Home Blog Page 2491

पंचवटी ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

0

पुणे, दि. ७: पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुणे मेट्रो मार्गिका 3 हिंजवडी ते शिवाजीनगर कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेट्रोचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व ‘पीएमआरडीए’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कामकाज करावे, असे सांगितले. नागरिकांशी संवाद साधून मेट्रोचे काम जलदगतीने होण्यासाठी महापालिका व पीएमआरडीए मधील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये माधव जगताप, नितीन उदास व सुनंदा गायकवाड यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्प निश्चिती, मान्यता, कामकाजाची सुरुवात, भूसंपादनाची सद्यस्थिती, केंद्र आणि राज्य शासनाची जागा, पर्यायी रस्ते तसेच अंमलबजावणीतील महत्वाचे टप्पे व प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यावाहीबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी याविषयी माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले.
0000

कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे,दि.७: ‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पुणे शहरातील ‘कोरोना’च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन झिरो पुणे’ या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये ‘कोरोना’च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. या ‘कोरोना’च्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देण्याचे आवाहन करुन या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व मालेगाव येथे ‘मिशन झिरो’ मोहिम राबबिण्यात आले. पुणे शहरात फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे 3 ते 5 हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोनाविषयी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीवर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना, कोरोना करत बसू नका, रोजगार,पूरनियंत्रण यावर काय करताय ते ही सांगा…

0

पुणे- नुसत करोना-करोना म्हणता बसू नका, पूराच्या संबधित काय उपाय योजना केल्या आहेत ते सांगा,” करोनाच्या काळात लॉकडाउनमुळं राज्यातील अनेक नागरिकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे त्यांनी जगायचं कसं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अनेक कामगार अजूनही बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राज्यातील एसटी सेवेसह स्थानिक सार्वजनिक वाहतूक आणि सर्व प्रकाराची दुकाने लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा १० ऑगस्टनंतर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

“लोकांसमोर जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झालेला असताना आता एसटीमधील १० हजार कामगार काढले जाणार आहेत. त्यामुळे बेरोजगारीत आणखीनच भर पडणार आहे, हे होता कामा नये.

आंबेडकर पुढे म्हणाले, “टपरीवाले, फेरीवाले यांची आज उपासमार होत आहे. त्यांची दुकानं उघडण्याची परवानगी देणार आहात की नाही ते स्पष्ट करा. आज एसटी महामंडळावरही मोठ संकट आलं आहे. १० हजार लोकं एसटी महामंडळ कमी करणार असल्याची बातमी आली आहे. दोन महिने एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळ आम्ही शासनाला विचारतो की तुम्हाला जे काही कृती मानकं (एसओपी) तयार करायचे होते ते तयार करा. पण हे एसओपी तयार करुन एसटी महामंडळाच्या बसेस रस्त्यावर कधी धावतील त्याची तारीख सांगा. विविध महापालिकांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कधी सुरु करणार तेही सांगा. जर शासन हे स्पष्टपणे सांगणार नसेल तर १० ऑगस्टनंतर आम्ही कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील ८० कोटी कुटुंबांना अन्न-धान्य देऊ अशी घोषणा केली होती. मात्र, ते अद्याप मिळालेलं नाही. रेशन दुकानांवर नियमाप्रमाणं धान्य मिळत नव्हतं. मात्र, नियमबाह्य पद्धतीनं रेशन किती जणांना वाटलं ते सांगा, असा प्रश्नही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

खड़कवासला 78 टक्के,पानशेत 58,वरसगाव 48 तर टेमघर 32 टक्के भरले

0

पुणे- खडकवासला धरणात 1.53 टीएमसी 78 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कालव्यातून 302 क्यूसेक पाणी सोडले आहे. पाऊस वाढल्यावर तो एक हजार क्यूसेक पर्यत वाढविन्यात येऊ शकतो. पानशेत धरणात 6.17 टीएमसी म्हणजे 57.92 टक्के तर वरसगाव मध्ये 6.14 टीएमसी म्हणजे 47.92 टक्के पाणी जमा झाले. तर टेमघर 1.18 टीएमसी म्हणजे 31.95 टक्के पाणी जमा झाला आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली. “धरण साखळीतील चार ही धरणाची मिळून 29.15 टीएमसी उपयुक्त साठवण क्षमता असून त्यापैकी, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता 15.03 टीएमसी म्हणजे 51.56 टक्के पाणीसाठा जमा झाले आहे गुरुवारी सकाळी मागील 24 तासात खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या धरणात अनुक्रमे 18, 82, 80 व 85 मिलिमीटर पाऊस पडला. गुरूवारी सकाळी सहा ते गुरूवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे अकरा तासात खडकवासला 12, पानशेत 31 व वरसगाव 37 व टेमघर येथे 45 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

राज्यात १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.६: राज्यात आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,५१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३१६ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९१० (५७), ठाणे- २०९ (११), ठाणे मनपा-२६६ (२७),नवी मुंबई मनपा-३८४ (२), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (७),उल्हासनगर मनपा-२४ (३), भिवंडी निजामपूर मनपा-२९ (६) , मीरा भाईंदर मनपा-१५७,पालघर-७६ (४), वसई-विरार मनपा-१८६ (६), रायगड-२५९ (४), पनवेल मनपा-१७० (१), नाशिक-१८७(२),नाशिक मनपा-६०२ (११), मालेगाव मनपा-२६, अहमदनगर-२४९ (५),अहमदनगर मनपा-२८४, धुळे-५७ (१), धुळे मनपा-१२९ (१), जळगाव-३४३ (१३), जळगाव मनपा-१३७, नंदूरबार-४९ (१), पुणे- ५९४ (१२), पुणे मनपा-१५१२ (३१), पिंपरी चिंचवड मनपा-९८५ (१९), सोलापूर-२०५ (१४), सोलापूर मनपा-६७ (१), सातारा-२०५ (२), कोल्हापूर-४२१ (११), कोल्हापूर मनपा-१४३ (२), सांगली-७५ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५४ (२), सिंधुदूर्ग-५, रत्नागिरी-५७ (१), औरंगाबाद-१८५ (२), औरंगाबाद मनपा-८६ (५), जालना-६६, हिंगोली-१४, परभणी-१४ (४), परभणी मनपा-१८ (३), लातूर-१३२ (२), लातूर मनपा-८० (४), उस्मानाबाद-१२६, बीड-१०९ , नांदेड-६६ (३), नांदेड मनपा-४९ (२),अकोला-४१ (१), अकोला मनपा-३३, अमरावती-६८ (२), अमरावती मनपा-७३ (५), यवतमाळ-४४ (२), बुलढाणा-८२ (३), वाशिम-२३, नागपूर-२०६ (६), नागपूर मनपा-३३१ (१२), वर्धा-५, भंडारा- ५३, गोंदिया-२३, चंद्रपूर-५२, चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१३, इतर राज्य १५.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.

जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२०,१५०) बरे झालेले रुग्ण- (९२,६५९), मृत्यू- (६६४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५४६)

ठाणे: बाधित रुग्ण- (१०,०८७५), बरे झालेले रुग्ण- (७०,९८३), मृत्यू (२८७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७,०१२)

पालघर: बाधित रुग्ण- (१७,३७८), बरे झालेले रुग्ण- (१०,६८३), मृत्यू- (३८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३०९)

रायगड: बाधित रुग्ण- (१८,८७५), बरे झालेले रुग्ण-(१३,८३५), मृत्यू- (४५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५८०)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (१९९५), बरे झालेले रुग्ण- (१३१९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४३३), बरे झालेले रुग्ण- (३०१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)

पुणे: बाधित रुग्ण- (१,०४,३५३), बरे झालेले रुग्ण- (६०,८५७), मृत्यू- (२४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०००)

सातारा:  बाधित रुग्ण- (५०१४), बरे झालेले रुग्ण- (२९९८), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५८)

सांगली: बाधित रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (१४४५), मृत्यू- (१०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३८३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७६५१), बरे झालेले रुग्ण- (२८१७), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६४४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१०,५६५), बरे झालेले रुग्ण- (५८६७), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१४१)

नाशिक: बाधित रुग्ण- (१८,०५४), बरे झालेले रुग्ण- (११,४९६), मृत्यू- (५२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०३७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (७४४०), बरे झालेले रुग्ण- (४०९४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२६०)

जळगाव: बाधित रुग्ण- (१३,०३१), बरे झालेले रुग्ण- (८९५१), मृत्यू- (५७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (४८२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२)

धुळे: बाधित रुग्ण- (३४७०), बरे झालेले रुग्ण- (२२५५), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५,२१८), बरे झालेले रुग्ण- (१०,१४३), मृत्यू- (५३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४५)

जालना: बाधित रुग्ण-(२०८७), बरे झालेले रुग्ण- (१५५३), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)

बीड: बाधित रुग्ण- (११८७), बरे झालेले रुग्ण- (३७९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (७८३)

लातूर: बाधित रुग्ण- (२९६२), बरे झालेले रुग्ण- (१३८६), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४८)

परभणी: बाधित रुग्ण- (८१७), बरे झालेले रुग्ण- (४१४), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (६८९), बरे झालेले रुग्ण- (४५१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२३)

नांदेड: बाधित रुग्ण- (२६१८), बरे झालेले रुग्ण (९४४), मृत्यू- (९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१७२९), बरे झालेले रुग्ण- (६५५), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१५)

अमरावती: बाधित रुग्ण- (२५५७), बरे झालेले रुग्ण- (१६६५), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१५)

अकोला: बाधित रुग्ण- (२८१५), बरे झालेले रुग्ण- (२१७२), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५)

वाशिम: बाधित रुग्ण- (७८०), बरे झालेले रुग्ण- (४९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७३)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१६६३), बरे झालेले रुग्ण- (९२४), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१२५२), बरे झालेले रुग्ण- (७४६), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)

नागपूर: बाधित रुग्ण- (६९५०), बरे झालेले रुग्ण- (२१९२), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५८८)

वर्धा: बाधित रुग्ण- (२५२), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९)

भंडारा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (४६७), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (६४२), बरे झालेले रुग्ण- (३२०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३६०), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (४७१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१८)

एकूण: बाधित रुग्ण-(४,७९,७७९) बरे झालेले रुग्ण-(३,१६,३७५),मृत्यू- (१६,७९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४६,३०५)

 *(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३१६ मृत्यूंपैक़ी २४६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू ठाणे जिल्हा – १३, रायगड -३, सोलापूर -२, अहमदनगर -२, कोल्हापूर -१, नंदूरबार -१ ,नाशिक- १, पुणे -१, यवतमाळ-१ आणि बुलढाणा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)*

1200 मराठी व्ययसायिकांच्या मुळावर उठली महापालिका !!!

0

पुणे- येऊ घातलेल्या मेट्रो च्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महात्मा फुले मंडइतील गाळे धारकांच्या भाड्याच्या रकमेत ३३ पट वाढ आणि दर ११ महिन्यांनी नवा करार असा निर्णय महापालिकेने घेतल्याने मनसे च्या रवी सहाने यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील १२०० मराठीव्यावसायिकांच्या मुळावर महापालिका उठल्याचा घणाघात त्यांनी केला आहे .

ते म्हणाले,’ सर्वदुर परिचित असलेली पुणे शहरातील महात्मा फुले मंडई मधे 134 वर्षा पासून मराठी व्यायसायिक अनेक पिढ़या आपला व्यवसाय करत आली असून यामधे कांदे बटाटे , भाजीपाला , नारळ , सर्व प्रकारचे फळे इत्यादि साहित्य विक्री करत आपला उदर निर्वाह करत आली आहे.
134 वर्षा पूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या या मंडई चे नाव रे मार्केट होते , स्वातंत्र नंतर याचे महात्मा फुले मंडई असे नामकरण करण्यात आले.पुणे शहराच्या मध्य भागी असलेली मंडई सर्वांच्या गरजेची होतीच आणि जिव्हाळाची ही होती.

येथील 1200 मराठी व्यावसायिकांनी मोठ्या मेहनती ने आज ही तीच ओळख आणि जिव्हाळा कायम ठेवला आहे.परंतु येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशन मुळे पुढे होणाऱ्या बदला साठी येथील मराठी व्यावसायिकांना लूटण्याचे पुणे मनपा ने ठरविल्याचे दिसत आहे.येथील 1200 गाळा धारकांना येणाऱ्या भाडया मधे अन्यायकारक 33 ते 40 पट भाडेवाढ करण्याचे सूचित केले आहे.33 ते 40 पट भाडेवाढ आणि त्यात ही अकरा महिन्याचा करार हे म्हणजे परत 11 महिन्या नंतर पुन्हा भाड़ेवाढ हे अत्यंत संताप जनक असून मराठी व्यापाऱ्यांना बाहेर चा रस्ता दाखविण्यचा आणि धनिकांना आमंत्रण देण्याचा मनपा चा दुष्ट हेतु दिसत आहे.आमचा ही येथे नारळ पाकळी मधे तीन पिढी पासून नारळाचा गाळा आहे , आम्हांला ही नोटिस देण्यात आली आहे यात लिहले आहे पुढील आठ दिवसात आपण नवा करार करण्यास या.या नवीन करारात 33 पट भाडेवाढ सुचवली आहे याविरुद्ध या सर्व गाळाधारकांमधे संतापाची भावना आहे , या अन्याय कारक भाड़ेवाढी विरोधात आंदोलन आणि कायदेशीर मार्गाने लढा उभा केला जाणार आहे.मराठी व्यावसायिकांवर होणारा हा अन्याय मनसे कदापि सहन करणार नाही.ज्यांनी ही अन्यायकारक भाड़ेवाढ सुचवली आहे त्यांनी ताबडतोब मागे घ्यावी.असेही रवी सहाणे यांनी म्हटले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961: एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 1 लाख 23 हजार 967 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि. 6:- पुणे विभागातील 81 हजार 764 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजार 967 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 38 हजार 961 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.98 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 97 हजार 309 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 68 हजार 775 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 303 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एकूण 2 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 370 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 331, सातारा जिल्ह्यात 198, सोलापूर जिल्ह्यात 332 , सांगली जिल्ह्यात 229 तर कोल्हापूर जिल्ह्यात 280 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 747 रुग्ण असून 2 हजार 349 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 252 आहे. कोरोनाबाधित एकूण 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 9 हजार 822 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 281 आहे. कोरोना बाधित एकूण 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 3 हजार 669 रुग्ण असून 1 हजार 16 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 545 आहे. कोरोना बाधित एकूण 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 8 हजार 420 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 611 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 580 आहे. कोरोना बाधित एकूण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 41 हजार 88 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 23 हजार 967 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

0

मुंबई दि. ६ : दैनिक ‘पुण्य नगरी’ वृत्तपत्र समुहाचे संस्थापक, संपादक मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे प्रमुख हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरलीधर शिंगोटे यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, जुन्नर तालुक्यातील उंब्रज सारख्या छोट्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुरलीधर शिंगोटे यांनी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तसमुहाचे प्रमुख हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी आयुष्यभर सामान्य, कष्टकरी वाचकांशी बांधिलकी जपली. पुण्य नगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, कर्नाटक मल्ल्या, तमिळ टाईम्स, यशोभूमी, हिंदमाता या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड या चार भाषिक वाचकांना जोडले. मुरलीधर शिंगोटे यांनी कोणत्याही एका राजकीय विचारधारेकडे न झुकता कायम तटस्थ भूमीका ठेवली. त्यांचे यश आणि वेगळेपण मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी आश्चर्यच मानावे लागेल.

शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीची हानी – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

दैनिक ‘पुण्यनगरी’चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टीची हानी झाली आहे, अशा शब्दात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

डॉ. शिंगणे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाबा शिंगोटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च 1938 ला झाला होता. शिक्षण सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला वृत्तपत्र टाकण्याचे काम त्यांनी केले. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. सन 1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. त्यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते.

त्यांच्या निधनाने वृत्तपत्र सृष्टीतील एक अध्याय समाप्त झाला आहे असेही डॉ. शिंगणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.

समाजप्रबोधनासाठी आरोग्यमंत्र्यांचा कृतीतून संदेश

0

आईच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत

मुंबई, दि. ६: प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. काल बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका घेऊन कामकाजाला सुरूवात केली. आईने शेवटच्या काळात पाठीवर दोन्ही हात ठेवून आशिर्वाद दिल्याचे सांगतानाच आता ह्याच आर्शिवादाच्या बळावर पुन्हा जोमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरलो असल्याची भावना आरोग्यंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

शनिवारी १ ऑगस्ट रोजी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी जालना जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमावलीचे (कमी उपस्थिती, सोशल डिस्टंसिंग) पालन करण्यात आले.

टोपे कुटुंबियांचे जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आहे तिथूनच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

मार्चच्या सुरूवातीला जेव्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला सुरूवात झाली नेमक्या त्या कसोटीच्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल होत्या. कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या आरोग्यमंत्र्यांना आईच्या भेटी पुरेसा वेळ मिळत नव्हता तरीही ते वेळात वेळ काढून आईला भेटायला जायचे.

ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १४ दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे. पुर्वी निरोप जायला वेळ लागायचा, दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाईक यायलाही विलंब व्हायचा. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरूवात स्वत:पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर १४ दिवसांचा दुखवटा न पाळता याकाळातील विधी तीन दिवसात केले, असे श्री. टोपे यांनी सांगितले. जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

बाबा शिंगोटे यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून शोक व्यक्त

0

मुंबई, दि. ६ : दै. पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांच्या निधनाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केले आहे.
आपल्या शोक संदेशात श्री चव्हाण म्हणतात.

पुण्यनगरीचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वितरण क्षेत्रातील अनुभव व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी एकाहून एक सरस प्रकाशने काढली. त्यांचा जीवनप्रवास नेहमीच स्मरणात राहणारा ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

लोकाभिमुख योजनांमुळे ‘रामराज्य’ येईल : राजेश पांडे

0

श्रीराम मंदिर भूमिपूजनानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे जनआरोग्य योजनेंतर्तगत ७५० लोकांना लाभ

पुणे : “प्रभू श्रीरामाचे राज्य लोकाभिमुख होते. त्यांचाच आदर्श ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक लोकाभिमुख योजना भारतीय जनतेसाठी राबवत आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिरांचे भूमिपूजन करून नरेंद्र मोदी यांनी देशात ‘रामराज्य’ येईल, असा विश्वास दिला आहे. अनेक वर्षांचे मंदिर निर्माणाचे स्वप्न साकार झाल्यानंतर आता लोकाभिमुख योजनांमुळे ‘रामराज्य’ साकार होईल,” असे प्रतिपादन नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे राजेश पांडे यांनी केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त शिवसमर्थ प्रतिष्ठान व भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दीपक नागपुरे व प्रभाग क्रमांक ३४ च्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रभागातील ७५० नागरिकांना पंतप्रधान जनआरोग्य योजनेंतर्गत ‘आयुषमान भारत’चे कार्ड वाटण्यात येणार आहे. त्यामुळे पाच लाखांपर्यत मोफत उपचार होणे शक्य होईल. यावेळी पांडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात २०-२५ नागरिकांना हे कार्ड प्रदान करण्यात आले. प्रभू रामाच्या प्रतिमेचे पूजन करून मिठाई वाटण्यात आली. परिसरात दिव्यांची आरास, विद्युत रोषणाई, रांगोळी करण्यात आली होती. यावेळी दीपक कवाने, दीपक महाडिक, सचिन गोसावी, मंगेश बुजवे, प्रणव कुकडे, सौरभ मंडावले, संदीप कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश पांडे म्हणाले, “पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून पाच लाखांचा आरोग्यविमा दिला जात आहे. उज्ज्वला योजनेत गृहिणीना मोफत गॅस दिला जात आहे. अंत्योदय योजनेतून सामान्यांना धान्य दिले जात आहे. अशा कितीतरी योजना सामान्य जनतेसाठी नरेंद्र मोदी प्रभावीपणे राबवत आहेत.” दीपक नागपुरे म्हणाले, “श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाल्याने आनंदाने मन भरून आले आहे. अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले आहे. देशाला एक नवी दिशा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकाभिमुख योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.”

जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करावीः डॉ. रघुनाथ माशेलकर

0

वेबिनारच्या माध्यमातून माईर्स एमआयटीचा 38वां स्थापना दिवस साजरा

पुणे, “भारताच्या इतिहासात आजचा ऐतिहासिक दिन असून एमआयटीचाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा मंत्र दिला आहे. आत्मनिर्भर म्हणजेच आत्मविश्वास असा होतो. त्यामुळे आता एमआयटीची धुरा सांभाळणारे सर्व सदस्यांनी लक्ष्य निर्धारित करून जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पाऊले उचलावी.”असे विचार जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटीच्या 38वां स्थापना दिन सोहळा वेबिनाराच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
तसेच, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड,  संस्थापक विश्वस्त डॉ. सुरेश घैसास, प्रा. प्रकाश जोशी हे उपस्थित होते.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्रा  कराड-नागरे, सौ. ज्योती कराड-ढाकणे, डॉ. विरेंद्र घैसास व माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर,“कोविड 19 मुळे लाखों लोकांच्या नोकर्‍या गेल्या तसेच मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल, नॅशनल व पर्यावरणसारख्या बर्‍याच समस्या निर्माण झाल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेऊन पुढील काळात काय करावे यावर संस्थेचा फोकस असावा. डॉ. कराड यांनी लावलेले बीज आज वटवृक्षामध्ये परिवर्तीत झाले आहे. 900 एकर जमीनीवर विस्तारित या संस्थेला पुढच्या सर्व पिढींमध्ये नेतृत्वाचे व शिकण्याचे गुण आहेत.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भारताच्या संस्कृतीची जबाबदारी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने स्विकारुन त्या दिशेनेच वाटचाल करावी. अयोध्या येथे श्रीराममंदिर निर्मितीसाठी संस्थेतर्फे 21 कोटी रूपये मदत म्हणून दिली आहे. त्यातून या मंदिरात सर्वात मोठे गर्भगृह व ग्रंथालयाचे निर्माण करणार आहे. श्रीराम या एका शब्दानेच जगासमोर आम्हाला भारतीय संस्कृती मांडता येईल. विश्व शांती ही संकल्पना स्विकारून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आपले कार्य करीत आहेत. त्याच आधारावर डॉ. विश्वनाथ कराड यांनी 1996 साली पहिली जागतिक तत्वज्ञान परिषदेत आयोजित केली होती. उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर संस्थेने आज चार विद्यापीठांची स्थापना केली आहे. वर्तमान काळात कोविड 19 मुळे जी स्थिती निर्माण झाली. ती गोष्ट लक्षात ठेऊन पुढील सर्व समस्यांसाठी तयार व्हावे लागणार आहे. प्रगतीसाठी नवनवीन कल्पनाचा अवलंब करणे अतिशय महत्वाची आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारताच्या इतिहासामध्ये अयोध्या येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मर्यादा पुरूषोत्तम रामाच्या मूर्तीची स्थापना होत आहे. हा नियतीचा खेळ आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश संपूर्ण जगभरात पोहचावा म्हणून राममंदिराची निर्मिती होत आहे. त्यासाठी हा कोनशीला होत आहे आणि याच दिवशी एमआयटीचा आज 38 वा वर्धापन दिवस आहे. 21 व्या शतकात भारत विश्वगुरू बनेल हे स्वामी विवेकांनदाचे भाकीत आता लवकरच साकार होईल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ देशातील 100 ट्रस्ट मध्ये माईर्स या संस्थेचा समावेश आहे. त्यामुळे या संस्थेच्या पदावरील जबाबदारी ही व्यवस्थित  पार पाडू. डॉ. कराड यांनी लावलेल्या या वटवृक्षाची फळे ही पुढच्या पिढीला नक्कीच मिळेल. संस्थेतर्फे भगवान श्रीराम मंदिर निर्मितीसाठी 21 कोटी रूपये हे समर्पण भावाने दिले आहे जो एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे माईर्स संस्था ही आत अदभूत अशा वळणावर आलेली आहे. कोविड 19 च्या काळात संस्थेच्या हॉस्पिटलने अमुल्य योगदान देऊन शेकडो रूग्णांना बरे केले आहे.”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, मी एमआयटीचा प्रथम विद्यार्थी असून याच्या उन्नतीचा साक्षीदार आहे. नवीन वळणावरील आव्हानांचा सामना करायचा आहे. या विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण व व्यावसायिक शिक्षणावर अधिक भर दिला आहे. तीच परंपरा पुढे ही ठेऊन इनोवेशन, रिसर्च आणि आंत्रप्रेन्यूअरशीप बरोबर मुल्याधिष्ठित शिक्षणावर अधिक लक्ष असेल. याच जोरावर आम्ही जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम करू.
प्रकाश जोशी म्हणाले,“संशोधन आणि नवनिर्मिती या दोन गोष्टींवर अधिक भर देऊन कार्य करावे. तसेच, विद्यापीठातील प्रयोगशाळा आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अत्याधुनिकता आणावी. तंत्रज्ञानावर अधिक भर देणारी बिट्स पिलानी ही सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटीचा आदर्श पुढे ठेऊन विद्यापीठाने वाटचाल करावी. तसेच, जास्तीत जास्त शिक्षकांना समाजोपयोगी पीएचडी करण्यास प्रोत्साहित करावे.”
 डॉ. एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले.
 यावेळी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रा.दिपक आपटे हे ही उपस्थित होते.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्र संचालन केले. प्रा. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाने अधिक सतर्क राहून मदत कार्य करावे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्षांच्या संपर्कात

कोकण, कोल्हापूर भागाचाही घेतला आढावा, नागरिकांना तातडीने सहाय करण्याचे निर्देश

मुंबई दि ६ : मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे मुंबई, मुंबई परिसर तसेच कोकणातील जिल्हे त्याचप्रमाणे विशेषत: कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने आढावा घेत असून ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी व नियंत्रण कक्षांमध्ये स्वत: बोलत आहेत. कोरोनाशी मुकाबला सुरु असताना अतिवृष्टीमुळे संपूर्ण काळजी घेऊन मदत कार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. काल रात्री पंतप्रधानांना देखील त्यांनी मुंबईतील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्री आणि आज सकाळीही मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडून माहिती घेतली तसेच ते कोकण विभागीय आयुक्त लोकेश चंद्र, मुंबई पालिका आयक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशीही बोलले व सुचना केल्या. भारतीय हवामान विभागाचे उप महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बोलून त्यांनी पुढील हवामानाचा काय अंदाज असेल व कशी तयारी करता येईल याविषयी चर्चा केली.

