Home Blog Page 2426

ड्रग रॅकेटमध्ये जे अडकले त्यांच्यावर कारवाई होणारच – गृहमंत्री अनिल देशमुख

0

मुंबई, दि.17 : “बॉलीवूडमधल्या काही जणांचा ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. दोषींवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे. पण या काहीजणांच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड ड्रग रॅकेटमध्ये अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण बॉलीवूडची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

देशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र असणाऱ्या मुंबईवर चिखलफेक सुरु झाली. कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या मुंबईतल्या बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांचे यामागचे हेतू लक्षात घ्यायला हवेत. विशिष्ट विचारधारेतून बॉलिवूडवर हल्ले केले जात असल्याची शक्यता आहे. मात्र शंभरपेक्षा अधिक वर्षांच्या मजबूत आणि समृद्ध परंपरेला मुठभरांच्या चिखलफेकीमुळे धक्का लागणार नाही, असा विश्वास मंत्री देशमुख यांनी व्यक्त केला.

बॉलिवुडमधील काही घटक ड्रगच्या आहारी गेल्याच्या संबंधाने चौकशी चालू आहे. बॉलिवुडमधील अपप्रवृत्तींचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेऊन काम करणारे महाराष्ट्र पोलिस भल्या-बुऱ्यातील फरक ओळखून वाईट प्रवृत्तींचा योग्य समाचार घेतील. काही जणांच्या चुकीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला बदनाम करणे योग्य नाही, असे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.

बॉलिवूडशी संबंधित नुकत्याच घडलेल्या काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातल्या हजारो फेक अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न कसे झाले, हे एव्हाना उघड झाले आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता मुंबई-बॉलिवूडला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मात्र त्यांचे हे कारस्थान उधळून लावण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. बॉलिवूडसह देशातल्या सर्वच सिनेसृष्टीने मुंबईवरील प्रेम आणि विश्वास पूर्वीसारखाच अभेद्य ठेवावा. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्यासोबत आहेत, असा दिलासा मंत्री श्री.देशमुख यांनी दिला. गुन्हा घडून गेल्यानंतर अवतरणारे पोलिस फक्त सिनेमांमध्येच असतात. महाराष्ट्राचे पोलिस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे बॉलिवूडला बदनाम करु पाहणाऱ्यांनी विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला.

बॉलिवुडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवल्याचे दिसते आहे. त्यांनी हे लक्षात घ्यावे की, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हेच कर्तुत्त्ववान मराठी माणूस आहेत. फाळके यांनी सन 1913 मध्ये ‘राजा हरिश्र्चंद्र’च्या रुपाने चित्रपट सृष्टीची बीजे या देशात सर्वात प्रथम रोवली. भारताला पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (1931) मुंबईतचं झळकला. शंभरपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, आहे आणि राहील. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या लौकिकाला कोणी, कितीही प्रयत्न केले तर धक्का लावू शकणार नाही, असे मंत्री देशमुख यांनी बजावून सांगितले.

चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, चित्रपट व्यवसायाला महाराष्ट्राच्या जनतेकडून मिळणारे अपार प्रेम आणि आदर तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाला मिळणारे संरक्षण यामुळे चित्रपटसृष्टीने मुंबईत भक्कमपणे पाय रोवले आहेत. बॉलीवुडमधल्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर कलाकार, तंत्रज्ञ, बॅकस्टेज आर्टीस्ट यासारख्या हजारो कुटुंबांचा चरितार्थ आज अवलंबून आहे. कितीही संकटे आली तरी मुंबईला असणारे ग्लॅमर, आर्थिक समृद्धी आणि सुरक्षितता यामुळे बॉलिवूडने मुंबईला नेहमीच पसंती दिली आहे. महाराष्ट्राच्या पोलिस दलावर बॉलिवूडचाच नव्हे तर तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी येथील चित्रपट व्यावसायिकांचाही पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून ही मंडळी मुंबईत, बॉलिवूडमध्ये येत राहतात. याचेच दुखणे काहींच्या पोटात असू शकते. त्यातूनच बॉलिवूडच्या पद्धतशीर बदनामीची मोहीम आज चालवली जात आहे, असे मंत्री देशमुख म्हणाले.

शेकडो सिने तारे-तारका स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लाहोर-कराचीपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत नशीब आजमवण्यासाठी येत राहिले आणि कायमचे मुंबईकर झाले. तेलुगू, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी सिनेसृष्टीतल्या यशस्वी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गायक-गायिका, वादक, लेखक, कवी आदी सर्वांनीच देशपातळीवरची लोकप्रियता मिळवण्यासाठी मुंबईचा आधार घेतला. कारण या मुंबईने, या महाराष्ट्राने सर्वांचे खुल्या दिलाने स्वागत केले. भविष्यात देखील देशातल्या कोणत्याही प्रांतातल्या कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीचा मुकूटमणी असलेल्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे असेल तर महाराष्ट्रातले पोलिस, महाराष्ट्राची जनता तुमचे स्वागतच करेल. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे बालिश प्रयत्न करणाऱ्यांनी वेळीच शहाणे व्हावे, असे मंत्री देशमुख यांनी सुनावले.

राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

0

पुणे- कोरोनाच्‍या काळात माहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राजेश पांडे यांच्‍या हस्‍ते हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. यावेळी सूर्यदत्ताचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, सचिन इटकर, श्वेता शालिनी, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिता दीदी, ज्‍येष्‍ठ पत्रकार राजू वाघमारे, उद्योजक डॉ. दीपक तोष्णीवाल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजेश बाहेती, ‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड, ‘जागृती ग्रुप’चे राज देशमुख, किरण साळी, प्रा. अक्षीत कुशल, प्रा. रामचंद्रन आदी उपस्थित होते. पुणे जिल्‍ह्यात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्‍ण सापडला. तथापि, 26 फेब्रुवारीपासूनच प्रशासनाच्‍यावतीने राबविण्‍यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रसारमाध्‍यमांपर्यंत अचूक आणि तात्‍काळ पोहोचवण्‍यात माहिती कार्यालय आघाडीवर होते. ‘लॉकडाऊन’मध्‍ये अधिकृत माहितीसाठी ट्वीटर, फेसबुक, व्‍हॉट्सअप तसेच इ-मेल या माध्‍यमांचा प्रभावी वापर करुन अधिकृत माहिती पोहोचवण्‍यात येत होती. त्‍यामुळे सोशल मिडीयावरील अफवांचे निराकरण करण्‍यास मदत झाली. याबाबींची दखल घेवून हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. यापूर्वी राजेंद्र सरग यांना विश्‍व संवाद केंद्र आणि डेक्‍कन एज्‍युकेशन सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2017 चा आद्य पत्रकार देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार देऊन गौरवण्‍यात आले. याशिवाय महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍कार, महाराष्‍ट्र पोलीस दलाच्‍या दक्षता मासिकातर्फे आयोजित राज्यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2004 पासून सन 2007 पर्यंत सलग 4 वर्षे प्रथम पुरस्‍कार, पवनेचा प्रवाह प्रकाशन संस्‍थेचा सन 2007 चा उत्‍कृष्‍ट साहित्‍य पुरस्‍कार, दक्षतातर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2008 मध्‍ये द्वितीय पुरस्‍कार, दैनिक रत्‍नभूमी, रत्‍नगिरी तर्फे आयोजित राज्‍यस्‍तरीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत सन 2008 मध्‍ये प्रथम पुरस्‍कार, रोटरी क्‍लब, बीड तर्फे सन 2003 चा व्‍यवसाय गौरव पुरस्‍कार, दैनिक गांवकरी, औरंगाबादतर्फे व्‍यंगचित्र क्षेत्रातील उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल सन 2004 मध्‍ये गौरव पुरस्‍कार, ओम ह्युमन रिसोर्स डेव्‍हलपमेंट अकादमी, पुणे आणि महात्‍मा गांधी मिशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सन 2008-2009 चा राज्‍यस्‍तरीय चौथा स्‍तंभ व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. परभणी येथील जनसहयोग संस्‍थेच्‍यावतीने साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2012 चा ‘जननायक पुरस्‍कार देऊन सन्‍मान करण्‍यात आला आहे.

