Home Blog Page 2380

कोरोना काळात धैर्याने काम केल्याबद्दल राज्यपालांची पत्रकारांना शाबासकी

0

मुंबई, दि. ६ : कोरोनाचे आव्हान देशापुढे उभे असताना व संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये असताना पत्रकारांनी विशेषतः टीव्ही पत्रकारांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने बातम्या देण्याचे काम अव्याहतपणे केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांना जाहीर शाबासकी दिली.

सर्वच माध्यम क्षेत्रात आज तीव्र स्पर्धा असून सबळ असेल तोच टिकेल अशी परिस्थिती आहे. तरी देखील पत्रकार आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील उपेक्षित लोकांच्या समस्या मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी यावेळी गौरवोद्गार काढले.

राज्यातील टीव्ही पत्रकारांच्या ‘न्यूजरूम लाइव्ह’ या मराठी दिवाळी अंकांचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. ६) राजभवन येथे संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

आपण देखील राजकारणात येण्यापूर्वी एक उत्साही पत्रकार होते याचे स्मरण देऊन अनुभवातून उथळपणा कमी होतो व प्रगल्भता येते असे राज्यपालांनी सांगितले.

टीव्ही पत्रकार हा अनेकदा पुरस्कारापेक्षा तिरस्काराचा धनी असतो असे सांगून दीड मिनिटाच्या बाईट पलिकडे त्याचे स्वतःचे चिंतन व भूमिका असते. दिवाळी अंकातून टीव्ही पत्रकारांनी ही भूमिका मांडतांना आत्मचिंतन देखील केले आहे, असे संपादक कमलेश सुतार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार प्रसन्न जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विनोद जगदाळे, दिनेश दुखंडे, सोहित मिश्र, विवेक कुलकर्णी, सचिन चौधरी, मेधा, मयुरेश गणपत्ये, विनायक दावरुंग व कमलेश सुतार या पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.’न्यूजरूम लाइव्ह’ या दिवाळी अंकाचे संपादन कमलेश सुतार यांचेसह पंकज दळवी व प्रशांत डिंगणकर यांनी केले असून अंकात प्रसन्न जोशी, संजय आवटे, विजय चोरमारे, स्वाती लोखंडे, सुभाष शिर्के यांसह अनेक पत्रकारांचे लेख समाविष्ट केले आहेत. कार्यक्रमाचे संचलन प्रशांत डिंगणकर यांनी केले, तर पंकज दळवी यांनी आभार प्रदर्शन केले.

‘काही केले तरी केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही’; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

0

पुणे-मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्‍यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात फक्त बदल केला जाईल. केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यात नव्याने कोणताही मोठा बदल केलेला नाही. जे जुन्या कायद्यात होते, तेच कायम असून फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली आहे. अगोदर ही पद्धत अस्तित्वात नव्हती. प्रश्न फक्त MSPचा होता. पण त्याबाबत केंद्र सरकार पेपरवर MSPची रक्कम लिहून द्यायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार असं म्हणणं निरर्थक आहे. केंद्र सरकारने केलेला हा कायदा रद्द होणार नाही”, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी येथे स्पष्ट केले आहे.

मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणासह देशाच्या विविध भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील ८-१० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी निषेध नोंदवताना दिसत आहेत. तर दुसरीकडे चर्चेच्या पाचव्या फेरीनंतरही सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणं शक्य होताना दिसलेलं नाही. “शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही राहणार नाही”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. त्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना उत्तर दिलं.

काय म्हणाले शरद पवार –

“आपण संपूर्ण देशाची शेती आणि अन्नपुरवठा बघितला, तर सगळ्यात जास्त योगदान पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचे आहे. विशेषतः गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात देशाची गरज या भागातील शेतकऱ्यांनी भागवली आहे. पण त्याचबरोबर जगातील १७-१८ देशांना धान्य पुरवण्याचं कामही भारत करतो आहे. त्यात पंजाब आणि हरयाणाचा वाटा फार मोठा आहे. ज्यावेळी पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. अद्याप ती घेतलेली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं तर हे आंदोलन दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील. त्यामुळे अजूनही केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी”, असं शरद पवार म्हणाले.

