Home Blog Page 2488

…तर पुण्यातील परिस्थिती सुधारेल – आयुक्त विक्रम कुमारांकडून कोरोना प्रकरणी दिलासा (व्हिडीओ)

0

पुणे : कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून घरी जाण्याची संख्या वाढत आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने आपण या संकटावर मात करुच. अनेक रुग्ण घरी विलिगीकरण करण्याचा पर्याय देखील निवडत आहेत. त्यामुळे त्यांची योग्य काळजी देखील घेतली जात आहे. जेवढी कोविड केअर सेंटर रिकामी होतील, तेवढे आपण यशस्वी होऊ. पुढील सात दिवसात कोरोना रुग्णांचा दर कमी झाल्यास कोरोनाचा दर कमी झाला असे म्हणता येईल, असे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा दहिहंडी उत्सव रद्द करुन पुणे महापालिकेला २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे देण्यात आली. बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ झालेल्या कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष व ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने, उपाध्यक्ष सुनील रासने, माणिक चव्हाण, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, सचिन आखाडे, अक्षय गोडसे, यतिश रासने, तुषार रायकर आदी उपस्थित होते. सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उपकरणे आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली.

विक्रम कुमार म्हणाले, पुण्यामध्ये आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येक एक जंबो हॉस्पिटल साकारण्यात येत आहे. सुमारे ८०० बेडची ही रुग्णालये असणार आहेत. भविष्यात जंबो हॉस्पिटलची गरज पडली नाही, तर चांगलेच आहे. मात्र, त्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आजमितीस कोरोनामुळे होणारा मृत्युदर हा २.५ इतका आहे, तो १ च्या खाली येणे गरजेचे आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाने गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाबाबत घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णालयांना मंडळाने दिलेले २ आॅक्सिजन कॉन्संटेÑटर उपकरणे अत्यंत उपयुक्त आहेत.

प्रकाश चव्हाण म्हणाले, सध्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरागत साजरा होणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे सुवर्णयुग तरुण मंडळ दहीहंडी उत्सव रद्द करून उत्सवावर खर्च होणा-या रकमेतून सामाजिक बांधिलकी जपत पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयास कायमस्वरूपी उपयोगी पडेल असे दोन आॅक्सिजन कॉन्संट्रेटर उपकरण दिले आहेत. ही मदत नसून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 475

0

पुणे विभागातील 98 हजार 618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 42 हजार 779 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.11 :- पुणे विभागातील 98 हजार 618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 779 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 475 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 10 हजार 87 रुग्णांपैकी 82 हजार 432 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 145 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.88 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 765 रुग्णांपैकी 2 हजार 753 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 832 आहे. कोरोनाबाधित एकूण 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 324 रुग्णांपैकी 7 हजार 268 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 494 आहे. कोरोनाबाधित एकूण 562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 776 रुग्णांपैकी 1 हजार 562 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 827 रुग्णांपैकी 4 हजार 603 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 253 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 806 , सातारा जिल्ह्यात 115, सोलापूर जिल्ह्यात 399, सांगली जिल्ह्यात 271 तर कोल्हापूर जिल्ह्यात 662 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 17 हजार 463 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 42 हजार 779 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 10 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


ज्या मंडळांना मंदिरेच नाहीत त्यांना मंडप टाकू द्या – आ. चंद्रकांत दादा

0

पुणे- शहरातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी आणि पोलिसांकडून गणेश मंडळांना यंदा  मंदिरांतच साजरा करण्याचे आवाहन केले जात असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र ज्या मंडळांकडे मंदिरच नाही अशा मंडळांचा प्रश्न उपस्थित करीत त्यांना मंडप घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. शहरातील अनेक मानाची मंडळे परंपरा मोडून मंडपाऐवजी मंदिरातच उत्सव साजरा करण्यासाठी तयारी करत असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेमुळे पुन्हा या विषयावर वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे महापौरांनी घरच्या घरी गणपती विसर्जन करावे असे घरगुती गणपती स्थापना करणाऱ्यांना केलेलं आवाहन आणि त्यावर कॉंग्रेसचे आबा बागुल यांनी उपस्थित केलेली विधाने वादाची ठरत असताना यंदा गणेशोत्सवाच्या काळात तमाम पुणेकर आणि कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर मात्र घालावाच लागणार आहे हे स्पष्ट आहे.

