Home Blog Page 2494

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती

0

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 या बॅचचे नवल किशोर राम हे (आयएएस) अधिकारी आहेत. 2 वर्षांपूर्वी त्यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यांच्या बदलीनंतर आता पुण्याचे पुढील जिल्हाधिकारी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फेम इंडिया एशिया पोस्ट ने केलेल्या सर्वेक्षणानुसार नवल किशोर राम यांचा देशातील पन्नास लोकप्रिय जिल्हाधिकार्‍यांनी मध्ये समावेश होता. नवल किशोर राम मूळचे बिहार मधील असून 2007 मध्ये ते भारतीय शासकीय सेवेत दाखल झाले होते. आयएएस बनल्यानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग नांदेड मध्ये झालं होतं. त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत सी इ ओ आणि त्यांनतर बीड आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. औरंगाबाद मधील कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले होते. दोन वर्षांपूर्वी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. पुण्यात आल्यानंतर कोरेगाव भीमा रणस स्तंभ अभिवादन दिनाच्या कार्यक्रमाचं नेटकेपणानं नियोजन त्यांनी केलं. वर्षभरापूर्वी झालेल्या दंगलीमुळे कोरेगाव भीमा हा संवेदनशील विषय बनला होता. नवलकिशोर राम यांनी तो इतक्यात संवेदनशीलतेने हाताळला.

पुण्यामध्ये गेल्यावर्षी आलेला महापूर तसेच पावसाळ्यातील दुर्घटनांचा वेळी नवलकिशोर राम यांची कार्यक्षमता दिसून आली. सध्या कोरोनाच संकट असताना परिस्थिती हाताळत असताना जिल्हाधिकारी म्हणून नवलकिशोर राम हे राबवत असलेल्या उपायोजना प्रभावी ठरताहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवलकिशोर यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यामध्ये अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले आय ए एस अधिकारी श्रीकर परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात काम करण्यासाठी खास बोलावून घेण्यात आलं होतं.

हॉटेल,मॉलला ५ ऑगस्ट पासून पुण्यात सशर्त परवानगी

0

पुणे- महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ५ ऑगस्ट पासून पुण्यात जिथे प्रतिबंधित क्षेत्र नाही अशा ठिकाणी असलेल्या हॉटेल, लॉजेस, मॉल ला व्यवसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे .

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या संदर्भात आज काढलेले आदेश आणि नियमावली पहा , वाचा …

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय थांबवा- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

0

कोकणच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि.३ ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात आहे. परंतु सध्या त्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे चाकरमान्यांना आठ-आठ, दहा-दहा तास ताटकळत राहावे लागत आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांनी तात्काळ मुख्य सचिवांशी संर्पक साधून कोकणात गणेशात्सवात जाणा-या चाकरमान्यांना त्रास होता कामा नये याची योग्य काळजी घ्या असे आदेश दिले आहेत.
विरोधी पक्षनेते दरेकर गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खारपाडा, कशेडी, खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर भेट देऊन गणेशात्वासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली व माहिती घेतली. चाकरमान्यांना होणा-या त्रासाबद्दलची माहिती आज त्यांनी राज्यपालांना भेटून दिली व सर्व परिस्थितीची कल्पना दिली. आणि चाकरमान्यांची गैरसोय थांबवावी यासाठी निवेदन दिले. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार कालिदास कोळंबकर, मनिषा चौधरी, सुनिल राणे, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेजा, पराग शहा आदि मान्यवर उपस्थित होते
राज्यपालांनी तात्काळ मुख्य सचिव संजय कुमार यांना दूरध्वनी करून, कोकणात गणेशोत्वासाठी जाणा-या चाकरमान्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घ्या. तसेच चाकरमान्यांची तपासणी असेल किंवा त्यांना गावात क्वांरटाईन करावयाचे असेल तसेच गावातील ग्रामस्थांना कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी सरकार व जिल्हा प्रशासन यांनी नीट समन्वय साधत कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यपालांनी मुख्य सचिवांना दिले.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबई ठाण्यातून चाकरमानी आपापल्या गावी जात असतो. आज १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय हा चाकरमान्यांवर अन्याय करणारा आहे, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. अगोदरच कोरोनामुळे चाकरमान्यांचे आर्थिक कंबरडे मोडलेले आहे. त्यातच त्यांचे हातावर पोट असल्याने १४ दिवस क्वारंटाईन राहणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. यामुळे तपासणी यंत्रणा सक्षम करून क्वारंटाईन कालावधी कमी करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खाजगी बसेस कडून लूटमार
एसटी सेवा वेळेत उपलब्ध न केल्यामुळे खासगी बसेसकडून मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय चाकरमान्यांची लूटमार होत असल्याचे दरेकर यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. सरकारच्या निष्क्रियतेचा पाढा विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांसमोर वाचला. चाकरमान्यांबरोबरच गावातील ग्रामस्थांना प्रादुर्भाव होणार नाही याकरिताही नियोजन करून त्यांनाही दिलासा द्यावा, अशीही राज्यपालांकडे विनंती केली.

