Home Blog Page 2423

महापालिकेत ठेकेदारी पद्धतीने सेवक भरती नको : आबा बागुल

0

पुणे- कामगारांचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या कडून चांगले काम करवून घ्यायचे असेल, महापालिकेचे उत्पन्न देखील वाढवायचे असेल तर कामगारांची पिळवणूक करणारी ठेकेदारी पद्धत बंद करून थेट रोजंदारी पद्धतीने सेवक भारती केली पाहिजे असे मत कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी येथे व्यक्त केले. कामगारांना सुरक्षा आणि विश्वास मिळाला तर महापालिकेचा आणि पर्यायाने शहराचा फायदा होऊ शकेल असे ते म्हणाले.

पी.एम.सी.एम्प्लॉइज युनियन, पुणे महानगरपालिका कामगार युनियन, पुणे मनपा अभियंता संघ व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे कडून विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदने वेळोवेळी येत असतात. यास अनुसरून कॉंग्रेस पक्ष कार्यालयात पी.एम.सी.एम्प्लॉइज युनियन, पुणे महानगरपालिका कामगार युनियन, पुणे मनपा अभियंता संघ व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत पुणे मनपा कामगारांच्या प्रश्नाविषयी चर्चा झाली. यामध्ये सर्व संघटनानी सातवा वेतन आयोग, बोनस, कोरोनाने मृत पावलेल्या सेवकांचे वारसांना नोकरी, कालबद्ध पदोन्नती लागू करणेबाबत प्रश्न मांडले व विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
सदर बैठकीत आबा बागुल यांनी सर्व संघटनांना आवाहन व विनंती केली कि, पुणे मनपाची जमा बाजू भक्कम केल्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. जमा बाजू वाढविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. गेले ५ ते ७ वर्षात ठेकेदारी पद्धतीने कामे करनेची प्रथा मोठ्या प्रमाणात चालू झाली असून महसुली खर्च वाढत वाढत चालला आहे. आपले १८००० सेवक असताना ठेकेदारी सेवक घेतल्याने हा खर्च वाढतोय, परंतु त्यांना कमी वेतन देऊन जास्त काम करून घेतात, सबब ठेकेदारी सेवकांची पिळवणूक चालू असल्याने ते पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. ठेकेदारी सेवक पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे रोजंदारी सेवक घेऊन कामे केल्यास कामे पूर्ण होतील. रोजंदारी सेवक घेतल्यास त्यांचे रेकॉर्ड मनपाकडे असेल. ठेकेदारी सेवक घेण्यात आर्थिक भ्रष्टाचार होत असून मनपाचे नुकसान होत आहे.
        मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मनपाच्या ५ ते ६ हजार सदनिका विक्री करणेबाबत विचार विनिमय चालू असून त्यामुळे कायमस्वरूपी उत्पन्न मनपास मिळणार नाही.  यापैकी काही सदनिका मनपा सेवकांना ३० वर्षांच्या लीजवर/भाडेतत्वावर अथवा अन्य मार्गाने या सदनिका दिल्यास मनपास कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल. पुणे मनपाच्या सेवकांना घरे देखील राहावयास मिळतील व मनपाचे उत्पन्न देखील वाढेल.
        कामगारांचा अचानक मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंब रस्त्यावर येते, फंड आणि इतर रक्कम यातून सध्याच्या महागाईच्या काळात कुटुंबास हातभार लागत नाही. कॉंग्रेस पक्ष सर्व सेवकांच्या कुटुंबीयांच्या देखील पाठीशी असून मनपाच्या सर्व सेवकांचा सुरक्षा कवच विमा काढण्याबाबत चर्चा झाली. मार्च २०२० मध्ये आबा बागुलांनी याबाबत स्थायी समितीपुढे ठराव देखील दिलेला होता. पुणे मनपा सेवकांचा अचानक कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास ५० लाख रकमेचा विमा काढल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रक्कम मिळेल. यासाठी आवश्यक प्रीमियम ५० टक्के रक्कम हि मनपा व ५० टक्के रक्कम हि सेवकांकडून घेता येईल अशी चर्चा झाली. तसेच पुणे सिटीझन कार्ड काढनेसाठी व मनपा कर्मचाऱ्यांचे स्मार्ट कार्ड काढणे बाबत गेली ८ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करत आहोत. याबाबत चर्चा होऊन मनपा सेवकांचे स्मार्ट कार्ड लवकरच येईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोविड सेंटर्समधील महिलांची छेडछाड टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात

0

मुंबई, दि. 20 : कोविड सेंटर्समध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच महिलांच्या तक्रारींप्रकरणात तातडीने लक्ष घालून सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक होणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांनी आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

राज्यातील महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुनावनीसाठी गेले दोन दिवस मुंबईत दौऱ्यावर आल्याचे सांगून श्रीमती शर्मा म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रकरणांची सुनावनी प्रलंबित आहे. तसेच कोविड सेंटर मध्ये बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या घटना झाल्याची 11 प्रकरणे केंद्रीय महिला आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी राज्याची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असल्याचे सांगण्यात आले. एसओपीबरोबरच अन्य उपाययोजनांचेही काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.

महिलांवरील अत्याचार प्रकरणात मदत, समुपदेशन आदी सहाय्य करण्यासाठी सध्या कार्यरत असलेली वन स्टॉप सेंटर्स चांगल्या पद्धतीने काम करत असून राज्यातील उर्वरित 19 जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर्स कार्यरत करणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य श्रीमती रिदा रशीद उपस्थित होत्या.

‘वर्दीतील स्त्रीशक्ती’ : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती खाडे

0

मुंबई, दि. 20 : कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

शक्ती, बुद्धी आणि नीतीचे प्रतीक

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते, असेही गृहमंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

स्वाती खाडे

महिलांचा सन्मान करणे, त्यांना बरोबरीची वागणूक देणे हा खरा स्त्री शक्तीचा जागर आहे.  पुणे पोलीस (Pune City Police) दलातील संवेदनशील सहायक पोलीस निरीक्षक स्वाती खाडे यांनी पतीने ६ महिन्यांच्या बाळासह घराबाहेर काढलेल्या निराधार महिलेची परिस्थिती समजून घेत त्वरित ई-पास मंजूर केला. तसेच नातेवाईकांनी ठरविलेल्या कारमध्ये बसवून दिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खाडे यांनी माणुसकीच्या नात्याने सदर महिलेला सर्वतोपरी मदत केली. खाडे यांच्या या प्रशंसनीय कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे. असे गौरवोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

5 वर्षात 1 ही नाही झाला ‘ महाराष्ट्र भूषण’

0

वादात राहिलेला “महाराष्ट्र भूषण पुरस्कार,”

पाच वर्षे खंडीत पडलेली परंपरा,नवनिर्वाचित निवड समिती पुढे मोठे आव्हान..!

मुंबई (खंडूराज गायकवाड)

राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून समजल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती” सांस्कृतिक कार्य खात्याने गठीत केली खरी .परंतु गेल्या पाच वर्षांपासून या खात्याच्या उदासीन कारभारामुळे एकही पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही.हा या सर्वोच्च पुरस्काराचा अवमान म्हणावा की,या पुरस्कार “लायक”कोण व्यक्तीचं शोधून सापडली नाही.यावर हवी तेवढी चर्चा घडू शकेल. आता नवनिर्वाचित निवड समिती गेल्या पाच वर्षातील खोळंबलेल्या पुरस्कारांचा विचार करणार आहे की, “मागचं सपाट,पुढचं पाठ”अशी भूमिका ही समिती घेणार आहे. हे लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल.

दि.७ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य विभागाने सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून समजल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती” गठीत केली आहे.या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपाध्यक्ष अजित पवार असून शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री, सांस्कृतिक कार्य सचिव यांचा या समितीमध्ये समावेश आहे. तर अशासकीय सदस्य म्हणून या समितीमध्ये डॉ,अनिल काकोडकर (शास्त्रज्ञ) डॉ.प्रकाश आमटे(समाजिक कार्य) श्री.बाबा कल्याणी(उद्योजक) संदीप पाटील(क्रीडा) आणि दिलीप प्रभावळकर (कला) या मान्यवरांचा समावेश करण्यात आलेला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे हे सदस्य सचिव म्हणून या समितीचे काम पाहणार आहेत.
सन १९९५ साली राज्यात शिवसेना -भाजपची युतीची सत्ता आल्यावर तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कला साहित्यिक,क्रीडा,आरोग्य सेवा,उद्योग,लोकप्रशासन,सहकार,सामाजिक कार्य, विज्ञान अशा विविध क्ष्रेत्रातील मान्यवर ज्यांनी महाराष्ट्राचे नाव आपल्या क्षेत्रात उज्ज्वल केले.यांना सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार म्हणून * महाराष्ट्र भूषण* पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पहिला पुरस्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्याचा निर्णय तेव्हा सरकारने कॅबिनेट मध्ये घेतला.परंतु बाळासाहेबांनी आपले मोठे मन दाखवून हा पुरस्कार घेण्यास स्पष्ट नकार दिला.माझं सरकार आले आहे.त्याच सरकारचा पुरस्कार मी घेणे उचित होणार नाही.असे त्यांचे मत होते.
म्हणूनच १९९७ साली पहिला पुरस्कार ज्येष्ठ.साहित्यिक पु. ल.देशपांडे यांना रविंद्र नाट्य मंदिर (प्रभादेवी)येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.मात्र तेव्हा सुध्दा हा पुरस्कार सोहळा पु.ल.देशपांडे यांच्या भाषणामुळे वादग्रस्त झाला होता.तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धारावी येथील एका पुलाच्या उदघाटन समारंभात म्हणाले होते की जुने “पुलं ” पाडून आता नवीन पुलं बांधण्याची गरज आहे.अर्थातच बाळासाहेब विरूद्ध साहित्यिक असा महिनाभर नवीन वादाला यामुळे तोंड फुटले होते.
दुसरा वाद म्हणजे गानसम्रज्ञी लता मंगेशकर यांना त्यानंतरचा पुरस्कार घोषित झाला.मग तत्कालिन सांस्कृतिक कार्य मंत्री अनिल देशमुख यांनी हा पुरस्कार सोहळा नागपूर येथे आयोजित करण्याचा आग्रह धरला.तेव्हा अनिल देशमुख हे अपक्ष आमदार असल्याने अन् १९९५ सालचे सरकार अपक्ष आमदारांवर तग धरून असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द खाली पडून न देता, त्यांची इच्छा लागलीच पूर्ण केली. नागपूरचा पुरस्कार सोहळा अगदी दृष्ट लागावी असा झाला. भव्य गर्दी.. प्रमुख पाहुण्यांची रेलचेल..उत्कृष्ट अशी रोषणाई, पण आयत्या वेळी माशी शिंकली. सोहळ्याला गालबोट लागले.कार्यक्रमाच्या दिवशी अर्धा हिस्सेदारी म्हणून भाजपचा पाठींबा असलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे चक्क पाचव्या मजल्यावर एका गावातील पाण्याच्या प्रश्नावर बैठक घेत बसले होते.हे मंत्रालयातील काही पत्रकारांच्या लक्षात आले की नागपूरला येवढा मोठा शानदार सोहळा असताना, मुंडे साहेब मंत्रालयात कसे..! काही तरी गडबड आहे. याची पत्रकारांच्या मनात पाल चुकचुकली. तेव्हा पत्रकारांनी सुरू असलेल्या बैठकीत घुसून आपण नागपूर सोडून मंत्रालयात कसे बसला. ही मनातील शंका मुंडे यांना बोलून दाखविली. मग काय त्यांनी हसत हसत आपल्या गंमतीदार शैलीत जिथं आमंत्रण नाही,तिथे जात नाही.अशा शब्दात उत्तर दिले.हे ऐकुन काही क्षण पत्रकारांना कळेना.मुंडे साहेब काय म्हणतात.अखेर त्यांनी निमंत्रण पत्रिकाच दाखवून आम्हाला विचारले की,तुम्हाला या पत्रिकेत कुठे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे नाव दिसते का?तेव्हा कळेल की,त्यांना मनोहर जोशी यांनी मुद्दाम नागपूरला घेऊन जाण्यास डावल्याने मुंडे साहेब मंत्रालय रुसून बसले होते.दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन्स दिसल्या.अन् सकाळी – सकाळी सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर यांना आपल्या देवगिरी बंगल्यातून रामटेक या बंगल्यावर चालत जावून गोपीनाथ मुंडे यांची माफी मागावी लागली.
त्यामुळे महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सरकारचा सर्वोच्च असला तरी नेहमी वादात राहिला आहे.अनेक मान्यवरांना पुरस्कार जाहीर होवून पुरस्कार प्रदान करायला अनेक वेळा उशीर झाला आहे. दरम्यान वयोमानामुळे दोन पुरस्कार सन्मानिताचे निधन झाल्याने त्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्याची वेळ सांस्कृतिक कार्य खात्यावर आलेली.अशा या निष्काळीपणामुळे या पुरस्कार सन्मानिताचा अवमान म्हणावा लागेल. अनेक पुरस्कार विजेते हे ज्येष्ठ असल्याने त्यांना पुरस्कार घोषित होताच,अवघ्या महिन्याभरात पुरस्कार प्रदान केला तर असे दुर्दैवी प्रसंग ओढवणार नाही.याचे भान प्रत्येक विद्यमान सरकारने ठेवले तर असे मरणोत्तर पुरस्कार देण्याची वेळ यापुढे कधी येणार नाही.
सन २०१४रोजी महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार आले.त्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीमध्ये अनेक मान्यवर या समितीचे सदस्य होते. पण त्यांनी जाहीर केलेल्या पुरस्काराने येवढा वाद निर्माण झाला की,या वादाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सन २०१५मध्ये या महायुतीच्या सरकारने आपल्या काळातील पहिला पुरस्कार घोषित केला. मग काय अनेक संघटनानी त्यांच्या नावाला विरोध केला.ज्या ठिकाणी पुरस्कार सोहळा होईल.तो कार्यक्रम आम्ही हाणून पाडू. असा जाहीर इशारा सरकारला देण्यात आला..त्यामुळे तेव्हाच्या सांस्कृतिक कार्य मंत्र्यांना पुरस्कार प्रदान सोहळा कुठे घ्यावा. याची जागा निवडता-निवडता दम छाक झाली होती.शिवाजी पार्क,नागपूर,पुणे,अशी सर्व ठिकाणची तपासणी झाली. पण हा सोहळा आयोजित करायला एकही जागा सुरक्षित वाटली नाही. अखेर राज्यपाल यांचे राजभवन या ठिकाणी कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले.या कार्यक्रमासाठी मोजून दोनशे मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.अत्यंत कडक सुरक्षेत बाबासाहेब पुरंदरे यांना आदल्या दिवशी राजभवनात आणले गेले.अख्खे राजभवन एखादा राष्ट्रपती यावा,अन कडक सुरक्षा असावी.असे पोलिसांनी राजभवन वेढले होते.अखेर दि.१९ ऑगस्ट २०१५रोजी सायंकाळी “ना भूतो ना भविष्य” असा कडक सुरक्षा व्यवस्थेत हा सोहळा पार पडला.
त्यानंतर मात्र सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी हा पुरस्कार देण्याचे धाडस केले नाही.म्हणजे २०१५ सालानंतर तर आजमितीला महाराष्ट्रात महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करावा,अशी एकही सन्मानित व्यक्ती सांस्कृतिक कार्य खात्याला सापडली नाही।।


सध्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या घरीच सांस्कृतिक कार्याचा वारसा आहे.त्यामुळे हे खातं त्यांना नवीन वाटणार नाही.मात्र त्यांनी या खात्यातील अधिकाऱ्याचे किती ऐकायचे आणि एखादा निर्णय किती दिवस रेंगाळत ठेवायचा यावर त्यांच्या कार्यपध्दतीची दिशा भविष्यात ठरणार आहे.दर वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची पध्दत नाही.असा एका सांस्कृतिक कार्य मंत्र्याने जावई शोध लावला होता.परंतु त्यांच्या जीआर मध्ये काय म्हटले याची सामान्य लोकांना कल्पना नाही.पण या महाराष्ट्रात निश्चित दरवर्षी गौरव करावा अशी विभूतिची कमी नाही.आज आपल्या राज्यात सर्व क्ष्रेत्रतील लोकं प्रगती करीत आहे.हे मान्य करावाच लागेल.

कोर्टातून अपहरण केलेल्या वकीलाचा खून, तीन संशयित अटकेत

0

पुणे शिवाजीनगर कोर्टातून अपहरण केलेल्या वकिलाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पुणे पोलिसांनी ३ संशयितांना अटक केली. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दृश्यम चित्रपटाच्या कथेनुसार हा खून झाला असल्याचे समजते.मोरे याचा मृतदेह ताम्हिणी घाटात नेहून टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर कोर्टाने त्या तिघांना आज ४ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

उमेश चंद्रशेखर मोरे रा. (गुरुदत्त अपार्टमेंट, पवार हॉस्पिटल शेजारी, बालाजीनगर, धनकवडी) हे दि. 1 ऑक्टोबरपासून कोर्टातून बेपत्ता झाले होते.त्यांचे अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची तक्रार उमेश चा भाऊ प्रशांत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परंतु आता बेपत्ता झालेले ॲड. उमेश मोरे यांचा खून झाल्याचे उघड झाले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी कपिल विलास फलके (वय ३४, रा.चिखली) , दीपक शिवाजी वांडेकर (वय २८ ,रा,सालेवडगाव,ता,आष्टी, जि. बीड) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय ३२,रा. संतनगर मार्केटयार्ड) या तिघांना अटक केली आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी उमेश मुळे यांचा शोध घेण्यासाठी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. यावेळी उमेश मोरे हे बेपत्ता झाल्याचा दिवशी त्यांच्या आसपास संशयास्पदरित्या दोन व्यक्ती दिसत होत्या. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र पथकही तयार करून तांत्रिक बाजूने तपास केला जात होता.

उमेश मोरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. दोन वर्षांपूर्वी एका मोठ्या लाच प्रकरणाच्या गुन्ह्यातील ते फिर्यादी होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भूमिअभिलेख अभियंता बाळासाहेब वानखेडे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. 1 ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे न्यायालयात गेले होते. न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मित्रांनाही ते भेटले. त्यानंतर पत्नीशी फोनवर बोलल्यानंतर घरी येतो असे त्यांनी सांगितले. परंतु रात्री नऊ वाजल्यानंतर ही ते परत आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती.

महापौरसाहेब ,’दार उघडा ,हो दार उघडा ‘ (व्हिडीओ )

हडपसरच्या कचरा प्रश्नावर आंदोलनाची पराकाष्ठा

पुणे- महापालिकेतील नव्या इमारतीत वाढलेल्या  ‘अँटीचेंबर्स बैठकांमुळे ‘ आज हडपसरच्या 2 नगरसेवकांना हडपसरला कचरा डेपो नको हे आंदोलनात्मक पद्धतीने महापौरांपुढे सांगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली . राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि अशोक कांबळे यांनी या साठी मोठी पराकाष्ठा केली . अखेरीस त्यांना या बैठकीत प्रवेश मिळाला आपले गार्हाणे मांडता आले. पण यश मात्र कितपत मिळेल हे देवभरोसे सोडून माघारी परतावे लागले. हडपसर येथे कचरा डेपो नको म्हणून गेली कित्येक वर्षे येथील नगरसेवक ससाणे झटत आहेत . सातत्याने ते आंदोलने करीत आहेत. आजच्या आंदोलनाने त्यांना महापालिकेतील बैठकांमध्ये जाण्यास ,महापौरांपुढे जाण्यास किती अनंत दरवाजे अनंत अँटीचेंबर्स  पार कराव्या लागतात हे स्पष्ट दिसून आले. एवढ्या महत्प्रयासाने प्रवेश मिळवून देखील  महापालिकेतीलअनेक विषयांवर संबधित नगरसेवक किंवा पदाधिकारी , अधिकारी यांच्या बैठका पारदर्शकपणे होण्याचे दिवस संपुष्टात आल्याच्या  चित्रावर शिक्कामोर्तब झाले आहे. पहा या आंदोलनाची हि अर्थात दरवाजापर्यंत ची झलक ….

केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत जाहीर करावी-देवेंद्र फडणवीस

0
  • राज्य चालवायला हिंमत लागते, मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये,

दौंड: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मदतीसाठी केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे राज्य चालवायला हिंमत लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थिल्लरपणा करु नये, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी, काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत फडणवीस यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या.

आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

0

मुंबई, दि. 19 : महाराष्ट्रात विविध भागात पावसाने थैमान घातले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातील अनेक भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार  शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे अश्या निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण  मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून प्रतिकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.

राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ०८ मार्च २०१९ च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती  भुजबळ यांनी दिली आहे.

अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद दौऱ्यावर

0

मुंबई, दि. १९ : –  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील, तसेच शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील.

मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रम :

स.९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण, स.१०.१५ वा. काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. १०.१५ वा. काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. स. ११.१५ वा. अपसिंगा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी. स. ११.३५ वा. अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १२.२० वा. पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी राखीव. दु. १ ते १.४५ वाजेपर्यंत राखीव.

दु. १. ४५ वा. शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण  व ३.३० वा. सोलापूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप

0

मुंबई, दि. 19 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.

श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले,  परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरीबात गरीब व्यक्तीमध्ये आपल्या ताटातील अर्धे जेवण दुसऱ्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले तरी त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटार कार व विमानाने फिरतील असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानचे शुभ्रांशु दिक्षीत यांनी प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कोरोना काळात अनेक डबेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या व त्यांचा रोजगारही गेला. या सर्वांना पुनश्च रोजगार मिळावा या दृष्टीने सायकल वाटप करण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई डब्बावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते.

तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा

0

सोलापूर, दि. 19 : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.

आस्थेवाईकपणे चौकशी

रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री  ठाकरे यांनी  बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. यावर शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

आपत्तीग्रस्तांना धनादेशाचे वाटप

यावेळी आपत्तीग्रस्त रमेश बिराजदार, लक्ष्मण कोणदे, शोभा बिराजदार, नागेंद्र बिराजदार, चन्नव्वा वाघमारे यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री  ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले.

ठाकरे यांनी बोरी नदीची पाहणी करून नुकसान झालेल्या भागाची त्वरित डागडुजी करण्याचे निर्देश दिले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी पूरग्रस्त आणि बाधित झालेल्या कुटुंबांची माहिती दिली. रामपूर गावातील 50 टक्के रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी बोरी नदीला पूर आल्याने 40 घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेकडो एकर शेतीचेही नुकसान झाले आहे. बोरी नदीवरील पुलावर पाणी आल्याने गावाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची सात जनावरे वाहून गेल्याने दगावली आहेत. तुरीच्या आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहितीही श्रीमती मरोड यांनी दिली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, जि.प. सदस्य आनंद तानवडे, सरपंच शोभा बिराजदार, उपसरपंच रोहिणी फुलारी, आदींसह परिसरातील आपत्तीग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

चॅट करता करता…

0

नवरात्रीतील ९ दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे माहितीपत्रक राहीने ‘सखी ग्रुप’वर टाकले – ‘सख्यांनो सर्वांच्या सोयीनुसार दुपारची वेळ ठरवली आहे आणि आसावरी त्याआधी २ दिवस ‘Google Meet’वर आरती, भजन, स्तोत्र यांची रंगीत तालीम घे गं, म्हणजे आयत्या वेळी अडचण येणार नाही.’ राहीने जवळजवळ फर्मानच काढले. व्हॉटसअपवर नुसते गुड नाईट-गुड मॉर्निंग आणि फॉरवर्डेड मेसेज न पाठवता कोडी, बुद्धीला खाद्य मिळेल असे काहीसे चालू ठेवायचे; नाविन्यपूर्ण काय काय शिकता येईल तेही शिकायचं असं आमच्या सखी ग्रुपवर आधीच ठरलं होतं. आता लॉकडाऊनमधील 7 महिन्यांच्या कालावधीत त्यात रोज नवनवीन उपक्रमांची भर पडते आहे. या लॉकडाऊनमध्ये दुपारी सगळी कामं आटपली की निवांत वेळात सकाळपासूनच्या मेसेजेना रिप्लाय द्यायचा आणि रात्री निजानीज झाली की निवांतपणे गप्पा मारायच्या (त्यांच्या भाषेत चॅट करायचं) हा साधारण सर्व महिलांचा व्हाट्सअपवरचा दिनक्रम. तसं पाहिलं तर पूर्वी घरातील बायकांचा निवांत वेळात गप्पा मारण्याचा नेम होताच; पण त्याचं स्वरूप बऱ्यापैकी वेगळं होतं. दुपारच्या वेळात कामाची आवराआवर झाल्यावर, थोडी  विश्रांती झाली की कुठे तरी सूप पाखडण्याच्या आवाजाने जाग यायची आणि निवडटीपणाची कामं बाकी आहेत याची आठवण यायची. मग गव्हाचा किंवा तांदळाचा डबा, सोबत चाळणी, ताट, सूप या लवाजम्यासह ग्यालरीत विराजमान व्हायचा. तोपर्यंत आजूबाजूच्या ३-४ घरातील गृहिणी जमा झालेल्या असायच्या आणि गप्पा मारत मारत निवडणं-टिपणं चालू असायचं. घरगुती गोष्टींपासून नाटक, सिनेमा, खरेदी ते अगदी राजकारणापर्यंत अनेक विषयांवरील चर्चांसोबत सुखदुःखाच्या गोष्टी अगदी सहज सांगितल्या जायच्या…मन हलकं होऊन जायचं. नव्वदीच्या दशकापर्यंत शहरातील बिल्डिंग आणि चाळ संस्कृतीमध्ये हे चित्र ठळकपणे तरग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात दिसायचं. गावाकडे पारावरच्या गप्पा किंवा कुणाच्या घरी एकत्र जमून निवडणं टिपण किंवा वर्षभराचे वाळवणाचे पदार्थ करण्याच्या निमित्ताने गप्पांना ऊत यायचा. शहरात कालांतराने सुपर मार्केटचा उदय झाला आणि चकचकीत प्लास्टिकच्या पिशव्यांमधून स्वच्छ निवडलेलं धान्य घरी येऊ लागलं. तांदूळ निवडणं कमी झालं तरी गप्पा थांबल्या नव्हत्या. कालपरत्वे चाळी पाडून टोलेगंज इमारती उभ्या राहू लागल्या; फ्लॅट संस्कृती आली, त्याबरोबरच कॉमन ग्यालरी जाऊन पॅसेज आणि बंद घरं आली. रोजच्या मनमोकळ्या गप्पांना ब्रेक लागला आणि एकत्रित निवडटिपंणही थांबलं.घरोघरी टेबलवर ट्रिंगट्रिंग करणारे फोन विराजमान झाले होते, पण त्यावर खूप गप्पा ठोकायच्या तर भरमसाठ बिल यायचं. काही वर्षांनी त्यालाही पर्याय निघाला…मोबाईल! सुरुवातीला व्यावसायिकांकडे आढळणारा मोबाईल हळूहळू नोकरदार वर्ग, तरुणाईच्याही हातात अनायसे आला. मोबाईल यत्र सत्र सर्वत्र दिसू लागला. गृहिणी ते ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा, एकदा का नेट पॅक भरला की अनलिमिटेड गप्पा आणि कॉल.खरंतर करोनाच्या काळात या मोबाईलने सगळ्यांनाच तारलं. गृहिणी आणि ज्येष्ठांना मोठा आधारच झाला. चॅट, व्हिडिओ कॉल, झूम यांद्वारे सगळ्यांशी कनेक्ट राहता आलं आणि सुखदुःखाच्या चार गोष्टीही झाल्या. सकाळी योग क्लास, दुपारी अवांतर गप्पा तर कधी गाण्याच्या भेंड्या व सोबत वेगवेगळे विषय, त्यावर चर्चा, ज्ञानात भर घालणारे मेसेज…इथल्या सर्वसमावेशक नेटगॅलरीत हवं तेवढं साठवता येऊ लागलं. बंदिस्त दारात कोंडलेल्या मनाला मोकळा श्वास घ्यायला मिळाला, निवांत वेळ असताना चॅट करता करता… पूर्णिमा नार्वेकर, दहिसरमो. 9820003834

नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन प्रस्ताव पाठवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

0

सोलापूर, दि. 19 : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले.

सोलापुरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बैठक घेतली. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जीवितहानीची मा‍हिती शक्य तितक्या लवकर संकलित करुन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

हवामान विभागाने येत्या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि कृषि विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना द्याव्यात. पूर येण्याची शक्यता असणाऱ्या भागातील नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची काळजी घ्यावी. पावसात  मनुष्यहानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री  ठाकरे यांनी दिल्या.

महसूल मंत्री थोरात म्हणाले, पावसामुळे पुणे विभागातील जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेऊन राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल. त्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची नोंद देखील नुकसानीच्या अहवालामध्ये घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोलापूर तसेच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पुणे विभागात सर्वाधिक जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. जिल्ह्यात शेती, फळबागा, रस्ते, वीज वहन यंत्रणा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. येत्या तीन चार दिवसात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.

या बैठकीस पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जलसंपदा विभागाचे जयंत शिंदे, धिरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

0

मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील.

शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, क्रिकेटर संदीप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य म्हणून या समितीत असणार आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षे कालावधीसाठी किंवा समितीची पुनर्रचना यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत कार्यरत असेल.

वर्दीतील स्त्रीशक्ती : पोलीस नाईक विद्या कोळेकर

0

मुंबई, दि. 19 : नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे. त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

पोलीस नाईक विद्या कोळेकर

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस नाईक विद्या कोळेकर यांनी त्यांच्या पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना मैदान तयार करुन देण्यासाठी भरीव योगदान दिले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी कोळेकर यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे. असे गौरवोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.