Home Blog Page 2466

कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटल बाहेर ओपीडी सुरु करून ओपीडीतही तात्काळ उपचार सुरु करावेत -आबा बागुल

0

पुणे-

कोरोना विषाणू बाधित  रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये त्वरित वैद्यकीय उपचार सुरु होण्यासाठी हॉस्पिटलच्या   ओपीडीमध्ये देखील वैद्यकीय उपचार सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही कोविड हॉस्पिटलमध्ये ओपीडी नसून हॉस्पिटल बाहेर मंडप उभारून ओपीडी सुरु करून तेथे डॉक्टर,नर्सेस व वॉर्डबॉय यासह व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची सुविधा निर्माण करावी आणि रुग्नांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत ओपीडीमध्येच त्वरित उपचार सुरु व्हावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली. 
ते म्हणाले की , रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र मनपा,राज्य शासन आणि खासगी हॉस्पिटल्सची क्षमता कमी पडत आहे. अश्या वेळी हॉस्पिटलमध्ये  बेड मिळेपर्यंत कोरोना बाधित रुग्णांना तिष्ठत बसावे लागते.  व त्या मौल्यवान  वेळी वैद्यकीय  उपचार सुरु न झाल्यास तो रुग्ण दगावणायची भीती असते. नुकतेच  पुण्यात एक ५४ वर्षाची  महिला व एक तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत उपचार सुरु न झाल्यामुळे व हलगर्जीपणा झाल्यामुळे त्यांचा दुरदैवी मृत्यू झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. अश्या अनेक केसेस आहेत त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत त्यामुळे रुग्ण दगावतात त्याची कधीही गांभीर्याने दखल प्रशासनाने  घेतली नाही. त्यासाठीच हॉस्पिटल बाहेर ओपीडी उभारून त्यांचे त्वरित उपचार सुरु व्हावेत. व हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाल्यावर रुग्नांना शिफ्ट करावे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील याची कल्पना द्यावी. यामुळे वेळीच उपचार सुरु होऊन रुग्णांचे  प्राण वाचतील. सध्या त्या रुग्णांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नसल्यास ओपीडीत तात्पुरते उपचार सुरु करून वैद्यकीय दिलासा देण्याची गरज आहे. काही तासानंतर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाल्यावर त्या रुग्णास शिफ्ट करणे शक्य असते. यासाठीच मनपा,राज्य शासन अथवा खासगी हॉस्पिटल मध्ये ओपीडी मधेच तातडीचे वैद्यकीय उपचार अश्या रुग्नांना  मिळण्याची व्यवस्था  व्हावी.कोणालाही रुग्णालयात जागा नाही म्हणून परत पाठवू नये त्यांचे उपचार ओपीडीत सुरु करून त्यांना हॉस्पिटलमध्ये जागा झाल्यावर शिफ्ट करावे.   वेळ प्रसंगी  हॉस्पिटल बाहेर तात्पुरता मंडप उभारून तेथेही ओपीडी सुरु करता येऊ शकेल . रुग्णांना वाचवण्यासाठी मौल्यवान वेळ वाया जाऊ नये यासाठीच प्रशासनाने  याचा विचार करावा व त्वरित कृती करावी. 

ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन; १० सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

0

मुंबई, दि.३: सध्याच्या ‘कोविड-१९’ च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडिओ येत्या दि. १० सप्टेंबरपर्यंत माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उखाणा घेणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय आहे असे म्हटलयास वावगे ठरणार नाही. याच गोष्टीला नजरेसमोर ठेऊन कोविडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी राज्यातील महिलांसाठी महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्‍पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून ती नि:शुल्क आहे. ज्या महिलांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी नाविन्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मूल्य असणारे यापैकी एका उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांच्या कालावधीचा व्हिडिओ तयार करून माविमच्या जिल्हा कार्यालयाकडे दिनांक १० सप्‍टेंबर, २०२० पर्यंत पाठवावा.

