पुणे : कोरोना प्राथमिक उपचार केले जातील, असे फलक शहरातील खासगी ओपीडी, दवाखान्यांवरही लावण्यात यावेत असे बंधन महापालिकेने घातले असून क्षेत्रीय कार्यालयांवर याच्या देखरेखीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे,असे काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
बागुल म्हणाले की , कोरोना रुग्णाला श्वास घेण्यास त्रास झाल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते परन्तु आजार प्राथमिक अवस्थेत असल्यास थंडी, ताप, खोकला यावर खाजगी दवाखान्यात ( ओपीडी ) उपचार घेता येतील. गरज भासल्यास कोरोनाची तपासणी केल्यावर तपासणीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला की रुग्णांना रुग्णालयात किंवा कोविड सेंटरमध्ये उपचार दिले जातील. परंतु सद्य स्थितीत तपासणी रिपोर्ट पॉसिटीव्ह आला की, रुग्ण घाबरून जातो आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची तारांबळ उडते. रुग्णालयांमध्ये आधीच गर्दी झालेली आहे, त्यामुळे जागा मिळत नाही किंवा जागा अडविली जाते. अशा रुग्णांनी खासगी ओपीडीत किंवा दवाखान्यातच प्राथमिक उपचार घ्यावेत आणि दवाखान्यांनी व ओपीडीनी कोरोना उपचार केले जातील, असे फलक लावावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. ती मागणी मंजूर झाली असून दवाखान्यांनी फलक लावावेत व सर्दी, खोकला,ताप यावर प्राथमिक उपचार करावेत गरज भासल्यास रुग्णांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगावे असे आदेश काढण्यात आले आहेत आणि क्षेत्रीय कार्यालयांना यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे आबा बागुल यांनी सांगितले.
शहरामध्ये सुमारे साडेतीन हजार दवाखाने असल्याची माहिती बागुल यांनी दिली. प्राथमिक उपचारांसाठी आवश्यक ती औषधे पालिकेने उपलब्ध करून द्यावीत. यामुळे रुग्णालयांमधील गर्दी टळेल, असे बागुल म्हणाले.
कोरोना प्राथमिक उपचाराचे फलक लावण्याचे पुणे शहरातील दवाखान्यांवर बंधन.-आबा बागुल
‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेतील उल्लेखनीय सेवेबद्दल’क्लासिक ड्रायक्लिनर्स’चा पुणे पोलिसांतर्फे सन्मान
पुणे : राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्पूर्ण आणि गुप्त स्वरूपाच्या ‘डीजीपी-आयजीपी’ परिषदेत उल्लेखनीय लॉंड्री सेवा दिल्याबद्दल क्लासिक ग्रुप ऑफ ड्रायक्लिनर्सचा पुणे शहर पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी ‘क्लासिक’चे प्रमुख दुष्यंत निकम यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत गतवर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यातील ‘आयसर’मध्ये ही चार दिवसीय परिषद झाली होती. देशभरातील शंभरहून अधिक पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक या परिषदेत सहभागी झाले होते.
अतिशय महत्वाच्या व्यक्ती असलेल्या या परिषदेत लॉंड्री सेवा देणारे दुष्यंत निकम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासह (महाराष्ट्र शासन) विविध शैक्षणिक संस्थांत लॉंड्री व्यवसायाचे प्रशिक्षण देतात. त्यांच्यावर पुणे शहर पोलिसांनी विश्वास टाकत या परिषदेत लॉंड्री सेवा पुरविण्याची संधी त्यांना दिली होती. त्या विश्वासाला साजेशी कामगिरी करत निकम यांनी तत्पर आणि चोख सेवा देऊन सर्वांचीच मने जिंकली. ७२ वर्षीय वडील त्याच दिवशी अपघात झाल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट असतानाही निकम यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. निकम यांनी त्यांच्या २२ सहकाऱ्यांच्या मदतीने चारही दिवस दोन शिफ्टमध्ये न चुकता, न थकता सेवा दिली. सुरक्षेच्या कारणास्तव लागणाऱ्या सर्व मशिनरी तेथेच नेऊन त्यांनी अगदी कुशलतेने काम केले, अशा शब्दांत पोलिसांनी गौरव केला आहे.
दुष्यंत निकम म्हणाले, “देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि देशभरातील अतिशय व्हीव्हीआयपी दर्जाचे लोक या परिषदेत होते. चार दिवस तिथेच थांबून सेवा करण्याची संधी ‘क्लासिक’ला मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या मशिनरीपासून ते सर्व व्हीव्हीआयपींच्या कपड्यांचे व्यवस्थापन केले. कपड्याना डाग लागू नये, इस्त्री करताना चिकटू नये, बटणे तुटू नयेत, कपड्यांची अदलाबदल होऊ नये, आदी बाबींवर काटेकोरपणे लक्ष देत उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. या चार दिवसांच्या काळात पोलिसांची शिस्त, काटेकोर नियोजन अतिशय जवळून अनुभवता आले. देशाच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तींना सेवा पुरविण्याची संधी पुणे पोलिसांमुळे मिळाली, हे माझे भाग्य समजतो.”
बचतगटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन
ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी‘माविम’चे पुढचे पाऊल
मुंबई, दि. 19 : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचतगटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या ऑनलाईन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले.
‘माविम’च्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, ‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ श्रीमती राजलक्ष्मी नायर आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.
मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी ‘माविम’ अधिनस्त बचतगटांच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेला शेतमालाला पारंपरिक बाजारापेक्षा अधिक बाजारभाव आणि व्यापक तसेच खात्रीशीर बाजारपेठा मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार ‘माविम’ने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कृतीदलाच्या सहाय्याने या ई- सुविधेचे निर्माण केले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून ‘माविम’चे एकूण 1 लाख 37 हजार स्वयंसहायता बचत गट आहेत. त्यापैकी 97 हजार 499 ग्रामीण 39 हजार 591 शहरी गट आहेत. माविमचे 361 लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) आहेत. या बचतगटांशी 11 लाख 81 हजार ग्रामीण तर 4 लाख 28 हजार शहरी महिला जोडलेल्या आहेत.
‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’ मध्ये सुमारे दीड लाख शेतकरी महिलांची, त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल तसेच कृषीपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, विविध भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, नगदी पिके याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी उत्पादनांबाबतची माहितीदेखील भरण्यात आली आहे. यापुढे ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार असून त्यामुळे राज्यातील ‘माविम’च्या बचत गटाच्या महिलांकडे असलेल्या शेतमालाची त्यावेळची (रिअल टाईम) माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे सोपे होणार आहे. पुढील काळात या माहितीची बाजारपेठेशी जोडणी (मार्केट लिंकेज) करण्यात येणार असून त्यामुळे या महिलांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यासह पर्यायाने अधिक बाजारभाव मिळणार आहे.
‘ई-बिझनेस’ उपक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक महिला कार्यकर्ती राहणार असून या महिलेकडे स्मार्ट फोनवरील ई-बिझनेस ॲपद्वारे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये गावातील विविध उत्पादनांची माहिती या मध्ये भरण्यात येणार आहे. बाजाराच्या मागणीनुसार कोणते उत्पादन कोणत्या बाजारपेठेत पाठवायचे तसेच कोणते विक्रेते किंवा संस्था हा माल विकत घेण्यास तयार आहेत याची माहिती माविम जिल्हा कार्यालयामार्फत घेण्यात येईल. थोडक्यात गावातील महिला प्रत्यक्षपणे जगातील बाजारपेठेशी या माध्यमातून जोडण्याचा ‘माविम’चा मानस आहे.
या ऑनलाईन बैठकीत मंत्री ॲड.ठाकूर, माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे आदींनी अमरावती जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून माविमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती जाणून घेतली. सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालकांच्या कल्याणासाठी विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम गतीने राबविण्यात येतील असे सांगितले. अमरावती व ठाणे जिल्ह्यामध्ये ‘माविम’ने या उपक्रमाची यशस्वी प्रायोगिक चाचणी केली व शेळी तसेच भाजीपाल्याकरिता खरेदीदार मिळवून दिले, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी – शर्मा यांनी दिली.
ई- बिझनेस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती उत्पादनाचे बाजारपेठेशी ई- लिंकेज झाल्यामुळे बचत गटाच्या शेतकरी महिला सदस्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनांना अधिक बाजारभाव मिळणार असून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासह त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.- ॲड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
माविमने यापूर्वी बचत गटाच्या महिलांकडून उत्पादित होत असलेल्या उत्पादनांची आधाररेखा माहिती (बेसलाईन डेटा) जमा केली जात होती. मात्र, आता वेळोवेळी अद्ययावत माहिती या ई- प्लॅटफॉर्मवर भरण्यात येणार असल्याने उत्पादनांना वेळेत बाजारपेठ आणि योग्य दर मिळू शकणार आहे. यापुढील काळात बचत गटांकडून उत्पादित कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे ई- व्यासपीठ निर्माण करण्यात येईल.- श्रीमती ज्योती ठाकरे
शुक्रवारी दिवसभरात ४ हजार ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
मुंबई, दि. 19 : राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल (शुक्रवारी) दिवसभरात 4 हजार 009 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 3 हजार 759 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 9,440 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे 2020 पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 1 एप्रिल 2020 ते 18 सप्टेंबर 2020 या काळात 1 लाख 56 हजार 085 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी 1 लाख 50 हजार 955 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहेत.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीनेसुध्दा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरिता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.
