Home Blog Page 2460

काळ आला होता पण..!ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या १८ महिन्यांच्या बाळाला वडिलांनी वाचवले,कात्रज येथील घटना

0

पुणे-: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. कात्रज भागात हे प्रमाण अधिक आहे शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने कात्रज तलाव काल भरून वाहू लागला. यामुळे कात्रज तळ्या शेजारी असलेल्या शेलारमळ्यात नाल्याचे पाणी घुसले. त्यात एक १८ महिन्यांचे बाळ पाण्यात वाहून चालले होते. परंतु, वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जात असलेल्या बाळाला वाचवले. सध्या भारती विद्यापीठ येथील दवाखान्यात या बाळाची जीवन- मरणाची लढाई सुरु आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, शेलार मळ्यातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमणे,तसेच नाले सफाई न झाल्यामुळे नाल्याची रुंदी व खोली कमी झाली असल्यामुळे थोडाही पाऊस झाला की पाणी या भागात घुसते. गँबेल वाँल मुळे हा १२ मीटरचा ओढा जागेवर फक्त ४ मीटर राहिलेला आहे. कालच्या झालेल्या पावसाने सुमारे ४ फुट पाणी या भागात घुसले असल्याचे प्रत्यक्षदर्शी संदीप कोष्टी यांनी सांगितले.या पाण्यामध्ये संदेश भोरे हे १८ महिन्यांचे बाळ वाहून चाललेे होते. सतीश भोरे यांच्या बंगल्यामध्ये पाणी घुसल्यामुळे भोरे हे बाहेर असलेली आपली दुचाकी वाहुन जाऊ नये यासाठी पाण्यात उतरले,त्यांच्यापाठोपाठ संदेश देखील बाहेर आला आहे हे त्यांना माहीत नव्हते.रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.संदेश वाहून जाऊ लागल्यामुळे तो ओरडला तेव्हा सतीश भोरे यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी गाडी सोडुन आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धाव घेतली.सुमारे १५ ते २० फुट हे बाळ वाहून गेले होते.नंतर त्याला तातडीने भारती विद्यापीठ येथे दाखल करण्यात आले आहे.नाका-तोंडात पाणी गेल्याने हा चिमुरडा जीवन-मरणाची लढाई लढत आहे.

नाले सफाईच्या नावाखाली कोटी रुपये उचलणारे ठेकेदार व त्यांच्यावर निरीक्षक म्हणून काम करणारे अधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे अनेकांना आपले प्राण धोक्यात घालावे लागत आहेत.

याविषयी ड्रेनेज विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्वाती बिराजदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नाले सफाई झालेली आहे.गार्डन विभागाच्या अंतर्गत या नाल्यावर जेएन.आर.यु.योजनेमध्ये दोन्ही बाजूनी गँबेन वाॅल केल्यामुळे ओढ्याची लांबी कमी झालेली आहे.त्यामुळे नेहमीच पाणी शेलार मेळ्यात घुसत आहे.वॉलवर असलेल्या जाळीमुळे सर्व भिंत काढणे शक्य नाही.पुढील काळात शेलार मळ्यात पाणी जाऊ नये यासाठी उपाय योजना सुरु केल्या आहेत.

एका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता

0

नवी दिल्ली,: जगभरातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये आर्थिक रिकव्हरीचे (Economy Recovery Hopes) संकेत मिळत आहेत. यामुळे सोन्याच्या किंमतींवर दबाव वाढत आहे. शुक्रवारी कॉमेक्सवर सोन्याची किंमत 1 टक्क्याहून अधिक प्रमाणात घसरली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या मते सोन्याचे दर (Gold Price) घसरून 1941 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. जगभरातील मोठ्या रेटिंग एजन्सींच्या मते पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येईल, अशी शक्यता कमी आहे.

सिटी ग्रृपने त्यांच्या आताच्या अहवालात असे म्हटले आहे की, सोन्यामध्ये तेजीची शक्यता 30 टक्के तर घसरणीची शक्यता 20 टक्के आहे. अहवालात असे म्हटले आहे की, जर तेजी आली तर सोन्याचे दर 2275 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात, घसरण झाल्यास सोन्याचे दर 1600 डॉलर प्रति औंसपर्यंत येण्याची शक्यता आहे.

एका महिन्यात 4000 रुपयांनी स्वस्त झाले सोने

देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किंमती घसरत आहेत. रुपयाचे वधारलेले मुल्य हे या मागचे मुख्य कारण सांगण्यात येत आहे. 10 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा या स्तरावर होते, तर आता देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत 52 हजारांच्या खाली आहे.

सलग 4 दिवस सोन्याचे भाव वाढल्यानंतर शुक्रवारी सोन्याचे भाव कमी झाले होते. दिल्लीतील सराफा बाजारात देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरलेल्या सोन्याच्या किंमतीचा परिणाम पाहायला मिळाला. याठिकाणी सोन्याचे दर 52,643 रुपये प्रति तोळावरून कमी होत 52,452 रुपये प्रति तोळावर आले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात 191 रुपये प्रति तोळाची घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी एक किलोग्रॅम चांदीची किंमत 70,431 रुपयांवरून 69,950 रुपये प्रति किलो झाली होती. चांदीमध्ये 990 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत

0

कोवीड-19 रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे दि.12- कोवीड-19 रुग्णालये आणि कोवीड-19 हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असून राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13/03/2020 पासून लागू केला आहे.
राज्यात तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोवीड-19 रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सीजनचे उत्पादन होऊनसुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत असल्याची शक्यता आहे. भविष्यात कोवीड-19 रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सीजनची गरज वाढेल ही बाब लक्षात घेता ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर समिती गठीत केली आहे. पुणे जिल्हयात कोरोना विषाणू ( कोवीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्याकरीता ऑक्सीजन पुरवठा संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून नियोजन करणे
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे यांनी उत्पादकांशी समन्वय व बॉटलींग प्लॅंटमधून वाटपाचे नियोजन करणे.
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी उत्पादनात वाढ व उत्पादकांशी समन्वय साधणे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे व पिंपरी यांनी वाहतूक-टॅंकर समन्वय राहण्याबाबतचे नियोजन करणे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलित करावी आणि निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांना द्यावी.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी जिल्हयातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका, आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची मागणी नोंदविणे.
जिल्हास्तरीय समितीची कार्ये

  1. समितीने दैनंदिन ऑक्सीजनची गरज व ती पुरविणाऱ्या बॉटलिंग प्लांट्स बल्क सप्लायर्स
    यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी.
    जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळयासाठी स्थापन करण्यात आलेल्या कंट्रोल रुमला ऑक्सीजन पुरवठयाची जबाबदारी देण्यात येत आहे आणि कंट्रोल रुम दिनांक 31/12/2020 पर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. कंट्रोल रुमचा वापर ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अडचणी सोडवणूक करण्यासाठी करावा.
    पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रुम दुरध्वनी क्र. 020-26123371 वर संपर्क साधावा. या कंट्रोल रुमला
    काही अडचण असल्यास त्यांनी एफडीए कंट्रोल रुम दूरध्वनी क्र. 022-26592364 व टोल फ्री क्र. 1800222 365 संपर्क साधावा. यानुसार समितीने कार्यवाही करुन कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठा खंडीत होणार नाही, याची
    दक्षता घ्यावी, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

