Home Blog Page 2443

अनिल भोसले यांच्या घरावर छापा- 18 हून अधिक मालमत्ता, 170 बॅंक खाती,सगळ्याच गाड्या 7171 आणि बरच काही !

0

पुणे : आमदार अनिल भोसले यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. यामध्ये त्यांच्या दोन महागड्या गाड्या आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील सहकारी पडवळ याची देखील एक गाडी जप्त करण्यात आली आहे. या तिन्ही गाड्यांची किंमत 1 कोटी 23 लाखांच्या घरात आहे. जप्त करण्यात आलेल्या गाड्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. याबरोबरच अनिल भोसले यांनी 30 कोटी रुपयांची मालमत्ता पुणे पोलिसांनी शोधली असून त्याच्या जप्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या गुन्हयात त्यांना अटकही करण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी जामिनासाठी दोन वेळा अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला.

भोसलेंकडे 18 हून अधिक मालमत्ता, 170 बॅंक खाती आणि बरच काही !
भोसले यांच्याकडे कोरेगाव मूळ येथे स्वतःची शेती आहे. तसेच शिवाजीनगर, विश्रांतवाडी, कोथरूड, वारजे यासह शहराच्या वेगवेगळ्या भागात दुकाने, व्यावसायिक संकुल, दुकाने, सदनिका, मिळकती अशा 18 हून अधिक मालमत्ता आहेत. त्याचबरोबर त्यांची 170 बॅंक खाती असून त्यामध्ये एक कोटी 90 लाख रुपयांची रोकड आहे. संपूर्ण मालमत्तेची किंमत 32 कोटी रुपये इतकी असून ही मालमत्ता अधिगृहीत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. संबंधित प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर संबंधित मालमत्तांचा लिलाव करून त्यातून येणारे पैसे ठेवीदारांना देण्यात येणार असल्याचे कदम यांनी सांगितले

सगळ्याच गाड्या 7171

अनिल भोसले यांच्याकडील अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यापैकी स्वतःच्या नावावर असणाऱ्या लॅंड क्रूझर व कॅमरे पोलिसांनी जप्त केली आहे. तर उर्वरित गाड्या बॅंकेच्या नावावर आहे. लॅंड क्रूझर, कॅमरे या दोन्ही गाड्यांचा क्रमांक 7171 असा आहे. तर उर्वरित गाड्यांनाही 7171 हाच क्रमांक आहे. हाच क्रमांक ठेवण्यामागे नेमके काय गुपित आहे, याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही.

बॅंकेतील घोटाळ्यासंदर्भात भोसलेंवर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यांच्यावर तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्‍यता आहे. या बॅंकेचे रिझर्व्ह बॅंकेने 2018-19 चे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही कारवाई मागील दोन आठवड्यांपासून सुरु आहे. भोसले यांची लॅण्ड क्रुझर, टोयाटा कॅमरी आणि मारुती बलेनो या गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. यांची किंमत सव्वा कोटीच्या आसपास आहे. त्यांच्या मालकीच्या आणखी दहा ते बारा गाड्यांवरही जप्ती आणण्याची तयारी सुरु आहे. लॉकडाऊनपुर्वी भोसले यांच्यासह 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे इतर कार्यवाहीस थोडा विलंब झाला होता. या गुन्हयासंदर्भात एमपीआयडी न्यायालयात दोषारोपपत्रही मे महिन्यात सादर झाले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने 30 ते 32 कोटी किंमत असलेल्या 18 मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यांची जवळपास 170 बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत, यामध्ये दोन कोटी रुपयांची रक्कम आहे.या प्रकरणात आता पर्यंत 153 कोटी हुन अधिक रक्कमेचा गैर व्यवहार झाल्याचे समोर आले आहे

बँकांच्या वसुली एजंट्सच्या गुंडगिरीला पायबंद घालावा-आ. सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे : कोरोनाच्या काळातल्या लाॅकडाऊन नंतर अनलाॅकचा काळ आल्यानंतर काही बँका कर्जवसुलीसाठी ग्राहकांकडे तगादा लावू लागल्या आहेत. काही वेळा ग्राहकांच्या घरी जाऊन दमदाटी करणे किंवा रिकव्हरी एजंटच्या मार्फत फोनवरुन शिवीगाळ करणे असेही प्रकार घडू लागले आहेत. त्यासाठी पुण्याचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अशा ग्राहकांच्या मदतीला धावून जाण्याचे ठरवले आहे.