राज्यात आज ८९६८ नवीन रुग्ण,तर दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी

0

मुंबई, दि.३: राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असून आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७  हजार १७  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ८९६८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७० (४६), ठाणे- २०३ (५), ठाणे मनपा-२४४ (५),नवी मुंबई मनपा-३२२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-२४७ (२),उल्हासनगर मनपा-५४ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२३ (२) , मीरा भाईंदर मनपा-१३० (४),पालघर-१३२, वसई-विरार मनपा-२२७ (३), रायगड-२३२ (३), पनवेल मनपा-१७३ (२), नाशिक-११४(३),नाशिक मनपा-३२३ (३), मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-१८४ (१), अहमदनगर मनपा-१८६ (१), धुळे-१२ (१), धुळे मनपा-१२, जळगाव-२८० (६), जळगाव मनपा-१७३, नंदूरबार-३ (४), पुणे- २३१ (७), पुणे मनपा-७९६ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-७३१ (१३), सोलापूर-२०२(४), सोलापूर मनपा-६२ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-३९५ (५), कोल्हापूर मनपा-१५६ (४), सांगली-११४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३६५ (५), सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-३१ (२), औरंगाबाद-८१, औरंगाबाद मनपा-२३७ (३), जालना-१९ (१), हिंगोली-१००, परभणी-१, परभणी मनपा-१०,लातूर-७६(५), लातूर मनपा-३१ (२), उस्मानाबाद-३५ (१), बीड-४१ (१), नांदेड-१२३ (१), नांदेड मनपा-१०३ (४), अकोला-२५ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती- ३७ (२), अमरावती मनपा-६३, यवतमाळ-३ (२), बुलढाणा-५१, वाशिम-८ (१), नागपूर-१०८ (९) , नागपूर मनपा-१७६ (४१), वर्धा-३, भंडारा-७, गोंदिया-६१, चंद्रपूर-१३, चंद्रपूर मनपा-३, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (३).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,१७,४०६) बरे झालेले रुग्ण- (९०,०८९), मृत्यू- (६४९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५२८)

ठाणे: बाधित रुग्ण- (९७,३४३), बरे झालेले रुग्ण- (६२,४४८), मृत्यू (२७०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,१९१)

पालघर: बाधित रुग्ण- (१६,६०८), बरे झालेले रुग्ण- (९९९४), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१५१)

रायगड: बाधित रुग्ण- (१७,७५४), बरे झालेले रुग्ण-(१२,४६९), मृत्यू- (४११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८७२)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (१८७०), बरे झालेले रुग्ण- (११६२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४००), बरे झालेले रुग्ण- (२८५), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८)

पुणे: बाधित रुग्ण- (९६,६६९), बरे झालेले रुग्ण- (५२,७१९), मृत्यू- (२२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,६६४)

सातारा:  बाधित रुग्ण- (४४५३), बरे झालेले रुग्ण- (२५७७), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२४)

सांगली: बाधित रुग्ण- (३१५१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (६४१४), बरे झालेले रुग्ण- (२२३३), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (९८०२), बरे झालेले रुग्ण- (४९४७), मृत्यू- (५२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३२६)

नाशिक: बाधित रुग्ण- (१६,०७९), बरे झालेले रुग्ण- (१०,०१९), मृत्यू- (४८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५७१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५९०६), बरे झालेले रुग्ण- (३४१२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१८)

जळगाव: बाधित रुग्ण- (११,७९५), बरे झालेले रुग्ण- (८१५५), मृत्यू- (५४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (६५८), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६)

धुळे: बाधित रुग्ण- (३२४१), बरे झालेले रुग्ण- (२०३५), मृत्यू- (१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१४,४५१), बरे झालेले रुग्ण- (९०६६), मृत्यू- (५०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८७८)

जालना: बाधित रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१५१२), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१९)

बीड: बाधित रुग्ण- (९३२), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (६३६)

