Home Blog Page 2495

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 38 हजार 645,एकुण 2 हजार 925 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 69 हजार 221 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 लाख 10 हजार 791 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि. 2 :- पुणे विभागातील 69 हजार 221 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजार 791 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 645 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.48 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.64 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 88 हजार 584 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 58 हजार 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 231 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 793 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 729, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 82, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 25 व ग्रामीण क्षेत्रातील 3 हजार 465 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 361 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 377, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 66, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 43, व ग्रामीण क्षेत्रातील 157 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 808 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 65.83 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 818 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 819, सातारा जिल्ह्यात 234, सोलापूर जिल्ह्यात 224, सांगली जिल्ह्यात 274 तर कोल्हापूर जिल्ह्यात 267 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 83 रुग्ण असून 2 हजार 84 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 869 आहे. कोरोनाबाधित एकूण 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 8 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 144 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 215 आहे. कोरोना बाधित एकूण 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 726 रुग्ण असून 813 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 836 आहे. कोरोना बाधित एकूण 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 6 हजार 537 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 862 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 494 आहे. कोरोना बाधित एकूण 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 5 लाख 22 हजार 860 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 10 हजार 791 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

9 वर्षांपूर्वी स्पेसमध्ये पाठवलेले फ्लॅगसोबत दोन अंतराळवीर २ महिन्यात पृथ्वीवर परतणार

0

दोन अमेरिकन अंतराळवीर रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले 63 दिवसानंतर पृथ्वीवर परत येत आहेत. दोघे येताना आपल्यासोबत 9 वर्षांपूर्वी अंतराळात पाठवलेला अमेरिकेचा झेंडा घेऊन येतील.अमेरिकन अंतराळ कंपनी स्पेसएक्सचा क्रू ड्रॅगन कॅप्सूल इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (आयएसएस)वरुन पृथ्वीकडे रवाना झाला आहे. नासाने एक व्हिडिओ जारी करुन याची माहिती दिली. व्हिडिओमध्ये स्पेसएक्स आयएसएसमधून निघताना दिसत आहे. फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे, तरीदेखील भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 5 वाजता आयएसएसमधून रवाना झाला. हे कॅप्सूनल रविवारी रात्री 12 वाजता पृथ्वीवर पोहचण्याची शक्यता आहे.दरम्यान, 45 वर्षानंतर एखादे अमेरिकन स्पेसशिप समुद्रात लँडिंग करणार आहे. याला अंतराळ संशोधकांच्या भाषेत स्प्लॅश लँडिंग म्हणतात. यापूर्वी 24 जुलै 1975 ला अपोलो सोयूज टेस्ट प्रोजेक्टअंतर्गत असे करण्यात आले होते. ते स्पेस मिशन अमेरिका आणि सोवियत यूनियनने सोबत मिळून लॉन्च केले होते.

मे महिन्यात अंतराळात पाठवले होते स्पेसएक्स

30 मेच्या रात्री भारतीय वेळेनुसार 1 वाजता अमेरिकेच्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून क्रू ड्रॅगनला फॉल्कन-9 रॉकेटमधून लॉन्च करण्यात आले होते. 19 तासानंतर हे आयएसएसमध्ये पोहचले. या मिशनला ‘क्रू डेमो-2’ आणि रॉकेटला ‘की ड्रॅगन’नाव देण्यात आले होते. 21 जुलै 2011 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेतून मानवी मिशन अंतराळात पाठवण्यात आले. हे मिशन अमेरिकेसाठी महत्वाचे आहे.

