Home Blog Page 2445

व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या संधी

0

मागील दशकापासून तांत्रिक प्रगतीमुळे व्यवसाय आणि उद्योगांत अमूलाग्र रुपांतर झाले आहे. आधुनिक कार्यस्थळांच्या गरजाही अधिक प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आभासी कार्यालये हे आजचे वास्तव आहे. त्यामुळे सध्या अनेक नियोक्ते अद्ययावत तंत्रज्ञान कौशल्यांसह नेतृत्व आणि व्यवस्थापन अशी भूमिका पार पाडण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत आहेत.

– डॉ. एस. रामचंद्रन, संचालक, एसआयएमएमसी

एकविसाव्या शतकात सर्व कौशल्य कॉर्पोरेट क्षेत्रात संचयित झाली आहेत. त्यामुळेच या क्षेत्रात कौशल्याच्या अभावामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. महामारीमुळे कामाचे आभासी स्वरुप प्रत्यक्षात अवतरले आहे. त्याचप्रमाणे महामारीमुळे कंपन्यांच्या कामातील नैतिकता, संस्कृती आणि कामाच्या प्रक्रियेत नाट्यमय बदल झाला आहे. कर्मचारीही नवीन बदल हळूहळू स्वीकारत आहेत. या कौशल्य संचात टीकात्मक परिक्षण, समस्येचे निराकरण, युक्तिवाद, विवेचन, माहितीचे एकत्रिकरण, संशोधन कौशल्य आणि पद्धती, सर्जनशीलता, नाविन्य, अभिव्यक्ती, चिकाटी, शिस्त, बदल स्वीकारण्याची क्षमता, उपक्रमशील, लेखी व तोंडी संभाषण कौशल्य, सार्वजनिक संभाषण व सादरीकरण, ऐकूण घेण्याची क्षमता, नेतृत्व, सांघिक काम, सहयोग, माहिती व तंत्रज्ञान साक्षर, माध्यम आणि इंटरनेट साक्षरता, नागरी, नैतिक, सामाजिक न्याय साक्षरता, आर्थिक साक्षरता, उद्योजकता, जागतिक जागरूकता, बहुसांस्कृतिक साक्षरता, मानवतावाद, पर्यावरण व संवर्धन साक्षरता, आरोग्य आणि कल्याण साक्षरता, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा इत्यादी कौशल्यांचा समावेश होतो.

मुलांना बालवयातच ही कौशल्ये आत्मसात करता यावीत, त्यादृष्टीने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना नियमितपणे लागू होणारी, उपयुक्त, मागणी असलेली आणि सार्वभौम कौशल्ये शिकवण्याची गरज आहे. ही कौशल्ये त्यांना नोकरीस पात्र ठरवतात. त्यामुळे त्यांना कारकीर्दीचा आनंद घेता येतो. शब्द, बहुभाषिकता, शारीरिक शिक्षण, कला आणि हस्तकला, व्यवसायिक कौशल्ये, कला एकात्मिक शिक्षण, संज्ञानात्मक शिक्षण, चौकस-शोध-आधारित शिक्षण, कृत्रिम बुद्धीमत्ता, संरचना, समग्र आरोग्य, सेंद्रिय जीवन, पर्यावरण शिक्षण, जागतिक नागरिकत्व शिक्षण या महत्त्वाच्या विषयांना नवीन शिक्षण धोरणात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. बाजारपेठ अधिक गुंतागुंतीची, तंत्रज्ञानावर आधारित, अत्यंत स्पर्धात्मक आणि ज्ञान-आधारित झाली आहे. विद्यार्थ्यांची क्षमता समजून घेऊन त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रात त्यांना स्वप्नवत नोकरी मिळवून देण्यात संस्था मोलाची भूमिका बजावतात. स्वप्नवत नोकरी मिळवण्यासाठी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविकेचे (पीजीडीएम) शिक्षण घेणे हे प्रत्येक पदवीधर तरुणाचे स्वप्न असते. पीजीडीएम हा अत्यंत प्रधान शैक्षणिक अभ्यासक्रम मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते. विद्यार्थ्यांना सैद्धांतिकदृष्ट्या शिक्षण घेण्याचा व्यवहारिक मार्ग या कार्यक्रमामुळे गवसला आहे. पीजीडीएम अभ्यासक्रम उद्योग संलग्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या संस्थेच्या व्यवस्थापनात सहज स्थान मिळू शकते.

कॉर्पोरेट जगतात पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्यांना व्यावसायिक बदलांचे प्रशिक्षण दिले जाते. आणि पदवी मिळाल्यावर त्यांना नोकरी दिली जाते. पीजीडीएमचा अभ्यासक्रम ठरवण्यात कॉर्पोरेट क्षेत्राचा सहभाग असतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कालावधीत औद्योगिक/कॉर्पोरेट भेटी, इंटर्नशिप, नोकरी, प्रशिक्षण इत्यादींबाबत कॉर्पोरेट संधी दिली जाते. विद्यार्थी कॉर्पोरेटच्या सल्लागार उपक्रमातही सहभागी होतात. पीजीडीएमचा अभ्यासक्रम शिकवणार्या संस्था विद्यार्थ्यांना सर्वांगीण कौशल्य शिकवतात. शिक्षण संपल्यावर त्यांना अव्वल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये चांगल्या पैकेजची नोकरी मिळावी यासाठी संस्था परिपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवतात. नोकरी करणारे तरुण आणि विद्यार्थी भविष्यात उत्तम नोकरी मिळवण्यासाठी पीजीडीएम अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. दैनंदिन काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात देण्यात येते. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे एमबीएचे शिक्षण घेऊन कार्यरत असलेले असंख्य तरुण आणखी प्रगतीसाठी पीजीडीएम अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही जवळपास एक दशकापासून महाराष्ट्र सरकारच्या एआयसीटीई आणि डीटीई यांच्या संयुक्त विद्यमाने पीजीडीएम कार्यक्रम राबवणारी भारतातील प्रमुख संस्था आहे. या कार्यक्रमाच्या सदस्यांच्या सल्लागार मंडळामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक, विविध डोमेन आणि विषयांमधील जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्तिंचा समावेश आहे. ते नियमितपणे विद्यार्थ्यांना  ज्ञान आणि कौशल्याबाबत मार्गदर्शन करतात. सूर्यदत्त येथील पीजीडीएम अभ्यासक्रमात व्यवसाय व्यवस्थापन, कॉर्पोरेट जगाची अधिक चांगली समज प्रदान करण्याबरोबरच जगातील व्यवसायावर लक्ष केंद्रित केले जाते. समग्र विकास आणि शिकणार्‍याला परिवर्तनात्मक अनुभव देणे ही सूर्यदत्तमधील शिक्षणाची ओळख आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, व्यवसायिक आणि वैयक्तिक प्रगती ही एकाधिक हस्तक्षेपांद्वारे सुनिश्चित केली जाते. त्यामध्ये शिक्षणाद्वारे दिलेली माहिती, ऑनलाईन शिक्षण, व्यवस्थापनातील ज्ञान, प्रकल्प, इंटर्नशिप कार्यक्रम, शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रकल्प भेट, आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसायिक संभाषण उपक्रमांचा समावेश आहे.

सूर्यदत्त संस्थेकडे प्रख्यात आणि प्रशंसित शैक्षणिक भागीदारांची एक मजबूत परिसंस्था आहे. त्यामध्ये हार्वर्ड बिझिनेस स्कूल, हार्वर्ड पब्लिशिंग, आयआयएमबीएक्स, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन-एआयएमए, लिंकन युनिव्हर्सिटी -मलेशिया, टीसीएस आयन, राऊंड ग्लास वेल बेईंग, केम्ब्रिज बिझिनेस इंग्लिश, एसएपी, डॉ.  एपीजे कलाम ट्रस्ट, सीआयएमएसएमई, बडा बिझिनेस, असोसिएशन ऑफ इंटर्नल कंट्रोल प्रॅक्टिशनर्स –यूके, रिस्क मॅनेजमेन्ट असोसिएशन ऑफ इंडिया इ. विद्यार्थ्यांना इयत्ता वर्गाच्या पलीकडे शिक्षण देऊन स्थानिक आणि जागतिक क्षेत्राशी संलग्न, सामाजिकदृष्ट्या जबाबदार बनवणे. विद्यार्थी समुदाय आणि भविष्यातील संभाव्य कार्यस्थळाच्या अपेक्षांच्या अनुरुप कार्यक्रम आणि तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब ही सूर्यदत्तचे वैशिष्ट्ये आहेत. सूर्यदत्त संस्थेने सर्जनशीलता वाढविण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इंडस्ट्री 4.0 इनोव्हेशन लॅबची स्थापना केली आहे.

ग्राहकांना व कामगार वर्गाला सांभाळून संयमाने प्रकल्प उभारणी करा-सतीश मगर

0

क्रेडाई महाराष्ट्र या राज्यव्यापी बांधकाम व्यावसायिक संघटनेस यशस्वीरित्या २५ वर्षे पूर्ण झाल्याने रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा काल २७ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने खेळीमेळीत व उत्साहात पार पडली. अशी माहिती क्रेडाई  महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष  राजीव परीख व  मानद सचिव सुनील कोतवाल यांनी दिली.

महाराष्ट्रातील ५७ शहरांतील क्रेडाई चॅप्टर्स मधून जवळपास १००० हून अधिक सदस्य सभेत सहभागी झाले होते. सभेचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय क्रेडाई अध्यक्ष श्री. सतीश दादा मगर यांनी खास मुलाखतीतुन सभासदांना बांधकाम व्यवसायाच्या कठिण कालावधीमध्ये टिकून राहणे महत्वाचे असल्याचे सांगून लहान शहरातील सभासदांना चांगले व्यवसायिक मार्गदर्शन केले व ग्राहक, कामगार, नोकरवर्ग योग्य रीतीने सांभाळणेचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत ११ माजी अध्यक्षांचा ऑनलाइन सत्कार समारंभ संपन्न झाला.

राष्ट्रीय उपाध्यक्ष  शांतीलाल जी कटारिया यांनी जीएसटी, बांधकाम नियमावली, रेडीरेकनर, स्टॅम्प ड्युटी साठींच्या राज्य व केंद्र सरकारच्या तरतुदींचा उहापोह केला.

राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. अनंत राजेगावकर यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी उदयोन्मुख संधी यावर प्रकाशझोत  टाकला  तर *बांधकाम खर्चात कशी कपात करावी यावर उदबोधक माहिती श्री. दिलीप मित्तल व निलेश अगरवाल यांनी देऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.

 राजीव परीख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सन 2019-20  मधील क्रेडाईच्या कार्याचा आढावा घेऊन सभासदांना संघटनेचे महत्व कथित केले तर खजिनदार  गिरीश रायबागे यांनी वार्षिक हिशोब सादर केला. मानद सचिव श्री. सुनील कोतवाल यांनी सेक्रेटरी रिपोर्ट सादर करत सूत्रसंचालन देखील केले.

शिरपूर  येथे  नवीन ५७ व्या क्रेडाई चॅप्टरचे अनावरण सर्व मान्यवरांचे हस्ते झाले व   शांतीकुमार जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी वार्षिक बुलेटीन व शहरांचे माहिती पुस्तक अनावरण करण्यात आले. सहसचिव  विकास लागू यांच्या आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.

रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई दि. २८:-  राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी  राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटते. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते एकेक सुरु करत आहोत. काही व्यवहार बंद ठेवल्याने कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे.  या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी… तशीच तुमचीही…

राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे.

कोविडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक

आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे.  मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा

या विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे गंभीर असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचे सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागलीये, ही भूक अनेकांना संपवते-काँग्रेस नेते संजय निरुपम

0

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र ही भेट फडणवीसांची मुलाखत घेण्यासाठी घेतली होती असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले होते. राऊतांच्या या स्पष्टीकरणावर काँग्रेस नेता संजय निरुपम यांनी टीका केली आहे.

संजय निरुपम यांनी ट्विटरवरून संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला हेडलाइन बनवण्याची प्रचंड भूक लागली असून ही भूख अनेकांना संपवते. ही दुर्भावना नाही तर वास्तव आहे. असा घणाघातच निरुपम यांनी केला आहे.

‘मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करुन मेरिटवर सर्वांची निवड करा’- उदयनराजे

0

. ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजाचे आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या’, अशी मागणी छत्रपती , भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली, त्यानंतर उदयनराजेंनी ही प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. प्रत्येकाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळाले, त्याच पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा,’ असे उदयनराजे म्हणाले.

‘चांगले गूण मिळूनही मराठा समाजातील मुलांना अ‍ॅडमिशन मिळत नाही, पण इतर समाजात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे. यापूर्वीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र तसे झाले नाही,’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

0


-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
मुंबई,दि. २७- सर्वसामान्य ग्राहक वीज बिलाने त्रासलेला आहे,नोक-या नाही, कंपन्या बंद होत आहे, त्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचना त्यांच्या समोर आहेत. आणि अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे व हे सरकार मोठ्यांची पाठराखण करीत आहे..असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी असेही म्हटले आहे …..

महाविकास आघाडीशी सरकार बनविणे
ही शिवसनेची मजबुरी आहे का..


२५ ते ३० वर्षे शिवसेना व भाजपा सोबत युती करुन राजकारण सुरु होते ही त्यांची मजबुरी होती का..हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना होती याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागेल. तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार बनविणे म्हणजे युतीमध्ये लढलो असताना नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवुन महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का..याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांच्या अलिकडच्या काळातील वक्तव्यावरून दिसून येते.

केवळ चर्चेत व प्रसिध्दीमध्ये राहण्यासाठी
संजय निरुपम यांचे वक्तव्य


शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतीची वेळ मागितली आहे. त्यावरुन कॉंग्रसेचे नेते संजय निरुपम यांचे वक्तव्य असावे. संजय राऊत यांनी एखाद्याची भेट घेणे, सामना मध्ये संपादकीय लिहिणे व पुन्हा त्या विषयाची बातमी होणे ही मोडस ऑपरेंडी असताना बातमीमध्ये राहिले पाहिजे व काही तरी सनसनाटी केले पाहिजे अशा पध्दतीने जे राऊत यांच्या बाबतीत सुरु आहे, त्यावरुन संजय निरुपम यांनी वक्तव्य केले असावे. कारण काल ही बैठक फक्त सामना च्या मुलाखतीची वेळ मागण्यासाठी होती पण आता राजकीय भूकंप होणार..सरकार पडणार…असे होणार अशा अर्थाने सनसनाटी निर्माण करायची असे जाणीवपुर्वक झाले आहे का…यामधून अश्या प्रकारचे वक्तव्य निरुपम यांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी केले असावे.

महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 27 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्त्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक दिलीप गावडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, पूर्वी एरियल फोटोग्राफी करत असताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. राज्याचे सौंदर्य आणि वैभव डोळ्यात मावत नाही. हे वैभव जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यातील फक्त पर्यटनस्थळांचा विकास करुन चालणार नाही. तिथे जायचे कसे, राहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्यंभूत माहिती आणि सोयी-सुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने कामकाज सुरु केल्यानंतर लगेच रायगडच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांचा निधी दिला. कोकणातील चिपी विमानतळही आता लवकरच सुरु होत आहे. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असे ते म्हणाले.

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अनेक देशाचे पर्यटन हे मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. युरोपियन देश, अमेरिका आदी देशांना दरवर्षी सुमारे 8 कोटी पर्यटक भेट देतात. आपल्या राज्यातही पर्यटन क्षेत्रात असाच वाव आहे. मराठवाड्यात कृषी पर्यटन, विदर्भातील जंगल, कोकणातील समुद्र किनारे यांची माहिती पर्यटकांना देता येईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती बरोबरच राज्याला मोठा महसूलही मिळतो. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ यांनी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची संकल्पना मांडली. ते म्हणाले की, नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. इथे पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस इथे राहावे यासाठी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. परिसरातील शिर्डी, त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगीगड आदी पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहे. आज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. कोकणात आता हॉटेल ताज गुंतवणूक करत आहे. येत्या काळात तिथे दोन पंचतारांकित हॉटेल्स तसेच चिपी विमानतळही लवकरच सुरु होईल. राज्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन टुरिजम आणि साहसी पर्यटनाच्या धोरणावर काम सुरु आहे. वन आणि जलसंपदा विभागाबरोबर समन्वय करुन इको टुरिजम, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, सायकलिंग आदी उपक्रम सुरु करण्याचा प्रयत्न आहे. वन विभागाच्या गेस्ट हाऊससंदर्भातही चर्चा सुरु आहे. वानखेडे स्टेडियमची सफर, गेट वे ऑफ इंडियाचा विकास, बीएमसी इमारत पर्यटन आदी उपक्रमही हाती घेण्यात येत आहेत. महाबळेश्वर, माथेरान आदी स्थळांना पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणत आहोत. पर्यटनामध्ये महाराष्ट्राला पहिल्या क्रमांक आणण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी शासनामार्फत सर्व उपाययोजना करण्यात येतील, असे ते म्हणाले.

पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या की, पर्यटन विभागासाठी राज्य शासनाने प्रथमच भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. उद्योग, ग्रामविकास, नगरविकास याप्रमाणेच आता आपण राज्याच्या पर्यटन विकासाकडे लक्ष देत आहोत. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले. या क्षेत्राला लवकरच पूर्वपदावर आणू. खारघरमध्ये आज सुरु होत असलेल्या एमटीडीसी रेसिडन्सी या पर्यटक संकुलामुळे पर्यटकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होत आहे. सिडको आणि एमआयडीसीसोबत करार करुन या संकुलाची देखभाल आणि मेंटेनन्स करण्यात येईल.  रायगड किल्ला, जिल्ह्यातील समुद्रकिनारे, इतर पर्यटनस्थळे यांच्या विकासासाठी शासनामार्फत सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन संचालनालयाद्वारे आयोजित किल्ले फोटोग्राफी, व्हीडीओग्राफी व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि एमटीडीसी रेसिडन्सीमध्ये विविध सुविधा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टद्वारे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या रिसॉर्टमध्ये 4 ट्वीन व्हिला (प्रत्येकी 3 कक्ष), 28 पर्यटक कक्ष, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतिक्षा कक्ष व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या बोट क्लबमधील 11 बोटी प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहेत. या पर्यटन संकुलाचे आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले.

याशिवाय आज खारघर (नवी मुंबई) येथील सेक्टर-12 मधील सुसज्ज अशा चार मजली ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. या संकुलात 27 कक्ष, 2 लोकनिवास, सोविनियर शॉप, उपहारगृह, व्यायामशाळा, सभागृह, अंतर्गत खेळ, स्वागत कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई परिसरात असलेल्या सिडको, एमआयडीसी आणि खाजगी उद्योगांमुळे विविध कामासाठी येथे येणाऱ्या व्यावसायिक पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच नजीकच्या काळात नवी मुंबई विमानतळ विकसित होत आहे. याअनुषंगाने एमटीडीसीने हे पर्यटक संकुल विकसित केले आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 959

0

पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 4 लाख 15 हजार 914 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.27 :- पुणे विभागातील 3 लाख 29 हजार 52 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 15 हजार 914 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 959 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 10 हजार 903 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.12 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 73 हजार 12 रुग्णांपैकी 2 लाख 24 हजार 582 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 321 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 82.26 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 609 रुग्णांपैकी 25 हजार 1 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 548 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 31 हजार 812 रुग्णांपैकी 23 हजार 660 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 40 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 112 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 447 रुग्णांपैकी 23 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 267 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 259 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 34 रुग्णांपैकी 31 हजार 888 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 783 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 363 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 6 हजार 537 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 180, सातारा जिल्ह्यात 622, सोलापूर जिल्ह्यात 523, सांगली जिल्ह्यात 615 तर कोल्हापूर जिल्ह्यात 597 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 18 लाख 20 हजार 844 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 15 हजार 914 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 26 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची केली प्रशंसा

0

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020-आपल्या “मन की बात” या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की कोविड च्या कठीण काळात देशातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिकारक्षमता दाखवली.

पंतप्रधान म्हणाले की, जर कृषीक्षेत्र मजबूत असले तर आत्मनिर्भर भारताचा पाया भक्कम राहील.नजीकच्या काळात या क्षेत्रावरील अनेक  निर्बंध मुक्त करण्यात आले असल्याचे आणि मिथकांना छेद  देण्यात  आला असल्याचे त्यांनी  निदर्शनास आणून दिले. हरीयाणातील श्री. कन्वर चव्हाण यांचे उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले, की चव्हाण यांना आपली फळे आणि भाजीपाला मंडईच्या बाहेर विकण्यात अनेक अडचणी येत होत्या, परंतु 2014मधे कृषी उत्पन्न बाजार समिती  कायद्यातून फळे आणि भाजीपाला यांना वगळण्यात आले, याचा चव्हाण यांना खूप फायदा झाला. त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनांची संस्था(Farmer  Producer’s Organization) स्थापन केली आणि आता त्यांच्या गावातील शेतकरी  मका आणि त्याच्या  विविध प्रकारांची लागवड करतात (स्वीट काँर्न आणि बेबी काँर्न) आणि  ते उत्पन्न दिल्लीतील आझादपूर मंडईत,मोठ्या किरकोळ साखळी दुकानांत आणि पंचतारांकित हॉटेल्समधून  थेट पुरवितात, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात (कमाईत)कमालीची वाढ झाली आहे.शेतकऱ्यांना आपली फळे आणि भाजीपाला याची विक्री कुणालाही कुठेही  करण्याची मुभा आहे, आणि तो त्यांच्या प्रगतीचा पाया आहे, तसेच  हे तत्त्व देशभरातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांसाठी प्रभावित करत आहे,असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अधोरेखीत केले.

पंतप्रधानांनी श्री.स्वामी समर्थ फार्म प्रोड्यूस कंपनी लिमिटेड या महाराष्ट्रातील कृषी उत्पादन संघटनेचे(फार्म प्रोड्यूसर्स  आँरगनायझेशन) उदाहरण देत सांगितले ,की शेतकऱ्यांना त्यांची फळे आणि भाजीपाला विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून परीदृश्य केले आहे.पुणे आणि मुंबई येथील शेतकरी आठवडी बाजार स्वतः चालवीत असून मध्यस्थांशिवाय आपल्या मालाची थेट विक्री करत आहेत,असे त्यांनी नमूद केले.

तामिळनाडू येथील एका केळ्याच्या कृषी उत्पादन संस्थे बद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले, की शेतकऱ्यांच्या एक समूहाने टाळेबंदीच्या काळात जवळपासच्या गावांतून शेकडो टन भाजीपाला, फळे आणि केळी  विकत घेतली आणि त्यांना एकत्र बांधून  ती कोम्बो कीट  चेन्नईत विकली .त्यांनी लखनौतील ‘इरादा शेतकरी उत्पादक समूह बाबत  उल्लेख केला. पंतप्रधान म्हणाले की, या समूहाने, टाळेबंदीच्या काळात थेट शेतकऱ्यांच्या शेतातील फळे आणि भाजीपाला घेऊन मध्यस्थांशिवाय लखनौच्या बाजारात विक्री केली.

नवनिर्माण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्र अधिक प्रगती करेल,असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. ईस्माईल भाई यांनी घरच्यांचा विरोध पत्करून शेती व्यवसाय स्विकारणाऱ्या गुजरातमधील शेतकऱ्याचे उदाहरणही पंतप्रधानांनी दिले. ईस्माईल भाईंनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बटाट्याची लागवड केली आणि आणि उत्तम दर्जाचे बटाटे हा त्यांचा हाँलमार्क बनला असून ते देखील आता मध्यस्थांशिवाय आपल्या मालाची थेट विक्री करून उत्तम लाभ मिळवत आहेत. मणिपूरमधील श्रीमती बिजय शांती या महिलेने कमळाच्या देठापासून धागा तयार केल्याच्या स्टार्ट अप कंपनीच्या प्रयत्नांचे कौतुक करत या नाविन्यपूर्ण कल्पकतेने कमळाची लागवड आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रात नवीन वाटा उघडल्या गेल्या असल्याच्या कथेची सर्वांना माहिती दिली.

राज्यात ७.५ अश्वशक्तीचे नवीन ७५०० सौर कृषीपंप आस्थापित होणार

0

ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांची मंजुरी

नागपूर, दि. 27 सप्टेंबर 2020 – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ७.५ अश्वशक्तीचे ७५०० नवीन सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार महावितरणकडून विशेष वेबपोर्टलद्वारे कृषिपंपांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे याकरिता राज्य शासनाने एक लाख पारेषण विरहीत सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना’ सुरु केली आहे. महावितरणच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात २५,००० सौर कृषिपंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्यात आणखी ७५,००० सौर कृषिपंपांच्या आस्थापनेचे उद्दिष्ट आहे. तथापि, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी या योजनेच्या टप्पा २ व ३ अंतर्गत ७.५ अश्वशक्तीचे ७५०० सौर कृषिपंप आस्थापित करण्याकरिता मंजुरी दिलेली आहे.महावितरणकडून वेबपोर्टलद्वारे ७.५ अश्वशक्तीच्या सौर कृषिपंपाच्या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ज्या गावांची सुरक्षीत पाणलोटक्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. मात्र कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मीटरपेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये ७.५ अश्वशक्तीचे सौर पंप देण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/solar/ या वेबपोर्टलला भेट देण्याचे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच या योजनेसंबंधी सर्व माहिती या वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. सौर कृषिपंपामुळे दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता, दिवसा विनाव्यतय अखंडित वीजपुरवठा, वीज बिलापासून मुक्तता, डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य व पर्यावरणपुरक परिचलन आदी फायदे आहेत. अर्जासोबत ७/१२ उतारा प्रत, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी) आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने ए-1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे. ऑनलाइन फॉर्म प्राप्त झाल्यानंतर व सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल आणि त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल. प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.या योजनेसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार (मार्च २०१८ पूर्वी ज्यांना एचव्हीडीएस योजनेमध्ये २.५ लाखांहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे), ३१ मार्च २०१८ नंतर सर्व पैसे भरुन प्रलंबित असलेले अर्जदार, १ जानेवारी २०१९ पासून कृषीपंपासाठी सर्व नवीन अर्जदार, २.५ लाखापेक्षा कमी रकमेच्या पायाभूत सुविधा लागणाऱ्या एचव्हीडीएस मधील पैसे भरुन प्रलंबित असलेला व या योजनेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक असलेला अर्जदार पात्र राहतील. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी पात्र आहेत मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने  वीजजोडणी झालेली नसावी. याशिवाय विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे वीजजोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात वीजजोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी पात्र आहेत. तसेच अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्य शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी,वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी/विहिर/बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील. मात्र या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने यापूर्वी अटल सोलर योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा. सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता ५ टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे. ७.५ अश्वशक्ती सौर कृषिपंपाची ८.९ टक्के जीएसटीसह किंमत ३,३४,५५० असून खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के हिस्सा म्हणून ३३,४५५ रुपये केवळ तर अनुसूचित जाती/ जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के हिस्सा म्हणून १६,७२८ रुपये केवळ भरणा करावा लागेल. या योजनेचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

संविधानाबद्दलचे भ्रम दूर करण्यासाठी ‘ संविधान प्रचारक ‘ तयार व्हावेत: नागेश जाधव

0

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल आयोजित ‘ संविधान प्रचारक ‘ कार्यशाळेस रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. गांधीभवन ( कोथरूड ) येथे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ही कार्यशाळा झाली. संविधानाचे अभ्यासक नागेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. नीलम पंडित, सुदर्शन चखाले, सचिन पांडुळे, कमलाकर शेटे यांनी संयोजन केले. ज्येष्ठ कार्यकर्ते अन्वर राजन, संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर यांच्यासह ६o जण सहभागी झाले.

‘ संविधान निर्मिती ही मोठी प्रक्रिया होती, त्यात देशातील अनेकांचा सहभागी होते.डॉ. आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत, हे संविधान सभेनेच म्हटलेले आहे. तरीही संविधान आणि डॉ.आंबेडकर यांच्या बाबत भ्रम पसरवले जातात. संविधान केवळ एका समाजासाठी नसून सर्व देशासाठी आहे. ‘ असे प्रतिपादन नागेश जाधव यांनी केले.

ते म्हणाले,’संविधान हे परिवर्तनवादी भारतीय संस्कृतीवर, संकल्पनेवर आधारित आहे.आधुनिक लोकशाही पध्दतीत ते बसवलेले आहे. जगातील चांगल्या गोष्टींचा समावेश त्यात केला आहे. संविधान हे सर्वांनी मिळून, सर्वांसाठी तयार केले आहे, याचा प्रचार संविधान प्रचारकांनी केला पाहिजे. संविधानाची प्रास्ताविका, त्यातील मूल्ये आणि आपल्या जीवनाशी असलेला संबंध, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्वे हे आपल्याला माहित पाहिजे. त्या शिवाय आपण जबाबदार नागरिक होऊ शकणार नाही.

संविधान निर्मिती करणारे दूरदर्शी होते. स्वातंत्र्य, समानता, बंधुता अशी सगळी चांगली मूल्ये मनात असून उपयोग नाही, ती लिहून ठेवली पाहिजेत , हे त्यांना माहित होते. संविधानाच्या प्रास्ताविकेत संविधानाचे सार आहे. संविधान लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. मातीत रुजवले पाहिजे.त्यासाठी संविधान प्रचारक तयार झाले पाहिजेत, असे आवाहन ही जाधव यांनी केले.

‘दागिने विकून वकिलांची फी भरली- स्वतःची अशी माझी कोणतीच मोठी संपत्ती नाही.. अनिल अंबानी

0

कर्जबाजारी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी लंडनच्या एका कोर्टात शुक्रवारी सांगितले की, ते साधे जीवन जगत आहेत. तसेच, त्यांच्याकडे कोणतीही रोल्स रॉयस कार नाही आणि दागिने विकून वकिलांची फी देत आहेत. चीनच्या तीन सरकारी बँकोंकडून कर्ज घेतल्याप्रकरणी अनिल अंबानी पहिल्यांदा व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे लंडन हाय कोर्टात सामील झाले होते.

9.9 कोटी रुपयांचे दागिने विकले

अनिल अंबानी यांनी सांगितले की, जानेवारी ते जून 2020 दरम्यान घरातील दागिने विकून त्यांनी 9.9 कोटी रुपये जमा केले. आता त्यांच्याकडे स्वतःची अशी मोठी कोणतीच संपत्ती नाही. त्यांच्याकडे अनेक कार्स असलेल्या प्रश्नावर अनिल अंबानी म्हणाले की, माध्यमांनी पसरवलेल्या या बातम्यांना काहीच तथ्य नाही. त्यांच्याकडे कोणतीच रॉल्स रॉयस कार नाही. सध्या त्यांच्याकडे फक्त एक कार आहे. तसेच, सध्या त्यांचे कुटुंबीय त्यांचा खर्च उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोर्टाने आणि मुलाकडून घेतलेल्या कर्जावर विचारला प्रश्न

शुक्रवारी सुनावणीदरम्यान कोर्टाने लग्जरी दुकानांवर क्रेडिट कार्डने केलेल्या खर्चावर प्रश्न विचारला. यावर अनिल अंबानी म्हणाले की, या क्रेडिट कार्डवर त्यांची आई कोकिलाबेन अंबानी खर्च करतात. आईकडून 66 मिलियन डॉलर आणि मुलाकडून 41 मिलियन डॉलरच्या कर्जावर अनिल अंबानी म्हणाले की, या कर्जाच्या अटीची माहिती देऊ शकत नाही. पण, हे कर्ज भेट स्वरुपाचे नाही. यादरम्यान अंबानी यांनी कोर्टात सांगितले की, कधीकाळी ते भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत होते. पण, आता त्यांच्याकडे फक्त 1,10,000 डॉलरची एक पेंटींग उरली आहे.

काय आहे प्रकरण ?

अनिल अंबानींची कंपनी रिलायंस कम्युनिकेशन (आरकॉम) ने चीनच्या तीन सरकारी बँकांकडून कॉरपोरेट लोन घेतले होते. पण, आरकॉम हे कर्ज फेडू शकली नाही. चीनी बँकांचे म्हणने आहे की, या कर्जासाठी अनिल यांनी पर्सनल गॅरंटी दिली होती. अनिल अंबानी यांच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी बँकांनी लंडनच्या कोर्टात खटला दाखल केला.

हायकोर्टाने 22 मे रोजी 5,281 कोटी रुपये फेडण्याचे आदेश दिले होते

याप्रकरणी लंडनच्या हायकोर्टाने 22 मे 2020 ला अनिल अंबानी यांना चीनी बँकांचे 71 कोटी डॉलर( 528) कोटी रुपये फेडण्याचे आदेश दिले होते. यासोबतच कायदेशीर खर्च म्हणून सुमारे 7 कोटी रुपयेही देण्यास सांगितेल होते. ही परतफेड 12 जून 2020 पर्यंत करायची होती. पण, अनिल अंबानी हे पैसे फेडू शकले नाही. 15 जूनला चीनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीचा खुलासा करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

या चीनी बँकांकडून घेतले होते कर्ज

  1. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (आयसीबीसी) ची मुंबई शाखा
  2. चायना डेवलपमेंट बँक
  3. एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ चायना

खडसेंना पुन्हा डच्चू : माजी मंत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडेंना ‘मानाचे पान’ -राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान

0

यादीत महाराष्ट आणि मुंबई असे वेगवेगळे उल्लेख का ?

पुणे-भाजप अध्यक्ष बनल्यानंतर आठ महिन्यांनी जेपी नड्डा यांनी शनिवारी आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. नड्डा यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील आठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. यात माजी पंकजा मुंडे आणि विनोद तावडेंचाही समावेश आहे. दरम्यान, पक्षाने मागील काही दिवसांपासून नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना या कार्यकारिणीत जागा दिली नाही.या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. माजी मंजत्री विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना मानाच पानं देत या कार्यकारिणीत सचिव म्हणून स्थान देण्यात आले आहे.पण, भाजपवर नाराज असलेल्या खडसेंना राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलेले नाही.

महाराष्ट्रातून कोण कोण …
पंकजा मुंडे ( महामंत्री)
विनोद तावडे ( महामंत्री)
विजया राहटकर ( महामंत्री)
सुनिल देवधर ( महामंत्री)
व्ही. सतीश (सहसंघटन मंत्री)
जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
संजू वर्मा (प्रवक्ते)
हिना गावित (प्रवक्त्या)

यादीत महाराष्ट आणि मुंबई असे वेगवेगळे उल्लेख का ?

मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण

0

सुदर्शन केमिकल्स  इंडस्ट्रीज, सुदर्शन सीएसआर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

पुणे : कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचा रोजगार थांबला होता. घरातील रोजचा खर्च कसा भागवायचा, अशी भ्रांत रोहा तालुक्यातील अनेक महिलांना होती. लॉकडाऊन काळात या महिलांच्या हाताला काम द्यावे, या उद्देशाने सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज संचालित सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या वतीने फेस मास्क शिवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या सुधा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना जोडून घेत रोजगाराची ही नवी संधी निर्माण केली आहे. आज १०० पेक्षा अधिक महिलांनी एक लाखाहून अधिक मास्क शिवले आहेत. त्यातून महिलांना उत्पन्नाचा एक चांगला स्रोत मिळाला आहे, अशी माहिती सुदर्शन सीएसआर फाउंडेशनच्या व्यवस्थापक माधुरी सणस यांनी दिली.

सुदर्शनच्या सुधा महिला बचत गटातील सर्व महिला गृहिणी किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या आहेत. रोहा तालुक्यातील धाटाव, वाशी, वरसे  आणि जवळच्या गावातील महिलांचा यामध्ये सहभाग आहे. सुदर्शनच्या वतीने या महिलांना शिवणकाम प्रशिक्षण, कापड आणि दोऱ्याची रीळ देण्यात येत असून, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत या महिलांनी उत्तम दर्जाचे दोन स्तर असलेले मास्क बनवले आहे. त्यांनी शिवलेले मास्क बचत गटाच्या माध्यमातुन विकले जात आहेत. हे मास्क पूर्णतः सुती कापडापासून बनवलेले आहेत. रायगडसह पुणे आणि इतर शहरातील अनेक संस्थांकडून हे मास्क विकत घेतले जात आहेत. मास्क शिवण्याचा कामातून हजारो रुपयांची उलाढाल झाली. सुधा बचत गटातून सगळे आर्थिक व्यवहार होत आहेत. समाजातील विविध संस्थांकडून या मास्कला मोठी मागणी आहे. प्रत्येक महिलेला स्वयंपूर्ण बनविण्याचे ध्येय सुदर्शन सीएसआर फाउंडेशनने हाती घेतले आहे,” असेही माधुरी सणस यांनी सांगितले.

“लॉकडाऊनमुळे आमच्यासारख्या सामान्य गृहिणीचे हाल सुरु झाले होते. परिस्थिती बेताचीच असल्याने काय करावे हे सुचत नव्हते. अशावेळी सुदर्शन संस्थेने मास्क शिवण्याचा उपक्रम आम्हाला सांगितला. घरबसल्या मास्क शिवण्याचे काम मिळाल्याने घर खर्च भागवण्यास मोठी मदत झाली. या उपक्रमामुळे आम्हाला रोजगार तर मिळालाच; शिवाय राष्ट्राची सेवा करण्याची संधीही मिळाली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या संकटात सुदर्शनने दिलेल्या मदतीबद्दल धन्यवाद देते.”

– प्रतिभा मोरे रा. विष्णुनगर, धाटाव, ता. रोहा. जि. रायगड,

“कंपन्या बंद झाल्या, शेतीची कामे बंद झाली. अशावेळी घर चालविण्याचे मोठे संकट ठाकले होते. पण सुदर्शनने संस्थेने आमच्या गावातील महिलांना मास्क शिवण्याचे काम दिले. मास्कसाठी लागणारा कच्चा मला संस्थेकडून मिळत होता. आम्ही फक्त मास्क शिवून देतो. हे मास्क विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांतून आमचे घर चालू लागले आहे. या उपक्रमामुळे आमच्यासमोरील मोठी समस्या सुटली आहे

– समृद्धी लहाने, रा. वाशी, ता. रोहा. जि. रायगड.

सुदर्शनच्या सुधा महिला बचत गटाच्या महिलांनी शिवलेले मास्क आम्ही घेतले. अतिशय उत्तम प्रतीचे आणि कोरोनापासून सुरक्षित ठेवणारे असे हे मास्क आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिरॅमिड आदिवासी शाळेत या मास्क आम्ही वाटले. इतर शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांसाठी हा एक प्रेरक उपक्रम आहे. राज्यभरात गरजूना हे कापडी मास्क वाटण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. त्यातून या महिलांनाही रोजगार मिळेल.”

– सुरेंद्र श्रॉफ, पर्यावरण प्रकल्प प्रमुख, रोटरी क्लब

रुबल आगरवाल सापडू शकतात ..वादाच्या भोवऱ्यात…?

0

पुणे- ‘त्या ‘शिर्डी साई संस्थान वरून बदलून पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर आल्या. पाहता पाहता तत्कालीन आयुक्तांचा विश्वास संपादन आणि अनेक खात्यांचा कारभार यामुळे त्या सातत्याने अग्रभागी राहिल्या ,राव गेले ,गायकवाड आले ,पुन्हा आता विक्रम कुमार आले ..पण ‘त्या अग्रभागी च राहिल्या . कोणीही नेता आला तर याच पुढे , चलती असलेल्या लॉबीचा सहारा यांनाच …मुख्य सभेत उत्तरे द्यायला याच पुढे … अशा महापालिका अतिरिक्त आयुक्त यापुढे ..वादाच्या भोवऱ्यात सापडल्या तर नवल वाटणार नाही अशी चर्चा आहे .

या चर्चेत देण्यात येणारी कारणे तशी दुर्लक्षित करता येण्याजोगी नाहीत .

गेल्यावर्षी आंबिल ओढ्याला पूर आला 5 लोक दगावले ..पण … प्र्शासनाने घेतलेली दक्षता अजूनही दिसली नाही .ओढ्याच्या रिटेनिंग वॉल च्या टेंडर संदर्भात भले भले अभ्यासक डोळे लावून आहेत .

६७ (३ ) क अन्वये दिलेल्या विशेष अधिकारात आताची कोरोना काळातील सर्व खरेदी यांच्याच अधिपत्याखाली होते आहे . तर अभ्यासकांच्या तोफा कालांतराने थंडावतील असा विश्वास असलेले महापौर मोहोळ हे त्यांना तोफेच्या तोंडी उभे राहण्यापासून वाचवीत आहेत ,पण कधी ना कधी त्यांना या अभ्यासकांच्या तोफेला सामोरे जायचे आहे . तत्पूर्वी त्यांच बदली सुद्धा होऊ शकेल असा हि काहीचा दावा आहेच .पण असे अयोग्य पाऊल राज्य शासन उचलेल असे हि अनेकांना वाटत नाही

विशेष म्हणजे आता आयटी,मिळकतकर अशी महत्वाची खाती त्यांच्याकडून नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढून घेतली आहेत . स्मार्ट सिटी चा स्मार्ट कारभार हि त्यांच्या हातून निसटला आहे. केवळ बांधकाम आणि आरोग्य विभाग त्यांच्या अखत्यारीत आहे

दक्षिण पुण्यासह पश्चिम पुण्यात काही नगरसेवकांनी उभारलेल्या बेकायदा बांधकाम प्रकल्पांकडे कानाडोळा करणे , त्या त्या भागातील बांधकाम निरीक्षकांच्या कारभारावर नियंत्रण न ठेवणे ,ओढे नाले बुजवून , डोंगर फोडून होणाऱ्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणे हे साऱ्या पुणेकरांना ठाऊकच आहे.

आरोग्य खात्यात तर कहरच मांडलाय ..आंधळं दळतंय ..अशी परिस्थिती आहे. सीएसआर मध्ये येणाऱ्या संस्था आणि स्वतःच शोखी मिरविणाऱ्या संस्था यांच्यातच ‘त्यांना ‘ म्हणे वावरायला खूप आवडतंय ..आरोग्यप्रमुख म्हणे यांच्या अधिपत्याखाली टिकतच नाही . ते तर ते पण आता आम्हाला किमान वेतन द्या , किमान वेतन द्या असे ओरडू ओरडू सांगणारे आरोग्य सेवकांनी हि यांच्या ‘सबुरी’ पुढे माथा टेकला आहे. पण सुदैव यांचे कि त्यांनी रुग्ण सेवा सोडलेली नाही .

आता या सर्वावर ..’खरे खोटे देव जाणो ‘ असे म्हणायची वेळ लॉबी च्या बाहेरील लोकांवर आली असली तरी ..या लवकरच वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतील असा अभ्यासकांचा दावा आहे.