रेल्वे प्रवाशांची सुटका करणाऱ्या जवानांचे कौतुक

कालपासून (५ ऑगस्ट) आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झालं. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता. तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली झाडे, विस्कळीत वाहतूक तसेच मदत कार्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. कुर्ला येथे झाड अंगावर पडून एक व्यक्ती जखमी झाला असून ठिकठिकाणी पडलेली झाडे, व फांद्या युद्धपातळीवर दूर करण्यात आल्याचे  पलिकेने सांगितले. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशाना यशस्वीरीत्या बाहेर काढणाऱ्या रेल्वे पोलीस दलाच्या व एनडीआरएफ जवानांचे त्यांनी कौतुक केले. मस्जिद बंदर येथे मोटार पंपाचा शॉक लागून रेल्वेचा एक कर्मचारी मरण पावला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

पाण्याचा निचरा, पडलेली झाडे काढणे याला प्राधान्य

प्रथमच काल जेजे रुग्णालय येथे तळमजल्यावर पाणी भरले होते परंतु लगेचच यंत्रणेने त्या पाण्याचा निचरा करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास होऊ दिला नाही त्याचप्रमाणे मुंबईत हिंदमाता, शेख मिस्त्री दर्गा रोड, बीपीटी कॉलनी स्काय वॉक, गोल देऊळ, महर्षी कर्वे रोड, पोलीस वसाहत, भायखळा, खेतवाडी आदी ठिकाणी साचलेले पाणी पालिकेने तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून काढले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त केले.

शहरात १५ ठिकाणी घरांच्या भिंती पडण्याच्या तक्रारी आल्या आहेत. ३६१ ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या होत्या ते तोडून रस्ता साफ करण्याचे काम सुरु आहे, ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पेडर रोड ते केम्स कॉर्नर या मार्गावर संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली आहे त्याचीही माहिती त्यांनी घेतली.

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील सुचना  

कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी येथील परिस्थितीचा त्यांनी पुणे विभागीय आयुक्त व कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून माहिती घेतली व पूर परिस्थिती असल्यास त्या-त्या भागातील नागरिकांचे वेळीच स्थलांतर करावे व त्यांना कुठली गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले.

एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोल्हापूरला पंचगंगा आणि रत्नागिरी येथे कोदवली, रायगड येथे कुंडलिका या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा प्रवास प्रेरणादायी – अमित देशमुख

0

लातूर दि.६ : दै. पुण्य नगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात  म्हटले आहे.

श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणतात की,  वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजता आणि वाचता येणारे वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक/ संस्थापक हा प्रवास थक्क करणारा असून त्यांनी या क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.

भारतीय स्टेट बँकेमध्ये होणार ५१७ अधिकाऱ्यांची मेगाभरती

0

पुणे : भारतीय स्टेट बँकेतर्फे महाराष्ट्रातील तरुण उमेदवारांना स्टेट बँकेत अधिकारी पदावर काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण ५१७ जागांसाठी ही भरती होणार असून, उमेदवार किमान कोणत्या तरी एका शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. मंडळ आधारित अधिकारी किंवा ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ असे या पदाचे नाव असून, सहाय्यक प्रबंधक या श्रेणीत नियुक्तीसाठी ही भरती होत आहे, अशी माहिती बँकेचे उपमहाप्रबंधक व सीडीओ श्री. आलोक चतुर्वेदी यांनी दिली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळातही बँकेने दिलासा देणारी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिक उमेदवारांना महाराष्ट्रातच अधिकारी पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. यासाठी ग्रामीण बँक अथवा शेड्युल कमर्शियल बँकेमध्ये दोन वर्षाचा अनुभव असलेल्या ३० वर्षाखालील मराठी तरुणांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.”

अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२० असून, जास्तीत जास्त मराठी तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. पात्रतेचे निकष, आरक्षण, वेतन यासह अधिक माहितीसाठी https://www.sbi.co.in/careers किंवा https://bank.sbi/careers या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन चतुर्वेदी यांनी केले आहे.