बेनकेन आणि हर्लेने चार वेळेस स्पेसवॉक केला

ड्रॅगन कॅप्सूलमधून आयएसएसला गेलेल्या बेनकेन आणि हर्लेने 100 तास अंतराळात काम केले. यादरम्यान त्यांनी चार वेळेस स्पेसवॉक केला. दोघांनी आयएसएसच्या पॉवर ग्रिडमध्ये नवीन बॅटरी लावल्या आणि हार्डवेअरसंबंधी कामात मदत केली.

https://twitter.com/Astro_Doug/status/1289344985163337734/photo/1

ससून रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देणार

0

पुणे, दि. २- ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त
३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. आज जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची पहाणी केली. यामध्ये ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी कामे तातडीने करण्यात येत आहेत. पहाणीच्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, विभाग प्रमुख व प्रा. आरती किनीकर, कार्यकारी अभियंता तेलंग यांच्या सह इतर अधिकारी उपस्थित होते. ससून रुग्णालयात ४ ऑगस्ट पर्यंत १७५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील.
ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
ससून रुग्णालयातील
इन्फोसिस, डेव्हीड ससून, पेडियाट्रीक, जेकब ससून या वॉर्डात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामासाठी ४ कोटी २ लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे कार्यकारी अभियंता तेलंग यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

0

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 22 दिवस नानावटी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाली आहे. मी आता घरी आलो आहे. देवाच्या आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने, प्रार्थना आणि चाहत्यांच्या प्रेमाने मी बरा झालो आहे. तसेच नानावटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी आज हा दिवस पाहू शकलो आहे.

अमित शाह यांना कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Home Minister Amit Shah tested Corona Positive)

‘कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी’ असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले’ आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आईसाठी भावनिक ट्विट

0

पुणे- महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं शनिवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. वयाच्या 74 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर बाॅम्बे हाॅस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू होते. हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांची प्रकृती खूप खालावली होती. यानंतर राजेश टोपेंनी आईसाठी भावनिक ट्विट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आरोग्य मंत्री हे राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. यासोबतच ते आपल्या आईचीही काळजी घेत होते. आता आईच्या निधनानंतर त्यांनी आपल्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत. ‘ती अजातशत्रु होती…एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही….सर्वांना प्रेम दिले… माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती….दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील’, असं भावनिक ट्विट टोपे यांनी केलं आहे.

शरद पवारांची पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट ,कोरोनाला रोखण्यासाठी लस तयार करण्याचे अथक प्रयत्न

0

पुणे-मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूटला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि.1) रोजी भेट दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लस तयार करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट प्रयत्नशील आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून विकसित केल्या जात असलेल्या करोनावरील लशीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेत आढावा घेतला. त्यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला यांच्याशी या लशीसंदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच, मांजरी येथील लशीच्या मुख्य प्रकल्पास भेट देऊन त्याची पाहणी केली.

जगातील 189 देशांमध्ये सिरम इन्स्टिट्यूट मधून लशींचा पुरवठा केला जातो.यात पोलिओ, फ्ल्यू, रूबेला अशा आजारांवरील लशींचा समावेश आहे. वर्षाला दीड अब्ज लशींचे डोस येथे तयार केले जाऊ शकतात.जगभर धैमान घालणार्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस निर्मितीसाठी जगभरात स्पर्धा सुरु आहे. काही ठिकाणी पहिल्या टप्प्यातील चाचण्या संपून दुसऱ्या टप्प्यातील अनेक कंपन्यांच्या चाचण्या सुरु झाल्या आहेत. या लस निर्मितीच्या स्पर्धेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील उडी घेतली असून त्यांनी जगातील सात कंपन्याशी लशीच्या संशोधन, उत्पादन प्रक्रियेसाठी भागीदारी केली आहे. त्या भागीदाराच भाग म्हणून त्यांनी विकसित केलेली लस ही अंतिम टप्प्याकडे असली तरी त्याला अद्याप डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे डॉ. सायरस आणि आदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते

कधीपर्यंत उपलब्ध होईल लस?ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं (Oxford corona vaccine) पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याने आता आशा पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युचीही या लशीच्या निर्मितीत भागीदारी आहे, त्यामुळे भारतातही ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र या लशीची किंमत असेल, सर्वसामान्यांना ही लस परवडणारी असेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार भारतात उपलब्ध होणाऱ्या ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत ही एक हजारपेक्षाही कमी असेल. ही किंमत सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखी आहे

