Home Blog Page 2480

निशिकांत कामत यांच्या निधनाने एक उमदा दिग्दर्शक हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0

मुंबई, दि. १७ : ‘डोंबिवली, फास्ट’, ‘लय भारी’, दृश्यम, मदारी, अशा दर्जेदार सिनेमांचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतच्या अकाली निधनाचे वृत्त मनाला चटका लावून गेले. अवघ्या ५० व्या वर्षी कामत यांनी जगाचा निरोप घेतला हे अजूनही मनाला पटत नाही. दर्जेदार चित्रपट देणाऱ्या निशिकांत कामतच्या जाण्याने चित्रपसृष्टीने एक उमदा दिग्दर्शक गमावला आहे, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.निशिकांत कामत हे यकृताशी संबंधित आजारामुळे हैदराबादमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, यातून ते लवकर बरे होतील अशी सर्वांना आशा होती पण आज संध्याकाळी त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. निशिकांत कामत यांनी ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘मदारी’, यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शन निशिकांत केले. निशिकांत कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कामत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे श्री. थोरात म्हणाले.

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन

0

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यूज जर्सी येथे त्यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला होता. पंडित जसराज हे गेल्या ८० वर्षांपासून जास्त काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातल्या अनेक प्रमुख पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. मेवाती घराण्यातील गायकी असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

ख्यातनाम शास्त्रीय गायक व संगीतकार पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले आहे, अशा शोकभावना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.पंडितजी मेवाती घराण्याशी संबंधित होते. सुरुवातीला त्यांनी वडिलांकडून संगीताचे धडे गिरवले व त्यानंतर भावाने त्यांना प्रशिक्षण दिले. ८० वर्षांहून अधिक काळ ते संगीत क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या संगीताने त्यांनी लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्यांनी शास्त्रीय संगीताची वेगळी छाप सोडली. पंडित जसराज यांचे भारत, अमेरिकेसह जगभरात अनेक शिष्य आहेत. पंडितजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन पंडित जसराज यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे श्री.थोरात म्हणाले.

‘अगदीच शांत झालास’; निशिकांत कामतसाठी अमेय खोपकरांची भावनिक पोस्ट

0

बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

आज एकदम शांत झालास, असं म्हणत अमेय खोपकर यांनी अश्रुंना वाट मोकळी केली आहे. सोबतच तुझी सतत आठवण येत राहिलं असंही त्यांनी म्हटलं आहे.

“अजून ‘लय भारी’ काम करायचं होतं मित्रा…तुझ्या इतका शांतचित्त दिग्दर्शक मी तरी अजून पाहिलेला नाही. आता तर अगदीच शांत झालास…अजून काय लिहू? तू तर मनातलं ओळखायचास आणि गूढ हसायचास…तसाच गूढपणे गूढ देशी निघून गेलास. तुझी आठवण सतत येत राहणार दोस्ता.”, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.

दरम्यान, निशिकांत कामत हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक होते.‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या अनेक बॉलिवूडपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. त्यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर काम करणाऱ्या 6 जणांना कोरोनाची लागण

0

राज्यात कोरोनाची विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडले. अशातच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर कोरोनाचा शिरकाव झाला. सिल्व्हर ओक वरील 6 जणांचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे.

सिल्व्हर ओकवरील एकूण सहा जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. या सर्वांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यापैकी कोणीही पवारांच्या संपर्कात नसल्याने चिंता मिटली आहे. शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही न भेटण्याची शक्यता आहे.

पवारांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह

दरम्यान सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात शरद पवार यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

भाजयुमोच्या जिल्हाध्यक्ष पदावर नगरसेवक किरण दगडे पाटील यांची निवड 

कार्यकर्त्यांना काय सुनावले खासदार गिरीश बापटांनी …((व्हिडीओ) 

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड 

महिला जिल्हाध्यक्षपदी कांचन कुल 

पुणे : महापालिकेतील नगरसेवक  मुळशीतील किरण दत्तात्रेय दगडे-पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आज  देण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षातून भारतीय जनता पक्षात आलेले ऍड राहुल कुल यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या कांचन कुल यांच्या खांद्यावर भाजप महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तर पक्षाच्या संघटन सचिवपदी शिरूरमधील ऍड धर्मेंद्र खांडरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

बावधन (ता. मुळशी) येथे सोमवारी (ता. 17 ऑगस्ट) झालेल्या भाजपच्या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.या वेळी खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, जिल्ह्याचे प्रभारी योगेश गोगावले, माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,रवींद्र अनासपुरे, अमोल बालगुडे यांच्यासह पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित होते. याच बैठकीत पक्षाच्या नव्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे जिल्हाध्यक्ष : गणेश कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष : दादासाहेब बबनराव सातव, स्नेहल गणपत दगडे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता अशोकराव उमरेकर, प्रशांत पांडुरंग सातव, प्रदीप विश्वासराव पाटील, जयश्री बाबुराव पोकळे, राहुल रामचंद्र शेवाळे, प्रवीण उत्तमराव काळभोर. संघटन सरचिटणीस : ऍड धर्मेंद्र जनार्दन खंडारे. सरचिटणीस : अविनाश गंगाधर बवरे, अविनाश तुकाराम मोटे, सुदर्शन जयप्रकाश चौधरी. सचिव : तानाजी साहेबराव थोरात, अशोक दत्तात्रेय पांगारे,
सुवर्णा सुधीर जोशी, पूनम सागर चौधरी, रोहिदास सुदाम भोंडवे, ऍड. अमृता गुरव-देशमुख, संगीता राजेंद्र जगताप, अनिल लक्ष्मण नवले. कोशाध्यक्ष : इंदरमल राजमल ओसवाल, सहकोशाध्यक्ष : विकास शिवराम जगताप आदी.

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष : किरण दत्तात्रेय दगडे-पाटील, संघटन सरचिटणीस : संदीप सातव, सरचिटणीस : ऍड श्रीकांत उद्धव ताम्हाणे, जीवन युवराज साखरे.

महिला मोर्चा अध्यक्ष : कांचन राहुल कुल, संघटन सरचिटणीस : ऋतुजा धैर्यशील जाधव, सरचिटणीस : श्रीया सचिन रहाळकर.
किसान मोर्चा : संजय जिजाबा थोरात, सरचिटणीस : ज्ञानेश्वर अप्पासाहेब शेळके.
इतर मागास वर्ग मोर्चा, अध्यक्ष : सागर सत्यवान भूमकर, सरचिटणीस : भागवत नारायण आवटे, उपाध्यक्ष : नानासाहेब किसन शेंडे.

अनुसूचित जाती मोर्चा, अध्यक्ष : मयूर चंद्रकांत कांबळे, सरचिटणीस : सुनील नारायण माने.
अनुसूचित जमाती मोर्चा, अध्यक्ष : मधुकर निवाजी काठे, सरचिटणीस : किसन दगडू चपटे.
अल्पसंख्याक मोर्चा, अध्यक्ष : राजूभाई सय्यदलाल शेख, सरचिटणीस : युसुफ महंमद शेख

राज्यात १ लाख ५५ हजार २६८ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू

0

बरे झाले ११ हजार ३९१ तर ८४९३ नवीन रुग्णांचे निदान; ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई, : राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे निदान  झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख २८ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ५५  हजार २६८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. कालच्यापेक्षा आज राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी  झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले ८४९३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७५३ (४०), ठाणे- १३७ (३), ठाणे मनपा-२१२, नवी मुंबई मनपा-२५० (८), कल्याण डोंबिवली मनपा-२४९ (२), उल्हासनगर मनपा-१६ (६), भिवंडी निजामपूर मनपा-४ (२), मीरा भाईंदर मनपा-८४ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-६९ (२), रायगड-११५ (१०), पनवेल मनपा-११०, नाशिक-२१९ (२), नाशिक मनपा-५३५ (५), मालेगाव मनपा-५६ (१), अहमदनगर-२३५ (२), अहमदनगर मनपा-८५ (१), धुळे-४३ (२), धुळे मनपा-३८ (१), जळगाव-२९६ (९), जळगाव मनपा-६६ (२), नंदूरबार-२, पुणे- ३४१ (९), पुणे मनपा-९१९ (२६), पिंपरी चिंचवड मनपा-६१५ (१९), सोलापूर-१९९ (६), सोलापूर मनपा-५४ (१), सातारा-२०५ (११), कोल्हापूर-२१३ (५), कोल्हापूर मनपा-१२६ (२), सांगली-१२६ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९० (४), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-५५, औरंगाबाद-११९ (१), औरंगाबाद मनपा-११६ (३), जालना-२०६ (१), हिंगोली-०, परभणी-२२, परभणी मनपा-३१ (१), लातूर-७४ (१२), लातूर मनपा-५८ (४), उस्मानाबाद-१५२ (६), बीड-८० (२), नांदेड-६६ (२), नांदेड मनपा-४३ (२), अकोला-४, अकोला मनपा-१३, अमरावती-१४, अमरावती मनपा-७५, यवतमाळ-३० (२), बुलढाणा-४५ (२), वाशिम-६१, नागपूर-८० (१), नागपूर मनपा-३५१ (४), वर्धा-५, भंडारा-१९, गोंदिया-१५, चंद्रपूर-९, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-१३, इतर राज्य २.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ०६ हजार २४८ नमुन्यांपैकी ६ लाख ०४ हजार ३५८ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५३ हजार ६५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ५५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                          

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२९,४७९) बरे झालेले रुग्ण- (१,०४,३०१), मृत्यू- (७१७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७,७०४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,१४,८९६), बरे झालेले रुग्ण- (९७,७२६), मृत्यू (३३५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,८१८)

पालघर: बाधित रुग्ण- (२१,४००), बरे झालेले रुग्ण- (१४,५८०), मृत्यू- (५०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३१८)

रायगड: बाधित रुग्ण- (२३,६२७), बरे झालेले रुग्ण-(१८,११५), मृत्यू- (५८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२२)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२८७०), बरे झालेले रुग्ण- (१६०८), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (६३७), बरे झालेले रुग्ण- (४४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०)

पुणे: बाधित रुग्ण- (१,३२,४८१), बरे झालेले रुग्ण- (८९,८१०), मृत्यू- (३२४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,४२४)

सातारा: बाधित रुग्ण- (७५९१), बरे झालेले रुग्ण- (४५८८), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७६७)

सांगली: बाधित रुग्ण- (६७१८), बरे झालेले रुग्ण- (३८३७), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६४)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१४,२४१), बरे झालेले रुग्ण- (७१५३), मृत्यू- (३८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७०६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१४,५५३), बरे झालेले रुग्ण- (९२९५), मृत्यू- (६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२६)

नाशिक: बाधित रुग्ण- (२७,१५१), बरे झालेले रुग्ण- (१६,५९३), मृत्यू- (६७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८८२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१३,१३६), बरे झालेले रुग्ण- (९६७२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३२२)

जळगाव: बाधित रुग्ण- (१८,२९९), बरे झालेले रुग्ण- (१२,४१५), मृत्यू- (६९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१९२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (११८४), बरे झालेले रुग्ण- (७९४), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३७)

धुळे: बाधित रुग्ण- (५२६८), बरे झालेले रुग्ण- (३६०७), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५०२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१८,७०८), बरे झालेले रुग्ण- (१२,२२६), मृत्यू- (५७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९०४)

जालना: बाधित रुग्ण-(३२८६), बरे झालेले रुग्ण- (१८३७), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३५)

बीड: बाधित रुग्ण- (२७०९), बरे झालेले रुग्ण- (९२७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७२१)

लातूर: बाधित रुग्ण- (५३५१), बरे झालेले रुग्ण- (२५८६), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५६०)

परभणी: बाधित रुग्ण- (१५२०), बरे झालेले रुग्ण- (५५९), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९०९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१०२३), बरे झालेले रुग्ण- (७०६), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९५)

नांदेड: बाधित रुग्ण- (४००२), बरे झालेले रुग्ण (१७६३), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३७११), बरे झालेले रुग्ण- (१८५५), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५८)

अमरावती: बाधित रुग्ण- (३६३५), बरे झालेले रुग्ण- (२३८८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५०)

अकोला: बाधित रुग्ण- (३२७७), बरे झालेले रुग्ण- (२६६७), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७०)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२४९), बरे झालेले रुग्ण- (८१०), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१४९४), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२०९३), बरे झालेले रुग्ण- (१३१६), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३,९९५), बरे झालेले रुग्ण- (६६७०), मृत्यू- (३६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९५९)

वर्धा: बाधित रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (२३४), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)

भंडारा: बाधित रुग्ण- (५३३), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७९६), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४५)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०६५), बरे झालेले रुग्ण- (६२२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५००)

एकूण: बाधित रुग्ण-(६,०४,३५८) बरे झालेले रुग्ण-(४,२८,५१४),मृत्यू- (२०,२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३११),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,५५,२६८)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २२८ मृत्यूंपैकी १७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू ठाणे जिल्हा –९, पुणे -६, मुंबई -२, बुलढाणा -१, कोल्हापूर -१ आणि उस्मानाबाद -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

बदल्यांविषयी न्यायालयात दाद मागण्याचा भाजपा प्रदेशाध्यक्षांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

0

मुंबई – कोरोनाच्या महामारीमुळे राज्य गंभीर संकटात असूनही बदल्यांना परवानगी देताना राज्य सरकारने मनमानीपणे आपलेच धोरण बदलले, कोरोनाच्या उपाययोजनात सातत्य न राहिल्याने जनतेचे जीवित संकटात आले, बदलीच्या कायद्याचा भंग झाला, राज्याचे आर्थिक नुकसान झाले व बदल्यांचा बाजार मांडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाले आहेत. बदल्यांच्या सीआयडी चौकशीचा आदेश द्यावा, अन्यथा न्यायालयात दाद मागणे भाग पडेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या वित्त विभागाने दि. ४ मे रोजी शासन निर्णय जारी केला व त्यामध्ये कोरोनामुळे बदल्या करू नयेत, असे म्हटले होते. पण त्या अनुषंगाने ७ जुलै रोजी शासन निर्णय जारी करताना सामान्य प्रशासन विभागाने पंधरा टक्के बदल्यांना परवानगी दिली. राज्य सरकारचे धोरण मनमानीपणे बदलले. तसेच कोरोनाविषयी उपाययोजनांमध्ये सातत्य राखले नाही.
त्यांनी सांगितले की, पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देताना ३१ मेपर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या असे स्पष्ट म्हटले होते. तरीही बदल्या करण्यास दिलेली ३१ जुलैची मुदत व नंतर वाढविलेली १० ऑगस्टची मुदत याचा आधार घेऊन ३१ मेपर्यंत ज्या अधिकारी – कर्मचारी यांची तीन वर्षांची मुदत संपत नव्हती त्यांनाही हटविण्यात आले व मोक्याच्या ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांना आणण्यात आले. यामध्ये बदलीच्या कायद्याचा भंग झाला.
ते म्हणाले की, बदलीच्या नियमांप्रमाणे तीन आयएएस अधिकाऱ्यांची आस्थापना समिती बदली प्रस्ताव तयार करते व त्यामध्ये बदल करायचा असेल तर संबंधित मंत्र्याने कारणाची लेखी नोंद करायची असते व नंतर मुख्यमंत्र्यांनी सही करायची असते. तीन वर्षे पूर्ण झाली नाही, अशांची बदली करायची असेल तरीही मंत्र्यांनी कारण लेखी नोंदवायचे व अंतिम स्वाक्षरी मुख्यमंत्र्यांनी करायची असा नियम आहे. यावेळी ही प्रक्रिया पार पाडली का, याचा जाहीर खुलासा होण्याची गरज आहे. या संबंधीच्या सर्व फाईल जनतेसमोर खुल्या करण्याचा आदेश द्यावा. तसेच बदलीच्या कायद्याचा भंग कोणी केला याची जबाबदारी निश्चित करावी.
ते म्हणाले की, राज्याची वित्तीय स्थिती कोरोनामुळे गंभीर झाली असल्याने वित्त विभागाने विविध खर्चावर निर्बंध घातले. मार्च महिन्याचा पूर्ण पगारही दिला नाही. पण बदल्यांना परवानगी देऊन सर्वसाधारण बदली झालेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना बदली भत्ता देण्याचा मोठा खर्च राज्य सरकारने ओढवून घेतला. या प्रकरणात राज्य सरकारवर किती वित्तीय बोजा पडला हे जाहीर करावे.

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख नियुक्ती

0

 पुणे- पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची माळ हाफकिन इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांच्या गळ्यात पडली आहे. राज्य सरकारने त्यांची आज (दि.17) नियुक्ती केली आहे. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविणे ‘आयएएस’ अधिकाऱ्यांसाठी नेहमीच प्रतिष्ठेचे राहिले आहे. त्यामुळे या पदावर येण्यासाठी नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते.

डॉ. योगेश म्हसे, आयुष प्रसाद, जी. श्रीकांत यांना मागे टाकत देशमुख वरचढ ठरले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे देशमुख यांच्यासाठी आग्रही होते. त्यांनी देशमुख यांच्या नावाला पसंती दिली होती.

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण होणार याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय वर्तुळात सुरू होती. त्यामध्ये देशमुख यांच्यासह लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मुंबई ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, ‘पीएमआरडी’चे आयुक्त सुहास दिवसे आदींची नावे चर्चेत होती.

राष्ट्रवादीने देशमुख यांचे नाव उचलून धरले होते. तर, शिवसेनेने जी. श्रीकांत यांचा नावाचा आग्रह केला होता. काँग्रेसने डॉ. योगेश म्हसे नाव पुढे केल्याची चर्चा होती.

त्यामध्ये डॉ. राजेश देशमुख यांचे पारडे वरचढ ठरले असून त्यांनी बाजी मारली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती केली आहे.

पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवाची आचारसंहिता जाहीर

0

 पुणे -पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर केली आहे. कोरोना काळात सामाजिक अंतर राखून तसेच योग्य खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने यंदा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. त्याबाबतचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सव तसेच मिरवणुका, वाद्य याबाबत सविस्तर नियमावली देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही कठोर निर्णय घेणे भाग आहे.

त्यानुसार मागील सहा महिन्यात धार्मिक, सामाजिक व उद्योग व्यवहारात अनेक बंधने अंमलात आणली गेली आहेत. परंपरांना मुरड घालत वर्षानुवर्षे साजरे होणारे उत्सव आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे साजरे करीत असताना प्रत्येकाची भावना जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

पुणे मनपाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली. सार्वजनिक आरोग्याचे प्राधान्य लक्षात घेता त्यातील निर्णयांना सर्वांनी सकारात्मक समर्थन दिले.

त्यानुसार महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला पुणे शहरातील गणेशोत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले आहे.

सर्वानुमते आखण्यात आलेली आचारसंहिता खालीलप्रमाणे –

गणेश मुर्ती खरेदी

यावर्षी गणेश मुर्तीची खरेदी मंडळांनी/ नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन पध्दतीने करावी. मनपाकडून क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर गणेश मुर्ती विक्रीकरीता परवानगी दिली जाईल. यावर्षी गणेश मुर्ती विक्री स्टॉलला मनपाकडून रस्ता, पदपथांवर परवानगी दिली जाणार नाही.

ब) श्री. गणेश आगमन

यावर्षीच्या श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत, अशा शासनाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या असून मिरवणूकी बाबत शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.श्रींचे आगमन व विसर्जनाच्या विधीसाठी कमीत कमी लोक एकत्र जमतील.

क) श्री गणेश प्रतिष्ठापना

ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदिरे आहेत त्यांनी श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना मंदीरात करावी. अनन्य साधारण परिस्थितीत मनपाचे नियम व अटींचे पालन करून मंडळास छोटे मंडपा करीता परवानगी दिली जाईल.

गणेशोत्सव-2020 बाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये गणेश मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटाच्या मर्यादेत असावी.

ड) श्री गणेश पुजा

श्रींच्या आरती व पुजेकरीता जास्तीजास्त 5 व्यक्तीच हजर राहतील. श्री गणेशाचे परंपरागत विधी योग्य ते पावित्र्य राखून करावेत.

यावेळी सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य राहील. गणेश मुर्तीच्या ठिकाणी गर्दी होईल असे उपक्रम टाळावेत.

अनन्यसाधारण परिस्थिती लक्षात घेता गणेश पुजन व इतर आरती ही मंडळाचे कार्यकर्ते किंवा मंदिराचे पुजारी यांनीच करावी. बाहेरील व्यक्तींना त्यात सहभागी करून घेऊ नये. श्रध्देचा विषय असूनही सध्याच्या अनन्यसाधारण परिस्थितीत दर्शन/पूजा याकरीता दृकश्राव्य/डिजिटल माध्यमांचा वापर करावा.

इ) श्री गणेश दर्शन

श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक याव्दारे उपलब्ध करून देण्याबाबत मंडळांने जास्तीजास्त प्रयत्न करावा.

ऑनलाईन व्यवस्था करता येत नसल्यास गणेश दर्शनासाठी छोटे छोटे व्हिडीओ बनवून ते संबधितांना पाठवावेत. चांगल्या व्हिडीओसाठी प्रशासनाकडून बक्षिस देण्याची योजना ठेवण्यात येईल.

गणेश मंडळांनी दर्शनाकरीता ऑनलाईन टोकन, डिजीटल पास सुविधा वेळेची मर्यादा ठेवावी. सामाजिक अंतराचे नियमाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कोणाही निमंत्रितांना अगर व्हीआयपीना दर्शनाला परवानगी अगर निमंत्रित करण्यात येऊ नये. परिस्थिती गंभीर व अनन्य साधारण असल्याने ज्याप्रमाणे पंढरपूर वारीचे वेळी लोकांनी घरातूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्याप्रमाणे गणेशाचे घरातूनच दर्शन घ्यावे.

ई) परिसर

गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार/नारळ/ मिठाई/ प्रसाद इत्यादी दुकाने लावण्यास मनाई आहे. महत्वाच्या गणेश मंडळांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत व त्यांचे रेकॉडींग करावे.

गणेश मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातींना प्राधान्य द्यावे.

उत्सव कालावधीत रस्ता/ पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही.अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे प्रतिबंध आहे.रुग्णवाहीका, रिक्षा व अत्यावश्यक सेवेतील वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक.

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियम 2000 मधील परिच्छेद 4 च्या तरतुदीप्रमाणे रूग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी 100 मीटरच्या परिसरात ध्वनी क्षेपकाचा वापर करू नये.

उ) सांस्कृतिक व इतर कार्यक्रम

गणेश मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने उत्सवाचे मांगल्य व पावित्र्य राखले जाईल अशा पध्दतीने करावा.संपूर्ण उत्सवाचे काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

यावर्षी उत्सवाचे स्वरूप उत्सवी नसेल परंतु त्यात पुर्णपणे मांगल्य जपले जाईल, याकरीता मंडळांनी ऑनलाईन उपक्रम राबवावेत. त्याची प्रशासनाकडून योग्य ती नोंद घेण्यात येईल.

आरोग्य विषयक मदत, विद्यार्थ्यांना, वृध्दांना व गरजुंना मदत तसेच आरोग्य विषयक प्रबोधनपर ऑनलाईन उपक्रम अनेक मंडळे करू इच्छितात. ते स्वागतार्ह आहेच परंतु स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

त्यास योग्य त्या नियमात बसवून घरोघरी मदत पोहोचवून असे उपक्रम करण्याचे प्रयत्न करावेत. कोणीही त्यास समारंभाचे स्वरूप देऊ नये.

उदा. वृध्दांना वस्तु वाटप करण्यासाठी त्यांना जमा करून समारंभ करणेस परवानगी असणार नाही. त्याऐवजी वृध्द गरजूंची यादी बनवून त्याचे सोशल डिस्टसिंग राखून, मास्कचा वापर इत्यादी प्रतिबंधात्मक काळजी घेऊन वाटप करून आवश्यकतेनूसार त्याचे फोटो काढून कार्यक्रम यशस्वी करावा. अनेक मंडळांनी एकमेकाशी समन्वय साधुन असे वाटप एकमेकाच्या मदतीने करणेचा प्रयत्न करावा.

ऊ) सुरक्षा

कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. वाळुच्या बादल्या भरून ठेवाव्यात.

मंडळाजवळ हजर स्वयंसेवक/ कायकर्ते यांनी मद्य सेवन करु नये. मद्यसेवन केलेल्या व्यक्तीला मंडळाच्या मंडपा जवळ येण्यास प्रतिबंध करावा. तसेच कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नये.

काही अनोळखी, संशयीत, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घडयाळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरतांना रेंगाळतांना दिसल्यास ताबडतोब पोलीसांना कळवावे. या बाबत संयोजकांनी स्वयंसेवक कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करावे.

गणेश मुर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणा-या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी.

श्रींच्या मुर्तीचे संरक्षणासाठी मंडळाचे कमीत कमी 5 कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक 24 तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी तसेच गर्दी टाळावी.

ए) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

कोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासन/राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील. कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी, व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी.

शासनाने कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केलेल्या ठिकाणाच्या गणेशोत्सव मंडळांनी प्रतिबंधीत क्षेत्रास लागू असलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आरोग्य सेतू ॲप वापरणे बंधनकारक आहे.

तसेच गणेशोत्सव कालावधीत गणपती मंडळांनी त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे, मोबाईल क्रमांक, पत्ता, आरोग्य सेतू ॲप इत्यादी बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे बंधनकारक आहे, जेणेकरून यदाकदाचित संशयीत रुग्ण आढळल्यास कॉन्टेंक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे होईल.

कोविड-19 साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने व देखावे न करता साजरा करावा तसेच गणेशोत्सवाच्या वेळी सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे. आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

श्री गणेशाची आरती करताना आरतीचे ताट व प्रसादाचे ताट अनेक व्यक्तीकडून हाताळले जाणे टाळावे. आरती करण्यापुर्वी व प्रसाद वाटपाच्या पुर्वी ताट सॅनिटायझरने सॅनिटायझ करून घेणे, तसेच हाताळणा-या व्यक्तीने सॅनिटायझरचा वापर करावा. जेणेकरून विषाणूचा संसर्ग टाळणे शक्य होईल.

मंडळांनी मंडपामध्ये सॅनिटायझेशन करीता सोडियम हायपोक्लोराईड किंवा इतर निरजंतुकीकरण करण्याची साधने ठेवावीत.

तसेच छोटा स्प्रे पंपाच्या किंवा सरफेस सॅनिटायझरच्या सहाय्याने वारंवार स्पर्श होणारी ठिकाणे फवारणी करून सॅनिटायझेशन करावे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत सजग राहून उत्सहाच्याभरात कोणाशीही हस्तांदोलन न करता दुरूनच नमस्कार करावा.

ऐ) श्री. गणेश विसर्जन

या वर्षी पुजेच्या मुर्तीचे विसर्जन मंडपालगतच विधीवत करावे. विसर्जनाकरीता मिरवणूक काढता येणार नाही.

विसर्जनाकरीता गर्दी होऊ नये म्हणुन नदी पात्रात विसर्जन घाटांचे व हौदांचे व्यवस्था करणार नसल्याबाबत मनपाने घोषणा केली आहे. तरी मंडळांनी त्याची नोंद घ्यावी.

श्री गणेशाची मुर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाचे शेजारी कृत्रिम हौदाची निर्मिती करून त्यामध्ये श्री गणेशाचे मुर्तीचे विसर्जन करावे. विसर्जनाच्या वेळी गर्दी न करता कमीतकमी लोक हजर राहतील याची घ्यावी.

मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणा-या गर्दीला टाळण्याकरीता सदर बाबीना पुर्णतः मनाई आहे.

घरगुती गणपती व गौरी विसर्जन नागरिकांनी सोसायटीमध्ये कृत्रिम हौद तयार करून त्यामध्येच करणेबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. विसर्जनाच्या ठिकाणी पारंपारिक पध्दतीने होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मुर्ती व निर्माल्य हे मनपाच्या वाहनामधून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सार्वजनिक घाटांची/ विसर्जन हौदांची सुविधा यावर्षी सेवक व्यस्ततेमुळे मनपाकडून केली जाणार नसल्याने तशी व्यवस्था आपल्या मंदीराजवळ व मंडपाजवळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपआपल्या स्तरावर करावी.

ध्वनी क्षेपकाबाबत –

ध्वनी प्रदूषण बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटी व शर्थीचे काटेकोर पालन करावे. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार, पाचवा दिवस (दि. 26 ऑगस्ट), सातवा दिवस (दि. 28 ऑगस्ट), दहावा दिवस (दि. 31 ऑगस्ट), अनंत चतुर्दशी (दि. 1 सप्टेंबर) या दिवशी ध्वनी क्षेपकाचा सकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत वापर करता येईल. इतर दिवशी सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंतच ध्वनी क्षेपकाचा वापर करावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणच्या 54 जनमित्रांचा गौरव

0

पुणे,  : सन 2019-20 मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या महावितरणच्या पुणे परिमंडलमधील उत्कृष्ट 12 यंत्रचालक व 42 तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. 15) स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

      महावितरणमधील उत्कृष्ट यंत्रचालक, तंत्रज्ञ या तांत्रिक कर्मचाऱ्यांना दरवर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी गौरविण्यात येते. मात्र कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे यंदा हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी आयोजित करण्यात आला. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) कमांडर शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. प्रकाश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन उत्कृष्ट 54 जनमित्रांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला सहाय्यक महाव्यवस्थापक सौ. माधुरी राऊत (वित्त व लेखा) व सौ. ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन), कार्यकारी अभियंता सर्वश्री मधुकर घुमे, विष्णूकुमार पैठणकर, रवींद्र बुंदेले, संतोष गरूड आदींसह अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर यांनी केले व आभार मानले.

पुणे परिमंडलातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे – विशाल शिंदे, गणेश गायकवाड, पोपट सातपुते, पंकज टेकाम (बंडगार्डन विभाग), बालाजी तुडमे, अनिरुद्ध रणधीर, मच्छिंद्रा बोराडे, बालाजी महाजन (नगररोड विभाग), किशोर कुमावत, रवींद्र पाटील, राजेंद्र वैद्य, प्रमोद पवार (पद्मावती विभाग), राहुल तारू, संभाजी शेरकर, राजेंद्र शिंदे, संजय गेडाम (पर्वती विभाग), कुंडलिक काशिद, सुनील गायकवाड, राजेखान मुजावर, दयाराम तोंडिलकर, रसूल सय्यद (रास्तापेठ विभाग), प्रशांत बुरसे, कलाप्पा जबगौंडा, जालिंदर खरमाळे, दिलीप बंगाळे (भोसरी विभाग), भैरव वडणे, एकनाथ शेळके, अमरकुमार डोंगरे, किशोर भोयर (कोथरूड), रणजित जोगे, मिठ्ठू कुरलेकर, संदीप नांगरे, रमेश घनवट (पिंपरी विभाग), नंदकुमार सुतार, निलेश पाटील, संदीप साबळे, ललीतकुमार शेळकांडे (शिवाजीनगर विभाग), रामचंद्र गभाले, संग्राम सांडभोर, अतुल बुरुडकर, दिलीप बांबळे, बाळासाहेब कंकान, गजानन घाडगे (मंचर विभाग), शैलेश कदम, गणेश ओव्हाड, जितेंद्र कोळी, संजय गोरड, निलेश भोंडवे (मुळशी विभाग), समाधान पटाईत, बाळू कोतवाल, कैलास वाखरे, शरद आरुडे, विकास सुपे, संतोष जाधव.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी

0

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता १५ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये दुसऱ्या पाळीतील वर्गासाठी प्रवेशप्रक्रिया सुरु; राज्यात 1 हजार 920 जागांवर मिळणार प्रवेश – मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई, दि. १७ : अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता राज्यातील १५ शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये (पॉलिटेक्निक) दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या योजनेतून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना अभियंता बनण्याची संधी उपलब्ध झाली असून सध्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. पात्र इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करावा, असे आवाहन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. राज्यात दुसऱ्या पाळीतील वर्गांमध्ये 1 हजार 920 इतक्या जागा उपलब्ध असून मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आयटी, प्रिटींग टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आदी अभ्यासक्रमात अल्पसंख्याक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया सुरु असून लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या आदेशानुसार नंतर वर्ग सुरु करण्यात येतील. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती, हेल्पलाईन क्रमांक यासह ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया ही तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहे.      

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी, ज्यु समाजातील विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल. ठाणे, सोलापूर, नांदेड, जळगाव, यवतमाळ, वांद्रे (जि. मुंबई उपनगर), रत्नागिरी, कराड (जि. सातारा), ब्रम्हपुरी (जि. चंद्रपूर), जालना, अंबड (जि. जालना), पुणे, हिंगोली, लातूर येथील शासकीय तंत्रनिकेतने आणि मुंबईतील शासकीय मुद्रण तंत्र संस्था (सीएसएमटी समोर) येथे दुसऱ्या पाळीतील वर्ग सुरु होणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतनमधील काही निवडक व्यवसायांचे अभ्यासक्रम दुसऱ्या पाळीत शिकविले जातात. संचालक (तंत्रशिक्षण) यांनी नियमित तंत्रनिकेतनांमध्ये प्रवेशाकरिता विहित केलेल्या नियमानुसार दुसऱ्या पाळीत प्रवेश देण्यात येतो. एकूण प्रवेश क्षमतेच्या ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तर ३० टक्के जागा सर्वसाधारण आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तंत्रनिकेतनांमधील नियमित अभ्यासक्रमासाठीही अल्पसंख्याक विद्यार्थी अर्ज करु शकतात. तिथे संधी न मिळाल्यास अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या पाळीतील वर्गामध्ये प्रवेश उपलब्ध आहे.

पॉलिटेक्निक संस्थेचा पत्ता, संस्था प्रमुख, प्रवेश संख्या, प्रशिक्षणाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे नाव इत्यादी माहिती अल्पसंख्याक विकास विभागाच्या http://mdd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ‘ई-शासन व इतर – अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी व तिसरी पाळी मान्यताप्राप्त संस्थांची यादी’ या मेनूवर पाहू शकता.

नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना नाविन्यपूर्ण व विस्तारित स्वरूपात राबवणार

0

वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई, दि. 17 :- नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी  झाली असून 26 पैकी 11 महागरपालिकांचे नगर वन उद्यान प्रस्ताव व 43 शाळांचे रोपवाटिका योजना प्रस्ताव केंद्रास सादर केले असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. देशातील सर्व राज्यांमधील वनमंत्री यांची आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत राज्याच्या वतीने वनमंत्री श्री.राठोड सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. या योजनांसाठी केंद्राने राज्याला भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केंद्र सरकारकडे केली.

या बैठकीत नगर वन उद्यान, शाळा रोपवाटिका योजना, 13 नद्यांच्या पुनरुज्जीवन योजना, 20 कलमी कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम, जल व मृद संधारण व पाणलोट विकाससाठी प्रायोगिक स्तरावर लीडार तंत्रज्ञान सर्वेक्षण, प्रायोगिक स्तरावर बांबू व गौण वन उपजची राष्ट्रीय ऑनलाईन ई – पास प्रणाली या बाबत राज्यांची पूर्वतयारी आदी विषयांवर चर्चा झाली.

राज्यातील वन विभागाच्या कामाची माहिती देताना वनमंत्री श्री.राठोड म्हणाले,  नगर वन उद्यान योजनेबाबत राज्यात कार्यवाही सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे वारजे स्मृती वन उद्यान तयार करण्यात आले आहे. राज्यात 26 महानगरपालिका असून त्यापैकी 11 नगर वन उद्यान चे प्रस्ताव हे केंद्र शासनास सादर करण्यात आले आहेत. तसेच या योजनेत महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांना सुद्धा वृक्ष लागवड व पर्यावरण संरक्षण बाबत जागृती व्हावी म्हणून सहभागी करून घेण्यात येणार आहे. शाळा रोपवाटिका योजना या बाबत 43 शाळांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आले असून राज्यात 150 शाळा यामध्ये समाविष्ट करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त जिल्हा नियोजन निधी मधून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शाळा रोपवाटिका योजना राबविण्याचा शासनाचा मानस आहे.

केंद्र सरकारच्या 20 कलमी कार्यक्रम अंतर्गत राज्यात मागील 4 वर्षात  मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. या वर्षात वृक्ष लागवड सोबतच मागील वृक्ष लागवडीचे संगोपन व संवर्धन करण्याबाबत विशेष लक्ष देणार आहोत.

मृद व जल संधारण व पाणलोट विकासाबाबत आपण केंद्र शासनाच्या लीडार तंत्रज्ञान सर्वेक्षणाला सर्वतोपरी मदत करणार आहोत. कॅम्पा निधीमधून सन 2020-2021 मध्ये वन मृद व जलसंधारणबाबत नव्याने योजना तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून देशातील 13 नद्यांच्या विकासाचा विस्तृत आराखडा बनवण्यात येत असून त्यात राज्यातील गोदावरी व नर्मदा नदीचा समावेश असून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत. राष्ट्रीय बांबू व गौण वन उपज ऑनलाईन ई -पास सिस्टीम राज्यात प्रायोगिक स्तरावर सुरु करण्याबाबत अभ्यास गट तयार करत आहोत. तिच्या शिफारशी विचारात घेवून त्याची अंमलबजावणी राज्यात केली जाईल असे वनमंत्र्यांनी सांगितले.

नगर वन उद्यान योजना

नगर वन उद्यान ही केंद्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाची महत्वाकांक्षी योजना असून ही देशातील 200 शहरात राबवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील 26 शहरांचा समावेश आहे. या योजनेसाठी 25 ते 100 हेक्टर क्षेत्रावर शहरात व शहरालगत वन क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येते. या योजनेत केंद्र सरकारचा हिसा 80 टक्के असून राज्याचा हिस्सा 20 टक्के राहणार आहे. एका शहर वन उद्यानसाठी कमाल 2 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून हा निधी प्रामुख्याने संरक्षक भिंत व वृक्षलागवड यासाठी वापरला जाणार आहे. या योजनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये वन व जंगलाबाबत जागृती  निर्माण होण्यास मदत होणार आहे.

शाळा रोपवाटिका योजना

शाळा रोपवाटिका योजना ही विद्यार्थी जीवनात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन व वृक्ष संरक्षण व संवर्धन याबाबत आवड निर्माण व्हावी म्हणून राबवली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्यामार्फत एका शाळेत एक शाळा रोपवाटिका व एका रोपवाटिका मध्ये 1 हजार रोपे निर्माण केली जाणार आहेत. या योजनेसाठी सरासरी 40 ते 50 हजार अनुदान एका शाळेस दिले जाणार आहे. या दोन्ही योजना राज्यात विस्तृत स्वरूपात राबवणार असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी दिली

या बैठकीत वन संरक्षण अधिनियम 1980 मधील तरतुदीला बाधा न आणता  राखीव वन क्षेत्रातील तलावामधील गाळ काढणे व शेतकरी यांचे शेतीवर तो गाळ पसरणे याबाबत केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी वनमंत्री श्री. राठोड  यांनी केली. तसेच केंद्राचे वृक्ष लागवड मापदंड व राज्याचे वृक्ष लागवड मापदंड हे एकच असावेत असेही त्यांनी सांगितले.

या दूरदृश्य प्रणाली बैठकीस केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो व अरुणाचल प्रदेश व गोवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी सहभाग घेतला. या बैठकीसाठी देशातून सर्व राज्यातील वनमंत्री उपस्थित होते. राज्यातून वनमंत्री संजय राठोड यांचे सोबत प्रधान सचिव  मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक, वन बल प्रमुख राम बाबू  हे उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 954

0

पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 67 हजार 79 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, दि. 17 :- पुणे विभागातील 1 लाख 18 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजार 79 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 954 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.09 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 197 रुग्णांपैकी 95 हजार 865 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 450 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 882 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.57 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 371 रुग्णांपैकी 3 हजार 940 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 189 आहे. कोरोनाबाधित एकूण 242 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 602 रुग्णांपैकी 9 हजार 15 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 983 आहे. कोरोनाबाधित एकूण 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 6 हजार 320 रुग्णांपैकी 3 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 54 आहे. कोरोनाबाधित एकूण 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 14 हजार 589 रुग्णांपैकी 6 हजार 906 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 278 आहे. कोरोनाबाधित एकूण 405 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 195 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 800, सातारा जिल्ह्यात 242, सोलापूर जिल्ह्यात 407, सांगली जिल्ह्यात 315 तर कोल्हापूर जिल्ह्यात 431 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 7 हजार 749 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 67 हजार 79 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 16 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्युची बातमी अफवा -रितेश देशमुख चे ट्वीट

0

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरत होती. मात्र अभिनेता रितेश देशमुखनं निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून, तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, असे ट्वीट केले आहे. निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास असून. त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनसे चे अमेय खोपकर यांच्यासह अनेक मान्यवर अभिनेते अभिनेत्री यांनी मृत्यु च्या बातमीवर श्रद्धाजंली वाहणाऱ्या पोस्ट टाकल्या होत्या त्या रितेश च्या ट्वीट नंतर या सर्व पोस्ट डिलीट करण्यात आल्या.

निशिकांत कामत यांचे आज निधन झाल्याची बातमी दिग्दर्शक मिलाप झावेरी यांनी ट्विट करुन दिली होती. त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. मात्र ही बातमी चुकीची असून निशिकांत कामत आपल्यातच आहे, मात्र त्यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. ते व्हेटिंलेटरवर असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे अभिनेता रितेश देशमुखने सांगितले आहे.

पंतप्रधानांचे व्हीव्हीआयपी विमान:बोइंग-777 विमानाची किंमत 8458 कोटी रुपये

0

(नवी दिल्ली- वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे एक विशेष विमान मिळणार आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, भारताने अमेरिकेकडून बोइंग-७७७ ही दोन विमाने खरेदी केली आहेत. दोन्ही विमानांची किंमत ८४५८ कोटी रुपये आहे. यापैकी एक विमान याच आठवड्यात भारताला मिळेल. हे आणण्यासाठी नॅशनल कॅरिअर एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अमेरिकेत रवाना झाले आहे. या विमानाची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीदेखील या व्हीव्हीआयपी विमानाचा वापर करतील. आगामी काळात एअर इंडियाएेवजी बजाज एअरफोर्स हे विमान ऑपरेट करेल. या विमानाचे कॉल साइन एअरफोर्स वन हे असू शकते. राफेलप्रमाणे या विमानात हवेतच इंधन भरण्याची क्षमता असेल. विशेष बाब म्हणजे, इंधन भरल्यानंतर हे विमान सलग १७ तास उड्डाण करू शकते.

सुरक्षित सॅटेलाइट कम्युनिकेशन सिस्टिमही

हे विमान अत्यंत सुरक्षित आहे. याच्या पुढील भागात जॅमर बसवले आहे.ते शत्रूच्या रडार सिग्नलला निष्क्रिय करते. यावर मिसाइलच्या हल्ल्याचाही परिणाम होत नाही. विमानात ऑफिस आणि एक मीटिंग रूमही असेल. तसेच यात मिरर बॉल प्रणालीचाही वापर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर यात अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन प्रणालीदेखील आहे.

> हे विशेष विमान इन्फ्रारेड सिग्नलने चालणाऱ्या मिसाइलला निष्क्रिय करेल.

> बोइंग-७७७ विमानाची ८४५८ कोटी रुपये एवढी किंमत आहे.