Home Blog Page 2490

बेळगावात छत्रपती शिवरायांचा पुतळा रातोरात हटवला; सीमा भागासह कोल्हापूरात तीव्र पडसाद, कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

0

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील (ता. हुक्केरी) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रात्रीत हटवला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी सीमाभागा सह कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांनी पुतळा त्वरीत बसवावा अन्यथा बेळगावात जाऊन आंदोलन करु असा इशारा दिला आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री दोन गटांनी या भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी सांगितले की माझ्या हस्ते शिवपुतळा चबुतऱ्याचे पूजन होऊन या ठिकाणी पुतळा बसविण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तुम्ही रातोरात पुतळा बसवण्याची घाई का केली? याला कायदेशीर परवानगी घेऊन तेथे पुतळा बसवूया, तोपर्यंत हा पुतळा हलवून सुरक्षित जागी ठेवा. पंधरा दिवसानंतर याबाबत मी निर्णय घेतो असे आश्वासन आमदारांनी दिल्याचे पंच व पुतळा कमिटीचे म्हणणे आहे.आमदारांच्या आश्वासनानंतर गावातील पंच मंडळी व पुतळा कमिटीच्या सदस्यांनी शनिवारी मध्यरात्री पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे बोलले जात आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता हुक्केरीचे तहसीलदार अशोक गुराणी व पोलिस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी देखील उपस्थित होते. याबाबत कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पुतळा बसविण्यास परवानगी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीची त्यास परवानगी असतानाही कर्नाटक सरकारने पुतळा हटवला आहे. सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी (9 ऑगस्ट) कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत.महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती येथे प्रतिष्ठापित छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कर्नाटक प्रशासनाने काही मोजक्या संघटना आणि लोकांच्या दबावाखाली येत रातोरात हटवली आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध. मागील काही दिवसांपासून कर्नाटकात सोशल मीडियावर अवमानकारक लिखाण, पुस्तकातून महाराजांचा इतिहास काढून टाकणें, आणि मूर्ती हटवणे असे अवमानकारक प्रकार वाढत आहेत, प्रशासनाने हे प्रकार वेळीच थांबवावेत, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्याबाबत झालेला अवमान शिवभक्त सहन करू शकत नाहीत. याचसाठी येत्या सोमवार दिनांक 10 ऑगस्टला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.

अभिषेक बच्चन कोरोनामुक्त

0

नानावटी रुग्णालयात दाखल असलेल्या अभिषेक बच्चनचा लेटेस्ट कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ज्यूनिअर बच्चनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘प्रॉमिस हे प्रॉमिस असते. आज दुपारी माझी कोविड-19 टेस्ट निगेटिव्ह आली. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की, मी याला हरवेल. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना केली याचे खूप आभार. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप धन्यवाद

28 दिवसांनंतर निगेटिव्ह आला रिपोर्ट
अभिषेक बच्चन 28 दिवसांपासून नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये कोविड-19 वर उपचार घेत होता. 11 जुलैच्या संध्याकाळी तो आणि अमिताभ बच्चन हे लक्षण दिसल्यानंतर रुग्णालयात गेले होते. अभिषेकने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी ट्विटरवर दिली होती. त्याने लिहिले होते की, ‘आज आम्ही दोघं, माझे वडील आणि मी कोविड-19 पॉझिटिव्ह आलो आहोत. आम्हाला दोघांना सौम्य लक्षण होती. यानंतर आम्ही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही सर्व आवश्यक अथॉरिटीजला माहिती दिली आहे आणि आमचे कुटुंब आणि स्टाफच्या सदस्यांची टेस्ट केली जात आहे. मी सर्वांना शांत राहण्याची आणि चिंता न पसरवण्याची विनंती करतो. धन्यवाद’

इंस्टाग्रामवर शेअर केला डिस्चार्ज प्लान

अभिषेक बच्चनने शनिवारी हॉस्पिटलमधून आपल्या केअर बोर्डचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे ‘मी तुम्हाला म्हणालो होतो. डिस्चार्ज प्लान- हो. आज दुपारी माझा कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आला. प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. मला घरी जाण्याचा खूप आनंद आहे. नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप आभार त्यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली आणि आम्हाला कोविड-19 वर मात करण्यास मदत केली. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हते.’

साठे कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन

0

नागपूर, दि. ८ : कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज भरतनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन साठे कुटुंबाचे  सांत्वन केले व धीर दिला.

वैमानिक विंग कमांडर दीपक यांचे वयोवृद्ध वडील कर्नल वसंत साठे, आई नीला साठे तसेच नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

दुबईहून केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगवेळी धावपट्टीवरुन अचानक घसरल्यानंतर दरीत कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचे सूपुत्र पायलट साठे एनडीएमध्ये कार्यरत होते. अपघात झालेले विमान त्यांनी दोन वेळा उतरवण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान उतरवले पण अपघात झाला. दीपक साठे अनुभवी पायलट होते. त्यांना एअरफोर्स ॲकेडमीचा प्रतिष्ठित ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ सन्मान आणि ‘राष्ट्रपती पदका’ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा साठे, बहीण अंजली साठे-पराशर, मुलगा धनंजय साठे, शांतनू साठे, स्नुषा वैभवी शांतनू साठे तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.

