Home Blog Page 2475

सोने-चांदी किमतीत आज तरी मोठी घसरण

0

कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीमधील घसरण सोमवारी देखील सुरूच आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती दहा ग्रॅम ५२ हजारांच्या खाली आला आहे. सोने आणि चांदीच्या दरात आज पुन्हा घसरण पहायला मिळाली. आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणाने कमॉडिटी बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू आहे. यामुळे आज सोमवारी सोने स्वस्त झाले. सोन्याचा भाव ५१७१५ रुपये प्रती दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात ४०१ रुपयांची घसरण झाली असून चांदीचा भाव एक किलोला ६६६६६ रुपये झाला आहे  

आज बाजार उघडताच सोने पुन्हा दबावात आले. सोन्यामध्ये विक्री सुरु झाली. सध्या सोन्याचा भाव ५१६३० रुपयांपर्यंत घसरला होता. सध्या सोने ३०१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१७१५ रुपये झाला आहे.

मागील आठवड्यात सोने १५०० रुपयांनी कमी झाले होते. तर चांदीचा भाव १६५० रुपयांनी कमी झाला होता. यापूर्वी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५६१९१ रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकावर गेला होता. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १९४७ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव प्रती औंस २६ डॉलर आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0


पुणे दि. २४:- म. रा. मा. वि.वि.महामंडळाच्या सन २०२० व २१ या वर्षकरता वैयक्तिक कर्ज व्याज पतावा योजनेत पुणे जिल्हयासाठी ८३ भौतिक व आर्थिक ९४.६२ लाख तसेच गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी भौतिक १५ व आर्थिक ८६.२५ लाख उद्ष्टिये प्राप्त झाले असल्याचे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

 आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर समकक्ष रु. १० लाख पर्यंत वैयक्तिक कर्ज परतावा तसेच रु. १० ते ५० लाखापर्यत समकक्ष गटकर्ज व्याज परतावा योजना आहे. या दोन्ही योजना बँक मार्फत राबविली जाईल. कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार (जास्तीत जास्त १२% पर्यत) महामंडळाकडून केला जाईल, वैयक्तिक गट परतावा योजनेसाठी लाभार्थीची (इतर मागासवर्गीय) कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा र.८ लाख आहे. तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय 18 ते 50 पर्यंत, कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य राहील, महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य, उमेदवाराने अर्ज करतेवेळी यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थीने मध्येच कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही. गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी शासन मान्य बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी कायदा 2013) च्या वेबपोर्टलनुसार अर्ज करू शकतात. गटातील उमेदवाराने अर्ज करतेवेळी या प्रकरणासाठी व यापूर्वी महामंडळाच्या व इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा, गटाने कर्ज प्रकरण हे सार्वजनिक वित्तीय प्रणालीद्वारे प्रकरण हाताळण्यास सक्षम असलेल्या बँकेत केलेले असावे. गटाच्या भागीदाराचे किमान रु.५०० कोटीच्या ठेवी असलेल्या व कोअर बँकिंग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत शेड्युल बँकेत खाते असावे. गटातील सर्व सदस्यांच्या क्रेडीट स्कोर किमान ५०० असावा. अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे पत्ता-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र बी, स नं.१०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे-४११००६ फोन- ०२०-२९५२३०५९ असा आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर विश्वास व्यक्त

0


नवी दिल्ली -कॉंग्रेसच्या सदस्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि पुढाकार घेत पक्ष चालू ठेवण्याचे आवाहन केले, असे त्यांनी मान्य केले. पुढची बैठक लवकरच बोलावणार आहे, बहुधा 6 महिन्यांच्या आत नवीन प्रमुख निवडण्यासाठी. तोपर्यंत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष राहण्यास राजी झाले आहेत .