पुण्याचे 1 नव्हे दोन्ही आरोग्यप्रमुख आजारी…अन प्रभारीना काढण्याची भाजपची तयारी…

0

अन प्रभारी आरोग्यप्रमुखांना काढण्याची सुरु भाजपची तयारी

पुणे : कोरोनासोबत मुकाबला करीत दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आता आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन्हीही आरोग्य प्रमुख तब्येत बरी नसल्याने रजेवर गेले आहेत. ऐन कोरोना काळात हा विभागच जायबंदी होत असल्याचे दिसत आहे.
राज्य शासनाने महापालिकेच्या मदतीकरिता आरोग्य प्रमुख म्हणून पाठविलेल्या डॉ. नितीन बिलोलीकर हे मागील 15 दिवसांपेक्षा अधिक काळापासून रजेवर गेलेले आहेत.पालिकेत हजर झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काम केलेल्या बिलोलीकर यांनी काही बैठकांनाही हजेरी लावली होती. परंतू, त्यांना कामाचा ताण जाणवू लागला होता. काही दिवसांनी त्यांची तब्येत बिघडली. उपचारांसाठी ते रजेवर गेले.
दरम्यान, दोन वर्षांपासून पालिकेचे आरोग्य प्रमुख असलेले डॉ. रामचंद्र हंकारे हे सुद्धा कामाच्या ताणामुळे अधूनमधून आजारी पडत होते. गेल्या आठवड्यापासून त्यांना बरे वाटत नव्हते. त्याही स्थितीत ते कामावर येत होते. परंतू, दोन दिवसात त्यांना खुपच जास्त अशक्तपणा आला. तब्येत आणखी बिघडू नये याकरिता त्यांनी रजा टाकली असून पुढील आठवडाभर ते रजेवर आहेत.
दोन्हीही आरोग्य प्रमुख रजेवर आहेत. त्यामुळे आरोग्य प्रमुख पदाचा तात्पुरता पदभार सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आरोग्य प्रमुख रजेवर असले तरी सर्व कामे व्यवस्थित आणि नेहमीप्रमाणे सुरु असल्याचे साबणे यांनी सांगितले.

मात्र साबणे या काम करत नाहीत असे कारण देत त्यांच्यावर ही कारवाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समिति पुढे ठेवण्यात आला आहे.

चारही धरणे फुल्ल, तरीही धनकवडीत पाणी कपात कायम…

0

पुणे महापालिकेचा गजब कारभार

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ‘फुल्ल’ झालेली असूनही धनकवड़ी आणि दक्षिण पुण्यातील काही भागात पावसाळ्यात देखीलपाणी कपात सुरुच आहे. गेली असंख्य वर्षे पालिकेत येवू न ही या भागांना रोज सकाळी 3 तास पाणी पुरवठा होत आला आहे अशा स्थितीत गेल्या 2 वर्षापासून दर सोमवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो आहे. या पुढे हीआठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कायम ठेवला असून पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात आठवड्यातून एक दिवस पाणी सोडले जात नाही. या निर्णयामुळे सिंहगड रस्त्याचा बहुतांश भाग, सहकारनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ परिसर, कात्रज गाव, पद्मावतीनगर, आंबेगावासह (खु) परिसरातील पाणी पुरवठा बाधित होत आला आहे.गेल्या 2 वर्षा पासून वडगाव जलशुध्दीकरण प्रकल्पांतर्गत पाणीकपात केली जात आहे. याबाबत रहिवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

पुढील महिना-सव्वामहिना अशा प्रकारे पाणी पुरविले जाईल. त्यानंतर तो पूर्ववत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावसकर यांनी सांगितले. खडकवासला धरण साखळीतील धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणेकरांना रोज पुरेशा दाबाने पाणी मिळण्याची आशा आहे.
या परिसरांमधील पाणी पुरवठ्यासाठी 1 कोटी 30 लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या टाक्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून या पाणीपुवठा सुरळीत होईल, असे पावसकर यांनी सांगितले असले तरी त्यावर विश्वास ठेवण्यासाठी कोणी राजी होताना दिसत नाही.

7.64 लाखात महिंद्रा ची नवी बोलेरो

0

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने हिंदुस्थानात लोकप्रिय असलेली ‘बोलेरो’ (Mahindra Bolero B2) एसयूव्हीचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट लॉन्च केला आहे. कंपनीने अधिकृतपणे नवीन बोलेरोच्या फीचर्सची घोषणा केलेली नाही.

मात्र अशी अपेक्षा केली जात आहे की, यात एअरबॅग, पॉवर स्टीयरिंग, एअर कंडिशन, एबीएस, पार्किंग सेन्सर्स यासारखे मूलभूत फीचर्स दिले जाऊ शकतात.

