Home Blog Page 2485

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ

0

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. १३: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून मिळणार सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

यासंदर्भात मंत्री श्री. शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी  आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना श्री. शिंदे यांनी  दिल्या.

सामाजिक न्याय विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत २८ ऑगस्टपर्यंत वाढ – मंत्री धनंजय मुंडे

0

मुंबई (दि. १३)  : आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी सन २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्टपर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्टपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊन या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण आयुक्तालयाने ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे स्वीकारावेत अशा सूचना श्री . मुंडे यांनी याअगोदरच दिलेल्या आहेत. तसेच अर्ज करण्यासाठीची मुदत आता १५ दिवसांनी वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

एखाद्या विद्यार्थ्याने ज्या शाखेत पदवी प्राप्त केली त्याच शाखेत पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी या योजनेचा लाभ घेता येत होता; मात्र धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत ही अट नुकतीच रद्द केली आहे. आता कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अन्य शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे. त्याचबरोबर योजनेतील वयोमर्यादेबाबतचा अडचणी ही आता सोडविल्या आहेत .

दरम्यान २८ ऑगस्ट २०२० पर्यंत नवीन शैक्षणिक वर्षातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्ती साठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे समाज कल्याण विभागास सादर करावेत असे श्री . धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

राज्य सरकारचा काजू उद्योगाला दिलासा; काजू व्यावसायिकांना स्टेट जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती

0

मागील कालावधीतील व्हॅटची थकित रक्कमही परत मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा‍ महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. 13 : काजू व्यावसायिकांना चालू आर्थिक वर्षापासून राज्य वस्तू आणि सेवा कराच्या (स्टेट जीएसटी) रकमेची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. त्याचबरोबर काजू व्यावसायिकांची मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कमही परत करण्यात येणार आहे.  काजू उत्पादक आणि प्रक्रिया  उद्योजकांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असून त्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक विचार करेल,  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयांमुळे काजू उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमदार राजेश पाटील, महाराष्ट्र काजू उत्पादक संघटनेचे अध्यक्ष सुरेश बहुलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, चंदगडचे सागर दांडेकर यांच्यासह वित्त, पणन, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वातावरणातील बदल, बाजारातील चढ-उतार अशा विविध समस्यांचा सामना करणाऱ्या काजू उद्योगाला उभारी देण्यासाठी  चालू आर्थिक वर्षापासून म्हणजे दि. 1 एप्रिल 2020 पासून राज्य वस्तू व सेवा कराची (स्टेट जीएसटी) काजू व्यावसायिकांना शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा तसेच मागील कालावधीतील व्हॅट परताव्याची थकित रक्कम परत  करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा काजू व्यावसायिकांबरोबरच अप्रत्यक्षरित्या काजू उत्पादक शेतकरी, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांनाही होणार आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. 

महाराष्ट्रात उत्पादित होणारा काजू उच्च प्रतीचा आणि चांगल्या चवीचा असल्याने त्याला परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काजूसह सुपारी आणि पांढऱ्या कांद्याचे जिओग्राफिकल इंडिकेशन (जी.आय.) करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून या क्षेत्राला मदत करण्याची मागणीही उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केली. कापूस, उसाप्रमाणे काजू पिकालाही आधारभूत विक्री किंमत मिळाली पाहिजे, अशी मागणी काजू उत्पादक संघटना तसेच शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यावर योग्य विचार करुन निर्णय घेण्याचे आश्वासन उममुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

पुणे, दि.13 : अवयवदान ही या देशाची जुनी संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात या दातृत्वाचे महत्त्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्त्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अवयवदान संस्कृतीला पुनरुज्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ.महेश अबाळे, डॉ.विलास उगले, अधिष्ठाता डॉ.संजीव सोनावणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ.पराग काळकर यांच्यासह डॉ.श्रीमती अंजली कुरणे, अधिसभा सदस्या श्रीमती बागेश्री मंठाळकर यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका वैष्णवी पाटोळे हिला अवयवदान संकल्पाचे प्रमाणपत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रदान करण्यात आले. विद्यापीठ क्षेत्रातील सर्व स्वयंसेवकांची प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या वैष्णवी पाटोळे यांच्यासह कोविड संकटकाळात सर्व विद्यार्थ्यांनी उभारलेल्या मदत व सेवा कार्याबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विशेष कौतुक केले.

अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियान  दिनांक १३ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२० या कालावधीत आयोजित करण्यात आले असून विद्यापीठ परिसर तसेच संलग्नित महविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या अभियानात सहभागी होणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यापीठ नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करीत असते. यामुळेच आज काही तासात 2 हजारहून अधिक अवयवदान करणाऱ्या व्यक्तींची नोंद झाली असून पुढील सात दिवसात याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामित सदस्य व विद्यार्थी विकास मंडळ तथा राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी उपक्रम समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी संकटकाळी  विद्यार्थ्यांची  कृतिशीलता व समाजोपयोगी बाबीत पुढे होऊन उत्साहाने काम करण्याच्या सकारात्मक योगदानाविषयी राज्यपाल महोदयांना माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.प्रभाकर देसाई यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे यांनी केले.

सीआरपीएफ मध्ये विविध पदांची भरती

0

पदाचे नाव : इन्स्पेक्टर (डायटिशियन) – १

शैक्षणिक पात्रता : न्युट्रीशन या विषयासह बीएससी (होम सायन्स / होम इकोनॉमिक्स), डिप्लोमा इन डायटेटिक्स किंवा होम सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.

२. पदाचे नाव : सब इन्स्‍पेक्टर (स्टाफ नर्स) – १७५

शैक्षणिक पात्रता : बारावी पास, जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरीचा साडेतीन वर्षांचा डिप्लोमा, सेंट्रल किंवा स्टेट नर्सिंग कौन्सिलकडे नर्स म्हणून नोंद

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.

३. पदाचे नाव : सब इन्सपेक्टर (रेडियोग्राफर) – ८

शैक्षणिक पात्रता : विज्ञान विषयासह १२ वी आणि रेडियो डायग्नोसिस मध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा कमी असावे.

४. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फार्मासिस्ट) – ८४

शैक्षणिक पात्रता : बारावी पास, फार्मसीमध्ये २ वर्षांची पदविका आणि फार्मासिस्ट म्हणून नोंदणी.

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

५. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (फिजियोथेरपिस्ट) – ५

शैक्षणिक पात्रता : फिजियोथेरपीमध्ये पदवी किंवा 3 वर्षांची पदविका

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

६. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (डेन्टल टेक्निशियन) – ४

शैक्षणिक पात्रता : २ वर्षांचा डेन्टल हायजिनिस्ट अभ्यासक्रम

वयोमर्यादा : १ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

७. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (लॅबोरेटरी टेक्निशियन) – ६४

शैक्षणिक पात्रता : मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

८. पदाचे नाव : असिस्टंट सब इन्सपेक्टर/इलेक्ट्रो कार्डियोग्राफी टेक्निशियन – १

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रो कार्डिओग्राफी टेक्नॉलॉजीमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

९. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (फिजियोथेरपी असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट/मेडिक) – ८८

शैक्षणिक पात्रता : बारावी पास, फिजियोथेरपीमध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.

१०. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (एएनएम/मिडवाईफ) – ३

शैक्षणिक पात्रता : बारावी पास, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफरी मध्ये २ वर्षांची पदविका आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.

११. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस टेक्निशियन) – ८

शैक्षणिक पात्रता : बारावी पास, डायलिसिस टेक्निक्समध्ये २ वर्षांची पदविका आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.

१२. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (ज्युनियर एक्स रे असिस्टंट) – ८४

शैक्षणिक पात्रता : रेडियो डायग्नोसिसमध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

१३. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (लॅबोरेटरी असिस्टंट) – ५

शैक्षणिक पात्रता : दहावी, लॅबोरेटरी असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

१४. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) – १

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिशियन ट्रेड पदविका

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे २०-२५ दरम्यान असावे.

१५. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (स्टिवर्ड) – ३

शैक्षणिक पात्रता :  १० वी पास, फुड अँड बेवरेज सर्विसेसमध्ये पदविका

वयोमर्यादा : १ आँगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

१६. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (मसाल्ची) – ४

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

१७. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (कुक) – ११६

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

१८. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) – १२१

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि इंग्रजी, हिंदी किंवा स्थानिक भाषेचे ज्ञान

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

१९. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (धोबी/वॉशरमॅन) – ५

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

२०. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (डब्ल्यु/सी) – ३

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि संबंधित विषयात तज्ञ

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

२१. पदाचे नाव : कॉन्स्टेबल (टेबल बॉय) – १

शैक्षणिक पात्रता : १० वी पास आणि अनुभव

वयोमर्यादा : १ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२३ दरम्यान असावे.

२२. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (वेटर्नरी) – ३

शैक्षणिक पात्रता : वेटर्नरी थेरप्युटिक किंवा लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंटमध्ये प्रमाणपत्र, पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.

२३. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (लॅब टेक्निशियन) – १

शैक्षणिक पात्रता : वेटर्नरी लॅब टेक्निशियनमध्ये २ वर्षांची पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.

२४. पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल (रेडियोग्राफर) – १

शैक्षणिक पात्रता : वेटर्नरी रेडियोग्राफी मध्ये पदवी किंवा पदविका आणि अनुभव

वयोमर्यादा : ३१ ऑगस्ट २०२० रोजी वय वर्षे १८-२५ दरम्यान असावे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी https://bit.ly/3aqFpyQ

अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : डीआयजीपी, ग्रुप सेंटर, सीआरपीएफ, भोपाळ, व्हिलेज बंग्रेशिया, तालुक-हुजूर, जिल्हा भोपाळ, मध्यप्रदेश. ४६२०४५

रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

0

मुंबई, : तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांना गृहराज्यमंत्री  (ग्रामीण ) शंभूराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. देसाई बोलत होते.

श्री. देसाई म्हणाले, तांबडी बु. येथील घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा,  तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबतही शासन स्तरावर विचार केला जाईल असे श्री. देसाई यावेळी म्हणाले.

 या घटनेच्या चौकशीबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक

महेश डोंगरे व महेश राणे यांनी दिले.

राज्यात १ लाख ४९ हजार ७९८ ॲक्टिव्ह रुग्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.१३: राज्यात ९११५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  एवढे आहे. आज ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,८१३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४१३ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२०० (४८), ठाणे- १९६ (१३), ठाणे मनपा-२२७ (९),नवी मुंबई मनपा-३३३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३४५ (१३),उल्हासनगर मनपा-३९ (८), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (८), मीरा भाईंदर मनपा-१४६ (५), पालघर-१७२ (२), वसई-विरार मनपा-२१३ (१०), रायगड-३१७ (९), पनवेल मनपा-१८९ (६), नाशिक-१९५ (६), नाशिक मनपा-६६९ (८), मालेगाव मनपा-६२ (१),अहमदनगर-२९९ (३),अहमदनगर मनपा-२२९ (५), धुळे-६५ (३), धुळे मनपा-३३ (२), जळगाव-४१२ (१२), जळगाव मनपा-८६ (३), नंदूरबार-८८ (१), पुणे- ३९६ (२५), पुणे मनपा-११४८ (४८), पिंपरी चिंचवड मनपा-८४८ (१९), सोलापूर-२६८ (५), सोलापूर मनपा-५१ (१), सातारा-३२० (२०), कोल्हापूर-७२४ (२२), कोल्हापूर मनपा-११३ (१४), सांगली-७९ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४४ (७), सिंधुदूर्ग-२ (१), रत्नागिरी-६१ (२), औरंगाबाद-१६९, औरंगाबाद मनपा-१४३ (१), जालना-८१ (२), हिंगोली-३३ (२), परभणी-२० (२), परभणी मनपा-४२ (१), लातूर-१३८ (६), लातूर मनपा-८३ (५), उस्मानाबाद-२०७ (९), बीड-१२० (३), नांदेड-५७ (२), नांदेड मनपा-१९ (२), अकोला-१९, अकोला मनपा-१४ (२),अमरावती-१४, अमरावती मनपा-६१ (२), यवतमाळ-७९ (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-३४ (१), नागपूर-१२३ (३), नागपूर मनपा-४२० (१२), वर्धा-१४, भंडारा-१२, गोंदिया-३२ (२), चंद्रपूर-६७, चंद्रपूर मनपा-२२ (१), गडचिरोली-३४, इतर राज्य २१.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ७६ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख ६० हजार १२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.८२ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख २५ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,५५६) बरे झालेले रुग्ण- (१,००,९५४), मृत्यू- (६९९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,३१४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०९,७०३), बरे झालेले रुग्ण- (८६,९२३), मृत्यू (३१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५८९)

पालघर: बाधित रुग्ण- (१९,८९७), बरे झालेले रुग्ण- (१३,७७१), मृत्यू- (४६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६६०)

रायगड: बाधित रुग्ण- (२१,८१३), बरे झालेले रुग्ण-(१६,६४१), मृत्यू- (५५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६१६)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२४४९), बरे झालेले रुग्ण- (१५३६), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५३६), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२२,०२०), बरे झालेले रुग्ण- (७८,८३८), मृत्यू- (२९५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०,२२५)

सातारा: बाधित रुग्ण- (६५५२), बरे झालेले रुग्ण- (४१३२), मृत्यू- (२०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१३)

सांगली: बाधित रुग्ण- (५४२१), बरे झालेले रुग्ण- (२९५५), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१२,०१३), बरे झालेले रुग्ण- (५६३०), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०७१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१३,१५५), बरे झालेले रुग्ण- (७६८५), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८५८)

नाशिक: बाधित रुग्ण- (२३,५०३), बरे झालेले रुग्ण- (१५,०४३), मृत्यू- (६३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८२९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (११,५६१), बरे झालेले रुग्ण- (७९०२), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३६)

जळगाव: बाधित रुग्ण- (१६,२७८), बरे झालेले रुग्ण- (११,००४), मृत्यू- (६५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१०८८), बरे झालेले रुग्ण- (६७२), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)

धुळे: बाधित रुग्ण- (४४६१), बरे झालेले रुग्ण- (२९७५), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,५३१), बरे झालेले रुग्ण- (११,६४९), मृत्यू- (५५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३२५)

जालना: बाधित रुग्ण-(२८५३), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१८)

बीड: बाधित रुग्ण- (२३५३), बरे झालेले रुग्ण- (६३७), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६७२)

लातूर: बाधित रुग्ण- (४६२८), बरे झालेले रुग्ण- (२०७४), मृत्यू- (१८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७४)

परभणी: बाधित रुग्ण- (१२९०), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (६२३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

नांदेड: बाधित रुग्ण- (३५४५), बरे झालेले रुग्ण (१५८९), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३०६५), बरे झालेले रुग्ण- (१४१८), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६५)

अमरावती: बाधित रुग्ण- (३२०१), बरे झालेले रुग्ण- (२१६९), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९४०)

अकोला: बाधित रुग्ण- (३१३६), बरे झालेले रुग्ण- (२५३४), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६७)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०४७), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (१२८१), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१८३३), बरे झालेले रुग्ण- (११५०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३५)

नागपूर: बाधित रुग्ण- (११,१५१), बरे झालेले रुग्ण- (४११६), मृत्यू- (३०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७२७)

वर्धा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

भंडारा: बाधित रुग्ण- (४४३), बरे झालेले रुग्ण- (२७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७१३), बरे झालेले रुग्ण- (४२२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९३२), बरे झालेले रुग्ण- (४७८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४९०), बरे झालेले रुग्ण- (३५४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५८६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८)

एकूण: बाधित रुग्ण-(५,६०,१२६) बरे झालेले रुग्ण-(३,९०,९५८),मृत्यू- (१९,०६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४९,७९८)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४१३ मृत्यूंपैकी २८८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू ठाणे जिल्हा –३१, जळगाव -४, पुणे -३, नाशिक -३,पालघर -३, लातूर -२, उस्मानाबाद -२, रायगड -१, वाशिम -१  आणि औरंगाबाद -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

0

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी

मुंबई  : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाईल. 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्या वतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.   

अखेर 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

इंडियन आर्मीमध्ये भरती

0

पदाचे नाव : सोल्जर जनरल ड्युटी (वुमन मिलिटरी पोलीस) – ९९

शैक्षणिक पात्रता : सरासरी ४५ टक्के गुणांसह १० वी पास

वयोमर्यादा : ०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००३ च्या दरम्यान जन्म झालेला उमेदवार पात्र (०१ ऑक्टोबर व ०१ एप्रिल या दोन्ही तारखांचा समावेश)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२०

अधिक माहितीसाठी https://bit.ly/3gOy6Dn

अर्ज करण्यासाठी https://bit.ly/342SIUG

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 594

0

पुणे विभागातील 1 लाख 4 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 50 हजार 745 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.13 :- पुणे विभागातील 1 लाख 4 हजार 250 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 745 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 594 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 901 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.16 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 15 हजार 128 रुग्णांपैकी 86 हजार 817 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 692 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 225 रुग्णांपैकी 2 हजार 893 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 135 आहे. कोरोनाबाधित एकूण 197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 51 रुग्णांपैकी 7 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 615 आहे. कोरोनाबाधित एकूण 578 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 83 रुग्णांपैकी 1 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 225 आहे. कोरोनाबाधित एकूण 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 258 रुग्णांपैकी 4 हजार 990 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 927 आहे. कोरोनाबाधित एकूण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 405 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 997 , सातारा जिल्ह्यात 286, सोलापूर जिल्ह्यात 404, सांगली जिल्ह्यात 181 तर कोल्हापूर जिल्ह्यात 537 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 42 हजार 25 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 50 हजार 745 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 12 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
*

सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

0

महाराष्ट्र राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

पुणे(प्रतिनिधी) : गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याप्रकरणी ‘केंद्रीय गृहमंत्री पदक 2020’ देशातील 121 अधिकाऱ्यांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे शहर पोलीस दलात कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनाही या पदकाने गौरविण्यात येणार आहे.

पुणे शहर पोलीस दलात गुन्हे शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणून डॉ. शिवाजी पवार कार्यरत आहेत. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात एल्गार परिषद प्रकरणी दाखल गुन्ह्याचा त्यांनी सखोल तपास केला. मुंबई, नागपूर सह दिल्ली, हैद्राबाद, गोवा आदी देशभरात छापे टाकून पुरावे गोळा केले तसेच नक्षलवादी चळवळीशी संबंध असलेल्या संशयित आरोपीना अटक केली आहे

दरम्यान, यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. राजकीय वातावरण तापलेले असतानाही एसीपी पवार यांनी अत्यंत सचोटीने या गुन्ह्याचा तपास करीत आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. एक हुशार आणि तडफदार अधिकारी म्हणून पवार यांची पोलिस दलात ओळख आहे.

गुन्ह्याचा गुणात्मक आणि उत्कृष्ट तपास करणाऱ्या सीबीआय तसेच देशातील विविध राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी 2018 पासून केंद्रीय गृहमंत्री पदक देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यंदा देशातील 121 अधिकाऱ्यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) 15 , महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश प्रत्येकी 10 , उत्तरप्रदेश 8 , केरळ आणि पश्‍चिम बंगाल प्रत्येकी 7 आणि ईतर राज्यातील पोलीस अधिकारी यांच्यासह 21 महिला अधिकारीचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :- डॉ. शिवाजी पंडितराव पवार (एसीपी), राजेंद्र सिद्राम बोकाडे ( पोलीस निरीक्षक), उत्तम दत्तात्रय सोनावणे ( पोलिस निरीक्षक), नरेंद्र कृष्णराव हिवरे (वरीष्ठ निरीक्षक), ज्योती लक्ष्मण क्षीरसागर ( पोलीस अधीक्षक), अनिल तुकाराम घेर्डीकर (एसडीपीओ), नारायण देवदास शिरगावकर (पोलीस उपअधीक्षक), समीर नजीर शेख ( एसीपी), किसन भगवान गवळी ( एसीपी), कोंडीराम राघू पोपेरे ( पोलीस निरीक्षक ).

गणेश विसर्जनासाठी फिरते विसर्जन हौद : महापौर मोहोळ

0

मूर्तीदान करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयानिहाय व्यवस्था

पुणे ( प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करत नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्यासाठी प्राधान्य द्यावे, ज्या नागरिकांना घरी विसर्जन करणे गैरसोयीचे आहे फक्त अशाच नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १ फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मूर्ती लवकर विरघळण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीनाच प्राधान्य द्यावे. तसेच घरीच’ श्रीं’ चे विसर्जन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून सोडीयम बायकार्बोनेट मोफत पुरविण्यात येणार आहे. मूर्ती विक्रेते, प्रभागातील आरोग्य कोठ्या व क्षेत्रीय कार्यालयाचे ठिकाणी सोडीयम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे,’ महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की,’ या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. अनंत चर्तुदशीला विसर्जन करून परत देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांचे मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार आहे.’

‘गणेशोत्सवाच्या काळात प्रतिवर्षी पुणे शहरात जवळपास पाच लाख ‘मूर्तीचे विसर्जन होते आणि जवळपास वीस ते पंचवीस लाख गणेशभक्त या दिवशी रस्त्यावर उतरतात. तथापि या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा पध्दतीने एकत्र येणे हे मोठ्या संकटाला आमंत्रण देणे ठरेल. गेली पाच महिने पुणेकरांनी अतिशय जबाबदरीने या संकटात प्रशासनाला साथ दिली आहे. त्याबद्दल समस्त पुणेकरांचे जाहिर आभार मानतो आणि या गणेशोत्सवाच्या कालावधीतही आपण सर्व पुणेकर गर्दी टाळून या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य कराल याची खात्री बाळगतो,’ असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

समाजाचे देणे ही भावना जपत राजर्षी शाहू चौक मंडळाने केली मदतीची दहीहंडी

0


पुुणे- पुणे शहराच्या मध्यवस्ती शुक्रवार पेठ येथे राजर्षी शाहू चौक मंडळाकडून दरवर्षी दिमाखदार दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यावर्षी सर्वत्र पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून विधायक दहीहंडी साजरी करण्यात आली. त्याअनुषंगाने एकलव्य न्यास संस्थेतील निराधार मुले-मुली यांना १००किलो गहू, १०० किलो तांदूळ, ३० किलो पोहे, डाळ, मास्क, सॅनिटीजर, हॅन्ड वॉश व इतर जीवनावश्यक साहित्यचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा शिवसाई मित्र परिवारातर्फे करण्यात आले असून याकरिता खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. बोबडे, श्री. सातपुते व तसेच एकलव्य न्यास चे मल्हार कांबळे आणि राजर्षी शाहू चौक मंडळाचे कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात समाजाचे आपण काही देणं लागतो ही भावना मनात जपत मंडळाने यंदाचा वर्षी दहीहंडी च्या आयोजनात खर्च होणारा निधी गोळा करून एकलव्य न्यास या संस्थे साठी मदत करण्याचे ठरवले आणि त्या अनुषंगाने संस्थेशी संपर्क साधून त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी यांची पूर्तता कशा प्रकारे करता येतील याचे नियोजन करून राजर्षी शाहू चौक मंडळा कडून गहू तांदूळ पोहे डाळ तसेच सनिटायझेशन साठी लागणारे हॅण्डवॉश, सनिटायझर, फिनेल, तसेच कपड्याचे व अंगाचे साबण, मास्क आणि मुलांसाठी नाश्ता तसेच चॉकलेट देण्यात आले.
राजर्षी शाहू चौक मंडळ दरवर्षी दहीहंडी चे मोठ्या प्रमाणात आयोजन करत असते पण तसेच एकलव्य न्यास या संस्थे सोबत सुद्धा गेली 4 वर्ष पासून जोडली गेली असून संस्थे तील मुलांसोबत मिळून एकलव्य न्यास या संस्थेतील मुलांसाठी चॉकलेट दहीहंडी चे आयोजन देखील गेली 4 वर्ष मंडळ करत आहे आणि त्या मध्ये खंड पडू न देता मंडळाने दरवर्षी प्रमाणे मंडळात दहीहंडी न करता एकलव्य न्यास या संस्थे मध्ये जाऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

जानेवारी 2021 पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करा- आ.चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे- यंदाचे शैक्षणिक वर्ष हे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असे जाहीर करून 1 जानेवारी 2021 ला शाळा सुरू कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. पाटील म्हणाले की,  शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या घोषणेत एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री कधी ऑनलाईन शाळा सुरू करणार असल्याचे सांगतात तर काही वेळेस लवकरच प्रत्यक्ष शाळा सुरू होणार असल्याचे घोषित करतात. कधी  मुहूर्ताची तारीख पण सांगतात पुन्हा काहीतरी बदल होतो.   यातून या सरकारच्या निर्णयशक्तीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पाटील म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांनी काय ते एकदाच शाळा नक्की  केंव्हा सुरू होणार याचा मुहूर्त काढावा.  या तिघाडी सरकारला अजूनही या विषयाचे गांभीर्य कळले नाही किंवा त्यांच्याकडे यासाठी वेळच नाही असे दिसते. ऑनलाईन शिक्षण हे ग्रामीण भागात किती उपयुक्त आहे हा ही चर्चेचा विषय आहे. सध्या शहरातही नेटवर्कच्या अनंत अडचणींचा सामना करीत असाताना ग्रामीण भागात नेटवर्क मिळेल का याचा विचार करायला हवा. ऑनलाइन शिक्षण हे न परवडणारे माध्यम आहे आणि अध्यापन प्रक्रियेत पूर्णतः यशस्वी नसणारे माध्यम आहे. त्यामुळे शाळांना-प्रत्यक्ष अध्यापनाला पर्यायच नाही.  आत्ताची स्थिती पाहता ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत परिस्थिती निवळेल असे वाटते.   त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष हे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असे जाहीर करून 1 जानेवारी 2021 ला शाळा सुरू होण्याची घोषणा करावी. सहा महिने सत्र पुढे सरकल्याने कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात फारसा फरक पडणार नाही, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

राज्यात आज १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान,१ लाख ४७ हजार ५१३ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.१२ : राज्यात आज पुन्हा आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज  १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४७ हजार ५१३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,७१२ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३४४ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११३२ (५०), ठाणे- २२९ (१), ठाणे मनपा-२२० (०),नवी मुंबई मनपा-४३२ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३८६ (१५),उल्हासनगर मनपा-२९ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२० (१), मीरा भाईंदर मनपा-१४५ (११), पालघर-२४९ (९), वसई-विरार मनपा-२१४ (४), रायगड-२२१ (३), पनवेल मनपा-१९३, नाशिक-२७२ (८), नाशिक मनपा-८१६ (१८), मालेगाव मनपा-४४ (२),अहमदनगर-३३८ (३),अहमदनगर मनपा-२९५ (३), धुळे-३७ (२), धुळे मनपा-५३ (१), जळगाव-३५३ (११), जळगाव मनपा-६३ (५), नंदूरबार-३५ (४), पुणे- ३६९ (११), पुणे मनपा-१६६५ (१९), पिंपरी चिंचवड मनपा-९४८ (११), सोलापूर-३२० (८), सोलापूर मनपा-६० (३), सातारा-२७० (८), कोल्हापूर-३९६ (१७), कोल्हापूर मनपा-२३८ (२), सांगली-८८ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-९३ (१०), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-८१ (२), औरंगाबाद-२१३ (२), औरंगाबाद मनपा-११६ (१), जालना-९६ (३), हिंगोली-२७ (१), परभणी-१७ (३), परभणी मनपा-३९ (४), लातूर-१६६ (१०), लातूर मनपा-७७ (६), उस्मानाबाद-१२१ (७), बीड-९४ (२), नांदेड-१०९ (५), नांदेड मनपा-२५ (५), अकोला-१३ (१), अकोला मनपा-३१ (१),अमरावती-४१ (१), अमरावती मनपा-६३ (३), यवतमाळ-१३९ (१), बुलढाणा-५४ (१), वाशिम-३७ (१), नागपूर-३१८ (५), नागपूर मनपा-४५४ (२४), वर्धा-११, भंडारा-१८ (१), गोंदिया-२७ (२), चंद्रपूर-३६, चंद्रपूर मनपा-९ (१), गडचिरोली-१३, इतर राज्य १४ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २९ लाख ८ हजार ८८७ नमुन्यांपैकी ५ लाख ४८ हजार ३१३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख १५ हजार ११५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ८८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३४४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२६,३५६) बरे झालेले रुग्ण- (१,००,०६९), मृत्यू- (६९४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,०४७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,०८,३९९), बरे झालेले रुग्ण- (८५,४२७), मृत्यू (३१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,८४६)

पालघर: बाधित रुग्ण- (१९,५१२), बरे झालेले रुग्ण- (१३,४९१), मृत्यू- (४५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६७)

रायगड: बाधित रुग्ण- (२१,३०७), बरे झालेले रुग्ण-(१६,६४१), मृत्यू- (५३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२३८८), बरे झालेले रुग्ण- (१५१०), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८८)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५३४), बरे झालेले रुग्ण- (३७६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९)

पुणे: बाधित रुग्ण- (१,१९,६२८), बरे झालेले रुग्ण- (७६,९२५), मृत्यू- (२८६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,८३८)

सातारा: बाधित रुग्ण- (६२२९), बरे झालेले रुग्ण- (४००१), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४१)

सांगली: बाधित रुग्ण- (५१९८), बरे झालेले रुग्ण- (२६२३), मृत्यू- (१५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१६)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (११,१७६), बरे झालेले रुग्ण- (५२८९), मृत्यू- (२७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६११)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१२,८३६), बरे झालेले रुग्ण- (७४०१), मृत्यू- (६०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२९)

नाशिक: बाधित रुग्ण- (२२,५७७), बरे झालेले रुग्ण- (१४,३४०), मृत्यू- (६१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६२१)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (११,०३३), बरे झालेले रुग्ण- (७०००), मृत्यू- (११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९१८)

जळगाव: बाधित रुग्ण- (१५,७८०), बरे झालेले रुग्ण- (१०,७१९), मृत्यू- (६३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१०००), बरे झालेले रुग्ण- (५९५), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५५)

धुळे: बाधित रुग्ण- (४३६३), बरे झालेले रुग्ण- (२९७१), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५७)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१७,२१९), बरे झालेले रुग्ण- (११,४३७), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२२६)

जालना: बाधित रुग्ण-(२७७२), बरे झालेले रुग्ण- (१७२१), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५१)

बीड: बाधित रुग्ण- (२२३३), बरे झालेले रुग्ण- (६२८), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१५६४)

लातूर: बाधित रुग्ण- (४४०७), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४५)

परभणी: बाधित रुग्ण- (१२२८), बरे झालेले रुग्ण- (४९३), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (८६२), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३४६९), बरे झालेले रुग्ण (१५०५), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२८५८), बरे झालेले रुग्ण- (१२७९), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०६)

अमरावती: बाधित रुग्ण- (३१२६), बरे झालेले रुग्ण- (२०५२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८४)

अकोला: बाधित रुग्ण- (३१०३), बरे झालेले रुग्ण- (२४८७), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०१३), बरे झालेले रुग्ण- (६६७), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२०६५), बरे झालेले रुग्ण- (१२२८), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१७५४), बरे झालेले रुग्ण- (११४९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (१०,६०८), बरे झालेले रुग्ण- (३७५८), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५५७)

वर्धा: बाधित रुग्ण- (३०४), बरे झालेले रुग्ण- (२०७), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

भंडारा: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (३८४), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९१)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (८४३), बरे झालेले रुग्ण- (४२२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१८)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (४५६), बरे झालेले रुग्ण- (३४१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७)

एकूण: बाधित रुग्ण-(५,४८,३१३) बरे झालेले रुग्ण-(३,८१,८४३),मृत्यू- (१८,६५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,५१३)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३४४ मृत्यूंपैकी २३८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४० मृत्यू नाशिक -१२,ठाणे जिल्हा –११, पालघर -३, कोल्हापूर -३, परभणी -२, धुळे -२ , उस्मानाबाद -२,औरंगाबाद -१,लातूर- १, नंदूरबार -१,  सांगली -१  आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)