दिवसभर चर्चेत असलेली काँग्रेस कार्यसमितीची बैठक अखेर संपली. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रानंतर झालेली ही बैठक वादळी ठरली. सात तास चाललेल्या या बैठकीत नवीन अध्यक्षांच्या निवडीसह अनेक मुद्यांवर चर्चा झाली. अखेर चर्चेअंती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी राहणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढील सहा महिन्यात नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली जाणार असून, तोपर्यंत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व निवड करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज (२४ ऑगस्ट) काँग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सुरूवातीलाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पद सोडण्यास तयार असल्याचं सांगत जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती कार्यसमितीकडे केली.

दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिलेल्या पत्राच्या वेळेवरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत नेत्यांना सुनावलं. त्याचबरोबर हे पत्र भाजपाला पूरक असल्याचा आरोपही बैठकीत झाला. त्यावरून दुपारी बराच गदारोळ झाला. काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

तब्बल सात तास चाललेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याबरोबर पुढील सहा महिन्यात नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तोपर्यंत हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहतील असा ठरावही मंजूर करण्यात आला.बैठकीच्या समारोपात बोलताना सोनिया गांधी यांनी पत्रावरून आणि झालेल्या आरोप प्रत्यारोपावरून नाराजी व्यक्त केली. “आपण दुखावलो गेलो आहे, पण सगळे माझे सहकारीच आहे. झाले गेलं सोडून द्या. आता पुन्हा एकदा नव्यानं एकजुटीनं कामाला सुरूवात करू,” अशा भावना सोनिया गांधी यांनी बैठकीत व्यक्त केल्या.

देश आणि कॉंग्रेसला एकत्र ठेवण्यासाठी गांधी-नेहरू घराण्याचे नेतृत्व आवश्यक; राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, अशोक चव्हाणांची मागणी

0

काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकती काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा असे म्हटले आहे. आता यानंतर काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न समोर आला आहे. गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष असावा आणि गांधीं कुटुंबातीलच अध्यक्ष असावा असे दोन मतप्रवाह पक्षात निर्माण झाले आहेत. तर राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्षपद सोपवण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी केली आहे.

नुकतीच 23 काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न लवकरचात लवकर सोडवण्यात यावा अशी मागणी केली. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे.

अशोक चव्हाण म्हणतात की, देश आणि कॉंग्रेसला एकत्र ठेवण्यासाठी गांधी-नेहरू घराण्याचे नेतृत्व आवश्यक आहे. ते पक्षाचे महान आश्रयदाता आहेत आणि इतिहासात हे बर्‍याच वेळा सिद्ध झाले आहे. ही वास्तविकता लक्षात घेऊन पक्षाने पुढील निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच सोनिया गांधींनी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करा असे म्हटल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, ‘सीडब्ल्यूसी कॉंग्रेस अध्यक्ष पदाबाबत योग्य तो निर्णय घेईल, परंतु पक्षातील लोकप्रिय आवाजानुसार राहुल गांधींनीच या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला पाहिजे.’

तसेच अशोक पुढे म्हणाले की, ‘सोनिया गांधी यांनी कठोर काळात कॉंग्रेस पक्षाची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली यूपीए सरकारने न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.’

सोनिया गांधी रुग्णालयात होत्या तेव्हाच पत्र का पाठवले, राहुल गांधींचा सवाल, पक्षातील 23 नेत्यांनी नेतृत्वाच्या मुद्द्यावर पाठवले होते पत्र

0

काँग्रेसच्या कार्यकारी समिती महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे. यामध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला पक्ष अध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी केली आहे. यानंतर नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. दरम्यान काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र पाठवत पत्र नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी केली होती. यावर आता सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवले?असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

सोनिया गांधी आजारी असतानाच पत्र का पाठवले?
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरुन सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवण्यात आले? असा सवाल राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत विचारला आहे.

पत्रात काय होते?
23 काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी आणि शशी थरूर यांच्यासह 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षातील मोठ्या बदलांवर भर दिला. ते म्हणाले – नेतृत्व पूर्णवेळ (पूर्ण वेळ) आणि प्रभावी असले पाहिजे, जे या क्षेत्रात सक्रिय असले पाहिजे. त्याचा परिणामही दिसायला हवा. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका घेण्यात याव्यात. संस्थेत नेतृत्व करणारी यंत्रणा त्वरित तयार करण्यात यावी. जेणेकरून पक्षाला पुनरुज्जीवन करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. मात्र, त्यांनी असे लिहिले नाही की कॉंग्रेस अध्यक्ष हे बिगर गांधी कुटुंबातील असावेत.

राहुल गांधींवर भडकलेल्या कपिल सिब्बल यांनी डिलीट केलं ‘ते’ ट्विट, नवं ट्विट करत म्हणाले…

0

काँग्रेसच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे. यात मोठा गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते हे आता राहुल गांधींवर नाराज असल्याचे दिसत आहे. दरम्यान कपिल सिब्बल यांनी ट्विट करत राहुल गांधींवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आता काहीच वेळात त्यांनी हे ट्विट डिलीट करत सारवासारव केली आहे.

नव्या ट्विटमध्ये सिब्बल म्हणतात…

राहुल गांधीविरोधातलं ‘ते’ आक्रमक ट्विट सिब्बल यांच्याकडून काही मिनिटांत डिलीट करण्यात आलं आहे. आता दुसररं ट्विट करत सिब्बल म्हणतात की, ‘राहुल गांधी यांनी थेट माझ्याशी संवाद साधला आहे. माध्यमांमध्ये दाखवलं जाणारं विधान आपण केलंच नसल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे मी माझं ट्विट मागे घेत आहे,’ असं सिब्बल यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं.

कपिल सिब्बल यांनी केलं होते ‘हे’ ट्विट

कपिल सिब्बल यांनीही ट्विट करत राहुल गांधींच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. सिब्बल म्हणाले की, ‘आम्ही भाजपाशी संगनमत केलं असल्याचं राहुल गांधी म्हणाले. मग राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या 30 वर्षांमध्ये भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधान मी केलेलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,’ अशा शब्दांमध्ये कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

सोनिया गांधी यांनी या बैठकीत अंतरिम अध्यक्षाचे पद सोडण्याची मागणी केली. यापूर्वी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र पाठवत पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी केली होती. यावर आता सोनिया गांधी रुग्णालयात असताना पत्र का पाठवले?असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. तसेच पत्राच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थिती केले. राहुल गांधींनी पक्षांच्या नेत्यांनी आरोप केले होते की, हे सर्व भाजपच्या मिलीभगतमुळे होत आहे. राहुल गांधींनी हे वक्तव्य करुन 20-25 मिनिट झाल्यानंतर लगेच त्यांचा विरोध करण्यास सुरुवात झाली आहे.

‘हे’ ऐकण्यासाठीच 45 वर्षे काँग्रेसची गुलामी केली का? गुलाम नबी आझाद यांना असदुद्दीन ओवेसींचा सवाल

0

काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू असल्याचं चित्र आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली. या बैठकीत मोठा गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये राहुल गांधींनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांवर भाजपशी ‘मिलीभगत’ असल्याचे आरोप केले होते. यावर काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. यावरुन आता राजकारणं चागलंच रंगलं आहे.

काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पत्र पाठवत पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची मागणी केली होती. यानंतर राहुल गांधींनी हे पत्र म्हणजे काँग्रेस नेत्यांची भाजपसोबत ‘मिलीभगत’ असल्याचं वृत्त समोर आलं राहुल गांधींनी केलेल्या आरोपावर गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. या संपूर्ण प्रकरणावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गुलाम नबी आझाद यांना ‘याचसाठी 45 वर्षे काँग्रेसची गुलामी केली का?’ असा ओवेसींनी केला आहे. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेल्या जुन्या आरोपांची आठवणही त्यांनी गुलाम नबी आझादांना करुन दिली आहे.

काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ‘काव्यात्मक न्याय! गुलाम नबी आझाद तुम्ही माझ्यावर असेच आरोप केले होते. आता तुमच्यावरही तसच आरोप झाला आहे. या साठीच 45 वर्षे काँग्रेसची गुलामी केली का? आता हे सिद्ध झालं आहे की, जो कुणी जानवेधारी नेतृत्वाला विरोध करतो त्यांना बी टीम ठरवलं जातं. आता मला आशा आहे की, मुस्लिमांना काँग्रेसविषयी असलेल्या निष्ठेची किंमत कळेल?’ असे म्हणत त्यांनी गुलाम नबी आझाद यांना सुनावलं आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 412,एकुण 5 हजार 243 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;

विभागात कोरोना बाधित 1 लाख 97 हजार 552 रुग्ण

                                                       -विभागीय आयुक्त सौरभ राव

            पुणे, दि. 24 :- पुणे विभागातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 97 हजार 552 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 412 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 5 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 45 हजार 41 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 291 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 334 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.04 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 714 रुग्णांपैकी 5 हजार 707 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 701 आहे. कोरोनाबाधित एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 765 रुग्णांपैकी 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 725 आहे. कोरोनाबाधित एकूण 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

               सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 441 रुग्णांपैकी 4 हजार 458 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 674 आहे. कोरोनाबाधित एकूण 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 591 रुग्णांपैकी 10 हजार 66 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 978 आहे. कोरोनाबाधित एकूण 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 197 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 580, सातारा जिल्ह्यात 345, सोलापूर जिल्ह्यात 271, सांगली जिल्ह्यात 146 तर कोल्हापूर जिल्ह्यात 855 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 24 हजार 574 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 97 हजार 552 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 23 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

महेश कोठारेंच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा भूमिपूजन सोहळा कोल्हापूर चित्रनगरीत संपन्न, लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरण होणार सुरू

0

दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित “दख्खनचा राजा जोतिबा’ ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. महेश कोठारे यांच्या हस्ते सेट उभारणी कामाचे भूमिपूजन झाले.

कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे मालिकेचे शुटिंग सुरू राहणार आहे. यासाठी चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार असून त्याचा भूमिपूजन समारंभाला निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील उपस्थित होते. कोठारे व्हिजन्सचं कोल्हापूरशी तसं खूप जुनं व घट्ट नातं आहे. ज्योतिबाचं देवस्थानदेखील या कोल्हापूर नगरीत आहे त्यामुळेच मालिकेचं शूटिंगही कोल्हापुरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याविषयी महेश कोठारे म्हणाले, “कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. कोल्हापुरातूनच अनेक सिनेमे आणि मालिका केल्या आणि एकूणच करियरला कलाटणी मिळाली. कोठारे व्हिजन संस्थेच्या माध्यमातून आजवर पौराणिक मालिकांवर भर देण्यात आला असला तरी जोतिबाची मालिका आणखी उंची गाठेल. भव्य सेटबरोबरच मालिकेसाठी वेशभूषा, विविध अलंकार या अतिशय महत्वाच्या गोष्टी असून ही मालिकाही अनेक नवे ट्रेंड निर्माण करेल. कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जातील.’कोल्हापुरात संपूर्ण मालिका शुटिंग करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. कोल्हापूर चित्रनगरीत आता सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या मालिकेचे येथे शुटिंग शक्‍य झाले आहे. शुटींग पूर्ण होताच रोजचे एपीसोड चित्रनगरीतून थेट मुंबईतील स्टुडिओमध्ये अपलोड होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मालिका स्टार प्रवाह प्रस्तुत कोठारे व्हिजन्सची निर्मिती आहे.

राज्यात आज १० हजार ४४१ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.२३ : राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १० हजार ४४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ७१  हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १०,४४१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील  

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३६,३५३) बरे झालेले रुग्ण- (१,१०,०५९), मृत्यू- (७४२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,५६७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२२,६२६), बरे झालेले रुग्ण- (९८,६९३), मृत्यू (३५६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,३७२)

पालघर: बाधित रुग्ण- (२३,४९३), बरे झालेले रुग्ण- (१६,०८५), मृत्यू- (५५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८५४)

रायगड: बाधित रुग्ण- (२६,५३६), बरे झालेले रुग्ण-(२०,६९३), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५८)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३३८२), बरे झालेले रुग्ण- (१८१८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (५१०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९)

पुणे: बाधित रुग्ण- (१,५०,२०७), बरे झालेले रुग्ण- (१,०१,७४९), मृत्यू- (३७४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,७१७)

सातारा: बाधित रुग्ण- (९५५५), बरे झालेले रुग्ण- (५७७०), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९३)

सांगली: बाधित रुग्ण- (८९०४), बरे झालेले रुग्ण- (५२२६), मृत्यू- (२९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३८१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१७,५३१), बरे झालेले रुग्ण- (१०,१५३), मृत्यू- (४७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९०२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१६,८३३), बरे झालेले रुग्ण- (११,९१२), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२३७)

नाशिक: बाधित रुग्ण- (३१,८६४), बरे झालेले रुग्ण- (२०,४४८), मृत्यू- (७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,६६७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६,४३२), बरे झालेले रुग्ण- (१२,४३३), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७२)

जळगाव: बाधित रुग्ण- (२२,०४९), बरे झालेले रुग्ण- (१४,८८८), मृत्यू- (७५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४११)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७२०), बरे झालेले रुग्ण- (९८०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८०)

धुळे: बाधित रुग्ण- (६३९९), बरे झालेले रुग्ण- (४४७३), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,६५५), बरे झालेले रुग्ण- (१४,२३९), मृत्यू- (५९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२२)

जालना: बाधित रुग्ण-(३८८३), बरे झालेले रुग्ण- (२२३९), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२३)

बीड: बाधित रुग्ण- (४०३१), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४६)

लातूर: बाधित रुग्ण- (६५९०), बरे झालेले रुग्ण- (३५३५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८२७)

परभणी: बाधित रुग्ण- (२०६०), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१२६३), बरे झालेले रुग्ण- (९१७), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)

नांदेड: बाधित रुग्ण- (५१७५), बरे झालेले रुग्ण (२३५०), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४९६६), बरे झालेले रुग्ण- (२७२८), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११०)

अमरावती: बाधित रुग्ण- (४२६४), बरे झालेले रुग्ण- (२९२२), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३२)

अकोला: बाधित रुग्ण- (३४८१), बरे झालेले रुग्ण- (२८४३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४०७), बरे झालेले रुग्ण- (१०१८), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२७६८), बरे झालेले रुग्ण- (१७२१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२४९३), बरे झालेले रुग्ण- (१६८१), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४८)

नागपूर: बाधित रुग्ण- (१९,६६८), बरे झालेले रुग्ण- (१०,४०८), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७५५)

वर्धा: बाधित रुग्ण- (५७९), बरे झालेले रुग्ण- (३००), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६)

भंडारा: बाधित रुग्ण- (७२२), बरे झालेले रुग्ण- (४५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१४), बरे झालेले रुग्ण- (७२३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (८५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५८५), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६२९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५)

एकूण: बाधित रुग्ण-(६,८२,३८३) बरे झालेले रुग्ण-(४,८८,२७१),मृत्यू- (२२,२५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,७१,५४२)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २५८ मृत्यूंपैकी २१३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू  हे अहमदनगर-९, ठाणे-६, पुणे-२, नाशिक-२, जालना-१, नांदेड-१, कोल्हापूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पर्यावरणपूरक फिरते विसर्जन 30 हौद सेवेत दाखल ! -महापौर

0

पुणे-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पुणे शहरामध्ये घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे आणि सार्वजनिक मंडळातील गणपतीचे मांडवातच विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले, त्याला पुणेकरांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ज्या नागरिकांना घरच्या गणपतीचे घरी विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी आपल्या पुणे महापालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देताना फिरत्या हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज हे फिरते हौद क्षेत्रिय कार्यालयांकडे रवाना केले आहेत. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

पुढे त्यांनी असेही म्हटले आहे कि,एका क्षेत्रिय कार्यालयात दोन याप्रमाणे ३० पर्यावरण पूरक गणेश विसर्जन फिरत्या हौद उपक्रमाचा आज सकाळी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत फिरत्या हौदाचा मार्ग, वेळेचे योग्य असे नियोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी उपमहापौर सौ सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जम्बो कोविड रुग्णालयाची पाहणी

0

पुणे दि 23: येथील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील सोईसुविधांचा आढावा घेतला.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, मनपाचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त राव यांनी उभारण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयातील साधन सामुग्रीचा आढावा घेतला तसेच वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सुविधांच्या उपलब्धतेबाबत चर्चा केली.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 457; एकुण 5 हजार 123 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 38 हजार 755 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 1 लाख 93 हजार 355 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.23 :- पुणे विभागातील 1 लाख 38 हजार 775 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 93 हजार 355 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 457 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 123 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 42 हजार 461 रुग्णांपैकी 1 लाख 7 हजार 885 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 221 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.73 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 369 रुग्णांपैकी 5 हजार 550 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 523 आहे. कोरोनाबाधित एकूण 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 494 रुग्णांपैकी 11 हजार 178 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 295 रुग्णांपैकी 4 हजार 298 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 704 आहे. कोरोनाबाधित एकूण 293 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 736 रुग्णांपैकी 9 हजार 864 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 348 आहे. कोरोनाबाधित एकूण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 587 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 280, सातारा जिल्ह्यात 361, सोलापूर जिल्ह्यात 323, सांगली जिल्ह्यात 319 तर कोल्हापूर जिल्ह्यात 304 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 9 हजार 62 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 93 हजार 355 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

काँग्रेस अध्यक्षपद सोडणार सोनिया गांधी, नवीन अध्यक्षावर उद्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली -काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. याआधीच काही वृत्तांमध्ये पक्षातील सूत्रांच्या हवाल्याने दावा केला जातोय ही सोनिया गांधी अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांना या पदावर राहण्याची इच्छा नाही. उद्या, सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. याच बैठकीत नवीन अध्यक्षाबाबत निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.

पक्षाच्या नेत्यांनी एक पत्र लिहून बदल करण्याची मागणी केली

इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या 23 नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून वरपासून खालपर्यंत बदल करण्याची मागणी केली आहे. ज्यांनी हे पत्र लिहिले त्यांच्यात 5 माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस कार्यकारिणी सदस्य, खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांचा यांचा समावेश आहे. या मुद्द्यावरून सोमवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे.

पत्रात काय आहे?

भाजप सातत्याने पुढे जात असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत तरुणांनी नरेंद्र मोदींना जोरदार मतदान केले. काँग्रेसचा बेस कमी असल्यामुळे आणि तरुणांचा आत्मविश्वास तुटत असल्याबद्दल गंभीर चिंता यामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की सुमारे 15 दिवसांपूर्वी पाठविलेल्या या पत्राने बदलाचा असा अजेंडा दिला आहे, ज्यांची चर्चा सध्याच्या नेतृत्वाला खुपू शकते.

या 3 मागण्यांचा उल्लेख

लीडरशिप फुल टाइम आणि प्रभावी असावी, जी फिल्डमध्ये अॅक्टिव्ह असेल. त्याचा परिणामही दिसावा.

काँग्रेस वर्किंग कमिटीची निवडणूक घ्यावी.

संस्थात्मक नेतृत्व यंत्रणा तातडीने तयार करावी जेणेकरून पक्षाला नवजीवन मिळण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.

गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणे चुकीचेअमरिंदर सिंह

यादरम्यान पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी रविवारी म्हटले की, अंतर्गत निवडणुकांऐवजी प्रत्येकाची संमती घेतली पाहिजे. राहुल गांधींनी कार्यकर्त्यांचे पूर्ण समर्थन आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत की नाही, याचा काहीच फरक पडत नाही. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही गांधी घराण्याच्या नेतृत्वाला आव्हान देणार्‍या नेत्यांचा विरोध दर्शविला आहे.

उद्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी या महिन्यात आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करीत आहेत. गेल्या वर्षी राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कॉंग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) सोमवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक होईल. यात नेतृत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते

असे म्हटले जात आहे की, पक्षाच्या एका गटाला पुन्हा राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवायचे आहे. पक्षाने 2 दिवसांपूर्वी मीडिया ब्रीफिंगमध्ये म्हटले होते की देशभरातील कार्यकर्त्यांना राहुल यांना अध्यक्षपदी बघण्याची इच्छा आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून “स्वच्छतेचा जागर” सुरु…

0

पुणे- शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त सुरु राहणा-या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे. या आरोग्यत्सोवाची सुरुवात आजपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ येथून झाली. यावेळी उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, पर्यावरण तज्ञ नितीन देशपांडे, दत्तात्रय देवळे, ललित राठी, लोकेश बापट,  माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, पतित पावन संघटनेचे योगेश वाडेकर, यादव पुजारी, विकी आंग्रे, विजय जोरी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, परेश खांडके, मनीष घरत, श्रीकांत मेमाणे उपस्थित होते.

माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत म्हणाले कि, उत्सवाच्या कालावधीत जमा झालेले निर्माल्य – हार – नैवद्य यांचे संकलन करून पुणे मनपा च्या सहकार्याने सेंद्रिय पद्धतीने खतनिर्मिती करुन पुन्हा अशा मंडळांकडे देऊ, हे खत त्यांनी नागरिकांना झाडांसाठीचा नैवैद्य म्हणून मंडळांकडून प्रसाद देण्याचे आवाहन घरत यांनी केले आहे. तसेच १० टन टाकाऊ प्लास्टिक संकलन करण्याचा उपक्रम आणि रिसायकल प्लास्टिक डस्ट बिन चे वाटप करण्यात येणार असल्याचे घरत म्हणाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव आणि सदस्य सचिव इ. रविंद्रन यांनी या आरोग्योत्सवासाठी मोलाची मदत केल्याने त्यांचे आभार यावेळी घरत यांनी मानले.

पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक म्हणाले कि, पुणे मनपा दरवर्षी निर्माल्यापासून खत बनवत असते, गेल्यावर्षी अशा निर्माल्यापासून तर अगरबत्तीदेखील बनवण्यात आली होती. या गोष्टी पुन्हा मंडळांना आणि नागरिकांना देण्यात येतात. अशा समाजपयोगी गोष्टींमध्ये गणेशमंडळे आणि सोसायट्यांनी तसेच नागरिकांना सहभाग घेण्याची गरज असल्याचे मोळक म्हणाले. नागरिकांनी आपापल्या घरि गणपतीचे विसर्जन करावे, ते जमत नसेल तर मुर्ती दान करुन पर्यावरण रक्षण करण्यास हातभार लावण्याचे आवाहन देखील मोळक यांनी केले. नागरिकांना घरी गणपती विसर्जन करण्यासाठी महानगरपालिका अमोनियम कार्बोनेट मोफत देते, तसेच ज्यांना मुर्ती दान करायची आहे अशांसाठी मनपाच्यावतीने विधीवत पूजा करुन विसर्जन करण्यात येते. मुर्तीदानासाठी शहरामध्ये १८७ केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. नागरिकांनी उत्सवाच्या काळात अशा सामाजिक संस्था आणि मनपाला सहकार्य केले तर निश्चित पर्यावरणाचे रक्षण होईलच तसेच कोरोनाचादेखील प्रादुर्भाव कमी होईल असा विश्वास यावेळी उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केला.

उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे म्हणाल्या कि,  उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी निर्माल्य, नैवेद्य विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. पावसाळ्यात यामुळे अनेक ठिकाणी गटारे, चेंबर, कॅनॉल तुंबलेले दिसतात, त्यामुळे  अनेक ठिकाणी  पाणी साचून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळायच्या असतील तर निर्माल्य कलशचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करण्याचे आवाहन शेंडगे यांनी केले.