भारत बंदला काँग्रेस, तृणमूल आणि TRS चे संपूर्ण समर्थन

0

नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा रविवारी 11 वा दिवस आहे. दरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि तेलंगाना राष्ट्र समिती (TRS) ने 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या भारत बंदला पूर्ण समर्थन देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे नवीन रणनितीवर शेतकरी संघटनांमध्ये सिंघू बॉर्डरवर महत्त्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये पुढील योजनांवर चर्चा होत आहे. बॉक्सर विजेंदर कुमारनेही कायदा मागे न घेतल्यास खेळरत्न पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे .

काँग्रेसने 8 डिसेंबरला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या समर्थनाची घोषणा केली. पक्षाचे प्रवक्ता पवन खेडा यांनी सांगितले की, आम्ही आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या पक्षाच्या कार्यालयात प्रदर्शन करु. यामुळे राहुल गांधी यांचे शेतकर्‍यांसाठीचे समर्थन अधिक बळकट होईल. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनीही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला. तत्पूर्वी TMC चे खासदार सुदीप बंडोपाध्याय म्हणाले होते की पक्ष शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये त्यांचे पूर्ण समर्थन करेल.

कृषी राज्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला हल्ला
यानंतर कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी विरोधकांवर शेतकऱ्यांना भडकावण्याचा आरोप करत म्हटले की, देशाच्या शेतकऱ्यांना नव्या कायद्याने फायदाच होणार आहे. पण काँग्रेस शासित राज्ये त्यांना भडकावत आहेत. राजकीय लोक आगीत तेल ओतत आहेत.

8 डिसेंबर रोजी भारत बंदचा अल्टीमेटम
याआधी शुक्रवारी शेतकरी म्हणाले की, तीन कृषी कायदे मागे न घेतल्यास ते 8 डिसेंबर रोजी भारत बंद आंदोलन केले जाईल. सर्व टोल प्लाझा ताब्यात घेण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. शुक्रवारी झालेल्या शेतकरी सभेनंतर त्यांचे नेते हरविंदरसिंग लखवाल म्हणाले- आगामी काळात आम्ही दिल्लीचे उर्वरित रस्तेही रोखू.

अभिनेते प्रशांत दामले , अभिनेत्री कविता लाड यांचा सत्कार

0


पुणे –
करोना च्या काळानंतर पुण्यातील नाट्यगृह सुरु व्हावीत म्हणून आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो त्याला यश आले असून त्याला पुणे महानगर पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगले सहकार्य केले असून पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , बालगंधर्व रंगमंदिर , अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हि कलावंत व रसिकांसाठी सुसज्ज झाली असून प्रेक्षक व कलावंतांची सर्व काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे
एका लग्नाची गोष्ट ,प्रशांत दामले व कविता लाड यांच्या भूमिका असलेले नाट्यप्रयोग १२ डिसेंबर रोजी पुण्यात करण्यात येणार असून या नाटकाची तिकीट विक्री दोन्ही कलावंतांनी पहिल्या ५ प्रेक्षकांना तिकिटे देऊन तसेच रसिकप्रेक्षकांच्या वतीने नारळ फोडून आज करण्यात आली रसिकाने दाखवलेल्या प्रेमामुळे कोथरूड च्या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या निमित्ताने पुणेकर रसिक व संवाद पुणे नाट्य संस्थांच्या वतीने प्रशांत दामले व कविता लाड यांचा सत्कार करण्यात आला या वेळी संवाद चे सुनील महाजन , समीर हंपी,प्रवीण बर्वे उपस्थित होते सुनील महाजन यांनी पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आव्हान केले .

श्रीनगरमध्ये पोलिस पथकावर दहशतवाद्यांचा बेछूट गोळीबार, एका जवानासह नागरिक जखमी

0

श्रीनगर- येथील हवल चौकात रविवारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर बेछूट गोळीबार केला. यात एक जवान आणि एक नागरिक जखमी झाला आहे. सध्यो दोघांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सैन्याने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

26 नोव्हेंबरला 2 जवान शहीद झाले होते

यापूर्वी 26 नोव्हेंबरला श्रीनगरच्या HMT परिसरात दहशतवाद्यांनी पेट्रोलिंग पार्टीवर हल्ला केला होता. यात दोन जवान शहीद झाले होते.

मागच्या महिन्यात सात दहशतवादी ठार

मागच्या महिन्यात नगरोटामध्ये सैन्य आणि सुरक्षा दलाने जैशच्या 4 दहशतवाद्यांना मारले होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी म्हटले होते की, दहशतवाद्यांनी निवडणुकीपूर्वी मोठा हल्ला करण्यायी योजना आखली होती. पाकिस्तानातील मसूद अजहरचा भाऊ रऊफ लाला यांचा हँडलर होता. यापूर्वी 8 नोव्हेंबरला कुपवाडामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यात तीन दहशतवादी मारले होते. तसेच, एका कॅप्टनसह तीन जवान शहीद झाले होते.

शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

0

मुंबई-शिरोमणी अकाली दलाच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुंबईत भेट घेतली आहे. यावेळी ठाकरेंनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

ही भेट घेतल्यानंतर अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितले आहे की, ‘शेतकरी आंदोलनातील सर्व कार्यक्रमांना आपला पाठिंबा असणार आहे. दिल्लीत दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीमध्येही ते हजेरी लावतील. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे’

काही दिवसांपूर्वीच शेतकरी विधेयक पारीत झाल्याच्या विरोधात शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले होते. तर शिवसेना एक वर्षापूर्वीच एनडीएमधून बाहेर पडली आहे. शिवसेने पाठोपाठ अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपला धक्का बसला होता. यानंतर आता भाजपविरोधात व कृषी कायद्यांविरोधात लढण्यासाठी अकाली दल शिवसेनेची मदत घेत आहे. यासाठीच अकाली दलाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 97

0

पुणे विभागातील 5 लाख 12 हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 41 हजार 706 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.06 :- पुणे विभागातील 5 लाख 12 हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 41 हजार 706 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 97 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 127 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 47 हजार 130 रुग्णांपैकी 3 लाख 27 हजार 824 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 920 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.44 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 774 रुग्णांपैकी 49 हजार 523 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 519 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 665 रुग्णांपैकी 43 हजार 59 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 986 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 993 रुग्णांपैकी 44 हजार 888 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 403 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 144 रुग्णांपैकी 47 हजार 188 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 269 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 118 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 785 , सातारा जिल्ह्यात 115, सोलापूर जिल्ह्यात 165, सांगली जिल्ह्यात 41 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1हजार 65 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 701, सातारा जिल्हयामध्ये 189, सोलापूर जिल्हयामध्ये 107, सांगली जिल्हयामध्ये 37 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 31 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 47 हजार 683 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 41 हजार 706 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 5 डिसेबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला प्रेरणादायी – राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

0

पुणे, दि. ६ :-  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची शिकवण मानवजातीला आजही आदर्श व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांनी आज स्टेशन परिसरातील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन केले.

याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री कदम यांनी येथे उपस्थित असलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व कलाकारांबरोबर चर्चा केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला अभिवादन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि ६ :  दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त सागराशी स्पर्धा करणारा भीमसागर येथे येतो. परंतु कोरोनामुळे वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन करताना केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच खासदार शरद पवार यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की,  भारतरत्न डॉ .बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपणाला आणि एकूणच त्यांच्या कार्याला मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि सर्वांनी शिस्तीचे पालन केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.

यावेळी राज्यपाल म्हणाले, कोरोनामुळे सर्व जग त्रस्त आहे, सगळ्या जगात भारतापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे आणि भारतात त्या मानाने मृत्यू संख्या कमी आहे याचे कारण एकच आहे की, भगवान बुद्धांनी करुणा, दयेचा जो विचार लोकांना दिला हाच विचार बाबासाहेबांनी स्वीकारला, आणि याच विचारांच्या आधाराने आपण कोरोनाला हरवू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमाने आणि बलिदानाने पुन्हा एकदा आपला देश नवे शिखर गाठेल, सर्वजणांनी एकत्र येऊन  बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू,  आज संपूर्ण देश त्यांना  अभिवादन करीत आहे. माझे ही त्यांना विनम्र अभिवादन.

यावेळी श्री अजित पवार म्हणाले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. एक शक्तिमान देश म्हणून भारताची ओळख जगात व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होवू या. त्याचबरोबर इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत .

तसेच यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल चहल आदी उपस्थित होते.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0

मुंबई:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. चैत्यभूमीवर दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा या अनेकांनी आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.