आज त्यांच्या आईचा जन्मदिवस असून मुलाच्या अपघाती मृत्यूचे धक्कादायक वृत्त त्यांना आजच कळले. टेबलटॉपसारखी रचना असलेल्या एअरपोर्टवर लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई तसेच नातेवाईकांनी यावेळी केली.

बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स एक नवी दिशा…..

0

२१ व्या शतकामध्ये विकसनशील राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिक्षण फार मोठी भूमिका बजावत आहे. उच्च तंत्रशिक्षणाचे ज्ञान देशाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकते, म्हणून विद्यार्थ्यासाठी तांत्रिक शिक्षण गरजेचे आहे. जागतिक स्तरावरील उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात. औद्योगिक क्षेत्राची कुशल मनुष्यबाळाची  गरज पूर्ण व्हावी यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने स्कील इंडिया या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बारावी नंतर बॅचलर ऑफ व्होकेशनल कोर्स हा एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कोरोनानंतर शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी, रोजगाराच्या संधी या मध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार पेठेची गरज ओळखून रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणे केव्हाही फायदेशीर होणार आहे. ह्या विचाराने हा लेख लिहिण्याचा प्रयत्न आहे.        सध्यस्थितीमध्ये विविध क्षेत्रात अद्यावत तंत्रज्ञानासाठी हार्डवेअर व त्यामध्ये वापरात असलेले सॉफ्टवेअर आणि मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाऊन  सध्यस्थितीत होत असलेले बदल व भविष्यात अपेक्षित असणारे बदल  यांच्याशी सांगड घालून रेफ्रिजरेशन ॲड एअर कंडीशनिंग, ऑटोमोबाईल सर्विसिंग, इलेक्ट्रोनिक प्रोडक्टस डिझाईन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सारखे व्होकेशनल कोर्स विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे आहेत. विद्यार्थ्याला या कालावधीमध्ये शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कंपनीमध्ये जाऊन प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध होईल. हा कोर्स करीत असताना विद्यार्थ्याला आठवड्यातील चार दिवस प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये प्रशिक्षणासाठी इंट्रन्सशिप करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थ्याला  विषयाचे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान मिळाल्यामुळे शिक्षणा बरोबर प्रत्यक्ष कामाचा देखील अनुभव येणार आहे. या कोर्सचे प्रशिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी बरोबर  स्वतःचा व्यवसाय सुरु करून  उद्योजक होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मोठी स्वप्ने बघून भविष्यकाळ घडत नसतो तर  आजचा योग्य निर्णयाने भविष्यकाळ उज्वल घडू शकतो. अशी माहिती डॉ. एन. बी. पासलकर, माजी संचालक, तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य, सदस्य, महाविद्यालय विकास समिती, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲड रिसर्च, पर्वती, पुणे  यांनी दिली.    

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त कलावस्तू पुणेकरांच्या भेटीस

0

पुणे:

भारतीय आदिवासी जमाती मधील कलाकारांनी निर्मित केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे  प्रदर्शन   पुण्यात’ ट्राईब छत्री’ या कलादालनात   ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनापासून भरविण्यात आले आहे. कोरोना साथीच्या काळात काही दिवस बंद असलेले हे कलादालन नव्या दमाने आदिवासींच्या कलावस्तू पुणेकरांच्या भेटीस घेऊन आले आहे. 

आदिवासी जीवनशैली आणि ‘ बालमुद्रा ‘ या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे आणि सौ पूर्वा परांजपे हे भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राईब छत्री’ नावाने कलादालन वर्षांपूर्वी सुरू केले आहे . केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘ट्रायबल को ओपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया'(ट्रायफेड) मान्यता प्राप्त हे राज्यातील एकमेव दालन आहे. 

पुणे महिला मंडळ, पहिला मजला, पर्वती मुख्य चौक ( पर्वती पायथा चौक ) येथे ९ ऑगस्ट पासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात हे दालन आणि प्रदर्शन पाहता येणार आहे .

येथे या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था असेल .कपडे,किचन मधील वस्तू,कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू,शिल्पे,चित्रे ,भेट वस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश असणार आहे.

देशाच्या 22 राज्यातील 430 हून अधिक आदिवासींकडून या वस्तू मागविल्या आहेत.आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान,कोरकू, माडिया, गोंड,नागा ,डोंग्रीया कोंढ ,भुतडा अशा अनेक आदिवासींच्या कलावस्तू आहेत . 

देशातील आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरु होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. 

पुण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पर्वती ला भेट देण्याची सवय लक्षात घेता पर्वती पायथा येथील महिला मंडळाच्या जागेत हे केंद्र सुरु करण्यात आले असून त्याची सजावट आदिवासींमधील वारली, गोंड चित्रकारांनीच केली आहे. 

