Home Blog Page 2422

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक

0

मुंबई, दि. २० : राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे.

हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन, असेही श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

कामगार संघटनांनी नवीन कामगार संहितेबाबत लेखी सूचना कळवाव्यात – कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील

0

मुंबई, : केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध २९ कामगार कायदे एकत्रित करून वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता २०२० विधेयके २३ सप्टेंबर रोजी पारित केली आहेत. या नवीन संहितेबाबत विविध कामगार संघटनांनी लेखी सूचना कळवाव्यात, असे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

नवीन कामगार संहितेबाबत राज्यातील कामगार संघटनांची मते जाणून घेण्यासाठी कामगार मंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कामगार आयुक्तालय येथे बैठक झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद- सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने इंटकचे कैलास कदम, आयटकचे उदय चौधरी, आय.टी.यूचे विवेक मौंटरो, हिंद मजदूर सभेचे संजय वढावकर, टी.यु.सी.आयचे ॲड. संजय सिंघवी, भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके, वर्किंग पीपल्स चार्टरचे चंदन कुमार, संयुक्त कृती समितीचे विश्वास उटगी, एन.टी.यू.आयचे एम.ए.पाटील. ए.आय.सी.सी.टी.यूचे अनिल त्यागी, आर.एम.एम.एसचे निवृत्ती देसाई, भारतीय मजदूर संघाचे ॲड. अनिल ढूमणे उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशात कामगार चळवळ उभी राहिली. त्यातून कामगारांचे हित जोपासले गेले. महाराष्ट्रात कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन कामगारांसाठी विविध कायदे आणण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाला तर सशक्त कामगार चळवळीचा वारसा आहे. कामगार कायदा आणि कामगार चळवळींच्या अभूतपूर्व इतिहासाला धक्का न लावता महाराष्ट्रात कामगारांचे हक्क आणि कायदे अबाधित ठेवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.

केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार संहितांचे सादरीकरण कामगार विभागाकडून ७ ऑक्टोबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळासमोर करण्यात आले होते. या सादरीकरणाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन कामगार संहितेबाबत सर्व संबंधित कामगार संघटनांशी संवाद साधून त्यांचे कामगार संहिताबाबत मते जाणून घेण्यात यावीत असे सांगितले होते. त्यानुसार आज ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे कामगार मंत्री श्री. वळसे- पाटील यांनी सांगितले.

आमदार भाई जगताप यांनी नवीन कामगार संहितेमध्ये कामगार हाच केंद्रस्थानी असणे गरजेचे असून विविध कामगार संघटनांनी प्रत्येक अधिनियमाचा कामगारांना होणारा फायदा लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, देशात कोणताही कायदा नव्याने निर्माण झाला की नागरीकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. कामगारांचे हक्क आणि कायदे अबाधित ठेवण्यासाठी ही लढाई केवळ सरकारचीच नाही तर कष्टकऱ्यांची देखील आहे. महाराष्ट्र हे कष्टकरी कामगाराच्या डोक्यावरचे ओझे पाहून कायदे निर्माण करणारे संवेदनशील राज्य आहे. काही राज्याने कामगारांची परिस्थिती पाहून कामगार कायद्यात बदल केले आहेत. तरी महाराष्ट्र राज्याने देखील कामगारांना न्याय देणारा कायदा अंमलात आणून कामगारांना न्याय द्यावा.

श्री. विश्वास ऊटगी यांनी असे नमूद केले की, सदर संहिता तयार करताना कामगार संघटनांना विश्वासात घेतले गेलेले नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने एकमुखी मागणी केली आहे की, कामगार हा विषय राज्य घटनेच्या समवर्ती सुचीमध्ये असल्याने राज्य शासनाने फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, कंत्राटी कामगार, कामगार कपात इत्यादीसाठी वेगळे नियम करावेत.

यावेळी उपस्थित विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी आपापली मते नोंदवली.

केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध २९ कामगार कायदे एकत्रित करून औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता २०२० तसेच वेतन संहिता, २०१९ हे चार विधेयके पारित केली आहेत. औद्योगिक संबंध संहिता,२०२० मध्ये एकूण ३ अधिनियम आहेत. तर व्यावसायिक सुरक्षा व कार्यस्थळ परिस्थिती अधिनियम संहिता,२०२० मध्ये एकूण १३ अधिनियम आहेत. सामाजिक सुरक्षा संहिता २०२० मध्ये एकूण ९ अधिनियम तसेच वेतन संहिता २०१९ मध्ये ४ अधिनियमाचा समावेश आहे. आज झालेल्या चर्चेदरम्यान सध्याची स्थिती आणि नवीन कायदा आल्यानंतरची स्थिती कशी असेल हे संगणीकृत सादरीकरणातून मांडण्यात आले.

अग्रवाल परिवार, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडतर्फे बोरा हॉस्पिटल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट

0

पुणे : अग्रवाल परिवार आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या वतीने गणेश पेठ परिसरातील बोरा हॉस्पिटल कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री व अग्रवाल कुटुंबियांच्या हस्ते हे व्हेंटिलेंटर मशीन हॉस्पिटलचे डॉ. महेश बोरा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
प्रसंगी लायन्स क्लब ऑफ पुना गणेशखिंडचे अध्यक्ष ज्योतिकुमार अगरवाल, अग्रवाल परिवारातील जगदीशप्रसाद अग्रवाल, उद्योजक श्याम अग्रवाल व विजय अग्रवाल जगदीशप्रसाद अग्रवाल, उद्योजक श्याम अग्रवाल व विजय अग्रवाल, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे विजय भंडारी, द्वारका जालान, श्याम खंडेलवाल, महेंद्र गादिया, अजय जैन, कुरेश पोलन, कांतीलाल पालेशा, राकेश मित्तल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लायन्स अभय शास्त्री म्हणाले, “कोरोना महामारीचा सामना करताना गरजुंसाठी मदतीचा हात पुढे करण्यात येतोय, ही बाब सकारात्मक आहे. आजच्या परिस्थितीत रुग्णालयाकरीता व्हेंटिलेटर खूप गरजेची गोष्ट आहे. अग्रवाल परिवार यांनी व्हेंटिलेटर मशीन भेट देत माणुसकीचे काम केले आहे. लायन्स क्लब गणेशखिंडच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. क्लबमधील सर्व सभासद यामध्ये मनापासून सहभागी होत आहेत, हे पाहून आनंद होतो.”
डॉ. महेश बोरा म्हणाले, “हॉस्पिटलच्या कोविड सेंटरला व्हेंटिलेटर भेट दिल्याबद्दल अग्रवाल परिवार आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचा आभारी आहे. गेल्या सहा-सात महिन्यापासून सर्व डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी मेहनत घेत काम करत आहे. रुग्णाला बरे करण्यासाठी झटत आहेत. रुग्णांना उपचार करताना व्हेंटिलेटर मशीनचा खूप उपयोग होईल.” द्वारका जालान यांनी आभार मानले. यावेळी येथील नियोजन पाहणारे, तसेच डॉक्टर्स यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

महापौरसाहेब ‘नायडू’ च्या स्थलांतराला तुमच्या सहकारी पक्षाचाही विरोध ..

0

पुणे- वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुण्यातील ऐतिहासिक नायडू रुग्णालय स्थलांतरित करणार असल्याच्या बातम्या ..खोट्या असल्याचा दावा करणाऱ्या महापौरांना आता त्यांच्या सत्तेत सहभागी झालेल्या आरपीआय आठवले गटाने हि टोला लगावला आहे. आणि ..खबरदार नायडूला धक्का लावू देणार नाही … अशी भूमिका आज जाहीर केली आहे पुण्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडणारे नायडू हॉस्पिटल अन्यत्र स्थलांतरित करून तेथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची प्रशासनाची तयारी सुरु असल्याचा दावा करत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट)यांनी त्यास तीव्र विरोध केला आहे.
पुण्यातील नायडू हॉस्पिटल हे ब्रिटिशांच्या काळातील असून तेथे सर्व संसर्गजन्य आजारावर उपचार केले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येथे येतात. सर्वसामान्य नागरिक आणि गोरगरिबांसाठी हे हॉस्पिटल अत्यंत उपयुक्त ठरले आहे. कोरोनाच्या काळात नुकताच त्याचा अनुभव शेकडो नागरिकांना आला आहे.
पुणे महानगरपालिकेने नुकतेच तेथे स्व. अटलबिहारी वाजपेयी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बांधकाम देखील सुरु केले. आर. पी आय (आठवले गटाने) याला तीव्र विरोध दर्शविला आहे. महापालिकेतील आर.पी.आय च्या पक्षनेत्या सुनीता वाडेकर, उपमहापौर आणि नगरसेवक सिदार्थ धेंडे ,घोले रोड प्रभाग समितीच्या अध्यक्षा सोनाली लांडगे ,नगरसेविका हिमाली कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे कि ,शहरात अन्यत्र ओपन स्पेस उपलब्ध असताना याच जागेचा अट्टाहास सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींना का व्हावा. नैसर्गिक आपत्ती तसेच साथीच्या आजारांच्या काळात हे रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरले आहे. आर.पी आय ( आठवले गट) पक्षाचा वैदकीय महाविद्यालयाला विरोध नाही परंतु ते अन्यत्र स्थलांतरित करावे अशी मागणी त्यांनी केली असून त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रारूप मतदान केंद्राच्या यादीबाबत हरकती व सूचना पाठवाव्यात

0

पुणे, :-पुणे जिल्हा शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक-२०२० साठी निश्चित करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांच्या यादीबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रशांत पिसाळ, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि पदवीधर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ pune.nic.in उपविभागीय अधिकारी, तहसिल कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी निरीक्षणासाठी तसेच मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रारूप मतदान केंद्राच्या यादीबाबत पुणे जिल्हाच्या हद्दीतील हरकती व सूचना असल्यास त्या प्रारूप मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांक पासून ७ दिवसांपर्यंत म्हणजे दिनांक २२ऑक्टोबर २०२० पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांच्याकडे पाठवाव्यात.

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांची योजनेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करणार-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे,: महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा कोविड रुग्णांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयांची या योजनेची मान्यता रद्द करुन त्याऐवजी अन्य रुग्णालयांचा समावेश करण्याची शिफारस राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी व समिती सदस्य उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील कोविड व नॉन कोविडच्या हजारो रुग्णांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला आहे. काही रुग्णालये योजनेचा लाभ मिळवून देण्यात टाळाटाळ करत असल्याचे आढळून येत आहे. या योजनेचे काम न केल्यामुळे मान्यता रद्द करण्यात येणाऱ्या रुग्णालयांची चौकशी करुन जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी दिल्या. अधिकाधिक रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या रुग्णालयांच्या कामाचे कौतुक करुन अशा रुग्णालयांना प्रोत्साहन द्यावे,असेही त्यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन व समिती सदस्यांना सांगितले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येणारी रुग्णालये व त्यांनी रुग्णांना दिलेला लाभ यांची आकडेवारी, आतापर्यंतचे एकूण लाभार्थी याबाबतची माहिती घेवून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना मिळवून देण्यासाठी समितीने प्रभावीपणे काम करावे. या कामी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहकार्य महत्वाचे आहे. समाजात डॉक्टरांना मानाचे स्थान दिले जाते. डॉक्टरांनीही समाजासाठी सेवाभावी वृत्तीतून आरोग्य सेवा द्यायला हवी,असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी योजनेच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करुन योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले.
सागर पाटील यांनी योजने अंतर्गत हॉस्पिटल, लाभार्थी रुग्ण व अन्य अनुषंगिक माहिती दिली.
अधिकाधिक रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी व समिती सदस्यांनी बैठकीत चर्चा केली.

आ.चंद्रकांतदादांनीही दिला महापालिकेकडील अपंगांच्या हक्कासाठी संघर्षाचा इशारा

0

पुणे- महानगरपालिकेने शहराच्या एकूण बजेट च्या ५% रक्कम अपंगांसाठी खर्च करण्याचे बंधन असून ते होताना दिसत नाही,त्यासाठी व नौकरी मधे ४% दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी आगामी काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.असे वक्तव्य येथे क्रिएटिव्ह फौंडेशन आणि एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थांनी दिव्यांगां साठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आ. चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे केले आहे. समाजात सातत्याने सेवाकार्य करत राहायचे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण असून त्या संस्कारांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला असे ते येथे म्हणाले

यावेळी क्रिएटिव्ह चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्टचे अमोल शिनगारे,नेचरवॉक चे अनुज खरे,नगरसेवक दीपक पोटे,नगरसेवक जयंत भावे,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी,शहर चिटणीस प्रशांत हरसुले,महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे,कोथरूड मंडल सरचिटणीस गिरीश भेलके व अनुराधा एडके,उपाध्यक्ष राज तांबोळी,प्रभाग १३ चे अध्यक्ष राजेंद्र येडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ.पाटील म्हणाले या कार्यक्रमाचे मी जाहीर कौतुक करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे स्वप्न आहे की या देशात कोणीही मागून पोट भरु नये तर कष्ट करुन पोट भरावे,त्यासाठी त्यांनी आत्मनिर्भर भारत ची घोषणा केली आहे व तसे नियोजन केले आहे असे ही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले नरेंद्रभाई गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तुंचा लिलाव आयोजित करायचे,अनेक धनिक व दानशूर व्यक्ती त्या वस्तू  खरेदी करत असत व त्यातून उभ्या राहणाऱ्या निधीतून मोदीजी गरजूंना मदत करत असत,यातूनच त्यांनी स्त्रीयांसाठीची शाळा उभी केली व दिव्यांगांना स्वयं पूर्ण करण्यासाठीचे अनेक उपक्रम राबवले.अहमदाबाद येथील संस्कारधाम ही स्त्री शिक्षणासाठी उभारलेली संस्था सर्वांनीच अनुभवावी अशी असल्याचे ही ते म्हणाले.त्यालाच अनुसरून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहांतर्गत अनेक कार्यक्रमांचे नियोजन झाले
दिव्यांग व्यक्तीस सहानुभूतीची नव्हे तर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देण्याची व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कार्य करण्याची गरज असून क्रिएटिव्ह फौंडेशन त्यादृष्टीने काम करत आहे.येणाऱ्या काळात दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने उपक्रम राबविले जातील असे क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच विविध उद्योगां मधे दिव्यांगां साठी ४% जागा राखीव असून त्या जागांवर दिव्यांगांनाच नौकरी मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट ही दिव्यांगां साठी काम करणारी संस्था असून दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे, पण कोरोनाच्या संकटकाळी दिव्यांगांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असून आजच्या कार्यक्रमातून त्यांना दसरा दिवाळी साठी उपयुक्त शिधा देउन एक छोटीशी मदत करत आहोत असेही ते म्हणाले.यावेळी पुनीत जोशी यांच्या वतीने कर्वेनगर येथील जिम मधे उकडलेली अंडी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग उल्हास जौंजाळ या बांधवास व्हील चेयर भेट देण्यात आली.तर क्रिएटिव्हच्या वतीने चहा विक्री करुन उदरनिर्वाह करु पाहणाऱ्या संतोष भालेराव या दिव्यांग मित्रास चहाचा मोठा थर्मास भेट देण्यात आला.हा धागा पकडून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की महानगरपालिकेने शहराच्या एकूण बजेट च्या ५% रक्कम अपंगांसाठी खर्च करण्याचे बंधन असून ते होताना दिसत नाही,त्यासाठी व नौकरी मधे ४% दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी आगामी काळात आपल्याला संघर्ष करावा लागेल.कारण तसे झाल्यास दिव्यांग बेरोजगार राहणार नाहीत व स्वावलंबी होतील.तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना चंद्रकांतदादांनी नरेंद्र भाई मोदी यांचे वक्तव्य सांगितले की राजकारण करत असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर मिळणाऱ्या निधीचा विनियोग हा समाजोपयोगी विकासासाठीच व्हावा तसेच तुम्ही जिथे कुठे आहात तिथे कोणी अडचणीत नाही ना हे बघावे असे ही ते म्हणाले.
मंजुश्री खर्डेकर यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय मिळावा यासाठी मी माझ्या पदाचा वापर करत असून राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात जास्त समाधान मिळते व पदाचा वापर हा गरजूंसाठी करता येतो हे स्पष्ट करतानाच दिव्यांगां साठी सर्वतोपरी मदत करेन असेही त्या म्हणाल्या.
मंजुश्री खर्डेकर व अमोल शिनगारे यांनी प्रास्ताविक,संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर अनुज खरे यांनी आभार प्रदर्शन केले.

स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य कराव्यात

0

मुंबई, दि. 20 : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एका महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवन येथे राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि त्यांच्या पाल्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, स्वातंत्र्य सैनिक कक्षाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, उपसचिव राहुल कुलकर्णी, करपते, वित्त विभागाचे उपसचिव सु.मो. महाडिक, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेचे भाऊसाहेब साळुंखे, आप्पासाहेब शिंदे उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा, स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा सन्मान झालाच पाहिजे. या दृष्टीने त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे समांतर आरक्षण तसेच, ज्याप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती केली जाते त्याप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने कारवाई करावी. याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष न करता स्वातंत्र्य सैनिक हयात नसल्यास कुटुंबातील किमान एका व्यक्तीस शासकीय नोकरीचा लाभ देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी.

स्वातंत्र्य सैनिकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करणे, घरकुल योजनेत विशेष बाब म्हणून सामावून घेणे आणि स्वातंत्र्य सैनिकासह त्यांच्या वारसदारास ओळखपत्र देण्यासंदर्भात  सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार

0

मुंबई, दि. 20 :- दिव्यांग व्यक्तींमध्ये अंत्योदय योजनेची  माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत मोफत वेबिनार आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार दि. 21 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2.00 वाजता अंत्योदय योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली योजना व दिव्यांग व्यक्ती याबाबत अधिक माहिती देण्याकरिता कैलास पगारे, भा.प्र.से. यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता https://youtu.be/9djIARbskuM या लिंकचा वापर करावा. तसेच यापूर्वी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत आतापर्यंत घेण्यात आलेल्या वेबिनारचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी.

रब्बी हंगामात अखंडित वीजपुरवठा सुरू राहणार – ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

0

मुंबई,  :  येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी,असे आवाहनही ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले.

   ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर  महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगडला ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाशगड येथे आयोजित बैठकीत परतीच्या पावसामुळे राज्याच्या काही भागात झालेल्या वीजयंत्रणेच्या नुकसानीचा   आढावा तसेच राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती तसेच इतर विविध मुद्द्यांवर बैठक घेतली. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारे, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे तसेच चारही वीज कंपन्यांचे संचालक उपस्थित होते. या बैठकीस राज्यभरातील सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक तसेच मुख्य अभियंता हे व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सहभागी झाले होते.

ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे वीजक्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. वीजबिलांची वसुली अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. एकीकडे महसुलात घट होताना दुसरीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अवकाळी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसाची अतिवृष्टी यामुळे यंदा राज्यभरातील वीजयंत्रणेला मोठे तडाखे बसले आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दर्जेदार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी वीजयंत्रणा नेहमी पाण्याखाली जाते, त्याचा अभ्यास करून भविष्यात असे प्रकार घडणार नाही अशा उपाययोजनांचा आराखडा तयार करून लगेचच या कामास सुरवात करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यासोबतच अतिवृष्टीमधील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी किंवा साहित्याची आवश्यकता असल्यास ती त्वरीत पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त स्वरुपात रोहित्र उपलब्ध करून ठेवावेत. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार ऑईल व इतर साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत असल्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

राज्यातील प्रामुख्याने नऊ जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहा गावांमध्ये सध्या वीजपुरवठा उपलब्ध नाही. तसेच सात उपकेंद्रामध्ये पाणी साचले असल्याने ते बंद आहेत. मात्र युद्धपातळीवर दुरुस्ती कामे व पर्यायी व्यवस्थेतून उर्वरित सर्व ठिकाणी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झालेला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सद्यस्थितीत वीजपुरवठ्यासंबंधी वैयक्तिक तक्रारी निवारणाचे काम सुरु असून पावसाच्या पाण्याच्या निचरा झाल्यानंतर कृषिपंपांचा वीजपुरवठा टप्पाटप्प्याने सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे यांनी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीबाबत संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये संबंधीत कंपन्यांसमोर येत्या कालावधीमध्ये येणारी आव्हाने व त्यावरील तांत्रिक, प्रशासकीय व ग्राहकाभिमुख सेवा व उपाययोजना आदींची सविस्तर माहिती देण्यात आली.

या बैठकीमध्ये मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक (वित्त) श्री सुनिल पिंपलखुटे, संचालक (संचालन व वाणिज्य) श्री. सतीश चव्हाण संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत, संचालक (प्रकल्प) श्री भालचंद्र खंडाईत,. संचालक (संचालन) श्री संजय ताकसांडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या राज्यातील रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 20 : राज्यात गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते व पुलांच्या नुकसानीचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विभागनिहाय आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते व पुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अजित सगणे, सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह राज्यातील सर्व विभागातील मुख्य अभियंते व कार्यकारी अभियंते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

श्री.सौनिक व श्री. देबडवार यांनी पाऊस व पुरामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते व पुलाच्या झालेल्या हानीची माहिती दिली. तसेच प्रत्येक विभागातील मुख्य अभियंत्यांनीही त्या-त्या विभागात झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी दिली.

राज्यात गेल्या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व ओढे, नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणचे रस्ते व पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद पडली आहे. तसेच अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

श्री.चव्हाण यांनी राज्याचा आढावा घेऊन सांगितले, पुरामुळे झालेल्या रस्ते व पूल दुरुस्ती, नवीन रस्ते बांधणी यासाठी तातडीने निधी देण्यात येईल. अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले, खराब झालेले रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती सुरू करावी. तसेच ज्या ठिकाणी रस्ते खराब झाल्यामुळे वाहतूक बंद पडली आहे, अशा ठिकाणी ते प्राधान्याने दुरुस्त करून रस्ते वाहतूक योग्य करावी. ही कामे करताना त्यांचा दर्जा व गुणवत्ता नियंत्रणावर मुख्य सचिवांनी लक्ष ठेवावे. तसेच खड्डे पडलेल्या रस्त्याची दुरुस्तीही पावसाळा संपताच सुरू करावी.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जवन -शिळींब- घुसळखांब रस्त्याच्या कामासाठी २५ कोटी मंजूर – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

0

मुंबई, दि. 20 : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पवना धरण व खडकवासला धरणामुळे पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. त्यामुळे मावळमधील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 26 मधील जवन ते शिळींब-मोरवे-घुसळखांब आणि प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 106 या रस्त्यांची हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत कामे करण्यासाठी तातडीने 25 कोटी रुपये देण्यात येणार आहे. येत्या मार्चपर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी येथे दिले.

मावळ तालुक्यातील जवन-घुसळखांब या गावामध्ये असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्र.26 व 106 च्या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी श्री. चव्हाण यांनी हे निर्देश दिले. सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह पुण्याचे मुख्य अभियंताही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील शिळींब गावामधून जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग 26 व 106 या रस्त्याची एकूण 19.08 किमी लांबी आहे. त्यापैकी 11.95 किमी लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण व 7.13 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण हायब्रीड ॲन्युईटी अंतर्गत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामासाठी परवाने मिळाले असून हे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश श्री.चव्हाण यांनी यावेळी दिले.

अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने केले जेरबंद

0

मुंबई, दि. २० : ऑनलाईन पेटीएम अपहार करणाऱ्या पेटीएम कर्मचाऱ्यास महाराष्ट्र सायबर विभागाने जेरबंद केले. यामुळे छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे वाचवण्यात यश आले असल्याची माहिती सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे.

यासंदर्भात दि. ०५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी  भागातील दुग्ध व्यावसायिक राजेश मनसुख पटेल यांनी महाराष्ट्र सायबरकडे तक्रार केली की, दि.२० ऑगस्ट २०२० आणि दि. २० सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या पेटीएम अकाउंट मधून त्यांचे अपरोक्ष ५० हजार ४४८ रुपये अज्ञात व्यक्तीने काढून घेतले आहेत.

तक्रारीवरुन नोडल सायबर पोलीस ठाणे, महाराष्ट्र सायबर, येथे भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चे कलम ४३ (अ),६६, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होतात घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ नोडल सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्ह्याशी संबधित बाबींची तपासणी, अभ्यास करून तांत्रिक पद्धतीने तपास करत संशयीत आरोपी  MD, MUNNA उर्फ मोहम्मद मुन्ना, पाशिउद्दीन अन्सारी, वय २५ वर्षे, व्यवसाय – फिल्ड सेल्स एक्झिक्युटीव्ह, यास तात्काळ अटक करण्यात आले. आरोपीने इतरही व्यावसायिकांचे पेटीएम अकाऊंटचे पासवर्ड चोरून ते गैरकामासाठी वापरल्याचे पुढे येत आहे.

नागरिकांना आवाहन

नागरिकांना महाराष्ट्र सायबरतर्फे आवाहन करण्यात येते की, छोट्या व्यावसायिकाचे मर्चंट वॉलेट अकाऊंट उघडून देण्याच्या, तसेच त्यांचा पासवर्ड सेट करून देण्याचे बहाण्याने त्यांचा पासवर्ड स्वतःकडे घेऊन अशा मर्चंट वॉलेटचा वापर नंतर आर्थिक अपहाराकरिता करण्यात असल्याचे समोर आले आहे. सर्व लहान मोठ्या मर्चंट वॉलेटच्या ग्राहकांना सुचित करण्यात येते की, त्यांच्या मोबाईल क्रमांकांचे मर्चट वाँलेट खाते इतर कोणी वापरत नाही ना? याची खात्री करून आपला पासवर्ड स्वतः बदलून तो स्वत: पुरता मर्यादित ठेवावा व सतत बदलत राहावा.

कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस उपमहानिरीक्षक हरिश बैजल, पोलीस अधीक्षक डॉ. बालसिंग राजपुत, पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर, पोलीस उप अधीक्षक  विजय खैरे, यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश सरदेसाई, सहा- पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पो.हवा. विश्वास मोहिते, पो. शि. हर्षल रोकडे, शैलेश साळुंखे, पो. शि.निलेश जंगम, पो. शि. शाम हगवणे यांनी  केली आहे.

उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना लोकल प्रवासासाठी परवानगी-पियूष गोयल

0

सर्व महिलांना उद्यापासून लोकल प्रवासासाठी संमती देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ही घोषणा ट्विटरवरुन माहिती देत केली आहे. उद्यापासून सर्व महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर मुंबई लोकल सुरु असेपर्यंत ट्रेनमधून प्रवास कऱण्याची संमती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

महिलांना लोकलचा प्रवास करु द्यावा यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला पत्र लिहिलं आहे. नवरात्रीच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी राज्य सरकारने सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचं म्हटलं होतं. मात्र रेल्वे बोर्डाने यासंदर्भातली संमती नाकारली होती. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवासाचा पेच सुटला असं वाटत असतानाच तो जैसे थेच राहिला. अशात आता राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारं पत्र आज पाठवलं.  त्याची मात्र दखल रेल्वेमंत्र्यांनी घेतलेली दिसत असून महिलांना राज्य सरकारनं मागणी केल्याप्रमाणे लोकल प्रवासास मुभा देण्यात आली आहे.१६ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने यासंदर्भातला आदेश काढला होता. मात्र रेल्वे बोर्डाने नाही म्हटलं होतं त्यामुळे महिलांना लोकल प्रवास कधीपासून करता येणार? याचं उत्तर मिळत नव्हतं ते आता रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे. उद्यापासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून मुंबई आणि उपनगरांमधील सर्व महिलांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनपासून बंद असलेल्या ट्रेन आणि त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेतेल्या लोकांसाठी सुरु झालेल्या ट्रेन्सचे दरवाजे आता सरसकट सर्व महिलांसाठीही खुले झाले आहेत.

लॉकडाऊन संपलाय पण व्हायरस नाही :नरेंद्र मोदी-LIVE

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करत आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.यावेळी ते म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाई जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत आपण खूप मोठा प्रवास केला आहे. वेळेनुसार आर्थिक गाडा हळु-हळू पुर्ववत येत आहे. आपल्यातील अनेकजण आयुष्य रुळावर आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या या काळात बाजारातही झगमगाट दिसत आहे. पण, आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, लॉकडाउन संपला आहे, पण कोरोना व्हायरस आताही आहे. पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले …

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/3626285024100787/

पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात आतापर्यंत केलेले संबोधन

तारीखघोषणावेळ
19 मार्चजनता कर्फ्यूची घोषणा29 मिनीटे
24 मार्च21 दिवसांचा लॉकडाउन29 मिनीटे
3 एप्रिलदीप प्रज्वलनाचे आवाहन12 मिनीटे
14 एप्रिललॉकडाउन-2 ची घोषणा25 मिनीटे
12 मे20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा33 मिनीटे
30 जूनअन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा16 मिनीटे