Home Blog Page 2387

जगभरातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी पुण्याला प्राधान्य

0

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘फिसा’तर्फे परदेशी विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न
पुणे : “भारतात शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांमुळे भारतीय संस्कृती व परंपरा जगभर पोहोचण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदानामुळे उभय देशातील प्रगतीला हातभार लागत असतो. सूर्यदत्ताला परदेशी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती असून, गेल्या १८ वर्षांपासून सूर्यदत्तामध्ये २५० पेक्षा जास्त परदेशी विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे,” असे प्रतिपादन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले.

फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल स्टूडंट्स असोसिएशन-पुणेच्या वतीने वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे पुण्यात शिकणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. चोरडिया बोलत होते. या कार्यक्रमाला ५८ देशातील ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. संस्कृतीतील विविधतेचा उत्सव साजरा करण्याविषयी आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी अंतर्भाव देणारा हा सोहळा होता. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल स्टुडंट्स सेंटरचे संचालक प्रा. डॉ.  विजय खरे, अफगाणिस्तान कौन्सलेटचे कॉन्सुल जनरल शफीकुल्लाह इब्राहिमी, एलपीसीपीएसचे संस्थापक डॉ. एस. पी. सिंग, अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीतील इंटरनॅशनल सेंटरच्या संचालक प्रा. निरुपमा प्रकाश, ‘फिसा’चे अध्यक्ष अब्बा ओमर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात अफगाणी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. चाड, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, कॅमरून, युगांडा, केनिया, टांझानिया, दक्षिण सुदान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, येमेन, झांबिया, नायजेरिया, जिबूती, तुर्की, गॅम्बिया, कांगो, दक्षिण आफ्रिका, अंगोला, मलावी, श्रीलंका, नेपाळ, रुवांडा, कझाकस्तान, बुरुंडी, गिनी, लेसोथो, इथिओपिया, मालदीव, युक्रेन, रशिया, आयव्हरी कोस्ट, नायजर, थायलंड, बोत्सवाना, मोझांबिक, गॅबॉन, बेनिन प्रजासत्ताक, स्वाझीलँड, मादागास्कर, एरिट्रिया, इराक, इराण, इजिप्त, मोरोक्को, सोमाली, मॉरिशस, सेशेल्स आदी ५८ देशातील ३०० विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी ‘अतिथी देवो भव’ या भारतीय परंपरेनुसार सर्व परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.  ते म्हणाले की, सूर्यदत्तमध्ये गेल्या १८ वर्षांपासून परदेशी विद्यार्थी आहेत. आजवर सूर्यदत्तामधून जवळपास २५० विद्यार्थी पदवी घेऊन गेले आहेत. ३३ देशातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. भारतात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांबद्दल सूर्यदत्ता संस्थेला आस्था असून, त्यांच्या सुविधेसाठी सूर्यदत्ता इंटरनॅशनल एज्युकेशनल अँड कल्चरल सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटर अंतर्गत नियमितपणे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी मेळावा, दीक्षांत समारंभ आयोजित करतो. पुण्यात शिकणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक आणि वैयक्तिक क्रियाकलापांच्या आधाराची आवश्यकता आहे जेणेकरून ते चांगले प्रदर्शन करू शकतील.

डॉ. चोरडिया यांनी सांगितले की, सूर्यदत्त येथील पायाभूत सुविधा परदेशी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कार्यक्रमांसाठी उपलब्ध असतात. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समधील सर्व पायाभूत सुविधा, मूल्य, परंपरा आणि शैक्षणिक प्रगती अनुभवण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांना त्यांनी आमंत्रित केले. त्यातून सूर्यदत्ता आणि परदेशी विद्यार्थी यांच्यातील नाते आणखी दृढ होत जाईल, असा विश्वास वाटतो. प्रा. डॉ. विजय खरे यांनी एसपीपीयूआय इंटरनॅशनल स्टूडंट सेलविषयी परदेशी विद्यार्थ्यांबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना व इतर आवश्यक माहिती माहिती दिली.प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी इतर मान्यवरांनांही सन्मानित केले. त्यामध्ये अध्यक्ष, सचिव व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