आयुक्तसाहेब ,आता तरी दक्षिण पुण्यात कोविड केअर सेंटर उभारा – अश्विनी कदम

0

पुणे-
कोरोना रुग्ण संख्या धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गतकोरोना रुग्ण संख्या 4461 पर्यंत पोचली असून आता तरी येथे कोविड केअर सेंटर अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 118 मृत्युमुखी झालेत व 3242 जरी कोरोना मुक्त झाले असले तरी 1101 अजूनही आहेत ऍक्टिव्ह रुग्ण व दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे.

दक्षिण पुण्यातील हा सर्व भाग दाट लोकवस्तीचा असल्यामुळे कोरोना चा प्रसार झपाट्याने या भागात होत आहे. त्यामुळे या भागांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विशेष अभियान राबवणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचाच एक भाग म्हणून रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधायुक्त कोविड केअर सेंटर या भागात उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
यासंदर्भात तातडीने कारवाई करावी अशी मागणी मी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.अशी माहिती अश्विनी कदम यांनी येथे दिली .

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 155 : एकुण 3 हजार 403 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 87 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 31 हजार 294 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.8 :- पुणे विभागातील 87 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 294 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 155 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 403 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.82 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 2 हजार 884 रुग्णांपैकी 73 हजार 509 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 31 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 179 रुग्णांपैकी 2 हजार 493 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 523 आहे. कोरोनाबाधित एकूण 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 166 रुग्णांपैकी 6 हजार 486 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 142 आहे. कोरोनाबाधित एकूण 538 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 85 रुग्णांपैकी 1 हजार 297 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 670 आहे. कोरोनाबाधित एकूण 118 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 980 रुग्णांपैकी 3 हजार 951 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 789 आहे. कोरोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 474 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 620, सातारा जिल्ह्यात 203, सोलापूर जिल्ह्यात 291, सांगली जिल्ह्यात 180 तर कोल्हापूर जिल्ह्यात 180 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6लाख 72 हजार 468 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 31 हजार 294 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 7 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

दुबईहून भारतीयांना घेऊन आलेल्या विमानाचा केरळमध्ये अपघात, दोन्ही वैमानिकांसह 17 ठार

0

केरळच्या करिपूर विमानतळावर मुसळधार पावसात शुक्रवारी रात्री लँडिंग करताना एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरून थेट ३५ फूट खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, विमानाचे दोन तुकडे झाले.यात दोन्ही वैमानिकांसह १७ जणांचा मृत्यू झाला. १७५ प्रवासी-क्रू मेंबर सुरक्षित आहेत. एकूण १२५ जण जखमी झाले आहेत.

रात्री ११ पर्यंत सर्व प्रवासी बाहेर काढले
बचाव पथकांनी रात्री ११ वाजेपर्यंत विमानात अडकलेल्या सर्वांची सुटका केली होती. एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स-३४४ विमान वंदे भारत मिशनअंतर्गत दुबईहून भारतीयांना घेऊन आले होते. त्यात एकूण १९१ जणांत १७४ व्यक्ती, १० नवजात बालके, २ वैमानिक व ५ केबिन क्रू हाेते. हे बाेइंग ७३७ विमान रात्री ७.४१ वाजता लँडिंगच्या प्रयत्नात धावपट्टीवरून घसरून पुढे फरफटत गेले होते.

वैमानिक दीपक साठे होते माजी विंग कमांडर
विमानाचे वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे हे २२ वर्षे वायुदलात फायटर प्लेनचे पायलट होते. त्यांनी मिग-२१ सारखी विमानेही उडवली होती. साठेंनी २००३ मध्ये विंग कमांडर पदावरून मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. साठे हे खडकवासल्याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या ५८ व्या कोर्सचे सुवर्णपदक विजेते होते. त्यांना स्वोर्ड ऑफ ऑनर सन्मानही मिळालेला होता. त्यांचे मोठे बंधू कारगिल युद्धात शहीद झाले होते. वडील वसंत साठे लष्करात ब्रिगेडिअर होते.

करिपूर विमानतळाची धावपट्टी आहे टेबल टाॅप, पुढे खोल दरी
डोंगराळ भागातील या विमानतळाची धावपट्टी टेबल टाॅप आहे. म्हणजेच एका ठरावीक अंतरानंतर पुढे खोल दरी आहे. धावपट्टीवर पाणी तुंबल्याची माहिती नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी यांनी दिली.

– या विमानतळावर २००८ ते २०१७ दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरण्याच्या चार मोठ्या घटना घडलेल्या आहेत. – डोंगर कापून उभारले आहे करिपूर विमानतळ, विमान ३५ फूट दरीत कोसळले -१२४ जखमी, पैकी १५ गंभीर: विमानात १० नवजात बालके, उशिरापर्यंत बचावकार्य – पाऊसही मोठे कारण : लँडिंग करण्याआधी विमानाने आकाशात दोनदा घिरट्या घातल्या

कोरोनाला थोपविण्यात हलगर्जी नको, रुग्णांना वेळीच उपचार देऊन मृत्यू दर कमी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि ७: महाराष्ट्रातील मृत्यू दर कोणत्याही परिस्थितीत कमी झालाच पाहिजे तसेच कोरोनाची दुसरी लाट आपल्याकडे येणार नाही यासाठी जिल्ह्यांनी रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, कंटेन्मेंट क्षेत्रांवर अधिक लक्ष, रुग्णांना वेळीच उपचार याकडे कुठलीही हलगर्जी न करता लक्ष द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या दूरदृश्य बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरून केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी विशेषत: मुंबईमधील प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले मात्र राज्यातील कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांनी अधिक परिणामकारक उपाय योजावेत असे सांगितले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे त्याचप्रमणे टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित हे देखील सहभागी होते.

