Home Blog Page 2462

आयुक्तसाहेब,बस आता टेंडर पुराण- लोकांचे जीव वाचवा हो ..

0

पुणे- वारंवार सांगूनही पुणे महापालिका काहीही उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट वाढत आहे. ते तातडीने आटोक्यात आणा, अन्यथा काँग्रेसतर्फे आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी दिला आहे. कोरोनाकडे दुर्लक्ष करून प्रशासन निविदा प्रक्रिया राबवित असल्याचा आरोपही बागवे यांनी केला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. यावेळी बागवे यांच्या समवेत मोहन जोशी, अरविंद शिंदे,अविनाश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील दोन महिन्यांपासून काँग्रेस पक्षाने खूप संयम बाळगला आहे.पण, आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. युद्धस्तरावर योग्य त्या उपाययोजना केल्या नाही तर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होऊन अनेकजण प्रशासकीय हलगर्जीपणामुळे आपला जीव गमावतील, अशी भीतीही रमेश बागवे यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे आता महापालिकेची यंत्रणा निविदा प्रक्रियेत न अडकवता ती कोरोनाच्या नियंत्रणात व्यस्त करावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.

कोरोनाची परिस्थिती शहरातील विविध प्रभागात चिंताजनक झालेली आहे. प्रत्येक नगरसेवक सभागृहाच्या निदर्शनास आणायची इच्छा सोशल डिस्टनसिंगचे पालन करून व्यक्त करीत असताना जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी शासन आदेशाचे निमित्त करून कोरोनावर चर्चा होऊ दिली नाही.

या आजाराचा सर्वाधिक फटका पुणेकरांना बसला आहे. शहरात 100 वा रुग्ण ज्यावेळी आढळला होता. त्यावेळीच काँग्रेसतर्फे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना सावध केले होते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हा आजार भयंकर होणार असल्याचे सांगितले होते.

त्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये बेडस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचीही मागणी केली होती.ॲम्ब्युलन्स घेण्यासही सांगितले होते. मात्र, कोरोनाकडे दुर्लक्ष करून प्रशासन निविदा प्रक्रिया राबवित असल्याचा आरोपही बागवे यांनी केला आहे.

आयुक्तसाहेब, सर्व राजकीय पक्षनेत्यांची बैठक घेऊन समस्या सोडवा- दीपाली धुमाळ

0

पुणे-मागील 5 महिन्यांपासून कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. त्याचा फटका पुणे महापालिकेच्या विकासकामांनाही बसला आहे. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी तातडीने सर्व राजकीय पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला कोरोना संदर्भात आढावा घेत आहेत. अनेक महत्वपूर्ण सूचनाही करीत आहेत. मात्र, पुणे महापालिकेला कोरोना रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा होणे गरजेचे असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण एक लाखांच्यावर गेले आहेत. 90 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. 16 हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, अडीच हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. शहरात विकासकामे सुरू करण्याची सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची मागणी आहे.स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. पण, महापालिका प्रशासन काहीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे.दुसरीकडे जीएसटी आणि शासनाचे अपेक्षित अनुदान काही मिळत नाही.

मनसे च्या चार कार्यकर्त्यांवर स्वारगेट ठाण्यात गुन्हा दाखल

0

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसबा विधानसभा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर (वय 45, रा. खडकमाळ अळी) यांच्यासह चार कार्यकर्त्यांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट येथील पाणीपुरवठा विभागात पाण्यासाठी आंदोलन करताना कार्यालयाची तोडफोड, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन मंगळवारी (ता. 8) सायंकाळी करण्यात आले होते. याप्रकरणी आतिश जाधव (वय 50, रा. चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

स्वारगेट पाणी पुरवठा विभागाच्या आवारात पाणी पुरवठा पुरेशा दाबाने होत नाही या कारणावरून संग्राम तळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह इथे आंदोलन केले.

पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात शिरून स्टाफला पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आलेला माठ शासकीय वाहनावर फोडण्यात आला. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीत 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक ए. एस. लाहोटे करीत आहेत.

मनसे च्या वसंत मोरेंना अटक व जामिनावर सुटका

0

पुणे: शासकीय वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांच्यावर आज शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि बेकायदेशीर जमाव केल्याच्या कलमांनुसार हा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून अटक करून न्यायालयात नेणयात आले .यावेळी त्यांच्यावतीने ऍड. गणेश म्हस्के आणि ऍड. सतीश कांबळे यांनी युक्तिवाद करीत जामीन देण्याची मागणी केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जानवी केळकर यांनी त्यांना जामीन मंजूर केला आहे.

