Home Blog Page 2411

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 640 :एकुण 14 हजार 67 रुग्णांचा मृत्यू

0

पुणे विभागातील 4 लाख 68 हजार 817 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 3 हजार 524 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.01 :- पुणे विभागातील 4 लाख 68 हजार 817 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 3 हजार 524 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 20 हजार 640 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 67 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.11 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 23 हजार 577 रुग्णांपैकी 3 लाख 3 हजार 735 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 54 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.87 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 375 रुग्णांपैकी 41 हजार 773 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 55 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 344 रुग्णांपैकी 36 हजार 23 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 870 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 85 रुग्णांपैकी 41 हजार 754 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 692 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 639 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 143 रुग्णांपैकी 45 हजार 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 969 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 221 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 757, सातारा जिल्ह्यात 156, सोलापूर जिल्ह्यात 134, सांगली जिल्ह्यात 103 तर कोल्हापूर जिल्ह्यात 71 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 676 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 923 ,सातारा जिल्हयामध्ये 393, सोलापूर जिल्हयामध्ये 142, सांगली जिल्हयामध्ये 168 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 50 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 89 हजार 298 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 3 हजार 524 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल – जयंत पाटील

0

मुंबई दि. १ नोव्हेंबर – महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला जातो आहे. आज काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला.

कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

राज्यातील जनता सीमा भागात अडकलेल्या लोकांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे. सुप्रीम कोर्टात केस सुरू असली तरी कर्नाटकमधील मराठी बांधवांवरील अत्याचार थांबलेला नाही त्याचाही निषेध करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री ‘ग्राऊंड झिरो’वर

0

मुंबई, दि.1: टाटा वीज निर्मिती केंद्राने आयलँडिंगच्या काळात मुंबईला वीज पुरवठा न केल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत हे सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी  करणार आहेत.

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास डॉ.राऊत टाटा वीज निर्णय केंद्रात येणार असून त्यानंतर आयलँडिंग यंत्रणेचे अद्यावतीकरण, भविष्यातील वाढीव वीज निर्मितीसाठी कंपनीचे नियोजन, स्काडा आणि नविनीकरण ऊर्जा यावर टाटा कंपनीतर्फे त्यांच्यासमोर सादरीकरण होईल. या ऊर्जा प्रकल्पाची ते प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर या वीज निर्मिती केंद्रात दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

टाटा वीज कंपनीच्या अंतर्गत असलेली मुंबईची आयलँडिंग यंत्रणा 12 ऑक्टोबरला मुंबईला बाहेरून येणारा वीजपुरवठा बाधित झाल्यावर कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र ती कार्यान्वित न झाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काही तास वीज खंडित होऊन मोठा फटका बसला. याची गंभीर दखल ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी घेतली आणि त्यादृष्टीने भविष्यातील धोका टाळण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांना (ग्राऊंड झिरो) भेट देत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी राज्य भार प्रेषण केंद्र आणि खारघर येथील महापारेषणचे केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन वीज ठप्प होण्यामागील कारणे समजून घेतली.

सोमवारी डॉ.राऊत हे टाटा वीज कंपनीच्या टाटा थर्मल पॉवर प्लांटला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. वीज पुरवठा ठप्प झाल्याबद्दल डॉ. नितीन राऊत हे संबंधित यंत्रणांचा वेळोवेळी आढावा घेत असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली (एसएलडीसी) येथेही उर्जामंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली होती.

मंदिर खुले करण्यासंदर्भात सरकार गंभीर नाही-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टिका

0

मुंबई — महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारच्या भूमिका पूर्णपणे बदलले आहेत. पहिले मंदिर फिर सरकार म्हणणारी लोक आता मंदिर उघडण्यापासून का दूर जात आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारनं नियमावली बनवून मंदिर उघडं अपेक्षित होते, परंतु दुर्देवाने सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही. मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. नियमावली बनवून मंदिर उघडण्यास काही हरकत नाही परंतु हे सरकार अहंकाराने भरलेला आहे. लोकांना काय वाटते यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू यावर सरकारचा भर असतो. सरकारने मंदिर उघडली नाहीत आणि राज्यभर मंदिर खोलो आंदोलन सुरू झालं तर भाजपा त्यांच्यासोबत उभी राहिल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.
बेळगावमधील मराठी भाषिकांना न्याय मिळवून दया
सरकारच्या बाहेर राहून आरडा-ओरड करणे सोपे असते, परंतु सरकारमध्ये गेल्यानंतर त्या विषयातून मार्ग काढण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात, ते परिश्रम घेताना हे सरकार दिसत नाही. सरकारच्या बाहेर राहून तुम्ही यापूर्वी बेळगाव सीमाप्रश्र्नी टोकाची संघर्षाची भूमिका घेत होतात,मात्र आता सत्तेत असून सुद्धा याबाबतीत काही निर्णय घेताना दिसत नाही. यावेळी तुम्ही आपली अहंकाराची भावना बाजूला ठेवून बेळगाव मधील लोकांना न्याय मिळेल अशी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मतही दरेकर यांनी व्यक्त केले.

13 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

0

पुणे -पोलिस दलातील 13 पोलिस निरीक्षकांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश अप्पर आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍याचे नाव आणि कंसात कोठुन कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे –

1. पोनि सुचेता वसंत खोकले (वाहतूक शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)
2. पोनि अनिल गंगाधर नलावडे (वाहतूक शाखा ते नियंत्रण कक्ष)
3. पोनि शंकर रामभाऊ डामसे (कोर्ट कंपनी ते वाहतूक शाखा)
4. अनघा विद्याधर देशपांडे (बीडीडीएस ते गुन्हे शाखा)
5. राजेंद्र नारायणराव मोहिते (गुन्हे शाखा ते अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका)
6. नंदकुमार मुरलीधर बीडवई (वपोनि, सहकारनगर पो.स्टे. ते विशेष शाखा)
7. गणेश जगन्नाथ माने (पोनि, गुन्हे – कोरेगांव पार्क पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
8. विष्णू नाथा ताम्हाणे (पोनि, गुन्हे – भारती विद्यापीठ पो.स्टे. ते वपोनि, समर्थ पो.स्टे.)
9. मुरलीधर गंगाधर करपे (गुन्हे शाखा ते वपोनि, डेक्कन पो.स्टे.)
10. माया दौलतराव देवरे (पोनि, गुन्हे – चतु:श्रृंगी पो.स्टे. ते विशेष शाखा)
11. मुनाफ फरीद शेख (नियंत्रण कक्ष ते बीडीडीएस)
12. अजित धोंडीराम दळवी (सांगलीवरून हजर ते वाहतूक शाखा)
13. गणेश रंगनाथ उगले (पुणे ग्रामीणवरून हजर ते विशेष शाखा)

शनिवारी करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या खालील प्रमाणे –
1. बाळकृष्ण सिताराम कदम (वपोनि, समर्थ पो.स्टे. ते वपोनि. हडपसर पो.स्टे.)
2. अशोक आनंदराव कमद (वपोनि, वारजे माळवाडी – संलग्न नियंत्रण कक्ष ते वपोनि, लष्कर पो.स्टे.)
3. देविदास काशिनाथ घेवारे (वपोनि, दत्तवाडी पो.स्टे. ते वपोनि. सिंहगड रोड पो.स्टे.)
4. नंदकिशोर माधव शेळके (वपोनि., सिंहगड रोड पो.स्टे. ते वाहतूक शाखा)
5. रमेश साहेबराव साठे (वपोनि, हडपसर पो.स्टे. ते विशेष शाखा)

शुक्रवारी करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या खालील प्रमाणे –
1. सयाजी गावारे (गुन्हे शाखा ते वपोनि, अलंकार पोलिस स्टेशन)
2. जगन्नाथ कळसकर (फरासखाना पो.स्टे. ते वपोनि, भारतीय विद्यापीठ पो.स्टे)
3. विनायक साळुंखे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
4. जयराम पायगुडे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
5. दुर्योधन पवार (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
6. सरदार पाटील (विशेष शाखा ते वपोनि, कोंढवा पो.स्टे.)
7. दिपक लगड (वपोनि. डेक्कन – सलग्न, पोलिस आयुक्त यांचे वाचक ते गुन्हे शाखा)
8. विनायक गायकवाड (वपोनि. कोंढवा पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
9. चंद्रकांत निंबाळकर (आर्थिक गुन्हे शाखा ते कोर्ट आवार)

 पोलिस निरीक्षक दिपक लगड हे पोलिस आयुक्त यांचे वाचक म्हणून पुढील आदेश होईपर्यंत कामकाज पाहतील.

पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण, नेमणुक गुन्हे शाखा (सध्या पोनि, अलंकार पो.स्टे.) यांना या आदेशाव्दारे त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी परत करण्यात आली आहे.

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पाठिंबा

0

मुंबई, दि. 1 : बेळगाव,  कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या संघर्षाला मी देखील जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. मराठाभाषिक सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाल्याशिवाय हा संग्राम थांबणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना काळात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

0

मुंबई, दि. 1 : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला.

निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात कोरोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे कोरोना काळात समाजासाठी काम करण्याची अहिमहीका बघायला मिळाली, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. समाजातील प्रत्येक घटकाचे कार्य सारखेच महत्त्वाचे असते. कोरोना देशातून लगेचच जाण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे यापुढेही कोरोना योद्ध्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य सुरु ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केली.

विविध इस्पितळांमधील डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स  पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा 45 करोना योद्ध्यांच्या सत्कार करण्यात आला.

भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप जाधव, परिचारिका दिपाली इंदुलकर, सफाई कर्मचारी उदयकुमारी चरमर, जसलोक रुग्णालय येथील परिचारिका सोनल घुमे, आरोग्य सेविका लतिका नकते, फादर कॉसमॉस एक्का, होली स्पिरीट इस्पितळाच्या कार्यकारी संचालिका स्नेहा जोसेफ, ट्राफिक वार्डन अनिता लोबो, वैद्यकीय अधिकारी संजय फुंदे, वार्ड अधिकारी सुरेंद्र सिंग, संदीप मुर्जानी व देवयानी वैद्य, जैन संघटनेचे संजय दोषी, रेडीओलॉजिस्ट डॉ.पूजा राजेश छेडा, किशोर मन्याल, महावीर हॉस्पिटलचे प्रकाश कोठारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महिला अत्याचार प्रतिबंधासाठी कडक कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

0

नंदुरबार दि. 1 : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि त्यासाठी तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

शहादा तहसिल कार्यालयात कोविड-19 आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्य्वस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. अशा प्रकरणात गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सारंगखेडा येथील प्रकरणात ॲड.उज्ज्वल निकम यांच्यासारख्या तज्ज्ञ वकीलाचे सहकार्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलिसांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा.

नंदुरबार हा सीमावर्ती जिल्हा असल्याने पोलीसांवर अधिक जबाबदारी आहे. नवापूर आणि शहादा पोलीस ठाण्याचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल. नंदुरबार पोलीस दलाचा ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राज्यात सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोरोना योद्ध्यांवर होणारे हल्ले दुर्देवी असून असे प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.

कोविडसारख्या संकटात जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्ह्याने पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमही राबविले त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी येत्या काळात दक्षता बाळगण्याची गरज आहे. युरोपात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने परीस्थिती बिकट झाली आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, जिल्ह्यात पोलीस दलाने कोरोना काळात चांगली कामगिरी केली असल्याचे श्री.देशमुख म्हणाले.

पालकमंत्री श्री.पाडवी म्हणाले, जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाबाबत चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील चांगले सहकार्य केले. पोलीस दलाने आपली भूमिका योग्यप्रकारे बजावली. पोलीसाच्या निवासाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महिला विषयक गुन्हे करणाऱ्यावर कडक कारवाई झाल्यास समाजात चांगले संदेश जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी सर्वानी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ॲड.पाडवी म्हणाले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रश्नाविषयी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनेबाबत आणि पोलीस अधीक्षक पंडीत यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सादरीकरण केले.

मास्क बनविणाऱ्या बचतगटाचे कौतुक

गृहमंत्री श्री.देशमुख यांनी बैठकीपूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सरस्वती महिला बचत गट आणि ओमसाई महिला बचत गट यांनी तयार केलेल्या मास्क आणि इतर उत्पादनाची पाहणी केली. कोरोना संकटकाळात मास्क निर्मिती करुन प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांनी बचतगटाचे कौतुक केले. त्यांनी महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: मास्कची खरेदी केली.

मराठी भाषिकांवर दहशत बसविण्यासाठी बेळगाव पोलिसांची मुजोरी

0

बेळगावात आज सकाळपासून पोलिसांनी नाकेबंदी करुन मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या काळ्या दिनाच्या धरणे आंदोलनात जनता पोहोचू नये यासाठी शहरातील विविध भागात नाकेबंदी करण्यात आली असून लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकेच नाही तर काळे कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांना जाब विचारला जात आहे.

काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे असणारे बुम खेचून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ही मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे माध्यमांची देखील दडपशाही पोलिसांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. माध्यमांच्या या दडपशाहीचा निषेध पत्रकार वर्गाकडून करण्यात आला

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळते.भाषावर प्रांतरचनेच्या बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी निषेध फेरी व सभाही होतात. कोरोना महामारीमुळे यंदाची निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन प्रशासनाने परवानगी दिली. पण ही परवानगी देत असताना लोकांनी आंदोलन स्थळांपर्यंत पोचू नये, यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. एकावेळी केवळ ५० लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठी भाषिकांची कोंडी केली जात आहे.

आज रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. मराठा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घातली आहे. लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काळे कपडे घातलेल्या लोकांना जाब विचारण्यात येत आहे. पोलिसांच्या या मुस्कटदाबीचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.

IPL मधून निवृत्ती घेणार नाही-धोनी

0

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्त होणाच्या चर्चांना रविवारी पूर्णविराम लावला. आज चेन्नई आणि पंजाबचा सामना होत आहे. या सामन्यापूर्वी टॉस दरम्यान कमेंटेटर डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की, हा तुझा शेवटचा सामना आहे का ? यावर धोनी म्हणाला ,’बिलकुल नाही.

सोशल मीडियावर सुरू होत्या निवृत्तीच्या चर्चा

सीजनमध्ये सामना झाल्यानंतर धोनी विरोध संघातील अनेक खेळाडूंना ऑटोग्राफ देण्यासोबतच गिफ्ट देतानाचे फोटोज व्हायरल झाली. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. धोनीने 15 ऑगस्टला अचानक इंस्टाग्रामवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. धोनीने आपला अखेरचा सामना मागच्या वर्षी वर्ल्डकपमध्ये न्यूजीलँडविरुद्ध खेळला होता.

चेन्नई पहिल्यांदा प्लेऑफमधून बाहेर

चेन्नई सुपर किंग्स पहिल्यांदा प्ले ऑफमधून बाहेर आली आहे. या सीजनमध्ये चेन्नईचा आतापर्यंत 8 सामन्यात पराभव आणि 5 सामन्यात विजय झाला आहे. गुणतालिकेत चेन्नई सर्वात काली आहे. यापूर्वी चेन्नईने तीनवेळा (2010, 2011, 2018)आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर पाचवेळेस (2008, 2012, 2013, 2015 और 2019) उप-विजेता ठरला आहे.

हिमाचलमध्ये मुंबईच्या अनेक चित्रपटांची शूटिंग -येथे पैसे कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटले जात नाही

0

‘हिमाचल सध्या मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचा पाहुणचार करत आहे. देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि जर कुणी या राज्यातून पैसे कमावत आहे तर त्याला हरामखोर किंवा नमकहराम म्हटले जाणार नाही. जर कुणी म्हणत असेल तर मी निंदा करते, बॉलिवूड प्रमाणे शांत राहणार नाही.’असा टोला आज कंगना रनोटने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांना लागावला आहे .तिने आपल्या ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटासंबंधीत न्यूज आर्टिकल शेअर केले आहे .

संजय राऊतांनी कंगनाला हरामखोर म्हटले होते
गेल्या महिन्यात कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांवर टीका केली होती. यासोबतच संजय राऊतांवर तिला मुंबईत न येण्याची धमकी दिल्याचा आरोप लावला होता आणि मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केली होती.कंगनाच्या ट्वीटवर भडकलेल्या संजय राऊतांनी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला हरामखोर मुलगी असे म्हटले होते. यानंतर राऊतांवर टीका झाली तेव्हा ते स्पष्टीकरण देत म्हणाले होते की, हरामखोर म्हणजे नॉटी म्हणालो होतो.

डलहौजी येथे सुरू आहे ‘भूत पोलिस’ची शूटिंग
पवन कृपलानींच्या दिग्दर्शनात तयार होत असलेला हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूत पुलिस’ची शूटिंग सध्या हिमाचल प्रदेशच्या डलहौजीमध्ये सुरू आहे. यासाठी चित्रपटाचे अॅक्टर्स सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडीज, यामी गौतम आणि प्रोड्यूसर्स रमेश तौरानी आणि अक्षय रायसोबत तिथे पोहोचले आहेत.

हिम्मत असेल तर एकेकटे लढा … चंद्रकांतदादांचे जाहीर आव्हान … (व्हिडीओ)

0

पुणे- हिम्मत असेल तर सेना, कॉंग्रेस ,राष्ट्रवादी ने एक एकटे लढावे मग बघू कुणाला किती मते पडतात .. असे जाहीर आव्हान आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खा. संजय राउत यांनी सकाळी पुण्यात केलेल्या वक्तव्यानंतर दिले आहे. ते म्हणाले,’भाजपवर टीका करणं,ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत.मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही,त्यांना लगेच टोचतं ! तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात,हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे.. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं.  महाविकास आघाडी सरकार जर ५ वर्ष चालणार असेल तरी देखील आमचा काही आक्षेप नाही.. आम्ही प्रखर विरोधी बनून अन्यायाविरुद्ध सरकारची झोप उडवत राहू ! राज्य सरकारला ट्रेन,बस सुरु झाल्यावर त्यामध्ये होणारी गर्दी दिसत नाही,परंतु यांना मंदिर सुरु करण्याआधीच तिथे होणाऱ्या गर्दीची चिंता वाटते !  नेमके आ. पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात …..

कोथरूड मध्ये २५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य आणि १५० जणांची मोफत रक्त तपासणी

0
  • आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या पोस्ट कोविड आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे- कोरोनावर ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे; मात्र, ज्यांना अजूनही आरोग्याच्या तक्रारी आहेत, अशांसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आज कोथरुडमध्ये मोफत पोस्ट कोविड आरोग्य व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात केले होते. या शिबिराला कोथरुडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आपली आरोग्य तपासणी केली. जवळपास २५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. तर १५० पेक्षा जास्त जणांची रक्त तपासणी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांत पुण्यामध्ये कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. मात्र, कोरोनावर ज्यांनी यशस्वीपणे मात केली आहे; यापैकी बऱ्याचजणांना आरोग्याच्या तक्रारी आहेत, अशांसाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आज कोथरुडमधील महेश विद्यालय येथे पोस्ट कोविड आरोग्य व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, मोफत आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी; आणि मानसोपचार तज्ज्ञांचेही मार्गदर्शन करण्यात येणार होते. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रॅन्डम शुगर टेस्ट, हिमोग्राम, सीआरपी, डी-डायमर आदीच्या तपासण्या देखील केल्या जाणार होत्या. या शिबिराला कोथरुडकरांनी चांगला प्रतिसाद देत, आपली आरोग्य तपासणी करुन घेतली. यामध्ये जवळपास २५० पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. तर १५० पेक्षा जास्त नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली.

यामध्ये डॉ. अजित डेंगळे, डॉ. नितीन पाटील, डॉ. सुमित अगरवाल, डॉ. संजय गांधी, डॉ. नितीन धांडे, डॉ. प्रशांत बोरुडे, समुपदेशक अभय ठकार सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात केली, तर १५० पेक्षा जास्त जणांची रक्त तपासणी करण्यात आली.

दरम्यान, आज सकाळी या शिबिराला श्री. पाटील यांनी भेट देऊन, सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कोथरुड मधील सर्व नगरसेवक आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालकांना कधी मदत करणार?

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा खडा सवाल

पुणे-राज्य सरकार सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकत आहे. पण राज्य सरकार राज्यातील फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. पुणे शहर भाजपा, लायन्स क्लब इंटरनॅशनल, स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्यावतीने एम. आय.टी. कॉलेज रोड वरील भवानीमाता मंदिर येथे रिक्षाचालकांना मोफत आरोग्य किट वाटप करण्यात आले. यावेळी श्री. पाटील बोलत होते.

यावेळी लायन्स क्लबचे नरेंद्र भंडारी, प्रांतपाल अभय शास्त्री, सुनीता चिटणीस, कोथरुड भाजपाचे अध्यक्ष पुनित जोशी,स्मार्ट पुणे फाऊंडेशनचे रोहित शाह, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संदीप खर्डेकर, पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष डॉ.‌ संदीप बुटाला, नगरसेवक दिलीप उंबरकर, पुणे शहर चिटणीस निलेश कोंढाळकर, भाजपा नेत्या मनिषा बुटाला, संतोष रायरीकर – प्रभाग ११ अध्यक्ष, दत्ता भगत – कोथरूड मंडल चिटणीस, अॅड नवनाथ लाड- अध्यक्ष वकिल आघाडी, अभिजित राऊत पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस, समीर पाटील- उद्योजक, वैभव मारणे – कोथरूड मंडल चिटणीस, गणेश दहिभाते – युवा मोर्चा चिटणीस, सुयश ढवळे – युवा मोर्चा उपाध्यक्ष, दिनेश माझीरे – मा. कोथरूड मंडल सरचिटणीस, संतोष अमराळे – मा युवा मोर्चा उपाध्यक्ष, योगेश मरळ – युवा मोर्चा सरचिटणीस, सुप्रिया माझीरे – महिला आघाडी चिटणीस, पल्लवी गाडगीळ- महिला आघाडी चिटणीस यांच्यासह परिसरातील नागरिक रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, “कोरोनाच्या काळात रिक्षाचालक, फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला यांचे प्रचंड हाल झाले. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले. केंद्राने नोव्हेंबर पर्यंत रेशन दुकानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिले. याशिवाय फेरीवाले आणि लघु उद्योगांना कर्ज योजना असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पण राज्य सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही. राज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला यांना मदतीसाठी आर्थिक पॅकेज केव्हा जाहीर करणार,” असा सवाल उपस्थित केला.

या कार्यक्रमात लायन्स क्लबचे अभय शास्त्री यांनी श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना क्लबचे मानद सदस्य होण्याची विनंती केली. श्री. पाटील यांनी त्याला मान्यता देत मानद पदाचा स्विकार केला. तर श्री. पाटील यांच्या हस्ते संदीप खर्डेकर आणि डॉ. संदीप बुटाला यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या सामाजिक कार्याचा लायन्स क्लबच्या वतीने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात लायन्स क्लबचे श्री. नरेंद्र भंडारी, अभय शास्त्री, संदीप खर्डेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

पुणे विभागात आता ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 142

0

पुणे विभागातील 4 लाख 67 हजार 141 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 2 हजार 303 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.31 :- पुणे विभागातील 4 लाख 67 हजार 141 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 2 हजार 303 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 21 हजार 142 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.00 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 22 हजार 820 रुग्णांपैकी 3 लाख 2 हजार 812 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 243 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 765 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.80 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 219 रुग्णांपैकी 41 हजार 380 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 303 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 40 हजार 210 रुग्णांपैकी 35 हजार 881 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 885 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 982 रुग्णांपैकी 41 हजार 586 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 761 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 72 रुग्णांपैकी 45 हजार 482 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 950 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 640 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 353 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 715 , सातारा जिल्ह्यात 196, सोलापूर जिल्ह्यात 272, सांगली जिल्ह्यात 114 तर कोल्हापूर जिल्ह्यात 56 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 76 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 694, सातारा जिल्हयामध्ये 333, सोलापूर जिल्हयामध्ये 702, सांगली जिल्हयामध्ये 217 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 130 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 74 हजार 532 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 2 हजार 303 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 30 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )