Home Blog Page 2500

पाकिस्तान आणि चीनची झोप उडवेल राफेल

0

अंबाल्चाय एक्स सर्व्हिसमेन वेलफएअर कमेटीचे प्रधान अत्र सिंह मुल्तानी यांनी म्हटले की, राफेल येण्याने पाकिस्तान आणि चीनची झोप उडेल. भारताला असे फायटर मिळाले आहे जे खूप शक्तीशाली आहे. हे शत्रूच्या टार्गेटला सिलेक्ट करुन त्याला उद्धवस्त करु शकते.

स्वागतात काही ठिकाणी ठोल वाजवले तर काही ठिकाणी वाटले लाडू

अंबाला एअरफोर्स स्टेशनवर मंगळवारपासून कडेकोट बंदोबस्त होता. सकाळपासून हेलिकॉप्टर सतत एअरपोर्स स्टेशनच्या वर उड्डाण भरत आहेत. ठिकठिकाणी पोलिस तैनात आहे. राफेल येण्यापूर्वीच शहरात जल्लोष सुरू झाला. ढोलच्या तालावर तिरंगा फडकावण्यात आला. या निमित्ताने माजी सैनिकांनी ठेका धरला. राफेल येण्याच्या आनंदात आमदार असीम गोयल यांनी लाडू वाटले.

अंबालामध्येच का तैनात होत आहेत राफेल?

अंबाला एअरबेस भारताच्या पश्चिम सीमेपासून 200 कि.मी. अंतरावर आहे आणि पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसच्याही जवळ आहे. येथे तैनात केल्याने पश्चिम सीमेवर पाकिस्तानविरूद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात सक्षम होईल. चीनच्या सीमेपर्यंत या एअरबेसचे अंतरही 200 किमी आहे. अंबाला एअरबेसपासून 300 किमी अंतरावर लेहच्या समोर चीनचे न्गारी गर गुंसा एअरबेस आहे. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे एअरबेसवर राफेलच्या अगोदर जगुआर आणि मिग -21 बाइसन सारख्या लढाऊ विमानांनाही तैनात केले गेले आहे.

परमाणु क्षेपणास्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे वेगळे ठरते राफेल

राफेल हवेत फक्त ताशी 2 km किमी वेगाने वेगवान उड्डाण करण्यासोबतच 1,915 किमी प्रति तासाचा वेग वाढवू शकतो. हे हवेतून हवेमध्येच हल्ला करु शकते. यासोबतच हवेतून जमिनीवर आक्रमण करण्यास देखील सक्षम आहे. हे केवळ चपळच नाही तर त्यामुळे अण्वस्त्र हल्ला देखील केला जाऊ शकतो. पाकिस्तानचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान एफ -16 आणि चीनचा जे -20 मध्ये एवढ्या सुविधा नाहीत.

8 ऑक्टोबर रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जाऊन राफेलची पूजा केली होती. त्या पूजेनंतर 9 महिने 21 दिवसानंतर, राफेल हरियाणाच्या अंबाला एअरबेसवर तैनात होत आहे. भारत दैसो एव्हिडएशनमधून जे 36 राफेल फायटर जेट करत आहे. त्यामधील आता केवळ 5 मिळाले आहे. उर्वरीत 31 जेट 2022 पर्यंत मिळण्याची आशा आहे. यापूर्वी भारताने 1997-98 मध्ये रुसमधून सुखोईची खरेदी केली होती. तीन वर्षांनंतर म्हणजेच 2001 मध्ये नवीन फायटर जेट खरेदी करण्याचा निर्णय झाला. 14 वर्षांनंतर 2012 मध्ये राफेल शॉर्टलिस्ट झाले. परंतु भारतात येण्यासाठी याला आठ वर्षे लागली.

नवीन शैक्षणिक धोरणाला मंजूरी, 34 वर्षानंतर पॉलिसीत बदल

0

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणाला मंजूरी देण्यात आली आहे. 34 वर्षानंतर एजुकेशन पॉलिसीमध्ये बदल झाले आहेत. सरकारने म्हटले की, 2035 पर्यंत हायर एजुकेशनमध्ये 50% एनरोलमेंटचे ध्येय ठरवले आहे.

नवीन शैक्षणक धोरणानुसार जगभरातील मोठी विद्यापीठे भारतात आपल्या शाखा सुरू करू शकतील. कॅबिनेटने एचआरडी (ह्यूमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट) मिनिस्ट्रीचे नाव बदलून मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन करण्यालाही मंजूरी दिली आहे. हा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणांच्या ड्राफ्टमधील शिफारसीनुसार झाला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 मध्ये बनले होते

34 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनवण्यात आले होते. याचा आढावा घेण्यासाठी 1990 आणि 1993 मध्ये कमेटी स्थापन करण्यात आली होती. परंतू, त्यानंतर आजपर्यंत यात कोणतेच मोठे बदल झाले नाही.

