Home Blog Page 2367

मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. २० :- मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असा आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई मेट्रोच्या अंधेरी एल-सेव्हन स्थानक, अकुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाण पूल (मेट्रो रेल ब्रिज), चारकोप मेट्रो डेपो आणि डी.एन. नगर मेट्रो स्थानक येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी अंधेरीतील प्रस्तावित गुंदवली आणि त्यानंतर कांदिवली येथील मेट्रो स्थानकांच्या कामांची पाहणी केली, तसेच विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

चारकोप मेट्रो डेपोतील मेट्रोच्या इंजिनची मेट्रो मार्गिंकांवरील चाचणीच्या तयारीबाबतही या भेटीत पाहणी केली.

यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह तसेच मेट्रोशी निगडीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी कामांचा प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विविध मुद्दयांबाबत निर्देश दिले. प्रकल्पातील चारकोप मेट्रो डेपोत मेट्रो मार्गिकांवरील चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मेट्रोच्या इंजिनचीही त्यांनी माहिती घेतली. दहिसर येथे उभारण्यात येत असलेल्या मेट्रोच्या पुलाच्या कामांचीही प्रत्यक्ष पाहणी केली.

उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रकल्पातील प्रगतीपथावरील कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ही कामे दर्जेदार व्हावीत, तसेच ती वेळेत पूर्ण करण्यात यावीत, या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी काही निर्देश दिले.

विद्यार्थ्यांनो बदलत्या परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सामर्थ्यशाली बना-प्रा. चाटे सर

0

पुणे –

          चाटे शिक्षण समूह पुणे विभागातर्फे दहावी बोर्ड परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे याठिकाणी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे त्याच बरोबर फेसबुक लाईव्ह वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक फेसबुक लाईव्ह व झूम च्या माध्यमातून कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

            आजच्या विविध क्षेत्रातील असणाऱ्या जीवघेण्या स्पर्धा पाहता विद्यार्थ्यांनी वेळेतच आपले ध्येय ठरवणे व त्यानुसार नियोजन बद्ध तयारी करून यश संपादन करणे हे आज फार आवश्यक झाले आहे दहावी बोर्ड परीक्षेस सामोरे जात असताना विद्यार्थ्यांनी योग्य ती उजळणी, वेळेचे नियोजन, पेपर प्रेझेंटेशन इत्यादी बाबींवर लक्ष देणे फार गरजेचे आहे त्याच बरोबर सध्याची कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आपल्या आरोग्याची ही तितकीच काळजी घेणे आवश्यक बनले आहे आज महाराष्ट्रातून सोळा ते सतरा लाख विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी सामोरे जात असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे परीक्षेचे दडपण न घेता अतिशय आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेत सामोरे जावे असे आवाहन यावेळी चाटे शिक्षण समूह पुणे विभागीय संचालक प्रा फुलचंद चाटे यांनी केले.

             कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्रद्धा ओंबासे,ओंकार कळंबे त्याचबरोबर राहुल चाटे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेस शुभेच्छा देत असताना कोल्हापूर विभागीय संचालक प्रा भारत खराटे यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये असणाऱ्या विविध संधीबद्दल ओळख करून दिली.

            या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा गोपीचंद चाटे सर त्याच बरोबर चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक डॉ. प्रा भारत खराटे , प्रा समर जमादार, प्रा बापू काटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

             विद्यार्थ्यांना संबोधून बोलताना प्रा गोपीचंद चाटे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्मार्ट असावे, बदलत्या परिस्थितीनुसार येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सामर्थ्यशाली बनवावे . दहावी बोर्ड परीक्षा सोबतच अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षाचे महत्त्व अधोरेखित करत असताना विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावी या दोन वर्षांमध्ये मोबाईलच्या आहारी न जाता मोबाइलला स्वतःपासून जास्तीत जास्त दूर कसे ठेवता येईल व आपला अमूल्य असा वेळ स्वयंअध्ययन ना मध्ये कसा घालवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच आपण बोर्ड परीक्षा सोबतच पुढे असणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांमध्ये देखील उज्वल असे यश संपादन करू शकता. याकरिता चाटे शिक्षण समूहाच्या असणाऱ्या निवासी संकुलाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले आपल्या पुढील वाटचालीसाठी या कॉलेजची निवड करण्याचा सल्ला वेळी विद्यार्थी व पालकांना देण्यात आला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा समर जमादार यांनी केले व 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या भास्कराचार्य स्कॉलर सर्च परीक्षेस सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

भाई जगताप यांची मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी निवड, तर कार्यकारी अध्यक्षपदी चरणजीतसिंह सप्रा

0

मुंबई-कांग्रेस नेते आणि विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. विद्यमान मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षातील नाराजी वाढल्याची चर्चा होती.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मान्यता मिळताच मुंबई काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी अशोक उर्फ भाई जगताप यांची निवड झाली. एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षातील नाराजी आणि लवकरच येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने हा बदल केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चरणजीतसिंह सप्रा, अस्लम शेख, मिलिंद देवरा, संजय निरुपम, सुरेश शेट्टी अशा नेत्यांचीही नावे चर्चेत होती. त्यात भाई जगताप यांच्यावर हायकमांडने विश्वास टाकला आहे.

दरम्यान, भाई जगताप यांच्यासोबतच मराठा काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, चरणजीतसिंह सप्रा यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तसेच, माजी मंत्री नसीम खान यांना प्रचार समिती अध्यक्ष करण्यात आले असून सुरेश शेट्टी यांना मेनिफेस्टो कमेटीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 204

0

      पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 5 लाख 54 हजार 398 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव  

पुणे,दि.20 :- पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11  हजार 204 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 55 हजार 842 रुग्णांपैकी 3  लाख 38 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8  हजार 782 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 603  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  95.11 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 595 रुग्णांपैकी 50 हजार 965 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  883 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 213 रुग्णांपैकी 45 हजार 339 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 193 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 681  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 376 रुग्णांपैकी 45 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 261 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 372 रुग्णांपैकी 47  हजार 591 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 878 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 668 , सातारा जिल्ह्यात 88, सोलापूर जिल्ह्यात 105, सांगली जिल्ह्यात 14 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण – 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 44 आहे. पुणे जिल्हयामध्ये 671, सातारा जिल्हयामध्ये 174, सोलापूर जिल्हयामध्ये 160, सांगली जिल्हयामध्ये 33 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 59 हजार 987 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  54 हजार 398 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  19 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

बुलडाणा : जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून जिल्ह्यातील पळसखेडा चक्का ता. सिं. राजा येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात आले. औरंगाबाद येथे विमानतळावर लष्कराकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी औरंगाबाद येथून रस्ता मार्गे पळसखेड चक्का ता. सिं. राजा येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले.  शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी लष्कर, पोलीस यांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवान प्रदीप मांडळे यांना मानवंदना दिली. मानवंदनेसाठी 100 आजी – माजी सैनिक उपस्थित होते. काही वेळासाठी पार्थिव शहीद जवान यांच्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला घरापासून सुरूवात करण्यात आली. संपूर्ण गावात रस्त्यारस्त्यावर रांगोळी काढण्यात आल्या, तर मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजलीचे बॅनर्स लावण्यात आले. यावेळी संपूर्ण गावात भावनिक वातारवण होते. शहीद जवान प्रदीप मांदळे अमर रहे.. च्या निनादात अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भावपूर्ण वातावरणात भारत मातेच्या वीर सुपुत्राला साश्रु नयनांनी शेवटचा निरोप देण्यात आला. प्रदीप मांदळे भारतीय लष्कारात 10 महार रेजींमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांचा जन्म 1 जुलै 1989 रोजी पळसखेड चक्का येथे झाला. औरंगाबाद येथे सैन्यामध्ये शहीद जवान प्रदीप भरती झाले. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2009 ला महार रेजीमेंट सागर मध्यप्रदेश येथे एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून 10 महार रेजीमेंट (सिग्नल प्लाटून) मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.  जवळपास महार रेजीमेंट मध्ये त्यांची 10 वर्ष 2 महिने सेवा झाली आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा जयदीप व अडीच वर्षाचा मुलगा सार्थक, दोन भाऊ असा परीवार आहे. पार्थिवावर भारतीय लष्कारातील उच्च पदस्थ अधिकारी, माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, माजी आमदार राहुल बोंद्रे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार सुनील सावंत, माजी सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती फिरदौस, नगराध्यक्ष सतिष तायडे, माधवराव जाधव, ॲड नाझेर काझी आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. अत्यंत शोकाकूल वातावरणात शहीद जवान प्रदीप मांदळे यांना त्यांच्या मुलाने मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण धीरगंभीर झाले होते.

विजया, देना बँकांच्या शाखांचे एकत्रिकरण

0

स्थलांतर बँक ऑफ बडोदाकडून पूर्ण

मुंबई, 20 डिसेंबर2020 : देना बॅंक व विजया बॅंक यांच्या एकूण 3898 शाखांचे एकत्रिकरण / स्थलांतर करून घेण्याचे काम ‘बॅंक ऑफ बडोदा’ने पूर्ण केले आहे. देना बॅंकेच्या 1770 शाखांचे एकत्रिकरणाचे काम ‘बॅंक ऑफ बडोदा’ने या डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण केले. विजया बॅंकेच्या 2128 शाखांच्या एकत्रिकरणाचे काम ‘बॅंक ऑफ बडोदा’ने सप्टेंबर 2020 मध्येच पूर्णत्वास नेले होते. अशा प्रकारे, देना व विजया या दोन्ही बॅंकांचे एकत्रिकरण ‘बॅंक ऑफ बडोदा’मध्ये होण्याची प्रक्रिया ठरलेल्या मुदतीपेक्षा अगोदरच पूर्ण झाली आहे. या विलिनीकरणामुळे, बॅंक ऑफ बडोदा ही मालमत्तेच्या दष्टीने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी मोठी बॅंक झाली आहे.

हे विलिनीकरण खऱ्या अर्थाने मोठे आहे. या प्रक्रियेमध्ये 5 कोटींहून अधिक ग्राहकांची खाती स्थलांतरीत करण्यात आली. शाखांचे एकत्रिकरण करण्याबरोबरच, सर्व एटीएम, पीओएस मशीन्स व क्रेडिट कार्ड्स यांचेदेखील स्थलांतर यशस्वीपणे पूर्ण झाले. विलिनीकरणानंतर आता सर्व ग्राहकांना देशभरातील एकूण 8248 देशांतर्गत शाखा व 10318 एटीएम यांचा वापर करता येणार आहे. ‘बॅंक ऑफ बडोदा’ची सर्व प्रकारची उत्पादने व सेवा यांचा लाभ या सर्व ग्राहकांना घेता येईल. तसेच, या सर्वांना ‘बडोदा कनेक्ट’, ‘एम-कनेक्ट प्लस’ यांसारख्या सुलभ, वापरण्यास सोप्या व शाखांमध्ये मिळू शकणाऱ्या वैशिष्ट्यांनी युक्त अशा सुविधा मिळू शकणार आहेत. त्यांना घरबसल्या बॅंकिंगच्या सेवा उपभोगता येणार आहेत.

ज्या ग्राहकांची खाती स्थलांतरीत झाली आहेत, त्यांना आपला नवीन खाते क्रमांक, आयएफएससी कोड यांची माहिती कोणतीही डिजिटल साधने व कॉल सेंटर यांच्या माध्यमातून वा कोणत्याही शाखेमधून मिळविता येईल. देना व विजया या पूर्वाश्रमींच्या बॅंकांनी आपल्या ग्राहकांना दिलेली डेबिट कार्डे यापुढेही कार्डावरील मुदतीच्या काळात चालू राहतील.

एकत्रिकरणाचे काम वेळेत पूर्ण झाल्याच्या संदर्भात ‘बॅंक ऑफ बडोदा’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव चढ्ढा म्हणाले, “कोविड-19च्या साथीची प्रतिकूल परिस्थिती असतानाही, आम्ही देना व विजया या बॅंकांचे बॅंक ऑफ बडोदामध्ये संपूर्ण एकत्रिकरण करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले, याबद्दल समाधानी आहोत. आम्ही सर्व ग्राहकांचे पुन्हा मनापासून स्वागत करतो आणि ‘बॅंक ऑफ बडोदा’ची सर्व उत्पादने व डिजिटल सुविधा यांचा लाभ घेण्याची विनंती करतो. एकत्रिकरणाची प्रक्रिया यशस्वी पार पडल्याने, कामकाजातील समन्वयाव्यतिरिक्त, तिन्ही बँकांच्या या विलिनीकणाचे फायदे एकत्रित मिळवून देण्यासाठी आमची बँक सज्ज झाली आहे.”

आम्ही आमच्या सर्व भागधारकांबद्दल, विशेषतः आमच्या सर्व आदरणीय ग्राहकांबद्दल, कृतज्ञता नोंदवतो आणि त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करतो.

बॅंक ऑफ बडोदाविषयी :

बँक ऑफ बडोदा (“बँक”) 20 जुलै 1908 मध्ये स्थापन करण्यात आली. ती बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील अग्रगण्य सरकारी बॅंक अहे. गुजरातमधील वडोदरा (पूर्वीचे बडोदा) या शहरात तिचे मुख्यालय आहे.

‘बँक ऑफ बडोदा’च्या अनेक शाखा भारतातील गावांत व शहरांत सुरू आहेत. बँकेच्या वितरण नेटवर्कमध्ये 9,500 हून अधिक शाखा, 13,400 हून अधिक एटीएम आणि 1,200 हून अधिक स्वयं-सेवा ई-लॉबी समाविष्ट आहेत. २१ देशांमधील १०० शाखा / उपकंपन्यांची कार्यालये असलेल्या नेटवर्कसह बँकेचा कारभार आंतरराष्ट्रीय स्तरावरही चालतो. ‘बीओबी फायनान्शियल सोल्यूशन्स लिमिटेड’ (पूर्वाश्रमीची बॉब कार्ड्स लि.), ‘बीओबी कॅपिटल मार्केट्स’ आणि ‘बडोदा अ‍ॅसेट मॅनेजमेन्ट इंडिया लि.’ या बँक ऑफ बडोदाच्या सहाय्यक कंपन्या आहेत. पायाभूत सुविधांच्या गुंतवणूकीत व्यग्र असलेल्या ‘इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लि’. आणि ‘इंडिया इन्फ्राडेट लि.’ या कंपनीत बॅंकेची भागीदारी आहे. तसेच ‘द नैनिताल बॅंक’ येथेही ‘बॅंक ऑफ बडोदा’’ची 98.57 टक्के मालकी आहे. ‘बडोदा उत्तर प्रदेश ग्रामीण बँक’, ‘बडोदा राजस्थान ग्रामीण बँक’ आणि ‘बडोदा गुजरात ग्रामीण बँक’ या तीन प्रादेशिक ग्रामीण बँकादेखील ‘बॅंक ऑफ बडोदा’ने प्रायोजित केल्या आहेत.

केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि.20 : जनतेचे सेवक म्हणून काम करतांना विकास प्रकल्पावरून वाद घालणे योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि राष्ट्र विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन विकास कामांना गती दिली पाहिजे, विकासाचे दूरगामी परिणाम विचारात घेतले पाहिजेत असे स्पष्ट केले. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विकासाला अवधी लागला तरी चालेल परंतू भावी पिढ्यांच्या भवितव्याचा विचार करून काम केले पाहिजे या भावनेने आपण काम करत आहोत, यात कुठेही आपल्या अहंकाराचा प्रश्न नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाईल असे कोणतेही काम आपण करणार नाही तर महाराष्ट्र हिताचेच काम करू असेही ते म्हणाले.

विकासकामांवर लक्ष

मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आड कुणालाही येऊ देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईतल्या मेट्रो कामाची पाहणी मी आज करणार आहे. या आधी कोस्टल रोडची पाहणी मी केली होती. राज्यातील विकास कामांवर माझे स्वत:चे लक्ष आहे. कोस्टल रोडचे काम मागील एक दोन वर्षापासून सुरु आहे. या कामाबाबत कोळी बांधवांचे काही आक्षेप होते. ते न्यायालयात गेले होते त्यांना या कामाविषयीची माहिती देऊन, समजून सांगितल्यानंतर आता या सागरी किनारा मार्गाचे काम सुरु झाले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंकचे काम असो, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम असो, या सगळ्या कामांना त्यावेळीही शेतकऱ्यांचा विरोध होता. चर्चा आणि संवादातून मार्ग काढत आता हे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत.  एखादा प्रकल्प सुरु झाल्यानंतर  त्याच्या रचनेत काहीवेळा बदल करावा लागतो असे सांगतांना मुख्यमंत्र्यानी प्रकल्पाच्या मूळ रचनेत बदल कराव्या लागलेल्या अमरावती जिल्ह्यातील लोअर पेढी सिंचन प्रकल्पाचा तसेच जळगावच्या शेलगाव बॅरेज प्रकल्पाचा उदाहरणादाखल उल्लेख केला. राज्य हित आणि जनतेच्या हिताचा ‍विचार येतो तेव्हा काही प्रकल्पात बदल करणे गरजेचे असते. विकास कामे करतांना घाई करणे उचित ठरत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

भविष्यातील गरज लक्षात घेऊन कारशेड कांजूरमार्गला

विकास हा काही काळाचा नाही तर भविष्यातील गरजांचा विचार करून नियोजित करावा लागतो हे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे उदाहरण दिले. आरेची जागा फक्त मेट्रो-3 च्या मार्गिकेसाठी उपयुक्त आहे आणि इथल्या 30 हेक्टर जागेपैकी 5 हेक्टर जागेवर घनदाट जंगल आहे. म्हणजे 25 हेक्टर क्षेत्रावर आता कारशेड उभारायचे आणि भविष्यातली वाढती गरज लक्षात घेऊन 5 हेक्टरवरचे हे जंगल नष्ट करायचे याला काय अर्थ आहे अशी विचारणा ही त्यांनी केली. पहिल्या मेट्रो प्रकल्पात स्टेबलिंग लाईनचा प्रस्तावच नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्याने मेट्रो 3,4 आणि 6 या लाईन्सचे एकत्रीकरण शक्य होणार आहे हे ही त्यांनी स्पष्ट केले. तीनही लाईनचे कारडेपो एकत्र केले तर या जंक्शनमधून अंबरनाथ-बदलापूरपर्यंत लाईन नेणे शक्य होणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली. कांजूरमार्गची 40 हेक्टरची जागा ही ओसाड प्रदेश असून ही जागा भविष्यातील कित्येक वर्षांच्या गरजा पूर्ण करू शकेल असे असतांना कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेले तर त्यात चुक काय अशी विचारणा करतांना त्यांनी या जागेसाठी राज्य सरकारविरोधात केंद्र सरकार (खार जमीन आयुक्त) न्यायालयात गेल्याचे सांगितले.

केंद्र आणि राज्याने एकत्र बसून विकास प्रकल्प राबवावेत

बुलेट ट्रेनसाठी राज्याने वांद्रे-कुर्ला संकुलात राज्याची हक्काची आणि मोक्याची जागा दिली. केंद्र सरकारने तिथले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र  इतरत्र हलवले. तरीही राज्याने केंद्राच्या प्रकल्पाला जागा दिली मग राज्याच्या विकास कामात केंद्र शासनाने अडथळे आणू नयेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्याने एकत्र बसून हा वाद सोडवला तर जनतेच्या या जागेवर त्यांच्याच उपयोगाचा असलेला प्रकल्प राबवणे सोपे जाईल असेही ते म्हणाले.

माहूल पंपींग स्टेशनसाठी जागा द्यावी

माहूल येथील पंपींग स्टेशनसाठी राज्य शासन केंद्राकडे जागेची मागणी करत असतांना केंद्र त्यास  प्रतिसाद देत नसल्याचेही ते म्हणाले. मीठागराची ही जागा पंपीग स्टेशनसाठी मिळाल्यास पावसाचे पाणी साचून मुंबईकरांना होणारा त्रास वाचू शकेल असेही ते म्हणाले.

संकटाचा सामना तरी विकासाला गती

कोरोना संकटाशी निग्रहाने लढा देत असतांना अनेक विकास कामांना वर्षभरात गती दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची, महामार्गावर वन्यजीवांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची आपण स्वत: पाहणी केल्याचे ते म्हणाले. 1 मे 2021 पर्यंत नागपूर – शिर्डी या टप्प्यातील महामार्ग वाहतूकीसाठी खुला करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. सिंधुदूर्गचे विमानतळ जानेवारी महिन्यात सुरु होणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या आयुष्याला प्रकाशमान करणाऱ्या कोयना धरणाची ही पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची पाहणी करतांना सर्वात अवघड अशा बोगद्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

संकटकाळात राज्याची मदत

सरकार  आर्थिकदृष्ट्या अडचणीत  आहे, केंद्र सरकारकडून राज्याची हक्काची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे असे असतांना आत्मविश्वासाने एकेक पाऊल पुढे टाकत राज्य शासनाने अनेक आपत्तीच्या प्रसंगात जनतेला, शेतकऱ्यांना मदत केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरानाचे संकट, निसर्ग चक्रीवादळ, पूर्व विदर्भातील पूर स्थिती, राज्यभरात अतिवृष्टीने झालेले नुकसान  या सगळ्या अडचणींचा सामना करत राज्य विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगभर लॉकडाऊनने विकास प्रक्रिया थंडावली असतांना महाराष्ट्र राज्याने 65 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार औद्योगिक क्षेत्रात केले. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी  महाराष्ट्रात गुंतवणूकीला पसंती दिली. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सामंजस्य करारातील 70 टक्के काम पूर्ण झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन वर्षातही स्वयंशिस्त पाळा – कोरोनाला दूर ठेवा

राज्यातील प्राचीन मंदिरांचा, तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे राज्य शासनाने ठरवले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सर्वधर्मियांनी आपापल्या सण, समारंभात शिस्त पाळल्याने आणि जनतेने स्वयंशिस्तीचे पालन केल्याने आपण कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलो  आहोत. पण अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही  असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  लस आली तरी पुढचे सहा महिने आपल्याला सावध राहण्याची, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळण्याची गरज आहे. युरोप आणि इंग्लंडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली. नवीन वर्ष समोर आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना हे वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाओ अशा शुभेच्छा आपण एकमेकांना देतो. त्या खऱ्या ठरण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्तीने राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.  राज्यातील 70 ते 75 टक्के लोक बाहेर फिरतांना मास्क वापरतांना दिसतात उरलेले 25 टक्के लोक विनामास्कचेच फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आणि समाजाला धोका होऊ शकतो हे त्यांनी लक्षात घ्यावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

रक्तदानाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन – हेमंत बागुल

0

पुणे-“अंतरराष्ट्रीय मानवता  दिवसाचे “निमित्त साधून महाराष्ट्राच्या रक्ताचा तुटवडा लक्ष्यात घेता “आधार सेवा केंद्र ” व” पुणे ब्लड बँक” यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य रक्तदान शिबिराचे शिवदर्शन बागांमध्ये आयोजित करण्यात आले होते .
या शिबिरास शिवदर्शन,सहकारनगर ,पद्मावती,पर्वती दर्शन ,तावरे कॉलनी आदी भागातून नागरिकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला .
महाराष्ट्र शासनाच्या आव्हानाला साद देऊन सुमारे ११३ हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले .

     या शिबिराचे उद्घाटन पुणे शहराचे माजी उपमहापौर व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. श्री आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी नंदकुमार बानगुडे ,घनश्याम सावंत ,नंदकुमार कोंढाळकर ,रमेश भंडारी ,राजेंद्र बागुल , कपिल बागुल, राहुल जाधव , गोरख मरळ , सागर बागुल ,सतीश पवार, महेश ढवळे ,योगेश निकाळजे, कुमार खटावकर,  आकाश खटावकर, विशाल लोणारे, अशोक शिंदे ,लक्ष्मण जन्नु, किरण वरपे , निखिल सोनवणे ,सुयोग धाडवे व आदर्श सेवा केंद्राचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .
              या प्रसंगी आधार सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष मा.हेमंत आबा बागुल यांनी मनोगत व्यक्त केला .ते म्हणाले सर्व जाती धर्मातील नागरिकांनी रक्त दान करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवून आणले. त्यांनी रक्तदात्यांचे व पुणे ब्लड बँकेचे यांचे विशेष आभार मानले.

जय स्वामी समर्थ मालिकेचा शनिवारी शुभारंभ

0

कलर्स मराठी वर दि . २८ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या ” जय जय स्वामी समर्थ ” या मालिकेचा शुभारंभ शनिवार दि . १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समाधी मठ येथे तर सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर येथे श्री स्वामींची पूजा करुन करण्यात आला . यावेळी मालिकेचे निर्माता दिग्दर्शक राकेश सारंग , लेखक शिरीष लाटकर , अनिमेश सारंग , श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , श्री स्वामी समर्थ महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा सौ चंद्रकला भिसे , श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे , समाधी मठाचे अण्णू महाराज पुजारी , नरेंद्र पुजारी , श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले ,सचिव शाम मोरे आदी उपस्थित होते .

नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरण उद्योग क्षेत्राला पूरक – डॉ नितीन राऊत

0

मुंबई- महाराष्ट्र राज्याचे येत्या ५ वर्षांत सौर प्रकल्पांच्या माध्यमातून १७३८५  MW वीज निर्मितीचे लक्ष्य अलीकडेच जाहीर केलेल्या अपारंपरिक धोरणात असून राज्याच्या उद्योग क्षेत्राला हे धोरण पूरक आहे. या धोरणांर्गत उद्योग व शेतीला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने राज्यात आर्थिक क्षेत्रात क्रांती घडून येईल, असे स्पष्ट प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले. 
कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज (सीआयआय) ने व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित केलेल्या एका परिसंवादाला  संबोधित करताना ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरण आणले आहे. हे नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरण राज्यातील उद्योगांसाठी पुरक आहे. राज्यातील ऊर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी उद्योजक, विकासक यांनी पुढे यावे असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी  या ऑनलाइन परिसंवादात केले. यासाठी सीआयआय समन्वय साधेल असा विश्वासही डॉ राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. अपांरपारिक ऊर्जा सारख्या महत्त्वाच्या विषयावर व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद आयोजित केल्याबद्दल डॉ नितिन राऊत यांनी सीआयआयचे आभार मानले.
सौर ऊर्जा ही औष्णिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे. उद्योगांना स्वस्त वीज उपलब्ध करुन देणे आणि शेतीला दिवसा वीज पुरवठा करणे हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. २५ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्याची महाराष्ट्र राज्याची क्षमता आहे, मात्र ऊर्जा विभागाने येत्या ५ वर्षांत नवीन अपारंपारिक उर्जा धोरणाअंतर्गत १७ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परिषदेत देशभरातील ऊर्जाक्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला.नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरणामुळे या क्षेत्रातील उदयोजक व गुतंवणुकदारांसाठी संधींची दारे उघडली आहेत. या क्षेत्रात गुंतवणुक करण्यास इच्छुक असणाऱ्या उदयोजकांना सिंगल विंडोच्या माध्यमातून सर्व परवानग्या उपल्बध होतील. मोठया सौर प्रकल्पाच्या सहाय्यासाठी एक विशेष अधिकारी उपलब्ध असेल. यासाठी नेमलेली समन्वय समिती दर महिन्याला त्याचा कार्याचा आढावा घेईल. सौर प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जा विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करेल आणि सरकारी जमिनी देखील उपलब्ध केल्या जातील. नवीन अपांरपारिक ऊर्जा धोरणाअंतर्गत शेती कृषी पंपांना दिवसा वीज व ५ लाख सौर कृषी पंप येत्या ५ वर्षांत देण्याचे लक्ष्य असल्याचे डॉ राऊत म्हणाले. सौर प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करावी असे आवाहन डॉ राऊत यांनी उद्योजकांना केले आहे, त्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाहीही डॉ राऊत यांनी उद्योजकांना दिली आहे.
शेतीसह औद्योगिक क्षेत्र हे मुख्यत: वीजेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपणा सर्वांना विजेचे महत्त्व माहित आहे. सध्या वीज निर्मिती प्रामुख्याने कोळशावर अवलंबून आहे. भारतात अंदाजे 80%  वीज निर्मिती ही कोळशाद्वारे थर्मल पॉवर स्टेशनमधून केली जाते. औष्णिक ऊर्जेच्या तुलनेत जल, आण्विक, वायू या  स्त्रोतांपासून वीज निर्मितीचा खर्च खूप कमी  आहे.  राज्य सरकार व केंद्र सरकार सौर ऊर्जेद्वारे वीज क्षेत्राला चालना देण्यासाठी उत्सुक आहेत. २०३० पर्यंत सौर आणि अपारंपारिक ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. अद्यावत तांत्रिक प्रगतीमुळे अपांरपारिक ऊर्जा प्रकल्प, सौर प्रकल्पांमध्ये वित्तीय गुंतवणूक ही व्यावसायिकदृष्टया व्यवहार्य असल्याचे ते म्हणाले.   या उर्जा स्त्रोतांपासून निर्मित वीजेचे दर हे अल्प व आकर्षक असणार आहेत. सध्या केंद्र सरकार या क्षेत्राच्या उन्नतीसाठी विशेष उत्सुक आहे. अपांरपारिक ऊर्जा स्त्रोताच्या माध्यमातून २०३० पर्यंत ३० टक्के वीज निर्मितीचे लक्ष्य आहे.     राज्यात नूतनीकरण उर्जा प्रकल्प राबविण्यास व ते सक्रियपणे वाढीस सीआयआय ही संस्था ऊर्जा विभाग आणि राज्य नियामक विदयुत आयोगाच्या माध्यमातून प्रोत्साहन देत आहे ही बाब माझ्या निदर्शनास आली असल्याचे डॉ राऊत म्हणाले. ऊर्जाक्षेत्राचा कार्यभार हाती घेतल्यावर ऊर्जा क्षेत्रातील अधिकारी, तज्ञ व  सर्व भागदारकांशी मी संवाद साधला असल्याचे राऊत म्हणाले.अपांरपारिक ऊर्जेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कोविड साथीच्या या कठीण काळात सीआयआय़ने आयोजित केलेली ही परिषत कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

“निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल” – अमित शहांची ललकार – तृणमूल काँग्रेसला खिंडार:आजी माजी खासदारांसह ११ आमदार भाजपात

0

कोलकाता :

ममता बॅनर्जी यांच्या सरकारला आज जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी माजी खासदारांसह 11 आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे. वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता नाराजांनी अधिकाऱ्यांसोबत भाजपात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आहे.”निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल” असं म्हणत अमित शहांनी हल्लाबोल केला आहेजेव्हा प. बंगालमध्ये विधानसभेचे निकाल लागतील तेव्हा भाजपा २०० च्या बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. आज ममता बॅनर्जी यांच्या सरकारला जोरदार धक्के देण्यात आले आहेत. आजी माजी खासदारांसह ११ आमदारांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत शहांच्या उपस्थितीच भाजपात प्रवेश केला आहे.

गेल्या वर्षभरापासून ममता यांच्यावर नाराज असलेले शुभेंदू अधिकारी यांनी गेल्याच महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभेत आमदारकीचाही राजीनामा दिल्याने ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांनी ममता सरकारमध्ये नाराज असलेल्या आमदार, खासदारांना फोडण्याचे प्रयत्न केला होता. आज या नाराजांनी अधिकारी यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला. यामध्ये तापसी मोंडल, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सायकत पंजा, शिलभद्र दत्ता, दिपाली बिश्वास, सुक्र मुंडा, श्यामपदा मुखर्जी, विश्वजीत कुंडू आणि बन्सारी मैती यांचा समावेश आहे.

यावेळी अधिकारी यांनी ममता यांच्या सरकारवर टीका केली. प. बंगालची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली आहे. जर राज्याला वाचवायचे असेल तर त्याची कडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यानंतर अमित शहा यांनी ममता यांच्यावर टीका केली. ममता सांगतात की भाजपा सर्व पक्षांतून नेत्यांची आयात करते. मात्र, त्यांना लक्षात आणून देवू इच्छितो की त्यांचा मूळ पक्ष हा काँग्रेसचा होता. ही तर साधी लाट आहे. मी ज्या प्रकारची त्सुनामी पाहतोय, याची ममता यांनी कल्पनाही केली नसेल. ममता आता एकट्याच राहतील. जे लोक भाजपात येत आहेत ते लोक माँ-माटी-मानुषच्या नाऱ्यासोबत पुढे आले होते. आज त्या लोकांचा मोहभंग झाला आहे.

मोदींनी गरीबांसाठी जे अन्नधान्य पाठविलेले ते तृणमूल काँग्रेसने फस्त केले. भाजपाध्यक्षांच्या ताफ्यावर मोठमोठे दगड फेकले गेले, आम्ही यामुळे घाबरणारे नाही. प. बंगालच्या लोकांनी आता सत्तांतराचे मन बनविले आहे, असेही शहा म्हणाले.

आता या नेतृत्त्वाचे फायदे उद्योग जगताने दाखवायला हवेत – टाटा

0

नवी दिल्ली -देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि बडे उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सध्याच्या करोना महामारीच्या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. असोचेम फाउंडेशन वीकच्या संमेलनात ते बोलत होते.“या नेतृत्त्वाचे फायदे दाखवून देणे हे आता उद्योग म्हणून आपलं काम आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही असे करुन दाखवू. गेल्या काही वर्षांत मी पाहिले आहे की, आपण एकत्रित एकत्र येत असताना प्रचंड गोष्टी करतो. त्यामुळे या कठीण काळात जर आपण सर्वजण एकत्र उभे राहिलो आणि आपण मोदींनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागलो तर जग म्हणेल की या पंतप्रधानांनी जसं सांगितलं तसं घडून आलं,” अशा शब्दांत रतन टाटा यांनी पंतप्रधान मोदींचा गौरव केला.

रतन टाटा म्हणाले, “मी आजवरच्या व्यावसायिक कार्यकाळात साथीच्या आजाराची सर्वात भयनाक परिस्थिती यंदा पाहिली. महामारीचा काळ आणि देशाची आर्थिक पातळीवर घसरण झालेली असताना पंतप्रधानांनी केलेल्या कार्याचा मला आदर वाटतो. कारण या काळात तुमचे नेतृत्व अढळ राहिले, तुम्ही दुजाभाव केला नाही, तुम्ही जबाबदाऱ्या झटकल्या नाहीत, तुम्ही पुढे राहून देशाचे नेतृत्व केले.”

महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक कार्याची दुसऱ्यांदा देशातील एका बड्या उद्योजकानं दखल घेतली आहे. यापूर्वी आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मोदींचे करोना काळातील नेतृत्वाचे आणि कामाचे कौतुक केले होते.

“तु्म्ही लॉकडाउन लागू केला, काही मिनिटांसाठी तुम्हाला देशानं दिवे बंद करावे असं वाटत होतं. तुम्ही यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. यामध्ये वरवरचं वाटणं आणि दिखाऊपणा नव्हता, देशानं एकत्र यावं हाच यामागील उद्देश होता,” असेही रतन टाटा म्हणाले.

विषाणूच्या नियंत्रणामुळे एप्रिल-जूनमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के घट झाली आणि त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ७.५ टक्के घट झाली. देशातील सर्वात गरीब लोकांना मोफत अन्न आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी वित्तीय पाठबळात वाढ होत असताना तिला चालना देण्यासाठी आणि पतपुरवठा वाढविण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाय केले. मोदी सरकारने याच काळात कामगार सुधारणांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच शेतीविषयक सुधारणांचा मार्ग धरला. तर भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी १० हून अधिक क्षेत्रांच्या उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन देणारी धोरणे तयार केली, असेही टाटा यावेळी म्हणाले.

मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या साधू-महंतांनी भगवान श्री कृष्णाचा ‘तो’ संदेश लक्षात ठेवावा; काँग्रेस नेते सचिन सावंत

0

मुंबई– मध्य प्रदेशच्या धर्तीवर विधानपरिषदेवर घेऊन मंत्रिपदे द्या अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री यांनी केली आहे. त्यासाठी महंत लवकरच राज्यपालांनी भेट घेणार आहेत. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या साधू-महंतांनी श्री कृष्णाचा संदेश लक्षात ठेवावा असेही ते म्हणाले.नाशिकमधल्या साधू संतांनीही आता मंत्रिपदाची मागणी केली आहे.

यावेळी सचिन सावंत यांनी मंत्रिपदाची मागणी करणाऱ्या महंतांना श्री कृष्णाने सांगितलेला एक श्लोक समजून सांगितले. स्वतःला साधू, महंत संन्यासी म्हणवणाऱ्यांनी श्री कृष्णाने दिलेल्या संदेशाच्या विपरीत मागणी केली असल्याचे सावंत म्हणाले.

सावंत यांनी श्री कृष्णाच्या ध्यान युगातल्या चौथ्या चरणातील एका श्लोकाचा अर्थ सांगत महंतांना उत्तर दिले. जो भौतिक कामनांचा त्याग करतो, जो कुठलीही आसक्ती ठेवत नाही, इंद्रिय सुखासाठी कर्म करत नाही तो योगारूढ झाला असे समजावे, असे श्री कृष्णाने सांगितले आहे. त्यामुळे भौतिक कामनांसाठी करत असलेल्या मागण्या भगवान श्री कृष्णाच्या संदेशाच्या विपरीत आहेत, असेही सचिन सावंत म्हणाले.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 389

0

पुणे विभागातील 5 लाख 26 हजार 697 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 53 हजार 520 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 19 :- पुणे विभागातील 5 लाख 26 हजार 697 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 53 हजार 520 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 389 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 434 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 55 हजार 174 रुग्णांपैकी 3 लाख 37 हजार 786 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 797 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 591 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.10 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 507 रुग्णांपैकी 50 हजार 791 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 972 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 108 रुग्णांपैकी 45 हजार 179 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 251 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 678 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 362 रुग्णांपैकी 45 हजार 356 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 281 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 369 रुग्णांपैकी 47 हजार 585 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 88 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 773 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 550, सातारा जिल्ह्यात 86, सोलापूर जिल्ह्यात 101, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण – *
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 948 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 602, सातारा जिल्हयामध्ये 150, सोलापूर जिल्हयामध्ये 103, सांगली जिल्हयामध्ये 40 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 53 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 31 लाख 45 हजार 358 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 53 हजार 520 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 18 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

21 शतकात भारत जागतिक कौशल्याची राजधानी बनेल

0

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचे विचारः
 चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चा समारोप समारंभ
डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे: “नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेवर अधिक भर देण्यात येणार आहेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणारे हे धोरण 21 व्या शतकात जागतिक कौशल्य राजधानी बनविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.”असे उद्गार केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री . महेंद्रनाथ पांडे यांनी काढले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित चौथ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) च्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावर्षीची परिषद ‘ राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ः उपलब्ध संधी’ या मुख्य विषयवर होती.
या प्रसंगी हिमाचल प्रदेशाचे उच्च शिक्षण मंत्री गोविंदसिंग ठाकूर, रिसर्च अ‍ॅण्ड इन्व्होवेशन सर्कल हैद्राबादचे महासंचालक डॉ. अजित रांगणेकर आणि जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासन प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजीचे संस्थापक व खासदार डॉ. अच्युत समंता यांना ‘जीवन गौरव पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी. राव आणि प्र कुलगुरू प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
ही परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने भरविली गेली होती.
केंद्रीय मंंत्री महेंद्रनाथ पांडे म्हणाले,“ भविष्य ओळखून देशात 26 हजार सेटअप, 2 हजार पेक्षा अधिक ट्रेनिंग संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. त्या माध्यमातून 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना त्यांच्या कौशाल्यांला वाव दिला जात आहे. 2025 पर्यंत देशातील 50 टक्के विद्यार्थ्यांना कौशल्य विकास क्षेत्रात सामावून घेतले जाईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षणाला एकत्रित करून योग्य दिशा देण्याचे काम केले जात आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर अधिक भर देत आहोत. पंतप्रधान कौशल्य विकास योजना आता तिसर्‍या चरणात आहे. यामध्ये काही विशेष पाठ्यक्रम शिकविले जाणार आहेत. परिसरातील मागणीनुसार त्या त्या ठिकाणी कौशल्य शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. 21 व्या शतकात शिक्षण संस्था आणि शिक्षक भारताला पुढे घेऊन जाणार आहे आणि वसुधैव कुटुम्बकम नुसार मानवाची सेवा घडेल.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशाला नवीन आकार मिळणार आहे. तसेच यामुळे शिक्षकांचे भवितव्य सुद्धा उज्वल होईल. आज देशाचे भवितव्य हे शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळेच शिक्षण आणि नवनर्मिती हे 21 व्या शतकातील कळीचे मुद्े आहेत. संकट ही संधी बनते हे सोलापूरच्या एक शिक्षकाने 1 कोटी रूपयांचा पुरस्कार मिळवून सिद्ध करून दाखविले आहे. शिक्षकांमध्ये अंतःकरणात प्रेरणा आणि स्फूर्ती असावी. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये  ऐकणे, विचार करणे आणि विचार घडविण्यासारखे गुण निर्माण करावे.”
डॉ. अच्युत समंता म्हणाले,“ नवनिर्मिती, पृथक्करण व एकिकरण ही शिक्षणाची त्रिसूत्री आहे. गरीब आणि आदिवासी मुलांना द्रारिद्—य आणि अज्ञान या पासून वर काढावयाचे असेल तर दर्जेदार शिक्षण हाच एक उपाय आहे. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. इंटरनेटच्या युगात शिक्षकाची भूमिका अधिक जवाबदारीची झालेली आहे. शिक्षण पद्धती लवचिक बनवावी. नवीन राष्ट्रीय शिक्षण पद्धती ही मूलभूत बदल घडवून आणणार आहे. आम्ही नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रवीण केले. त्यामुळे या देशाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळाले आहेत.”
डॉ. अजित रांगणेकर म्हणाले,“ येत्या 10 वर्षात या देशात अतिशय सकारात्मक परिणाम दिसणार आहेत. एकंदरीतच समाजात परिवर्तन होईल. या साठी महत्वाचा मुद्दा म्हणजे आंतरिक बदल हवा. आत्मविश्वसामुळेच हे शक्य होईल. तिसरा घटक म्हणजे सहकार्याची आवश्यकता आहे. यूजीसी सारख्या संस्थेवर आम्ही टीका करतो पण आत्मपरीक्षण करीत नाही. त्यासाठी आपली मनोवृत्ती बदलावी लागेल. सतत सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा शिक्षकांची उंची कशी वाढविता येईल यावर लक्ष केंद्रित करावे. आज तंत्रज्ञानमुळे विद्यार्थी हवा तो अभ्यासक्रम शिकू शकत आहे. जेव्हा सर्वजण पुढाकार घेतील तेव्हाच राष्ट्रीय शिक्षण धोरण यशस्वी होईल.”
हिमाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री गोविंदसिंग ठाकूर म्हणाले,“स्वातंत्र्यानंतर शिक्षणाच्या रचनेत हवी तशी सुधारणा झाली नाही. म.गांधी म्हणत, ब्रिटिश येण्यापूर्वी शिक्षणाची चांगली पद्धती होती. पण त्यांच्या आगमनानंतर ती उध्वस्त झाली. शिक्षणामध्ये आई वडिलांपेक्षा शिक्षकांची भूमिका अधिक महत्वाची आहे. शिक्षकांनी प्राचीन काळापासून आता पर्यत या देशाला सांभाळले आहे. शिक्षकांमुळे येथील विद्यार्थी हे जगाला ज्ञान देईल. मला अशी खात्री आहे की भविष्यात भारत विश्वगुरू बनेल.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आम्ही आमच्या संस्थेत वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती रूजवित आहोत. पुढील काळात स्कूल ऑफ कॉन्शसनेस व स्कूल ऑफ रियॅलिटी सुरू करण्याची आवश्यकता आहे. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक परिवर्तन होईल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ या परिषदेमुळे विचार मंथन घडवून काही ठोस सिद्धांत पुढे येतील. त्यामुळे भविष्यात शिक्षकच देशाचा शिल्पकार असेल.”
डॉ. एन.टी.राव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रशांत दवे यांनी स्वगातपर भाषण केले.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुहासिनी देसाई यांनी आभार मानले.