Home Blog Page 2469

दंड भरणार पण …सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला देणार आव्हान- प्रशांत भूषण

0

पुणे- दंड भरण्यासाठी आपण आनंदाने तयार आहोत, मात्र कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार असं प्रशांत भूषण यांनी येथे सांगितलं. न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने प्रशांत भूषण यांना १ रुपया दंडाची शिक्षा सुनावली. दंड भरण्यासाठी प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्याच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, शिवाय तीन वर्षांसाठी वकिली करण्यापासून रोखण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर प्रशांत भूषण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत भूषण यांनी सांगितलं की, “आनंदाने दंड भरण्यास तयार आहोत, मात्र आपल्याला दोषी ठरवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा मला हक्क आहे”. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझे ट्विट कोर्टाचा अवमान करण्याच्या उद्धेशाने नव्हते तर मला जे वाटलं ते मी म्हटलं होतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हा महत्त्वाचा क्षण होता आणि यामुळेच अनेकांना अन्यायाविरोधात बोलण्यात बळ मिळालं असं दिसत आहे”.

काय आहे प्रकरण ?
सरन्यायाधीश शरद बोबडे हे नागपूरमधील राजभवनात मोटारसायकलवर स्वार झाल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यावर प्रशांत भूषण यांनी टिप्पणी केली होती. प्रशांत भूषण यांच्या ट्विटची दखल घेत सुप्रीम कोर्टाने त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली होती. तसंच सहा वर्षांतील सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करणारेही ट्विट केलं होतं. हा न्यायालयाचा अवमान असून भूषण यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वकील महेश महेश्वरी यांनी केली होती. त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने दोन ट्वीटबद्दल भूषण यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं.

या ट्विटमुळे लोकशाहीचे खांब कमकुवत होत असल्याचं निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. १४ ऑगस्ट रोजी त्यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. या निकालावर भूषण यांनी, न्यायालयाने दिलेली शिक्षा मी भोगण्यास तयार असल्याचे निवेदन न्यायालयात केलं होतं. या विधानाचा फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली होती.

प्रशांत भूषण यांना 1 रुपया दंड – दंड न भरल्यास 3 महिने तुरुंगवास, 3 वर्षे वकिली करण्यास प्रतिबंध

0

नवी दिल्ली -कोर्ट आणि न्यायाधीशांचा अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांना 1 रुपया दंड ठोठावला आहे. भूषण यांनी 15 सप्टेंबरपर्यंत दंड न भरल्यास त्यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 3 वर्षांसाठी वकिली करण्यात प्रतिबंध करण्यात येईल. सुप्रीम कोर्टाने म्हटले की बोलण्याचे स्वातंत्र्य दडपता येणार नाही, परंतु इतरांच्या अधिकाराचा आदर करणे देखील आवश्यक आहे.

प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास नकार दिला

सुप्रीम कोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीलाच भूषण यांना महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना अवमान प्रकरणी दोषी ठरवले होते आणि निर्णय राखीव ठेवला होता. गेल्या आठवड्यात कोर्टाने भूषण यांना बिनशर्त माफी मागण्याची संधी दिली होती, परंतु त्यांनी नकार दिला. भूषण यांनी म्हटले होते की जर त्यांनी माफी मागितली तर ते अंतरात्मा आणि कोर्टाचा अवमान होईल.

भूषण यांच्या या 2 ट्विटला कोर्टाने अवमान मानली आहेत

पहिले ट्विट 27 जून : जेव्हा इतिहासकार भारताची शेवटची 6 वर्षे पाहतात, तेव्हा असे आढळते की देशातील लोकशाही आणीबाणीशिवाय कशी संपुष्टात आणली. ते (इतिहासकार) सुप्रीम कोर्ट विशेषतः 4 माजी सीजेआय यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतील.

दुसरे ट्विट 29 जून : त्यात ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांचा हार्ले डेव्हिडसन बाइकसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत सीजेआय विना हेल्मेट आणि मास्कचे दिसले होते. भूषण यांनी लिहिले होते की, सीजेआय यांनी लॉकडाउनमध्ये कोर्ट बंद ठेवून लोकांना न्याय देण्यास नकार दिला आहे.

भूषण यांना यापूर्वीही अवमान केल्याची नोटीस मिळाली होती

प्रशांत भूषण यांना नोव्हेंबर 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हा त्यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर टिप्पणी केली होती.

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन

0

नवी दिल्ली -माजी राष्ट्रपदी प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यावर मागील अनेक दिवसांवासून दिल्लीतील आर्मी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत यांनी ट्वीट करुन दिली आहे.१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.

इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.

पुण्यात तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

0

पुणे- डेक्कन परिसरातील भिडे ब्रिजजवळ सोमवारी दुपारी तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही गटातील तरुणींनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. यावेळी तरुणींचे भांडण पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी तरुणींना हकलून लावले. दरम्यान, घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाव प्रचंड व्हायरल होत आहे.

भांडणामागचे कारण अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणींचा एक गट एसपी महाविद्यालयातील आणि दुसरा ग्रुप मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचा होता. अद्याप दोन्ही ग्रुपकडून पोलिस तक्रार करण्यात आलेली नाही. या हाणामारीमागचे कारण अस्पष्ट आहे.

शौचालय, फुटपाथ, भिंती रंगवणे म्हणजे स्मार्ट सिटी का ? आबा बागुल यांचा प्रश्न

0

स्मार्ट सिटीच्या मानांकनात न अडकता पुणे शहर कसे स्मार्ट करता येईल याकडे लक्ष द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी स्मार्ट सिटीच्या सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

.

पुणे:- गेल्या काही वर्षांत स्मार्ट सिटीचा कारभार बघता पुणेकरांचा या योजनेवरील विश्वास उडालेला आहे. स्मार्ट म्हणजे काय हेच पुणेकरांना समजण्यास तयार नाही. शहरात मोठे फुटपाथ तयार करणे, झाडे लावणे, रस्ते बनवणे, शौचालयांना रंगरंगोटी करणे म्हणजेच स्मार्ट शहर करणे की काय? असा समज आता नागरिकांचा होऊ लागला आहे. ही कामे तर महानगरपालिकेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सभासद आपल्या भागात करत आहेत.

मग स्मार्ट सिटी म्हणून कोणती विशेष कामे स्मार्ट सिटीने केली आहेत? असा सवालही बागूल यांनी उपस्थित केला आहे.

स्मार्टची संकल्पना अशी होती की, शहरावर त्याचा प्रभाव पडेल आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवाला, आरोग्याला व इतर कोणत्याही गोष्टीला धोका नसेल, हा खरा स्मार्टनेस पाहिजे. शहरामध्ये वाहतुकीचा आराखडा करणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे व नागरिकांचा त्याकडे कल वाढवणे म्हणजे स्मार्टनेस.

सर्व इ गव्हर्नन्स आणणे त्याचे मार्गदर्शन करणे म्हणजे स्मार्टनेस, पर्यावरणाचा समतोल राखणे म्हणजे स्मार्टनेस, 900 हेक्टर बीडीपी झोनवर कसे वृक्षारोपण करणे, बीडीपीचे कसे संरक्षण व संवर्धन करता येईल म्हणजे स्मार्टनेस, पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे स्मार्टनेस, महानगरपालिकेचा शिक्षणाचा दर्जा खालावत असताना दर्जेदार शिक्षण देणे म्हणजे स्मार्टनेस, शहरातील कचऱ्यासाठी उपाय योजना करणे म्हणजे स्मार्टनेस.

अशा उपाययोजना स्मार्ट शहर करत असताना माझ्या व पुणेकरांच्या मनात कल्पना होत्या. परंतु, सर्व आशा फोल ठरल्या. अशाप्रकारे स्मार्ट सिटीने काम केल्यास मानांकनासाठी आपण जी धावपळ करतोय. ती करावी लागणार नाही व मानांकनामध्ये आपले शहर कायमचे एक नंबरला राहिल.

इतर 99 शहरे आपला आदर्श घेऊन कामे करतील यासाठी आपण शहराच्या शाश्वत विकासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे. शहरासाठी महत्वाचे असलेल्या कामांना प्राधान्य देऊन शहर कसे स्मार्ट करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही बागूल यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यात १ लाख ९३ हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू

0

राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांवर कायम

मुंबई, दि.३०: राज्यात आज ७ हजार ६९० रुग्ण बरे झाले तर १६ हजार ४०८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.०४ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९३  हजार ५४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १६,४०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१२३७ (३०), ठाणे- २३४ (९), ठाणे मनपा-२२८ (३), नवी मुंबई मनपा-४८८ (१), कल्याण डोंबिवली मनपा-३६६ (१४), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-१२, मीरा भाईंदर मनपा-१२० (१), पालघर-१५८ (८), वसई-विरार मनपा-१३१ (६), रायगड-३२२ (३),पनवेल मनपा-२३९ (२), नाशिक-३२५ (५), नाशिक मनपा-१०४९, मालेगाव मनपा-६३ (१), अहमदनगर-२८३ (७),अहमदनगर मनपा-१८७  (२), धुळे-८९ (२), धुळे मनपा-६९ (१), जळगाव- ६२५ (१०), जळगाव मनपा-१३०, नंदूरबार-२९ (५), पुणे- ९९१ (१२), पुणे मनपा-१६६३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-१०७२ (२), सोलापूर-३४५ (६), सोलापूर मनपा-४८, सातारा-६१६ (५), कोल्हापूर-६६९ (१६), कोल्हापूर मनपा-३०५ (१२), सांगली-३९३ (६), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९७ (१२), सिंधुदूर्ग-४८, रत्नागिरी-१६३ (५), औरंगाबाद-६३ (२),औरंगाबाद मनपा-५८ (४), जालना-६७, हिंगोली-१०, परभणी-४२, परभणी मनपा-२५ (४), लातूर-१५४ (३), लातूर मनपा-११५ (३), उस्मानाबाद-१०८ (२),बीड-१०४ (३), नांदेड-१८३ (४), नांदेड मनपा-१२८ (१), अकोला-२९ (२), अकोला मनपा-५२ (१), अमरावती-२८ (३), अमरावती मनपा-८६ (३) , यवतमाळ-९५ (१), बुलढाणा-४४, वाशिम-६३ , नागपूर-२२३ (५), नागपूर मनपा-८३६ (४०), वर्धा-६६, भंडारा-१०९, गोंदिया-४८, चंद्रपूर-११२, चंद्रपूर मनपा-१६४, गडचिरोली-७५, इतर राज्य १७ (२).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख ८४ हजार ७५४ नमुन्यांपैकी ७ लाख ८० हजार ६८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ९ हजार ६७६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ३७३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४४,६२६) बरे झालेले रुग्ण- (१,१६,३५२), मृत्यू- (७६२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२७), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,३२१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,३१,३५२), बरे झालेले रुग्ण- (१,०६,५९८), मृत्यू (३७७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,९७६)

पालघर: बाधित रुग्ण- (२५,२५०), बरे झालेले रुग्ण- (१७,८३८), मृत्यू- (५८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८२४)

रायगड: बाधित रुग्ण- (२९,८१९), बरे झालेले रुग्ण-(२३,४३९), मृत्यू- (७८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९८)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४०८४), बरे झालेले रुग्ण- (२३६७), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७६)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११४९), बरे झालेले रुग्ण- (६४५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८४)

पुणे: बाधित रुग्ण- (१,७३,१७४), बरे झालेले रुग्ण- (१,१७,२०५), मृत्यू- (४०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१,९०९)

सातारा: बाधित रुग्ण- (१३,५४१), बरे झालेले रुग्ण- (७८६०), मृत्यू- (३३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४६)

सांगली: बाधित रुग्ण- (१२,५२५), बरे झालेले रुग्ण- (७२६७), मृत्यू- (४२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२१,९६३), बरे झालेले रुग्ण- (१४,४१८), मृत्यू- (६२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९१८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१९,३००), बरे झालेले रुग्ण- (१३,७१९), मृत्यू- (७५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२१)

नाशिक: बाधित रुग्ण- (३८,९४०), बरे झालेले रुग्ण- (२६,३७३), मृत्यू- (८६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,७०३)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०,१३०), बरे झालेले रुग्ण- (१५,३९०), मृत्यू- (२९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४९)

जळगाव: बाधित रुग्ण- (२६,८२८), बरे झालेले रुग्ण- (१८,५४६), मृत्यू- (८४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४३५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२६४९), बरे झालेले रुग्ण- (१२९७), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७८)

धुळे: बाधित रुग्ण- (७६८१), बरे झालेले रुग्ण- (५३१०), मृत्यू- (२१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१५९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२२,७२८), बरे झालेले रुग्ण- (१६,९४६), मृत्यू- (६६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१२०)

जालना: बाधित रुग्ण-(४२५३), बरे झालेले रुग्ण- (२८५८), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६५)

बीड: बाधित रुग्ण- (४७१६), बरे झालेले रुग्ण- (३२०३), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९२)

लातूर: बाधित रुग्ण- (७८३५), बरे झालेले रुग्ण- (४८१८), मृत्यू- (२६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४८)

परभणी: बाधित रुग्ण- (२५५५), बरे झालेले रुग्ण- (१२०५), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४४९), बरे झालेले रुग्ण- (११२०), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९४)

नांदेड: बाधित रुग्ण- (६८९३), बरे झालेले रुग्ण (३२२७), मृत्यू- (२१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४४९)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५७८०), बरे झालेले रुग्ण- (३७३३), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८९५)

अमरावती: बाधित रुग्ण- (५०६३), बरे झालेले रुग्ण- (३८०७), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२६)

अकोला: बाधित रुग्ण- (३८५९), बरे झालेले रुग्ण- (२९९४), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१७०३), बरे झालेले रुग्ण- (१३३७), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३३१२), बरे झालेले रुग्ण- (२१३३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३१७६), बरे झालेले रुग्ण- (१९०८), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९६)

नागपूर: बाधित रुग्ण- (२७,२४१), बरे झालेले रुग्ण- (१४,९४९), मृत्यू- (७१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,५७४)

वर्धा: बाधित रुग्ण- (८८५), बरे झालेले रुग्ण- (४६९), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१०६४), बरे झालेले रुग्ण- (६०१), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१४३९), बरे झालेले रुग्ण- (८२१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२२१५), बरे झालेले रुग्ण- (१०६४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७८३), बरे झालेले रुग्ण- (५८४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७२९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५७)

एकूण: बाधित रुग्ण-(७,८०,६८९) बरे झालेले रुग्ण-(५,६२,४०१), मृत्यू- (२४,३९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४१),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,९३,५४८)

(टीप:  आज नोंद झालेल्या एकूण २९६ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३३ मृत्यू ठाणे – ८, नागपूर – ६, कोल्हापूर – ५, पुणे -२, रत्नागिरी -२, नाशिक -२, औरंगाबाद -२, बीड-१,  जळगाव- १, लातूर्-१,  नंदूरबार-१,  परभणी -१ आणि पालघर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 55 हजार 436

0


विभागात कोरोना बाधित 2 लाख 27 हजार 938 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे,दि.30 :- पुणे विभागातील 1 लाख 66 हजार 440 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 27 हजार 938 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 55 हजार 436 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 62 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.02 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 64 हजार 525 रुग्णांपैकी 1 लाख 26 हजार 949 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33 हजार 706 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.16 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 12 हजार 888 रुग्णांपैकी 7 हजार 109 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 408 आहे. कोरोनाबाधित एकूण 371 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 415 रुग्णांपैकी 12 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 764 आहे. कोरोनाबाधित एकूण 729 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 735 रुग्णांपैकी 5 हजार 800 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 514 आहे. कोरोनाबाधित एकूण 421 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 22 हजार 375 रुग्णांपैकी 13 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 44 आहे. कोरोनाबाधित एकूण 671 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 120 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 70, सातारा जिल्ह्यात 670, सोलापूर जिल्ह्यात 294, सांगली जिल्ह्यात 442 तर कोल्हापूर जिल्ह्यात 644 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 48 हजार 968 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 27 हजार 938 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.


( टिप :- दि. 29 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

अनलॉक 4 चा आदेश,शाळा बंदच, मेट्रो ट्रेन सुरु तर ई पास रद्द

0

मुंबई 29 ऑगस्ट : कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध (Lockdown) आता आणखी शिथिल होणार आहेत. Unlock 4.0  संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने (Unlock 4.0 guidelines) जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.


असे आहेत नवे नियम

  • थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद
  • शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
  • ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
  • नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
  • शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.

अनलॉक ४ साठीच्या मार्गदर्शक सूचना आज केंद्रीय गृहमंत्रालयानं जाहीर केल्या आहेत. अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकारनं मेट्रो सेवा सुरू करण्यासह सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व धार्मिक सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. २१ सप्टेंबरपासून राज्यात हे कार्यक्रम घेता येणार असून, त्यासाठी काही बंधन घालण्यात आली आहेत.

गृहमंत्रालयानं जाहीर केलेल्या मार्गदर्शक एकाच छताखाली होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये केवळ १०० लोकांनाच सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर अशा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना तोंडावर मास्क, सोशल डिस्टन्सिगचं पालन, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. त्याचबरोबर करोनासंदर्भात सरकारनं जाहीर केलेल्या इतर नियमाचं पालन करण्यात यावं, असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

हे राहणार बंद…

अनलॉक ४ मध्ये केंद्र सरकार चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, चित्रपटगृहांसह स्विमिंग पूल (जलतरण तलाव), आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा (विशेष विमान सेवा वगळून) सप्टेंबरमध्येही बंदच राहणार आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारनं शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

अनलॉक ४ च्या नियमावलीनुसार, कन्टेन्मेंट झोन आणि लॉकडाउनबाबत केंद्रानं राज्यांना महत्वपूर्ण सूचना केली आहे. त्यानुसार, केंद्र सरकारला विचारल्याशिवाय राज्यांनी कन्टेंन्मेंट झोनबाहेर स्वरुपातील लॉकडाउन लावता येणार नाही, असे निर्देश केंद्राने राज्यांना दिले आहेत. त्यामुळे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना स्थानिक पातळीवर लॉकडाउन करता येणार नाही.

केंद्राने शनिवारी अनलॉक ४ ची प्रक्रिया आणि नियमावली जाहीर केली. यामध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यास ७ सप्टेंबरपासून परवानगी देण्यात आली आहे. तर सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणिक, खेळ आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये १०० लोकांना परवानगी देण्यात आली आहे२१ सप्टेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.

अनलॉक ३ चा टप्पा ३१ ऑगस्टला संपत असल्यानं केंद्र सरकारकडून अनलॉक ४ मध्ये नवीन नियमावली जाहीर केली आहे

आज १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान,राज्यात १ लाख ८५ हजार १३१ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि. २९ : राज्यात आज ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५  हजार १३१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १६,८६७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), ठाणे मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९), पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), पुणे मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४), सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६), नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४० लाख १० हजार २०० नमुन्यांपैकी ७ लाख ६४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०५ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख १२ हजार ०५९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ५२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४३,३८९) बरे झालेले रुग्ण- (१,१५,५००), मृत्यू- (७५९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,९७१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,२९,८५४), बरे झालेले रुग्ण- (१,०५,८४२), मृत्यू (३७४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,२६४)

पालघर: बाधित रुग्ण- (२४,९६१), बरे झालेले रुग्ण- (१७,७४८), मृत्यू- (५७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६३९)

रायगड: बाधित रुग्ण- (२९,२५८), बरे झालेले रुग्ण-(२३,१४५), मृत्यू- (७७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३३६)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३९२१), बरे झालेले रुग्ण- (२२९२), मृत्यू- (१३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (११०१), बरे झालेले रुग्ण- (६२२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५९)

पुणे: बाधित रुग्ण- (१,६९,४४८), बरे झालेले रुग्ण- (१,१६,०६२), मृत्यू- (४०२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९,३६५)

सातारा: बाधित रुग्ण- (१२,९२५), बरे झालेले रुग्ण- (७७०७), मृत्यू- (३२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८८८)

सांगली: बाधित रुग्ण- (११,८३५), बरे झालेले रुग्ण- (६८६९), मृत्यू- (४०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५६३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२०,९८९), बरे झालेले रुग्ण- (१४,१९६), मृत्यू- (५९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१९४)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१८,९०७), बरे झालेले रुग्ण- (१३,५१७), मृत्यू- (७५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६३६)

नाशिक: बाधित रुग्ण- (३७,५०३), बरे झालेले रुग्ण- (२६,३४७), मृत्यू- (८५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,२९८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१९,६६१), बरे झालेले रुग्ण- (१५,२२६), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१५३)

जळगाव: बाधित रुग्ण- (२६,०७३), बरे झालेले रुग्ण- (१८,१९१), मृत्यू- (८३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०४५)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२३५९), बरे झालेले रुग्ण- (१२०९), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७०)

धुळे: बाधित रुग्ण- (७५२३), बरे झालेले रुग्ण- (५१३६), मृत्यू- (२०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२२,६०७), बरे झालेले रुग्ण- (१६,१३८), मृत्यू- (६५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८१३)

जालना: बाधित रुग्ण-(४१८६), बरे झालेले रुग्ण- (२७९३), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६३)

बीड: बाधित रुग्ण- (४६१२), बरे झालेले रुग्ण- (२९३६), मृत्यू- (११८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५८)

लातूर: बाधित रुग्ण- (७५६६), बरे झालेले रुग्ण- (४५५९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४४)

परभणी: बाधित रुग्ण- (२४८८), बरे झालेले रुग्ण- (११५१), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४३९), बरे झालेले रुग्ण- (१११४), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९०)

नांदेड: बाधित रुग्ण- (६५८२), बरे झालेले रुग्ण (३१६५), मृत्यू- (२१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२०५)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५६७२), बरे झालेले रुग्ण- (३६०३), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१९)

अमरावती: बाधित रुग्ण- (४९४९), बरे झालेले रुग्ण- (३७७९), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०४६)

अकोला: बाधित रुग्ण- (३७७८), बरे झालेले रुग्ण- (२९८६), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१६४०), बरे झालेले रुग्ण- (१२८५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३२६८), बरे झालेले रुग्ण- (२१०६), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८९

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३०८१), बरे झालेले रुग्ण- (१९०८), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०२)

नागपूर: बाधित रुग्ण- (२६,१८२), बरे झालेले रुग्ण- (१४,०७५), मृत्यू- (६७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,४३४)

वर्धा: बाधित रुग्ण- (८१९), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४१)

भंडारा: बाधित रुग्ण- (९५५), बरे झालेले रुग्ण- (५९४), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४०)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१३९१), बरे झालेले रुग्ण- (८१९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१९३९), बरे झालेले रुग्ण- (१०४८), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७४)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (५७२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४२)

एकूण: बाधित रुग्ण-(७,६४,२८१) बरे झालेले रुग्ण-(५,५४,७११), मृत्यू- (२४,१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३६),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,८५,१३१)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ३२८ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे ठाणे -१४,  पालघर -४, नाशिक – ३, औरंगाबाद – २, कोल्हापूर -२, लातूर -२, नागपूर -२, सांगली -२, बीड -१, जळगाव -१,पुणे -१, रत्नागिरी -१ आणि सातारा -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.आज जिल्हा आणि मनपा निहाय १५ ऑगस्ट  २०२० पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येतून ५८१ रुग्ण कमी झाले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ घेऊन येणार १० नव्याकोऱ्या वेब सिरीज

0

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाउन काळात घरी अडकल्यामुळे सगळे चित्रपट, वेबसिरीज, मालिका, विविध कार्यक्रम बघून झाले. परंतु, या गर्दीत मराठी चित्रपट, वेबसिरीज किंवा कोणत्याही प्रकारचा मराठी कंटेंट फार झळकला नाही. पुरेसा मराठी भाषेतील कंटेंट कोणत्याच ओटीटी माध्यमावर उपलब्ध नसल्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सुरु पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षकांनी त्यांची ही भावना विविध सोशल मीडिया मंचावर व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या अविरत मनोरंजनासाठी ‘प्लॅनेट मराठी’ने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’या नव्याकोऱ्या खास मराठी ओटीटी माध्यमाची घोषणा केली. आता त्यासाठी १० नव्याकोऱ्या वेब सिरीज आणि सुमारे ८५० तासांचे लहान मुलांसाठीचे कन्टेन्ट बनविण्यासाठी प्लॅनेट मराठीने कंबर कसली आहे. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांना घेऊन या १० वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लहान मुलांसाठीचे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजनाने भरपूर असं कंटेंट देखील निर्मितीच्या तयारीत आहे. येत्या नजीकच्या काळात नवीन मराठी वेब फिल्म्स, लघुपटांच्याही घोषणा करण्यात येतील.  
‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चा रंगू लागली आहे. ‘म मानाचा, म मराठीचा’ म्हणतं दणक्यात प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. येत्या डिसेंबर २०२० पासून प्रेक्षकांसाठी खुल्या होणाऱ्या प्लॅनेट मराठी ओटीटीवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या कंटेंटमुळे प्रेक्षकवर्ग नक्की सुखावेल अशी खात्री प्लॅनेट मराठी ओटीटीचे सीएम डी अक्षय बर्दापूरकर व्यक्त करतात.

प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिजिटल थिएटरची घोषणाही नुकतीच अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांनी केली. सिने निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपले चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावेत या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. सिने निर्मात्याला सिनेमा रिलीजचा आव्हानात्मक वाटणारा प्रवास यामुळे सुकर होणार आहे. आता घरबसल्या पे-पर-व्ह्यूच्या तंत्रावर प्रेक्षकांना चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा आनंद घेता येणारं आहे. डिजिटल थिएटरमुळे निर्मात्यांच्या खिशावर कमी भार पडणार आहे. 
प्लॅनेट मराठीची पहिली निर्मिती असलेला आणि प्रदर्शित झालेला ‘एबी आणि सीडी’ चित्रपट, लवकरच येणारा शंतनू रोडे दिग्दर्शित अभिनेत्री सायली संजीवची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा आगामी चित्रपट अशा अनेक प्रोजेक्ट्सचा चित्रपटाच्या निर्मिती पासून ते प्रदर्शनापर्यंतचा अनुभव अक्षय बर्दापूरकर यांच्या गाठीशी आहे. आणि त्यामुळेच  भविष्यात चित्रपटमाध्यमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सिनेमा रिलीजच्या आव्हात्मक वाटणाऱ्या प्रवासाला एक पर्याय म्हणून निर्माते डिजिटल थिएटरचा मार्ग अवलंबवू शकतात असे ते म्हणाले.

मंदिरे उघडली नाही तर…….खासदार गिरीश बापटांचा इशारा

0


पुणे :२९:भारतीय जनता पार्टी च्या वतीने महाराष्ट्रातील मंदिरे खुली व्हावी या करता संपूर्ण राज्य भर अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा एक भाग म्हणून कसबा मतदारसंघात २४ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते ओंकारेश्वर मंदिर येथे खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी बापट यांनी राज्य सरकार हेतुपुरस्सर मंदिरे मशिदी चर्च बंद ठेऊन लोकभावना दुखावत आहेत करोना च्या पर्शवभूमी वर लोकडाऊन मध्ये राज्य सरकारला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य केले पण आता दारूची दुकाने व्यापारी बाजारपेठ हॉटेल इत्यादी चालू होत असताना मंदिर मशिदी बंद ठेऊन सरकार अन्याय करत आहे त्यामुळे जर मंदिरे उघडली नाहीत तर मंदिर सत्याग्रह करणार असल्याचा इशारा बापट यांनी दिला या आंदोलनाला पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे , सुनील माने,पुष्कर तुळजापूरकर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

मागाठाणेतील अशोकवन येथील हनुमान मंदिरात घंटानाद

0

मुंबई दि.२९ : महाविकास आघाडीचे सरकार जागे झाले तर ठीक आहे आणि दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील सरकार झोपले आहे, त्याला जागे करण्यासाठीच हा घंटानाद आज राज्यभर केला जात आहे, असा इशारा आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला आहे. मागाठाणेतील अशोकवन परिसरात हनुमान मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलनाच्या वेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. 

केंद्राने संपूर्ण देशभर मंदिरे, मस्जिदी, चर्च अशी सर्व प्रार्थनास्थळे सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरूही आहेत. पण हे राज्य सरकार पूर्णपणे आपल्या धर्माच्या, हिंदुत्वाच्या किंवा या सर्व प्रक्रियेच्या विरोधात आहे असे दिसते. एकीकडे दारूची दुकाने सुरु होत आहेत, मॉल सुरु होत आहेत  परंतु आमची श्रद्धास्थान 
असलेली आमची दैवतं, त्यांची मंदिरे सुरु होत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून सरकारला जागे करण्यासाठी भाजपाने राज्यभर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे, अशी माहिती दरेकर यांनी यावेळी दिली. 

“उध्दवा दार उघड, आता तरी जागा हो, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी देशभर, राज्यभर घेतली आहे,” असे सांगून त्यांनी,’ अशोकवन येथील हनुमान मंदिर समोर घंटानाद करून सरकारच्या कानटीळ बसविण्याचा प्रयत्न केला. “सरकारचे कान उघडे असतील तर हा आवाज त्यांच्यापर्यँत पोहचेल. आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतील. पण जर दोन तीन दिवसात मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पार्टी स्वतः  मंदिरे उघडी करेल. सोशल डिस्टंशिंगची जी काळजी घायची आहे त्याबाबत मंदिरांना सूचना देऊ, भक्तगण काळजी घेतील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
या घंटानाद आंदोलनात माजी नरसेवक प्रकाश दरेकर, अ‍ॅड शिवाजी चौगुले, मोतीभाई देसाई, गौतम पंडागळे, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, माधुरी रावराणे, प्रियांका रेडकर, अध्यक्ष लकी यादव, अमोल खरात, आबा जाधव, सचिन शिरवडकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमर शाह,  युवामोर्चा मंडळ अध्यक्ष अमित उतेकर आदी सहभागी झाले होते

राज्यात शेत मजूर बोर्ड स्थापन करावे. ..! आरपीआयची (रिफॉरमिस्ट)मागणी राज्य सरकार सकारात्मक

0

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात बांधकाम मजुरांच्या धर्तीवर “शेत मजूर बोर्ड” स्थापन करावे अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) पक्षाच्या एका शिष्टमंळाने उपमुख्मंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना भेटून केली आहे.याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे ना.पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
शेती प्रधान देशात शेतावर राबणाऱ्या शेतमजुरांसाठी कोणतेही महामंडळ अस्तित्वात नाही. पण आता लवकरच शेतमजुरांसाठीही शेत मजूर बोर्ड स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार यासाठी सकारात्मक विचार करीत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगितले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) पक्षाने याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली होती.
राज्यातील हमालांच्या उन्नतीसाठी माथाडी महामंडळ आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांकरिता मजूर सहकारी संस्था कार्यरत आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघाटीत कामगारांसाठी सुद्धा नोंदणी करण्याची तरतूद आहे. पण शेतावर राबणाऱ्या भूमिहीन आणि शेतमजुरांकरिता कोणतेही बोर्ड नाही. त्यामुळे ज्या शेतमजुरांवर शेती टिकून आहे. देशाचे पोट भरले जाते. त्यांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने एखादे स्वतंत्र बोर्ड निर्माण करावे अशी मागणी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉरमिस्ट) च्या वतीने राज्य सरकारला करण्यात आली आहे.
यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष समाधान नावकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुस्ताक मलिक, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष बनसोडे, राष्ट्रीय सचिव संजय कांबळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरभाऊ सोनावणे, मुंबई युवा अध्यक्ष भास्कर खरात, युवा नेते निरंजन लगाडे, हर्षवर्धन नावकर, मंगेश आहिरे, महेश गायकवाड, संदेश तांबे या शिष्टमंडळात समावेश होता.
या भेटीत पदाधिकऱ्यांनी दोघांनाही प्रत्यक्ष भेटीत लेखी निवेदन दिले. त्यावेळी शेतमजूर बोर्डाची मागणी रास्त असून हे बोर्ड कामगार विभाग, कृषी विभाग अथवा महसूल विभागा अशा नेमके कोणत्या खात्यात बसते त्याची माहिती घेऊन बोर्ड स्थापन करण्याबाबत नक्की विचार केला जाईल असेही आश्वासन अजित पवार यांनी दिले. तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, हे अधिवेशन दोन दिवसाचे आहे. तुमची मागणी चांगली आहे. मी नक्कीच मार्ग काढेल. दरम्यान या मागणीसाठी नावकर यांनी कार्यकर्त्यांसमावेत राज्यपालांची देखील भेट घेतली. त्यांनीही मागणीचे कौतुक करीत याबाबत राज्याला कळवू असे आश्वासन दिले.अशी माहिती पक्ष अध्यक्ष समाधान नावकर यांनी दिली.
आपला

चार दशके गाजविणारी मराठी अभिनेत्री

0


मराठी चित्रपट सृष्टीतील एक जबरदस्त,भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री जयश्री गडकर. अभिनेत्री, निर्माती,दिग्दर्शक,लेखक,उत्तम नृत्य कौशल्य अशा विविधांगी कलागुणांनी निपून अशा जयश्री गडकर यांचा आज २९ ऑगस्ट हा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना ही भावपूर्ण शब्दसुमनांजली…

मला आठवतं लहानपणी म्हणजे स्वतंत्ररित्या मी ज्या वेळेस चित्रपट पाहू लागलो, त्यावेळी बीड येथील अशोक टॉकीज मध्ये “हर हर महादेव’ हा चित्रपट पाहिला.या धार्मिक चित्रपटात महादेवाच्या भूमिकेत दारासिंह तर पार्वतीच्या भूमीकेत जयश्री गडकर होत्या. त्यांनी साकारलेले पार्वतीमातेचे रूप,ते सौंदर्य, ती भूमिका माझ्या मनावर खूप बिंबली. कदाचित बालवयाचा तो परिणाम असावा.. पुढे मी त्यांना ज्या वेळी प्रत्यक्ष भेटलो त्यावेळी हर हर महादेव चा उल्लेख करून त्या भूमिके बद्दल बोललो. हा योग मला १९९३आला.

सासर माहेर या मराठी चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूर येथील पॅलेस मध्ये सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग कव्हरेज करण्यासाठी खास मुंबईहून काही पत्रकार कोल्हापूरला आले होते त्यात लोकमत साठी मी देखील होतो. चित्रपटात अशोक सराफ, डॉ.निशिगंधा वाड, अशोक शिंदे, बाळ धुरी स्वप्नगंधा, नेहा बोरगावकर तसेच पाहुणा कलावंत म्हणून माझा मित्र दिपक देऊळकर होता. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन करत होत्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयश्री गडकर. मातब्बर मराठी, हिंदी दिग्दर्शकानं सोबत काम केलेल्या जयश्रीबाईंचा दिग्दर्शक म्हणून हा जरी पहिलाच चित्रपट असला तरी आपल्या कलेशी प्रचंड प्रामाणिक असल्यामुळे एखाद्या मुरब्बी दिग्दर्शकाप्रमाणे त्यांनी पटापट त्या दिवशीचे दोन-तीन सीन संपविले. सेटवर सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती होती हे मला त्यादिवशी दिसले.त्यानंतर मग पत्रकारांशी गप्पा वगैरे झाल्या.अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही बाबी कशा वेगवेगळ्या आहेत हे त्या सेटवर तर मी अनुभवल्या. प्रत्यक्ष बोलताना देखील जयश्रीबाईंनी याचं सुरेख विश्लेषण केलं. पुढे त्यांनी अशी असावी सासू या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केली.
जयश्री गडकर यांचा जन्म २१ मार्च १९४२. कारवार जवळील कणसगिरी या गावचा. कणसगिरी (सदाशिवगड) हा भाग पूर्वीच्या कारवार जिल्ह्यातील पण तो आता कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात येतो.
लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. याला योगायोगच म्हणावा लागेल की,चित्रपती व्ही. शांताराम यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटातून १९५५ यावर्षी नृत्य कलाकार म्हणून पहिल्यांदा त्यांनी रुपेरी पडद्यावर आपले आगमन केले.
लोकप्रिय मराठी अभिनेत्री
सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी दिसतं तसं नसतं या चित्रपटातून छोट्याशा भूमिकेसाठी जयश्री बाईंना संधी दिली. राजा गोसावी यांच्या सोबत या चित्रपटातील काम होतं. त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. जयश्रीबाईंचे काम दिनकर पाटलांना आवडले आणि त्यांनी सांगते ऐका या महत्त्वाच्या चित्रपटातून पुढे त्यांना प्रमुख भूमिका दिली. हा तमाशाप्रधान चित्रपट होता. या चित्रपटाने मोठा इतिहास घडविला हे सर्वश्रुत आहे. त्या नंतर चित्रपटांचा हा प्रवास जोरदारपणे सुरू झाला.
जवळपास २५० चित्रपटातून जयश्रीबाईंनी काम केले. चार दशके त्यांनी गाजवली. त्यांनी केलेल्या काही प्रमुख चित्रपटांची नावे घ्यायची ठरली तर ती सुगंधी कट्टा,सांगते ऐका, साधी माणसं, मोहित्यांची मंजुळा, घरकुल, सून लाडकी या घरची, पंढरीची वारी, कसं काय पाटील बर हाय, का थांब लक्ष्मी कुंकू लावते, पवनाकाठचा धोंडी, जिद्द, आई मला क्षमा कर, लाखात मी देखणी, मल्हारी मार्तंड, मानिनी, वैशाख वणवा, गण गौळण, एक गाव बारा भानगडी, नया कदम, मास्टरजी, श्रवण कुमार, विर भिमसेन, शेर शिवाजी, नजराना, मायाबाजार, ईश्वर, लव कुश, पत्तो की बाजी, कृष्णा कृष्णा अशी एकापेक्षा एक सुपरहिट आहेत.
तमाशाप्रधान चित्रपटातून सुरुवातीला काम केलेल्या जयश्रीबाईंनी पुढे उत्तम असे धार्मिक चित्रपट देखील केले. तसेच त्यांच्या सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी स्वीकारले. प्रत्येक चित्रपटांतून त्यांचा अभिनय सरसच ठरला. त्यामुळे लोकप्रिय व यशस्वी मराठी अभिनेत्री चे मोठे बिरूद त्यांना लाभले. मराठी व हिंदी दोन्ही भाषेतून चित्रपट केले. अरुण सरनाईक, रमेश देव, सूर्यकांत, डॉ.श्रीराम लागू ,दारासिंग, चंद्रकांत यांच्यासमवेत त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.
कौशल्यामाता
१९८७ मध्ये रामायण या दूरदर्शन वरील मालिकेने तमाम भारतीयांना मोठी भुरळ पाडली होती. रामानंद सागर उर्फ पापाजी निर्मित या मालिकेत जयश्रीजींनी कौशल्यामातेची भूमिका केली होती तर त्यांचे पती अभिनेते बाळ धुरी हे राजा दशरथ झाले होते.
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर पाच वेळेस महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेल्या जयश्री गडकर यांनी ‘अशी मी जयश्री’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.
आपल्या अप्रतिम अभिनयाने अजरामर झालेल्या जयश्री गडकर यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी २९ ऑगस्ट २००८ रोजी या जगातून एक्झीट घेतली. उत्तम व उत्कट अभिनयाचे एक पर्व संपले.
जयश्री गडकर यांची काही गाजलेली गाणी…
१)नाचू किती नाचू किती कंबर लचकली..सुगंधी कट्टा
२) बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला.. सांगते ऐका
https://youtu.be/eGnBa-YZHAU
३)पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..मल्हारी मार्तंड
https://youtu.be/5iz3LC_ksVE
४) सोळा वरीस धोक्याचं.. सवाल माझा ऐका
https://youtu.be/pTxjlTreYtg
५) राजाच्या रंग महाली…
साधी माणसं.
https://youtu.be/C6AM-9rzKoQ
६) ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे…साधी माणसं.
https://youtu.be/TO2qfDxvVDo
७) बाई मी पतंग उडवीत होते.. लाखात मी देखणी
https://youtu.be/eEPsgXHLTtY
८) कशी गवळण राधा बावरली..एक गाव बारा भानगडी
https://youtu.be/_MhTSE3or6w
९) राया आता रिक्षा होऊ दे सुरू… एक गाव बारा भानगडी
१०) पप्पा सांगा कुणाचे….घरकुल

डॉ. राजू पाटोदकर, मुंबई.

“जनतेला स्वतःच मंदिराची कुलुपे तोडायला भाग पाडू नका’-भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक

0

पुणे-“महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे” या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी पुणे पुणे शहराच्या वतीने या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन दोनशेच्या पेक्षा जास्त धर्मस्थळा समोर भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. “मद्यालय खुली आणि देवालय बंद” या ठाकरे सरकारच्या अत्यंत जुलमी कार्यपद्धतीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या आंदोलनातून तीव्र रोष व्यक्त केला.

पुणे शहर भाजपा अध्यक्ष श्री जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पर्वती मतदार संघातील सारसबाग सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारला जाग यावी आणि देवालय सुरू करण्याची बुद्धी या सरकारला मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शाहीर श्रीकांत रेणके आणि त्यांचे सहकारी यांनी गोंधळ सादर केला.

सर्व धर्मस्थळे नागरिकांसाठी ताबडतोब खुली करावीत अशी मागणी श्री जगदीश मुळीक यांनी यावेळी केली. अन्यथा सर्वसामान्य पुणेकर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला यापुढे अजून प्रखर आंदोलन उभे करावे लागेल. तसेच सर्वसामान्य जनतेच्या संयमाची परीक्षा ठाकरे सरकारने घ्यायचा प्रयत्न करू नये. जनतेचा धीर सुटला तर जनता स्वतः मंदिरे व सर्व धर्मस्थानांची कुलपे तोडायला उद्युक्त होईल असा इशारा श्री जगदीश मुळीक यांनी दिला.

यावेळी महापौर श्री मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी ताई मिसाळ, आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती ताई शेंडगे, माजी मंत्री दिलीप कांबळे, पुणे शहर सरचिटणीस श्री राजेश पांडे, श्री गणेश घोष, श्री राजेश येनपुरे आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कॅन्टोनमेंट मतदारसंघाचे आमदार श्री सुनील कांबळे यांनी वानवडी येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केले. शिवाजीनगर मतदार संघात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली कमला नेहरू पार्क जवळील दत्त मंदिरासमोर घंटानाद करण्यात आला.