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याला अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मोरे यांनी सोमवारी महापालिका उपायुक्त नितीन उदास यांच्या शासकीय गाडीच्या काचा फोडल्या होत्या. फेसबुक वर हा प्रकार लाइव्ह करत जाहिर पणे त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात हा सर्व प्रकार घडला होता. उदास हे मराठी बहुजन समाजातील कारकुन पदापासुन उपायुक्त पदावर पोहोचलेले अपंग असलेले अधिकारी आहेत. मोरे हे स्वतः महापालिकेतील गटनेते आहेत. आयुक्त विक्रम कुमार, महापौर मोहोळ यांच्या समोर आता ते याच विषयावर आंदोलन करतील असा महापालिकेतील अधिकारी वर्गाचा अंदाज आहे. मात्र या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनीषा झेंडे यांनी फिर्याद दिली आहे.

महाराष्ट्राच्या पर्यटन विकासासाठी काम करण्याची युवकांना संधी

0

मुंबई, दि. ९ : सध्याच्या जागतिक कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. महाराष्ट्रातील नवपदवीधरांकरीता एमटीडीसी कार्यक्रम सुरू करीत आहे. या कार्यक्रमात इंटर्नना सोशल मीडिया बिझनेस डेव्हलपमेंट, एचआर, आयटी अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होईल. तसेच एमटीडीसीच्या अखत्यारीत असलेल्या निसर्गरम्य रिसॉर्ट, ॲडव्हेंचर पार्क, डायव्हींग संस्था, इत्यादींच्या विकासासाठी आपल्या कल्पना मांडता येतील व विकास प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविता येईल.

महाराष्ट्र सरकारच्या मिशन बिगीन अगेनच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यावर शासन अनेक निर्णय घेत असताना, पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी हा कार्यक्रम उपयोगी ठरेल. या कार्यक्रमात ईंटर्नना एमटीडीसीच्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. त्याचप्रमाणे विभागाचे मंत्री तसेच महामंडळाचे अधिकारी यांच्यासोबत काम करण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. इंटर्नना दहा हजार रूपये मानधन व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीने अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल. इंटर्नना काम करण्यासाठी कार्यालयात येणे अनिवार्य आहे. सोशल मीडीयाचे काम करणाऱ्या उमेदवारांचे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असावे. इंटर्नशिप कार्यक्रमाचा कालावधी सहा महिन्यांचा असेल, मात्र जे उमेदवार आपले काम कुशल व निर्विवार्द करतील त्यांना ५ महिन्यांचा वाढीव कालावधी दिला जाईल.  २५ वर्षापेक्षा खालील वयाचे उमेदवार या ईंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतीम मुदत १६ सप्टेंबर, २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

तरुणांच्या संकल्पनांना चालना देणार – मंत्री आदित्य ठाकरे

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. यात युवकांच्या नवकल्पनांचीही आवश्यकता आहे. एमटीडीसीसोबत महाराष्ट्राचे पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि महाराष्ट्राचे पर्यटन वैभव संपूर्ण विश्वाला दाखवण्यासाठी या कार्यक्रमात तरुणांनी सहभागी व्हावे. प्रवास व पर्यटनाची आवड असेल तर एमटीडीसीच्या या नवीन मोहीमेचा भाग व्हा. कार्यकुशल उमेदवारांच्या संकल्पनांना यात निश्चित चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.

पत्रकार संतोष पवार यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला शोक

0

अलिबाग,जि. रायगड, दि.9 (जिमाका)- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कराेनामुळे अकस्मात निधन झाल्याचे समजताच मला धक्काच बसला असून याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

एक अजातशत्रू, दिलखुलास, समाजहितासाठी सतत लढणारा पत्रकार म्हणून संतोष पवार यांची एक चांगली ओळख होती. मात्र अशा चांगल्या व्यक्तीचे आपल्यातून असे अचानक जाण्याने जिल्ह्याची आणि प्रसारमाध्यम क्षेत्राची हानी झाली आहे.अवघ्या दहा-पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी माझी व्यक्तिशः भेट घेऊन अनेक महत्वाच्या विषयांबाबत सकारात्मक चर्चा केली होती, असे सांगून पालकमंत्री कु.तटकरे यांनी तात्काळ या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून कराेना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षमतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

नोंदणीकृत प्रसारमाध्यम प्रतिनिधींची माेफत अँटीजन टेस्ट करुन घ्या

0

अलिबाग,जि. रायगड, दि.9 (जिमाका)- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांचे कराेनामुळे अकस्मात निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत प्रसारमाध्यम प्रतिनिधींची जिल्हा प्रशासनाकडून मोफत अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