याबाबत तक्रारी मिळाल्यानंतर आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती शिरोळे यांनी सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली असून जिल्हाधिकारी नियमपालनाबाबतचे परिपत्रक काढणार असल्याचेही शिरोळे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1381740515365177/

पुणे महापालिकेला हवेत २५० व्हेंटिलेटर मशीन..आयुक्तांचे पत्र

0

पुणे : महापालिकेने राज्य शासनाकडे २५० व्हेंटिलेटर मशीनची मागणी केली असून या मशीन पीएम केअर फंडामधून पुरविण्यात याव्यात असे पत्र पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांना पाठविले आहे.पीएम केअर फंडामधून मिळालेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयांना भाडेतत्वावर देण्याचा विचार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यावर ते पुन्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात येतील असेही पालिकेने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

पालिका हद्दीत सध्या कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पालिकेची आरोग्य यंत्रणा आणि संपूर्ण मनुष्यबळ या परिस्थितीचा यथाशक्ती मुकाबला करीत आहेत. पालिकेने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ८०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभे केलेले आहे. औंध- बाणेर येथील डेडिकेटेड कोविड सेंटरमध्येही ३१४ बेड उपलब्ध करण्यात आले आहेते. या दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आऊटसोर्स करण्यात आली असून खासगी एजन्सी मार्फत सेवा दिली जात आहे.

पालिका क्षेत्रातील बहुतेक रुग्णांचा भार खाजगी रुणालयांवर असल्याचे दिसते आहे. पुण्यातील एकूण रूग्णांपैकी ५ हजार २५६ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये १ हजार ७९८ नॉन ऑक्सिजन बेड, २ हजार ७५५ ऑक्सिजन बेड, ३५० आयसीयू बेड आणि ३५० व्हेंटिलेटरचा समावेश आहे.

गंभीर रुग्णांचा कल खासगी रुग्णालयात दाखल होण्याकडे अधिक आहे. गंभीर रूग्णांची संख्या वाढत चालली असून या रूग्णांसाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. ही गरज भागविण्यासाठी पालिकेला ‘पीएम केअर’ फंडामधून २५० व्हेंटिलेटर मिळावेत असे पालिकेने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे व्हेंटिलेटर मिळाल्यास गंभीर रुग्णांना त्याचा फायदा होईल.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

मुळशीतील ‘गिरीवनप्रकल्प प्रकरण

पुणे : मुळशी तालुक्यातील डोंगरगाव होतले येतील जमिनींच्या प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या न्यायालयात या जामिन अर्जाची सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र अंतिम निकाल देताना गोखले यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.दरम्यान, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज करण्यास मुदत मिळावी, अशी विनंती गोखले यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने या निकालास १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या विरोधात जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा.कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात १४ गुंतवणूकदारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.

या प्रकरणातील संशयित आरोपींनी मुळशीतील ‘गिरीवन’ नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे असे भासवले. त्या आधारे ग्राहकांना आकर्षित केले व तक्रारदार यांच्यासह १४ जणांची एक कोटी रुपयांची फसवणूक झाली, अशा आशयाची ही तक्रार आहे. गोखले यांनी अॅड. ॠषीकेश गानू आणि अॅड. उपेंद्र खरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मार्चमध्ये यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

विक्रम गोखले कंपनीचे अध्यक्ष असल्याची बाब कंपनीच्या मेमोरेंडम आॅफ असोसिएशनमध्ये दिसून येत नाही. तसेच त्यांची ग्राहकांच्या खरेदीखतावर स्वाक्षरी नाही. तसेच त्यांनी गुंतवणूकदारांकडून कुठलाही मोबदला स्वीकारला नाही. एफआयआरमधील कोणत्याही आरोपांशी गोखले यांचा संबंध नाही, असा युक्तिवाद गोखले यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या जामीन अर्जाला सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला.

गोखले हे संबंधित कंपनीचे अध्यक्ष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम मोठी आहे. गोखले यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे, त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद अॅड. सप्रे यांनी केला.त्यनंतर न्यायालयाने गोखले यांचा अर्ज फेटाळून लावला.

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम नाही :नवरात्रोत्सव गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

0

मुंबई, दि. २९ : कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता दि.१७ सप्टेंबर पासून सुरु होणारा या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे.

मार्गदर्शक सूचना

१. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवनागी घेणे आवश्यक राहील.

२. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा.न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

३. या वर्षांचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवी मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

४. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.

५. या वर्षी शक्यतो पारंपारिक देवी मुर्तीऐवजी घरातील धातु/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्याने कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

६. नवरात्रोत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

७. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

८. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदीचे पालन करण्यात यावे.

९. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

१०. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुक करणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.

प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

११. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवी मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

१२. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी.

१३. मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकत्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल.

१४. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

१५. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्ती कार्यक्रमस्थळी हजर राहतील, प्रेक्षक बोलावू नयेत, त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.

१६. कोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जाहीर केल्या आहेत. त्या सूचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करून शासन, प्रशासनास सहकार्य करावे व कोरोना विरुद्धच्या युद्धात सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.देशमुख यांनी केले आहे.

माणिकबागेतील खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत दीपक नागपुरे आक्रमक

0

पुणे : माणिकबाग परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, तसेच सहाय्यक अभियंता दिनेश फुलझले यांची भेट घेतली. या भेटींदरम्यान नागरिकांच्या समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम सुरू असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे देखील ऑनलाईन क्लासेसवर परिणाम होत आहे. वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठावर देखील या ठिकाणी विपरीत परिणाम होत आहे.

याबाबत नागपुरे यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या सर्व अत्यंत गंभीर बाबींची दाखल घेऊन महावितरणमधील वरिष्ठ अधिकारी व पुणे महानगर पालिकेशी समन्वय साधून ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याचे नागपुरे यांनी म्हटले आहे. आठवड्याभरात हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दीपक नागपुरे म्हणाले. 

मेधा कुलकर्णींची धडक :बाणेरच्या अनाधिकृत सिमेंट प्लांट वर कारवाई

0


पुणे- विद्यमान आमदार सोडा ,पण माजी आमदार हि जनतेच्या साठी बरेच काही करू शकतो हे कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या कृतीतून आज दाखवून दिले आहे . बाणेर येथील सिल्वर डेल सोसायटी परिसरात गेले अनेक महिने एक अनधिकृत सिमेंट प्लांट चालू होता. आज इथे महापालिका अधिकाऱ्यांना नेऊन तो बंद करायला त्यांनी भाग पाडले.

याबात त्यांनी म्हटले आहे कि , या प्लांट मधील मशिनरी अत्यंत मोठ्या आवाजात दिवसा आणि रात्रीही उशिरा पर्यंत चालत असे. धुळीचा आणि आवाजाचा त्रास नागरिकांना सहन होईनासा झाला होता.गेल्या आठवड्यात या भागातील काही नागरिकांनी माझ्या कडे या बाबत तक्रार केली आणि आत्ता पर्यंत केलेल्या आणि असफल झालेल्या प्रयत्नांचा पाढा वाचला. मी त्यांच्या समवेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली आणि कारवाई ची मागणी केली .

उपायुक्त माधव जगताप, बांधकाम अधिकारी Dyc गायकवाड साहेब, JE अमोल गोलार यांनी आमच्या समवेत पाहणी करून त्वरित कारवाई केली.. नागरिकांची त्रासातून मुक्तता करता आली याचा आनंद झाला. यावेळी या भागातील अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. शिला मांगलेकर – चेअरमन, सिल्व्हरडेल सोसायटी, नवल पटेल सेक्रेटरी , सिल्व्हरडेल सोसायटी, अंजन, यूलू पुलागले, मनोहर पंडित, अभिजित सराफ, प्रकाश पाटील, अनुप देशमुख, वसंत चितम, शिरीष वलसंगीकर, संगीता लोल्याकर, मिहिर गुप्ता, भारत पाठक, योगेश मानधने, भूषण तळवलकर, अनिंद्या लाहेरी, भक्ती कुलकर्णी, एम.जी. कुलकर्णी, निलेश लोल्याकर, प्रशांत बाहेती, सिद्धार्थ मानकीकर, श्रीजित कुलकर्णी, सीमा पाठक, ओंकार कुलकर्णी, रामानंद पाठक, स्मिता मानकीकर, कु. तन्वी गुप्ता, अमोल देशपांडे, प्राची कुलकर्णी, कु. जुई कुलकर्णी, घाईताडे, गुप्ता ए, भटवडेकर एस., दत्ता एस., सुश्री श्रेयता सुगंधी, पवार, परांजपे एम., विश्वजित कोठावडे, राज कुमार एस., सत्यक असिस्टेड लिव्हिंग हिलिंग सेंटर _ मॅनेजर, कृपा सिंधू असे नागरीक उपस्थित होते.असेही माजी आमदार कुलकर्णी यांनी सांगितले .

हृदयरोग टाळण्यासाठी मांसाहार,व्यसन वर्ज्य करण्याची आवश्यकता;डॉ. कल्याण गंगवाल

0

जागतिक हृदय दिवसानिमित्त ‘सुर्यदत्ता’तर्फे सन्मान
पुणे : “बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, मांसाहाराचा अतिरेक आणि वाढती व्यसने यामुळे हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या काही वर्षात भारत हृदयरोगाची राजधानी बनू पाहत आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला सदाचारी, शाकाहारी आणि व्यसनमुक्त जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे,” असे मत शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले.

जागतिक हृदयरोग दिवसाच्या निमित्ताने सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. कल्याण गंगवाल यांना ‘सुर्यदत्ता हृदयस्पर्शी आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले. बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, माजी विद्यार्थी प्रशांत दवे, आदी उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे हृदयरोग होण्याचे प्रमाण तिशीत आले आहे. या तरुण पिढीला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर सदाचारी आणि व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. तणावापासून दूर राहण्यासह स्थूलता वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आहार, विहार, विचार आणि आचार चांगले असणे गरजेचे आहे. आज व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा घातक ठरत आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या सेलिब्रिटींच्या प्रेमात पडणे थांबवले पाहिजे. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने हृदयरोगाच्या बाबतीत जगभरात जनजागृती होत आहे, ही सकारात्मक बाब आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉक्टरांनी दिलेल्या आहार, विहार, आचार आणि विचार या चतु:सूत्रीचे पालन करू. सुर्यदत्तामध्ये नेहमीच्या शकाहाराला प्रोत्साहन दिले जाते. येथील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व सर्व स्टाफला व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. माणसांसह पशु-पक्ष्यांच्याही हृदयाला हात घालून त्यांचे प्रेम जिंकणाऱ्या डॉ. कल्याण गंगवाल यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करताना आम्हाला आनंद होतो.” प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
कोरोनाची भीती बाळगू नका

वाफ घेणे, गरम पाणी पिणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, मांसाहार टाळणे गरजेचे आहे. कोरोना हा काळजी करण्याचा नव्हे, तर काळजी घेण्याचा आजार आहे. स्थूलता, मधुमेह, हृदयरोग, श्वसनाचे आजार हे कोरोनाला पूरक आहेत. त्यामुळे योग्य व्यायाम आणि आहार घेतला, तर कोरोनवर सहज मात करता येते. गंभीर लक्षणे असतील तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात जावे. अन्यथा दहा ते बारा दिवस घरीच थांबून योग्य ती काळजी घेतली तर कोरोना सहज बरा होतो

कोरोना संकटकाळात ५३ हजार बेरोजगारांना रोजगार दिल्याचा मंत्री नवाब मलिक यांचा दावा

0

मुंबई, दि. २९ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकुण ५३ हजार ०४१ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.

फक्त ऑगस्ट महिन्यात १३ हजार ७५४ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तत्पुर्वी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार मिळाला, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.

माहे ऑगस्टमध्ये या वेबपोर्टलवर ३७ हजार ३२० इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ६ हजार ७१०, नाशिक विभागात ५ हजार ६८७, पुणे विभागात १२ हजार ५२३, औरंगाबाद विभागात ७ हजार ०८८, अमरावती विभागात २ हजार ३४९ तर नागपूर विभागात २ हजार ९६३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १३ हजार ७५४ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात २ हजार १७७, नाशिक विभागात १ हजार ७६४, पुणे विभागात ६ हजार ३२०, औरंगाबाद विभागात २ हजार ९३२, अमरावती विभागात ११० तर नागपूर विभागात ४५१ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.  

ऑगस्टमध्ये १३ हजार जागांसाठी ऑनलाईन मुलाखती

कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात ७६ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. ऑगस्टमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये १२८ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १३ हजार ८९४ जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये १० हजार ३३२ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत १ हजार २८९ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

नोकरीइच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

मंत्री श्री. मलिक म्हणाले की, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पीएमपीएलनेच सक्षम होण्यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात- आबा बागुल

0

लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ यांची ‘फ्री कन्सल्टन्सी’ घ्यावी

पुणे – सद्यस्थितीत कोरोनाचे संकट तसेच आर्थिक समस्या सगळ्यांनाच भेडसावत आहे. आणखी किमान वर्षभर तरी या स्थितीत फारसा बदल होणार नाही हे लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएल) व्यापक उपाययोजना करुन सक्षम व्हावे, अशी सूचना काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पीएमपीएलचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांच्याकडे केली आहे.

कोरोना साथीमुळे पीएमपीएलच्या प्रवासी संख्येवर निर्बंध आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात बस सेवा पूर्णपणे बंद ठेवावी लागली होती. यामुळे पीएमपीएलला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सध्या पंचवीस टक्के बस गाड्या धावत असल्या तरीही एवढ्या मर्यादित ताफ्याचे संचालन करणेही पीएमपीएलला आर्थिकदृष्ट्या अवघड झाले आहे. याकरिता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी अर्थसहाय्य द्यावे, थकबाकीच्या रकमा द्याव्यात अशी मागणी पीएमपीएल प्रशासन वारंवार करीत आहे. कर आकारणी आणि अन्य उत्पन्नावर मर्यादा आल्याने महापालिकासुद्धा आर्थिक पेचात सापडल्या आहेत. त्यामुळे ‘आडातच नाही तर, पोहऱ्यात येणार कुठून’ अशी गत झाली आहे. यात सुधारणा होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी तरी लागेल, असे बागुल यांनी पत्रकात म्हटले आहे.

पीएमपीएलने वाहतूक नियोजन आणि आर्थिक नियोजन करण्यासाठी व्यापक सल्लागार मंडळ नेमावे. त्यात नगरसेवक, वाहतूक तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ यांचा समावेश करावा, त्यांची ‘फ्री कन्सल्टन्सी’ घ्यावी. याकरिता नियमितपणे बैठका घ्याव्यात. त्यातून निश्चितच सुधारणा होऊ शकेल. पीएमपीएल कंपनी स्थापन होण्यापूर्वी महापालिकेच्या मुख्य सभेत अंदाजपत्रक आणि बस सेवा यावर जोरदार चर्चा होत असे, त्यातून प्रशासनावर अंकुश रहात असे, काही मोलाच्या सूचनाही होत होत्या. मात्र, पीएमपीएल कंपनी अस्तित्वात आल्यापासून हा संवाद थांबलेला आहे. या निमशासकीय कंपनीवर सत्ताधारी पक्षाचा एकच संचालक असतो. महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष निमंत्रित सदस्य असतात आणि प्रशासकीय अधिकारी अन्य सदस्य असतात. या रचनेमुळे पीएमपीएल मधील त्रुटींवर चर्चाच होत नाही, कारभारावर नियंत्रण रहात नाही. त्याचे परिणाम सध्या दिसत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी यापूर्वी पीएमपीएलला आर्थिक सहाय्य केलेले आहे. परंतु सध्या कोरोना साथीच्या नियंत्रणासाठीचा खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामे यांची सांगड घालताना दोन्ही महापालिकांची दमछाक होत आहे. अशा स्थितीत दोन्ही महापालिकांकडून पीएमपीएलला आर्थिक सहाय्य होणे अशक्य आहे. तरी पीएमपीएल कंपनीने फ्री कन्सल्टन्सी आदी सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी.

हॅलो माय काँग्रेस .. आबा बागुलांची हेल्प लाईन ..

0

पुणे- शहर कॉंग्रेसने कॉंग्रेस भवन मध्ये कोरोना महामारी संदर्भात नागरीकांसाठी हेल्प लाईन सुरु केली आहे तर महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी आपल्या पर्वती मतदार संघात हॅलो माय काँग्रेस नावाने हेल्प लाईन सुरु करून नागरिकाना मदत करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात येत आहे.नागरिकांना त्याबाबत सूचना दिल्या जात आहेत.नागरिक कोरोनावर उपचार घेऊन घाबरलेल्या अवस्थेत घरी जात आहेत. माझे काय होईल? मला पुन्हा कोरोना होईल का? असे विविध प्रश्नाने ग्रासलेले आहेत.यावेळी डिप्रेशन येऊन टोकाचे पाऊल नागरिकांनी उचलू नये.यासाठी त्यांची विचारपूस करून धीर देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व हेमंत बागूल यांच्या संयोजनाखाली हॅलो माय काँग्रेस हेल्प लाईन सुरू करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनद्वारे कोरोनावर उपचार घेऊन घरी आलेल्या नागरिकांना फोन करून त्यांची विचारपूस करण्यात येते.त्यांना कोणता त्रास होतोय का? कोणता आहार घेताय? काही लक्षणे आहेत का?टेंशन घेऊ नका याबाबत विचारणा करून धीर देण्यात येतो.नागरिक हॅलो माय काँग्रेस हेल्पलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.डिप्रेशनमध्ये येऊन नागरिकांनी टोकाचे पाऊल उचलू नये.या हेतूने सुरू केलेल्या या उपक्रमातून नागरिकांना केलेली विचारपूस व दिलेला सल्ला लाख मोलाचा ठरत आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 73 हजार 361,एकुण 11 हजार 185 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 3 लाख 40 हजार 953 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,
विभागात कोरोना बाधित 4 लाख 25 हजार 499 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.29 :- पुणे विभागातील 3 लाख 40 हजार 953 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 25 हजार 499 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 73 हजार 361 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 185 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 80.13 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 78 हजार 270 रुग्णांपैकी 2 लाख 31 हजार 606 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 416 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 83.23 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 870 रुग्णांपैकी 26 हजार 497 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 277 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 96 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 732 रुग्णांपैकी 24 हजार 314 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 284 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 850 रुग्णांपैकी 25 हजार 787 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 754 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 777 रुग्णांपैकी 32 हजार 749 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 158 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 945, सातारा जिल्ह्यात 469, सोलापूर जिल्ह्यात 437, सांगली जिल्ह्यात 973 तर कोल्हापूर जिल्ह्यात 334 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 860 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 3 हजार 130, सातारा 983, सोलापूर 302, सांगली 1 हजार 11 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 434 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 18 लाख 59 हजार 212 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 25 हजार 499 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ७१ हजार गुन्हे दाखल; ३७ हजार ४४२ व्यक्तींना अटक

0

मुंबई दि. २९ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ७१ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३७ हजार ४४२ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २८ कोटी ५५ लाख ६० हजार ९१४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २८ सप्टेंबर या कालावधीत

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३६४ (८९५ व्यक्ती ताब्यात)

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १३ हजार ३५६

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

जप्त केलेली वाहने – ९६, ४६६

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस –

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २२० पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २४५ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला.

पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

राज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल

0

मुंबई, दि. 29 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी होईल अशी अपेक्षा आहे.

ही अधिसूचना राज्यपालांनी संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील परिच्छेद ५, उपपरिच्छेद १ अंतर्गत असलेल्या प्राप्त अधिकारांचा वापर करून काढली आहे.

अनुसूचित क्षेत्र असलेल्या पालघर, नंदुरबार आणि गडचिरोली यांसह इतर जिल्ह्यांच्या भेटी दरम्यान राज्यपालांच्या निदर्शनास आले होते की काही अनुसूचित जमाती आणि वननिवासी कुटुंबे अनुसूचित क्षेत्रातील त्यांच्या मूळ वसतीस्थानापासून वाढलेल्या कुटुंबासाठी जागा उपलब्ध नसल्याने इतरत्र स्थलांतर करीत आहेत. या संदर्भात सर्व संबंधितांशी चर्चा करून सदर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

अधिसूचनेची प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर (rajbhavan-maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आली आहे.

सिंचन भवन’ येथे कोरोना विषयक जनजागृती

0
  •  ‘सिंचन भवन’ येथे ‘कोरोना किलर ‘ यंत्रणा

पुणे : शंभर टक्के उपस्थितीत कार्यालयीन सुरु असणाऱ्या सिंचन भवन पुणे येथे कोरोना पासून सुरक्षेसाठी जनजागृती करण्यात आली तसेच ‘कोरोना किलर’ ही इलेक्ट्रोनिक  यंत्रणा बसविण्यात आली. अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी ही माहिती दिली. कार्यालयीन प्रवेशापूर्वी टेम्परेचर गन ने तपासणी,सॅनिटायझर,मास्क चा वापर आणि कार्यालयात कोरोना किलर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.   
‘कोरोना विषाणू साथीपासून सरकारी कामकाज थांबू नये म्हणून कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व ती काळजी घेतली जात आहे. आयनायझेशनच्या माध्यमातून  भोवतालचे वातावरण कोरोना मुक्त करणारे ‘कोरोना किलर ‘ उपकरण बसविण्यात आले आहे.या सर्व उपाय योजनांमुळे अधिकारी ,कर्मचाऱ्यांना निर्धोक पणे काम करणे शक्य झाले आहे ‘,असे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी सांगितले. 
हेमंत धुमाळ  यांच्या हस्ते ‘कोरोना किलर ‘ यंत्रणेचे  उदघाटन करण्यात आले.पुण्यातील  इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा ली चे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी  ‘कोरोना किलर ‘ संशोधनाची माहिती दिली. 
ते म्हणाले ,’कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंतू ,असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान  व मशीन  इलेक्ट्रोनिक इंजिनियर असलेल्या आणि  इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण  व संशोधन विभागाने ह्या  मशीनची कार्यक्षमता चाचणी प्रमाणित केली आहे . 
 व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण  हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही  हवा पोहोचते  तेथे हे आयन पोहचतात व  कोरोना व्हायरस आणि  इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले.आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी ‘कोरोना किलर ‘ विषाणू नाशक   इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली  कार्यक्षमता  चाचणी प्रमाणपत्र यावेळी   देण्यात आली .  अशा स्वरूपाची प्रमाणपत्र  मिळवणारे हे पहिले उपकरण आहे ,असे भाऊसाहेब जंजिरे यांनी यावेळी सांगितले. 
  ‘कोरोना किलर ‘ हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते .  रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. 
 उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच  या संस्थेने बसविले आहे,उप मुख्य मंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते  या उपकरणाचे मुंबई येथे  लोकार्पण करण्यात आले,अशी माहिती यावेळी देण्यात आली .