अंबाला एअयरबेसवर उतरले पाच राफेल विमान,संरक्षण मंत्री म्हणाले- सैन्य इतिहासात नवीन युगाची सुरुवात (व्हिडिओ)

0

नवी दिल्ली- फ्रान्सपासून 7 हजार किलोमीटर अंतर पार केल्यावर 5 राफेल बुधवारी दुपारी 3.15 वाजता अंबाला एअरबेसवर उतरले. पाचही राफेल एकाच एअरस्ट्रिपवर एकानंतर एक उतरले. यानंतर त्यांना वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला.

17 वा गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉन हा राफेलचा पहिला स्क्वाड्रन असेल. 22 वर्षानंतर भारताकडे 5 नवीन लढाऊ विमाने आली आहेत. यापूर्वी 1997 मध्ये रशियाकडून भारताला सुखोई मिळाले होते. एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांच्यासह वेस्टर्न एअर कमांडचे अधिकारीही राफेल घेण्यासाठी अंबाला हवाई दल स्थानकात हजर आहेत.

यापूर्वी एयएनएस कोलकाताने राफेलच्या तुकडीशी संपर्क साधला. म्हटले – ‘एरो लीटर, हिंद महासागरात आपले स्वागत आहे. हॅप्पी लँडिंग, हॅप्पी हंटिंग’ असं म्हणत त्यांनी या विमानांच स्वागत केलं आहे.

अण्वस्त्रे बाळगण्याचे सामर्थ्य असणारे हे विमान जगातील एकमेव लढाऊ विमान आहे, ज्यामध्ये 55 हजार फूट उंचीवरुन शत्रूचा नाश करण्याची शक्ती आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही क्षमता भारताच्या दोन्ही शेजारी पाकिस्तान आणि चीनच्या सैन्यात नाही.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2669648396639030/

राफेलची वैशिष्ट्ये :-

  • 3 कोटी रुपयांपर्यंतचा लेजर बॉम्ब- मिका एअर-टू-एअर मिसाइल : 50 किमीच्या रेंजसह लक्ष्यानुसार आपला मार्ग निश्चित करू शकते.मीटियोर मिसाइलः जगातील अद्वितीय क्षेपणास्त्र. रेंज 100 किलोमीटर. ते अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याने राफेलला शत्रू देशाच्या सीमेत घुसून हल्ला करण्याची गरज भासणार नाही.
  • लेजर किंवा जीपीएस गायडेड बॉम्ब : एका बॉम्बची किंमत 50 हजार ते साडेतीन लाख युरो म्हणजे ४४ लाख ते ३ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. आयएसआयएसवर हल्ल्यात बहुतांशी त्याचाच वापर झाला. राफेलमध्ये या प्रकारचे ६ बॉम्ब लागू शकतात. त्याचे बॉम्ब पॉड्स 10 किमीपर्यंत लक्ष्यावर निशाणा साधू शकते.
  • अंडर कॅरिजमध्ये एक रिव्हॉल्व्हर कॅनन : हे 30 मिमी गोळीचा 1055 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने मारा करते. हे रिव्हॉल्व्हर कॅनन दर मिनिटाला 2500 गोळ्या मारू शकते.
  • फायर अँड फॉर्गेट क्रूझ मिसाइल : पायलटने बटण दाबल्यानंतर ते आपोआप लक्ष्याच्या दिशेने जाते.
  • शत्रूच्या क्षेपणास्त्राचा रस्ता चुकवतो : राफेलमधील स्पेक्ट्रा इंटिग्रेटेड डिफेन्स यंत्रणा शत्रूचे रडार जाम करू शकते आणि त्याच्याकडे येणाऱ्या क्षेपणास्त्राबाबत सावध करतो. तो विमानाच्या प्रोटेक्टिव्ह शील्डचे काम करतो. तो छद्म सिग्नल पाठवू शकतो आणि रडार सिग्नल जाम करू शकतो, शत्रूचे सिग्नल निष्क्रीय करू शकतो. तरीही शत्रूने क्षेपणास्त्राने हल्ला केला तर स्पेक्ट्रा डिकॉय सिग्नल सोडून त्या क्षेपणास्त्राचा मार्ग चुकवतो.
  • फ्लाइट रेंज आणि इंधन क्षमता : फ्लाइंट रेंज साडेदहा तासांपेक्षा जास्त आहे. म्हणजे सतत 10 तासांपेक्षा जास्त उडू शकते. या दरम्यान 6 वेळा त्यात इंधन भरण्याची गरज भासते. जे हवेतच भरता येते. यात साडेपाच टन इंधन साठा होऊ शकतो. पूर्ण वेगात ते 10 मिनिटात 5 टन इंधन खर्च करते.
  • राफेलचे 3 प्रकार छट्रेनर- दोन आसनी, राफेल सी- सिंगल सीटर, राफेल एम- नेव्हीच्या विमानवाहू जहाजासाठी. ते अण्वस्त्र हल्लाही करता येऊ शकतो. एक राफेल तयार करण्यात सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागतो. यासाठी 7000 कर्मचारी सतत काम करतात.

