Home Blog Page 2413

महापालिकेच्या उद्यानांची आमदार शिरोळे यांनी केली पहाणी

0

पुणे-

एक नोव्हेंबरपासून पुणे शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका आणि हिरवाई उद्यानातील स्वच्छता विषयक कामांची आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, शुक्रवारी पाहणी केली.

या संदर्भात आ. सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहेकी,’ कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे गेल्या ८ महिन्यांपासून बंद असलेले पुणे शहरातील ८१ उद्याने नागरिकांसाठी १ नोव्हेंबर २०२० पासून सुरु करण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिलेली आहे.या पार्श्वभूमीवर आज मी शिवाजीनगर मतदारसंघातील मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटिका उद्यान व भांडारकर रोड येथील हिरवाई उद्यान याठिकाणी पुणे मनपाचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांबरोबर जाऊन पाहणी केली.१ नोव्हेंबर पासून उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागणार नाही व त्यांना उद्यानामध्ये कोणताही त्रास होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येऊन उद्याने सज्ज करण्यास सांगितले आहे.उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे कि, पुणे मनपाने दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून आपण कोविड चा होणारा फैलाव रोखू शकतो. आपले लाडके पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे “जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं” याप्रमाणे आपल्या सर्वाना काळजी घ्यावी लागणार आहे. असेही शिरोळे यांनी म्हटले आहे.


यावेळी पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, शिवाजीनगर अध्यक्ष रवी साळेगावकर, सरचिटणीस प्रतुल जागडे, सरचिटणीस गणेश बगाडे, चिटणीस जय जोशी, निलेश धोत्रे व उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यात सर्वाधिक रुग्णवाहिकामध्ये चंद्रपूरचा दुसरा क्रमांक

0

चंद्रपूर- : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना काळात तसेच गंभीर परिस्थितीत रुग्णाला कमीतकमी वेळेत दवाखान्यात पोहचविण्यासाठी व तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पुर्ण व्यवस्था असलेल्या ३८ अद्ययावत रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे चंद्रपुर जिल्हा हा राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला जिल्हा ठरला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन परीसरात या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकी‌त्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपविभागिय अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत प्रामुख्याने उपस्थ‍ित होते.

जिल्ह्याच्या खनिज विकास निधीतून सर्व सुविधायुक्त 38 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहीका वातानुकुलीत असून अत्यावश्यक सोईसुविधांनी सुसज्ज आहेत. या रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात येणार आहेत. याशिवाय सहा रुग्णवाहीका वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार आहेत. जिल्हाभरात हेल्थ मिशन राबविणे व ग्रामीण पातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा अद्यावत करण्याचा मानस असल्याचे ना. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

विविध घरकुल योजनांची माहिती देणाऱ्या ‘महाआवास’ त्रैमासिकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

0

मुंबई, दि. ३० : ग्रामविकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या ‘महाआवास’ त्रैमासिकाच्या जुलै ते सप्टेंबर २०२० या पहिल्या अंकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल प्रकाशन करण्यात आले.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी ऑनलाईन सहभागी झाले होते, तर शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

घरकुल योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचेल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

याविषयी माहिती देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेघरांना घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘महा आवास’ त्रैमासिक सुरु करण्यात आले आहे. जुलै ते सप्टेंबर २०२० च्या अंकात गृहनिर्माण’ कार्यालयाची भूमिका, राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण योजना, त्यांची सद्यस्थिती, या योजना गतिमान करण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, राबवावयाचे नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी विषय प्रामुख्याने अंतर्भूत करण्यात आले आहेत. ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम व यशोगाथांना या त्रैमासिकाच्या स्वरुपात प्रसिध्दीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, इ. योजनांशी कृतीसंगम (Convergence) करण्यास मदत होणार आहे. योजनांची माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहचवून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देताना त्याची गुणवत्ता सुधारणेसाठीही मदत होणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 912

0

पुणे विभागातील 4 लाख 65 हजार 65 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 950 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 320 ने वाढ

पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 65 हजार 65 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 950 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 912 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 973 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.84 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 22 हजार 105 रुग्णांपैकी 3 लाख 2 हजार 118 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 251 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.79 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 023 रुग्णांपैकी 41 हजार 47 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 448 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 938 रुग्णांपैकी 35 हजार 179 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 320 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 439 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 868 रुग्णांपैकी 41 हजार 369 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 868 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 16 रुग्णांपैकी 45 हजार 352 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 25 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 320 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 707, सातारा जिल्ह्यात 233, सोलापूर जिल्ह्यात 212, सांगली जिल्ह्यात 113 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 636 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 2, सातारा जिल्हयामध्ये 275, सोलापूर जिल्हयामध्ये 172, सांगली जिल्हयामध्ये 122 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 65 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 56 हजार 798 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 950 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

पुण्यभूषण दिवाळी अंकाचे हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात प्रकाशन

0

हॉटेल वैशाली चे जगन्नाथ शेट्टी आणि हॉटेल कामगारांना प्रकाशनाचा मान

पुणे:पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात पार पडले .पुणेकरांचे लाडके हॉटेल असलेल्या हॉटेल वैशाली चे मालक जगन्नाथ शेट्टी आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणाऱ्या या हॉटेल च्या कामगारांना प्रकाशनाचा मान देण्यात आला .या सर्वांच्या हस्ते प्रकाशन झाले . पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती या प्रकाशन समारंभाला होती.

अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पुण्यातील यशस्वी साहित्य संमेलनानंतर पुणे शहरावर दरवर्षी दिवाळी अंक ‘पुण्यभूषण ‘ या नावाने काढण्याची अभिनव प्रथा डॉ सतीश देसाई यांनी साहित्य संस्कृती विश्वात सुरु केली.एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक मानला जातो.या परंपरेतील हा दहावा दिवाळी अंक आहे .

पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई म्हणाले,’’दरवर्षी आम्ही पुण्याला साजेशी संकल्पना घेवून प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो.यावर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या ‘वैशाली हॉटेल ‘ या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ करीत आहोत .यापूर्वी पोस्टमन,सांस्कृतिक विश्व ची बातमीदारी हाताळणारे पत्रकार ,दगडूशेठ गणेश मंदिर ,बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे विविध मान्यवर पुणेकरांना आणि ठिकाणांना प्रकाशन समारंभाचा मान दिला गेलेला आहे.

यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे ,पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख ,आठवणी हे यावर्षीच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे .

प्रकाशन समारंभात शेखर केंदळे यांनी राग भटियार गाऊन प्रारंभ केला. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले. सुरेश ( काका ) धर्मावत यांनी आभार मानले.

यावेळी विश्वजीत जाधव, दयानंद शेट्टी, सुरेश धर्मावत, नंदकुमार काकिर्डे, रवी चौधरी,दीपक दाते, गौतम गेलडा , अॅड.मंदार जोशी, दिलीप कुंभोजकर आदी उपस्थित होते.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘ पुण्यभूषण अंकामुळे पुण्याची विशेष ओळख तयार झाली आहे. या दशकपूर्तिच्या निमित्ताने पुढील वर्षी तयार होणाऱ्या संग्राह्य खंडाच्या निर्मितीसाठी पालिका सहकार्य करेल.पुण्यभूषण दिवाळी अंकाला, परंपरेला पालिका भक्कम सहकार्य करेल. पुण्यातील जनजीवन, सण, परंपरा, सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं, हीच इच्छा आहे. तसे प्रयत्न आहेत. आपण सर्वांनी या शहराची कोविड काळात काळजी घेतली. हे संकट लवकरच जाईल. पुण्याची सांस्कृतिक ओळख जगात पोहोचवू. पुण्यभूषण ची सांस्कृतिक चळवळ त्यात उपयोगी ठरत आली आहे.

जगन्नाथ शेट्टी यांनी पुणेकरांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स,गांधी भवन,युक्रांद आयोजित रक्तसंकलन शिबिरास प्रतिसाद

0

पुणे :

वुमेन्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन ) ,युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित रक्तसंकलन शिबिराला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ३० ऑक्टोबर रोजी रक्तसंकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

ससून सर्वोपचार रूग्णालय रक्तपेढी च्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गांधी भवन,कोथरूड,पुणे येथे हे शिबीर झाले. भेदाभेद विसरून मानवतेचे नाते जोडण्या साठी सर्वोत्तम माध्यम म्हणून अशा शिबीरांचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगीतले. कोरोनाचा सामना करताना रक्त संकलनाची गरज सध्या अधिक भासते आहे. म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
डॉ प्रवीण सप्तर्षी ,अन्वर राजन ,दत्तात्रय मेहेंदळे ,सतीश गिरमे ,संदीप बर्वे ,मिलिंद चव्हाण ,एड प्रभा सोनटक्के ,एड अर्चना मोरे ,नीलम पंडित ,अभिजित मंगल ,विजय बोडेकर ,सचिन पांडुळे,सुदर्शन लोहाडे ,विवेक काशीकर,श्री गायकवाड ,कदम ससूनचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अरुण बर्डे उपस्थित होते . प्रारंभी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले .

‘डॅाक्टर डॅाक्टर’ने जुळवला एकत्र येण्याचा योग – प्रथमेश

0

अनलॅाक सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना नवनवीन सिनेमे पाहण्याचे वेध लागले आहेत. प्रेक्षकांची हीच आवड ओळखून मराठी सिनेसृष्टीसुद्धा नवनवीन माध्यमांकडे वळली आहे. ३० ऑक्टोबर रोजी ‘डॅाक्टर डॅाक्टर’ हा पहिला मराठी सिनेमा ‘झीप्लेक्स’वर प्रदर्शित झाला आहे. किरण काशिनाथ कुमावत, गौरी सागर पाठक, सूरज दगडे-पाटील यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रितम पाटील यांनी केलं असून, प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांची अफलातून केमिस्ट्री यात अनुभवायला मिळेल. या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमेश शी केलेली ही बातचीत.

तू आणि पार्थ ने प्रथमच एकत्र काम केलं त्याबद्दल काय सांगशील?

प्रथमेश : ‘किल्ला’ सिनेमाच्या प्रिमीयरच्या वेळी माझी आणि पार्थची पहिली भेट झाली होती. त्याचं काम मला खूप आवडलं होतं. भविष्यात कधीतरी आपण दोघांनी एकत्र काम करूया असं मी तेव्हा त्याला म्हटलं होतं. ‘डॅाक्टर डॅाक्टर’च्या निमित्ताने तो योग जुळून आला. पार्थसोबत काम करताना एका तगड्या अभिनेत्यासोबत काम केल्याचं समाधान लाभलं.

तुझ्या भूमिकेबद्दल आणि तुमच्या टयूनिंग बद्दल काय सांगशील?

प्रथमेश : होय, खरोखर ही एक धमाल जोडी असल्याचा अनुभव प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यावर येईल. कारण यापूर्वी मी साकारलेल्या ज्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या, त्या केवळ उडाणटप्पू स्टाईलच्या होत्या, पण यात मी साकारलेला केशव हा अभ्यासात हुषार आहे. सिनेमात पुष्कर आणि केशवची गट्टी जमल्याने बरेच किस्से घडतात जे पोट धरून हसायला लावतील.

चित्रपटातील गाणी गाजतायेत त्याबद्दल काय सांगशील?

प्रथमेश : या सिनेमातील गाणी कथानकाला अनुसरून आहेत. यातील ‘यारी ही…’ हे माझं फेव्हरेट साँग आहे. हे गाणं आमच्या फ्रेंडशिपवर आधारलेलं आहे. यात प्रेक्षकांना आमचा ब्रोमांस पहायला मिळेल. ‘माझाच पाहिजे…’ हे कमर्शियल साँग असून, खूप चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलं आहे. हे गाणं जेव्हा पहिल्यांता ऐकलं, तेव्हा मला नाचावंसंही वाटलं आणि धमाल करावीशीही वाटली. लॅाकडाऊननंतर हे गाणं शूट करताना आम्हाला बरीच रिस्ट्रीक्शन्स होती, तरीही सर्वजण हे गाणं एन्जॅाय करत होते.

सेटवरचे किस्से सांगा?

प्रथमेश : पार्थ आणि माझी केमिस्ट्री पाहून सेटवरच्या फोकस पुलर यांनी आम्हाला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची उपमा देत तुम्हाला एकत्र काम करताना पाहून त्यांची आठवण येते असं म्हटलं होतं. ती आमच्यासाठी खूप मोठी कॅाम्प्लिमेंट होती. पुण्यात शूट सुरू असताना पार्थ अचानक मधेच कुठेतरी गायब व्हायचा आणि अर्ध्या-पाऊण तासानंतर पुन्हा हजर व्हायचा. तो नेमका कुठे जायचा हे कोडं कोणालाच उलगडलं नाही…

चित्रपटात तुझा एक वेगळा अंदाज आहे त्याबद्दल सांग?

प्रथमेश : स्त्री वेष धारण करणं वाटतं तितकं सोपं नाही. खूप मोठी जबाबदारी असते. स्त्री व्यक्तिरेखा साकारताना त्यात नेटकेपणा असणं खूप महत्त्वाचं असतं. हिलवाली सँडल, मुलींचे कपडे, सर्व अॅक्सेसरीज आणि हातात पर्स घेऊन काम करताना व्यक्तिरेखेची देहबोली आणि अभिनय यांचा अचूक बॅलंस साधावा लागतो. त्यामुळेच आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही व्यक्तिरेखा अभिनयाचा कस लावणारी असल्याचं मला वाटतं.

३० नोव्हेंबरपर्यंत मंदिरे, चित्रपटगृहे,शाळा ,कॉलेजेस बंदच राहणार

0

मुंबई- लोकल, खासगी कार्यालये, रेस्तराँ, हाॅटेल, लाॅजेस अद्याप १०० टक्के क्षमतेने सुरू नाहीत. तसेच चित्रपटगृहे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये अजून बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी लॉकडाऊनची १४ आॅक्टोबरची स्थिती ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहील, अशी अधिसूचना जारी केली आहे.

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनेही ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील नियमावलीच कायम राहणार असल्याने चित्रपटगृहे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये सध्या तरी बंदच राहणार आहेत. मात्र आता राज्य सरकारने पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालयांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना निघाल्या आहेत. त्यानुसार ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हायचे आहे. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी जारी केले आहे. शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा पालकांची लेखी हमी घेण्यात यावी, त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, असे या पत्रकात बजावण्यात आले आहे.

३१ ऑक्टोबर २० पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित वर्ग घेण्यासाठी बंद आहेत. मात्र ऑनलाइन, ऑफलाइन आणि दूरस्थ शिक्षण सुरू करण्यासाठी मात्र मान्यता आहे. त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी शासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कामावर रुजू व्हायचे आहे.

शाळांचे निर्जंतुकीकरण करावे, कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू नये, शारीरिक अंतर पाळावे, मास्क बंधनकारक, लक्षणे दिसल्यास अशा विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना तातडीने विलग करावे, शाळेच्या दर्शनी भागावर आरोग्य यंत्रणेचे संपर्क क्रमांक लिहावेत, अशा सूचना या पत्रकात देण्यात आल्या आहेत.

उपनगरी लोकल सुरू होणार
मुंबई व पुण्यातील उपनगरीय लोकल सर्वांना सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली आहेत. मात्र दिवाळीच्या काळात गर्दी वाढणार असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. राज्यातील मंदिरे उघडण्याचीही मागणी सध्या जोर धरत आहे. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य सरकारनेही सध्याची स्थिती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. मात्र लोकल किंवा मंदिरांसंदर्भात निर्णय झाल्यास घोषणा स्वतंत्रपणे होऊ शकते.निर्जंतुकीकरणाचा खर्च कुणी करायचा, दिवाळीच्या सुटीत काय धाेरण ठेवायचे तसेच जेथे कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे, तेथे या परिपत्रकाची अंमलबजावणी करायची की नाही, असे प्रश्न मुंबई मुख्याध्यापक संघाने उपस्थित केले.

एसटीची मालमत्ता गहाण ठेऊन थकित पगार उभारणे हे महाराष्ट्राला शोभादायक नाही -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. ३० –एसटीच्या मालमत्ता गहाण ठेऊन एसटीसाठी कर्ज उभारायचे हा प्रकार महाराष्ट्राला शोभादायक नाही. एसटीसाठी जर कर्ज घ्यायचे असेल तर राज्य सरकारची कर्ज घेण्याची क्षमता आहे, त्यामाध्यमातून राज्य सरकारने कर्ज घेऊन बॉंड निर्माण करावेत व एसटीचा कारभार चालवावा पण एसटीची कुठलीही मालमत्ता गहाण ठेऊन पैसे उभारणे योग्य नाही अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडली.
एसटी महामंडळ दोन हजार कोटीचे कर्ज घेऊन कर्मचा-यांचे ९०० कोटीचे थकीत पगार आणि एसटीसाठी इतर व्यवस्था करण्याच्या हेतूने कर्ज घेण्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केल्याचे समजते. त्याबददल बोलनाता दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची नक्कीच आवश्यकता आहे. सध्या सरकारला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. परंतु सरकारला मंत्रालयातील शासकीय कर्मचा-यांना पगार द्यायचे असेल तर तुम्ही मंत्रालय गहाण ठेवणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्य सरकार म्हणून महामंडळांनी पैसे उभारण्यापेक्षा सरकारने पैसे उभे करून एसटीला आर्थिस आधार देण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराविषयी आग्रही भूमिका घेतल्यामुळेचे एक महिन्याचा पगार कर्मचा-यांना देण्यात आला. त्यांचे तीन महिन्याचे पगार अदयापहे द्यायचे आहेत. दिवाळी तोंडावर आहे अशा वेळेला पैसे उभे करणे गरजेचे आहे. पण कर्जाच्या माध्यमातून खाजगीकरणाचा तर डाव नाही ना. उद्या आपण मालमत्ता गहाण ठेवून पैसे उभे केल्यास एसटी महामंडळ कर्जबाजारी होईल. कुणीतरी खासगी कंपनीने एसटी महामंडळ ताब्यात घ्यावी हा हेतू तर यामागे नाही ना अशी भीतीही दरेकर यांनी वक्त केली.

एसटी महामंडळ काढणार 2 हजार कोटींचे कर्ज

0

मुंबई-कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांपासूनचे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार बाकी आहेत. यातच आता येणाऱ्या दिवाळी सणात एसटीची मागणी वाढते आणि त्यासाठी इंधन खर्चासह इतर गोष्टींसाठी पैसा लागतो. त्या अनुशंगाने एसटी महामंडळ 2 हजार कोटींचे कर्ज काढणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

अनिल परब यावेळी म्हणाले की, ‘एसटीला मिळणारे २२ कोटींचे उत्पन्न कोरोनामुळे यंदा मिळाले नाही. सध्या एसटी साडे पाच हजार कोटींचा तोटा सहन करत आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधने वाढली पाहिजे, नाही तर तोटाही वाढतो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधने वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झाले. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत. त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. कोरोनामुळे राज्यालाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज काढण्यात येईल’, असे अनिल परब म्हणाले.

व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या तरुणीवर बलात्कार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संशयित ताब्यात

0

नवी दिल्ली – गुडगांवच्या फोर्टिस रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 22 ते 27 ऑक्टोबरदरम्यान तिच्यावर बलात्कार झाला. पीडितेला शुद्ध आल्यानंतर 28 ऑक्टोबरला तिने आपल्या वडिलांना आपबीती सांगितली. आरोपीचे नाव विकास आहे. या गुन्ह्यात आरोपीची हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्याने मदत केल्याचा संशय आहे. CCTV फुटेजच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तरुणीला 21 ऑक्टोबरला गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात भरती केले होते. तब्येत बिघडल्यावर 22 ऑक्टोबरला तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. हॉस्पीटलमध्ये तिच्या बेशुद्ध अवस्थेचा फायदा घेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 29 ऑक्टोबरला गुन्ह्याची नोंद केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

चंद्र आहे साक्षीला…

0

चांदोबा – चांदोबाची आकाशात पहिल्यांदा कधी भेट झाली ते आठवत नसले तरी, त्या क्षणापासून तो आपला जिवलग मात्र झाला. आपल्याकडे बघून हसतोय असं कायम वाटायचं आणि आजही वाटतं. चांदोबावर असणारे काळे डाग कधी झाड वाटले तर कधी इटुकला ससा असल्याचा भास झाला. त्या चांदोबाला तासन् तास बघत बसणं हे खूप आनंददायी होतं आणि आज सुद्धा आहे.

‘चांदोबा चांदोबा
भागलास का,
निंबोणीच्या झाडामागे
लपलास का…’

प्रत्येकाच्या आवडीचं हे चांदोबाचं बालगीत गदिमांच्या लेखणीतून किती सुरेख उतरलंय! चांदोबाची गाणी आणि गोष्टी ऐकताच आपले बालपण समृद्ध झाले. चांदोबा नेहमी जवळचा वाटला. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने चांदोबाशी आपल्या परीने नाते जोडले.

‘निंबोणीच्या झाडामागे…चंद्र झोपला गं बाई,
आज माझ्या पाडसाला, झोप का गं येत नाही’ –

आपल्या बाळाला झोपविण्यासाठी माऊलीने हे अंगाईगीत गाईले. मधुसूदन कालेलकरांचं एक अप्रतिम अंगाईगीत, आजही तितकेच लोकप्रिय आहे.

जन्मजन्मांतरी प्रेमाचा साक्षीदार तर चांदोबा आहेच की. आपल्या प्रेमासाठी त्याची साक्ष ही महत्त्वाची. जगदीश खेबूडकरांनी भावगीतातून ते पटवून दिले –
‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला,
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला…
चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला,
चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला…’

या चंद्रास साक्षी ठेवून प्रेमी युगलांनी आपले प्रेम फुलवले आणि आणाभाका घेतल्या.

अर्थात या भेटीतही कधी तरी कुणाला अपूर्णता जाणवली. अशाच एका प्रेयसीची आर्तता, तिची हुरहूर दाखवताना मधुकर जोशी यांनी आपल्या भावगीतातून तिचे मनोगत व्यक्त केले –
‘चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी गीत अर्धे प्रीत अर्धी राहिली…’

तर कुसुमाग्रजांनी लिहिलेले आणि अभिषेकी बुवांनी स्वरसाज चढवलेले गाणे म्हणजे कळसाध्यायच!
‘हे सुरांनो, चंद्र व्हा…
चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोहोचवा’ –

या गाण्यातून चंद्राचा एक वेगळाच साक्षात्कार होतो.

कविवर्य मंगेश पाडगावकरांनी मिश्कीलपणे चांदोबाला शाळेत नेऊन बसविले आणि थेट प्रश्नांची सरबत्ती केली –
‘चांदोमामा चांदोमामा…भागलास काय?
घरचा अभ्यास केलास काय?
चांदोमामा चांदोमामा लपलास काय?
पुस्तक हरवून बसलास काय?’

चाचा चौधरी, चंपक किंवा चांदोबा…ही कॉमिक बुक्स लहानपणी वाचली नाहीत, असं सांगणारा विरळाच. ‘चांदोबा’ म्हणजे सगळ्यांचंच आवडतं गोष्टीचं पुस्तक आणि त्यातील आवडती गोष्ट म्हणजे ‘विक्रम आणि वेताळ’. दर महिन्याला घरी येणाऱ्या चांदोबाची आतुरतेने वाट पाहिली जायची. कधी एकदा वाचून त्याचा फडशा पाडतो, असं झालेलं असायचं.

चांदोबा प्रत्येकाचाच अगदी जिवाभावाचा आणि जवळचा. आजही एखादे बाळ रडत असेल तर आई सांगेल – तो बघ चांदोबा, तुझ्याकडे बघून हसतोय. कधी तो पुन्हा निंबोणीच्या झाडामागे लपेलही. तर बहीण आपल्या भावाला सांगेल –
‘गोरी गोरी पान फुलासारखी छान,
दादा मला एक वहिनी आण…
वहिनीला आणायला चांदोबाची गाडी,
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी…’

या चांदोबाचं प्रत्येक वयोगटाला आकर्षण आहे. तो नक्की कसा आहे, त्यावर आहे तरी काय याचा शोध नेहमीच घेतला जातो. नील आर्मस्ट्राँग हा पहिला अंतराळवीर ज्याने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते, त्या घटनेला तब्बल ५० वर्षं होऊन गेलीत.

रितू क्रिधाल आणि वनिथा मुथय्या यांना लहानपणापासूनच चांदोबाबद्दल विलक्षण कुतूहल. बालपणीचा मित्र चांदोबा ते भविष्यातील प्रेरणादायी चंद्र ही यशस्वी वाटचाल करणाऱ्या या चंद्रवेड्या अवकाशकन्या!

केवळ अंतराळवीरांनाच नाही तर सगळ्यांनाच या चंद्राचं कुतूहल आहे. आजही रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र दिसला की त्याला बघताना आपण हरवून जातो; ढगाआड लपला की तो पुन्हा दिसेपर्यंत व्याकुळ होतो. दूर तिथे आकाशात असला तरी आपल्या सर्वांनाच कायम जवळचा वाटणारा हा चांदोबा आपल्या सुख-दुःखाच्या प्रवासाचा साक्षीदार असतो.

© पूर्णिमा नार्वेकर, दहिसर,मुंबई

राज ठाकरेंनी प्रश्न मांडल्यानंतर राज्यपाल म्हणाले,’ पवार साहेबांशी बोलून घ्या

0

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ आणि वाढीव वीज बिलाच्या मुद्दा राज्यपालांसमोर मांडला. यावेळी राज ठाकरेंना राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचा त्यांनी सांगितले आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘वाढीव वीजबिलासंदर्भात पहिले निवेदन राज्यपालांना दिले आहे. राज्यपालांसोबत वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. यानंतर राज्यपाल म्हणाले की, पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार असल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना मनसे प्रमुख म्हणाले की, ‘जिथे 2 हजार बिले यायची तिथे लोकांना 10 हजार बिल आता येत आहेत. त्यासाठी पहिले निवेदन राज्यपालांना देण्यात आले. कोणतीही गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असे सांगितले जाते मात्र त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिले बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल अशी आशाही राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

सरकार का कुंथत आहे?
राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे म्हणाले की, ‘मुंबईमध्ये अनेक प्रश्न आहेत. प्रश्नांची कसलीही कमतरता नाही. मात्र आपल्याकडे निर्णयाची कमतरता आहे आणि ते का घेतले जात नाहीत? सरकार का कुंथत आहे?’ असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

0

सांगली-‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काही उपयोग नाही, सध्या शरद पवार हेच राज्य चालवतात. यामुळे पवारांनाच भेटले पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला आहे. शरद पवार हेच सध्या सरकार चालवत आहे. यामुळे एखाद्या प्रश्नासाठी शरद पवारांनाच भेटले पाहिजे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी शरद पवारांची स्तुती केली होती. याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. मात्र, शरद पवार बाहेर फिरतात त्यांचे कौतुक आहेच. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे.’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. वाढीव विज बिलांचा प्रश्न आणि दुध दर वाढीविषयीचे मुद्दे त्यांनी राज्यपालांकडे मांडले. यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आलेले नाही. त्यामुळे राज्यपालांनी राज यांना दिलेला सल्ला योग्यच आहे.

ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती पुन्हा चालू करा- आबा बागुल

0

पुणे -महापालिकेस उत्पन्न देणारी ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती पुन्हा चालू करावी अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

या संदर्भात बागुल यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’महापालिकेच्या हददीचा वाढता विस्तार पाहता जायका प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, विकासकामे, देखभाल दुरूस्तीकामे, सातवा वेतन असे खर्च पाहता उत्पन्न वाढीसाठी विविध मार्ग अवलंबणे अत्यंत गरजेचे आहे.
पुणे महापालिकेत कंत्राटी पध्दतीने स्थापत्य, विदयुत, यांत्रिकी, टँकरने पाणीपुरवठा करणे व इतर कामे करणेसाठी इच्छुक असलेल्या ठेकेदारांना दक्षता विभागाकडून विविध नोंदणी वर्गाध्ये खात्याची शि\ारशीनुसार ठेकेदार नोंदणी करण्यात येते. अनेक वर्षांपासून ही कार्यपध्दती असून सदयस्थितीत ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती मुख्य सभा, स्थायी समिती अथवा कोणत्याही समितीची मान्यता न घेता प्रशासनाने बंद केलेली आहे. पुणे महापालिकेच्या निविदांध्ये सहभाग घेणा-या ठेकेदारांची संख्या वाढून स्पर्धात्क पध्दतीने दर यावेत यासाठी जास्तीत जास्त ठेकेदार नोंदणी होणे आवश्यक असते. असे असताना पुणे महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाकडे पूर्व नोंदणीकृत असल्याचे वैध प्रमाणपत्र जोडल्यास पुणे महापालिकेच्या निविदेत सहभागी होता येईल असे स्पष्ट केले आहे.
अनेक वर्षांपासून पुणे महापालिकेकडे ठेकेदार नोंदणी होवून निविदेत सहभागी होणारे नवीन ठेकेदार यांना आता अन्य शासकीय विभागांकडे नोंदणीकृत व्हावे लागेल, सबब नवीन नोंदणी करणारे ठेकेदार अन्य शासकीय यंत्रणेकडे \ी भरून नोंदणीकृत होतील, यामुळे पुणे महापालिकेचे ठेकेदार नोंदणीमधून मिळणारे उत्पन्न कायस्वरूपी आपण बंद केले आहे. ठेकेदार नोंदणी विभागाचे मागील ३ आर्थिक वर्षाचे उत्पन्न पाहता चालू आर्थिक वर्षात अंदाजे ५ कोटी रूपये उत्पन्न या विभागाकडून महापालिकेस मिळाले असते.
तरी जास्तीत जास्त ठेकेदारांची नोंदणी पुणे महापालिकेकडे होवून ठेकेदार नोंदणीकामी असणारी \ी वाढवून त्यामधून पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविणेसाठी अनेक वर्षांपासून चालू असलेली ठेकेदार नोंदणी कार्यपध्दती पूर्ववत चालू करावी आबा बागुल यांनी म्हटले