Home Blog Page 2384

एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य-मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय वाचा

0

मुंबई-एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020 अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात 120 कोटी इतका निधी आकस्मिकता निधीमधून अग्रीम म्हणून मंजूर करण्यात आला होता. या अग्रीमाचा रक्कम वजा करून उर्वरित 880 कोटी रुपये 6 मासिक हप्त्यात एसटी महामंडळास अदा करण्यात येईल. ही रक्कम हिवाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणी म्हणून मंजूर करण्यात येईल. (नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या महिन्यांच्या वेतनासाठी प्रति महिना 150 कोटी या प्रमाणे व एप्रिल 2021 च्या वेतनासाठी 130 कोटी रुपये)
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या 99 हजार 787 एवढी असून विविध प्रवासी वर्गाला प्रवास भाड्यात सवलतीपोटी शासनाकडून महामंडळास 1700 कोटी रुपये देण्यात येतात.

महामंडळाच्या एकूण खर्चापैकी 40 टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर आणि 32 टक्के खर्च इंधनावर होतो. 23 मार्च पासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने एसटी महामंडळाची वाहतूक सेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले होते.

अद्यापही जनतेच्या मनात असलेल्या भितीमुळे प्रवासी संख्या मर्यादितच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा लक्षात घेऊन हे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.
—–०—–

सामाजिक न्याय विभाग

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.

यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.

मा.राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत “Scheduled Caste & Nav Bouddha” आणि मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौध्द” या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

—–०—–

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सेवार्थ प्रणालीत नोंदणी न झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना
निवृत्तीवेतनाचा लाभ देणार

मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेशित न झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित असल्याचे समजून त्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाने विद्यापीठामधील शासन मान्य पदावरील 148 कर्मचाऱ्यांच्या बदल्या/पदोन्नत्या विना अनुदानित पदावर केलेल्या आहेत ही बाब लक्षात घेता सकृतदर्शनी त्यांच्या सेवेत खंड पडला आहे.

अशा कर्मचाऱ्यांनी विनाअनुदानित पदावर केलेली सेवा नियमित असल्याचे समजून सदरहू सेवाकालावधी निवृत्तीवेतन विषयक लाभासाठी अनुज्ञेय ठरविण्यात यावा, यासाठी मान्यता दिली.

शासनाने सर्व अकृषि विद्यापीठांसाठी मंजूर केलेल्या पदांची बिंदुनामावली स्वतंत्र ठेवण्यात यावी. तसेच अशा अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या विद्यापीठाने विनाअनुदानित पदावर करू नयेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात उद्भवणार नाहीत असेही बैठकीत ठरले.
—–०—–

वैद्यकीय शिक्षण विभाग

चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये
अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करणार

राज्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेत अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी प्रथम टप्प्याकरिता 888 पदांची निर्मिती देखील करण्यात येईल.

या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन 120 कोटी रुपये तर राज्य शासन 30 कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे. सध्या औरंगाबाद येथील बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून यवतमाळ येथील बांधकामही जवळपास पूर्ण झाले आहे.

लातूर आणि अकोला येथील महाविद्यालयाच्या इमारती पूर्ण झाल्या असून कोविड उपचारासाठी त्या वापरात आहे. या नव्याने सुरु होणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालयांमध्ये हृदयरोगचिकित्सा, उर शल्यचिकित्सा, मुत्र पिंडचिकित्सा, मुत्र रोगशल्यचिकित्सा, मज्जातंतु शल्यचिकित्सा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग इत्यादी सेवा असतील.

या रुग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यात वर्ग-1 चे 34, वर्ग-2 चे 38, वर्ग-3 नियमित 388 तसेच बाह्यस्त्रोतांने 28, वर्ग-4 कंत्राटी 344 आणि विद्यार्थ्यांची निवासी पदे अशी 888 पदे भरण्यात येतील. यासाठी 42 कोटी 99 लक्ष 23 हजार 568 रुपये असा वार्षिक खर्च येईल.
—–०—–

गृह विभाग

डिसेंबर 2019 पर्यंतचे राजकीय व सामाजिक खटले मागे घेणार

राज्यातील 31 डिसेंबर 2019 पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

यापूर्वी 14 मार्च 2016 च्या शासन निर्णयान्वये 1 नोव्हेंबर 2014 पूर्वीचे खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि 1 नोव्हेंबर 2014 नंतर देखील राज्यात विविध राजकीय, सामाजिक व इतर जनआंदोलनाची संख्या सतत वाढते आहे.

हे खटले मागे घेण्याबाबत लोकप्रतिनिधी व विविध संघटनांकडून सातत्याने विनंती होत आहे. त्यामुळे ही सुधारणा करण्यात आली. यापूर्वी खटले मागे घेण्याकरिता वित्त व नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. हे खटले काढून घेण्यास आता गृह विभागाचे प्रमुख म्हणून गृह मंत्री हे सक्षम प्राधिकारी असल्याने ही मंत्रिमंडळ उपसमिती आता बरखास्त करण्यात आली आहे.
—–०—–

कृषी विभाग

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविणार

राज्यात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

यासाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येईल. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या दोन्ही अंमलबजावणीतील तरतुदी भिन्न असल्यामुळे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरुच राहील.

राज्यात जवळपास 2.24 लाख असंघटीत व अनोंदणीकृत कृषी व अन्न प्रक्रीया उद्योग आहेत. या क्षेत्रातील उद्योजकांना बाहेरून कर्ज मिळत नाही. तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी जास्तीचा खर्च येतो. त्यांच्याकडे आधुनिकीकरणाचा अभाव आहे. तसेच एकात्मिक अन्न पुरवठा साखळी देखील नाही. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येईल.

ही योजना केंद्र व राज्य खर्चाचे प्रमाण 60:40 अशा तत्त्वावर चालविली जाईल. तसेच प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारित असेल.

यामध्ये उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन बळकट करणे, त्यांना पुरवठा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रीया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे या उद्योगांना व्यावसायिक व तांत्रिक सहाय्य देणे, क्रेडिट लिंकद्धारे अर्थसहाय्य करणे आदी बाबींचा समावेश आहे.

या योजनेतील लाभार्थींना प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडीट लिंक्ड सबसिडी आधारावर अनुदान मिळेल. त्याचप्रमाणे प्रकल्प आराखडा तयार करणे, कौशल्य प्रशिक्षण, बँक कर्ज, परवाने काढणे यासाठी मदत केली जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग नोडल असून राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी देखील स्थापन करण्यात येईल.

—–०—–

संजय राऊत यांच्यावर उद्या लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

0

मुंबई-शिवसेना नेते संजय राऊत यांना आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येईल. गेल्या वर्षी लीलावती रुग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, त्यांना परत त्रास सुरू झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार परत एकदा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले होते. त्यासंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्यावर एप्रिल 2020 मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण, कोरोनामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. तीच शस्त्रक्रिया उद्या करण्यात येणार आहे. लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर मॅथ्यू आणि डॉ. मेनन हे राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करतील. आज सायंकाळपर्यंत संजय राऊत रुग्णालयात दाखल होणार असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.

बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का? : योगी आदित्यनाथ

0

मुंबई-इथे कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का? असा सवाल करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्ही बॉलिवूड घेऊन जायला आलो नाही, आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत. अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत दिली. तसेच बॉलिवूड मुंबईतच राहील अशी ग्वाही यावेळी दिली.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, “इथे कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. बॉलिवूड कुणीही घेऊन जायला ही काय पर्स आहे का? ही खुली स्पर्धा आहे. कुणासोबत भेदभाव न करता चांगले वातावरण देण्याची, सुरक्षा देण्याची, सामाजिक सुरक्षा देण्याची गरज आहे. ती प्रत्येकाने दिली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. मुंबई फिल्मसिटी आपले काम करेल. उत्तर प्रदेशातील नवी फिल्मसिटी त्यांचे काम करेल, असेही आदित्यनाथ म्हणाले.

शिवसेनेला काढला चिमटा

पुढे बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, कुणीही कुणाची गुंतवणूक घेऊन जाणार नाही. कुणालाही बाधा आणायची नाही तर भारताची अर्थव्यवस्था वाढवायची आहे. मला वाटते हेच सर्वांचेही लक्ष असले पाहिजे, असा चिमटाही त्यांनी शिवसेनेला काढला.

वर्ल्डक्लास फिल्मसिटी बनवण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा

बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवे मॉडल तयार करायचे आहे. जागतिक दर्जाची फिल्मसिटी तयार करण्यासाठी बॉलिवूडकरांशी चर्चा केली. आम्ही कुणाचे काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नव निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असेही आदित्यनाथ म्हणाले.

अंडरवर्ल्डद्वारे बॉलिवूडवर दबाव टाकत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी – मंत्री रझा

उत्तर प्रदेशमधील फिल्म सिटीवरून सुरू असलेल्या राजकारणादरम्यान योगी सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री मोहसीन रझा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अंडरवर्ल्डद्वारे बॉलिवूडवर दबाव टाकत आहेत. अनेक चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकारांना मुंबई सोडून उत्तर प्रदेशात यायची इच्छा आहे. मात्र त्यांना अंडरवर्ल्डद्वारे धमकावले जात आहे असा आरोप मोहसीन रझा यांनी केला.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्भया फंडातील निधीचा सुयोग्य वापर करा – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

0

मुंबई, दि. 2 : राज्यासाठी निर्भया फंडामधून प्राप्त होणाऱ्या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुयोग्यपणे करावा तसेच महिलांसाठी असलेल्या विविध योजनांकरिता निधी उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिल्या.

महिला व बालविकास विभागांतर्गत निर्भया योजनेकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली. महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव श्री.मंत्री, उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.

निर्भया फंडांतर्गत उपलब्ध असलेला निधी राज्यांना वितरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने निर्धारित केलेले निकष व त्याबाबतची कार्यपध्दती यावेळी विषद करण्यात आली. राज्यासाठी निर्भया फंडामधून प्राप्त होणारा निधी, महिलांच्या अन्य योजनांसाठी निधी यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

यावेळी ‘कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व’ (सीएसआर) बाबतही आढावा घेण्यात आला. सीएसआर निधीतून जुन्या अंगणवाड्या दुरुस्त करणे, नव्या अंगणवाड्या बांधणे याबाबत चर्चा झाली. बाल धोरण ठरविण्याबाबत व सुधारणा करण्याबाबतही आढावा घेण्यात आला.

तलाठी पदभरती : एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देणार

0

मुंबई,: बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांनी दिली.

श्री. थोरात म्हणाले, 7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरुन 7 जिल्ह्यातील सन 2019 तलाठी पदभरतीतील एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.

सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, हे जिल्हे, नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक  विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील  पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पदभरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली होती. तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित 8 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित ठरणार नसल्याने 8 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने 9 सप्टेंबर 2020 रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी आदेश पारित करुन एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसा क्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेश पारित करण्यात आले असल्याचेही श्री. थोरात यांनी सांगितले.

विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईतच होणार

0

मुंबई- आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.तसेच कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे घेण्यात येणारे विधानमंडळाचे आगामी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे आयोजित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

  • आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय पुढील प्रमाणे .

एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

यापूर्वी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर 2020 अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात 120 कोटी इतका निधी आकस्मिकता निधीमधून अग्रीम म्हणून मंजूर करण्यात आला होता.  या अग्रीमाचा रक्कम वजा करून उर्वरित 880 कोटी रुपये 6 मासिक हप्त्यात एसटी महामंडळास अदा करण्यात येईल.  ही रक्कम हिवाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणी म्हणून मंजूर करण्यात येईल. (नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 या महिन्यांच्या वेतनासाठी प्रति महिना 150 कोटी या प्रमाणे व एप्रिल 2021 च्या वेतनासाठी 130 कोटी रुपये)

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या 99 हजार 787 एवढी असून विविध प्रवासी वर्गाला प्रवास भाड्यात सवलतीपोटी शासनाकडून महामंडळास 1700 कोटी रुपये देण्यात येतात. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी 40 टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर आणि 32 टक्के खर्च इंधनावर होतो. 23 मार्च पासून कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने एसटी महामंडळाची वाहतूक सेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद असल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले होते. अद्यापही जनतेच्या मनात असलेल्या भितीमुळे प्रवासी संख्या मर्यादितच आहे.  त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा लक्षात घेऊन हे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

—–०—–

राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणार

राज्यातील शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

काही वस्त्यांची नावे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, ब्राम्हणवाडा, माळी गल्ली, अशा स्वरुपाची नावे आहेत. ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला भुषणावह नसल्याने सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने ही नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या वस्त्यांना आता समता नगर, भीम नगर, ज्योती नगर, शाहू नगर, क्रांती नगर तसेच इतर तत्सम नावे देण्यात येतील.

यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेच्या नावात बदल करुन त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे असे करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हे नाव बदलून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असे करण्यात आलेले आहे.

मा.राष्ट्रपतींच्या आदेशानुसार अनुसूचित जातींच्या संबोधनाकरिता, सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र इत्यादींमध्ये “दलित” शब्दाऐवजी इंग्रजी भाषेत “Scheduled Caste & Nav Bouddha” आणि मराठी भाषेत “अनुसूचित जाती व नव बौद्ध” या संबोधनाचा वापर करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

—–०—–

सेवार्थ प्रणालीत नोंदणी न झालेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना

निवृत्तीवेतनाचा लाभ देणार

मुंबई विद्यापीठामधील एचटीई सेवार्थ प्रणालीमध्ये प्रवेशित न झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित असल्याचे समजून त्यांना निवृत्तीवेतन विषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाने विद्यापीठामधील शासनमान्य पदावरील 148 कर्मचाऱ्यांच्या बदल्या/पदोन्नत्या विना अनुदानित पदावर केलेल्या आहेत ही बाब लक्षात घेता सकृतदर्शनी त्यांच्या सेवेत खंड पडला आहे. अशा कर्मचाऱ्यांनी विनाअनुदानित पदावर केलेली सेवा नियमित असल्याचे समजून सदरहू सेवाकालावधी निवृत्तीवेतन विषयक लाभासाठी अनुज्ञेय ठरविण्यात यावा, यासाठी मान्यता दिली.

शासनाने सर्व अकृषि विद्यापीठांसाठी मंजूर केलेल्या पदांची बिंदुनामावली स्वतंत्र ठेवण्यात यावी. तसेच अशा अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या विद्यापीठाने विनाअनुदानित पदावर करू नयेत, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात उद्भवणार नाहीत असेही बैठकीत ठरले.

—–०—–

चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये

अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करणार

राज्यामध्ये प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेत अकोला, यवतमाळ, लातूर व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  यासाठी प्रथम टप्प्याकरिता 888 पदांची निर्मिती देखील करण्यात येईल.

या प्रत्येक महाविद्यालयासाठी केंद्र शासन 120 कोटी रुपये तर राज्य शासन 30 कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे.  सध्या औरंगाबाद येथील बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून यवतमाळ येथील बांधकामही जवळपास पूर्ण झाले आहे.  लातूर आणि अकोला येथील महाविद्यालयाच्या इमारती पूर्ण झाल्या असून कोविड उपचारासाठी त्या वापरात आहे. या नव्याने सुरु होणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालयांमध्ये हृदयरोगचिकित्सा, उर शल्यचिकित्सा, मुत्र पिंडचिकित्सा, मुत्र रोगशल्यचिकित्सा, मज्जातंतु शल्यचिकित्सा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग इत्यादी सेवा असतील.

या रुग्णालयांमध्ये पहिल्या टप्प्यात वर्ग-1 चे 34, वर्ग-2 चे 38, वर्ग-3 नियमित 388 तसेच बाह्यस्त्रोतांने 28, वर्ग-4 कंत्राटी 344 आणि विद्यार्थ्यांची निवासी पदे अशी 888 पदे भरण्यात येतील.  यासाठी 42 कोटी 99 लक्ष 23 हजार 568 रुपये असा वार्षिक खर्च येईल.

—–०—–

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविणार

राज्यात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येईल.  मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या दोन्ही अंमलबजावणीतील तरतुदी भिन्न असल्यामुळे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरुच राहील.

राज्यात जवळपास 2.24 लाख असंघटीत व अनोंदणीकृत कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग आहेत.  या क्षेत्रातील उद्योजकांना बाहेरून कर्ज मिळत नाही.  तसेच वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी जास्तीचा खर्च येतो.  त्यांच्याकडे आधुनिकीकरणाचा अभाव आहे.  तसेच एकात्मिक अन्न पुरवठा साखळी देखील नाही.  या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येईल.  ही योजना केंद्र व राज्य खर्चाचे प्रमाण 60:40 अशा तत्त्वावर चालविली जाईल.  तसेच प्रामुख्याने नाशवंत मालावर आधारित असेल.

यामध्ये उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन बळकट करणे, त्यांना पुरवठा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे, या उद्योगांना व्यावसायिक व तांत्रिक सहाय्य देणे, क्रेडिट लिंकद्धारे अर्थसहाय्य करणे आदी बाबींचा समावेश आहे.

या योजनेतील लाभार्थींना प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत क्रेडीट लिंक्ड सबसिडी आधारावर अनुदान मिळेल.  त्याचप्रमाणे प्रकल्प आराखडा तयार करणे, कौशल्य प्रशिक्षण, बँक कर्ज, परवाने काढणे यासाठी मदत केली जाईल.  या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभाग नोडल असून राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी देखील स्थापन करण्यात येईल.

.

कोरोना विषयी काम करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा

0
  • काँग्रेस गटनेते आबा बागुल व विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची मागणी.

पुणे- कोरोना विषयक काम करणारे मनपा कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, ठेकेदारी पद्धतीने असलेले कर्मचारी यांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या प्रमाणात हजर दिवसाप्रमाणे प्रतिदिन .रु.१५०/-प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी स्थायी समितीस केली आहे.

कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थितीती नियंत्रित करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.राज्य शासनाने दि.२४ मार्च, ते १७ मे, व १४ जुलै, ते २३ जुलै, या कालावधीत ६५ दिवसांचा लॉकडाऊन कालावधी जाहीर करण्यात आला होता. सदर कालावधी मध्ये सर्व लोकल सेवा / परिवहन सेवा व इतर दैनिक प्रवासी सेवा बंद करण्यात आल्या होत्या.त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी ये-जा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

तसेच सदरच्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दैनंदिन सेवा तसेच हॉटेल,
रेस्टॉरंट व भोजनालय बंद करण्यात आली होती. त्यामुळे सदरहून कर्मचारी यांना भोजनाची व्यवस्था उपलब्ध झाली नाही. पुणे महानगरपालिका नियमित सेवेतील तसेच
अत्यावश्यक सेवेतील सर्वच अधिकारी/कर्मचारी यांनी जोखीम पत्करून कामावर हजर राहून त्यांचेवर सोपविलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. कोरोना विषाणूचा प्रसार व त्यावरील उपाययोजना अंतर्गत महानगरपालिकेने विविध स्थापन केलेले कक्ष, रुग्णालये, कोविड केअर सेंटरमध्ये महापालिकेतील बहुतांशी सर्वच विभाग व विभागातील अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊन कालावधीत देखील वेळेचे बंधन पाळता नेमून दिलेले काम अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.अश्या कर्मचाऱ्यांना १५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी बागुल व धुमाळ यांनी केली आहे.

श-ओ-क्राफ्ट’द्वारे रोजगारनिर्मिती राज्यातील पहिला अभिनव उपक्रम – मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख

0

मुंबई, दि. 2 : मत्स्य कातडीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश-ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती होणार आहे. शासन नव उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

तारापोरवाला मत्स्यालय येथे फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 व 3 डिसेंबर रोजी सुरू असणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात मंत्री अस्लम शेख बोलत होते.

या कार्यक्रमास मत्स्यविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ.अतुल पाटणे आदींसह अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

मंत्री श्री. शेख म्हणाले, जागतिक स्तरावर माशांच्या कातड्यापासून विविध वस्तू बनविण्यात येतात. शासनाने टाळेबंदीच्या काळातही मच्छिमारांना सहकार्य केले आहे. फिश ओ क्राफ्ट या कौशल्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे मच्छिमारांना आणि नव-तरूणांना नव-उद्योग करण्याची संधी प्राप्त होणार आहे. मत्स्यव्यवसाय करण्याव्यतिरिक्त उद्योग करण्याची नवी संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी विनामुल्य प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. हा एक क्रांतीकारी उपक्रम असून, राज्यातील विविध जिल्ह्यातही हा उपक्रम पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे. याचबरोबर मत्स्यव्यवसाय विभागाच्या विकासासाठी असणाऱ्या नवीन सुचनांचे शासन स्वागत करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य मत्स्यव्यवसाय विभाग करीत आहे. माशांच्या कातडीपासून विविध वस्तू बनविण्याचा हा उपक्रम जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांपर्यंत पोहोचल्यास एक नवीन उद्योग सुरू करण्यास मदत होणार आहे. यामुळे मच्छिमार बांधवांचा विकास होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आयुक्त डॉ.अतुल पाटणे म्हणाले, राज्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईला 75 टक्के किनारा लाभला असून, मुंबई ही एक मोठी बाजारपेठ असल्याने हा उद्योग करताना मच्छिमार बांधवांना अडथळे येणार नाहीत. जवळपास 40 ते 50 मच्छिमार बांधव आणि इतर प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. माशांच्या कातडीवर संशोधन होणे ही काळाची गरज आहे. मत्स्य कातडी पासून उत्पादने आदींचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह कौशल्य विकास प्रशिक्षणामार्फत देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.पाटणे यांनी यावेळी दिली.

‘वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राबविणार – वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

0

मुंबई, दि. 2 : तृणभक्षक प्राणी व पाळीव प्राणी यांच्यासाठी वन क्षेत्रावर ‘वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम’ राज्यात सन 2020-2021 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

राज्य वन्यजीव मंडळाच्या 15 व्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वाघ व इतर वन्यजीव यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने वन क्षेत्रात कुरण विकासाचा कार्यक्रम राबवावा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता कॅम्पानिधी मधून वन कुरण व चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राज्यभर वन क्षेत्रावर राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची व यासाठी यावर्षी कॅम्पा निधीतून 50 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात आल्याची माहितीही  श्री.राठोड  यांनी दिली.

वनातील व वनेतर क्षेत्रातील चारा (गवत) हे तृणभक्षीय प्राण्यांसाठी जगण्याचे महत्त्वाचे साधन असते. त्यामुळे जीवन साखळी निरंतर राहते व तिच्यात कोणताही खंड पडत नाही. मात्र अतिचराईमुळे ही साखळी धोक्यात येत आहे. तसेच वन व वनेतर क्षेत्रात पाळीव प्राण्यामार्फत तीव्र चराई झाल्याने वन व वनेतर क्षेत्र ओसाड होते व उत्पादनक्षम राहत नाही. राज्यातील मोठे क्षेत्र अवर्षणग्रस्त क्षेत्र असून शेती सोबतच पशुपालन हा एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय आहे. तसेच तो दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आधार ठरतो. त्यामुळे कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम राबवणे व त्यातून तृणभक्षीय वन्यजीव व शेतकऱ्यांच्या पशुपालन विषयक गरजा भागवणे व वनावरील ताण कमी करणे हे महत्त्वाचे ठरणार आहे असे श्री.राठोड यांनी सांगितले.

गवताळ कुरणे ही फक्त पाळीव प्राणी व वन्य तृण भक्षक प्राणी यांच्यासाठीच फक्त उपयोगाची नसून जल व मृद संधारणासाठीही ती तेवढीच महत्त्वाची आहेत. कुरण विकासामुळे जैव विविधतेमध्ये सुद्धा भर पडते व निसर्ग समृद्ध होतो. केंद्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाअंतर्गत भूमी संसाधन विभागाने राष्ट्रीय सदुर संवेदन यंत्रणेच्या मदतीने केलेल्या पाहणी नुसार 3 लाख 7 हजार चौरस किलोमीटर  क्षेत्रापैकी 53 हजार 484 चौरस किलोमीटर क्षेत्र पडीक आहे व त्याची टक्केवारी ही 17.38 टक्के आहे. असे हे पडीत क्षेत्र तात्काळ उत्पादनक्षम करणे आवश्यक आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्र 3 लाख 7 हजार चौरस किलोमीटर असून त्यापैकी वन क्षेत्र 62 हजार चौरस किलोमीटर आहे. या जंगल व्याप्त क्षेत्रापैकी 2 हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हे कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी राखीव आहे.

या सर्वंकष बाबी विचारता घेता वन विभाग व वन्यजीव विभागामार्फत वन जमिनीवर वन कुरण व वैरण विकास कार्यक्रम राबवण्याबाबत वन विभागाची विस्तृत व व्यापक योजना तयार करण्यात आली आहे. वनांमध्ये चारा उपलब्ध होणार असल्याने तृणभक्षी प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान यामुळे कमी होण्यास मदत होईल. आदिवासी व पारंपरिक निवासी यांच्या पशुधनासाठी चारा उपलब्ध होणार असल्याने त्यांच्या आर्थिक जीवनमानात वाढ होईल. वनालगत असलेल्या गावांची संख्या अंदाजे 15 हजार 500 असून त्यापैकी 12 हजार 700 गावात संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम क्षेत्रीय स्तरावर राबवण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची सुद्धा काही प्रमाणात मदत घेण्यात येणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे भरीव स्वरुपात वन कुरण व वन चराई क्षेत्र विकास कार्यक्रम घेण्यात येत असून या साठी राज्य कॅम्पा निधीमधून या वर्षासाठी 8 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर कुरण व चराई क्षेत्र विकासासाठी 50 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत असून पुढील चार वर्षात 200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहितीही वनमंत्र्यानी दिली.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 2 : शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमिनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतिक मृददिनानिमित्त प्रत्येक गावात कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.          

ग्रामपंचायत स्तरावर सुपिकता निर्देशांक फलक लावण्याबाबत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, सह सचिव गणेश पाटील उपस्थित होते.          

दरवर्षी 5 डिसेंबरला जागतिक मृद दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिन साजरा करताना प्रत्येक गावात कार्यशाळा घ्यावी. त्यावेळी गावातील अन्नद्रव्यांचा सुपिकता निर्देशांक त्या गावातील जमिनीमध्ये असणारे घटक त्याला आवश्यक खत आणि त्याची मात्रा या संदर्भात शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती द्यावी. त्याचबरोबर गावातील प्रमुख पिकांच्या मार्गदर्शनासाठी ग्रामपंचायतीमध्ये फलक लावावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. भुसे यांनी केले.          

राज्यात 38,500 गावांचे जमीन सुपिकता निर्देशांक तयार करण्यात आले असून ते कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहे. हे निर्देशांक प्रत्येक गावात मोठ्या फलकावर लावण्यात यावेत असे श्री. भुसे यांनी सांगितले. हे सुपिकता निर्देशांक तयार करताना त्या त्या गावातील प्रमुख पाच पिकांचा त्यात खरीप 3  आणि रब्बी 2 असा समावेश करण्यात आला आहे.       

राज्यात गेल्या पाच वर्षात 57 लाख माती परीक्षण नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून 2 कोटी 64 लाख माती आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. माती परीक्षण नमुन्यांमुळे रासायनिक खतांच्या वापरात 8 ते 10 टक्क्यांनी घट आली असून पिक उत्पादनात 5 ते 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.          

38 हजार 500 गावांचे जमीन सुपिकता निर्देशांक तयार करताना 4 घटकांवर आधारित एका गावाचे बारा वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा विचार करण्यात आला आहे.

देशात जल आंदोलनाची गरज- केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

0
  •  दुसर्‍या ‘राष्ट्रीय सरपंच संसद’ चे ऑनलाईन उद्घाटन

पुणे, : “जल सुरक्षा आणि जल नियोजनाची अत्यंत गरज असून त्यासाठी जल आंदोलनाची गरज आहे. पाण्याचा पुर्नउपयोग कसे करता येईल या वर विचार करण्याची वेळी आली आहे. जल समृध्दीतूनच देशाचा विकास होईल. पाणी हे जीवन असल्याने त्याला वाया घालवू नका.” असे विचार केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी मांडले.
‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटेतर्फे 2 ते 4 डिसेंबर या दरम्यान आयोजित तीन दिवशीय दुसर्‍या ऑनलाईन ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
छत्तीसगढ राज्याचे पंचायत आणि ग्रामिण विकास मंंत्री श्री. टी. एस. सिंग देव, ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण श्री. अण्णा हजारे, इस्त्राईल  सहकार संस्थेचे प्रमुख डॅन अलुफ व बाएफचे अध्यक्ष श्री. गिरीष सोहनी हे विशेष अतिथी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिर्टी चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे प्रणेते सरपंच संसदेचे प्रमुख संयोजक राहुल विश्वनाथ कराड, महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील आणि सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले,“पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जल शक्ति मंत्रालयाची स्थापना केली. आज याच्या माध्यमातून संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केले आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व ग्रामपंचायत आणि सरपंचांना पत्राच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यास सांगितले. तसेच, गावातील पाणी गावात, आणि शेतातील पाणी शेतात असेल तर विकास होईल. कोविडच्या काळात ही जलशक्ति विभागाकडून संपूर्ण देशात 7 लाख जल संचयनाचे काम पूर्ण झाले आहे. पाणी वाचविण्यासाठी या विभागाने 15 हजार कोटी रूपये खर्च केले. नव भारत निर्मितीचा मार्ग हा गावातूनच जातो त्यामुळे गावांना सशक्त करण्यासाठी जल शक्ति अत्यंत महत्वाचे आहे.”
अण्णा हजारे म्हणाले, “सरपंचांनी सदैव असा विचार करावा की मी गावाचा नाहीतर देशाचा विकास करणार आहे. शुद्ध चारित्र्य, शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि निष्कलंक जीवन ज्यांचे असते तो विकासदूत बनतो. सरपंचानी विकास कार्य करतांना विरोधकांना कधीही शब्दांनी उत्तर देऊ नका तर आपल्या कथनी आणि करणीने दयावे. महात्मा गांधी म्हणायचे की देशाची अर्थव्यवस्था बदलावयाची असेल तर प्रथम गावाची अर्थव्यवस्था बदलणे गरजेचे आहे. त्या शिवाय देश बदलणार नाही. गावाचे परिवर्तन करावयाचे असेल तर प्रकृती आणि मानवाचे शोषण करू नका असाही सल्ला त्यांनी दिला.”
डॅन अलुफ म्हणाले, “ इंडो इस्त्राईल अ‍ॅग्रिकल्चर प्रोजेक्ट वर काम करून संपूर्ण जगात चांगली बाजार पेठ मिळविणे गरजेचे आहे. त्यासाठी, सरकारी, खाजगी आणि सहाकरी संस्थांना पुढे यावे लागेल. पाण्यासारख्या समस्यांवर इस्त्राईलने खूप मोठे यश मिळविले आहे. त्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग शेतीसाठी केला असून तोच प्रयोग भारतात करावा. अत्याधुनिक आणि नवे तंत्रज्ञानाचा वापर करावा. महाराष्ट्रात ड्रिप इरिगेशनची गरज आहे. कुठलेही कार्य हे पुढील तीन वर्षाचे लक्ष ठेऊन करावे. शेती करतांना कामाचे नियोजन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा.”
टी.एस. सिंग देव म्हणाले, “देशातील सर्वात जुनी व्यवस्था ही पंचायतराजची  आहे. त्यांना पंच परमेश्वरांचा दर्जा सुद्धा देण्यात आला आहे. वेगवेगळ्या राज्यात याचे कायदे एकसारखे नाही, परंतू महाराष्ट्रात ही व्यवस्था अत्यंत मजबूत आहे. त्यांच्याकडून सर्व राज्यांना शिकण्याची गरज आहे. पंचायतराज्य व्यवस्थेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणत बळ मिळाले आहे. तसेच, युवक ही याच्या माध्यमातून समोर येतांना दिसत आहे. देशातील पंचायतराजला जी रक्कम देण्यात येत आहे त्यात वृद्धि करण्याची गरज आहे. त्यातूनच देशाचा विकास होईल.”
गिरीष सोहनी म्हणाले, “सरपंचांनी मंंत्र, तंत्र, गती आणि दिशा या चार गोष्टी सदैव लक्षात ठेवावे. तसेच गांव विकासासाठी सात सुत्र महत्वाचे आहे त्यात तरूणाई, तितिक्षा, शाश्वती, हरित अर्थव्यवस्था, उद्यम, उद्दिष्ट आणि टप्पा चा समावेश आहे. त्याचे पालन केल्यास विकास आपोआपच होईल. महात्मा गांधी सतत म्हणायचे की गावाचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे आज देशातील 6 लाख गावांना सशक्त व्हावे लागेल.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील आदर्श गाव या संकल्पनेच्या आधारे ही सरपंच संसदेची संकल्पना आहे. सरपंचाच्या  माध्यमातून गाव आणि त्यातून देशाचा विकास होईल. 730 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी गाव कसे असावे, त्याचे नियोजन कसे करावे तसेच पाण्याची सुविधा कोणत्या पद्धतीने हवी हे सांगून ठेवले आहे. आज आम्हाला त्याचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आज ग्रामविकास, आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर जोर दिला जात आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“सरपंच संसद ही सरपंचासाठी एक स्वतंत्र असे व्यासपीठ निर्माण केले आहे. ग्रामीण क्षेत्राला जवळ आणण्यासाठी ही संसद अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी या शिक्षण संस्थेने असे कार्यक्रम घ्यावे. भविष्यात ग्रामीण क्षेत्रातील समस्या सोडवायच्या असतील तर या संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समोर यावे लागेल.”
योगेश पाटील म्हणाले, “राष्ट्रनिर्माण कार्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सरपंचाने अपडेट राहून स्मार्ट कार्य करावे. यासाठी हा मंच राहुल कराड यांनी उपलब्ध करून दिला आहे. ही संसद साकारताना गौतम बुद्धांची मानवता, तुकोबा आणि ज्ञानेश्वरांची सहिष्णूता, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कौशल्य आणि महात्मा गांधी यांचे ग्रामविकास या चतुःसूत्री वर आधारित आहे.”
रविंद्रनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रशांत दवे यांनी आभार मानले.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 229

0

पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 36 हजार 940 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 36 हजार 940 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 229 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.36 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 43 हजार 827 रुग्णांपैकी 3 लाख 23 हजार 988 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 513 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 326 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.23 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 225 रुग्णांपैकी 48 हजार 693 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 813 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 719 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 984 रुग्णांपैकी 42 हजार 296 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 822 रुग्णांपैकी 44 हजार 684 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 440 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 82 रुग्णांपैकी 47 हजार 20 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 378 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 684 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 180 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 926, सातारा जिल्ह्यात 78, सोलापूर जिल्ह्यात 115, सांगली जिल्ह्यात 39 तर कोल्हापूर जिल्ह्यात 22 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 173 आहे. पुणे जिल्हयामध्ये 768, सातारा जिल्हयामध्ये 106, सोलापूर जिल्हयामध्ये 213, सांगली जिल्हयामध्ये 49 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 37 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 81 हजार 696 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 36 हजार 940 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 1 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

आता कोण होणार महापौर ? सवाल कार्यकर्त्यांचा ….

पुणे- गेली चार वर्षे पुणे महापालिकेत भाजपची एक हाथी सत्ता आहे. पण महापालिकेचा कारभार हाताळताना विशिष्ट मंडळीनांच डोळ्यापुढे ठेऊन कारभार होत असल्याची टीका अजूनही भाजपच्या वर्तुळात होतेच आहे. आता २०२२ ला महापालिका निवडणुका आहेत . आजवर एकाच नगरसेवकावर पक्षाने खूपच कृपा दृष्टी ठेवल्याचे साऱ्यांचेच मत आहे. या कृपा दृष्टीचा वापर त्यांनी जनहितासाठी लागणारे ,पक्ष बळकटी साठी लागणारे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी केला किंवा नाही हा विषय आता घेणार नाहीचं … पण ‘ हा’, ज्येष्ठ, ‘त्याचे’ योगदान मोठे , अजूनही सावरतोय तो, सर्वांनाच … असे सांगत असा यांनी काय केला गुन्हा ..म्हणत यांना का महापौर पद दिले जात नाही .. ? असा सवाल केला जातो आहे. आता अखेरचे वर्ष आहे, नेत्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर महापालिका निवडणुकीत कठीण प्रसंग येऊ शकतात ..अशी भाजपच्या .अनेक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झड़तेआहे . कॉंग्रेस मधून भाजपा तआलेले निराश तर आहेतच .पण भाजप कडून निवडून आलेल्यांपैकी सुमारे ८० टक्के नगरसेवक पदाधिकार्यांच्या कारभाराबाबत नाराज आहेत .

आता भिमाले महापौर का होऊ शकत नाहीत ? वर्षा तापकीर यांनी किती वर्षे महापौर पदासाठी प्रतीक्षा करायची . दीपक पोटे , अमोल बालवडकर सारखी तरुण मंडळी महपौर का होऊ शकत नाहीत ? एवढेच काय जर पूर्वीचे स्थायी अध्यक्ष महापौर होऊ शकतात तर सध्याचे स्थायी अध्यक्ष ज्यांनी कोरोना काळात हि उत्तम कामगिरी करून दाखविली ते महापौर का होऊ शकत नाहीत असा हि कार्यकर्त्यांचा सवाल आहे. राणी भोसलेंच्या समर्थकांकडून देखील त्यांना चांगले पद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय .दिलीप वेडे पाटील ,उमेश गायकवाड, आदित्य माळवे उपमहापौर का होऊ शकत नाहीत ? असे देखील प्रश्न त्यांचे कार्यकर्ते विचारत आहेत .मात्र यातील कुठलाही नगरसेवक अशा पदांसाठी स्वतःहून पुढे येऊन इछ्या देखील व्यक्त करताना दिसत नाही हे भाजपचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल .

जनसामन्यात मिसळणारे , त्यांना भूलथापा न देणारे , प्रत्यक्षात दिलेली आश्वासने पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांना आता अखेरच्या वर्षात तरी जनतेची कामे वेगाने मार्गी लावण्याची शक्ती अशा पदां द्वारे मिळेल काय ? असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे.

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानने फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून केले लाँच

0

बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड, (टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप)च्या गेल्या वर्षी मुंबईत लाँच झालेल्या, पहिल्या फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या यशानंतर, आता टाइम्स ग्रुपने मुंबईतील पवई येथे अलीकडेच दुसरे फेमिना फ्लाँट स्टुडिओ आउटलेट सुरू केले आहे. टाइम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप दहिया यांच्यासह फेमिना फ्लाँट स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान ही उपस्थित होती.

फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची ही पहिली फ्रँचायझी आहे. जी केस, मेकअप, नखे आणि त्वचेविषयक सौंदर्य सेवा देताना जागतिक पातळीवरील चालू ट्रेंडनूसार सेवा प्रदान करते.

लाँचिंगविषयी बोलताना टाईम्स लाइफस्टाईल एंटरप्राइझचे सीईओ संदीप दहिया म्हणाले, “आमच्या फ्रँचायझी पार्टनरच्या सहकार्याने आमचा पहिला फ्रँचायझी स्टुडिओ सलून सुरू करताना आम्ही खूप उत्साही आहोत. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून सौंदर्य संकल्पना परिभाषित करण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहील.” ते पुढे म्हणतात, ” पुढील 4 महिन्यांत, आम्ही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून देशातील आणखी चार शहरांमध्ये, आणखी 8 नवीन ठिकाणी विस्तारित करण्याची योजना आखत आहोत. सौंदर्यविषयक जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या सेवा हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. “

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान म्हणाली, “फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून पाहून मी खूप प्रभावित झाले. माझ्यासाठी सलून हा एक खास आणि खासगी अनुभव आहे, जिथे प्रत्येक भेटीत आपण 2 ते 3 तास घालवतो. आणि म्हणूनच तेथे डिझाइन, दिलासादायक अनुभव आणि सकारात्मक वातावरण खूप महत्वाचे असते. फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनमध्ये, मला ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. “

फेमिना फ्लाँटस्टुडिओ सलूनमध्ये, नवे प्रयोग आणि कौशल्य ह्याची योग्य सांगड घातली जाते. लॉन्चिंगबद्दल बोलताना फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनची फ्रँचायझी पार्टनर स्मिता बिजू म्हणाली, “अत्यंत प्रतिष्ठित ब्रँडशी संलग्न होऊन काम करणे, हा माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप चांगला अनुभव आहे. गेल्या काही महिन्यांपासून, मी फेमिना फ्लाँट स्टुडिओ सह काम करत आहे आणि जागतिक पातळीवरील चालू ट्रेंडनूसार सौंदर्य सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही उत्साही आहोत. “

सौंदर्याचा समग्रतेने विचार करताना फिटनेस आणि पोषण आहाराचा ही समावेश होतो. म्हणूनच या क्षेत्रातही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून, डॉ. मिकी मेहता आणि सांची एस. नायक ह्या तज्ञांसोबत काम करत आहे. ह्यासह, नम्रता नाईक (त्वचा आणि नेल केअरची तज्ञ) आणि तनवीर शेख (केसांची निगा राखण्याचे तज्ञ)सह नामांकित सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट नम्रता सोनीबरोबरही फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलून काम करतात.

पोषण आहार सल्लागार सांची एस. नायक, (फेमिना फ्लाँट न्यूट्रिशन एक्सपर्ट) म्हणतात की, “फेमिना फ्लाँट स्टुडिओ नवीन ठिकाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचताना पाहून मला आनंद होत आहे. फेमिना फ्लाँटसोबत मी काही काळापासून संलग्न आहे आणि मला खात्री आहे की चांदिवली, पवई आणि आसपासच्या भागातील लोकांसाठी हा एक नवीन आणि वेगळा अनुभव असेल. ”

फेमिना फ्लाँट स्टुडिओचे अभिनंदन करताना, जागतिक पातळीवरचे आरोग्य गुरू आणि कॉर्पोरेट लाइफ कोच डॉ. मिकी मेहता (फेमिना फ्लाँट फिटनेस एक्सपर्ट)म्हणाले की, “सौंदर्याची निगा राखताना त्यात फिटनेसचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. मी फेमिना फ्लाँट स्टुडिओ सलूनचा भाग असल्याचा मला आनंद आहे. मला खात्री आहे की ही संकल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. “

”मिसेस वेस्‍ट इंडिया एम्प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया २०२०” – सीझन ३ ग्रॅण्‍ड फिनाले – ४७ फायनालिस्‍ट्समध्‍ये चुरशीची स्‍पर्धा

0

पुणे-तिस-या पर्वामध्‍ये ‘मिसेस वेस्‍ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्‍ट इंडिया २०२०’ – सीझन ३ चा भव्‍य फिनाले यंदा २८ नोव्‍हेंबर २०२० रोजी अलिला दिवा गोवा, लॅण्‍ड ऑफ सॅण्‍ड*सी*सन येथे आयोजित करण्‍यात आले. या फिनालेने सर्व ४७ फायनालिस्‍ट्सच्‍या जीवनामध्‍ये ‘सामान्‍यतेपासून विलक्षणते’पर्यंत आमूलाग्र बदल घडवून आणला. महाराष्‍ट्र, गुजरात व गोवा या राज्‍यांचे प्रतिनिधित्‍व केलेल्‍या या महिलांनी शौर्य व धैर्य दाखवले. या व्‍यासपीठाने सामान्‍य महिलांना ख-या भावनेसह महिला सक्षमीकरण या मोठ्या मंचावर आणले.

दि रोसरी फाऊंडेशनचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विनय अरन्‍हा यांनी जहांगीर ओराकेअर डेण्‍टल सेंटरसोबत सहयोगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या या भव्‍य कार्यक्रमाला सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून केंद्रीय राज्‍यमंत्री माननीय मंत्री श्रीपाद येसो नाईक उपस्थित होते. दिवा पेजीण्‍ट्समने या भव्‍य कार्यक्रमाची संकल्‍पना मांडली.

सर्व ४७ फायनालिस्‍ट्सना चार दिवस दिवा पेजीण्‍ट्सचे कार्ल अॅण्‍ड अंजना मस्‍करेन्‍हास यांच्‍या तज्ञ मार्गदर्शनांतर्गत प्रस्‍तावना, आवाजातील बदल, मंचावरील सादरीकरण, प्रश्‍नोत्तरे अशा पेजीण्‍टच्‍या विविध पैलूंबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले.

या कार्यक्रमासाठी महक चहल (अभिनेत्री), ब्रूना अब्‍दुल्‍ला (अभिनेत्री), सुहानी मेंडोन्‍सा (इव्‍हेण्‍ट्स), ग्‍वेन डी (डिझाइनर), विवेक मेंडोन्‍सा (लॉरेन्‍स अॅण्‍ड मायो) हे प्रख्‍यात परीक्षक लाभले.

लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता अमन यतन वर्माने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले. त्‍याने आत्‍मविश्‍वासासह या भव्‍य कार्यक्रमाचे उत्तम सुत्रसंचालन केले.

फायनालिस्‍ट्सनी किताब जिंकण्‍यासाठी त्‍यांचे अद्वितीय ग्रुमिंग कौशल्‍य दाखवले आणि आत्‍मविश्‍वास व भव्‍यतेसह स्‍वत:ला सादर केले. प्रख्‍यात परीक्षकांना सिल्‍व्‍हर (वयोगट २० ते ३६ वर्षे) आणि गोल्‍ड (वयोगट ३७ वर्षे व त्‍यापेक्षा अधिक) या दोन विभागांमधील ४७ सेमी-फायनालिस्‍ट्समधून ८ सर्वोत्तम फायनालिस्‍ट्सची निवड करणे अत्‍यंत अवघड गेले.

किताबाचे विजेते:

विजेती – सिल्‍व्‍हर: विभुती पांडे

विजेती – गोल्‍ड: चैताली वैद्य

पहिली उपविजेती – सिल्‍व्‍हर: अंशिका अरोरा

पहिली उपविजेती – गोल्‍ड: बंदाना दुआ  

दुसरी उपविजेती – सिल्‍व्‍हर: श्‍वेता ओस्‍वाल जैन

दुसरी उपविजेती – गोल्‍ड: सुनिता कुलकर्णी

तिसरी उपविजेती – सिल्‍व्‍हर: यशोदा पवार

तिसरी उपविजेती – गोल्‍ड: जयश्री बावनकर

किताबासह सन्‍मानित करण्‍यात आलेल्‍या चार आंतरराष्‍ट्रीय क्‍वीन्‍स:

अश्विनी कु-हाडे, वर्षा भावसार, सुजाता यांडे, प्रतिमा जाधव 

प्रचिती पुंदेचा मिसेस युनिव्‍हर्स ऑस्‍ट्रलएशिया २०२१ म्‍हणून करण्‍यात आलेला सन्‍मान या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. ती दिवा पेजीण्‍ट्स अंतर्गत प्रतिष्ठित ”मिसेस युनिव्‍हर्स २०२१’साठी भारताचे प्रतिनिधीत्‍व करेल.

निपुण नृत्‍यदिग्‍दर्शक पूजा सिंग हिने तिच्‍या अद्भुत सीक्‍वेनेस व शो डिरेक्‍शनसह सर्वांची मने जिंकली. सिन्थिया फुर्टाडोने ‘मिसेस वेस्‍ट इंडिया’चे गीत संगीतबद्ध करण्‍यासोबत गायले. या कार्यक्रमाला फराह अन्‍वर, श्रद्धा रामदास, नेहा चौहान व मृणाली तायडे यांचा सहयोग मिळाला.

विजेत्‍यांना आकर्षक मुकुट, रोख बक्षीसे आणि मोदसुत्र, लॉरेन्‍स अॅण्‍ड मायो, दीशा चॉकलेट्स, प्‍लस बीव्‍हरेजेस, ऑरा अराऊंड, बी-दिवा व ऑरिक यांच्‍याकडून गिफ्ट्स देण्‍यात आले.

कार्ल अॅण्‍ड अंजना मस्‍करेन्‍हासचा अभिनव उपक्रम मिसेस वेस्‍ट इंडिया एम्प्रेस ऑफ वेस्‍ट इंडियाने दिवा कॅचलाइन: ”डेअर * ड्रीम * डॅजल” उत्तमरित्‍या सादर केली आहे.