​​​​​​​दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30 टक्के, तर कोकण प्रथम,पुणे द्वितीय , यंदाही मुलींचीच बाजी

0

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबादचा निकाल हा 92 टक्के इतका लागला. तसेच नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

विभागनिहाय टक्केवारी

  • कोकण – 98.77 टक्के
  • पुणे – 97.34 टक्के
  • कोल्हापूर – 97.64 टक्के
  • मुंबई – 96.72 टक्के
  • अमरावती – 95.14 टक्के
  • नागपूर – 93.84 टक्के
  • नाशिक – 93.73 टक्के
  • लातूर – 93.09 टक्के
  • औरंगाबाद – 92 टक्के

हे लक्षात ठेवा :

गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

या ऑनलाइन वेबसाइट्सवर निकाल उपलब्ध

> www.mahresult.nic.in (येथे निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल)

> www.sscresult.mkcl.org

> www.maharashtraeducation.com

> www.mahahsscboard.in (येथे शाळांना एकत्रित निकाल मिळेल)

कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे डॉ.दीपक म्हैसेकर

0


पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान सुविधेसाठी वेगळे ॲप


पुणे कोवीड – 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नसले तरी कोवीडबाधित रुग्णांचा 28 दिवसानंतर ती व्यक्ती कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुस-या बाधित रुग्णाला देता येतो.कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, प्लाइमा ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. प्लाझ्मा दान करणारी व्यक्ती 18 ते 60 वयोगटातील कुठलीही व्यक्ती ज्या व्यक्तीचे वजन 50 किलो पेक्षा जास्त आहे तसेच हिमोग्लोबीन 12.5 पेक्षा जास्त आहे, अशी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. आपण किंवा आपल्या परिचित व्यक्ती ज्यांना कोवीड होता, त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दानमुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोहचत नाही, प्लाझ्मा दानमुळे दोन व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करावे. असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे विभागासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी वेगळे ॲप तयार करण्यात येत आहे. त्या ॲपमध्ये प्लाझ्मा दान करण्यासाठी आपली नोंद करू शकतात. त्याबरोबर आपल्याला किंवा आपल्या परिचित व्यक्तीला प्लाझ्माची गरज भासल्यास प्लाझ्माची मागणी करू शकतात, प्लाझ्मा दान रक्तदानासारखेच आहे, हे अमुल्य दान आहे. म्हणून कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यास पात्र असल्यास प्लाझ्मा दान करुन गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

शाळा बंद… पण शिक्षण आहे

0

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम

मुंबई, : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत. ज्या शिक्षकांना कोरोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करुन देण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

प्रसिद्धी माध्यमातून सरकारी शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. या वृत्तामध्ये तथ्य नसून यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक सविस्तर खुलासा शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत करण्यात आला आहे.

शाळा बंद पण शिक्षण आहे…

• शाळा बंद .. पण शिक्षण आहे .. या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा APP आधारित विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करण्यासाठीचा उपक्रम गेले ३ महिने सलग सुरु आहे.

• विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.

• जिओ टी.व्ही वर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. ३ री ते इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• जिओ सावन या रेडीओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.

• पाठ्यपुस्तके १००% विद्यार्थ्यांना पोहोच करण्यात आली आहेत.

• यु ट्यूब वाहिनीवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चे Channel सुरु करून त्यावर व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

• DD सह्याद्री वाहिनीवर टीलीमिली हा शैक्षणिक कार्यक्रम इ.१ ली ते इ.८ वी साठी सुरु करण्यात आला आहे.

• शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गूगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

• स्वयंसेवक, शिक्षक वाडी वस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.

शाळा बंद…पण शिक्षण सुरु रहावे यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

कोणताही पाठ कायमस्वरुपी वगळला नाही; फक्त चालू वर्षासाठीच पाठ्यक्रम कमी

0

शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई, : शालेय वर्ष २०२० – २१ साठी कोरोना (कोविड १९) प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर शालेय पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे. यासंदर्भाने समाजशास्त्र व इतिहास विषयाच्या अनुषंगाने काही वर्तमानपत्रामध्ये दिशाभूल करणारे व संभ्रम निर्माण करणारे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.  यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने सविस्तर खुलासा केला आहे.