आरोग्यमंत्र्यांनी देखील यावेळी उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना केल्या तसेच प्लाझ्मा थेरपीविषयीही सांगितले.  

रुग्णांकडून जादा खर्च वसूल करणे गंभीर

खासगी रुग्णालयांतील ८० टक्के बेड्स राखीव न ठेवणे आणि रुग्णांच्याकडून अव्वाच्या सव्वा खर्च घेण्याच्या तक्रारी येत आहेत ही गंभीर गोष्ट आहे. जिल्हा प्रशासन आणि पालिकांनी याला तातडीने चाप लावला पाहिजे व योग्य ती कडक कारवाई लगेच केली पाहिजे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बेड्स आणि रुग्णवाहिका नियोजन हा महत्त्वाचा भाग आहे, याकडेही खूप काटेकोरपणे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रमुख शहरांमध्येही जम्बो सुविधा

मुख्यमंत्री म्हणाले, धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आला त्यावेळी तर सध्या उपयोगात आणणारी विशेष औषधेही उपचारासाठी देण्यात येत नव्हती. उपलब्ध वैद्यकीय साधन सुविधांचे उत्तम नियोजन करून ही साथ या भागात आटोक्यात आणण्यात आली. मुंबईमध्ये जशा जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत तशाच राज्यातील इतर मोठ्या शहरांमध्ये देखील उभारण्यास प्राधान्य देण्यात आले असून यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यावर भर आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव विशेषत: डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये पसरत आहे तो रोखणे खूप गरजेचे आहे.या आरोग्य सेवकांना संरक्षित करणे व त्यासाठी त्यांना तशा स्वरूपाचे प्रशिक्षण द्यावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आजमितीस व्हेंटिलेटरवर खूप कमी संख्येने रुग्ण आहेत, त्यांना सर्वात जास्त गरज असते ती ऑक्सिजनची.

महाराष्ट्रात कुणीही गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरणार नाही तसेच दुसरी लाट येणार नाही याकडे लक्ष द्या असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रयत्न अधिक वाढवा

यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की आपण निश्चितपणे चांगले प्रयत्न करीत आहात पण आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कंटेन्मेंट क्षेत्राच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी. घरोघर भेटी सुरूच ठेवाव्यात, जे अजूनही सक्रिय कंटेन्मेंट असतील त्यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे. रुग्णाचे ८० टक्के संपर्क शोधून ७२ तासांच्या आत त्यांच्या सर्वांच्या चाचण्या कराव्यात, नवीन काही हॉटस्पॉट निर्माण होत आहेत का ते बारकाईने पाहावे, १४० चाचण्या दर दशलक्ष दर दिवशी प्रत्येक जिल्ह्याने केल्याच पाहिजेत, एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तरी अति आत्मविश्वास न ठेवता अशा व्यक्तींच्या लक्षणानुसार आरटीपीसीआर चाचणी केलीच पाहिजे, चाचणी संकलित केल्यानंतर २४ ते ३६ तासांत अहवाल आलाच पाहिजे. रुग्ण सेवा आणि रुग्णालय व्यवस्थापन यांचा मृत्यू दर कमी होण्यात मोठा भाग असतो, त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.

वृद्ध आणि इतर आजार असलेल्यांनी लवकर रुग्णालयात यावे

लव अग्रवाल म्हणाले, साधारणपणे वृद्ध व्यक्ती या रुग्णालयांत येण्यास टाळाटाळ करतात आणि मग प्रकृती गंभीर झाली की धावाधाव करता यामुळे मृत्यू दर वाढतो आहे. देशाच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातील आरोग्य सेवकांना जास्त झाल्याचे आढळते हे प्रमाणही कमी करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. देशात हे प्रमाण ७ टक्के तर महाराष्ट्रात सरासरी २१ टक्के प्रमाण आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राने काही गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर कोरोना मुकाबल्यात महाराष्ट्र हे देशासमोरचे एक उदाहरण होऊ शकते असेही ते म्हणाले.

सध्या महाराष्ट्रातील मृत्यू झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले तर असे आढळते की, ४५ ते ५९ या वयोगटात १७.९ टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे आहेत. ६० ते ७४ या वयोगटात २९.७० टक्के मृत्यू इतरही आजार असलेल्या रुग्णांचे तसेच ४० टक्के मृत्यू हे ७५ पेक्षा जास्त वयोगटातील इतर आजार असलेल्यांचे आहेत.