लातूर: बाधित रुग्ण- (२४७९), बरे झालेले रुग्ण- (१२१२), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५४)

परभणी: बाधित रुग्ण- (६९९), बरे झालेले रुग्ण- (३५९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (६६८), बरे झालेले रुग्ण- (४४२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११)

नांदेड: बाधित रुग्ण- (२२६५), बरे झालेले रुग्ण (८८१), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (११२७), बरे झालेले रुग्ण- (५२९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४४)

अमरावती: बाधित रुग्ण- (२२९५), बरे झालेले रुग्ण- (१५१३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४)

अकोला: बाधित रुग्ण- (२६९३), बरे झालेले रुग्ण- (२०४०), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९)

वाशिम: बाधित रुग्ण- (६३६), बरे झालेले रुग्ण- (४२९), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१४५५), बरे झालेले रुग्ण- (७८२), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१११०), बरे झालेले रुग्ण- (५८३), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९७)

नागपूर: बाधित रुग्ण- (५७१६), बरे झालेले रुग्ण- (२१६४), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४२४)

वर्धा: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५)

भंडारा: बाधित रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (३८१), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५२२), बरे झालेले रुग्ण- (२७९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२९६), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (४२७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७५)

एकूण: बाधित रुग्ण-(४,५०,१९६) बरे झालेले रुग्ण-(२,८७,०३०),मृत्यू- (१५,८४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०६),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,०१८)

(टीप: नागपूर जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रात आज नोंद करण्यात आलेले मृत्यू हे १९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२० या कालावधीतील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे महिला पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन

0

मुंबई, दि.३:- सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले.

यानिमित्ताने त्यांनी सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांची,त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. कोविड-१९ च्या लढ्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमच्या महिला पोलीस कर्मचारी भगिनी नेटाने लढा देत आहेत. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कर्तव्याबरोबर सामाजिक जाणिवेतून लोकहित जपणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात फुटपाथवरील बेघर महिलेला प्रसुती करण्यास मदत करत तिला व तिच्या बाळाला सुखरूप दवाखान्यात भरती करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया गरुड आणि महिला पोलीस शिपाई अस्मिता जाधव उपस्थित होत्या. तसेच पनवेल नजिकच्या ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांचा १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना दत्तक घेणाऱ्या महिला पोलीस नाईक रेहाना शेख यांच्यासोबत मुंबईच्या रस्त्यांवरील अनेक निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या महिला पोलीस नाईक रंजनी जबारे, तसेच एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महिला पोलीस नाईक संध्या शिलवंत उपस्थित होत्या. तसेच कोविड१९ च्या काळात कर्तव्य बजावताना कोरोनाने संक्रमित होऊन त्यावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या महिला पोलीस शिपाई रुपाली डावके आणि सविता नवघणे या देखील उपस्थित होत्या.

या सर्व महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून माझ्या पुढील कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा मिळाली. पोलीस दलातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा मोठा भाऊ या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने मला सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा बरोबरीने महाराष्ट्र पोलीस दलाचा सार्थ अभिमान आहे, असे मनोगत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले.

माझ्या विरोधात राजकीय षड्यंत्र -माजी खासदार संजय काकडे (व्हिडीओ)

0

पुणे, दि. 3 ऑगस्ट : युवराज ढमाले याने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांकडून कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मला बोलवून अथवा माझे जबाब न घेता आणि कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी हा गुन्हा दाखल केला आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? यासह या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जनतेसमोर सर्व सत्य यावे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिले देशमुख, पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना निवेदन देणार आहे. तसेच, या आरोपांमुळे मानहानी झाली असून, संबंधितांवर मानहानी झाल्याचा व 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यापूर्वी ढमाले याने माझ्यावर केलेल्या आरोपांची मला बोलवून शहानिशा करायला हवी होती. माझा प्रत्यक्ष जबाब नोंदवून घेऊन कायदेशीरपणे गुन्हा नोंदवायला हवा होता. कारण, ढमालेनी तीन वर्षांपूर्वी मी त्याला दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबत एखादा व्यक्ती तक्रार देत असेल तर, पोलिसांनी त्याविषयी खात्री करून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते परंतु, तसे घडले नाही. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदविण्यापूर्वी आरोपांची साधी खात्रीदेखील करावीशी वाटली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून समजली. महाराष्ट्रातील पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधील पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणाचे फोन आले? कोणी त्यांच्यावर दबाव आणला? याविषयी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एखादा विशेष तपास अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी. यामध्ये ढमालेचे तक्रार दाखल केल्याच्या संपूर्ण दोन दिवस अगोदर व पोलीस स्टेशनच्या संबंधीत अधिकाऱ्याचे दोन तास अगोदर व नंतरचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले जावेत, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