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम स्वयंअध्ययनासाठी

इयत्ता १२ वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामधून वगळलेले सर्व उपघटक हे स्वयं-अध्ययनासाठी आहेत. विद्यार्थी या उपघटकांचा स्वयंअध्ययनाच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात. स्वयंअध्ययनासाठी देण्यात आलेल्या घटक तसेच उपघटकांवर परिक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यांचे मूल्यमापन असणार नाही. असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले आहे. कमी करण्यात आलेल्या पाठ्यक्रमाविषयी विभागाने अधिक खुलासा केला आहे.

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’या विषयाचा इतर घटकात उल्लेख

इयत्ता 12 वी समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातील घटक 6 मधील उपघटक ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’हा शालेय वर्ष 2020-21 साठीच फक्त कमी करण्यात आलेला आहे. कारण याविषयी घटक २ मधील ग्रामीण समाजाच्या समस्या यामध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पाठ वगळला असे म्हणने संयुक्तिक ठरणार नाही.

विविध शालेय विषयांच्या माध्यमातून तसेच पूर्वीच्या इयत्तांमध्ये सामाजिक शास्त्राच्या संदर्भाने ज्या घटक / उपघटकांचे अध्ययन विद्यार्थ्यांनी केलेले आहे असे घटक पुनरावृती होऊ नयेत म्हणून फक्त या वर्षासाठी मूल्यमापनामधून वगळले आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये काही नवीन उपघटकांचा उदा. वृद्धांच्या समस्या, घरगुती हिंसाचाराची समस्या आणि व्यसन समस्या इत्यादींचा अभ्यासक्रमानुसार नव्याने समावेश केलेला आहे. पाठ्यपुस्तकामधील इतर पाठांमध्ये ज्या उपघटकांविषयी लिखाण माहिती समाविष्ट केली आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास अवघड वाटतील (समजून घेण्यास) असेच उपघटक चालू शैक्षणिक वर्षामध्ये मूल्यमापनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत. विद्यार्थी या उपघटकांचे स्वयंअध्ययन करु शकतात.

का वगळले घटक?

इयत्ता दहावी, इतिहास – राज्यशास्त्र व इयत्ता तिसरी ते दहावी या वर्गांच्या इतिहास – नागरिकशास्त्र – राज्यशास्त्र  या विषयांमधून उपरोक्त प्रकरणे, घटक, उपघटक शालेय वर्ष 2020-21 साठी कमी करण्यामागील कारणे विभागाने दिली आहेत. 

• इतिहास- राज्यशास्त्र या विषयाच्या इयत्ता दहावीच्या पाठ्यक्रमातील एकूण १३ प्रकरणांपैकी तीन प्रकरणे कमी करण्यात आलेली आहेत. यामध्ये इतिहासातील दोन तर राज्यशास्त्र विषयातील एका प्रकरणाचा समावेश आहे.

• इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या दहावीच्या अभ्यासक्रमाची घटकनिहाय विभागणी पाहता प्रकरणे कमी करताना किंवा स्वयंअध्ययनास  देताना ती प्रकरणे विविध घटकांतून कमी करण्यात आलेली आहेत हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. दहावीच्या संपूर्ण पाठ्यक्रमाचे घटकनिहाय विभाजन हे पाठ्यपुस्तकात दिलेलेच आहे त्यानुसार संपूर्ण घटक न कमी करता विशिष्ट घटकातील प्रकरणांच्या स्वरूपातील काही भाग केवळ २०२०-२०२१  या शैक्षणिक वर्षात पुरताच कमी करण्यात आलेला आहे, तो पाठ्यपुस्तकातून कायमस्वरूपी कमी करण्यात आलेला नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

• माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी इतिहास राज्यशास्त्र या विषयाचा विशिष्ट असा घटकनिहाय अभ्यासक्रम ठरविण्यात आलेला आहे. इतिहास – राज्यशास्त्र या विषयातील जे पाठ्य घटक विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून  समजतील तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाशी संबंधित असतील अशी प्रकरणे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन देण्यात आलेली आहेत याची नोंद घ्यावी.

