Home Blog Page 2451

उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांच्या दालनात’कोरोना किलर” उपकरण

0

पुणे :
 जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध  पद्धतीवर संशोधित “कोरोना किलर”हे मशीन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता महाराष्ट्राच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे.
या मशीनचे संशोधन  केलेल्या इंडोटेक या कंपनीचे भाऊसाहेब जंजिरे व  विजयसिंह डुबल यांनी काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात कोरोना किलर या मशीनचे सादरीकरण केले. कोरोना व्हायरसला ही मशीन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती मंत्री उदय सामंत यांना दिली. त्यानंतर हे मशीन त्यांच्या जनता दरबारात बसविण्यात आले.महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय,  शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच सहयोग या संस्थेने बसविले आहे. 
कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंत,   असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्र व मशीन इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण  व संशोधन विभागाने ह्या  मशीनची कार्यक्षमता  प्रमाणित केली आहे. 
 निवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण  हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही  हवा पोहोचते  तेथे हे आयान पोहचतात व  कोरोना व्हायरस आणि  इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले

गेल्या तीन वर्षांत 3,82,581 बोगस कंपन्या केल्या बंद

0

नवी दिल्ली –

सरकारने बोगस  कंपन्या ओळखुन  त्यांना बंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती  घेतली आहे.ज्या कंपन्यांनी सलग दोन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वर्षे आपले आर्थिक विवरणपत्र (financial statement) सादर केले नाही ,अशा कंपन्यांना कंपनी कायद्याच्या वर्ष 2013च्या,  248 व्या कलमानुसार  रद्द करण्यात आले आहे. 2016 च्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून,गेल्या तीन वर्षांत सरकारने 3,82,581कंपन्या बंद केल्या आहेत. केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री श्री. अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देतांना आज ही माहिती दिली.

शेल कंपनी या शब्दाची व्याख्या कंपनी कायद्यात नाही. जी कंपनी व्यावसायिक दृष्ट्या सक्रीय नाही किंवा जिची मालमत्ता लक्षात घेण्याजोगी नाही अथवा जी कर बुडविणे,अवैध मार्गाने पैसे कमावणे, मालकी सुस्पष्ट नसणे बेनामी मालमत्ता इत्यादी प्रकारांसाठी वापरली जाते, अशा कंपन्यांना शेल कंपनी असे  म्हटले जाते. शेल कंपन्यांच्या या कामात लक्ष घालण्यासाठी सरकारने  विशेष कृती दल ( स्पेशल टास्क फोर्स)स्थापन केले असून  त्यांनी अशा बोगस कंपन्या ओळखण्यासाठी एका लाल निशाणाच्या संकेताचा वापर करून  अशा प्रकारच्या कंपन्यांचा धोका ओळखावा ,अशी शिफारस केली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये पहिल्यांदाच 12 लाखांपेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या

0

नवी दिल्ली – कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. देशभरामध्ये पहिल्यांदाच एका दिवसामध्ये 12 लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये देशात 12,06,806 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.  देशामध्ये आत्तापर्यंत एकूण 6.36 कोटी (6,36,61,060) जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशामध्ये कोविड-19 च्या चाचण्या करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अतिशय वेगाने वृद्धी होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशाची दरदिवसाला चाचणी करण्याची क्षमता अनेक पटींनी आता वाढली आहे. दि. 8एप्रिल, 2020 रोजी  देशात अवघ्या 10,000 चाचण्या करण्यापासून प्रारंभ झाला होता. आता चाचण्यांची  दैनंदिन सरासरी 12 लाखांच्या पुढे गेली आहे.

गेल्या केवळ 9 दिवसांत एक कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मोठ्या संख्येने चाचण्या होत असल्यामुळे कोविडची बाधा झालेल्या रूग्णांची ओळख लवकर होते त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होते. वेळेवर आणि प्रभावी उपचारांमुळे रूग्णांच्या मृत्यूदराचे प्रमाणही कमी होत आहे.

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे संक्रमणाच्या- प्रसाराचे प्रमाण कमी  होत आहे त्याचबरोबर दैनंदिन कोविड बाधित होण्याच्या दरामध्येही घट दिसून येत आहे.जगामध्ये होत असलेल्या चाचण्या पाहता भारताची दैनंदिन चाचणी संख्या सर्वाधिक आहे.

कोविड-19 संदर्भातील धोरणे आवश्यतेनुसार केंद्राकडून सातत्याने विकसित करण्यात येत आहेत. तसेच लोकांपर्यंत चाचण्यांची सुविधा पोहोचविण्यासाठी, चाचण्या अधिक सुलभतेने करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. अलिकडेच केंद्र सरकारने प्रथमच ‘ मागणीनुसार चाचणी’ सेवा उपलब्ध करून दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही चाचणी सक्षम करण्यासाठी  कार्यपद्धती अधिक व्यापक करून त्यामध्ये लवचिकता आणण्यात आली आहे.

केवळ सरकारी डॉक्टरांनी लिहून दिले तरच चाचणी केली जाणार असे आता नाही;  तर कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला कोविड-19 चाचणी करण्यासाठी लिहून देण्याची परवानगीही केंद्र शासनाने आता दिली आहे. ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणीचे निकष पूर्ण करणा-या कोणत्याही व्यक्तीला आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाला तसेच सर्व पात्र वैद्यकीय चिकित्सकांना कोविड-19 चाचणी लिहून देता येवू शकते. त्याचबरोबर चाचणी सुलभ करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी त्वरित पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी, संक्रमणाला आळा घालण्यासाठी अवलंबिलेल्या नीतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने चाचण्या करणे, हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती चाचणी करण्यातून सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ केल्यानंतर आलेला निष्कर्ष   आरटी-पीसीआर नियमनाच्या अधिन राहून देण्यात आलेला आहे, असे राज्यांनी स्पष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सुलभ चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विस्तारित चाचणी प्रयोगशाळांचे जाळे देशभरामध्ये तयार करण्यात आले आहे.

देशात प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये 46,131पर्यंत वाढ झाली आहे.

भारत जागतिक आरोग्य संघटनेच्या  मार्गदर्शक सल्ल्यानुसार प्रतिदिनी/प्रति दशलक्ष 140 चाचण्या करण्याची लक्षणीय कामगिरी पार पाडत आहे. कोविड-19 संदर्भामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय योजना समायोजित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार कार्य केले जात आहे.

देशातल्या 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 चाचण्या करण्याचे लक्ष्य पार केले आहे

विस्तारित चाचणी प्रयोगशाळांचे व्यापक जाळे निर्माण करण्यामध्ये प्रमुख निर्धारक म्हणून देश अधिक बळकट झाला आहे. सरकारी क्षेत्रातल्या 1061 प्रयोगशाळा आणि 712 खाजगी प्रयोगशाळांमध्ये म्हणजेच देशामध्ये एकूण 1773 प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 ची चाचणी केली जाते. यामध्ये:-

रिअल टाइम रॅपिड टेस्ट आधारित चाचणी प्रयोगशाळा –

902 (सरकारी – 475 + खासगी 427)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा – 746 (सरकारी – 552 + खासगी – 194)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा –

 125 (सरकारी – 34 + खासगी 91)

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in  आणि @CovidIndiaSeva .

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळेंचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासले जाणार?

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे तिघे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या तिघांविरुद्ध निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची किंवा अर्धवट माहिती दिल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे तपास पाठवला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे.

आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे या तिघांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती आहे. यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हे पाऊल उचलण्यात आले असल्याच्या चर्चा आहेत.

राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवेसना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांनी सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनेक विसंगती असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यात संपत्ती आणि कर्ज याबद्दल चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्याने या तिघांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

दुकाने आणि व्यापारी आस्थापनांनी नव्या नियमांचे पालन करावे, व्यापार मंडलचे आवाहन

0

पुणे
पुण्यामध्ये कोरोना संकट वाढत असताना प्रशासनाच्या नव्या नियमांनुसार गर्दीचे नियमन करावे आणि कारवाई ओढवून घेऊ नये ,प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन  ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल’  चे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी केले आहे.
 पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले आहे .
दुकाने आणि व्यापारी आस्थापनांमध्ये गर्दीचे नियमन न केल्यामुळे, सोशल डिस्टंसिंग ची सुरक्षा  न पाळल्याने काही दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. लॉक डाउन नंतर नुकतेच व्यवसायाने उभारी भरलेली असताना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही ,याची खबरदारी व्यापारी व्यावसायिक आणि उद्योजकांनी घ्यावी असे  आवाहन  विजयसिंह डुबल यांनी या पत्रकात  केले आहे .व्यापार मंडल चे संपूर्ण सहकार्य प्रशासनाला राहील असे त्यांनी म्हटले आहे.

देशासाठी समर्पण भावनेने कार्य करावे पॉडिचरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांचा सल्ला

0

पुणे, 20 सप्टेंबर:“ देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी समर्पण भावनेने कार्य कसे करावे, हा विचार केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षा पास करण्यांनी सदैव करावा.” असा सल्ला पॉडिचरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणेतर्फे यूपीएससी स्पर्धा परीक्षा-2019 मधील यशस्वितांच्या 12 व्या राष्ट्रीय स्तरावरील सत्कार आणि प्रोत्साहन सोहळा व ‘प्रशासकीय सेवेच्या परिक्षेची तयारी कशी करावी आणि प्रशासकीय सेवेसमोरील आव्हाने’ या विषयावरील चार दिवसीय परिषदेच्या ऑनलाईन समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
या वेळी भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्याम सरेन, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा व भारताचे माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे सन्माननीय अतिथि म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड,  कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्रा. रविंद्रनाथ पाटील आणि प्रा.डॉ.शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
या प्रसंगी यूपीएससी परिक्षेमध्ये भारतात तिसरी आलेली प्रतिमा वर्मा हिचा सत्कार केला व तिला 21 हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आहे.
डॉ. किरण बेदी म्हणाल्या,“ सेवा करतांना सर्वात प्रथम स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन फीट रहावे. या क्षेत्रात रोज शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी असल्यामुळे सदैव शिकत राहून त्यातील कौशल्य गुण आतमसात करावे. जन सेवा ही महत्वाची असल्याने कार्यक्षेत्रात जाऊन कार्य करावे. या वेळी जर मंत्र्यांना सूचना दयावयाचे असतील तरी ती दयावी त्यांना घाबरून जावू नये किंवा त्यांसाठी आपल्या नियमात बदल करू नका. जनसेवेचे व्रत घेतल्यामुळे कुटुंब आणि सेवेचे संतुलन ठेऊन जीवन व्यतीत करावे. या देशासाठी समर्पण भावनेने कार्य केल्यास भारत हा आत्मनिर्भर बनेल.”
प्रतिमा वर्मा म्हणाली, “ कठोर परिश्रम, निश्चय आणि सातत्य या गोष्टींमुळे जीवनात यश मिळते. किरण बेदी यांच्या पासून प्रेरणा घेऊन या देशाला समोर कसे नेता येईल. यासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहणार आहे. समाजाचा अविभाज्य अंग असल्यामुळे मी या सेवेत राहून सदैव समाजउन्नतीचे कार्य करीत राहिल.”

अशोक लवासा म्हणाले,“तुम्ही सिस्टीमला निर्मित करत नाही तर त्यातील एक भाग असतात. त्यामुळे त्यात राहून उत्तम कार्य करावे. या सिस्टीम मध्ये तुम्ही एक पात्र असता त्याला चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करावा. येथे कोणालाही सल्ला देऊ नका, तर सरळ कार्याची अंमलबजावणी करावी. जीवनाता प्रामाणिकतेला खूप महत्व आहे. त्यामुळे याचा हाथ कधीही सोडू नका. केंद्रीय लोकसेवा आयोगमध्ये जे यशस्वी झाले त्यांना आता हा विचार करावयचा आहे की या सर्वीससाठी मी संपूर्णपणे तयार आहे का. कठोर परिश्रम घेतल्या शिवाय जिवनात कधीही यशस्वी होता येत नाही. कोणतीही समस्या आली तरी तिला घाबरून न जाता ती सोडविण्याचा प्रयत्न करा. जीवनात सदैव शिकत रहा आणि नोकरी करतांना सतर्क रहा.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ कोरोना वायरस मुळे या सृष्टीवर नवी समस्या निर्माण झाली आहे. अशावेळेस नव्या आव्हांनाचा सामना सर्वांना करावयाचा आहे. त्यात प्रशासकीय अधिकार्‍यांची भूमिका ही सर्वात महत्वाची असेल. शिस्त आणि चारित्र्य या दोन गोष्टी आपल्या मध्ये असणे गरजेचे आहे. प्रशासकीय सेवेत कार्य करतांना दृढ विश्वास व समर्पण असणे गरजेचे आहे. 21 व्या शतकाता भारत ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येईल. त्यामध्ये प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. समाजात सुख, समाधान आणि शांती कसे नांदेल या वर लक्ष्य केंद्रीत करावे.”
यावेळी भारताचे माजी परराष्ट्र सचिव पद्मभूषण श्याम सरेन आणि भारताचे माजी मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांनी सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासकीय सेवा करण्याचा सल्ला दिला.

सूत्रसंचालन प्रा. आसावरी फडके यांनी केले. प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.

प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रात क्रांती-हेमंत पाध्ये

0

पुणे : जागतिक स्तरावर संशोधन आणि विकास यावर ऑटोमोटिव्ह कंपन्यांकडून मोठी गुंतवणूक केली जात आहे. जवळपास सर्वच देश प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन क्षेत्रात नवोन्मेष घडवून आणत आहेत. इलेक्ट्रिकल व्हेइकल्ससह स्वयंचलित वाहने उत्पादित करण्याचे नाविन्यपूर्ण प्रयत्न सुरु आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने ऑटोमोटिव्ह (वाहन) क्षेत्रात क्रांती घडत आहे,” असे मत प्रो-बिझनेस इनोव्हेशन्सचे संचालक हेमंत पाध्ये यांनी व्यक्त केले.

टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन (टीटीए), डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी (डीओटी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इनोव्हेशन्स इन ऑटोमोटिव्ह’वर व्याख्यानात हेमंत पाध्ये बोलत होते. झूम मिटद्वारे झालेल्या या सत्राचे उद्घाटन ‘डिओटी’चे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. यावेळी ‘टीटीए’चे यशवंत घारपुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळीग्राम, ‘टीटीए’चे सचिव विलास रबडे आदी उपस्थित होते.  

हेमंत पाध्ये म्हणाले, “विविध मोटर वाहन कंपन्यांनी दाखल केलेल्या पेटंटची संख्या वाढत आहे. इनोव्हेशन करणारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नवनवी क्षेत्रे उदयास येत असून, ती विकसित होत आहेत. नव्याने विकसित होणाऱ्या उत्पादनाची यशस्विता राखणे महत्वाचे आहे. उत्पादन विकास प्रक्रिया आणि उत्पादन नाविन्यपूर्ण प्रक्रिया याचा मेळ घालता आला पाहिजे. ऑटोमोटिव्ह कंपन्यांद्वारे प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्यात आणि वर्गातील उत्पादनांमध्ये नाविन्यपूर्णता आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत.”

डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, “ऑटोमोटिव्ह, इनोव्हेशन आणि इन्व्हेंशन या गोष्टींसाठी संध्या चांगले वातावरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडूनही संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक आणि स्वयंचलित वाहने प्रत्यक्ष वापरात येतील.” जागतिक पातळीवर ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील प्रवाह, इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह क्षेत्रात इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठीच्या (इव्ही) संधी, आयसीई ते इव्ही मायग्रेशन आदी मुद्यांवर हेमंत पाध्ये प्रकाश टाकला. 
टीटीएने मॉडर्न कॉलेज व विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फौंडेशन कंपनीबरोबर करार केला असून इलेक्ट्रिक ऑटोरिक्षासाठी विद्यार्थ्यांनाकडून एआरएआय प्रमाणित किट विकसित केले जाणार आहे. त्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे रिसर्च पार्क फौंडेशन अर्थसहाय करणार आहे. टीटीएचे औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ सभासद विद्यार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत. अशा तऱ्हेने शिक्षण क्षेत्र व उद्योग जगत यांच्या मिलाफातून देशाला आत्मनिर्भर करणारे  जागतिक दर्जाचे उत्पादन होणार आहे, अशी माहिती मॉडर्न इंजिनीरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रिकल डीपार्टमेंटच्या प्रमुख डॉ सौ नीलिमा कुलकर्णी यांनी दिली. रिसर्च पार्क फौंडेशन कंपनीचे डॉ. अरविंद शाळीग्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. यशवंत घारपुरे यांनी प्रास्ताविक केले. विलास रबडे यांनी आभार मानले.

महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

0

पुणे, दिनांक 20- महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनी ही राज्‍यातील एकमेव प्रशिक्षण संस्‍था असून इथे आवश्‍यक त्‍या सोयी-सुविधा निर्माण करण्‍यासाठी राज्‍य शासन मदत करेल, अशी ग्‍वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला भेट दिल्‍यानंतर त्‍यांनी प्रशिक्षणार्थ्‍यांशी संवाद साधला. त्‍यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे, संचालक प्रदीप देशपांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

            गृहमंत्री देशमुख म्‍हणाले, पहिल्‍यांदाच या प्रबोधिनीला भेट देण्‍याचा योग आला. कोणत्‍याही राज्‍यात अशी संस्‍था नाही, फक्‍त महाराष्‍ट्रात आहे. नामवंत प्रशिक्षकांकडून येथील प्रशिक्षणार्थ्‍यांना गुप्‍तवार्ताचे अद्ययावत प्रशिक्षण दिले जाते. येथे राष्‍ट्रीय स्‍तरावरील प्रशिक्षण संस्‍थेसारख्‍या सोयीसुविधा निर्माण व्‍हाव्‍यात, यासाठी राज्‍य शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील.

            प्रत्‍येक राज्‍यात खालपासून वरपर्यंत गुप्‍तवार्ता यंत्रणा आवश्‍यक आहे. अस्थिरता निर्माण करु पाहणा-या शक्‍ती बॉम्‍बस्‍फोटासाठी ड्रोनसारख्‍या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. अशा गोष्‍टींवर वेळेपूर्वी मात करणे आवश्‍यक आहे, त्‍यासाठी गुप्‍तवार्ता यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले अधिकारी भविष्‍यात राज्‍याची आणि देशाची सेवा करतील, अशी आशा गृहमंत्री देशमुख यांनी व्‍यक्‍त केली.

            राज्‍य गुप्‍तवार्ताचे आयुक्‍त आशुतोष डुंबरे यांनी संस्‍थेच्‍या प्रशिक्षणाची माहिती दिली. संचालक प्रदीप देशपांडे यांनी येथे देण्‍यात येणा-या प्रशिक्षणाच्‍या आराखड्यात काळानुरुप बदल केले जात असून राष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ञ, प्रशिक्षक येऊन मार्गदर्शन करत असल्‍याचे सांगितले. सूत्रसंचालन  विजय पळसुले यांनी केले. यावेळी प्रशिक्षणार्थ्‍यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.  

            गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्‍य राखीव पोलीस बलाच्‍या कार्यालयास भेट देवून अधिका-यांशी चर्चा केली. पोलीस उप महानिरीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस महासंचालक अर्चना त्‍यागी, समादेशक निवा जैन यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते. तत्‍पूर्वी गृहमंत्री देशमुख यांनी शहीद स्‍मारकास पुष्‍पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.

कोरोनाच्या महामारीतही ‘ते’ झाले ..मस्तवाल..मालामाल : आबा बागुलांची टीका (व्हिडीओ)

0

पुणे- कोराना सारख्या महामारीतही ..सर्वाधिकार देऊन ,विश्वास टाकून दिलेल्या अधिकाराचा फायदा घेऊन ,’त्यांनी ‘ करोडोच्या खर्चाचा हिशेब न देता .. त्याचे कुठलेही फलित न दाखवून देता केसाने गळा कापला . अशी टीका आज कॉंग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केला .

आज कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत नेमके ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….

पुण्याला कोरोनाच्या खाईत कोण ढकलले ? (व्हिडीओ )

0

पुणे- महापालिकेत असलेले सर्व भाजपचे पदाधिकारी, भाजपचे केंद्रात पंतप्रधानांच्या जवळचे म्हणून ,केंदीय मंत्री असलेले प्रकाश जावडेकर पुण्यातले , – शिवाय पुण्यात खासदार ,आमदार आणि १०० नगरसेवकांची फौज असूनही पुण्यातल्या कोरोनाच्या फैलावाला यांनी अटकाव केला नाही . आणि आलेल्या कोरोनाच्या साथीत पुण्याला कोरोनाच्या खाईत ढकलण्याचेच काम भाजपने केल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ,माजी आमदार मोहन जोशी यांनी केला .आज कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत नेमके ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….

महापालिकेतील भाजपच्या धोरणानेच पुण्यात कोरोनाचा उच्छाद – रमेश बागवेंचा आरोप (व्हिडीओ)

0

आज कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत नेमके ते काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….

आज राज्यात आज २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान .

0

मुंबई, दि.१९ : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २१,९०७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२११ (५०), ठाणे- ३३७ (१७), ठाणे मनपा-४०२ (१), नवी  मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७१ (१), उल्हासनगर मनपा-५२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (१), मीरा भाईंदर मनपा-१९२ (८), पालघर-१९९ (३), वसई-विरार मनपा-२५५ (७), रायगड-४५६ (१५), पनवेल मनपा-२१० (१), नाशिक-३८६ (१), नाशिक मनपा-११४१ (६), मालेगाव मनपा-१७ (१), अहमदनगर-७४४ (८),अहमदनगर मनपा-१८६ (३), धुळे-४४, धुळे मनपा-६०(१), जळगाव-५९७ (७), जळगाव मनपा-११९ (२), नंदूरबार-११३ (२), पुणे- १३६६ (१२), पुणे मनपा-१७४५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (४), सोलापूर-५३८ (१६), सोलापूर मनपा-६७, सातारा-७६७ (२६), कोल्हापूर-५२७ (२०), कोल्हापूर मनपा-१७९ (५), सांगली-६६२ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९० (९), सिंधुदूर्ग-६० (३), रत्नागिरी-३३५ (४), औरंगाबाद-१८२ (७),औरंगाबाद मनपा-३५१ (७), जालना-१२७, हिंगोली-५९, परभणी-६२ (३), परभणी मनपा-३८ (३), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-८५ (१), उस्मानाबाद-२५८ (५), बीड-१६९ (४), नांदेड-१९१ (३), नांदेड मनपा-२१७ (१), अकोला-१०९ (५), अकोला मनपा-१३० (८), अमरावती-११८ (१), अमरावती मनपा-१८८, यवतमाळ-३४८ (१३), बुलढाणा-१२७ (१), वाशिम-४२ (२), नागपूर-४७७ (१४), नागपूर मनपा-१५६९ (२२), वर्धा-९७ (३), भंडारा-२०२ (११), गोंदिया-२३३ (१), चंद्रपूर-९० (१), चंद्रपूर मनपा-७० (३), गडचिरोली-३० (२), इतर राज्य- ३१ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख  ०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,८२,२०३) बरे झालेले रुग्ण- (१,४२,७६९), मृत्यू- (८४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,६३९)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,६८,८०५), बरे झालेले रुग्ण- (१,३४,७०२), मृत्यू (४४८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,६१६)

पालघर: बाधित रुग्ण- (३३,४१७), बरे झालेले रुग्ण- (२६,५१७), मृत्यू- (७६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१३२)

रायगड: बाधित रुग्ण- (४५,५३९), बरे झालेले रुग्ण-(३५,०११), मृत्यू- (१००२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (९५२४)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (७४३०), बरे झालेले रुग्ण- (४२१६), मृत्यू- (२०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०१३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२९९२), बरे झालेले रुग्ण- (१६३७), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२९८)

पुणे: बाधित रुग्ण- (२,५७,४०९), बरे झालेले रुग्ण- (१,७२,७३२), मृत्यू- (५१८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९,४८९)

सातारा: बाधित रुग्ण- (२९,२६७), बरे झालेले रुग्ण- (१९,८७५), मृत्यू- (७२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६६७)

सांगली: बाधित रुग्ण- (३०,७४६), बरे झालेले रुग्ण- (१९,०४९), मृत्यू- (९३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,७६७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (३६,७७४), बरे झालेले रुग्ण- (२७,४१८), मृत्यू- (१०९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२६३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३०,७५८), बरे झालेले रुग्ण- (२२,४४०), मृत्यू- (१०३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२७९)

नाशिक: बाधित रुग्ण- (६२,२५१), बरे झालेले रुग्ण- (४८,१२७), मृत्यू- (११३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,९९२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (३४,७८७), बरे झालेले रुग्ण- (२५,१५६), मृत्यू- (५५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(९०७८)

जळगाव: बाधित रुग्ण- (४२,०४१), बरे झालेले रुग्ण- (३२,२१८), मृत्यू- (१११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७०८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (४५६०), बरे झालेले रुग्ण- (३२६८), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८१)

धुळे: बाधित रुग्ण- (११,५३९), बरे झालेले रुग्ण- (९७६५), मृत्यू- (२८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३१,९७९), बरे झालेले रुग्ण- (२२,९४६), मृत्यू- (८१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२२०)

जालना: बाधित रुग्ण-(६५७७), बरे झालेले रुग्ण- (४५२५), मृत्यू- (१७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७५)

बीड: बाधित रुग्ण- (८४२२), बरे झालेले रुग्ण- (५२२३), मृत्यू- (२२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२९७१)

लातूर: बाधित रुग्ण- (१४,३२८), बरे झालेले रुग्ण- (१०,२३७), मृत्यू- (४०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८२)

परभणी: बाधित रुग्ण- (४६०७), बरे झालेले रुग्ण- (२९६३), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२४०१), बरे झालेले रुग्ण- (१८५८), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१३,१८५), बरे झालेले रुग्ण (६३६०), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४८६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१०,२०७), बरे झालेले रुग्ण- (६८९७), मृत्यू- (२६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०४४)

अमरावती: बाधित रुग्ण- (१०,४०३), बरे झालेले रुग्ण- (८००१), मृत्यू- (२१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९०)

अकोला: बाधित रुग्ण- (६१८५), बरे झालेले रुग्ण- (३९०६), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८०)

वाशिम: बाधित रुग्ण- (३२७९), बरे झालेले रुग्ण- (२५१८), मृत्यू- (६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६२४०), बरे झालेले रुग्ण- (३९५९), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१७७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (६६६१), बरे झालेले रुग्ण- (३८५४), मृत्यू- (१४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६५९)

नागपूर: बाधित रुग्ण- (६२,०९४), बरे झालेले रुग्ण- (३८,७६९), मृत्यू- (१६२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६९८)

वर्धा: बाधित रुग्ण- (२७५०), बरे झालेले रुग्ण- (१७५४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६४)

भंडारा: बाधित रुग्ण- (३८७०), बरे झालेले रुग्ण- (१७९०), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (४३१३), बरे झालेले रुग्ण- (२६६७), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५९७)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (७२६५), बरे झालेले रुग्ण- (३२९२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०७)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (१४८३), बरे झालेले रुग्ण- (१०८६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०७)

एकूण: बाधित रुग्ण-(११,८८,०१५) बरे झालेले रुग्ण-(८,५७,९३३),मृत्यू- (३२,२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३८६),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,९७,४८०)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४२५ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४८ मृत्यू सातारा -८, औरंगाबाद -७, नागपूर -७, पुणे -४, ठाणे -४, पालघर -४, यवतमाळ -३, कोल्हापूर -३, नांदेड -२, सांगली -२, अहमदनगर -१, चंद्रपूर -१, रत्नागिरी -१ आणि वर्धा -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यामधील महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या मृत्यूंचे  रुग्णांच्या रहिवासी पत्त्यानुसार जिल्हांतर्गत बदल केल्याने ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यातील मनपा यांच्या मृत्यूसंख्येत बदल झाला आहे तथापी ठाणे जिल्ह्याच्या एकूण मृत्यूसंख्येत कोणताही बदल झालेला नाही. आज जिल्हा आणि मनपा निहाय ५ सप्टेंबर  २०२० पर्यंतचे कोविड बाधित रुग्णांचे रिकॉन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. रुग्णांची दुहेरी नोंद वगळणे, रुग्णांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेला बदल यामुळे आज एकूण बाधित रुग्णसंख्येत १३८८ रुग्णांची घट झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

२० /२० आय ए एस अधिकारी असून पुण्यात कोरोना नियंत्रणात येत नाही -खा.गिरीश बापट (व्हिडिओ)

0

पुणे-वीस वीस आय ए एस अधिकारी असूनही पुण्यात अजूनही कोरोना नियंत्रणात येत नाही . शासकीय पातळीवरही व्यवस्थित समन्वय व्हायला हवा असे मत व्यक्त करीत काय करायचे ते करा पण सामन्य माणसाचे जनजीवन विस्कळीत होता कामा नये असे खासदार गिरीश बापट यांनी ‘पुण्यात जमाव बंदी’ बाबत लोकप्रतिनिधी म्हणून आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे.

पुण्यामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना वेगवेगळ्या पातळ्यांवर काय करावे असा प्रश्न आहे .मला असे वाटते कि प्रश्नांना सामोरे जायला हवे ,घाबरून चालणार नाही .तसा लॉकडाऊन तर आपण विचारच नाही करू शकत पण जमाव बंदी देखील ज्या भागात अति गर्दी होते, तिथे जमाव बंदी करावी ,पण जिथे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहे तिथले जनजीवन विस्कळीत करू नये .अॅॅम्ब्युलंस पासून औषधांपर्यंत. सगळ्या उपलब्धी लोकांच्या मनातील भीती घालवावी ,प्रबोधनाच्या माध्यमातून कोरोनावर मात होईल भीतीच्या माध्यमातून होणार नाही .फैलाव होऊ नये म्हणून जे करायचे ते करा ,पण तारतम्याने वागून करावे पण सरसकट जमावबंदी करावी असे मला वाटत नाही . वीस वीस आय ए एस अधिकारी असूनही पुण्यात अजूनही कोरोना नियंत्रणात येत नाही . शासकीय पातळीवरही व्यवस्थित समन्वय व्हायला हवा

शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार, एकमुखाने पाठिंबा द्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे-

शेतकऱ्यांना वर्षानुवर्षांच्या बंधनातून मुक्त करून मर्जीनुसार कोठेही व हव्या त्या किंमतीला शेतीमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कायदा करण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी मा. पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारने मांडलेल्या विधेयकांबाबत विरोधकांकडून आणि दलाल लॉबीकडून गैरसमज पसरविण्यात येत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. शेतकऱ्यांनी या विषयात पंतप्रधानांना संपूर्ण पाठिंबा द्यावा. सध्याची शेतकऱ्यांच्या मालाला किमान हमीभाव मिळण्याची व्यवस्था नव्या कायद्यानंतरही कायम राहणार आहे. नव्या बदलानंतर कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मालकी शेतकऱ्याचीच राहील याची दक्षता घेण्यात आली आहे. नव्या कायद्यामुळे बाजार समितीच्या आवाराबाहेरील शेतमालाचा संपूर्ण व्यापार मुक्त असेल व त्यामुळे शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळेल. सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा राज्यांचा कायदा असून ती व्यवस्थाही राहणार आहे. ज्यांना या समित्यांमध्ये माल विकायचा असेल त्या शेतकऱ्यांना तो पर्याय उपलब्ध राहणार आहे. या विधेयकाला आज विरोध करणारे राजकीय पक्ष सत्तेवर असताना त्यांनी अशा सुधारणांचे आवाहन केले होते. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तसे आश्वासन दिले होते. आता केवळ राजकीय कारणासाठी गैरसमज निर्माण करण्यात येत आहेत.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोणत्याही उत्पादकाला त्याच्या मालाची किंमत ठरविण्याचे आणि तो माल हवा तेथे विकण्याचे स्वातंत्र्य असते. पण शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य नाकारले गेले होते. त्यांनी त्यांचा माल केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकला पाहिजे, असे बंधन घातल्यामुळे शेतकरी बाजार समितीत प्रभावी असलेल्या शक्तींच्या ताब्यात सापडले व त्यांना आपल्या मालाला किफायतशीर भाव मिळणे कठीण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांना आपला माल मर्जीने हवा तेथे विकता यावा आणि हवा तसा भावही ठरवता यावा यासाठी कायदा करण्यासाठीचे विधेयक संसदेत मांडले आहे. ते लोकसभेत मंजूर झाले आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला होता.

त्यांनी सांगितले की, मोदी सरकारने आणलेल्या अन्य एका विधेयकामुळे पेरणी करण्यापूर्वीच शेतकऱ्याला खरेदीदारासोबत भाव ठरवून करार करता येईल. या व्यवस्थेत कापणीनंतर बाजारभाव कमी झाला असला तरीही खरेदीदाराला करारानुसार शेतकऱ्याला भाव द्यावा लागेल व परिणामी बाजारपेठेतील चढउताराची जोखीम शेतकऱ्यावर राहणार नाही. हे बदल करण्यात येत असले तरीही कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मालकी शेतकऱ्याचीच राहील व ती कधीही खरेदीदार कंपनीकडे जाणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

जम्बोमधील 28 रुग्णांना डिस्चार्ज, सुधारित व्यवस्थेबाबत रुग्ण समाधानी- रुबल अग्रवाल

0

पुणे : जम्बो कोविड रुग्णालयाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. आज (शनिवारी) 28 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो सेंटरच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी दिली.
आयसीयूमधील रुग्णही पूर्ण करोनामुक्त होत आहेत. येथील व्यवस्थापनाबाबत रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करीत आहेत.

येथे उपचार घेऊन महिला, वृद्ध, व्याधीग्रस्त असे सर्व करोना रुग्ण बरे होत आहेत. ‘जम्बो’मध्ये आयसीयू वॉर्डमध्ये गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या दिलीप गवळी यांच्यावर डॉक्टरांनी तातडीने योग्य उपचार केले. आठ दिवस उपचारांनंतर ते करोनामुक्त झाले आहेत. रुग्णांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन महापौर मुरलीधर मोहोळ वैयक्तिक लक्ष देऊन यंत्रणा राबवत आहेत. यामुळे अत्यंत चांगली सेवा उपलब्ध होत आहे, असे गवळी यांचे नातेवाईक अमोल साठे यांनी सांगितले.

मी एकवीस दिवस जम्बो सेंटरमध्ये होते, मात्र अजिबात त्रास जाणवला नाही. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली, असे करोनामुक्त झालेल्या महिला रुग्णाने सांगितले.

रुबल अग्रवाल म्हणाल्या, “जम्बो’मधील व्यवस्थेत सातत्याने सकारात्मक बदल व सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणाम रुग्ण सेवेत दिसून येत आहे. रुग्ण व नातेवाईकांशी जास्तीत जास्त समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. यामुळे रुग्ण प्रशासनाचे धन्यवाद देत आहेत.”

डिस्चार्ज नंतरही घरी सर्व खबरदारी घ्यावी. कुटुंबीयांसह नियमांचे पालन करावे. पुन्हा त्रास जाणवल्यास त्वरीत जम्बो’मध्ये उपचार केले जातील. निगेटिव्ह चाचणी आल्यावरच कामावर जावे, असे आवाहन येथील डॉक्टरांनी केले.