Home Blog Page 2476

आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा प्रारंभ

0

पालकमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला ऑनलाइन प्रारंभ

मुंबई, दि. २२ : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. या यंत्रणेद्वारा व्यक्तिच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा प्रारंभ केला. पायलट तत्वावरील या उपक्रमाचा महापालिका अधिकाऱ्यांसह मान्यवरांच्या ऑनलाइन उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांकरीता त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे, असे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले. कृत्रीम बुद्धीमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाच्या आधारे कोरोनाचे निदान लवकर करणे शक्य होणार आहे. पण निदानासाठीच्या आरटी-पीसीआर चाचण्या मात्र सुरुच राहतील, असेही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रात विविध अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गणेश विसर्जनासाठी पालिकेच्या फिरत्या कृत्रिम तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी आणि कौतुक

0

मुंबई दि 23: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याविषयी आवाहन करण्यात येत आहे. आज खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महालक्ष्मी मंदिराजवळ मुंबई महानगरपालिका डी विभागाने ट्रकमध्ये तयार केलेल्या फिरत्या कृत्रिम तलावाची पाहणी केली व कौतुक केले.

अशा रीतीने फिरत्या स्वरूपातील या कृत्रिम तलावामुळे गर्दी न होता नागरिकांना त्यांच्याकडील गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करता येईल व एरव्ही गिरगाव चौपाटी किंवा इतरत्र जाऊन गर्दी करण्याची आवश्यकता राहणार नाही असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. फिरत्या स्वरूपातील विसर्जन तलाव ही कल्पक संकल्पना असून यामुळे सणही उत्साहाने पण नियम पाळून साजरा करणे शक्य होणार आहे असे ते म्हणाले

पुणे शिवाजीनगर येथील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण

0

पुणे, दि.23 – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, दीपाली डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय मित्तल उपस्थित होते.विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा.सुप्रियाताई सुळे, खा.श्रीरंग बारणे, आ.चंद्रकांत पाटील, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितलेमुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्सासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, त्यामुळेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयात मंगळवार सायंकाळपासून रुगणसेवा देण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाचा उल्लेख करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, पुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जम्बो सुविधेमुळे बेड उपलब्धता वाढणार असून कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.कार्यक्रमात जम्बो कोविड रूग्णालयाची उभारणीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आभार सुहास दिवसे यांनी मानले.

रुग्णालयाविषयी – पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 800 खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयू साठी स्वतंत्रपणे राखीव असतील. एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण परिसर, ज्यामध्ये व्यवस्थापन केंद्र, प्रयोगशाळा, औषध केंद्र, डॉक्टरांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, रुग्ण येण्याचे ठिकाण, वाहनतळ इत्यादी सोयी सुविधा आहेत तसेच या दिव्यांगाच्या दृष्टीने सुद्धा सुखकर करण्यात आल्या आहेत. लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सीजन सिलेंडर यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ऑक्सीजनयुक्त सहाशे खाटांच्या संपूर्ण वातानुकूलित विभागामुळे हा देशातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयात पैकी एक बनला आहे. कमी दाबाने वातानुकूलित करण्यात आलेल्या आयसीयूमुळे या विभागात कायम शुद्ध व स्वच्छ हवा खेळती राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. रुग्ण तसेच भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर रेड व ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आला आहे.  पुण्यात सरासरीच्या 70 टक्के पर्जन्यमान या दरम्यान होत असल्याने हे रुग्णालय जलरोधक व ताशी 125 किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा सहन करू शकेल इतके भक्कम बनवण्यात आले आहे.

गेल्या 18 दिवसात जरी सातत्याने पाऊस होत होता तरी हे रुग्णालय वेळेत व सुसज्ज असे बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळेच कुठल्याही वातावरणात रुग्णालय पुढील सहा महिने भक्कम उभे राहील याची खात्री देता येईल.  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच पुण्यातील इतर शासकीय आस्थापनांच्या सहकार्याने हे रुग्णालय उभे राहिले आहे. येणाऱ्या काळात हे रुग्णालय देशात उभे राहणाऱ्या कोविड रुग्णालयांसाठी मानक म्हणून पुढे येईल, अशी खात्री आहे.

