Home Blog Page 2482

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 992 ; एकुण 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;

विभागात कोरोना बाधित 1 लाख 62 हजार 884 रुग्ण   -विभागीय आयुक्त सौरभ राव

            पुणे, दि. 16 :- पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 62 हजार 884 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 992 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.41 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 22 हजार 397 रुग्णांपैकी 93 हजार 565 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 15 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 817 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.44 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 129 रुग्णांपैकी 3 हजार 644 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 195 रुग्णांपैकी 8 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 844 आहे. कोरोनाबाधित एकूण 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 5 रुग्णांपैकी 2 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 201  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 158 रुग्णांपैकी 6 हजार 214 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 569 आहे. कोरोनाबाधित एकूण 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 103 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 432, सातारा जिल्ह्यात 293, सोलापूर जिल्ह्यात 446, सांगली जिल्ह्यात 355 तर कोल्हापूर जिल्ह्यात 577 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 93 हजार 4 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 62 हजार 884 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

आपण सारे एकमेकांचे बळ होऊयात!

0

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विशेष लेखाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक बंधु-भगिनींशी, युवा वर्गाशी मनमोकळा संवाद साधला आहे. त्यांच्या या भावना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी हा विशेष लेख आम्ही प्रकाशित करीत आहोत.

मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे वास्तव आपण मोठ्या धैर्याने स्वीकारले आहे. कोरोनाला समजून घेत आपण भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. समाजातील दीनदुबळ्या, गोरगरिब कष्टकरी, कामगारांच्या संवेदना समजून घेत आपण या स्वातंत्र्य दिनाकडे पाहत आहोत.  

आपल्या जिल्ह्यातून मागील काही वर्षापासून कामाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर लोकांचे मुंबई-पुण्याकडे स्थलांतर झाले आहे. जिल्ह्यातील आपले बांधव विविध महानगरात रुळले होते. मार्चनंतर कोरोनाचा प्रसार जसा सुरु झाला तसे लोकांनी आपल्या गावाकडे परतण्यास अधिक प्राधान्य दिले. कोरोनाचा संसंर्ग  रोखण्याच्या उद्देशाने जिल्हा बंदीपासून लॉकडाऊनपर्यंत राज्य पातळीवर ज्या कांही उपाययोजना हाती घेतल्या त्यात तळागाळातील कष्टकऱ्यांचे झालेले हाल नाकारता येणार नाहीत. या दिव्यातून मार्ग काढत सारे बांधव मोठ्या हिम्मतीने सावरले.

आपल्याला कल्पना आहेच की, कोरोनामध्ये सर्वच रोजगाराचे मार्ग बंद झाले होते. अशावेळी शासनाने मजुरांच्या रोजगारासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात त्यांच्याच गावात कामे उपलब्ध करुन दिली. ज्या मजुरांनी कामांची मागणी केली त्या सर्व मजुरांच्या हाताला काम आपण उपलब्ध करुन दिले. चालू आर्थिक वर्षामध्ये मनरेगा योजनेंतर्गत एकुण 6 लाख 22 हजार 329 एवढा मनुष्यदिन रोजगार निर्मिती झालेली असून जवळपास 18 कोटी रुपये मजुरांना डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक / पोस्ट खात्यात जमा करण्यात आलेली आहे. या रोजगारामुळे कोरोनाच्या काळात मजुरांना आर्थिक संकटावर काही प्रमाणात मात करता आली.

बाहेर गावावरुन आपल्या गावी परतणाऱ्या लोकांना ग्रामपंचायतींनी सरळ गावात न घेता संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने प्राथमिक अथवा उपलब्ध असेल त्या शाळांमध्ये होम-क्वारंटाईनसाठी व्यवस्था केली. यात प्रत्येक गावातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी जे काम केले त्याला तोड नाही. माझ्या बांधवांना डोळ्यासमोर घर दिसत असतांना गावातल्याच शाळेत राहून तेथूनच घराकडे ओल्या डोळ्यांनी पाहतांना, त्यांची जी काही मनात कालवाकालव झाली असेल ती मी समजू शकतो. प्रचंड मोठा विश्वास नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनावर दाखविला आहे. 

आजच्या घडीला आपण मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या तपासण्या वाढविल्या आहेत. जवळपास 40 हजार अँटिजेन किट्सची उपलब्धता आपण करुन दिली आहे. तपासण्यांचा वेग जेवढा अधिक आहे तेवढे अधिक रुग्ण आपल्याला आढळत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविडबाबत 27 हजार 627 स्वॅब घेतले असून यात 21 हजार 475 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींची संख्या 3 हजार 815 एवढी झाली आहे. कोविडमुळे 140 मृत्यू झाले आहेत. 2 हजार 225  बाधितांना योग्य औषधोपचार करुन रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 1 हजार 432 बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

पंजाब भवन कोविड सेंटर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, आयुर्वेदिक कॉलेज, आश्विनी हॉस्पीटल, आशा हॉस्पीटल, निर्मल हॉस्पीटल, गोदावरी हॉस्पीटल, आमृत हॉटेल, श्री हॉस्पीटल या ठिकाणी शासनातर्फे बाधितांच्या उपचारासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचे लवकर निदान व्हावे व बाधितांवर तात्काळ उपचार सुरु करता यावेत यासाठी तपासणीवर भर दिला आहे. यासाठी नांदेडकर पुढे या ही मोहिम महानगरपालिकेने हाती घेतली असून फिरत्या पाच स्वॅब टेस्टिंग व्हॅनद्वारे शहराच्या प्रत्येक भागात तपासणी मोहिम सुरु आहे.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढली तर त्यासाठी ऊर्दू घर, युनानि कॉलेज येथे उपचार केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाने यापुर्वी अशी आव्हानात्मक स्थिती कधी अनुभवलेली नाही. एका बाजूला जिल्ह्यातील सर्व नागरिकांची काळजी, दुसऱ्या बाजूला प्रशासकीय व्यवस्थापन, तिसऱ्या बाजुला भविष्यातील आव्हानात्मक स्थिती लक्षात घेता करावी लागणारी सेवा सुविधांची उपलब्धता यावर प्रशासन दिवसरात्र काम करीत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून, अंगणवाडी सेविका, आमच्या आशाताई, परिचारिका व त्यांच्याजोडीने स्वंयस्फुर्तीने पुढे आलेले प्राथमिक शाळेतील शिक्षक आदि. नागरिकांच्या धैर्याचे कौतुक करावे, तेवढे कमी आहे.

लॉकडाऊनच्या काळात तसे पाहिले तर शासनासमवेत जनतेने जनतेला सावरले. विविध सेवाभावी संस्था, संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले कर्तव्य ओळखून समाजाप्रती असलेली कृतज्ञता दाखवून दिली. विविध धार्मिक, आध्यात्मिक संस्थांनसमवेत गुरुद्वाराने मदतीचा जो हात पुढे केला त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल.

या काळात जनतेच्या अधिक संपर्कात राहून मी या साऱ्या गोष्टी अनुभवत होतो. सर्व प्रकारची शक्ती पणाला लावूनही आम्हाला आमच्या मर्यादा या आव्हानापुढे लक्षात येत होत्या. व्यक्तीगत पातळीसह शासनस्तरावरुन सर्व नियोजन सुरु असतांना मलाही जिल्ह्यातील इतर बाधितांसारखे या कोरोनाच्या संसर्गातून जावे लागले.

नांदेड जिल्ह्याच्या विकासाची जी ब्ल्यू प्रिंट आपण तयार केली त्यातील अनेक विकास कामांऐवजी आता आपण वैद्यकीय सेवा सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. जनतेला स्वच्छ प्रशासन देण्यापासून जिल्ह्यातील सर्व विकासाच्या कामांना गती कशी देता येईल यावर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी व आरोग्य सुविधा बळकटीकरणासाठी शासनाने 41 कोटी 54 लाख रुपयांची तरतुद केली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लाख 66 हजार रुपये एवढा निधी खर्च केला जाणार आहे.      

मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो आपल्या आरोग्य विभागातील वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून आहोरात्र मेहनत करणारे आपले सर्व डॉक्टर्स, नर्स, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा.

याचबरोबर जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित अधिकारी आणि ऊन-पाऊसाची पर्वा न करता शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ! जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेला तत्पर ठेवत त्यासाठी जी दक्षता घेतली आहे याचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. या काळात प्रशासनाला संयम ठेवून मार्ग काढतांना जनतेला न आवडणारे निर्णयही घ्यावे लागतात.

कोरोनाच्या व्यवस्थापना सोबत जिल्ह्याचा आर्थिक कणा ज्या क्षेत्रावर उभा आहे त्या कृषि क्षेत्राला सावरण्यासाठी शासनाने विशेष लक्ष दिले. मार्च पासून सुरु झालेल्या लॉकडाऊन व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना कापसाची विक्री करता आली नाही. यासाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय व सातबाऱ्यावरील नोंदीनुसार सर्व्हे केल्यानंतर 9 हजार 450 शेतकऱ्यांकडे जवळपास 2 लाख 5 हजार 434 क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे दिसून आले. या सर्व शेतकऱ्यांचा कापूस शासनाने अगदी मागील महिन्या पर्यंत खरेदी करुन एक नवा उच्चांक गाठला. मागीलवर्षी सर्वसाधारणत: 3 लाख 41 हजार 349 हेक्टर क्षेत्र कापसासाठी निर्धारित केले होते. प्रत्यक्षात 2 लाख 31 हजार 810 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली. या क्षेत्रावर लागवड झालेल्या कापसाची बहुतांश शेतकऱ्यांनी विक्री केली होती. काही शेतकऱ्यांनी कापूस सांभाळुन ठेवला होता. जिल्ह्यात कोविड पूर्वी कापूस पणन महासंघ, सीसीआय, खाजगी बाजार, थेट परवानाधारक व कृषि उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक व्यापारी यांच्यामार्फत एकुण 39 हजार 873 शेतकऱ्यांचा 8 लाख 61 हजार 252.71 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

जिल्ह्यात जीनिंग मिलची संख्या कमी प्रमाणात आहे. ही संख्या वाढल्यास शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यात जाऊन कापूस विकायची वेळ पडणार नाही. यासाठी खाजगी उद्योजकांना चालना देऊन जिल्ह्यात अधिक जिनिंग कशा होतील यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात 22 जुलै 2020 अखेरपर्यंत एकुण 15 हजार 466 शेतकऱ्यांकडून 3 लाख 13 हजार 824.53 क्विंटल एवढ्या कापसाची आपण खरेदी केली. या हंगामात एकुण 54 हजार 761 कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आपला जिल्हा दक्ष होता. आजच्या घडिला जवळपास 1 लाख 44 हजार 907 खात्यांवर 1 हजार 24.20 कोटी रुपये लाभ शेतकऱ्यांना वितरीत केला आहे.

नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण सर्वसाधारणपणे 3 हजार 965 किलोमीटर रस्ते लांबी अस्तित्वात आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित जिल्हा व ग्रामीण मार्ग असे एकूण 8 हजार 667 किलोमीटर लांबीचे रस्ते अस्तित्वात आहेत. रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषद व इतर जिल्हा मार्ग अशा 393.30 किलोमीटर लांबीचे रस्ते विकास योजनेत दर्जोन्नत करण्यात आले आहेत. पांदण व शेतरस्त्यांच्या 155.60 किलोमीटर लांबीस ग्रामीण मार्गाचा दर्जा प्रदान केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाची सुत्र मी स्वीकारल्यापासून सन 2020 च्या अर्थसंकल्पात रस्ते सुधारणा व पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 769 कोटी रक्कमेची 121 कामे मंजूर केली आहेत. शासनाने नांदेड येथील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नवीन जिल्हा न्यायालय इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावला आहे. यासाठी 152 कोटी 17 लाख रुपये रक्कमेस मंजूरी देण्यात आली आहे. स्व. डॉ. शंकररावजी चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात अभ्यासिका संकुलासाठी 44 कोटी 71 लाख रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली  आहे.

मागील अर्थसंकल्पात आपण भोकर येथील न्यायालय इमारत विस्तारिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध ठिकाणच्या आठ इमारतींचे बांधकाम, लोहा उपजिल्हा रुग्णायातील विविध सुविधा, शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील विविध बांधकामासाठी सुमार 128 कोटी रुपये खर्चाच्या कामांचा समावेश केला आहे. अर्धापूर व मुदखेड येथे गृह विभागाच्या इमारतींसाठी 24 कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर करुन ती कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा गतिमान करण्यासाठी नाबार्ड अंतर्गत 415 कोटी रुपये, केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत 1342 कोटी रुपये तर आशियाई विकास बँकेअंतर्गत सुमारे 3385 कोटी रक्कमेचे कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा अद्ययावत करण्यासाठी नांदेड येथे 231 कोटी रुपयांच्या योजना, उपजिल्हा रुग्णालय देगलूरसाठी येथे 49 कोटी रुपये खर्चाचे, उपजिल्हा रुग्णालय कंधारसाठी सुमारे 37 कोटी रुपये, हदगाव येथील कर्मचारी निवासाच्या बांधकामास सुमारे 4 कोटी, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुमारे 86 कोटीच्या पाच इमारती, शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी 21 कोटी आदि कामांचा समावेश आहे.  भोकर तालुक्यातील भोसी येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी 312 कोटी रुपये आणि चिदगिरी येथे बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी सुमारे 32 कोटीची कामे प्रस्तावित असून त्याबाबत पाठपुरावा केला जात आहे.

जनतेला अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यायावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या आपल्या श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या जिर्ण झालेल्या इमारतीच्या जागेवर आपण अद्ययावत बाह्य रुग्ण विभाग बांधून पूर्ण केला आहे. त्याठिकाणी 200 खाटांचे रुग्णालय सुरु केले आहे.  सिटीस्कॅन विभागही आपण मागच्या महिन्यात उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन याठिकाणी अधिक सुविधा कशा देता येतील याचे नियोजन आपण करित आहोत.  

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपला नांदेड जिल्हा मोठा आहे. तब्बल 16 तालुके आपल्या जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तालुक्याची भौगोलिक रचना वेगळी आहे. जिल्ह्यात गोदावरी, आसना सारख्या नद्या व विष्णुपूरी, उर्ध्व पैनगंगा या प्रकल्पांमुळे काही तालुक्यांमध्ये शेतीला पाणी पोहचले आहे.  इतर तालुक्यांसाठी नैसर्गिक संसाधनाच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे नियोजन अधिक सक्षम होईल यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. लेंडी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा यासाठी आम्ही दक्ष आहोत. एकही गोरगरिब पक्क्या घरावाचून राहणार नाही यासाठी महानगरपालिकेतर्फे घरकुल योजना आपण जाहिर केली आहे. जवळपास 70 कोटी रुपये आपण यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. या निधीतून मोठ्या प्रमाणात आपण पात्र लाभार्थ्यांना पक्की घरे उपलब्ध करुन देणार आहोत.

जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील कुठलाही गोरगरिब अन्न धान्यावाचून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर आपण भर दिला. शासनातर्फे यासाठी लागणाऱ्या अन्न-धान्याचा मुबलक प्रमाणात जो पुरवठा  झाला आहे त्याची गुणवत्ता टिकावी यासाठी गोदाम व्यवस्थाही अधिक परिपूर्ण कशी करता येईल याचा तालुकानिहाय समतोल आराखडा आपण तयार करित आहोत. लॉकडाउनच्या काळात आपण जिल्ह्याच्या प्रत्येक गावातील, वाडी तांड्यावरील लोकांची उपासमार होऊ नये यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्न धान्याचे सुलभ वितरण केले.

जिल्ह्यातील जनतेला आपल्या प्रशासकिय कामासाठी अनेक ठिकाणी जायची गरज पडू नये, त्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात यादृष्टिने कौठा येथे संपूर्ण प्रशासकिय संकुल उभारण्याचा माझा मानस आहे. लवकरच याठिकाणी भव्य असे प्रशासकिय संकुल आम्ही उभे करु. भारताला ज्या संघर्षातून, बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वातंत्र्य अधिकाधिक परिपक्वतेकडे, सुदृढ लोकशाहीकडे नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करु यात.

– अशोक शंकरराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री 

स्वातंत्र्यदिन आणणार मातंग समाजाच्या इतिहासात नवी पहाट

0

पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने माननीय राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांची भेट घेऊन समाजाच्या विविध मागण्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. राज्यपाल महोदयांनी ही अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. राज्यपाल महोदयांसोबत झालेल्या या सकारात्मक भेटीमुळे मातंग समाजाच्या इतिहासात हा स्वातंत्र्यदिन नवी पहाट घेऊन येईल, असा विश्वास शिष्टमंडळातील नेत्यांनी व्यक्त केला.
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होता. आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भांडे, काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदिपान झोंबाडे, लहुजी समता परिषदेचे अनिल हातागळे, आदींचा समावेश होता.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे काम गतीने व्हावे, मातंग आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी तातडीने व्हावी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला तातडीने मोठ्या प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केल्या. राज्यात विधान परिषद अस्तित्वात आल्यापासून गेल्या सहा दशकात मातंग समाजाच्या एकाही व्यक्तीला राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी मिळालेली नाही. हा अनुशेष दूर करून अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजाला न्याय द्यावा, अशी विशेष मागणीही शिष्टमंडळाने केली. यावर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देत राज्यपालांनी मातंग समाजाच्या जास्तीत जास्त मागण्या मंजूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला निर्देश देऊ, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले. राज्यपालांसोबत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या बैठकीमुळे मातंग समाजातला एक नवी ऊर्जा मिळाल्याची भावना शिष्टमंडळाच्या वतीने रमेश बागवे यांनी व्यक्त केली.

आर. आर. आबांच्या आठवणी ताज्या; जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

मुंबई, दि. 16 :- माजी उपमुख्यमंत्री, सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय आर. आर. आबांना आपल्यातून जावून पाच वर्षे झाली असली तरी त्यांच्या आठवणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत. स्वर्गीय आबांनी राबवलेलं ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती अभियान, त्यांचा डान्सबारबंदीचा निर्णय, पोलिसभरती भ्रष्टाचारमुक्त करुन हजारो युवकांना दिलेली संधी, यामुळे राज्यातील जनतेच्या मनातलं त्यांचं स्थान अढळ आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आर. आर. आबांच्या आठवणींना उजाळा देतांना म्हणाले की, आर. आर. आबा राष्ट्रवादीचे प्रमुख नेते होते. आम्हा सर्वांचे मित्र, सहकारी होते. अत्यंत गरीब कुटुंबातून येऊनही गुणवत्ता, कठोर परिश्रम, पक्षनिष्ठेच्या बळावर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचता येतं, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं होतं. जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर सोपवलेल्या प्रत्येक जबाबदारीला त्यांनी न्याय दिला. प्रत्येक पदावर स्वत:च्या कामाचा ठसा उमटवला. आर. आर. आबांचं जीवन हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आर. आर. आबांना आदरांजली वाहिली.
०००००००

पुण्याच्या चारही धरणात सुमारे 80 टक्के पाणी साठा-विसर्ग वाढविला..

0

खडकवासला-100 टक्के,वरसगाव-74.46 टक्के, पानशेत-88.41टक्के,टेमघर- 59.60टक्के

पुणे-खडकवासला धरण साखळीत आज शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. खडकवासला धरणातील येवा 17 हजार क्यूसेकपेक्षा जास्त होता. म्हणून शनिवारी रात्री 16 हजार 247 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढविणार असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, आज संध्याकाळी पाच वाजता चार ही धरणात मिळून सुमारे 80 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील शनिवार आठ ऑगस्ट रोजी या चार धरणात मिळून 57.96 टक्के पाणीसाठा होता.
आज चार ही धरणात मिळून 23.19 टीएमसी पाणी जमा झाले आहे.

‘आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये’, राज्यपाल कोश्यारींची उपमुख्यमंत्री अजितदादांना कोपरखळी, आणि शनवार वाडा व वेदपाठ शाळेला विशेष भेट पहा व्हिडिओ,फोटो

0

‘आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये’ असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली आहे. स्वातंत्र्यदिनी राज्यपालांच्या हस्ते पुण्यामध्ये शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. तेव्हा अगदी थोड्याच वेळासाठी अजित पवार आणि राज्यपालांची भेट झाली. ही भेट चांगलीच चर्चेत आली आहे.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/331494721319149/

आज पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थितीती होती. अजित पवार जेव्हा राज्यपालांचं स्वागत करण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत टोला अजित पवारांना लगावला. कौन्सिल हॉल येथे हा सोहळा पार पडला.

सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी राज्यपालांच्या हस्ते झेंडावंदन केले गेले. हे ध्वजारोहण संपल्यानंतर राज्यपाल आणि अजित पवार हे समोरासमोर आले. तेव्हा ‘आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये’ असा मिश्कील टोला राज्यपालांनी ऐकवला. यावेळी अजित पवारांनी भगतसिंह कोश्यारी यांना नमस्कार केला.

पुण्यातील शनवार वाड्याला राज्यपालांनी आवर्जून भेट दिली आणि तिथे फोटो सेशन हि करून घेतले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पुणे येथील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळेला (वेदभवन) भेट दिली. वेदाचार्य मोरेश्वर घैसास यांनी त्यांना संस्थेची माहिती दिली.  
वेदपाठ शाळेच्या विद्याथ्यांशी त्यांनी संवाद साधला

जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने पुण्याच्या ‘व्हेंचर सेंटर’येथे आता राष्ट्रीय सुविधा

0

पुणे-जैवतंत्रज्ञान विभागाच्या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) च्यावतीने  एनबीएम म्हणजेच नॅशनल बायोफार्मा मिशनच्या सहकार्याने सीबीए म्हणजेच द सेंटर फॉर बायोफार्मा अॅनालिसच्या ,जैवऔषध विकासक आणि उत्पादकांसाठी उच्च गुणवत्तेची विश्लेषणात्मक सेवा  प्रदान करण्यात येणार आहे. या सीबीएचे आभासी उद्घाटन जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या हस्ते करण्यात आले.

सीबीए जैवऔषध विकासक आणि उत्पादकांसाठी उच्च गुणवत्तेची विश्लेषणात्मक सेवा प्रदान करणार आहे. जैविक आणि जैवऔषध संरचनात्मक आणि कार्यात्मक वैशिष्ट्य यांच्यासाठी एक संशोधन केंद्र म्हणून कार्यरत राहील.

जैवतंत्रज्ञान विभागाच्या  सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्याहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  डॉ. रेणू स्वरूप म्हणाल्या, ‘‘शैक्षणिक आणि सरकारी संशोधन प्रयोगशाळा या स्टार्टअप्स तसेच अनेक भारतीय कंपन्यांकडून होत जात असलेल्या विविध संशोधनासाठी ही सीबीए संस्था अतिशय महत्वाची भूमिका बजावेल. कारण उच्च-गुणवत्तेच्या विश्लेषणात्मक जैवऔषधांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना पाठिंबा यामुळे मिळू शकणार आहे. तसेच नियामक मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासाला सल्ला देण्याची गरज असते, त्यामुळे विकास प्रक्रिया वेग घेण्यास मदत मिळते.’’

यावेळी बोलताना, सीएसआयआर-एनसीएलचे संचालक प्राध्यापक ए.के. नांगिया यांनी अतिसूक्ष्म रेणूंच्या उपचारासाठी एनसीएलने 1970 ते 80 च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे, हे अधोरेखित केले तसेच आता या क्षेत्रात भारतामध्ये होत असलेल्या संशोधनाला हातभार लावण्यास एनसीएल उत्सुक असल्याचेही सांगितले. पुण्याच्या आयबीपीएल म्हणजेच इंटरनॅशनल बायोटेक पार्क लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बिस्वाल म्हणाले, सीबीएच्या पायाभूत सुविधा विकासासाठी सीएसआरच्या पाठिंब्यामुळे आयबीपीएल आनंदी आहे. जैवऔषध आणि वैद्यतंत्रज्ञान विकास आणि उत्पादन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करण्यासाठी पुणे हे ज्ञानकेंद्र आहे. त्यामुळे व्हेंचर सेंटर आणि बीआयआरसी यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.

डीबीटी विषयी – जैवतंज्ञान विभागाचे कामकाज विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत चालते. कृषी, आरोग्यसेवा, पशूविज्ञान, पर्यावरण आणि उद्योग या क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाची होत असलेली वृद्धी आणि उपयोग यांना प्रोत्साहन देवून प्रकल्पांना गती दिली जाते.

बीआयआरएसी विषयी- जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद ही एक कोणत्याही प्रकारे ना -नफा कलम 8 शेड्यूल- बी अनुसर स्थापन झालेली सार्वजनिक क्षेत्रातली संस्था आहे. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाची ‘इंटरफेस एजन्सी ’ आहे. या संस्थेच्या मदतीने देशातल्या बायोटेक कंपन्यांचे सबलीकरण करणे तसेच त्यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय, संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे काम करते. देशाच्या नेमक्या गरजा लक्षात घेवून बीआयआरसी कार्यरत असते.

नॅशनल बायोफार्मा मिशन विषयी- उद्योग-शैक्षणिक संशोधन यांची सांगड घालून भारत सरकारच्या शोध-संशोधन कार्याला गती देण्यासाठी या राष्ट्रीय जैवऔषध मिशनचा प्रारंभ करण्यात आला आहे. बीआयआरएसीसाठी  जागतिक बँकने संशोधनासाठी निधी देवू केला आहे. एकूण 250 दशलक्ष डॉलर्स खर्चाच्या 50टक्के निधी जागतिक बँक देत आहे. भारतातल्या जनतेच्या आरोग्य दर्जामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वांना परवडणा-या दरामध्ये वैद्यकीय उत्पादने तयार करण्यासाठी हा खर्च करण्यात येणार आहे. लस, वैद्यकीय उपकरणे आणि निदान तसेच जैवउपचार, क्लिनिकल चाचणी आणि इतर तंत्रज्ञान क्षमता बळकट करणे, ही महत्वाची कामे देशात करण्यात येत आहेत.

व्हेंचर सेंटर विषयी- सीएसआयआरच्या पुढाकाराने पुण्याच्या एनसीएल म्हणजेच राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा या संस्थेअंतर्गत केंद्राचे काम चालते. तंत्रज्ञान आणि ज्ञान आधारित उपक्रमांना पाठिंबा दिला जातो. पुणे भागातल्या वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी कौशल्यांचा लाभ करून घेवून त्यांना पोषक वातावरण देण्याचा प्रयत्न केला जातो. व्हेंचर सेंटरच्यावतीने सामुग्री, रसायने आणि जैवविज्ञान तसेच अभियांत्रिकी या क्षेत्रातल्या उद्योगांवर लक्ष पुरविण्यात येते. या केंद्राची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी – : http://www.venturecenter.co.in/

सीबीए विषयी – सेंटर फॉर बायोफार्मा अॅनालिसिस – बीआयआरएसीच्या समर्थनातून व्हेंचर सेंटरच्यावतीने सीबीए हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. व्हेंचर सेंटर म्हणजे तंत्रज्ञान व्यवसायातले इन्युबेटर आहे. पुण्याच्या एनसीएलच्या वतीने सीबीएचे काम चालते. सीबीएमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जैवऔषधीय उद्योगांविषयी जागतिक स्तरावर विश्लेषणात्मक सुविधा या केंद्राच्या माध्यमातून प्रदान करण्यात येतात. भारत आणि जगभरामध्ये असलेल्या लहान तसेच मध्यम आकारांच्या जैवसंशोधक, विकासक यांना मदत करण्याचे काम केंद्रामार्फत केले जाते. संस्थेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी – : https://www.venturecenter.co.in/biopharma/

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले संबोधन(जसेच्या तसे )

0

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन आणि  शुभेच्छा. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो मुलामुलींचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, नरवीरांना, शहीदांना वंदन करण्याचे हे पर्व आहे. आपले सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात, आज त्या सर्वांना हृदयपूर्वक, आदरपूर्वक स्मरण करण्याचा, त्यांच्या महान त्याग तपस्येला वंदन करण्याचे पर्व आहे.

आणखी एक नाव – अरविंद घोष, क्रांतीदूत ते अध्यात्म यात्रा, आज त्यांची जन्म जयंती आहे. त्यांचा संकल्प पूर्ण करायचा, आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्याबरोबर राहोत. आज आपण विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत.  आज छोटी मुले माझ्यासमोर दिसत नाहीत. आपले उज्वल भविष्य, कोरोनाने सर्वांना रोखले आहे.

या कोरोना कालावधीत लक्षावधी कोविड योद्धे, डॉक्टर्स असतील, परिचारिका असतील, सफाई कामगार असतील, रुग्णवाहिका चालवणारे असतील, कुणाकुणाची नावे घेऊ, ज्यांनी इतका दीर्घकाळ ज्याप्रकारे ‘सेवा परमो धर्म:’ हा मंत्र जगून दाखवला. पूर्ण समर्पण भावनेने भारतमातेच्या सुपुत्रांची सेवा केली आहे, अशा सर्व कोरोना योद्धयांना मी आज नमन करतो. या कोरोना काळात आपले अनेक बंधू भगिनी प्रभावित झाले. अनेक कुटुंबे प्रभावित झाली. अनेकांनी आपले प्राण गमावले. त्या कुटुंबीयांप्रती मी संवेदनशीलता व्यक्त करतो. आणि या कोरोना विरुद्ध मला विश्वास आहे १३० कोटी लोकांची अगम्य इच्छाशक्ती, संकल्पशक्ती विजय मिळवून देईल. आपण विजयी होऊ. 

गेल्या काही दिवसात आपण एकप्रकारे अनेक संकटाना आपण सामोरे जात आहोत. पुराचा प्रकोप, विशेषतः पूर्व भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारतात, कुठे दरडी कोसळल्यात, अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेकांनी आपले प्राण गमावले. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. राज्य सरकारांबरोबर खांद्याला खांदा भिडवून अशा संकटाच्या काळात नेहमी देश एक बनून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल,  तात्काळ जितकी मदत करता येईल तेवढी यशस्वीपणे करत आहोत. स्वातंत्र्याचे पर्व आपल्यासाठी स्वातंत्र्याचे पर्व आहे, स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करत नवसंकल्पांसाठी ऊर्जाची संधी असते,  एक प्रकारे आपल्यासाठी नवी  प्रेरणा घेऊन येते.  नवा उमंग आणि नवा उत्साह घेऊन येतो.  आणि यावेळी संकल्प करणे  आपल्यासाठी  आवश्यक आहे. आणि शुभ प्रसंग देखील आहे. कारण  पुढल्या वर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करू तेव्हा आपण  ७५ व्या वर्षात पदार्पण करू. ही खूप मोठी संधी आहे. म्हणूनच पुढल्या दोन वर्षांसाठी खूप मोठे संकल्प आपल्याला करायचे आहेत. १३० कोटी लोकांना करायचे आहेत. ७५ व्या वर्षात प्रवेश करू, जेव्हा ७५ वर्षे पूर्ण करू  तेव्हा संकल्पपूर्तीचे महापर्व म्हणून साजरे करू. आपल्या पूर्वजांनी अखंड एकनिष्ठ तपस्या करून, त्याग आणि बलिदानाची उच्च भावना प्रस्थापित  करून आपल्याला ज्याप्रकारे  स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्यांनी झोकून दिले आपण हे विसरू नये की  गुलामगिरीच्या इतक्या प्रदीर्घ काळात एकही क्षण असा नव्हता, सेवा एकही क्षेत्र असे नव्हते जेव्हा स्वातंत्र्याची इच्छा नव्हती, स्वातंत्र्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही, त्याग केला नाही, एकप्रकारे तारुण्य तुरुंगात व्यतीत केले, जीवनातील सर्व स्वप्नांची फाशीवर जाताना आहुती दिली.  अशा  वीरांना नमन करताना आणि मग एकीकडे सशक्त क्रांती, दुसरीकडे राष्ट्र जागरणाबरोबर जन आंदोलनाला नवी ऊर्जा दिली आणि आपण स्वतंत्र भारताचे पर्व साजरे करू शकलो. या लढाईत  या स्वतंत्र भारताचा आत्मा कुचलण्याचे अगणित  प्रयत्न झाले. भारताला आपली संस्कृती, परंपरा रीती रिवाज उखडून टाकण्यासाठी काय झाले नाही. शेकडो वर्षांचा कालखंड होता, साम, दाम, दंड, भेद सर्वोच्च पातळीवर होते. काही असे मानत होते कि, ‘यावत् चंद्र दिवाकरौ’ आम्ही  इथे राज्य करायला आलो आहोत. मात्र स्वातंत्र्याच्या निर्धाराने त्यांचे सर्व मनसुबे जमीनदोस्त केले. इतका विशाल देश, अनेक राजेरजवाडे , अनेक खानपान, अनेक भाषा किती विविधतेने नटलेला देश कधी एक होऊन स्वातंत्र्यलढा देऊ शकत नाही , मात्र या देशाची प्राणशक्ती ते ओळखू शकले नाहीत. अंतर्भूत जी प्राणशक्ती आहे, जिने  एका सूत्रात आपल्याला बांधून ठेवले आहे. जेव्हा तो पूर्ण ताकदीने मैदानात  विस्तारवादाच्या विचारसरणीने जगभरात जिथे जिथे जाता येईल तिथे तिथे पसरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचे स्वातंत्र्य आंदोलन जगासाठी  देखील प्रेरणा कुंज बनले. दीपस्तंभ बनले. जगभरातही स्वातंत्र्याची झलक दिसली. जे लोक विस्तारवादाच्या मागे होते त्यांनी विस्तारवादाचे मनसुबे पूर्ण करण्यासाठी जगावर दोन महायुध्ये लादली, जगाला उध्वस्त केले, मानवतेला हानी पोहचवली. मात्र अशा कालखंडातही युद्धाच्या काळातही भारताने आपल्या स्वातंत्र्याची पकड घट्ट ठेवली. कमी होऊ  दिली नाही. गरज भासली तेव्हा बलिदान देत राहिला. कष्ट करत राहिला. जन  आंदोलन उभे करण्याची गरज भासली तेव्हा जन आंदोलन उभे केले. भारताच्या लढाईने जगभरात  स्वातंत्र्यासाठी वातावरण तयार केले. भारताच्या शक्तीमुळे जगात जो बदल झाला, विस्तारवादाला आव्हान निर्माण केलं  इतिहास ते कधी नाकारू शकत नाही.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

स्वातंत्र्याच्या लढाईत भारताने पूर्ण जगात आपली  एकजुटतेची, सामूहिकतेची ताकद दाखविली. आपल्या उज्वल भविष्याप्रती संकल्प प्रेरणा, ऊर्जा घेऊन देश पुढे जात राहिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० कोटी भारतीयांनी संकल्प केला, आत्मनिर्भर भारत बनण्याचा. आत्मनिर्भर भारत आज सगळ्या भारतीयांच्या मनात मस्तिष्कात रुजला आहे.  आज सगळीकडे त्याची छाप आहे. आत्मनिर्भर भारत आज १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आपल्याला माहित आहे जेव्हा मी आत्मनिर्भर बाबत बोलतो तेव्हा २५-३० वर्षांवरचे नागरिक असतील, त्यांनी आपल्या घरात ऐकले असेल, मुले २०-२१ वर्षांवरची असतील तर ते आपल्या पायांवर  उभे राहण्याची अपेक्षा करतील.  आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळापासून एक पाऊल दूर आहोत. भारतालाही आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे   तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या लढ्यात यशस्वी होईल.

भारताला आत्मनिर्भर बनणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक  आहे ते देशासाठी देखील आवश्यक आहे.  म्हणूनच मला विश्वास आहे ,भारत हे स्वप्न साकार करू शकेल. या देशाच्या नागरिकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, देशाच्या प्रतिभेचा अभिमान आहे, मला देशाच्या युवकांमधील, महिलांमधील  सामर्थ्यावर विश्वास आहे. भारताची विचारसरणी, दृष्टिकोन यावर विश्वास आहे.  इतिहास साक्ष आहे. भारत जे ठरवतो ते करून दाखवतो. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारत-बाबत  जगाला उत्सुकता आहे

भारताकडून अपेक्षा आहेत. म्हणूनच या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला पात्र बनवणे खूप आवश्यक आहे. स्वतःला तयार करणे आवश्यक आहे. भारतासारखा विशाल देश, युवा शक्तीने भरलेला देश,  आत्मनिर्भर भारताची पहिली अट असते, आत्मविश्वासाने भरलेला भारत , त्याचा हाच पाया असतो. आणि त्यातच  विकासाला नवी ऊर्जा देण्याचे सामर्थ्य असते. भारत विशेष परिवारांच्या संस्कारानी  वाढलेला आहे. जे वेद म्हणायचे ‘वसुधैव  कुटुंबकम’ तर विनोबाजी भावे  म्हणायचे  ‘जय जगत’. म्हणूनच जग हे आपल्यासाठी एक कुटुंब आहे. म्हणूनच आर्थिक विकास देखील  व्हायला हवा आणि त्याचबरोबर  मानव आणि मानवतेचे महत्व असायला हवे हे लक्षात घेऊनच आपण मार्गक्रमण करत आहोत.

आमच्यासाठी जग एक परिवार आहे म्हणूनच आर्थिक विकासा बरोबरच मानव आणि मानवता ही केंद्रस्थानी राहायला हवी. त्याचे महत्व असायला हवे.आज जग परस्पराशी जोडलेले आहे. आज जग एकमेकावर अवलंबून आहे,म्हणूनच काळाची गरज आहे,की जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासारख्या विशाल देशाचे योगदान वाढले पाहिजे. विश्व कल्याणाप्रती भारताचे कर्तव्य आहे, आणि भारताला आपले योगदान वाढवायचे असेल तर भारताला स्वतःला सशक्त व्हावे लागेल,भारताला आत्म निर्भर व्हावे लागेल,आपल्याला जगाच्या कल्याणासाठीही, स्वतःला सामर्थ्यवान करावेच लागेल.आपली मुळे जेव्हा मजबूत असतील, आपले सामर्थ्य असेल तेव्हा आपण जगाचे कल्याण करण्याच्या दिशेने पावले उचलू शकतो. आपल्या देशात अथांग नैसर्गिक संपत्ती आहे,काय नाही आपल्याकडे, आज काळाची गरज आहे की आपल्या या नैसर्गिक संपत्तीमध्ये आपण मूल्यवर्धन करायला हवे,आपण आपल्या मानव संपदेत मूल्यवृद्धी करायला हवी,नवी शिखरे गाठायला हवीत आपण कुठपर्यंत कच्चा माल विदेशात पाठवत राहणार आहोत… कच्चा माल विदेशात पाठवायचा आणि तयार माल देशात परत आणायचा ? हा खेळ कधीपर्यंत चालणार ? आणि म्हणूनच आपल्याला आत्म निर्भर व्हायचे आहे. आपल्या प्रत्येक शक्तीवर, जागतिक आवश्यकते अनुसार मूल्यवृद्धी करायची आहे,ही आपली जबाबदारी आहे हे मूल्यवर्धन करण्याच्या दिशेने आपल्याला पुढे जायचे आहे. जगासाठी योगदान देण्यासाठी आम्ही पुढे जाऊ इच्छितो. त्याच प्रकारे कृषीक्षेत्र. एक काळ होता जेव्हा आपण बाहेरून गहू मागवून आपला उदरनिर्वाह करत होतो, मात्र आपल्या देशाच्या शेतकऱ्यानी कमाल करून दाखवली, भारत आज कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर भारत झाला आहे.आज भारताचा शेतकरी, भारताच्याच नागरिकांचे पोट भरतो असे नव्हे तर आज भारत अशा स्थितीमध्ये आहे की जगात ज्याला आवश्यकता आहे त्यालाही आपण अन्न देऊ शकतो. आपली ही शक्ती आहे, आत्म निर्भरतेचीही ही ताकद आहे, आपल्या कृषी क्षेत्रातही मूल्यवृद्धी आवश्यक आहे.जागतिक आवश्यकतेनुसार आपल्या कृषी जगतात बदलाची आवश्यकता आहे

आज देश अनेक महत्व पूर्ण पावले उचलत आहे.  आपण अंतराळक्षेत्र खुले केले, देशाच्या युवकांना संधी मिळाली, देशाच्या  कृषी क्षेत्राला कायद्यातून मुक्त केले,बंधनातून मुक्त केले,आम्ही आत्म निर्भर व्हायचा प्रयत्न केला आहे. भारत अंतराळ क्षेत्रात सामर्थ्यवान बनतो तेव्हा शेजाऱ्याना त्याचा नक्कीच लाभ मिळतो. आपण जेव्हा उर्जा क्षेत्रात सामर्थ्यवान होतो तेव्हा जो देश आपला अंधकार नष्ट करू इच्छितो, भारत त्याच्या  मदतीसाठी येऊ शकतो. देशाच्या आरोग्य पायाभूत सुविधा क्षेत्र आत्म निर्भर होते तेव्हा जगातल्या अनेक देशांना पर्यटन, आरोग्य विषयक स्थान म्हणून, भारत पसंतीचे स्थान होऊ शकतो.  म्हणूनच आपल्याला आवश्यक आहे, की आपण भारतात निर्मिती झालेल्या वस्तूंची  संपूर्ण जगात वाहवा होईल. एक काळ होता, आपल्या देशात ज्या वस्तू निर्माण होत होत्या, आपल्या स्टीलमन शक्ती   द्वारा जे काम होत होते,त्याची जगात प्रशंसा होत होती,इतिहास याला साक्ष आहे. आपण आत्म निर्भरतेबाबत बोलतो तेव्हा, केवळ आयात कमी करणे इतकाच आपला विचार नाही, आत्म निर्भरते विषयी बोलतो तेव्हा, आपले हे जे कौशल्य आहे,मानव संसाधनांचे सामर्थ्य आहे, जेव्हा वस्तू बाहेरून येऊ लागतात, तेव्हा त्याचे सामर्थ्य नष्ट होऊ लागते.पिढी पासून  नष्ट होऊ लागते. आपल्याला आपले हे सामर्थ्य टिकवायचेही आहे आणि वाढवायचेही आहे.कौशल्य वाढवायचे आहे.सृजनशीलता   वाढवायची आहे, आणि त्यासह आपल्याला पुढे जायचे आहे. कौशल्य विकासाच्या दिशेने आपल्याला भर द्यायचा आहे. आत्म निर्भर भारतासाठी आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी.

माझ्या प्रिय भारतवासियांनो,

मी जाणतो की मी जेव्हा आत्मनिर्भर होण्याबाबत बोलतो तेव्हा, अनेक शंका व्यक्त केल्या जातात, मी मानतो, की आत्म निर्भरभारता साठी लाखो आव्हाने आहेत, जग जेव्हा स्पर्धेच्या वळणावर आहे तेव्हा आव्हाने वाढूही शकतात, मात्र देशा समोर जेव्हा लाखो आव्हाने आहेत, तर देशाकडे त्यावर तोडगा सांगणाऱ्या करोडो शक्तीही आहेत. माझे देशवासीही आहेत जे तोडगा काढण्याचे सामर्थ्ये देतात. आता पहा कोरोना संकट काळात आपण पाहिले अनेक बाबीसाठी आपण कठीण काळात आहोत, आपल्या देशाच्या युवकांनी,उद्योजकांनी आपल्या देशाच्या उद्योग जगताने विडा उचलला, ज्या देशात एन -95 निर्माण होत नव्हता, निर्माण होऊ लागले, पीपीई बनत नव्हते, ते तयार होऊ लागले, व्हेंटीलेटर  बनत नव्हते आता तयार होऊ लागले, देशाच्या आवश्यकतेची पूर्तता तर झालीच त्याच बरोबर जगात निर्यात करण्याची आपली ताकद  निर्माण झाली. जगाची आवश्यकता होती, आत्मनिर्भर भारत जगाला कशी मदत करू शकतो हे आपण आज पाहू शकतो, म्हणूनच जगाच्या कल्याणासाठी योगदान देण्याची भारताची जबाबदारी आहे. स्वतंत्र भारताची मानसिकता काय असली पाहिजे, स्वतंत्र भारताची मानसिकता असली पाहिजे, व्होकल फॉर लोकल, आपली जी स्थानिक उत्पादने आहेत त्याचे आपण गुणगान करायला हवे. आपण आपल्याच वस्तूंचे गुणगान  करणार नाही, तर त्यांना चांगले बनण्यासाठी संधीही मिळणार नाही.त्यांची हिम्मत वाढणार नाही,चला आपण सर्वजण मिळून संकल्प करूया स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्ष च्या पर्वाकडे वाटचाल करत आहोत तेव्हा व्होकल फॉर लोकल हा जीवन मंत्र करूया. सर्व मिळून भारताच्या या सामर्थ्याला प्रोत्साहन देऊया.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आपला देश काय कमाल करतो कसा पुढे जातो,हे आपण जाणतो.कोणी   विचार करू शकत होते का , की  कधी गरिबांच्या जन धन खात्यात लाखो करोडो रुपये थेट हस्तांतरित होऊ शकतात, शेतकऱ्याच्या कल्याणासाठी एपीएमसी सारख्या कायद्यात इतके बदल आणले जाऊ शकतात, कोणी   विचार करू शकत होते का , की  आपल्या व्यापाऱ्या वर लात्क्ती तलवार होती,अत्यावश्यक सेवा कायदा, इतक्या वर्ष नंतरत्यातही बदल होईल, कोणी   विचार करू शकत होते का , की  आपले अंतराळ क्षेत्र आपल्या युवकांसाठी खुले केले जाईल,आज आपण पाहत आहोत की राष्ट्रीय  शैक्षणिक धोरण असो, एक देश एक रेशन कार्ड असो,एक देश एक ग्रीड असो, नादारी आणि दिवाळखोरी विषयीचा  कायदा असो, बँकांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न असो, देशाची सच्चाई बनली आहे. भारतात परिवर्तनाच्या या कालखंडात सुधारणांच्या परिणामांना जग पाहत आहे. एका पाठोपाठ एक ,एकमेकांशी जोडलेल्या  आपण ज्या सुधारणा करत आहोत, त्या जग अतिशय बारकाईने पाहत आहे,त्याचेच कारण आहे गेल्या वर्षी भारतात थेट परकीय गुंतवणुकीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. गेल्या वर्षीभारतात एफडीआय मध्ये अठरा टक्के वृद्धी झाली आहे.म्हणूनच कोरोना काळातही जगातल्या मोठ्या कंपन्या भारताकडे वळत आहेत. हा विश्वास असाच निर्माण झाला नाही.जग असेच मोहित झाले नाही, त्यासाठी भारताने आपल्या धोरणावर, भारताने आपल्या लोकशाहीवर,भारताने आपल्या अर्थ व्यवस्थेच्या पायाच्या मजबुतीवर जे काम केले आहे त्यामुळे हा विश्वास निर्माण झाला आहे.जगातले अनेक व्यावसाय भारताला साखळी पुरवठा केंद्र म्हणून पाहत आहेत. आता आपल्याला मेक इन इंडियाच्या बरोबरीने मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. 130 कोटी देश वासियांचे सामर्थ्य जेव्हा एकाच वेळेत कोरोनाच्या या काळात एकीकडेपूर्वेकडे चक्री वादळ पश्चिमेकडे चक्री वादळ , वीज कोसळून अनेक मृत्यू झाल्याच्या बातम्या, कुठे वारंवार भू स्खलन झाल्याच्या घटना, छोटे मोठे भूकंप धक्के, हे कमी म्हणून की काय आपल्या शेतकर्यांना टोळ धाडीचा सामना करावा लागला एका पाठोपाठ संकटे येत गेली,मात्र देशाने आपला विश्वास गमावला नाही. देश आत्म विश्वासाने पुढे जात राहिला. देश वासीयांच्या जीवनाला, देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोंनाच्या प्रभावातून लवकरात लवकर बाहेर काढण्याला आमचे प्राधान्य आहे. यात महत्वाची भूमिका राहील नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईप लाईन प्रकल्पाची यावर एकशे दहा लाख कोटी त्यापेक्षा जास्त खर्च केला जाईल. त्यासाठी वेग वेगळ्या क्षेत्रात सुमारे सात हजार प्रकल्पांची  निवड करण्यात आली आहे. यातून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल एक नवी गती मिळेल. संकट काळात जितक्या पायाभूत सुविधा बळकट केल्या जातील तितक्या आर्थिक घडामोडी वाढतात, लोकांना रोजगार मिळतो,काम मिळते त्याच्याशी सबंधित काम मिळते,छोटे मोठे उद्योग, शेतकरी प्रत्येक वर्गाला याचा मोठा लाभ होतो.आज मी एका बाबीचे स्मरण करू इच्छितो,जेव्हा अटल बिहारी वाजपेयी आपल्या देशाचे पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी सुवर्ण चतुर्भुज ही दूरगामी योजना  सुरु केली होती. देशाचे रस्ते जाळे आधुनिक करण्याकडे नेले होते. आजही सुवर्ण चतुर्भुज योजने कडे देश अभिमानाने बघत आहे. आपला हिंदुस्थान बदलत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

अटलजींनी आपल्या काळात हे काम केले आता आपल्याला ते पुढे न्यायचे आहे.आपण आता कप्प्यात राहू शकत नाही. रस्त्याचे काम रस्त्यात जाईल, रेल्वेचे रेल्वेत जाईल, रेल्वेचा रस्त्याशी सबंध नाही,विमान तळाचा बंदराशी संबंध  नाही, बस स्थानकाचा रेल्वेची संबंध  नाही,अशी स्थिती चालणार नाही. आपल्या पायाभूत सुविधा सर्वंकष असाव्यात, एकीकृत असाव्यात एकमेकाशी पूरक असाव्यात रेल्वेशी  रस्ता पूरक आहे,रस्त्याशी बंदर पूरक, नव्या शतकासाठी आपल्याला मल्टी मोडल पायाभूत  सुविधा जोडण्यासाठी आपण पुढे जात आहोत. हा नवा आयाम राहील. मोठे स्वप्न घेऊन यावर काम सुरु केले आहे,मला विश्वास आहे, हे कप्पे संपुष्टात आणून आपल्या सर्व व्यवस्थेला नवी ताकद देतील.याच्या बरोबरीने आपले सागर किनारे, जागतिक व्यापारात समुद्र किनाऱ्याचे  स्थान महत्वाचे आहे. आपण बंदर केन्द्री विकास घेऊन चालतो तेव्हा येत्या काळात आपण समुद्री किनारी भागात चार पदरी रस्ते करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधेच्या दिशेने काम करू.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आपल्या शास्त्रात एक महत्वाची बाब सांगितली आहे, सामर्थ्य्मूलंस्‍वातंत्र्यंश्रममूलं च वैभवम्’ म्हणजे  कोणत्याही समाजाचा, कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा स्रोत म्हणजे त्याचे सामर्थ्य आणि त्याचे वैभव, उन्नती, तसेच प्रगतीचा स्रोत म्हणजे त्याची श्रमशक्ती होय. म्हणूनच सामान्य नागरिक, मग तो शहरातील असो किंवा गावातील. त्याच्या मेहनतीला तोड नाही. मेहनतीने जेव्हा समाजाला सुविधा मिळतात, जीवनातील दररोजच्या अडचणींचा संघर्ष जेव्हा कमी होतो तेव्हा त्याची ऊर्जा, त्याची शक्ती अधिक प्रभावशाली होते, अचंबित करते. गेल्या सहा वर्षांमध्ये देशातील मेहनत मजुरी करणाऱ्या लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी विविध गावांमध्ये अनेकविध योजना राबविल्या गेल्या आहेत. आपण पाहू शकता; बँक खाते असो, पक्क्या घरांचा प्रश्न असो, मोठ्या प्रमाणावर शौचालयांची निर्मिती असो, घरोघरी वीज जोडणी देण्याची बाब असो, माता भगिनींची धुरापासून सुटका करण्यासाठी गॅस जोडणी देणे असो, गरिबातील गरिबाला विमा कवच देण्याचा प्रयत्न असो, चांगल्यातल्या चांगल्या रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी असलेली आयुष्मान भारत योजना असो, शिधावाटप दुकानांना तंत्रज्ञानाने जोडण्याचा मुद्दा असो;  प्रत्येक गरीबापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत कोणत्याही भेदभावाशिवाय पूर्ण पारदर्शकतेने लाभ पोहोचविण्यात गेल्या सहा वर्षात खूप प्रगती झाली आहे. कोरोनाच्या संकट काळातही या योजनांद्वारे खूप मदत झाली आहे. या कालावधीत कोट्यवधी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पोहचवणे, शिधापत्रिका असो वा नसो 80 कोटीहून जास्त  देशबांधवांच्या घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी, 80 कोटी देशबांधवांना मोफत अन्नधान्य पुरविण्याचे काम असो, 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकेत थेट लाभ हस्तांतरण   असो, या गोष्टीचा  काही वर्षांपूर्वी आपण विचार पण  करू शकत नव्हतो; कल्पनाच करू शकत नव्हतो कि दिल्लीहून मदत म्हणून दिलेले पैसे गरिबांच्या खात्यात शंभर टक्के जमा होतील. हे यापूर्वी अशक्यप्राय वाटत होते. आपल्याच गावात रोजगारासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आले आहे. श्रमिक बांधव स्वतःची कौशल्ये विकसित करतील, नवीन कौशल्ये आत्मसात करतील यावर विश्वास दाखवत, श्रमशक्तीवर विश्वास ठेवून, गावातील साधनसामुग्रीवर भरवसा ठेवून आम्ही स्वदेशीचा बोलबाला करीत (व्होकल फॉर लोकल) कौशल्ये नव्याने शिकून, कौशल्य विकासाद्वारे देशातील गरिबांच्या उन्नतीसाठी, आमच्या श्रमशक्तीला सक्षम करण्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आर्थिक व्यवहारांचे केंद्र शहर असल्यामुळे गावातून दूरवरून लोक शहरात येतात त्यामुळे शहरांमध्ये जे श्रमिक आहेत, मग ते रस्त्यावरील फेरीवाले असोत, रेल्वे रूळांवरील असोत, बँकेतून त्यांना थेट पैसे देण्याची योजना सुरु आहे. लाखो लोकांनी इतक्या कमी कालावधीत या कोरोना परिस्थितीतही याचा लाभ घेतला आहे. आता त्यांना कुठूनही जास्त व्याजाने खाण्यापिण्यासाठी पैसे घेण्याची गरज पडणार नाही. बँकेतून तो स्वतः अधिकाराने पैसे काढू शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा शहरांमध्ये श्रमिक येतात तेव्हा त्यांच्या वास्तव्याची सोय झाली तर त्यांच्या  कार्यक्षमतेतही वाढ होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन शहरात त्यांच्यासाठी आम्ही निवास व्यवस्थेची मोठी योजना आखली आहे ज्याद्वारे जेव्हा श्रमिक शहरात येईल तेव्हा तो त्याच्या कामासाठी, मोकळ्या मनाने आत्मविश्वासाने बाहेर पडेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

हे पण बरोबर आहे कि विकासाच्या या यात्रेत आपण बघितले असेल कि समाज जीवनात कोणी मागासलेले राहते, गरिबीतून बाहेर पडू शकत नाही, राष्ट्र जीवनातही काही क्षेत्र असतात, काही भूभाग असतात, काही प्रदेश असतात जे विकासात मागे पडतात. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी आम्हाला संतुलित विकास आवश्यक आहे आणि आम्ही 110 पेक्षा जास्त आकांक्षीत जिल्हे निवडले आहेत ते 110 जिल्हे जे  सरासरीपेक्षा सुद्धा मागासलेले आहेत त्यांना राज्याच्या राष्ट्राच्या सरासरी स्तरावर आणायचे आहे. सर्व बाबींचा सर्वार्थाने विचार  करायचा आहे. सर्वाना चांगले शिक्षण, चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी तेथील लोकांना रोजगाराच्या स्थानिक संधी उपलब्ध होण्यासाठी या सर्वांसाठी हे सर्व जे एकशे दहा मागासलेले आकांक्षीत जिल्हे आहेत त्यांना पुढे नेण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरु आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आत्मनिर्भर भारताची महत्वपूर्ण प्राथमिकता म्हणजे आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर किसान. याकडे अजूनही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. शेतकऱ्यांना, मागील काळात आपण पाहिले आहे एकापाठोपाठ एक सुधारणा स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या काळाने केल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना अगणित बंधनातून मुक्त करण्याचे काम आम्ही केले आहे. आपण विचारही करू शकत नाही कि आपल्या देशात तुम्ही अगदी साबण बनवत असाल तर हिंदुस्थानच्या दुसऱ्या कोपऱ्यात  जाऊन तो साबण विकू शकता, तुम्ही कपडे बनवत असाल तर देशाच्या कोणत्याही भागात जाऊन कपडे विकू शकता. तुम्ही साखर तयार केली तर तीसुद्धा विकू शकता मात्र माझा शेतकरी ज्याची खूप लोकांना कल्पनाही नसेल; आपल्या देशातील शेतकरी त्याचे उत्पादन त्याच्या मर्जीनुसार विकू शकत नव्हता, त्याला जिथे शेतमाल विकायचा आहे तिथे विकू शकत नव्हता; त्याला आखून दिलेल्या मर्यादेतच तो उत्पादन विकू शकत होता. त्याला या बंधनातून आम्ही मुक्त केले आहे. आता हिंदुस्थानातील शेतकरी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकेल कारण आता तो देशातीलच काय पण जगातही कोणत्याही कानाकोपऱ्यात त्याचा माल त्याच्या हिमतीवर विकू शकतो. आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांवरही भर दिला आहे. त्याच्या शेतीकामात निविष्ठांचा खर्च कमी करण्यासाठी, डिझेल पंपातून मुक्ती देण्यासाठी त्याला सौर पंप देण्यासाठी, अन्नदाता उर्जदाता बनविण्यासाठी, मधमाशीपालन असो, मत्स्यपालन, कुक्कुटपालन असे अनेक उपक्रम त्यासोबत जोडले जाऊन त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने काम करीत आहोत. आमचे कृषिक्षेत्र आधुनिक बनले पाहिजे ही आजच्या काळाची गरज आहे. किंमत वाढण्यासाठी, मूल्यवर्धन होण्यासाठी, शेतीप्रक्रिया असो, वेष्टनाची प्रक्रिया असो त्याला सांभाळण्याची प्रक्रिया असो यासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची गरज आहे.

आपण पाहिले असेल कि या कोरोना कालखंडात मागील काही दिवसात एक लाख कोटी रुपये कृषी पायाभूत सुविधांसाठी भारत सरकारने वितरित केले आहेत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी ज्या पायाभूत सुविधा असतील त्याद्वारे शेतकरी त्याच्या मालाचे मूल्य प्राप्त करू शकतो, जागतिक बाजारात त्याचे उत्पादन विकू शकतो. जागतिक बाजारात त्याचा वावर वाढेल. आज आम्हाला ग्रामीण उद्योग मजबूत करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात विशिष्ट उद्देशाने आर्थिक क्लस्टर तयार केले जातील. कृषी आणि बिगर कृषी उद्योगांना गावात एक यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवीन एफपीओ म्हणजेच कृषी उत्पादक संघटना बनवायचा जो आम्ही प्रयत्न केला आहे त्याद्वारे आर्थिक सबलीकरणाचे  काम होईल.

बंधू, भगिनींनो मी मागच्या वेळी इथे जलजीवन अभियानाची घोषणा केली होती आणि आज त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. मी आज अभिमानाने सांगू शकतो कि आम्ही जे स्वप्न पाहिले आहे कि पिण्याचे शुद्ध पाणी, नळाद्वारे पाणीपुरवठा आमच्या देशबांधवांना मिळाला पाहिजे. आरोग्याच्या तक्रारींच्या उपाययोजनासुद्धा शुद्ध पाण्याशी निगडित आहेत. अर्थव्यवस्थेतही त्याचे मोठे योगदान असते. त्यादृष्टीने जल जीवन अभियान सुरु करण्यात आले. आज मला समाधान आहे कि प्रत्येक दिवशी आम्ही एक लाखाहून अधिक घरांमध्ये, दररोज एक लाखाहून अधिक घरांमध्ये, पाणी पोहचवीत आहोत; नळाद्वारे पाणीपुरवठा करीत आहोत. गेल्या एक वर्षात दोन कोटी कुटुंबांना पाणीपुरवठा करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. विशेष करून जंगलात दूरवर राहणाऱ्या आमच्या आदिवासींच्या घरापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे अभियान सुरु आहे. मला आनंद आहे कि आज जल जीवन अभियानाद्वारे अभियानाद्वारे देशात निकोप स्पर्धेचे वातावरण निर्माण केले आहे. जिल्ह्या- जिल्ह्यांमध्ये ही निकोप स्पर्धा सुरु आहे. शहरांमध्ये ही स्पर्धा सुरु आहे, राज्या राज्यांमध्ये निकोप स्पर्धा होत आहे. प्रत्येकाला वाटत आहे कि पंतप्रधानांचे हे जल जीवन अभियानाचे स्वप्न आपापल्या स्तरावर पूर्ण करावे. सहकारी, सार्वभौमत्वाला नवी ताकद या जल जीवन अभियानाद्वारे प्राप्त झाली आहे. त्याच्या साथीने आम्हीही पुढे जात आहोत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

कृषी क्षेत्र असो, लघु उद्योग क्षेत्र असो किंवा आमचा नोकरदार वर्ग असो हे साधारण सर्वच लोक भारताच्या मध्यमवर्गाचा हिस्सा आहेत आणि या मध्यमवर्गातून तयार झालेले व्यावसायिक आज जगात आपले नाव गाजवीत आहेत. मध्यमवर्गातून आलेले आमचे डॉक्टर, वकील, इंजिनिअर,  वैज्ञानिक सर्वच जण जगात आपली ओळख निर्माण करीत आहेत. म्हणूनच ही गोष्ट खरी आहे कि मध्यमवर्गाला जितक्या संधी मिळतात त्यापेक्षा कैकपटीने तो आपली छाप पाडतो यासाठी मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपापासून मुक्ती हवी आहे , त्यांना नवीन संधी हव्या आहेत, खुले मैदान हवे आहे आणि आमचे सरकार मध्यमवर्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. अद्भुत गोष्टी करण्याची ताकद मध्यमवर्गात असते. सुलभ जीवनाचा लाभ कोणाला होणार असेल तर तो आमच्या मध्यमवर्गाला सर्वाधिक होणार आहे. इंटरनेटची बाब असो, स्वस्त स्मार्ट फोनचा मुद्दा असो, उडान योजनेद्वारे विमानाची तिकिटे स्वस्त होण्याची गोष्ट असो, आमचे महामार्ग असोत, दूरसंचार मार्ग असो या सर्व गोष्टी मध्यमवर्गीयांची ताकद वाढविणाऱ्या आहेत. आज तुम्ही बघत असाल कि मध्यमवर्गीयांमध्ये जे गरिबीतून वर आले आहेत त्यांचे पहिले स्वप्न असते ते त्याचे स्वतःचे घर असावे. सुखासमाधानाचे आयुष्य असावे असे त्याला वाटते. देशात आम्ही मोठे काम केले ते ईएमआय क्षेत्रात. कारण गृहकर्ज स्वस्त झाली आणि जेव्हा कोणी घरासाठी कर्ज घेतो तेव्हा कर्जाची प्रतिपूर्ती करताना सुमारे सहा लाख रुपयांची सूट त्याला मिळते. इतकेच नाही मागील दिवसात लक्षात आले कि प्रत्येक गरीब मध्यमवर्गीय कुटुंबाने पैसे गुंतविले आहेत मात्र गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण न झाल्या कारणाने त्यांना स्वतःचे घर मिळत नाही, भाडे भरावे लागत आहे, त्यासाठी भारत सरकारने  पंचवीस हजार कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करून अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करून मध्यमवर्गीयांना घरे उपलब्ध होण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. खूप वेगाने कर कमी झाले आहेत, आयकर कमी झाला आहे. आज  किमान व्यवस्थांद्वारे आम्ही देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत.

सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेशी जोडणे म्हणजे मध्यमवर्गीयांच्या पैशाना हमीद्वारे जोडण्याची योजना आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात झालेल्या सुधारणा झाल्या आहेत, कृषी क्षेत्रात ज्या सुधारणा झाल्या आहेत त्यांचा थेट लाभ आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळणार आहे त्यामुळे हजारो कोटी रुपयांचा विशेष निधी आज जो आमच्या व्यापारी वर्गाला, आमच्या लघु उद्योजकांना लाभ मिळवून देणार आहे. सर्वसाधारण भारतीयांची ताकद, त्याची ऊर्जा आत्मनिर्भर भारत अभियानाचा मोठा आधार आहे. ही ताकद कायम ठेवण्यासाठी सातत्याने काम सुरु आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात, आधुनिक भारताच्या निर्मितीत, नव्या भारताच्या निर्माणात, समृद्ध आणि सुखी भारताच्या निर्मितीत देशाच्या शिक्षण पद्धतीचे मोठे महत्व आहे. याच विचाराने देशाला तीन दशकानंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

हिंदुस्थानच्या प्रत्येक कोपऱ्यात याच्या स्वागताच्या बातम्या नवी ऊर्जा, नवा विश्वास देत आहेत. हे शिक्षण, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमच्या विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टींशी जोडेल मात्र त्याचबरोबरीने त्याला जागतिक स्तरावर नागरिक बनण्याचे सामर्थ्य प्रदान करेल. विद्यार्थी त्याच्या मूलभूत गोष्टींशी जोडलेला असेल तरी त्याचे कर्तृत्व आभाळ गवसणारे असेल. आज आपण पाहिले असेल कि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एक विशेष भर देण्यात आला आहे तो राष्ट्रीय संशोधन संस्थेवर. देशाला प्रगती करण्यासाठी नवोन्मेषाची गरज असते. नावीन्यतेला, संशोधनाला जेव्हढी बळकटी मिळेल तेवढेच देशाला पुढे जाण्यासाठी, स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी खूप ताकद मिळेल. आपण विचार केला होतात का कि कधी इतक्या वेगाने गावापर्यंत ऑनलाईन क्लासचे वातावरण तयार होईल.कधी कधी संकटातही काही अशा गोष्टी नव्याने समोर येतात ज्या नवीन ताकद देतात. म्हणूनच आपण बघितले असेल कि कोरोना काळात ऑनलाईन क्लासेस ही एक प्रकारची संस्कृती तयार झाली आहे. ऑनलाईन व्यवहारही वाढत आहेत.        

‘भीम यूपीआय’ च्या माध्यमातून एक महिन्यामध्ये तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार अवघ्या एक महिन्यात झाले आहेत. याचा कोणालाही गर्व वाटेल. भारतासारख्या देशामध्ये भीम यूपीआयने तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार झाले आहेत. याचाच अर्थ आपण बदललेल्या स्थितीला स्वीकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत, याचेच हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण पाहिले असेल 2014च्या आधी पाच डझन फक्त पाच डझन पंचायतीमंध्ये ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या होत्या. गेल्या पाच वर्षामध्ये सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे लक्ष्य निश्चित करून आम्ही काम सुरू केले. ज्या एक लाख पंचायतींचे काम बाकी राहिले आहे, तिथेही अतिशय वेगाने काम सुरू करण्यात आले आहे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. सर्व गावांची अगदी लहान लहान गावांची भागीदारीही डिजिटल भारताच्या दृष्टीने महत्वाची आहे. गावांना डिजिटल करणे आता अनिवार्य बनले आहे. गावातल्या लोकांनाही अशा प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांच्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेवून, आम्ही पहिल्यांदा जो कार्यक्रम बनविला होता. तो पंचायतपर्यंत आधी पोहोचविणार आहे. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की, आमची जी सर्वच्या सर्व सहा लाख गावे आहेत, त्या सर्व गावांपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क पोहोचविण्यात येत आहे. गरज पडली म्हणून आम्ही आमच्या कामांचे प्राधान्यक्रमही बदलले आहेत. सहा लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये हजारो-लाखो किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे आणि आम्ही निश्चित केले आहे की, एक हजार दिवसांमध्ये, एक हजार दिवसांच्या आत देशातल्या सहा लाखांपेक्षा जास्त गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काम पूर्ण करण्यात येईल.

काळाप्रमाणे बदलत चाललेले तंत्रज्ञान लक्षात घेवून सायबर स्पेस या क्षेत्रावर आपल्याला जास्तीत जास्त निर्भर रहावे लागणार आहे. परंतु सायबर स्पेसबरोबर अनेक धोकेही जोडूनच येतात. हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घेतले आहे. यामुळे आपल्या देशाचे सामाजिक ताणे-बाणे, आपल्या देशाची अर्थव्यवस्था, आणि आपल्या देशाच्या विकास कामांमध्ये धोके निर्माण करण्याचा, बाधा आणण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. अशा सर्व गोष्टींविषयी भारत अतिशय सतर्क आहे. आणि या धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेले योग्य निर्णयही घेत आहे. इतकेच नाही, तर नवीन व्यवस्थाही निरंतर विकसित करण्यात येत आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये नवीन सायबर सुरक्षा रणनीतीचा एक संपूर्ण आराखडा देशाच्या समोर मांडण्यात येईल. आगामी काळामध्ये संबंधित सर्व संस्थांना, घटकांना जोडून आपल्याला सायबर सुरक्षेअंतर्गत सर्वांना एकसाथ जावे लागणार आहे; त्यासाठी रणनीती बनवण्यात येत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

भारतामध्ये महिला शक्तीला ज्या ज्यावेळी संधी मिळाली, त्या त्यावेळी त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देशाला बळकट केले आहे. महिलांना स्वरोजगार आणि रोजगार मिळावा, त्यांना समान संधी मिळावी, यासाठी आज देश कटिबद्ध आहे. आज भारतामध्ये महिला अगदी जमिनीखाली जावून खनिजांच्या खाणींमध्ये जावूनही काम करीत आहेत. तसेच आज माझ्या देशाच्या कन्या लढावू विमानेही मोठ्या दिमाखात आकाशात घेवून जात आहेत. ज्या देशातल्या महिलांना लढावू वैमानिक बनण्याची संधी दिली जाते, आज भारतही दुनियेतल्या अशा काही विशिष्ट देशांमध्ये सहभागी आहे. गर्भवतींना वेतनाबरोबरच सहा महिन्यांची सुट्टी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. अशीच गोष्ट मुस्लिम भगिनींची आहे. आमच्या देशात तीन तलाकच्या कारणाने अनेक महिलां पीडीत झाल्या आहेत. त्यांची या त्रासातून सुटका करण्याचे काम आम्ही केले. महिलांच्या हातात आर्थिक सत्ता यावी, यासाठीही प्रयत्न केले. जे 40 कोटी जनधन खाते उघडण्यात आले, त्यापैकी 22 कोटी बँक खाती ही आमच्या भगिनींची आहेत. कोरोना काळामध्ये जवळपास 30हजार कोटी रूपये, या माता-भगिनींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. मुद्रा कर्ज- जवळपास 25 हजार कोटींचे मुद्रा कर्ज देण्यात आले आहे.  यापैकी 70 टक्के मुद्रा कर्ज घेणा-या आमच्या माता- भगिनी आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेनुसार त्यांना स्वतःचे घर मिळत आहे. विशेष म्हणजे, त्या घरांची नोंदणीही त्या महिलांच्याच नावाने केली जात आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

देशातल्या गरीबातल्या गरीबाच्या आरोग्याची चिंताही सरकारला आहे. यासाठी हे सरकार निरंतर काम करीत आहे. आम्ही जनौषधी केंद्राच्या माध्यमातून अवघ्या एक रूपयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले आहेत, यासाठी खूप मोठे काम केले आहे. देशभरातल्या सहा हजार जनौषधी केंद्रांमार्फत गेल्या अगदी अल्प काळावधीमध्ये जवळपास पाच कोटींपे़क्षा सॅनिटरी पॅड आमच्या या गरीब महिलांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. कन्या- मुली यांच्यामध्ये असलेले कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, त्यांच्या विवाहाचे वय किती असावे, यासाठी आम्ही अभ्यास, संशोधन करणारी समिती बनविली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर लगेचच कन्यांच्या विवाहासाठी विशिष्ट वय निश्चित करण्याविषयी  योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

कोरोनाच्या काळामध्येही आरोग्य या क्षेत्राकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच आत्मनिर्भरतेचा सर्वात मोठा धडा आपल्याला आरोग्य क्षेत्र किती महत्वाचे आहे, याने दिला. आता या क्षेत्रातले लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढे जायचे आहे. आता पहा, कोरोनाच्या प्रारंभीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये  चाचणी प्रयोगशाळा कार्यरत नव्हत्या. आज देशभरामध्ये 1400 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये आता कोरोनाची चाचणी होवू शकते. ज्यावेळी कोरोनाचे संकट आले, त्यावेळी एका दिवसामध्ये फक्त 300 चाचण्या केल्या जावू शकत होत्या. इतक्या कमी काळामध्ये आमच्या लोंकानी अभूतपूर्व जी शक्ती दाखवली आहे, त्यामुळे आज प्रत्येक दिवशी सात लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत आहेत. पहा कधी आम्ही प्रारंभ 300 पासून केला होता, आणि आता आम्ही सात लाखांपर्यंत पोहोचलो आहोत. देशामध्ये नवीन एम्स, नवीन वैद्यकीय, आरोग्य संस्थांची निर्मिती केली जात आहे, तसेच वैद्यकीय सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी निरंतर  प्रयत्न सुरू आहे. पाच वर्षांमध्ये एमबीबीएस, एमडी मध्ये 45 हजारांपेक्षा जास्त जागांवर विद्यार्थींना प्रवेश देण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये दीड लाखांपेक्षा जास्त ‘वेलनेस सेंटर’ सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी एक तृतीयांश वेलनेस सेंटर तर याआधीच कार्यरत झालेली आहेत. विशेष म्हणजे या केंद्रांची गावातल्या लोकांना कोरोनामध्ये खूप मोठी मदत झाली आहे. कोरोना काळामध्ये वेलनेस सेंटरने अतिशय महत्वाची भूमिका गावांमध्ये निभावली आहे.

आरोग्य क्षेत्रामध्ये आजपासून एक भव्य काम सुरू करण्यात येणार आहे. आणि यामध्ये तंत्रज्ञानाचीही खूप मोठी, महत्वाची भूमिका असणार आहे. आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ म्हणजेच ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’ चा प्रारंभ करण्यात येत आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आज सुरू होत आहे. भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये हे अभियान एक नवीन क्रांती घेवून येणार आहे. कोणालाही औषधोपचार करताना होणार त्रास कमी व्हावा, यासाठी तंत्रज्ञानाची अतिशय उत्तम पद्धतीने मदत घेवून हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आय.डी. म्हणजे ‘आरोग्य ओळखपत्र’ देण्यात येईल. या आरोग्य ओळखपत्रामध्ये प्रत्येकाच्या आरोग्याची माहिती डिजिटल माध्यमातून जमा केली जाईल. प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, तुम्ही कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या, डॉक्टरकडून- कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी काय औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य आय.डी.मध्ये आपल्याला मिळू शकणार आहे. डॉक्टरांनी रूग्णालयात दाखल करण्यास सांगितले असो, पैसे जमा करावे लागणार असो, या सर्व गोष्टींचा तपशील सर्वांना मिळू शकणार आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या माध्यमातून वैद्यकीय विषयक अनेक प्रश्नांतून सुटका मिळू शकणार आहे. यामुळे उत्तम आरोग्य मिळवताना, आमचा प्रत्येक नागरिक अगदी योग्य निर्णय घेवू शकेल. ही व्यवस्था आता देशात लवकरच होणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

ज्यावेळी आता कोरोनाची गोष्ट निघते, त्यावेळी एक गोष्ट स्वाभाविक आहे की, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की, कोरोनाची लस कधी तयार होणार आहे? हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या अगदी संपूर्ण दुनियेमध्ये सर्वांच्या मनामध्ये येत आहे. याविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो की, देशातले आमचे संशोधक कार्य करीत आहेत. आमच्या संशोधकांची प्रतिभा ऋषिमुनींच्या प्रमाणे प्रयोगशाळांमध्ये काम करीत आहे. सर्व संशोधक अगदी जीव लावून कार्यरत आहेत. सर्वजण अखंड, निरंतर तपस्या करीत आहेत. अतिशय कठोर परिश्रम करीत आहेत. आणि भारतामध्ये एक नाही, दोन नाही, तीन- तीन तीन व्यक्ती, संस्था त्याच्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. संशोधकांकडून ज्यावेळी हिरवा कंदिल दाखवला जाईल, त्यावेळी कोरोनाच्या लशीचे मोठ्या- व्यापक प्रमाणात निर्मितीचे काम केले जाईल. त्यासाठी जी काही तयारी करणे आवश्यक आहे, ती सर्वतोपरी करण्यात आली आहे. अतिशय वेगाने लस निर्माणाचे काम करून ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचविण्याचे येईल. लस कमीत कमी कालावधीमध्ये कशी पोहोचेल, याचाही विचार केला आहे. त्यासाठी आराखडाही अगदी तयार आहे. या कामाची रूपरेखाही तयार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जागी विकासाचे चित्र वेगवेगळे दिसते. काही क्षेत्रे खूप पुढे आहेत. काही क्षेत्रे खूप मागे आहेत. हे असंतुलन आत्मनिर्भर होण्यास बाधा आणते. विकासामध्ये असलेले हे अतिशय महत्वाचे,मोठे आव्हान आपण मानू शकतो. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मी प्रारंभी म्हणालो, 120 जिल्ह्यांना बरोबर घेवून जायचे आहे. सर्वांना आम्ही विकासामध्ये बरोबरीने घेवून पुढे जावू इच्छितो. यासाठी कनेक्टिव्हिटी सुधारणे, ही आमची प्राथमिकता आहे. आता आपण पहा- हिंदुस्थानच्या पश्चिमी भाग पहा, हिंदुस्थानचा मध्य भाग पहा आणि हिंदुस्थानचा पूर्व भागही पहा. उत्तर प्रदेश असो, ईशान्य भारत, ओरिसा असो,  बिहार असो, बंगाल असो या सर्व आमच्या भागामध्ये अपार संपदा आहे. नैसर्गिक संपदेचे हे भंडार आहेत. इस्टर्न डेडिकेटेड फ्राईट  कॉरिडॉर असो पूर्वेकडील राज्यात गॅस पाईप लाईन जोडण्याची गोष्ट असो  किंवा नवीन रेल्वे, रोड पायाभूत प्रकल्प उभा करायचा असो , नवीन  बंदर उभारायचे असो म्हणजे पूर्ण  विकासाच्या दृष्टीने  अवसंरचनात्मक प्रकल्प उभा करायचा असल्यास आम्ही पूर्ण ताकदीनिशी तो विकसित करत  आहोत. 

लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याची अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी होती , त्यांची आकांक्षा होती ती आकांक्षा पूर्ण करण्याचे आपण मोठे काम केले आहे. हिमालयाच्या  उंचीत वसलेले लडाख विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. आता केंद्रीय विद्यापीठ तिथे निर्माण होत आहे,  नवीन संशोधन केंद्र बनत आहेत. हॉटेल मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम सुरु झाले आहेत, विजेसाठी साडेसात हजार मेगावॅटची सोलर  पार्कची  योजना बनत आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

लडाखची अनेक वैशिष्ट्य आहेत ती आपल्याला सांभाळायची आहेत संवर्धन करायचे आहे. ईशान्य भागात सिक्कीमने आपली सेंद्रिय राज्याची ओळख बनवली, तशीच  लडाख लेह कारगिल हे संपूर्ण क्षेत्र आपल्या देशासाठी कार्बन न्यूट्रल म्हणून ओळख बनवू शकतात. यासाठी भारत सरकार तिथल्या नागरिकांच्या मदतीने एक नमुना स्वरूप , प्रेरणारूप  कार्बन न्यूट्रल आणि ते देखील विकासाचे मॉडेल तिथल्या आवश्यकतांच्या पूर्तीचे मॉडेल बनवण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारताने दाखवून दिले आहे कि पर्यावरणाचे संतुलन  राखत वेगवान विकास शक्य आहे. आज भारत वन वर्ल्ड , वन सन ,  वन ग्रीडच्या कल्पनेसह जगात विशेषतः सौर उर्जेला प्रेरित करत आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या उत्पादनात आज भारताने  जगातल्या पाच अव्वल देशांमध्ये स्थान निर्माण केले आहे. प्रदूषण उपयांबाबत भारत सजग आहे आणि सक्रिय देखील आहे. स्वच्छ भारत अभियान असेल, धूरमुक्त स्वयंपाकाची  गॅस व्यवस्था असेल, एलईडी दिव्यांचे अभियान, सीएनजी आधारित वाहतुकीची व्यवस्था असेल,  इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी प्रयत्न असेल आपण कुठेही कसर सोडली नाही. पेट्रोलपासून प्रदूषण कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर आणि त्याच्या वापरावर भर दिला जात आहे. ५ वर्षांपूर्वी आपल्या देशात इथेनॉलची काय स्थिती होती. पाच वर्षांपूर्वी आपल्या देशात ४० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन  होत होते , आज पाच वर्षात ते पाचपट झाले आहे. आज २०० कोटी लिटर  इथेनॉल बनत आहे. जे पर्यावरणासाठी खूप उपयुक्त आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,  

देशातल्या १०० निवडक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन सह, सर्वांगीण दृष्टिकोनासह लोकसहभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रदूषण कमी करण्यासाठी मिशन मोड पद्धतीने काम करणार आहोत. भारत अभिमानाने म्हणू शकतो कि भारत त्या खूप कमी देशांपैकी एक आहे जिथे जंगलांचा विस्तार होत आहे. आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत संवेदनशील आहे. आपण यशस्वीपणे प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट आपण यशस्वीपणे राबवले आहे. आपल्याकडे वाघांची संख्या वाढली आहे. आगामी काळात आशियाटिक लायन प्रोजेक्ट लायनची सुरुवात होत आहे. प्रोजेक्ट लायन अंतर्गत  भारतीय सिंहांची सुरक्षा , आवश्यक पायाभूत सुविधा, त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे. प्रोजेक्ट लायनवर भर दिला जाईल.  त्याचबरोबर आणखी एका कामावर भर दिला जाणार आहे.  प्रोजेक्ट डॉल्फिन चालवले जाईल. नद्या, समुद्रात राहणाऱ्या दोन्ही प्रकारच्या डॉल्फिनवर  लक्ष केंद्रित केले जाईल., यामुळे जैवविविधतेला बळ मिळेल, आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच पर्यटनाचे आकर्षण बनेल.या दिशेने आपण पुढे जाणार आहोत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,  

जेव्हा आपण एक असाधारण लक्ष्य घेऊन असाधारण प्रवासाला निघतो तेव्हा वाटेत आव्हानांचा भडीमार होतो, आणि आव्हाने देखील असामान्य होतात. इतक्या संकटातही सीमेवरही देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले, मात्र एलओसी ते एलएसी पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिले त्यांना आपल्या सैन्याने , आपल्या वीर जवानांनी त्याना त्यांच्या भाषेत प्रत्त्युत्तर दिले. भारताच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणासाठी संपूर्ण देश एकजुटीने भरलेला आहे, संकल्पाने प्रेरित आहे आणि सामर्थ्यावर अतूट श्रद्धेने पुढे वाटचाल करत आहे. या संकल्पासाठी वीर जवान काय करू शकतात, देश काय करू शकतो हे लडाखमध्ये जगाने  पाहिले आहे.

मी आज मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या त्या सर्व वीर जवानांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन आदरपूर्वक नमन करतो. दहशतवाद असेल किंवा विस्तारवाद असेल, भारत आज निकराने लढा देऊ शकतो.  आज जगाचा भारतावरचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे. काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून १९२ पैकी १८४ देशांनी भारताला पाठिंबा दिला , ही आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जगात आपण कसे संबंध स्थापन केले आहेत त्याचे हे उदाहरण आहे . हे तेव्हा शक्य आहे जेव्हा भारत स्वतः मजबूत असेल, सशक्त असेल .भारत  सुरक्षित असेल.  याच विचाराने आज अनेक कामे केली जात आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आपल्या शेजारी देशांबरोबर मग ते जमिनीने जोडले असतील किंवा सागरी सीमेने, आपल्या संबंधांना आपण  सुरक्षा विकास विश्वासाच्या भागीदारीने जोडत आहोत. भारताचा निरंतर प्रयत्न आहे आपल्या शेजारी देशांबरोबर आपले प्राचीन सांस्कृतिक सामाजिक आर्थिक सम्बन्ध अधिक दृढ करू. दक्षिण आशियात  जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. आपण सहकार्य आणि संवादाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या जनतेच्या समृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करू शकतो. या क्षेत्रातील देशाच्या सर्व नेत्यांची एवढ्या विशाल लोकसंख्येच्या प्रगतीची मोठी जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी दक्षिण आशियातल्या सर्वाना राजकीय नेत्यांना, बुद्धिवंतांना आवाहन करतो, या क्षेत्रात जितकी शांतता नांदेल, सौहार्द असेल, तेवढे ते मानव हिताचे असेल. संपूर्ण जगाचे हित त्यात समाहित आहे.

आज  शेजारी देश केवळ तेच देश नाहीत ज्यांच्याशी  आपल्या  भौगोलिक सीमांचा  संबंध आहे, तर असे  देश  देखील आहेत ज्यांच्याशी  आपली मने जुळतात , नात्यात समरसता असते, मेळ असतो. मला आनंद आहे कि गेल्या काही महिन्यात भारताने विस्तारित शेजारी म्हणून सर्व देशांबरोबर आपले संबंध अधिक मजबूत केले आहेत.  पश्चिमी देशांबरोबर आपल्या राजकीय, आर्थिक , मानवी संबंधाच्या प्रगतीत अनेक पटीने वाढ झाली. विश्वास अनेक पटीने वाढला आहे. या देशांबरोबर आले आर्थिक संबंध विशेषतः ऊर्जा क्षेत्रातली भागीदारी महत्वाची आहे. या सर्व देशात मोठ्या संख्येने भारतीय बांधव काम करत आहेत. ज्याप्रकारे या देशांनी कोरोना संकटाच्या काळात भारतीयांची मदत केली,  भारत सरकारच्या विनंतीचा सन्मान  केला त्यासाठी भारत या सर्व देशांचा आभारी आहे. आणि मी त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. ज्याप्रकारे आपले  पूर्वेचे आसियान देश , जे आपले सागरी शेजारी देश आहेत ते देखील भारतासाठी विशेष महत्वाचे आहेत. त्यांच्याबरोबर भारताचे हजारो वर्ष जुने धार्मिक आणि सांस्कृतिक सम्बन्ध आहेत.  बौद्ध धर्माची परंपरा आपल्याला जोडते. संरक्षण उत्पादनात ‘आत्मनिर्भर भारत’ साठी मोठीं पावले उचलण्यात आली आहेत.

माझ्या  प्रिय देशबांधवांनो,

नुकतीच शंभराहून अधिक सैन्य उपकरणाची आयात रोखण्यात आली आहे. क्षेपणास्त्रपासून हलक्या युद्ध हेलिकॉप्टर पर्यंत, असॉल्ट रायफल पासून ते वाहतूक विमानापर्यंत सर्व ‘मेक इन इंडिया’ असतील. आपले तजस ही आपले तेज, आपली ताकद दाखवण्यासाठी आधुनिक आवश्यकतानुसार सज्ज होत आहे .देशाच्या सुरक्षेत आपल्या सीमा आणि किनारी पायाभूत सुविधांची मोठी भूमिका आहे. आज हिमालयाची शिखरे असोत किंवा हिंदी महासागराची बेटे असोत, प्रत्येक दिशेने कनेक्टिव्हिटी विस्तारावर भर दिला जात आहे, लडाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या देशाची सुरक्षितता लक्षात घेऊन नवे रस्ते तयार करण्यात आले आहेत. 

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आपला इतका मोठा समुद्र किनारा आहे, मात्र त्याच बरोबर आपल्याकडे तेराशेहून अधिक बेटं आहेत. काही निवडक बेटांचे महत्व पाहून त्यांचा वेगाने विकास करण्यासाठी आपण वाटचाल करत आहोत. आपण पाहिले असेल काही दिवसांपूर्वी अंदमान निकोबार मध्ये समुद्रा अंतर्गत ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्पाचे लोकार्पण झाले. अंदमान निकोबारलाही चेन्नई आणि दिल्ली प्रमाणे इंटरनेट सुविधा आता उपलब्ध होईल. आता आपण लक्षद्वीपलाही अशाच पद्धतीने जोडण्यासाठी काम पुढे नेणार आहोत. पुढच्या एक हजार दिवसात लक्षद्वीपलाही वेगवान इंटरनेट सुविधेने जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. सीमा आणि किनारी भागातल्या युवकांचा विकास, त्यालाही सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून , विकासाच्या मॉडेलच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. याच दिशेने एक पाऊल , एक मोठे अभियान आम्ही सुरू करत आहोत. आपले जे सीमा भाग आहेत, जे किनारी भाग आहेत तिथले सुमारे 173 जिल्हे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या देशाची सीमा किंवा समुद्र किनाऱ्याला लागून आहेत, येत्या काळात एनसीसीचा विस्तार त्या सीमा भागातल्या युवकांसाठी करण्यात येईल. सीमा भागात आम्ही सुमारे एक लाख नवे एनसीसीचे कॅडेटस तयार करणार आहोत. आणि त्या मध्ये एक तृतीयांश कन्या असतील यासाठीही प्रयत्न राहील. सीमा भागातल्या कॅडेटसना सैन्यदल प्रशिक्षित करेल. किनारी भागातल्या कॅडेटसना नौदल प्रशिक्षण देईल आणि जिथे हवाई तळ आहे तिथल्या कॅडेटसना हवाई दल प्रशिक्षण देईल. सीमा आणि किनारी भागांना आपत्तीशी तोंड देण्यासाठी एक प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. युवकांना सशस्त्र दला मध्ये करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्यही मिळेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

गेल्या वर्षी लाल किल्यावरून मी सांगितले होते, गेली पाच वर्षे गरजांची पूर्तता आणि पुढची पाच वर्षे आकांक्षांच्या पुर्ततेची आहेत. गेल्या एक वर्षात देशाने अनेक मोठ्या आणि महत्वपूर्ण निर्णयांचा टप्पा पार केला. गांधीजींच्या 150 जयंतीला भारताच्या गावांनी स्वतः ला हागणदारी मुक्त केले आहे. आस्थेमुळे पीडित शरणार्थींना नागरिकत्व देण्याचा कायदा, दलित, मागास, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षणाचे अधिकार वाढवण्याची बाब असो, आसाम आणि त्रिपुरात, ऐतिहासिक शांतता करार असो, सैन्याची सामूहिक शक्ती अधिक प्रभावी करण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती असो, कर्तारपूरसाहिब कॉरिडॉरची विक्रमी वेळात निर्मिती असो, देशाने इतिहास घडवला, इतिहास घडताना पाहिला आणि असाधारण काम करून दाखवले. दहा दिवसांपूर्वी अयोध्येत भगवान राम यांच्या भव्य मंदिर निर्मितीचे काम सुरू झाले. राम जन्मभूमीच्या अनेक वर्षे जुन्या विषयाचा शांततापूर्ण तोडगा निघाला आहे. देशाच्या जनतेने, ज्या संयमाने आणि समजूतदारपणाने, आचरण केले आहे, व्यवहार केला आहे, हे अभूतपूर्व आहे आणि भविष्यासाठी आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. शांतता, एकता आणि सद्भावना हीच तर आत्मनिर्भर भारताची शक्ती आहे. हाच सलोखा, हाच सद्भाव भारताच्या उज्वल भविष्याची हमी आहे. हाच सदभाव घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.

विकासात, या महा यज्ञात प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीने आपल्याकडुन थोडी तरी आहुती द्यायची आहे. या दशकात, भारत नवे धोरण आणि नव्या रितीसह पुढे वाटचाल करेल. आता साधारण काम नाही चालणार, आता, होते असे, चालून जाते असे म्हणण्याचा काळ संपला आहे, आपण जगात कोणाहीपेक्षा कमी नाही, आपण सर्वोच्च राहण्याचा प्रयत्न करू आणि म्हणूनच आपण सर्वश्रेष्ठ उत्पादन, सर्व श्रेष्ठ मनुष्य बळ, सर्वश्रेष्ठ प्रशासन, प्रत्येक बाबतीत सर्वश्रेष्ठ बनण्याचे लक्ष्य घेऊन स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षासाठी आंपल्याला वाटचाल करायची आहे. आपली धोरणे, आपल्या प्रक्रिया, आपली उत्पादने, सर्व काही उत्तमातले उत्तम राहील तेव्हाच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही परीकल्पना साकार होईल.

आज आपल्याला पुन्हा संकल्प करायची आवश्यकता आहे, हा संकल्प स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा आहे. हा संकल्प 130 कोटी देशवासीयांसाठी आहे, हा संकल्प आपल्या भावी पिढीसाठी आहे, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आहे, हा संकल्प आत्मनिर्भर भारतासाठी आहे, आपल्याला धडा घ्यावा लागेल, आपल्याला प्रतिज्ञा करावी लागेल, आपण आयात कमीत कमी करण्याच्या दिशेने योगदान देऊ, आपण आपल्या लघु उद्योगांना सशक्त करू, आपण सर्वजण ‘लोकल साठी व्होकल’ होऊ, आपण अधिक नवोन्मेष आणू, आपण सबलीकरण करू आपल्या युवकांचे, महिलांचे, आदिवासींचे, दिव्यांगाचे, दलितांचे, गरिबांचे, गावांचे, मागासांचे, प्रत्येकाचे आज भारताने, असाधारण वेगाने अशक्य ते शक्य केले आहे. हीच इच्छाशक्ती, हीच निष्ठा, घेऊन प्रत्येक भारतीयाला पुढे जायचे आहे. 2022 मध्ये आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे पर्व आलेच आहे, आपण एक पाऊल दूर आहोत, आपल्याला दिवस रात्र एक करायची आहे.

21 व्या शतकाचे हे तिसरे दशक स्वप्नांची पूर्तता झाल्याचे दशक राहिले पाहिजे. कोरोना मोठी आपत्ती आहे, भारताची विजय यात्रा रोखू शकत नाही.  मी बघत आहे, एक नव्या पहाटेची लालिमा, एक नव्या आत्म निर्भर भारताचा शंख नाद.

एकदा पुन्हा आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

या माझ्यासमवेत दोन्ही हात उंचावून, जयजयकार करा,

भारत माता की- जय

भारत माता की- जय

भारत माता की- जय

वंदे मातरम

वंदे मातरम

वंदे मातरम

जय हिंद!

जय हिंद!

74 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण

0

भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

  1. माझ्या प्रिय देशबांधवांनो ,स्वातंत्र्यदिनाच्या या मंगल प्रसंगी मी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि  शुभेच्छा देतो.
  2. आज आपण कोरोनाच्या एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. या कोरोना कालावधीत लक्षावधी कोविड योद्धे, ‘सेवा परमो धर्मा’ हा मंत्र अक्षरशः जगत आहेत. डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालवणारे, पोलीस कर्मचारी, सेवा कर्मचारी आणि इतर अनेक लोक इतका दीर्घकाळ अविश्रांत काम करत आहेत.
  3. देशाच्या विविध भागात, विविध नैसर्गिक संकटांमुळे ज्यांना प्राण गमवावे लागले, अशा लोकांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकसंवेदना व्यक्त केली. या संकटकाळात सरकार सर्व पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
  4. भारताचा स्वातंत्र्यलढा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होता. विस्तारवादि धोरणामुळे काही देशांना गुलाम करण्यात आले. मात्र दोन्ही महायुद्धाच्या सावटात असतांनाही भारताने आपला स्वातंत्र्यलढा तितक्याच कणखरपणे सुरु ठेवला.
  5. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.  आत्मनिर्भर भारत आज सगळ्या भारतीयांच्या मनबुद्धीत  रुजला आहे.  आज सगळीकडे त्याची छाप दिसते आहे. आत्मनिर्भर भारत आज १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. हे स्वप्न आज जणू प्रतिज्ञा झाले आहे.”भारताच्या क्षमतांवर, भारतीयांमधल्या क्षमतांवर माझा पूर्ण विश्वास आहे. एकदा आपण काही करायचे ठरवले, तर आपण ते धेय्य पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसत नाही.
  6. आज संपूर्ण जग परस्परांशी जोडलेले आहे, परस्परावलंबी झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका पार पाडण्याची भारतासाठी  हीच योग्य वेळ आहे.मात्र, त्यासाठी आधी भारताला आत्मनिर्भर व्हावं लागेल. कृषीपासून आरोग्यापर्यंत, सायबर क्षेत्रापर्यंत, सगळीकडे आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने महत्वाची पावले उचलली आहेत.या उपाययोजना, जसे अवकाश क्षेत्र खुले करणे, यातून रोजगाराच्या नव्या न्साधी उपलब्ध होतील आणि युवकांना त्यांची कौशल्ये अद्ययावत करण्याचे नवे मार्गही उपलब्ध होतील..
  7. केवळ काही महिन्यांपूर्वी, आपण एन -95 मास्क ची आयात करत होतो, कारण देशात एन-95 मास्क तयार होत नव्हते , ते आता निर्माण होऊ लागले, पीपीई बनत नव्हते, ते तयार होऊ लागले, व्हेंटीलेटर तयार होत नव्हते,आता तयार होऊ लागले, देशाच्या आवश्यकतेची पूर्तता तर झालीच त्याचबरोबर जगात निर्यात करण्याची आपली ताकद  निर्माण झाली.
  8. आता ‘मेक इन इंडियाच्या’ बरोबरीने ‘मेक फॉर वर्ल्ड’ हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे.
  9. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पासाठी एकशे दहा लाख कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे .त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सुमारे सात हजार प्रकल्पांची  निवड करण्यात आली आहे. यातून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल, एक नवी गती मिळेल. आता आपल्याला मल्टी मॉडेल दळणवळण पायाभूत सुविधांवर भर द्यायला हवा. आपण आता तुकड्यांमध्ये काम करु शकत नाही. आपल्या पायाभूत सुविधा सर्वंकष असाव्यात, एकीकृत असाव्यात, एकमेकाशी पूरक असाव्यात, रेल्वेशी  रस्ता पूरक आहे,रस्त्याशी बंदर पूरक, नव्या शतकासाठी, आपल्या बहुआयामी  पायाभूत  सुविधा एकमेकांशी जोडत आपण पुढे जात आहोत. हा नवा आयाम राहील. मोठे स्वप्न घेऊन यावर काम सुरु केले आहे, मला विश्वास आहे, हे तुकडे संपुष्टात आणून सर्वसमावेशक कामातून आपल्या सर्व व्यवस्थेला नवी ताकद मिळेल.
  10. आपण किती काल केवळ कच्चा माल पुरवत राहणार आणि तयार उत्पादनांची आयात करत राहणार? एक काळ असा होता, जेव्हा देशाची कृषीव्यवस्था अत्यंत बिकट होती. आपल्यासमोरसर्वात मोठे संकट होते की आपण आपल्या सर्व नागरिकांना काय खायला घालणार? आज आपण केवळ आपल्याच नागरिकांचे पोट भरु शकतोय, एवढेच नव्हे, तर अनेक देशांमध्ये अन्नाची निर्यातही करतो आहोत. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात घटवणे नव्हे, तर त्यातून आपल्या आपली कौशल्ये आणि जगाशी संपर्क देखील वाढवायचा आहे.
  11. भारतात होत असलेल्या या सुधारणांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. म्हणूनच तर, अगदी कोविडच्या काळातही भारतात होणाऱ्या थेट परदेशी गुंतवणूकीत 18% टक्क्यांची वाढ झाली.
  12. कोणी  कल्पना करू शकत होते का,की कधी गरिबांच्या जनधन खात्यात लाखो करोडो रुपये थेट हस्तांतरित होऊ शकतात?  शेतकऱ्याच्या कल्याणासाठी एपीएमसी सारख्या कायद्यात इतके बदल आणले जाऊ शकतात?  एक देश एक रेशन कार्ड असो,एक देश एक ग्रीड असो, नादारी आणि दिवाळखोरी विषयीचा  कायदा असो, बँकांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न असो, हे सगळे आज वास्तवात घडले आहे.
  13. आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. नौदल आणि हवाई दलात महिलांना लढावू क्षेत्रात घेतले जात आहे. महिला आज नेतृत्व करत आहेत, आम्ही तीन तलाकची प्रथा रद्द केई, महिलांसाठी केवळ 1 रुपयात सैनिटरी पैड देण्याची व्यवस्था केली.
  14. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या शास्त्रात म्हटले गेले आहे-

सामर्थ्य मुलं स्वातंत्र्यम,

श्रम मुलंच वैभवं

म्हणजे कोणत्याही समाजाचा, कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा स्रोत म्हणजे त्याचे सामर्थ्य आणि त्याचे वैभव, उन्नती, तसेच प्रगतीचा स्रोत म्हणजे त्याची श्रमशक्ती होय

  1. सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला गेला, शिधापत्रिका असो वा नसो 80 कोटींहून जास्त देशबांधवांच्या घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी, त्यांना मोफत अन्नधान्य पुरविण्यात आले, 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकेत थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले. गरिबांना त्यांच्या गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु करण्यात आले
  2. व्होकल फॉर लोकल, पुनर्कौशल्ये आणि कौशल्ये अद्ययावत करणे यातून देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या आयुष्यात स्वयंपूर्णतेच्या आर्थिक संधी निर्माण होतील.
  3. देशातील काही प्रदेश असे आहेत जे अद्याप अविकसित राहिले आहेत. असे 110 पेक्षा जास्त आकांक्षी जिल्हे निवडले आहेत ते 110 जिल्हे जे  सरासरीपेक्षा सुद्धा मागासलेले आहेत त्यांना राज्याच्या राष्ट्राच्या सरासरी स्तरावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून सर्वाना चांगले शिक्षण, चांगली आरोग्य सुविधा. तेथील लोकांना रोजगाराच्या स्थानिक संधी उपलब्ध होतील.
  4. आत्मनिर्भर भारताची महत्वपूर्ण प्राथमिकता म्हणजे आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर शेतकरी. कृषीक्षेत्रात अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी, सरकारने  एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत निधी निर्माण केला आहे.
  5. गेल्या वर्षी  याच लाल किल्यावरुन मी जलजीवन अभियानाची घोषणा केली होती आज या अभियानाअंतर्गत दररोज एक लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये नळजोडणी पूर्ण केली जात आहे.
  6. मध्यमवर्गातून तयार झालेले व्यावसायिक आज जगात आपले नाव गाजवीत आहेत, जगात आपली ओळख निर्माण करीत आहेत. म्हणूनच मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपापासून मुक्ती हवी आहे , त्यांना नवीन संधी हव्या आहेत, खुले मैदान हवे आहे.
  7. देशात पहिल्यांदाच कोणी घरासाठी कर्ज घेतले असले, तर त्या कर्जाची प्रतिपूर्ती करताना सुमारे सहा लाख रुपयांची सूट त्याला मिळण्याची व्यवस्था सरकारने केली.केवळ एका वर्षात अनेक अपूर्ण गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25 हजार कोटी रुपये उभारण्यात आले.
  8. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात, आधुनिक भारताच्या निर्मितीत, नव्या भारताच्या निर्माणात, समृद्ध आणि सुखी भारताच्या निर्मितीत देशाच्या शिक्षण पद्धतीचे मोठे महत्व आहे. याच विचाराने देशाला तीन दशकानंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
  9. या कोरोनाच्या काळात आपण डिजिटल व्यवहारांची महत्वाची भूमिका देखील पहिली.‘भीम यूपीआय’ च्या माध्यमातून तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार अवघ्या एक महिन्यात झाले आहेत.
  10. 2014 च्या आधी फक्त पाच डझन पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या होत्या. गेल्या पाच वर्षामध्ये 1.5 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे काम पूर्ण झाले. देशातील सर्व सहा लाख ग्रामपंचायती येत्या 1000 दिवसात ऑप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत.
  11. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला अनुभव असे सांगतो, की भारतामध्ये महिला शक्तीला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देशाला बळकट केले आहे. आज महिला केवळ भूमिगत कोळसा खाणीत काम करत नाहीत , तर लढावू विमानेही उडवत नवनव्या उंची गाठत आहेत.
  12. जी 40 कोटी जनधन खाती उघडण्यात आली, त्यापैकी 22 कोटी बँक खाती ही आमच्या भगिनींची आहेत. कोरोना काळामध्ये जवळपास 30 हजार कोटी रूपये, या माता-भगिनींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत.
  13. कोरोनाच्या प्रारंभीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये  चाचणी प्रयोगशाळा कार्यरत नव्हत्या. आज देशभरामध्ये 1400 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
  14. आरोग्य क्षेत्रामध्ये आजपासून एक भव्य काम सुरू करण्यात येणार आहे. आजपासून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ म्हणजेच ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान’ चा प्रारंभ करण्यात येत आहे. ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ आज सुरू होत आहे. प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आय.डी. म्हणजे ‘आरोग्य ओळखपत्र’ देण्यात येईल. प्रत्येकाने केलेल्या आरोग्य चाचण्या, प्रत्येकाचे आजार, तुम्ही कोणत्या आरोग्य चाचण्या केल्या, डॉक्टरकडून- कोणते औषध घेतले, त्यांनी तुमच्या आजाराचे नेमके काय निदान केले, कधी काय औषध दिले, केलेल्या चाचणीचा अहवाल काय आला, अशी सगळी माहिती त्या एकाच आरोग्य आय.डी.मध्ये आपल्याला मिळू शकणार आहे.
  15. भारतामध्ये एक नाही, दोन नाही, तीन- तीन तीन व्यक्ती, संस्था त्याच्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत. संशोधकांकडून ज्यावेळी हिरवा कंदिल दाखवला जाईल, त्यावेळी कोरोनाच्या लसीचे मोठ्या- व्यापक प्रमाणात निर्मितीचे काम केले जाईल.
  16. हे वर्ष जम्मू काश्मीरच्या विकासाच्या नव्या प्रवासाचे वर्ष आहे. हेव वर्ष जम्मू काश्मीर मधली महिला आणि दलितांच्या अधिकारांचे वर्ष आहे. जम्मू काश्मीरमधील शरणार्थी नागरिकांना प्रतिष्ठेचे जीवन मिळवून देणारे हे वर्ष आहे. जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी विकासाच्या नव्या युगाला पुढे नेत आहेत, याचा आपल्या सर्वाना अभिमान वाटायला हवा.
  17. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याची अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी होती , त्यांची आकांक्षा होती ती आकांक्षा पूर्ण करण्याचे आपण मोठे काम केले आहे. हिमालयाच्या  कुशीत, उंचावर  वसलेले लडाख विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे. जशी सिक्कीमने सेंद्रिय राज्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे, तसेच लदाखही येत्या काळात कार्बन न्यूट्रल प्रदेश म्हणून  म्हणून ओळख बनवू निर्माण करू शकेल.
  18. देशातल्या १०० निवडक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन सह, सर्वांगीण दृष्टिकोनासह लोकसहभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रदूषण कमी करण्यासाठी मिशन मोड पद्धतीने काम करणार आहोत.
  19. आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत संवेदनशील आहे. आपण प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट आपण यशस्वीपणे राबवले आहे. आपल्याकडे वाघांची संख्या वाढली आहे. आगामी काळात आशियाई सिंह प्रकल्पाची सुरुवात होत आहे. या पकल्पाअंतर्गत  भारतीय सिंहांची सुरक्षा , आवश्यक पायाभूत सुविधा, त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट डॉल्फिन देखील सुरु केले जाईल.
  20. एलओसी ते एलएसी पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिले त्यांना आपल्या सैन्याने , आपल्या वीर जवानांनी त्याना त्यांच्या भाषेत प्रत्त्युत्तर दिले. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण आपल्यासाठी  सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले जवान काय करु शकतात, हे संपूर्ण जगाने लदाखमध्ये पहिले आहे.
  21. दक्षिण आशियात  जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. आपण सहकार्य आणि संवादाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या जनतेच्या समृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करू शकतो.
  22. देशाच्या सुरक्षेत आपल्या सीमा आणि किनारी पायाभूत सुविधांची मोठी भूमिका आहे. आज हिमालयाची शिखरे असोत किंवा हिंदी महासागराची बेटे असोत, प्रत्येक दिशेने कनेक्टिव्हिटी विस्तारावर भर दिला जात आहे,.
  23. आपल्या देशात 1300 हून अधिक बेटे आहेत. त्यांच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, आणि देशाच्या विकासातील त्यांचे महत्व लक्षात घेऊन, त्या भागात नव्या विकास योजना सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लक्षद्वीपलाही नंतर आता पुढच्या एक हजार दिवसात लक्षद्वीपलाही वेगवान इंटरनेट सुविधेने जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
  24. जे सीमा भाग आहेत, जे किनारी भाग आहेत तिथले सुमारे 173 जिल्हे आहेत, जे कोणत्या ना कोणत्या देशाची सीमा किंवा समुद्र किनाऱ्याला लागून आहेत, येत्या काळात एनसीसीचा विस्तार त्या सीमा भागातल्या युवकांसाठी करण्यात येईल. सीमा भागात आम्ही सुमारे एक लाख नवे एनसीसीचे कॅडेटस तयार करणार आहोत.
  25. आपली धोरणे सर्वोत्कृष्ट, आपल्या प्रक्रिया, आपली  उत्पादने सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ मनुष्यबळ, सर्वश्रेष्ठ प्रशासन, प्रत्येक बाबतीत सर्वश्रेष्ठ बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे, यातूनच आपण एक भारत श्रेष्ठ भारत चे स्वप्न साकारू शकू.
  26. आपल्या जीवनमान सुखकर करण्याचा धोरणाचा सर्वाधिक लाभ आपल्या मध्यमवर्गाला मिळणार आहे. स्वतः इंटरनेट सुविधेपासून ते स्वस्त विमान तिकीट, महामार्ग ते इ वे, आणि परवडणारी घरे ते करात सवलत- सर्व उपाययोजना देशाच्या मध्यमवर्गाला सशक्त करण्यासाठी केल्या जात आहेत.

राज्यात आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान : १ लाख ५६ हजार ४०९ रुग्णॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.१५ : राज्यात आज ६८४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०८ हजार २८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२,६१४ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२५४ (४८), ठाणे- १९२ (१८), ठाणे मनपा-१८४ (७),नवी मुंबई मनपा-४४७ (४), कल्याण डोंबिवली मनपा-२९६(११),उल्हासनगर मनपा-२० (७), भिवंडी निजामपूर मनपा-३६ (३), मीरा भाईंदर मनपा-१४४ (१०), पालघर-२१६ (१२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-३७६ (३), पनवेल मनपा-१६०(६), नाशिक-२१४ (४), नाशिक मनपा-७८३ (६), मालेगाव मनपा-६४, अहमदनगर-२३२ (१),अहमदनगर मनपा-१३५, धुळे-२०६ (२), धुळे मनपा-१५१ (३), जळगाव-४१९ (६), जळगाव मनपा-७९ (२), नंदूरबार-७८ (२), पुणे- ४५८ (२५), पुणे मनपा-१११४ (३४), पिंपरी चिंचवड मनपा-७९१ (१४), सोलापूर-३०९ (३), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-३९० (३), कोल्हापूर-३४४ (१२), कोल्हापूर मनपा-२६२ (१), सांगली-११६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०९ (४), सिंधुदूर्ग-७ (२), रत्नागिरी-१२३ (४), औरंगाबाद-१२९ (२),औरंगाबाद मनपा-१४७ (२), जालना-४४ (१०), हिंगोली-३२, परभणी-२२, परभणी मनपा-३१, लातूर-९० (२), लातूर मनपा-९२ (२), उस्मानाबाद-१७० (४), बीड-११२ (५), नांदेड-७३, नांदेड मनपा-४१, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती-२५, अमरावती मनपा-५३ (१), यवतमाळ-६१, बुलढाणा-६७ (२), वाशिम-३९, नागपूर-१९२ (१), नागपूर मनपा-७३९ (१८), वर्धा-१७, भंडारा-२७ (१), गोंदिया-३४, चंद्रपूर-३३, चंद्रपूर मनपा-१२ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ११ हजार ५१४ नमुन्यांपैकी ५ लाख ८५ हजार ७५४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७९ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ४४ हजार ९७४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२७,७१६) बरे झालेले रुग्ण- (१,०२,७४९), मृत्यू- (७०८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,५८१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१२,६३८), बरे झालेले रुग्ण- (८९,७९५), मृत्यू (३३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,५४२)

पालघर: बाधित रुग्ण- (२०,२४३), बरे झालेले रुग्ण- (१३,९८१), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७८४)

रायगड: बाधित रुग्ण- (२३,००४), बरे झालेले रुग्ण-(१७,३२०), मृत्यू- (५७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११०)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१५८२), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५७२), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२)

पुणे: बाधित रुग्ण- (१,२७,५१८), बरे झालेले रुग्ण- (८३,३०८), मृत्यू- (३१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०८०)

सातारा: बाधित रुग्ण- (७१८८), बरे झालेले रुग्ण- (४३०९), मृत्यू- (२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६२)

सांगली: बाधित रुग्ण- (६०८०), बरे झालेले रुग्ण- (३४९१), मृत्यू- (१९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३९३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३,३८४), बरे झालेले रुग्ण- (६२६९), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७७६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४,०३३), बरे झालेले रुग्ण- (८३३६), मृत्यू- (६२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२५,६६२), बरे झालेले रुग्ण- (१५,९३६), मृत्यू- (६६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०६६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,५२२), बरे झालेले रुग्ण- (८७७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६१५)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७,३३९), बरे झालेले रुग्ण- (११,८०२), मृत्यू- (६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११७६), बरे झालेले रुग्ण- (७५४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६९)

धुळे: बाधित रुग्ण- (५१३४), बरे झालेले रुग्ण- (३२८०), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८,३३३), बरे झालेले रुग्ण- (१२,००१), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७६२)

जालना: बाधित रुग्ण-(३००२), बरे झालेले रुग्ण- (१७६९), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२०)

बीड: बाधित रुग्ण- (२५४४), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२१)

लातूर: बाधित रुग्ण- (४९८२), बरे झालेले रुग्ण- (२२५४), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५४०)

परभणी: बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (९७८), बरे झालेले रुग्ण- (६४८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३८२७), बरे झालेले रुग्ण (१७१६), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७७)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३४३२), बरे झालेले रुग्ण- (१६६२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६८०)

अमरावती: बाधित रुग्ण- (३४४२), बरे झालेले रुग्ण- (२२४७), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११००)

अकोला: बाधित रुग्ण- (३२२९), बरे झालेले रुग्ण- (२५७३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८)

वाशिम: बाधित रुग्ण- (११६३), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२३०२), बरे झालेले रुग्ण- (१३४९), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२००९), बरे झालेले रुग्ण- (१२३९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१२,८७३), बरे झालेले रुग्ण- (४७२६), मृत्यू- (३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०२)

वर्धा: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण- (२११), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

भंडारा: बाधित रुग्ण- (४९२), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७६७), बरे झालेले रुग्ण- (४४९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (५५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५१३), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५३८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७९)

एकूण: बाधित रुग्ण-(५,८४,७५४) बरे झालेले रुग्ण-(४,०८,२८६),मृत्यू- (१९,७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५६,४०९)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३२२ मृत्यूंपैकी २२६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४३ मृत्यू ठाणे जिल्हा –२२, पुणे -८, नाशिक-३, रायगड -३, सांगली -२, पालघर-१,उस्मानाबाद-१,लातूर -१, जालना-१ आणि बुलढाणा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. आज जिल्हा आणि मनपा निहाय ३१ जुलै २०२०पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण  करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येतून ५९४ रुग्ण कमी झाले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राष्ट्रपती भवनात एट होम कार्यक्रम:नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि वैंकेया नायडू सामील; कोरोनामुळे यावर्षी 100 पेक्षा कमी लोकांना आमंत्रण

0

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती भवनात दरवर्षी होणारा एट होम कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा स्पीकर ओम बिर्ला आणि उप राष्ट्रपती वैंकेया नायडू कार्यक्रमात आले आहेत. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह येऊ शकले नाही.कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत, आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे, चीफ ऑफ नेवल स्टाफ करमबीर सिंह आणि एअरफोर्स चीफ आरकेएस भदौरियादेखील आले आहेत.आयएएनएस या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, यावेळेस 100 पेक्षाही कमी पाहुण्यांना बोलवण्यात आले आहे. यात काही कॅबिनेट मंत्री, ज्यूडिशियरीशी निगडीत लोक, ब्यूरोक्रेट, डिप्लोमॅट आणि काही मीडियापर्सन सामील आहेत. कोरोनामुळे यावेळेस गेस्टलिस्ट कमी करण्यात आली आहे. दरवर्षी 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त पाहुणे असायचे.

महेंद्र सिंह धोनीनंतर सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा

0

नुकतच भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या काही मिनीटांतच सुरेश रैनानेही आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. रैनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन ‘आपण धोनीसोबत या प्रवासात आहोत, जय हिंद’ अशी पोस्ट केली.

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

0

नवी दिल्ली – भारताचा अष्टपैलू फलंदाज, माजी कर्णधार, यष्टीरक्षक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.धोनीच्या निवृत्तीबाबत एएनआय या वृत्तसंस्थेनं बातमी दिली आहे. तसेच धोनीने स्वत: इस्टांग्रामवर एक व्हिडीओ आणि पोस्ट करत याबदल माहिती दिली आहे.

महेंद्र सिंग धोनी हा गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडक 2019 च्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध धोनी शेवटची मॅच खेळला होता. यानंतर धोनी टीम इंडियाच्या जर्सीमध्ये धोनी दिसला नव्हता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. पण, आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून धोनीने शनिवारी (15 आॅगस्ट 2020) इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घेत असल्याची घोषणा केली आहे.

तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार…

धोनी पहिला असा खेळाडू आहे ज्याला सलग दोन वेळा आयसीसी एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून मान मिळाला. धोनीबदल सांगायचे झाले तर, तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने एक दिवसीय विश्‍वचषक (2011), टी-20 विश्‍वचषक (2007) या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळविले होते. तसेच त्याने 2007 मध्ये भारतास चॅंपियन चषक स्पर्धेतही अजिंक्‍यपद मिळवून दिले आहे. आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने तीनवेळा विजेतेपद पटकावलं आहे.

कसोटी क्रिकेटमधून धोनीने 2014 मध्ये निवृत्ती घेतली. त्याआधी त्याने 90 सामन्यात 6 शतके आणि 33 अर्धशतकांसह 4 हजार 876 धावा केल्या होत्या. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 350 सामन्यात 10 हजार 773 धावा केल्या असून यामध्ये 10 शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 प्रकारात त्याने 98 सामन्यात 2 अर्धशतकांसह 1 हजार 617 धावा केल्या आहेत.

सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी ४०० खाटांचे हॉस्पिटल लवकरच उभारणार – पालकमंत्री जयंत पाटील

0

सांगली, दि. 15 : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पिटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे.

आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली  असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा         प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक

कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम    बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे.

जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येतआहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे,  मात्र  त्याला  उंबरठ्यावरुनच  परत  पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे   नियोजन, नदीकाठच्या  लोकांना  सावधानतेचा  इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती.  यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्गकरून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या  गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत  ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत.

प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे,  कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला.

पुरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

पुणे ग्रामीण पोलीस आणि स्‍मार्ट पोलिसींग

0

            गुवाहाटी येथे 30 नोव्हेंबर 2014 रोजी झालेल्या 49 व्या पोलीस महासंचालक/विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेमध्ये भारताच्या प्रधानमंत्री महोदयांनी स्‍मार्ट (एसएमएआरटी) पोलिसींग संकल्पना जाहीर केली होती. यानुसार पोलीस प्रशासन हे सामान्य नागरिकांसाठी अधिक अनुकूल बनविणे. अधिक प्रशिक्षित पोलीस दल आणि पोलिसींगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद उपलब्ध करणे. सतर्क आणि जबाबदार पोलिस दल. पोलीसांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून संवेदनशील आणि विश्वासार्ह असे पोलीस दल समाजासाठी उपलब्ध करून देणे याबाबींचा समावेश होता.            एस म्‍हणजे स्‍ट्रीक्‍ट ॲण्‍ड सेन्सिटीव्‍ह, एम म्‍हणजे मॉडर्न ॲण्‍ड मोबाईल, ए म्‍हणजे अलर्ट ॲण्‍ड अकाऊंटेबल, आर म्‍हणजे रिलायबल ॲण्‍ड रिस्‍पॉन्सिव्‍ह आणि टी म्‍हणजे टेक्‍नोसॅव्‍ही ॲण्‍ड पोलीस फोर्स असा त्‍याचा अर्थ आहे. जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्‍ह्यात ‘स्‍मार्ट पोलिसींग’ उपक्रम यशस्‍वीपणे राबविण्‍यात येत आहे.            स्‍मार्ट पोलिसींगचे पोलीस स्‍टेशन, तंत्रज्ञान व दळणवळण, गतीमानता, जनतेशी पोलीसांशी सह-संबंध, पोलिसांचे वर्तन, तपास, आपत्‍कालिन प्रतिसाद प्रणाली, वाहतुकीचे नियमन, अभिलेख देखभाल आणि प्रशिक्षण हे महत्‍त्‍वाचे पैलू आहेत. पोलिसींगच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यामध्ये डिसेंबर २०१८ पासून कामास सुरुवात झाली. त्यामध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता, अभिलेख वर्गीकरण व नाश, पोलीस ठाण्याचे एकंदरीत कामकाज व त्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण, महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष तसेच येणाऱ्या काळानुसार सायबर गुन्‍हे व इतर गुन्हे तपास कामी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल रेकॉर्ड अद्ययावत करणे, इंटरनेट सुविधा, स्मार्टफोनचा वापर तसेच महिला व नागरिक सुरक्षिततेसाठी १०० नंबर, १०९१, प्रतिसादचा वापर व खऱ्या अर्थाने मिळणारा प्रतिसाद अशा अनेक गोष्टींचा या स्‍मार्ट पोलिसींग तपासणीमध्ये समाविष्ट करून प्रत्येक पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित केले गेले. याचा शासन सर्व पोलीस अधिकारी/कर्मचारी व नागरिकांना फायदा होईल, असा विश्‍वास उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्‍यक्‍त केला.       पुणे ग्रामीण पोलीस दलाच्‍या पुणे विभागात 4 उपविभाग आणि 16 पोलीस स्‍टेशन तर बारामती विभागात 3 उपविभाग आणि 15 पोलीस स्‍टेशन येतात. पोलीस अधीक्षक कार्यालयात स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण विभाग, जिल्‍हा विशेष शाखा, आर्थिक गुन्‍हे शाखा, सुरक्षा शाखा,  सायबर पोलीस स्‍टेशन, कल्‍याण शाखा, जिल्‍हा वाहतूक शाखा, वायरलेस विभाग, मोटार परिवहन विभाग यांचा समावेश होतो. ‘स्‍मार्ट पोलीसींग’मध्‍ये हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील लोणीकंद, पौड पोलीस स्‍टेशनला ए प्‍लस तर हवेली, वेल्‍हा आणि लोणी काळभोर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेडचे मानांकन मिळाले. लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ पोलीस स्‍टेशनला ए प्‍लस, कामशेत पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. खेड उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील घोडेगाव पोलीस स्‍टेशनला ए डबल प्‍लस, खेड ए प्‍लस तर मंचर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. जुन्‍नर उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील नारायणगावला ए डबल प्‍लस, आळेफाटा ए प्‍लस तर ओतूर आणि जुन्नर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले.            बारामती उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील बारामती शहर, इंदापूर, वडगाव निंबाळकर, वालचंदनगर पोलीस स्‍टेशनला ए डबल प्‍लस तर बारामती तालुका व भिगवण पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. दौंड उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील दौंड, यवत, शिक्रापूर, रांजणगाव (एमआयडीसी) पोलीस स्‍टेशनला ए डबल प्‍लस व शिरुर पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले. भोर उप विभागीय पोलीस अधिकारी क्षेत्रातील भोर, सासवड, राजगड आणि जेजुरी पोलीस स्‍टेशनला ए ग्रेड मानांकन मिळाले.            ‘स्मार्ट पोलिसींग’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे पोलिस स्टेशनची पायाभूत सुविधा, पोलिसांचे वर्तन, कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ यामध्‍ये सुधारणा करता आली. उत्तम सेवा उपलब्‍ध केल्‍यामुळे सामान्य लोकांमध्ये पोलिसांबद्दलची व पर्यायाने शासनाची प्रतिमा उज्‍ज्‍वल करता आली. पोलिस मित्र समिती, ग्राम सुरक्षा दल, महिला सुरक्षा समिती, पोलिस स्टेशन -100, बीट -100 यांच्या कम्युनिटी पोलिसींग उपक्रमावर लक्ष केंद्रीत केल्याने अधिक समन्वय साधून गोपनीय माहिती संग्रह वाढला आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न कमी झाले आहेत. ग्रामीण भागात स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून 300 सीसीटीव्ही कॅमेरे आणि लोकसहभागातून 400 सीसीटीव्ही लावण्‍यात आले. या कामातील खासगी सहभागामुळे 5 कोटी रुपयांचा निधी वाचला आहे. ई-चालानचा वापर आणि रहदारी मनुष्यबळाच्या चांगल्या वापरामुळे वाहतुकीचे महसूल संकलन वाढले आहे. व्हॉलीबॉल मैदान सुरू करणे आणि पोलिस ठाण्यात जीम उघडणे, 45 वर्षांवरील सर्वांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्‍यात आली. पोलिस कर्मचारी, कर्मचारी यांच्‍याकडून हेल्मेटचा सक्तीने वापर केल्याने दर वर्षी पोलिसांचे 15 मृत्यू कमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात आरएफआयडीचा (रेडिओ फ्रीक्‍वेन्‍सी इन्‍फ्रारेड डिव्‍हाईस) वापर करणे, मोठ्या बंदोबस्तामध्ये तसेच गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर, प्रमुख बन्दोबस्तामध्ये जातीय दंगल काबू योजनेच्या अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था प्रश्‍न रोखण्यास मदत झाली आहे.            सीएसआर उपक्रम – ‘स्मार्ट पोलिसिंग’ उपक्रमाच्या जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात सीएसआर (कॉरपोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबीलीटी) उपक्रमांत वाढ झाली. सीएसआर उपक्रमांतर्गत पोलिस कल्याण निधीला अडीच कोटी निधी प्राप्त झाला. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींचा व सामान्य माणसांचा आत्मविश्वास वाढल्‍याने गुन्हेगारी नोंदीचे प्रमाण वाढले. जिल्ह्यातील 12 टोळ्यांवर एमसीएसीए (मोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्या अंतर्गत 130 गुन्हेगारांना, बॉम्‍बे पोलीस कायद्यानुसार 55 गुन्हेगारांना हद्दपार केले गेले.            सायबर गुन्‍हेगारी जनजागृती, आर्थिक गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि सर्वसाधारण संबंधित विषयांवर विविध पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांच्यासाठी 100 हून अधिक कार्यशाळा घेण्‍यात आल्यात. यामुळे अशा प्रकारचे अनेक गुन्हे रोखण्‍यास मदत झाली. वर्तणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी ध्यानधारणा कार्यशाळा तसेच खासगी एजन्सीसमवेत आयोजित केलेल्या प्रशिक्षणांमुळे तक्रारदारांना पुरविण्यात येणारी सेवा सुधारली आहे.            डायल 100 च्या लाईनमध्ये वाढ, वाहनांवर जीपीएस बसविणे, कर्मचारी-अधिकारी यांच्‍याद्वारे वायरलेसचा वापर होत असल्‍यामुळे पोलिसांकडून प्रतिक्रियेची वेळ 20 मिनिटांवरून 6 मिनिटांवर आणली गेली. एका मार्गाचा वापर करून वाहतुकीचा प्रवाह वाढवणे, विषम पार्किंग, पार्किंग सीमांकन, पार्किंग झोन, ट्रॅफिक वॉर्डन, ई-चालान प्रणाली, आवश्यकतेनुसार नवीन सिग्नल यामुळे रहदारीची परिस्थिती सुधारली आहे.          इमारत सुस्थितीत व प्रशस्त जागेसह सर्व सोयींनी युक्त, स्वागत कक्ष, पुरेसे व चांगले फर्निचर, स्वतंत्र मुद्देमाल कक्ष, शस्त्रसाठा व अभिलेख कक्ष, अधिकारी, कर्मचारी यांच्‍याकरिता विश्रांतीगृह, लॉकअपमध्ये पुरेशी हवा व स्वच्छतागृह, स्वतंत्र मुलाखत कक्ष, स्वच्छ व प्रशस्त प्लास्टिक विरहीत परिसर, आवश्यक व पुरेसा शस्त्रसाठा, अश्रूधूर, ढाल, हेल्मेटचा साठा, प्रशिक्षित व अनुभवी अधिकारी व कर्मचारी हेही पायाभूत सुविधांबाबतचे सर्वेक्षण आधारीत मुद्दे होते.            अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर- पोलीस ठाण्‍यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा ही मुलाखत कक्ष, लॉकअप, स्वागत कक्षामध्ये उपलब्ध आहे. सी.सी.टी.एन.एस. (क्राईम ॲण्‍ड क्रिमीनल ट्रॅकींग ॲण्‍ड नेटवर्कींग सिस्‍टीम) प्रणालीच्‍या अनुषंगाने कॅस सॉफ्टवेअर व हार्डवेअरचा जास्तीत जास्त वापर करण्‍यात येत आहे. पुरेशा संगणकासह इंटरनेट सुविधा त्याचबरोबर प्रिंटर, फोटो कॉपियर, मशीन, फॅक्स मशीन व स्कॅनर उपलब्ध आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी स्मार्टफोनचा वापर करतात.                               पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीमधील खाजगी कार्यक्षेत्रामधील आस्थापना, बँका, शाळा व महाविद्यालयांच्‍या  परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचा वापर करण्‍यास प्रोत्‍साहन तर तांत्रिक दळणवळणासाठी (ई-मेल व व्‍हॉट्स ॲप) संगणकीय वापर करण्‍यात येतो.                                           पोलीसांचे जनतेशी सहसबंध आपुलकीचे, विश्‍वासाचे रहावे यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात आले. त्‍यानुसार अनुभवी व निवडक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नागरिकांचे सुरक्षिते संबंधाने प्रत्येक कामामध्ये सहभाग असतो. या पथकाद्वारे वेगवेगळे विषय घेवून शाळा-महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांकरिता कार्यशाळा, स्पर्धा आयोजित करुन जनजागृती केली गेली. जातीय सलोखा कायम ठेवण्याकरीता वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे/कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. झोपडपट्टीतील नागरिकांच्‍या सुरक्षिततेच्या दृष्टिने बैठका घेवून मार्गदर्शन केले जाते. महिला, मुलींचा आत्मविश्वास वाढवून सुरक्षिततेची भावना निर्माण करणे व नोकरीच्‍या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा छळ होणार नाही, याची दक्षता घेतली गेली.  मोहल्ला कमिटी बैठक, शांतता समिती बैठक, शासकिय कर्मचारी/कार्यकर्ते यांच्या बैठकांचे नियमित आयोजन केले जाते.                                                                                                                           पोलीसांचे वर्तन – अनुभवी, प्रशिक्षित व कौशल्यपूर्ण पोलीस अधिकारी व कर्मचारी असल्‍याने त्‍यांचे नागरिकांचे प्रति विनयशील, संवेदनशील, प्रामाणिक व सभ्‍य वर्तन असते. सर्वोच्च न्यायालयाच्या इसम अटकेबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्‍यात येते. महिलां तक्रारदारांसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती तसेच आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे सामान्य जनतेमध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्‍यास मदत झाली आहे.                                                                                                         तपास यंत्रणा- विनाविलंब अर्जाची स्‍वीकृती, कायदा व गुन्ह्याची सद्यस्थिती तपासून त्वरित गुन्हा दाखल, तक्रारीची व तपासाची कार्यवाही त्वरित सुरु, लवकरात लवकर घटनास्थळास भेट, कायद्याचे ज्ञान नसलेल्या तक्रारदारास व्यवस्थित सल्ला देणे, गुन्ह्याची तीव्रता कमी न करणे, तक्रारदारास तक्रार नोंदविल्‍यानंतर प्रत (पोहोच) देणे, अद्ययावत, सुसज्ज व स्वतंत्र पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन,  तपासकामी अनुभवी व प्रशिक्षित पोलीस कर्मचारी, तपासी अंमलदारांकरिता प्रशिक्षण किंवा कार्यशाळांचे आयोजन, तपास वेळेत पूर्ण करून त्याबाबत तक्रारदार यांना वेळोवेळी सुचित करणे, शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास, जप्त मुद्देमालाची एफ.एस.एल.कडे (फॉरेन्सिक सायन्‍स लॅब) विनाविलंब तपासणी, जखमीचे प्रमाणपत्र किंवा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट याकरिता आवश्यक पाठपुरावा केला जातो.                         आपत्कालिन प्रतिसाद प्रणाली- पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील ठिकाणे, संभाव्य धोके, महत्त्वाच्या व्यक्‍तींची सुरक्षा, सिक्युरीटी ऑडिट याची आवश्यक माहिती उपलब्ध, धार्मिक स्थळांची माहिती व जनसमुदायाबद्दल माहिती उपलब्ध, परिसरातील शैक्षणिक संस्था, बँका, व्यावसायिक, पत संस्था, ऐतिहासिक ठिकाणे, नद्या व पुराची ठिकाणे, संवेदनशील ठिकाणे, प्रेक्षणीय स्थळांची माहिती उपलब्‍ध आहे. पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशामक यंत्रणा, औद्योगिक आस्‍थापना, सिंचन विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांबरोबर नियमित बैठका घेण्‍यात येतात.               वाहतुकीचे नियमन- अपघात प्रवण ठिकाणांची माहिती, सर्व हॉस्पीटल व आपत्कालीन सेवांच्‍या संपर्क क्रमांकाची माहिती, वाहनांची वर्दळ व ट्रॅफिक जॅम होणाऱ्या ठिकाणांची माहिती, रस्त्याची दुरुस्ती करणाऱ्या विभागाची माहिती, गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक, पुणे ग्रामीण पोलीस दलातील हद्दीच्‍या चौकामध्ये डिजिटल स्‍कॅनिंग व रेकॉर्डिंग सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची उपलब्धता आहे.              अभिलेख जतन- पोलीस ठाणे अभिलेखावरील पाहिजे (वॉण्‍टेड) असलेले आरोपी, फरारी, मागील वर्षामध्‍ये अटक केलेल्या आरोपींचे रेकॉर्ड, शिक्षा लागलेले, माहितगार गुन्‍हेगार, हिस्‍ट्रीशिटर, कोर्टात हजर न झालेले आरोपी यांची माहिती, जुने रेकॉर्ड आवश्‍यकतेनुसार ठेवून इतर रेकॉर्ड नियमाप्रमाणे नष्‍ट करणे, रेकॉर्डरुम (अभिलेख कक्ष) व्‍यवस्थित व सुस्थितीत असावी, जेणेकरुन वाळवी लागून नाश होवू नये, पोलीस ठाण्‍यातील रेकॉर्ड पोलीस मॅन्‍युअलमधील तरतुदीनुसार ठेवण्‍यात आले आहे.                                प्रशिक्षण- पोलीस कर्मचाऱ्यांचे क्राईम ॲण्‍ड क्रिमीनल ट्रॅकींग ॲण्‍ड नेटवर्कींग सिस्‍टीम व दैनंदिन ऑनलाईन अहवाल याबाबतचे मुलभूत प्रशिक्षण झाले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे संगणक वापराचे मुलभूत प्रशिक्षण झाले आहे. किशोर न्याय कायदा, मुलांची काळजी व संरक्षणाबाबतचे प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अधिकारी/कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या शंका निरसनाचे, तक्रार निवारण्याचे तसेच त्‍यांना विविध योजनांची माहिती करुन देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिकारी/कर्मचारी यांना अद्ययावत प्रशिक्षण/कार्यशाळा गरजेनुसार आयोजित केली जाते. सेजल समीर रुपलग आणि समीर रुपलग यांच्‍या सोर ग्रुपतर्फे विविध मुद्दयांवर आधारित सर्व्‍हेक्षण करुन ‘स्‍मार्ट पोलिसींग’चे मानांकन निश्चित करण्‍यात आले. मानांकन प्राप्‍त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला. यामध्‍ये बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्‍यासह आंतरिक सुरक्षा पदकाने  सन्मानित पोलिस उप अधीक्षक जाधव आण्णासाहेब मारुती, खन्ना दिपाली मोहन, पोलीस निरीक्षक उगले गणेश रंगनाथ  (लोणी काळभोर),पोलीस उपनिरीक्षक मोहिते नितीन मोहन- (वाचक, दौंड एसडीपीओ) गोरे अमोल महादेव (स्थानिक गुन्हे शाखा),धोंगडे रामेश्वर चंद्रभान (स्थागुशा),लकडे नितीन शिवाजी  (यवत), पालवे भगवान जगन्नाथ (शिरूर)ननावरे शिवाजी लक्ष्मण  (लोणी काळभोर), पवार राजेंद्र भीमा, (भोर) लवटे अनिल मनोहर,(पौड), गायकवाड मृगदीप सुधाकर (लोणावळा शहर ), लोंढे सुशील शामराव(इंदापूर),सहायक पोलिस निरीक्षकदत्तात्रय महादेव दराडे, अर्जुन हरिबा मोहिते,  रमेश नारायण खुणे आणि सहायक फौजदारजितेंद्र दत्तात्रय शेवाळे तसेच पोलीस हवालदार राजु बापुराव पुणेकर, रविंद्र एकनाथ शिनगारे, सचिन मोहन गायकवाड, निलेश बाळासाहेब कदम, सुरेश दौलत भोई,अजित रघुनाथ ननावरे,पोलीस नाईक प्रमोद परशुराम नवले, मंगेश तुकाराम नेवसेया अधिकाऱ्यांचा समावेश होता.             ‘स्‍मार्ट पोलिसींग’या उपक्रमामुळे पोलीस आणि जनता यांच्‍यातील संबंध विश्‍वासाचे होतील,अशी आशा उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी  व्‍यक्‍त केली. प्रत्‍येक नागरिकांच्‍या सर्वसाधारण अपेक्षा पूर्ण करण्‍यात पुणे ग्रामीण पोलीस यशस्‍वी झाले आहेत, भविष्‍यातही ते यशस्‍वी होतील, अशी अपेक्षा आहे.
राजेंद्र सरग,

जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

मो- 9423245456