Home Blog Page 2374

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू; विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

0

मुंबई –

‘मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. पण, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला, तर रस्त्यावर उतरू’, असा इशारा भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला.आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले.

भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का दिला जाणार नाही, याबाबतचे कलम आम्ही टाकले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे, ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

संतांनी भारत देश जोडण्याचे कार्य केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

पुणे, दि. 13:- भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्यासोबतच देश जोडण्याचेही कार्य  केले त्यामधील संत नामदेव एक आहेत, असे मनोगत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संत नामदेव अध्यासन आणि सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव यांच्या 750 व्या जयंती वर्षात देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र ही सतांची भूमी असून या राज्याने देशाला अनेक महान संत दिले आहेत. भक्ती आणि शक्तीचा संगम महाराष्ट्रात आहे. संतांचा सन्मान हा आपला सन्मान आहे. महाराष्ट्राचे सुपूत्र म्हणून संत नामदेव यांच्याकडे गौरवाने पाहिले जाते. त्यांनी देशभर भक्तीचा प्रचार केला, असे गौरवोद्गार राज्यपाल  कोश्यारी यांनी  काढले.
संत नामदेव यांचे स्मरण करतांना साहित्यिकांनी नवीन पिढीला संतांविषयी माहिती करुन देण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य लेखन केले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास शिख समाजाचे नेते संतसिंग मोखा यांच्या विशेष उपस्थितीसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्यासह शिक्षण, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते.

सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकात संत नामदेवांची एकसष्ट पदे मराठी अन्वयार्थासह समाविष्ट केली आहेत. त्याचबरोबर त्या पदांचे संक्षिप्त सारग्रहणही दिलेले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव रचित ‘अमृताहूनी गोड तुझे नाम देवा’  या अभंगगायनाने झाली. धनश्री हेबळीकर यांनी हा अभंग गायिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख व प्रास्ताविक व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी यांनी मानले.

संजीवन समाधी सोहळा आता ‘विश्वशांती दिवस’

0

डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली घोषणाः

संतश्री ज्ञानेश्वर माऊलींचा 724वा संजीवन समाधी सोहळा राजबागलोणी काळभोर येथे संपन्न