दि.24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल (शुक्रवारी) दि.18 सप्टेंबर 2020 रोजी राज्यात 123 गुन्हे नोंदविण्यात आले असून 86 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 32 लाख 69 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि.01 एप्रिल, 2020 पासून दि. 18 सप्टेंबर 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 18,304 गुन्हे नोंदविण्यात आले असून 9,937 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 1697 वाहने जप्त करण्यात आली असून 42 कोटी 23 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअॅप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून commstateexcise@gmail.com ई-मेल आहे.
विद्यापीठांनी ‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 19 – बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयंरोजगार देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच ग्रामीण भारताच्या आर्थिक उत्थानासाठी बांबू हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून राज्यातील विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून बांबू मिशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केली.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित ‘बांबू मिशन’अंतर्गत सामुदायिक बांबू लागवड मोहीम या विषयावरील दोन दिवसांच्या चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले, यावेळी पणजी, गोवा येथील राजभवन येथून उपस्थितांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.
बांबू लागवड अत्यंत कमी खर्चिक आहे. बांबूचा विस्तार झपाट्याने होतो. त्याला जलसिंचनाची आवश्यकता नाही. बांबूमुळे जमिनीची धूप थांबते व गुरांसाठी चारा उपलब्ध होतो. शेतजमीन, जंगल तसेच पहाडी प्रदेश कोठेही बांबू लागवड होते. पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या बांबूपासून टोपली, फर्निचर, वस्त्र, दाग-दागिने, राखी यांसह अनेक वस्तू तयार होतात. जीवनाच्या आरंभापासून तर थेट अंत्ययात्रेपर्यंत बांबू माणसाला उपयुक्त असणारी वस्तू असल्याचे सांगून विद्यापीठांनी आणि विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण जनतेला बांबू लागवड तसेच बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे विपणन करण्यासाठी मदत करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
विद्यापीठातील प्राध्यापकांनी केवळ अध्यापनाचे कार्य न करता समाजाला आपले योगदान दिले पाहिजे असे सांगून विद्यापीठांनी बांबू मिशनला आपले मिशन बनवून यशस्वी करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारने बांबू मिशन सुरु करून सन 2017 साली बांबूला वृक्ष न मानता गवत मानावे या दृष्टीने विधेयक पारित केले आहे. सदर विधेयकामुळे वनवासी व आदिवासी लोकांना बांबूचा उपजीविकेसाठी उपयोग करता येऊ लागला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
राजभवन येथे बांबू फर्निचर
गोवा येथील काबो निवास राजभवन 450 वर्षे जुने असून या ठिकाणी बांबूचा विविध ठिकाणी उपयोग केलेला आहे. मुंबई येथील राजभवन येथे नवी वास्तू तयार होत असून त्या ठिकाणी फर्निचर घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र राजभवन येथे केवळ बांबूपासून तयार केलेलेच फर्निचर घ्यावे, अशी सूचना आपण केली असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.
चर्चासत्राला कुलगुरु डॉ पी. पी. पाटील, प्र-कुलगुरू पी. पी. माहुलीकर, धडगाव, जि. नंदुरबार येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अध्यक्ष हेमंत वळवी, प्रो बी व्ही पवार, रासेयोचे राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंके यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, निमंत्रित वक्ते, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 643
पुणे विभागातील 2 लाख 77 हजार 860 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 3 लाख 65 हजार 971 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि.19 :- पुणे विभागातील 2 लाख 77 हजार 860 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 65 हजार 971 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 78 हजार 643 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 9 हजार 468 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.92 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 44 हजार 516 रुग्णांपैकी 1 लाख 96 हजार 559 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.22 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.39 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 28 हजार 153 रुग्णांपैकी 19 हजार 57 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 289 आहे. कोरोनाबाधित एकूण 807 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 681 रुग्णांपैकी 19 हजार 84 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 595 आहे. कोरोनाबाधित एकूण 1002 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 27 हजार 691 रुग्णांपैकी 16 हजार 903 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 750 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 930 रुग्णांपैकी 26 हजार 257 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 477 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7 हजार 266 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 93, सातारा जिल्ह्यात 790, सोलापूर जिल्ह्यात 660, सांगली जिल्ह्यात 1 हजार 10 तर कोल्हापूर जिल्ह्यात 713 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 99 हजार 234 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 65 हजार 971 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 18 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु
मुंबई, दि. 19 : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने १८ ते २३ सप्टेबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहेत.
उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉगइन करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जावून मुंबई शहर सिलेक्ट करावे. नंतर पुढे एम्प्लॉयर सिलेक्ट करावा व इच्छुक रिक्त पदाकरीता अप्लाय करावे. एम्प्लॉयरकडून उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती छाया कुबल यांनी केले आहे.
पॅकर, लोडर, हाऊसकिपर आदी विविध पदे उपलब्ध
कोरोना संकटामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय, उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी शर्तीच्या अधीन राहून कंपन्या, आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मुंबई शहर जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे कॉलींग प्रोसेसर, फील्ड सेल्स, लोन प्रोसेसर, बाइकर ऑफ डिलिव्हरी, इन्शुरन्स सेल्स, रिकव्हरी मॅनेजर, पॅकर, लोडर, हेल्पर प्रमोटर, डॉक्युमेंट कलेक्शनर, टेलर, सीवींग मशिन ऑपरेटर, टेरिटरी एक्झिक्युटिव्ह, सिनिअर टेरिटरी एक्झिक्युटिव्ह, टेलीसेल्स कॉलर, इन्स्टॉलेशन टेक्निशिअन, ईएमआय प्रोसेसर, हाऊसकिपर, कॅश कलेक्शनर इत्यादी पदे उपलब्ध आहेत.
मेळाव्यासाठी कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी ऑनलाईन पद्धतीने दूरध्वनी, भ्रमणध्वनी तसेच स्काईप आदींच्या माध्यमातून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.
महापौरसाहेब, अँटीचेंबरमध्ये चर्चा भरपूर झाली…( व्हिडिओ)
पुणे- अँटी चेंबरमध्ये चर्चा भरपूर झाली. सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना खुलासा करायला सांगा , शहरात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेडस मिळत नाही, यावर तरी महापालिका प्रशासनाला खुलासा करू द्या, अशी मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतर्फे शुक्रवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. मात्र, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडे दुर्लक्ष करून तातडीने सभा तहकूब केली.पुणे महापालिका सर्वसाधारण सभेत आज कोरोना संदर्भातील विविध प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.पुणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे खाजगीकरण होऊ नये, हे चुकीचे आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अधिक सक्षम हवे. प्रशासनाने याबाबतीत खुलासा करावा, अशी मागणी माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केली.
कोरोना रुग्णनांना डॅश बोर्डवर बेडस उपलब्ध नाही. नायडू, जम्बो, ससूनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते आधी सांगा, शिक्षण मंडळाचे अधिकारी बोलावले, स्मार्ट सिटी अधिकारी का बोलावले नाही, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमचे सभासद पोटतिडकीने बोलत असताना त्यांची दाखल घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली.
कोरोनामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात आहे, त्यांना ऑक्सिजन बेडस मिळत नाही, याची उत्तरे द्या, अशी मागणी नगरसेवक योगेश ससाणे यांनी केली. महापालिका प्रशासनाला पाठीशी घालू नका, उत्तरे द्या, महापौर खुलासा करायला सांगा, असेही त्यांनी सांगितले.आता अँटी चेंबरमध्ये चर्चा भरपूर झाली. सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना खुलासा करायला सांगा, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली.पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना नगरसेवकांच्या भावना तीव्र आहेत, त्यांना बोलू द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली. शेवटी महापौर बोलू देत नसल्याने नगरसेवक गणेश ढोरे, गफूरभाई पठाण, बाबुराव चांदेरे यांनीही महापौरांसमोर येऊन जाब विचारला.
आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान … ३ लाख ८८७ रुग्ण ॲक्टिव्ह
मुंबई, दि.१८: राज्यात आज एका दिवसात २२ हजार ७८ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ६५६ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ३४ हजार ४३२ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या ३ लाख ८८७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले २१,६५६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४०५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२८३ (५२), ठाणे- ४४५ (६), ठाणे मनपा-४३१ (१०), नवी मुंबई मनपा-२८० (४), कल्याण डोंबिवली मनपा-५५७ (१), उल्हासनगर मनपा-७२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३९ (१), मीरा भाईंदर मनपा-२०१ (९), पालघर-२१५ (४), वसई-विरार मनपा-२३५ (१), रायगड-४५२ (९), पनवेल मनपा-२४७, नाशिक-२४१ (१०), नाशिक मनपा-५२३ (५), मालेगाव मनपा-२० (१), अहमदनगर-६९८ (१२),अहमदनगर मनपा-२९७ (९), धुळे-३९ (२), धुळे मनपा-४०(१), जळगाव-८३४ (१३), जळगाव मनपा-१३० (३), नंदूरबार-१३३, पुणे- १३५६ (७), पुणे मनपा-१८७५ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-८१० (४), सोलापूर-५८४ (९), सोलापूर मनपा-५३ (३), सातारा-९०२ (३४), कोल्हापूर-६०७ (५), कोल्हापूर मनपा-१९६ (६), सांगली-७८१ (१७), सांगली मिरज कुपवाड मनपा-३३१ (४), सिंधुदूर्ग-२०० (६), रत्नागिरी-११५, औरंगाबाद-११७ (५),औरंगाबाद मनपा-१७९ (७), जालना-७३ (१), हिंगोली-४७ (१), परभणी-३३२, परभणी मनपा-२४ (३), लातूर-२२१ (८), लातूर मनपा-९४ (४), उस्मानाबाद-२९५ (२), बीड-१८२ (७), नांदेड-१९० (१), नांदेड मनपा-१३२ (३), अकोला-३७, अकोला मनपा-८३ (१), अमरावती-१२५ (१), अमरावती मनपा-२४६, यवतमाळ-३२० (१०), बुलढाणा-१०७ (१), वाशिम-१०१ (३), नागपूर-४१२ (५), नागपूर मनपा-१६९४ (५९), वर्धा-१२९, भंडारा-९२, गोंदिया-१६६ (४), चंद्रपूर-१५७, चंद्रपूर मनपा-१०१, गडचिरोली-३८, इतर राज्य- ४० (२).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५१ टक्के) आले आहेत. राज्यात १७ लाख ७८ हजार ७९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७६७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४०५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७२ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,८०,६६८) बरे झालेले रुग्ण- (१,३७,६६४), मृत्यू- (८३७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४,२५९)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,६६,९८२), बरे झालेले रुग्ण- (१,३२,६११), मृत्यू (४४४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,९२१)
पालघर: बाधित रुग्ण- (३३,००५), बरे झालेले रुग्ण- (२६,२३१), मृत्यू- (७५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०१६)
रायगड: बाधित रुग्ण- (४५,१३५), बरे झालेले रुग्ण-(३४,५५६), मृत्यू- (९८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५९१)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (७१००), बरे झालेले रुग्ण- (३८८९), मृत्यू- (१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०१४)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२९३१), बरे झालेले रुग्ण- (१५८०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९७)
पुणे: बाधित रुग्ण- (२,५३,५५४), बरे झालेले रुग्ण- (१,६८,७३०), मृत्यू- (५१३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९,६९१)
सातारा: बाधित रुग्ण- (२८,५१८), बरे झालेले रुग्ण- (१९,१००), मृत्यू- (६९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७१९)
सांगली: बाधित रुग्ण- (२९,७६९), बरे झालेले रुग्ण- (१८,४६१), मृत्यू- (९०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,४०४)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३६,०७६), बरे झालेले रुग्ण- (२५,४७१), मृत्यू- (१०६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५३७)
सोलापूर: बाधित रुग्ण- (३०,१९१), बरे झालेले रुग्ण- (२२,०२२), मृत्यू- (१०२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१४६)
नाशिक: बाधित रुग्ण- (६०,६५०), बरे झालेले रुग्ण- (४६,९४४), मृत्यू- (११२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,५८२)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (३३,८९०), बरे झालेले रुग्ण- (२४,६८६), मृत्यू- (५४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(८६६२)
जळगाव: बाधित रुग्ण- (४१,३७३), बरे झालेले रुग्ण- (३१,३२७), मृत्यू- (११०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८९४०)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (४४५०), बरे झालेले रुग्ण- (३१९५), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४६)
धुळे: बाधित रुग्ण- (११,४३४), बरे झालेले रुग्ण- (९५३०), मृत्यू- (२८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१५)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३१,४०२), बरे झालेले रुग्ण- (२२,६६९), मृत्यू- (७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९३४)
जालना: बाधित रुग्ण-(६४५९), बरे झालेले रुग्ण- (४४५२), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३०)
बीड: बाधित रुग्ण- (८२५७), बरे झालेले रुग्ण- (५१४५), मृत्यू- (२२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८८८)
लातूर: बाधित रुग्ण- (१४,०४३), बरे झालेले रुग्ण- (९५१७), मृत्यू- (४०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१२२)
परभणी: बाधित रुग्ण- (४५१२), बरे झालेले रुग्ण- (२९०६), मृत्यू- (१४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६३)