स्पर्धेसाठीचे उखाणे नाविन्यपूर्ण असावेत. त्यांचा आशय सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक असावा. उखाणे हा मौखिक साहित्यिक प्रकार आहे. तरी या स्पर्धेसाठी त्यातील आशय हा प्रागतिक विचारांना पुढे नेणारा असावा. सर्वसाधाणपणे पतीच्या नावाभोवती उखाणे गुंफले जातात. पण, या स्पर्धेत समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा (विशेषत: स्त्री व्यक्तिरेखा), कोविड काळातील अत्यावश्यक सेवा यांच्यापैकी अथवा यासारखे तत्सम यांच्या भोवती उखाणे गुंफणे अपेक्षित आहे. उखाणा ‘स्त्री पुरुष समानता’ या मूल्यांचा पुरस्कार करणारा असावा. तो कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिट लांबीचा असावा. उखाणा पाठ असावा.

जिल्ह्यात प्राप्त उखाण्याची जिल्हा स्तरावर परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक आणि माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ विभागीयस्तरावर पाठविण्यात येतील. प्रति जिल्हा ६ याप्रमाणे साधारण एकूण ३६ पात्र व्हिडीओ एका विभागीयस्तरावर प्राप्त होतील ज्यामधून परीक्षकाकडून छाननी करून त्यापैकी पात्र माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ क्रमांक काढून ६ व्हिडीओ मुख्यालयाकडे पाठविले जातील. ६ विभागाचे मिळून ३६ पात्र व्हिडीओमधून राज्यस्तरावर केवळ माविमच्‍या महिलांचे ३ क्रमांक व माविमेतर महिलांचे ३ असे ६ क्रमांक काढले जातील. मात्र, विभागीय स्तरावर ३६ पात्र महिलांना स्‍पर्धेत सहभागाबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्‍यात येईल. राज्‍यस्‍तरीय विजेत्या ६  महिलांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनात उखाणा सादरीकरणासाठीची संधी देण्‍यात येईल. याशिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी माविम मुख्यालयाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री.महेंद्र गमरे (भ्रमणध्वनी क्र.९८९२५४८८५४) यांच्याशी किंवा जिल्हा कार्यालयांशी संपर्क साधावा. महामंडळाचे संकेतस्थळ http://www.mavimindia.org वर सर्व जिल्हा कार्यालयांचे संपर्क, संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व इमेल उपलब्ध आहेत.

विद्यार्थी भारतीने लढाई जिंकली आरे चे कारशेड रद्द झाले ..

0

मुंबई-

मेट्रो कारशेड बनविण्यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन सरकारने मुंबई गोरेगाव येथील आरे कॉलनी ची रातोरात जंगल तोड केली ,अनेक झाडांचा खून केला ह्या विरोधात विदयार्थी भारतीने कडाक्याचे तीव्र आंदोलन केले .आरे वाचवा चा नारा देत निदर्शने केली !
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे ची ६०० ची एकर जमीन जंगल घोषित करण्यात आली ! विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सरकारच्या निर्णया चे स्वागत केले व २००० हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती आता मात्र दुप्पट झाडे लावून त्याची मशागत करण्याची मागणी विद्यार्थी भारती संघटनेने केली आहे .
आरे जंगल नाही असा दावा तत्कालीन BJP सरकार ने केला होता , तसेच अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आरे ची तुलना बागेतल्या झाडांशी केली होती ह्या विरोधात बिग बीं च्या बंगल्या बाहेर विद्यार्थी भारती ने निदर्शनं करून बच्चन याना ऑक्सिजन ची भेट देत चांगलीच कान उघडणी केली आरे आंदोलनात विद्यार्थी भारतीच्या २२ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती तरी विद्यार्थी भारती मागे हटली नाही लढा देत राहिली मेट्रो कारशेड साठी हजारो झाडांची कत्तल करून त्यावर निर्भर असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनावर संकट आणले आरेत असणाऱ्या नानाविध प्रजातींचा गळा घोटला जाईल ! आरे वाचवा ह्या भूमिकेवर मात्र विद्यार्थी भारती संघटना ठाम राहिली व आज अखेर लढाईला यश आले असे राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितले .

जम्बो कोव्हीड सेंटरच्या व्यवस्थेच्या विरोधात पिपीएसचे आंदोलन

0

पुणे-टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर च्या व्यवस्थेच्या विरोधात पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे सोशल डिस्टंसिंग चे भान राखून आंदोलन करण्यात आले त्या कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांची व्यवस्थित रित्या देखभाल होत नाही तेथील रेंगाळलेल्या व्यवस्था यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे या सगळ्याला प्रशासन जबाबदार असून नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी बद्दल प्रशासन जबाबदार आहे सदर ठिकाणी होणाऱ्या मृत्यूबाबत प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी याठिकाणी करण्यात आली त्यावेळी पुणे शहराचे मनोज नायर,श्रीकांत शिळीमकर,गोकुळ शेलार,गुरु कोळी,स्वप्नील नाईक,विजय गावडे,अरविंद परदेशी,राजेंद्र बर्गे,रोहन मोहोळ व अक्षय बर्गे व यांच्यासह सर्व उपस्थित होते

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

0

णे दि .03 : – पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज यवत ग्रामीण रुग्णालय व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस मुख्यालयामध्ये दौंड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसिलदार एच.आर.म्हेत्रे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करुन अतिजोखमीचे आजार तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने पाळली जावीत, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदीचा अवलंब होत नसल्यास कारवाई करुन शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले, तसेच चेस दि व्हायरस या संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणा-या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहचले पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. हीच संकल्पना आपण संपूर्ण जिल्हाभर राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग
रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

१०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

0

मुंबई, दि.३: कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांच्या महिलेने कोरोनावर मात केली आहे, असा दिलासा देतानाच प्रतिकारशक्ती व मनाची इच्छाशक्ती चांगली ठेवावी असा सल्ला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत सुरू असलेल्या चर्चासत्राचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला. कोरोना: कालावधी, क्वारंटाईनचे प्रकार व काळजी याविषयी शांतीलाल मुथ्था यांनी आरोग्यमंत्र्यांशी यावेळी संवाद साधला.

आरोग्यमंत्री श्री. टोपे यावेळी म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, कोविड केअर सेंटर्स आहेत. त्यामध्ये आवश्यक ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, त्यांचा ८० वर्षांचा मुलगा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६०-६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यामुळे कोरोना बरा होतो मात्र योग्यवेळी उपचारासाठी दवाखान्यात जाणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोनाचे मृत्यू जाहीर करताना पारदर्शकता
ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बिड अवस्थेतील रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे.
दुखणे अंगावर काढू नका विश्लेषण केले तर २४ तासांतले मृत्यू, ४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे की लोक दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तत्काळ करता येतो.
ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी करा

प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (SPO2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चितपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं राहत असतील किंवा एका घरात १०-१५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे  मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वतःला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो.

३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स

होम आयसोलेशनमध्ये  बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहावे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वतःची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने  राहणे सुरक्षित आहे. ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये २००० पेक्षा अधिक कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन-अडीच लाखांच्यावर खाटा आहेत., असे श्री. टोपे यांनी सांगितले.

पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

0

मुंबई, दि. 3 :- पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं असून समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवून वंचित, उपेक्षित, कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करणारं नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. पुण्याच्या जडणघडणीतील त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांमधील समन्वय महत्वाचा – राज्यमंत्री दतात्रय भरणे

0

इंदापूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा
पुणे दि.3 : – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणांमधील समन्वय महत्वाचा असून मृत्यूदर कमी करणे, कोरोना निदानासाठीच्या चाचण्यांची संख्या वाढवून बाधित रुग्णांवर वेळेत उपचार करणे तसेच इतर आजार असणा-या व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक यांना वेळीच ओळखून त्यांची आरोग्य तपासणी व उपचार करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) मृद व जलसंधारण, पदुम, वने, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज प्रशासनाला दिल्या. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत. घाबरु नका शासन आपल्या पाठिशी आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात राज्यमंत्री श्री.भरणे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी एकत्रित इंदापूर तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सोनाली मेटकरी आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री भरणे म्हणाले,कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेला गती देणे आवश्यक असून सुरक्षित अंतर, मास्कचा वापर याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना प्रतिबंधासाठी आपल्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रत्येकाने व्यवस्थितपणे पार पाडावी. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करु या, असे सांगून इंदापूर तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन आवश्यक आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींचा शोध घेवून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. ‘ चेस दि व्हायरस ‘ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देताना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, ज्येष्ठ नागरीक, इतर आजार असलेले नागरीक यांची सातत्याने आरोग्य तपासणी करावी, आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी टास्क फोर्समार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत बेड उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढविण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक साधनसामग्रीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर यासह शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ग्रामीण भागात सर्व्हेक्षणावर अधिक भर देणे आवश्यक आहे. यामध्ये सर्दी, ताप, खोकला व लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने आरोग्य तपासणी करा, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करावी,असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं निधन- सुरुवातीला बेड मिळाला नाही नंतर अंत्यसंस्कार करतानाही अडचणी