१० प्रमुख जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित

राज्यातील ११ जिल्ह्यांमधील मृत्यू दर हा राज्याच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा जास्त आहे. पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, रायगड, जळगाव, नागपूर, पालघर, सांगली या १० जिल्ह्यांमधून गेल्या आठवड्यात ७९ टक्के रुग्ण आढळले आहेत असे लव अग्रवाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितलं. महाराष्ट्राचा मृत्यू दर ३.४७ टक्के असून देशाचा मृत्यू दर २.०७ टक्के आहे. पुणे २.३७ टक्के, ठाणे २,७२ टक्के, मुंबई ५.५० टक्के, नाशिक २.८२ टक्के, औरंगाबाद १.९७ टक्के, कोल्हापूर २.५३ टक्के, रायगड २.७८ टक्के , पालघर १.९३ टक्के, जळगाव ४.५१ टक्के, नगर १. १९ टक्के अशी प्रमुख जिल्ह्यांची मृत्यू दराची आकडेवारी असून ती कमी करण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे असे ते म्हणाले.

अवघ्या 225 रुपयात मिळेल कोरोनाची लस; सीरम इंस्टीट्यूटने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि गावीसोबत केला करार

0

देशात ऑक्सफोर्डची व्हॅक्सीन तयार करणाऱ्या सीरम इंस्टीट्यूटकडून एक चांगली बातमी आली आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि व्हॅक्सीन अलायंस संस्था गावीसोबत एक करार केला आहे. या करारानुसार, भारत आणि कमी उत्पन्न असलेल्या 92 देशांना फक्त 3 डॉलर म्हणजेच 225 रुपयात व्हॅक्सीन देण्याचे ठरवले आहे.

गेट्स फाउंडेशन व्हॅक्सीनसाठी गावीला फंड उपलब्ध करुन देईल, याचा वापर सीरम इंस्टीट्यूट व्हॅक्सीन तयार करण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यसाठी करेल. व्हॅक्सीनचे ह्यूमन ट्रायल यशस्वी झाल्यानंतर लस बाजारात उपलब्ध होईल. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.

I would like to thank @BillGates@gatesfoundation@GaviSeth for this key partnership of risk sharing and manufacturing of a 100 million doses, which will also ensure equitable access at an affordable price to many countries around the world. https://t.co/NDmpo23Ay8 pic.twitter.com/jNaNh6xUPy— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 7, 2020

https://twitter.com/adarpoonawalla/status/1291660966497628160/photo/1

काय आहे गावी ?

गावी गेट्स फाउंडेशनची एक संस्था आहे. गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशांना कमी दरात लस पुरवण्याचे काम ही संस्था करते. व्हॅक्सीनचे वितरण कोव्हॅक्स स्कीम अंतर्गत केले जात आहे. अभियानाचा उद्देश जागतीक आरोग्य संघटनेसह जगभरातील लोकांपर्यंत कोव्हिड-19 ची लस पोहचवणे आहे. कोव्हॅक्स स्कीमचा एजेंडा 2021 पर्यंत 200 कोटी लोकांना व्हॅक्सीचा पुरवठा करण्याचा आहे.

कोव्हिशील्ड नावाने लॉन्च होईल व्हॅक्सीन

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका कंपनी भारतातील सीरम इंस्टीट्यूटसोबत मिळून व्हॅक्सीनवर काम करत आहे. भारतात हे व्हॅक्सीन कोव्हिशील्ड (AZD1222) नावाने लॉन्च होईल.

मोठ्या प्रमाणावर होईल ट्रायल

नॅशनल बायोफार्मा मिशन अँड ग्रँड चॅलेंज इंडिया प्रोग्रामअंतर्गत सरकार आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनमध्ये एक करार झाला आहे. या प्रोग्राम अंतर्गत या व्हॅक्सीनचे मोठ्या प्रमाणावर ट्राल होईल. यासाठी अनेक इंस्टिट्यूटची निवड झाली आहे. यात हरियाणातील पलवलचे INCLEN, पुण्यातील KEM हॉस्पिटल, हैदराबादच्या सोसायटी फॉर हेल्थ एलायड रिसर्च अँड एजुकेशन, चेन्नईचे नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि वेल्लोरचे क्रिश्चियन मेडिकल कॉलेज सामील आहेत.

एअर इंडियाचे विमान कोझिकोडमध्ये कोसळले, विमानात 180 प्रवासी होते

0

केरळच्या कोझिकोड विमानतळावर शुक्रवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दुबईवरुन आलेले एअर इंडियाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 180 प्रवासी होते.एअर इंडियाचे विमान आयएक्स-1344 दुबईवरुन केरळला येत होते. या विमानात 174 प्रवाशांसह 6 क्रू मेंबर्स होते. या अपघातात पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भयंकर होता की, विमानाचे दोन तुकडे झाले. अपघातात जवळपास 40 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. पावसामुळे विमान स्लिप झाल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान तर आज १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी

0

मुंबई, दि.७: राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५  हजार ५८२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १०,४८३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-८६२ (४५), ठाणे- १७५ (५), ठाणे मनपा-१८८ (१०),नवी मुंबई मनपा-३८५ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२५२ (६),उल्हासनगर मनपा-२० (२), भिवंडी निजामपूर मनपा-९ (४), मीरा भाईंदर मनपा-७३ (३),पालघर-६७, वसई-विरार मनपा-१३५ (१४), रायगड-२५६ (९), पनवेल मनपा-१७५ (१९), नाशिक-२११(२),नाशिक मनपा-५२७ (२३), मालेगाव मनपा-४३(१),अहमदनगर-२८१ (४),अहमदनगर मनपा-१८५ (१), धुळे-८ (२), धुळे मनपा-११६ (१), जळगाव-४१७ (५), जळगाव मनपा-४ (१), नंदूरबार-१३, पुणे- ५५१ (१७), पुणे मनपा-१३९५ (३५), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१८), सोलापूर-२५२ (५), सोलापूर मनपा-५१ (२), सातारा-२२० (६), कोल्हापूर-१७८ (६), कोल्हापूर मनपा-९२, सांगली-७१ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१२१ (२), सिंधुदूर्ग-१५, रत्नागिरी-१३ (३), औरंगाबाद-२५१ (२), औरंगाबाद मनपा-१९६ (२), जालना-६१, हिंगोली-६०, परभणी-२८, परभणी मनपा-३४, लातूर-१३० (२), लातूर मनपा-४२ (३), उस्मानाबाद-१६३ (१), बीड-१४२ (२), नांदेड-१२८ (५), नांदेड मनपा-७० (१),अकोला-४४, अकोला मनपा-२७ (१), अमरावती-३२ (१), अमरावती मनपा-५१ (४), यवतमाळ-३४, बुलढाणा-४४ (३), वाशिम-५९ (१), नागपूर-१७१ (४), नागपूर मनपा-३४६ (११), वर्धा-३, भंडारा- १३, गोंदिया-८, चंद्रपूर-३७, चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-२१, इतर राज्य १३(१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २५ लाख ६९ हजार ६४५ नमुन्यांपैकी ४ लाख ९० हजार २६२ नमुने पॉझिटिव्ह (१९.०७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८२ हजार ७५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार २६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४९ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील           

मुंबई: बाधित  रुग्ण- (१,२१,०१२) बरे झालेले रुग्ण- (९३,८९८), मृत्यू- (६६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१२४)

ठाणे: बाधित  रुग्ण- (१,०१,९७७), बरे झालेले रुग्ण- (७४,५७९), मृत्यू (२९१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४,४८४)

पालघर: बाधित  रुग्ण- (१७,५८०), बरे झालेले रुग्ण- (११,१६३), मृत्यू- (४००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०१७)

रायगड: बाधित  रुग्ण- (१९,३०६), बरे झालेले रुग्ण-(१४,८१३), मृत्यू- (४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००५)

रत्नागिरी: बाधित  रुग्ण- (२००८), बरे झालेले रुग्ण- (१३७१), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५)

सिंधुदुर्ग: बाधित  रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (३३७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४)

पुणे: बाधित  रुग्ण- (१,०७,२०४), बरे झालेले रुग्ण- (६३,१९४), मृत्यू- (२५६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,४४४)

सातारा:  बाधित  रुग्ण- (५२३४), बरे झालेले रुग्ण- (३१०३), मृत्यू- (१६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६७)

सांगली: बाधित  रुग्ण- (४१२६), बरे झालेले रुग्ण- (१५८०), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४३७)

कोल्हापूर: बाधित  रुग्ण- (७९२१), बरे झालेले रुग्ण- (२९३०), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९५)

सोलापूर: बाधित  रुग्ण- (१०,८६८), बरे झालेले रुग्ण- (५९५३), मृत्यू- (५६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५१)

नाशिक: बाधित  रुग्ण- (१८,८३५), बरे झालेले रुग्ण- (११,८९७), मृत्यू- (५४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९१)

अहमदनगर: बाधित  रुग्ण- (७९०६), बरे झालेले रुग्ण- (४२६६), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५४९)

जळगाव: बाधित  रुग्ण- (१३,४५२), बरे झालेले रुग्ण- (९१६४), मृत्यू- (५८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७०७)

नंदूरबार: बाधित  रुग्ण- (७४०), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

धुळे: बाधित  रुग्ण- (३५९४), बरे झालेले रुग्ण- (२२७२), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०२)

औरंगाबाद: बाधित  रुग्ण- (१५,६६५), बरे झालेले रुग्ण- (१०,३२५), मृत्यू- (५३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८०६)

जालना: बाधित  रुग्ण-(२१४८), बरे झालेले रुग्ण- (१५९४), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५)

बीड: बाधित  रुग्ण- (१३२९), बरे झालेले रुग्ण- (४०२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (९००)

लातूर: बाधित  रुग्ण- (३१३४), बरे झालेले रुग्ण- (१४२०), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५८१)

परभणी: बाधित  रुग्ण- (८७९), बरे झालेले रुग्ण- (४३१), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१६)

