Home Blog Page 2474

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 848

0

पुणे विभागातील 1 लाख 45 हजार 719 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;
विभागात कोरोना बाधित 2 लाख 948 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे, दि. 25 :- पुणे विभागातील 1 लाख 45 हजार 719 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 948 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49 हजार 848 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 5 हजार 381 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.5 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 47 हजार 392 रुग्णांपैकी 1 लाख 12 हजार 648 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 237 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 157 रुग्णांपैकी 5 हजार 947 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 895आहे. कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 59 रुग्णांपैकी 11 हजार 700 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 615 रुग्णांपैकी 4 हजार 577 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 718 आहे. कोरोनाबाधित एकूण 320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 725 रुग्णांपैकी 10 हजार 847 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 315 आहे. कोरोनाबाधित एकूण 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 396 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 351, सातारा जिल्ह्यात 443, सोलापूर जिल्ह्यात 294, सांगली जिल्ह्यात 174 तर कोल्हापूर जिल्ह्यात 134 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 39 हजार 310 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 948 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


(टिप :- दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

‘गोदरेज अप्लायन्सेस’तर्फे आरोग्य व स्वच्छता यांसाठी ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ सादर

0

गोदरेज अप्लायन्सेसतर्फे आरोग्य व स्वच्छता यांसाठी गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 सादर;
यूव्हीसी तंत्रज्ञान आधारित जंतुनाशक उपकरणाद्वारे
कोविड-19 व इतर विषाणूंवर 99 टक्के मात

यूव्हीसी किरणाच्या उत्सर्जनाबाबत आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रमाणित गोदरेज व्हिरोशील्डमधून कोविड-19 व अन्य विषाणू 2 ते 6 मिनिटांत होतात निष्प्रभ

ऑगस्ट 14, 2020 : सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या संदर्भात, ‘कोव्हिड-19’च्या साथीमुळे भारतीय ग्राहकांच्या वर्तणुकीत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. ‘कोरोना’च्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी ग्राहक स्वत:चे प्रयत्न करीत आहेत. दररोज घरात येणाऱ्या व वापरल्या जाणार्‍या गोष्टी धुण्यासाठी, त्यांची स्वच्छता करण्यासाठी किंवा त्या वस्तू वेगळ्या ठेवण्यासाठी ग्राहक वेळ आणि शक्ती खर्च करताना दिसत आहेत. आणि तरीही ते अवलंबीत असलेल्या पद्धतींच्या प्रभावीपणाची त्यांना कोणतीही खात्री मिळत नाही. कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे, की 60 टक्क्यांहून अधिक ग्राहक त्यांच्याकडे आलेली पार्सल्स व पाकिटे एका दिवसापेक्षा जास्त काळ अलग ठेवतात, काहीजण घरी आणलेल्या भाज्या धुवून दिवसभरापेक्षा जास्त वेळ बाजूला ठेवतात, तर काहीजण चक्क भाज्या साबणाच्या पाण्याने धुवून काढतात.

ग्राहकोपयोगी वस्तूंचे गेली 62 वर्षे उत्पादन करणारी भारतातील आघाडीची कंपनी, गोदरेज अप्लायन्सेस हिने भारतीय ग्राहकांच्या गरजा नेमक्या ओळखून योग्य ते तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचे नेहमीच प्रयत्न केले आहेत. ‘कोरोना व्हायरस’च्या संकटात या कंपनीने पुन्हा एकदा आपले प्रसंगानुरुप योग्य ठरणारे खास भारतीय बनावटीचे उत्पादन भारतीय ग्राहकांसाठी निर्माण केले आहे. ‘अल्ट्रा व्हायोलेट–सी’ तंत्रज्ञानावर आधारीत गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 हे नवे उपकरण कंपनीने सादर केले आहे. यामध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू केवळ 2 ते 6 मिनिटांच्या अवधीत 99 टक्के निर्जंतूक होतात, त्यायोगे त्या ‘कोरोना व्हायरस’पासून निर्धोक होतात. यातील 254 एनएम इतक्या तरंगलांबीच्या अतिनील किरणांमुळे ‘कोविड-19’चे, तसेच इतरही विषाणू, जीवाणू निष्प्रभ होतात. उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी विश्वासार्हता मिळवलेल्या या ब्रॅंडने ‘व्हिरोशील्ड’च्या अनेक चाचण्या घेतल्या आहेत आणि यूव्ही-सी किरणांच्या उत्सर्जनाबाबत ‘आयसीएमआर’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्रही घेतले आहे.

सुरक्षितता व स्वच्छता या दोन्ही बाबींची पुरेपूर काळजी घेतली जाईल, अशा पद्धतीने ‘व्हिरोशील्ड’ची रचना करण्यात आली आहे. ‘यूव्ही सराऊंड’ तंत्रज्ञानाच्या संकल्पनेनुसार, ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ मध्ये 4 ‘यूव्ही-सी ट्यूब’ आणि 6 ‘साईड रिफ्लेक्टिव्ह इंटिरिअर्स’ बसविण्यात आले आहेत. या क्षमतेच्या अशा उपकरणामध्ये बसविण्यात आलेली ही सर्वोच्च स्तरावरील रचना आहे. यामुळे ‘व्हिरोशील्ड’च्या आतमध्ये 360 अंश कोनांत यूव्ही-सी किरणे पोहोचू शकतात. ‘व्हिरोशील्ड’च्या चौकोनी आकारामुळे त्याच्या अंतर्गत भागात सगळीकडे यूव्ही-सी किरणांची तीव्रता समान राहते. धान्याच्या पाकिटांपासून भाज्या, मोबाईल फोन, फेसमास्क, सोन्याचे दागिने, हेडफोन, गाडीच्या किल्ल्या, खेळणी, चलनी नोटा, पैशाचे पाकीट, चष्मा अशा कोणत्याही वस्तू यामध्ये त्वरीत निर्जंतूक होतात.

तीस लिटर इतक्या त्याच्या आकारमानामुळे आपण एकाचवेळी अनेक लहान-मोठ्या वस्तू निर्जंतूक करू शकतो आणि आपला वेळ व ऊर्जा वाचवू शकतो. वस्तू वा भाज्या धुणे, वाळवणे, वेगळ्या ठेवणे, अशा गोष्टी करण्याने फायदा होतो किंवा नाही हेही माहीत नसताना, त्या करीत राहण्याचा व्याप या उपकरणाने वाचतो. 

गोदरेज अप्लायन्सेस हा ब्रॅंड ग्राहकांच्या सुरक्षेबाबत अतिशय काटेकोर आहे. ‘यूव्ही-सी’च्या थेट संपर्कात जास्त वेळ राहिल्यास ते मानवी शरिराला घातक असते, हे लक्षात घेऊन ‘व्हिरोशील्ड’ची रचना करण्यात आली आहे. अपारदर्शक पृष्ठभाग, जाडजूड दरवाजे व इतर बाजू आणि गास्केट आधारीत मॅग्नेटिक सिलिंग सिस्टीम, तसेच दरवाजा उघडल्याबरोबर आपोआप थांबणारी यंत्रणा अशी या उपकरणाची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच, ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ हे मानवी सुरक्षेच्या दृष्टीने शंभर टक्के यूव्ही लीकप्रूफ आहे. त्यातून किरणांची गळती होत नाही, याच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्याबाबतचे प्रमाणपत्रही कंपनीला मिळाले आहे.

‘गोदरेज व्हिरोशील्ड’वर 1 वर्षाची व्यापक स्वरुपाची वॉरंटी देण्यात आली आहे. या वॉरंटीमध्ये ‘यूव्ही-सी’च्या ‘लॅम्प’चाही समावेश आहे. गोदरेजच्या विक्रीपश्चात सेवेच्या यंत्रणेचे पाठबळ या उपकरणाला लाभले आहे.

नेत्रसुखद पांढऱ्या रंगातील, 30 लिटर क्षमतेच्या व अनेकविध वैशिष्ट्यांनी युक्त अशा ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ची किंमत 9490 रु. अशी आकर्षक ठेवण्यात आली आहे. यामध्ये कर समाविष्ट आहेत.  

व्हिरोशील्ड सादर करताना ‘गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, “कोविड साथीचा स्पष्ट परिणाम ग्राहकांच्या वर्तनावर झाला आहे. आरोग्य आणि स्वच्छता यांबाबत आमचे ग्राहक सतत चिंताग्रस्त असतात. ‘‘विचारपूर्वक बनवलेल्या गोष्टी’’ या ब्रँड तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आम्ही ग्राहकांचा दृष्टीकोन आणि त्यांच्या सद्य गरजा यांवर आधारित उत्पादने देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आरोग्य, स्वच्छता आणि कमी कष्ट या संकल्पनांचा एकत्रित विचार करून विविध तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांच्यावर आम्ही काम करीत आहोत. त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या ग्राहकांसाठी गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 सादर करीत आहोत. ‘यूव्ही-सी’ तंत्रज्ञान-आधारित निर्जंतुकीकरणाचे हे उपकरण आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या प्रियजनांना ‘कोविड-19’ व इतर विषाणू व जीवाणू यांच्यापासून संरक्षण देऊ शकते. आमच्या ग्राहकांना ‘न्यू नॉर्मल’ ही संकल्पना स्वीकारीत असताना कोणताही धोका पत्करावा लागू नये आणि त्यांनी चिंतामुक्त असावे, हीच आमची इच्छा आहे.”

गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड (रेफ्रिजरेटर्स) अनुप भार्गव म्हणाले, “कोरोनाच्या संसर्गापासून आपण कसे वाचू, याची भिती प्रत्येकाच्या मनात आहे. अशावेळी आमच्या ग्राहकांना ‘कोविड-19’, इतर विषाणू व जीवाणू यांच्यापासून वाचवण्यासाठी आम्ही नवीन ‘गोदरेज व्हिरोशील्ड 4.0’ सादर करीत आहोत, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. यूव्ही-सी किरणाच्या उत्सर्जनाबाबत ‘आयसीएमआर’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून प्रमाणपत्र मिळालेल्या ‘व्हिरोशील्ड’मधून ‘कोविड-19’पासून केवळ 2 ते 6 मिनिटांच्या अवधीत 99 टक्के निर्जंतुकीकरण करून मिळते. 360 अंशातील ‘यूव्ही सराऊंड’ तंत्रज्ञान व शंभर टक्के ‘यूव्ही लीकप्रूफ’ आणि इतरही अनोखी वैशिष्ट्ये असलेले गोदरेज व्हिरोशील्ड 4.0 हे 30 लिटर क्षमतेचे उपकरण अतिशय आकर्षक किंमतीत उपलब्ध होत आहे. हे उपकरण सादर केल्यापासूनच्या वर्षभरात 40 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. ‘अॅमेझॉन’वर हे उपकरण अगोदरच, त्यांच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ऑनलाइन जाहिरातींसाठी आम्ही आमच्या ई-कॉम भागीदारांशी समन्वय साधून आहोत. आम्ही या महिन्यातच आमच्या नेटवर्कवर देशभरात हे उपकरण उपलब्ध करुन देऊ. ‘व्हिरोशील्ड’चा उत्कृष्ट मूल्य प्रस्ताव आणि त्याला मिळणारा सकारात्मक अभिप्राय यांतून आम्हाला या आर्थिक वर्षात बाजारात 20 टक्के हिस्सा मिळण्याचा आत्मविश्वास वाटतो आहे.’’

आयसीआयसीआय बँक शेतकऱ्यांची पत तपासण्यासाठी घेणार उपग्रहांनी दिलेल्या माहितीची मदत

0

आयसीआयसीआय बँक शेतकऱ्यांची पत तपासण्यासाठी घेणार उपग्रहांनी दिलेल्या माहितीची मदत

·         असा निर्णय घेणारी भारतातील पहिलीच व जगातील मोजक्या बँकांपैकी एक बँक

·         महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथील 500 गावांमध्ये उपलब्ध; लवकरच 63,000 गावांपर्यंत विस्तारण्याचे नियोजन

मुंबई: आयसीआयसीआय बँकेने शेती क्षेत्रातील आपल्या ग्राहकांची पत तपासण्यासाठी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीचा वापर करणार असल्याचे आज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासंबंधीचे निर्णय जलद घेण्याच्या दृष्टीने जमीन, सिंचन व पीकपद्धती यांच्याशी निगडित असलेल्या विविध निकषांचे मापन करण्यासाठी उपग्रहाने दिलेल्या माहितीचा वापर करणारी आणि या माहितीची सांगड लोकसंख्याविषयक व आर्थिक निकषांशी घालणारी ही भारतातील पहिलीच आणि जगभरातील मोजक्या बँकांपैकी एक बँक आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर केल्यास, सध्या कर्ज घेतलेले असलेल्या शेतकऱ्यांना त्यांची पात्रता वाढवण्यासाठी, तसेच यापूर्वी कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होणे सोयीचे होण्यासाठी होणार आहे. तसेच, उपग्रहांच्या माहितीच्या मदतीने काँटॅक्टलेस पद्धतीने जमिनीची खातरजमा केली जाणार असून, पतविषयक मूल्यमापन अवघ्या काही दिवसांत केले जाणार आहे. या क्षेत्रातील अन्य कंपन्यांना यासाठी 15 पर्यंत दिवस लागतात.  

बँक गेले काही महिने महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथील 500 हून अधिक गावांमध्ये उपग्रहांद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करत आहे आणि लवकरच हा उपक्रम देशभरातील 63,000 हून अधिक गावांपर्यंत विस्तारण्याचे बँकेचे नियोजन आहे.

करोनाव्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहण्याचे आणि प्रवास करणे टाळण्याचे आवाहन केले जात असताना, हा उपक्रम सादर करण्यात आल्याने तो विशेष महत्त्वाचा आहे. उपग्रहांनी दिलेल्या माहितीमुळे जमीन, पीक व सिंचनाची पद्धत यांचे दुरूनच झटपट व तांत्रिकदृष्ट्या अचूक विश्लेषण करणे शक्य होणार आहे. त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना किंवा ग्राहकांना प्रत्यक्ष जमिनीच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यामुळे, शेतकऱ्यांना कोठेही प्रवास न करता, तसेच अन्य कोणत्याही प्रकारचा खर्च न करता बँकेला विश्वासार्ह माहिती पुरवता येऊ शकते.

या नव्या उपक्रमाविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, “ग्राहकांना जास्तीत जस्त सोयीस्कर सेवा देण्याच्या हेतूने, तंत्रज्ञानामध्ये प्रवर्तक असे नावीन्य आणण्याची आयसीआयसीआय बँकेची परंपरा आहे. आम्ही नावीन्याची कास धरून 1998 मध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग (2008), टॅब बँकिंग (2012), 24×7 टच बँकिंग शाखा (2012), सॉफ्टवेअर रोबोटिक्स (2016) आणि ब्लॉकचेन बसवणे (2016) अशा सेवा सर्वांच्या आधी सुरू केल्या आणि वित्तीय सेवा उद्योगामध्ये नवे मापदंड निर्माण केले.

शेतकऱ्यांना कर्ज देत असताना, त्यांची पत तपासण्यासाठी उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा व विश्लेषणाचा वापर करणे, हे आणखी एक नावीन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञान आम्ही सादर करत आहोत. अगोदर, शेतकऱ्यांना भविष्यात मिळू शकणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज बांधण्याच्या हेतूने, जमिनीचे ठिकाण, सिंचनाची पातळी व पिकाची गुणवत्ता यांच्याशी संबंधित निरनिराळ्या निकषांचे व्यक्तिशः मूल्यमापन करण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणी जावे लागत असे. आता, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांनी टिपलेल्या इमेजेसद्वारे अनेक ठिकाणांची वेगवेगळ्या प्रकारांची माहिती काँटॅक्टलेस व अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने तपासता येऊ शकते. ही माहिती, तसेच लोकसंख्याविषयक व आर्थिक तपशील यांची सांगड घालून शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीबद्दल इत्थंभूत माहिती उपलब्ध होऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कर्जाची उपलब्धता वाढण्यासाठी मदत होणार आहे. कारण, कर्जाच्या बाबतीत नवखे असलेल्या शेतकऱ्यांना औपचारिक स्वरूपाचे कर्ज सहज उपलब्ध होऊ शकेल, तसेच सध्या कर्ज घेतलेले असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या पात्रतेमध्ये सुरक्षितपणे वाढ करता येऊ शकेल. 500 हून अधिक गावांतील प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाला मिळालेला प्रतिसाद पाहता, या तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्जे देण्यासाठी आम्ही देशातील 63,000 हून अधिक गावे यामध्ये समाविष्ट करणार आहेत.”

बँकेने व्यावसायिक वापरासाठी हवामानाचा वापर व स्पेस टेक्नालॉजीचा वपर यामध्ये हातखंडा असलेल्या कृषी फिनटेक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. जमीन, पीक व सिंचन यांचा सखोल अभ्यास करून शेतकऱ्यांची पत अभ्यासण्यासाठी 40 हून अधिक निकषांच्या आधारे अहवाल तयार करण्यासाठी बँकेने त्यांच्याबरोबर काम केले आहे. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांकडून मिळालेल्या इमेजेसचे विश्लेषण करण्यासाठी सर्व विश्लेषण विचारात घेतले जाते. याचबरोबर, भूतकाळात मिळालेल्या व भविष्यात मिळणाऱ्या कृषी उत्पन्नाचा, भूतकाळातील व भविष्यातील लागवडीच्या कालावधीचा व उत्पन्नाच्या स्रोतांचा अंदाज वर्तवण्यासाठी जिल्हा स्तर, गाव पातळी आणि वैयक्तिक जमीन या स्तरांवर निर्देशांक तयार करण्यासाठी बँकेने स्कोअरिंग मॉडेल तयार केले आहे. यामुळे पत मूल्यमापनासाठी महत्त्वाची माहिती मिळणार आहे.  

बँक वापरत असलेल्या उपग्रहांच्या माहितीपैकी काही प्रमुख माहिती पुढीलप्रमाणे आहे:

·         गेल्या काही वर्षांतील पर्जन्य व तापमान यांची आकडेवारी

·         गेल्या काही वर्षांतील मातीतील आर्द्रतेची पातळी

·         पृष्ठभागावरील पाण्याची उपलब्धता

·         पिकाचे नाव, अंदाजे पेरणी व कापणीचे आठवडे, पिकाचे आरोग्य व उत्पादन असे पीक पेरणीतील ट्रेंड

·         अक्षांश, रेखांश व जमिनीची सीमा असा शेतजमिनीच्या ठिकाणाचा तपशील

·         जवळची गोदामे व बाजारपेठा

या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे बँकेचे ग्राहक असलेल्या आणि नसलेल्याही शेतकऱ्यांना केसीसी (किसान क्रेडिट कार्ड) कर्जे मिळवण्यासाठी मदत होणार आहे. जून 30, 2020 पर्यंत संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत, बँकेने ग्रामीण भागात दिलेल्या 571.77 अब्ज रुपयांच्या कर्जांमध्ये केसीसीचे योगदान एक-तृतियांश होते.

परंपरा राखत गौरायांचे घरोघरी आगमन

0

पुणे: कोरोनामुळे यावेळच्या गणेशोत्सवाचा उत्साह काहीसा कमी झाला असला तरी परंपरा राखत आणि जमेल तितकी काळजी घेत घरोघरी  महिलांनी गौरीचे थाटात आवाहन,आगमन  साजरे केले.   
देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई..असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.अशी अख्यायिका सांगितली जाते..ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. राज्यासह देशातुन हद्दपार होऊ दे आणि सर्वांना निरोगी आयुष्य मिळो अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली.

तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मदतकार्य वेगाने करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

0

अलिबाग, जि.रायगड,दि.25 (जिमाका) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पूर्णपणे ढासळून असून मोठी दुर्घटना घडली.

या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आज पहाटे उपस्थित राहून तेथे सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासकीय यंत्रणांना वेगाने मदतकार्य करण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.

यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.

तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल; दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही 5 मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.

महाड शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी  डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 7 जण जखमी झाले आहेत.

दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल  करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केल्याचे तसेच दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही 26 लोक अडकले असून त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची पथके श्वानपथकाच्या मदतीने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करीत असल्याची  माहितीही त्यांनी यावेळी दिली.

स्टेट बँकेकडून ‘सीआयएसएफ’ला पीपीई किटचे वाटप

0

पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) वतीने पुणे विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या लढाईत सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेले १०० पीपीई किट, १०० सॅनिटायझर, १०० फेस शिल्ड, १०० ज्यूट बॅग आदी साहित्य देण्यात आले. ‘एसबीआय’चे उप महाप्रबंधक श्री. पी. शेषू बाबू यांच्या हस्ते हे सर्व साहित्य ‘सीआयएसएफ’चे डेप्युटी कमांडंट श्री संतोष सुमन व असिस्टंट कमांडंट श्री. जी. जी. भार्गव यांच्याकडे सुपूर्त केले.यावेळी रिजनल मॅनेजर श्री. मनीष चंद्रा, ब्रांच हेड श्री. एस. ए. शेंडे, मॅनेजर (लायजन) श्री. जयंत सिन्हा, शशिकला पाटील, श्री. कृष्णा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री. पी. शेषू बाबू यावेळी म्हणाले, “स्टेट बँकेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत नियमितपणे विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, कृषी विकास, जलसंवर्धन, वृक्षारोपण, ग्रामीण आर्थिक विकास आदी उपक्रम राबवले जात आहेत. समाजाप्रती आपले योगदान असावे, या कर्तव्यभावनेतून अधिकाधिक मदतकार्य देण्याचा प्रयत्न नियमितपणे करत असते. यासह कोरोना महामारीच्या काळात बँकेच्या वतीने अखंडपणे आर्थिक सेवा पुरविली जात आहे. ‘एसबीआय’च्या सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून जवळपास २०० कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीला दिले आहेत. स्थानिकपासून राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे काम बँकेने केले आहे.”

“कोरोना संकटात गरजुंना दिलासा मिळावा, यासाठी बँकेच्या वतीने पुणे शहर आणि ग्रामीण भागात अन्नधान्याचे वाटप केले. ‘इस्कॉन’च्या ‘अन्नामृत’ उपक्रमांत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात २५ दिवस रोज २५०० लोकांना जेवण दिले गेले. पुणे महानगरपालिकेला १२०० पीपीई किट, पूना हॉस्पिटलला ४०० एन-९५ मास्क, पुणे शहर पोलिसांना ३०० मास्क, ३०० फेसशिल्ड, ३०० सॅनिटायझर देण्यात आले. याशिवाय सर्व प्रकारची काळजी घेऊन ग्राहकांना उत्तम सेवा दिली आहे. पुण्यातील तीन रुग्णालयांना व्हेन्टिलेटर्स दिले आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर देण्यात आले आहेत. बँकेच्या वर्धापनदिनी ५००० झाडे लावण्यात आली आहेत,” असेही श्री. बाबू यांनी नमूद केले.

भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात वकिलांकडून निदर्शने

0

पुणे : सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ आणि सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवाराबाहेर वकिलांकडून सोमवारी (ता.२४) काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला. लोकायतच्या वकील विंग समतेसाठी शहरातील काही वकील संघटना यात सहभागी झाल्या होत्याअ‍ॅड. भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबाबत नुकतेच दोषी ठरवण्यात आले आहेवकिलांनी या निर्णयाबद्दल असहमती दर्शवत म्हटले आहे की, ऍड. भूषण यांची विधाने अयोग्य, तर्कविसंगत असू शकतात. परंतु यातून न्यायालयाची अवमानना होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत तत्परतेने निर्णय देत त्यांना दोषी ठरवले. न्यायव्यवस्थेवर टीका करणे म्हणजे तिचा अपमान करणे आहे का? टीका करणे म्हणजे अपमान करणे नाही. संविधानाच्या कलम १९ (१)(A) नुसार देशातील प्रत्येक नागरिकास भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. ऍड. भूषण यांच्यावरील कारवाई ही एक प्रकार या हक्काची पायमल्ली होत आहे.

ऍड. मोहन वाडेकर, ऍड. शाहिद अख्तर, ऍड. नाथा शिंगाडे, ऍड. मोनाली चं. अ., ऍड. प्रभाकर सोनवणे, ऍड. वाजीद खान, ऍड. आरिफ खान, ऍड. सुषमा नामदास, ऍड. अतुल गुंड-पाटील, ऍड. सैफान शेख यांच्यासह लोकायतची वकील विंग आणि शहरातील काही वकील संघटना सभेत सहभागी झाल्या होत्या.
संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार अबाधित राहावे म्हणून आम्ही बोलतोय. आपले हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. आम्ही ती घेत आहोत, असे सभेत सहभागी झालेल्या वकीलांनी सांगितले.

गणेशोत्सव संपेपर्यन्त मिळणार नाही खाजगी क्लासेस आणि हॉटेल्स ला परवानगी

0

पुणे – स्पर्धा परीक्षा, व्यवस्थापनशास्त्र, (एमबीए), अभियांत्रिकीसह काही अभ्यासक्रमांचे क्‍लासेस (खासगी शिकवणी वर्ग) सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढच्या वर्षी होणार असल्याने क्‍लासेसला परवानगी देण्याचा आग्रह विद्यार्थी, पालक, शिकवणी चालकांनी धरल्याने; त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुढच्या आठवड्यात म्हणजे, एक सप्टेंबरनंतर क्‍लासेस सुरू होण्याची आशा आहे. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा आढावा घेऊनच क्‍लासेसबाबत तसेच हॉटेल्स बाबत निर्णय होईल, येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत एक सप्टेंबरपासून नवे काही बदल करण्याबाबत येत्या शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार असून, त्यामध्ये बंद असलेले व्यवहार, विशेषत: क्‍लासेस आणि खासगी आस्थापनांना आणखी काही सवलती दिल्या जानार काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा-महाविद्यालयांसह खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. सध्या बहुतांशी व्यव्हार सुरू झाले तरीही, शैक्षक्षिक संस्था सुरू झालेल्या नाहीत. त्यातच परीक्षा न घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, पुढच्या वर्षी परीक्षा होणार असल्याने किमान खासगी शिकवण्यांचे वर्ग सुरू व्हावे, अशी अपेक्षा विद्यार्थी-पालकांची आहे. ही मागणी लावून धरत क्‍लासेस सुरू करण्यासाठी मालकांनीही आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर क्‍लासेसला परवानगी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग, सद्य:स्थिती, आरोग्य यंत्रणा आणि वाढत्या संसर्ग याचा दर महिन्याला दोनदा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून व्यवहारांबाबतची बंधने-सवलती ठरविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून येत्या एक सप्टेंबरपासून नव्याने काय सुरू करायचे, यासाठी महापालिका आयुक्त आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर क्‍लासेस आणि अन्य व्यवहारांबाबतचे नवे निर्णय जाहीर होतील.

बाजारपेठांबाबतचे बहुतांशी अटी-शर्ती शिथिल केल्यानंतर हॉटेलही सुरू होण्याची आशा होती. त्यामुळे एक सप्टेंबरपासूनच्या नव्या नियमात हॉटेल सुरू करण्याची सवलत मिळेल का, याची उत्सुकता आहे. परंतु, गणेशोत्सव संपेपर्यंत हॉटेलला परवानगी मिळण्याची शक्‍यता नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यावरही या आठवड्याच्या आढावा बैठकीत चर्चा होणार आहे.

राज्यात बरे झालेल्या रुग्णसंख्येने ओलांडला पाच लाखांचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि.२४: राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १४ हजार २१९ रुग्ण बरे झाले तर ११ हजार १५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.४७ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६८  हजार १२६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,०१५ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २१२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७४३ (२०), ठाणे- ११५ (५), ठाणे मनपा-१३२ (६), नवी मुंबई मनपा-३२९ (१), कल्याण डोंबिवली मनपा-१९२ (१), उल्हासनगर मनपा-१५ (१६), भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-७४ (४), पालघर-४६, वसई-विरार मनपा-१२० (२), रायगड-१३८ (५), पनवेल मनपा-१३८, नाशिक-१७५ (२), नाशिक मनपा-६९९ (४), मालेगाव मनपा-४० (१), अहमदनगर-२७० (७),अहमदनगर मनपा-१२८ (२), धुळे-२२२ (४), धुळे मनपा-११४ (२), जळगाव-५३९ (१५), जळगाव मनपा-११० (३), नंदूरबार-११८, पुणे- ३८२ (४), पुणे मनपा-११०७ (१६), पिंपरी चिंचवड मनपा-८१५ (४), सोलापूर-३१० (९), सोलापूर मनपा-५७ (१), सातारा-४४६ (१०), कोल्हापूर-४२६ (७), कोल्हापूर मनपा-२४३, सांगली-१५२ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-२७२ (३), सिंधुदूर्ग-६१, रत्नागिरी-९६ (२), औरंगाबाद-१६३ (४),औरंगाबाद मनपा-१७८ (२), जालना-३३ (१), हिंगोली-५, परभणी-२० (१), परभणी मनपा-३०, लातूर-५६ (४), लातूर मनपा-२८ (३), उस्मानाबाद-२०२ (१),बीड-१३८ (७), नांदेड-९४ (२), नांदेड मनपा-७३ (२), अकोला-३९, अकोला मनपा-८, अमरावती-४४, अमरावती मनपा-९४, यवतमाळ-६२, बुलढाणा-६२, वाशिम-५३ (१), नागपूर-१७८ (३), नागपूर मनपा-४७८ (१५), वर्धा-५, भंडारा-१६ (१), गोंदिया-४० (२), चंद्रपूर-१६, चंद्रपूर मनपा-३१ (१), गडचिरोली-५, इतर राज्य २४ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील      

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३७,०९६) बरे झालेले रुग्ण- (१,११,०८२), मृत्यू- (७४४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,२६७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२३,४९९), बरे झालेले रुग्ण- (१,००,५७०), मृत्यू (३५९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,३३५)

पालघर: बाधित रुग्ण- (२३,६५९), बरे झालेले रुग्ण- (१६,४५५), मृत्यू- (५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६४८)

रायगड: बाधित रुग्ण- (२६,८१२), बरे झालेले रुग्ण-(२१,०३१), मृत्यू- (६८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३४७८), बरे झालेले रुग्ण- (१८५३), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५००)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (९३६), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०१)

पुणे: बाधित रुग्ण- (१,५२,५११), बरे झालेले रुग्ण- (१,०५,६८१), मृत्यू- (३७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३,०६५)

सातारा: बाधित रुग्ण- (१०,००१), बरे झालेले रुग्ण- (६०२१), मृत्यू- (३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६७८)

सांगली: बाधित रुग्ण- (९३२८), बरे झालेले रुग्ण- (५४५१), मृत्यू- (३०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५७३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१८,२००), बरे झालेले रुग्ण- (१०,८१७), मृत्यू- (४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९००)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१७,२००), बरे झालेले रुग्ण- (१२,१९६), मृत्यू- (६९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१०)

नाशिक: बाधित रुग्ण- (३२,७७८), बरे झालेले रुग्ण- (२१,५३६), मृत्यू- (७६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,४६८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६,८३०), बरे झालेले रुग्ण- (१३,०५९), मृत्यू- (२३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५३५)

जळगाव: बाधित रुग्ण- (२२,६९८), बरे झालेले रुग्ण- (१५,३७६), मृत्यू- (७६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५५४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१८३८), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७०)

धुळे: बाधित रुग्ण- (६७३५), बरे झालेले रुग्ण- (४६५५), मृत्यू- (१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,९९६), बरे झालेले रुग्ण- (१४,९०७), मृत्यू- (६००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४८९)

जालना: बाधित रुग्ण-(३९१६), बरे झालेले रुग्ण- (२२९०), मृत्यू- (१२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०४)

बीड: बाधित रुग्ण- (४१६९), बरे झालेले रुग्ण- (२३२०), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१७५५)

लातूर: बाधित रुग्ण- (६६७४), बरे झालेले रुग्ण- (३६५२), मृत्यू- (२३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८७)

परभणी: बाधित रुग्ण- (२११०), बरे झालेले रुग्ण- (८००), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२४२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१२६८), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७९)

नांदेड: बाधित रुग्ण- (५३४२), बरे झालेले रुग्ण (२५७०), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६११)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५१६८), बरे झालेले रुग्ण- (२९३७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०२)

अमरावती: बाधित रुग्ण- (४४०२), बरे झालेले रुग्ण- (३२४६), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४६)

अकोला: बाधित रुग्ण- (३५२८), बरे झालेले रुग्ण- (२८६७), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१२)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (१०८४), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२८३०), बरे झालेले रुग्ण- (१७८९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२५५५), बरे झालेले रुग्ण- (१७९६), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९५)

नागपूर: बाधित रुग्ण- (२०,३२४), बरे झालेले रुग्ण- (११,०३२), मृत्यू- (५२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७६९)

वर्धा: बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३३३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३८)

भंडारा: बाधित रुग्ण- (७३८), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०५४), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१४३८), बरे झालेले रुग्ण- (८७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५९०), बरे झालेले रुग्ण- (५२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८७)

एकूण: बाधित रुग्ण-(६,९३,३९८) बरे झालेले रुग्ण-(५,०२,४९०),मृत्यू- (२२,४६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,६८,१२६)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २१२ मृत्यूंपैकी १६४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २९ मृत्यू  हे ठाणे ११, अहमदनगर- ८, औरंगाबाद -३, जळगाव -२, नाशिक -२, पुणे -२ आणि परभणी -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

कवयित्री बहिणाबाईंच्या स्मारकासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करणार

0

जळगाव दि. 24 – कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या जन्मभूमीचा (आसोदा) मी जनसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाजसुधारक होत्या. असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.कवयित्री बहिणाबाईंच्या जयंतीनिमित्त आसोदा येथील बहिणाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री उपस्थितांशी बोलत होते.पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले, बोली भाषेतील बहिणाबाईंच्या कविता, गाणी सर्वव्यापी व सर्वस्पर्शी आहेत. निसर्ग, शेतकरी, शेती, स्त्रियांच्या व्यथा, विनोद, अध्यात्म अशा सर्व विषयांना त्यांनी कवितेतून जगासमोर मांडले. बहिणाबाई या समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांनी कवितेच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे काम केले. त्या खर्‍या अर्थाने समाज सुधारक होत्या. असेही पालकमंत्री यांनी आवर्जून सांगितले.बहिणाबाईंची जन्मभूमी असणारे आसोदा हे गाव माझ्या मतदारसंघात असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. पालकमंत्री झाल्यानंतर बहिणाबाईंच्या स्मारकाच्या कामाला गती देणार तोच कोरोनाची आपत्ती आली. असे असले तरी आपण बहिणाबाईंच्या स्मारकासाठी लवकरच दोन कोटी रूपयांची तरतूद करणार असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली. आसोदेकरांना आपण जी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते.त्यापैकी अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत. गावासाठी आपण नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी कटिबद्ध असून योजना लवकरच पूर्ण होणार असल्याची ग्वाहीही ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर भादली गावाकडे जाणार्‍या चौकातील वाढीव काम करण्याच्या सूचनाही त्यांनी कंत्रादाराला दिल्या.या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच श्रीमती नबाबाई बिर्‍हाडे, तुषार महाजन, बहिणाबाई स्मारक समिती अध्यक्ष किशोर चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप भोळे, सदस्य संजीव पाटील, योगेश वाणी, रविकांत चौधरी, ग्रा. पं. सदस्य अनिल महाजन, संजय भोळे, खेमचंद महाजन, संजय बिर्‍हाडे, सुभाष महाजन,सचिन चौधरी, रमाकांत कदम, उमेश बाविस्कर,जितेंद्र भोळे तसेच बहिणाबाई महिला मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या.

कोरोना सोबतच इतर बाबींवर मनपा यंत्रणांनी लक्ष केंद्रीत करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २४ : शासन पालिकांच्या पाठीशी आहे पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे तितकेच गरजेचे आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले. तसेच  पावसाळीआजार, खड्डे, रस्ते, कचरा या इतर बाबींवरही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते.

या बैठकीस नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदीप व्यास, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर, कल्याण-डोंबिवली आयुक्त विजय सूर्यवंशी, आदींनी मनपा क्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे  सादरीकरण केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते, हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणावर  सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु हे करत असताना आपल्याला कायम सतर्क रहावे लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियमांचे नागरिकांनी पालन करावे. कायम सतर्क राहावे.  तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आपल्या सर्वांना  मास्कचा नियमित वापर करावाच लागणार आहे.  वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे.

पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ठाणे, मुंबईला लागून आहे. गेले काही महिने सातत्याने कोरोनावर लक्ष दिले गेले परंतू आता आपल्याला इतर बाबींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आगामी काळात विविध धर्मियांचे सण असल्याने पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे. सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.  शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असेही त्यांनी सागितले.

कोरोना बरा झाल्यानंतर रुग्णांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर असतो हे लक्षात ठेवुन रुग्णांवर उपचार करावे. तसेच कोरोना रुग्णावर उपचार करताना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक औषधोपचार टाळण्यावर भर देण्यात यावा. कोरोना बरा झालेल्या रुणांशी यंत्रणांनी एक महिना संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.

दिवसेंदिवस कोरोनाची लक्षणे बदलत आहेत. लक्षणे विरहीत रुग्णांवर बारकाईने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले. यंत्रणेचे तीन भागात विभाजन आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृती करण्यावर भर द्यावा. पोलिस व महानगरपालिकांनी ट्रॅकिंग व ट्रेसिंगवर भर द्यावा. चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवावी. रुग्णाला व्हेंटीलेटरपेक्षा ऑक्सीजनची आवश्यकता आहे. रुग्ण बरा होईपर्यंत ऑक्सीजनची व्यवस्था करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कोरोना उपचाराबाबत  शंका असल्यास टास्क फोर्सला शंका विचारावी असेही त्यांनी सांगितले. सर्व मनपांच्या मागे शासन ठाम व खंबीरपणे उभे आहे.  मात्र प्रयत्नांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करुन प्रत्येक मनपाने कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करावे असे त्यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची आवश्यकता आहे. कोरोनावर औषध नाही म्हणून लोक घाबरत आहेत. डॉक्टर-रुग्ण-औषधे यांची गाठ वेळेत होणे आवश्यक आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि योग्य उपचार यांचा वापर करावा. जनतेमध्ये कोरोनाविषयी आजही गैरसमज आहेत. त्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करुन हे संक्रमण नियंत्रणात ठेवायचे आहे. प्रयत्न करताना स्वत:ची व कुटुंबाचीही काळजी घ्या, असे शेवटी मुख्यमंत्री यांनी आवाहन केले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळ्यांच्या मेहनतीचे यश दिसते आहे. यंत्रणांनी आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधावा. मिशन बिगिन अगेनमध्ये आपण सुरुवात करीत आहेत. त्यासाठी निर्जंतुकीकरण आणि टेस्टिंगवर भर देण्यात यावा. जनजागृती करतांना स्वत:च डॉक्टर न बनता अधिकृत डॉक्टरांवर विश्वास ठेवावा यावर भार द्यावा असे सांगितले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तळागाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खूप महत्त्वाचे काम केले आहे. मुंब्रा विभागात कोरोनाचे काम खूप चांगले झाले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे.  कळव्यामध्ये सुसज्ज सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे मुंबई व ठाणे विभागात कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मादान करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणेकरांनी गाफील राहून चालणार नाही. अदृश्य शत्रूशी आपली लढाई सुरु आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले असून ते 1:20 प्रमाण केले आहे. फिव्हर क्लिनिक, मोबईल क्लिनिक, जम्बो सुविधा उभारण्यात आल्या आहेत.  रुग्ण वाहिकांच्या संख्या वाढविण्यात आल्या आहेत, टेस्टची संख्या वाढविण्यात आल्या आहेत, जिल्हा रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या आहेत.  एमएमआरमध्ये मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे.  या सुविधांच्या गुणवत्ता व दर्जा यावर भर देण्यात आलेला आहे.  त्यामुळे नागरिकांची पसंती मिळते आहे, असेही ते म्हणाले.

कळवा येथे म्हाडाच्या सहकार्याने उभारलेल्या 1100 बेडच्या कोरोना सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले.  याशिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 20 रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

टायटनच्या आयप्लसच्या नवीन अँटी-फॉग लेन्सेस डोळ्यांना देतात आराम आणि सुस्पष्ट दृष्टी

0

आजाराच्या साथीमुळे एकंदरीत मानवी जीवनात प्रचंड उलथापालथ घडून आली आहे.  सोशल डिस्टंसिंगसॅनिटायझिंग हे शब्द आता आपणां सर्वानाच सवयीचे झालेत आणि मास्क तर जणू आपल्या चेहऱ्याचा भाग बनलाय. 

गेल्या काही महिन्यांपासून चष्मा वापरणाऱ्यांना एका नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे – मास्क घातल्यानंतर प्रत्येक वेळी चष्म्याच्या काचांवर साठणारे धुके.  चष्म्याच्या काचा अशा धुरकट होणे ही बाब जितकी कटकटीची तितकीच धोकादायक देखील आहे.  पायऱ्या चढतानावाहन चालवताना किंवा अगदी रस्त्यावरून चालताना देखील चष्म्यावर येणाऱ्या या धुक्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.  काचा धुरकट झाल्यामुळे एक जरी पाऊल चुकले तरी ते फार महागात पडू शकते.  दुसरीकडे या समस्येवर काही उपाय नसल्यामुळे चष्मा वापरणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. 

भारतातील सर्वात आघाडीचा आयवेअर ब्रँड टायटन आयवेअरने ही समस्या ओळखून वेळीच ती सोडवण्यासाठी अँटी-फॉग लेन्सेसची नवी श्रेणी सादर केली आहे.

नवीन प्रकारच्या लेन्सेसचे महत्त्व सांगताना टायटन कंपनी लिमिटेडच्या आयवेअर डिव्हिजनचे सीईओ                  श्री. सौमेन भौमिक यांनी सांगितले, “अशाप्रकारच्या लेन्सेस असल्या पाहिजेत हे आम्हाला आधीच जाणवले होते पण त्यावेळी असेही वाटले होते की कोविड लवकरच निघून जाईल.  पण आता अशी चिन्हे आहेत की आपल्याला पुढचा बराच काळ मास्क घालावेच लागतील आणि त्यामुळे आम्ही ही अतिशय गरजेची अशी सुविधा सादर करत आहोत.  आमच्या या अँटी-फॉग लेन्सेसमुळे चष्म्याच्या काचांवर धुके साठण्याचे प्रमाण नक्कीच कमीत कमी होईल आणि तुम्हाला सुस्पष्ट दिसू लागेलच शिवाय डोळ्यांना आराम देखील मिळेल.

धुके विरहीतसुस्पष्ट दृष्टी मिळवून देण्याबरोबरीनेच अँटी-फॉग लेन्सेसमध्ये अँटी-रिफ्लेक्टीव्ह व ब्ल्यू फिल्टर कोटींग हे फायदे देखील मिळतात.

मास्कच्या आड सुरक्षित राहून आपापली कामे करण्यासाठी आपण सर्वजण बाहेर पडत आहोतअशावेळी आपली दृष्टी सुस्पष्ट असणे आवश्यक आहे.  अशी सुस्पष्ट दृष्टी व डोळ्यांना आराम मिळवून देणाऱ्या             अँटी-फॉग लेन्सेस टायटन आयप्लसच्या सर्व स्टोर्समध्ये तसेच https://www.titaneyeplus.com/ या वेबसाईटवर ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत.  यांच्या किमती सहज परवडण्याजोग्या १८४९ रुपयांपासून पुढे आहेत.

टायटन आयप्लस

टायटन आयप्लस ही भारतातील आघाडीची ऑप्टिकल रिटेल शृंखला असून २३० छोट्या-मोठ्या शहरांमध्ये त्यांची ५८० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.  टायटनफास्ट्रॅकरेबॅनवोगओकलेटॉमी हिलफिगर तसेच कार्टिअरडीओर यासारखे प्रीमियम ब्रँड्स अशा ४० पेक्षा जास्त ब्रँड्सच्या १००० पेक्षा जास्त फ्रेम्स व सनग्लासेस याठिकाणी उपलब्ध असतात.  प्रत्येक प्रिस्क्रिप्शन पॉवर आणि जीवनशैलीशी संबंधित गरजांनुसार लेन्सेसची आपल्या आवश्यकतेप्रमाणे बनवून घेता येईल अशी श्रेणी देखील टायटन आयप्लस स्टोअर्समध्ये मिळते.  ५९९ रुपयांपासून पुढे स्टायलिश फ्रेम्स३९५ रुपयांपासून किमतीच्या उत्तम दर्जाच्या लेन्सेस यामुळे टायटन आयप्लस हे सर्व प्रकारच्या बजेटच्या ग्राहकांसाठी हमखास शॉपिंग डेस्टिनेशन बनले आहे.  बॉश अँड लॉम्बअल्कोन सिबा व्हिजन आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस देखील याठिकाणी आहेत. 

सतत नाविन्यपूर्ण उत्पादने सादर करण्यासाठी नावाजल्या जाणाऱ्या टायटन आयप्लसने नुकतेच ऑडिओ व्हिडिओ सनग्लासेस अनुक्रमे ३४९९ व ५९९९ रुपये इतक्या माफक किमतींना सादर केले.  क्लिअरसाईट लेन्सेसच्या रूपाने टायटनने लेन्स तंत्रज्ञानामध्ये अजून एक क्रांती घडवून आणली.  युएसच्या कोल्टस लॅबोरेटरीच्या परीक्षणानुसार या लेन्सेसची सुस्पष्टता व टिकून राहण्याची क्षमता अतुलनीय आहे.  फ्लिप-ऑन हे आणखी एक क्रांतिकारी उत्पादन टायटन आयप्लसने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करवून दिले आहे,  यामध्ये चष्मा व सनग्लासेस हे एकाच आयवेअरमध्ये मिळतात.  ऑप्टोमेट्रीस्टसकडून संपूर्णतः बिनचूक डोळे तपासणी मोफत करवून दिली जाणे आणि पुरस्कार-प्राप्त ग्राहक सेवा ही टायटन आयप्लसची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.   

राज्यात आज १० हजार ४४१ नवीन रुग्णांचे निदान :सध्या १ लाख ७१ हजार ५४२ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.२३ : राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५५ टक्के असून आज ८ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ८८ हजार २७१ रुग्ण बरे झाले आहेत. आज १० हजार ४४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ७१  हजार ५४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १०,४४१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २५८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९९१ (३४), ठाणे- १५० (१), ठाणे मनपा-१४३ (४), नवी मुंबई मनपा-३४८ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१५, उल्हासनगर मनपा-१३ (७), भिवंडी निजामपूर मनपा-१५ मीरा भाईंदर मनपा-११२ (३), पालघर-२११ (२), वसई-विरार मनपा-१३७ (१), रायगड-१९७ (२), पनवेल मनपा-१३८, नाशिक-२२६ (३), नाशिक मनपा-१२२ (७), मालेगाव मनपा-३८ (२), अहमदनगर-२६६ (९),अहमदनगर मनपा-२३१ (३), धुळे-२०, धुळे मनपा-३४ (४), जळगाव-४८७ (२), जळगाव मनपा-१४० (२), नंदूरबार-११९, पुणे- ५६९ (११), पुणे मनपा-१२८८ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-६७९ (१६), सोलापूर-२७६ (५), सोलापूर मनपा-४० (१), सातारा-२५३ (७), कोल्हापूर-३४३ (१२), कोल्हापूर मनपा-१७९ (१), सांगली-१५० (६), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७५ (५), सिंधुदूर्ग-० (१), रत्नागिरी-३६ (२), औरंगाबाद-३६ (३),औरंगाबाद मनपा-३४ (४), जालना-९० (३), हिंगोली-६४, परभणी-३२, परभणी मनपा-५४ (१), लातूर-१०५ (५), लातूर मनपा-४१ (१), उस्मानाबाद-१८३ (४),बीड-८१ (५), नांदेड-४९ (१), नांदेड मनपा-१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-६, अमरावती-३३, अमरावती मनपा-३६ (१), यवतमाळ-५९ (२), बुलढाणा-६१, वाशिम-३३, नागपूर-१३८, नागपूर मनपा-६८० (२२), वर्धा-१६, भंडारा-१४ (१), गोंदिया-२२, चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-३५, गडचिरोली-१४, इतर राज्य १६.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख १६ हजार ७०४ नमुन्यांपैकी ६ लाख ८२ हजार ३८३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ३० हजार ९८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२६ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील  

मुंबई: बाधित रुग्ण- (१,३६,३५३) बरे झालेले रुग्ण- (१,१०,०५९), मृत्यू- (७४२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,५६७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२२,६२६), बरे झालेले रुग्ण- (९८,६९३), मृत्यू (३५६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,३७२)

पालघर: बाधित रुग्ण- (२३,४९३), बरे झालेले रुग्ण- (१६,०८५), मृत्यू- (५५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८५४)

रायगड: बाधित रुग्ण- (२६,५३६), बरे झालेले रुग्ण-(२०,६९३), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५८)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३३८२), बरे झालेले रुग्ण- (१८१८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (८७५), बरे झालेले रुग्ण- (५१०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९)

पुणे: बाधित रुग्ण- (१,५०,२०७), बरे झालेले रुग्ण- (१,०१,७४९), मृत्यू- (३७४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,७१७)

सातारा: बाधित रुग्ण- (९५५५), बरे झालेले रुग्ण- (५७७०), मृत्यू- (२९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४९३)

सांगली: बाधित रुग्ण- (८९०४), बरे झालेले रुग्ण- (५२२६), मृत्यू- (२९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३८१)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१७,५३१), बरे झालेले रुग्ण- (१०,१५३), मृत्यू- (४७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९०२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१६,८३३), बरे झालेले रुग्ण- (११,९१२), मृत्यू- (६८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२३७)

नाशिक: बाधित रुग्ण- (३१,८६४), बरे झालेले रुग्ण- (२०,४४८), मृत्यू- (७४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,६६७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१६,४३२), बरे झालेले रुग्ण- (१२,४३३), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७२)

जळगाव: बाधित रुग्ण- (२२,०४९), बरे झालेले रुग्ण- (१४,८८८), मृत्यू- (७५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४११)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७२०), बरे झालेले रुग्ण- (९८०), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८०)

धुळे: बाधित रुग्ण- (६३९९), बरे झालेले रुग्ण- (४४७३), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४२)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२०,६५५), बरे झालेले रुग्ण- (१४,२३९), मृत्यू- (५९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२२)

जालना: बाधित रुग्ण-(३८८३), बरे झालेले रुग्ण- (२२३९), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२३)

बीड: बाधित रुग्ण- (४०३१), बरे झालेले रुग्ण- (२१९८), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४६)

लातूर: बाधित रुग्ण- (६५९०), बरे झालेले रुग्ण- (३५३५), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८२७)

परभणी: बाधित रुग्ण- (२०६०), बरे झालेले रुग्ण- (७४३), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१२६३), बरे झालेले रुग्ण- (९१७), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)

नांदेड: बाधित रुग्ण- (५१७५), बरे झालेले रुग्ण (२३५०), मृत्यू- (१५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६८)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (४९६६), बरे झालेले रुग्ण- (२७२८), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११०)

अमरावती: बाधित रुग्ण- (४२६४), बरे झालेले रुग्ण- (२९२२), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३२)

अकोला: बाधित रुग्ण- (३४८१), बरे झालेले रुग्ण- (२८४३), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१४०७), बरे झालेले रुग्ण- (१०१८), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६५)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२७६८), बरे झालेले रुग्ण- (१७२१), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९७९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२४९३), बरे झालेले रुग्ण- (१६८१), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४८)

नागपूर: बाधित रुग्ण- (१९,६६८), बरे झालेले रुग्ण- (१०,४०८), मृत्यू- (५०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७५५)

वर्धा: बाधित रुग्ण- (५७९), बरे झालेले रुग्ण- (३००), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६६)

भंडारा: बाधित रुग्ण- (७२२), बरे झालेले रुग्ण- (४५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१४), बरे झालेले रुग्ण- (७२३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (८५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५८५), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६२९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६५)

एकूण: बाधित रुग्ण-(६,८२,३८३) बरे झालेले रुग्ण-(४,८८,२७१),मृत्यू- (२२,२५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,७१,५४२)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २५८ मृत्यूंपैकी २१३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू  हे अहमदनगर-९, ठाणे-६, पुणे-२, नाशिक-२, जालना-१, नांदेड-१, कोल्हापूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

रोहा तांबडी प्रकरणात चौकशी पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र – गृहमंत्री अनिल देशमुख

0

अलिबाग,जि.रायगड दि.24 :- रोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले.

मौजे तांबडी, तालुका रोहा येथील पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आले असताना बोलत होते.

यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

0


पुणे दि.२४:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्या करीता २०% बीज भांडवल योजनेचे ६० व थेट कर्ज योजनेचे १०० भौतिक उद्दिष्टव प्राप्त झाले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकाने दिली आहे.
२०% बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविली जाते. यासाठी प्रकल्प मर्यादा ५ लाख आहे. यात महामंडळाचा हिस्सा २०% व बँकेचा हिस्सा ७५% असून लाभार्थीचा सहभाग ५% आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष व संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबिवली जाते. त्याची मर्यादा एक लाख आहे. या योजनेत नियमित कर्ज फेड़ करणान्यांना व्याज आकारले जात नाही थकीत राहिल्यास ४% व्याज आकारले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष आणि सिबील क्रेडीट स्कोर किमान ५०० इतका असावा. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख पर्यंत असावे शासनाच्या कौशल्य विकासामार्फत तसेच शासकीय/ निमशासकीय संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतले त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळ जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे पता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र बी, स नं.१०४ /१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे-४११००६ फोन-०२०-२९५२३०५९
००००