हिंगोली: बाधित रुग्ण- (२३४३), बरे झालेले रुग्ण- (१८२८), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६६)
नांदेड: बाधित रुग्ण- (१२,७७७), बरे झालेले रुग्ण (६१७०), मृत्यू- (३३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२७२)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (९९५९), बरे झालेले रुग्ण- (६७१५), मृत्यू- (२६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८३)
अमरावती: बाधित रुग्ण- (१०,१०३), बरे झालेले रुग्ण- (७७५०), मृत्यू- (२११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४२)
अकोला: बाधित रुग्ण- (५९४६), बरे झालेले रुग्ण- (३८९६), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६४)
वाशिम: बाधित रुग्ण- (३२३६), बरे झालेले रुग्ण- (२४४४), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३०)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (६११७), बरे झालेले रुग्ण- (३६९१), मृत्यू- (१०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३२३)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (६३१८), बरे झालेले रुग्ण- (३८४१), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३४२)
नागपूर: बाधित रुग्ण- (६०,१०९), बरे झालेले रुग्ण- (३६,७७२), मृत्यू- (१५८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,७४६)
वर्धा: बाधित रुग्ण- (२६५३), बरे झालेले रुग्ण- (१६७२), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५२)
भंडारा: बाधित रुग्ण- (३६७१), बरे झालेले रुग्ण- (१७९०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२७)
गोंदिया: बाधित रुग्ण- (४०८७), बरे झालेले रुग्ण- (२५२९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५१०)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (७१०३), बरे झालेले रुग्ण- (३१८५), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८५६)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (१४५४), बरे झालेले रुग्ण- (१०३५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१२२१), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८१)
एकूण: बाधित रुग्ण-(११,६७,४९६) बरे झालेले रुग्ण-(८,३४,४३२),मृत्यू- (३१,९७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६),ॲक्टिव्ह रुग्ण-(३,००,८८७)
(टीप: दैनंदिन रिपोर्ट झालेले ४०५ मृत्यू आणि पोर्टलवर अद्ययावत झालेले पूर्वीचे ३५ मृत्यू असे एकूण ४४० मृत्यूंची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४४० मृत्यूंपैकी २४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९३ मृत्यू पुणे मनपा-४०, नागपूर ११, अहमदनगर -९, औरंगाबाद -७, सातारा -७, पुणे ग्रामीण – ३, कोल्हापूर ३, सांगली -३, जळगाव -२, नांदेड -२, बुलढाणा -१, ठाणे -१, लातूर -१, पालघर -१, सोलापूर – १ आणि यवतमाळ -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
नगरसेवक वसंत मोरेंकडून दमदाटी चा पायंडा -सर्व आरोप खोटे ; अतिक्रमण प्रमुखांचा दावा (व्हिडीओ )
पुणे- मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांच्यावर केलेले सर्व आरोप जगताप यांनी फेटाळून लावले असून आपण किमान वेतन कायदा पाळून आणि इ एस आय पी एफ चे सर्व नियम पाळूनच ठेकेदाराने काम करण्याचे आदेश दिलेले आहेत .याबाबत सर्व कागदपत्रे आपल्या कार्यालयात उपलब्ध आहेत . केवळ मनसेचेच नेते असलेले किशोर शिंदे यांनी बिगारी अतिक्रमण कारवाई करताना जप्त मालाची चोरी करतात असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली म्हणूनच आपण या सर्व बिगारी कामगारांच्या बदल्या केल्या . असे स्पष्टीकरण अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांनी दिले आहे. ते देताना त्यांनी मोरे हे अधिकाऱ्यांवर दमदाटी चा पायंडा पाडीत असल्याचा आरोप केला आहे .
नेमके जगताप यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात ….
अंमलीपदार्थ विक्री करणारी टोळी गजाआड
पुणे – अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळीला खंडणी व अंमली पदार्थविरोधी पथकाने पश्चिम विभाग जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 130 किलो गांजासह 24 लाख 53 हजारांचा ऐवज हस्तगत केला.
अरुण बळीराम जाधव (26, रा. निगडी), प्रशांत हरीभाऊ शिंदे (निगडी), शुभम सुनील मोहिते (19, रा. पांगरी, खेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील गाडीत पाच गोण्यांमधून 130 किलो 250 ग्रॅम गांजा, रोख रक्कम सापडली.
आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सह आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मार्गदर्शनपर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उपायुक्त संभाजी कदम व सह आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते.
यावेळी पोलीस कर्मचारी प्रमोद गाडे यांना एका कारमध्ये गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शास्त्रीनगर चौकात सापळा रचण्यात आला. संशयीत गाडी दिसताच तिला थांबण्याचा इशारा देऊनही ती थांबली नाही. यामुळे संशय आल्याने संबंधीत गाडी येरवडा येथील डॉन बॉस्को शाळेच्या रस्त्यावर अडवली. यावेळी गाडीतील तिघांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता गाडीत गांज्यांची पोती सापडली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, दत्ताजी मोहिते, पोलीस कर्मचारी प्रदीप गाडे, रमेश गरुड, मंगेश पवार, सुनील चिखले, विजय गुरव, महेश कदम, साहिल शेख, मनोज शिंदे, फिरोज बागवान, प्रमोद टिळेकर, प्रदीप शितोळे, प्रविण पडवळ, रुपाली कर्णवर, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.