वास्तविक 29 ऑगस्ट 2017 आणि 29 ऑगस्ट 2018 या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आला असतानाच भेट झालेली आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या तीन वर्षात त्याच्याबरोबर माझं बोलणंदेखील झालेले नाही. माझी पत्नीदेखील त्याच्याबरोबर एक वर्षापासून बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी सोपान बागेतील एका प्रकल्पामध्ये युवराज ढमाले भागीदार होते. परंतु, त्यानंतर गेल्या दहा वर्षांत आमचा कोणताही व्यवसाय ढमालेबरोबर भागिदारीमध्ये नाही. त्यामुळे ढमाले याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. यामागे राजकीय षडयंत्र आहे. कोणीतरी ढमालेला पुढे करून अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे काम केले असावे. या गुन्ह्या संदर्भात मी कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही माजी खासदार संजय काकडे म्हणाले.

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट सावध रहा! महाराष्ट्र सायबरचे आवाहन

0

मुंबई, दि.३ :- नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबरतर्फे करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे . काही नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना त्यांच्या बिलिंग अपयशाच्या समस्येसंदर्भात ईमेल प्राप्त झाले आहेत. ईमेलने वापरकर्त्यांच्या नेटफ्लिक्स सदस्यता २४ तासांत रद्द करण्याचा दावा केला आहे, ज्यामुळे अनेकजण त्यांचे पेमेन्ट पूर्ण करण्यासाठी लिंक वर क्लिक करतील. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केले की, वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाइटवर नेले जाते . वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते . एकदा पूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल  वेबसाइटवर नेले जाते आणि या  प्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो. अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते आणि फिशिंग घोटाळ्याला बळी पाडले जाते. सेन्डर्स चा ई-मेल आय डी पाहता (netfiix@csupport.co), हे स्पष्ट होते की.सायबर क्रिमिनल्सनि तो कायदेशीर (ओरिजिनल) दिसावा म्हणून पुरेपुर प्रयत्न केला आहे, ज्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडतील.

आवाहन

महाराष्ट्र सायबरतर्फे असे आवाहन करण्यात येते की, फिशर्सना ओरिजिनल कंपनीचा लोगो वापरकर्त्यांना फसवण्यासाठी कशा प्रकारे वापरायचे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे,  म्हणून आपण क्लिक करण्यापूर्वी विचार करावा.

आपणास प्राप्त झालेला ईमेल आणि त्याचा ईमेल आयडी काळजीपूर्वक तपासा.  सगळ्याच वेबसाईट ओरिजिनल नसतात त्यामुळे सगळ्याच वेबसाईटवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा संशयास्पद ईमेलमधील अँट्यचमेंट डाउनलोड करू नका.

आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, के्डिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इ. तपशील कोणाशीही शेअर करु नका. अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी ओरिजिनल नेटफ्लिक्स वेबसाइट वर जा आणि आपले बिल पेमेन्ट इत्यादी तपशील पडताळून बघा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 39 हजार 145; एकूण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 लाख 13 हजार 716 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि. 3 :- पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 716 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 145 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 90 हजार 393 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 60 हजार 272 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 37 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 हजार 13, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 864, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 912, कॅन्टोंन्मेंट 675, व ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 573 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 393, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 387, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 68, कॅन्टोंन्मेंट विभागातील 75, व ग्रामीण क्षेत्रातील 161 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 133 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 17, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 185, सांगली जिल्ह्यात 179 तर कोल्हापूर जिल्ह्यात 607 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 228 रुग्ण असून 2 हजार 128 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 46 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 215 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 320 आहे. कोरोना बाधित एकूण 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 905 रुग्ण असून 880 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 938 आहे. कोरोना बाधित एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 7 हजार 144 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 67 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 886 आहे. कोरोना बाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 4 हजार 474 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 716 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