व्यापारी महासंघाच्या कोरोना चाचणीत सर्व व्यापाऱ्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह-32 कर्मचारी पॉझिटीव्ह

0

पुणे -व्यापारी महासंघ व पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने महासंघाचे सदस्य व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित कोविड अँटिजेन चाचणी शिबिरात चार दिवसांमध्ये 1,214 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 32 कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे सर्व व्यापाऱ्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितलिया यांनी ही माहिती दिली. शिबिराच्या पहिल्या दिवशी 250 चाचण्या झाल्या. त्यात चार कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. दुसऱ्या दिवशी 346 जणांच्या चाचण्या झाल्या. त्यात 13 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.

तिसऱ्या दिवशी 350 चाचण्या झाल्या. त्यात 10 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. चौथ्या दिवशी 298 चाचण्या झाल्या. त्यात पाच कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. झालेल्या चाचण्यांपैकी पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेल्या चाचण्यांचे प्रमाण 2.57 टक्के आहे.

पहिले दोन दिवस लक्ष्मी रोडवरील दिनेश सांकला यांच्या सभागृहात हे शिबिर झाले. त्यानंतर बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयात शिबिर झाले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अ‍ॅड. श्री. के. जैन, अशोक वाझे आणि प्राचार्या ओमासे यांनी कोविड चाचणीसाठी हॉल, वर्ग खोल्या व लॉबी उपलब्ध करून देऊन विशेष सहकार्य केले. या शिबिरावरून आम्ही व्यापारी स्वतःची आणि कर्मचाऱ्यांचीही चांगली काळजी घेत असल्याचे सिद्ध होते, असे रांका यांनी म्हटले आहे.

हे आहेत, पुण्यातील सुक्ष्म कंटेन्मेंट झोन

0

पुणे-कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शहरात नव्याने 75 मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील व्यवहारांसह रहिवाशांवरही काही बंधने राहणार आहेत. या भागातील व्यापारी आणि रहिवाशांनी नियमांचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सुक्ष्म कंटेन्मेंट झोन पुढीलप्रमाणे-
पर्वती दर्शन, सदाशिव पेठ, राजेंद्र नगर, मनपा कॉलनी, पर्वती, दत्तवाडी, गाडगीळ दवाखाना परिसर, कसबा पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, पर्वती, महात्मा फुले नगर, लक्ष्मी नगर, गणेश पेठ, नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, पुणे रेल्वे स्थानक परिसर, ताडीवाला रस्ता, हडपसर, मुंढवा, घोरपडीजवळील भीमनगर.

हडपसर, घोरपड़ी, पंचशीलनगर, आगवाली चाळ, कोरेगाव पार्क, कवड़ेवाडी, कात्रज, नवीन वसाहत, कात्रज गावठाण, बहिरट चाळ, बाबर डेअरी जवळ, पर्वती, गवळीवाडा सहकारनगर, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर, के.के. मार्केट जवळ, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, न्यू स्त्रोत नगर सोसायटी, येरवडा.

धानोरी शांतीनगर, आळंदी रस्ता, कळस गावठाण, माळवाडी परिसर, धानोरी, टिंगरेनगर, मुंजोबा वस्ती, कळस-विश्रांतवाडी, वडारवस्ती, हडपसर, गोसावी वस्ती, वैदुवाडी, वानवडी गावठाण, वानवडी, एसआरपीएफ, कोंढवा (खु), साईबाबा नगर, ते तांबोळी बाजार, कोंढवा, भाग्योदय नगर.

शिवाजी नगर, पांडव नगर, हेल्थ कॅम्प, वडारवाडी, शिवाजीनगर, जनवाडी, गोखलेनगर, संगमवाडी टी.पी स्क्रीन, कस्तुरबा वसाहत, मुळा रस्ता, आदर्शनगर, औंध शिवाजीनगर, डेक्कन, पुलाची वाडी, पोलिस वसाहत-शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, खैरेवाडी, वडगावशेरी, लोहगाव इंदिरानगर.

खराडी-चंदनगर-विडी कामगार वसाहत, कल्पतरु सोसायटी, लोहगाव गावठाण, मोझे आळी, खराडी थिटे वस्ती, लेन, वडगावशेरी- गणेशनगर, बोराटे वस्ती, खराडी-तुकाराम, सातववस्ती, पर्वती, राजू गांधीनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत, फुरसुंगी भेकराईनगर, गंगानगर, हडपसर, गोंधळेनगर, हडपसर, माळवाडी, जनता वस्ती, कामठे वस्ती, साडेसतरा नळी, गणेशनगर, मालती तुपे वस्ती, साधू नाना तुपे वस्ती, मुंढवा-केशवनगर, कोंढवा (बु) गावठाण.

आई – माझं जग’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

0

पुणे-

संवेदनशील कवी रामदास पुजारी यांच्या ‘ आई  – माझं जग ‘ या पहिल्या काव्यसंग्रहाचे ऑनलाईन प्रकाशन डॉ. दिनेशकुमार त्यागी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, म.रा., पुणे यांचे व श्री.माधव गोगटे, सेवानिवृत्त, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना डॉ. त्यागी यांनी या कवितासंग्रहातील विविध कवितांचा परामर्श घेताना “जे न देखे रवी ते देखे कवी” अशा शब्दात गौरवोदगार काढून, कवीने विविध विषयांना हात घातला असल्याचे सांगितले. या कवितासंग्रहामध्ये आईबरोबरच माता वसुधंरेवरील कवितांचा स्वतंत्र विभाग असल्याचे नमूद करुन, कवी रामदास पुजारी यांनी प्रसिध्द निसर्ग लेखक मारुती चितमपल्ली यांचेप्रमाणे निसर्गाच्या विविध पैलूंसंबंधी लेखन करावे अशी अपेक्षा श्री. माधव गोगटे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी पुस्तकाला प्रस्तावना लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री श्रीमती मंदाताई नाईक यांनी पुस्तकाचे तीन ठळक भागांतील पहिल्या भागात आईवरील १८, दुसऱ्या भागात माता वसुधंरेवरील १८ तर तिसऱ्या भागात इतर विषयांवरील १९ अशा ५५ कवितांचा समावेश असल्याचे नमूद करून पुस्तकातील कवितांविषयी त्यांचे विचार व्यक्त केले. श्री. प्रकाश ठोसरे, डॉ. अरविंदकुमार झा, डॉ. शेषराव पाटील या सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य; श्री रंगनाथ नाईकडे, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांनी तसेच श्री. पुजारी यांचे बालपणापासूनचे मित्र के.ई.एम. हॉस्पिटलचे सीनिअर कन्सलटंट डॉ. बाळासाहेब बांडे यांनी  कवीविषयी व कवितांविषयी कौतुकाचे दोन शब्द व्यक्त करुन कवीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी त्यांची पत्नी सौ.निलम, मुली कु. सुप्रभा व नुपूर,बहीण – भाऊ,नातेवाईक व ग्रामस्थ हेही  सहभागी झाले होते.

वनाधिकारी असलेल्या कवी रामदास पुजारी यांनी त्यांची स्वर्गीय आई, माता वसुंधरा, निसर्ग, सृष्टीतील विविध घटकांच्या ऋणातून अंशत: मुक्त होण्याचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे सांगून सर्वांनी जन्मदात्या आई-वडीलांची काळजी घेण्याबरोबरच सर्वांची जीवनदाती असणाऱ्या माता वसुंधरेचे रक्षणासाठी वृक्षलागवड करण्याची गरज असल्याचे नमूद करून काही कवितांचे वाचन केले. तसेच त्यांनी सर्व मान्यवर, नातेवाईक व विविध ठिकाणांहून सहभागी झालेल्या सर्वांचे तसेच आकर्षक स्वरुपात पुस्तक तयार करणाऱ्या वेदान्तश्री प्रकाशनचे श्री. सुनील गायकवाड (उंब्रजकर) यांचे व भंडारी मुद्रणालयाचे श्री. रमेश भंडारी यांचे आभार व्यक्त केले. श्री. सुनील गायकवाड यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडताना कवी, मुद्रक तसेच या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करणाऱ्या श्री. प्रकाश बोरूडे व श्री. तुषार वैद्य यांचे आभार व्यक्त केले.