0


पुणे-महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे.माजी महापौर असलेल्या एकबोटे यांनाही कोरोना चे उपचारासाठी संघर्ष करावा लागल्याचे समोर आल्याने पुण्यातील आरोग्य सुविधांबाबत आ वासून पुढे असलेल्या प्रश्नापुढे साऱ्यांनीच नांग्या टाकल्याचे चित्र समोर येते आहे.
गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्याचेसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसेम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत.
नुकतेच त्यांच्यात ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांना कोरोना झालाय हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला पण त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही अखेर त्यांनी ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता. माजी नगरसेविका मीनाक्षी ज्ञानेश्वर काडगी यांनी गिरीश बापट, अजित पवार यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर सुविधा उपलब्ध झाल्या आणि गांभीर्याने उपचार केले गेले. निधनानंतरही त्यांच्या अंत्यसंस्कारात अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम कैलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्याच्या क्रीडा धोरणात लवकरच सुधारणा करणार -उपमुख्यमंत्री

0

मुंबई, दि. 3 – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रित करता यावे या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवीन खेळाडूंना मार्गदर्शन, दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी, राज्याच्या क्रीडाविकासासाठी व्हावा  यादृष्टीने सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

सुधारित धोरणामध्ये गिर्यारोहणासारखे साहसी क्रीडाप्रकार, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेते मल्ल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आदींबाबतही विचार करुन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती आणि अनुषंगित मुद्यांवर क्रिडा राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा करण्यात आली.

क्रीडा क्षेत्रात राज्याचा गौरव वाढविणाऱ्या आणि अत्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय डिसेंबर २०१० मध्ये जारी करण्यात आला होता. त्यातील निकषांनुसार आधी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीत छाननी होऊन नंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत खेळाडूंच्या नियुक्तीबाबत निर्णय होतो. शासकीय धोरणातील तरतुदींच्या गेल्या दहा वर्षातील अंमलबजावणीचा आढावा घेऊन नवीन सर्वंकष धोरण ठरविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. खेळांचा सराव आणि स्पर्धेसाठी हजर राहण्यासाठी खेळाडूंना सवलत देणे, माऊंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक, लिम्का किंवा गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेले स्पर्धक, शिवछत्रपती पुरस्कारविजेते खेळाडू, महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल आदींनाही शासकीय सेवेत संधी देण्याबाबतही सुधारित धोरणात विचार करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीला मुख्य सचिव संजयकुमार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासनच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, महसुलचे उप सचिव माधव वीर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 596,एकुण 6 हजार 672 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 1 लाख 84 हजार 382 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 2 लाख 50 हजार 650 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.03 :- पुणे विभागातील 1 लाख 84 हजार 382 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 50 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 596 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 6 हजार 672 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.66 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.56 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 282 रुग्णांपैकी 1 लाख 37 हजार 638 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 498 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.34 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 77.64 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 247 रुग्णांपैकी 8 हजार 151 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 666 आहे. कोरोनाबाधित एकूण 430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 882 रुग्णांपैकी 14 हजार 242 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 871 आहे. कोरोनाबाधित एकूण 769 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 13 हजार 897 रुग्णांपैकी 7 हजार 927 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 428 आहे. कोरोनाबाधित एकूण 542 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 342 रुग्णांपैकी 16 हजार 424 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 133 आहे. कोरोनाबाधित एकूण 785 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 151 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 535, सातारा जिल्ह्यात 589 , सोलापूर जिल्ह्यात 456 , सांगली जिल्ह्यात 735 तर कोल्हापूर जिल्ह्यात 836 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 11 लाख 81 हजार 138 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 50 हजार 650 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 2 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