हिंगोली: बाधित  रुग्ण- (७४९), बरे झालेले रुग्ण- (४८६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४८)

नांदेड: बाधित  रुग्ण- (२८१६), बरे झालेले रुग्ण (९५), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४९)

उस्मानाबाद: बाधित  रुग्ण- (१८९२), बरे झालेले रुग्ण- (७४५), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८७)

अमरावती: बाधित  रुग्ण- (२६४०), बरे झालेले रुग्ण- (१८०६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५२)

अकोला: बाधित  रुग्ण- (२८८६), बरे झालेले रुग्ण- (२३२४), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३)

वाशिम: बाधित  रुग्ण- (८३९), बरे झालेले रुग्ण- (५२५), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)

बुलढाणा: बाधित  रुग्ण- (१७०७), बरे झालेले रुग्ण- (९६२), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९६)

यवतमाळ: बाधित  रुग्ण- (१२८६), बरे झालेले रुग्ण- (७७०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)

नागपूर: बाधित  रुग्ण- (७४६७), बरे झालेले रुग्ण- (२२५९), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०२३)

वर्धा: बाधित  रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)

भंडारा: बाधित  रुग्ण- (३३१), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०३)

गोंदिया: बाधित  रुग्ण- (४७५), बरे झालेले रुग्ण- (२५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१)

चंद्रपूर:  बाधित  रुग्ण- (६८८), बरे झालेले रुग्ण- (३३५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२)

गडचिरोली: बाधित  रुग्ण- (३८१), बरे झालेले रुग्ण- (२६३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७)

इतर राज्ये: बाधित  रुग्ण- (४८४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३०)

एकूण: बाधित  रुग्ण-(४,९०,२६२) बरे झालेले रुग्ण-(३,२७,२८१),मृत्यू- (१७,०९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४५,५८२)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैक़ी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू रायगड जिल्हा-१४, ठाणे- ४, नाशिक -४, पालघर-३, पुणे ३, जळगाव- १, कोल्हापूर -१ आणि मुंबई – १ असे आहेत.पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

खासगी रुग्णालयांकडून होणारी अवाजवी शुल्क आकारणी रोखण्यासाठी राज्यात भरारी पथके नेमण्याचे निर्देश

0

मुंबई, दि.७ : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व निर्देशांची अंमलबजावणीसाठी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोरोनाच्या रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय २३ मे रोजी घेण्यात आला असून ३० जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दर निश्चित केले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणे व त्याच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र अद्यापही, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्याच्या जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
भरारी पथकांचे कार्य
१) वेळोवेळी जाहीर केलेल्या शासन निर्णयाचे खासगी रुग्णालयांकडून पालन होत आहे की नाही याची खातरजमा या भरारी पथकांमार्फत करण्यात येईल.
२) खासगी रुग्णालयांमध्ये अधिसूचना व अधिसूचित दर दर्शनी भागावर लावले की नाही याची पाहणी केली जाईल.
३) खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी बिले अंतिम करण्यापूर्वी त्याच्या तपासणीसाठी यंत्रणा नेमावी.
४) आकारलेले दर, खासगी वाहने, रुग्णवाहिका यांच्याकडून आकारले जाणारे दर योग्य आहेत की नाही याची तपासणी करावी.
५) महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे यासर्व बाबींची तपासणी करावी.

आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचा ८७७ रुपयांमध्ये २ लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा महानगरपालिकेने काढावा – आबा बागुल

0

संपूर्ण भारतात २३ मार्च रोजी कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाउन करण्यात आले होते. त्यास देशातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत आहे. देशाच्या अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी जुलै महिन्यापासून अनलॉक करण्यास सुरुवात करण्यात आली असून नागरिकांची वर्दळ रस्त्यावर वाढलेली दिसत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात दिवसाला हजार रुग्ण सापडत असून आज रोजी पुण्यात १००२६४ रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याबाबत प्रशासनाकडून माहिती मिळत आहे. 
पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहराची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज आहे.शहरात नागरिकांना उपचार देण्यासाठी सार्वजनिक हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात नसून,  पुणे महानगरपालिका देत असलेल्या रेटने खासगी हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास तयार नाही. तसेच रोजगार गेल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना कोरोनावरील उपचार घेण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे काँग्रेस पक्षाचे गटनेते, जेष्ठ नगरसेवक  आबा बागुल म्हणाले.  
आबा बागुल म्हणाले की , आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी  आम्ही अनेक इन्शुरन्स कंपन्यांना कोरोना आरोग्य विम्याबाबत माहिती घेतली.त्यापैकी  ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने  सर्वात कमी प्रीमियममध्ये कोरोना कवच विमा दिला असून यामध्ये  ४० वर्षापर्यंत वय असणाऱ्या प्रती व्यक्तीस  वनटाईम  ८७७ रुपये व ४१ ते ६० वर्षापर्यंत वय असणाऱ्या  प्रती व्यक्तीसाठी   वनटाईम ११६८ रुपये वनटाईम प्रीमियम भरून  २ लाख रुपयांचा कोरोना कवच आरोग्य विमा  साडे नऊ महिन्यांसाठी काढण्यात येतो.हा आरोग्य विमा काढल्यास  कोरोना झालेल्या व्यक्तीस भारतामध्ये कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा मिळून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील. यामाध्यमातून कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होतील. कोणत्याही नागरिकाचा उपचाराविना जीव जाणार नाही. 
यासाठी पुणे महानगरपालिकेने इतर सुविधांवर जास्त खर्च न करता आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचा कोरोना कवच आरोग्य विमा काढावा जेणे करून कोरोना झाल्यावर उपचार घेण्यास त्यांना आर्थिक अडचणी येणार नाहीत.त्यामुळे कोणाचाही उपचाराविना नाहक मृत्यू होणार नाही. आपण अल्पदरामध्ये  आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना हा कोरोना कवच देऊ शकतो. त्यासाठी आपण  ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींन बरोबर बैठक घेऊन लवकरात लवकर पावले उचलावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी केली.  