(टिप :- दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
0000

ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि. 3 :- पुणे शहर तसेच ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची दैनंदिन वाढत जाणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन अति दक्षता विभागातील (आयसीयू) व कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) तसेच ऑक्सिजनयुक्त वाढीव खाटा निर्मितीचे काम 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज औंध येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन खाटानिर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची, तसेच नॉन-कोवीड रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधून रुग्णालयाकडून सुरु असलेल्या उपचाराबाबत विचारपूस केली. यावेळी कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. शर्मिला गायकवाड, डॉ. किरण खलाटे, यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरासह ग्रामीण भागातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारी वर्ग चांगले काम करत आहेत. जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या बळकटीकरणाकरीता निधीची कमतरता पडणार नाही. रुग्णालयाचे बळकटीकरण करतांना दर्जेदार काम करण्यार भर असला पाहिजे. कोरोना सारख्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्य सोईसुविधा देण्यावर आमचा भर आहे, असेही जिल्हाधिकारी श्री राम म्हणाले.
जिल्हाधिकारी राम यांनी ऑक्सिजन पाइपलाइन, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टॅंक, स्थापत्य दुरूस्त्या, विद्युत दुरूस्त्या, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी सुरु असलेल्या कामकाजाची माहिती घेवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

डॉक्टर,शासकीय कर्मचारी ,पोलिसांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी

0

  पुणे – कोरोना काळात जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या  पोलीस अधिकारी , कर्मचारी ,पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक , मुकादम ,डाॅक्टर व  सेवाभावी संस्थांचे सदस्य यांना रक्षाबंधनाचे निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी राखी बांधुन त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचा यथोचित सन्मान केला . भाजपचे  स्वीकृत सभासद सचिन दांगट यांचे नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरातील हा उपक्रम यशस्वी झाला .     कार्यक्रमास भारतीय मजदुर संघाचे प्रकाश आळंदकर , वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत,स्टेशनचे कर्मचारी , वारजे वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांचेसह वाहतुक कर्मचारी , पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक ऋतुराज दिक्षीत , सचिन सावंत , मुकादम संतोष बराटे ,रेणुका मोरे , वर्षा पवार , रेश्मा दोशी , सुप्रिया निंबाळकर , अमजद अन्सारी , किरण साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते .  ‘कोरोना,कोवीड १९ या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे . या काळात शासनाने घालुन दिलेले नियम पालन  जनतेकडून करून घेण्यासाठी ज्यांनी आपल्या कुटुंबाचा  , आपला सगळा वेळ देऊन सेवा केली आहे ,त्यांची कृतज्ञता म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सचिन दांगट यांनी यावेळी दिली . 

सहकारनगर, स्वारगेट, अरण्येश्वर, जनता वसाहतीच्या पर्यायी वीजपुरवठ्याचे काम रखडले

0

पुणे, दि. 03 ऑगस्ट 2020 : जुनाट वीजवाहिनीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने सहकारनगर एक, स्वारगेट, जनता वसाहत व अरण्येश्वरमध्ये पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम रखडले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भूमिगत वाहिनीच्या कामासाठी नियमानुसार पैसे भरून देखील खोदकामाची परवानगी पुणे महानगरपालिकेकडे प्रलंबित आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रासह इतर भागातील नागरिकांचा जनक्षोभ वाढत असल्याने महावितरणने अत्यावश्यक पर्यायी वीजपुरवठ्याचे सुरु केलेले काम देखील थांबविण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, पर्वती विभाग अंतर्गत जुनी पर्वती उपकेंद्रातून निघणाऱ्या अरण्येश्वर 22 केव्ही वाहिनीद्वारे सहकारनगर एक, अरण्येश्वर परिसर तसेच स्वारगेट व जनता वसाहतीच्या काही भागातील वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. काही ठिकाणी ओव्हरहेड तर काही ठिकाणी भूमिगत असलेल्या अतिशय जुनाट अरण्येश्वर वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची सोय सध्या उपलब्ध नाही. त्यातच वाहिनीचा काही भाग हा वनविभागाच्या हद्दीतून तसेच कॅनॉलच्या कडेनेही जात असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी मोठा वेळ खर्ची पडत आहे. प्रामुख्याने मे व जूनमधील वादळी पावसापासून पुढे पावसाळ्यात या वाहिनीमध्ये बऱ्याच वेळा बिघाड होत असल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमिवर गुलटेकडी उपकेंद्रातून एक किलोमीटर लांबीच्या नवीन भूमिगत वाहिनीद्वारे अरण्येश्वर वाहिनीला पर्यायी वीजपुरवठा देण्याचा प्रस्ताव महावितरणकडून मंजूर करण्यात आला आहे. महावितरणच्या एक किलोमीटर भूमिगत वाहिनीच्या खोदकामासाठी पुणे महानगरपालिकेने 31 मार्च 2020 पर्यंत मंजुरी दिली होती. महावितरणकडून खोदकामासाठी नियमानुसार रक्कम भरण्यात आली आहे. मात्र 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने सर्वच काम ठप्प झाले. त्यातच मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने महानगरपालिकेने दिलेली मुदत उलटून गेली. त्यानंतर एप्रिलमध्ये महावितरणकडून खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे लेखी पत्र महानगरपालिकेकडे पाठविण्यात आले. मात्र अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान, जून व जुलैमधील मुसळधार पाऊस, झाडाच्या फांद्या पडल्याने तसेच पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकदा अरण्येश्वर वीजवाहिनी अनेक ठिकाणी नादुरुस्त झाली. परिणामी हजारो ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे या वाहिनीवरील वीजपुरवठ्यामध्ये काही कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांचाही समावेश आहे. तसेच इतर परिसरात वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने नागरिकांचा रोष व तक्रारी वाढत गेल्या. त्यामुळे महावितरणने अत्यावश्यक सेवेसाठी जुन्या परवानगीच्या आधारे पर्यायी वीजपुरवठ्याचे काम सुरु केले. भूमिगत वाहिनीचे एक हजार पैकी 950 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अवघ्या 50 मीटरचे काम शिल्लक असताना महानगरपालिकेकडून हे काम थांबविण्यात आले आहे. पूर्वी रितसर परवानगी घेतली असताना तसेच नियमाप्रमाणे आवश्यक रकमेचा भरणा केला असताना, खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे पत्र दिले असतानाही पर्यायी वीजपुरवठ्याचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अरण्येश्वर वीजवाहिनीला पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम देखील रखडले आहे.

