Home Blog Page 2442

शोभा मोहितेंचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

0

पुणे, दिनांक 30- पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई शोभा सुरेश मोहिते या 20 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, माजी जिल्हा माहिती अधिकारी गोविंद देशपांडे, निलिमा आहेरकर, गितांजली अवचट, वैशाली रांगणेकर, मिलिंद भिंगारे, विशाल कार्लेकर, स्वाती साळुंके, चंद्रकांत खंडागळे, संजय गायकवाड, मोहन मोटे, विलास कुंजीर, वर्षा कोडलिंगे, दिलीप कोकाटे, विशाल तामचीकर, श्रीमती मोहिते यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी शाकाहाराचा अवलंब करावा-डॉ. कल्याण गंगवाल

0
  • चांगल्या जीवनशैलीसाठी सदाचारासाठी अध्यात्माची जोड हवी 
  • डॉ. कल्याण गंगवाल यांचे प्रतिपादन; जागतिक हृदय दिवसानिमित्त ‘सुर्यदत्ता’तर्फे सन्मान

पुणे : “बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, मांसाहाराचा अतिरेक आणि वाढती व्यसने यामुळे हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या काही वर्षात भारत हृदयरोगाची राजधानी बनू पाहत आहे. हे टाळण्यासाठी आपल्याला सदाचारी, शाकाहारी आणि व्यसनमुक्त जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता आहे,” असे मत शाकाहार पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले.

जागतिक हृदयरोग दिवसाच्या निमित्ताने सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. कल्याण गंगवाल यांना ‘सुर्यदत्ता हृदयस्पर्शी आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले. बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, अधिष्ठाता डॉ. प्रतीक्षा वाबळे, माजी विद्यार्थी प्रशांत दवे, आदी उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “मद्यपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे हृदयरोग होण्याचे प्रमाण तिशीत आले आहे. या तरुण पिढीला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर सदाचारी आणि व्यसनमुक्त होण्याची गरज आहे. तणावापासून दूर राहण्यासह स्थूलता वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आहार, विहार, विचार आणि आचार चांगले असणे गरजेचे आहे. आज व्यसनांना मिळणारी प्रतिष्ठा घातक ठरत आहे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या सेलिब्रिटींच्या प्रेमात पडणे थांबवले पाहिजे. आजच्या या दिवसाच्या निमित्ताने हृदयरोगाच्या बाबतीत जगभरात जनजागृती होत आहे, ही सकारात्मक बाब आहे.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “डॉक्टरांनी दिलेल्या आहार, विहार, आचार आणि विचार या चतु:सूत्रीचे पालन करू. सुर्यदत्तामध्ये नेहमीच्या शकाहाराला प्रोत्साहन दिले जाते. येथील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व सर्व स्टाफला व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. माणसांसह पशु-पक्ष्यांच्याही हृदयाला हात घालून त्यांचे प्रेम जिंकणाऱ्या डॉ. कल्याण गंगवाल यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करताना आम्हाला आनंद होतो.” प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

कोरोनाची भीती बाळगू नका, काळजी घ्यावाफ घेणे, गरम पाणी पिणे, प्रतिकारशक्ती वाढवणे, मांसाहार टाळणे गरजेचे आहे. कोरोना हा काळजी करण्याचा नव्हे, तर काळजी घेण्याचा आजार आहे. स्थूलता, मधुमेह, हृदयरोग, श्वसनाचे आजार हे कोरोनाला पूरक आहेत. त्यामुळे योग्य व्यायाम आणि आहार घेतला, तर कोरोनवर सहज मात करता येते. गंभीर लक्षणे असतील तरच डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात जावे. अन्यथा दहा ते बारा दिवस घरीच थांबून योग्य ती काळजी घेतली तर कोरोना सहज बरा होतो

कोरोनाविरुद्ध ढाल घेऊन वीजयोद्ध्यांची खडतर परिस्थितीतही अविश्रांत ग्राहकसेवा

0

पुणे  : गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूविरुद्ध आरोग्यविषयक विविध उपाययोजनांची ढाल घेऊन महावितरणचे वीजयोद्धा पुणे परिमंडलातील सुमारे 31 लाख वीजग्राहकांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत सेवा देत आहेत. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे अत्यंत खडतर परिस्थिती उद्भवली असताना त्यावर यशस्वी मात करीत सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सेवा देण्याची कामगिरी महावितरणचे वीजयोद्धे बजावत आहेत.

दरम्यान, पुणे परिमंडल अंतर्गत आतापर्यंत महावितरणच्या विविध कार्यालयातील कोरोना संसर्ग झालेल्या एकूण 249 पैकी 158 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर दुर्दैवाने 8 वीजयोद्धांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 83 जणांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सुमारे 150 अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संसर्गजन्य लक्षणांमुळे घरी क्वॉरंटाईन आहेत. मात्र कोरोनाशी झुंज देणाऱ्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी अन्य वीजयोद्ध्यांनी कर्तव्य बजावत महावितरणच्या ग्राहकसेवेवर मनुष्यबळाअभावी कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही, हे विशेष.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील 5 ते 6 महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, मान्सूनपूर्व धुव्वाधार पाऊस व त्यानंतरचा संततधार पाऊस, पुरपरिस्थिती अशा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे वीजयोद्धे सज्ज असतात. मात्र यंदा ही परिस्थिती अधिकच गंभीर होती. त्यातच मार्चपासून कोरोनाचा संकटकाळ सुरु झाला. तथापि, सुरळीत वीजपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देत वीजयोद्ध्यांनी जीवाचे रान करीत एप्रिल,मे-मधील अवकाळी वादळी पावसाला तोंड देत जलदगतीने कर्तव्य बजावले. दैनंदिन कामांसोबतच एकीकडे कोरोनाबाधीत रुग्णांसाठी ससूनच्या 11 मजली नवीन इमारतीसाठी केवळ 36 तासांमध्ये नवीन उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वित करणे तर दुसरीकडे निसर्ग चक्रीवादळाच्या अभुतपूर्व तडाख्याने प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरासह मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांमध्ये जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा जलदगतीने उभारणे, वीजपुरवठा सुरळीत करणे आदी विशेष कामे देखील युद्धपातळीवर अहोरात्र केली आहेत.

न्यायाचा विजय झाला: अयोध्या निकालावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रीया

0

मुंबई -अयोध्येतील वादग्रस्त वास्तू उद्धवस्त केल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ.मुरलीमनोहर जोशी, उमा भारती यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टी स्वागत करीत आहे. या खटल्यात न्यायाचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आ.कालिदास कोळंबकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबत जनतेच्या मनात वर्षानुवर्षे साचलेला राग उफाळून आला. त्या वेळच्या काँग्रेस सरकारने लालकृष्ण अडवाणी, डॉ.जोशी, उमा भारती आदी नेत्यांवर खटले दाखल केले. वर्षांनुवर्षे हा खटला चालला. आता सर्वोच्च न्यायालयाने या सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
भारतीय जनता पार्टीने कायमच न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला आहे. या निकालाने न्यायाचा विजय झाला, असेही पाटील यांनी नमूद केले.

कर्नाळा आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करणार – वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

0

मुंबई, दि. ३० : कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि फणसाड अभयारण्यातील पर्यटन सुविधांचा विकास करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीकोनातून प्रकल्प अहवाल तयार करून महाराष्ट्र इको टूरिझम डेव्हलपमेंट बोर्डकडे तात्काळ पाठवावेत, असे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.

फणसाड अभयारण्य, कर्नाळा पक्षी अभयारण्य व माथेरान येथील वनक्षेत्र परिसरातील वनसंवर्धन व ही पर्यटनस्थळे अधिक विकसित करण्याच्यादृष्टीने राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) सुनील लिमये, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, नैसर्गिक देणगी लाभलेली ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक निवास सोयी-सुविधा व व्यापक प्रसिद्धी मिळाल्यास कोरोनानंतरच्या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतील. रायगड जिल्ह्यातील सुरू असलेल्या औद्योगिक विस्तारानुसार दिवसेंदिवस येथील लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निसर्ग पर्यटनाला चालना देऊन या अभयारण्यातील आर्थिक उत्पनात भर पडण्यास मदत होईल, असे यावेळी कु. तटकरे म्हणाल्या. त्याअनुषंगाने पर्यटकांसाठी पर्यावरणपूरक स्वच्छतागृहे, खाण्यापिण्याच्या व राहण्याच्या सोयी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने उपाययोजना केल्या जाव्यात, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

या स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथला आराखडा, वनक्षेत्र यांची प्रत्यक्ष पाहणी करुन तसा प्रस्ताव इको टुरिझम बोर्डास सादर करण्यासाठी नियोजनपूर्वक पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यमंत्री श्री.भरणे यांनी श्री. लिमये यांना दिल्या.

मातंग समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारणार – रमेश बागवे

0

पुणे – मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणा सह विविध मागण्या बऱ्याच वर्षापासून शासनाने प्रलंबित आहेत.त्यासाठी आज मातंग एकता आंदोलन च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली .यावेळी माजी मंत्री रमेश बागवे यांनी मातंग समाजाच्या मागण्यासाठी राज्यभर लढा उभारणार असल्याचे जाहीर केले.या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष , नगरसेवक अविनाश बागवे, शहराध्यक्ष विठ्ठल थोरात ,सुरेखा खंडागळे,दयानंद अडागळे ,अनिल हतागले ,रमेश सकट,सुरेश अवचिते ,अरुण गायकवाड ,राजू गायकवाड ,सुनील बावकर ,हुसेन शेख ,त्रिंबक अवचीते ,विशाल कसबे,नारायण पाटोळे,रावसाहेब खवले,मारुती कसबे यासह शहरातील कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी केले .मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण,लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या,लोक शाहीर आण्णा भाऊ साठे महामंळाचे कर्ज माफ करावे ,महामंडलाची तत्काळ पुनर्रचना करून चालू करावे, बार्ट्टी च्या धर्तीवर आर्ट्टी ची स्थापना करावी ,संगमवाडी येथील क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक लवकरात लवकर सुरू करावे,आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, अट्रोसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी,चिरानगर येथील आण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभा करावे, कै.संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियाना मदत करावी या मागण्यासाठी मातंग एकता आंदोलन च्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले .या वेळी कार्यकर्ते व महिला यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला .

मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई दि. ३० : शासकीय रूग्णालयातील डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेटरन), स्वच्छता निरीक्षक आणि सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोरोना महामारीच्या संकट काळात निष्ठेने सेवा करीत आहेत. या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

कोविड १९ या जागतिक महामारीच्या काळात मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील कोविड वॉरियर्सचा राजभवन येथे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभिनंदनपर भाषणात राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, माता-पिता-गुरू आणि देव यांचे आयुष्यातील स्थान महत्त्वाचे आहे. यामध्ये आपण देवाला पाहिले नाही परंतु, जेव्हा प्रकृती खराब होते, तेव्हा आपल्याला डॉक्टरच आठवतात आणि हेच आपल्यासाठी देव आहेत. कोरोनाच्या रूग्णांना अतिशय प्रेमाने आणि माणुसकीने शासकीय रुग्णालयात उपचार देण्यात येत आहेत. राजभवन येथील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले होते, मात्र आज सर्व ठणठणीत आहेत. अशाचप्रकारे आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णही पूर्णत: स्वस्थ होणे गरजेचे आहे आणि तेच आपले कर्तव्य असून, पुढेही आपल्याकडून असेच कार्य सुरू रहावे. या कालावधीत कार्यरत असणाऱ्या ज्या  वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांना सुदृढ आरोग्य लाभावे, ही भावनाही राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, डॉक्टर, अधीक्षक, प्राध्यापक, प्रमुख व्यवस्थापिका (मेट्रन), स्वच्छता निरीक्षक आदींसोबत वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच कर्मचारी उत्तम काम केले आहे. सुरुवातीला कोविड-१९ संदर्भात अधिक माहिती नसल्याने अनेक अडचणींना आणि रूग्णांच्या मृत्युला सामोरे जावे लागत होते. मात्र, या परिस्थितीतही सर्व डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत. सुरुवातीला तीनच लॅब होत्या मात्र आज १५४ लॅब, १४९० व्हेंटीलेटर, १६५० आयसीयु बेड, तीन लाख सात हजार बेड, १८ मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत. सुरुवातीला मृत्युदर ५० टक्के होता. आज २.६ टक्के आहे आणि हाच मृत्युदर शून्य टक्क्यावर नेण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गतही काम सुरू असून, शून्य टक्के मृत्युदरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लवकरच पूर्ण करू, असेही डॉक्टर लहाने यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांनी अनुभव कथन केले. जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित मानकेश्वर, राज्याच्या कोवीड लॅबरॉटरीचे नियंत्रक डॉ. सचिन मुलकुटकर आदींसह ३३ कोविड वॉरियर्सना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

लॉकडाऊन’मुळे कंटाळलेल्या ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य जागवणारा अनोखा हास्ययोग

0

पुणे : कोरोनामुळे सर्वाधिक बंधने आली ती, ज्येष्ठ नागरिकांवर. उद्याने, बागा, वॉकिंग प्लाझा सगळेच बंद आहे. शिवाय, त्यांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने ‘अनलॉक’मध्येही बाहेर न पडण्याचा सल्ला आहे. अशावेळी 24 तास घरात बसून त्यांची घुसमट होतेय. ना मनोरंजन, ना गाठीभेटी, ना व्यायाम, ना हास्यविनोद अशा अवस्थेत कंटाळलेल्या या ज्येष्ठ नागरिकांमध्ये चैतन्य जागविण्याचे काम नवचैतन्य हास्ययोग परिवाराने केले आहे. पत्रकार परिषदेत नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विश्वस्त मकरंद टिल्लू यांनी ही माहिती दिली. प्रसंगी प्रमोद ढेपे, विजय भोसले आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात या ज्येष्ठ नागरिकांना नवचैतन्य हास्ययोग परिवाराने जोडून घेतले आहे. नव्या तंत्रज्ञानाशी सांगड घालत त्यांच्यासाठी ऑनलाईन योग-प्राणायाम आणि हास्ययोग वर्ग चालवले जात आहेत. आज जवळपास 2000 ज्येष्ठांनी नोंदणी केली असून 1200 पेक्षा अधिक लोक रोज ऑनलाईन योग आणि हास्ययोग करण्यासाठी ऑनलाईन उपस्थित असतात.  संस्थेतर्फे आयोजित ‘लाईव्ह’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहून हजारो लोक उल्हसित होत आहेत. आपला वेळ चांगल्या गोष्टीत घालवत आहेत.

हास्यक्लबची सुरुवात पुण्यात 23 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांच्या पुढाकारातून झाली. आज या परिवारात 180 हास्यक्लब आहेत, तर 15000 पेक्षा जास्त सभासद आहेत. ऑनलाईन हास्ययोगात जोडल्या गेलेल्या ज्येष्ठांना 84 वर्षीय विठ्ठल काटे शारीरिक हालचाली, व्यायाम, प्राणायाम शिकवतात. तर परिवाराचे विश्वस्त व हास्ययोगाचे प्रशिक्षक मकरंद टिल्लू मनाचे हास्ययोग, व्यायाम, , सकारात्मक दृष्टिकोन, तांत्रिक ज्ञान शिकवतात. संस्थेचे विश्वस्त या उपक्रमाच्या प्रसाराचे कार्य करत आहेत. या उपक्रमाचे प्रमुख मकरंद टिल्लू यांनी ज्येष्ठांच्या हास्ययोगासाठी  खास स्टुडिओचा सेटअप लावला आहे. ज्येष्ठांना ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होताना घ्यावयाची काळजी, कॅमेरा अँगल, फ्रेम, स्पीकर चालू-बंद करणे अशा बारीकसारीक गोष्टी शिकवल्या जात आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाशी दुरावा ठेवणारी ही पिढी ‘टेक्नोसॅव्ही’ झाल्याचे पहायला मिळत आहे.

याबाबत बोलताना मकरंद टिल्लू म्हणाले, “लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवहार, कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे ज्येष्ठांची मोठी कोंडी झाली आहे. विरंगुळा केंद्रे, उद्याने बंद असल्याने त्यांना घरात बसून कंटाळा येत आहे. अशावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराने ऑनलाईन कार्यक्रम घेण्याची कल्पना अंमलात आणली. यंदा कोरोनामुळे वसंत व्याख्यानमालाही झाली नाही.  ज्येष्ठांचा त्यातील सहभाग मोठा असतो. त्यामुळे आम्ही व्याख्यानमाला घेतली. अतिशय चांगली व्याख्याने झाली आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. जागतिक हास्य दिनही यावेळी ऑनलाईन केला. हा कार्यक्रम 10 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला, ही आम्हाला सुखावणारी बाब होती. नियमित व्यायामाने ज्येठांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले होते आहे. सुरुवातीला मोबाईल, लॅपटॉप हाताळना ज्येष्ठांना अडचणी यायच्या. मात्र, त्याबाबतही आम्ही नियमितपणे मार्गदर्शन केले. आज अनेक ज्येष्ठ या ऑनलाईन वर्गांना सरावले आहेत.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे सर म्हणाले ” सुंदर पुणे, हसरे पुणे करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. जागतिक योगदिन, कलाकारांच्या मुलाखती, गुरू पौर्णिमा असे विविध उपक्रम सातत्याने होत असल्याने, ज्येष्ठांचा एकटेपणा कमी होतो आहे. आता फक्त पुण्यातूनच नव्हे तर नासिक, सांगली, नागपूर, सोलापूर, चंदिगढ, ऑस्ट्रेलिया अशा विविध ठिकाणाहून ज्येष्ठ दररोज सकाळी आरोग्य चळवळीत सामील होत आहेत.