0

पुणे, दि.२८:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

आता अविनाश भोसले ईडी च्या रडारवर ..10 तास ईडी ने केली चौकशी

0

पुणे -शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अमंलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारी मुंबई कार्यालयात तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. ईडीच्या तीन पथकांनी ही चौकशी केली. परकीय चलना विषयीच्या फेमा कायद्या अंतर्गत त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.अशी चर्चा आहे की पुण्यात कधी काळी रिक्षा चालक असलेल्या भोसले यांच्या मालकीचे हेलीकॉप्टर आहे. अनेक राजकीय नेते त्यांच्या हेलीकॉप्टरचा वापर निवडणूक प्रचारासाठी करतात.भोसले हे मोठे बांधकाम व्यावसायिक झाल्याने त्यांच्याबद्दलच्या `सक्सेस स्टोरीज`ही सोशल मिडियात व्हायरल होत असतात.अविनाश भोसले हे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला वजन असल्याची चर्चा असते. थेट त्यांचीच चौकशी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे

भोसले यांची एमएच 01 डीडी 0088 या क्रमांकाची कार सकाळ पासूनच मुंबईतील फोर्ट भागात उभी होती. या ठिकाणी अनेक वेळा पासून थांबलेली गाडी निदर्शनास येताच भोसले यांची चौकशी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. भोसले यांच्या चौकशीने चांगलीच खळबळ उडाली असून विविध प्रकारच्या चर्चाना उधान आले

भोसले यांची शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) चौकशी केली. 10 तासानंतर भोसले ईडीच्या बेलार्ड पियर येथील कार्यालयातून बाहेर पडले. परदेशी चलनाच्या प्रकरणात ही चौकशी झाल्याचे करण्यात आली. .भोसले यांचा बाणेर रस्त्यावर बंगला आहे. गणेशखिंड रस्त्यावर व्यावसायिक कार्यालय आहेत. राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ट संबंध असलेल्या भोसले यांनी अनेक मोठे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या सलगीमुळे भोसले कायम चर्चेत राहिले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय व्यक्तींच्या घरावर ईडीने छापसत्र सुरू केले आहे. एकंदर राज्य व केंद्र सरकार यांच्यामधील संघर्ष ईडीच्या कारवाईने समोर आल्याचे दिसून येते. मुंबईतील शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने दोन दिवसांपूर्वी छापा टाकल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील बांधकाम व्यावसायीक भोसले यांची चौकशी करण्यात आली.आज सकाळी 10 वाजता ते ईडीच्या कार्यालयात आले. 10 तास ही चौकशी चालली फेमा प्रकरणात भोसले यांचा जबाब नोंदवण्यात आला.मनी लाँडरींगप्रमाणे ईडी परदेशी चलन कराप्रकरणाच्या प्रकरणांबाबतही फेमा कायद्या अंतर्गत तपास करते. अशाच एका फेमा प्रकरणात ही चौकशी झाली. 2007 मध्ये भोसले परदेशी चलन व महागड्या वस्तू आणल्याप्रकरणी ईडी फेमा अंतर्गत तपास करत होती. पण भोसले यांना नेमक्या कोणत्या फेमाच्या प्रकरणात ईडीकडून बोलवण्यात आले होते. हे ईडीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही

रात्री साडे आठच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. विदेशी चलन प्रकरणात फेमा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. सीमाशुल्क बुडवल्याप्रकरणी फेमा अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतुद आहे. ईडी परिमंडळ-2 याप्रकरणी तपास करत आहेत. यााबत ईडीचे संचालक एस.के. मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का?

0

अभिनेत्री कंगना रनोटवर महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर आज मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली होती असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. तसेच कंगनाला पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना जामीन न देणे ही चूक असल्याचे निरीक्षणं नोंदवले आहेत. या दोन निकालांवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.याविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. पोलिस, फौजदारी कायदे हे जनतेचे संरक्षण करण्यासाठी असतात. त्यांची छळवणूक करण्यासाठी नाहीत, हे जर न्यायालयाला सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेक बुद्धी- संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो,’ असा खोचक सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 797 कालच्या तुलनेत 1446 रुग्ण वाढले

0

पुणे विभागातील 5 लाख 1 हजार 266 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 30 हजार 983 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.27 :- पुणे विभागातील 5 लाख 1 हजार 266 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 983 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 797 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 920 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 39 हजार 562 रुग्णांपैकी 3 लाख 20 हजार 418 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 883 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.36 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 529 रुग्णांपैकी 48 हजार 78 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 748 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 226 रुग्णांपैकी 41 हजार 428 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 211 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 674 रुग्णांपैकी 44 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 475 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 992 रुग्णांपैकी 46 हजार 836 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 480 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1446 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 966, सातारा जिल्ह्यात 178, सोलापूर जिल्ह्यात 223, सांगली जिल्ह्यात 53 तर कोल्हापूर जिल्ह्यात 26 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1468 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 725, सातारा जिल्हयामध्ये 583, सोलापूर जिल्हयामध्ये 103, सांगली जिल्हयामध्ये 17 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 40 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 460 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 30 हजार 983 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

न्यायालयाचा निकाल म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत यांच्या बाबतीत शुक्रवारी न्यायालयाने दिलेले निकाल म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला थप्पड असून आता तरी सत्तेचा अहंकार सोडावा आणि धमक्या देणे बंद करावे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यात जनादेश धुडकावून लबाडीने सत्ता मिळवली तरीही संविधानाच्या चौकटीत आणि लोकशाही पद्धतीनेच काम करावे लागेल. एखाद्यावर कारवाई करायची असेल तरीही संविधान आणि कायदा यांच्या चौकटीतच करावी लागेल. रस्त्यावरील गुंडगिरीच्या मानसिकतेने वागून चालणार नाही, एवढा बोध या निमित्ताने सत्ताधारी आघाडीच्या प्रमुखांनी घ्यावा आणि मुखपत्रातून धमक्या देणे बंद करावे.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर करताना दिलेल्या निर्णयाबद्दलचे सविस्तर निकालपत्र आज जाहीर केले तर मुंबई उच्च न्यायालयाने कंगना राणावत हिचे कार्यालय पाडण्याबाबत आज निर्णय दिला. या दोन्ही निर्णयात महाविकास आघाडीची सूडबुद्धी आणि आपल्याविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करणे स्पष्ट झाले आहे. कंगना राणावत हिचे मुंबईबद्दलचे विधान समर्थनीय नाही पण त्यावर लोकशाही पद्धतीनेच उत्तर द्यायला हवे. एखादी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारते म्हणून किंवा आव्हान देते म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून त्याचे नुकसान करणे योग्य नाही. अशा पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही. देशात संविधान प्रमाण आहे आणि लोकशाही व्यवस्था अंतिम आहे व त्याचे उल्लंघन कोणालाच करता येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ‘सीए’च्या परीक्षा सुरळीत

0

ललित बजाज यांची पत्रकार परिषदेत माहिती; विद्यार्थी, सीए सभासदांचे उल्लेखनीय कार्य

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही योग्य नियोजन आणि नियमांचे काटेकोरपणे पालन यामुळे ‘सीए’च्या परीक्षा सुरळीतपणे सुरु आहेत. सोशल डिस्टंसिन्ग पाळले जावे, तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या ५०० वरून ११०० वर नेण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही परीक्षा देणे सोयीचे होत आहे,” अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए ललित बजाज यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयसीएआय’चे उपक्रम, विविध बदल, विद्यार्थी व सीएंसाठी आणलेल्या तरतुदी याबाबत ललित बजाज यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. प्रसंगी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए यशवंत कासार, ‘डब्ल्यूआयआरसी’चे सचिव सीए मुर्तुझा काचवला, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लड्डा, सचिव सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.

ललित बजाज म्हणाले, “कोरोना काळात समाजाला मदतीचा हात देण्यासाठी सीए इन्स्टिट्यूटच्या सर्व सभासदांनी देशभर उल्लेखनीय कार्य केले. कोरोनाबाबत जागरूकता, गरजूना मदत असे अनेक उपक्रम राबवले. सीए परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक चिंतीत होते. मात्र, इन्स्टिट्यूटमार्फत सर्व प्रकारची काळजी घेऊन सध्या परीक्षा सुरु आहेत. अभ्यासासाठीचे सर्व साहित्य ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या काळात नाविन्यपूर्ण बदल करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरु आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “अभ्यासाचे साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासह वेबिनार्स, ऑनलाईन कार्यशाळा, तज्ज्ञांची व्याख्याने आयोजिली जाताहेत. सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यालाही सीए परीक्षा देता येईल, यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात आहेत. विविध शिष्यवृत्ती योजना आणल्या जात आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ‘आयसीएआय’कडून विविध सूचना दिल्या जात आहेत. लघु व माध्यम उद्योगांना प्रोत्साहित केले जात आहे. सीए संदर्भातील कायद्यांमधील बदल विद्यार्थी व सीएपर्यंत पोहोचवले जात आहेत.”

सीए मुर्तुझा काचवाला म्हणाले, “कोरोनाच्या अवघड काळातही सनदी लेखापालांनी जीएसटी भरण्याचे काम व्यवस्थितपणे पार पाडले. ऑनलाईन प्रणालीला आत्मसात करत सीएनी केलेले काम उल्लेखनीय आहे. इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सभासदांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासह ऑनलाईन व्याख्यानातून मार्गदर्शन होत आहे. ऑनलाईन फायलिंग करताना घ्यायची काळजीबद्दलही जागृती झाली आहे.” सीए यशवंत कासार यांनीही कोरोनामुळे सनदी लेखापाल क्षेत्रावर झालेल्या बदलांविषयी सांगितले. सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए काशिनाथ पाठारे यांनी आभार मानले.

जनजागृतीसाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0

पुणे : येत्या १ डिसेंबर रोजी होत असलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ब्राह्मण समाजाने अधिकाधिक मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले.

ब्राह्मण समाजातील सुक्षितित मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करून योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, याबाबत जनजागृती करण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे (कॉल सेंटर) उद्घाटन स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी नगरसेवक योगेश समेळ, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, ब्राह्मण महासंघाचे संस्थापक आनंद दवे, विश्वस्त मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, रसिका घाणेकर, महिला आघाडी शहराध्यक्ष नीता जोशी, तृप्ती तारे, मिलिंद बर्वे, हर्षद ठकार आदी उपस्थित होते.

हेमंत रासने म्हणाले, “सुशिक्षित मतदारांनी आळस झटकून मतदान केले पाहिजे. ही पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक असून, त्यात पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवार कोणा एका जिल्ह्याचा नाही, तर मतदारसंघाचा असतो. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल, त्या उमेदवाराला मतदान करून आपला हक्क बजवावा.”

आनंद दवे म्हणाले, “मतदारांनी कोणाला मतदान करायचा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. पण ब्राह्मण समाजातील मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे. जास्तीतजास्त मतदान झाले, तर चांगले उमेदवार निवडून येतील.”

पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदानादिवशी सुटीवर न जाता मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागृती करण्यात येणार असल्याचेही दवे यांनी सांगितले. योगेश समेळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

पेशव्यांच्या पुतळ्याला लोखंडी जिना करणार
शनिवारवाडा येथील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला स्वखर्चाने लोखंडी जिना करण्याची तयारी ब्राह्मण महासंघाने केली असून, त्या जिन्याच्या कामासाठी पुणे महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रासने यांच्याकडे केली. त्याला प्रतिसाद देत रासने यांनी पुढील दोन महिन्यात हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र रोखण्सायाठी नवीन नियमावली – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

0

मुंबई, दि. 27 : राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खेळाडू दाखवून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. असे प्रकार भविष्यात होणार नाहीत यासाठी नवीन नियमावली आणणार असल्याचे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

राज्यातील क्रीडा विभागाच्या विभागनिहाय आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, राज्यात यापुढे बोगस प्रमाणपत्र देण्याचे कोणाचे धाडस होणार नाही. कोणी मागण्याची हिंमतही करणार नाही, अशी नियमावली तयार करण्यात येणार आहे. नोकरीत प्रमाणपत्राचा लाभ घेताना प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहे.

राज्यात उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलासाठी जो निधी वितरित करण्यात आला. त्याची कामे तातडीने सुरु करावीत. जागेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित विभागाशी संपर्क करून त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यापुढे निधी वितरण झाल्यानंतर निधी खर्च करण्याची कार्यवाही तात्काळ करावी. तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत, यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. काही ठिकाणी निधी कमी पडत असेल तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. केदार यांनी केल्या.

क्रीडा राज्यमंत्री कु.तटकरे यांनी क्रीडा संकुलाकरिता सपाट असेल अशीच जागा निवडावी जेणेकरुन येणारा निधी सपाटीकरणासाठी खर्च न होता तो  इमारत उभारणीकरिता आणि क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उपयोगात आणता येईल, असे सांगितले.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये दुसऱ्या तिमाहीत 7.5% ची घसरण

0

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) वाढ 7.5 टक्क्यांनी घटली आहे. तथापि, हा घट सर्व विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच खाली आहे. सर्व विश्लेषकांनी 8% ते 12% पर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तविला होता. सर्वात कमी अंदाज भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) चा होता. त्यामध्ये 8.6% घसरण होण्याचा अंदाज होता. पहिल्या तिमाहीत 23.9% घसरण झाली होती.

आकड्यांनुसार, आताच्या मुल्याच्या आधारावर GDP ची एकूण किंमत चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये 85.30 लाख कोटी रुपयांची राहिली आहे. ही एक वर्षापूर्वी याच काळात 98.39 लाख कोटी रुपयांची होती. म्हणजेच या आधारावर 13.3% ची घसरण नोंदवण्यात आली होती. तर मागील वर्षी पहिल्या वर्षाच्या याच कालावधीत 7% वाढ झाली होती.

8 कोर इंडस्ट्रीजच्या आकड्यांमध्ये घसरण

GDP च्या आकडेवारीच्या आधी 8 कोर इंडस्ट्रीजच्या ऑक्टोबरचा डेटा जाहीर करण्यात आला. आकडेवारीनुसार, 8 कोर इंडस्ट्रीजचा आकडा ऑक्टोबरमध्ये 124.2 वर राहिला. ऑक्टोबर 2019 च्या तुलनेत हे 2.5% कमी आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत झालेल्या वाढीविषयी बोलायचे झाले तर त्यात 13% घट नोंदली गेली आहे.

दुसर्‍या तिमाहीत अर्थव्यवस्था उघडते

दरम्यान एप्रिल आणि मेमध्ये पहिल्या तिमाहीचे पहिले दोन महिने संपूर्ण लॉकडाऊनमध्ये होते. उपक्रम आणि प्रवासाची सुरुवात मेच्या अखेरीस झाली. दुसऱ्या तिमाहीत संपूर्ण अर्थव्यवस्था उघडली गेली आहे. अशा परिस्थितीत GDP मध्ये कमी घट होण्याची शक्यता आहे. रेटिंग एजन्सीचा असा अंदाज आहे की जीडीपी दुसर्‍या तिमाहीत 10 ते 11% पर्यंत घसरू शकतो.

RBI चा अंदाज 8.6% घसरणीचा होता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) असा अंदाज लावला आहे की जीडीपी 8.6% ने कमी होईल. मूडीजने 10.6, केअर रेटिंग 9.9, क्रिसिल 12, इक्राने 9.5% आणि एसबीआय रिसर्च 10.7% च्या घसरणीची शक्यता वर्तवली आहे. ज्या सेक्टर्समध्ये चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती त्यामध्ये कृषी, बँकिंग -फायनेंस आणि सेवा सेक्टर आहेत. तर मॅन्यूफॅक्चरिंग आणि कंस्ट्रक्शनमध्ये घसरण होऊ शकते.

लिस्टेड कंपन्या नफा रेकॉर्ड वाढला
गुरुवारी, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMIE) म्हणाले की दुसऱ्या तिमाहीत लिस्टेड कंपन्यांचा नफा 1.50 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. कोणत्याही एका तृतीयांश भागातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा आहे. यापूर्वी 2014 च्या चौथ्या तिमाहीत 1.18 लाख कोटी रुपयांचा नफा झाला होता.

दुसर्‍या तिमाहीत सुधारणा अपेक्षित आहे

दुसऱ्या तिमाहीत सुधारणे अपेक्षित आहे कारण आता अनलॉकमुळे सर्व सुरू झाले आहे. दुसरे म्हणजे प्रत्येक सेक्टर खुले आहे आणि तिसरे म्हणजे दुसऱ्या तिमाहीची अर्निंग चांगली आहे. डिझेल, वीज, जीएसटी यासारख्या सर्व उपभोग आणि संकलन मोर्चांमध्ये सुधारणा चांगली झाली आहे.

GST कलेक्शन 1.05 लाख कोटी

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ऑक्टोबरमध्ये 1.05 लाख कोटी रुपये होता, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त होता. तसेच देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या अहवालात नोव्हेंबरमध्ये जीएसटी 1.08 लाख कोटी रुपये होईल असा अंदाज आहे. तसेच, जुलै ते सप्टेंबर दरम्यान बहुतेक देशांची अर्थव्यवस्था ढासळत आहे. यासोबतच, चीन आणि अमेरिकेसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्येही चांगली वाढ दिसून आली आहे. चीनची अर्थव्यवस्था 4% तर अमेरिकेची 33% पर्यंत वाढली आहे.

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा

0

मुंबई दि. 27 : महाराष्ट्रात मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात घेता मनोरंजन क्षेत्राबाबतचे धोरण असणे काळाची गरज बनली आहे. आज मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार काम करीत असताना या क्षेत्रामुळे अनेक रोजगार निर्माण होत आहेत हे विचारात घेऊनच या क्षेत्रासाठी निश्चित धोरण आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली.

श्री. देशमुख म्हणाले, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मनोरंजन क्षेत्रातून मोठी भर पडत असून यामध्ये आणखी वाढ होण्यास वाव आहे. यासाठीच येणाऱ्या काळात चित्रपट निर्मात्यांना मुंबईबरोबरच राज्यातील इतर चित्रीकरण स्थळांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महामंडळामार्फत तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये चर्चिले गेलेल्या बाबींचाही मनोरंजन क्षेत्रासाठीचे सर्वंकष धोरण ठरविताना समावेश करण्यात यावा.

महामंडळाने गेल्या 15 वर्षाची लाभांश देण्याची परंपरा कायम ठेवली असून अनेक सार्वजनिक उपक्रमांपैकी नफ्यात असलेल्या काही मोजक्या महामंडळापैकी चित्रनगरी हे एक महामंडळ आहे. यापुढील काळातही ही परंपरा अशीच सुरु राहील. येणाऱ्या काळात महामंडळ केवळ आर्थिक पातळीवरच नाही तर धोरणात्मक पातळीवरही महत्वाची कामगिरी करेल, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सन 2019-20 च्या वार्षिक लेख्यांवर चर्चा झाली. सन 2019-20 या वर्षीचा पाच टक्के इतका लाभांश आजच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आला असून लाभांशाची एकूण रक्कम 1 कोटी 41 लाख इतकी आहे.

भाजपचे रविवारी पदवीधर आणि शिक्षक मतदार महासंपर्क अभियान दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

0

निवडणूक प्रमुख राजेश पांडे यांची माहिती
पुणे, ता. २७ – पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप आणि मित्र पक्षांचे उमेदवार संग‘ाम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ येत्या रविवारी (२९ नोव्हेंबर) पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये दहा हजार कार्यकर्ते ‘पदवीधर आणि शिक्षक मतदार महासंपर्क अभियान’ राबविणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख राजेश पांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
पांडे म्हणाले, ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील या अभियानात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, पक्षाच्या पदाधिकार्‍यांपासून बूथ प्रमुखांपर्यंतचे दहा हजार कार्यकर्ते पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी घरोघर जाऊन प्रत्यक्ष संपर्क करणार असून जाहीरनामा, परिचय पत्रक, मतदार स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे.’
पांडे पुढे म्हणाले, ‘प्रत्येकी एक हजार मतदारांमागे एक प्रमुख कार्यकर्ता याप्रमाणे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पाचही जिल्ह्यातील रचना पूर्ण करण्यात आली आहे. पारंपरिक प्रचार साधनांबरोबर मोबाईल ऍप, आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान स्लिपांचे वाटप करण्यात येत आहे. एसएमएस, प्रत्यक्ष ङ्गोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी प्रचार करण्यात आला आहे. संस्थात्मक पातळीवर मतदानाची रचना पूर्ण करण्यात आली आहे.’
सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत संग‘ाम देशमुख आणि जितेंद्र पवार यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले आहे. प्रदेशाध्यक्षांपासून बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या पदवीधर मतदार महासंपर्क अभियानातून देशमुख यांचा विजय सुनिश्‍चित होईल असा विश्‍वास पांडे यांनी व्यक्त केला आहे.  

अध्यक्षपदासाठी सुशांत शेलार यांची खेळी : मेघराज भोसले

0

कोल्हापूर : अभिनेते सुशांत शेलार यांनी अध्यक्षपदासाठी माझ्याविरोधात अविश्वास ठरावाची खेळी खेळली. मात्र असा ठराव करण्याची तरतूद महामंडळाच्या घटनेतच नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी हे सगळे एकत्र आले आहेत. चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी केवळ मला खाली खेचण्यासाठी कार्यकारिणीची बैठक घेतली गेली, असा आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले यांनी शुक्रवारी केला.

माजी अध्यक्ष भोसले यांनी अविश्वास ठरावाविरोधात न्यायालयात दाद मागणार असे जाहीर केल्याने आठ संचालकांनी शुक्रवारी कॅव्हेट दाखल केले.

भोसले यांनी निवेदनाद्वारे भूमिका मांडली. आजपर्यंत सगळ्याच ठरावांना सर्वानुमते मंजुरी असताना मी कोणता मनमानी कारभार केला, महाकलामंडलबाबत सर्वांना ग्रुपवर विचारण्यात आले, त्यावेळी काहींनी सकारात्मक निर्णय दिला; तर काहीजण गप्प बसले.

मग चित्रपट महामंडळ कलामंडलच्या दावणीला बांधले गेले, हा आरोप कशाच्या जोरावर करण्यात आला? राज्यपालनियुक्त आमदारकीसाठी सगळ्याच संचालकांनी माझ्या नावाने बहुमताने ठराव केला. मग आत्ताच त्याचा कांगावा का केला जात आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

महामंडळाच्या घटनेत अविश्वास ठरावाची तरतूद नाही, नैसर्गिक न्यायाने हा हक्क मान्य केला तरी अध्यक्षांना किमान सात दिवस आधी नोटीस देणे गरजेचे आहे.

यमकर यांनी स्वत: बँकेत भरलेला धनादेश, बाळा जाधव यांचे धोक्यात आलेले संचालकपद, सतीश रणदिवे व सतीश बिडकर हे मागील कार्यकारिणीच्या १० लाख ७८ हजार रुपयांच्या प्रकरणात दोषी ठरले आहेत. वर्षा उसगावकर, निकिता मोघे यांचा जादा भत्त्याचा विषय ऐरणीवर आल्याने स्वार्थ सांभाळण्यासाठीच सगळे एकत्र आल्याची टीका भोसले यांनी केली.

तेव्हा लता मंगेशकरांवर झाला होता विष प्रयोग – कोणी केला माहिती असूनही त्यांनी तक्रार केली नाही .

0

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर विषप्रयोग झाला होता. ही माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. १९६३ मध्ये लता मंगेशकर हे नाव सर्वश्रुत झालं होतं. लता मंगेशकर यांना गाण्यासाठी दिवसाचे तास कमी पडत होते. अशात त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हा विषप्रयोग कुणी केला? हे मला कळलं होतं पण माझ्याकडे पुरावा नव्हता असं आता लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

काय म्हटलं आहे लता मंगेशकर यांनी?
“ही खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी माझ्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. मी खूप आजारी झाले होते. मी थोडेथोडके नाही जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. मात्र त्या अफवा होत्या. एकाही डॉक्टरने मला हे सांगितलं नव्हतं की तुम्हाला पुन्हा गाता येणार नाही. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला बरं केलं. त्यांनी मला या आजारातून बरं केलं. तीन महिने माझं गाणंही बंद होतं. मला भयंकर अशक्तपणा आला होता. त्यावेळी मी अशक्त झाले होते की मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न निर्माण झाला होता.”

हा विषप्रयोग कुणी केला?
विषबाधा कुणामुळे झाली होती हा प्रश्न विचारला असता माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळलं होतं. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही कराण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचं आम्हाला नवल वाटलं होतं.

मेघराज भोसले यांना अध्यक्षपदावरून काढले …

0

कोल्हापूर-: मनमानी,राजकारणी कारभार आणि गैरकृत्य करणाऱ्यांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्याविरोधातील अविश्वास ठराव गुरुवारी आठ विरुद्ध चार मतांनी मंजूर करून त्यांच्याकडील अध्यक्षपद काढून घेऊन प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.

महामंडळाचे कार्यवाह अभिनेते सुशांत शेलार यांनी सांगितले कि,’आम्ही बहुमताने मेघराज यांना अध्यक्ष केले होते, आता बहुमतानेच त्यांना हटविले असून प्रभारी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्याकडे कार्यभार दिला. लवकरच नवे पदाधिकारी निवडले जातील.

कोरोना काळातील साखर चोरी, दोन लाखांच्या धनादेशाचा भरणा अशा वादग्रस्त विषयांच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक येथील शहाजी कॉलेजमध्ये झाली. बैठकीची सुरुवातच नाट्यमयरित्या झाली. बैठक दीड वाजता सुरू होताच संचालक बाळा जाधव यांनी भोसले यांना संचालकांनी आपल्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला असून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हा विषय विषयपत्रिकेवर आलेला नसल्याने हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगून राजीनामा देणार नसल्याचे अध्यक्ष भोसले यांनी स्पष्ट केले. त्यावरून बैठकीत तब्बल पाच तास वादावादी व चर्चेचा घोळ सुरू राहिला.

शेवटी हा ठराव कायदेशीर व्हावा यासाठी ऐनवेळचा विषय म्हणून घेण्यात आला. उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, सतीश बिडकर, सतीश रणदिवे, सुशांत शेलार, नीकिता मोघे, पितांबर काळे यांनी विरोधात तर खजिनदार संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, शरद चव्हाण, विजय खोचीकर यांनी अध्यक्षांच्या बाजूने मत दिले. अविश्वास ठरावानंतरही अध्यक्षांनी राजीनामा न दिल्याने यमकर यांना प्रभारी अध्यक्ष करण्यात आले. मागील सभेचे इतिवृत्त नामंजूर करण्यात आले.

सुशांत शेलार म्हणाले, चार वर्षे आम्ही अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पण संचालकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने सुुरू असलेल्या कारभाराला यमकरने वाचा फोडली.यमकर म्हणाले, कोरोना काळात गरीब कलावंतांना किराणा माल मोफत द्यावा म्हणून अनेक नामवंतांनी मदत केली होती त्यात अफरातफर करण्यात आली त्याकडे लक्ष वेधूनही भोसले यांनी त्याकडे दुर्लक्ष केले .साखर चोरी, धनादेश अशा अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. माझे आणि बाळा जाधव यांचे संचालकपद रद्दचा प्रस्ताव अतिशय चुकीचा होती. आम्ही खरे होतो म्हणून संचालकांनी साथ दिली.

मेघराज भोसले म्हणाले, निवडणूक आली म्हणून, गेल्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या माझ्याच पॅनेलच्या ८ जननी अविश्वास ठराव करून माझ्या पाठीत खंजीर खुपसला. सुशांत शेलार यांना अध्यक्ष व्हायचे आहे. संचालकांची कारस्थाने आणि बेकायदेशीर गोष्टी लपविण्याचे तसेच आर्थिक आमिषे दाखवून हे कारस्थान रचले गेले. तुमच्यात दम असता तर नोटीस काढून विषय घ्यायला हवा होता. मी राजीनामा दिलेला नाही आणि खचलेलो नाही. मी न्यायालयात दाद मागेल .