या आगळयावेगळया प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन बायोस्फिअर्स संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी त्यांचे खास शैलीत केले. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, पुणेचे कार्याध्यक्ष श्री. सुनील भिडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटकेपणाने केले.

माऊलींच्या  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे निधन.

0


मुंबई, दि. १: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे आज रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.
ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला. श्री. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.
००००

दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे तर ९६०१ नवीन रुग्णांची नोंद; एकाच दिवशी झाल्या ६४ हजार ८४५ चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई-राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४९  हजार २१४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ९६०१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०४७ (४५), ठाणे- १९७ (१२), ठाणे मनपा-२२४ (७),नवी मुंबई मनपा-३४९ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२८३ (६),उल्हासनगर मनपा-४१ (४), भिवंडी निजामपूर मनपा-१९ (३) , मीरा भाईंदर मनपा-१०९(१),पालघर-१२९ (२), वसई-विरार मनपा-१८० (१२), रायगड-२७१ (२६), पनवेल मनपा-१४६(२), नाशिक-१३८ (६), नाशिक मनपा-३१८ (६), मालेगाव मनपा-२१ (१), अहमदनगर-२५६ (२),अहमदनगर मनपा-२३५ (४), धुळे-११ (२), धुळे मनपा-१९, जळगाव-१२४ (१७), जळगाव मनपा-१४९ (३), नंदूरबार-१३ (१), पुणे- ४६१ (२१), पुणे मनपा-१४४१ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-७९७ (१३), सोलापूर-१९८ (६), सोलापूर मनपा-२७ (१), सातारा-१९८ (६), कोल्हापूर-४९५ (४), कोल्हापूर मनपा-१११ (४), सांगली-७९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९५ (७), सिंधुदूर्ग-६, रत्नागिरी-४५ (२), औरंगाबाद-९३ (६), औरंगाबाद मनपा-२२ (११), जालना-२२ (१), हिंगोली-५ (१), परभणी-१३ , परभणी मनपा-१५, लातूर-११८ (४), लातूर मनपा-४९ (२), उस्मानाबाद-३३ (६), बीड-४९ (२), नांदेड-७८, नांदेड मनपा-८ (२), अकोला-३१ (१), अकोला मनपा-१४, अमरावती- ४० (२), अमरावती मनपा-१४१(२), यवतमाळ-१०१, बुलढाणा-८० (२), वाशिम-७ (१), नागपूर-२११ , नागपूर मनपा-१४१ (२), वर्धा-९, भंडारा-३, गोंदिया-२७, चंद्रपूर-३९, चंद्रपूर मनपा-१०, गडचिरोली-३, इतर राज्य ७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ९४ हजार ९४३ नमुन्यांपैकी ४ लाख ३१ हजार ७१९ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ०८ हजार ०९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१५,३३१) बरे झालेले रुग्ण- (८७,९०६), मृत्यू- (६३९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,७३१)

ठाणे: बाधित रुग्ण- (९४,५६४), बरे झालेले रुग्ण- (५९,९९१), मृत्यू (२६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९४६)

पालघर: बाधित रुग्ण- (१५,९२८), बरे झालेले रुग्ण- (९६३६), मृत्यू- (३४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९५१)

रायगड: बाधित रुग्ण- (१६,९५५), बरे झालेले रुग्ण-(१०,९५०), मृत्यू- (४०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६०२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१७४५), बरे झालेले रुग्ण- (९४०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३७४), बरे झालेले रुग्ण- (२८०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

पुणे: बाधित रुग्ण- (९१,९३०), बरे झालेले रुग्ण- (४३,४१०), मृत्यू- (२१७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,३४५)

सातारा:  बाधित रुग्ण- (४०७५), बरे झालेले रुग्ण- (२३७१), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५९)

सांगली: बाधित रुग्ण- (२६१९), बरे झालेले रुग्ण- (१०३४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (५६६६), बरे झालेले रुग्ण- (१६९४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९३५४), बरे झालेले रुग्ण- (४७०४), मृत्यू- (५११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१३८)

नाशिक: बाधित रुग्ण- (१५,२२७), बरे झालेले रुग्ण- (९३९१), मृत्यू- (४७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३६१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५२३१), बरे झालेले रुग्ण- (२९१९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२४५)

जळगाव: बाधित रुग्ण- (११,०९९), बरे झालेले रुग्ण- (७६८८), मृत्यू- (५३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६)

धुळे: बाधित रुग्ण- (३०९१), बरे झालेले रुग्ण- (२०२७), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,०११), बरे झालेले रुग्ण- (८५६९), मृत्यू- (४९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४३)

जालना: बाधित रुग्ण- (१९६२), बरे झालेले रुग्ण- (१४५३), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३४)

बीड: बाधित रुग्ण- (८०६), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५१३)

लातूर: बाधित रुग्ण- (२२३४), बरे झालेले रुग्ण- (११२२), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१७)

परभणी: बाधित रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (३३९), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (५५५), बरे झालेले रुग्ण- (४२९), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)

नांदेड: बाधित रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण (८१२), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१००४), बरे झालेले रुग्ण- (५२०), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

अमरावती: बाधित रुग्ण- (२१०८), बरे झालेले रुग्ण- (१४१६), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२९)

अकोला: बाधित रुग्ण- (२६४०), बरे झालेले रुग्ण- (१९६७), मृत्यू- (११६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६)

वाशिम: बाधित रुग्ण- (५९८), बरे झालेले रुग्ण- (४१०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१३६३), बरे झालेले रुग्ण- (६९५), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१०४४), बरे झालेले रुग्ण- (५१५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (१९७८), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१३३)

वर्धा: बाधित रुग्ण- (२०५), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४)

भंडारा: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३१५), बरे झालेले रुग्ण- (२३१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (२६६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१३)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (४०५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५६)

एकूण: बाधित रुग्ण-(४,३१,७१९) बरे झालेले रुग्ण-(२,६६,८८३),मृत्यू- (१५,३१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०६),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४९,२१४)

 (टीप:आज भिवंडी मनपामधील मृत्यूंचे रिकॉन्सिलिएशन करण्यात आले असून भिवंडी मनपामध्ये यापूर्वी दाखविण्यात आलेले ३५ मृत्यू  रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार ठाणे ग्रामीणमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे भिवंडी आणि ठाणे ग्रामीण यांच्या मृत्यू संख्येत बदल झाला आहे तथापि राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत त्यामुळे कोणताही बदल झालेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

0

परळी/बीड: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजळा देत साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अजरामर कार्यासाठी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित सन्मान करण्यात यावा अशी मागणी करत आपण त्यासाठी  पाठपुरावा करणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त श्री. मुंडे यांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले आहे. तसेच राज्य सरकारने केंद्राकडे याबाबतचा ठराव पाठवावा याबाबत आपण मागणी व पाठपुरावा करणार असल्याची माहिती बीड जिल्हा पालकमंत्री श्री. मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली.

पीडित – शोषितांचा आवाज आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करणारे थोर समाजसेवक, लेखक – कवी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज शंभरावी जयंती. त्यांच्या विचारांचा वारसा आपण त्यांचे सच्चे अनुयायी बनुन अखंडपणे तेवत ठेवू. साहित्यरत्न यांना भारतरत्न देण्यात यावा, यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे, असे यावेळी मंत्री श्री मुंडे यांनी याप्रसंगी म्हटले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने अधिकृतपणे याबाबतचा प्रस्ताव  केंद्र सरकारकडे पाठविला जाईल याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

अण्णाभाऊंना भारतरत्नसाठी आग्रह धरू – अशोक चव्हाण

0

पुणे- अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न मिळावे, या मागणीला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राला पत्र द्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन राज्याचे माजी मुख्यमंत्री,आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. अखिल महाराष्ट्र मातंग समाजाच्या वतीने साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही या वेबिनार मध्ये सहभागी होणार होते होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते सहभागी होऊ शकले नाही परंतु फोनवरून त्यांनी या वेबिनारला शुभेच्छा व्यक्त केल्या.