2020 साठी महिलांचे सर्वोत्कृष्ट कार्यस्थान म्हणून ईएसडीएसला पुरस्कार प्रदान

0

नाशिक, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. या कंपनी ला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ या संस्थे तर्फे “इंडियाज बेस्ट वर्क प्लेस फॉर वूमन २०२०” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ईएसडीएसने त्यांच्या सर्व सन्माननीय महिला कर्मचार्‍यांसाठी समानतेचे आणि सशक्तीकरणाचे व्यासपीठ तयार केले आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला यांच्यात 0% वेतन अंतर असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावर्षी पुरस्कार मिळवण्याच्या यादीतुन १७ वेगवेगळ्या उद्योगांमधील, ८५२ संघटनांचा सहभाग होता ज्याने ४,५९,३८६ हून अधिक महिला कर्मचार्‍यांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व केले.

ईएसडीएसच्या कार्यसंस्कृतीची विश्वासार्हता त्यांच्या “मिशन पीपल एचआर टीमवर” अवलंबून आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकी क्रियाकलाप, प्रशिक्षण कार्यक्रम, वेबिनार, कर्मचाऱ्यांची नेतृत्व कौशल्ये वाढविण्यासाठी आणि त्यांची प्रतिभा सुनिश्चित करण्यासाठी प्रख्यात व्याख्यानाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांसाठी सुरक्षितता आणि आनंदाची संस्कृती तयार करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक महिला सहकार्यासाठी समानतेची संस्कृती उंचावण्यासाठी प्रत्येकजण पाठिंबा देत आहे.

“ग्रेट प्लेस टू वर्क” मान्यता ही प्रतिष्ठेची प्रासंगिकता आहे कारण यामुळे कंपनीच्या संभाव्य कर्मचार्‍यांमध्ये अभिमान आणि वचनबद्धता निर्माण होते आणि संस्थेच्या संस्कृतीविषयी जागरूकता देखील वाढते. ही एक पोचपावती आहे जी ब्रँडची दृश्यमानता आणि तिची तारतम्य ओळखते. हे कंपनीला जगातील नियोक्ता ब्रँड रिकग्निशनच्या गर्दीपेक्षा वेगळे उभे राहण्यास मदत करते.

या कामगिरीवर मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. चंद्र मौली द्विवेदी म्हणाले, “कोविड-१९ लॉकडाऊनचा कामगार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर मोठा आणि गहन परिणाम झाला आहे. आमचे बरेच कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’  करत आहेत, व  काही गंभीर व्यवसाय सेवांसाठी वेगवेगळ्या डेटा सेंटरमध्ये कार्यरत आहेत. आमची एचआर टीम सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करीत आहे आणि त्यांना विविध लोक गुंतवणूकीच्या कार्यात गुंतवत आहे. आमचे कर्मचारी निरोगी  असल्याचेही आम्ही सुनिश्चित करत आहोत. आमचे चेअरमन आणि ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पीयूष सोमाणी  देखील शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी दररोज ऑनलाइन योगासन, ध्यान आणि प्राणायाम करीत आहेत. आम्ही ते म्हणायलाच हवे, की “कर्मचारी हे आमचे ग्राहक आहेत आणि त्यांचा आनंद आणि समाधान हेच आमचे मुख्य लक्ष आहे.”

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशनचे संस्थापक, सीएमडी आणि ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पियुष सोमाणी  म्हणतात, “काम करण्यासाठी एक उत्तम कंपनी घडवण्याचा आमचा प्रवास १५ वर्षांपूर्वी  म्हणजेच अगदी ईएसडीएसच्या स्थापनेच्या वेळीच सुरु झाला. ईएसडीएस पूर्वी, मी दोन कंपन्यांमध्ये काम केले आणि मी हा अनुभव घेतला की १५ वर्षांपूर्वी कार्य संस्कृती अशी होती की आपण एखाद्या कंपनीत जास्त वेळ घालविल्यामुळे तेथील कर्मचार्‍यांना तेथे काम करणे कठीण होते. तिथेच मी असा निश्चय केला कि आपण एक अशी कंपनी उभी करायची जेथे प्रत्येक कर्मचार्‍याशी आदराने वागले जाईल आणि त्यांची तितकीच काळजी घेतली जाईल. ही कार्य संस्कृती सुरुवातीच्या वेळीच पेरली गेली. मला असे सांगण्यात अभिमान आहे की आम्ही बर्‍याच वर्षांमध्ये ही संस्कृती टिकवून ठेवण्यास यशस्वी झालो आहोत. आमच्याकडे एक ‘नो सर, नो मॅडम’ धोरण आहे ज्यात कंपनीतील प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या नावांनी संबोधले जाते, अगदी  ६० वर्षाच्या व्यक्तीपासून ते २५ वर्षांच्या कर्मचार्यांपर्यंत. या प्रकारची संस्कृती कर्मचार्‍यांना प्रेरित करते आणि त्यांना त्यांच्या कामात उत्कृष्ट काम करण्यास मदत करते. तसेच, ईएसडीएस मधील २ डझनाहून अधिक कॅन्टीन कर्मचार्‍यांनी गेल्या १० वर्षात स्वत: ला अभियंता व  सीएक्सओ भूमिकेत श्रेणीसुधारित केले आहे. सतत शिकत राहणे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. हि ईएसडीएसची संस्कृती दर्शवते आणि स्केल-अप करण्यासाठी येथे प्रतिभा आणि कौशल्यांचा कसा आदर केला जातो हे दर्शविते. आम्हाला कार्य करण्याचे महान ठिकाण म्हणून ओळखले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि उर्वरित जगाला प्रेरणा देण्यासाठी आणि अशा अधिक संस्था तयार करण्याचे आश्वासन देतो.”


ग्रेट प्लेस टू वर्क संस्थेबद्दल

ग्रेट प्लेस टू वर्क संस्था, उच्च-विश्वस्त आणि उच्च-कार्यक्षमता संस्कृती तयार करून ती टिकवून ठेवण्यासाठी ‘जागतिक संस्था’ आहे. कार्यसंस्थेच्या संस्कृती निर्धारणातील या संस्थेस ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले जाते. ते पूर्णपणे कर्मचारी अभिप्राय आणि संस्थेमधील लोक पद्धतींच्या गुणवत्तेवर आधारित उत्कृष्ट कार्यस्थळे ओळखतात. दरवर्षी ग्रेट प्लेस टू वर्क हे उद्दीष्ट आणि कठोर कामाची जागा संस्कृती मूल्यांकन प्रक्रियेद्वारे (500 पेक्षा अधिक कर्मचारी सामर्थ्याने) कार्य करण्यासाठी भारताच्या 100 सर्वोत्कृष्ट कंपन्या ओळखतात.

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन बद्दल

2005 मध्ये पहिल्या पिढीचे उद्योजक पीयूष सोमाणी यांनी ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन ची स्थापना केली होती, जगभरातील 40,000 हून अधिक ग्राहकांसह ईएसडीएस ही भारतातील अग्रगण्य व्यवस्थापित डेटा सेंटर सर्व्हिस आणि ऑटो-स्केलेबल क्लाऊड सोल्यूशन प्रदाता आहे. बँकिंग आणि वित्त, आरोग्य सेवा, शिक्षण, ऊर्जा आणि उपयुक्तता, कृषी आणि उत्पादन, आयटी, करमणूक आणि माध्यम, प्रवास आणि पर्यटन, दूरसंचार, शासन आणि ईकॉमर्स या उद्योगांच्या अस्तित्वात आहेत.

नोंदणी आणि मुद्रांक विभाग कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास लोकजनशक्ती पक्षाचा पाठींबा

0

पुणे:
मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित केलेल्या बेमुदत लेखणी बंद आंदोलनास लोकजनशक्ती पक्षाने  पाठींबा दिला आहे .
लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर -जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट,प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब कांबळे,एड.अमित दरेकर   यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.१ ऑक्टोबर पासून हे लेखणीबंद आंदोलन सुरु होत आहे .पदोन्नती तत्काळ करावी,कोरोना साठीमध्ये जीवन सुरक्षा कवच लागू करावे,कार्यालयीन सुविधा पुरवाव्या ,सह दुय्यम निबंधक वर्ग २,दुय्यम निबंधक श्रेणी १ या संवर्गाचे एकत्रीकरण करावे या मागण्या तातडीने मान्य कराव्यात ,असे संजय अल्हाट यांनी या पत्रकात म्हटले आहे.                                                               लोकजनशक्ती पार्टी तर्फे   जिल्हा मुद्रांक अधिकारी कोळेकर यांना निवेदन देण्यात आले .या निवेदनावर संजय अल्हाट,के सी पवार ,अशोक कांबळे,एड .अमित दरेकर ,संजय चव्हाण ,अंकल सोनवणे यांच्या सह्या आहेत 

बाबरीची घटना अचानक घडली होती, फोटोंवरुन कोणालाही गुन्हेगार ठरवू शकत नाही-कोर्ट

0
  • आडवाणी-मुरली मनोहर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही, 

बाबरीची वादग्रस्त रचना उद्ध्वस्त करण्याबाबत लखनऊच्या विशेष कोर्टाने बुधवारी मोठा निर्णय दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 32 आरोपींना न्यायाधीश एस.के. यादव यांना निर्दोष मुक्त केले. एकूण 48 लोकांवर आरोप लावण्यात आले होते, यामधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यायाधीशांनी निर्णय सांगताना म्हटले की, घटना अचानक झाली होती, याची कोणतीही योजना तयार करण्यात आलेली नव्हती. फोटोंवरुन कोणालाही गुन्हेगार ठरवता येऊ शकत नाही.

स्पेशल कोर्टाच्या जजने निर्णयावर केल्या या टिप्पणी

  • रचना पाडण्याची घटना अचानक झाली होती. 6 डिसेंबर 1992 ला दुपारी 12 वाजता रचनेच्या मागून दगडफेक सुरू झाली.
  • अशोष सिंगल ढांचा सुरक्षित ठेवू इच्छित होते कारण येते मूर्ती होत्या.
  • कारसेवकांनी दोन्ही हात व्यस्त ठेवण्यासाठी जल आणि फूल आणण्यास सांगितले होते.
  • वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना पुरावा मानू शकत नाही.
  • फोटोंच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येऊ शकत नाही.

हे होते 32 आरोपी
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमरनाथ गोयल, जयभान सिंह पवैया, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर

6 नेता व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून हजर
कोर्टात सहा आरोपी उपस्थित नाहीत. लालकृष्ण आडवाणी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून कोर्टाशी संपर्क केला. तर मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान, महंत नृत्यू गोपाल दास, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंहही कोर्टात पोहोचले नाहीत. या व्यतिरिक्त इतर सर्व आरोपी उपस्थित आहेत. 12 ते 2 च्या दरम्यान निर्णय देण्यात येईल. विशेष जज एसके यादव यांच्या कार्यकाळात हा निर्णय येत आहे. विशेष जज एसके यादव यांच्या कार्यकाळाचा आज अखेरचा दिवस असले. 30 सप्टेंबर 2019 ला ते रिटायर होणार होते, मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सेवा विस्तार दिला.

न्यायालयात बचावाची बाजू

  • पुराव्याच्या स्वरुपात केवळ फोटो आणि व्हिडिओ होते. फोटो निगेटिव्ह नव्हते. जे व्हिडिओ होते त्यामध्ये अधुनमधून न्यूजही होत्या. ते जास्त विश्वासार्ह नव्हते.
  • जे कारसेवक घटनास्थळी होते, त्यांचा हेतू रचना पाडण्याचा नव्हता. तेथे रामललाची मूर्तीही होती. कारसेवकांनी ती रचना पाडली असती तर मूर्तीलाही नुकसान पोहोचले असते.

एकूण आरोपींची नावे

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुधीर कक्कर, सतीश प्रधान, राम चंद्र खत्री, संतोष दुबे आणि ओम प्रकाश पांडे, कल्याण सिंह, उमा भारती, रामविलास वेदांती, विनय कटियार, प्रकाश शरण, गांधी यादव, जय भानसिंग, लल्लू सिंह, कमलेश त्रिपाठी, बृजभूषण सिंह, रामजी गुप्ता, महंत नृत्य गोपाल दास, चंपत राय, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, धर्मदास, जय भगवान गोयल, अमरनाथ गोयल, साध्वी ऋतंभरा, पवन पांडे, विजय बहादुर सिंह, आरएम श्रीवास्तव आणि धर्मेंद्रसिंग गुजर

6 डिसेंबर 1992 ला 10 मिनिटांच्या अंतरावर दाखल झाल्या दोन एफआयआर

  • पहिले एफआयआर प्रकरण संख्या 197/92 हे प्रियवदन नाथ शुक्ल यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात सर्व अज्ञात लोकांविरूद्ध कलम 395, 397, 332, 337, 338, 295, 297 आणि 153ए मध्ये गुन्हा दाखल केला.
  • दूसरे एफआयआर प्रकरण संख्या 197/92 हे चौकी इंचार्ज गंगा प्रसाद तिवारीकडून आठ नामांकित लोकांविरुद्ध दाखल करण्यात आले. ज्यामध्ये भाजपचे लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, डॉ. मुरली मनोहर जोशी, तत्कालीन खासदार आणि बजरंग दल प्रमुख विनय कटियार, तत्कालीन व्हीएचपी महासचिव अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरि डालमिया आणि गिरिराज किशोर यांचा समावेश होता. यांच्याविरोधात कलम 153ए, 153बी, 505 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
  • नंतर जानेवारी 1993 मध्ये 47 इतर गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यामध्ये पत्रकारांना मारहाण आणि लूट अशा प्रकारचे आरोप होते.

1993 मध्ये हायकोर्टाच्या आदेशावर लखनऊमध्ये तयार झाले विशेष कोर्ट

1993 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार लखनौमध्ये विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रकरण क्रमांक197/92 ची सुनावणी होणार होती . या प्रकरणात, उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार कलम 120 बी जोडली गेली, तर मूळ एफआयआरमध्ये ही कलम जोडण्यात आलेली नव्हती. ऑक्टोबर 1993 मध्ये सीबीआयने आपल्या आरोपपत्रात 198/92 प्रकरणालाही जोडून संयुक्त आरोपपत्रही दाखल केले. कारण दोन प्रकरणे एकमेकांशी संबंधीत होती.

याच आरोपपत्रात बाळासाहेब ठाकरे, नृत्य गोपाल दास, कल्याणसिंग, चंपत राय अशी 48 नावे तपासात जोडली गेली. या प्रकरणाशी संबंधित वकील मजहरुद्दीन म्हणतात की सीबीआयच्या सर्व आरोपपत्रांचा समावेश केला असता तर दोन ते अडीच हजार पृष्ठांची चार्जशीट होईल.

‘अंक नाद’ मार्गदर्शक समितीच्या प्रमुख मार्गदर्शक पदी ;डॉ रघुनाथ माशेलकर,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे

0

पुणे:

भारतीय गणित आणि  लोप पावत असलेले मराठी पावकी -निमकी सारखे पाढे या भारतीय गोष्टींचे कालानुरूप   पुनरुज्जीवन करून सर्व देशात आणि परदेशात प्रसार करण्यासाठी मार्गदर्शक समिती स्थापन करण्यात आली असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर आणि डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी प्रमुख मार्गदर्शकपदी काम करण्यास मान्यता दिली  आहे. मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि संस्थेने ही समिती स्थापन केली असून याच उद्देशाने ‘अंक नाद’ हे ऍप ही निर्माण केले आहे.

या समितीमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ  डॉ रघुनाथ माशेलकर ,डॉ अनिल सहस्त्रबुद्धे,(अध्यक्ष ,अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ),तालयोगी सुरेश तळवलकर ,संगीतकार अशोक पत्की, प्राजक्ती गोखले (बालभारती च्या अभ्यास मंडळाच्या सदस्य ),प्रसाद मणेरीकर (संस्थापक ,अनुभूती नॉलेज सेंटर ),प्राची साठे,प्रा .अनघा ताम्हणकर,साक्षी हिसवणकर,चारुदत्त आफळे,शोभा नेने (अध्यक्ष ,बृहन्मुंबई गणित अध्यापक मंडळ ),मंदार नामजोशी,निर्मिती नामजोशी,समीर बापट  हे सन्माननीय सदस्य आहेत.

मॅप  एपिक कम्युनिकेशन्स प्रा लि. चे  संस्थापक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

डॉ माशेलकर यांनी या मार्गदर्शक समितीच्या प्रमुख मार्गदर्शक पदावर  काम करण्याचे मान्य केले आहे.’गणिताचे अस्तित्व सर्वत्र असून आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने गणित समजावून सांगण्याचे अंक नाद चे प्रयत्न महत्वाचे असून त्यात संगीताचा प्रयत्न  कौतुकास्पद आहे’ असे डॉ माशेलकर यांनी म्हटले आहे.

महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने करावे – दरेकर

0

मुंबई-

महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी करणार पत्र मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे.. तसेच महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविडसाठी वापरण्याकरिता दुरुस्ती प्रस्तावास तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे…

महाड येथील तारीख गार्डन नावाची पाच मजली इमारत 24 ऑगस्ट रोजी कोसळली या दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले.. तर या इमारतीत राहणारी सत्तेचाळीस कुटुंब बेघर झाली आहेत.. शासनाने या दुर्घटनेतील बेघर कुटुंबियांचं तातडीने पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी मदत कार्य व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे..

या घटनेची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे मात्र या चौकशी सोबतच या बेघर कुटुंबियांचा विषय तितकाच महत्त्वाचा आहे कारण स्वतः नवीन घर बांधण्याची आर्थिक क्षमता या लोकांकडे नाही त्यामुळे शासनाने त्यांचं पुनर्वसन करावं असं दरेकर यांनी स्पष्ट केले आहे..

या मागणी सोबतच दरेकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्याकडे आणखीन एक महत्त्वाची मागणी केली आहे..महाड ग्रामीण रुग्णालयाची इमारत कोविड सेंटर म्हणून वापरण्यासाठी तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.. या दुरुस्तीसाठी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी करणार पत्र दरेकर यांनी विजय वडेट्टीवार यांना दिलं आहे..

आर्थिक गुन्हे शाखेने मालडच्या व्यवसायिकांवर केलेली कारवाई चुकीची- प्रवीण दरेकर

0

मुंबई-मालाड एस.वी रोडवरील रास्ता रुंदीकरणाच्या कामातून उद्भवलेल्या वादात आर्थिक गुन्हे शाखेने ( EOW) येथील व्यवसायिकांवर कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोन व्यवसायीकांना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई चुकीची असून तात्काळ त्या व्यवसायीकांना मुक्त करावे तसेच इतर व्यापाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी आज खासदार गोपाळ शेट्टी व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने धरणे आंदोलन केलं..

विकासकाने आर्थिक गुन्हे शाखेची दिशाभूल केली आहे.. हा वाद विकासक व स्थानिक व्यवसायीकांचा असताना अश्याप्रकाची कारवाई करणं चुकीचं आहे. दोन व्यसायीकांना याठिकाणी अटक करण्यात आली आहे.. १४ दुकानदारांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.. अशी कारवाई करणं ही दडपशाही असून अश्या कारवाईचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते अश्या शब्दात दरेकर यांनी विकासकाला व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना ठणकावले आहे… या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून दरेकर यांनी व्यवसायीकांवर दाखल खटले तात्काळ मागे घेण्यात यावे तसेच अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे..

या कारवाई विरोधात भारतीय जनता पार्टी व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.. विकासकाविरोधात सुडाची भावना नाही पण स्थानिक व्यापाऱ्यांविरोधात अश्या प्रकारची कारवाई चुकीची आहे.. मागण्या मान्य होई पर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील..असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले…

आज राज्यात १४ हजार ९७६ नव्या रुग्णांची नोंद: २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि. २९ : राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६६ लाख ९८ हजार २४ नमुन्यांपैकी १३ लाख ६६ हजार १२९ नमुने पॉझिटिव्ह (२०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ३५ हजार ४९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

आज निदान झालेले १४,९७६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१७१३ (४९), ठाणे- १८३ (२१), ठाणे मनपा-३२० (६), नवी  मुंबई मनपा-३२७ (९), कल्याण डोंबिवली मनपा-१८२ (१), उल्हासनगर मनपा-५० (२), भिवंडी निजामपूर मनपा-३३ (३), मीरा भाईंदर मनपा-१५० (४), पालघर-१९१ (११), वसई-विरार मनपा-८४ (१), रायगड-२२४ (३९), पनवेल मनपा-१९१ (३), नाशिक-३१३ (८), नाशिक मनपा-९६१ (६), मालेगाव मनपा-२७, अहमदनगर-५३८ (८), अहमदनगर मनपा-१२३ (३), धुळे-३७, धुळे मनपा-१०, जळगाव-४९३ (९), जळगाव मनपा-६१, नंदूरबार-५३ (१), पुणे- ७२६(१७), पुणे मनपा-१००५ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-६२८ (२), सोलापूर-४०० (६), सोलापूर मनपा-६५, सातारा-५९९ (४), कोल्हापूर-२८२ (९), कोल्हापूर मनपा-३६, सांगली-४४२ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१०७ (८), सिंधुदूर्ग-८१ (९), रत्नागिरी-५५ (६), औरंगाबाद-१२७ (२),औरंगाबाद मनपा-२२१, जालना-७३, हिंगोली-६४, परभणी-६३, परभणी मनपा-१५, लातूर-१०६ (८), लातूर मनपा-११७ (४), उस्मानाबाद-२३४ (११), बीड-१५६ (८), नांदेड-८६ (४), नांदेड मनपा-१०७ (१), अकोला-३९ (२), अकोला मनपा-४९ (२), अमरावती-१३० (३), अमरावती मनपा-१६८ (४), यवतमाळ-१९२ (२३), बुलढाणा-२१६ (१), वाशिम-८२ (१), नागपूर-२७३ (८), नागपूर मनपा-७७२ (४१), वर्धा-५९ (९), भंडारा-१९६ (४), गोंदिया-२४२, चंद्रपूर-१५६ (१), चंद्रपूर मनपा-१७२ (२), गडचिरोली-१५३, इतर राज्य- १८ (४).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                          