•  इतिहास विषयाचा विचार करता पाठ्यपुस्तकातील इतिहास संशोधन व  इतिहास लेखन परंपरा  हे घटक महत्त्वाचेच आहेत.  उपयोजित इतिहास ही या पाठ्यपुस्तकाची मूळ कल्पना आहे. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हे इतिहासातले महत्त्वाचे मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमे आणि इतिहास तसेच खेळ आणि इतिहास या बाबी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाची संबंधित आहेत व त्यांचा अभ्यास करणे सहज सोपे आहे . ही प्रकरणे यावर्षी अभ्यासक्रमात तशीच  ठेवण्यात आलेली आहेत.

•  भारतीय कलांचा इतिहास आणि मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाबाबत विद्यार्थी स्वयंअध्ययन आणि अवांतर वाचनाच्या आधारे माहिती मिळू शकतात त्यामुळे सदर प्रकरणे ही सन २०२०-२०२१  या शैक्षणिक वर्षापुरती पाठ्यक्रमातून अध्यापनासाठी कमी करून स्वयंअध्ययन करण्यासाठी  देण्यात आलेली आहे.

•  इयत्ता दहावीच्या वर्षाकरिता  संविधानाची वाटचाल ही राज्यशास्त्र या विषयाची मूलभूत संकल्पना आहे. त्यानुसार संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी, भारतापुढील आव्हाने या घटकांचा समावेश हा राज्यशास्त्राच्या पाठ्यक्रमात करण्यात आलेला आहे.  शासनाच्या धोरणानुसार पाठ्यक्रम कमी  करताना संविधाना संबंधी माहिती  देणारे संविधानाची वाटचाल हे प्रकरण त्याचबरोबर लोकशाही प्रक्रियेशी संबंधित  निवडणूक प्रक्रिया व राजकीय पक्ष ही प्रकरणे, त्याचबरोबर लोकशाही सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी ही प्रकरणे एकूणच पाठ्यक्रमात महत्त्वाची आहेत. त्यामुळे या वर्षी तशीच ठेवण्यात आली आहेत.

• भारतापुढील आव्हाने हे प्रकरण देखील पाठ्यक्रमात महत्वाचे आहे परंतु भारतापुढील असलेल्या आव्हानाविषयी विद्यार्थी अलीकडच्या काळात विविध प्रसार माध्यमांच्या आधारे माहिती मिळवताना दिसतात. त्यामुळे हा पाठ विद्यार्थ्यांना  स्वयंअध्ययन करण्यासाठी  दृष्टीने देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच राज्यशास्त्रातील पहिली चार प्रकरणे अध्ययनासाठी राखून शेवटचे प्रकरण भारतीय लोकशाहीसमोरील  आव्हाने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनसाठी देण्यात आलेले आहे.

 यामध्ये कोणताही पाठ कमी  करण्यामागे विशिष्ट असा हेतू नाही कारण संपूर्ण राज्यशास्त्र किंवा  नागरिक शास्त्र हे विषय लोकशाही मूल्ये रुजवणारी आहेत. त्यामुळे त्यातील प्रत्येक पाठ महत्त्वाचा आहे परंतु सध्याची स्थिती पाहता  प्रत्येक विषयाचा  पाठ्यक्रम कमी करावयाचा असल्याने भारतीय लोकशाहीसमोरील  आव्हाने हा राज्यशास्त्रातील शेवटचा पाठ  केवळ याच शैक्षणिक वर्षापुरता कमी करण्यात आलेला आहे. या कडे लक्ष वेधुन, या  पाठातील घटक हे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनातून  अभ्यासणे सोपे जाईल याचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.

माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही ‘कोरोना’ काळात ५० लाखांचे विमा संरक्षण

0

मुंबई, : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षारक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेतील घटकांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण माथाडी कामगारांना व सुरक्षारक्षकांना देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटना, लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात येत होती. त्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला व निर्णय घेण्यात आला. कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना वित्त विभागाच्या दि. २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

‘महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९’ अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतुदीनुसार राज्यामध्ये ३६ माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही.

सरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या १ लाखांहून अधिक असून सद्य:स्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम, कृषि उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या आदी ठिकाणी २८ हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत. या पुरवठा साखळीत अत्यावश्यक व जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. माथाडी कामगारांची सेवा कोविड संसर्गाचे हॉटस्पॉट भागातही असल्याने या निर्णयाचा मोठा लाभ माथाडी कामगारांना होणार आहे. 

राज्यात एकूण १५ सुरक्षारक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सुरक्षारक्षक मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हिल हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत. केंद्र शासनाने दि. २३ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार ‘सुरक्षा रक्षकांची सेवा’ ही अत्यावश्यक सेवा जाहीर करुन या सेवा लॉकडाऊनमध्ये सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा समावेश अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कामगार विभागाकडून सादर करण्यात आला होता.

सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षक व माथाडी कामगार यांचा जरी कोरोनालढ्यात थेट समावेश होत नसला तरी सदर यंत्रणेस मदत, सहकार्य व त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार करत असल्यामुळे सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय सरकारच्यावतीने आज घेण्यात आला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ५० लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांच्या संख्येत वाढ

0

२००६ मध्ये १०३ तर २०१८-१९ मध्ये ३१२ वाघांची नोंद

चौथा सविस्तर अहवाल प्रकाशित

नवी दिल्ली : देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण वाघांची संख्या २ हजार ९६७ इतकी असून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ३१२ वाघांची संख्या आहे. चौथ्या अखिल भारतीय वाघ जनगणनाच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

‘जागतिक टायगर दिना’च्या पुर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये असणाऱ्या वाघांच्या जनगणनविषयीचा सविस्तर अहवाल आज येथील राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे प्रकाशित केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘वाघ’ हा जंगलाचा राजा असून निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जंगलाचा महत्त्वाचा घटक समजला जातो. वाघांची वाढती संख्या पर्यावरणात समतोल असल्याचे दर्शविते. वाघ आणि इतर प्राण्यांची वाढती संख्या हे भारताला जागतिक पटलावर महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देण्यात भूमिका निभावू शकतात.

भारतामध्ये जैवविविधतेचे आठ टक्के प्रमाण आहे. वृक्ष, निसर्ग, वन्यजीवन वाचवण्याची आणि जतन करण्याची भारतीय संस्कृती आहे. भारतात, जगातील वाघांच्या संख्येच्या ७० टक्के वाघ आहेत. हे एक प्रशंसनिय बाब, असल्याचे श्री.जावडेकर यावेळी म्हणाले.

मानव आणि प्राण्यांचा संघर्ष टाळण्यासाठी जंगलांमध्ये पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्रथमच लिडर सेंसरचा वापर केला जाईल, अशी माहिती श्री जावडेकर यांनी यावेळी दिली.

चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अनुमानाचा तपशीलातील महत्त्वाचे मुद्दे

· इतर प्राणी आणि प्रजातींच्या विपुलता निर्देशांक दर्शविण्यात आला आहे.

· सर्व कॅमेरा ट्रॅप साइटमधून प्रथमच सर्व वाघांचे लिंग प्रमाण केले गेले.

· मानववंशविषयक तपशीलांचा वापर वाघांची लोकसंख्या मोजण्यासाठी करण्यात आला.

· व्याघ्र प्रकल्पातील रचनेत वाघांचे असणारे प्रमाण काढण्यात आले.

भारतात वाघांची संख्या आता २९६७ आहे. जी जगातील वाघाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ७० टक्के आहे. झालेल्या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक कॅमेराचे जाळे पसरवून सर्वेक्षण करण्यामध्ये भारताने जागतिक विक्रम नोंदविला केला आहे.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमधील वाढती वाघांची संख्या

आज प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या ६ व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकूण ३१२ वाघांची संख्या नोंदविण्यात आली आहे. यापुर्वीच्या प्रसिद्ध अहवालामध्ये २००६ मध्ये ही संख्या १०३, २०१० मध्ये १६८, २०१४ मध्ये १९० आणि आता २०१८-१९ च्या सर्वेक्षणामध्ये हा आकडा वाढून ३१२ झाला असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यामुळे भविष्यात व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन क्षेत्रात वाढ होईल.

दहावी परीक्षेचा उद्या ऑनलाईन निकाल

0

मुंबई, दि. 28 :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी 1 वा. ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

मार्च 2020 मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. सदर माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.comwww.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या निकालाबाबत अन्य तपशील पुढीलप्रमाणे आहे. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh- ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार 30 जुलै 2020 ते शनिवार 8 ऑगस्ट 2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार 30 जुलै 2020 ते मंगळवार 18 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट  कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.

मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च 2020 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी / गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