आकाशवाणी मुंबईच्‍या वतीने सन 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्‍कृष्‍ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्‍ह व प्रमाणपत्र देऊन गौरव, अहमदनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीने साहित्‍य क्षेत्रातील अनमोल योगदानाबद्दल 2017 मध्‍ये गौरव तसेच नागपूर येथे जानेवारी 2017 मध्‍ये आयोजित अखिल भारतीय व्‍यंगचित्र स्‍पर्धेत रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रास उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. शासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्‍थांच्‍या वतीने आयोजित जलसाक्षरता, स्‍वच्‍छता अभियान, प्रदूषण नियंत्रण, बेटी बचाव यासारख्‍या प्रबोधनपर व्‍यंगचित्र प्रदर्शनात राजेंद्र सरग यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. याशिवाय त्‍यांनी रेखाटलेल्‍या व्‍यंगचित्रांचे औरंगाबाद, पुणे, परभणी, सेलू या ठिकाणी प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे. विविध दिवाळी अंकांत त्‍यांची 11 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 544

0

पुणे विभागातील 4 लाख 30 हजार 556 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 4 लाख 83 हजार 253 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.17 :- पुणे विभागातील 4 लाख 30 हजार 556 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 83 हजार 253 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 39 हजार 544 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89. 10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 12 हजार 699 रुग्णांपैकी 2 लाख 82 हजार 675 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 22 हजार 759 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.40 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 969 रुग्णांपैकी 35 हजार 699 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 855 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 902 रुग्णांपैकी 31 हजार 889 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 698 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 472 रुग्णांपैकी 37 हजार 438 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 474 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 211 रुग्णांपैकी 42 हजार 865 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 758 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 588 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 817 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 72, सातारा जिल्ह्यात 271, सोलापूर जिल्ह्यात 159, सांगली जिल्ह्यात 231 तर कोल्हापूर जिल्ह्यात 84 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 369 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 98, सातारा जिल्हयामध्ये 925, सोलापूर जिल्हयामध्ये 283, सांगली जिल्हयामध्ये 335 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 728 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 94 हजार 103 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 83 हजार 253 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

कोरोना चाचणीच्या पुण्यात निकृष्ट दर्जाच्या किट्स-एस.आय.टी चौकशी :दोषींना शासन झालेच पाहजे -प्रवीण दरेकर

0


मुंबई दि. १७ ऑक्टोबर- कोरोनाच्या चाचणीसाठी जालना व पुणे जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आरटी-पीसीआर च्या किट्स वापरण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेने तपासणी केल्यानंतर या किटस् निकृष्ट असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. परंतु हे किटस् निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर वैदयकीय शिक्षणा विभागामार्फत ही खरेदी झाल्याचे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर आता जबाबदारी ढकलली आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची एस.आय.टी व्दारे चौकशी करुन दोषी अधिकारी व कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
कोरोना चाचणीसाठी वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या किटससंदर्भात गौप्यस्फोट करताना विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, १ ऑक्टोबर पर्यंत भारत सरकारने आरटी-पासीआर कीटस् चा पुरवठा केला. यामध्ये कोणतीही अडचण आली नाही. पण १ ऑक्टोबर पासून राज्य सरकारने खरेदी सुरु करताच अडचणी निर्माण झाल्या. कारण वैदयकीय शिक्षण विभागा अंतर्गत असणा-या डी.एम.ई.आर. ने या निकृष्ट दर्जाच्या किटस् खरेदी केल्या होत्या. या किटस् आरोग्य संचालनालय मार्फत सर्व जिल्हा पातळीवर पोहचविल्या. परंतु कोरोना रुग्णांचा पॉझीटिव्हीटी रेट कमी आल्याने ही बाब लक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.
आरटी-पासीआर किटस् यायच्या अगोदर जालना जिल्हयामध्ये २५ टक्क्यांच्या दरम्यान पॉझीटिव्हीटी रेट होता. परंतु या किटस् वापरल्यानंतर हा रेट ०५ टक्क्यांपर्यंत खाली आला. त्यामुळे संशय निर्माण झाल्यामुळे डॉ. हयात नगरकर यांनी याची तक्रार आय.सी.एम.आर., राष्ट्रीय विषाणू संस्था, व सिव्हील सर्जन, जालना यांच्याकडे केल्याची माहितीही दरेकर यांनी दिली.
जालना जिल्हयामध्ये रेट ऑफ इंन्फेक्शन रेट (पॉझीटिव्हीटी रेट) अचानक कमी झाल्याचे लक्षात आल्याची बाब डॉ. तात्याराव लहाने यांनी जेव्हा व्हिडोओ कॉन्फरसिंग घेतली तेव्हा डॉ. हयात नगरकर यांनी त्यांच्या समोर मांडली. पण डॉ. लहाने या गंभीर गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुलर्क्ष केले. उलट ही बाब निदर्शनास आणून देणा-या डॉ. नगरकर यांचीच कानउघडणी करण्यात आली. एवढेच नव्हेतर डॉ. नगरकर यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे समजते, असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.
दरेकर यांनी पुणे जिल्हयातील असाच प्रसंग सांगताना स्पष्ट केले की, निकृष्ट दर्जाचे किटस वितरित झाल्याचे लक्षात आल्यानंतरही पुण्यामध्ये १० ऑक्टोबर पर्यंत याच किटस् ने रुग्णांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय विषाणू संस्थेने या किटस् निकृष्ट असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु त्यानंतरही पुणे जिल्हयात सलग ३ दिवस हयाच निकृष्ट दर्जाच्या किटसचा वापर करण्यात आला, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राज्य सरकार कोरोनाबाबत किती गंभीर आहे, हे हयावरुन दिसून येते असल्याचे सांगतांना दरेकर म्हणाले की, या सर्व प्रकरणामधून आरोग्य संचालनालयाचा केवळ निष्काळजीपणा दिसून येतो. विशेष म्हणजे किटस् निकृष्ट दर्जाचे आहेत हे लक्षात आल्यानंतरही वैदयकीय शिक्षणामार्फत ही खरेदी झाल्याचे सांगून राजेश टोपे यांनी अमित देशमुख यांच्यावर जबाबदारी ढकलली. तर त्याच वेळेस राजेश टोपे यांना हा विषय माहित नसून आरोग्य विभागच याप्रकरणी दोषी असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले गेले, असेही दरेकर यांनी सांगितले.
या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीसाठी निकृष्ट दर्जाच्या किट्स पुरवठ्याच्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री गंभीर असतील तर त्यांनी याप्रकरणाची तातडीने एस.आय.टी चौकशी करुन दोषी अधिकारी व कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दरेकर यांनी यावेळी केली.
तसेच या प्रकणात दोषी असणारा वैद्यकीय शिक्षण विभाग असो की आरोग्य विभाग असो त्यांच्याविरुध्द तात्काळ कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचे किटस् पुरविणाऱ्या कंपनीला कायम स्वरुपी काळया यादीत टाकण्यात यावे. तसेच या किटसला मान्यता देणाऱ्या वैद्यकीय शिक्षण संचालकांवर तसेच न तपासता हया किटस् स्विकारणाऱ्या आरोग्य संचालकांवरही तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.

आज शालेय पोषण शिक्षणाची देशाला गरज – पद्मश्री मिलिंद कांबळे

0

पुणे – एकीकडे देश विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे परंतु गडचिरोली ,यवतमाळ सारख्या भागात आणि देशातील विविध ठिकाणी गरिबीमुळे मुलांना पोषक आहार न मिळाल्यामुळे कुपोषित होत आहेत तर दुसरीकडे जास्त आहार झाल्यामुळे मुले लठ्ठ पणाची समस्या निर्माण होत आहे .शिवाय कोरणा सारखे विषाणूंमुळे होणारे आजार वाढत आहेत .त्यामुळे आज भारत देशाला शालेय पोषण आहार या शिक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे मत आय.आय.एम जम्मु चे अध्यक्ष व दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक अध्यक्ष मिलिद कांबळे यांनी व्यक्त केले. जूनेवेट वेलबींग या संस्थेने पोषण आहार शिक्षण पद्धती व पोषण चक्र यावर आधारित संकेतस्थळाचे उद्घाटन पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.


पुढे ते म्हणाले की ,लहान मुलांची अधिग्रहण करण्याची शक्ती जास्त असते .त्यामुळे या वयात पोषण आहार हा विषय अभ्यास क्रमात सहभागी झाल्यास त्याचा फायदा हा नक्कीच होईल .आणि आज कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अचानक आहार बदल करण्याची गरज पडणार नाही जे लहान वयातच पौष्टीक आहार सेवणाचा अभ्यास झाला तर.त्यामुळे देशातील सर्व शाळांमध्ये पोषण आहार हा अभ्यासाचा विषय होणे गरजेचे असल्याचे कांबळे यांनी म्हंटले .
प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका गौरी शिंगोटे यांनी जुविनेट वेलबिंग यांनी पोषण आहार शास्त्र व त्यावर आधारित आहार पोषण चक्र याचे सखोल संशोधन करून यावर आधारित शिक्षण पद्धती विकसित केली आहे .त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली .
आहारतजज्ञ डॉ.प्राची बोरा यांनी पोषण आहार हा प्रत्येक व्यक्तीला किती महत्त्वाचा आहे.ते पटवून दिले.शिवाय भारतीय परंपरेत ही पोषण आहार पद्धती महत्त्वाची होती.आता आपण आपली जुनी आहार पद्धती चा अभ्यास करून त्यातील महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे .असे आपल्या मनोगतात म्हणाल्या .
यावेळी जुवेनेट वेलबिग या संस्थेचे राहुल कांबळे ,जॉर्ज मकासरे ,शांती कृष्णन आदी संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.

यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी- आ.चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई -कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी केली.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी कायम आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.

त्यांनी सांगितले की, वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील व त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते.

चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

0

पुणे – चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त आज सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्‍वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन करून या वर्षीचा नवरात्रौत्सव विजयादशमीपर्यंत (२५ ऑक्टोबर) साधेपणाने साजरा केला जाणार आहे. शासनाच्या नियमांनुसार भाविकांना दर्शनासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र ऑनलाइन पद्धतीने देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
देवीचे दर्शन आणि सर्व धार्मिक सोहळ्यांचे आणि या संकेतस्थळांवर पाहाता येणार आहे. भाविकांसाठी फेसबुक पेजवर आणि यूट्यूबवर दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थेट दर्शनासाठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी विशेष ऍपद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
देवीची आरती दररोज सकाळी १० वाजता आणि रात्री साडेआठ वाजता करण्यात येणार आहे. रविवारी (२५ ऑक्टोबर) सकाळी ८ ते ११ या वेळेत नवचंडी होम करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी विजयादशमीनिमित्त देवस्थानचे कर्मचारी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या परिसरात सीमोल्लंघन करण्यात येणार आहे.

प्राणहानी होता कामा नये, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा- मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

0

मुख्यमंत्र्यांनी आज पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला

मुंबई-राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी आज पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पुरस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यसचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, मदत पथकाकडून अनेक ठिकाणी पुरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. हे करतांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतर याचेही वेळीच नियोजन करावे, स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी. दुर्देवाने यात जे नागरिक मरण पावले त्यांच्या कुटुंबिंयाना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.यावेळी संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पुरस्थिती आणि झालेले नुकसान, करण्यात येत असलेली मदत आणि उपाययोजना यासंदर्भात विस्ताराने माहिती दिली.

शेती, पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधन, घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज पुरवठ्याशी संबंधित बाबी, शाळा, ग्रामपंचायत इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे तातडीने करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.

मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाचा समारोप

0

पुणे :
पी ए इनामदार आय सी टी अकॅडमी तर्फे आयोजित दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण वर्गाचा समारोप गुरुवारी आझम कॅम्पस येथे झाला. भिवंडी येथील शिक्षकाना हार्डवेअर,सॉफ्टवेअर ,इंग्रजी संभाषण,कौशल्ये ,सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण देण्यात आले. उत्तम रित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रथम ३ शिक्षकांना अनुक्रमे १० हजार ,५ हजार आणि ३ हजाराचे पारितोषिक  डॉ पी ए इनामदार  यांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी ऍकेडमीच्या संचालक मुमताज सय्यद,अरिफ सय्यद ,अंजुम काजळेकर ,आलिया शेख ,आसिया लकडे ,राबिया गोडिकत,नसरीन शेख,शेहनाज शरीफ,अतिया शेख उपस्थित होते

मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

 बाबा पाटील, संतोष साखरे,विजय पाटकर,  सविता मालपेकर, प्रिया बेर्डे यांची  अजित पवार यांच्याशी चर्चा   
पुणे :
‘मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल’,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिले. 
राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अजित पवार यांना चित्रपट सृष्टी आणि कलाकारांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले . तेव्हा हे महत्वपूर्ण आश्वासन त्यांनी दिले. प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, समन्वयक संतोष साखरे, अभिनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, अभिनेत्री आणि प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, अभिनेत्री आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे, व विद्या म्हात्रे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन अनेक समस्यांबाबत चर्चा केली. 
   राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रीचा दर्जा मिळावा,तसेच मुंबई, पुण्यात,कोल्हापूर,नाशिक या शहरांमध्ये कलाकारांसाठी कलाकार भवन उभं करावं,ज्येष्ठ कलाकारांचे मानधन  तीन हजार आहे ते  15 हजार रुपये महिना असे करावे,तसेच राज्यातील चित्रपटगृहे बंद असताना देखील आकारला गेलेला  स्थानिक मालमत्ता कर, सरसकट देण्यात आलेले वीज  बिल  माफ करावे किंवा त्याच्यामध्ये सूट द्यावी,वेळ  द्यावा, सिडको आणि म्हाडा येथे राखीव कोट्यातून कलाकारांना घरे मिळावी अशा मागण्याचे निवेदन  अजित पवार यांना देण्यात आले.   
 राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील, समन्वयक संतोष साखरे, प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर, प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रिया बेर्डे, व विद्या म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आणि चर्चा केली. 
‘संबंधित मंत्र्यांशी आणि प्रमुख सचिवांशी बोलून लवकर आदेश काढू .आतापर्यंत कोणीच ही मागणी शासनाकडे आणली नाही,त्यात राष्ट्रवादी काँग्रेस  चित्रपट सांस्कृतिक विभाग पाठपुरावा करीत आहे,त्यामुळे शासन तातडीने निर्णय घेईल’,असे अजित पवार यांनी सांगितले. 
‘हिंदी,दक्षिण,भोजपुरी चित्रसृष्टीला उद्योगाचा दर्जा असून मराठी चित्रपटसृष्टी मात्र वंचित राहिली होती म्हणून आम्ही प्राधान्याने ही मागणी उप मुख्यमंत्र्यांकडे मांडली.कला आणि कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू’,असे बाबा पाटील यांनी सांगितले.

‘जम्बो’ बनले कुष्ठरोग्यांचे कैवारी – कुष्ठरोग्यांसाठी ४० बेड राखीव-जम्बो कोविड सेंटरचा अभिनव उपक्रम

0

“टेस्टिंग, ट्रीटमेंट टू क्युअर”-
जम्बोतर्फे कोविड निदान ते निवारण, तपासणी ते करोनामुक्तीपर्यंतची तत्पर सेवा

पुणे : कुष्ठरोगाने ग्रासलेल्या व्यक्तींना करोना विषाणूचा संसर्ग झाला तर उपचार कोठे व कोण करणार असा वेगळाच प्रश्न अलीकडे समोर आला. मात्र पुणे महापालिका प्रशासनाने या प्रश्नावर ताबडतोब तोडगा काढून कार्यवाहीदेखील केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये करोनाबाधित कुष्ठरोग्यांना त्वरीत प्रवेश देण्यात आले. तसेच या ठिकाणी कुष्ठरोग्यांसाठी 40 बेड राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. सध्या येथे 21 कुष्ठरोगाने ग्रासलेल्या व्यक्तींवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जम्बोच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

बंडोरावाला कुष्ठरोग निवारण केंद्रातील चार करोनाबाधित व्यक्तींची तपासणी करायची होती. त्यासाठी चार दिवसांपूर्वी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी गेले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांची तपासणी करणे शक्य नव्हते, कारण कुष्ठरोगामुळे त्यांची बोटे, कानाची पाळी वगैरे अवयव झडलेले होते. त्यामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी तपासणेही कठीण होते. तसेच एक्स रे, रक्त तपासणी अशा इतर चाचण्या त्यांच्या संस्थेत केल्या जात नाहीत. त्यांना महापालिकेच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतून एका मोठ्या रुग्णालयात पाठवले, मात्र काही रुग्णांकडे आधार कार्ड वगैरे लगेच उपलब्ध नसल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. रात्री 11 वाजता ते सर्व करोनाबाधित हताश होऊन कुष्ठरोग केंद्रात परतले… ही व्यथा कोंढवा कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. दीप्ती बच्छाव यांनी रात्रीच मेसेज करून अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांना कळवली.

या प्रकाराची दखल घेत कुष्ठरोगी व्यक्तींबद्दल संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे, त्यांना ताबडतोब जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्याचे आदेश श्रीमती अग्रवाल यांनी आम्हाला दिले, असे जम्बोमधील वैद्यकीय प्रमुख डॉ. श्रेयांश कपाले यांनी सांगितले. त्याप्रमाणे संबंधित यंत्रणेला सूचना देऊन रुग्णांना रात्रीच जम्बोमध्ये प्रवेश देऊन त्वरीत पुढील उपचार सुरू करण्यात आले. महापालिकेच्या सहकार्याने जम्बो सेंटरद्वारे आम्ही कोविड निदान ते रोग निवारण अशी संपूर्ण सेवा देत आहोत, असे अग्रवाल यांनी सांगितले.

याबाबत माहिती मिळताच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्या चार करोनाबाधितांच्या संपर्कातील व बंडोरावाला केंद्रातील सर्व कुष्ठरोग्यांची तपासणी महापालिकेच्या वतीने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त तानाजी नारळे यांनी पुढील कार्यवाही करून तेथील 128 कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 21 व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. तसेच, याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, महापालिका प्रशासन व जम्बो सेंटरने कुष्ठरोग्यांबद्दल दाखवलेली संवेदनशीलता व तत्परता कौतुकास्पद आहे. कोणत्याही करोनाबाधित व्यक्तीस प्रवेश नाकारला जाणार नाही. जम्बो सेंटर ही सेवा सर्वांसाठी खुली आहे.

पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 व 29 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन

0


पुणे दि.16 : – खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठया कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय,पुणे या कार्यालयामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 व 29 ऑक्टोबर 2020 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात उद्योजकांमार्फत अधिसूचित केलेल्या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. सदर ऑनलाईन मेळाव्यात विविध उद्योजकांनी ऑनलाईन पध्दतीने त्याच्याकडील रिक्तपदे महास्वयंम वेबपोर्टलवर अधिसूचित केलेली आहेत. उद्योजकांमार्फत उमेदवारांच्या मुलाखती दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स या माध्यमाद्वारे ऑनलाईन पध्दतीने किंवा प्रत्यक्ष घेवून विविध पदांसाठी उद्योजकांमार्फत रिक्त जागांसाठी निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर, पदवीधर उमेदवारांकरीता नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या महास्वयम वेबपार्टलवर नोंदणी व लॉग इन करुन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जाऊन ONLINE DIVISIONAL JOB FAIR PUNE DIVISION सिलेक्ट करावे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. सदर रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त श.बा.अंगणे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते “पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार” अभियानाचा शुभारंभ

0

कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची

पुणे, दि. 16. कोरोना विरुध्दच्या लढाईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी “पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार” अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. “पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार” अभियानाला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना (कोविड-१९) विरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेंतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्य गट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “पुण्याचा निर्धार – कोरोना हद्दपार” या अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ द्यावी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातांची नियमित स्वच्छता आदी दक्षता नियमांचे पालन करत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करून अर्थव्यवस्था पुढे घेवून जावी लागणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे, ही समाधानकारक बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. आपण यापूर्वीही घरी राहून, दक्षता घेत सण उत्सव साजरे केले आहेत. यापुढेही नियमांचे पालन करून सण उत्सव घरीच साजरे करूया, तसेच कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा निर्धार करुया, असे सांगून राज्य शासन सर्वतोपरी पुणेकरांसोबत आहे, कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी सर्व यंत्रणा उपाययोजना करत आहेत, पुणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापुढेही काळजी घेत कोरोनाला हरवूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत “पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार” अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगतानाचा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे यापुढील कालावधीतही प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी “पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार” अभियानांतर्गत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत बसचे चालक, वाहक यांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिक,पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते. आभार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप यांनी मानले.

पुणे विभागातीलॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 169 :एकुण 13 हजार 70 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 4 लाख 26 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 81 हजार 436 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.16 :- पुणे विभागातील 4 लाख 26 हजार 197 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 81 हजार 436 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 169 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 70 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 88.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 11 हजार 627 रुग्णांपैकी 2 लाख 80 हजार 577 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 23 हजार 826 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.04 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 698 रुग्णांपैकी 34 हजार774 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 516 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 37 हजार 743 रुग्णांपैकी 31 हजार 606 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 831 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 241 रुग्णांपैकी 37 हजार 103 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 588 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 127 रुग्णांपैकी 42 हजार 137 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 408 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 582 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 980 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 197, सातारा जिल्ह्यात 268, सोलापूर जिल्ह्यात 210, सांगली जिल्ह्यात 247 तर कोल्हापूर जिल्ह्यात 58 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 3 हजार 757 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 473, सातारा जिल्हयामध्ये 276, सोलापूर जिल्हयामध्ये 299, सांगली जिल्हयामध्ये 329 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 380 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 21 लाख 81 हजार 138 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 81 हजार 436 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मेट्रो प्रकल्पामुळे बाधित झोपडीधारकांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

पुणे,दि.16: मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना सद्यस्थितीची माहिती देऊन त्यांना विश्वासात घेऊन पुनर्वसनाबाबत योग्य मार्ग काढावा, तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधी नगर येथील मेट्रो प्रकल्प-1, 2 व 3 मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाबाबत आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महामेट्रोचे डॉ. रामनाथ उपस्थित होते.

यावेळी झोपडपट्टी धारकांच्यावतीने स्थानिक पदाधिकारी, प्रतिनिधींनी बाधित झोपडपट्टी धारकांचे म्हणणे मांडून सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बाधित झोपडीधारकांच्या मुलांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मेट्रोने उपलब्ध करुन देण्याचा व त्यानुसार त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. तसेच यादृष्टीने आतापासूनच प्रशिक्षण देण्यात यावे. बाधित झोपडीधारकांना दोन्ही मेट्रो मार्गाचे आराखडे दाखवून पुनर्वसनाबाबत जागांच्या शक्यता पडताळाव्यात. तसेच अन्य ठिकाणी स्थलांतर केल्यास त्यांना पीएमपीएमएल चा पास मिळवून देता येईल का, याचाही विचार करावा, असे उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त सौरभ राव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर व संबंधित अधिकाऱ्यांनी मेट्रो प्रकल्प व झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत सद्यस्थितीची माहिती दिली.
झोपडपट्टी धारकांच्या वतीने स्थानिक पदाधिकारी, प्रतिनिधींनी पुनर्वसनाबाबत सूचना केल्या.