‘त्या ‘ ठेकेदारावर गुन्हा दाखल करा -आबा बागुल (व्हिडीओ)
पुणे- महापालिकेत प्रत्येक खात्यात ठेकेदारी पद्धतीने कामगार भरतीची कुप्रथा पडलेली आहे . आणि हे ठेकेदार कामगारांची आर्थिक पिळवणूक करून गलेलठ्ठ होत असल्याच्या तक्रारी येत आहेत . अशा पद्धतीने किमान वेतन कायदा न पाळता , कामगारांचे इएसआय ,पीएफ न भरता त्यांची पिळवणूक जर कोणी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही .आज असंख्य कामगार महापालिकेत आले होते . या प्रकरणी आपण संबधित ठेकेदारावर कारवाई करा अशी मागणी अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे अशी माहिती आज कॉंग्रेसचे गट नेते आबा बागुल यांनी ‘माय मराठी’ ला दिली .पहा नेमके आबा बागुल काय म्हणाले …
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मध्ये ७० प्लाझ्मा दान
- आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
पुणे- पुणे शहरातील वाढती मागणी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी ७० प्लाझ्मादानाची संकल्पना मांडून आवाहन केले होते. या उपक्रमाचा कोथरुड मध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमाचा बुधवारी श्रीगणेशा झाला.
कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. मात्र, पुणे शहरासह सर्वत्र प्लाझ्माची मागणी वाढूनही, त्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या मतदारसंघातून ७० प्लाझ्मा दात्यांकडून प्लाझ्मा दान उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडली होती.
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, बुधवारपासून पुणा सेरोलाॅजिकल इन्सिट्यूट ब्लड बँक येथे प्लाझ्मादान शिबीर राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बुधवारी . चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड कार्यालयाचे व्यवस्थापक राहुल देशपांडे, कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, अजय मारणे यांच्यासह अनेकांनी स्वेच्छेने प्लाझ्मा दान करुन या उपक्रमाचा श्री गणेशा केला. तर अनेकजणांनी प्लाझ्मादान करण्यासाठीची इच्छा व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ मिळत असून, बुधवारी प्लाझ्मा दान उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर पुणा सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूटकडे प्लाझ्माच्या मागणी सुरु झाली आहे.
दरम्यान, सध्याच्या काळात रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी म्हणून प्लाझ्मादात्यांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन प्लाझ्मा दान करावा असे आवाहन आ. श्री. पाटील यांनी केले.
महापौर कार्यालयाच्या दरवाजातच अधिकाऱ्याला गाठले अन …(व्हिडीओ )
पुणे- महापालिकेची मुख्य सभा संपली अन … अ तिरिक्त आयुक्तांच्या समोर आज मनसे च्या 2 नगरसेवकांनी अतिक्रमण प्रमुख माधव जगताप यांना फैलावर घेतले.५० ते ६० युवकांचा जमाव अन महापालिकेच्या 2 सुरक्षा रक्षकासमवेत असलेले अतिरिक्त आयुक्त आणि अतिक्रमण प्रमुख आणि अतिक्रमण प्रमुखांवर भडकलेले मनसे नगरसेवक वसंत मोरे (समवेत साईनाथ बाबर )या प्रसंगामुळे वातावरणात तणाव निर्माण होऊ पाहताच तेथून अतिक्रमण प्रमुखांनी महापौर कार्यालयात निघून जाणे पसंत केले .त्यानंतर इथे कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल ,जुन्या काळातील जयंतराव टिळक गटाचे म्होरके असेलेले नेते पोहोचले आणि नंतर त्यांनीही अतिरिक्त आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा वाचून प्रश्न सोडविण्याची मागणी केली.अन वातावरण शांत झाले. प्रश्न होता , सुमारे २०० कंत्राटी कामगारांचा ; ज्यापैकी ९० टक्के बिगारी अतिक्रमण खात्यात ठेकेदारी पद्धतीने कामाला .. त्यांच्या बदल्या अतिक्रमण प्रमुखांनी केल्याने हा सारा वाद चिघळला होता . ते बदल्याच्या आदेशावर ठाम होते तर किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देणे आणि अन्य तक्रारी अतिक्रमण विभाग प्रमुखांच्या विरोधात मनसेच्या वतीने आक्रमक पणे मांडल्या गेल्या .यानंतर ‘माय मराठी शी बोलताना पहा मनसे नगरसेवक वसंत मोरे काय म्हणाले ….
बचत गटातील शेतकरी महिलांच्या उत्पादनांची माहिती आता ऑनलाईन
ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’चे ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
मुंबई, दि. 18 : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) आता आणखी पुढचे पाऊल टाकत ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे. त्यासाठी निर्माण केलेल्या ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ या ऑनलाईन सुविधेचे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन झाले.
माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, युनिसेफच्या राज्यातील आहारतज्ज्ञ श्रीमती राजलक्ष्मी नायर आदी या ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले.
मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माविम अधिनस्त बचत गटांच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेला शेतमालाला पारंपरिक बाजारापेक्षा अधिक बाजारभाव आणि व्यापक तसेच खात्रीशीर बाजारपेठा मिळवून देण्यासाठी ऑनलाईन व्यवस्था निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार माविमने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कृतीदलाच्या सहाय्याने या ई- सुविधेचे निर्माण केले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून माविमचे एकूण 1 लाख 37 हजार स्वयंसहायता बचत गट आहेत. त्यापैकी 97 हजार 499 ग्रामीण 39 हजार 591 शहरी गट आहेत. माविमचे 361 लोकसंचलित साधन केंद्र (सीएमआरसी) आहेत. या बचत गटांशी 11 लाख 81 हजार ग्रामीण तर 4 लाख 28 हजार शहरी महिला जोडलेल्या आहेत.
‘ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’मध्ये सुमारे दीड लाख शेतकरी महिलांची, त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल तसेच कृषीपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली असून यामध्ये अन्नधान्य, विविध भाजीपाला, फळभाज्या, फळपिके, नगदी पिके याचबरोबरीने शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी उत्पादनांबाबतची माहितीदेखील भरण्यात आली आहे. यापुढे ही माहिती वेळोवेळी अद्ययावत केली जाणार असून त्यामुळे राज्यातील माविमच्या बचत गटाच्या महिलांकडे असलेल्या शेतमालाची त्यावेळची (रिअल टाईम) माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे सोपे होणार आहे. पुढील काळात या माहितीची बाजारपेठेशी जोडणी (मार्केट लिंकेज) करण्यात येणार असून त्यामुळे या महिलांना आपली उत्पादने विक्रीसाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध होण्यासह पर्यायाने अधिक बाजारभाव मिळणार आहे.
‘ई बिझनेस’ उपक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक महिला कार्यकर्ती राहणार असून या महिलेकडे स्मार्ट फोनवरील ई-बिझनेस ॲप व्दारे ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये गावातील विविध उत्पादनांची माहिती या मध्ये भरण्यात येणार आहे. बाजाराच्या मागणीनुसार कोणते उत्पादन कोणत्या बाजारपेठेत पाठवायचे तसेच कोणते विक्रेते किंवा संस्था हा माल विकत घेण्यास तयार आहेत याची माहिती माविम जिल्हा कार्यालयामार्फत घेण्यात येईल. थोडक्यात गावातील महिला प्रत्यक्षपणे जगातील बाजारपेठेशी या माध्यमातून जोडण्याचा माविमचा मानस आहे.
या ऑनलाईन बैठकीत मंत्री ॲड. ठाकूर, माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे आदींनी अमरावती जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून माविमच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात झालेल्या परिवर्तनाची माहिती जाणून घेतली. सचिव श्रीमती कुंदन यांनी महिला व बालकांच्या कल्याणासाठी विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम गतीने राबविण्यात येतील असे सांगितले. अमरावती व ठाणे जिल्हयामध्ये माविमने या उपक्रमाची यशस्वी प्रायोगिक चाचणी केली व शेळी तसेच भाजीपाल्याकरिता खरेदीदार मिळवून दिले, अशी माहिती माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी दिली.
ई- बिझनेस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेती उत्पादनाचे बाजारपेठेशी ई- लिंकेज झाल्यामुळे बचत गटाच्या शेतकरी महिला सदस्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळणार आहे. त्यांच्या उत्पादनांना अधिक बाजारभाव मिळणार असून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासह त्यांच्या कुटुंबांचेही जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल – ॲड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
माविमने यापूर्वी बचत गटाच्या महिलांकडून उत्पादित होत असलेल्या उत्पादनांची आधाररेखा माहिती (बेसलाईन डेटा) जमा केली जात होती. मात्र, आता वेळोवेळी अद्ययावत माहिती या ई- प्लॅटफॉर्मवर भरण्यात येणार असल्याने उत्पादनांना वेळेत बाजारपेठ आणि योग्य दर मिळू शकणार आहे. यापुढील काळात बचत गटांकडून उत्पादित कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंनाही बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारचे ई- व्यासपीठ निर्माण करण्यात येईल. – श्रीमती ज्योती ठाकरे