राज्याने गाठली कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या

0

आज बरे झालेले रुग्ण १०,३३३; नवीन रुग्ण ७७१७

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ६० टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२८ : राज्यात आज १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे. तर आज ७७१७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४४  हजार ६९४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ७७१७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २८१ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०० (५५), ठाणे- १४७ (३), ठाणे मनपा-१९१ (६),नवी मुंबई मनपा-३३५ (१२), कल्याण डोंबिवली मनपा-२१९ (१६),उल्हासनगर मनपा-४३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (१), मीरा भाईंदर मनपा-९६ (५), पालघर-८७, वसई-विरार मनपा-१०१ (२), रायगड-१६१ (१८), पनवेल मनपा-१०५ (१), नाशिक-१२२ (१), नाशिक मनपा-२५३ (१०), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-१७७ (२), अहमदनगर मनपा-४१ (१), धुळे-११४ (१), धुळे मनपा-१०६, जळगाव-३१२ (१२), जळगाव मनपा-५७ (१), नंदूरबार-४६ (१), पुणे- ३४० (१२), पुणे मनपा-११८२ (२३), पिंपरी चिंचवड मनपा-६७३ (१२), सोलापूर-१६१ (२१), सोलापूर मनपा-६२ (४), सातारा-१३३ (८), कोल्हापूर-१०२ (३), कोल्हापूर मनपा-२७ (३), सांगली-२७ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१०२ (१), सिंधुदूर्ग-१ (१), रत्नागिरी-६३, औरंगाबाद-७८ (२), औरंगाबाद मनपा-५७६ (४), जालना-५५ (१), हिंगोली-५, परभणी-१८, परभणी मनपा-१० (१), लातूर-४४ (४), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१५ (४), बीड-३७, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अकोला-४५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-३२, अमरावती मनपा-२६ (२), यवतमाळ-१८ (१), बुलढाणा-७५ (१), वाशिम-६, नागपूर-७९ (७), नागपूर मनपा-१२३ (११), वर्धा-२०, भंडारा-१, गोंदिया-३, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-६, इतर राज्य ७.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख ६८ हजार ५५९ नमुन्यांपैकी ३ लाख ९१  हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह (१९.८८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८५ हजार ५४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ७३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                                  

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१०,८८२) बरे झालेले रुग्ण- (८४,४११), मृत्यू- (६१८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९९०)

ठाणे: बाधित रुग्ण- (८८,८५९), बरे झालेले रुग्ण- (५३,३८४), मृत्यू- (२४३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३,०४३)

पालघर: बाधित रुग्ण- (१४,६१०), बरे झालेले रुग्ण- (८७७६), मृत्यू- (३०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५२५)

रायगड: बाधित रुग्ण- (१५,२४८), बरे झालेले रुग्ण-(१०,५३०), मृत्यू- (३४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३६८)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१६१२), बरे झालेले रुग्ण- (८८२), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७४)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३४२), बरे झालेले रुग्ण- (२६२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३)

पुणे: बाधित रुग्ण- (८०,३२५), बरे झालेले रुग्ण- (२९,४५६), मृत्यू- (१८८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,९८४)

सातारा:  बाधित रुग्ण- (३३५५), बरे झालेले रुग्ण- (१८२४), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०९)

सांगली: बाधित रुग्ण- (१७०१), बरे झालेले रुग्ण- (७८६), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४०२०), बरे झालेले रुग्ण- (१२३५), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८२९७), बरे झालेले रुग्ण- (३९४२), मृत्यू- (४७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८३)

नाशिक: बाधित रुग्ण- (१३,२६५), बरे झालेले रुग्ण- (७६८८), मृत्यू- (४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१३५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३६४६), बरे झालेले रुग्ण- (१८६२), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७३१)

जळगाव: बाधित रुग्ण- (९८७२), बरे झालेले रुग्ण- (६६६८), मृत्यू- (४९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७०९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५६२), बरे झालेले रुग्ण- (३६०), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

धुळे: बाधित रुग्ण- (२६४२), बरे झालेले रुग्ण- (१७२६), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१२,७७६), बरे झालेले रुग्ण- (७१२७), मृत्यू- (४५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९४)

जालना: बाधित रुग्ण- (१८४६), बरे झालेले रुग्ण- (१३३४), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४३)

बीड: बाधित रुग्ण- (६१८), बरे झालेले रुग्ण- (२२१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३८०)

लातूर: बाधित रुग्ण- (१७३९), बरे झालेले रुग्ण- (८६०), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९९)

परभणी: बाधित रुग्ण- (४८८), बरे झालेले रुग्ण- (१९८), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५२७), बरे झालेले रुग्ण- (३६७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३६८), बरे झालेले रुग्ण (६४४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४८०), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९)

अमरावती: बाधित रुग्ण- (१७३०), बरे झालेले रुग्ण- (१२४५), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३०)

अकोला: बाधित रुग्ण- (२४५८), बरे झालेले रुग्ण- (१८८७), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६०)

वाशिम: बाधित रुग्ण- (५३६), बरे झालेले रुग्ण- (३०५), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१११६), बरे झालेले रुग्ण- (६०१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (८०४), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६)

नागपूर: बाधित रुग्ण- (३९०६), बरे झालेले रुग्ण- (१८४१), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२००१)

वर्धा: बाधित रुग्ण- (१५५), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८)

भंडारा: बाधित रुग्ण- (२११), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (२५३), बरे झालेले रुग्ण- (२२४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (२३३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२४४), बरे झालेले रुग्ण- (२१०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (३५२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०५)

एकूण: बाधित रुग्ण-(३,९१,४४०) बरे झालेले रुग्ण-(२,३२,२७७),मृत्यू- (१४,१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४४,६९४)

 (टीप: बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येते. जिल्हा स्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार–अजित पवार

0

मुंबई, दि. २८ :- पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्याचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल. विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.

पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आज संध्याकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जमाबंदी आयुक्त तथा ‘ससून हॉस्पिटल’चे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखील प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हणाले की, पुण्यात ‘कोरोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे. पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणां युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसात पुण्याला भेट देणार असून त्यांच्या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात माहिती सादर केली.

पुणे जिल्ह्यात तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. ससुन रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेन्टीलेटर्स, आयसीयु आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांचंही सहकार्य मिळत आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई सेवा देणारे कर्मचारी आदी उपलब्ध होतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

कलावंतांच्या आर्थिक विवंचना, समस्या मनापासून सोडवायला अद्याप कोणी पुढे आलेच नाही -प्रिया बेर्डे

0

mymarathi.net पुणे- मराठी सिने नाट्यसृष्टीतील कलावंतांच्या समस्या आर्थिक विवंचना आहे तिथेच आहेत ,पूर्वापार त्या तशाच आहेत ,खरेतर या समस्या सोडवायला पुढाकार घेऊन असे कोणी पुढे आलेलेच नाही अशी खंत व्यक्त करीत आपण आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आपल्याला या समस्या ,विवंचनेतून कलावंत तंत्रज्ञ आदी या सृष्टीतील प्रत्येकाला कसे बाहेर काढता येईल सिने नाट्य सृष्टी कशी सशक्त करता येईल या आव्हानाला तोंड द्यायचे असून आपण आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम करणार असल्याचे अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आज पुणे महापालिकेत आल्यावर ‘माय मराठी’ शी बोलताना सांगितले .विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी प्रिया आणि त्यांचा सुपुत्र अभिनेता अभिनय यांचे स्वागत केले . यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे कार्याध्यक्ष बाबा पाटील उपस्थित होते. पहा आणि ऐका यावेळी नेमके प्रिया बेर्डे यांनी काय म्हटले आहे …

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या झाली 35 हजार 109

0

पुणे विभागातील 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले विभागात कोरोना बाधित 92 हजार 65 रुग्ण–विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

   पुणे  :- पुणे विभागातील 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 92 हजार 65 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 109 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 140 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.15 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   2.71  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. 
 पुणे जिल्हयातील 74 हजार 649 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 45 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 59 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 221, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 309 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 108, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 915 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  61.40 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे. 
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 342 रुग्ण असून 1 हजार 798 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 431 आहे. कोरोनाबाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार 679 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 464 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 757 आहे. कोरोना बाधित एकूण 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 1 हजार 653 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 140 आहे. कोरोना बाधित एकूण 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार 742 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 900 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 722 आहे. कोरोना बाधित एकूण 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 913 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 149, सातारा जिल्ह्यात 139, सोलापूर जिल्ह्यात 296, सांगली जिल्ह्यात 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 249 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 54 हजार 269 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 50 हजार 341 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 928 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 57 हजार 433 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.
( टिप :- दि. 28 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


आघाडी सरकारचे अपयश आक्रमकतेने मांडा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे आदेश

0

मुंबई- राज्यातील सरकारचे अपयश कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे जनतेपुढे मांडले पाहिजे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील यांनी सोमवारी भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत बोलताना केले. पाटील म्हणाले की, लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सेवा कार्यात सहभाग घेतला.आता या पुढील काळातही कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून जनतेची मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग होईल तसेच विलगिकरण केंद्रे सुरू करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रुग्णांची सेवा अधिकाधिक पद्धतीने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे.फेब्रुवारी मध्ये नवी मुंबईत झालेल्या अधिवेशनात पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.पक्षाच्या आंदोलनामुळे सरकारला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाचा विचार करणे भाग पडले. या पुढील काळात दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन उभे केले पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकारचा गैरकारभार जनतेपर्यंत नेणेही आवश्यक आहे. आपल्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन उत्तर द्यावे, असेही  पाटील यांनी सांगितले.प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी आगामी काळात पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.कोरोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयश, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याकडे केलेल्या दुर्लक्षा बद्दल आघाडी सरकारचा निषेध करणारा ठराव प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडला. किसान मोर्चाचे प्रमुख डॉ. अनिल बोंडे , माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या ठरावाला अनुमोदन दिले.