सध्या कराेनाचे संकट सर्वत्र असून समाजासाठी काम करणाऱ्या प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींचेही आरोग्य सर्वांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पातळीवर काम करणारे प्रसारमाध्यम प्रतिनिधी ते जिल्हा पातळीवर काम करणारे प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांची कराेना तपासणी करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच नोंदणीकृत सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींची मोफत अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 66 हजार 977:एकुण 7 हजार 637 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,विभागात कोरोना बाधित 2 लाख 90 हजार 884 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.9 :- पुणे विभागातील 2 लाख 16 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 लाख 90 हजार 884 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 66 हजार 977 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 7 हजार 637 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 14 हजार 5 रुग्णांपैकी 1 लाख 59 हजार 986 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 805 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.43 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 19 हजार 609 रुग्णांपैकी 11 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 622 आहे. कोरोनाबाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 21 हजार 667 रुग्णांपैकी 15 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 226 आहे. कोरोनाबाधित एकूण 850 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 281 रुग्णांपैकी 9 हजार 917 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 29 हजार 922 रुग्णांपैकी 19 हजार 325 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 663 आहे. कोरोनाबाधित एकूण 934 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 21 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 619 सातारा जिल्ह्यात 621, सोलापूर जिल्ह्यात 403, सांगली जिल्ह्यात 573 तर कोल्हापूर जिल्ह्यात 305 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 13 लाख 38 हजार 800 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 90 हजार 884 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 8 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
*

सरकार आताचे असो कि मागचे , दगाफटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, खासदार संभाजीराजे यांचा इशारा

0

पुणे-विद्यमान सरकार असो कि मागचे सरकार…दगाफटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापुढे समाज जी दिशा ठरवेल तिच माझी भूमिका असेल असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, ‘आज मराठा समाजावर अन्याय झाला. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.’

‘मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल,’ असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे व्यथित झालो- विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस

0

मुंबई-सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. ‘मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मी व्यथित आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी एका निवेदनातून दिली.

यात फडणवीस म्हणाले की, ‘मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या समाजाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी केलेल्या आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरल्या गेले. सर्वांना विश्वासात घेऊन या सरकारने योग्य कारवाई केली असती तर या सरकारला आरक्षण कायम राखता आले असते. पण, हे सरकार सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हतं आणि आज त्याचा परिणाम आपल्यासमोर आहे.’

‘आमच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कठीण परिश्रम घेतले. केवळ विधिमंडळात कायदे करुन ते टिकविता आले नसते, हे लक्षात घेऊन राज्य मागासवर्ग आयोग गठीत केला. आरक्षणाच्या संपूर्ण राज्यभर झालेल्या लढ्याला कायदेशीर आधार दिला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले, तेव्हा तेथे प्रयत्नांची शर्थ करुन ते आरक्षण टिकवले. आज मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो आहोत’, असे फडणवीस म्हणाले.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात एमबीए प्रवेश प्रक्रिया सुरू

0

मुंबई, दि. ९ : एमबीए / एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल,  पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दिनांक २३ मे, २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

एमएएच – एमबीए / एमएमएस – २०२० च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक! : मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण

0

मुंबई, दि. ९ : मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित, धक्कादायक व आश्चर्यकारक असल्याचे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या प्रकरणामध्ये अनेक संवैधानिक, कायदेशीर मुद्दे उपस्थित झाले होते. त्यामुळे हे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करण्याची मागणी होती. ती मागणी मान्य देखील झाली. परंतु, प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करताना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया आणि नोकरभरतीमध्ये मराठा आरक्षण लागू न करण्याचा अंतरिम आदेश देणे अनाकलनीय आहे.

गेल्याच महिन्यात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे सोपवले. मात्र, त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीवर कोणताही अंतरिम निर्णय दिला गेला नाही. याशिवाय इतरही असे अनेक निर्णय आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणे घटनापिठाकडे वर्ग केली. परंतु, अंतरिम निर्णय घेतला नाही. मात्र, मराठा आरक्षणाबाबतच वेगळा निर्णय घेतला गेला, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

मराठा आरक्षणाचे प्रकरण पुढील सुनावणीसाठी घटनापिठाकडे गेले आहे. त्यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, हा दावा योग्य नाही. मराठा आरक्षणाचे प्रकरण तडीस लागेपर्यंत राज्य सरकार लढा देत राहील.

सोमवारी सरन्यायाधिशांकडे अर्ज करून हा अंतरिम आदेश निरस्त करण्याची विनंती केली जाणार आहे. उद्या, गुरूवारी दुपारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, त्यावेळी पुढील दिशा ठरवली जाईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला उपसमितीचे सदस्य तथा बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

0

नवी दिल्ली -सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, वर्ष 2020-2021 मध्ये नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अॅडमिशनसाठी मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सुनावणीदरम्यान खटला मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्यात आला आहे.

चीफ जस्टिस ऑफ इंडिया एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर याचिकांवर सुनावणी सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंठपीठासमोर घेण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती.