साथींच्या आजारांवर मात करण्यासाठी राज्यभरात कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

भाईंदर पूर्व येथील ३७१ बेडच्या दोन समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण

ठाणे, दि. ०३ :- विकासात्मक कामांच्या व्यतिरिक्त आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात साथींच्या आजारावर मात करण्यासाठी राज्यभरात समर्पित कायमस्वरूपी संसर्ग रुग्णालये उभारण्याची नितांत आवश्यकता असुन त्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोविडशी लढताना राज्यातील पालिकांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व मिरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्व येथे कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी उभारलेल्या दोन स्वतंत्र अद्ययावत समर्पित कोविड आरोग्य केंद्रांचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे, खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक,आ. गीता जैन, आ. रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक आयुक्त विजय राठोड यांसह मनपा पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रेसिंग ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. सर्व यंत्रणांनी मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.

कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान अतिशय काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. योग्य औषधोपचाराबरोबरच रुग्णांची योग्य कळजी आणि रुग्णसेवा अत्यंत महत्त्वाची असुन यामध्ये हयगय अथवा दुर्लक्ष होता कामा नये. या बाबीवरही स्थानिक प्रशासनाने लक्ष केंद्रीत केल्यास मृत्यूदर कमी करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही.

स्थानिक प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, प्रभावी उपाययोजना कराव्यात यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. मनपांना निधीची कमतरता पडु देणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्थानिक यंत्रणेला औषधांचा पुरेसा साठा करुन देण्यात येईल परंतु औषधांचा वापर कसा होतो याबाबत सदैव जागरुक राहुन नियमांची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा अशा सुचना श्री. ठाकरे यांनी केल्या.

सदैव दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी प्रशासन व जनता यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. जनतेमध्ये सुरक्षित अंतर, मास्क वापरणे याबाबत जागरुकता आणण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनीही नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मिरा भाईंदर मनपा हद्दीत कोरोनाबाबत चाचण्या, संपर्क शोधणे, बेड व रुणवाहिका व्यवस्थापन अत्यंत काळजीपुर्वक करण्यात येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. नगरविकास विभागाकडून पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या मनपा क्षेत्रात अलगीकरण व विलगीकरण सुविधांची आवश्यकता आहे. त्या निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे, अँटीजन टेस्ट सुरु रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्यावतीने उभारण्यात आलेल्या या सुविधांबाबत माहिती दिली. भविष्यात म्हाडाकडे सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून कोरोना संकट लवकर दूर व्हावे ही अपेक्षा व्यक्त केली. आ. प्रताप सरनाईक, महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

मनपा आयुक्त विजय राठोड यांनी मनपाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची सद्यस्थिती, कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदी विषयी सविस्तर माहिती दिली.

आयोडीन, स्तनपान माता व बाळासाठी उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली

0

ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०२० नुसार मातेचं स्तनपान मुलांना अमृत समान

मुंबई, ३ ऑगस्ट २०२०:- स्तनपानसंबंधीचे विविध गैसमज दूर करण्यासाठीच ऑगस्ट महिन्याचा पहिला सप्ताह ‘स्तनपान जागृती सप्ताह’ म्हणून पाळला जातो. तेंव्हा आयोडीन आणि स्तनपान यांचा एक विशिष्ट संबंध आहे महिलां स्तनपान आणि आयोडीन संबंधीच्या विविध मुद्द्यांची घेतलेली ही माहिती…. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०२० नुसार बाळ १ किंवा २ वर्षांचे होईपर्यंत त्याला स्तनपान करवणे हे शहरी भागांमध्ये किंवा अधिक शिक्षित मातांच्या बाबतीत सर्वसामान्यतः आढळून येत नाही.  तर दुसरीकडे अत्यंत गरीब कुटुंबे, ग्रामीण भाग किंवा कमी शिक्षित माता आपल्या बाळांना वरचे जेवण आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देण्याचे प्रमाण फार कमी असते. बाळ जन्माला आल्यानंतरचे काही महिने, त्याला आईच अंगावरच दूध मिळण हा त्याचा हक्कच आहे आणि त्याच्या सम्पूर्ण वाढीसाठी ते आवश्यक आहे. मात्र कधी गैरसमजामुळे आई -बाळाच्या या स्तनपान प्रक्रियेत अडथळे येतात. स्तनपानामुळे बाळांना सर्वोत्तम पोषण मिळते. त्याचप्रमाणे आयोडीन हे देखील आहारातील अत्यावश्यक पोषक तत्व आहे, खासकरून लहान बाळे व गर्भवती महिलांच्या आहारात आयोडीनचा समावेश नियमितपणे आणि योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. चयापचय क्रिया, शरीराची वाढ आणि विकास यावर नियंत्रण ठेवणाऱ्या थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडीन आवश्यक असते.टाटा न्यूट्रीकॉर्नरच्या पोषण तज्ञ श्रीमती कविता देवगण यांनी सांगितले की, “बाळ कमीत कमी दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान गरजेचे आहे, त्यामुळे बाळाचे विविध प्रकारच्या कुपोषणापासून संरक्षण होते. आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी स्तनपान अतिशय लाभकारी आहे. स्तनपानामध्ये बाळांना आईच्या दुधातून आयोडीन मिळत असल्याने नंतरच्या वर्षांमध्ये या मुलांचा बुद्ध्यांक वाढण्याशी देखील स्तनपान निगडीत आहे. त्यामुळे गरोदरपणामध्ये महिलांच्या शरीराची आयोडीनची गरज वाढलेली असते, त्यांच्या नेहमीच्या आहारातून ती पूर्ण होऊ शकत नाही.  आयोडीनची कमतरता थोडी जरी असली तरी बाळाच्या मेंदूच्या विकासाला धोका उत्पन्न होऊ शकतो. पुरेशा प्रमाणात आयोडीनयुक्त मीठ किंवा ज्यामध्ये आयोडीन असते असे पदार्थ म्हणजे मासे आणि दुग्धजन्य उत्पादनांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात करून महिलांनी आपल्या शरीराची आयोडीनची गरज पूर्ण केलीच पाहिजे.” गरोदर राहण्याच्या आधी आणि गरोदर असताना आहार, जीवनशैली यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यावर खूप भर दिला जातो.  चांगला आहार, भरपूर आराम, कमीत कमी ताणतणाव आणि निरोगी वातावरण हे सर्व घटक निरोगी बाळ जन्माला येण्यात योगदान देत असतात. परंतु गर्भाशयात असताना बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आयोडीन ही तितकेच बाळाला गरजेचे आहे हे बहुतांश मातांना माहित नसते. गरोदरपणामध्ये स्त्रीच्या शरीराची आयोडीनची गरज लक्षणीय प्रमाणात वाढते कारण गर्भाला देखील पुरेशा प्रमाणात आयोडीन हवे असते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यांपासूनच त्यांच्या शरीराची आयोडीन आणि थायरॉईड हार्मोन्सची मागणी वाढलेली असते, आयोडीनची कमतरता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या हे टाळायचे असेल तर आयोडीन अतिरिक्त प्रमाणात पुरवले जाण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांनुसार सर्व गर्भवती व स्तनपान करीत असलेल्या मातांना दररोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळालेच पाहिजे (२५० मायक्रोग्रॅम्स).