अशोक चव्हाण म्हणाले, पोटासाठी जगणाऱ्या माणसांच्या अस्तित्त्वाचा लढा अण्णा भाऊंनी त्यांच्या साहित्यातून मांडला. गरीब-शोषितांचे जीवन त्यांनी साहित्यातून चितारले. मालकधार्जिण्या गोष्टींवर प्रहार केला. इंग्रजांची सत्ता असताना त्या विरोधात आवाज उठवण्याची धमक त्यांनी दाखवली. त्यांच्या लालबावटा कलापथकावर इंग्रज सरकारला बंदी घालावी लागली हे अण्णांच्या लढ्याचे यश होते. अण्णाभाऊ हे क्रांतीची चालतीबोलती मशाल होते.

त्यांच्या समाजाच्या सर्व मागण्यांना न्याय देण्यासाठी येत्या वर्षभरात सर्व तऱ्हेने प्रयत्न करण्याचे आश्वासनही चव्हाण यांनी दिले.राष्ट्रवादी च्या नेत्या खासदार सौ. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अण्णा भाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नव्हते तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे कर्तृत्ववान सुपुत्र होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची जन्मशताब्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात साजरी करता आली नाही.पुढील वर्षात त्यांच्या नावाने शैक्षणिक कार्य, संशोधकांसाठी पाठ्यवृत्ती अशा स्वरूपात भरीव काम करण्याचे आश्वासनही सौ. सुळे यांनी दिले.

मातंग स्पीकस या अभियानाच्या माध्यमातून राज्यातला सकल मातंग समाज एकत्रित येऊन आत्मीयतेने, तळमळीने काही मागण्या करीत आहे. अण्णा भाऊंना भारतरत्न मिळावे, बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने (आर्टी) संस्था व्हावी, लहुजी साळवे यांचे भव्य स्मारक व्हावे, अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे, अ, ब,क,ड, प्रमाणे मातंग समजला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे, लहुजी वस्ताद अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करावे, अशा या मागण्या आहेत.
त्याबद्दल जन्मशताब्दी वर्षात सकारात्मक विचार करून त्यावर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक रवींद्र दळवी, आरपीआय मातंग आघाडीचे हनुमंत साठे, शिवसेनेचे बाळासाहेब भांडे, या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळेस राष्ट्रवादीचे विजय डाकले, साहित्यिक सुरेश पाटोळे, काशीनाथजी आल्हाट, अब्राहाम जी आवले, उपस्थित होते.

लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे यांही कार्यक्रमाचे आभार मानले तर कार्यक्रमाचे संयोजक मातंग एकता आंदोलन चे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, नगरसेवक अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले.हे वेबिनार ऑनलाइन फेसबुक वर 48 विविध पेज व FB अकाउंट वरून share केल्यामुळे हेय वेबिनार एकाच वेळेस एकूण 3,10,000 नागरिकांच्या पर्यंत पोहचले असे आयोजकाने सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या

0

पालकमंत्री जयंत पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी

100 व्या जयंती दिनी अण्णा भाऊ साठे यांना वाटेगाव येथे अभिवादन

सांगली : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे आग्रहाने केली आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज मन जागविण्याचे काम स्वतःच्या शाहिरीतून आणि प्रतिभेतून केले आहे.  प्रतिभावंत आणि संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक असणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आग्रहाने केल्याचे सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमित्त आज वाटेगाव येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्यहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार मानसिंग नाईक, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

तदनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री जयंत पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जुन्या घरास भेट देऊन अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्यहार करून अभिवादन केले व येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर साकारलेल्या शिल्पसृष्टीची पाहणी केली.

यावेळी वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री साठे व कुटुंबीय उपस्थित होते.