महाराष्ट्रात मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग वर्ग अधिनियम, 2018 कायदा लागू करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी जून महिन्यात म्हटले होते की, 16 टक्के आरक्षण योग्य नाही. याऐवजी नोकरीमध्ये 12 टक्के आणि अॅडमिशनमध्ये 13 टक्क्यांपेक्षा जास्त दिले जाऊ शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही या निर्णयावर शिक्कामोतर्ब केला होता. परंतू, नंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा.. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना अखेर कंगनाची जीभ घसरली

0

मुंबई: ‘मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?’ या वक्तव्यानंतर अनेकांनी अभिनेत्री कंगना  हिला मुंबईत न येण्याची ताकीद दिली होती.मात्र वाय सुरक्षा घेत   कंगना मुंबईत दाखल झाली आणि घरी देखील पोहोचली . घरी पोहचल्यावरही तिने आपले ट्विटर वॉर सुरूच ठेवले .आणि  व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.यावेळी एकेरी उल्लेख करून तिने दिवसभर मिळविलेली सहानुभूती गमावली .कंगना मुंबईत नसताना मुंबई महापालिकेने तिच्या ऑफिसमधील काही बेकायदा बांधकामाचा भाग २४ तासाची नोटीस देऊन कोर्टात असलेली याचिका झुगारून पाडायला सुरुवात केल्याने कंगनाला लोकांची सहानुभूती मिळू लागली होती . प्रवासात तिने केलेल्या ट्विटरवॉर ने ती पॉवर फुल बनू लागली असताना घरी आल्यावर हि तिने एक व्हिडिओ शेअर केला . तो करताना कंगनाने मोठी चूक केली ती म्हणजे मुख्यमंत्री असलेल्या ठाकरे यांचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला .’उद्धव ठाकरे आज मेरा घर टूता है, कल तेरा घमंड टूटेगा… असे म्हणत तिने मिळविलेली सहानुभूती पुन्हा गमावली असे बोलले जाऊ लागले . 

नेमकी ती काय म्हणाली ते पहा ..

ट्विटरवार- करत सुरक्षा व्यवस्थेत कंगना मुंबईत दाखल …

0

मुंबई – वाय श्रेणीची सुरक्षा घेऊन मुंबईकडे निघालेली कंगना बीएमसीकडून झालेली ऑफिसची तोडफोड… त्यांचे फोटो प्रवासात पाहत ट्विटरवार करत मुंबईत दाखल झाली .

अभिनेत्री कंगना रनोट तिने ठरवल्याप्रमाणे बुधवारी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाली . मुंबई विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. शिवाय विरोध आणि समर्थकांची मोठी गर्दी देखील होती. दरम्यान व्हीआयपी गेटऐवजी दुस-या गेटमधून बाहेर पडत कंगना विमानतळावरून थेट आपल्या घरी दाखल झाली.

कंगना विमानतळावरुन उतरत असताना तिला इंडिगोच्या वाहनातून पोलिस सुरक्षेत घरी पाठवण्यात आले. समोरच्या गेटऐवजी मागील बाजूने कडक सुरक्षेत तिला घरी पाठवण्यात आले.मुंबई विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसला. शिवसेनेची कामगार सेना, रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी आणि करणी सेनेचे लोक मोठ्या संख्येने मुंबई विमानतळावर हजर होते. केंद्र सरकारने कंगना रनोटला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरविली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर तिच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. मुंबई पोलिस आणि सीआरपीएफची फौजही तैनात करण्यात आली होती.कंगनाच्या विरोधात शिवसेनेने विमानतळात आपले शेकडो कामगार जमा केले होते. दुसरीकडे कंगनाच्या समर्थनार्थ करणी सेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील झेंडे-फलक घेऊन हजर होत्या. दोन्ही बाजूंनी कंगनाच्या समर्थन व विरोधात घोषणाबाजी केली गेली.

एकीकडे मुंबईत ऑफिसवर बीएमसी ची कारवाई होत असताना ,दुसरीकडे कंगनाने प्रवासात केलेले हे ट्वीट-मी चुकीचे नव्हतेच ,माझी मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी झाल्याचेच या कारवाईने सिद्ध झाले आहे.

ऑफिसवर बीएमसी ची कारवाई होत असताना कंगनाने केलेल्या या ट्वीट मध्ये पाडापाडी च्या फोटो ला ‘पाकिस्तान ‘ असे कॅप्शन दिले आहे.

जेव्हा सकाळीच कारवाई सुरु झाली तेव्हा तिथे पोहोचलेले पोलीस आणि ,महापालीकेचे अधिकारी कर्मचारी यांचे फोटो शेअर करत कंगनाने त्यास’ बाबर आणि त्यांची आर्मी असे हेडिंग दिले आहे