शहरातील करोनाची साथ अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करतानाच रस्त्यावर मंडप टाकण्याऐवजी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंदिरांमध्येच प्राणप्रतिष्ठा करण्याचा सल्ला महापालिकेचे पदाधिकारी आणि पोलिसांनी दिला आहे. शहरातील बहुतेक मानाच्या मंडळांमध्ये त्यावरून एकमत असल्याचे चित्र दिसून येत असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिरे नसलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप घालण्याची परवानगी देण्याची विनंती पोलिस आयुक्तांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे. सरकारने निश्चित केलेल्या सर्व नियमांसह मंडप घालण्याची परवानगी दिली जावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

गेल्या पाच महिन्यांमध्ये प्रत्येक धर्माच्या सण-उत्सवाच्या वेळी प्रसंगानुरूप मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सव एक-दोन दिवस नाही, तर दहा दिवसांचा असतो आणि तो सामूहिक स्वरूपात साजरा केला जातो. स्वतःचे गणेश मंदिर उपलब्ध असल्यास तेथेच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. परंतु, शहरातील अनेक मंडळांकडे स्वतःची जागा अथवा मंदिर नसल्याने अशा मोजक्या मंडळांना मंडप घालण्याची परवानगी देऊन त्यांच्या भावनांचा आदर केला जावा, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाइट हाऊस बाहेर गोळीबार-परिषद गुंडाळली

0

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाला. त्यामुळे ट्रम्प यांना पत्रकार परिषद अर्ध्यावरच गुंडाळावी लागली. गोळीबार होताच सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. ट्रम्पही सुरक्षित असल्याचं व्हाइट हाऊसमधून सांगण्यात आलं.  
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील करोना संकटाची माहिती देण्यासाठी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाला. अचानक गोळ्यांचा आवाज येऊ लागल्याने ट्रम्प यांनी ताबडतोब पत्रकार परिषद थांबवली.दरम्यान, तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वर्ष अखेरपर्यंत अमेरिकेकडे करोनाची लस असेल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. आतापर्यंत ६ कोटी ५० लाख लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. एखाद्या देशाच्या लोकसंख्ये एवढा हा आकडा आहे. तर १ कोटी १० लाख टेस्ट भारतात झाल्या असून करोना टेस्ट करण्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, असंही त्यांनी सांगितलं. 
सुरक्षा अधिकाऱ्यांनीही त्यांना काही वेळासाठी पोडियमवरून उतरायला सांगितलं गेलं. तसेच यूएस सीक्रेट सर्व्हिस या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गोळीबार करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तिला गोळी घालून जखमी करण्यात या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या जखमी व्यक्तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्वत: ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाल्याचं वृत्त दिलं आहे. यूएस सीक्रेट सर्व्हिसनेही गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  

‘घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन घरच्या घरीच करावे’ -महापौर

0
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुणेकरांना आवाहन
  • दरवर्षी पाच लाख मूर्तींचे विसर्जन होते विसर्जन हौदात
  • सोडियम बाय कार्बोनेट क्षेत्रीय कार्यालयात उपलब्ध केले जाणार : महापौर मोहोळ

पुणे -‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना सर्व घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जनदेखील नागरिकांनी घरच्या घरी करावे’, असे आवाहन करत ‘घरगुती विसर्जनासाठी सोडियम बाय कार्बोनेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून सार्वजनिक घाट आणि विसर्जन हौदाची सुविधा मनपाकडून केली जाणार नाही’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

कोरोशाची लढा देताना गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला असून याबाबत महापालिका, पोलीस आणि मंडळांचे एकमत झालेले आहे. दरवर्षी जवळपास पाच लाख गणेश मूर्तींचे विसर्जन हौदात होत असते. एका गणेशमूर्तीसोबत कमी कमी चार भाविक सहभागी झाले तरी ही संख्या वीस लाखांपर्यंत जाऊ शकते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्याही लक्षात घेता महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘संवेदनशील आणि समाजभान असणाऱ्या माझ्या पुणेकरांना आवाहन आहे, की यंदा घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरातच करण्यात यावे, शिवाय घरगुती गणेशमूर्तींची उंची २ फुटांपर्यंत असावी. गणेशोत्सव विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी निर्माल्य आणि मूर्ती अवशेष मनपाकडून घेऊन जाण्याची व्यवस्था केली जाणार आहे’.

‘गणेशमूर्तीची खरेदी मंडळांनी आणि नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करावी. कारण यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या जाणार नाहीत. गणेशमूर्ती विक्री परवानग्या क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर दिली जाईल. अशा परवानग्या मनपाच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्याचे नियोजन केले जात आहे. उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी मिळणार नाही. अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायास पूर्णपणे प्रतिबंध केला जाईल’, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

उत्सव काळात येथे करा तक्रार…

http://complaint.punecorporation.org
टोल फ्री नंबर- 1800 103 0222,
सर्व महा. सहा. आयुक्त कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक
PMC Care Whatsapp NO-9689900002
मुख्य कार्यालय संपर्क क्र. : 020-25501392
feedback@punecorporation.org
encroachment1@punecorporation.org

‘सरकार आता तरी जागे होईल का?’; वाढीव वीज बिलावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारला सवाल

0

लॉकडाऊनदरम्यान घरगुती वीजेचे बिल तब्बल 40 हजार रुपये आल्याने नागपुरात लीलाधर गायधने यांनी जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावरुन आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन सरकारवर निशाना साधला आहे.

ट्विटरवर फडणवीसांनी लिहीले की, ‘सामान्यांपासून ते थोरामोठांपर्यंत..! वीजबिलाच्या शॉकमधून कुणीही सुटले नाही. आंदोलने झाली, सर्वसामान्यांनी कोरोनाचा धोका पत्करून रांगा लावल्या. पण, त्यांना न्याय मिळाला नाही. लीलाधर गायधने यांनी जाळून स्वत:चे जीवन संपविले. सरकार आता तरी जागे होईल का?’ असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय, ‘कोरोनाच्या काळात समाजातील अनेक घटक आर्थिक संकटात असताना एकाही घटकासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मदत करू शकत नसाल, तर किमान त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड तरी लादू नका. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, सामान्य नागरिकांना या वाढीव वीजबिलांतून तात्काळ दिलासा द्यावा !’, अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.

अंदमान व निकोबारमध्ये आता ‘सुपर डिजिटल हायवे’; मराठी अधिकारी बुरडे यांची कर्तबगारी

0

नवी दिल्ली, १० : अंदमान व निकोबार बेटांना आजपासून मिळणाऱ्या जलद संचार सेवांमुळे स्थानिकांना नव्या संधी उपलब्ध होतील तसेच सबमरीन ऑप्टीकल फायबर केबलमुळे आता सुपर डिजिटल हायवे तयार झाला असल्याची प्रतिक्रिया युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) चे संचालक विलास बुरडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला दिली.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागांतर्गत युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) विभाग येतो. या विभागाच्या देखरेखीतच चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले, असल्याचा आनंद श्री.बुरडे यांनी व्यक्त केला.

विलास बुरडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री.बुरडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या भेटी दरम्यान त्यांनी सदर प्रकल्पाविषयीची माहिती दिली. वर्ष २०१६ मध्ये श्री.बुरडे यांनी  युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) मध्ये संचालक पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्याकडे अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप बेटांमधील दूरसंचार सेवा अधिक सुलभ करण्यासबंधीची जबाबदारी आहे.

प्रथमत:च अशा प्रकाराची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्राच्या खाली टाकण्यात आली असल्याचे श्री. बुरडे यांनी सांगितले. ही सबमरीन केबल चेन्नई ते अंदमान व निकोबार बेटांदरम्यान आहे. ही सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल २३०० किलो मीटर लांबीची आहे. यासाठी १२२४ कोटी रूपयांचा खर्च  आला आहे.  या केबलमुळे अंदमान निकोबार बेटांच्या स्थानिकांसाठी ‘सुपर डिजिटल हायवे’ तयार झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ३० डिसेंबर २०१८ रोजी पोर्ट ब्लेअरमध्ये केली. तेव्हापासून प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यापासून  ते पूर्णत्वास येईपर्यंतची सर्व जबाबदारी युएसओएफ चे संचालक म्हणून श्री. बुरडे यांनी पार पाडली.

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्विप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्विपांना जोडली जाणार आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर दरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २ x २०० जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २ x १०० जीबीपीएस असणार आहे. यामुळे टेलिकॉम आणि ब्रॉडबँड सुविधेला गती मिळेल.

टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल, रोजगार वाढतील, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानिक राहनीमानाचा दर्जा सुधारेल. चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारित बँडविड्थचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी करतील.

श्री.विलास बुरडे यांच्या विषयी

विलास बुरडे वर्ष १९९५ मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत रूजु झालेत. त्यांनी मुंबई, ठाणे, नाशिक आणि सुरत येथे विविध पदांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच दूरसंचार खात्याला मोठ्या प्रमाणात मलसूलही गोळा करून दिला. वर्ष २०१३ ला ते दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (SSC) प्रादेशिक संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. त्यांच्या कार्यकाळात जवळपास ३०००० उमेदवार केंद्र शासनाच्या सेवेत रूजू झाले. श्री.बुरडे दिल्लीतील विविध मराठी संस्थांमध्येही सक्रिय असतात.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘द पॅक’ टीमला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे एक लाखाचे प्रथम पारितोषिक

0

पुणे : दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ‘द पॅक’ टीमने स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे पारितोषिक मिळवले आहे. ‘द पॅक’ने ‘ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण’ यावर ‘यूरेका’ नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. अंतिम फेरीत २० टीम पोहोचल्या होत्या. त्यात ‘एआयटी’ने हैदराबादच्या एमएलआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला मात दिली. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या वतीने १ ते ३ ऑगस्ट २०२० या कालावधीत या हॅकेथॉनचे आयोजन केले होते.
या हॅकेथॉनमध्ये सॉफ्टवेअर प्रकारात २५६ खासगी व सरकारी संस्थांमधून अनेक संघ सहभागी झाले होते. साधारणपणे एक लाख विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता. विविध समस्यांवर उपाय करण्याचे सॉफ्टवेअर बनविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे होते. ‘एआयटी’च्या रिशव शर्माच्या नेतृत्वात अक्षय शर्मा, सत्य प्रकाश, हर्ष चौहान, दीपशिखा त्रिपाठी, शुवम कुमार यांच्या ‘द पॅक’ टीमने हे ‘युरेका’ सॉफ्टवेअर बनवले. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि विविध ठिकाणाहून होणाऱ्या व्हिडीओ व्याख्यानाचा मोठा खर्च यामुळे ग्रामीण व आर्थिक मागास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी एक अप्लिकेशन तयार केले आहे. कमी इंटरनेट बँडविड्थमध्येही याचा वापर करता येतो. स्वयंचलित ऑनलाईन शिक्षणाच्या दिशेने हे पहिले पाऊल असणार आहे. तसेच ‘युरेका’ अप्लिकेशनमधील सध्याच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरील सर्व सुविधा एकत्रितरित्या उपलब्ध असणार आहेत. ‘द पॅक’सह ‘एआयटी’च्या ‘हेक्साडा’, ‘माधवाज’ आणि लोरा एसवायएनसी या आणखी तीन संघानी अंतिम फेरीत स्थान मिळवले.या यशाबद्दल ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट (निवृत्त) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भट म्हणाले, “स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे विजेतेपद आणि एक लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) ‘पॅक’ टीमची कामगिरी अभिमानास्पद आहे. केवळ भारतातच नाही, तर जगभरात ही स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मानाची समजली जाते. विजेतेपदासह ‘एआयटी’च्या चार टीम अंतिम फेरीत गेल्या, हेदेखील आनंददायी आहे. एका टीमला विजेता होण्यापासून थोडक्यात हुलकावणी दिली. गेल्या दोन वर्षांपासून ‘एआयटी’ विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करते आहे. २०१९ व २०२० या सलग दोन्ही वर्षी ‘केपीआयटी स्पार्कल’चे विजेतेपद, गेल्या वर्षी आयआयटी दिल्ली येथे झालेल्या ‘एनईसी हेकेथॉन’मध्ये पहिले तीनही क्रमांक ‘एआयटी’ला मिळाले. हे यश विद्यार्थ्यांचे कष्ट, त्यांच्यातील गुणवत्ता दर्शवते. त्याचबरोबर शिक्षकांचे, प्रेरकांचे आणि सिनिअर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनही महत्वाचे ठरले हे अधोरेखित होते. विविध प्रकारचे क्लब, अवांतर उपक्रम यातून विद्यार्थी घडताहेत. या अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा आम्हाला अभिमान आहे. त्यापेक्षाही आनंद आहे, तो म्हणजे समाजातील विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करताहेत. ‘ग्रामीण आणि मागास वर्गातील मुलांचे शिक्षण’ यावर ‘पॅक’ने काम केले आहे.”

आंबीलओढा रिटेनिंग वाॅल टेंडर पुन्हा वादात …(व्हिडीओ )

0

अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांना शासकीय सेवेत माघारी पाठवून त्यांची चौकशी करा –

आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलचे २० कोटी रुपयांचे काम विशिष्ट ठेकेदाराला देण्याचा घाट: अरविंद शिंदे यांचे आरोप : पहा जशीच्या तशी पत्रकार परिषद

शिंदेंच्या आरोपात तथ्य नाही – ठेकेदाराचा दावा

पुणे- भाजपच्या नेत्याच्या दबावाखाली आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलची निविदा ठेकेदार विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला मिळावी यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल हे देखिल दोषी आहेत. त्त्यांयांना माघारी पाठवून त्यांची चौकशी करावी. तसेच या निविदेला मान्यता दिल्यास त्याविरोधात राज्य शासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान शिंदे यांनी केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही असा दावा संबधित ठेकेदार पाटील यांनी ‘मायमराठी ‘ कडे केला आहे.

अरविंद शिंदे म्हणाले, की कल्व्हर्ट च्या निविदेत पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवलं, आणि अपात्र ठरलेल्या विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला पात्र ठरविण्यात आले. ही बाब उघड झाल्यानंतर निविदा रद्द करून त्याची चौकशी अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्याकडे देण्यात आली. या चौकशीमध्ये काय झाले याचा अहवाल न देताच आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलचे २० कोटी रुपयांचे कामही काम पाटील यांनाच देण्याचा घाट घातला आहे. या ठेकेदाराला सरकारी कामाचा अनुभव नाही. ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून एस्टीमेट केले जात आहे. हा ठेकेदार वापरत असलेले तंत्रज्ञान कोथरूडच्या आमदारांप्रमाणेच बाहेरून इंम्पोर्ट केले आहे. भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड भागात लागलेले फ्लेक्स याच ठेकेदाराने स्पॉन्सर केले असून यावर त्याचे ङ्गोटोही आहेत.

भाजपच्या या पदाधिकारयाने दमबाजी करून त्याच्या मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे यातून दिसून येते. एस्टीमेट कमिटीच्यावेळी हा पदाधिकारीही ठेकेदारासोबत तेथे उपस्थित होता, असा आमचा आरोप आहे. त्यादिवसाचे सीसीटीव्ह फुटेज तपासावेत, असे आव्हानही अरविंद शिंदे यांनी दिले. कोरोनाच्या गडबडीत काही अधिकारी या प्रस्तावासाठीच प्रयत्नशील होते हे अनेक अभिप्राय एकाच दिवसात दिल्यावरून दिसून येतेय. कोरोनाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा अधिकार्‍यांमुळेच कोरोनाचे संकट वाढले आहे. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही त्यांनी या ठेकेदाराला अनुकूल अशीच भूमिका घेतली आहे. तेच यामध्ये दोषी आहेत. शासनाने या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करणार असून लाच लुचपत विभागाकडे ही तक्रार करणार असल्याचे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंदांच्या वैज्ञानिक दृष्टीचा पश्चिमात्य देशांचा प्रभाव- जयंत सहस्रबुद्धे

0


पुणे : डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धान्तानंतर पाश्चिमात्य देशात धर्म की अाधुनिक विज्ञान असा संघर्ष निर्माण झाला होता. त्या काळात स्वामी विवेकानंद यांनी कोलंबिया वर्ल्ड एक्सपो मध्ये भारतीय धर्म व नव विज्ञान कसे एकत्र आहेत याचे तत्वज्ञान मांडले. त्यामुळे पाश्चिमात्य देशांत निर्माण झालेली पोकळी भरून निघाल्याने स्वामी विवेकानंद यांच्या वैज्ञानिक दृष्टीचा
पश्चिमात्य देशांचा प्रभाव आजही प्रभाव दिसून येतो, असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे संघटन मंत्री जयंत सहस्त्रबुद्धे यांनी केले

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) संस्थापक दिनानिमित्त आयोजित ‘स्वामी विवेकानंद आणि विज्ञान’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये जयंत सहस्त्रबुद्धे बोलत होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले कार्यवाह धनंजय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
जयंत सहस्रबुद्धे म्हणाले, “पश्चिमी देशांमध्ये १८व्या शतकात विश्वाच्या निर्मितीत धर्म सत्य की विज्ञान यावर चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे विज्ञान हेच श्रेष्ठ मानले जावू लागले. यामुळे पाश्चिमात्य देशात संघर्ष सुरू झालेला असताना जागतीक पातळीवर धर्मपरिषद घेण्याचा निर्णय झाला. या कोलंबिया वर्ल्ड एक्सपो या परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद यांना निमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत तत्वज्ञानावर आधारीत विवेकानंदांचा अनेक भाषणे झाली. एका भाषणात त्यांनी ‘ हिंदूत्वाचे तत्वज्ञान’ यावरील शोधपत्र सादर केले होते. वेद आणि आधुनिक विज्ञान एकत्र कसे आहेत याचा सिद्धांत मांडला. जसे विज्ञानाचे लक्ष एकत्व शोधणे आहे तसेच हिंदू धर्म विविधतेत एकता बघणारा आहे. आमच्या देशात हीच जीवनपद्धती आहे असे विवेकानंदांनी १८९३ मध्ये मांडले.
पाश्चिमात्य देशात धर्म व विज्ञान स्वतंत्र होते, पण विवेकानंदांनी केलेल्या मांडणी मध्ये धर्माचा विचार विज्ञानाकडे घेऊन जाणारा आहे हे मांडल्याने तेथील लोकांना नवा विचार मिळाला. त्याचा प्रत्यय अाजही येतो, असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

आपल्या देशात मागे पडल्याची खंत

पाश्चिमात्य देशांत हिंदू तत्त्वज्ञान स्वीकारले जात असताना आपला देश आधुनिक विज्ञानात मागे पडला आहे, या विज्ञानाची गरज आहे असे विवेकानंदांना वाटत होते. अमेरिकेला जाताना विवेकानंद आणि जमशेटजी टाटा यांची भेट झाली होती, त्या भेटीतूनच बेंगलोर येथील इंडीयन इंस्टिट्यूट आॅफ सायन्स ही संस्था उभा राहिली. यासाठी विवेकानंद यांची शिष्य भगिनी निवेदिता आणि जमशेटजी टाटा यांचे पुत्र दोराबजी टाटा यांनी पुढाकार घेतला होता.” असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

१७ ऑगस्टपासून लॉकडाऊन मागे घेणार

0

मुंबई, दि.10:  कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिली.

जिल्ह्यातील लॉकडाऊन संदर्भात बोलताना श्री. देशमुख म्हणाले, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाउन हा प्रमुख्याने कोविड-19 नियंत्रणासाठी आरोग्य सेवा त्याचप्रमाणे वैद्यकीय  क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला होता याचे  चांगले परिणाम दिसून येत आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजेच येत्या सतरा तारखेपासून टेस्ट टेस्ट आणि ट्रीट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोविड-19 ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीशी सामना करताना शासन मागे राहिले नाही. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हात स्वच्छ धुणे तोंडावर मास्क लावणे त्याचप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आपणाला यापुढेही स्वीकाराव्या लागणार आहेत.

लातूर जिल्ह्यात कोविड-19 ला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा आता करणार आहेत.  जिल्ह्यात तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.

कोविड -19 नियंत्रणासाठी 1 लाख अँटिजन टेस्ट केल्या जातील यासाठी खाजगी लॅबचे ही सहकार्य घेतले जाईल. कोणत्याही व्यक्तीला ही  चाचणी करून घ्यावयाची असल्यास ती सहजपणे करून घेता येईल. कोविड-19 उपचारासाठी आता लातूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी ही पुढाकार घेतला आहे याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कोविड -19 चा प्रादुर्भाव इतक्यात संपणार नाही कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे हे लक्षात घेतले तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी क

गणेश विसर्जनाबाबत महापौरांचा निर्णय एकतर्फी (व्हिडीओ)

0

पुण्यातील श्रींच्या विसर्जनासाठी ठिकठिकाणी हौद आवश्यक

पुणे- पुण्यातील घरगुती श्रीं’चे विसर्जन करण्यासाठी यंदा कोठेही हौद असणार नाहीत. घरच्या घरीच श्रींचे विसर्जन करा. असा ऐतिहासिक निर्णय पुण्याच्या महापौरांनी घेतला ही दुर्दैवी बाब आहे. पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सवाची संख्या मोठी आहे. त्यापेक्षाही खूप मोठी संख्या सुमारे चार लाख पेक्षा अधिक श्रींची प्रतिष्ठापना पुण्यात घरोघरी केली जाते. त्यांचे विधिवत विसर्जन करणे देखील आवश्यक असते. हे विसर्जन मुठा नदी व कॅनॉलमध्ये केले जायचे. मात्र पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन व नदीचे व कॅनॉलचे पाणी दूषित होऊ नये. यासाठी सुमारे दहा-बारा वर्षापूर्वी जागोजागी हौद बांधून तेथे घरगुती श्रीं’चे विसर्जन करण्याची मोठी सोय केली गेली होती. या व्यवहार्य योजनेचे सर्वत्र स्वागतच केले गेले होते व त्यामुळे मोठा नदी व त्यांवरील गर्दी कमी होऊन गतवर्षी सुमारे दोन लाख घरगुती श्रींचे हौदामध्ये विसर्जन केले जाते. विसर्जनासाठी लांब जाण्याचा नागरिकांना होणारा त्रास कमी झाला होता व अपघाताचे प्रमाणही नगण्य झाले होते.

आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना श्रींच्या विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या हौदाचा वापर करता येणार नाही. हा महापौरांचा एकतर्फी निर्णय पूर्णतः अव्यवहार्य व पुणेकरांच्या त्रासात भर घालणारा आहे. शिवाय यामुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या वातावरणात सारे शहरातील गणेशभक्त नागरिकांची मुठा नदी व कॅनॉलवर विसर्जनासाठी मोठी गर्दी होईल. त्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होईल. यासाठी महापौरांनी त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करून पक्ष नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय रद्द करावा.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गतवर्षी बांधलेले 50 पेक्षा अधिक विसर्जन हौद उपलब्ध असून हौदामधील माती काढून,रंगरंगोटी करून हे हौद सर्वत्र उपलब्ध करावेत व आवश्यकतेनुसार ते वाढवता येणे देखील शक्य आहे.हे हौद श्रींच्या विसर्जनासाठी उपलब्ध करण्यासाठी अजूनही वेळ हाती आहे. अशा ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्यासाठी आवश्यक त्या खुणा करून सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था देखील केली जाऊ शकेल.नदीपात्र व कॅनॉल येथे होणारी संभाव्य गर्दी व चेंगराचेंगरी,कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता याबाबी लक्षात घेऊन महापौरांनी सर्व पक्ष नेत्यांची बैठक घेऊन आता एकतर्फी घेतलेला निर्णय रद्द करावा व पूर्ववत हौदात विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी मागणी विरोधीपक्ष नेत्या मा.दीपाली धुमाळ,गटनेते शिवसेना पृथ्वीराज सुतार व आबा बागुल यांनी केली.
घरामध्ये श्रींचे विसर्जन करताना नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल. विसर्जनासाठी हौद उपलब्ध केल्याने पुणेकरांना श्रींचे विसर्जन सुखरपणे करता येईल व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत होईल.यासाठी पुण्याच्या 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये गतवर्षी असलेल्या हौदामध्ये श्रींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी हौद उपलब्ध करावे असे आबा बागुल शेवटी म्हणाले.

नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने मुख्य मंदिरामध्येच होणार यंदा ‘दगडूशेठ’ चा गणेशोत्सव –

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; आॅनलाईन दर्शन सुविधांवर देणार भर 

पुणे : दरवर्षी होणा-या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करुन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्त व नागरिकांमध्ये याचा प्रार्दुभाव वाढू नये, याकरीता लोकभावना जपण्यासाठी मंदिरात उत्सव होणार आहे. दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो. मात्र, गेल्या १२७ वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे. पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या आॅनलाईन दर्शन सुविधेवर व आॅनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
पत्रकार परिषदेला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख हेमंत रासने, माणिक चव्हाण, कुमार बांबुरे, राजाभाऊ सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी मंदिरामध्येच उत्सवात गणपती विराजमान होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्यसेवा देण्यात येणार आहेत. मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे. मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरुनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नाहीत आणि प्रसाद दिला जाणार नाही. 
अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होणारी अलोट गर्दी पाहता यंदा मंदिरामध्येच श्रींची मूर्ती ठेऊन धार्मिक विधी करण्याचा निर्णय नागरिक व भक्तांच्या आरोग्यहिताच्या दृष्टीने ट्रस्टने घेतला आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षक असलेले सामुहिक महिला अथर्वशिर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्वशिर्ष पठण यांसह इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. उत्सवकाळात अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत. भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व दर्शनसुविधा आॅनलाईन
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने आॅनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अर्थवशिर्ष याविषयावर प.पू.स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण दिनांक ११ ते ३१ आॅगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील दिनांक १८ आॅगस्ट पासून सकाळी आॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती आॅनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.
श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App  या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात दर्शनासाठी येणा-यांसाठी एलईडी स्क्रिनची व्यवस्था व सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच
श्रीं चे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिन ची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये व  परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.
—————————-
भाविकांची मोठी गर्दी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होत असते. त्यामुळे मंदिरातच उत्सव साजरा करण्याचा ट्रस्टने घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे सामाजिक भान ठेऊन व समाजस्वाथ्याच्या विचार करुन ट्रस्टने दिलासादायक निर्णय घेतला आहे. हा आदर्श निर्णय असून याचे अनुकरण केवळ राज्यात नाही तर देशात होईल, यात शंका नाही.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

दगडूशेठ गणपती ट्रस्टने मंदिरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय अभूतपूर्व व विवेकवृत्तीने घेतला आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण हलका होणार आहे. दगडूशेठ गणपती उत्सवाप्रती भाविक व कार्यकर्त्यांच्या भावना मोडणे कठिण होते. पण, यंदा उत्सवात गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आचारसंहिता आखण्याची गरज आहे. त्याची सुरुवात दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली हे अभिनंदनीय आहे.
– डॉ.रवींद्र शिसवे, पोलीस सहआयुक्त, पुणे

आयडीबीआय बँकेतर्फे बीएफएसआय विभागासाठी एनएसीएच सुविधेचे दोन प्रकार लाँच

0

आयडीबीआय बँकेने कॉर्पोरेट ग्राहकांसाठी विशेषतः बीएफएसआय विभागातील ग्राहकांसाठी एनएसीएच सुविधेचे ई- एनएसीएच आणि बी- एनएसीएच हे दोन नवे प्रकार लाँच केले आहेत. यामुळे बँकेतर्फे कॉर्पोरेट ग्राहकांना वेब बेस्ड सोल्यूशन्स पुरवले जाणार असून त्याच्या मदतीने त्यांना विशिष्ट कालावधीनंतर आणि वारंवार केले जाणारे आंतरबँक, मोठ्या रकमेचे इलेक्ट्रॉनिक व्यवहार सहजपणे करता येणार आहेत. यानिमित्ताने बँकेने आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठीच्या डिजिटल उत्पादनश्रेणीत आणखी एक उत्पादन समाविष्ट केले आहे. बँकेने नुकतेच फास्टॅग उत्पादन लाँच केले आहे, ज्यामुळे महामार्गावर संपर्कविरहीत पद्धतीने टोल भरता येतो. बँक आपल्या ग्राहकांसाठी जास्तीत जास्त डिजिटले उत्पादने लाँच करण्यासाठी आणि ग्राहकांना त्यांच्या सोयीने बँकिंग सेवांचा पूर्ण वापर करणे शक्य करण्यासाठी बांधील आहे.

लाँचप्रसंगी व्यवस्थापकीय सांचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा म्हणाले, उद्योगक्षेत्रांसाठी त्यांच्या गरजेप्रमाणे उत्पादने बनवणे आणि ग्राहक अनुभव उंचावणे ही काळाची गरज झाली आहे. ग्राहककेंद्री बँक या नात्याने आम्ही ग्राहक सेवा वितरण प्रक्रियेतील पोकळी भरून काढणे आणि अशा प्रकारची उत्पादने लाँच करून सातत्याने ग्राहक समाधानावर काम करत राहाणे महत्त्वाचे आहे.

आयडीबीआय बँक अग्रेसर बँकांपैकी एक असून 2001 मध्ये भारतात कॅश सर्व्हिस मॅनेजमेंट सर्व्हिसेसची (सीएमएस) सुरुवात करणाऱ्या काही बँकांपैकी एक आहे. बँकेकडे स्वतःचा सीएमएस व्यवहार देखरेख आणि कामकाज विभाग असून तो मुंबईतील बेलापूर येथे कार्यरत आहे. बँकेद्वारे कॉर्पोरेट ग्राहकांना नव्या युगाशी सुसंगत सीएमएस उत्पादने उपलब्ध करून दिली जातात व त्यात एपीआय पॉवर्ड डायनॅमिक व्हर्च्युअल अकाउंट्स, होस्ट-टु-होस्ट, फआस्टॅग, अक्वायरिंग सोल्यूशन्स, बल्क पेमेंट्स मोड्यूल, ई- फ्रेट आणि बीबीपीएस इत्यादींचा समावेश आहे.

आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत – पंतप्रधान

0

राज्यातील पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा

आपत्ती निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबई दिनांक १०: आपत्कालीन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणेमध्ये चांगला समन्वय असून संकटाशी मुकाबला करताना केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या सूचना आणि योजनांवर संबंधित केंद्रीय विभागाने विचार करून  निर्णय घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्रात, विशेषत: ५ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीची माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंटर स्टेट फ्लड मॅनेजमेंट सिस्टिम उपयुक्त असली तरी त्यामध्ये केंद्र शासनाचे प्रतिनिधी असावेत  अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच  नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करावी अशी मागणी केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम  या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. आज व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि सहा राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी, एनडीआरएफ आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत जाहीर करावी

निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे तर ५  ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसाने मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे राज्याला लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली.

माहूल पंपिंग स्टेशनसाठी जागा हस्तांतरित करावी

केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई महानगरपालिकेस हस्तांतरित केल्यास माहुल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येईल. हे पंपिंग स्टेशन उभे राहिल्यास हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे मोठ्या प्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य होईल असेही ते म्हणाले.

कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर द्यावा

अतिवृष्टी आणि पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. नदीकाठी पूररेषेच्या आत राहणाऱ्या मानवी वस्त्या शोधून तेथील नागरिकांना इतरत्र हलवण्याची, योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

विकासासाठी सोपे मार्ग निवडू नयेत

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा मीटरगेज मार्ग ब्रॉडगेज करताना तो व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्गातून नेल्यास जंगलाचे रक्षण तर होईलच परंतु मानवी वस्तीलाही रेल्वेसेवेचा अधिक लाभ घेता येईल हे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी  सोपे मार्ग निवडल्यास प्रश्न अधिक जटील होतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेसाठी महाराष्ट्र नेहमीच पुढाकार घेईल हेही यावेळी सांगितले.

औरंगाबादसाठी डॉपलर रडारची मागणी

मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे  स्वतंत्र ३ x डॉपलर रडार उभारणीची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुंबई आणि महाराष्ट्रातील पाऊस स्थिती

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मुंबईसह महाराष्ट्रात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. ते म्हणाले की,  मुंबईमध्ये  ५  ऑगस्ट २०२० रोजी २४ तासात ३३३ मिमी पाऊस झाला तर  ७० ते ८० किमी प्रति तास  व जास्तीत जास्त १०६ कि.मी प्रति तास वेगाने वारे वाहिले. कोणालाही कल्पना नव्हती एवढे मोठे संकट येईल. याही परिस्थितीत राज्य शासनाने आणि महापालिकेने सज्जता दाखवत पुढील काही तासांमध्ये स्थिती पूर्वपदावर आणली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या शहरात अनेक ठिकाणे ही सखल भागात ( लो लेवल) आहेत. त्यामुळे जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा आणि अतिवृष्टी झाली की पाणी साचतेच.  महापालिकेच्या पंपिंग स्टेशन्सच्या माध्यमातून पालिका अधिकाऱ्यांनी सक्षमपणे अनेक ठिकाणी चांगले काम केल्याने मोठ्या दुर्घटना टाळता आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.  नदी जोड प्रकल्प, रिअर टाईम डाटा साठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर, नदी किनारी होणारी अतिक्रमणे, फ्लड डॅम्स उभारणे, पूरग्रस्त भागातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेणे  अशा महत्त्वाच्या विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर धोरण निश्चित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.