खरेदी करण्याचे आदेश देउनही रुग्णवाहिका खरेदी का केल्या नाहीत- खा. बापटांचा सवाल

0

हलगर्जीपणा करणारा कोणी असो , कारवाई झाली पाहिजे

पुणे-पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोविड सेंटरमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेताना वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग यांना कोविड सेंटरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोरोनाच्या काळात पोलिस, पालिका, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण काम करत आहेत. मात्र काही जणांच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग सारख्यांचा मृत्यू होत आहे, असे पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले.सगळ्यांना बरोबर घेऊन काम करताना सूचना देखील पाळल्या गेल्या पाहिजेत. महापौर, आयुक्तांना खासदार म्हणून रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र, त्या पाळल्या नाहीत.रुग्णवाहिकेच्या बाबतीत देखील पीएमपीएलच्या गाड्या रुग्णवाहिका म्हणून तयार करा, अशाही सूचना दिल्या होत्या.

100 कोटी रुपयांचा निधी आणून सेंटरला खर्च करण्याऐवजी दहा-पंधरा दवाखान्यांना प्रत्येकी 10 कोटी दिले असते तर चांगलं झालं असतं.खासदार बापट पुढे म्हणाले, मला मंगळवारी रात्री समजलं की पत्रकार पांडुरंग रायकर यांची प्रकृती बिघडली आहे.

त्यांच्या पत्नी कोविड सेंटरच्या बाहेर थांबलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुण्याच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.

पांडुरंग यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर पांडुरंग यांना कार्डियाक रुग्णवाहिका मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात हलवण्याचे ठरले.

विभागीय आयुक्तांशी बोलुन सुद्धा पांडुरंग यांना कोविड सेंटरमधून खाजगी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. यामध्ये कोणी हलगर्जीपणा केला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार बापट यांनी केली.

पुणे अनलॉक 4 जाहिर, पहा काय सुरु अन काय बंद..

0

पुणे : निवासी सोय असलेल्या हॉटेल आणि लॉज यांना शंभर टक्के क्षमतेसह, तर खासगी कार्यालयात तीस टक्के कर्मचारी उपस्थितीत ठेवून व्यवसाय सुरू करण्यास पुणे महापालिकेकडून बुधवारी (ता.२) परवानगी देण्यात आली. मात्र शहरातील शाळा, कॉलेज, खासगी क्‍लासेस, रेस्टॉरंन्ट (हॉटेल), चित्रपटगृहे जलतरण तलाव, व्यायामशाळा या मात्र तीस सप्टेंबरपर्यंत खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.केंद्र आणि राज्य सरकारकडून अनलॉक-4 ची नियमावली जाहीर करण्यात आली होती.त्यामध्ये हॉटेलसह सर्व सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु त्याबाबतचे आदेश पुणे महापालिकेकडून काढण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पुणे शहरात या सर्व गोष्टी कधी सुरू होणार यांची चौकशी होत होती. अखेर बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी अनलॉक-4 नियमावली जाहीर करण्यात आली.

हे सुरू राहणार
– निवासाची सोय असलेले हॉटेल व लॉज यांना शंभर टक्के परवानगी
– खासगी आस्थापना कार्यालयात तीस टक्के कर्मचारी वर्गासह सुरू करण्यास परवानगी
– आंतरजिल्हा वाहतुकीसाठी निर्बंध नाही, वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही.
– पीएमपी बसला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी
– शॉपिंग मॉल मधील थिएटर वगळून सुरू ठेवण्यास मान्यता
– रेस्टॉरंट (हॉटेल) मधून पार्सल सेवा सुरू ठेवता येणार
– सर्व प्रकाराचे मैदानी खेळ, व्यायाम यांना परवानगी
– ब्युटी पार्लर, केशकर्तनालय

हे बंद राहणार
– शाळा, कॉलेज, कोचिंग क्‍लासेस
– चित्रपटगृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे
– रेस्टॉरंन्ट, जलतरण तलाव, बागा
– नाट्यगृह, सभागृह, बार
– सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम
– साठ वर्षांवरील आणि दहा वर्षांच्या आतील मुले यांना विनाकारण बाहेर पडण्यास बंदी
– मास्क वापरणे बंधनकारक

आजपासून पीएमपी अटी शर्ती ने सुरु

0

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली पीएमपीची प्रवाशांसाठीची वाहतूक सेवा गुरुवारपासून (ता.3) दोन्ही शहरांत सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या 421 बस एकूण 190 मार्गांवर धावतील. प्रवाशांसाठी प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल. 65 वर्षांवरील प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करण्यास बंदी असेल.कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पीएमपीची प्रवासी वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद झाली होती

बस प्रवासासाठी सूचना
– 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील नागरिकांना बसमध्ये प्रवेश नसेल.
– बसमध्ये फक्त 22 प्रवासी असतील.
– प्रवाशांना मास्कशिवाय बसमध्ये प्रवेश मिळणार नाही.

https://www.facebook.com/1501539223422053/posts/2706784449564185/

दोन्ही शहरांतील अत्यावश्‍यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी 25 मार्चपासून फक्त वाहतूक सुरू आहे. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यावर विमान, रेल्वे, एसटी, रिक्षा आणि कॅब वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, पीएमपीला वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.

या पार्श्‍वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतल्यावर 20 ऑगस्ट रोजी दोन्ही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात 3 सप्टेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचे ठरले. दोन्ही महापालिकांडून या बाबतचे अधिकृत पत्र मिळाल्यावर वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी बुधवारी प्रशासनाला सूचना दिल्या.प्रत्येक बस दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज करण्यात येईल. तसेच शहरातील प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. तेथेच प्रवाशांनी उभे राहवे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्वारगेट, महात्मा गांधी स्थानक, हडपसर, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, पुणे मनपा, विश्रांतवाडी, वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपळे गुरव, भोसरी, सांगवी, पिंपरी चौक येथील पास केंद्र रविवार वगळता सकाळी सात ते दुपारी दोन दरम्यान उघडी राहतील, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान – २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.२ : राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १७,४३३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१६२२ (३४), ठाणे- ३०२ (५), ठाणे मनपा-३०१ (१), नवी  मुंबई मनपा-३७१ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५०८ (४), उल्हासनगर मनपा-२५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-२१९ (३), पालघर-२५२ (७), वसई-विरार मनपा-१७१ (८), रायगड-४५८ (१०), पनवेल मनपा-२८८ (१), नाशिक-३२७ (६), नाशिक मनपा-६३१ (१४), मालेगाव मनपा-७०, अहमदनगर-३७४ (५),अहमदनगर मनपा-२१२, धुळे-८६ (१), धुळे मनपा-११० (१), जळगाव- ७६२ (१०), जळगाव मनपा-११२ (५), नंदूरबार-१०१ (३), पुणे- ९०२ (९), पुणे मनपा-१७०६ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००६ (२), सोलापूर-३६२ (११), सोलापूर मनपा-६१ (२), सातारा-६८३ (६), कोल्हापूर-४०९ (१०), कोल्हापूर मनपा-१९४ (१०), सांगली-४१९ (१०), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३३४ (५), सिंधुदूर्ग-४०, रत्नागिरी-१४६ (२), औरंगाबाद-१९७,औरंगाबाद मनपा-८८ (१), जालना-१३५ (२), हिंगोली-४५ (१), परभणी-३९, परभणी मनपा-४७ (१), लातूर-२०५ (५), लातूर मनपा-११३ (२), उस्मानाबाद-१६८ (६),बीड-१३० (१), नांदेड-१८१, नांदेड मनपा-१४५ (१), अकोला-३८, अकोला मनपा-१४, अमरावती-७ (१), अमरावती मनपा-३० (२), यवतमाळ-१२० (३), बुलढाणा-७४ (१), वाशिम-४७, नागपूर-३१६ (३), नागपूर मनपा-११८४ (३५), वर्धा-६४, भंडारा-७० (१), गोंदिया-१०९ (४), चंद्रपूर-११७, चंद्रपूर मनपा-८४, गडचिरोली-३६, इतर राज्य २४ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,४८,५६९) बरे झालेले रुग्ण- (१,१९,७०२), मृत्यू- (७७२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८१०)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,३५,६०४), बरे झालेले रुग्ण- (१,१०,७४६), मृत्यू (३८६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,९९६)

पालघर: बाधित रुग्ण- (२६,३१९), बरे झालेले रुग्ण- (१९,६४०), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०६८)

रायगड: बाधित रुग्ण- (३१,५४६), बरे झालेले रुग्ण-(२५,१८३), मृत्यू- (८०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५५३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४४२८), बरे झालेले रुग्ण- (२४९८), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७७)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३४८), बरे झालेले रुग्ण- (६९३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३५)

पुणे: बाधित रुग्ण- (१,८२,२१२), बरे झालेले रुग्ण- (१,२३,२९२), मृत्यू- (४१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४,७६०)

सातारा: बाधित रुग्ण- (१५,४२६), बरे झालेले रुग्ण- (९०१९), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०४२)

सांगली: बाधित रुग्ण- (१५,१९५), बरे झालेले रुग्ण- (८००५), मृत्यू- (४६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७३०)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२३,३५९), बरे झालेले रुग्ण- (१६,५२७), मृत्यू- (६८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१५०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२०,४५६), बरे झालेले रुग्ण- (१४,७०५), मृत्यू- (७९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९५९)

नाशिक: बाधित रुग्ण- (४१,४५७), बरे झालेले रुग्ण- (२९,५२८), मृत्यू- (९०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,०२४)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२१,६७७), बरे झालेले रुग्ण- (१७,०५१), मृत्यू- (३०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४३२३)

जळगाव: बाधित रुग्ण- (२८,९७२), बरे झालेले रुग्ण- (२०,१२८), मृत्यू- (८८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९६०)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२८९७), बरे झालेले रुग्ण- (१५४०), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८०)

धुळे: बाधित रुग्ण- (८१२४), बरे झालेले रुग्ण- (५९२५), मृत्यू- (२१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७८)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२३,५८१), बरे झालेले रुग्ण- (१८,००८), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९८)

जालना: बाधित रुग्ण-(४५७६), बरे झालेले रुग्ण- (३०३८), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०१)

बीड: बाधित रुग्ण- (५०१३), बरे झालेले रुग्ण- (३५८५), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०१)

लातूर: बाधित रुग्ण- (८५६३), बरे झालेले रुग्ण- (५३१४), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६७)

परभणी: बाधित रुग्ण- (२८२४), बरे झालेले रुग्ण- (१३५७), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८०)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१५६०), बरे झालेले रुग्ण- (११६५), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८)

नांदेड: बाधित रुग्ण- (७८४२), बरे झालेले रुग्ण (३५८२), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३१)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६३५३), बरे झालेले रुग्ण- (४२३५), मृत्यू- (१७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४७)

अमरावती: बाधित रुग्ण- (५२९४), बरे झालेले रुग्ण- (४०४८), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०७)

अकोला: बाधित रुग्ण- (४०६७), बरे झालेले रुग्ण- (३११०), मृत्यू- (१५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००)

वाशिम: बाधित रुग्ण- (१८६१), बरे झालेले रुग्ण- (१४५१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७९)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३५९९), बरे झालेले रुग्ण- (२२३७), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३४९२), बरे झालेले रुग्ण- (२१७८), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३४)

नागपूर: बाधित रुग्ण- (३१,०३३), बरे झालेले रुग्ण- (१६,९८३), मृत्यू- (७९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,२५६)

वर्धा: बाधित रुग्ण- (१०९०), बरे झालेले रुग्ण- (५२३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४८)

भंडारा: बाधित रुग्ण- (१२४३), बरे झालेले रुग्ण- (६१८), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१६७८), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५६)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२८३४), बरे झालेले रुग्ण- (१२६९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५४६)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (८६६), बरे झालेले रुग्ण- (६१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०८)

एकूण: बाधित रुग्ण-(८,२५,७३९) बरे झालेले रुग्ण-(५,९८,४९६),मृत्यू- (२५,१९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४५),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,०१,७०३)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २९२ मृत्यूंपैकी २०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू नागपूर -१३,जळगाव -५, पुणे -४, ठाणे -३, अहमदनगर -२, जालना -२, कोल्हापूर -२,पालघर -२, नंदूरबार- १, रायगड -१ आणि  नाशिक  -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात  आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)