पवार काका-पुतण्यामध्ये मतभेद, दोघांचेही वेगवेगळे विचार; त्यामुळे राष्ट्रवादीत कलह – भाजप खासदार सुब्रमण्यमस्वामी

0

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यस्वामी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चांगलेच मतभेद असल्याचे ते म्हणाले.

सुब्रमण्यमस्वामी यांनी ट्विट करत शरद पवार आणि अजित पवार यांच्या मतभेदावर बोट ठेवले आहे. ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चांगलेच मतभेद आहे. दोघांचेही वेगवेगळे विचार आहे. त्यामुळे या पक्षात अंतर्गत कलह आहे’ असा दावाच सुब्रमण्यमस्वामी यांनी केला आहे.यासोबतच सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहे. ‘निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचा सिंगापूर सिटिझनशिप आणि इतर कंपनी व्यवहाराबाबत सीबीआय चौकशी मागणी केली होती’, असा मुद्दा त्यांनी आपल्या ट्विट मध्ये उपस्थितीत केला आहे.

दिलखुलास’कार्यक्रमात राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची मुलाखत

0

पुणेे,दि.24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कोरोनाला घाबरू नका, प्रत्येकाने काळजी घ्या ‘ या विषयावर राज्य  सर्वेक्षण अधिकारी  डॉ. प्रदीप आवटे  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  मंगळवार दि. २५ ऑगस्ट आणि बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.तसेच तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या  ॲप वर  ही याच वेळेत ऐकता येईल. जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग  यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            या मुलाखतीत कोरोना  रूग्णांची वाढती आकडेवारी बरोबर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणारे प्रमाण, कोरोना जर झाला असेल तर तो कसा ओळखावा, कोरोनाची बदलती लक्षणे, कोरोना कालावधीत कशा प्रकारे खबरदारी घ्यावी, वेळेत आरोग्य तपासणी कशी करावी,मार्च ते ऑगस्ट पर्यंत वाढलेली आकडेवारी  तसेच यामधील नेमके सकारात्मक बदल या सर्व विषयांची सविस्तर माहिती  डॉ.प्रदीप आवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

दरवर्षी प्रमाणे दगडूशेठ गणपती समोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम 

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मुख्य मंदिरात प्रत्यक्षपणे पाच महिलांची तर ऑनलाइन पद्धतीने हजारो भाविकांची उपस्थिती ; उपक्रमाचे ३४ वे वर्ष

पुणे : ओम नमस्ते गणपतये… चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर यंदा देखील निनादले. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणराया चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरती देखील करण्यात आली.

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.  

मूर्ती विसर्जनासाठी फिरत्या हौदांची संकल्पना गोंधळात भर टाकणारी – मनसे

0

 पुणे

पुणे-शहरातील गणेश विसर्जनाबाबत पालिकेने जाहीर केलेल्या सर्व योजना फसव्या असून त्यातून पुणेकरांमध्ये अधिकच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. गर्दी टाळण्यासाठी विसर्जनावर बंधने घालताना गणेश कला क्रीडा केंद्र येथे एकावेळी गणेशमूर्ती विक्रीसाठी शंभर स्टॉलला परवानगी कशी देता, अशी विचारणा मनसेने महापौर मुरलीधर मोहोळ यांना केली आहे.   करोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणपतींचे विसर्जन घरच्या घरी करण्याचे आवाहन केले जात असले, तरी मोठी मूर्ती बादलीत कशी विसर्जन करायची, हे पालिकेने दाखवून द्यावे, असे आव्हान मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिले आहे. मूर्ती विसर्जनासाठी सर्व नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप क्षेत्रीय कार्यालयांना त्याची कल्पनाही नाही, असा दावा त्यांनी केला. शहरातील मूर्ती विसर्जनासाठी ३० फिरत्या हौदांची संकल्पना फसवी असून घरगुती स्वरूपातील पाच लाख मूर्तींना एवढ्या कमी संख्येचे हौद कसे पुरे पडणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे.  

दाऊद कराचीत-पाकची कबूली

0

इस्लामाबाद- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद पाकिस्तानातच असल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची अनेकदा नाचक्की झाली आहे. तरीही, दाऊदच्या ठिकाण्याबद्दल पाकिस्तानने जाहीरपणे बोलणे टाळले होते. पण, आता भारताच्या दृष्टीने मोस्ट वॉन्टेड असलेला दाऊद आपल्या भूमीत राहत असल्याची कबुली पाकिस्तानने प्रथमच दिली आहे.

दाऊदला आश्रय दिल्याविषयी पाकिस्तानकडून नेहमी नकारघंटा वाजवली जात होती. पण, आता आर्थिक निर्बंध लादण्याची नामुष्की ओढवलेल्या पाकिस्तानला दाऊदचा पत्ता उघड करावा लागला आहे.

त्यामुळे दाऊद पाकिस्तानच्या कराची शहरात राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.कराचीमध्ये त्याची तीन घरे असल्याचे पाकिस्तान सरकारने नमूद केले आहे. यावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून काय हालचाली होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

केन्द्राचे निर्देश अंतरराज्य वाहतुकीला बंधने नको,तरीही राज्यात ई पास सुरुच

0

नवी दिल्ली ः राज्य सरकारांनी वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन घालू नयेत, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्याराज्यातील आणि आंतरराज्य प्रवासी व मालवाहतूक यांना आडकाठी करू नका, असे पत्र लिहून बजावले आहे.

केंद्र सरकारने असे आदेश दिले असले तरी राज्य सरकार निर्णय घेईपर्यंत महाराष्ट्रातील जिल्हाबंदी सुरू राहणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्यांना ई-पास घेण्यापासून सवलत दिली आहे. मात्र खासगी वाहनांना ई-पासची सक्ती आहे. त्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल. मात्र केंद्र सरकारने आदेशानुसारच ई-पासची गरज नसल्याचे सोशल मिडियात व्हायरल झाले आहे.

वस्तुस्थिती तशी नसल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावर राज्य सरकारच्या वतीने स्वतंत्र आदेश देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

कोरोना महामारीचा वाढत्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू केले होते. लॉकडाउनच्या तीन टप्प्यानंतर जूनपासून अनलॉकची मालिका सुरू झाली. आजही कोरोना संक्रमणाचा देशातील धोका कायम असला तरी आर्थिक व्यवहार व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्राकडून हळूहळू टाळेबंदीची नियमावली टप्प्याटप्प्याने शिथिल केली जात आहे. अनेक व्यवहारांवरील निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत व येणारही आहेत.

राज्यांतील अंतर्गत आणि आंतरराज्य प्रवासी व मालवाहतुकीवरील बंदीवरून अनलॉक 3 च्या काळात निर्बंध शिथील करण्यात आले तरी अनेक राज्यांकडून याबाबतच्या केंद्राच्या नियमावलीचे (एसओपी) उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी दिल्ली दरबारी आल्या आहेत. त्यामुळे आज या मुद्यावरून केंद्राने राज्यांना फटकारले. त्याचबरोबर ही बंदी कोणी चालू ठेवली असेल तर ती तातडीने उठवण्याचेही निर्दश दिले आहेत. भल्ला यांचे पत्र आज दुपारी सार्वजनिक करण्यात आले.

अशी वाहतूकबंदी घातल्याने आंतरराज्य मालवाहतुकीला व प्रवासी वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होतो व नव्याने समस्या निर्माण होतात. शिवाय त्यामुळेआर्थिक व्यवहारांना खीळ बसते व बेरोजगारीची समस्याही वाढते. त्यामुळे असे कोणत्याही राज्याने करू नये असे भल्ला यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. अनलॉक-3 च्या दिशानिर्देशांतच , राज्यातील अंतर्गत व राज्याराज्यांतील मालवाहतुकीला व प्रवासी वाहतुकीला कोणतेही निर्बंध नाहीत असे स्पष्टपणे म्हटले होते याचेही स्मरण त्यांनी राज्य सरकारांना करवून दिले आहे.

राज्यात आज १४ हजार ४९२ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.२२: राज्यात आज ९ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.४५ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८० हजार ११४ रुग्ण बरे झाले आहेत. आज १४ हजार ४९२ नवीन  रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ६९  हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १४,४९२ नवीन  रुग्ण आणि नोंद झालेले २९७ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-११३४ (३२), ठाणे- १८५ (२), ठाणे मनपा-१४६ (९), नवी मुंबई मनपा-४२५, कल्याण डोंबिवली मनपा-४२२ (१), उल्हासनगर मनपा-१७ (२), भिवंडी निजामपूर मनपा-२५ (२), मीरा भाईंदर मनपा-१४८ (८), पालघर-१७३ (३), वसई-विरार मनपा-१९० (७), रायगड-२४९ (८), पनवेल मनपा-२२६ (२), नाशिक-२२२ (७), नाशिक मनपा-६४१ (३), मालेगाव मनपा-३० (२), अहमदनगर-३३४ (११),अहमदनगर मनपा-२५२ (११), धुळे-३४५ (२), धुळे मनपा-२३५ (३), जळगाव-६३५ (३), जळगाव मनपा-१४३ (३), नंदूरबार-१४९ (२), पुणे- ६५९ (२१), पुणे मनपा-१५८१ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-९८१ (१५), सोलापूर-३८७ (५), सोलापूर मनपा-३५, सातारा-३९५ (६), कोल्हापूर-४०५ (५), कोल्हापूर मनपा-२२८ (३), सांगली-१३८ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५० (८), सिंधुदूर्ग-१४१, रत्नागिरी-८० (५), औरंगाबाद-९५ (३),औरंगाबाद मनपा-१५३, जालना-६० (२), हिंगोली-७८ (२), परभणी-२९, परभणी मनपा-५५, लातूर-९४ (२), लातूर मनपा-२७५ (५), उस्मानाबाद-२६३ (७),बीड,- २६५ (४), नांदेड-६८ (२), नांदेड मनपा-१०० (२), अकोला-५३ (१), अकोला मनपा-१६, अमरावती-१६ (१), अमरावती मनपा-७५ (७), यवतमाळ-३६, बुलढाणा-५१ (१), वाशिम-३३ , नागपूर-१८८, नागपूर मनपा-६९७ (१९), वर्धा-३७ (१), भंडारा-४१ (१), गोंदिया-४५, चंद्रपूर-३५ (१), चंद्रपूर मनपा-९, गडचिरोली-४, इतर राज्य १५.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३५ लाख ६६ हजार २८८ नमुन्यांपैकी ६ लाख ७१ हजार ९४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ११ हजार ६०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२७ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३५,३६२) बरे झालेले रुग्ण- (१,०९,३६८), मृत्यू- (७३८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,३०१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२१,६३०), बरे झालेले रुग्ण- (९७,४९१), मृत्यू (३५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,६०१)

पालघर: बाधित रुग्ण- (२३,१४५), बरे झालेले रुग्ण- (१५,८२३), मृत्यू- (५५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७७१)

रायगड: बाधित रुग्ण- (२६,२०१), बरे झालेले रुग्ण-(२०,३३४), मृत्यू- (६८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१८४)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३३४६), बरे झालेले रुग्ण- (१८१४), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४११)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (४९७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६३)

पुणे: बाधित रुग्ण- (१,४७,६७१), बरे झालेले रुग्ण- (१,००,५००), मृत्यू- (३६७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३,४९७)

सातारा: बाधित रुग्ण- (९३०२), बरे झालेले रुग्ण- (५५६६), मृत्यू- (२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४५१)

सांगली: बाधित रुग्ण- (८५७९), बरे झालेले रुग्ण- (५०७५), मृत्यू- (२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२१८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१७,००९), बरे झालेले रुग्ण- (९८४९), मृत्यू- (४६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६९७)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१६,५१७), बरे झालेले रुग्ण- (११,५५०), मृत्यू- (६७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२८९)

नाशिक: बाधित रुग्ण- (३१,३८८), बरे झालेले रुग्ण- (२०,२७२), मृत्यू- (७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,४७९)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१५,९३५), बरे झालेले रुग्ण- (१२,०९८), मृत्यू- (२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६२२)

जळगाव: बाधित रुग्ण- (२१,४२२), बरे झालेले रुग्ण- (१४,५७३), मृत्यू- (७४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१०३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१६०१), बरे झालेले रुग्ण- (९३८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०३)

धुळे: बाधित रुग्ण- (६३४५), बरे झालेले रुग्ण- (४१९९), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६६)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,५८५), बरे झालेले रुग्ण- (१३,७३२), मृत्यू- (५८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२६६)

जालना: बाधित रुग्ण-(३७९३), बरे झालेले रुग्ण- (२२०१), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७४)

बीड: बाधित रुग्ण- (३९५०), बरे झालेले रुग्ण- (२०१६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५२)

लातूर: बाधित रुग्ण- (६४४४), बरे झालेले रुग्ण- (३३२९), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८९३)

परभणी: बाधित रुग्ण- (१९७४), बरे झालेले रुग्ण- (६९०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२१८)

हिंगोली: बाधित रुग्ण- (११००), बरे झालेले रुग्ण- (८७४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६)

नांदेड: बाधित रुग्ण- (५११०), बरे झालेले रुग्ण (२२५९), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६९८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४७८३), बरे झालेले रुग्ण- (२६०९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०५०)

अमरावती: बाधित रुग्ण- (४१९५), बरे झालेले रुग्ण- (२८८५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२०१)

अकोला: बाधित रुग्ण- (३४५७), बरे झालेले रुग्ण- (२८३३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७५)

वाशिम: बाधित रुग्ण- (१३७४), बरे झालेले रुग्ण- (१००५), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२७०७), बरे झालेले रुग्ण- (७०५), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२४३४), बरे झालेले रुग्ण- (१६२६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४६)

नागपूर: बाधित रुग्ण- (१८,८५०), बरे झालेले रुग्ण- (९७७५), मृत्यू- (४८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८५९२)

वर्धा: बाधित रुग्ण- (५६३), बरे झालेले रुग्ण- (२९७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३)

भंडारा: बाधित रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४३९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (९९२), बरे झालेले रुग्ण- (६८७), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१३१२), बरे झालेले रुग्ण- (८०२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (५०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६१३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४९)

एकूण: बाधित रुग्ण-(६,७१,९४२) बरे झालेले रुग्ण-(४,८०,११४),मृत्यू- (२१,९९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,६९,५१६)

 (टीप: आज नोंद झालेल्या एकूण २९७ मृत्यूंपैकी २५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७ मृत्यू  हे ठाणे -७, पुणे -४, अहमदनगर -३, पालघर -२, उस्मानाबाद -२, नाशिक -२, कोल्हापूर -२, बीड -१, जळगाव -१, लातूर १, नागपूर -१ आणि नांदेड -१असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

‘दगडूशेठ’ च्या श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना साधेपणाने संपन्न

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; उत्सवकाळात मंदिरात दर्शनासाठी कार्यकर्ते देखील जाणार नाहीत – ट्रस्टचा मोठा निर्णय ; मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई , गणेश परिवारातील मूर्ती विराजमान

पुणे : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली. कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने निवडक विश्वस्तांच्या उपस्थितीत आणि श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी हा सोहळा साधेपणाने संपन्न झाला. श्रींच्या मूर्ती शेजारी गणेश परिवारातील मूर्तीदेखील विराजमान झाल्या होत्या. उत्सवकाळात देखील मंदिर बंद राहणार असल्याने कार्यकर्ते मंदिरात दर्शनासाठी जाणार नसल्याचा मोठा निर्णय ट्रस्टतर्फे घेण्यात आला आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी गणेश चतुर्थीला सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, , माणिक चव्हाण, कुमार वांबुरे प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला. उत्सवकाळात देखील मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. 

गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेल्या भाविकांनी मंदिरावरील आकर्षक विद्युतरोषणाई पाहण्यासोबतच रस्त्यावरुन बाहेरुनच दर्शन घेत कोरोनाचे संकट लवकर दूर होवो, अशी श्रीं ची चरणी प्रार्थना केली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.  

ॠषीपंचमीनिमित्त आॅनलाईन अथर्वशिर्ष पठणाचा कार्यक्रम :-
ॠषीपंचमीनिमित्त दरवर्षी हजारो महिला एकत्र येऊन गणरायासमोर अथर्वशिर्षाचे पठण करतात. यंदा सार्वजनिक प्रकारे कार्यक्रम करता येत नसला तरी ही अथर्वशिर्ष पठणाची परंपरा खंडित होणार नाही. रविवार, दिनांक २३ आॅगस्ट रोजी पहाटे ६ वाजता प्रातिनिधीक स्वरुपात महिला अथर्वशिर्ष पठण आणि श्री गणेशाची महाआरती आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनामुळे घरी राहून साधेपणाने आपण गणेशोत्सव साजरा करीत आहोत

मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम :-
मुख्य मंदिरामध्ये दररोज पहाटे ५ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त, सकाळी ६ वाजता श्री गणपती महाअभिषेक, सकाळी ७.३० वाजता महाआरती, रात्री ८ वाजता विशेष महामंगल आरती होणार आहे. वेदमूर्ती मिलींद राहुरकर आणि वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली दररोज श्री गणेशयाग होणार आहे. यावर्षी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल. मंदिरात दररोज सत्यविनायक पूजा होणार असून शनिवार, दिनांक २९ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मंत्रजागर होईल. उत्सवात दिनांक ३१ आॅगस्टपर्यंत सायंकाळी ५ वाजता वेदमूर्ती मधुकर जांभेकर, वेदमूर्ती धनंजय घाटे यांच्या पौरोहित्याखाली श्रीं चे सहस्त्रावर्तन होणार आहे. 
श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी

0

पुणे, दि. 22 : जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधाकरीता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह येथील कोविड केअर सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. याठिकाणी उपलब्ध असलेल्या खाटांची क्षमता व वापर, स्राव नमुना तपासणी सुविधा, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, उपचार सुविधा, स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच आहार व्यवस्था, औषधे व साधनसामग्री तपासणी, रिपोर्टिंग पध्दती, रुग्णवाहिका व्यवस्थापन, नोडल ऑफिसर व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
सणसर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये भेट देत एन्ट्री व एक्झिट पॉईंटसंदर्भात चर्चा केली. यावेळी सार्वजनिक शौचालये व स्वच्छता गृहांची व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण, सर्व्हेक्षण अहवाल, कोरोनाबाधितांची संपर्क शोध मोहीम तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांचा तपशील याविषयी माहिती घेतली.
बारामती येथील शासकीय विश्रामगृह येथे शासकीय विविध विभागप्रमुखांकडून कोरोना प्रतिबंधाबाबत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी भेट दिली व तेथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी सविस्तर माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेल्या प्रयोगशाळेची पाहणी करून कोरोना चाचण्यांची क्षमता वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या. तसेच खंडोबानगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामतीचे तहसिलदार विजय पाटील, इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी, इंदापूरचे गटविकास अधिकारी विजय परिट, बारामतीचे गट विकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्वास ओव्हाळ, रुई रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुनिल दराडे, अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच कोवीड केअर सेंटरची पाहणी त्यांनी केली.प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 145, एकुण 4 हजार 992 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 34 हजार 631 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 88 हजार 768 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.22 :- पुणे विभागातील 1 लाख 34 हजार 631 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 88 हजार 768 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 145 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4 हजार 992 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.32 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 39 हजार 181 रुग्णांपैकी 1 लाख 5हजार 209 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 686 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 286 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.59 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 8 रुग्णांपैकी 5 हजार 208 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 512 आहे. कोरोनाबाधित एकूण 288 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 171 रुग्णांपैकी 10 हजार 490 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 35 आहे. कोरोनाबाधित एकूण 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 7 हजार 976 रुग्णांपैकी 4 हजार 148 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 552 आहे. कोरोनाबाधित एकूण 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 432 रुग्णांपैकी 9 हजार 576 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 360 आहे. कोरोनाबाधित एकूण 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 927 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 324 , सातारा जिल्ह्यात 337, सोलापूर जिल्ह्यात 322, सांगली जिल्ह्यात 391 तर कोल्हापूर जिल्ह्यात 553 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 90 हजार 428 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 88 हजार 768 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव

0

मुंबई  – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- २०१९ मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा  महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बुद्धिमत्ता, ध्येय, एकाग्रता, अभ्यासू वृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रथमच करण्यात येत आहे. यावर्षी जवळपास ८० उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत सुयश प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विधानमंडळाकडून या यशस्वी उमेदवारांचा गौरव म्हणजे स्वजनाकडून त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली कौतुकाची दाद असून त्यांच्या भावी उज्ज्वल  कारकिर्दीकरिता शुभेच्छा आहेत. या कार्यक्रमासाठी यशस्वी उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले असून कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यात येईल, अशी माहिती विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना

0

मुंबई, दि. २२ :- मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.