BS6 Mahindra Bolero टॉप व्हेरिएंट्सबद्दल बोलायचे झाले तर यात स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स, फॉग लॅम्प्स, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टमसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, म्युझिक सिस्टम, पॉवर विंडोज, सेन्ट्रल लॉकिंग आणि रीअर वॉश सारखे फीचर्स देण्यात आले आहे. नवीन बोलेरोमध्ये बीएस 6-कंपिलियंट, एमएचडब्ल्यूके 75, 1.5-लीटर, डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 76hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

किंमत

बोलेरोच्या या व्हेरिएंटची किंमत 7.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

महाराष्ट्रात रेडीरेकनरचे दर वाढले, १२ सप्टेंबरपासून लागू होणार नवे दर

0

बेघरांच्या लोकसंख्येत वाढ करण्याचा डाव

पुणे -महाराष्ट्रात रेडीरेकनरच्या दरात सरासरी वाढ करण्यात आली आहे. १.७४ टक्के अशी ही वाढ आहे. ग्रामीण भागात २.८१ टक्के, प्रभाव क्षेत्रात १.८९ टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १.२९ टक्के वाढ आणि महानगरपालिका क्षेत्रात १.२ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक वाढ पुणे जिल्ह्यात झाली आहे. जी ३.९१ टक्के इतकी आहे. तर PCMC क्षेत्रात ही वाढ ३.२ टक्के आहे. पीएमसी क्षेत्रात ही वाढ २ टक्के आहे. मुंबई उणे सहा टक्के, ठाण्यात ०.४४ टक्के, नाशिकमध्ये ०.७४ टक्के, नागपूरमध्ये ०.१ टक्के, नवी मुंबईत ०.९९ टक्के, रायगडमध्ये ३ टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. करोना काळात महसुलात ६० टक्के घट झाली आहे तर दस्त नोंदणीत ४० टक्के घट झाली आहे.

रेडी रेकनर म्हणजे काय?
रेडी रेकनर दर म्हणजे काय? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडत असतो. मूल्य दर तक्के म्हणजेच इंग्रजीत रेडी रेकनर हे स्थावर व जंगम मालमत्ता खरेदीसाठी वापरात आणले जातात. मूल्य दर तक्त्यामध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी जिल्हा, तालुका, गाव, प्रभाव क्षेत्र, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यानुसार स्वतंत्र दर निश्चित करण्यात येतात. नोंदणी महानिरीक्षक किंवा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनंतर रेडी रेकनरचे दर ठरवले जातात. २०१६ पासून हे दर १ एप्रिलपासून अमलात येतात. २०१८-२०१९ या वर्षात मात्र हे दर कायम ठेवण्यात आले होते.

जून महिन्यात करण्यात आली होती कपातीची मागणी
२४ मार्चपासून देशभरात टाळेबंदी झाली. त्यानंतर राज्य शासनाने रेडी रेकनरचे दर जाहीर केले नव्हते. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षानुसारच मुद्रांक शुल्क आकारले जात होते. आता १२ सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. मात्र जून महिन्यात नवे दर जाहीर करताना सरकारने कपातीसह जाहीर करावेत अशी मागणी विकासकांकडून झाली होती

दाऊदचे घर पाडता येत नाही, कंगनाचे मात्र पाडले, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

0

मुंबई- कंगना रनोटचे कार्यालय पाडल्याबद्दल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दाऊद इब्राहिमचे घर पाडले गेले नाही, तर कंगनाचे घर पाडले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

सरकारने कंगनाला अधिक महत्व दिले

फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने कंगना प्रकरणाला जास्त महत्व दिले आहे. ती कोणता नेता नाही. तुम्ही दाऊद इब्राहिमचे घर तोडायला गेला नाहीत पण तिचा बंगला पाडायला गेला . महाराष्ट्र सरकारने जर कंगनाऐवजी कोरोनाशी लढण्यात प्रयत्न केले असते तर आज कोरोनावर नियंत्रण असते. वास्तविकता अशी आहे की महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढा देऊ इच्छित नाही. दरम्यान बीएमसीने कंगनाचे ऑफिस तोडल्यावर, हे एकाप्रकारे राज्यात ‘सरकार पुरस्कृत दहशतवाद’ असल्याचे काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले होते.

निर्माते आणि कलाकारांकडून बेकायदा पैसे उकळणाऱ्यांची सिनेनाट्यक्षेत्रावर दहशत -राजू पार्सेकारांनी उठविला आवाज

0

पुणे- निर्माते , कलाकार यांना फसवून ,दिशाभूल करून , बेकायदा छळून, तुम्ही आमचे सभासद असलेच पाहिजे असे सांगून त्यांच्याकडून वसुली करणाऱ्या काही संघटना आणि संस्था,महामंडळे,परिषदा यांचा वर्चस्ववाद ,लॉबिंग बिनदिक्कत सुरु असून सरकार याकडे सर्रास डोळेझाक करीत त्यांना पाठीशी घालीत आलेली आहे हे वास्तव आहे.प्रसंगी अनेक राजकीय पक्ष अशा लोकांना आपल्या पक्षातील सांस्कृतिक विभागात समाविष्ट करवून घेऊन ताकद देण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा हि वारंवार होत आली आहे. . या सर्व पार्श्वभूमीवर सलाम पुणे पुरस्कार विजेते प्रसिद्ध सिने दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी आता या महत्वाच्या विषयाला हात घातला आहे.त्यांनी या प्रकरणी ‘माय मराठी’ ला हिंदी भाषेत पत्र पाठविले आहे ते आम्ही जसेच्या तसे इथे प्रसिद्ध करीत आहोत .

फिल्म और टेलीविजन इंडस्ट्री में फैला हुआ खौफ:

भारतीय संविधान का आर्टिकल ४१ राइट टु वर्क…हर भारतीय नागरिक को ये हक देता है कि वो भारत में किसी भी जगह बिना किसी रोक ठोक के काम कर सकता है.. अगर कोई भी इंसान या संस्था किसी भारतीय व्यक्ति को काम करने से रोकता है तो ये कानूनन अपराध है .. जो व्यक्ति या कोई भी संस्था या ग्रुप किसी को काम करने से रोकता है तो उसपर कानूनन करवाई का प्रावधान है..

फिल्म एंड टेलीविजन इंडस्ट्री मै शूटिंग के वक़्त ऐसे बहुत से लोग आते है और जो काम करने वाले के कार्ड चेक करते है ..
उनको किसने ये अधिकार दिया है के काम करने वाले व्यक्ति का कार्ड चेक करे या उसे काम करने से रोके ?

आजकल ये आम हो गया है के किसी भी शूटिंग कुछ लोग पहुंच जाते है .कार्ड चेक करने की डिमांड करते है..प्रोड्यूसर मजबूर होता है , उसे शूटिंग करनी होती है तो वो जो भी लोगआते है उनकी मांग पूरी करके शूटिंग में बाधा ना आए इसलिए बिना बहस किए उनका समाधान करने की कोशिश करते है..
किसी को ये कानूनन अधिकार नहीं है के जाकर किसी का काम रोके ये कार्ड दिखाने की मांग करे..

इस परेशानी की वजह से मुंबई में आजकल जो भी प्रोडक्शन्स शूटिंग कर रही हैं वो मजबूरी से कर रहीं है..ये मुंबई फिल्म और टेलीविजन इंडस्ट्री के लिए घातक हो सकता है, इसे रोकना बहुत जरूरी है.. मुंबई और महाराष्ट्र के बाहर सभी राज्य फिल्म शूटिंग के लिए सब्सिडी दे रहे है, जो बनेगी वो सुविधाएं मुहैया करा रहे है.. और इस मुंबई जो फिल्म क्षेत्र की जन्मभूमि है यहां इस परेशानी से निर्माता परेशान है..
इस बारे में सभी को सोचना बहुत जरूरी है..

अगर कोई आकर शूटिंग रोकने की कोशिश करता है तो उसका विरोध करो.
हम सबको जो भारतीय संविधान जो हक दिए है उसका इस्तेमाल कीजिए.. हाई कोर्ट ने भी ये कहां है के अगर dispute ho तो प्रोड्यूसर को लेटर दे सकते हो मगर शूटिंग रोकना या सेट पर जाकर शूटिंग रोकने की धमकी देना, यूनिट सदस्यों के कार्ड्स चेक करना ये नहीं कर सकते है..

तुरंत पुलिस को बुलाकर शिकायत दर्ज कीजिए..
भारतीय संविधान से बढ़कर यहापर कोई नहीं है। जबरदस्ती से अगर कोई कुछ भी तुच्छ सा कारण देकर आपकी कोई शूटिंग रोकता है तो भारतीय संविधान का आर्टिकल ४१ उन्हें पढ़ाइए..और अगर मानते ही नहीं और शूटिंग रोकने की धमकी देते है तो १०० डायल करके पुलिस को बुला लीजिए.. आपकी शूटिंग किसी भी कारण रोकने का किसी को अधिकार नहीं है.. एफआईआर रजिस्टर करवाइए..

राजू पारसेकर – निर्देशक

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना करोनाची लागण

0

पुणे- महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम हे होम क्वारंटाइन झाले आहेत.

कोरोनाची किरकोळ लक्षण आढळल्यानंतर कदमांनी कोरोना चाचणी केली. यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट आला. यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली. यासोबतच संपर्कातील लोकांना कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंतीही केली आहे.

विश्वजित कदम म्हणाले की, ‘धावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच! थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, ही विनंती. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोन द्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन.’ अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे

कोरोनाच्या संकटकाळी रक्तदान करणारे देवदूत – महापौर मुरलीधर मोहोळ

0

सेवा कार्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग स्पृहणीय – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर

रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर आणि प्रगती इंडस्ट्रियल इस्टेट आयोजित रक्तदान शिबिरात 75 बाटल्या रक्त संकलित.

पुणे- एरंडवणा येथील प्रगती इंडस्ट्रियल इस्टेट मधील छोटे कारखानदार,उद्योजक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येउन रोटरी क्लबच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.कोरोनाच्या संकटकाळी रक्तदान करणारे हे माझ्या दृष्टीने देवदूत असून त्यांच्या ह्या कार्याबद्दल समाज त्यांचा कायम कृतज्ञ राहील असे गौरवोद्गार महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या दात्यांना महापौरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,संयोजक दीपक नानिवडेकर,चेतन धारिया, क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर,रोटरी क्लब ऑफ कर्वेनगरच्या प्रेसिडेंट आकांक्षा पुराणिक,राजेश कुलकर्णी,प्रसन्न उमराणी,दिनेश गणेशवाडे,विवेक जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाचे संकट गडद होत असताना विविध सेवाकार्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग स्पृहणीय असून पुणेकर एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ या उक्तीप्रमाणे कृती करत आहेत असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
वृत्तपत्रात रक्ताची टंचाई असल्याचे वाचनात आले व त्यामुळे अनेक रुग्णांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे तातडीने रक्तदान शिबीर आयोजित केल्याचे उद्योजक दीपक नानिवडेकर,राजेश कुलकर्णी यांनी सांगितले.तसेच या कार्यात रोटरी क्लब ऑफ कर्वेनगर व प्रगती इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त केली.
जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित शिबिरात 75 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

अहो दादा , सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळवण्यासाठी अजूनही करावा लागतोय अडचणींचा सामना- महापौरच कळवळले …

0

पुणे- गेली ६ महिने महापालिकेची मुख्य सभा प्रत्यक्षात न घेता स्वतःवर सर्व जबाबदारी घेऊन प्रश्नाच्या खांद्याला खांदा लाऊन कोरोना निर्मुलनासाठी सदैव सज्ज राहिल्याचे दिसत आलेले महापौर आज सहा महिने झाल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाशी कळवळले , जणू ..म्हणाले .. अहो दादा ,अजूनही बेड , ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर साठी सामान्य नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. काही दिवसापूर्वीच मनसे च्या मोरेंनी शव वाहिकेसाठी महापालिकेची मोटार फोडली होती .

पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून बेड मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भात तातडीने कार्यवाही होण्याची शक्यता असून यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.

कोरोना संसर्ग आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी महापौर मोहोळ यांनी ही मागणी केली आहे. यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मागणीही वाढत असून सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘रुग्णांचा बेड्स उपलब्ध होण्यासाठी तातडीने केंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबल्यास रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ शकतील.’

‘पुणे शहरात दररोज ६ हजार पेक्षा जास्त चाचण्या होत असल्या तरी त्यात सरकारी संस्थांकडून होणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या तुलनेने कमी असून यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. यासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होऊ शकेल’ असेही महापौर मोहोळ म्हणाले.

संसर्गाच्या अंदाजकडे महापौरांनी वेधले लक्ष !

कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच्या काळात नजीकच्या काळातील अंदाज बांधून रुग्णसंख्या आणि संभाव्य बेड्सची माहिती बैठकीत उपलब्ध केली जात होती. त्या आधारावर नियोजन करणे सहज शक्य होते. मात्र गेल्या तीन बैठकांमध्ये ही माहिती सादर होत नसल्याने महापौर मोहोळ यांनी समोर आणले. विशेष म्हणजे जम्बो रुग्णालयाची निर्मिती याच अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती.

‘जम्बो’ आणि बाणेर केंद्र पूर्ण क्षमतेने लवकर लवकर सुरु करा : महापौर

‘जम्बो’चा गाडा आता रुळावर येत असला तरी नियोजित क्षमतेनुसार जम्बो आणि बाणेर केंद्राचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स कमीत कमी कालावधीत उपलब्ध करा, अशीही सूचना महापौर मोहोळ यांनी बैठकीत केली. जम्बो आणि बाणेरचे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हॉटेल्स, रीसॉर्टस्, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी

0

कंटेनमेंट झोन वगळता …..

मुंबई, दि. ११ : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रीसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळावर जोडपत्र ए, बी आणि सीद्वारे ही कार्यप्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

https://www.maharashtratourism.gov.in/docs/default-source/whats-new/a-covid-19—mh—hotels.pdf?sfvrsn=2

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह – यांनी राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सना पत्राद्वारे ही कार्यप्रणाली कळवली आहे. कोरोना रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शासनाने निश्चित केलेल्या नियमास अनुसरुन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयामार्फत त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे विविध हॉटेल असोसिएशन्स, व्यावसायिक यांच्याबरोबर वेबिनारचे आयोजन करुन कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा अंतर्भाव पर्यटन संचालनालयाने जारी केलेल्या एसओपीमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही एसओपी तयार करण्यात आली आहे.

एसओपीमध्ये विविध मार्गदर्शक बाबींचा समावेश

  हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना तसेच वेटींग रुम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधीत प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधीत प्रवाशाची नाहरकत घेण्यात यावी. प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर ठेवण्यात यावा. चलनाची हाताळणी करताना योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि डिजीटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे. हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करण्यात यावी. पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-ईन करण्यापुर्वी शक्यतो ऑनलाईन भरुन घेण्यात यावा. शक्य असल्यास क्यू आर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-ईनसारख्या बाबी सुरु कराव्यात. अभ्यागतांनी काय करावे आणि काय करु नये (डूज आणि डोन्टस्) संदर्भातील माहिती त्यांना बूकलेट किंवा व्हीडीओच्या स्वरुपात देण्यात यावी. अभ्यागतांनी शक्य असल्यास त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी. एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास अभ्यागतांचा समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि् खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा. रुम सर्व्हीस संपर्करहीत असावी. अभ्यागताने मागवलेली ऑर्डर रुमच्या बाहेर ठेवण्यात यावी. मुलांसाठीचे प्ले एरिया बंद राहतील. याशिवाय इतरही विविध मार्गदर्शक बाबींचा एसओपीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

याच पद्धतीने होम-स्टे, बी अँड बी, फार्म-स्टे आदींसाठीही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या https://www.maharashtratourism.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अधिवेशन सुरू होण्याच्या 72 तासांपूर्वी सर्व खासदारांची कोविड चाचणी केली जाणार

0

नवी दिल्ली – 14 सप्टेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी, राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू यांनी आज कोविड – 19 चाचणी केली.

राज्यसभेच्या सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या सल्ले-सुचनेनुसार, प्रत्येक सदस्याला आगामी पावसाळी अधिवेशनात हजर होण्यापूर्वी कोविड -19 चाचणी (आरटी-पीसीआर) करणे बंधनकारक आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांनी 72 तासांच्या आत शासनाने अधिकृत केलेल्या कोणत्याही हॉस्पिटल / प्रयोगशाळेत किंवा संसद भवन संकुलात त्यांची कोविड चाचणी करुन घ्यावी.

सदस्यांच्या सोयीसाठी आजपासून संसद भवन येथे तीन चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. अधिवेशनासाठी संसद भवनात प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सदस्यांनी आधीच त्यांचे चाचणी अहवाल नियुक्त ई-मेलद्वारे राज्यसभा सचिवालयात पाठवावे अशी विनंती करण्यात आहे.

तसेच संसद सचिवालय व संसदेच्या आवारात कार्यरत अन्य एजन्सींचे कर्मचारी जे त्यांच्या कर्तव्यावर असताना संसद सदस्यांच्या संपर्कात येतात त्यांच्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच, रिसेप्शन कार्यालय, संसद भवन येथे आजपासून खासदारांचे खासगी कर्मचारी आणि खासदारांच्या वाहनचालकांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शारीरिक अंतराच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी राज्यसभा कक्ष, सज्जा (गॅलरी) आणि लोकसभा कक्ष सदस्यांना बसण्यासाठी वापरले जाईल- त्यापैकी – 57 कक्षामध्ये आणि 51 राज्यसभेच्या गॅलरीमध्ये बसतील. उर्वरित 136 लोकसभेच्या सभागृहात बसतील. एकूण 244 सदस्य असून एक जागा रिक्त आहे.

चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक आसन व्यवस्थेच्या (सीटला) येथे मायक्रोफोन आणि ध्वनी कन्सोल प्रदान करण्यात आला आहे. सभासदांच्या सुरक्षेचा विचार करता सदस्यांना बसून बोलण्याची परवानगी दिली जाईल

डीआरडीओ सर्व खासदारांना मल्टी युटिलिटी कोविड किट देखील पुरवेल. प्रत्येक किटमध्ये डिस्पोजेबल थ्री प्लाय मास्क (40), वॉल नसलेले एन -95 मास्क (5), प्रत्येकी 50 मिलीलीटरच्या सॅनिटायझरच्या 20 बाटल्या, पॉलीप्रोपालीनपासून बनविलेले फेस शिल्ड (5), हातमोजे (40), टच फ्री हुक ( स्पर्श न करता दरवाजे उघडण्यासाठी व बंद करण्यासाठी), सी बक थॉर्न टी बॅग्स ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल आणि हर्बल सेनिटेशन वाइप्स असतील.

येत्या २१ तारखेला तमाशा पंढरी नारायणगांव येथे लोककलावंताचे उपोषण..रघुवीर खेडकर करणार नेतृत्व..

0

मुंबई (प्रतिनिधी) करोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेली असतानाही राज्य सरकारने एका नवा पैशाची मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या दि. २१सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव येथे महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा।निर्णय लोककलावंतानी घेतला आहे.महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही.चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम बंद झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही.अशी खंत ह्या कलावंतांची आहे.म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनेनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती.परंतु अद्यापही सरकार जागे झाले नाही.म्हणूनच तमाशा पंढरी अशी ओळख असणाऱ्या नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील तमाशा सम्राज्ञी कै विठाबाई नारायणगाव यांच्या पुतळ्या समोर लोक कलावंतांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथून तमाशा घडला,अन ज्या विठाबाईंनी आमच्या तमाशा कलावंताचे नाव जगभर पसरविले त्यांच्या गावातूनच आम्ही कलावंतांच्या मागण्यासाठी संघर्षचा शुभारंभ केला आहे.असे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
स्व.विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र कैलाश, कन्या मालती इनामदार, नातू विशाल, त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास मंडळाचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल,दत्ता महाडिक यांचे सुपुत्र संजय महाडीक, शांताबाई संक्रापुरकर, आदी लोककलावंत यांचा या आंदोलनात सहभाग आहे.