Home Blog Page 2470

अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येथील यासंदर्भात कुलगुरूंची समिती गठीत – उदय सामंत

0

मुंबई, दि. २९ : विद्यार्थ्यांना कोणत्याही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही याची विशेष काळजी घेऊन सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठीत करण्यात आली आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संगितले.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात  झूमच्या माध्यमातून 13 अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरू सोबत ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

श्री.सामंत म्हणाले, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठांनी  एका समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का? याबद्दलही विचार करावा, अशा सूचना श्री.सामंत यांनी दिल्या.

श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांची परिक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन   कमीत कमी संसाधनामध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी आज कुलगुरुंची एक समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर उद्या दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता बैठक घेऊन आपला अहवाल सादर करावा. समितीच्या निर्णयानंतर मा.राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही श्री.सामंत यांनी सांगितले. बैठकीत गोवा, दिल्ली, मध्यप्रदेश, बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा  घेण्यात आला.

या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,  विभागाचे अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ.धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे-पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

0

पुणे दि.29- पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी केले.
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्लाझ्मादाता गौरव कार्यक्रम पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे आदी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे मो.नं.9960530329 या व्हॉटस्अपवर मेसेजव्दारे प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी. पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे यांनी हे चांगले व्यासपीठ तयार केले आहे. बोलणारे भरपूर बोलतात पण आपण सर्व प्लाझ्मादान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद आहे. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. ज्यांना ज्यांना प्लाझ्माची गरज आहे त्यांना ते देण्यासाठीच आपण हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असेही ते म्हणाले.
यावेळी प्लाझ्मा दाते करण रणदिवे, मोहिम नलावडे, राहुल तुपे, वैभव लोढा, अजय मुनोत, राहुल लंगर,जमीर शेख, अवधुत दिवटे, वैभव भाकन, कुणाल तोडी, मोहित तोडी यांना पोलीस आयुक्त डॉ.व्यंकटेशम यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, आपण सर्वांनी सगळया शंका-कुशंकांवर मात करुन अनेकवेळा प्लाझ्मा दान केले आहे. तुमची ही कृती फार महत्त्वाची असून एखाद्याचा जीव वाचविणे हे एक मोठे काम आहे. तुमच्या मनात जागृत झालेली ही भावना अशीच पुढे चालू राहून समाजात एक मोठी चळवळ झाली पाहिजे. ही मोहीम शहराबरोबरच ग्रामीण भागातही राबवावी. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्लाझ्मा दाते अजय मुनोत, राहुल लंगर, वैभव भाकन व प्लाझ्मा स्वीकारणारे संदिप सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले.
पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी पुणे शहर पोलीस विभागाने प्लाझ्मा थेरपी हा चांगला उपक्रम हाती घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केलेल्या आवाहनामुळे 405 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक रुग्णाने मदतीचा हात पुढे करुन प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. यामुळे प्लाझ्मा दाता एक मोठी चळवळ होऊ शकेल. उपस्थितांचे सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आभार मानले.
यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्लाझ्मा दाते व प्लाझ्मा स्वीकारलेल्या रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 54 हजार 274

0

पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
विभागात कोरोना बाधित 2 लाख 21 हजार 818 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.29 :- पुणे विभागातील 1 लाख 61 हजार 610 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 818 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 54 हजार 274 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 934 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 60 हजार 455 रुग्णांपैकी 1 लाख 23 हजार 595 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 63 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.3 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 218 रुग्णांपैकी 6 हजार 787 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 74 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 121 रुग्णांपैकी 12 हजार 624 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 781 आहे. कोरोनाबाधित एकूण 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 293 रुग्णांपैकी 5 हजार 656 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 731 रुग्णांपैकी 12 हजार 948 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 654 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 612 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 611, सातारा जिल्ह्यात 575, सोलापूर जिल्ह्यात 268, सांगली जिल्ह्यात 463 तर कोल्हापूर जिल्ह्यात 695 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 18 हजार 428 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 21 हजार 818 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 28 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

माजी खासदार संजय काकडे यांचा अदभूत, थक्क करणारा प्रवास!

0

भाजी विक्रेता ते उद्योजक आणि पुढे राज्यसभेचे खासदार असा अद्भूत प्रवास आहे तो संजय काकडे यांचा. सर्वांनाच थक्क करणारी ही वाटचाल आहे ती ‘झिरो ते हिरो’!

महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे संजय काकडे. संजय काकडे 2014 मध्ये राज्यसभेवर बिनविरोध खासदार झाले. राज्यसभेच्या इतिहासात नोंद झालेली ही घटना आहे. कोणत्याही पक्षाचा सदस्य नसलेली आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती बिनविरोध निवडून जाण्याची ती पहिलीच वेळ होती. राज्यसभेवर गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानंतर  संजय काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. ते भाजपाचे सहयोगी सदस्य देखील झाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयासमर्थनार्थ देशातील पहिली रॅली संजय काकडे यांनी पुण्यात काढली. यामध्ये 80 हजार पुणेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

राजकारणातील संजय काकडे यांची खरी ओळख झाली ती फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार संजय काकडे यांच्यावर पुणे महापालिकेची जबाबदारी टाकली. पुणे महापालिकेच्या इतिहासात भाजपाला कधीही महापालिकेवर झेंडा फडकावता आला नव्हता. भाजपाचे जेमतेम 25 नगरसेवक निवडून यायचे. अशा परिस्थितीत माजी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही गाजावाजा न करता स्वतःचे नेटवर्क आणि राजकीय कौशल्य, मुत्सद्देगिरीच्या जोरावर पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

संजय काकडे म्हणजे राजकीय गणितं, आकडेवारी, मतांची गोळाबेरीज वॉर्डनिहाय संपूर्ण तपशीलासह खडा न खडा माहिती असलेला नेता. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीवेळी निकालाअगोदर वाडेश्वर कट्ट्यावर त्यांनी वर्तवलेला निवडणूक निकालाचा अंदाज तंतोतंत बरोबर आला. यावेळी त्यांनी भाजपाला 92 हून अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवताना, अंदाज चुकला तर, राजकीय संन्यास घेईल असे विधान केले होते आणि ते प्रचंड गाजले होते. भाजपाला मित्रपक्षांसह 98 जागा मिळाल्या. पोलीस आणि सर्व राजकीय पंडितांचे अंदाज भाजपाला सुमारे 50 जागा मिळतील असा असताना संजय काकडे यांचा अंदाज तंतोतंत बरोबर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राजकारणासंबंधी सहज घेतले जाणाऱ्या संजय काकडे यांना या निकालानंतर मात्र गांभिर्याने घेतले जाऊ लागले.

पुढे लोकसभा व विधानसभा निवडणूक 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुणे लोकसभा व शहरातील शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, कोथरुड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या विजयासाठीची दिलेली जबाबदारी संजय काकडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

पुणेकरांप्रती विशेष आस्था व प्रेम असलेल्या संजय काकडे यांनी समान पाणीपुरवठा योजनेतील टेंडर प्रकरणातील त्रुटी सउदाहरण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेस आणून दिल्या. त्यानंतर फडणवीस यांनी तत्काळ पुन्हा टेंडर काढण्यासंबंधी आदेश दिले होते. संजय काकडे यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यासू वृत्तीमुळे पुणे महापालिकेचे म्हणजेच पुणेकरांचे तब्बल 800 कोटी रुपये वाचले होते.

घोरपडी पेठेत हालाखीच्या परिस्थितीत माजी खासदार काकडे यांचे बालपण गेले. एका शिक्षकाच्या घरात जन्म घेतलेल्या संजय काकडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांची वाटचाल पाहिली तर, या माणसात तुम्हाला प्रचंड कष्ट करण्याची ताकद, जिद्द, चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास आणि सढळ हाताने मदत करणारा व जिवाला जीव लावणारा माणूस दिसेल. मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक केल्याने संजय काकडे यांच्या उद्योगाची वाढ झपाट्याने झाली.

1986 मध्ये त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल टाकले आणि ‘संजय काकडे ग्रुप’ची मुहुर्तमेढ रोवली गेली. रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारा विश्वसनीय ब्रँड म्हणून आज ‘संजय काकडे ग्रुप’ची ओळख आहे. येणाऱ्या नजीकच्या काळात भूगाव येथे 150 एकरमध्ये टाऊनशीप, कोंढवा परिसरात 250 एकरामध्ये टाऊनशीप, कोथरुडला 25 एकरमध्ये काकडे सिटी, बाणेर रस्त्यावर कमर्शिअल प्रोजेक्ट, कोरेगाव पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल इत्यादी अनेक प्रकल्प  होत आहेत.

राज्यसभेचे खासदार असताना खासदार निधीचा खर्च करताना संजय काकडे यांनी दाखविलेली दूरदृष्टी आणि संवेदनशीलता त्यांच्यातील दृष्ट्या व सहृदयी नेत्याची जाणीव करून देते. लातुर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त 37 गावांमध्ये केलेली जलसंधारणाची कामे असोत की शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक इत्यादी क्षेत्रातील कामे; हे त्याचेच निदर्शक आहे.

महाराष्ट्रात 2016 मध्ये दुष्काळाने परिसीमा गाठली होती. मराठवाड्यातील अवस्था तर, इतर भागांपेक्षा भयानक होती. लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली होती. दररोजची वृत्तपत्रं व वृत्तवाहिन्या याच बातम्यांनी भरलेली असायची. हे सर्व पाहिल्यावर व वाचल्यावर खासदार संजय काकडे यांचे हृदय हेलावून गेले. खासदार काकडे यांनी लातूर आणि मराठवाड्यातील आपल्या काही सहकाऱ्यांशी संपर्क केला आणि दुसऱ्याच दिवशी थेट मराठवाडा गाठला. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व शेतकरी चळवळीतील अनुभवी नेते पाशा पटेल आणि कृषी व जलसंधारण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या मदतीने खासदार काकडे यांनी लातुर जिल्ह्यातील औसा तालुका व परिसरातील 37 गावात सुमारे 1 कोटी 75 लाख रुपयांची कामे केली. यामध्ये तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण, बांध-बंदिस्ती करणे इत्यादी अनेक कामे करण्यात आली. या गावांना तत्कालिन राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी भेट देऊन सर्व कामे स्वतः पाहिली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर झालेल्या पावसाने हे तलाव व नाले पाण्याने तुडुंब भरले. आणि गावांचा पाचवीला पुजलेला दुष्काळ हटला.

खासदार फंडातून संजय काकडे यांनी राज्यातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, बीड, औरंगाबाद, धुळे, परभणी जिल्ह्यांमधील विविध मतदार संघातील वर्ग खोल्या बांधण्यासाठी, शैक्षणिक साहित्य व संगणक खरेदीसाठी मदत केली. त्याबरोबरच रुग्णवाहिका दिल्या. रस्ते बांधण्यासाठी, पिण्याच्या पाण्याच्या योजना व विद्युतीकरणाच्या विकास कामांना त्यांनी निधी दिला. उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठीची विरंगुळा केंद्र, समाज मंदिरे, सभामंडप व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधी दिला आहे.

उद्योग क्षेत्राबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या पटलावर संजय काकडे यांचे नाव आदराने घेतले जात आहे ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून जाती-धर्माच्या भिंती तोडून सर्वांच्या मदतीला धावणारा नेता म्हणून सर्व पक्ष व जाती-धर्मातील लोक संजय काकडे यांचा विशेषत्वाने उल्लेख करतात.

पुणे महापालिकेची निवडणूक आता जवळ आली असून संजय काकडे यांच्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मागच्या निवडणुकीवेळी संजय काकडे यांनी केलेली कमाल यावेळी देखील ते करणार का? म्हणून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

माजी खासदार संजय काकडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांची वाटचाल याहून अधिक दैदीप्यमान होवो. महाराष्ट्र व देशाच्या नवनिर्माणामध्ये त्यांच्या हातून सत्कार्य व सत्कर्म घडो, याच मन:पूर्वक शुभेच्छा!

राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री

0

मुंबई दि.28- राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील जिम चालकांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जिम सुरु करताना कोरोनाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून शासनास सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबईतील जिम चालकांचे प्रतिनिधी महेश गायकवाड, निखिल राजपुरिया, करन तलरेजा, हेमंत दुधवडकर, गुरुजितसिंग गांधी, योगिनी पाटील, साईनाथ दुर्गे, रमेश गजरीया, मनोज पाटील उपस्थित होते.

राज्यात आज १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान

0

मुंबई, दि.२८: राज्यात आज ११ हजार ६०७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६२ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८०  हजार ७१८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १४,३६१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३३१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-१२१७ (३०), ठाणे- २१८ (१), ठाणे मनपा-२०९ (७), नवी मुंबई मनपा-४२७ (९), कल्याण डोंबिवली मनपा-२४३ (८), उल्हासनगर मनपा-२० (२), भिवंडी निजामपूर मनपा-२८ (१), मीरा भाईंदर मनपा-१६६ (४), पालघर-१२० (४), वसई-विरार मनपा-११२ (२), रायगड-२५३ (६), पनवेल मनपा-२८३, नाशिक-१९५ (१५), नाशिक मनपा-४९१ (१२), मालेगाव मनपा-३६ (२), अहमदनगर-३७२ (१),अहमदनगर मनपा-१७२ (२), धुळे-९५ (४), धुळे मनपा-११६ (५), जळगाव- ४७८ (९), जळगाव मनपा-१०५ (४), नंदूरबार-७५ (३), पुणे- ८५१ (१४), पुणे मनपा-१७९५ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१००१ (२२), सोलापूर-२९७ (९), सोलापूर मनपा-३२, सातारा-६७७ (९), कोल्हापूर-५५४ (१७), कोल्हापूर मनपा-१६९ (५), सांगली-२७० (९), सांगली मिरज कुपवाड मनपा-३४६ (१५), सिंधुदूर्ग-२० (४), रत्नागिरी-१०२ (४), औरंगाबाद-१०१ (४),औरंगाबाद मनपा-८० (८), जालना-६१ (१), हिंगोली-३६ (३), परभणी-३७ (१), परभणी मनपा-२४ (३), लातूर-७७ (५), लातूर मनपा-६९ (३), उस्मानाबाद-१३८ (२),बीड-६४ (५), नांदेड-१४२ (१), नांदेड मनपा-११४, अकोला-४५, अकोला मनपा-१७, अमरावती-२६ (४), अमरावती मनपा-७७ (४) , यवतमाळ-१०३ (२), बुलढाणा-९४ (१), वाशिम-४३ (२), नागपूर-३११ (२), नागपूर मनपा-८४८ (१९), वर्धा-३६, भंडारा-३४, गोंदिया-७८, चंद्रपूर-७५, चंद्रपूर मनपा-२६, गडचिरोली-४६, इतर राज्य १४.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३९ लाख ३२ हजार ५२२ नमुन्यांपैकी ७ लाख ४७ हजार ९९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.०२ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ०१ हजार ३४६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ९०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१८ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील    

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४२,१०८) बरे झालेले रुग्ण- (१,१४,८१८), मृत्यू- (७५६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१८), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,४०७)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२८,६८५), बरे झालेले रुग्ण- (१,०४,६२७), मृत्यू (३७०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,३४८)

पालघर: बाधित रुग्ण- (२४,६९५), बरे झालेले रुग्ण- (१७,५३०), मृत्यू- (५६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५९८)

रायगड: बाधित रुग्ण- (२८,६७९), बरे झालेले रुग्ण-(२२,१७३), मृत्यू- (७५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७५०)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३७९२), बरे झालेले रुग्ण- (२२००), मृत्यू- (१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१०७१), बरे झालेले रुग्ण- (६०३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४८)

पुणे: बाधित रुग्ण- (१,६५,५९२), बरे झालेले रुग्ण- (१,१४,०९९), मृत्यू- (३९७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६,५१९)

सातारा: बाधित रुग्ण- (१२,२०८), बरे झालेले रुग्ण- (७११९), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७६५)

सांगली: बाधित रुग्ण- (११,२५२), बरे झालेले रुग्ण- (६३६७), मृत्यू- (३८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०५)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२०,३१९), बरे झालेले रुग्ण- (१३,९४३), मृत्यू- (५८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७९२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८,३८३), बरे झालेले रुग्ण- (१३,२४०), मृत्यू- (७४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३९८)

नाशिक: बाधित रुग्ण- (३६,३४३), बरे झालेले रुग्ण- (२५,४८१), मृत्यू- (८४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,०२०)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१९,०४६), बरे झालेले रुग्ण- (१४,८६९), मृत्यू- (२७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०३)

जळगाव: बाधित रुग्ण- (२५,२११), बरे झालेले रुग्ण- (१७,२२०), मृत्यू- (८१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१७४)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२२९४), बरे झालेले रुग्ण- (१२०९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०१७)

धुळे: बाधित रुग्ण- (७३२९), बरे झालेले रुग्ण- (५०८४), मृत्यू- (२०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०३९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२२,२२४), बरे झालेले रुग्ण- (१५,७६९), मृत्यू- (६५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८०२)

जालना: बाधित रुग्ण-(४११३), बरे झालेले रुग्ण- (२६१२), मृत्यू- (१२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७३)

बीड: बाधित रुग्ण- (४४९६), बरे झालेले रुग्ण- (२७५८), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२६)

लातूर: बाधित रुग्ण- (७३८१), बरे झालेले रुग्ण- (४३२१), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८०५)

परभणी: बाधित रुग्ण- (२४०६), बरे झालेले रुग्ण- (१०४९), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१३८८), बरे झालेले रुग्ण- (१११२), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२)

नांदेड: बाधित रुग्ण- (६२७५), बरे झालेले रुग्ण (३०६८), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०१०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५५१५), बरे झालेले रुग्ण- (३३६८), मृत्यू- (१४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०००)

अमरावती: बाधित रुग्ण- (४८२२), बरे झालेले रुग्ण- (३६९६), मृत्यू- (१२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००६)

अकोला: बाधित रुग्ण- (३७३०), बरे झालेले रुग्ण- (२९३८), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४०)

वाशिम: बाधित रुग्ण- (१६०१), बरे झालेले रुग्ण- (१२६९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३१४०), बरे झालेले रुग्ण- (२०८१), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२९६४), बरे झालेले रुग्ण- (१८९१), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००२)

नागपूर: बाधित रुग्ण- (२४,७८३), बरे झालेले रुग्ण- (१३,२३९), मृत्यू- (६३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,९०२)

वर्धा: बाधित रुग्ण- (७६३), बरे झालेले रुग्ण- (४५९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७)

भंडारा: बाधित रुग्ण- (८९५), बरे झालेले रुग्ण- (५९३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८१)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१२९४), बरे झालेले रुग्ण- (७८७), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१७९०), बरे झालेले रुग्ण- (१००८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६९७), बरे झालेले रुग्ण- (५७०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४१)

एकूण: बाधित रुग्ण-(७,४७,९९५) बरे झालेले रुग्ण-(५,४३,१७०), मृत्यू- (२३,७७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,८०,७१८)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३३१ मृत्यूंपैकी २४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे ठाणे -१२, नाशिक् ८, नागपूर -५, औरंगाबाद -३, सांगली -२, धुळे – १, हिंगोली -१, कोल्हापूर -१, लातूर -१, रायगड -१ आणि सातारा – १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे. आज २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२० या कालावधीतील कोविड बाधित रुग्णांच्या रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेत  एकूण बाधित रुग्णसंख्येत ६६ रुग्णांची वाढ झाली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

साताऱ्यात पहा ,ऐका विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ….

0

पुणे- दारूची दुकाने उघडतात मग मंदिरे उघडायला काय हरकत आहे ? असा सवाल करत आज विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले .राज्यात दारूचे दुकान आणि मॉल उघडू शकतात, तर धार्मिक स्थळं सुरू करायला काहीही हरकत नाही. सर्वच राज्यात ती खुली होत आहेत. लोकंही जागरूक आहेत. त्यांनाही त्यांच्या सुरक्षेची काळजी आहे.असे हि ते म्हणाले ….

चेन्नई सुपरकिंग्स संघातील एका भारतीय खेळाडूसह 12 स्टाफ मेंबर्स कोरोना पॉझिटिव्ह?

0

आयपीएल टुर्नामेंट अखेर दुबईमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. परंतू, यापूर्वीच एक मोठी माहिती समोर आली आहे. युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप संघाकडून याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संघातील एखा भारतीय गोलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे, पण खेळाडूचे नाव कळू शकले नाही. सध्या चेन्नई संघात शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, केएम आसिफ आणि मोनू कुमार, हे भारतीय गोलंदाज आहेत.

7 दिवस क्वारंटाइनमध्ये होता संघ

दुबईमध्ये आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होत आहे. चेन्नई संघ 21 ऑगस्टलाच दुबईत पोहचला होता. यानंतर सात दिवस सर्व संघ क्वारंटाइन होता. शुक्रवारपासून संघाला सराव सुरू करायचा होता, पण आता संघातील खेळाडू आणि स्टाफमधील 12 जणांना कोरोनाचील लागण झाल्याचे समोर आल्याने सराव थोडा उशीराने सुरू होईल.

यूएईत जाण्यापूर्वी भारतीयांच्या पाच चाचण्या झाल्या होत्या

यूएईला जाण्यापूर्वी आयपीएलमध्ये भाग घेत असलेल्या भारतीय खेळाडू आणि स्टाफची पाच वेळा चाचणी झाली होती. सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच सर्वांना दुबईला पाठवले होते. परदेशी खेळाडूंनाही दुबईत येण्यापूर्वी 14 दिवस क्वारंटाइन केले होते आणि चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच दुबईला पाठवले होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 52 हजार 603

0

पुणे विभागातील 1 लाख 57 हजार 803 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात कोरोना बाधित 2 लाख 16 हजार 206 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे :- पुणे विभागातील 1 लाख 57 हजार 803 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 16 हजार 206 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 52 हजार 603 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 5 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.99 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 56 हजार 844 रुग्णांपैकी 1 लाख 21 हजार 402 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 709 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.40 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 643 रुग्णांपैकी 6 हजार 455 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 843 आहे. कोरोनाबाधित एकूण 345 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 853 रुग्णांपैकी 12 हजार 288 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 860 आहे. कोरोनाबाधित एकूण 705 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 830 रुग्णांपैकी 5 हजार 381 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 66 आहे. कोरोनाबाधित एकूण 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 36 रुग्णांपैकी 12 हजार 277 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 125 आहे. कोरोनाबाधित एकूण 634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 839 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 703, सातारा जिल्ह्यात 505, सोलापूर जिल्ह्यात 194, सांगली जिल्ह्यात 445 तर कोल्हापूर जिल्ह्यात 992 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 98हजार 657 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 16 हजार 206 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 27 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत

0

मुंबई, दि. २८ : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

परीक्षेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले,सर्व अकृषी विद्यापीठांना प्रत्यक्ष भेट देऊन कुलगुरू, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांच्याशीसुद्धा याबद्दल सविस्तरपणे चर्चा करून विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचे कसलेही खच्चीकरण होणार नाही, आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्य शासन निर्णय घेईल असेही श्री. सामंत यांनी संगितले.

श्री. सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाकडून राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव, विद्यार्थी, पालक यांची मानसिकता,कुलगुरू यांच्या सूचना आणि काही शैक्षणिक संघटनांचे निवेदन अशा सर्वांगीण परिस्थितीचा विचार करूनच परीक्षेसंदर्भात बाजू मांडण्यात आली होती.

तसेच या वर्षापासून उच्च न्यायालयाने आदेशित केल्याप्रमाणे सीजीपीए ( CGPA) पद्धतीने निकाल जाहीर करून पदवी देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांचे हित त्यांची मानसिक स्थिती आणि राज्यातील कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव याच पार्श्वभूमीवर घेतला होता.

श्री. सामंत म्हणाले, परीक्षेसंदर्भातील कार्यपद्धतीमध्ये समाविष्ट असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य ,प्राध्यापक, पोलीस व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून केंद्र शासनाने कोविड-१९ संदर्भात दिलेल्या सर्व सुरक्षिततेचा प्रोटोकॉल व नियमांचे पालन करुन परीक्षा कशा घेता येतील याबाबत सर्व कुलगुरू यांच्याशी चर्चा करून राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमवेत सर्वांगीण विचार करून परीक्षा कधी, कशा व कोणत्या पद्धतीने विद्यापीठ परीक्षा घेईल या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.

सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन

0

मुंबई दि.28. सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते .यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे , समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे ,सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार , विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले, सफाई कामगारांच्याबाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार तसेच नियुक्तीबाबतीत शैक्षणिक अर्हता तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

लक्ष्यचा खेल प्रोत्साहन पुरस्काराने गौरव

0

पुणे, २८ ऑगस्ट २०२०- क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता शोधून त्यांच्या विकासासाठी लक्षपूर्वक कार्य करणाऱ्या पुण्यातील “लक्ष्य” या संस्थेचा राष्ट्रीय क्रीडा दिनी खेल प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडू आणि त्याचा विकास हेच एकमेव उद्दिष्ट बाळगून गेले दशकभर लक्ष्य ही संस्था आपले काम करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल अलिकडेच केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने आपल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात घेत, त्यांना खेल प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.
खेळ आणि त्यात कारकिर्द घडवू पाहणाऱ्या खेळाडूंसाठी काहीतरी करण्यासाठी पुण्यातील काही क्रीडा प्रेमी एकत्र आले आणि त्यांच्या पहिल्याच बैठकीत यासाठी लक्ष्य ही ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्रीडा प्रेमींनी २०१० मध्ये हा संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि तेव्हापासून आज दहा  वर्षे ही संस्था आपल्या निश्चयापासून तसूभरही ढळली नाही. खेळाडूंची गुणवत्ता तपासून त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करणे हे उद्दिष्ट या संस्थेने सुरवातीपासूनच बाळगले. खेळाडूंच्या पाठीशी त्यांचे पालक असतात यात शंकाच नाही. पण, कारकिर्द घडवण्यासाठी बाहेर पडल्यावर त्यांच्यामागे प्रत्येक पालक खंबीरपणे उभे राहू शकत नाही. लक्ष्यने हेच काम केले आणि गुणवाने खेळाडूंना आर्थिक मदतीचा हात देत त्यांच्या मागे जबाबदार पालकाप्रमाणे खंबीर उभी राहिली. आतापर्यंत विविध आठ क्रीडा प्रकारातील शंभरहून अधिक खेळाडूंची ही संस्था पालक बनली आहे. यामध्ये ऑलिंपियन राही सरनोबत, शरथ कमाल, मनिका बात्रा, अश्विनी पोनप्पा अशा खेळाडूंचा समावेश आहे.क्रीडा जगतात लक्ष्यच्या या कार्याचे कौतुक होत होतेच. पण, आता त्यावर शासकीय शाबासकी देखील पडली.
या सन्मानाविषयी बोलताना लक्ष्यचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “हा पुरस्कार स्विकारताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या कार्याची दखल घेण्यात आली याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या कार्याची ही पावतीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडू पदके मिळवू शकतील का ?असा प्रश्न ऐरणीवर होता. दहा वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलो तेव्हा आमच्या चर्चेतही हा विषय आला. पण, त्याचवेळी देशातील गुणवत्तेला योग्य पद्धतीने प्रोत्साहन मिळाले, तर आपले खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर उभे राहू शकतात आणि पदक मिळवू शकतात असा विश्वासही वाटत होता. या एकाच विश्वासाच्या जोरावर आम्ही कार्यरत झालो आणि आज आमच्या कार्याचा होत असलेला सन्मान पाहून आम्ही अधिक उत्साहित झालो आहोत. भविष्यातही आम्ही खेळाडूंच्या पाठिशी याहून अधिक भक्कमपणे उभे राहू.”
आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेती राही सरनोबत ही आमच्या प्रवासातील पहिली खेळाडू म्हणता येईल. राहीच्या या कामगिरीने राही २०१२ ऑलिंपिकसाठी पात्रता सिद्ध करू शकली. राहीप्रमाणेच मम्पी दास या युवा नेमबाज खेळाडूला प्रोत्साहित करण्यातही लक्ष्यची साथ होती. लक्ष्यचा साथीमुळे ती केवळ खेळातच प्रगती करू शकली नाही, तर तिने आपल्याला घडवण्यासाठी आईला गहाण टाकलेले दागिनेही सोडवून घेतले. लक्ष्यने खेळाडूंनी केवळ आर्थिक मदत केली नाही, तर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचीदेखील काळजी घेतली. त्यामुळे देशात खेळाला पूरक असे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळाली. त्यामुळेच लक्ष्य ही संस्था खऱ्या अर्थाने देशातील खेळ आणि खेळाडूंचा विचार करणारी पालक आहे असे म्हणायला जागा आहे.
लक्ष्यचे सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, “खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे प्रत्येक खेळाडूचे उद्दिष्ट असते. पण, या खेळाडूंसाठी अनुकूल वातावरण निर्मीती होणे देखील गरजेचे असते. खेळाडू फक्त आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करू शकतील असे वातावरण तयार झाल्यास आपले खेळाडू भक्कमपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री होती. आम्ही खेळाडूंसाठी आर्थिक मदत उभी करताना त्यांचा सरावाचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घेतली. अंकिता रैना आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करू  शकत नव्हती. याचे कारण म्हणजे तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईला आपल्या नोकरीत तडजोड करावी लागत होती. अंकिता पुण्याला सराव करत असल्यामुळे आम्ही तिच्या आईची पुण्यात बदली करण्यासाठी प्रयत्न केले. यात यश आल्यावर अंकिता देखील आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करू शकली आणि तेव्हापासून तिने मागे वळून बघितले नाही.”
प्रशिक्षणापासून पूरक आहार ते खेळाडूंच्या मानसिकतेपर्यंतचे मार्गदर्शन पुरविण्याचा लक्ष्यचा आग्रह असतो. त्यामुळे खेळाडूंचे खऱ्या अर्थाने पालनपोषण करणारी संस्था म्हणून या संस्थेकडे बघितले जाते.
लक्ष्यच्या प्लेअर मॅनेजमेंटचे मुख्य व ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे म्हणाले की, “सध्या लक्ष्य विविध आठ क्रीडा प्रकारातील ३५ खेळाडूंना पाठिंबा देत आहे. यात २०२१ ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली मुष्टीयुद्धपटू पूजा राणी, सिमरजीत कौर, कुस्तीपटू सुनील कुमार, बुद्धिबळपटू विदीत गुजराथी या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. आमच्या या प्रवासात आम्हांला सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे आम्ही आभारी आहोत. भविष्यातही ते असेच आमच्याबरोबर राहतील अशी आम्हाला आशा आहे.”
खेळ म्हटले की जशी संघ भावना महत्वाची असते, तसेच खेळाडूंच्या पाठिशी उभे राहताना लक्ष्य चा देखील एक संघ आहे. खेळाडूंना प्रोत्साहन या एकमेव उद्दिष्टाने ते झपाटून गेले आहेत. या सर्वांशिवाय लक्ष्य संस्था उभीच राहू शकली नसती. यामध्ये संस्थापक अध्यक्ष मनीष जैन, उपाध्यक्ष स्वस्तिक सिरसीकर, आशिष देसाई, सहसचिव अमेय येरवडेकर, खजिनदार भरत शहा, सदस्य रितू नाथानी, सत्येन पटेल, नरेंद्र फिरोदिया, मनिष मेहता यांचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. देशात क्रीडा क्रांती घडविण्यासाठी आणि देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी आम्ही यापुढेही कटिबद्ध असू.
राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजे उद्या शनिवारी (ता.२९) नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात ”लक्ष्य”चा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात येईल. कोरोनाच्या संकटामुळे हा सोहळा यावेळी आभासी पद्धतीने होणार आहे.

देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम नाही -अण्णा हजारेंनी भाजपला खडसावले

0

पुणे-दिल्लीतील आप सरकर विरोधात अण्णा हजारे यांना आंदोलनासाठी बोलाविणाऱ्या भाजपच्या दिल्ली अध्यक्ष असलेल्या आदेश गुप्ता आणि एकूणच भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना अण्णा हजारे यांनी एका पत्रा द्वारे चांगलेच झापले आहे.

सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे. आज अनेक पक्ष-पार्टी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही. अशी माझी धारणा आहे.देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल.सिर्फ हंगामा खडा हो यह हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है यही की सुरत बदलनी चाहीए। असा शेवट असलेले हे पत्र आम्ही आमच्या वाचक दर्शक यांच्या साठी येथे जसेच्या तसे देत आहोत ..अण्णांच्या शब्दात ..वाचा जसेच्या तसे …..

दिनांक – 28/08/2020जा.क्र.06/2020-21/मराठी

प्रति,

मा. आदेश गुप्ता,

अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,

दिल्ली क्षेत्र

महोदय,

24 ऑगस्ट रोजी आपण लिहिलेले पत्र प्रसारमाध्यमांद्वारे मला प्राप्त झाले. आपण पत्रात लिहिले आहे की तुम्ही दिल्लीत येऊन ‘आप’ पक्षाविरूद्ध लोकपाल चळवळीसारखे आंदोलन करून आवाज उठविला पाहिजे आणि आम्हाला सहकार्य करावे.

प्रेसला लिहिलेले तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमची भारतीय जनता पार्टी मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे. युवा शक्ती ही राष्ट्रीय शक्ती आहे. तुमच्या पार्टीमध्ये तरुणांची संख्या मोठी असून जगातील सर्वाधिक पार्टी सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात १० बाय १२ फूट खोलीत राहणाऱ्या 83 वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते.

आज केंद्रात आपल्या पार्टीचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, आर्थिक अपराध, व्हिजनस, दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि जर दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत?

वयाच्या 83 व्या वर्षी मी समाज, राज्य आणि देशाच्या हितासाठी २२ वर्षांपासून अहिंसेच्या मार्गाने आंदोलने केले आहेत. 20 वेळा उपोषण केले आहे. आजपर्यंतच्या आंदोलनामुळे सहा मंत्र्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले. सत्तेवरून पायउतार झालेल्या मंत्र्यांमध्ये विविध पक्षाचे मंत्री आहेत. मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत. मला कोणत्याही पक्ष आणि पार्टीचे घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो आहे.

सत्तेत असलेल्या ज्या पार्टीच्या विरोधात माझे आंदोलन झाले त्या पार्टीने नेहमी माझे नाव दुसऱ्या पक्ष-पार्टी बरोबर जोडले आहे. रेडीमेड कपड्यांचे दुकान असते. त्या दुकानातील कपडे कुणाच्या शरीराचे माप घेऊन शिवलेले नसतात. परंतु ते रेडीमेड कपडे कुणाच्या ना कुणाच्या शरीराला फिट येतात. ज्यांच्या शरीराला ते रेडीमेड कपडे फिट येतात त्यांना वाटते हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. आज अनेक पक्ष-पार्ट्यांचे असेच झालेले आहे. आमच्या आंदोलनामुळे ज्या पक्ष-पार्टीचे नुकसान झाले आहे तो पक्ष-पार्टी मी दुसऱ्या पक्ष-पार्टीचा हस्तक आहे अशी अफवा व गैरसमज समाजामध्ये पसरवित असतो. आजपर्यंत अनेक वेळाला माझी नींदा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु अण्णा हजारे ला काही फरक पडत नाही. मी आजही तोच अण्णा हजारे आहे.

         वाढत्या भ्रष्टाचारामुळे २०११ चे दिल्ली आंदोलन झाले. लोकांना आपले जीवन जगणे कठीण झाले होते. भ्रष्टाचारामुळे जनता अस्वस्थ झाली होती. अशा परिस्थितीत अण्णा हजारे यांच्यासारखा व्यक्ती आपल्यासाठी आंदोलन करत आहेत असा विचार करून दिल्ली आणि देशातील लोक रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर 2014 मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. एका पक्ष-पार्टीला नेहमी दुसऱ्या पक्ष-पार्टीचा दोष दिसतो. कधीकधी एखाद्या पक्ष-पार्टीने स्वत: आत्मपरिक्षण करून स्वतःच्या दोषांविरूद्ध बोलले पाहिजे.

सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे. आज अनेक पक्ष-पार्टी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही. अशी माझी धारणा आहे.

देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल.

सिर्फ हंगामा खडा हो यह हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है यही की सुरत बदलनी चाहीए।

आपला,

कि. बा. तथा अण्णा हजारे

अखेर बाणेर ला आल्यावर राज्य सरकारवर साधला देवेंद्रांनी निशाना (व्हिडीओ)

0

पुणे- बाणेर कोविड सेंटर प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विपक्ष नेते देवेंद्र फडणवीस एकत्र उद्घाटनाला आले .. तेव्हा माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही -उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.28- कोरोनाच्या संकट काळात पुणेकरांना कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले.
बाणेर येथील पुणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, माजी महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना बाधित रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सर्व सोयी सुविधा, ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था असणारे कोविड रुग्णालये सुरु करण्यात येत असून या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा आज पार पडत आहे. रुग्णालयाच्या उभारणीमध्ये उद्योजक, महानगर पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना या सर्वांनी चांगले काम केले आहे. यांच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा दिली जाईल. या कोविड रुग्णालयामुळे पुणेकरांना याचा चांगला उपयोग होईल. आपण सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामजिक अंतर राखणे या नियमांचे देखील पालन केले पाहिजे. जिल्ह्यातील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, असेही ते म्हणाले. हे कोविड रुग्णालय उभारणीसाठी ज्यांची मोलाची साथ मिळाली त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अतिशय चांगले रुग्णालय उभारल्याबद्दल मी पुणे महानगर पालिकेला प्रथम शुभेच्छा देतो. ज्यांनी या कामासाठी मदत केली त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली असून पुणे महानगरपालिकेने जास्तीत जास्त तपासण्या करुन कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.