बाळाला स्तनपान करवल्यामुळे आईला देखील अनेक आरोग्यदायी लाभ मिळतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज निघून जाण्यात मदत मिळते, तसेच स्तन व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. बाळांना अतिशय आदर्श पोषण मिळते जे त्यांच्या वाढीसाठी खूप गरजेचे असते.  आईच्या दुधामध्ये अँटीबॉडीज असतात ज्या बाळाच्या शरीराला विषाणू व जंतुंविरोधात लढण्यात मदत करतात, त्यांना ऍलर्जी, कानातील संसर्ग, श्वसनाचे आजार, डायरिया असे आजार होण्याचा धोका कमी होतो. एकंदरीत स्तनपान करणाऱ्या बाळांची तब्येत उत्तम राहते, त्यांना वारंवार डॉक्टरकडे न्यावे लागत नाही.

चांगली बातमी अशी की नियमितपणे स्तनपान केल्यामुळे स्तन, गर्भाशय कर्करोग, टाईप २ मधुमेह होण्याचा आणि गरोदरपणातील आजारामुळे माता मृत्यू पावण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे दररोजच्या जेवणात चांगल्या दर्जाचे ब्रँडेड आयोडीनयुक्त मीठ वापरल्याने आयोडीन कमतरता देखील सहज टाळता येऊ शकते.

कृपया राम मंदीर भूमी पूजनात आमंत्रितांच्या यादीतून माझे नाव हटवा-उमा भारती

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण राम मंदिराच्या भूमी पूजन कार्यक्रमात सहभागी होणार नाही असे उमा भारती यांनी स्पष्ट केले. भाजपच्या कद्दावर नेत्यांपैकी एक उमा भारती यांनी अमित शहा यांचा कोराना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. देशातील वाढता कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोग्याबद्दल चिंतीत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

कार्यक्रम झाल्यानंतर घेणार रामललाचे दर्शन

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्मितीसाठी भूमी पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आपण कोरोनामुळे सहभागी होणार नाही. भूमी पूजन झाल्यानंतर शरयू नदी किनारी जाउन राम ललाचे दर्शन घेणार असे उमा भारती यांनी सांगितले आहे. सोबतच, राम मंदिर भूमी पूजनासाठी तयार करण्यात आलेल्या आमंत्रितांच्या यादीतून कृपपया माझे नाव हटवा अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.

पंतप्रधानांच्या आरोग्याची चिंता

उमा भारती यांनी ट्विट करून लिहिले, ‘काल अमित शहा जी आणि उत्तर प्रदेशचे भाजप नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले तेव्हापासूनच राम मंदिर शिलान्यास कार्यक्रमात उपस्थित होणाऱ्या प्रामुख्याने पीएम नरेंद्र मोदींच्या आरोग्यावर मी चिंतीत आहे.” भोपाळ येथून त्या आजच अयोध्येसाठी रवाना होत आहेत. परंतु, त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होत असल्याने मला पंतप्रधानांच्या आरोग्याची चिंता आहे असे त्या म्हणाल्या आहेत.

सनातन हिंदू धर्माच्या मान्यतेकडे दुर्लक्ष केले, यामुळेच पुजाऱ्यांपासून अमित शाहपर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह झाले -दिग्विजय सिंह यांची टीका

0

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख आणि मुहूर्तावर वाद वाढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोमवारी याला कोरोनाशी जोडले.त्यांनी ट्विट केले की, मंदिर पूजनासाठी हिंदू धर्माच्या मान्यतांकडे दुर्लक्ष केले. यामुळेच गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून राम मंदिराच्या पुजारी कोरोना संक्रमित झाले आहेत. एका ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी अमित शाह यांना पंतप्रधान संबोधले, नंतर त्यांनी यावर खेद व्यक्त केला.

दिग्विजय सिंह यांनी केले 11 ट्विट

दिग्विजय सिंह यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी 11 ट्विट केले. म्हणाले, “मोदीजी तुम्ही अशुभ मुहूर्तावर भगवान राम मंदिराचे भूमिपूजन करून आणखी किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी तुम्हीच मोदीजींनी समजवा. तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का मोडल्या जात आहेत? आणि तुमची काय नाईलाज आहे ज्यामुळे हे सर्व घडू देत आहात?”

1. राम मंदिराचे सर्व पुजारी कोरोना पॉझिटिव्ह.

2. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलराणी वरुण यांचे कोरोनामुळे निधन.

3. उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह.