Home Blog Page 2468

सैनिकी मुलींचे वसतीगृहाकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पहारेकरी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0


पुणे दि.1:- पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुलींचे वसतीगृहाकरीता तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने, पहारेकरी 01 पद भरण्यात येणार आहे. सदरचे पद हे कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर आहे. तरी इच्छुकांनी आपले आर्जासह सोमवार दिनांक 21 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,पुणे येथे सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर रहावे.
इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे 020-26122287 वर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

0


पुणे दि.1:- महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील पात्र पथविक्रेते यांनी केद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
केविड-19 साथरोग व त्यामुळे लॉकडाऊन व इतर उपाययोजनांमुळे पथविक्रेते व फेरीवाले यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील पथविक्रेते यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पुरवठा योजनेची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी मार्गदर्शक सूचना नगरविकास विभागाचे उपसचिव शं.त्र्यं.जाधव यांनी दिल्या आहेत.
या योजनेचे उद्दिष्ट पुढील प्रमाणे :- रुपये 10 हजार पर्यंतचे खेळते भांडवली कर्ज उपलब्धतेसाठी सुलभीकरण करणे, नियमीत परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देणे, डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे. या योजनेसाठी दि. 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वी शहरात पथविक्री करणारे पथविक्रेते पात्र असतील. या योजनेत नागरी पथविक्रेते 1 वर्षांच्या परतफेड मुदतीसह रुपये 10 हजार पर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेणेस व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. कर्जासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था, बँक कोणत्याही प्रकारचे तारण घेणार नाही. विहीत कालावधीत परतफेड केल्यास पथविक्रेते पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. याबाबत व्याजदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील. लाभार्थ्यांनी विहीत कालावधीत कर्ज परतफेड केल्यास ते 7 टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र असतील डिजीटल व्यवहार करणा-या विक्रेत्यांना मासिक कॅशबॅक रु. 50 ते रु. 100 साठी पात्र ठरतील या योजनेच्या संनियंत्रणासाठी प्रधानसचिव नवि-2 यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती व क्षेत्रीय स्तरावर महानगरपालिका आयुक्त, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पथविक्रेत्यांना याबाबत माहिती देण्यासाठी व योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नागरी संस्थांना निर्देश दिले असून याबाबत पात्र लाभार्थी यांनी संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत. या योजनेचे किमान उद्दिष्ट महानगरपालिकेस शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने न.प.निहाय विभागून देण्यात आले आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 56 हजार 450, एकुण 6 हजार 343 रुग्णांचा मृत्यू

0

1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,

विभागात कोरोना बाधित 2 लाख 37 हजार 936 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

   पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  2 लाख 37 हजार 936 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   56 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण   2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.61  टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण 1  लाख 70  हजार  314  रुग्णांपैकी  1 लाख 32 हजार    601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 33  हजार 697  आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार   16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.36 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.86  टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 13  हजार 997 रुग्णांपैकी 7  हजार 592  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  6 हजार 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 397 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18  हजार 164  रुग्णांपैकी 13 हजार 563  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 859 आहे. कोरोनाबाधित एकूण 742 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  11  हजार 778  रुग्णांपैकी  6 हजार 338  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4  हजार  975 आहे. कोरोनाबाधित एकूण 465  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 23  हजार 683  रुग्णांपैकी 14  हजार  49 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  7 हजार  911 आहे. कोरोनाबाधित एकूण 723  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 82  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 933सातारा जिल्ह्यात 489सोलापूर जिल्ह्यात 363सांगली जिल्ह्यात 686  तर कोल्हापूर जिल्ह्यात 611 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 10 लाख 86 हजार 765 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2  लाख 37  हजार 936  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

2 सप्टेम्बर पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतुकीस मुभा, हॉटेल्सना सुरु करण्यास परवानगी,मिशन बिगिन अगेन – नियमावली जाहीर

0

मुंबई, दि. ३१ : मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत  व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापी, खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजेसचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी शासकीय कार्यालयांमध्ये अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचीत करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितक्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.

खाजगी कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार ३० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय आणि खाजगी कार्यालये आणि आस्थापना यामध्ये निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारिरीक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.

आता आंतरजिल्हा प्रवासी व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळ्या व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय त्यासाठी ई-परमिट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.

मिशन बिगिन अगेन – नियमावली जाहीर

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेनअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी विविध सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.    

कोवीड विषाणू नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावरील सूचना

• मास्कचा वापर- सार्वजनिक ठिकाणे, कार्यस्थळे या ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.

• सामाजिक अंतर पाळणे (सोशल डिस्टंसिंग) : प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून किमान 6 फुटाचे (दो गज की दूरी) अंतर राखावे.

• ग्राहक सुरक्षित अंतर राखतील याची दुकानदारांनी काळजी घ्यावी, दुकानांमध्ये एका वेळी 5 व्यक्तिंपेक्षा अधिक ग्राहकांना प्रवेश देऊ नये.

• जमावाबाबतची बंधने : मोठ्या प्रमाणावर जमाव होऊ शकणारे समारंभ/सभा आदींना यापुढेही प्रतिबंध राहील. विवाह सोहळ्याला 50 पेक्षा अधिक अधिक अभ्यागतांना आमंत्रित करता येणार नाही. अंत्यसंस्कार आणि त्यासंबंधित विधींना 20 पेक्षा अधिक व्यक्तींना सहभागाची परवानगी नसेल.

• सार्वजनिक ठिकाणी थुंकणे शिक्षापात्र असून त्यासाठी संबंधित प्राधिकरणाचे कायदे, नियम, नियमनानुसार असलेला दंड लागू राहील.

• सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

कामाच्या ठिकाणी पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना :

• घरातून काम (वर्क फ्रॉम होम) :  शक्यतोवर  घरातूनच काम करण्याची पद्धत अवलंबली पाहिजे.

• कार्यालये, कामाची जागा, दुकाने,  बाजारपेठ, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये कामाचे/ व्यवसायाच्या वेळेचे विभाजन करण्याचा नियम पाळला पाहिजे.

• तपासणी व स्वच्छता – कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी .

• संपूर्ण कामाची जागा, सामान्य सुविधा आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींची/ वस्तूंची वारंवार स्वच्छता करण्यात यावी. शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक शिफ्टनंतर दरवाज्याचे हॅन्डल इत्यादी गोष्टींची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

• सुरक्षित अंतर –  कामाच्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी / कामगारांमध्ये प्रत्येक  शिफ्टच्या वेळांमध्ये पुरेसे अंतर ठेवून काम करतील. तसेच भोजनाच्या वेळांमध्ये सुयोग्य अंतर राहील याची दक्षता संबंधीत आस्थापना प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे.

कंटेनमेंट झोन्स –

· दि. १९ मे २०२० आणि २१ मे २०२० रोजीच्या आदेशान्वये वर्गीकृत केलेले कंटेनमेंट झोन्स हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.

· कंटेनमेंट झोन निश्चित करणे आणि त्याचे संनियंत्रण करण्याबाबत केंद्र शासन आणि राज्य शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश कायम राहतील.

· या कालावधित विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन एखाद्या विशिष्ठ भागात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त त्यांच्या क्षेत्रात आवश्यक निर्बंध घालू शकतील. मुख्य सचिव यांच्या मान्यतेने अत्यावश्यक नसलेल्या कामांसाठी तसेच नागरिकांच्या चलनवलनास प्रतिबंध घालू शकतील.

राज्यभरात निर्बंध कायम असलेल्या कृती –

· शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाला संमती असेल व त्यास प्रोत्साहन दिले जाईल.

· चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, करमणुक केंद्रे, थिएटर्स (मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेसमधील थिएटर्ससह), बार, सभागृहे, असेंब्ली हॉल्स आणि यासारखी ठिकाणे बंद राहतील.

· केंद्रीय गृह विभागाने संमती दिलेली वगळून प्रवाशांची इतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद राहील.

· मेट्रो रेल्वे बंद राहतील.

· सामाजिक, राजकीय, क्रिडाविषयक, करमणूकविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठे सभा, समारंभ बंद राहतील.   

· या आदेशापूर्वी संमती देण्यात आलेली सर्व अत्यावश्यक दुकाने खुली राहतील.

२ सप्टेंबर २०२० पासून पुढील कृतींना संमती देण्यात येत आहे.

• यापुर्वी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमधील शिथिलता आणि मार्गदर्शिकेनुसार अत्यावश्यक नसलेल्या सेवांची दुकाने सुरु राहतील. मद्याची दुकाने सुरु राहतील.

• हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना १०० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. यासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतांबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येईल.

• सर्व राज्य सरकारी कार्यालये (अत्यावश्यक सेवा, आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न आणि नागरी पुरवठा, एफसीआय, एनवायके, महापालिका सेवा यांना वगळून) पुढील प्रमाणे सुरु राहतील.

– संपूर्ण महाराष्ट्रासाठी अ व ब गटातील अधिकाऱ्यांची यापुढे १०० टक्के उपस्थिती राहील.

– इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पुढील प्रमाणे राहील –  
– मुंबईसह महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि वेळोवेळी सूचीत करण्यात आलेल्या इतर महापालिका क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचारी किंवा किमान ३० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितकी उपस्थिती राहील.

– उर्वरित महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी किंवा किमान ५० कर्मचारी यापैकी जे जास्त असेल तितकी उपस्थिती राहील.

– प्रत्येक कार्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच  बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ थर्मल स्कॅनिंग (शरीराचे तापमान मोजणे), हात धुणे आणि सॅनिटायझरची व्यवस्था करावी. कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करुन देण्यात यावेत.

– खाजगी कार्यालयांमध्ये गरजेनुसार ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील.

– शासकीय तसेच खाजगी कार्यालयात निरीक्षण अधिकारी (व्हिजिलंट ऑफिसर)ची नियुक्ती करणे आवश्यक करण्यात आले असून हा अधिकारी सॅनिटायझेशन, शारिरीक अंतर आणि इतर सुरक्षाविषयक उपयायोजनांकडे लक्ष पुरवेल.

· आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. वेगवेगळया व्यापारी करारानुसार शेजारी राष्ट्रांमधून मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाहीत. शिवाय वाहन किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तिंना ई – परमीट / संमती / स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नाही.

· खाजगी बस / मिनी बस आणि इतर साधनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) परिवहन आयुक्त यांच्याकडून जारी करण्यात येईल.

· कोणत्याही निर्बंधाशिवाय आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील.

· सार्वजनिक आणि खाजगी वाहनांमध्ये पुढीलप्रमाणे संमती देण्यात येत आहे. टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर यांना फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक २ या प्रवासी क्षमतेनुसार, चारचाकी वाहनामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठी १ अधिक ३ या प्रवासी क्षमतेनुसार तर दुचाकीसाठी १ अधिक १ प्रवासी क्षमतेनुसार (हेल्मेट आणि मास्कसह) चालवण्याची परवानगी राहील. वाहनांमध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य राहील.

· ६५ वर्षावरिल ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ति, गरोदर महिला आणि १० वर्षाखालील मुलांना अत्यावश्यक बाब किंवा आरोग्यविषयक बाबीसाठी बाहेर पडण्याशिवाय इतर वेळी घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

· मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेविषयक काळजी घेणे आदी आवश्यक खबरदारीसह अत्यावश्यक नसलेल्या बाबींसाठीही व्यक्ती प्रवास करु शकतात.

· परदेशी नागरिकांसाठी पारगमन (ट्रांझीट) व्यवस्था, कामगारांची वाहतूक, इंडियन सी-फेअर्सचे साईन ऑन आणि साईन ऑफ, अडकलेले मजूर, यात्री, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तिंची वाहतूक, देशाबाहेर अडकलेले भारतीय नागरीक, रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक, रेल्वेने राज्यात येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक, कार्यालये, कामाची ठिकाणी, कारखाने आणि आस्थापना यामध्ये सामाजिक अंतर, हॉटेल आणि लॉजेसचे कार्यान्वयन, राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची हाताळणी, राज्यात येणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांची हाताळणी, लग्न समारंभ, केशकर्तनालये, सलून्स, ब्युटी पार्लर्स, एसटी बसेसची वाहतूक आदींबाबत राज्य किंवा केंद्र शासनामार्फत लागू करण्यात आलेल्या कार्यप्रणालीस (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अनुसरुन या बाबी सुरु राहतील.

· यापुर्वी परवानगी देण्यात आलेल्या इतर कृती सुरु राहतील.     

· नियमावली व कार्यप्रणालीचा (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) अवलंब करुन प्रतिबंधित राहिलेल्या बाबी टप्प्याटप्याने सुरु केल्या जातील किंवा निर्बंध उठवले जातील.

राज्यात आज ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान,एकूण १ लाख ९४ हजार ५६ रुग्ण ॲक्टिव्ह

0

मुंबई, दि.३१: राज्यात आज कोरोनाचे ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले तर ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४  हजार ५६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले ११,८५२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले १८४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-११७९ (३२), ठाणे- २२१ (१०), ठाणे मनपा-२०७ (९), नवी मुंबई मनपा-३०४ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५९ (१), उल्हासनगर मनपा-५५ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१०, मीरा भाईंदर मनपा-१३२, पालघर-८२ (२), वसई-विरार मनपा-१५९ (१), रायगड-२७२, पनवेल मनपा-१९१ (१), नाशिक-२०२ (१), नाशिक मनपा-६५१ (२), मालेगाव मनपा-४२, अहमदनगर-१८० (२),अहमदनगर मनपा-५७  (१), धुळे-११३ (२), धुळे मनपा-६८ (१), जळगाव- ४६२ (१०), जळगाव मनपा-१४४ (१), नंदूरबार-१०५, पुणे- ४६४ (२), पुणे मनपा-८७५ (७), पिंपरी चिंचवड मनपा-५९२, सोलापूर-२२२ (३), सोलापूर मनपा-४४ (१), सातारा-४२२(७), कोल्हापूर-३२० (१५), कोल्हापूर मनपा-१९६ (४), सांगली-४४६ (५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३०१ (१), सिंधुदूर्ग-१३६, रत्नागिरी-८२ (१), औरंगाबाद-१९३ (२),औरंगाबाद मनपा-१८८ (२), जालना-९३ (२), हिंगोली-५९, परभणी-३९, परभणी मनपा-३९, लातूर-१२१ (३), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१३२ (६),बीड-९४ (३), नांदेड-१२५ (४), नांदेड मनपा-१४९ (४), अकोला-३, अकोला मनपा-७, अमरावती-३२, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-३७ (३), बुलढाणा-६६ (१), वाशिम-४ (१) , नागपूर-१५६ (३), नागपूर मनपा-६४५ (१२), वर्धा-५, भंडारा-२३, गोंदिया-२९ (१), चंद्रपूर-४४ (१), चंद्रपूर मनपा-१११ (१), गडचिरोली-६, इतर राज्य १२.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४५,८०५) बरे झालेले रुग्ण- (१,१७,२६८), मृत्यू- (७६५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,५५१)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,३२,६४०), बरे झालेले रुग्ण- (१,०७,४५५), मृत्यू (३८०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,३७५)

पालघर: बाधित रुग्ण- (२५,४९१), बरे झालेले रुग्ण- (१८,२११), मृत्यू- (५९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६८९)

रायगड: बाधित रुग्ण- (३०,२८२), बरे झालेले रुग्ण-(२४,१५६), मृत्यू- (७८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३४३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४१६६), बरे झालेले रुग्ण- (२४२२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१२८५), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६००)

पुणे: बाधित रुग्ण- (१,७५,१०५), बरे झालेले रुग्ण- (१,१८,३२४), मृत्यू- (४०६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२,७१२)

सातारा: बाधित रुग्ण- (१३,९६३), बरे झालेले रुग्ण- (८३२४), मृत्यू- (३४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२९७)

सांगली: बाधित रुग्ण- (१३,२७२), बरे झालेले रुग्ण- (७५७७), मृत्यू- (४२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२६८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२२,४७९), बरे झालेले रुग्ण- (१५,०५१), मृत्यू- (६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७८२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (१९,५६६), बरे झालेले रुग्ण- (१४,०८६), मृत्यू- (७६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१६)

नाशिक: बाधित रुग्ण- (३९,८३५), बरे झालेले रुग्ण- (२७,३५४), मृत्यू- (८६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,६१४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२०,३६७), बरे झालेले रुग्ण- (१६,००४), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४०६९)

जळगाव: बाधित रुग्ण- (२७,४३४), बरे झालेले रुग्ण- (१९,१९४), मृत्यू- (८५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३८२)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२७५४), बरे झालेले रुग्ण- (१३६६), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१४)

धुळे: बाधित रुग्ण- (७८६२), बरे झालेले रुग्ण- (५८७७), मृत्यू- (२१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७७०)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२३,१०९), बरे झालेले रुग्ण- (१७,६२१), मृत्यू- (६६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२२)

जालना: बाधित रुग्ण-(४३४६), बरे झालेले रुग्ण- (२९३४), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८०)

बीड: बाधित रुग्ण- (४८१०), बरे झालेले रुग्ण- (३२६३), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२३)

लातूर: बाधित रुग्ण- (८००९), बरे झालेले रुग्ण- (५०२४), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७१२)

परभणी: बाधित रुग्ण- (२६३३), बरे झालेले रुग्ण- (१२२२), मृत्यू- (७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१५०८), बरे झालेले रुग्ण- (११२०), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५३)

नांदेड: बाधित रुग्ण- (७१६७), बरे झालेले रुग्ण (३३६१), मृत्यू- (२२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५९१२), बरे झालेले रुग्ण- (३९२३), मृत्यू- (१५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३१)

अमरावती: बाधित रुग्ण- (५१८७), बरे झालेले रुग्ण- (३८८४), मृत्यू- (१३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११७३)

अकोला: बाधित रुग्ण- (३८६९), बरे झालेले रुग्ण- (३०१२), मृत्यू- (१५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०१)

वाशिम: बाधित रुग्ण- (१७०७), बरे झालेले रुग्ण- (१३६१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३३७८), बरे झालेले रुग्ण- (२१७५), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२९)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३२१३), बरे झालेले रुग्ण- (२०५०), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०८८)

नागपूर: बाधित रुग्ण- (२८,०४२), बरे झालेले रुग्ण- (१५,६०७), मृत्यू- (७३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,७०१)

वर्धा: बाधित रुग्ण- (८९०), बरे झालेले रुग्ण- (४८४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१०८७), बरे झालेले रुग्ण- (६१७), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (८८१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७०)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२३७०), बरे झालेले रुग्ण- (१०९६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (७८९), बरे झालेले रुग्ण- (५९०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९८)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६९)

एकूण: बाधित रुग्ण-(७,९२,५४१) बरे झालेले रुग्ण-(५,७३,५५९),मृत्यू- (२४,५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४३),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,९४,०५६)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण १८४ मृत्यूंपैकी १४३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९ मृत्यू ठाणे – ६, पुणे -१, औरंगाबाद -१ आणि मुंबई -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

गोव्याच्या सीमा आणि बार मंगळवारपासून सुरु

0

पणजी- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गोवाच्या सीमा मंगळवार (ता.1) पासून खुल्या केल्या जातील. बारही सुरु केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी रात्री पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केली जाणार नाही, असे ते म्हणाले. शाळा सुरु करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, सप्टेंबरनंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, आरोग्य सचिव नीला मोहनन यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की कोविड इस्पितळातील खाटा भरल्या असून, फोंडा येथे कोविड रुग्ण पाठवणे आजपासून सुरु करण्यात आले आहे.

पुण्यातील स्मार्ट सिटी योजनेतील कामाचे सोशियल ऑडिट होणे आवश्यक. -आबा बागुल

0

पुणे –
शहरांमधील विकास कामांना चालना मिळावी व निधी अभावी आकारास न आलेले मोठे विकास प्रकल्प राबवावे.  या स्मार्ट सिटी योजनेच्या उद्धेशाची पुण्यात पायमल्ली झाली असून,स्मार्ट सिटी योजने अंतर्गत आत्तापर्यंत केलेली कामे,त्यांची उपयुक्तता, लागलेला कालावधी व खर्च झालेला निधी याचे सोशियल ऑडिट करून ते पुणेकरांपुढे मांडले जावे. अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन जल शुद्धीकरण व मैल शुद्धीकरण प्रकल्प ,सुरक्षित व वेगवान वाहतुकीसाठी उन्नत मार्ग, रेल्वे  व लोकल रेल्वेसाठी नवीन टर्मिनल्स, सोलर सिटी प्रकल्प, मुठा नदी सुधारणा असे अनेक महत्वकांक्षी व मोठ्या खर्चाचे प्रकल्प स्मार्ट सिटी योजने अंतर्गत होणे अपेक्षित असताना फुटपाथ रुंदीकरण,वृक्षारोपण अशी पुणे महानगरपालिका करीत असलेल्या कामांची पुनरावृत्ती स्मार्ट सिटी योजनेत होत असेल तर त्याचा पुणेकरांना नक्की फायदा काय झाला हा प्रश्न पडला आहे. आणि त्या साठीच स्मार्ट सिटी योजने अंतर्गत केलेल्या कामांचे सोशियल ऑडिट होणे गरजेचे आहे. तसेच या योजने अंतर्गत कोणते मोठे प्रकल्प हाती घेतले जावेत. यासाठी पुणेकरांचा सहभागही त्यामध्ये असला पाहिजे. केवळ चांगले मानांकन मिळावे. हा उद्धेश न ठेवता शहरासाठी आवश्यक मोठ्या खर्चाच्या मोठ्या योजना आखून त्याची पूर्तता करणे हेच स्मार्ट सिटी योजनेचे उद्दिष्ट असले पाहिजे .मात्र हे होत नासल्यामुळे सोशियल ऑडिटची मागणी केली आहे असेही आबा बागुल म्हणाले. 

शिवाजी दौंडकर नवे नगरसचिव

0

पुणे- महापालिकेच्या सेवेत स्टेनो म्हणून १९८७ ला दाखल झालेल्या शिवाजीराव दौंडकर यांच्याकडे आता नगरसचिव पदाची सूत्रे देण्यात आली आहेत . आज या पदाचा अतिरिक्त पदभार दौंडकर यांनी निवृत्त नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडून स्वीकारला . पारखी आज निवृत्त झाले. या प्रसंगी उपनगर सचिव शेवाळे उपस्थित होते जे पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत .

शिवाजी दौंडकर यांनी अस्थापना , शिक्षण , आयातकर , कामगार कल्याण आदी विभागात आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे . तत्कालीन अतिरिक्त आयुक्त दीपक कपूर यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केले तेव्हा त्यांच्या कामाचा विशेष गौरव हि झाला होता . आता पारखी यांच्या नंतर दौंडकर हे नगरसचिव पदाची सूत्रे कशा पद्धतीने हाताळतील याबाबत अनेकांना उत्सुकता लागून आहे. नगरसचिव हे पद महापालिकेतील आयुक्तांच्याच जबाबदारी प्रमाणे महत्वाचे पद असून महापालिकेची स्थायी समिती , मुख्य सभा या सर कायदेशीर रित्या चालविण्याची मुख्य जबाबदारी नगरसचिव यांची असते. सत्ताधारी, विरोधकांच्या राजकीय खेळीत मोठ्ठी तारेवरची कसरत करत आणि मानसिक दृष्ट्या खंबीर राहून,कुणाच्याही दबावाला बळी न पडता ,अगर न भिता आणि कोणाच्याही बाजूने न झुकता ,कायदेशीर प्रमाण पाहूनच या पदावर काम करावे लागते . याबाबत आता दौंडकर यांची कसोटी लागणार आहे.

नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास परवानगी,प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

0

मुंबई-राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक-4 च्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, मार्च महिन्यापासून सुरू असलेली जिल्हा बंदी अखेर उठवली आहे. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसेल.शिवाय हॉटेल ,लॉजेस हे सुरु करता येतील .

राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार, हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास परवानगी असेल. परंतू, अद्याप मेट्रो आणि सिनेमा गृहांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्याने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.

जाणून घ्या अनलॉक-4 मध्ये काय सुरू आणि काय बंद?

  • शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच
  • 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रोला लाल सिग्नल
  • चित्रपटगृह 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार
  • मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
  • राज्यातील हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार
  • खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
  • टॅक्सी – 1+3 प्रवासी, रिक्षा – 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी

अकार्यक्षमतेचा कहर- मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर अजून झालाच नाही!

0
  • चंद्रकांत (दादा) पाटील, प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र, भाजपा

पुणे -कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये पीएम केअर फंडमुळे देशभरातील अनेक लोकांना आधार मिळाला. एकीकडे पीएम केअर फंडच्या माध्यमातून लोकांना सतत मदत केली जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा अद्यापही वापर झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुख्यमंत्र्यांनी आम्ही इतक्या चाचण्या केल्या, आम्ही हे सर्वप्रथम केलं, आम्हीच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, असा कांगावा केला होता. मात्र सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, मृत्युदर वाढत असताना राज्य शासनाचा अपयशी कारभार निदर्शनास येत आहे. वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ५५० कोटी रुपये जमा झाले होते, मात्र आतापर्यंत केवळ १३२ कोटी २५ लाख रुपयांचा वापर करण्यात आला आहे, ही मदत सुद्धा केवळ स्थलांतरित मजुरांना केली गेली. आज जेथे राज्यात नागपूर, पुणे, संभाजी नगर आणि अनेक शहरांमध्ये नागरिक कोरोनाच्या युद्धात लढताना कमजोर पडत आहेत, कारण त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. दुसरीकडे राज्यभरात गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही शासनाने या रक्कमेचा रुग्णांसाठी तसेच इतर सुविधा पुरवण्यासाठी वापर का केला नाही? ज्याठिकाणी जास्त गरज आहे, तिथे एक दमडीसुद्धा या साहाय्यता निधीमधून देण्यात आली नाही, जी फार लज्जास्पद बाब आहे.

गेल्या ४ ते ५ महिन्यात राज्य शासनाकडून या साहाय्यता निधीतून कोणत्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या, यावर शंका उपस्थित होते. या निधीतुन केवळ एका 16 कोटींच्या प्लाजमा थेरपीसाठी आणि 20 कोटी मुंबईतील एका रुग्णालयाला दिले गेले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत आहे, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व लक्षात घेता चाचण्या वाढवणं आणि बेड्सची निर्मिती करणं, व्हेंटिलेटर्स
उपलब्ध करणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मात्र यादेखील शासनाकडून योग्यरित्या केल्या गेल्या नाहीत, करण्याची गोष्टदेखील दूर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वाळूजमध्ये एका कोरोना संशयित वृद्ध महिलेला झाडाखाली ऑक्सिजन सिलेंडर लावून बसवण्यात आलं होतं, इतकी वाईट परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे. हे सरकार जनतेची मदत न करता, त्यांची पर्वा न करता केवळ त्यांच्या जीवाशी खेळत आहे, जनता सर्व पाहत आहे.

गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील 4,300 कोटी रुपयांच्या अकरा महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन व कोनशिला समारंभ

0

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग तसेच सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील 11 महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन व कोनशिला समारंभ उद्या होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आभासी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राहाणार असून,  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग (निवृत्त), उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, तसेच राज्यातील इतर मंत्री, खासदार, आमदार व केंद्र तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उद्या उद्‌घाटन होणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या 363 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधणी मूल्य रु. 4,281 कोटी आहे. या रस्त्यामुळे उत्तर प्रदेशातील दळणवळणाच्या दर्जात सुधारणा होईल, तसेच राज्याच्या आर्थिक विकासाचा मार्ग खुला होईल. या रस्त्यामुळे विशेषतः इतर राज्यांकडे दुतर्फा होणाऱ्या प्रवासी तसेच मालवाहतुकीत सुधारणा होईल. चांगल्या दर्जाच्या रस्त्यांमुळे वेळ व इंधन खर्चात बचत तर होईलच व वायुप्रदूषण पातळी देखील खाली येईल. शिवाय या प्रकल्पांमुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होऊन आसपासच्या शहरातली गर्दीही कमी होईल. एकूणच रस्ते वाहतुकीच्या दर्जात सुधारणा होईल.

खादी मास्कची लोकप्रियता वाढली; केव्हीआयसीला रेडक्रॉस सोसायटीकडून 10.5 लाख फेस मास्कसाठी पुन्हा ऑर्डर मिळाली

0

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केव्हीआयसी) भारतीय रेडक्रॉस सोसायटीकडून (आयआरसीएस) 10.5 लाख उच्च दर्जाच्या  फेस मास्कचा  पुरवठा करण्याबाबत पुन्हा ऑर्डर मिळाली असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. नवीन खरेदीची ऑर्डर यापूर्वीच्या 1.80 लाख फेस मास्कसाठी मिळालेल्या ऑर्डरनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मिळाली आहे , त्यापैकी केव्हीआयसीने  सोसायटीला यापूर्वीच 1.60 लाख फेस मास्क पुरवले आहेत.

3.30 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर नुकतीच प्राप्त झाली आहे आणि या आठवड्यातच पुरवठा सुरू होईल. केव्हीआयसी दोन दिवसात पहिल्या ऑर्डरचा उर्वरित पुरवठा पूर्ण करेल. पहिल्या ऑर्डरनुसार पुरवलेल्या फेस मास्कप्रमाणेच दुसऱ्या ऑर्डरमधील मास्क असतील. केव्हीआयसीकडून उत्कृष्ट दर्जा आणि वेळेवर मास्क पुरवण्यात आल्यामुळे आयआरसीएसकडून पुन्हा ऑर्डर मिळाली आहे.

केंद्रीय एमएसएमई मंत्री  नितीन गडकरी यांनी मास्क बनवण्याच्या उपक्रमांच्या माध्यमातून देशात शाश्वत रोजगार निर्मिती केल्याबद्दल केव्हीआयसीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की फेस मास्क हे कोरोना रोगाविरूद्ध सर्वात प्रभावी संरक्षणात्मक साधन बनले आहे; त्याच्या उत्पादनामुळे कारागिरांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे .

स्थानिक निर्मितीला ही मोठी चालना आहे कारण यामुळे खादी कारागिरांसाठी जवळपास  50,000 अतिरिक्त मनुष्य दिवस रोजगार तयार होतील. या ऑर्डरच्या अंमलबजावणीसाठी हाती तयार केलेल्या सुती खादीचे 1 लाख मीटरपेक्षा जास्त कापड लागेल जे  वेगवेगळ्या राज्यांमधून विविध खादी संस्थांकडून पुरवले जाईल. यामुळे  सूतकताई आणि विणकामाला गती मिळेल आणि अशा प्रकारे कारागिरांसाठी रोजगार उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे, केव्हीआयसीला  आतापर्यंत प्राप्त झालेल्या खादी फेस मास्कच्या पुरवठ्याची ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. इतर खादी फेस मास्क प्रमाणेच आयआरसीएससाठी बनविलेले मास्क देखील धुण्यायोग्य, पुन्हा वापरण्यायोग्य, त्वचेला -अनुकूल आणि जैव विघटन करता येतील असे आहेत.

महापौर करणार प्लाझ्मा दान!

0

पुणे-

‘कोरोनाबाधित रुग्णांचा शहरातील मृत्युदर २.४० टक्के इतका असून हे प्रमाण अजून खाली आणायचे. त्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले. महापौर मोहोळ यांनी स्वतः प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने देत पुणेकरांना आवाहन केले आहे.

पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या २१० व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून यात पहिला नमुना महापौर मोहोळ यांनी दिला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक आदित्य माळवे,अविनाश बागवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हकारे, डॉ. नलिनी काहगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख, डॉ. शंकर मुगावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले, आतापार्यंत ७५० कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करण्याकरिता पुढे आल्या आहेत. शहरात ८० हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त असून प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी पुढे यायला हवे. शहराचा मृत्युदर २.४०% इतका असून हा दर बऱ्याच प्रमाणात खाली आणायचा आहे. त्याकरिता प्लाझ्मा दान ही संकल्पना व्यापक करण्यात आपण लवकरच विशेष मोहीम राबवत आहोत.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, ‘पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी हे कोरोनाविरुध्द आजपर्यंत लढत आहेत. कोरोनाच्या या लढाईमध्ये प्लाझ्मा दान हे एक सकारात्मक पाऊल आहे. पुणे मनपाचे पदाधिकारी व अधिकारी या प्लाइमा दानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करतील यात काही शंकाच नाही’

याप्रसंगी डॉ. नलिनी काडगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख यांनी प्लाझ्मा दानाविषयी माहिती दिली. त्या समवेत डॉ. शंकर मुगावे, समाजसेवा अधिक्षक तथा प्लाज्मा समन्वयक ससून हे उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष श्री. शांतीलाल मुथ्था यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रामचंद्र हकारे यांनी आभार प्रदर्शन केले व सुरेश परदेशी यांनी सुत्र संचालन केले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 217

0

पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 2 लाख 33 हजार 854 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.31 :- पुणे विभागातील 1 लाख 70 हजार 431 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 33 हजार 854 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 57 हजार 217 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 206 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.88 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 68 हजार 381 रुग्णांपैकी 1 लाख 29 हजार 629 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 809 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 943 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.99 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 508 रुग्णांपैकी 7 हजार 208 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 918 आहे. कोरोनाबाधित एकूण 382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 17 हजार 801 रुग्णांपैकी 13 हजार 221 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 844 आहे. कोरोनाबाधित एकूण 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 92 रुग्णांपैकी 6 हजार 26 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 620 आहे. कोरोनाबाधित एकूण 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 23 हजार 72 रुग्णांपैकी 14 हजार 347 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 26 आहे. कोरोनाबाधित एकूण 699 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 916 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 856, सातारा जिल्ह्यात 620, सोलापूर जिल्ह्यात 386 , सांगली जिल्ह्यात 357 तर कोल्हापूर जिल्ह्यात 697 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 68 हजार 119 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 33 हजार 854 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 30 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Jio Fiber ने लाँच केला 399 रुपयांत अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन,नवीन ग्राहकांना 30 दिवस फ्री ट्रायल

रिलायन्स जिओने सोमवारी Jio Fiber साठी नवीन स्वस्त टॅरिफ प्लॅन्सची घोषणा केली आहे. या नवीन प्लॅन्सद्वारे आता ग्राहक केवळ 399 रुपयांमध्ये अनलिमिटेड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात. कंपनीने 399 ते 1499 रुपयांदरम्यान चार नवीन प्लॅन्स आणले आहेत. यासोबतच कंपनीने Jio Fiber च्या सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल सेवा देण्याचीही घोषणा केली आहे.

399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपयांचे चार प्लॅन :-
कंपनीने 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपयांचे चार प्लॅन आणले आहेत. यात 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 एमबीपीएस डेटा स्पीड मिळेल. अशाचप्रकारे 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएस, 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 एमबीपीएस आणि 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबीपीएस डेटा स्पीड मिळेल. याशिवाय 1499 रुपयांचा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना 12 टॉप ओटीटी अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. तर, 999 रुपयांचा प्लॅन घेणाऱ्यांना 11 टॉप अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. मात्र, 399 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये ही सुविधा मिळणार नाही. सर्व प्लॅन्समध्ये फ्री व्हॉइस कॉलिंग सेवाही आहे.

30 दिवस फ्री ट्रायल :-
यासोबतच कंपनीने सर्व नवीन ग्राहकांसाठी 30 दिवस फ्री ट्रायल देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत सर्व नवीन ग्राहकांना 150 एमबीपीएस डेटा स्पीड, 4के सेट टॉप बॉक्ससोबत 10 ओटीटी अ‍ॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळेल. यामध्ये मोफत व्हॉइस कॉलिंगची सुविधेचाही ग्राहकांना लाभ घेता येईल. यावेळी बोलताना जिओचे डायरेक्टर

10 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये Jio Fiber :-
यावेळी, “जिओफायबर आधीच देशातील सर्वात मोठी फाइबर प्रोव्हाइडर असून 10 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. पण भारत आणि भारतीयांसाठी आमचं स्वप्न खूप मोठं आहे. आम्ही प्रत्येक घरापर्यंत जिओफायबर पोहोचवू इच्छितो, याद्वारे देशातील प्रत्येक कुटुंबाला सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असे जिओचे डायरेक्टर आकाश अंबानी म्हणाले.