मुंबई: बाधीत रुग्ण- (२,०२,६१२) बरे झालेले रुग्ण- (१,६७,२०२), मृत्यू- (८८८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४०५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६,१२४)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,८५,२९७), बरे झालेले रुग्ण- (१,५१,३८५), मृत्यू (४८२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,०८८)

पालघर: बाधित रुग्ण- (३६,६५६), बरे झालेले रुग्ण- (२९,०६८), मृत्यू- (८२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७५९)

रायगड: बाधित रुग्ण- (५०,७९३), बरे झालेले रुग्ण-(४२,३४३), मृत्यू- (११४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३०१)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८३१९), बरे झालेले रुग्ण- (५९३३), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१२१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३८४८), बरे झालेले रुग्ण- (२४२६), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४०)

पुणे: बाधित रुग्ण- (२,८९,८०३), बरे झालेले रुग्ण- (२,२७,२५०), मृत्यू- (५७३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६,१८९)

सातारा: बाधित रुग्ण- (३६,२१५), बरे झालेले रुग्ण- (२७,०७१), मृत्यू- (९०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२३४)

सांगली: बाधित रुग्ण- (३७,६१५), बरे झालेले रुग्ण- (२७,६६३), मृत्यू- (११५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७९९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४२,९३२), बरे झालेले रुग्ण- (३३,६००), मृत्यू- (१३२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०१२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३५,७८०), बरे झालेले रुग्ण- (२७,२७३), मृत्यू- (११३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३६८)

नाशिक: बाधित रुग्ण- (७४,७३३), बरे झालेले रुग्ण- (५७,९९०), मृत्यू- (१२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,४६५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४१,४१९), बरे झालेले रुग्ण- (३३,१४१), मृत्यू- (६७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(७६०६)

जळगाव: बाधित रुग्ण- (४७,३०२), बरे झालेले रुग्ण- (३९,२९०), मृत्यू- (१२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७६८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५२८८), बरे झालेले रुग्ण- (४३३६), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८३३)

धुळे: बाधित रुग्ण- (१२,३१३), बरे झालेले रुग्ण- (११,२१३), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६९)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३५,७२३), बरे झालेले रुग्ण- (२५,१४३), मृत्यू- (८८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६९९)

जालना: बाधित रुग्ण-(७६३५), बरे झालेले रुग्ण- (५३०१), मृत्यू- (१८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१४८)

बीड: बाधित रुग्ण- (१०,१७६), बरे झालेले रुग्ण- (६८७४), मृत्यू- (२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३०२९)

लातूर: बाधित रुग्ण- (१७,१७३), बरे झालेले रुग्ण- (१२,८१५), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८०)

परभणी: बाधित रुग्ण- (५३५१), बरे झालेले रुग्ण- (३९४१), मृत्यू- (१८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२३)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३०२१), बरे झालेले रुग्ण- (२३६५), मृत्यू- (५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९९)

नांदेड: बाधित रुग्ण- (१५,७३३), बरे झालेले रुग्ण (८६८७), मृत्यू- (३९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६५४)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२,२६०), बरे झालेले रुग्ण- (८८२४), मृत्यू- (), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८५)

अमरावती: बाधित रुग्ण- (१३,३६६), बरे झालेले रुग्ण- (१०,५५६), मृत्यू- (२७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५३८)

अकोला: बाधित रुग्ण- (७१५५), बरे झालेले रुग्ण- (४६६०), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७२)

वाशिम: बाधित रुग्ण- (४१५०), बरे झालेले रुग्ण- (३३५४), मृत्यू- (८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१२)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (७६१४), बरे झालेले रुग्ण- (५१९६), मृत्यू- (११३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३०५)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (८६३७), बरे झालेले रुग्ण- (६१२३), मृत्यू- (२१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२९८)

नागपूर: बाधित रुग्ण- (७६,६४८), बरे झालेले रुग्ण- (६०,४०३), मृत्यू- (२०१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,२२४)

वर्धा: बाधित रुग्ण- (४१४९), बरे झालेले रुग्ण- (२६०४), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४७५)

भंडारा: बाधित रुग्ण- (५५६८), बरे झालेले रुग्ण- (३७५८), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७११)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७००४), बरे झालेले रुग्ण- (४३०५), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६२९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०,०२७), बरे झालेले रुग्ण- (५०७३), मृत्यू- (१४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८११)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२२४८), बरे झालेले रुग्ण- (१५६५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१५६४), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९८)

एकूण: बाधित रुग्ण-(१३,६६,१२९) बरे झालेले रुग्ण-(१०,६९,१५९),मृत्यू- (३६,१८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४२६),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,६०,३६३)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४३० मृत्यूंपैकी २३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १०८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९० मृत्यू  ठाणे -१५, पुणे -१३, यवतमाळ -१२, रायगड -१२, नागपूर -९, कोल्हापूर -६, वर्धा -४, पालघर -३, भंडारा -२, चंद्रपूर -२, जळगाव -२, अहमदनगर -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, नांदेड -१, नंदूरबार -१, नाशिक -१, सांगली -१, सातारा -१  आणि मध्यप्रदेश -२ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)