‘हा’ महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

अमरावती, दि. ५ :  विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील  नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृद्धी आणणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या १ मे पर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठीही खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे ३४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील ३८ नाल्यांचे ९१ हजार २१० मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धी देखील झाली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे या कामामध्ये विलंब झाला नाही. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट महामार्ग ठरणार असून नागपूर ते शिर्डी हा मार्ग येत्या १ मे पर्यंत व त्यानंतर मुंबई पर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्कृष्ट सुविधांसोबतच कृषी व पूरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे नागूपर ते मुंबई शीघ्रसंचार दृतगती मार्गापैकी अमरावती जिल्ह्यातून ७३.३३ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील ४६ गावांमधून जाणार आहे. २ हजार ८५० कोटी रुपये खर्चून तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्गावर दोन इंटरचेंज प्रस्तावित आहेत.

समृद्धी महामार्ग ठरले हेलीपॅड

अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हेलीकॉप्टरचे या महामार्गावरच विशेष हेलीपॅड तयार करण्यात आले. येथे सकाळी ११.३५ वाजता त्यांचे आगमन झाले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्वागताचा स्वीकार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सहा किलोमीटर प्रवास करुन प्रत्यक्ष पाहणी केली.

नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्प प्रमुख श्रीमती संगीता जयस्वाल यांनी सादरीकरणाद्वारे टप्पा तीनमधील कामाच्या प्रत्यक्ष प्रगतीची माहिती यावेळी सादर केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.

पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार प्रियांका चोप्रा

0

अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगामी ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यात प्रियांका वेगळ्या रुपात दिसतेय. तिने चित्रपटात हेडक्वार्टर चीफची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तिने निगेटिव्ह पात्र साकारले आहे.

‘वी कॅन बी हीरोज’ हा चित्रपट सुपरहीरो थीमवर आधारित आहे. ज्यामध्ये मुले एलियनच्या हल्ल्यानंतर आपल्या आईवडिलांसह जगाला वाचवतात. हॉलिवूड सिनेसृष्टीतील महागड्या दिग्दर्शकांपैकी एक रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या ख्रिसमसला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रियांका ‘बेवॉच’ नंतर पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटामध्ये प्रियांकाशिवाय क्रिश्चिय स्लेटर, सुंग कांग, पेड्रो पास्कल, बॉयड हॉलब्रूक आणि हॅली रीनहार्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी यापूर्वी ‘द एडव्हेंचर ऑफ शार्कबॉय एंड लावागर्ल इन 3-डी’, आणि ‘स्पाय किड्स’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होणार

0

नागपूर -बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतला. समृद्धी महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.1 मे 2021 पर्यंत नागपूर-शिर्डी प्रवास सुरू होईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच समृद्धी महामार्ग पूर्ण होईल, तेव्हा सर्वोत्तम महामार्ग असेल, त्याचा निश्चित महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असेसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. दरम्यान माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग कधी पूर्ण होतो याची उत्सुकता महाराष्ट्राला पण आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा सर्वोत्तम महामार्ग असेल. याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल. तसेच कोरोना काळात कामात खंड पडेल असे वाटले होते. मात्र हे काम मंदावलेले नाही. येत्या 1 मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो. येत्या 1 मेपर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ. त्याच्या पुढच्या म्हणजेच 1 मे 2022 पर्यंत आपण मुंबईपर्यंत गेलेलो असू असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधील एक प्रकल्प आहे. एकूण 710 किलोमीटरचा हा द्रुतगती महामार्ग असणार आहे. जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च यामध्ये लागू शकतो. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 66

0

पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 40 हजार 588 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.5 :- पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 40 हजार 588 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 66 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 46 हजार 345 रुग्णांपैकी 3 लाख 27 हजार 123 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 848 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 659 रुग्णांपैकी 49 हजार 334 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 599 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 500 रुग्णांपैकी 42 हजार 952 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 617 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 952 रुग्णांपैकी 44 हजार 851 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 400 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 701 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 132 रुग्णांपैकी 47 हजार 157 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 288 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 149 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 812, सातारा जिल्ह्यात 137, सोलापूर जिल्ह्यात 138, सांगली जिल्ह्यात 40 तर कोल्हापूर जिल्ह्यात 22 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 638 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 113, सातारा जिल्हयामध्ये 179, सोलापूर जिल्हयामध्ये 257, सांगली जिल्हयामध्ये 48 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 41 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 33 हजार 104 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 40 हजार 588 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 4 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

मराठा आरक्षण : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

0

मुंबई, दि. ५ : एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.

श्री. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये ॲड. आशिष गायकवाड, ॲड. राजेश टेकाळे, ॲड. रमेश दुबे पाटील, ॲड. अनिल गोळेगावकर आणि ॲड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल.