाद लोणारे यांना भेटायला सांगितलं. आतापर्यंत बहुतेक सर्व नागरिकांना समजलं होतं की, लोणारे साहेबांनी अनेक लोकांना अशा काळात मदत केली आहे. चौकीबाहेर बराच वेळ थांबल्यावर त्या पोतराजाची आणि लोणारे साहेबांची भेट झाली. त्‍यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी त्याला १५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य दिले. ही देवाचीच कृपा झाली असे समजून पोतराजाने सगळ्यांचेच आभार व्यक्त केले.

ईद साजरी होणारच !

आपल्या आयुष्यात उत्सव रंग भरतात. पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे कसला सण आणि कसला उत्सव. दर वर्षी दिमाखात साजरी होणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी लागली. काही जणांच्या नशिबी ते सुध्दा नव्हतं. पोलीस नाईक रामचंद्र गुरव यांना अमन दौलत खान हा 12 वर्षाचा मुलगा स्वारगेट येथील जेधे चौकात आढळून आला. तो त्याच्या आजी –आजोबांसोबत राहत होता. जे कंत्राटी कामगार होते. श्री. गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या तिघांना नियमितपणे फक्त खायला दिलं नाही तर त्यांचं रेशनसुध्दा भरुन दिलं.

जेव्हा अमनला विचारल की, या वर्षी तो ईद कशी साजरी करणार आहे? तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ‘शक्यच नाही हो!’ त्याने दिलेलं उत्तर ऐकून श्री. गुरव हेलावून गेले. त्यांनी कपड्यांसाठी त्या मुलाची मापं घेतली आणि ईद साजरी करण्यासाठी त्याला नवीन कपडे शिवून दिले. अमन तर हरकून गेला. एका मुस्लिम मुलाची ईद साजरी करण्यासाठी जणू श्री रामचंद्रच अवतरले! खरंच, माणुसकीला कुठलाच रंग नसतो.

अनाथाला दिले जीवदान

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा यांनी दिलेल्या माहितीनुसार साळुंखे विहार रोड येथे एक भिक्षेकरी फीट आल्याने खाली कोसळला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने रक्त येत होते. नागरिकांपैकी कोणीही मदत करायला पुढे येत नव्हते. मार्शल ड्युटी असलेले पोलीस शिपाई प्रशांत कांबळे व आनंद धनगर यांनी त्याला पाहताच रिक्षातून जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले व तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार झाले. या दोघांनी त्याच्या चहा -जेवणाची सुध्दा सोय केली. तसेच पुढील उपचारांसाठी मीनाताई ठाकरे या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या मार्शल्समुळे एका निराधार व्यक्तीचे प्राण वाचले.

मदत मोलाची, प्रचिती माणुसकीची !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर 30 एप्रिल रोजी सकाळी कात्रज चौकात नाकाबंदीवर ड्युटी करत होते. यावेळी आठ महिन्यांची एक गरोदर महिला खांद्यावर बॅग आणि आपल्या 5 वर्षांच्या मुलासह चालत येताना त्यांना दिसली. मेव्हण्यांचे निधन झाल्याने त्या मार्चमध्ये गुजरातहून पुण्यात बहिणीकडे फातिमानगर येथे आल्या होत्या आणि लॉकडाऊनमुळे इथेच अडकल्या. परंतु, त्रास होऊ लागल्यामुळे त्या सकाळी 5 वाजताच तिच्या घरुन निघाल्या. अँब्युलन्स मागवून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पाठविले व त्यांच्या चहा-नाष्ट्याची व्यवस्था केली. त्यांच्या पतीशी संपर्क साधून त्यांना पुण्याला येण्यास सांगितले व त्यासाठी लागणाऱ्या डिजीटल पासबाबत मार्गदर्शनही केले. पास मिळण्यास दोन दिवस लागत असल्याने या महिलेला निवारा केंद्रात दाखल केले. पास मिळताच तिचे पती येथे आले व तिला सोबत घेऊन गुजरातला घरी गेले. या महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, विद्या भोसले, उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांनी या कामात मार्गदर्शन केले.

मायलेकींची पुनर्भेट

पुण्यातील मूकबधीर जोडप्याची ७ वर्षांची मुलगी आजीकडे गावी गेली होती. परंतु लॉकडाऊनमुळे तिथेच अडकली. काही दिवस राहिली. परंतु नंतर ती आई-बाबांकडे जाण्याचा हट्ट करू लागली. त्यासाठी तिच्या मामाला तिला सोडण्यासाठी पुण्याला येण्याची व नंतर गावी परत जाण्यासाठी प्रवासाची परवानगी द्यावी, अशी विनंती सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्याकडे केली. त्‍यानुसार परवानगी देण्यात आली. तसेच प्रवासादरम्यान अडचण आल्यास गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी स्वतःचा मोबाईल नंबरही दिला. ती मुलगी आई-बाबांकडे सुखरूप पोहोचल्याचे नंदिनी जाधव यांनी नंतर कळवले व पोलिसांचे आभार मानले. माझ्याकडे त्या जोडप्याने विनंती केली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची हाक पोलीस खात्याने ऐकली, त्याबद्दल त्‍यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली. त्या पुढे म्हणतात, ड्युटी करत असताना पोलीस बांधव स्वतःच्या मुला-बाळांना भेटू शकत नाहीत. पण समाजात सर्वांनाच मदत करण्यासाठी ते पुढे असतात, मदतीचा हात देतात. यामुळेच मला पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. बच्चन सिंह साहेबांसारखे अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांच्‍या प्रयत्नांमुळेच आज ती लहानगी आपल्या आईच्या कुशीत आहे. पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद.

आजींना मोलाची मदत

प्रभात पोलीस चौकीचे बीट मार्शल चेतन चव्हाण आणि मोहन मालगुंडे ३ मे रोजी प्रभात रोड गल्‍ली क्रमांक 8 येथे गस्तीवर असतांना तेथील एका वृद्ध महिलेने त्यांना आवाज देऊन बोलावले. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले की, त्या एकट्या राहत असून गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. परंतु लॉकडाऊनमुळे वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यांना पायाच्या दुखण्यामुळे पेन्शन आणण्यासाठी चालत जाणेही शक्य नव्हते आणि म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या भांडारकर रोड शाखेतून पेन्शनची रक्कम काढून आणण्याबाबत त्यांनी बीट मार्शल्सना विनंती केली. त्यानुसार बँकेचे पुस्तक घेऊन बीट मार्शल्स बँकेत गेले. बँक व्‍यवस्‍थापकाशी चर्चा करून त्या आजींच्‍या खात्यातून रक्कम काढली व आजींना पैसे सुपूर्द केले. यासाठी स्वतः बँक व्‍यवस्‍थापक पोलिसांसोबत त्यांच्या घरी गेले होते. यापुढेही दर महिन्याची पेन्शन घरी पोहोचवण्याची तयारी दर्शवली. तसेच काही मदत लागल्यास व्‍यवस्‍थापकांनी स्वतःचा फोन नंबर आजींना दिला. विनंतीला मान देऊन मोलाची मदत केल्याबद्दल या आजींनी प्रभात बीट मार्शल्सचे मनापासून आभार मानले.

संजीवनीच जणू

दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांना माहिती मिळाली की, एका वृद्ध दाम्पत्याला मदतीची गरज आहे. ज्यांचा मर्चंट नेव्हीत नोकरीस असलेला मुलगा लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडला आहे. जराही वेळ न दवडता श्री. घेवारे त्यांच्या घरी गेले. त्यांना लक्षात आले की, दाम्‍पत्‍याला औषधांची तसेच डोळ्यांच्या तपासणीची गरज होती. त्यांनी लगेचच डॉक्टरांची व्यवस्था केली. त्यांची तपासणी करुन घेतली व लिहून दिलेली औषधे स्वतः आणून दिली. तसेच डोस कसा घ्यायचा आहे हेही सांगितले. इतकं करूनही ‘माझ्या कुटुंबासाठी केलं असतं तेच केलं’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पोलीस स्टेशनपासून पंधरा मिनिटांवर घर असूनही दोन महिने श्री. घेवारे घरी गेले नव्हते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले होते, असे ते अभिमानान सांगतात.

सह्रदयी दामिनी

सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती केदारी, यास्मिन खान व श्रीमती सोनावणे यांचे दामिनी पथक जीपीओ परिसरात दि. ९ जून २०२० रोजी पेट्रोलींग करत होते. सोबत लहान मुले असलेली एक महिला साधू वासवानी चौकात भीक मागत आहे व त्यामुळे तेथे गर्दी होते आहे, अशी एका गृहस्‍थाने तक्रार केली. दामिनी पथकाने तेथे जाऊन पाहिले. तेव्हा कळले की, ती महिला उत्तर प्रदेशची रहिवासी होती व तिला परत जायचे होते. शिवाय लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून ती व तिची मुले उपाशी होती. तिला पथकाने वडापाव खाण्यास दिले, पाचशे रूपये दिले. तसेच उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वेची चौकशी करून तिला माहितीही दिली. जेव्हा कोणीही लक्ष देत नव्हते, तेव्हा पोलीसांनी जेवण दिले व गावी जाण्यासही मदत

केली. याबद्दल तिने दामिनी पथकाचे मनःपूर्वक आभार मानले तेव्‍हा पथकाच्‍या डोळ्यांतही समाधानाचे अश्रू तरळले.

माणुसकीची परीक्षा पहाणारा टाळेबंदीचा कालावधी निश्चितच कोणालाही आवडणारा नव्‍हता. पण परिस्थितीच तशी होती. या कालावधीत लोकांनीही पोलिसांना मोलाची साथ दिली. वेगवेगळ्या प्रसंगांमुळे पोलीस व लोकांमध्ये विश्वासाचे एक घट्ट नाते वृध्दींगत झाले. खाकी वर्दीतील ‘माणूस’ही अनेकांनी जवळून अनुभवला.

राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

( मोबाईल -9423245456, 9309854982 )

वीरजवान भास्कर वाघ यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले सांत्वन

0

सोलापूर, : बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील वीरजवान भास्कर वाघ यांना लडाखमध्ये अपघाती वीरमरण आले होते. रविवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून धीर दिला.

श्री. भरणे म्हणाले, आज कारगिल विजय दिवस आहे. वीरजवान वाघ हे आपल्या सेवेसाठी सैन्यात भरती झाले होते. त्यांचा काश्मिरमधील लेहमधून कारगिलकडे जाताना अपघातात मृत्यू झाला होता. शासन त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहील. शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. ग्रामस्थांनी वीरजवान वाघ यांच्या कुटुंबाला आधार देऊन सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

वीरजवान वाघ यांच्या कुटुंबियांच्या वतीने जि.प. सदस्या रेखा राऊत यांनी पत्नी राणी वाघ यांना अंगणवाडीसेविका म्हणून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्री श्री. भरणे यांच्याकडे केली.

यावेळी आमदार यशवंत माने, सरपंच श्री. जाधवर, वीरजवान वाघ यांचे वडील सोमनाथ वाघ, आई राजूबाई, पत्नी राणी, दोन्ही मुली, मुलगा आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पुरातन वास्तूंच्या जतन व संरक्षणासाठी १५ व्या वित्त आयोगातून आर्थिक सहाय्य द्या-सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

0

मुंबई, : महाराष्ट्राला सांस्कृतिक पुरातन वास्तूंचा मोठा वारसा लाभलेला असून विविध पुरातत्त्व स्थळे, स्मारके त्याशिवाय ऐतिहासिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली स्तूप, लेण्या, मंदिरे-मशिद, चर्च, किल्ले, वाडे, प्रवेशद्वारे आदींच्या स्वरूपात हा वारसा महाराष्ट्राचे वैभव वाढवित आहेत. या सर्व पुरातन वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून केंद्र शासनाने महाराष्ट्राला आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्याकडे केली आहे. 

१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष श्री. सिंग यांना पाठविलेल्या पत्रात सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. अमित देशमुख यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील पुरातन वारसा स्थळे ही केंद्र, राज्य  आणि महानगर अशा तीन स्तरांवर भारतीय पुरातत्व सर्वेच्या माध्यमातून संरक्षित केले जात आहेत. पुरातत्व संचालनालनालय आणि वस्तुसंग्रहालये हे सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित तर महानगरपालिका या नगरविकास विभागाच्या अखत्यारित आहेत. मध्ययुगीन काळातील विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील मराठा साम्राज्य कालखंडातील वास्तू, वारसा स्थळांचे मोठे वैभव महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या निधीतून अशा अनेक स्मारकांचे दुरुस्ती व संवर्धन केले आहे. तथापि, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्मारकांचे संरक्षण, संवर्धन आणि देखभाल यासाठी अधिक निधीची गरज असल्याचे श्री. देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे. 

महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य विभागाने वारसास्थळे व स्मारके यांचे संरक्षण, संवर्धन व देखभाल व राज्यात संग्रहालये स्थापन करण्यासाठी ७०० कोटींचे आर्थिक सहाय्य केंद्रीय स्तरावरून मिळावे यासाठी सविस्तर प्रस्ताव १५  व्या वित्त आयोगाकडे सादर केला आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास महाराष्ट्राच्या समृद्ध वारसास्थळांचे संरक्षण करण्याबरोबरच त्याचे जतन करण्यात येईल, त्यातून वारसा स्थळांची पर्यटनस्थळे निर्माण करण्याबरोबरच त्याद्वारे रोजगार निर्मिती आणि महसूल मिळण्यास मदत होणार असल्याचेही श्री. अमित देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.