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान

0

2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन, क्वॉरंटाईन सारखे नववीन शब्द सामान्य माणसाच्या शब्दकोशात दाखल झाले. महाराष्ट्र शासन कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. आणि त्यात यशस्वी देखील झाला आहे. महाराष्ट्राने प्लाझ्मा उपचार करण्यास सुरुवात केली अहे. आपण प्रथमच ह्या प्लाझ्मा उपचाराचे नाव ऐकले असणार पण हा उपचार काही नवीन नाही. याचा शोध 130 वर्षां पूर्वी जर्मनीच्या फिजियोलॉजिस्ट एमिलवॉन बेह्रिंग यांनी लावला होता. यासाठी त्यांना नोबल पारितोषिकही देण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते.

संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे.  यापूर्वी सार्स (2003) आणि मर्स (2012) मध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले गेले होते. कोरोना विषाणू देखील या प्रकारात येतात. 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्याकाळात पसरलेल्या स्पॅनिश फ्लूपासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता.  इबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरीता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोलाने थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने प्लाझ्मा थेरपीबाबत मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. कोरोना विषाणूवर अद्याप लस निघालेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत प्लाझ्मा थेरपी हे एक वरदानच ठरु शकेल.

महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तसेच जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रात 23 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालयात या थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु करण्यात आली. या केंद्रांवर दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सर्व रूग्णांसाठी संपूर्ण प्लाझ्मा थेरपी उपचार मोफत आहे. गंभीर रुग्णांना चांगले करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रथमच उपयोग होतो आहे. राज्याने एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. या नंतर हा प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते. तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज मुक्त होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. जे आधी कोरोनाशी लढलेले असतात. हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो. डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररित्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात. जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्लाझ्मा वेळेत दिल्याने 10 पैकी 9 रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत.

प्लाझ्मा दानसाठी जनतेने पुढे येणे आवश्यक आहे.

प्लाझ्मा देण्यापूर्वी रुग्ण संपूर्णपणे कोरोनामुक्त झाल्यानंतर 14-28 दिवसांपर्यंत प्रतिक्षा करणे आवश्यक आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोरोनामुक्त व्यक्तीला ताप, श्वास घेण्यास कोणतीही अडचण येत नाही. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य आहे म्हणजेच 95 टक्के ते 100 टक्के आहे. एकूणच त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले आहे. इतर काही संक्रमण किंवा संसर्गजन्य रोगाची बाधा झालेली नाही याची खात्री झाल्यानंतरच प्लाझ्मादान करण्यास ती व्यक्ती सक्षम असते.

प्लाझ्मा कसे संकलित केले जाते?

प्लाझ्माफेरेसिस नावाच्या प्रक्रियेद्वारे रक्तातील प्लाझ्मा गोळा केला जातो.  या प्रक्रियेस सुमारे 45 मिनीटे वेळ लागतो.  या प्रक्रियेदरम्यान, रक्त काढले जाते आणि प्लाझ्मा वेगळे केले जातात. संकलित केले जाण्यासाठी प्लाझ्माची सामान्य मात्रा 300 मिली ते 600 मिलीमीटर दरम्यान असते. एकदा काढलेला प्लाझ्मा 10 डिग्री सेल्सिअस तापमानात थंड वातावरणात ठेवला जातो. प्लाझ्मा काढण्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत संग्रहित केला जाऊ शकतो.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दि.29 जून 2020 रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एखादा पूर्णपणे बरा झालेल्या रुग्णाने www.plasmayoddha.in या संकेतस्थळावर आपली नोंद करून प्लाझ्मादान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री महोदय यांनी जनतेला केले आहे. यामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा प्रथमच उपयोग होत आहे. जगातली ही सर्वात मोठी सुविधा महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्लाझ्मा दान करून एक नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर प्लाझ्मा दान महत्त्वाचे ठरेल. आवश्यक ती काळजी आणि वेळीच उपचारामुळे कोरोना अटकाव सहज शक्य आहे.

– प्रविण डोंगरदिवे

माहिती सहाय्यक, विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई