Home Blog Page 2481

फेसबुकवर नियंत्रण कोणाचे ? भाजपा -काँग्रेस मध्ये वॉर

0

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘कंट्रोल’ प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आले आहेत. कॉंग्रेसने माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान याप्रकरणी फेसबुकने आपले स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले की, ”आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. आमच्या बाजूने आणखी काम बाकी असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील.”

नेमके काय आहे प्रकरण ?

अमेरिकेचे वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकच्या नि:पक्षपातीपणावर सवाल केले आहेत. वृत्तपत्राने दावा केला आहे की, फेसबुकने भाजप नेते व काही गटाच्या ‘हेट स्पीच’ असणाऱ्या पोस्टविरोधातील कारवाईकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. या पोस्ट हिंसाचार पसरवणाऱ्या होत्या. फेसबुकच्या दक्षिण व मध्य आशियाच्या धोरण संचालक आंखी दास यांनी भाजप नेते टी. राजासिंहविरोधात फेसबुकचे हेट स्पीच नियम लागू करण्यास विरोध केला होता. त्यांना भाजपसोबतचे संबंध बिघडतील व भारतात कंपनीच्या व्यवसायाचे नुकसान होईल अशी भीती होती. टी. राजा तेलंगणातून आमदार आहेत.

वृत्तात म्हटले आहे की, आंखी दास यांनी निवडणूक प्रचारात भाजपला मदत केली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी फेसबुकने म्हटले होते की, त्यांनी पाकिस्तानी सेना, भारतातील राजकीय पक्ष काँग्रेसचे अप्रमाणित फेसबुक पेज व भाजपद्वारे खोटे वृत्त असलेले पेज हटवले होते. मात्र, सिंह आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या अनेक फेसबुक पोस्ट तोपर्यंत हटवल्या नाहीत, जोपर्यंत वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत इशारा दिला नाही. या सर्व पोस्ट मुस्लिमांबाबत द्वेष असलेल्या होत्या. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, ”भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला चालवतात. ते याद्वारे खोटे वृत्त आणि द्वेष पसरवतात. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करतात. अखेर, अमेरिकी मीडियाने फेसबुकबाबत सत्य समोर आणले.”

राज्यात आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान; १ लाख ५८ हजार ३९५ रुग्ण ॲक्टिव्ह

0

राज्यात साडेदहा लाख लोक होम क्वारंटाईन -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१६: राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे आहे. आज ११ हजार १११ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५८  हजार ३९५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,१११ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २८८ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०१० (४७), ठाणे- १६६ (२), ठाणे मनपा-२०६ (६),नवी मुंबई मनपा-३८४ (३), कल्याण डोंबिवली मनपा-३५१ (२), उल्हासनगर मनपा-२५ (७), भिवंडी निजामपूर मनपा-३४ (१), मीरा भाईंदर मनपा-१४० (८), पालघर-२३१ (१), वसई-विरार मनपा-१६० (३), रायगड-२४५ (५), पनवेल मनपा-१५३ (१), नाशिक-१६० (२), नाशिक मनपा-४७८ (६), मालेगाव मनपा-४१, अहमदनगर-१९९ (१),अहमदनगर मनपा-९५ (९), धुळे-२४ (७), धुळे मनपा-२९ (२), जळगाव-४६९ (७), जळगाव मनपा-१२९, नंदूरबार-६, पुणे- ६४४ (१२), पुणे मनपा-१५३९ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-९०५ (१९), सोलापूर-१७७ (५), सोलापूर मनपा-९० (१), सातारा-१९८ (८), कोल्हापूर-२९५ (२९), कोल्हापूर मनपा-२२३ (७), सांगली-१७४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (९), सिंधुदुर्ग-४, रत्नागिरी-६१ (३), औरंगाबाद-६८ (१),औरंगाबाद मनपा-७२ (३), जालना-७८, हिंगोली-४५, परभणी-२७, परभणी मनपा-४९ (१), लातूर-१२१ (१), लातूर मनपा-११६, उस्मानाबाद-१२७ (२), बीड-८५ (१), नांदेड-५० (३), नांदेड मनपा-१६, अकोला-१८ (१), अकोला मनपा-१३ (१), अमरावती-४०, अमरावती मनपा-६४ (२), यवतमाळ-५४, बुलढाणा-५९ (३), वाशिम-२५, नागपूर-१३९ (३), नागपूर मनपा-५५२ (१३), वर्धा-१०, भंडारा-२२ (१), गोंदिया-१४ (१), चंद्रपूर-२४ (१), चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-३, इतर राज्य २० (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० नमुन्यांपैकी ५ लाख ९५ हजार ८६५ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ८९७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार २०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२८,७२६) बरे झालेले रुग्ण- (१,०३,४६८), मृत्यू- (७१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३००), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,८२५)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१३,९४४), बरे झालेले रुग्ण- (९०,३२६), मृत्यू (३३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,२८८)

पालघर: बाधित रुग्ण- (२१,२२६), बरे झालेले रुग्ण- (१४,२१०), मृत्यू- (५००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५१६)

रायगड: बाधित रुग्ण- (२३,४०२), बरे झालेले रुग्ण-(१७,६४०), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२८१५), बरे झालेले रुग्ण- (१५८९), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (५७६), बरे झालेले रुग्ण- (४२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८)

पुणे: बाधित रुग्ण- (१,३०,६०६), बरे झालेले रुग्ण- (८६,३९३), मृत्यू- (३१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,०२०)

सातारा: बाधित रुग्ण- (७३८६), बरे झालेले रुग्ण- (४३८३), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७८)

सांगली: बाधित रुग्ण- (६४०२), बरे झालेले रुग्ण- (३६१८), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५७५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१३,९०२), बरे झालेले रुग्ण- (६४१८), मृत्यू- (३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१०९)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४,३००), बरे झालेले रुग्ण- (८७४५), मृत्यू- (६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२८)

नाशिक: बाधित रुग्ण- (२६,३४१), बरे झालेले रुग्ण- (१६,३००), मृत्यू- (६६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३७३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२,८१६), बरे झालेले रुग्ण- (९०८७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९०)

जळगाव: बाधित रुग्ण- (१७,९३७), बरे झालेले रुग्ण- (१२,१७८), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०७८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११८२), बरे झालेले रुग्ण- (७६९), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६०)

धुळे: बाधित रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (३५६६), मृत्यू- (१५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८,४७३), बरे झालेले रुग्ण- (१२,०७७), मृत्यू- (५७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२२)

जालना: बाधित रुग्ण-(३०८०), बरे झालेले रुग्ण- (१७९४), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७३)

बीड: बाधित रुग्ण- (२६२९), बरे झालेले रुग्ण- (७७०), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७००)

लातूर: बाधित रुग्ण- (५२१९), बरे झालेले रुग्ण- (२३८८), मृत्यू- (१८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४२)

परभणी: बाधित रुग्ण- (१४६७), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१०२३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९५)

नांदेड: बाधित रुग्ण- (३८९३), बरे झालेले रुग्ण (१७३३), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३५५९), बरे झालेले रुग्ण- (१७६५), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७०२)

अमरावती: बाधित रुग्ण- (३५४६), बरे झालेले रुग्ण- (२३३५), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११४)

अकोला: बाधित रुग्ण- (३२६०), बरे झालेले रुग्ण- (२६४६), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)

वाशिम: बाधित रुग्ण- (११८८), बरे झालेले रुग्ण- (७८६), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२३६१), बरे झालेले रुग्ण- (१३९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०१)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२०६३), बरे झालेले रुग्ण- (१३०५), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३,५६४), बरे झालेले रुग्ण- (५६६४), मृत्यू- (३६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५३९)

वर्धा: बाधित रुग्ण- (३७४), बरे झालेले रुग्ण- (२१२), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१)

भंडारा: बाधित रुग्ण- (५१४), बरे झालेले रुग्ण- (३१५), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (४८९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०४९), बरे झालेले रुग्ण- (५८७), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (३९६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५५८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९८)

एकूण: बाधित रुग्ण-(५,९५,८६५) बरे झालेले रुग्ण-(४,१७,१२३),मृत्यू- (२०,०३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५८,३९५)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण २८८ मृत्यूंपैकी २३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २४ मृत्यू पुणे -१०, ठाणे जिल्हा –७, कोल्हापूर-३, नागपूर-१,नाशिक-१, औरंगाबाद -१  आणि अहमदनगर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे प्रादेशिक विभागातील वीजयोद्धांसह उत्कष्ट उपकेंद्र, डिजिटल कार्यालयांचा गौरव

0

पुणे, दि. 16: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील 16 अभियंते, तांत्रिक कर्मचारी या कोरोना वीजयोद्धांसह उत्कृष्ट उपकेंद्र व डिजिटल शाखा कार्यालयांना पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून शनिवारी (दि. 15) मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव व निसर्ग चक्रीवादळाच्या खडतर परिस्थितीत अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडलनिहाय प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कोरोना वीजयोद्धा म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ग्राहकसेवा, वसुली व सुरळीत वीजपुरवठ्याच्या निकषानुसार परिमंडलनिहाय एक उपविभागीय कार्यालय, महावितरण पोर्टल व अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ काम करणाऱ्या डिजिटल शाखा कार्यालय आणि बिघाडरहित व आदर्शवत उत्कृष्ट उपकेंद्रांची देखील मंडलनिहाय प्रत्येकी एक अशी निवड करण्यात आली. प्रशासकीय सुधारणा, तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर, उत्कृष्ट ग्राहकसेवा यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक व मनोबल वाढविण्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयाने कर्मचारी व कार्यालयांच्या सन्मानाचा हा उपक्रम सुरु केला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्याहस्ते पुणे परिमंडलमधील कोरोना वीजयोद्धा शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह डिजिटल शाखा कार्यालय व उत्कष्ट उपकेंद्रांना मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. ‘वीजयोद्धांचा गौरव हा प्रातिनिधीक असून पुणे प्रादेशिक विभागातील सर्वच अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळाच्या खडतर परिस्थितीत चांगली कामगिरी बजावली आहे’, असे गौरवोद्गार काढत श्री. नाळे यांनी कौतुक केले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. शंकर तायडे, सौ. पुनम रोकडे आदींची उपस्थिती होती. कोविड-19मुळे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व बारामती मंडलमधील कोरोना वीजयोद्धा व कार्यालयांना परिमंडल, मंडल कार्यालयांमध्ये गौरविण्यात आले.

पुणे प्रादेशिक विभागातील मंडलनिहाय कोरोना वीजयोद्धा पुढीलप्रमाणे: शाखा अभियंता / तांत्रिक कर्मचारी – विशाल नाईकनवरे / रोहित ढमाले (रास्तापेठ, पुणे), सन्नी टोपे / शेषनारायण फावडे (गणेशखिंड, पुणे), गणेश श्रीखंडे / गणेश लोखंडे (पुणे ग्रामीण), अमर कणसे / लक्ष्मण देबाजे (कोल्हापूर), अश्विनकुमारे बुचडे / गोविंद सागर (सांगली), रोहित राख / गोरख गावडे (बारामती), दत्तात्रय जरे / स्वप्निल जाधव (सातारा), हर्षवर्धन पाटील / आनंद कागदे (सोलापूर). तसेच मंडलनिहाय डिजिटल शाखा कार्यालय / उत्कृष्ट उपकेंद्र पुढीलप्रमाणे: गंगा व्हिलेज शाखा / ब्रम्हासन सिटी उपकेंद्र (रास्तापेठ, पुणे), शिवाजी हौसिंग शाखा / सुसगाव उपकेंद्र (गणेशखिंड, पुणे), आळंदी शहर शाखा / आळेफाटा उपकेंद्र (पुणे ग्रामीण), निगवे शाखा / नागाळा उपकेंद्र (कोल्हापूर), विटा शाखा 2 / कुमठे उपकेंद्र (सांगली), भाटघर शाखा / काटी उपकेंद्र (बारामती ग्रामीण), कोळेवाडी शाखा / सदर बझार उपकेंद्र सातारा (सातारा), नातेपुते शाखा 2 / अकोला उपकेंद्र (सोलापूर) परिमंडलनिहाय उत्कृष्ट उपविभागीय कार्यालय पुढीलप्रमाणे: वारजे उपविभाग (पुणे), बारामती शहर उपविभाग (बारामती), मिरज ग्रामीण 1 (सांगली).

स्व. आर.आर. (आबा) पाटील यांच्या जयंती निमित्त कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण

0

सांगली, दि. 16 : स्व.आमदार आर.आर. (आबा) पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 2515 इतर ग्रामीण विकास कार्यक्रम सन 2014-15 मधून मंजूर झालेले पंचायत समिती कवठेमहांकाळ येथील कर्मचारी निवासस्थान टाईप 2 चे आठ व अधिकारी निवासस्थान टाईप 4 चे दोन या निवासस्थानांचे लोकार्पण स्व.आर आर आबा यांच्या जयंती निमित्त ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व जलसंपदा व लाभ क्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, आमदार सुमनताई पाटील, तालुका पंचायत समितीचे सभापती विकास हक्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती श्रीमती पाटील, रोहित आर आर पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा स्थितीत नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये त्याकडे दुर्लक्ष करू नये त्वरीत उपचार करावेत उपचार वेळेत झाल्यावर धोका टाळता येतो. अँटीजेन टेस्ट सर्वत्र चालू केली आहेत. सांगलीत लवकरच 400 बेडचे कोरोनासाठी नवे हॉस्पिटल उभे केले जात आहे. या संपूर्ण काळात लोकांनी सहाकार्य करावे अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. नदीचे पाणी वाहून कर्नाटकात जात असते त्या कालावधीत टंचाईग्रस्त भागातील तलाव भरण कार्यक्रम आजपासून सुरू होणार आहे. टेंभूचे पाणी सांगोल्यापर्यत व म्हैसाळचे पाणी जत पर्यत नेवून सर्व तलाव भरूण घेण्यात येणार आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील पाणी प्रश्नही सुटेल.

कवठेमहांकाळ तालुक्यातील प्राथमिक शाळाच्या खोल्या व अंगणवाड्या इमारतीच्या खोल्या ग्रामपंचायत कार्यालय स्मशानशेड सुसज्ज करण्यात येतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. यावेळी त्यांनी ग्रामविकास विभागाचा अधिकाधिक निधी ग्रामीण भागात दिला जाईल. 15व्या वित्त आयोगाचा निधी अखर्चीत आहे तो ग्रामपंचयातीनी आराखड्यानुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च करावा.

बेरोजगार युवक-युवतींसाठी… रोजगाराची सुवर्णसंधी ऑनलाईन रोजगार मेळावा’

0

पुणे-कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. अन्न,वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी रोजगार ही देखील मूलभूत गरज बनली आहे.कोरोनामुळे नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले असून बेरोजगार असलेल्या तरुण युवक व युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी पुणे शहर काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्यावतीने संपूर्ण पुणे शहरात ऑनलाईन रोजगार मेळाव्याद्वारे पुणेकरांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित आयोजित केले असून पुढील 3 महिने हा रोजगार मेळावा राबवण्यात येणार आहे.पुणेकरांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन कोरोना बरोबरच बेरोजगारीवरही मात करावी असे आबा बागुल म्हणाले.

आबा बागुल म्हणाले की, सामाजिक कार्य करत असताना अनेक नागरिक नोकरीसाठी जनसंपर्क कार्यालयात येतात. कोरोनामुळे अनेक नागरिकांचे रोजगार गेल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बेरोजगार नागरिकांना रोजगार देण्यासाठी माझ्या संकल्पनेतून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून अ व्हेंचर ऑफ जॉब शोकेस इंडिया प्रा.ली. या कंपनीशी करार केला असून 500 हुन अधिक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी या कंपनीच्या माध्यमातून मा. श्री. आबा बागुल यांचे जनसंपर्क कार्यालय शिवदर्शन ,पुणे येथून विविध ठिकाणांमधील  Manufacturing, IT, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Facility, Hospitality, Real Estate, Automobile, Agriculture, Pesticide & Fertilizer, Media आदी क्षेत्रातील  नामवंत कंपन्या तरुण- तरूणींची ऑनलाईन  मुलाखत घेणार आहेत. यामध्ये कमीत- कमी ५ वी पास ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले तरुण – तरूणी सहभागी होऊ शकतात.
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे संयोजन काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमित बागूल करणार आहेत.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर  नाव नोंदणी करणे गरजेचे असणार आहे.

लिंक- https://bit.ly/3iF7nJR

ऑनलाईन नाव नोंदणी  दि. 15 ऑगस्ट  2020 पासून सुरू असून पुढील तीन महिने सुरू राहणार असून रोजगार मिळवण्यासाठी महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे असणार आहे.

1. ऑनलाईन   नोकरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे, नोंदणी लिंक – https://bit.ly/3iF7nJR

  1. मुलाखतीचे दिनांक, वेळ, ठिकाण आपणांस SMS/ Call द्वारे  कळविले जाईल. ( कृपया दिलेल्या दिवशी व वेळेतच मुलाखतीसाठी येणे अनिवार्य आहे. ) 
  2. मुलाखत घेणाऱ्या  कंपनी विषयी, पेमेंट, कामाचे ठिकाण, इतर सुविधांविषयी अधिक माहिती मूलाखतीच्या अगोदर कळवली जाईल. 
    4. मुलाखतीसाठी येताना फाॅरमल ड्रेस घालून येणे. 
  3. आपले Selection/Shortlist/Rejection सर्वस्वी आपल्या मुलाखतीवर अवलंबुन असणार आहे.
  4. आपले Selection/Shortlist/Rejection चे सर्व अधिकार मुलाखत घेणाऱ्या  कंपनीचे असतील.
  5. मुलाखत झाल्यानंतर ज्या लोकांचे Selection झाले आहे, त्यांना Call द्वारे   कळवले ज़ाईल. 
  6. ज्यांचे Selection होईल, अशा  लोकांनी सांगितलेल्या दिवशी कामावर हजर राहणे गरजेचे आहे.
    बेरोजगार युवक युवतींनी या सुवर्णसंधीचे सोने करून चांगला रोजगार मिळवावा असे आबा बागुल म्हणाले.

मैं भी अण्णा, तू भी अण्णा – अब तो सारा देश है अण्णा…

0

जनलोकपाल आंदोलनाला आज ९ वर्षे झाली…ह्या आंदोलनात माझा मी पणा गळाला….बहुधा स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या जन्मी सहभाग असेल वा नसेल, १९४२ च्या चले जाव चा थरार अनुभवायला मिळाला नसेल,जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनावेळी मी खूप लहान होतो – मात्र या सगळ्याची कसर भरुन निघाली ती अण्णा हजारे यांच्या १६ ऑगस्ट २०११ च्या जनलोकपाल विधेयका साठीच्या जन आंदोलनात….

बालगंधर्व चौकात मला मिळाले शेखर मुंदडा,दीपक भराडिया,कृष्णा यादव,गणेश बाकले,संजय ठाकूर,बद्रीनारायण सोमाणी,सदाशिव कुलथे,रामेश्वर शेवाळे,हेंद्रे काका,प्रिया पवार यांच्यासारखे असंख्य स्नेही ( सर्वांची नावे घेणे अशक्यच) – विवेक वेलणकर,विनिता देशमुख,,जुगल राठी,तृप्ती देसाई हे स्नेही अग्रभागी होतेच / अनेक संस्था संघटना आणि सामान्य माणसांच्या सहभागाने खरेतर सगळेच FACELESS झालो होतो / इथे होता फक्त तिरंग्याचा अभिमान आणि माझ्या देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी आसुसलेल्या व सर्वस्व अर्पण करण्यास तयार असलेल्या हजारोहजार अगदी सामान्य भारतीयांचा हुंकार…इथे अनुभवायला मिळाला तो मी पणाचा (अहं भावाचा ) त्याग,अण्णा वगळता ना कोणाचा जयजयकार,ना जात,ना धर्म,ना फोटोत चमकण्याची धडपड,ना रेटारेटी,ना दंगाधोपा – फक्त देशासाठी रस्त्यावर उतरलेल्या सामान्य नागरिकांच्या शक्तीचा अद्वितीय आविष्कार होता….


एक धगधगते यज्ञकुंड,ज्यात माझी समिधा पडावी यासाठी तडफडणारे सर्व वयोगटातील नागरिक
प्रत्येक आंदोलन,उपोषण,मोर्चा,कॅंडल मार्च,धरणे,बाईक रॅली आणि अगदी आनंदोत्सव सुद्धा उत्स्फूर्त,डोळ्यातील अश्रू ही नैसर्गिकच = १६ ऑगस्ट ला सुरु झालेले आंदोलन २०१२ मधे दिल्लीतील नृशंस निर्भया प्रकरणात टिपेले पोहोचले आणि पुणेकरांना पुणेकरांनी स्वातंत्र्यसमरात दिलेल्या योगदानाची जणु चुणुकच अनुभवायला मिळाली….
माझ्या संघर्षपूर्ण सामाजिक राजकीय प्रवासात शेकडो आंदोलने उभारली पण ह्या आंदोलनात सहभागी होवून अग्रेसर होण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्यच / किंबहुना अश्या चळवळींनी माझे जगणे समृद्ध केले…
संदीप खर्डेकर
पुणे. मो – ९८५०९९९९९५

कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ मिळाल्या पाहिजेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

बारामती, दि. 16 :- बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा कोणताही विलंब न होता तत्काळ मिळाल्या पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोरोना बाबतची आढावा बैठक बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग, पुणे) संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, जिल्हा परिषद पुणे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये वैद्यकीय सुविधा मिळण्यास रूग्णांना त्रास होऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये जे काही सण, उत्सव येतील ते साधेपणाने व गर्दी न करता साजरे करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

किल्ले शिवनेरीला राज्यपालांची भेट; पायी फिरून केली गडाची पाहणी

0

पुणे-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.

‘ भंडारदरा भरले ‘

0
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/628235127806420/

‘ भंडारदरा भरले ‘ हे दोन जादुई शब्द गेली अनेक वर्षे लाखो लोकांना दिलासा देताहेत. कानात प्राण आणून लोक हे दोन शब्द कुणाच्या तरी तोंडून ऐकण्यासाठी किंवा डोळ्यात प्राण आणून कुठेतरी वाचण्यासाठी आतुर झालेले असतात. कारण हे दोन शब्द केवळ एखादी तांत्रिक क्रिया समजून सांगत नाहीत तर पुढचे वर्षभर जीवाला बिनघोर करतात. हे शब्द जेव्हा कानावर पडतात, डोळ्यासमोर येतात तेव्हा मनाला लाभणार आत्मिक समाधान फक्त प्रवरेकाठच्या माणसांनाच माहीत असते…. या समाधानाच, या आनंदाच शब्दात वर्णन करणे कठीण… ज्ञानेश्वर माउलींनी पांडुरंगाला बघून
‘ रूप पाहता लोचनी सुख जालें ओ साजणी ‘ हे जे वर्णन केले त्यात पांडुरंगाच साजिरं रूप बघून आनंद झाला असं नाही म्हटलं तर ‘ सुख जालें ‘ असं म्हटलंय. अशीच काहीशी अवस्था अमृतवाहिनी प्रवरेच्या काठावर वसलेल्या आणि त्याच्या आजूबाजूच्या भंडारदरा ते प्रवरासंगम पर्यंतच्या गावातल्या लोकांची झालेली असते.
सर्वसाधारणपणे 15 ऑगस्ट पर्यंत भंडारदरा धरण भरते. यावर्षी तशी चिन्हे दिसत नव्हती पण मागच्या आठवड्यात पावसाने जोर धरला आणि 15 ऑगस्टनंतर अगदी थोड्या काही तासांनी भंडारदरा धरण भरले. दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीपासून भंडारदरा धरणात किती पाणी शिल्लक आहे याचं काऊंट डाऊन सुरू होतं. हे काऊंट डाऊन करणारात शेतकरी तर असतातच पण व्यापारी, उद्योजक आणि चाकरमानीही असतात, इथल्या जनमानसाचं भंडारदऱ्याशी इतकं घट्ट नातं नातं जुळलेलं आहे.
जिल्ह्यात कितीही मोठी घटना घडली आणि त्याच दिवशी भंडारदरा धरण भरले तरी वर्तमानपत्रात हेडलाईन होण्याचा मान भंडारदरा भरले या बातमीलाच मिळतो. दरवर्षी घडणारी ही तशी नैसर्गिक क्रिया पण त्यातली आतुरता गेल्या नऊ दशकात अजिबात कमी झालेली नाही. चला तर या सुखाच्या अनुभूतीचा आनंदोत्सव साजरा करूया

डॉ. संतोष खेडलेकर

मनसे शहराध्यक्षाची आत्महत्या; मागच्या वर्षी याच महिन्यात जिल्हाध्यक्षानेही घेतला होता गळफास

0

नांदेड- मनसे शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नांदेडचे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. विशेष म्हणजे, मागच्या वर्षी याच महिन्यात नांदेडच्या जिल्हाध्यक्षानेही आत्महत्या केली होती.

जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी काल (शनिवार 15 ऑगस्ट) रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. या नोटमध्ये त्यांनी लिहीले, ‘राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे.’

मागच्या वर्षी याच महिन्यात जिल्हाध्यक्षानेही आत्महत्या केली होती
मागच्या वर्षीय या महिन्यात नांदेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी गोविंदराव जाधव यांनीही आपल्या राहत्या घरात गळफासघेऊन आत्महत्या केली होती. संभाजी जाधव हे राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांपैकी होते.

अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण – मंत्री नवाब मलिक

0

मुंबई, दि. 16: राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात 100 उमेदवारांची निवड

प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्यास ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी 1 हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी 300 रुपये, प्रतिमहिना 1 हजार 500 रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी 3 हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज अल्पोपहार देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्याचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात कमाल 100 विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाकरिता प्रत्येक जिल्ह्यास साधारण 5 लाख 60 हजार रुपये खर्च असून यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातून किमान 30 विद्यार्थी आले तरी त्यांचे प्रशिक्षण घेणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मंत्री श्री. मलिक यांनी केले आहे.

राज्यात 2009 मध्ये ही योजना सुरु झाली. यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक अल्पसंख्याक तरुणांची निवड पोलीस दलात झाली आहे. याशिवाय अनेकांची निवड सीआरपीएफ, एसआरपी, विविध सेना दले, रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षक अशा स्वरुपाच्या विविध पदांवर झाली आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

कुर्ला येथील कोहिनूर रुग्णालयात सामान्य रुग्णाला लाखाचे बिल आकारल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश

0

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्यासह मंगलप्रभात लोढा यांची रुगणालयाला भेट
मुंबई दि. १६- कुर्ला कोहिनूर येथील एका सामान्य रुग्णाला सतरा लाख दहा हजाराचे आल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज दुपारी रुग्णालयाला भेट दिली व या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश केला. त्यामुळे हॉस्पिटलचे प्रशासन ताळ्यावर आले. त्या सामान्य रुग्णाला लाख रुपयाचे अवाजवी बिल आकारल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सामान्य रुग्णाचे बिल कमी करण्यात आले. अशा पद्धतीची लूट खासगी रुग्णालयात सुरू असून ही लूट थांबविण्याचे आवाहन प्रविण दरेकर यांनी केले. तसेच मुंबईतील अशा खासगी रुग्णालयांच्या लुटमारी संदर्भात दोन दिवसात मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आज त्यांच्यासमवेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, “खाजगी हॉस्पिटलची कार्यपद्धती आज उघडकीस आली असून किती भयानक पद्धतीने बिल आकारले जाते, याचे मूर्तिमंत उदाहरण एका सामान्य रुग्णाच्या बिलाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. रामचंद्र दरेकर असे या रुग्णाचे नाव आहे. एका महिन्याचे बिल १७ लाख १० हजार आकारण्यात आले. यांसदर्भात आपण आणि मंगल प्रभात लोढा येथे येणार आहे कळल्यानंतर हे बिल १३ लाखांपर्यंत कमी करण्यात आले. या १३ लाखाच्या बिलाची विभागवारी मागितली असता, २ लाख रुपये हे फक्त पीपीई किटचे दाखविले आहेत. साधारणतः एका पीपीई किटला २७०० रुपये आकारले आहेत, त्याची बाजारात ३०० रुपये किंमत आहे. रुपये ४०० ते ५०० इंजेक्शनसाठी आकारले आहेत. पण ८२ वर्षाचा रुग्ण आहे. त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स कार्यान्वित होऊ शकतात का ? हाही एक प्रश्न उपस्थित होतो. दीड ते २ लाखाचे बिल हे १७-१८ लाख रुपयांवर जाते यापेक्षा गोरगरिबांची लूट काय असू शकते. अशाप्रकारचे भयानक वास्तव कोहिनुर रुग्णालयाच्या माध्यमातून उघडकीस आले आहे. फायर ब्रिगेडमधून सेवानिवृत्त झालेले हे रुग्ण ज्यांनी आपले सर्व आयुष्य लोकांचे जीव वाचविण्यासाठी खर्ची घातले. त्यांचा जीव वाचू शकला नाहीच, उलट सतरा – अठरा लाखांचे बिल येणे. यासारखा सेवेचा आणि सर्वसामान्य जनतेचा अपमान काय असू शकतो ? असा गंभीर प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
“या लुटीवर महापालिकेचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. फक्त बेड द्यायचे. पण वैदयकीय साहित्य, औषधे कितीला खरेदी करायचे यावर ना पोलिसांचे नियंत्रण, ना सरकारचे नियंत्रण. त्यामुळे आम्ही ५० बेड आरक्षित केले म्हणजे आम्ही गरिबांसाठी काहीतरी केले, या महापालिकेच्या दाव्याला काही अर्थ नाही. कारण बेड ज्या कमी किंमतीला ठरूवून दिले आहेत त्याची अधिकची वसुली विविध पद्धतीच्या औषधांच्या किंमतीच्या माध्यमातून केली जात आहे. असे हे विदारक चित्र उघड झाले आहे. म्हणजे २ लाखाची पीपीई किट लागणे म्हणजे एका रुग्णाला दिवसातून ३ वेळा पीपीई किट घालून तपासणे असे अर्थ होतो, पण एक पीपीई किट घालून एक डॉक्टर एकावेळी २५ ते ५० रुग्णांना तपासू शकतो. अशाप्रकारे पळवाट काढून सर्वसामान्य रुग्णांची लूट खाजगी रुग्णालयांकडून केली जाते. हे भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. याआधी आपण बोरिवलीच्या अँपेक्स हॉस्पिटल मध्येही असे प्रकरण उघडकीस आणसे, कांदिवलीच्या पार्थ हॉस्पिटलचे प्रकरण काढले, ठाण्यातही असे लूटमारचे प्रकार घडत आहेत, त्यामुळे आता भाजपच्यावतीने मुंबईतील सर्व खासगी हॉस्पिटलचा लेखाजोखा घेण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज दुपारी कोहिनूर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालायच्या वतीने रुग्णालयाचे उपाध्यक्ष अतुल मोडक उपस्थित होते. दरेकर यांनी यावेळी रुग्णाला पाठविण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या बिलाची माहिती मोडक तसेच प्रशासकीय अधिका-यांना विचारली. त्यानंतर वैदयकीय उपचारासह अन्य वैदयकीय साहित्याचे अवाजवी बिल रुग्णालयाकडून आकारल्याचे यावेळी दरेकर यांनी सिध्द करुन दाखविले.
याप्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र पाटील, कुर्ला पश्चिम येथील विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश पवार, भाजपा उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष, नगरसेवक सुषम सावंत, नगरसेवक हरिष भांदिर्गे आदी उपस्थित होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0

मुंबई, दि. 16 :- माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकनेते होते. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. संसदीय लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांनी राजकारण केलं. विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल श्रद्धा, आदर होता. ते महान लेखक होते. पत्रकार होते. संवेदनशील कवी होते. त्यांचं नेतृत्वं, वक्तृत्व, दातृत्व असामान्य होतं. देशाच्या या सर्वकालीन महान नेतृत्वाच्या स्मृतिदिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन केलं आहे.

कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावर करू कोरोनावर मात

0

कोल्हापूरकरांची लाख मोलाची साथ आणि दातृत्वावरच कोरोनावर मात करून कोरोनाचे संकट लवकरच दूर करू, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला आहे. गेल्या साडेपाच महिन्याच्या कालावधीत पालकमंत्री सतेज पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून कोरोनाच्या नियंत्रणाबाबत आणि संभाव्य महापुराबाबत उपाययोजना करत आहेत. याविषयी जाणून घेवू.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रुग्ण डिस्चार्ज होण्याचे प्रमाणही अत्यंत चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील जनतेच्या सक्रीय पुढाकाराने कोरोना विरुद्धच्या युद्धात निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास बाळगला आहे. त्यांचा हा आत्मविश्वास सार्थ ठरविण्यासाठी ‘आम्ही कोल्हापुरी-जगात भारी’ ही उक्ती कोरोनाच्याबाबतीत खरी ठरविण्यासाठी जनतेने आता प्रतिबंधक उपाययोजना स्वत:हून कठोरपणे अंमलात आणून आपण, आपलं कुटुंब आणि समाजाला कोरोनापासून दूर ठेवण्याची गरज आहे.

प्लाझ्मा थेरेपीने 25 अत्यवस्थांना जीवदान

कोरोना रुग्णावरील प्लाझ्मा थेरेपीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. आजअखेर 60 दात्यांनी प्लाझ्मा दान केला आहे. यामुळे 25 अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यासाठी सीपीआर, डी.वाय.पाटील हॉस्पिटल, आयसोलेशन, आयजीएम हॉस्पीटल या कोरोना हॉस्पीटलांबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोल्हापूर शहरातील खासगी हॉस्पीटलांनीही रुग्णसेवेसाठी योगदान दिले आहे. 

7 हजार 332 बेड्सची उपलब्धता

जिल्ह्याचे प्रमुख आरोग्य उपचार केंद्र म्हणून सी.पी.आर.कडे पाहिले जाते. सी.पी.आर. मध्ये सध्या 429 बेड्सची व्यवस्था असून त्यापैकी 222 ऑक्सिजन बेड्स आहेत. आणखी 94 ऑक्सिजन बेड्स वाढविण्याचे काम सुरु आहे. आयसीयू बेड्स 73 असून आणखी 8 बेड्सची भर घातली जात आहे. त्याचबरोबर 66 व्हेंटिलेटर, 50 एनआयव्ही, 20 हाय फ्लो नेझल ऑक्सीजन या सुविधा उपलब्ध आहेत.  सीपीआरसह समर्पित कोरोना हॉस्पीटल आणि समर्पित कोरोना मदत केंद्र यांना एकूण 12 एक्सरे मशिन देण्यात येत आहेत. जिल्ह्यात दररोज होणारी 2 हजार स्वॅब नमुने तपासणी क्षमता आता 5 हजार पर्यंत करण्यात येत आहे.  प्रत्येक कोव्हिड केअर सेंटरमध्ये ॲन्टीजेन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सी.पी.आर. मध्ये 20 किलो लिटर ऑक्सीजन टँक बसविण्यात येणार असून जम्बो सिलेंडर व लिक्वीड ऑक्सीजन प्राधान्याने उपलब्ध केले आहे. सर्व कोरोना काळजी केंद्रे आणि समर्पित कोरोना मदत केंद्राला एकूण 700 आणखी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 14, दुसऱ्या टप्प्यात 24 कोव्हिड काळजी केंद्रे, समर्पित कोरोना सेवा केंद्र 15, समर्पित कोरोना हॉस्पीटल 4 कार्यान्वित करण्यात आली आहेत. एकूण 7 हजार 332 बेडची उपलब्धता असून यामध्ये 808 ऑक्सिजन बेड व 288 आयसीयू बेड आहेत.

खासगी रूग्णालयांच्या बिलासाठी लेखा परिक्षकांची नियुक्ती

रुग्णांना हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडची माहिती कळावी तसेच बेड उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यासाठी तीन स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत. दिवसाला सरासरी 400 ते 500 फोन स्वीकारण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांकडून खासगी हॉस्पीटलमध्ये शासकीय दराने बील आकारणी व्हावी तसेच उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी प्रत्येक हॉस्पीटलसाठी एका शासकीय कर्मचाऱ्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. महापालिकेच्यावतीने खासगी रूग्णालयांना दरफलक लावण्याबाबत कळविण्यात आले असून बिले तपासणीसाठी लेखापरीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही हॉस्पीटलांसाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 

गृह विलगीकरणाचा वडणगे पॅटर्न

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीने सर्वप्रथम पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी केला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरु झाला असून यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण निश्चितपणे कमी झालेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आजअखेर जिह्यात 3 हजारहून अधिक कोरोना बाधित घरी उपचार घेत आहेत. प्रशासनामार्फत या सर्वांना किट दिले असून त्यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, डिझीटल थर्मामीटर, मास्क इत्यादी वस्तू देण्यात आल्या आहेत. यापैकी 2 हजारहून अधिक आता बरे झाले आहेत.

कोल्हापूरकरांची साथ दातृत्वाचा हात

कोरोनाच्या या संकट काळात अनेक सेवाभावी संस्था, संघटना व व्यक्तींनी कोल्हापूर रिलीफ फंड याला मदत करुन दातृत्वाची परंपरा जपली आहे. रोटरी मुव्हमेंट कोल्हापूर तर्फे 62 लाख रुपये खर्चून 538 बेड्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी 120 बेड्स च्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल येथे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. या ठिकाणी क्रिडाई कोल्हापूर तर्फे पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच शिरोली येथील जैन मंदिरामध्ये जैन समाजातर्फे कोवीड केअर सेंटर सुरु केले आहे. कसबा बावडा, राजोपाध्येनगर, फुलेवाडी या ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी कोवीड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजक व औद्योगिक संघटना यांनी 20 व्हेंटीलेटर उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले असून त्यापैकी 3 व्हेंटीलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केले आहेत.

घाटगे ग्रुपने शववाहिका उपलब्ध करुन दिली आहे. व्हाईट आर्मी संस्थेने कोवीडच्या काळात लाखो गरजूंना जेवण उपलब्ध करुन दिले आहे. अनेक शैक्षणिक संस्था, साखर कारखाने यांनी सुद्धा आपल्या कडील सुविधा कोरोना केअर सेंटर तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. होर्डिंग ॲण्ड आऊट सोर्सींग ॲडव्हर्टायझर्स असोसिएशनच्या माध्यमातून 2 हजार प्रबोधनाचे फलक लावण्यात आले आहेत.

उत्तम नियोजनाने अतिवृष्टीवर मात

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टिमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतूनही जिल्ह्याला सावरता आले. यापुढे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे नियोजन सुद्धा केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. 

पूर परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफच्या 4 पथकांसह स्वयंसेवी संस्थांची पथकेही तैनात आहेत. यात जवळपास 808 स्वयंसेवक आहेत. 51 रबर बोट, 700 लाईफ जॅकेट, 400 लाईफ रींग, 18 आस्का लाईट उपलब्ध आहेत. पुढारी रिलिफ फौंडेशनतर्फे दोन यांत्रिकी बोटी महापालिकेला नुकत्याच प्रदान करण्यात आल्या आहेत. यापूर्वीही पाच यांत्रिकी बोटी जिल्हा प्रशासनाला प्रदान करण्यात आल्या आहेत. 

गणेशोत्सव साजरा करताना सोशल डिस्टंसिंगसह स्वत:च्या आणि कुटूंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्लाझ्मा दान सारखे उपक्रम राबवावेत. मोहरमच्या उत्सवात सुद्धा सर्वांनी आपली काळजी घ्यायला हवी.

– सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील (गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर)

(शब्दांकन: प्रशांत सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर)

असा होता आठवडा

0

दि.९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शासनाने घेतलेले निर्णय आणि घडामोडींचा संक्षिप्त आढावा

कोरोना युद्ध

९ ऑगस्ट २०२०

  • बरे झालेल्या १३ हजार ३४८ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. आतापर्यंत ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे. नवीन निदान झालेले रुग्ण- १२ हजार २४८, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के  . सध्या १ लाख ४५  हजार ५५८  रुग्णांवर उपचार सुरू. आज ७८ हजार ७० चाचण्या पूर्ण, नोंद झालेले मृत्यू- ३९०.
  • महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न, उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड जाहीर, स्टार्टअप्सना १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश मिळणार असल्याची कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती.
  • कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असताना प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे  ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षणाची सोय उपलब्ध.        दीक्षा ॲपव्दारे दररोज इयत्ता व विषयनिहाय ई- साहित्य अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याची सुविधा. ऑफलाइनची सुविधा सुध्दा उपलब्ध. घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण.  
  • २० जुलै, २०२० पासून सह्याद्री वाहिनीवर एमकेसीएल फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण.
  •  दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे किंवा नाही अशा ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षण सुरु.

१० ऑगस्ट २०२०

  • आज बरे झालेल्या ६७११ रुग्णांची घरी रवानगी. आतापर्यंत एकूण ३ लाख ५८ हजार ४२१ रुग्ण बरे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के. आज ९,१८१ नवीन रुग्णांचे निदान, , सध्या १ लाख ४७ हजार ७३५ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु   . आज२९३ करोनाबाधितरुग्णांच्यामृत्यूंचीनोंदमृत्यूदर३.४४ टक्के
  • लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन  13 ऑगस्टपासून शिथिल तर 17 ऑगस्ट पासून पूर्णपणे उठणार असल्याची वैद्यकीय शिक्षण व  सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
  • २२ मार्च ते ९ ऑगस्ट पर्यंत  २,२५,३८०    गुन्ह्यांची नोंद, ३३,११७ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी  १९ कोटी ८८ लाख ०५  हजार ३५ ४ रु. दंडाची आकारणी.
  • मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते  बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगावराजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित.  या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे 100 व 20 खाटांची सोय उपलब्ध.

११ ऑगस्ट २०२०

  • २२ मार्च ते १० ऑगस्ट पर्यंत  कलम १८८ नुसार २, २५ ,९०७    गुन्ह्यांची नोंद, ३३,१९० व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी  १९ कोटी ९९ लाख ७३  हजार ८०४ रु. दंडाची आकारणी.
  • प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे आणि गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद. ठळक मुद्दे-  कोरोना बाधित आणि मृत्यू झालेले एकही प्रकरण महाराष्ट्राने लपवले नाही, मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न, मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक,  कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी सर्वोच्च प्राधान्य. याकाळात शिवभोजन योजनेव्दारे दर महिन्यात लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय, कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालक व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णय, कोरोनानंतरचे उपचार व्हावे यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज, महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरु करणार, इम्युनॉलॉजी लॅबची संख्या वाढविण्याची गरज, विषांणुचा उद्भव कसा आणि का होतो यावर संशोधन करण्याची गरज, अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय आवश्यक, राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह साडेतीन लाख खाटा उपलब्ध,  
  • आज बऱ्या झालेल्या १० हजार १४ रुग्णांची घरी रवानगी.  आतापर्यंत एकूण ३ लाख ६८ हजार ४३५ रुग्ण बरे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.७९ टक्के. आज ११ हजार ८८ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४८ हजार ५५३ ॲक्टिव्ह रुग्ण. आज २५६ मृत्यूंची नोंद. मृत्यूदर ३.४२ %. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २८,३७,५७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,३५,६०१ (१८.८७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह, १०,०४,२३३ व्यक्ती होमक्वारंटाइन, ३५,६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन.

१२ ऑगस्ट २०२०

  • आज बरे झालेल्या १३ हजार ४०८ रुग्णांची घरी रवानगी. ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या. एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ रुग्ण बरे, आज १२ हजार ७१२ नवीन रुग्णांचे निदान, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.६४ टक्के,  सध्या १ लाख ४७  हजार ५१३  रुग्णांवर उपचार सुरू, आज नोंद झालेले  मृत्यू – ३४४.
  • खुल्या प्रवर्गातील वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार  असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती.
  • राज्यातील वैद्यकीय व दंत महाविद्यालयात कार्यरत निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा दहा हजार रुपयांची 1 मे 2020 पासून वाढ करण्याचा निर्णय.
  • कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करण्याची, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे मागणी.
  • कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के आकराले जाणारे शुल्क अभय योजनेअंतर्गत माफ.
  • कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा वसतीगृह संचालक संघासोबत बैठक. यावेळी खासदार  सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मागासवर्ग, बहुजन समाज  कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, खा.श्री  शरद पवार उपस्थित. आश्रमशाळातील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड मोबाइल फोन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात शासकीय उपाययोजनेबाबत बैठकीत चर्चा.
  • राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे सुधारीत दर जाहीर, आधिच्या दरात प्रति तपासणी ३०० रुपये कमी. सॅम्पल घेऊन त्याची वाहतूक आणि नमुन्याच्या अहवालाकरिता २२०० रुपयांऐवजी १९०० रुपये दर, स्वॅब कलेक्शन सेंटर, कोरोना केअर सेंटर्स, क्वारंटाइन सेंटरमधून स्वॅब घेतल्यास २५०० रुपयांऐवजी २२०० रु. दर, रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २५०० रुपये दर.

मंत्रिमंडळ  निर्णय

  • कोविड विषाणुमुळे आदिवासी कुटुंबांना रोजगार नसल्याने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याने आर्थिक विवंचनेतील आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय, सुमारे 11.55 लाख आदिवासी लाभार्थींना याचा फायदा. या योजनेत एकूण 4 हजार रुपये कुटुंब अनुदान.  ज्यामध्ये 2 हजार रुपये किंमतीच्या वस्तू आणि 2 हजार रुपये रोख रक्कम बँक खात्यात जमा, यासाठी 486 कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता.  
  • प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्या चण्याऐवजी प्रति महिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय.
  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 500 कोटी इतका निधी आकस्मिकता निधी अग्रिमातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय.

१३ ऑगस्ट २०२०

  • बऱ्या झालेल्या ९११५ रुग्णांची घरी रवानगी. एकूण ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण बरे, रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६९.८ टक्के  . ११ हजार ८१३ नवीन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ४९  हजार ७९८ रुग्णांवर  उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू – ४१३
  • उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काजू व्यावसायिकांच्या विविध मागण्यासंदर्भात  बैठक, उद्योगमंत्री श्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित, काजू व्यावसायिकांना राज्याच्या जीएसटीची शंभर टक्के प्रतिपूर्ती; मागील कालावधीतील व्हॅटची थकीत रक्कम परत देण्याचा श्री पवार यांचा‍ निर्णय.
  • ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी 23 लाख 9 हजारांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द.
  • आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी २०२० – २१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंतची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्ट पर्यंत करण्यात आल्याची सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.
  • विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या सूचनेनुसार  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर 2020 रोजी होणारी परीक्षा आता सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्याचा निर्णय.

१४ ऑगस्ट २०२०

  • आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विस्थापित मजूर व विनाशिधापत्रिकाधारकांना पाच किलो  मोफत तांदूळ व एक किलो  अख्खा चना  वाटप करण्यास 31 ऑगस्ट 2020 पर्यंत  मुदतवाढ.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य आणि बांधकाम कामगारांच्या  खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याचा कामगार मंत्री दिलीप         वळसे-पाटील यांचा निर्णय. यामुळे १० लाख बांधकाम कामगार लाभान्वित. यासाठी मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च.
  • कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांच्या विमा कवचाची रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती. प्रस्तावास एका दिवसात मंजुरी.
  • सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोविड 19 मुळे अनिश्चित काळासाठी स्थगीत.
  • २२ मार्च ते १३ ऑगस्टपर्यंत  २, २८ ,०७६   गुन्ह्यांची नोंद, ३३,३५९ व्यक्तींना अटक, विविध गुन्हांसाठी  २० कोटी ६२ लाख ५३  हजार ४९४ रु. दंडाची आकारणी, अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ४३  हजार ४८४   पासेसचे वितरण.
  • भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयू प्रकल्पाचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुभारंभ, यामुळे अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा उपलब्ध. अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा लवकरच कार्यान्वित.
  • बऱ्या झालेल्या १० हजार ४८४ रुग्णांची घरी रवानगी. एकूण ४ लाख १ हजार ४४२ रुग्ण बरे. रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७०.०९ टक्के  . आज १२ हजार ६०८ नविन रुग्णांचे निदान, सध्या १ लाख ५१  हजार ५५५ रुग्णांवरउपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू-  ३६४.

१५ ऑगस्ट २०२०

  • बरे होऊन घरी रवानगी केलेले रुग्ण- ६८४४. आतापावेतो  ४ लाख ८ हजार २८६ रुग्ण बरे. बरे होणाचे प्रमाण ६९.८२ टक्के. आज १२ हजार ६१४ नवीन रुग्णांचे निदान. सध्या १ लाख ५६  हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू. नोंद झालेले मृत्यू-  ३२२.

इतर निर्णय व घडामोडी

९ ऑगस्ट २०२०

  • जागतिक आदिवासी दिनानिमित्त  उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री अॅड. के.सी. पाडवी आणि वनमंत्री श्री संजय राठोड यांच्याद्वारे शुभेच्छा.
  • उपमुख्यमंत्री श्री  अजित पवार यांच्यामार्फत ऑगस्ट क्रांतिदिनाच्या शुभेच्छा.
  • जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दशरथ मारुती पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्याद्वारे दु:ख व्यक्त.
  • महाराष्ट्र सायबर विभागात इंटर्नशीपची संधी, संपर्क-  Twitter@MahaCyber1 / The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

१० ऑगस्ट २०२०

  • मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाबाबत सूचना निर्गमित, प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार असल्याची ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची माहिती.
  • राज्यातील पूरस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा, आपत्ती निवारण व सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची श्री ठाकरे यांची मागणी. ठळक मुद्दे-  निसर्ग चक्रीवादळाने राज्यात १ हजार ६५ कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान, ५  ऑगस्ट २०२० रोजी वादळासह पडलेल्या पावसामुळे मुंबईत अंदाजे ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान, त्यामुळे राज्याला लवकरात लवकर मदत आवश्यक. केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाची जागा मुंबई महानगर पालिकेस हस्तांतरीत केल्यास माहूल पंपिंग स्टेशनच्या उभारणीच्या कामाला गती येणे शक्य. यामुळे हिंदमाता, दादर, वडाळा या भागातील पावसाचे मोठ्याप्रमाणात साचणारे पाणी बाहेर काढणे शक्य. नदीकाठी पुररेषेच्या आत राहणाऱ्या मानवी वस्त्या शोधून तेथील नागरिकांना इतरत्र हलवण्याची, योग्य जागी त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज. मराठवाड्याच्या हवामान अंदाजासाठी औरंगाबाद येथे  स्वतंत्र ३ x डॉपलर रडार उभारणीची मागणी.

११ ऑगस्ट २०२०

  • गणेशोत्सवाच्या काळात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण भागात चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे , ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश.
  • पर्यावरण प्रभाव मूल्यांकन मसुद्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण  आणि वनमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांना विनंती.
  • विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री यांना विनंती.

१२ ऑगस्ट २०२०

  • दिनांक १३ ते २० ऑगस्ट या कालावधीत अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयवदान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांची विद्यापीठांना सूचना.
  • उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशातील १२१ पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलीस पदक जाहीर, महाराष्ट्रातील १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश.
  • पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली दूध भेसळ रोखण्यासंदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित. महत्वाचे मुद्दे – दूध भेसळ  विरोधात दुग्धव्यवसाय आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने  कठोर कारवाई, प्रमाणित नसलेल्या दुधात नीळ टाकण्याचे निर्देश, क्षेत्रीय पातळीवर जाऊन दुधाचे नमुने तपासणार.
  • मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक. महत्वाचे मुद्दे–         रंगवैखरी नाट्याविष्कार स्पर्धेचे दरवर्षी आयोजन, मराठीतल्या उत्तमोत्तम साहित्याचे श्राव्य पुस्तक (बोलक्या पुस्तकांना) योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यास मान्यता, दुसऱ्या टप्प्यात ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा यांचे मान्यवर कलावंतांकडून बोलक्या  पुस्तकात रूपांतर. “सिंधुदुर्गातील रानभाज्या” या पुस्तकाला अर्थसहाय्य, मराठी विकास संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध आस्थापनांमधील अमराठी भाषकांसाठी असलेल्या मराठी प्रशिक्षण वर्गाच्या संख्येत वाढ.  सीबीएससी व आयसीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा सुलभ संदर्भसाहित्याची निर्मिती, अमराठी भाषकांना उपयुक्त ठरलेल्या “मायमराठी” पाठ्यक्रमांसारखे नवीन उपक्रम,मराठी भाषा-साहित्य-संस्कृती याविषयांवर मुंबई दूरदर्शनवरून प्रदर्शित कार्यक्रम दूरदर्शनच्या सहकार्याने संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, महाराष्ट्रातील ९ विद्यापीठांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील लोककलांचे डिजिटायजेशन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार, मराठी साहित्यक्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या साहित्यिकांपैकी निवडक साहित्यिकांच्या गावी अथवा जिथे त्यांची स्मारके आहेत अशा ठिकाणी भाषा-साहित्यविषयक विविध उपक्रमांचे आयोजन, कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने सार्वजनिक तसेच वैयक्तिक आरोग्य साक्षरता वाढण्यास साहाय्यभूत ठरेल अशा सुलभ साहित्याची मराठीतून निर्मिती.

मंत्रिमंडळ  निर्णय

  • उपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय, या सुधारणेनुसार अर्धवट अवस्थेतील अथवा कुठलेही काम सुरु नसलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेतल्यावर त्यासाठी आरंभ प्रमाणपत्र मिळाल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत भाडेकरु/रहिवाशी यांचे पुनर्रचित गाळे पूर्ण करुन देणे म्हाडास बंधनकारक. या निर्णयामुळे 14500 उपकरप्राप्त इमारतीतील रहिवाशांना फायदा.
  • रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी लघुपाटबंधारे योजनेच्या 290 कोटी 30 लाख रुपये किंमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता.  

१३ ऑगस्ट २०२०

  • आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
  • उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने आयोजित अवयवदान प्रोत्साहन व जनजागृती अभियानाचे राज्यपाल श्री भगतसिंह कोशारी यांच्या हस्ते उद्घाटन.
  • कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोल मधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांची माहिती.
  • तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्री  (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्यामार्फत रायगड जिल्हा पोलीस अधिक्षकांना निर्देश.  
  • कांदीवली येथील शिपोंली क्रीडा संकुलाच्या बांधकामाला तत्काळ सुरुवात करण्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे निर्देश.
  • पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या  अध्यक्षतेखाली बैठक. उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषामंत्री श्री. सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री. सुनील केदार, सामाजिक न्यायमंत्री श्री. धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री श्रीमती आदिती  तटकरे, राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे उपस्थित. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या नावावर चर्चा.

१४ ऑगस्ट २०२०

  • राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत अभिनंदन. उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर.
  • माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
  • पैलवान खाशाबा जाधव यांना,स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.
  • माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या  पुण्यतिथीनिमित्त उप मुख्यमंत्री श्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
  • पैलवान खाशाबा जाधव यांना,स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे अभिवादन.

15 ऑगस्ट 2020

  • स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयातील मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठळक मुद्दे– आरोग्य या विषयाकडे  प्राधान्याने लक्ष, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 150 टेस्टिंग लॅब सुरू, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 29 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 980 कोटी रुपये रक्कम खात्यावर जमा करून त्यांची कर्जमुक्ती. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे 418 लाख क्विंटल यावर्षी कापूस खरेदी.रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू. ऑनलाइन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय. अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर सध्या सुमारे 50 ते 60 हजार उद्योग सुरू. उद्योगक्षेत्रात 12 देशांमधील गुंतवणूकदारांसोबत सुमारे 16 हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार. देशात प्रथमच तज्ज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती. जिल्ह्यातील डॉक्टरांचे सुद्धा टास्क फोर्स तयार. गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेकिंग , ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटला वेग. जिल्ह्याजिल्ह्यात रुग्ण सुविधांची उभारणी वेगाने सुरू. साडेचार कोटी लिटर दुधाचे भुकटीत रूपांतर. आदिवासी मुले व महिलांना ही दूध भुकटी मोफत देण्याचा निर्णय. गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली आदिवासी खावटी योजना सुरू, 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू.
  • स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण, श्रीमती रश्मी ठाकरे यांच्यामार्फत राष्ट्रध्वजास मानवंदना.
  • स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश श्री दिपांकर दत्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण.
  • स्वातंत्र्यदिनानिमित्‍त राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्‍न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित. 
  • मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त कोविड योद्ध्यांचा पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सन्मान.
  • मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.