Home Blog Page 2438

महापालिका खरेदी करणार “कार्डियाक ऍम्ब्युलन्स’

0

पुणे – महापालिकेने स्वत:ची एक कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी केली असून यामध्ये रुग्णाच्या जिवितासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. ही रुग्णवाहिका येत्या पाच-सहा दिवसात रुग्णसेवेत दाखल होणार आहे. तसेच इतर चार कार्डियाक रुग्णवाहिकांची निविदा लवकरच उघडण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका उपायुक्त नितीन उदास यांनी येथे दिली. दरम्यान, सद्यस्थितीला महापालिकेने जम्बो हॉस्पिटलमध्ये 24 तास 108 सेवेतील एक कार्डियाक ऍम्ब्युलन्स कार्यरत ठेवली असून, रूबी हॉल आणि जहॉंगीर हॉस्पिटलकडील प्रत्येकी एक कार्डियाक ऍम्ब्युलन्स पाहिजे तेव्हा उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.

महापालिकेच्या 125 रुग्णवाहिका असून, यापैकी 74 रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे; महापालिकेच्या सेवेतील या सर्व रुग्णवाहिका मोफत उपलब्ध असून यासाठी नागरिकांनी 108 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले
शहरातील ऍम्ब्युलन्सची कमतरता दूर करण्यासाठी महापालिकेने स्वत:च्या पाच कार्डियाक ऍम्ब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची एक कार्डियाक रुग्णवाहिका येत्या पाच ते सहा दिवसांत रुग्णसेवेत दाखल होत असून उर्वरित चार रुग्णवाहिकांसाठी पालिकेच्या वाहन विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही खरेदी प्रक्रियाही ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होणार आहे.शहरात करोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने काही गंभीर रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानंतर एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची आवश्यकता पडते. त्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

.

मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन

0

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले.

9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे.

हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.  

या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.

हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आपत्कालीन बोगद्यांची देखील पाहणी केली. तसेच, ‘द मेकिंग ऑफ अटल टनल’ हे चित्रप्रदर्शनही त्यांनी पहिले.

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस ऐतिहासिक आहे कारण, आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीचे आज प्रत्यक्षात साकार रूप आपण बघतो आहोत. या प्रदेशांतील कोट्यवधी लोकांची दशकांपासूनची जुनी इच्छा आणि स्वप्ने आज पूर्ण झाली आहेत. 

अटल बोगदा हा हिमाचल प्रदेश आणि नव्याने निर्माण झालेल्या लेह-लद्दाख या केंद्रशासित प्रदेशासाठी जीवनवाहिनी ठरणार आहे, असं सांगत, या बोगद्यामुळे मनाली ते केलोंग दरम्यानचे अंतर 3 ते 4 तासांनी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेश आणि लेह-लद्दाखचे काही भाग आता कायम देशाशी जोडलेले राहतील आणि त्यामुळे या भागाची प्रगती देखील लवकरात लवकर होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी, बागकाम व्यावसायिक आणि युवक अशा लोकांनाही आता या मार्गाने राजधानी दिल्ली आणि इतर ठिकाणच्या बाजारात माल नेणे सोपे होईल.

अशा सीमावर्ती भागांना जोडणाऱ्या प्रकल्पांमुळे सुरक्षा दलांना होणारा दैनंदिन वस्तू पुरवठा सुरळीत होईल तसेच गस्त घालणेही सोपे जाईल.

हा स्वप्नवत वाटणारा प्रकल्प प्रसंगी आपला जीव धोक्यात घालूनही वेळेत पूर्ण करणारे अभियंते, तंत्रज्ञ आणि कामगारांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

अटल बोगदा हा देशाच्या सीमाभागातल्या पायाभूत सुविधांनाही मजबुती देईल आणि सीमाभागात जागतिक दर्जाची संपर्क व्यवस्था निर्माण करण्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून हा बोगदा ओळखला जाईल. या भागातील पायाभूत सुविधा सुधारण्याची मागणी कित्येक वर्षांपासून प्रलंबित असूनही कित्येक दशके हा भाग मागासलेलाच राहिला, असे पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, की अटलजींच्या हस्ते 2002 साली या बोगद्याचा कोनशिला समारंभ झाला होता, मात्र अटलजींचे सरकार गेल्यावर या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तेव्हापासून ते 2013-14 पर्यंत केवळ 1300 मीटर्स म्हणजे दीड किलोमीटरचेच, साधारणपणे दरवर्षी 300 मीटर्सचेच  बांधकाम पूर्ण होऊ शकले.