पुणे: तत्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधुन कार्तिकी शुध्द त्रयोदशी, म्हणजेच 13 डिसेंबर 2020 पासून संपूर्ण जगभर हा दिवस ‘विश्वशांती दिवस’ म्हणून साजरा केला जाईल. अशी घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीने तत्त्वज्ञ संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळा श्री. विश्वदर्शन देवता मानवता मंदिर, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे संपन्न झाला.
यावेळी रामेश्वरमचे ट्रस्टी व विद्याउपासक स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे, अक्कलकोट स्वामी संस्थानचे प्रमुख पुजारी पवन गुरूजी, इस्लामचे गाढे अभ्यासक डॉ. रफीक सय्यद, प्रा.डॉ. मुकुंद गायकवाड, सुप्रसिद्ध गप्पाष्टकार डॉ. संजय उपाध्ये व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे उपस्थित होते.
तसेच,माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.राहुल विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे अ ध्यक्ष व विश्वस्त डॉ. मंगेश तु. कराड, सह कार्यकारी विश्वस्त डॉ.सुचित्रा कराड-नागरे, महासचिव स्वाती कराड-चाटे, उपाध्यक्ष व विश्वस्त ज्योती कराड-ढाकणे, कवियत्री सौ. उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि पंढरपूरचे दत्तात्रय बडवे हे उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे गुह्य गुपीत सांगीतले आहे त्या मार्गावर समाज चालेल तर तो सुखी होईल. 724 वर्षापूर्वी त्यांनी सुख, शांती आणि समाधानाचा मार्ग दाखविला आहे. निसर्गाने कोरोनाच्या रूपात संपूर्ण जगाला दिलेली ही धोक्याची घंटा आहे. अशावेळेस साधू, संत आणि महात्म्यांनी दिलेला संदेशाचे अनुकरण केल्यास मानवजातीचे कल्याण होईल.”
डॉ. सय्यद रफीक म्हणाले,“ वर्तमान काळात सृष्टीवरील प्रत्येक व्यक्ती ही भाऊ बहिण हे नाते विसरले आहे. त्यामुळेच 700 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर’ हा संदेश देऊन सर्वांना सुखी होण्याचा मार्ग दाखविला. त्यांनी प्रत्येकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीतलावर विज्ञानाने समाजचे भले होईल, पण मानवाचे भले हे ईश्वराच्या चरणी गेल्यावर होईल. आपल्या संतांनी जो जीवन जगण्याचा सार्थक संदेश दिला आहे. तोच संदेश आज डॉ. विश्वनाथ कराड देऊन माणसे जोडण्याचे अद्वितिय असे कार्य करीत आहेत.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ रामेश्वरम, अक्कलकोट आणि राजबाग लोणी यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडलेला आहे. कोणत्याही कामात सातत्य, त्यात तपश्चर्या केल्या नंतरच यश मिळते याची प्रचिती येथे होत आहे. मानवाच्या मनात आधुनिकता हवी पण तसेच चांगल्या विचारांची धुनी असली तर चित्त चांगले राहते. तसेच, ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला करूणाचा संदेश हा जगाला तारू शकेल.”
स्वामी राधाकृष्ण गंगाधर दशपुत्रे यांनी समारंभाला आशिर्वाद देऊन रामेश्वर येथील प्रसाद दिला. विश्व शांती व कल्याणाची कामना केली. सौ. उर्मिला विश्वनाथ कराड व डॉ. मुकुंदराव गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा संदर्भ देऊन आजच्या काळात मानवाने कसे जीवन जगावे हे सांगितले.
ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळाही संपन्न झाला.  कीर्तन व संगीतभजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच, कलश पूजन, संत प्रतिमा पूजन, विश्वदर्शन देवता मूर्ती, विठ्ठल रूख्मिणी मूर्ती, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज व मंदिरातील सर्व मूर्तींचे पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन झाले. सकाळी ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली.
ह.भ.प.श्री. रामचंद्र महाराज इंगोले, महेश महाराज नलावडे आणि शालिकराम महाराज खंदारे यांची किर्तने झालीत.

शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन

0

पुणे-राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या आकृतिबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करत आहेत. राज्य शिक्षकेतर महामंडळाच्यावतीने शासनाच्या जी-आरची होळी करत याचा निषेध करण्यात आला आहे. शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्यातील सर्व प्रमुख शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बैठक पुण्यातील रावसाहेब पटवर्धन विद्यालय साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात अली होती.राज्यातील शाळांतील शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय अन्याकारक असून शासनाने हा निर्णय त्वरित रद्द न केल्यास उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात या निर्णयाची होळी करून आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी यावेळी दिली

 शासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी याबाबत मंत्रीमहोदयांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर चर्चा करणे अपेक्षित होते. किमानपक्षी राज्यातील शिक्षक आमदारांना बरोबर देखील विचार विनिमय करणे व त्यानंतर निर्णय घेणे अपेक्षित होते. तसेच अशाप्रकारे शासन निर्णय घेताना तो विधिमंडळामध्ये देखील सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मग निर्णय घेणे अपेक्षित होते.  परंतु कदाचित शासनाला तशी आवश्यकता वाटत नसावी. म्हणूनच अतिशय छुप्या पद्धतीने शासनाने हा निर्णय जाहीर केला. शासनाच्या या पळपुटे धोरणाचा राज्य शिक्षकेतर महामंडळ जाहीर निषेध करत आहे. महामंडळाच्या वतीने राज्यातील कोणत्याही चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. अशी ग्वाही ही यावेळी शिवाजी खांडेकर यांनी दिली.

२००५ पासून वेळोवेळी शासनाने अध्यादेश काढून आकृतिबंधाच्या नावाखाली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद ठेवलेली आहे. आजपर्यंत अनेक वेळा आंदोलने मोर्चे शासनाबरोबर चर्चा इत्यादी लोकशाही मार्गाने शिक्षकेतर महामंडळाने या प्रश्नांबाबत सातत्याने विरोध करून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. आज ना उद्या याबाबत सकारात्मक शासन निर्णय घेईल व आपली नियमित वेतनश्रेणी वर नियुक्ती होईल या आशावादावर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी सेवक पदावर काम करत असलेल्यांच्या पदरी शासन निर्णयने केवळ आणि केवळ निराशाच आलेली आहे. 

शिपाई भत्ता देऊन कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा शासनाचा हा डाव शिक्षकेतर संघटना यशस्वी होऊ देणार नाहीत. अशा कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आपली मुले सुरक्षित राहतील की नाही याचादेखील समाजाने विचार करणे आवश्यक आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना अशाप्रकारे शासन निर्णय घेणे हे निश्चित योग्य नाही.या निर्णयामुळे ५२ हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे घर उध्वस्त होतील. त्यामुळे शासनाने  हा निर्णय त्वरित मागे घाव अशी मागणी यावली करण्यात आली

आजच्या सभेला अनिल माने,अध्यक्ष,शिवाजी खांडेकर, राज्य सरकार्यवाह,मोरेश्वर वासेकर,कार्याध्यक्ष,सौ शोभा तांबे,महिला उपाध्यक्ष,भागवत पावळे,उपाध्यक्ष,खैरूद्दीन सय्यद,उपाध्यक्ष,राजू रणवीर,कार्यवाह मुंबई विभाग,गोवर्धन पांडुळे,कार्यवाह पुणे विभाग,शांताराम तौर,कार्यवाह औरंगाबाद विभाग,संजय पाटील,अंतर्गत हिशोब तापसनीस,सुखदेव कंद, राज्य कोषाध्यक्ष.आदी पदाधिकारी उपस्थित होते 

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 402

0

  पुणे विभागातील 5 लाख 20 हजार 855 कोरोना बाधित रुग्ण बरेहोऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 48 हजार 590रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव    

 पुणे,दि.13 :- पुणे विभागातील 5 लाख 20 हजार 855 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 48 हजार 590 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12  हजार 402 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 51 हजार 584 रुग्णांपैकी 3  लाख 33 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9  हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 520  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.93 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 34 रुग्णांपैकी 50 हजार 174 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार 116 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 473 रुग्णांपैकी 44 हजार 392 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 425 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 656  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 232 रुग्णांपैकी 45 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 385 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 267 रुग्णांपैकी 47  हजार 405 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  171 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  691  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 955 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 761 , सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 129, सांगली जिल्ह्यात 35 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण – 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 10 आहे. पुणे जिल्हयामध्ये 781, सातारा जिल्हयामध्ये 0, सोलापूर जिल्हयामध्ये 172, सांगली जिल्हयामध्ये 24 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 33 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 57 हजार 359 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  48 हजार 590  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  12 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

स्वित्झर्लंडमधील हिमनदीची गुहा पर्यटकांसाठी झाली खुली

0

बर्नस्वित्झर्लंडमधील अल्प पर्वतीय भागांत हिमनदीच्या वितळलेल्या पाण्यापासून बनलेली नैसर्गिक गुहा सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. चारही बाजूंनी बर्फच बर्फ असलेल्या पर्वतीय क्षेत्रात ही गुहा आहे. ही गुहा पाहण्यासाठी लाेक या ठिकाणी भेट देत आहेत. ‘द मिल’ असे या गुहेचे नाव असून लाेकांनी स्वत: जाेखीम पत्करून गुहेचा दाैरा करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

२० मीटर लांब व ५ मीटर खाेल अशा स्वरूपाची ही गुहा आहे. दरवर्षी या गुहेचा आकार बदलताे, असे स्थानिक लाेक सांगतात. ही गुहा स्की रिसाॅर्टपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळेच येथे दरवर्षी लाखाे पर्यटक भेट देतात.

60 टक्के जमिनीवर हिमपर्वत
स्वित्झर्लंडमधील ६० टक्के जमिनीवर हिमपर्वत दिसून येतात. असा युराेपातील हा पहिलाच देश आहे. येथे माेठ्या प्रमाणात बर्फवृष्टी हाेते. सुंदर पर्वत, गावे, तलावांचा देश म्हणूनच दरवर्षी लाखाे लाेक येथे पर्यटनासाठी येतात.

ग्रामीण भागातील दस्त नोंदणी बंदी संदर्भात भाजपचे महसूल सचिवांकडे गाऱ्हाणी

0

पुणे-ग्रामपंचायत हद्दीतील सदनिकांचे (फ्लॅट) करार (अग्रीमेंट) व जमिनीच्या तुकड्याची दस्त नोंदणी बंद केल्याबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी चंद्रकांतदादांना पुणे जिल्ह्यातील विविध ग्रामस्थ,सदनिकाधारक व बांधकाम व्यवसायिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी विषय समजून घेतला व याबाबत राज्य सरकार मधील  संबंधित मंत्री व  महसूल खात्याचे सचिव श्री. नितीन करीर यांच्यासोबत बोलणे करून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.ॲड.नितीन दसवडकर व ॲड.मयुर दुधाणे यांनी सांगितले की नोंदणी अधिनियम १९०८ मधील कलम ३२ व ३४ नुसार दुय्यम निबंधक यांना दस्त तपासणी संदर्भात कोणताही अधिकार प्राप्त नाही. महाराष्ट्र नोंदणी नियम ४४(१) आय मधील तरतुद ही केंद्रसरकारच्या कायद्यालाच चॅंलेज करते आहे. रेरा कायद्यातील कलम ३ मधील तरतुदी व नोंदणी अधिनियम व मालमत्ता हस्तांतरण कायदा यामधील तरतुदी या एकमेकांना विसंगत आहेत. मालमत्ता हस्तांतरण कायद्या नुसार ज्या दस्तातील देवाण घेवान रू १००/- पेक्षा जास्त असेल तो नोंदणी अधिनियमाप्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनातील अधिकारी हे कायद्यातील तरतुदींना छेद देत दस्त नोंदणी नाकरताना दिसत आहेत,जे बेकायदेशीर आहे. दुय्यम निबंधक यांना ४४(१)आय मधील दिलेले अधिकार हे नोंदणी अधिनियमला चॅलेंज करते तर मालमत्ता हस्तांतरण कायदा १९८२ ला ही चॅलेंज करते व हे दोन्ही कायदे केंद्रसरकारचे आहेत.त्यामुळे हे शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे असे ही त्यांनी सांगितले.याप्रसंगी श्री.संदीप खर्डेकर,मा.सरपंच उत्तमनगर श्री.सुभाषभाऊ नाणेकर,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. सारंगजी राडकर, ॲड.मयुर माणिकशेठ दुधाने, श्री. अतुल अप्पा धावडे,ॲड.नितीन दसवडकर,श्री. किरणभाऊ वांजळे,अमोल आहेर पाटील,श्री. सतिशभाऊ वांजळे ,अक्षय मोरे,सुधीर धावडे इ उपस्थित होते.

अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले रक्तदान

0

 मुंबई-  सध्या  राज्यात रक्त साठा खूप प्रमाणात कमी झाला होता आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी दिव्याज फॉउंडेशन यांनी  आज गामदेवी, मुंबई येथे शारदा मंदिर शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन बँकर,  सामाजिक कार्यकर्ता अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी   त्यांनी स्वतः देखील रक्तदान केले.या शिबिरा बद्दल बोलताना त्यांनी सांगितले, ” सद्या राज्यात रक्ताची प्रचंड कमतरता आहे आणि ही कमतरता दूर करण्यासाठी साठी निरोगी लोकांनी पुढे येऊन रक्तदान केले पाहिजे.”या शिबिराला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला व दिव्याज फॉउंडेशन तर्फे भविष्यात सुद्धा असे अनेक  सामाजिक उपक्रम केले जातील असे सांगण्यात आले.

अभय योजनेला मुदतवाढीची मागणी मान्य केल्याबद्दल स्थायी अध्यक्षांचे अभिनंदन – माळवे

0

पुणे – मिळकत कर थकबाकी बद्दलच्या वादामुळे अडकून पडलेली कोट्यावधी ची रक्कम वसूल व्हाव्ही आणि मिळकतकर थकबाकीदारांना दिलासा मिळून पालिकेच्या उत्पन्नातही भर पदवी म्हणून अभय योजनेला मुदतवाढ द्यावी अशी आपण केलेली मागणी मान्य करून उचित कार्यवाही सुरु केल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि महापौर मुरलीधर मोहोळ या दोहोंचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी अभिनंदन केले आहे .

ते म्हणाले ,’महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या अभय योजनेची मुदत 30 नोव्हेंम्बर रोजी संपुष्टात आल्याने त्यास मुदत वाढ देण्याकरिता मी व सहकारी नगरसेवक संदीपजी जऱ्हाड यांनी पत्राद्वारे महापौर मुरलीधर मोहोळ व चेअरमन हेमंत रासने यांच्याकडे निवेदन दिले होते त्यास त्यांनी मुदत वाढ दिल्या बद्दल त्यांचे आपण आभार मानीत आहोत . नगरसेवकांच्या मागण्यांची दाखल त्यांनी वेळोवेळी घेऊन स्थायीचा कारभार चांगल्या रीतीने हाताळल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रसिकांनी पुन्हा अनुभवला संगीत नाटकाचा सुवर्णकाळ

0

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संवाद पुणे, श्री खंडेराय प्रतिष्ठानतर्फे आयोजन

पुणे : नटसम्राट बालगंधर्व यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत द्रौपदी नाटकाला 100 वर्षे झाल्या निमित्ताने द्रौपदी नाटकातील स्वगत, बालगंवर्ध यांच्या आयुष्यातील ठळक घटनांवर प्रकाश टाकणारे निवडक प्रसंग आणि त्याच्या जोडीला‘खरा तो प्रेमा’, ‘सूर सुख खली सु-विमला’, ‘स्वकुल तारक सुता’, ‘सोडी नच मजवरी’, ‘अशी नटे ही चारूता’ या लोकप्रिय नाट्यगीतांचे सादरीकरण रसिकांसाठी जणू पर्वणीच ठरले अन् संगीत नाटकाचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.निमित्त होते ते नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर लिखित संगीत द्रौपदी नाटकाच्या शताब्दी सांगतेनिमित्त द्रौपदी आणि बालगंधर्व या अनोख्या कार्यक्रमाचे. संवाद पुणे आणि श्री खंडेराय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बालगंधर्व रसिक मंडळाच्या सहकार्याने आज (दि. 12 डिसेंबर) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून पंडित पद्मश्री सुरेश तळवलकर उपस्थित होते. गणपतराव तथा आप्पा बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहरचे उपाध्यक्ष डॉ. सागर गणपतराव बालवडकर, ज्येष्ठ सारंगीवादक खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ, गझल गायक अन्वर कुरेशी, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे विजय कोलते, बापूसाहेब मुरकुटे, संवाद पुणेचे सुनील महाजन, बालगंवर्ध रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकीता मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची निर्मिती संवाद पुणे यांची होती.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अस्मिता चिंचाळकर यांनी द्रौपदी नाटकातील स्वगत आणि थाट समरीचा दावी नट तसेच लाजविले वैर्‍यांना ही दोन पदे सादर केली.कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात ज्येष्ठ कलावंत सुरेश साखवळकर यांनी बालगंधर्वांच्या जीवनातील निवडक आणि महत्त्वाचे प्रसंग सादर केले. तर नाट्यगीतांचे सादरीकरण सुप्रसिद्ध गायिका बकुळ पंडित, सुरेश साखवळकर, रवींद्र कुलकर्णी यांनी केले. राहुल गोळे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व कादरबक्श खाँ साहेब यांची संगीत नाट्य रंगभूमीवरील परंपरा पुढे चालविणार्‍या अनुराधा राजहंस, ज्योत्स्ना बडवे, रूपा वाबळे, राहुल गोळे, दीपक टेंबे, खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ व अन्वर कुरेशी यांचा सत्कार पंडीत पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आला.बालगंवर्ध हे आमच्या घरातील दैवतनटसम्राट बालगंवर्ध यांच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ सारंगीवादक खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ यांनी बालगंधर्व हे आमच्या घरातील दैवत असल्याचे सांगून बालगंधर्व यांच्यामुळे नाट्य रसिकांना सारंगीची ओळख झाली. त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. बालगंधर्व द्रौपदीची भूमिका साकारत असताना प्रत्यक्ष द्रौपदीच गात आहे की काय असा भास रसिकांना होत असे. सारंगीवादन आणि बालगंधर्वांचे गायन इतके एकरूप असे की, सारंगी वाजत आहे की, बालगंवर्ध गात आहेत याचा श्रोत्यांना उलगडा होत नसे. बालगंधर्व हे त्यांच्या काळातील सुपरस्टारच होते. महान कलाकार कधीही मरत नाही, कलाकारच हेच कलाकारांचा सन्मान करतात. पुणे हे जीवंत शहर आहे आणि या शहरात मी राहतो याचा मला अभिमान आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. नाट्यसंगीतामुळेच शास्त्रीय संगीताला मानरत्नागिरीजवळील छोट्याशा गावात बालपणी नटसम्राट बालगंवर्ध यांच्यासमोर मला तबला वादनाची मिळालेली संधी आजही स्मरणात असल्याचे सांगून पंडित सुरेश तळवलकर यांनी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतामधील धागा उलगडून दाखविला. नाट्यसंगीतामुळेच शास्त्रीय संगीताला आजच्या काळात वैभावाचे दिवस दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद पुणेचे सुनील महाजन आणि बालगंधर्व रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी केले. मान्यवरांचा सत्कार शरद पवार यांचे आत्मनिवेदनपर असलेले लोक माझे सांगाती हे पुस्तक, शाल आणि तुळशीचे रोप देऊन करण्यात आला. सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले तर आभार निकीता मोघे यांनी मानले.सागर सेतू उपक्रमाचा शुभारंभमाजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सागर सेतू या उपक्रमाचा शुभारंभ या प्रसंगी झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे डॉ. बालवडकर यांनी सांगितले.

‘मतवाली मनचली कविताएँ’ या कवितासंग्रहाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हस्ते प्रकाशन

0

पुणे: ‘मतवाली मनचली कविताएँ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
उत्तराखंड येथील देवयानी मुंगली यांच्या लेखनीतून साकारालेला ‘मतवाली मनचली’ कवितासंग्रहातील कविता लहान मुलांना शौर्याचे धडे देतात. कवितासंग्रह वाचनातून पुन्हा एकदा पुस्तकांच्या विश्वात रममाण व्हावे वाटत आहे. देवयानी मुंगली यांच्या कविता मनाला भावणाऱ्या आहेत. लहान मुलांसाठी हा कवितासंग्रह वाचनीय असल्याचे सांगतानाच येणाऱ्या कालावधीत आणखी चांगल्या रचना देवयानी यांच्या लेखनीतून पुढे येतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक प्रणित मुंगली यांनी तर आभार श्रीमती देवयानी मुंगली यांनी मानले. यावेळी संस्कृती परिवारातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

शरद पवारांचे घरच्यांनी औक्षण करून दिल्या शुभेछ्या (पहा व्हिडीओ)

0

पुणे- पवारसाहेबांचा ८० वा वाढदिवस कार्यकर्त्यांपासून ते नेतेच नाही तर विरोधी पक्षांतून मिळणाऱ्या शुभेछ्यांनी त्यांचा दिवस ओथंबून वाहत असताना आज सायंकाळी त्यांच्या घरीही मोठ्या आदरभावाने ,सन्मानाने त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेछ्या दिल्या गेल्या . ज्याचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडिया वर शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज आपला 80 वाढदिवस साजरा करत आहेत. देशभरातील नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, असे म्हणत पंतप्रधाना मोदींनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पवारांना शुभेच्छा
‘महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधीनी दिल्या शुभेच्छ्या

उदयनराजे भोसलेंनी फोटो केला शेअर

आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

बाळासाहेब थोरातांकडून शुभेच्छा
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. ‘

अजित पवारांनी दिल्या शुभेच्छा
हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो.

शरद पवारांनी काँग्रेसला दिलेली ताकद पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते, पण…; प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेसवर टीका

0

मुंबई– शरद पवारांनी काँग्रेसला ताकत दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या ‘दरबार राजकारणात’ ही संधी हुकली. ज्यामुळे त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झाले, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले. त्यांनी आज इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रात पवारांवर लिहिलेल्या लेखात शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाविषयी महत्वाचे भाष्य केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक नेतेमंडळींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर हे सनसनाटी आरोप केले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी लेखात म्हटले की, काँग्रेसची काम करण्याची पद्धत ‘सुनियोजित बंड’ घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. पहिला फटका पवारांना 1989 ला आर के धवन, माखनलाल फोतेदार यांनी मोठे षडयंत्र करून देण्याचा प्रयत्न केला जो पवारांनी फोल पाडला, असेही पटेल

या लेखात पुढे ते म्हणाले की, राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठी नरसिंह राव यांना आणले. देशभर काँग्रेसला पवार हवे होते. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारे काँग्रेस सरकार बनले असते पण नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार आले. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

पटेल म्हणताता की, फक्त पवारांमुळेच वाजपेयी सरकार 13 दिवसांत पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस ने अपमान केला. पार्लियामेंटरी पार्टीचे मुख्य बनवून त्यांनाच अंधारात ठेवले जायचे. महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडवल्या जायच्या, असे आरोप देखील प्रफुल्ल पटेल यांनी या लेखातून केले आहेत.

डॉक्टरांना दहा वर्ष द्यावी लागणार शासकीय रुग्णालयात सेवा, अन्यथा १ कोटींचा दंड- योगी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

0

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य असतं. उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर १० वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं सक्तीचं केलं आहे. जर मध्येच सेवा सोडली, तर डॉक्टरांना १ कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे

उत्तर प्रदेशातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्यानं वैद्यकीय सेवेवर परिणाम होऊ लागला आहे. यावर मात करण्यासाठी योगी सरकारनं वैद्यकीय पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांना १० वर्षे शासकीय रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं नीट मधूनही सुट देण्याची तयारी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर डॉक्टरांना १० वर्षे शासकीय रुग्णालयात सेवा करावी लागणार आहे. मध्येच सेवा सोडल्यास १ कोटी रुपये दंड डॉक्टरांकडून वसूल केला जाणार आहे.

उत्तर प्रदेशात सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण एक वर्ष नोकरी केल्यास १० अंकांची सूट दिली जाते. तर दोन वर्ष सेवा केल्यास २० अंकांची सूट देण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात.

डॉक्टरांचा तुटवडा जाणवत असल्यानं योगी आदित्यनाथ सरकारनं मागील आठवड्यात नव्यानं सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्याचेही निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना यासंदर्भातील आदेश दिले आहेत.