जर हे काम त्याच गतीने सुरु राहिले असते ते तर ते पूर्ण होण्यासाठी 2040 साल उजाडले असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने या कामाला गती दिली आणि दरवर्षी 1400 मीटर्स या वेगाने हे काम सुरु झाले. जो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 26 वर्षे लागतील असे गृहीत धरण्यात आले होते, तो प्रकल्प पूर्ण करण्यास केवळ 6 वर्षे लागलीत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 

जर देशाला आर्थिक आणि सामाजिक प्रगती करायची असेल, तर पायाभूत सुविधा प्रकल्प अत्यंत वेगाने पूर्ण केले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशाच्या प्रगतीसाठी आज दृढ राजकीय इच्छाशक्ती आणि कटिबद्धतेची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

अशा महत्वाच्या आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची अंमलबजावणी होण्यात विलंब झाला तर त्यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होतेच, त्याशिवाय, जनताही आर्थिक आणि सामाजिक लाभांपासून वंचित राहते, असे पंतप्रधानांनी सांगितले.

2005 साली, या बोगद्याच्या बांधकामासाठी लागणारा अपेक्षित खर्च सुमारे 900 कोटी इतका होता. मात्र प्रकल्पाला झालेल्या सततच्या विलंबामुळे, त्याचा खर्च तिपटीने म्हणजे 3200 कोटी रुपयांपर्यंत वाढला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

देशातील अशा अनेक महत्वाच्या प्रकल्पांच्या बाबतीत देखील हेच करण्यात आले, असे पंतप्रधान म्हणाले.

लद्दाख इथल्या दौलत बाग ओल्डी या राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या अशा हवाई पट्टयाचे काम 40–45 वर्षे अपूर्णच होते. हवाई दलाची, हा हवाई पट्टा व्हावा अशी इच्छा होती.  

बोगीबील पुलाचे कामही अटलजींचे सरकार असतांना सुरु झाले मात्र नंतरच्या काळात रखडले. आता पूर्ण झालेल्या या पुलामुळे अरुणाचाल प्रदेश आणि उर्वरित ईशान्य भारतादरम्यानचा संपर्क वाढला आहे. या सरकारने 2014 नंतर त्या कामाला प्रचंड गती देऊन, दोन वर्षांपूर्वी, अटलजींच्या जयंतीदिनी या पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

त्याशिवाय, बिहारमधील मिथिलांचल भागातल्या दोन महत्वाच्या प्रदेशांना जोडणाऱ्या कोसी महासेतू प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ देखील अटलजींच्या काळातच झाला होता. मात्र, 2014 नंतर केंद्र सरकारने या प्रकल्पाला गती दिली आणि आता काही आठवड्यांपूर्वी त्याचे लोकार्पण करण्यात आले, असे मोदी यांनी सांगितले.

आता परिस्थिती बदलली आहे, आणि गेल्या सहा वर्षात सीमाभागातील पायाभूत सुविधा, मग त्या- रस्ते असोत किंवा पूल अथवा बोगदे हे सर्व जलद गतीने पूर्ण केले जात आहे.

सुरक्षा दलांच्या गरजांची पूर्तता करणे ही केंद्र सरकारची एक सर्वोच्च प्राथमिकता असते. मात्र, याआधी त्याच्याशीही तडजोड करण्यात आली आणि संरक्षण दलांच्या गरजांकडेहे दुर्लक्ष केले गेले, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकारने संरक्षण दलांच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना केल्याचे सांगत, त्यांनी वन रँक वन पेन्शन योजना, उत्तम अशा आधुनिक लढावू विमानांची खरेदी विविध आधुनिक उपकरणांची  वेगळी खरेदी करण्यात आली आहे. याआधीच्या केंद्र सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता, मात्र, आज ती इच्छाशक्ती दाखवल्यामुळेच देशातील परिस्थिती बदलते आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

संरक्षण उपकरण उत्पादनात थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा कमी करणे अशा सुधारणा देशातच ही उपकरणे तयार होण्यासाठी, करण्यात आल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

त्यशिवाय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांसारख्या नव्या पदांची निर्मिती संरक्षण दलांच्या गरजांनुसार आवश्यक त्याच उत्पादनांच्या खरेदीसाठी आणि उत्तम समन्वयासाठी करण्यात आली आहे. 

भारताचे जगात वाढत असलेले वजन टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या पायाभूत सुविधा, आणि आर्थिक विकास, अधिक सक्षम  व गतिमान करायला हवे आहेत. भारताच्या आत्मनिर्भर होण्याच्या दृढनिश्चयाचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून हा बोगदा आहे, असे मोदी म्हणाले.

“अन्यायाविरोधात उभे राहणार, न्याय मिळेपर्यंत लढणार” राहुल-प्रियंकांचा निर्धार

0

हाथरस (उत्तर प्रदेश) – हाथरसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या कुटुंबाची राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज भेट घेत त्यांचे सांत्वन केले. सुमारे अर्धा तास चाललेल्या भेटीमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाकडून झाल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार, असा हुंकार राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटंबाची भेट घेतल्यानंतर केले.

पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या की, हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या मागे काँग्रेस पक्ष उभा राहील. आम्ही अन्यायाविरोधात उभे राहणार आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार. न्याय झाला नाही तर ते आम्हाला रोखू शकत नाहीत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. तर आपल्याला न्याय हवाय अशी मागणी पीडित कुटुंबाने आमच्याकडे केली आहे. तसेच या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या आणि नंतर उपचारादम्यान मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. यापूर्वी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना अटकाव करत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा हाथरस येथे जात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर या कुटुंबाचे सांत्वन करताना प्रियंका गांधी यांच्याही भावनांना बांध फुटला.

गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले होते. यानंतर दोघेही हाथरससाठी रवाना झाले असून प्रियंका गांधी स्वत: गाडी चालवत आहे. तर राहुल गांधी त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे दिसून आले होते.

ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले ती आमची मुलगी नाही, पीडितेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा
उत्तर प्रदेशातल्याहाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून उत्तर पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्व गावात येणारे रस्ते पोलिसांनी सील करून नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी पत्रकारांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतले, त्यावेळी कुटुंबाने खळबळजनक आरोप केला की, पोलिसांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पीडित कुंटुंबाला पीडित मृत मुलीचा चेहरा न दाखवताच परस्पर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. यामुळेच आणखी या घटनेबाबत देशात संताप निर्माण झाला.

राज्यात आज १४ हजार ३४८ नवीन रुग्णांची नोंद ; एकूण २ लाख ५८ हजार १०८ रुग्णांवर उपचार सुरू

0

मुंबई, दि.३ : राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५८ हजार १०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७० लाख ३५ हजार २९६ नमुन्यांपैकी १४ लाख ३० हजार ८६१ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३४ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ३ हजार ९६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २८ हजार ४१४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

आज निदान झालेले १४,३४८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २७८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४०२ (४६), ठाणे- २९३ (२), ठाणे मनपा-३७४ (१३), नवी  मुंबई मनपा-४१२ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२७९ (१०), उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२८ (१), मीरा भाईंदर मनपा-१७९ (४), पालघर-९५ (३), वसई-विरार मनपा-१४९ (२), रायगड-१९२ (२), पनवेल मनपा-२१२ (६), नाशिक-३५४ (११), नाशिक मनपा-५४५ (२), मालेगाव मनपा-३८ (१), अहमदनगर-४८५ (१), अहमदनगर मनपा-१४६, धुळे-३७, धुळे मनपा-३७, जळगाव-२२१ (३), जळगाव मनपा-४५ (१), नंदूरबार-७० (२), पुणे- ७२१ (५), पुणे मनपा-१०७७ (१५), पिंपरी चिंचवड मनपा-५९८ (७), सोलापूर-२८५ (४), सोलापूर मनपा-५३ (२), सातारा-४६४ (४६), कोल्हापूर-२१९ (६), कोल्हापूर मनपा-९६ (१), सांगली-३०८ (१३), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१२१ (३), सिंधुदूर्ग-८४ (१), रत्नागिरी-७३, औरंगाबाद-११८ (२),औरंगाबाद मनपा-२११ (१), जालना-१०० (२), हिंगोली-३२, परभणी-५०, परभणी मनपा-२२, लातूर-१२१ (१०), लातूर मनपा-६१ (१), उस्मानाबाद-२०९, बीड-२५१ (१), नांदेड-४७, नांदेड मनपा-१३५ (२), अकोला-५८, अकोला मनपा-१०८, अमरावती-९३, अमरावती मनपा-९२, यवतमाळ-११९, बुलढाणा-१४८, वाशिम-१३७ (१), नागपूर-२४३ (६), नागपूर मनपा-६९६ (२१), वर्धा-१११ (४), भंडारा-१३४, गोंदिया-१०५ (७), चंद्रपूर-११० (१), चंद्रपूर मनपा-८६ (१), गडचिरोली-९५, इतर राज्य-२२.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (२,१२,४६२) बरे झालेले रुग्ण- (१,७३,६७०), मृत्यू- (९०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४१८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,३१४)

ठाणे: बाधित रुग्ण- (१,९२,३८५), बरे झालेले रुग्ण- (१,५६,८०७), मृत्यू (४९७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,६०४)

पालघर: बाधित रुग्ण- (३८,०२५), बरे झालेले रुग्ण- (३०,२९७), मृत्यू- (९०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६८२७)

रायगड: बाधित रुग्ण- (५२,७८६), बरे झालेले रुग्ण-(४३,६३९), मृत्यू- (१२७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८७५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८७५४), बरे झालेले रुग्ण- (६४२८), मृत्यू- (२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४१०५), बरे झालेले रुग्ण- (२८७३), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११३२)

पुणे: बाधित रुग्ण- (३,००,६२३), बरे झालेले रुग्ण- (२,३७,१९०), मृत्यू- (५९३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७,५०१)

सातारा: बाधित रुग्ण- (३८,६३९), बरे झालेले रुग्ण- (२९,५०८), मृत्यू- (१०६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०६९)

सांगली: बाधित रुग्ण- (३९,६४२), बरे झालेले रुग्ण- (३०,७८८), मृत्यू- (१२३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६२३)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४४,४०७),बरे झालेले रुग्ण- (३६,४६३), मृत्यू- (१३६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५७८)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३७,३६४), बरे झालेले रुग्ण- (३०,०१४), मृत्यू- (११७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१७३)

नाशिक: बाधित रुग्ण- (७९,३३९), बरे झालेले रुग्ण- (६१,९९७), मृत्यू- (१३४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,९९८)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४४,३६९), बरे झालेले रुग्ण- (३५,१०४), मृत्यू- (७०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(८५६४)

जळगाव: बाधित रुग्ण- (४८,६४१), बरे झालेले रुग्ण- (४१,७७५), मृत्यू- (१२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९८)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५४८६), बरे झालेले रुग्ण- (४५४८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१५)

धुळे: बाधित रुग्ण- (१२,७००), बरे झालेले रुग्ण- (११,५६०), मृत्यू- (३३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३७,०९८), बरे झालेले रुग्ण- (२६,२४९), मृत्यू- (९०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९४२)

जालना: बाधित रुग्ण-(७९९३), बरे झालेले रुग्ण- (५८८७), मृत्यू- (१९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१३)

बीड: बाधित रुग्ण- (१०,९४०), बरे झालेले रुग्ण- (७७७६), मृत्यू- (२८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७९)

लातूर: बाधित रुग्ण- (१८,०८५), बरे झालेले रुग्ण- (१३,९२६), मृत्यू- (५१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६४९)

परभणी: बाधित रुग्ण- (५६४३), बरे झालेले रुग्ण- (४०३०), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३१५५), बरे झालेले रुग्ण- (२४३१), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६,५५५), बरे झालेले रुग्ण (१०,३२३), मृत्यू- (४१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२०)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२,९९९), बरे झालेले रुग्ण- (९२०७), मृत्यू- (३८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४१२)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४,२१४), बरे झालेले रुग्ण- (११,८२३), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२११३)

अकोला: बाधित रुग्ण- (७५८९), बरे झालेले रुग्ण- (६२८०), मृत्यू- (२३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०७५)

वाशिम: बाधित रुग्ण- (४६०७), बरे झालेले रुग्ण- (३७२५), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८८)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८३६२), बरे झालेले रुग्ण- (५५९६), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६४२)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (९१५४), बरे झालेले रुग्ण- (६९०३), मृत्यू- (२३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२०)

नागपूर: बाधित रुग्ण- (८०,९३७), बरे झालेले रुग्ण- (६६,३१३), मृत्यू- (२१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२,४६३)

वर्धा: बाधित रुग्ण- (४७३९), बरे झालेले रुग्ण- (३०३५), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६२२)

भंडारा: बाधित रुग्ण- (६१६५), बरे झालेले रुग्ण- (४३६३), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६९५)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७४८२), बरे झालेले रुग्ण- (५२१८), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१८३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (११,१३८), बरे झालेले रुग्ण- (६५३६), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२६१६), बरे झालेले रुग्ण- (१८४५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७५५)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१६६३), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९१)

एकूण: बाधित रुग्ण-(१४,३०,८६१) बरे झालेले रुग्ण-(११,३४,५५५),मृत्यू- (३७,७५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४४०),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,५८,१०८)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २७८ मृत्यूंपैकी १५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६३ मृत्यू  ठाणे– १४, सातारा-१३, नागपुर –११, पुणे –८, नाशिक–४,जळगाव–२,जालना–२,कोल्हापुर–२, सांगली – २, वर्धा – १, सोलापुर – १, मुंबई – १, रायगड – १ आणि  चंद्रपूर – १ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

राहुल आणि प्रियंका गांधी हाथरस पीडितेच्या घरी दाखल, प्रियांका गांधींना अश्रू अनावर

0

हाथरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत केवळ 5 लोकांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांची बंद खोलीत पीडित कुटुंबाची भेट झाली. यानंतर राहुल गांधींनी न्याय मिळेपर्यंत पीडित कुटुंबासोबत असल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित कुटुंबाचा आक्रोश पाहून प्रियंका गांधी यांना अश्रू अनावर झाले

संघर्ष करत पोहोचले ..राहुल :प्रियांका

रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत या आहेत अटी:शर्ती

0

मुंबई, दि. ३ : राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगीन अगेनअंतर्गत येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेटस्, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

एसओपीमध्ये पुढील प्रमाणे सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे – खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा. टेबलांच्यामध्ये किमान १ मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा. ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे. मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री – प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तु, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत. ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजुला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ईमेल आदी माहिती घेण्यात यावी. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डस, डार्टस्, व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल. इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमला मनाई असेल. सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. एन ९५ किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.

ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. याशिवाय ग्राहकांनी रेस्‍टॉरंटमध्ये येण्यापुर्वी आणि आल्यानंतर घ्यावयाच्या दक्षता, अन्न आणि पेयपदार्थ तयार करणे आणि त्याची सेवा देताना घ्यावयाच्या दक्षता, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, ग्राहकांना सेवा देताना घ्यावयाची दक्षता, बारमध्ये घ्यावयाच्या दक्षता, किचनमध्ये घ्यावयाच्या दक्षता, सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्टाफ एरियासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची वाहतूक, कर्मचाऱ्यांच्या गणवेशासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा, एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये कोरोना लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबाधीत आढळल्यास तातडीने करावयाची कार्यवाही अशा विविध मुद्द्यांसंदर्भातील मार्गदर्शक सुचनांचा समावेश एसओपीमध्ये करण्यात आला आहे.

आस्थापनांसमवेत झालेल्या चर्चा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, डब्ल्यूएचओ, युएनडब्ल्यूटीओ, केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच एफएसएसएआय यांनी कोरोनाकाळात अन्नसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ही एसओपी तयार करण्यात आली आहे.  

प्रामाणिक करदात्यांना भाजपने फसविले-आबा बागुल

0

पुणे – महापालिकेचा मिळकत कर नियमितपणे भरणाऱ्यांना, स्थायी समितीच्या निर्णयाद्वारे पुढील वर्षापर्यंत देण्यात आलेली १५ टक्के सूट रद्द करुन सत्ताधारी भाजपने प्रामाणिक करदात्यांना फसवले आहे असा आरोप काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.

महापालिका हद्दीतील मिळकत कराची ५० लाखाहून कमी थकबाकी असणाऱ्या थकबाकीदरांना व्याजात ८० टक्के सूट देण्याचा निर्णय घेताना नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांना प्रोत्साहन म्हणून पुढच्या सप्टेंबरच्या एक वर्षापर्यंत मिळकत करात १५ टक्के सूट देण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. स्थायी समितीत सर्वपक्षीयांच्यामध्ये एकमताने झालेला निर्णय पायदळी तुडवून सत्ताधारी भाजप प्रत्यक्षात फक्त ५० लाखावर थकबाकी असणाऱ्यांनाच व्याजात ८० टक्के सवलत हाच फक्त निर्णय अमलात आणू पहात आहे. प्रामाणिक करदात्यांना पुढील वर्षापर्यंत देण्यात आलेली १५ टक्के सूट रद्द करण्यात आलेली आहे किंवा अशी सूट दिलीच गेली नाही ही बाब निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची ही फसवणूकच आहे. या संदर्भात सत्ताधारी भाजपने आणि पालिका प्रशासनाने खुलासा करणे आवश्यक आहे अशी मागणी आबा बागुल यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रामाणिकपणे, नियमित मिळकत कर भरणाऱ्यांना देऊ केलेली १५ टक्के सूटही अमलात आणावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. प्रामाणिक करदात्यांना सूट न दिल्यास पालिकेच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होतील. यापुढे प्रामाणिक करदाते थकबाकीदार होऊन सवलतींची अपेक्षा करतील. हे दुष्टचक्र टाळायला हवे, असे बागुल यांनी पत्रकात म्हटले आहे.

मयुर कॉलनी ते पौड फाटा डी.पी. रस्ता लवकरच खुला

0
  • महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
  • कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार

पुणे | प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मयूर कॉलनी ते पौड फाटा यांना जोडणारा डी.पी. रस्ता हा लवकरच कोथरूडकरांसाठी खुला होणार आहे. यामुळे कर्वे रस्ता आणि पौड रस्ता यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मयुर कॉलनी ते पौड फाटा या डीपी रस्त्याची पाहणी महापौर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त आणि विविध विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांसोबत करुन आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, एसआरए मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, स्थानिक नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, पथविभाग प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, अनिरुद्ध पावसकर, महापालिका सहआयुक्त संदीप कदम व इतर अधिकारी उपस्थित होते.

अत्यंत महत्वाचा असलेला हा रस्ता गेली अनेक वर्ष या रस्त्यामधील असलेल्या भीमनगर मधील घरामुळे तो पूर्ण होवू शकत नव्हता. या घरांचा प्रश्न आता मार्गी लागला असून डीपी रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे सातत्याने यासाठी प्रयत्न सुरु होते. या रस्त्यात बाधित होणाऱ्या घरांना बीएसयूपी आणि आर सेव्हनच्या माध्यमातून घर देण्याचे नुकतेच काम पूर्ण झाले. ही घरे राहण्यासाठी नागरिकांना ताब्यातही देण्यात आली आहेत. पूर्वीची रस्तावर असलेली घरे पाडण्याचे काम सुरू होत आहे.’

‘रस्ता लवकरात लवकर खुला करण्यासाठी महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून नियोजन करण्यासाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन सर्व संबंधितांना सूचनाही दिल्या आहेत. रस्त्यामध्ये असलेली काही घरे असून ती घरे एसआरएच्या माध्यमातून हस्तांतरित केली जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांमुळे झालेल्या कामाचे समाधान यामुळे मिळेल. तसेच कोथरूडकरांना वाहतुकीच्या दृष्टीकोनातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे त्याचेही समाधान आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 69 हजार 3

0

पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 45 हजार 362 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.03 :- पुणे विभागातील 3 लाख 64 हजार 566 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 45 हजार 362 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 69 हजार 3 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 793 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 81.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 89 हजार 248 रुग्णांपैकी 2 लाख 44 हजार 979 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 37 हजार 693 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.70 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 347 रुग्णांपैकी 28 हजार 655 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 505 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 34 हजार 364 रुग्णांपैकी 26 हजार 251 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 933 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 125 रुग्णांपैकी 29 हजार 817 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 924 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 384 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 278 रुग्णांपैकी 34 हजार 864 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 948 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 681 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 571, सातारा जिल्ह्यात 535, सोलापूर जिल्ह्यात 410, सांगली जिल्ह्यात 786 तर कोल्हापूर जिल्ह्यात 379 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 5 हजार 104 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 799 ,सातारा जिल्हयामध्ये 595, सोलापूर जिल्हयामध्ये 444, सांगली जिल्हयामध्ये 931 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 335 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 19 लाख 58 हजार 772 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 45 हजार 362 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 2 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पीडित कुटुंबाच्या नार्को चाचणीच्या स्थगितीसाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका

0

हाथरस येथे सामुहिक बलात्कार आणि अमानुष मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांची नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीला स्थगिती मिळावी यासाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी योगी सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या तीन सदस्यीय एसआयटीच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणातील दोन्ही पक्षाकडील लोकांच्या नार्को आणि पॉलिग्राफ चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे फिर्यादी पीडित कुटुंबीय तसेच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नार्को चाचणी होणार आहे.गोखले यांनी आयपीसीच्या कलम २२६ नुसार हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कोर्टाला उद्देशून म्हटलं की, “सरकारनं दिलेला हा आदेश अयोग्य आहे. त्यामुळे पीडित कुटुंबियांच्या नार्को आणि पॉलिग्राफ चाचणीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. ही नार्को चाचणी केवळ बेकायदाच नसून ती पीडित कुटुंबाला १२ ऑक्टोबर रोजी कोर्टात काय सांगायचं याबाबत दबाव आणण्यासाठीचा प्रयत्न आहे.”

पीडित कुटुंबियांचा नार्को चाचणीला नकार

दरम्यान, पीडित कुटुंबियांनी आपल्याला नार्को चाचणी करायची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही चाचणी त्यांच्यावर लादली जात आहे. सुप्रीम कोर्टाने २०१० मध्ये म्हटलं होतं की, ज्या व्यक्तीची नार्को चाचणी करायची आहे, त्या व्यक्तीची संमती असल्याशिवाय ती करता येणार नाही

राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी

0

 आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते. परंतु आता प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांना करोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. परंतु आता प्रशानानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.

हाथरसला जाताना प्रियंका गांधी स्वतः कार चालवत होत्या. तसंच त्यांच्या सोबत राहुल गांधीही आहेत. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा होता. राहुल व प्रियंका गांधी हे हथरसकडे रवाना होताच, उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर फौजफाटा वाढवला होता. तर, विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत, रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं. यमूना एक्स्प्रेस वे वर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही केला होता. या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हाथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली होती. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुःखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

मराठी पत्रकार ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण प्रामाणिकपणा विकणार नाहीत- रोहित पवार

0

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेल्या सामूहीक बलात्काराप्रकरणी बेजबाबदारपमे वार्तांकन करणाऱ्या काही माध्यमांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चांगलंच धारेवर धरलं. तसेच, ‘माझे मराठी पत्रकार ‘चाय-बिस्कुट’ खातील, पण प्रामाणिकपणा विकणार नाहीत’, असे मते रोहित पवारांनी व्यक्त केले.आमदार रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामीचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत लिहीले की, ‘हाथरसमध्ये पीडितेच्या कुटूंबाला गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे, त्यांचे फोन हिसकावून घेतले गेले आहेत, त्यांना घरात डांबून ठेवले जात आहे आणि संपूर्ण गावाला पोलिसांनी छावनीचे स्वरुप दिले आहे. खासदारांना मारले जात आहे आणि मीडिया कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करून दिशाभूल करणारे ऑडिओ व्हायरल केले जात आहेत.

रोहित पवारांनी दुसार एक व्हिडिओ पोस्ट केला. यात अर्णब गोस्वामीच्या वृत्तवाहिनीचा रिपोर्टर रिपोर्टिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत पवारांनी लिहीले की, ‘खऱ्या बातम्या दाखवण्याऐवजी खोट्या बातम्या तयार करण्याची नवीन पत्रकारीता सुरू केलीये. तुम्ही सोबतच्या व्हिडीओत पाहू शकता. याला पत्रकारितेऐवजी सर्कस म्हणणेच अधिक योग्य ठरेल. यापेक्षा अधिक उत्तम माझे मराठी पत्रकार मित्र आहेत. जे ‘चाय-बिस्कुट’ खाऊन राहतील पण आपला प्रामाणिकपणा कधीही विकणार नाहीत’, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नोएडा बॉर्डरवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जमाव हटवण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज

0

हाथरस गँगरेप प्रकरणी सुरू असलेल्या गदारोळात नेता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस येथे जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्याच्यासोबत केवळ 5 लोक जाऊ शकतील. दरम्यान राहुल-प्रियंका यांना 35 खासदारांना सोबत घेऊन जायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवेवर अडवले होते.

राहुल गांधींना 35 खासदारांना बरोबर न्यायचे होते. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्ली-नोएडा फ्लायवे (नोएडा बॉर्डर)वर अडवले. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका यांना जाण्याची परवानगी दिली आहे. तरीही काँग्रेस समर्थक गोंधळ घालत आहे. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज सुरू केला आहे.

दरम्यान आता दिल्ली-नोएडा फ्लायवेवर मोठ्या संख्येत पोलिस तैनात आहेत. रस्त्यामध्ये बॅरिकेड लावण्यात आले आहेत.तर प्रियंका गांधी म्हणाल्या की, यावेळीही जाऊ दिले नाही तर आम्ही पुन्हा प्रयत्न करु. यावेळी प्रियंका आणि राहुल गाधींसोबत काँग्रेसचे 35 खासदारही आहेत.

प्रियंका गांधी चालवत आहेत गाडी, राहुल गांधी फ्रंट सीटवर

यापूर्वी गुरुवारी राहुल आणि प्रियंका यांना हाथरसमध्ये जाताना ग्रेटर नोएडा एक्सप्रेस-वेवर अडवण्यात आले होते. दोघांना यूपी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी म्हटले होते की, त्यांनी कलम 188 चे उल्लंघन केले आहे.

पोलिसांनी राहुल गांधींची कॉलरही पकडली होती. धक्काबुक्कीत ते खाली पडले आणि त्यांच्या हाताला इजा झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना चार तास ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. दोघांना गॅंगरेप पीडितेच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी हाथरसच्या बुलीगड गावात जायचे होते

पैसे नाही म्हणून कोरोना योद्ध्यांचे जेवण बंद केल्याचा आरोप – भाजपचे ससून रुग्णालयात आंदोलन

0

पुणे : ससून सर्पोपचार रुग्णालयातील कोविड विभागात गेली सहा महिने जीवावर उदार होऊन, कुटुंबाची काळजी न करता अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना सुरु असलेली निवास आणि भोजन व्यवस्था पूर्ववत करावी. या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याना भोजनाचे पॅकेट वाटप करून अभिनव आंदोलन केले.  यावेळी मागण्यांचे निवेदन ससून चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे देण्यात आले.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, दत्तात्रय खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, युवती अध्यक्षा निवेदिता एकबोटे, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाची अकार्यक्षमता, असंवेदनशीलता आणि पुणे शहराला देत असलेल्या सापत्न वागणुकीचा तीव्र निषेध केला.

 ‘ कोरोनाच्या महामारीत गेल्या सहा महिन्यांपासून ससून रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी काम करत आहेत. गंभीर रुग्णांवर ते उपचार करत असतात. त्यामुळे त्यांना  संसर्ग होण्याची अधिक भीती असते. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही भीतीचे सावट असते. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था होणे आवश्यक आहे. परंतु निधी उपलब्ध नाही म्हणून या व्यवस्था करता येत नाही ही ससून रुग्णालय व शासनाची भूमिका चुकीची आणि निषेधार्थ आहे. या कोविड योद्ध्यांना तातडीने पूर्वापार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सरकारला जमत नसेल तर तसे स्पष्ट करावे. पुणेकरांच्या आरोग्यासाठी झगडणाऱ्या कोरोना योध्यांसाठी लागेल तितके दिवस भोजन देण्याची दानत पुणेकरांमध्ये नक्कीच आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा मुळीक यांनी दिला. ’

ज्यांच्या बळावर आपले पुणे शहर कोरोनाची लढाई लढत आहे, त्यांच्यावर अन्याय करणारी इतकी काटकसर बरी नव्हे उद्धवजी असा टोलाही मुळीक यांनी लगावला.

या वेळी मुळीक म्हणाले,  कुटुंबिय आणि इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी ड्युटीच्या आठ दिवसांच्या दरम्यान त्यांची राहण्याची व्यवस्था ससून रुग्णालय परिसरातील विविध हॉटेलांमध्ये करण्यात आली होती. मात्र, शासनाने या हॉटेलचे बिल भरले नाही. त्यामुळे हॉटेलचालकांनी हॉटेल देण्यास नकार दिला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तर हॉटेलांमध्ये निवासव्यवस्था केल्याने शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता क्वारंटाईन व्यवस्थेसाठी आयबी गेस्टहाऊस, पुणे विद्यापीठ गेस्ट हाऊस, एनसीएल पाषाण आणि सीओईपी होस्टेल येथे करणार असल्याचे म्हटले आहे. आयबी सोडल्यास इतर सर्व ठिकाणे ससून रुग्णालयापासून पाच ते सहा मिलोमीटर अंतरावर आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी जाणे कर्मचार्यांना अवघड होणार आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या होस्टेलमध्ये राहणार्यांनी त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था स्वत: करावी असे म्हटले आहे. क्वारंटाईनमध्ये राहणारे कर्मचारी स्वत: आपल्या भोजनाची व्यवस्था कशी करणार असा सवाल मुळीक यांनी केला आहे.

आता कुठे, राहुल गांधीना हाथरस भेटी ची दिली परवानगी

0

काँग्रेस नेता के. सी. वेणुगोपाल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हथरसकडे रवाना होणार आहे. राहुल गांधी हथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. दरम्यान, प्रसार माध्यमांना हथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.

दरम्यान ततपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत हथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली आहे. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी चालत निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या तयारीत आहेत.